Latest Post


माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे,

‘‘पैगंबर मुहम्मद (स.) अल्लाहचे स्मरण सतत करीत असत.’’ (हदीस : मुस्लिम)


स्पष्टीकरण

अल्लाहशी प्रत्येक स्थितीत व प्रत्येक वेळी पैगंबर मुहम्मद (स.) स्वत:चे संबंध स्थापित करून होते. ईशस्मरण प्रत्येक वेळी सतत व प्रत्येक स्थितीत सतत करणे मनुष्यासाठी  आवश्यक आहे कारण हे मनुष्याचे आध्यात्मिक खाद्यच नव्हे तर मनुष्यसामथ्र्याचा मूळदााोत आहे. मानव एक संवेदनशील व सक्रिय अस्तित्व आहे. मनुष्याची जगातील भूमिका शेतकरी व कर्मवीराची आहे. भोजन करणे, कर्म व सक्रियता मनुष्याची अनिवार्य विशेषता आहे. मनुष्य कधी संकल्प व हेतुविरहीत असू शकत नाही. म्हणून मनुष्यासाठी आवश्यक  आहे की त्याचा कोणी आदर्श व प्रियतम असावा जो त्याच्या प्रेमाचा व संकल्पाचा केंद्रबिंदू असावा. मनुष्यासाठी सर्वश्रेष्ठ बाब ही आहे की त्याचा प्रियतम अल्लाह असावा. मनुष्य  अल्लाहशी विमुख होत असेल तर त्याची आसक्ती इतर दुसऱ्याशी असेल. अशा प्रकारे मनुष्य स्वत: श्रेष्ठत्व व उच्च स्थानापासून खाली कोसळेल.


ह्या पुस्तिकेत जमाअत-ए-इस्लामी हिंदचा अल्पसा परंतु उपयुक्त परिचय करून देण्यात आला आहे. अपरिचितांना जमाअतचा परिचय एका दृष्टिक्षेपात व्हावा म्हणून लेखकाने अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली आहे.

जमाअतचे ध्येय-धोरण तसेच मूलभूत तत्त्व सांगून जमाअतचे कार्य व धोरण थोडक्यात स्पष्ट करण्यात आले आहे. संघटनात्मक कार्य, राष्ट्रीय एकात्मकता आणि निवडणुकीचे राजकारणसुद्धा थोडक्यात स्पष्ट करण्यात आले आहे.             

आयएमपीटी अ.क्र. 229  -पृष्ठे - 08      मूल्य - 06  आवृत्ती - 1 (2014)


डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/31znn1v7j9uo2l4htgxwug436g4eh4r2


quran

कुरआनकडे आकर्षित होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी आज तीन कारणांची आपण कारणमिमांसा करूया. 

1. सहनशिलता :

कुरआनमध्ये सहनशिलतेचे विस्ताराने वर्णन करण्यात आलेले आहे, ते केवळ वाचनासाठी नसून अनुकरणासाठी आहेत. सहनशीलता माणसाला आज ना उद्या नक्कीच यशस्वी करते. सहनशिल माणूस कधीच पराजित होवू शकत नाही. असहनशिलता ही भौतिक आकर्षण तसेच चंगळवादामुळे माणसांमध्ये निर्माण होते. आपल्या आजूबाजूला असणारे आपलेच लोक जेव्हा चंगळवादी जीवन जगत असतात तेव्हा आपल्या सीमित संसाधनामध्ये समाधानाने जगण्यासाठी सहनशिलतेचाच आधार असतो, नसता अनेक माणसे इतरांसारखे चंगळवादी जीवन जगण्याच्या इच्छेपोटी आपली ऐपत नसतांना अधिक खर्च करतात व त्या खर्चाचा मेळ घालण्यासाठी सुरूवातीला अनैतिक आणि नंतर अपराधिक कृत्यामध्ये सुद्धा लिप्त होवून जातात.  सहनशिलते संदर्भात कुरआनमध्ये खालीलप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. 

अ) ’’जो मनुष्य संयमाने वागेल आणि क्षमा करेल तर हे मोठे साहसी कर्मा पैकी एक कर्म आहे.’’ (सुरह : अश्शुरा, आयत क्र. 43). संयमाने वागणे हे सर्वांनाच जमण्यासारखे काम नाही, त्याला साहसाची गरज असते. असाहसी माणसे सहनशील असू शकत नाहीत. जी माणसं स्वतःच्या इच्छेचे गुलाम असतात त्यांच्यात सहनशीलता नसते. माणसात सहनशीलता निर्माण होण्यासाठी एक ईश्वरावर विश्वास ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे. वर नमूद आयतने मला सहनशील बनण्यासाठी भरपूर मदत केलेली आहे. म्हणून मी कुरआनकडे आकर्षित झालो. 

ब) ’’मग हे पैगंबर (सल्ल.) संयम राखा ज्याप्रमाणे दृढनिश्चयी प्रेषितांनी संयम राखलेले आहेत.’’ (सुरह : अलकहफ आयत क्र. 35). जे वाचक प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनाशी परिचित आहेत, त्यांना माहिती आहे की, प्रेषितांनी किती कठीण परिस्थितीत जीवन व्यतीत करून मानवतेच्या कल्याणाचे मिशन  पूर्ण केलेले आहे. विशेषतः त्यांच्या मक्काकालीन जवळ-जवळ 13 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना व त्यांच्या साथीदारांना ज्या अत्याचाराला सामोरे जावे लागले, तेव्हा त्यांनी ज्या सामुहिक संयमाचा परिचय दिला, तो केवळ अद्वितीय आहे आणि हा संयम कुरआनच्या शिकवणीमधूनच येवू शकतो. म्हणूनच कुरआनच्या या शिकवणीकडे मी आकर्षित झालो. 

2. परोपकार :

परोपकारासंबंधी कुरआनमध्ये एक ड झनापेक्षा जास्त आयतींमध्ये अशी ताकीद करण्यात आलेली आहे की, ज्यांचा कुरआनवर विश्वास आहे त्यांनी जीवनात परोपकार करावेत. प्रेषितांना यासंबंधी ताकीद करतांना ईश्वराने परोपकारासंबंधी इतक्या विस्ताराने सूचना दिल्या की, त्यानंतर प्रेषितांनी श्रद्धावंतांना परोपकाराची ताकीद करतांना आपल्या शब्दांवर एवढा जोर दिला की त्यांच्या साथीदारांना अशी शंका निर्माण झाली की, प्रेषित आता शेजाऱ्याला आमच्या संपत्तीमध्ये वारसाहक्क सुद्धा देतात की काय? या ठिकाणी शेजारी हा कोणत्याही जाती, धर्माचा असो परोपकार करतांना त्याचा पहिला अधिकार कुरआनने मान्य केलेला आहे. म्हणून मी कुरआनकडे आकर्षित झालो. परोपकारासंबंधात कुरआनमध्ये जे अनेक आदेश दिलेले आहेत त्यापैकी दोन निवडक आदेश खालीलप्रमाणे -

1. ’’ईश्वराच्या मार्गात खर्च करा आणि आपल्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नका आणि सद्वर्तन करा ईश्वराला सद्वर्तन करणारेच आवडतात.’’ (संदर्भ : सुरे बकरा आयत नं. 195). 

यात ईश्वराच्या मार्गात खर्च करण्याची ताकीद करण्यात आलेली आहे. स्पष्ट आहे ईश्वराच्या मार्गात खर्च करणे म्हणजे पुण्यकामात खर्च करणे होय. याचाच अर्थ असा की, माणसाने कष्टाने कमाविलेली संपत्ती ही  वाईट किंवा वाममार्गात खर्च करता येत नाही किंवा वाजवीपेक्षा जास्त संचितही करूनही  ठेवता येत नाही. कारण ईश्राच्या मार्गात खर्च करण्याची नुसती सुभाषितवजा सूचनाच करण्यात आलेली नसून, प्रत्यक्षात तो खर्च केला नाही तर स्वतः आपल्या हाताने स्वतःचा विनाश ओढवून घेण्यासारखे आहे, असे म्हटलेले आहे. या शब्दांवर गांभीर्याने विचार करताच प्रत्येक बुद्धीमान माणूस ईश्वराच्या मार्गात खर्च करण्यासाठी प्रेरित झाल्याशिवाय राहत नाही. या आयातीमुळे सुद्धा मी कुरआनकडे आकर्षित झालो.

2. ’’ जे लोक आपली संपत्ती  ईश्वराच्या मार्गात खर्च करतात आणि खर्च केल्यानंतर त्यावर उपकार दर्शवित नाहीत आणि दुःख देत नाहीत त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ आहे आणि त्यांच्याकरिता कोणताही दुःख आणि भयाचा प्रसंग नाही.’’ (सुरह बकरा आयत नं. 262) . 

या आयातीमध्ये जे मार्गदर्शन  करण्यात आलेले आहे त्याच्या उलट लोकांचा व्यवहार असल्याचा आपण याची देही याची डोळा पाहत असतो. कोणाची मदत केली तर लगेच त्याच्यावर आपण उपकार केले अशा पद्धतीने लोक वागू लागतात. विशेषतःसावकारीमध्ये ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. गरीब, शेतकरी किंवा मजूर जेव्हा सावकाराकडून अडल्यावेळी व्याजी ऋण घेतात त्यावेळेस ऋण दिल्यानंतर सावकाराचे त्यांच्याशी वागणे कसे असते हे कोणापासून लपलेले नाही. वास्तविक या ठिकाणी सावकारांनी कर्जदाराची मदत केलेली नसते तर व्याजी पैसे दिलेले असतात. तरी परंतु, त्याचा व्यवहार कर्जदारावर उपकार केल्यासारखा असतो. म्हणून श्रद्धावंतांना ही सक्त ताकीद देण्यात आलेली आहे की, कोणाचीही मदत जर करत असाल, ईश्वराच्या मार्गात खर्च जर करत असाल, तर ज्याच्यावर खर्च केला त्याच्यावर चुकूनही उपकार केल्याची भावना उत्पन्न होवू देऊ नका. या आयातीमध्ये मानवाच्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या उपकाराच्या भावनेची इतकी सुंदर व्याख्या केलेली आहे की, तिच्याकडे कोणताही सद्सद्विवेकबुद्धी असलेला माणूस आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनसुद्धा मी कुरआनकडे आकर्षित झालो. या संदर्भात एक ऐतिहासिक घटना माझ्या वाचनात आली की, एकदा हजरत अबु हनिफा हे भर दुपारी उन्हात कोणाचीतरी वाट पाहत उभे होते. रस्त्याने जाणाऱ्या माणसाने त्यांना हटकले व म्हटले की, ’’इमामसाहेब उन्हात का उभे आहेत बाजूलाच भींतीची सावली आहे तिथे उभे रहा.’’ तेव्हा ते उत्तरले की, ’’मित्रा, मी ज्याची भींत आहे त्याला कर्जाऊ रक्कम दिलेली आहे. त्याच्या भींतीची सावली घेणे म्हणजे त्या रकमेवर व्याज घेतल्यासारखे वाटते. म्हणून मी उन्हात उभा आहे.’’ 

आदर्शवादाची एक अत्युच्च पातळी असनेतून दिसून येते. 

3. बंधुभाव

 ’’ हे श्रद्धावंतांनों ! आपले दान, उपकार दाखवून आणि दुःख देउन त्या माणसासारखे मातीत मिसळू नका जो आपली संपत्ती लोकांना दाखविण्यासाठी खर्च करतो आणि ईश्वरावर आणि परलोकावर श्रद्धा ठेवत नाही. त्याच्या खर्चाचे उदाहरण असे आहे जणू एक खडक होता, त्याच्यावर मातीचा थर जमलेला होता, त्यावर जेव्हा जोराची वृष्टी झाली तेव्हा सर्व माती वाहून गेली आणि स्वच्छ खडक ते खडकच उरले. असे लोक आपल्यासाठी दान देउन जे पुण्य कमवितात त्यापासून त्यांच्या हाती काहीच लागत नाही आणि श्रद्धावंतांना सरळ मार्ग दाखविणे हा ईश्वराचा शिरस्ता आहे.’’ (सुरह बकरा आयत नं. 264.) आयत क्रमांक 262 मध्ये नमूद केलेल्या मानवी भावनेचा अधिक विस्ताराने आणि प्रभावशाली शब्दांचा वापर करून ईश्वराने ही ताकीद केलेली आहे की दुसऱ्यावर केलेल्या उपकारासंबंधी कधीच गर्व बाळगू नका आणि त्याच्याशी वर्तन करताना त्याच्यावर आपण उपकार केल्याची जाणीव त्याला होवू देऊ नका, असे करणे म्हणजे टणक खडकावर जमलेला मातीचा थर एका हलक्याशा पावसाच्या सरीने जसा वाहून जातो तसे होण्यासारखे आहे. कुरआनच्या या मोहित करणाऱ्या शब्दरचनेमुळे मी त्याकडे आकर्षित झालो आहे. 

(क्रमशः)


- किशन जयवंतराव पाटील 

मुखेड जि.नांदेड 

मो.9175793247

(लेखक हे कुरआनचे अभ्यासक आणि उपासक आहेत.)हा एकमेव असा सूरह आहे ज्यात मनुष्याबरोबर पृथ्वीवरील दुसरे स्वतंत्र प्राणी-जिन्नाना-संबोधित करण्यात आले आहे. दोघांना अल्लाहचे सामर्थ्य, त्याचे अनेकानेक उपकार आणि त्याच्या तुलनेत निर्मितीच्या असहाय व सामर्थ्यहीन अवस्थांचे वर्णन आले आहे. हिशेब देण्याबद्दलची जाणीव (उत्तरदायित्व) करून त्यांच्या अवज्ञेच्या वाईट परिणामांपासून सावध करण्यात आले आहे.

हा सूरह स्पष्ट करतो की अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) आणि कुरआनचे आवाहन हे जिन्न व मनुष्य दोघांसाठी आहेत. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे प्रेषित्व फक्त मनुष्यमात्रापर्यंतच सीमित नाही.

आयएमपीटी अ.क्र. 228   -पृष्ठे - 40   मूल्य - 20  आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/lmur3fbpck71kens569b2qu8odl1t0xmमाननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे,

‘‘अल्लाहच्या पैगंबरांचे चारित्र कुरआन होते.’’ (हदीस : मुस्लिम) 


स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) कुरआनला अभिप्रेत मणुष्याचे पूर्ण आदर्श होते. कुरआन शिकवणींनुसार ज्या उच्च दर्जाचा मनुष्य अपेक्षित आहे, त्यानुसार पैगंबर मुहम्मद (स.) पूर्ण आदर्श  मानव होते. कुरआनमध्ये ज्या महान नैतिक शिकवणी आल्या आहेत त्या सर्वांना पैगंबरांच्या चरित्रात आणि व्यक्तिमत्त्वात तुम्ही पाहू शकता. पैगंबर मुहम्मद (स.) कुरआन  शिकवणीचे एक जिवंत व पूर्ण आदर्श होते. कुरआनरूपात ईशआदेशच फक्त कयामतपर्यंत सुरक्षित करण्यात आले नाही तर यासोबत पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवनसुद्धा कुरआनद्वारा कयामतपर्यंत सुरक्षित झाले आहे. पैगंबरांच्या पवित्र जीवनावरील सर्व ग्रंथ हरवले तरी तुम्ही त्यांचे पवित्र जीवनचरित्र व व्यक्तिमत्त्वाला कुरआनमध्ये पाहू शकता.पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या दृष्टीने या सूरहचे अतिमहत्त्व आहे. म्हणूनच ते या सूरहचा विषय लोकांपर्यंत पोहचविण्याचा अनेकदा प्रयत्न करीत असत. या सूरहवर विचारपूर्वक मनन चिंतन केल्याने त्याचे महत्त्व कळून येते.

हा सूरह पारलौकिक जीवनाशी संबंधित आहे. मृत्यूपश्चात सर्व लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल यावर मक्कावासी अचंबित होत होते. त्या जगातील आपल्या कार्याचा हिशेब द्यावा लागेल यावर त्यांचा विश्वास नव्हता. सदाचारी त्यावेळी जन्नतमध्ये आणि दुराचारी जहन्नममध्ये जातील, हे ऐकून ते आश्चर्यचकित होत असत.  

आयएमपीटी अ.क्र. 227   -पृष्ठे - 36     मूल्य - 18  आवृत्ती-1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/bgn53pv9ulk0v9uhhfsk65ksfvmxr9q2माननीय बराअ (रजि.) यांचे कथन आहे,  ‘‘पैगंबर मुहम्मद (स.) सर्वांपेक्षा अधिक सुंदर व सर्वांपेक्षा जास्त सुशील स्वभावी होते. ते अतिउंच नव्हते की उंचीने लहानसुद्धा नव्हते.’’  

(हदीस : बुखारी)


स्पष्टीकरण

अल्लाहने पैगंबर मुहम्मद (स.) यांना आंतर्बाह्य दोन्ही प्रकारचे सद्गुण प्रदान केले होते. चेहरेपट्टीनुसारच ते सुंदर नव्हते तर त्यांचा स्वभाव व चारित्र्यसुद्धा अतिसुंदर तसेच उच्च व  श्रेष्ठ होते. कुरआनमध्ये पैगंबरांना संबोधन करण्यात आले आहे,

‘‘आणि नि:संशय तुम्ही महान नीतिमत्तेच्या उच्च दर्जावर आहात.’’ (दिव्य कुरआन, ६८:४)


statcounter

MKRdezign

Contact form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget