May 2018

इस्लाममध्ये रमजानला एवढे महत्व का? त्याची कुरआनाच्या आधारे दिलेली माहिती

रमजान हा सुरुवातीला अरबी कॅलेंडरमधील नवव्या क्रमांकाचा सर्वसामान्य महिन्यासारखा एक महिना होता. मग त्याला एवढे महत्व का प्राप्त झाले? याचे उत्तर कुरआनात सापडते -
कुरआनात अल्लाह सांगतो -
''रमजान तो महिना आहे ज्यात कुरआन अवतरित झाले, जे समस्त मानवांकरिता मार्गदर्शन आणि सत्य - असत्य स्पष्ट करण्याचे मापदंड आहे.'' - कुरआन (२:१८५)
याचा अर्थ रमजानला कुरआनच्या अवतरणामुळे महत्व प्राप्त झाले आहे. आता हे अवतरण झाले म्हणजे नेमके काय झाले? हे सविस्तरपणे आपण पाहू या-
प्रेषित मुहम्मद सल्लम यांना प्रेषित्व प्राप्त होण्यापूर्वी म्हणजे ते चाळीस वर्षांचे होते त्यावेळी त्यांना या सृष्टीच्या निर्मिकाची तीव्रतेने ओढ लागली होती. ते अल्लाहचे नामःस्मरण, चिंतन-मनन  करण्याकरिता मक्का शहराच्या बाहेर काही अंतरावर असलेल्या हिरा गुहेत जाऊन बसायचे. रमजानच्या महिन्यातील अशाच एका रात्री ते त्या गुहेत चिंतन मनन करत असतांना त्यांना ''जीब्रइल'' नावाचे ईशदूत (फरिश्ते) दिसले. फरिश्ते हे अल्लाहचे दूत असतात. त्यांना वेगवेगळे काम अल्लाहने सोपवलेले आहेत. ते नेमके कसे दिसतात, त्यांचे नेमके स्वरूप काय आहे, त्याबद्दल फार जास्त माहिती सापडत नाही. जीब्रइल हे त्यापैकी सर्वात महत्वाचे फरिश्ते मानले जातात. त्यांच्याकडे प्रेषितांपर्यंत अल्लाहचा संदेश पोहोचविण्याची जबाबदारी असते. असे संदेश ते प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यापूर्वीही आलेल्या अनेक प्रेषितांपर्यंत पोहोचवत होते.
प्रेषित मुहम्मद सल्लम हे इस्लामचे संस्थापक असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. त्यांच्यापूर्वीही जवळपास एक लाख चोवीस हजार प्रेषित आलेले आहेत. भूतलावरील पहिले मानव आदम हे इस्लामचे पहिले प्रेषितदेखील होते. त्या प्रेषितांकडेही जीब्रइल हेच ईशदूत येत होते. त्या रात्रीही तेच जिब्रइल अल्लाहचा संदेश घेऊन आले होते. काही इतिहासकार सांगतात कि, त्यांनी सोबत एक प्रकाशमान पटलावर लिहिलेले शब्द दाखवत प्रेषित मुहम्मद सल्लम यांना सांगितले -
''इकरा (वाचा)''
प्रेषितांनी उत्तर दिले कि, ''मला वाचता येत नाही.'' कारण प्रेषित हे उम्मी (अक्षरशून्य) होते. त्यांचा कुणीही गुरु नव्हता. गुरुविनादेखील मुक्ती शक्य आहे, हे प्रेषितांनीच जगाला कृतीतून शिकविले. जिब्रइल यांनी प्रेषितांना छातीशी घट्ट धरले आणि पुन्हा सांगितले -
''वाचा!''
असे तीनवेळा झाल्यानंतर प्रेषितांनी वाचायला सुरुवात केली. त्या प्रसंगानंतर पुढे कुरआनचा एक एक अध्याय वेगवेगळ्या प्रसंगानुरूप अवतरित होत गेला. अवतरित झाल्यानंतर प्रेषित ते मुखोदगत करून घ्यायचे. अल्लाहने प्रेषितांना कुरआन पाठ करण्याची एक जबरदस्त क्षमता प्रदान केली होती. अध्याय अवतरित होण्याचे तीन प्रकार होते. एक तर फरिश्ता मानवी रूपात येऊन अध्याय सांगायचा, दुसरा प्रकार म्हणजे स्वप्नात अध्याय सांगितला जायचा आणि तिसरा प्रकार म्हणजे अध्याय थेट अल्लाहकडून प्रेषितांच्या हृदयावर अवतरित होत होते. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी फार जड जात होती. कोणतीतरी जड वस्तू विजेसारखी आकाशातून येऊन हृदयावर पडत असल्याचा आभास त्यांना व्हायचा आणि तो अध्याय त्यांच्या मनःपटलावर जणू कोरला जायचा. नंतर तो अध्याय प्रेषित लोकांसमोर पठन करायचे आणि लोकं ते झाडांच्या पानावर, जनावरांच्या चामड्यावर किंवा लाकडांच्या पाटयावर लिहवून घेत होते. पुढे खलिफा उस्मान गनी यांनी एक आयोग नेमून त्या मूळ प्रतीच्या अनेक लिपिबद्ध करून त्याच्या शंभर प्रति जगभरात पाठवून दिल्या. आजही त्या अस्तित्वात आहे. अशाप्रकारे कुरआन रमजान महिन्यात अवतरण्यास प्रारंभ होऊन प्रेषितांद्वारे अल्लाहकडून (भगवंताकडून) भक्तांपर्यंत पोहोचला. पण या ज्ञानरूपी गंगोत्रीची सुरुवात याच रमजानमध्ये झाली होती. याच महिन्यात जगभरात कुराणाचा समता व एकत्वाच्या संदेशाचा जमजम झरा वाहू लागला होता.

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

पवित्र कुरआनचे इस्लाम धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे, मात्र रमजानमध्ये ते आणखी जास्त आहे.

रमजानमध्ये कुरआन इतर दिवसांच्या तुलनेत सर्वात जास्त पठण केले जाते, श्रवण केले जाते. कारण रमजान व कुरआन यांचा फार घनिष्ट संबंध आहे. ज्याप्रकारे एखाद्या वृत्तपत्राचा पहिला अंक ज्या दिवशी प्रकाशित होतो, त्याच तारखेला दरवर्षी त्याचा वर्धापन दिवस साजरा करण्याची पद्धत काही ठिकाणी असते. अशाप्रकारे रमजान हा जणू कुरआनचा एकप्रकारे वर्धापन मास आहे. कारण याच महिन्यात कुरआनचा पहिला श्लोक अल्लाहकडून प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावर अवतरित झाला होता.

या महिन्यात जे रोजे अनिवार्य करण्यात आले त्याचा उद्देशही रोजाधारकाला अल्लाहच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊन लोकांना ईशपरायण बनविणे आहे. ईशपरायण म्हणजे ईश्वराने, अल्लाहने जे करायला सांगितले ते सत्कर्म करणे आणि जे करायला मनाई केली ते करू नये. मग अल्लाहने काय करायला सांगितले आणि कशाला मनाई केली हे कसे माहीत होईल? तर त्यासाठीचे मार्गदर्शन म्हणून कुरआन अवतरित केले. अशाप्रकारे रमजान, कुरआन व रोजे यांचा आपसात घनिष्ट संबंध आहे.
या कुरआनचा विषय 'माणूस' आहे. जीवन कसे जगावे, प्रेषितांनी आणि इतर महापुरुषांनी जीवन कसे जगले, त्यांना त्याचा योग्य मोबदला कसा मिळाला आणि पारलौकिक मोबदला कसा मिळणार आहे, तसेच ज्या वाईट लोकांनी अल्लाहचा कल्याणकारी संदेश नाकारला त्यांचे लौकिक व पारलौकिक नुकसान कसे झाले त्याचे सोदाहरण विवेचन यात आलेले आहेत. वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनात निर्णय घेतांना कोणते निकष वापरावे याचे सुंदर मार्गदर्शन यात आहे.

हा एक अध्यात्मिक ग्रंथ तर आहेच, शिवाय यात संपूर्ण जीवन व्यवस्थेचे कायदे देखील आहेत. हे कायद्याचे पुस्तकदेखील आहे. अल्लाह, प्रेषितांचे प्रेषित आणि मरणोत्तर जीवनाचे अस्तित्व हे काही ठिकाणी वैज्ञानिक दाखले देऊन भोवतालच्या सृष्टीची तसेच कुरआनचीही चिकित्सा करण्याचे आवाहन यात करण्यात आले आहे. सारांश असा कि, अल्लाहने कुरआनात सर्वोच्च स्थान मानवी जीवाला दिलेले  आहे. अल्लाहसाठी मानवापेक्षा कोणतीच निर्मिती श्रेष्ठ नाहीये. हा सन्मान माणसाला अल्लाहने कुरआनात दिला आहे. म्हणूनच अल्लाहने एका जीवाची हत्या म्हणजे पूर्ण मानवतेची हत्या संबोधले आहे. (संदर्भ: अध्याय- ५, श्लोक क्र. ३२)

परंतु कुराणविषयी अनेक गैरसमज पसरले आहेत. त्याच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे कुरआनचा एखादा श्लोक समजून घेण्यासाठी तो कोणत्या परिस्थतीत अवतरला, त्या पार्श्वभूमीनुसार त्याचा अर्थ घ्यावा लागतो. उदाहरणार्थ गांधीजींनी ''अंग्रेजो भारत छोडो'' म्हटले तर याचा अर्थ प्रत्येक युरोपियन मूळच्या माणसाने भारत सोडून दिला पाहिजे आणि पुन्हा कधी त्या देशातल्या कोणत्याच माणसाने भारतात पायच ठेवला नाही पाहिजे, असा होत नाही. कारण गांधीजींनी ते फक्त जुलमी सत्ताधारी इंग्रजांना उद्देशून बोलले होते, ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतो. तसेच कुरआनचा एखादा श्लोक युद्धप्रसंगी अवतरीत झाला आणि त्यात मुस्लिमेतरांवर कारवाई म्हणून त्यांना मारण्याचा आदेश आला तर याचा अर्थ प्रत्येक युगातल्या प्रत्येक मुस्लिमेतराला ठार करण्याचा तो आदेश नसून, जुलमी सत्ताधारीशी जर युद्ध झाले तर त्यावेळी वैध मार्गाने करावयाची कार्रवाईसंबंधी तो नियम असतो. याचा अर्थ कुरआन कालबाह्य आहे, असे नाही. तर ती परिस्थिती भविष्यातही उदभवू शकत असल्यामुळे तो आदेश त्रिकालाबाधित ठरतो. परंतु तो आदेश सरसकट एखाद्या समाज किंवा धर्मसमूहाविरुद्ध नसतो. म्हणून कुरआनचा अभ्यास शक्यतोवर त्यावरील भाष्य ( तफसीर)मधून केलेला बरा . कारण त्याच्या तळटिपांत त्या त्या श्लोकाची अवतरण काळ आणि पार्श्वभूमी दिलेली असते. अशा पद्धतीने कुरआनचा अभ्यास केल्यास त्याविषयीचे गैरसमज दूर होऊ शकतात. अशाप्रकारे कुरआन समजून घेतल्यास रमजान समजून घेणे सोपे जाते आणि ते आवश्यक आहे. आज मराठीसहित सर्व भारतीय भाषेत कुरआन उपलब्ध आहे. अगदी नेत्रहीन बांधवांकरिता ब्रेल लिपीतही त्याचे भाषांतर उपलब्ध आहे. मग या रमजानमध्ये वाचणार ना कुरआन?


- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

पवित्र रमजान महिन्यात महिलाही रोजे ठेवतात. धार्मिक रिवाज पाळतात. त्याचवेळी इफ्तारी, सहरीसाठी कुटुंबीयांसाठी रुचकर पदार्थही त्याच रांधतात. त्याविषयीची माहिती
संस्कृतीचं रक्षण आपल्या देशात खऱ्या अर्थानं कुणी करत असतील तर त्या महिलाच.  सण, उत्सवात महिलांची फार मोठी भूमिका असते, तशीच रमजानमध्येही महिलांची फार महतवाची भूमिका आहे. याला ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे. याच रमजानच्या एके रात्री प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावर अल्लाहकडून (ईश्वराकडून) कुराणाचा पहिला श्लोक ''इकरा (वाचा/शिका)'' पहिल्यांदाच अवतरित झाला. त्याबरोबरच त्यांना प्रेषित्व प्राप्त झाल्याची घोषणाही याच महिन्यात झाली. त्यानंतर प्रेषितांनी ईश्वरी संदेशाच्या प्रचाराचा प्रारंभ केला तो त्यांच्या पत्नी आदरणीय खतिजा यांना इस्लामची दीक्षा देऊन. अशाप्रकारे प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्याकडून इस्लामची दीक्षा घेणारी सर्वात पहिली व्यक्ती एक स्त्रीच होती आणि ती ऐतिहासिक घटना रमजानमध्येच घडली. आदरणीय खतिजापासून तर आज जगाच्या जवळपास दोनशे कोटी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचलाय आणि तो त्यांनी स्वीकारला. पण या लोकशिक्षणाची सुरुवात एका स्त्रीपासून प्रेषितांनी सुरु केली होती हे विशेष.

आजही रमजान महिन्याच्या दैनंदिन सोपस्कारात महिला फार महत्वाची भूमिका निभावतात. ती स्वतः आणि घरचे लोकं रोजा ठेवतात म्हणून त्यांच्या सहेरीकरिता ती रात्रीच तयारी करून ठेवते. कणिक भीजवून फ्रीजमध्ये ठेवते, तर कधी मटन उकळून फ्रीजमध्ये ठेऊन देते. मूग किंवा वाटाणे वगैरेची एखादी डिश सहेरीला करायची असेल तर रात्रीच ते भिजवून ठेवते.

आजकाल औरंगाबादमध्ये सहेरीची अंतिम वेळ जवळपास साडे चार वाजता आहे. अशावेळी महिलांना तीन साडे तीन वाजताच उठावे लागते. तब्बल पावणेचार वाजेपर्यंत स्वयंपाक आटपून घरच्या मंडळींना झोपेतून उठवतात आणि जेवण वाढतात. स्वतःदेखिल त्यांच्यासोबत सहेरी करून रोजा ठेवतात. ती थकली असेल तर काही पुरुषदेखील स्वतः स्वयंपाक करून तिला जेवू घालतात. प्रेषित स्वतः देखिल काहीवेळा स्वयंपाक करून त्यांच्या पत्नींना जेवू घालायचे. ही प्रेषित परंपरा आहे.
सहेरी करून सगळे नमाज पढतात, महिलादेखील नमाज पढतात. महिलांनादेखील मशिदीत प्रवेश करण्याची परवानगी आहे, पण घरी नमाज पढण्याची सवलत दिलेली आहे. नाहीतर भल्या पहाटे उठून स्वयंपाक केल्यावर नमाजसाठी दूर एखाद्या मशिदीत जाणे त्यांना अवघड गेले असते. या सवलतीचा आपल्या देशात महिला पुरेपूर लाभ घेत सहसा घरीच नमाज पढतात. मुंबई, दिल्ली व इतर काही ठिकाणी मात्र काही महिला मशिदीत जाऊन नमाज पढतात.

नमाजनंतर काही महिला कुराणाचे पठण करतात तर काही महिला थकल्यामुळे आराम करतात. बऱ्याच शहरात आजकाल ''समाअत ए कुरआन'' म्हणून खास फक्त महिलांसाठी कार्यक्रम होत आहेत. त्यात एखादी आलेमा (पुरुष मौलवी किंवा आलिम असतो तशी महिला देखील आलेमा असते) कुरआनचे अरबीत पठन करते, त्याचे उर्दूत भाषान्तर वाचते आणि नंतर त्याचे निरूपण स्थानिक भाषेत समजाऊन सांगते. दोन ते तीन तासांचा तर कुठे कुठे चार तासांचा  हा कार्यक्रम असतो. कुरआनच्या तीस खंडांपैकी दररोज एका खंडाचे पठन केले जाते. औरंगाबादमध्ये सध्या जमाअत ए इस्लामी हिंद या एकाच संघटनेच्या महिला आघाडीतर्फे शहरात विविध ठिकाणी असे जवळपास चाळीस ''समाअत ए कुरआन''चे वर्ग चालतात. इतर संघटनांची संख्या वेगळी. ही एकप्रकारे महिलांमध्ये प्रबोधनाची लोकशिक्षणाची चळवळच आहे.
त्यांनतर अनेक महिला आराम करतात. दुपारची आणि सूर्यास्तापूर्वीची नमाज पढली जाते. पुरुषही ही नमाज पढतात. लहान लेकरांसाठी कधी कधी थोडेसे काही तयार करावे लागते. पण सहसा महिनाभर दुपारी एकप्रकारची महिलांना सुट्टीच असते. मात्र संध्याकाळी पाच नंतर पुन्हा त्यांची लगबग सुरु होते. कारण सूर्यास्तानंतर इफ्तार करावयाचा असतो. खरं म्हणजे इफ्तार हा साध्या पद्धतीने देखील केला जातो. पण दिवसभर खाणे पिणे बंद असल्यामुळे काहीतरी खास खावं म्हणून थोडेफार फराळाचं तयार करून घेतात. सूर्यास्तानंतर घरच्या सर्वांसोबत इफ्तार केला जातो. इफ्तार नंतर नमाज पढतात. मग रात्रीचे जेवण उरककल्यानंतर रात्रीची ''तराविह'' ही खास दीर्घ नमाज पढली जाते. काही ठिकाणी महिलांची स्वतंत्र तराविहची नमाज होते, त्याचे नेतृत्व महिला-मौलवीच (आलेमाच) करते. रात्री त्या आराम करतात.  अशाप्रकारे महिलांचा रमजानची दैनंदिनी संपते. यात पुरुष मंडळीही त्यांना नक्कीच हातभार लावतात, पण किचनक्वीन असतात त्या फक्त महिलाच!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

रमजानच्या पवित्र महिन्यात पहाटे रोजेदारांना उठवण्यासाठी घरोघरी जाऊन भक्ती गीते गाण्याचे काम 'मेसहेराती' करतात. त्यांच्या कार्याचा हा परिचय
सहेरी करण्यासाठी लोकांना जाग आणण्याकरिता काही लोकं घरोघरी जाऊन आवाज देऊन उठवतात. त्यांना 'मेसहेराती' म्हणतात. हे मेसहेराती लोकं गल्ली बोळात फिरून काही खास भक्ती गीते गात असतात, त्यांना ''सदा ए रमजान'' देखील म्हटले जाते. याला आपण 'रमजानची भूपाळी' म्हणू या.

सर्वात पहिले मेसहेराती आदरणीय बिलाल हबशी (निग्रो) होते. जुन्या काळात भा.रा. तांबेंची भूपाळी ''उठ उठी गोपाळा ...'' ही फार प्रसिद्धीस पावली होती. कारण सकाळी उठण्याचे महत्व जुन्या लोकांना कळले होते. सकाळी आणि विशेष करून पांढरं फाटण्यापूर्वीच्या वेळी वातावरणात एक प्लाझ्मा स्टेट तयार होते. म्हणजे एकावर एक असलेल्या हवेच्या थरावरचे ओझोनचे महत्वाचे थर हे खालील हवेच्या थरात मिसळले जाते आणि त्यावेळी प्रदूषणरहित शुद्ध हवा उपलब्ध होते. पण अशावेळी बंदिस्त घरात ढाराढूर झोपणारे निसर्गाच्या या देणगीला पारखे होतात. म्हणूनच आज वेगवेगळ्या रोगांनी थैमान घातले आहे. फार कमी जण याबद्दल जागृत आहेत.

यावेळी उठण्याचे फक्त शारीरिकच नव्हे तर आर्थिक कारणे देखील आहेत. उठायला उशिर झाला तर दिवसाची इतर कामे पुढे पुढे ढकलली जातात. कधी कधी त्या कामांसाठी अर्ध्या दिवसाची सुटी काढावी लागते तर व्यापाऱ्यांना दुकान अर्धा दिवस बंद करावे लागते. सकाळी उठून दुकान उघडणाऱ्यांचा धंदा नेहमीच जोरात असतो. म्हणूनच त्या एकमेव अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी म्हटले आहे -
''पहाटेचं झोपणं हे रोजीरोटीला आडकाठी आणणे आहे.''

अशाप्रकारे सहेरच्या वेळी खाने हे रोजाधारकाला फक्त अध्यात्मिक आणि शारीरिकच नव्हे तर आर्थिक फायद्याच्या सवयीदेखील लावते.
पण आजकाल अलार्म घड्याळे, मोबाईल अलार्ममुळे या मेसहिरातींची गरज नाही, असे सांगण्यात येते. म्हणून हे मेसहेराती शहरी भागातून लुप्त झाले आहेत. पण आलं;अलार्म वाजल्यानंतरही घडीचे बटन किंवा मोबाईल अलार्मचे 'स्नूज'ऐवजी 'डिसमिस'चे बटन दाबून पुन्हा झोपणारे तरुण महाभाग खूप आहेत. अशा लोकांना सकाळी उठणे हे एक दिव्य वाटते. काही देशात तर अलार्म वाजल्यावर इलेक्ट्रिक पलंग हा आपोआप वर खाली हलवून त्यावर झोपणाऱ्याला जागे करतो, अशी व्यवस्था केलेली असते. तेव्हा माणसाची जागा मशीन घेऊच शकतं नाही, हेच खरं. त्यामुळे आजही या मेसहेरातीची गरज आहेच आहे.

ग्रामीण भागात आजही हे मेसहेरातीं बाकी आहेत. परंतु त्यांना आता फार विकृत नाव देण्यात आले आहे - ''सहेरी के फकीर''. खरे म्हणजे हे भिकाऱ्यांचे काम नाही, यापूर्वी नव्हते. एक धर्मकार्य आणि समाजकार्य म्हणून विनामूल्य ही सेवा केली जात होती, त्यामुळे त्या कार्याची अस्मितादेखील जिवंत होती. परंतु आज त्यांना 'सहेरी के फकीर' म्हणून ईदच्या दिवशी थोडं जास्त धान्य दान (फितरा) म्हणून दिला जातो. हे काम कुणी दुसरे करत नसल्यामुळे आणि पोटाला प्रपंच देखील लागलेला असल्याने जे फकीर लोकं हे करत आहेत, तेही काही कमी नाही. काही मेसहेराती भूपाळीसोबतच खंजेरी, डफलीदेखील वाजवतात. याचा फायदा सकाळी उठणाऱ्या मुस्लिमेतर चाकरमान्यांनाही होतो. आज झोपलेल्या समाजाला बोधप्रत भूपाळी गाऊन जागे करणाऱ्या मेसहेराती आणि मराठीत अजरामर प्रभातगीते लिहिणाऱ्या भा.रा.तांबेंची खरंच गरज आहे!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

इस्लाम धर्मात चंद्राचे नेमके काय महत्व आहे, त्याविषयी असलेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी रमजाननिमित्त केलेले विवेचन.
मशीद, मदरसे, मुस्लिमांच्या लग्नपत्रिका, काही मुस्लिम देशांचे ध्वज आणि मुस्लिम समाजाचा प्रतीकात्मक उल्लेख करण्यासाठी सर्वसाधारण्पणे चंद्रकोरीच्या उपयोग केला जातो. पहिली चंद्रकोर पाहूनच रमजानचे रोजे सुरु होतात आणि त्यानंतर येणाऱ्या 'शवाल' या अरबी महिन्याच्या सुरुवातीला चंद्रकोर पाहूनच रमजानची सांगता होते आणि दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. अशाप्रकारे ही चंद्रकोर एकप्रकारे नैसर्गिक कॅलेंडरच आहे. कुरआनात  याविषयी म्हटले आहे -
''तोच आहे ज्याने सूर्याला तेजस्वी बनविले व चंद्रास कांतिमान बनविले आणि चंद्रकलेचे टप्पे योग्यरीत्या सुनिश्चित केले की जेणेकरून तुम्ही वर्ष व तारखांचे हिशेब माहीत करावे. '' - कुरआन  (10:5)
या श्लोकात वाढत्या आणि कमी होणाऱ्या चंद्रकला या फक्त तारखा निश्चित करण्यासाठीच्या खुणा असल्याचे सांगण्यात आले आहे. यापेक्षा जास्त चंद्राचे महत्व इस्लाम धर्मात नाही.
मशीद, मदरसा किंवा मुस्लिमांची लग्न पत्रिकेवर बहुतेकवेळा चंद्रकोर काढलेली असते. तुर्कस्थान, पाकिस्तान या मुस्लिमबहुल देशांच्या राष्ट्रध्वजावरही चंद्रकोर काढलेली असते. त्यामुळे आमच्या बऱ्याच मुस्लिमेतर बांधवांचा असा गैरसमज होतो कि, मुसलमान हे चंद्राची पूजा करत असतात.
मात्र वस्तुस्थिती तशी नाही. सण १९२४ पर्यंत मुसलमानांची एक वैश्विक सत्ता होती, त्याचे मुख्यालय तुर्कस्थानातीळ इस्तंबूल होते. तेथील खलिफा हा जगातील समस्त मुस्लिमांचा खलिफा गृहीत धरला जात होता. त्या उस्मानी खिलाफत (राज्य प्रणाली)च्या ध्वजावर हिलाल (चंद्रकोर) होती. तेव्हापासून मुस्लिमांचे एक सांस्कृतिक चिन्ह चंद्रकोर बनले. अशाप्रकारे यामागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. परंतु याला काहीही धार्मिक आधार मुळीच नाही. चंद्र एक उपग्रह असून तो आपले काहीही बरे वाईट करू शकत नाही, तो पूज्य अजिबात नाहीये, ही समस्त मुस्लिमांची धारणा आहे, इस्लामचीही तीच भूमिका आहे. फक्त मुस्लिम समाज सौर कालगणना (सोलर केलेंडर) ऐवजी  ''चांद्र कालगणना (लुनार केलेंडर)'' नुसार आपले धार्मिक सण उत्सव साजरा करत असतो आणि ही कालगणना चंद्रावर अवलंबून असते.
चंद्र कालगणनेनुसार वर्ष हे ३६५ ऐवजी ३५५ किंवा ३५४ दिवसांचेच असते. त्यामुळे सौर कॅलेंडरच्या वर्षाच्या तुलनेत ते दरवर्षी दहा दहा दिवस मागे मागे येत असते. त्यामुळे पूर्ण ३६ वर्षात रमजान हा महिना पूर्ण इंग्रजी वर्षात फिरत असतो. त्यामुळे रमजान हा एखाद्या देशात कधी कडक उन्हाळ्यात तर कधी थंड हिवाळ्यात तर कधी ओल्या पावसाळ्यात येतो. त्यामुळे प्रत्येक देशाच्या नागरिकांना नेहमीच एकाच ऋतूत रोजे ठेवण्याची पाळी येत नाही. सौर कॅलेंडरनुसार जर रोजे ठेवले गेले असते तर काही विशिष्ट देशांना भर उन्हाळ्यात दर वर्षी रोजे ठेवावे लागले असते. पण चांद्र कालगणनेचा हा नैसर्गिक फायदा रोजेधारकांना होतो. अशाप्रकारे निसर्गनियमांवर आधारित इस्लाम धर्म हा निसर्ग नियमांचे पालन करण्याचे एकप्रकारे संकेत देतो. कारण इस्लाम हा नैसर्गिक धर्म आहे. रमजानमधील आकाशातील चंद्रकोर जणू स्मित हास्य करत हेच सांगत असते.

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

जशी सहिष्णुता एक प्रवूत्ती आहे, तशीच दहशतवाद हीदेखील एक प्रवृत्ती आहे. असंयम, असहिष्णुता व कुणाचीही भिती मनात नसणे ही प्रवृत्ती म्हणजे दहशतवाद होय. कायदा, पोलीस व सरकारी यंत्रणा कुणाचं काहीही बरंवाइट करू शकत नाही कारण या ऐहिक संस्थांना अनेक मर्यादांनी वेढलेले आहे. अमर्याद अशा एका प्रचंड सार्वभौम शक्तीची भिती माणसावर असणे आवश्यक आहे. ती शक्ती म्हणजे ईश्वर होय. ईश्वराची प्रेमयुक्त भिती मनात जपण्यासाठी उपवास हे प्रभावी साधन आहे. सध्या उपवासांचा रमजान महिना सुरू आहे. यानिमित्त दहशतवादाच्या निर्मूलनात रमजान कसे सहकार्य करू शकतो यादृष्टीने विचार करण्याची गरज आहे. 
रमजान महिन्यात ईश्वराने त्याचा सर्वात शेवटचा ग्रंथ कुराणाचे अवतरण केले. कुराण हा रमजानचा आत्मा आहे. कुराणावर जास्तीत जास्त प्रामाणिकपणे आचरण करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी उपवास ठेवले जातात. शांततेचा संदेश देणाऱ्या कुराणाला आत्मसात करण्यासाठी उपवास ठेऊन आपल्या अंतकरणात ईशपरायणतेचा प्रकाश आवश्यक आहे. कारण कुराणाची शिकवण ही मानवाच्या सर्व समस्यांचे निराकरण करू शकते. कुराणात ईश्वर सांगतो:
‘‘... खुनी अथवा जगातील दहशतवाद्यांशिवाय इतर कुणालाही ज्याने ठार केले त्याने जणू समस्त मानवांना ठार केले आणि ज्याने एखाद्याचा जीव वाचविला त्याने जणू समस्त मानवांचा जीव वाचविला.’ परंतु त्यांची (इस्रायली लोकांची) अवस्था अशी आहे कि, आमचे प्रेषित वरचेवर त्यांच्यापाशी उघड-उघड आदेश घेऊन आले तरीसुद्धा त्यांच्यात भूतलावर आंतक माजविणारे मोठ्या संख्येने अतिरेकी आहेत’’
-भावार्थ:  कुराण (५-३२)
इस्रायली लोकांना उपदेश देण्यासाठी आलेल्या प्रेषितांवर अवतरित ग्रंथांवर त्यांची श्रद्धा असल्याचे ते सोंग करत होते. परंतु त्यावर आचरण न करता भूतलावर दहशतवाद पसरविण्याचे घृणास्पद काम करत होते. कारण त्यांची ग्रंथावरची श्रद्धा प्रामाणिक नव्हती. प्रामाणिक श्रद्धेसाठी ईश्वराच्या प्रकोपाची भिती, ईशप्रेम व ईश्वराच्या कृपेची अभिलाषा या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. यालाच तकवा म्हणजे ईशपरायणता म्हणतात. ही ईशपरायणता नसानसात भिनली पाहिजे यासाठीच रमजान महिन्यात उपवास हे कर्तव्य म्हणून निश्चित केले गेले आहे. म्हणून हे उपवास ठेवणाऱ्यांनी कुराणानुसार आचरण करायलाच हवं हे ओघानं आलंच. उपरोक्त श्लोकावरून कळते कि, जगभरातला दहशतवाद समूळ नष्ट करण्याची जबाबदारी उपवास ठेवणाऱ्यांची आहे. त्यांनी कुराणाच्या शांती संदेश जगभरातल्या समस्त मानवांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. उपवासामुळे संयम, सहिष्णूता व ईश्वराची प्रेमयुक्त भिती म्हणजेच ईशपरायणता उत्पन्न होऊ शकते. गरज आहे फक्त उपवासाची वास्तविकता समजून उपवास ठेवण्याची, कुराणावर आचरण करण्याची आणि त्याचा सर्वांना परिचय करून देण्याची! अशाप्रकारे रमजान व रोजे यांच्या संस्कारातून येणाऱ्या सहिष्णुतेचा सुगंध वर्षभर दरवळू द्या, आमीन!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

माणूस हा समाजशील, दुसऱ्या शब्दात, कळपात राहणारा प्राणी आहे. संवाद हा समाजाचा आत्मा असतो. पण आज सोशल मीडियाच्या युगात संवादच हरवलाय. आज लाखो कोस दूरवरच्या माणसाशी चॅट करायला वेळ आहे पण आपल्याजवळ शेजाऱ्यांसाठी दोन मिनिटे नाहीत. अशावेळी गेट टू गेदर, स्नेह संमेलनं फायदेशीर ठरतात. अशाचप्रकारे रमजान व ईदनिमित्तदेखील परस्पर सुसंवादाच्या माध्यामातूनही जातीय सलोखा कायम राहू शकतो. इफ्तारच्या फराळाचा आस्वाद घेतांना शिरकुर्म्याच्या दुधात साखर व कुर्मा (खारिक/खजूर) मिसळावी त्याप्रमाणे ईदच्या दिवशी माणसांची मनं एकमेकांत मिसळतात. धन्य-धन्य तो अल्लाह! ज्याने आम्हाला विविधतेने नटलेल्या या देशात जन्मास घातले! गरमागरम सुगंधीत शिरकुर्मा रिचवताना गप्पा रंगतात. ‘काय खबरबात, खुशाल? वावरात काय पेरलं आणि पोरगी कुठे दिली? यासारख्या विषयांवर गप्पा मारल्या जातात. तर तरूण घोळक्यात ‘ग्रॅज्युएशननंतर काय करणार? किंवा ईदनिमित्त कोणत्या टॉकीजवर कोणता नवीन पिक्चर लागला’ वगैरे.
 पण इतर खाजगी गोष्टींसह ज्या मुख्य मुद्यावर चर्चा होणे अपेक्षित असते, त्यावर सहसा कुणी बोलत नाही, तो म्हणजे या ईदचा, रमजानचा मूळ उद्देश! कोणतीही गोष्ट आपण का करतो हे जर ती गोष्ट करणाऱ्याला माहीत असणे अभिप्रेत असते. त्यामुळे कोणताही धार्मिक उत्सव किंवा विधी आपण का पार पाडत आहे हेही प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे. त्याविषयी आपण एकमेकांना विचारायला हवे. ‘कपडे कितीला घेतले' किंवा ‘शिरकुर्म्याचं दूध काय भाव घेतलं’ अशा शुल्लक गोष्टींऐवजी ‘‘ईदच्या दिवशी जिथे नमाज पढली जाते, त्या ईदगाहच्या मैदानावर मूर्ती किंवा काहीही अधिष्ठान मांडलेले नसते. मग तिथं उपासना होते तरी कशाची?" "तुझा देव कोणता?" "तुझे देव किती ?", "तुझा ग्रंथ कोणता?"" तो कुणी लिहिला अन् कुणी सांगितला?" या सर्व प्रश्नांवर बिनधोक मुद्देसुद चर्चा व्हायला हवी. "नाही बा! धर्माबिर्माचं काही विचारायचं नाही. उगीच त्याला राग आला तर?" ही भीती नको. एकमेकांच्या श्रद्धा, धर्मभावना समजून घ्यायला हव्या. मनात साचलेल्या गढूळ डोहाला रमजाननिमित्त मोकळी वाट करून द्यायला हवी. आपण सर्व एकच वडिल आदम व एकच आई हव्वाची संतती असून परस्परांचे बांधव आहोत, एकाच ईश्वराचे भक्त आहोत, असा संदेश देणारे कुरआन रमजानमध्ये अवतरीत झाल्याची आणि त्यामुळेच रमजान साजरा केला जात असल्याची माहिती सर्वांना करून देण्याची गरज आहे. त्यासाठी संवादाची गरज आहे, सोशल मीडियावर "तू तू - मै मै" ची नव्हे! या रमजानच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा सामाजिक संवादाला नवी झळाळी देऊ या इन्शा अल्लाह!

- नौशाद उस्मान
(लेखक नौशाद उस्मान इस्लामचे अभ्यासक आहेत)

    - जलालुद्दीन उमरी
    संपत्ती महान अल्लाहची फार मोठी देणगी आहे म्हणून प्रत्येकाने अल्लाहचेच ऋणी राहिले पाहिजे. परंतु मनुष्य संपत्तीला स्वत:च्या योग्यतेचे फळ मानतो. ही मानवी निचपणा आहे, याविषयीचे विवेचन मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांनी या पुस्तिकेत प्रभावीपणे केले आहे.
    व्यिक्त, समाज व राष्ट्राला सुद्धा हे लागू पडते. ते सर्व स्वत:च्या संपत्तीत अल्लाहचा वाटा विसरले तर ते धनलोभी बनून लक्ष्मी भक्त बनतात आणि शेवटी विनाशाचे हे एक कारण बनते, हे सत्य स्पष्ट करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 29    -पृष्ठे - 12    मूल्य - 08      आवृत्ती - 2 (2011)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/vdnj47h8fufuoxdmwwgyvg5d51mvdehw

- अबुल आला मौदूदी
    पुस्तिकेच्या नावावरूनच कळते की यात एकेश्वरत्व व प्रेषित्व विषयीची तर्कशुद्ध चर्चा करण्यात आली आहे.
    कुरआन जर पैगंबर (स.) यांच्याच बुद्धीची उपज असती तर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ईशत्वाचा दावा करावयास हवा होता. जर त्यांनी असा दावा केला असता तर ते जग ज्याने रामाला ईश्वर बनवून टाकले, ज्याने कृष्णाला भगवान ठरविण्यात मागेपुढे पाहिले नाही, ज्याने बुद्धाला आपोआप उपास्य बनविले, ज्याने येशुला ईश्वर पुत्र मानले, ज्याने ह्या, अग्नी, ग्रह, तारे अशा अनेकांची पूजा केली, त्या जगाने अशा महान, अद्भूत व प्रचंड सामर्थ्य असलेल्या व्यक्तीला निश्चितच ईश्वर मानले असते,याची चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 28    -पृष्ठे - 24     मूल्य - 10            आवृत्ती - 3 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/sx6jhwr9ltwu2c0kqmcfg1gelnmn84lo

लेखक - मौलाना वहिदुद्दिन खान   
भाषांतर - अब्दुल जब्बार कुरेशी

   
   

    आयएमपीटी अ.क्र. 26     -पृष्ठे - 36      मूल्य - 18                आवृत्ती - 2 (2016)
डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/z9lm31edb135degmun4di644nmzxcsob

    - शम्स पीरजादा
   
    या पुस्तिकेत जे काही लिहिले आहे ते आजसुद्धा लागु पडते. पुरोगामी व नव-संस्कृतीचे पाठीराखे म्हणतात, आज राजकीय व आर्थिक क्षेत्रा धर्मापासून वेगळे आहे त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्र धर्मापासून अलग केले पाहिजे ज्या निधर्मीपणाचा शिक्का बाहेर चालतो तो घरातसुद्धा चालला पाहिजे.
    या विचारसरणीचे लोक देशात इस्लामला इतर धर्मांच्या रांगेत उभा करतात. इस्लाम ही एक ईशप्रदत्त परिपूर्ण जीवनपद्धती आहे, हे सत्य ते विसरतात. मुस्लिम पर्सनल लॉ बद्दल देशात ह्याचमुळे गैरसमज पसरविला जात आहे, हे स्पष्ट केले आहे.

    आयएमपीटी अ.क्र. 21     -पृष्ठे - 32      मूल्य - 18                आवृत्ती - 5 (2013)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/lsug4rtx7y540w906vvdikzdg3ir0sye

सर्व आभार ईश्वराचे मानते की सृष्टीचा निर्माणकर्ता अल्लाह/परमेश्वर आहे. आणि त्याचे आशीर्वाद मुहम्मद (स.) आणि त्याच्या कुटुंबावर आहेत.
           जर कुरआनमधे पूर्णपणे या विश्वनिर्मिती चे पुरावे स्पष्ट केले गेले आहेत तर मग पैगंबर मुहम्मद (स.)  यानी त्याचे स्पष्टिकरण का बरे दिले नाही जेव्हा की कुरआन त्यांवर अवतरित झाले होते. परंतु, प्रेषिताने त्यांच्या सोबत्यांना तेवढेच सांगितले जे  त्यांच्या काळासाठी योग्य होते. तथापि, जेव्हा सृष्टी, आणि कुराणचे रहस्य यासंबंधी ईशसंन्देश पैगम्बरावर अवतरित झाले , तेव्हा पैगम्बराने सोबत्याना तेवढेच ज्ञान दिले जेवढे त्या काळातील लोक आकलन करू शकले.
            कुराणच्या प्रकटीकरणाचा हेतू वैज्ञानिक शोध उघड करणे किंवा सृष्टीच्या गुपितांना स्पष्ट करणे असा होत नाही.  ह्या विश्वनिर्मिती ची प्रत्येक महत्वाची बाब कुरआन मधे लपलेली आहे आणि ती वेळेप्रमाणे पुराव्यानिशी सिद्ध होत आहे.  जसेजसे विज्ञान संशोधनात पुढे जात आहे तसेतसे कुरआन मधले श्लोक त्याच्याशी पुरक ठरत आहेत. यामुळे कुराणामध्ये प्रत्येक वैज्ञानिक शोध हा योग्य वाटतो जेव्हा तो संशोधनाद्वारे सिद्ध होतो. उदाहरणार्थ:” पृथ्वी वरील आकाश, किंवा वातावरण हे सात स्तरांचे बनलेले आहे. हे प्रत्येक थर मानवी जीवन आणि पृथ्वीवरील इतर सर्व जीवसृष्टीच्या फायद्यासाठी महत्वाची कामे करते. प्रत्येक थर विशिष्ट कार्य करते, ज्यामुळे रेणु तरंगांना परावर्तित करण्यापासून, उल्काचा हानिकारक प्रभाव दूर होण्यापासून, हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी पाऊस तयार होतो. हे एक अद्भुत चमत्कार आहे की, 20 व्या शतकाच्या तंत्रज्ञानाविना शोधून काढता येत नाही पण अशी वस्तुस्थिती स्पष्टपणे कुराणाने 1400 वर्षांपूर्वी स्पष्ट केली होती.” कुरआन सांगतो: तोच तर आहे ज्याने पृथ्वीमध्ये तुमच्यासाठी सर्व गोष्टी निर्माण केल्या. नंतर आकाशाभिमुख झाला आणि सप्तआकाश (सात थर)  बनविले. आणि तोच प्रत्येक गोष्टीला जाणतो आहे .(कुरआन 2:29)


 अशाप्रकारे. प्रेषिताने कुराणाचे काही बाबिंचे स्पष्टीकरण दिले नाही, जे कर्तव्ये आणि धार्मिक कायद्याच्या बाबींशी संबंधित नाही , अर्थातच ते वेळेनुसार  पुराव्यानिशी सिद्ध होईल.
            कुराण हे ईश्वराची वाणी आहे.  ईश्वर  त्याच्या श्लोकांना अरबी भाषेत “ आयात ” آيات - म्हटले आहे  ज्याचा अर्थ " चिन्ह " असा होतो. ईश्वर आयात् " آيات "  या शब्दाचा वापर त्याने निर्माण केलेल्या विश्वाचे (जसे की सूर्य, तारे, सर्व स्वरुपातील जीवन (सजीव),निर्जीव व ईत्यादी) वर्णन करण्यासाठी वापरतो.  सर्वशक्तिमान ईश्वर म्हणतो:
" निसंशय आकाश आणि पृथ्वीच्या निर्मितीमध्ये, रात्रंदिनाच्या परिवर्तनामध्ये आणि समुद्रांत वाहणार्‍या नौकांमध्ये ज्या लोकांना लाभ देतात आणि जे पर्जन्य अल्लाहने आकाशांतून वर्षविले, व मृत जमीनीला पुनरुज्जीवीत केले आणि त्यामध्ये सर्व प्रकारच्या सजीवांचा विस्तार केला तसेच हवेच्या परिवर्तनामध्ये आणि आकाश व पृथ्वीच्या दरम्यान निरपेक्ष सेवा करण्यास कार्यरत केलेल्या ढगांमध्ये त्या लोकांसाठी संकेत आहेत जे ज्ञानी आहेत . “  (अध्याय 2: श्लोक 164)
तर हे निशाण्या ह्या विश्वात आणि ईश्वराचे  पुस्तक “क़ुरआन्” या दोन्ही ठिकाणी उपस्थित आहेत जे काळानुसार एकमेकांशी पुरक ठरतील.
            आता, “ कुरआन ” या शब्दाचा अर्थ पाहुया.  अरबी भाषेतील " कुरआन " हे " वाचा " या क्रियापदापासुन प्राप्त झाले आहे.  याचा अर्थ " वाचणे " किंवा " वाचलेले " असा होतो . " कुरआन " या शब्दाचा उपयोग, फक्त ईश्वराचे वचन (ईशवाणी) त्याच्या प्रेषित मोहम्मद यांच्यापर्यंतच मार्गदर्शनासाठी आणि पुराव्याच्या कारणास्तव मर्यादित आहे .त्याचबरोबर ईश्वर कुरआन हे " पुस्तक " म्हणून देखील संदर्भित करतो. कारण जेव्हा ते वाचनाशी सबन्धित असते  तेव्हा त्याला " कुरआन " असे म्हटले जाते आणि जेव्हा ते लेखी स्वरूपामध्ये त्याच्याशी संबंधित असते तेव्हा त्याला " पुस्तक " म्हटले जाते.
            ऐतिहासिकदृष्ट्या, ज्याप्रमाणे कुराण एकत्रित केले गेले आणि त्याच्या पुस्तकी स्वरुपात लिहिलेले गेले होते, प्रत्येक श्लोक लिहून ठेवण्यासाठी दोन नियम लागू केले गेले: पहिला नियम की दोन सोबतींची साक्ष ज्याने हे श्लोक लक्षात ठेवले असेल आणि दुसरे नियम असा की हे श्लोक पैगम्बराच्या एका सोबत्याने लिहिलेले असेल.  फक्त एक श्लोक  वगळता कुरआनातील प्रत्येक श्लोक लिहित असताना  ह्या  दोन अटींची पूर्तता होणे गरजेचे होते. .  मात्र एक श्लोक असा होता जो लिखित सापडला परंतु तो फक्त एकाच सोबत्याने लक्षात ठेवला होता. नियमाच्या अटिनुसार हा श्लोक वगळणे गरजेचे होते.  मात्र इथे  एक घटना घडली  ज्यामध्ये सर्वसमर्थ ईश्वराचे ज्ञान आणि दया दिसून येते.  हा श्लोक एकाच सोबत्याने लक्षात ठेवला होता ज्याचे नाव  खुझैमा ( خزيمة )  होते . कुराण लिहित असलेल्या लेखकाला स्मरण आहे की एकदा पैगम्बर म्हणाले  "ज्या कोणाला  खुझैमाने  साक्ष दिली आहे ती त्यासाठी पुरेशी आहे". पैगम्बरानी याविषयी एका घटनेचा उल्लेख केला जी घडली जेव्हा पैगम्बर जिवंत होते. “एकदा पैगम्बराने एका माणसाकडुन पैसे उधार घेतले होते आणि नंतर त्याला कर्ज परत केले. काही दिवसानी तो माणुस आपल्या पैशांची मागणी करण्यासाठी पैगम्बराकडे  परत आला. तेव्हा पैगम्बर त्याला  म्हणाले कि मी तुझे कर्ज आधीच फ़ेडले आहे. तर मग हा माणूस पैगम्बराना म्हणाला की बोलवा एक साक्षीदार जो हा व्यवहार करताना उपस्थीत होता. तथापि, हा व्यवहार होत असताना कोणिही पैगम्बरासोबत उपस्थित नव्हते. तेव्हा खुझैमा पुढे आले आणि म्हणाले, "जेव्हा पैगम्बर तुम्हाला पैसे परत देत होते तेव्हा मी तिथेच होतो". तो माणुस  निघून गेल्यानंतर, पैगम्बराने  खुझैमाकडे वळुन पाहिले  आणि म्हणाले, "मला माहीत आहे की जेव्हा मी माझ्या कर्जाची परतफेड करत होतो, तेव्हा तिथे कोणीही नव्हते.  मग तुम्ही कसे म्हणालात  की तुम्ही माझ्याबरोबर होते? " खुझैमाने पैगम्बराकडे पाहिले व आत्मविश्वासाने म्हणाले, "मी तुम्हाला स्वर्गातून आणलेल्या सर्व खुलाशांवर विश्वास ठेवू शकतो, आणि मग ह्या छोट्याश्या व्यवहाराविषयी कसा अविश्वास दाखवु". तेव्हा पैगम्बराना हे कळुन चुकले की  खुझैमा ,जो सर्वात प्रामाणिक व सत्यप्रिय माणूस आहे कारण तो ईश्वराच्या संदेशाविषयी एवढा प्रामाणिक होता की तो एक लहान सांसारिक गोष्टीबद्दल अप्रामाणिक राहु शकत नव्हता.  जेव्हा पैगम्बराने  खूजैमाचा ईश्वरावरील विश्वास पाहुन अतिशय आनंदाने म्हणाले , " "ज्या कोणाला  खुजैमाने  साक्ष दिली आहे ती त्यासाठी पुरेशी आहे".   ( Al-Bukhari, Matn vol. 3, 225).
अशाप्रकारे आपणास कळाले कुरआन कसे लिखीत तयार झाले.  येथे एका विद्वानांने कुराणाची थोडक्यात व्याख्या सांगितली आहे: “ कुरआन म्हणजे ईश्वराचे वाणी/वचन जे प्रेषित मुहम्मदकडे मार्गदर्शनासाठी आणि त्याच्या संदेशाचा एक पुरावा म्हणून अवतरित करण्यात आले. "
            काही अर्थाने, कुरआन हे पूर्वी अवतरित झालेल्या सर्व पवित्रग्रथांसारखे(पुस्तक) आहे , जसे तोराह आणि इंजिल . ही पुस्तके अवतरित होण्याचा उद्देशही ईश्वराचा सन्देश स्पष्ट करण्यासाठी व मार्गदशनासाठी होता. ईश्वर म्हणतो,
 हे पैगंबर (स.), त्याने तुमच्यावर हा ग्रंथ(कुरआन) अवतरला जो सत्य घेऊन आला आहे व त्या ग्रंथांच्या सत्यतेची साथ देत आहे, जे पूर्वी अवतरले होते. यापूर्वी त्याने मानवांच्या मार्गदर्शनाकरिता तौरात व इन्जील अवतीर्ण केले आहे .(कुरआन 3:3)
  दुसर्या दृष्टिकोणाने बघितले असता  कुरआन हे दोन उद्देशासाठी अवतरित झाले आहे. : प्रथम मार्गदर्शन देणे आणि ईश्वराच्या संदेशाचे स्पष्टीकरण करणे , आणि दुसरे म्हणजे एक प्रकटीकरण असणे आणि संदेष्टा ईशसंदेशाचा पुरावा देणे. तोरहमधे ईश्वराचे संदेश आणि कायदे सेट केले, तर मुसा (अ.स.) व त्यांचे कर्मचारी यान्द्वारे ते प्रकटीत झाले. इंजिल / बायबल मधे पण ईश्वराचे संदेश आणि कायदे सेट केले व त्याचे संदेष्टा येशू यावर ते प्रकटीत झाले. येशू त्याद्वारे आंधळ्या आणि आजूबाजूच्या रोग्यांना बरे करत असे हे  त्याचे चमत्कार होते. मात्र, कुराणाने ईश्वराचा संदेश आणि प्रेषित मुहम्मद (स.)यावर त्यांचे प्रकटीकरण व त्याचे चमत्कार याचे एकत्रिकरण केले
           यावरुन् तुम्हाला प्रश्न पडत असावा की सर्व ग्रंथ एकच ईशसन्देश सांगत असताना क़ुरआन व पुर्वीचे ग्रंथ प्रकटीकरणांमध्ये फरक का बरे आहे? कारण ईश्वराचे पूर्वीचे संदेश विशिष्ट कालावधीसाठी होते, आणि ते एका विशिष्ट लोकांसाठी होते; दुसरीकडे कुरआनचा संदेश सर्व मानवजातीसाठी आहे व  आणि न्यायाच्या दिवसापर्यंत तसेच राहणार आहे.  म्हणून, त्याचे चमत्कार सतत उपस्थित राह्तील. एखाद्या संदेष्ट्याच्या अनुयायांपैकी कोणत्याही व्यक्तीने हे सांगण्यास सक्षम असावे - कोणत्याही वेळी मुहम्मदच ईश्वराचा दूत होता आणि हे त्याचे चमत्कार आहे. एखादा असे म्हणू शकतो की येशू हा देवाचा संदेष्टा आहे, तथापि, तो किंवा ती म्हणू शकत नाही की हे त्याचे चमत्कार आहे.
मागील संदेष्ट्यांचा चमत्कार ज्योत जसा ज्योतीने चमकत होता तसा होता. जो कोणी त्या ज्योत ला पाहिले, एखादा साक्षीदार ती ज्योत विझल्यावर्, त्याची शक्ती आणि प्रकाश केवळ कथा सांगण्याद्वारे हस्तांतरित केले जाऊ शकते. आम्ही या सर्व चमत्कारांवर विश्वास ठेवतो कारण त्यांच्यात कुराणमधे यांचा उल्लेख आहे. (याचे reference तुम्ही कुरआन सुरह अलमायदा(५) मधे पाहु शकता.)
ह्यावर काहीजणाना हा पण प्रश्न पडत असेन की प्रेशित मुहम्मद (स.) व त्यांच्यापुर्वीचे प्रेशित हेच फक्त का बरे आम्ही ईश्वराचे संन्देशकर्ता मानायचे आणि फक्त मुहम्मद हेच फक्त सर्व मानवजातीसाठी ईश्वराचे शेवटचे संन्देशकर्ता आहे हे पण का बरे मानायचे ?  ईश्वर म्हणतो,
 मग हे पैगंबर मुहम्मद  (स.), आम्ही तुमच्याकडे हा ग्रंथ( *कुरआन ) पाठविला जो सत्य घेऊन आला आहे आणि अलकिताब (पूर्वकालीन ईश्वरीय ग्रंथ) पैकी जे काही त्याच्यासमोर उपलब्ध आहे त्यातील सत्य प्रमाणित करणारा व त्याचा संरक्षक व त्याची निगा राखणारा आहे, म्हणून तुम्ही अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्यानुसारच लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा आणि जे सत्य तुमच्यापाशी आले आहे त्यापासून पराडमुख होऊन त्यांच्या इच्छेचे अनुकरण करू नका* - आम्ही तुम्हा (मानवा) पैकी प्रत्येकासाठी एकच शरीअत (जीवनाचा कायदा) व एकच कार्यप्रणाली निश्चित केली. जर तुमच्या ईश्वराने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना एकच लोकसमूह (उम्मत) बनवू शकत होता परंतु त्याने हे यासाठी केले की जे काही त्याने तुम्हा लोकांना दिले आहे त्यात तुमची परीक्षा घ्यावी. म्हणून चांगुलपणात एक दुसर्‍यापेक्षा सरस ठरण्याचा प्रयत्न करा. सरतेशेवटी तुम्हा सर्वांना अल्लाहकडेच परत जावयाचे आहे, मग तो तुम्हाला सत्यःस्थिती दाखवून देईल ज्यामध्ये तुम्ही मतभेद करीत राहिला आहात (कुरआन 5:48)

चलातर ईशसन्देशाच्या   प्रकटीकरण बद्दल चर्चा करूया. कारण ईश्वरास आपली दृष्टी पाहु शकत नाही किव्हा प्रत्यक्षात त्याचे बोल आपण ऐकु शकत नाही  आणि मानवाची( स्वरूप)  प्रकृती आणि निर्मिती  प्रत्यक्षपणे त्याला प्राप्त करू शकत नसल्याने ईश्वराचे  संदेश प्रकटीकरणाद्वारे वितरित करावे लागतात.

 पण प्रकटीकरणाचा अर्थ काय आहे? प्रकटीकरण म्हणजे गुप्तपणे किंवा शांतपणे कोणालाही माहिती पुरविणे असा होतो . उदाहरणार्थ,
जेव्हा एखादी व्यक्ती किवा  विक्रेता (सेल्समन) आपल्या दारशी येतो त्याक्षणी आपल्याकडे त्याला भेटण्याची वेळ नसते , तेव्हा आपण कदाचीत त्या व्यक्तीस आपल्या कुटुंबाच्या एखाद्या सदस्यामार्फत विनंती करुन जाण्यास सांगतो, म्हणजे थोडक्यात, आपण आपल्या कुटुंबाच्या  सदस्या मार्फत शांतपणे  त्या व्यक्तीला पाहू इच्छित नसल्याचे सूचित करत असतो आणि आपली इच्छा व्यक्त करतो.

कुरआन मध्ये उल्लेख केलेल्या प्रकटीकरणाचे अनेक प्रकार आहेत. ईश्वराने देवदूतांकडे(फरिश्ते) प्रकट केले आहे.  प्रेशीत (संदेष्ट्यांच्या )व्यतिरिक आपल्या सृष्टीतील इतर लोकांपर्यंतही हे संदेश प्रकट केले आहे: जसे मुसाची आई वगैरे.
उधारणार्थ खालीनुमुद केलेल्या वचनात (आयात)

" आणि पहा, तुमच्या पालनकर्त्याने मधमाशीवर ही गोष्ट दिव्य प्रकटन केली की पर्वतामध्ये आणि वृक्षामध्ये आणि मांडवावर चढविलेल्या वेलीत आपले मोहळ बनव* .' "(कुरआन अध्याय 16: श्लोक 68)

याशीवाय सैतान  सुद्धा  स्वतःचे प्रकटीकरण करतात,व त्यांचे  प्रकटीकरण मानवांना चुकीचा मार्गाकडे व ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करतात.
उदाहरनार्थ, जेव्हा ईश्वराने मोमीन ला पाच वेळेस नमाज कायम करण्यासाठी सांगितलेली आहे मात्र आज तो या ऐहिक जीवनात स्वतः चे श्रेष्ठत्व प्राप्त करण्यात इतका मग्न झालाय  की त्याला नमाज कायम करणे ओझे वाटत आहे..ईथेच मनुष्यात सैतानाचे प्रकटीकरण होते जो  ईश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन करण्यास प्रवृत्त करत असतो.
परंतु जेव्हा प्रकटीकरणाचा शब्द वापरला जातो, तेव्हा त्याच्या एक विशिष्टपणे अर्थ सहसा घेतला जातो कि  ईश्वर त्याच्या विशिष्ट प्रेशीताद्वारे त्याच्या संदेशांना प्रकट करतो. खालीलप्रमाणे दीलेल्या श्लोकामधे(आयात) उल्लेख केल्याप्रमाणे तीन प्रकारचे प्रकटीकरण असु शकतात

“ कोणत्याही मनुष्याचा हा दर्जा नाही की अल्लाहने त्याच्याशी समक्ष बोलणी करावी. त्याची बोलणी एक तर वह्य (संकेता) च्या स्वरूपात होते, अथवा पडद्यामागून, अथवा मग तो एखादा संदेशवाहक (फरिश्ता) पाठवितो आणि तो त्याच्या आज्ञेने जे काही इच्छितो ’वह्य’ (बोध) करतो, तो उच्चतर आणि बुद्धिमान आहे .” (कुरआन 42:51)

चला तर एकेक प्रकटीकरणाचे प्रकार आत्मसात करून घेऊ या .

प्रथम: जेव्हा ईश्वर् एखाद्याला प्रेरणा देतो, तेव्हा तो त्या व्यक्तीच्या मनात विचार मांडतो, नंतर व्यक्ती त्यावर कार्य करते . तथापि, आपल्याला माहिती आहे की अनेक कल्पना  जे  एखाद्या मनुश्याच्या डोक्यामध्ये प्रकट होतात, किंवा एखाद्याच्या हृदयात व्यक्त होतात. मग आपणास कसे कळेल कि  त्यांच्यापैकी कोणता संदेश हा  दिव्य संदेश आहे ? जेव्हा एका व्यक्तीला ऐश्वर्य प्रेरणा प्राप्त होते, तेव्हा त्या व्यक्तीस त्या विचारानमुळे  मनाशी पुर्णपने समाधान आणि मानसिक शांती जाणवते. ती व्यक्ती कोणतीही आक्षेप किंवा आत्म-संशय न घेता कार्य करेल/ करते. जरी अशी प्रेरणा कार्यरत करण्यास एखाद्या सामान्य विचारशील व्यक्तीच्या  मनाविरूद्ध असु शक्ते. कुरआन कडून या प्रकारच्या प्रकटीकरणाचे उदाहरण घेऊ या.

 “आम्ही मूसा (अ.) च्या आईला संकेत दिला की, ’’याला दूध पाज, मग जेव्हा तुला त्याच्या जिवाचे भय वाटेल तेव्हा त्याला नदीत सोडून दे आणि कसलेही भय आणि दुःख बाळगू नकोस  आम्ही त्याला तुझ्यापाशीच परत घेऊन येऊ आणि त्याला पैगंबरांत समाविष्ट करू.’’ (कुरआन 28:7)
कोणतीही स्त्री जी समजदार असो वा नसो  ती आपल्या मनात आपल्या बाळाच्या सुरक्षेबद्दल भीती बाळगतच असते. तिच्या मनात सर्वात जास्त भीती असते ती म्हणजे "माझ्याबाळाला कोणतीही इजा होवु नये"-  असे असताना ती तिच्या बाळाला समुद्रात फेकून देईल काय? आई स्वतःहुन आपल्या बाळाला मृत्युच्या दाराशी पाठवेल का? तरीदेखील प्रेशीत मुसा च्या आईने , ईश्वराने तिला प्रेरणा दील्याने  तीने आपल्या बाळाला नदीत टाकुन दिले असे करत असताना एखादी आई दुःखी होवुन जाते मात्र मुसाची आई हे कृत्य अगदी आनन्दाने व समाधानपुर्वक केले कारण तीला ऐश्वर्य प्रेरणा लाभलेलि होती.

दुसरे: एक पड्द्या आडुन प्रकटीकरण. प्रत्येक प्रमुख धर्माचा, जसे ज्यू ,ख्रिश्चन किंवा इस्लाम ईश्वराचे संदेश , काही प्रमाणात या  पद्धतीने संदेश   वितरित केले आहेत , उदाहरणार्थ, जेव्हा  मुहम्मद(स.) (पैगम्बराना ) याना पाच दैनंदिन प्रार्थना (नमाज) प्रारंभ व कायम करण्यासाठी आज्ञा देण्यात आली तेव्हा ईश्वराने त्याना  एका पडद्याच्या मागुन  सांगितले,  अगदी तसेच जसे पुर्वी  मुसा (अ.स.)  पैगंबराना  सांगितले होते.

आणि तिसरे: ईश्वराकडुन् पाठविलेल्या दूताच्या(फरिश्ते)  माध्यमातून प्रकटीकरण. कुराण चे अनन्य प्रकटीकरण एक थेट संदेशवाहक  ( जिब्राइल ) देवदूतास   पाठवून स्पष्टपणे प्रकट करण्यात आले. मुहम्मद(स.) पैगंबरावर  एका ऐश्वर्य प्रेरणे मार्फत  कुरआन प्रकट झाले नाही, किंवा ते पडद्याच्या मागुन  थेट ईश्वरा कडून भाषणा  मार्फत देखील झाले नाही. कुरआन हे एकमेव  ( जिब्राइल )देवदूतामार्फत पूर्णपणे वितरित करण्यात आले होते, म्हणून हे त्याचे मूळचे आहे याबद्दल काही शंका नाही.  ( जिब्रियल )देवदूत दाखल होऊन प्रकटहोण्याआधी मुहम्मद(स.) पैगंबर एक मोठ्या घंटानादाचा आवाज ऐकायचे व मग  देवदूत ( जिब्राइल )च्या  उपस्थितीत मुहम्मद(स.)  पैगम्बर याना  मोठा थकवा यायचा  व त्यांच्या  चेहऱ्याचा  रंग बदलुन जायचा . . .  जर ते आपल्या एका सोबत्याच्या शेजारी बसलेले असत व  सोबती वर आपले पाय  ठेउन विश्रांती घेत असतील, तर त्या व्यक्तीला प्रेशिताचे पाय इतके भारी वाटत असत  जसेकाही एक पठारच त्यांच्या पायावर ठेवले आहे. तसेच, प्रेशीत जर एखाद्या घोड्यावर किंवा उंटवर स्वारी करत  असतील तर प्राण्याला त्यांचे ओझे ईतके भारी वाटत असत की ते प्राणी अक्षरशःथकुन जात असत व चालण्यास खुप ताकत लावत असत.
प्रारंभी, देवदुताशी या तणावग्रस्त मुलाखतीमुळे  संदेष्टा ( मुहम्मद(स.)  पैगंबर ) वर थकवून टाकणारा परिणाम झाला. मग, पहिल्या काही (आयात) अध्यायांच्या साक्षात्कारांनंतर, एक विराम कालावधी आला आणि देवदूत  काहीकाळ परत आलेच् नाही. त्यावेळी मुहम्मद(स.)  पैगंबराना  प्रकटीकरणाची उत्कट इच्छा निर्माण झाली व ते दिव्य साक्षात्काराची राहुनराहुन आठवण  करु लागले. सामान्यत: जेव्हा आपण काहीतरी चुकवतो, किंवा जेव्हा आपण कठोर परिश्रम करतो आणि नंतर अचानकपणे विश्रांती घेतो तेव्हा आपणास कठोर परिश्रमाचा गोडवा आणि यश मिळविण्याची इच्छा निर्माण होते . जेव्हा आपण विश्रांतीनंतर कामावर परत येतो तेव्हा ही भावना आपल्यासाठी  काम सुलभ करते.त्याचबरोबर् जेव्हा आपण प्रत्यक्षात ती  अपेक्षा करतो व त्यातून मिळविलेल्या सुखांचे निराकरण करतो तेव्हा आपण सहजपणे कष्टावर मात करू शकतो. अध्याय 9 4 मध्ये ईश्वर म्हणतो:

 (हे पैगंबर (स.)) काय आम्ही तुमचे मन तुमच्यासाठी उघडले नाही? आणि तुमच्यावरून ते भारी ओझे उतरविले जे तुमची कंबर खचवीत होते. आणि तुमच्याखातर तुमच्या लौकिकाचा नाद दुमदुमला. तर वस्तुस्थिती अशी आहे की, अडचणीबरोबर संपन्नताही आहे. निःसंशय अडचणींबरोबर संपन्नताही आहे. (कुरआन 94:1-6)
कुरआनच्या संदेशाच्या सत्यतेविषयी आणखी एक पुरावा लक्षात घ्या. कधीकधी पैगम्बराना (जिब्राईल) देवदुत् याच्यासोबत एका बैठकीत कुरआनचे एक दीर्घ अध्याय प्राप्त होत असे . जेव्हा प्रकटीकरण सत्र संपले, तेव्हा पैगम्बर आपल्या साथीदारांना नवीन श्लोकांचे पाठपुरावा तोंडी करायचे तेव्हा ते त्यांना खाली लिहून काढायचे . नवीन अध्यायचा तोंडी पाठपुरावा करायला शक्यतो 30 मिनिटे किंवा एक तासाचा वेळ लागायचा व  त्यादरम्यान त्यांचे सोबती ते अध्याय लिहून घेत असत ; आणि काही कालावधी नंतर जेव्हा प्रार्थनेची वेळ व्हायची , तेव्हा मुहम्मद(स.)   पैघंबर  तोच अध्याय ३० मिनिट् किंवा एक तास प्रार्थनांचे नेतृत्व करताना, शब्दशः तोंडी उस्फूर्तपणे आवाजात सांगायचे .
आपल्यापैकी कोणीही 30 मिनिटे  किव्हा एक तास बोलून   इतरांना आपले भाषण लिखित नोन्द करण्यास सांगू शकतो. तथापि, कोणिही मुखाने शब्दशः व  एक ना एक  अक्षर   पुन्हा एक तासाने त्या भाषणाची पुनरावृत्ती करू शकत नाही.
 मुहम्मद(स.)   पैगम्बर अध्यायचा एक ना एक शब्दाचा  अचूकपणे उच्चार करायचे हा आहे  पुरावा की कुरआन मधली ईशवाणी त्याच्याद्वारेच   प्रकटित झाली होती आणि उच्च शक्तीच्या माध्यमातून त्याच्या स्मृतीत पटल करण्यात आलेले होते.
 कुरआनमधील अध्याय एकमेकांना खूप समान आहेत, याचे उदाहरण म्हणजे काही श्लोकात तर एका अक्षराची  भिन्नता दिसते यावरुन हे लक्षात दिसुन येते की  मुहम्मद(स.)  पैगम्बर् यानी कुरआनचे प्रासंगिक भाषण किंवा सहज  वाचन हे एक सर्व सामान्य अर्थ घेउन केले नाही. ते कुरआनचे श्लोक वारंवार नमाझ मध्ये पठण करायचे. जे स्पश्ट, अचुक व काटेकोर पणे आत्मसात करणे एका साधारण मनुश्याला अतीशय कठिण आहे.
त्याचबरोबर प्रेशित मुहम्मद(स.)   द्वारे जे प्रकटेकरण झाले त्याचे काही चमत्कार प्रेशित मुहम्मद(स.)   द्वारे दिसुन आले कारण ते त्या कालावधीती लोकांपर्यंत योग्य होते. तथापि त्याचे चमत्कार अखेरीपर्यंत खुलासा करणे आवश्यक आहे. ही एक अशी देणगी आहे जिच्यामुळे काळानुसार या पृथ्वीचे संशोधन व शोध लावणे  चालुच आहे आणि त्याचे पुरावे कुरआन देत आहे व न्यायाच्या दिवसापर्यंत तो देतच राहील. यासाठी आवश्यक आहे की कुराणच्या सर्व भागांना नबीच्या वेळी समजावून सांगितले जाऊ नये.  कुराणात ईश्वर म्हणतो:
" लवकरच आम्ही यांना आमचे संकेत बाह्यजगतातही दाखवू आणि त्यांच्या अंतरंगातसुद्धा, येथपावेतो की यांच्यावर ही गोष्ट उघड होईल की हा कुरआन खरोखरीच सत्याधिष्ठित आहे. काय ही गोष्ट पुरेशी नाही की तुझा पालनकर्ता प्रत्येक गोष्टीचा साक्षी आहे? " (कुरआन 41:53)
.म्हणूनच कुरआन हे ईशसन्देश सर्व मानवजातीसाठी आहे व मुहम्मद(स.) हे ईश्वराचेच पैगम्बर आहेत ज्याच्याद्वारे कुरआनचे प्रकटीकरण झाले. हेच सत्य सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिक शोध आणि कुरआनचे पुरावे हे एकमेकांशी पुरक ठरत आहे.  व ते सातत्याने लोकांसमोर येत आहे व येतील….
                        
सिमा देशपांडे
 7798981535

मुल्यविहीन भौतिक शिक्षणाच्या प्रसारामुळे आज देशात प्रत्येक क्षेत्रात चरित्रहीन लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. चरित्रहीन हा शब्द ज्या विशिष्ट अर्थाने वापरला जातो तो अर्थ इथे अपेक्षित नाही. चरित्रहीन म्हणजे मानवतेला नुकसान पोहोचवणार्‍या सर्व अवगुणांचा समुच्चय असलेली माणसे असा घेण्यात यावा. आज कोणत्याही क्षेत्रात, कोणालाही विश्‍वासाने एखादे काम सांगून, निवांत बसता येण्यासारखी परिस्थिती नाही. सातत्याने ज्याला काम सांगितलेले आहे, तो ते काम नीट करत आहे किंवा नाही? याकडे लक्ष ठेवावे लागते. यात प्रत्येकाची ऊर्जा आणि वेळ विनाकारण वाया जातो. उदा. आपण एखादे घर बांधायला घेतले असेल तर बांधकामाचे सर्व साहित्य घर बांधणार्‍याला देऊन, आपण निवांतपणे आपल्या कामावर जावू शकत नाही. कारण आपल्या माघारी बांधकाम करणारा व्यवस्थित बांधकाम करेल, याची आपल्याला शाश्‍वती नसते. म्हणून त्याच्या बोकांडीवर उभे रहावे लागते. तो सिमेंटमध्ये माती तर मिसळत नाही ना, याची काळजी घ्यावी लागते. यात वेळ आणि ऊर्जा वाया जाते. आदर्श स्थिती तर अशी हवी होती की, बांधकामासाठी लागणार्‍या आवश्यक वस्तू पुरवून, त्याच्यावर विश्‍वास ठेवून आपण आपल्या कामाला लागायला हवे होते. पण बांधकाम करणार्‍याच्या चारित्र्यावर विश्‍वास नसल्यामुळे आपल्याला आपला कामधंदा सोडून त्याच्यावर देखरेख करीत बसावी लागते. हे झाले एक उदाहरण.
आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या अनेक गोष्टी अशा असतात की, त्यांच्यावर लक्ष ठेवल्याशिवाय त्या अपेक्षेप्रमाणे केल्या जात नाहीत. कारण त्या क्षेत्राशी संबंधित लोकांमध्ये चरित्रहीन लोकांची संख्या जास्त असते. सारांश तक्वाविहीन (चरित्रहीन) लोकांची वाढती संख्या हे आजचे वास्तव आहे. आणि वास्तव नाकारल्याने प्रश्‍न संपत नाहीत. समाजाला अनैतिकतेची लागण झाली की, सामाजिक वातावरण विषक्त होऊन जाते. वेळीच काळजी घेतली नाही तर सगळा समाज नासून जातो. आज समाजातून स्वार्थी, कपटी, लिंगपिसाट लोकांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होत आहे. पोलीस, कायदे व न्यायालये त्यांना रोखण्यास असमर्थ आहेत, हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. अशा लोकांच्या उपद्रवाचा त्रास समाजातील संसाधनविहीन लोकांना जास्त होतो. हे भ्रष्ट आणि चारित्र्यहीन लोक हेच समाजाचे खरे शत्रू आहेत. अशा लोकांची संख्या कमी करून चारित्र्यवान लोकांची संख्या वाढविण्यासाठी वार्षिक प्रशिक्षणाची व्यवस्था अल्लाहने रमजानच्या माध्यमातून केलेली आहे. ज्याप्रमाणे पोलीस खलप्रवृत्तीच्या विरूद्ध असतात, त्याचप्रमाणे मुस्लिम सुद्धा खलप्रवृत्तीच्या विरूद्ध असतात. एका दृष्टीने मुस्लिमांची समाजात पोजीशन (स्थिती) पोलिसांसारखीच असते. वाईट गोष्टीं (मुनकरात) चे उच्चाटन व चांगल्या गोष्टीं (मारूफात) ची प्रतिष्ठापणा हेच इस्लामचे उद्देश्य आहे. समाजामधून वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्यापूर्वी आपल्या व्यक्तिमत्वातून त्यांचे उच्चाटन करणे आवश्यक असते. ज्याप्रमाणे आपण स्वत: दारू पीत असतांना दुसर्‍याला पीऊ  नको म्हणून सांगण्याचा कुठलाच नैतिक अधिकार आपल्याला नसतो. त्याचप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्त्वात वाईट प्रवृत्ती ठेवायच्या व समाजातून त्याचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न करायचा, यापेक्षा मोठा विरोधाभास असूच शकत नाही.
समाजातून वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी ज्याप्रमाणे पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे मुस्लिमांनासुद्धा विशेष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण दैनंदिन आणि वार्षिक अशा दोन स्तरावर असते. रोज पाच वेळेच्या नमाजच्या माध्यमाने माणसांच्या व्यक्तिमत्त्वातून वाईट गोष्टींचा नाश केला जातो व चांगल्या सवयी रूजविल्या जातात. काही लोक नमाजमध्ये अनियमितता बाळगतात म्हणून त्यातही काही त्रुटी राहून गेल्या असतील तर वार्षिक प्रशिक्षणात ३० दिवसांचे उपवास (रोजे) ठेवण्यास भाग पाडून लोकांच्या व्यक्तिमत्त्वातून उरल्या-सुरल्या त्रुटीही संपविण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आदर्श समाजाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. 
तक्वा म्हणजे काय?
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ज्याप्रमाणे आपण जंगलातून जातांना स्वत:ला इजा होवू नये म्हणून काट्या-कुपाट्यापासून वाचत काळजीपूर्वक चालतो. त्याचप्रमाणे ज्या सवयींपासून माणसाला व पर्यायाने समाजाला नुकसान होईल, अशा गोष्टींपासून स्वत:ला वाचवून आयुष्याची वाटचाल करणे म्हणजे तक्वा.
सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यस तक्वा म्हणजे, अल्लाहची भीती बाळगून चांगले वागणे. चांगले चारित्र्य, चांगल्या सवयींमधून निर्माण होते व चांगल्या सवयी अंगी बाणवण्यासाठी, ’चांगल्या सवयी जपा’ असा सुभाषितवजा सल्ला देवून भागत नाही. म्हणून इस्लामने लोकांमध्ये चांगल्या सवयी रूजविण्यासाठी द्विस्तरीय अशी ठोस योजना, नमाज आणि रोजांच्या माध्यमातून दिलेली आहे. डोळ्यासमोर योजना असेल तर कोणालाही त्या योजने बरहुकूम चालणे सोयीचे असते. योजनेविना कोणतेही महान कार्य पूर्ण होऊ शकत नाही. ऐन वेळेसच्या जुळवा-जुळवितून फारसे काही साध्य होत नाही. तक्वा ऽ चारित्र्य भौतिक शिक्षणातून निर्माण होत नाही. म्हणून इस्लामने त्याच्या निर्मितीसाठी नैतिक शिक्षणाची खास व्यवस्था निर्माण केलेली आहे. ती व्यवस्था कशी आहे? हे पाहण्यापूर्वी प्रत्येक मुस्लिमाने एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला एकाच वेळी दोन युद्धांचा सामना करावयाचा आहे. एक अंतर्गत युद्ध तर दुसरे बर्हिगत युद्ध. अंतर्गत युद्धात राग, लोभ, द्वेष, मत्सर, भेदभाव इत्यादी मनोविकारांशी युद्ध करावे लागते. तर बर्हिगत युद्धात दुषित वातावरण, वाईट मित्र, अश्‍लिलता, नशा, इत्यादी वाईट गोष्टींशी युद्ध करावे लागते. सकृतदर्शनी हे युद्ध जरी सोपे नसले तरी त्या लोकांसाठी हे युद्ध सहज जिंकता येण्यासारखे आहे जे कुरआनच्या खालील निर्देशांवर ईमान (श्रद्धा) ठेवतात.
१. ” जे अल्लाहचे भय बाळगतात, परोक्षवर श्रद्धा ठेवतात, नमाज कायम करतात आणि जी उपजिविका आम्ही त्यांना दिली आहे, तिच्यातून खर्च करतात. जो ग्रंथ प्रेषित मुहम्मद सल्ल.वर अवतरित करण्यात आलेला आहे, अर्थात कुरआन आणि जे ग्रंथ प्रेषितांपूर्वी अवतरीत करण्यात आलेले आहेत त्या सर्वांवर देखील श्रद्धा ठेवतात आणि मरणोत्तर जीवनावर दृढ विश्‍वास ठेवतात. असेच लोक आपल्या पालनकर्त्यांकडून सन्मार्गावर आहेत आणि तेच सफल होणार आहेत. ” (सुरे बकरा आयत नं. २,३,४,५). सुरे बकराच्या वर नमूद आयातींमध्ये चारित्र्य निर्मितीसाठी सात आवश्यक गुणांची अत्यंत प्रभावशाली पद्धतीने मांडणी करण्यात आलेली आहे. हे गुण ज्यांच्या अंगी रूजले ते खरे तक्वावान अर्थात चारित्र्यवान लोक असतील याची हमी स्वत: अल्लाहने दिलेली आहे आणि हेच लोक सन्मार्गावर आहेत आणि हेच सफल होणार याची शुभवार्ताही दिलेली आहे. ते सात गुण म्हणजे १. अल्लाहचे भय बाळगणे २. परोक्ष (गायब) वर श्रद्धा ठेवणे ३. नमाज कायम करणे ४. जे काही उपजिविकेचे साधन अल्लाहने दिलेले आहे त्यातून अल्लाहच्या मार्गामध्ये खर्च करणे. ५. कुरआनवर श्रद्धा ठेवणे ६. कुरआनच्या पूर्वी जे ईश्‍वरीय ग्रंथ अवतरले आहेत त्यांच्यावरही श्रद्धा ठेवणे ७. मरणोत्तर जीवनावर दृढ विश्‍वास ठेवणे. वरील सद्गुण अंगात बाणवल्याशिवाय माणसात तक्व्याची निर्मिती होऊच शकत नाही.
२. दुराचारांच्या नेतृत्वाखाली कधीच सदाचारी समाज आकार घेवू शकत नाही. आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी, समाजात सदाचारी लोक, बहुसंख्येने असण्याची आवश्यकता असते. सदाचाराच्या बाबतीत कुरआन खालीलप्रमाणे निर्देश देतो, ”सदाचार हा नव्हे की तुम्ही आपले तोंड पुर्वेकडे किंवा पश्‍चिमेकडे करावे, तर सदाचार हा आहे की, जे अल्लाहवर आणि अंतिम दिवसावर इमान ठेवतात. तसेच सर्व दूतांवर, सर्व ग्रंथांवर, सर्व प्रेषितांवर श्रद्धा ठेवतात. अल्लाहच्या प्रेमापोटी आपल्याला प्रिय असलेली संपत्ती आपल्या नातेवाईकांवर, अनाथांवर, गरजवंतांवर, वाटसरूंवर तसेच गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करतात आणि नमाज कायम करतात व जकात अदा करतात. तसेच दिलेल्या वचनाची पूर्तता करतात आणि अडचणी, संकटे तथा युद्धप्रसंगी देखील सयंम राखतात, हेच लोक सत्यशिल (सदाचारी) आणि अल्लाहचे भय (तक्वा) बाळगणारे आहेत.” (संदर्भ : सुरे बकरा आयत नं.१७७).
या आयातींमध्ये आयत क्रं. २,३,४ आणि ५ मध्ये नमूद केलेल्या सद्गुणांपैकी काही सद्गुणांचा पुनरूच्चार करून चार अतिरिक्त सद्गुणांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यात गुलामांच्या मुक्ततेसाठी खर्च करणे, जकात अदा करणे, एकमेकांना दिलेल्या वचनांची पूर्तता करणे आणि अडी-अडचणी, संकटाच्या काळात एवढेच नव्हे तर युद्ध प्रसंगी देखील संयम राखणे. या सद्गुणांचा समावेश करण्यात आलेला आहे.
३. रोजांच्या बाबतीत कुरआनमध्ये एक संपूर्ण आयातच अवतरित झालेली आहे ती खालीलप्रमाणे.
”हे ईमानधारकांनो! तुमच्यावर रोजे अनिवार्य केलेले आहेत. जसे की, तुमच्या पूर्वीच्या लोकांवरही अनिवार्य केले होते. जेणेकरून तुम्ही तक्वावान (धर्मपारायण) व्हाल.” (कुरआन : सुरे बकरा आयत नं. १८३).
कुरआन पुन्हा-पुन्हा चारित्र्यनिर्मितीच्या आवश्यकतेवर भर देत आहे. यावरून वाचकांच्या लक्षात आलेच असेल की, चारित्र्यवान व्यक्तीशिवाय कुठलाही समाज संतुलित प्रगती करू शकत नाही. या आयातींमध्ये रोजांचा सरळ संबंध चारित्र्यनिर्मितीशी जोडलेला आहे व म्हटलेले आहे की, रोजे हे फक्त धर्मपारायणतेसाठी अर्थात चारित्र्यनिर्मितीसाठी अनिवार्य करण्यात आलेले आहेत.
ते कसे हे आता आपण पाहू. उदा. एक रोजदार आहे. त्याला दिवसातून चोरून खाण्या-पिण्याच्या शेकडो संधी मिळत असतात. सर्वांची नजर चुकवून सहज तो काहीतरी खाऊ-पिऊ शकतो. परंतु, तो असे करत नाही. भूक लागल्याने व्याकूळ होतो, तहान लागल्याने जीव कासावीस होतो पण सर्वकाही सहन करून सूर्यास्तापर्यंत तो संयम ठेवतो. असे करण्यास त्याला अल्लाहचे भयच भाग पाडते. स्पष्ट आहे रोजांमुळे अल्लाहचे भय अंगी बानवते. ३० दिवसाच्या कठिण प्रशिक्षणातून तो मग पुढील ११ महिने वाईट गोष्टींपासून लांब राहण्याची शक्ती प्राप्त करतो. म्हणजेच तो चरित्रवान बनतो. दैनंदिन नमाज आणि वर ३० दिवसांचे रोजे यापेक्षा सुलभरित्या चारित्र्यनिर्मितीची व्यवस्था जगात दूसरी नाही. रोजे म्हणजे फक्त सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपाशी राहणे एवढेच नाही. रोजाच्या कालावधीमध्ये नुसते उपाशी रहायचे नसते तर डोळ्यांनी वाईट पहायचे नाही, कानांनी वाईट ऐकायचे नाही, तोंडाने वाईट बोलायचे नाही, दिवसभर सत्कृत्य करायचे, वाईट कृत्यांपासून दूर रहायचे. संधी मिळूनही जसे खायचे-प्यायचे नाही तसे संधी मिळूनही वाईट कृत्य करायचे नाही. शिवाय, जवळजवळ १४ तासांचा रोजा, त्यातून निर्माण होणारी भुकेची तीव्रता, या सगळ्यांची जाणीव प्रत्येक माणसाला सतत ३० दिवस होत राहते. त्यातून गरीबांना उपाशी राहिल्यामुळे होणारा त्रास प्रत्येक श्रीमंताला सुद्धा अनुभवता येतो. म्हणून रोजा ठेवणारी श्रीमंत मंडळी सुद्धा कुठलाही माणूस गरीबीमुळे उपाशी झोपणार नाही, यासाठी खर्च करण्यासाठी प्रेरित होतात.
४. ”लोकहो उपासना करा आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पुर्वीच्यांनाही निर्माण केलेले आहे. जेणेकरून तुम्ही (दुष्कृत्यांपासून) परावृत्त राहू शकाल.” (सुरे बकरा, आयत नं. २१).
या ठिकाणी सुद्धा अल्लाहने उपासना अर्थात इबादत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. उपासनेची सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे नमाज. दिवसातून पाच वेळेसची नमाज माणसामध्ये चांगल्या सवयी निर्माण करण्याची हमी देते आणि ज्यांच्या सवयी चांगल्या असतात त्याचे चारित्र्य चांगले असते हे ओघाने आलेच. 
५.”हे श्रद्धावंतांनो! अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्त्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की, तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा हे ईशपारायणतेशी (तक्वाशी) अधिक निकट आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत रहा, जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची पूरेपूर खबर ठेवणारा आहे.” (सुरे अलमायदा आयत नं.८).
माणूस असेल किंवा जनसमूह त्यांच्यामध्ये न्यायबुद्धी असणे, चांगल्या चारित्र्याच्या प्रमुख लक्षणांपैकी एक महत्त्वाचे लक्षण आहे. न्याय हे फक्त आपल्या समुहाशीच नव्हे तर समाजातील सर्वच समुहाशी करणे हे नैतिकदृष्ट्या बंधनकारक आहे. एखाद्या व्यक्ती किंवा गटाशी काही कारणाने असलेले वैर आपल्याला त्यांच्याबरोबर न्याय करण्यापासून रोखत असेल तर ते आपल्या चारित्र्याचे सर्वात मोठे वैगुण्य ठरेल, या आयातींमध्ये याच महत्त्वाच्या गुणाकडे लक्ष वेधण्यात आलेले आहे.
आदर्श समाज रचना
आदर्श समाजाची रचना, भौतिक शिक्षण घेतलेल्या, चंगळवादी शैलीत रंगलेल्या, अनैतिक जीवनशैली अंगिकारलेल्या, लोकांकडून होवूच शकत नाही. याचा अनुभव आपल्या सगळ्यांना एव्हाना आलेला आहे. पश्‍चिमी जीवनशैली मुळे निर्माण होणार्‍या वाईट चारित्र्यांच्या लोकांचा कारखाना बंद पाडायचा असेल व आपल्य प्रिय भारत देशात चांगल्या चारित्र्याच्या लोकांची निर्मिती करावयाची असेल तर पश्‍चिमेकडून आलेल्या वाईट जीवनशैलीचे हे आव्हान मुस्लिमांनी स्विकारायलाच हवे. दुर्भाग्याने मुस्लिम समुदायातील एका मोठ्या वर्गाला हे आव्हान स्वीकारण्याची गरज वाटत नाही. उलट ते जन्माने जरी मुस्लिम असले तरी मनाने पूर्णतया पाश्‍चिमाळलेले आहेत. अशा लोकांनाही त्यांच्या मार्गापासून परावृत्त करून सद्मार्गाकडे आणण्याचे दुहेरी आव्हान चारित्र्यवान मुस्लिमांसमोर आहे. आज देशामध्ये वाईट चारित्र्यांच्या लोकांची गर्दी झालेली आहे. चांगल्या चारित्र्यांच्या लोकांची वाणवा आहे. ही जागा भरून काढण्याची सुवर्णसंधी, रमजाननिमित्त मुस्लिमांनी साधायला हवी. चांगल्या, सद्गुणी व जबाबदार नागरिक घडविणे यापेक्षा मोठी देशसेवा असूच शकत नाही.
सारांश - दुभंगलेली मने, वाईट चारित्र्य या आदर्श समाजाच्या रचनेमधील प्रमुख अडचणी आहेत. आपसातील असलेले वैरभावनेतून शत्रुत्व वाढते आणि त्यातून अनेक गुन्हे घडतात. एकमेकांविषयी प्रेम, दया, करूणा, बंधुभाव, सद्भावना या गोष्टी अल्लाहच्या उपासनेमुळेच आपल्या मनामध्ये निर्माण होतात. अल्लाहच्या उपासनेपासून आपण जेवढे दूर जाऊ तेवढेच हे सद्गुण आपल्यापासून दूर जातात. म्हणून मुस्लिमांनी रमजानची संधी साधून आपल्यामध्ये चारित्र्याची निर्मिती करण्याचे नियोजनपूर्वक प्रयत्न करायला हवेत. नुकताच सुरू झालेला रमजानचा महिना हा खडतर प्रशिक्षण काळ आहे. या प्रशिक्षणात जो जीव ओतून स्वत:ला जेवढा प्रशिक्षित करील तेवढाच तो समाजोपयोगी होईल, याची खुनगाठ प्रत्येकाने बांधावी.
प्रत्यक्षात आपण पाहतो रमजान म्हणजे काही लोकांसाठी डायटींगचा महिना असतो. अशा लोकांची गरज अल्लाहला नाही, असे अनेक हदीसमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. अनेक लोक या महिन्यात रात्रभर जागतात, मेजवाण्या उडवितात, दिवसभर झोपतात ही दिनचर्या सुद्धा अल्लाहला अपेक्षित नाही. आपले दैनंदिन काम करत, रमजानचे हे खडतर प्रशिक्षण घेणे यातच तर खरा आनंद आहे. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ऐ अल्लाह! आम्हा सर्वांना रमजानचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करण्याची, सुंदर असे चारित्र्य निर्माण करण्याची व त्यातून देशसेवा करण्याची शक्ती दे. आमीन.

- एम आय. शेख
www.naiummid.com

आपल्या समस्या दुसरा कोणीतरी येवून सोडवेल हा विचारच मूर्खपणाचा आहे. हुंडा आणि दहेज भारतीय मुस्लिम समाजामध्ये खोलपर्यंत रूजलेली समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी आता कोणी पैगंबर येणार नाहीत. म्हणून ही प्रथा आपल्यालाच दूर करावी लागेल. कुठलेही मोठे काम योजनेशिवाय पूर्ण होत नाही. ऐन वेळेसची जमवाजमव निरूपयोगी असते. दहेज प्रथेचे उन्मूलन करण्यासाठी जेवढे प्रयत्न होतात तेवढे ती प्रबळ होते, आतापर्यंतचा असा अनुभव आहे. जोपर्यंत आपण एक उम्मत म्हणून या समस्येचे गांभीर्य ओळखणार नाही, त्यापासून होणारे नुकसान तपासून पाहणार नाही तोपर्यंत ही समस्या दूर होणार नाही.
दहेज देण्याची कारणे
मुस्लिमांमधील अनेक विचारवंत दहेज प्रथेला योग्य ठरविण्यासाठी, ’दहेज-ए-फातमी’चे उदाहरण देतात. म्हणजे प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल.च्या लाडक्या मुली ह.फातेमा रजि.चा निकाह जेव्हा हजरत अली रजि. बरोबर झाला तेव्हा बिदाईच्या वेळी काही गृहउपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या. हे ऐतिहासिक सत्य आहे. मात्र या वस्तू देण्यामागची वस्तूस्थिती समजून न घेताच या घटनेचा सोयीस्कर अर्थ लावून टी.व्ही. फ्रिजपासून उंची फर्निचर पर्यंत लाखो रूपयांच्या वस्तूंची देवाण-घेवाण मुस्लिम समाजात होते. हा शुद्ध ढोंगीपणा आहे. या दहेज-ए-फातमी ची वस्तूस्थिती खालीलप्रमाणे नमूद आहे.
हे सत्य आहे की, खजूरच्या सालीपासून तयार केलेले एक अंथरून, चामड्याचा एक मिश्कीजा (पाणी भरण्याचे साधन) आणि काही मातीची भांडी ह.फातिमा रजि. यांना बिदाईच्या वेळी देण्यात आल्या होत्या. याचे कारण असे की, ह.अली रजि. हे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे चुलतभाऊ होते व लहानपणापासून त्यांच्याच छत्रछायेखाली वाढलेले होते. त्यांचे स्वतंत्र असे घर नव्हते. जेव्हा हा विवाह  निश्‍चित झाला तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी महेर आणि गृहउपयोगी वस्तू घेण्यासाठी हजरत अलीच्या मालकीची असलेली एकमेव वस्तू ’जर्रा’ (घोड्यावर बसण्यासाठी वापरण्यात येणारे आसन) विकून त्यातून आलेल्या रकमेतून महेर आणि गृहउपयोगी वस्तू घेण्याचे निर्देश ह.अली रजि. यांना दिले. त्याप्रमाणे ह.अली रजि. यांनी आपल्या मालकीची जर्रा विकली. ती ह. उस्मान रजि. यांनी खरेदी केली व त्या मोबदरल्यात जी रक्कम मिळाली त्यातून महेर अदा करण्यात आली व उपरोक्त नमूद वस्तू खरेदी करण्यात आल्या. वरील वस्तू खरेदी करण्यामध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या मालकीचे एक दिरहमही खर्च करण्यात आलेले नव्हते. ही सत्य घटना आहे. एवढ्याश्या घटनेचे भांडवल करून कोट्यावधी मुस्लिमांनी आतापावेतो अब्जावधी रूपयांच्या दहेजची देवाण-घेवाण केलेली आहे.
दहेज-ए-फातमीचे कारण पुढे करणारे विचारवंत हे विसरून जातात की, ज्या मदिना शहरामध्ये ह.फातिमा रजि. आणि ह.अली रजि. यांचा निकाह झाला. त्याच मदिना शहरामध्ये प्रेषित सल्ल. यांच्या दोन मुलींचे निकाह (ह.रूकैय्या रजि. आणि ह.उम्मे कुलसूम रजि.) एकीच्या मृत्यूनंतर एक ह.उस्मान रजि. यांच्याबरोबर झाले. तेव्हा कुठल्याही गृहउपयोगी वस्तू देण्यात आलेल्या नव्हत्या. म्हणून दहेज-ए-फातमीच्या नावाखाली हा जो दहेज देण्याघेण्याचा खेळ मोठ्या प्रमाणात मुस्लिमांनी सुरू केलेला आहे व त्यामुळे निकाह महाग झालेला आहे. गरीबांना परवडेनासा झालेला आहे. तो ताबडतोब बंद करण्याची गरज आहे.
एक मजेशीर गोष्ट आपल्याला सांगतो, माणसाचे शरीर असो का विचार, यावर बर्‍याच गोष्टींचा प्रभाव नकळतपणे पडत असतो. हा प्रभाव (बदल) इतका सूक्ष्म असतो की, दैनंदिन जीवनात तो लक्षात येत नाही. उदा. समजा आपला एखादा बालमित्र अचानक दहा वर्षानंतर भेटला तर आपल्याकडे पाहताच तो म्हणतो, ” अरे! कम्प्लिट चेंज झालास” त्याला गेल्या दहा वर्षात आपल्यात झालेले बदल चटकन लक्षात येतात पण आपल्या  लक्षात येत नाहीत. लग्नाच्या बाबतीतही काही बदल आपण आपल्या देशातील बहुसंख्य हिंदू बांधवांच्या लग्न पद्धतीतून स्वीकारलेले आहेत. आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या जवळच्या बहुसंख्य बांधवांच्या लग्नसोहळ्यास उपस्थित राहत असतो व नकळत त्या सोहळ्यातील बर्‍याच गोष्टींने प्रभावित होत असतो. उदा. लग्नपत्रिका छापणे, फेटे बांधणे, शॉल देऊन उपस्थितांचा सत्कार करणे, आलेल्या लोकांना जेवन देणे, रोषणाई करणे, बँड/ डी.जे.वाजविणे, वरात काढणे इत्यादी. मुळात सोहळ्यासाठी ह्या गोष्टी आवश्यकच असतात. परंतु, इस्लाममध्ये निकाह हा मुदलात सोहळाच नाही. तो एक सामाजिक करार आहे. ज्याच्याबद्दल दस्तुरखुद्द प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनीच सांगितलेले आहे की, ”तो निकाह सर्वात चांगला ज्यात साधेपणा आहे”.
बहुसंख्य हिंदू बांधवांचे लग्न मनुस्मृती खंड 3 मधील नियम 20 ते 34 अनुसार प्रजापती पद्धतीने होत असतात. त्यात मुलीचे वडील ’कन्यादान’ करीत असतात. कल्पना करा ज्या मुलीला जन्मापासून लग्नापर्यंत लाडात वाढविले तीचे दान करताना कोणता पिता तिला साध्या पद्धतीने सासरी पाठवेल? म्हणून बहुसंख्य बांधवांमध्ये लग्नाचा सोहळा आयोजित केला जातो. त्यात पिता आपल्या ऐपतीप्रमाणे हुंडा, संसारोपयोगी वस्तू बिदायीच्या वेळेस मुलीला देत असतो.
यानंतर त्या मुलीचा माहेरशी संबंध औपचारिक असतो. तिचे सर्व जग बदलून जाते. पतिच्या नावाचे कुंकू कपाळी तर पतीच्या हातचे मंगळसूत्र गळ्यात बांधले जाते. लग्नानंतर तिच्या नावाच्या पुढे वडिलांच्या नावाऐवजी पतीचे नाव लावले जाते. एवढेच नव्हे तर लग्नानंतर आई-वडिलांच्या संपत्तीमध्ये तिचा वारसा हक्क समाप्त होतो. (महिलांना वारसा हक्क हिंदू कोडबिल 1956 प्रमाणे मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.)
या उलट इस्लाममध्ये लग्नाचा करार मस्जिदीमध्ये अतिशय साध्या पद्धतीने करण्याचे प्रेषित सल्ल. यांचे निर्देश आहेत. लग्नानंतर मुलीचे नाव बदलले जात नाही. मरेपर्यंत तिच्या नावाच्या पुढे तिच्या वडिलाचेच नाव असते. तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले जात नाही. (ज्या विवाहित मुस्लिम महिला लच्छा/गलसर घालतात ती मंगळसूत्राचीच नक्कल असते.) आई आणि वडिल दोघांच्याही संपत्तीत तिचा वारसा हक्क अबाधित असतो. म्हणून अनेक मुस्लिम लोक मुलीच्या निकाहमध्ये भरपूर खर्च करून तिला वारसाहक्कापासून वंचित करण्याचा डाव खेळतात. हा एकप्रकारे शरियतचा अपमान आहे.
एकदा असे झाले की, नव्याने इस्लाममध्ये प्रवेश केलेल्या व जहालती (अडानीपणा)चे काही संस्कार शिल्लक असलेल्या बदू (ग्रामीण) लोकांमध्ये कोणाचा कबिला श्रेष्ठ? यावर चर्चा सुरू झाली. प्रत्येकजण आपलाच कबिला श्रेष्ठ असल्याचा दावा करीत होता. प्रकरण हमरीतुमरीवर पोहोचताना पाहून एका वृद्ध बदुने सर्वांना शांत राहण्याची विनंती करून आवाहन केले की, आपण सर्वजण प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचेकडे जावून त्यांनाच विचारू की आपल्यापैकी कोणाचा कबिला श्रेष्ठ? ते आपल्या सगळ्यांनाच ओळखतात. ते जे निर्णय देतील ते आपण मान्य करू. यावर सर्वांचे एकमत झाले आणि सर्वजण प्रेषित सल्ल. यांच्या समोर हजर झाले. वृद्ध बदुने म्हटले की, ”हे प्रेषित! आपल्यावर आमचे आई-वडिल कुर्बान, आम्हाला एका प्रश्‍नाचे उत्तर हवे आहे की, आमच्यापैकी कोणाचा कबिला श्रेष्ठ आहे?” प्रेषित सल्ल. यांनी स्मित करून उत्तर दिले की, ”तुमच्यापैकी ज्यांच्या कबिल्यामध्ये निकाह जितका सोपा व व्याभिचार जितका अशक्य आहे तो कबिला तेवढा श्रेष्ठ.” यावरून सुद्धा निकाह सोपा करण्याच्या आवश्यकतेवरच भर दिलेला आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी.
दहेजचे दुष्परिणाम
दहेजमुळे लग्न महाग होतात व गरीबांच्या मुलींचे लग्न होणे अवघड होवून जाते. खर्च वाढल्यामुळे त्याची जमवाजमव करताना वेळ जातो व उपवर मुला-मुलींचे वेळेवर लग्न होत नसल्यामुळे त्यांचा व्याभिचाराकडे वळण्याचा धोका असतो. व्याजाने रकम उचलून ऐपत नसताना खर्चीक लग्ने करून अनेक परिवार देशोधडीला लागलेले आहेत. लग्न महाग झाल्याने मुलींचे वडील भ्रष्ट मार्गाने कमाई करण्यासाठी बाध्य होतात. आज अशी परिस्थिती आहे की, मुस्लिम समाजातील प्रत्येक बाप आपल्या मुलींचे व प्रत्येक भाऊ आपल्या बहिणींचे थाटा-माटात लग्न करण्यासाठीच जणू कमावितो आहे. कुठल्याही मुस्लिम बहूल भागामध्ये ’भव्य शादीखाने’ आपले लक्ष वेधून घेतात. याउलट हिंदू बहूल भागामध्ये, ”भव्य खाजगी शिक्षण संस्था लक्ष वेधून घेतात.” लग्न महाग झाल्याने, मुलींचे लग्न होत नसल्याने अनेक ठिकाणी मुलांची लग्नेही खोळंबून ठेवली जातात. लग्न महाग झाल्यामुळे मुलगी जन्मली की काळीज धस्स करते. म्हणून अलिकडे मुस्लिमामध्ये सुद्धा कन्याभ्रूण हत्येची प्रवृत्ती वाढीस लागल्याची चाहूल लागलेली आहे. हा सगळा अनर्थ निकाह महाग केल्यामुळे होत आहे.
अलिकडे काही उलेमा आणि धार्मिक जमातींद्वारा मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या गेल्यामुळे सरळ हुंडा/ दहेज  मागण्याचे प्रकार कमी झालेले आहेत. मात्र जेथे, ”न मागताच” या गोष्टी मिळू शकतील. अशाच घराण्यामधील मुलींसाठी निकाहचे प्रस्ताव पाठविण्याची पद्धत रूढ झालेली आहे. याचा सरळ फटका गरीब आणि मध्यवर्गीय विशेष करून ज्यांना ज्यास्त मुली आहेत, अशा लोकांना बसत आहे. मुली पाहून नकार कळविण्यापेक्षा जेथे काही मिळण्याची शक्यता नाही तिथे जाणेच टाळले जात असल्याने अनेक परिवारांमध्ये 35 ते 40 वर्षाच्या व्हर्जीन (कुमारी) मुलींची संख्या समाजात भयावह पद्धतीने वाढत आहे. बर्‍याच ठिकाणी इज्तेमामध्ये साध्या पद्धतीने लग्न करून बिदाईच्या वेळी पुन्हा भव्य सोहळा आयोजित करून लाखोंचा खर्च केला जात आहे. काही ठिकाणी तर निकाह साधेपणाने मस्जिदीमध्ये पण बाकीचा सोहळा फंक्शन हॉलमध्ये यथोचित स्वरूपात पार पाडल्या जात आहे.
अल मारूफ अल मशरूत
अरबीमध्ये एक म्हण आहे, ’अल मारूफ अल मशरूत’ अर्थात जी गोष्ट आज समाजात प्रचलित होते काही काळानंतर ती अनिवार्य बणून जाते. हुंडा, दहेज, निकाहचे जेवण देणे ह्या गोष्टी अशाच मारूफ (प्रचलित) मधून मशरूत (अनिवार्य) प्रथा बनलेल्या आहेत. यामुळेच निकाह महाग झालेला आहे.
तोंडाने मागायचे नाही पण मनात आशा ठेवायची, अशी दुटप्पी भूमिका बरेचजण घेताना दिसतात.” हमें तो कुछ नहीं चाहिए आप अपनी खुशीसे जो देना है सो दें.” किंवा ” हमारे पास तो अल्लाह का दिया सबकुछ है, जो भी देना है आप अपनी बेटी को दीजिए” सारख्या सभ्य शब्दात आजकाल भीक मागितली जात असून, ’एक दूसरे को तोहफे देने में आखिर हर्ज ही क्या है’, असे म्हणून या भीकेचे समर्थन केले जात आहे. हे इस्लामच्या आत्म्याच्या विरूद्ध आहे.
मौलाना मौदूदी रहे. म्हणतात, ”एक मुसलमान की हैसियत से आप देखें तो, अखलाक की पस्ती के साथ हम सीरे से किसी इस्लामी जिंदगीका तसव्वुरही नहीं कर सकते. मुसलमान को तो मुसलमान बनायाही इसलिए गया है के, उसकी जात से दुनिया में भलाई कायम हो और बुराई मिटे. भलाई को मिटाना और बुराई को फैलाना और उसके साथ मुसलमान भी होना ये दर हकीकत एक खुला हुआ तनाखुज (विरोधाभास) है. एक शख्स मुसलमान हो और फिर भी उसके शरसे दूसरे बंदगाने खुदा महेफूज न हो, एक शख्स मुसलमान हो और फिर भी उसपर किसी मामले में ऐतेमाद न किया जात सके, एक शख्स मुसलमान हो और फिर भी वो नेकी से भागे और बदी की तरफ लपके, हराम खाये और हराम तरीके से अपनी ख्वाहिशें पूरी करे, तो आखिर उसके मुसलमान होने का फायदा क्या है? किसी मुआशरे (समाज) की इससे बढकर कोई जिल्लत नहीं हो सकती के वो इन्साफ से खाली और जुल्म से लबरेज होता चला जाए. उसमें रोज बरोज भलाईयाँ दबती और बुराई फरोग पाती चली जाएं और उसके अंदर दियानत, अमानत और शराफत के लिए फलने फुलने के मौके कमसे कमतर होते चले जाएं. ये खुदा के गजब को दावत देनेवाली हालत है. अगर किसी मुस्लिम मुआशरे की ये हालत हो जाए तो उसके मानी ये हैं के वो इस्लाम के रूह से खाली हो चुका है. सिर्फ इस्लाम का नाम ही उसमें बाकी रहे गया है और ये नाम भी अब सिर्फ इसलिए रहे गया है के दुनिया को इस दीन-ए-हक से दूर भगाता रहे.’ (संदर्भ ः तामीरे अख्लाक क्यूं और कैसे पेज क्र. 3-4).
मुस्लिम युवकांची जबाबदारी
वो फरेब खुर्दा शाहीं जो पला हो किरगीसों में
उसे क्या खबर के क्या है रहवेरस्मे शाहबाजी
मुस्लिम तरूणांना माझे आवाहन आहे की, ” ऐ शाहीनों! अपने अल्लाह पर भरोसा रख्खो, अपनी मनगट की ताकत पर भरोसा रख्खो, दुल्हन आयेगी तो उसके कदमों से बरकत भी आयेगी, हे भीक मागायचे प्रकार सोडून द्या. हा तुमच्या पुरूषार्थाचा अपमान आहे. मित्रांनों! परिश्रमाला पर्याय नाही. देअर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. मन लावून मेहनत करा, सजद्यामध्ये जावून मदद मागा, नैतिक मार्गाने पैसे कमाविण्याचा प्रयत्न करा, इस्लामी नितीमत्तेचे प्रदर्शन करा, विश्‍वास ठेवा आज समाजामध्ये भरोसा ठेवण्यालायक लोकांची संख्या फार कमी झालेली आहे. तुम्ही ही जागा भरू शकता. अनैतिकतेमध्ये ग्रासलेल्या या भांडवलशाही लोकशाही व्यवस्थेमध्ये नितीमान व प्रामाणिक व्यावसाय करणार्‍यांना भरपूर मागणी आहे. ती मागणी तुम्ही पूर्ण करू शकता. लक्षात ठेवा! प्रामाणिक नागरिकांची देशाला आपुर्ती करण्यापेक्षा मोठी देशसेवा दूसरी नाही आणि प्रामाणिक नागरिक बनविण्याचा हमखास यशस्वी मार्ग शरियत आहे. आज शपथ घ्या की मी हुंडा मागणार नाही, दहेज घेणार नाही, साधेपणाने मस्जिदीमध्ये निकाह करणार, फुकटाचे निकाहचे जेवण करणार नाही, साध्यापद्धतीने निकाह करून पुरूषार्थ सिद्ध करण्याची संधी कदापि सोडू नका, मग पहा पत्नीकडून व सासरवाडीकडून तुम्हाला नायकासारखा सन्मान मिळेल.
अलिकडे अशी लग्ने होत आहेत. ही संतोषजनक बाब आहे. जमाअते इस्लामी महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांच्या मुलीचे नुकतेच लग्न अगदी साध्या पद्धतीने मस्जिदे महेबूबिया लातूर येथे झाले. तसेच जमातचे सदस्य अशफाक अहेमद यांच्या मुलीचेही लग्न मस्जिदे मुहम्मदिया लातूर येथे अगदी साधेपणे झाले. मात्र अशा प्रकारचे निकाह करण्याची एक व्यापक चळवळ सुर व्हायला हवी. इतकी की इतर समाजांनी आपले अनुकरण करण्यास प्रवृत्त व्हावे. अल्लाह आपल्या सर्वांना निकाह सोप्या पद्धतीने करण्याची तौफिक अता करो. (आमीन.)

- एम आय. शेख
www.naiummid.com
           

पुणे (वकार अहमद अलीम)-
ईश्वर एकच आहे. त्याचा कोणीही समकक्ष नाही. सबंध सृष्टीची निर्मिती आणि तिची व्यवस्था तोच पाहतो. माणसाने केवळ त्याचीच भक्ती करावी. केवळ त्याचीच गुलामगिरी  पत्करावी, असा चिरकालीन संदेश देत इस्लामने माणसाला माणसाच्या गुलामगिरीतून मुक्त केले. एकेश्वरवादी संकल्पनेमुळेच स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर १४५०० वर्षांपूर्वी  इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एक जीवंत समाज उभा केला. इस्लामने मानवाने मानेवावर लादलेल्या गुलामगिरीच्या मुळावरच घाव घातला.
याचा फार मोठा प्रभाव क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले आणि परिवर्तन चळवळीचे खंदे पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर झाला, असे भावपूर्ण प्रतिपादन जमाअत-ए-इस्लामी हिंद  महाराष्ट्रचे प्रसार व प्रचार विभागाचे सचिव इम्तियाज शेख यांनी केले.
बहुजन महामानव विचार प्रबोधिनीतर्फे फुले-आंबेडकर फेस्टिवल – २०१८ अंतर्गत सामाजिक ऐ्क्य परिषदेचे आयोजन ११ ते १५ एप्रिल दरम्यान करण्यात आले होते. दि. १३ एप्रिल रोजी पुण्यातील गंगापेठेत म. ज्योतिबा फुलेवाडा येथे ‘म. ज्योतिबा फुले आणि इस्लाम’ या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून इम्तियाज शेख बोलत होते. प्रसिद्ध इस्लामी विचारवंत डॉ. रफीक सय्यद यांनी परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषविले.
सावित्री-फातिमा विचार मंच आणि देश बचाओ आघाडी तर्फे सदर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. अली इनामदार यांनी हाच विषय का निवडला? याबाबत आपल्या प्रास्ताविकेत स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित खोटा इतिहास गेल्या १५ वर्षांत मराठा सेवा संघाने उघडा पाडला. त्यामुळे देशात शिवाजी राजांच्या नावाने होणाऱ्या जातीय दंगली संपुष्टात आल्या. त्याच धर्तीवर म. फुले, छ. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर याचा खरा इतिहास लोकांसमोर आणने आणि या महामानवांच्या विचारांनुसार मार्गक्रमण  व्हावे, हाच हेतू आणि उद्देश परिसंवाद आयोजनामागे आहे.
जमाअत-ए-इस्लामी हिंद पुण्याचे सदस्य अजीमुद्दीन शेख यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सन्मानार्थ लिहिलेला पोवाडा ‘मुहम्मद झाला  जहांमर्द खरा’ अत्यंत सुरेल आवाजात सादर करून वातावरण भक्तिमय केले.
पुण्यातील कौसरबागचे चेअरमन शेख सलीम यांनी परिसंवादाचे उद्घाटन करताना उद्देशप्राप्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. मुजफ्फर सलीम यांनी संस्कृतप्रचुर अस्खलीत मराठी भाषेत विषयावर भाष्य करताना सांगितले की इस्लामने शिक्षणाचे महत्त्व ठासून सांगितले. इतकेच नव्हे तर ज्ञानार्जन करून इतरांना त्याचा लाभ द्यावा, असा आदेश  प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिला. इस्लामच्या या मूळ आदेशानुसार म. फुले यांनी महिलांना व अस्पृश्य समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले.
परिवर्तन चळवळीतील प्रमुख नेते अंजुम इनामदार यांनी म. फुले यांचे अर्धवट शिक्षण व नंतर शिक्षण निरंतर सुरू होण्यामध्ये मुन्शी गफ्फार बेग यांच्या बहुमूल्य योगदानाची आठवण  करून दिली. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या गौरवार्थ म. फुले यांनी लिहिलेल्या पोवाड्याचे उर्दूमध्ये इब्राहीम फैज यांनी भाषांतर केले. अंजुम इनामदार यांनी उर्दू पोवाड्याचे वाचन करून  श्रोत्यांना थेट हृदयाला हात घातला.
कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आचरणामध्ये वेळोवेळी शिक्षणाचे महत्व सांगण्यात आले, त्याचा फार मोठा प्रभाव फुल्यांवर झाला. त्याचीच परिणती म्हणजे देशातील एतदेशीयांची मुलींची पहिली शाळा पुण्यात ज्योतिबांनी सुरू केली. पुढे शाळेची जागा अपुरी पडत असल्याने गंजपेठेतील उस्मान शेख यांनी स्वत:ची जागा शाळेसाठी दिली. फुलेंचे  निवासस्थान व मुलींची शाळा म्हणजेच आज होत असलेला कार्यक्रम म. ज्योतिबा फुले वाडा होय.
पवित्र कुरआनमधील सूरह हुजूरातमधील १२ व्या आयतीचे पठण व भाषांतर करून इम्तियाज शेख यांनी सांगितले की समस्त मानवाची निर्मिती एकच पुरुष व एकच स्त्रीद्वारे झाली. त्यानंतर वेगवेगळ्या वंशावळीत त्यांची विभागणी ईश्वराने केली, जेणेकरून त्यांची आपापसात ओळख व्हावी.
पुढे इम्तियाज शेख यांनी सांगितले की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ‘ला इलाहा इल्लल्लाह’ संदेशाद्वारे शुद्ध एकेश्वरवादाची शिकवण दिली. त्यामुळे त्या काळी हजारो ईश्वरांना  मानणाऱ्यांपुढे केवळ एकच ईश्वराचे स्वामित्व स्वीकारण्याचे आवाहन केले. या आवाहनामुळेच माणसाची माणसाच्या गुलामीतून मुक्तता झाली. लोक केवळ एकच ईश्वराच्या गुलामीत  लिप्त झाले. अशा प्रकारे इस्लामने गुलागिरीच्या मुळावरच घाव घालून जगासमोर एक आदर्श जीवनपद्धती ठेवली.या सिद्धांताचा फार मोठा प्रभाव म. फुले यांच्यावर झाला. फुले यांनी  ‘मानवाचा धर्म एक’ या शीर्षकाच्या अखंडात निर्मिकाचे तपशीलवार वर्णन केले.
‘‘सर्वाचा निर्मिक आहे एक धनी।
त्याचे भय मनी, धरा सर्व।।१।।
मानवाचे धर्म नसावे अनेक।
निर्मिक तो एक, ज्योती म्हणे।।’’
देशात जातीजातीत विद्वेषाचे वातावरण जाणीवपूर्वक तयार केले जात आहे. अशा वेळी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या इस्लामच्या प्रमुख सिद्धान्तांना अनुसरून सर्व बहुजनांना  एकत्रित करून परिवर्तन चळवळ पुढे नेण्याचा आशावाद इम्तियाज शेख यांनी केला.
सामाजिक चळवळीचे प्रखर विचारवंत रमेश राक्षे यांनी ब्राह्मणवादी विचारावर कडाडून हल्ला चढविताना सांगितले की मुन्शी गफ्फार बेग, उस्मान शेख, फातिमा शेख आदींचे म. पुले  यांना मिळालेले सहकार्य ब्राह्मण्यवाद्यांनी लपवून ठेवले. फुल्यांनी ब्राह्मण्यवादावर घणाघाती हल्ला चढविला.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी १४५० वर्षांपूर्वी स्त्री-पुरुषांना शिक्षण सक्तीचे केले. नव्हे तर माणसाला माणूस बनविणारे शिक्षण असावे असे बजावले, असे सांगून आपल्या अभ्यासपूर्ण  धीरगंभीर वाणीने अध्यक्षीय समारोप करताना डॉ. रफीक सय्यद पारनेरकर यांनी जीवाची उद्दिष्ट्ये काय? असा खडा प्रश्न श्रोत्यांसमोर टाकला.
जीवनाचा उद्देश ठाऊक नाही तरीही लोक जीवन जगतात. म्हणून दु:खकष्टी राहतात. फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची चाल म्हटली जाते, पण त्यांच्यापूर्वी हजारो वर्षापूर्वीपासून  वर्णद्वेषी व्यवस्था कुणी निर्माण केली? वस्तुत: इंग्रज हे तर मनुवाद्यांचे शिष्य आहेत. आदर्श समाज निर्मितीसाठी फुले, आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’चा नारा  दिला. साडे चौदाशे वर्षांपूर्वी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी याचे केवळ आवाहनच केले नाही तर स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित एका आदर्श समाजाची निर्मिती केली. या  सर्वांचा म. फुले यांच्यावर फार मोठा प्रभाव पडलेला आहे. १८९१ साली ‘सार्वजनिक सत्य धर्म’ या पुस्तकाच्या मूळ हस्तलिखित प्रतीवर म. फुले यांचा दुर्मिळ अखंड फुलेंच्या हस्ताक्षरात लिहिलेला आहे. ती प्रत लंडनच्या म्युजियममध्ये आजही उपलब्ध आहे. त्यात फुले लिहितात,
‘‘तेरावे सद्दीची पैगंबरी खूण।
दावितो प्रमाण कुरानात।।
जगी स्त्री-पुरुष सत्यधर्मी होवी।
आनंदे वर्तती ज्योती म्हणे।।’’
शब्बीर अत्तार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. बोराडे यांनी आभारप्रदर्शन केले. फुलेवाडा सर्वधर्मीय स्त्री-पुरुषांनी फुलून गेला होता. कार्यक्रमानंतर सर्वांनी एकत्रितरित्या  सामूहिक भोजन करून आम्ही सर्व एकाच ईश्वराची लेकरे याचे प्रात्यक्षितकच सादर केले.

वेळेचे व्यवस्थापन म्हणजे जीवनाचे व्यवस्थापन. ज्याला हे जमले तो यशस्वी आणि ज्याला हे जमले नाही तो अयशस्वी! प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांनी वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी अनेकवेळेस मार्गदर्शन केलेले आहे.
    प्रेषित सल्ल. यांनी निर्देष दिला की पाच गोष्टींपूर्वी त्यांचा लाभ उठवा. 1. वृद्धत्व येण्यापूर्वी तारूण्याचा, 2. मरण्यापूर्वी जगण्याचा, 3. व्यस्त होण्यापूर्वी रिकामेपणाचा, 4. आजारपणापूर्वी आरोग्याचा, 5. दारिद्रय येण्यापूर्वी श्रीमंतीचा. (तिर्मिजी)
    या पाचही निर्देशांमध्ये वेळेचे महत्व अधोरेखित केलेले आहे. साधारणपणे तारूण्य हे मनोरंजनासारख्या निरूपयोगी गोष्टींमध्ये तरूण वाया घालवतात. वास्तविकपणे तारूण्यामध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेचा उपयोग वेळेवर केल्यास अनेक असाध्य गोष्टी साध्य करता येतात. ज्या की, प्रयत्न करूनही वृद्ध झाल्यानंतर करता येत नाहीत. व्यस्त होण्यापूर्वी जो रिकामा वेळ माणसाकडे असतो त्या वेळेच्या एकेका क्षणाचा उपयोग करण्याकडे माणसाचा कल असायला हवा. याची जाणीव ज्यांना असते तेच मोठमोठे कार्य करू शकतात. ज्यांना याची जाणीव नसते ते लोक आयुष्यात फार काही करू शकत नाहीत.
    एक दूसरी हदीस आहे ज्यात प्रेषित सल्ल. यांनी सांगितले आहे की, कयामतच्या दिवशी कुठल्याही माणसाची पावले अल्लाह समोरून हटूच शकार नाहीत जोपर्यंत त्याच्याकडून पाच प्रश्नांची उत्तरे घेतली जाणार नाहीत. ती पाच प्रश्न खालीलप्रमाणे -1.जीवन कुठे व्यतीत केले? 2. तारूण्य कुठे खर्चि घातले? 3. संपत्ती कोठून मिळविली? 4. संपत्ती कोठे खर्च केली? 5. हस्तगत केलेल्या ज्ञानावर किती प्रमाणात अंमल केला?
    यात पहिले दोन प्रश्न वेळेच्या व्यवस्थापनासंबंधीचेच आहेत. जीवन कुठे व्यतीत केले? त्यातही तारूण कुठे खर्ची घातले? हे दोन प्रश्न असे आहेत की, वेळेचे कुशल व्यवस्थापन करू शकणाऱ्या इसमालाच या प्रश्नाची नीट उत्तरे देता येतील. अन्यथा या प्रश्नाची उत्तरे देणेच शक्य नाही. खरे तर ही हदीस आय ओपनिंग (डोळे उघडणारी) हदीस आहे. या हदीसला नीट समजून घेतल्यानंतर कोणताही सश्रद्ध मुस्लिम वेळेचा अपव्यय करण्याचे धाडस करणार नाही.
    प्रेषित सल्ल. यांचे जीवन आमच्यासाठी आदर्श आहे. त्यांचे प्रेषित्वाच्या आधीचे जीवन असो का प्रेषित्व मिळाल्यानंतरचे जीवन असो. दोन्हीमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांना मिळालेल्या वेळेच्या एकेका क्षणाचा सदुपयोग केलेला आहे. म्हणूनच कमी अवधीमध्ये इस्लामची सत्यता ते लाखो लोकांच्या मनामध्ये बिंबवण्यामध्ये यशस्वी झाले.
    आजच्या आधुनिक जगामध्ये वेळेला प्रोडक्टीव्ह (उत्पादक) करण्याकडे सर्वांचा कल असतो. मुस्लिमांनी तर जगातच नव्हे तर मृत्यूनंतरचे जीवन सुद्धा सुखमय व्हावे, याचा विचार करायला हवा. त्यांच्या लेखी तर वेळेचे दुहेरी महत्व आहे. म्हणून आपल्याला मिळालेल्या वेळेचे उत्पादक मुल्य कसे वाढविता येईल, याकडे लक्ष देण्याची मोठी जबाबदारी प्रत्येक मुस्लिमावर आहे.
    अल्लाहने प्रत्येक मुस्लिमावर पाच वेळेसची नमाज त्या-त्या नमाजच्या वेळेच्या बंधनात अदा करण्याची सक्ती केलेली आहे. जरा डोळसपणे पाहिल्यास, आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी नमाजच्या माध्यमातून उत्कृष्ट असे वेळेचे व्यवस्थापन करण्याची संधी अल्लाहने आपल्याला दिलेली आहे. रमजानच्या रोजांची अनिवार्यता सहर आणि इफ्तारीच्या वेळेसह प्रत्येक मुस्लिमांवर अनिवार्य करण्यात आलेली आहे. यातूनसुद्धा आपल्याला वेळेचे व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे याची कल्पना येईल. अनेक मुस्लिम स्वत:ला स्वतंत्र समजतात. कुठलेही वेळेचे बंधन पाळणे त्यांना जमत नाही. मनात आले तर नमाज अदा करतात, नाही आले तर करत नाहीत. मात्र त्यांना कळत नाही की, आखिरतच्या दिवशी प्रत्येक व्यक्तिला त्याला प्रदान करण्यात आलेल्या वेळेचा कसा उपयोग केला, याचा हिशोब द्यावाच लागणार आहे. त्यातून कोणालाच सूट नाही. म्हणून आपल्याला वेळेचे महत्व ओळखायला हवे.
    सैतान माणसांच्या पाठिमागे लागलेला आहे. तो वेगवेगळ्या पद्धतीने माणसाच्या मनावर ताबा मिळवून त्याला अल्लाहच्या निर्देशाविरूद्ध चालण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो. जो व्यक्ती सैतानाच्या कचाट्यात सापडून अनुशासनहीन जीवन जगतो त्याच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण होतो, हे आपण सर्व जाणून आहोत. माणसांनी वेळेवर दिलेले काम पूर्ण केले तर त्याच्यावर तणाव येत नाही. नमाजी माणसाला वेळेत दिलेले काम पूर्ण करण्याची सवय जडते. त्याच्यामुळे त्याचे जीवन तणावविरहित होते.
    आधुनिक व्यवस्थापन शास्त्रामध्ये सुद्धा दिलेले काम (टार्गेट) वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आलेला आहे. नमाजचेच उदाहरण घ्या. अजान झाल्याबरोबर माणूस जर नमाजच्या तयारीला लागला तर वेळेवर नमाज अदा करू शकतो. तेच अजान झाल्यावरसुद्धा तो इकडे-तिकडे रमत राहिला आणि शेवटच्या दोन मिनिटात नमाज अदा करण्याचा प्रयत्न करू लागला तर ती अदा करण्यासाठी त्याला किती धावपळ करावी लागते व त्यातून कसा स्ट्रेस निर्माण होतो, याचा अनुभव आपल्यापैकी बहुतेकांना आलेलाच असावा. वेळेत काम करण्याची सवय नसेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या तणावामुळे माणसाचे आरोग्यसुद्धा प्रभावित होते.
    रिकाम्या वेळाची कुठलीच संकल्पना इस्लाममध्ये नाही. उदा. फन (एन्जॉयमेंट), रिकामटेकडेपणा याला इस्लाममध्ये थारा नाही. सुरे अलमनशराहमध्ये प्रेषित सल्ल. यांना निर्देश देण्यात आले आहे की, ’फ-इजा फरगता-फअनसब व-इला रब्बिका फऱगब’ (जेव्हा तुमच्याकडे फारीग म्हणजे मोकळा वेळ असेल तेव्हा अल्लाहच्या इबादतीमध्ये व्यस्त होवून जा.) प्रेषित सल्ल. यांना जेव्हा एवढी सक्त ताकीद देण्यात आली तेव्हा आपली काय बिशात? म्हणून फावल्या वेळी फालताड मालिका, क्रिकेट वगैरे पाहण्याचा व वेळ वाया घालवण्याचा एक श्रद्धावंत मुस्लिम विचार सुद्धा करू शकत नाही. माणसाकडे जस-जसे नवीन उपकरण येत आहेत तसा-तसा तो अधिक व्यस्त होत आहे. म्हणून प्रत्येक श्रद्धावंत माणसाला आपल्या वेळेची समिक्षा करावी लागेल. त्याला विचार करावा लागेल की आपला वेळ कुठे जास्त चाललाय? झोपेत जास्त चाललाये? की टी.व्ही. पाहण्यामध्ये जास्त चाललाय? की सोशल मीडियावर जास्त चाललाय?
    एखाद्या माणसाचे पंचाहत्तर वर्षे आयुष्य गृहित धरले आणि तो सरासरी दररोज सात तास झोपत असेल असे गृहित धरले तर 22 वर्षे नुसती झोपण्यात जातात. जर कोणी सात तासापेक्षा जास्त झोपेत असेल तर त्याचे दोन नुकसान आहेत. एक तर त्या अतिरिक्त झोपेचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दूसरा बहुमुल्य वेळ झोपण्यामध्ये जातो. कामाचे दहा तास जरी गृहित धरले तर तो 32 वर्षे सतत काम करत राहतो. तयार होण्यासाठी रोज 45 मिनिट जरी गृहित धरली तरी यात सव्वा दोन वर्षे निघून जातात. दैनंदिन जेवण वगैरे करण्यासाठी दीड तास गृहित धरला तरी तो साडे चार वर्षे व परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर 75 वर्षात तीन वर्षे तो वेळ खर्ची घालतो. मित्र परिवारासाठी रोज एक तास देत असेल तर त्यातही तीन वर्षे निघून जातात.
    याशिवाय, उरलेला अन डिफाईन्ड जो वेळ असतो तो साधारणत: रोज तीन ते चार तास असतो. तर ह्या मोकळ्या वेळेचे योग्य नियोजन केले व त्याला उत्पादक मुल्य कसे मिळवून देता येईल याचा विचार केला तर वेळेचे व्यवस्थापन केले असे म्हणता येईल. जर हे व्यवस्थापन करता आले नाही तर त्या वेळेचा सदुपयोग करता येणार नाही व त्या काळात माणसाची उत्पादकता कमी होईल, हाच वेळ वाचवून जर त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास केला तर तो माणूस समाजासाठी हिताचा होवून जाईल, त्याच्या हातून मोठ-मोठी चांगली कामे होतील.
    अल्लाहने आपल्यावर फर्ज (अनिवार्य)  काय-काय केले आहे, याला केंद्रस्थानी ठेवून आपण वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. याउलट आपण पाहतो की, अनेक लोक आपल्या इतर कामांना केंद्रस्थानी ठेवून वेळ मिळाल्यास फर्ज गोष्टींकडे लक्ष देत असतात. हेच ते लोक आहेत ज्यांना अल्लाहच्या आदेशांची व वेळेच्या व्यवस्थापनाची पर्वा नाही.
    वेळेच्या बाबतीत चार गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट वेळ वाया घालविणे. दूसरी वेळ खर्ची घालणे, तीसरी वेळ वाचविणे, चौथी वेळेची गुंतवणूक करणे.         वेळ वाया घालविण्याचे सगळयात मोठे मार्ग टी.व्ही. आणि मोबाईल फोन आहेत. आज अनेक व्यक्ति रिमोट हातात घेवून सारखे चैनल बदलत असतात. त्यांना कोणत्याच चॅनलवर समाधान मिळत नाही. अनेक लोक मोबाईल फोनवर अनावश्यक सामुग्री खात्री न करता इकडची तिकडे पाठवित असतात. त्यांची बोटं सारखी स्क्रीनवर चालत असतात. त्यांनाही कोणत्याच समाज माध्यमांवर समाधान मिळत नाही. अशा लोकांचा वेळ वाया जातो, मोठी कामे तर सोडा कधी-कधी स्वत:च्या घरगुती गरजांसुद्धा पूर्ण करण्यासाठी अशी माणसे कमी पडतात.
    दूसरी गोष्ट वेळ खर्ची घालणे, म्हणजे प्रत्येक माणसाला दरदिवशी चोवीस तास मिळत असतात. ते तास प्रत्येक माणूस कसा खर्ची घालतो, यावर प्रत्येक माणसाचे भविष्य अवलंबून असते. कोणतीही गोष्ट खर्च केल्याने संपून जाते. वेळ अमूल्य आहे. त्याला खर्च करतांना कोणत्या कारणासाठी आपण खर्च करीत आहोत, याची जाणीव जोपर्यंत प्रत्येकाला होणार नाही, तोपर्यंत रूपया जसा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो तसाच वेळ सुद्धा बेकार गोष्टींमध्ये खर्च होवू शकतो. वेळेला भांडवल समजून त्याची जर गुंतवणूक केली तर भविष्यात त्या गुंतवणुकीचा चांगला परतावा आपल्याला मिळू शकतो. याची जाणीव प्रत्येक श्रद्धावंत मुस्लिमांने ठेवणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ जर कोणी कुरआन समजून वाचण्यात वेळ खर्च करीत असेल तर नक्कीच त्याचा परतावा त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या रूपाने मिळेल. या उलट जर कोणी आपला वेळ हॉटेलमध्ये बेकारच्या गप्पा मारण्यात खर्च करत असेल तर त्याचा परतावा त्याला नकारात्मक रूपात मिळेल. रूपयांच्या गुंतवणुकीतून कधी-कधी नुकसान होण्याची शक्यता असते. परंतु, वेळेच्या गुंतवणुकीतून कधीच नुकसान होत नाही.
    शेवटची गोष्ट म्हणजे वेळ कसा वाचविता येईल, याचाही विचार करणे. म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन करणे होय. याचे उदाहरण असे की, समजा आपल्याला कोणाला भेटणे आवश्यक आहे, तर अगोदर दूरध्वनी करून त्यांची वेळ मागून घेणे व नंतर वेळेवर त्यांना जाऊन भेटणे म्हणजे वेळ वाचविणे. या उलट भेटीची वेळ न मागता, ते आहेत का नाहीत याचीसुद्धा  खात्री न करता गेल्यास इच्छित व्यक्ति हजर नसल्यास अगर इतर कामात व्यस्त असल्यास आपला जो वेळ वाट पाहण्यात जातो तो व्यर्थ जातो. तसेच रात्री तासन्तास गप्पा मारण्यात काही लोकांना मोठा आनंद होतो. वास्तविक पाहता इशाच्या नमाजनंतर अत्यावश्यक असल्याशिवाय जागरण करण्याची परवानगी नाही. दहाच्या आसपास झोपल्यास फजरच्या नमाजला बरोबर जाग येते. परंतु, आपण पाहतो की अनेक लोक विनाकारण रात्री उशिरापर्यंत जागत असतात. विज्ञानाने ही गोष्ट सिद्ध केलेली आहे की, लवकर झोपणारे आणि लवकर उठणारे लोकच स्वस्थ असतात. आजकाल रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. रात्रीतून जागरण केल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो. सुरूवातीच्या काही तासाची झोप शरिरासाठी अत्यंत पोषक असते. प्रेषित सल्ल. लवकर झोपून तिसऱ्या प्रहरी उठत होते. 
    अनेक लोक आपल्या भूतकाळाच्या आठवणीमध्ये तासनतास रमतात. आपण कसे होतो आणि कसे झालो. याचा विचार करीत राहतात. त्यात किती वेळ खर्ची जातो याचा त्यांना अंदाजच येत नाही. म्हणून आपण भूतकाळात जास्त रमू नये याची जाणीव निर्माण होणे व त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे वेळेचे व्यवस्थापनच होय.
    शेवटी वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी जीवनामध्ये शिस्त असणे आवश्यक आहे. अनावश्यक सुस्ती आणि निष्काळजीपणामुळे माणसाचा वेळ वाया जातो. याशिवाय, वेळेचे व्यवस्थापन करण्यामध्ये योजनेचे फार महत्त्व आहे. कोणत्याही कामाची अगोदर योजना तयार करून नंतर ते काम करणे गरजेचे असते. कुठलीही योजना नसतांना काम सुरू केल्यास वेळ अनावश्यकरित्या खर्ची होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून प्रत्येक माणसाने भौतिक तसेच आखिरतचे जीवन सफल व्हावे,  असे वाटत असेल तर त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.

अबरार मोहसीन
शहराध्यक्ष जमाअते इस्लामी हिंद, लातूर

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह म्हणतो, ‘‘माझा दास आपल्या  ज्या कर्मांद्वारे माझी जवळीक प्राप्त करतो त्यांपैकी सर्वाधिक आवडती कर्मे ती आहेत ज्यांना मी त्याच्यावर अनिवार्य केले आहे  आणि माझा दास ऐच्छिक (नफील) नमाज अदा करून नेहमी माझ्या जवळ येत राहतो, इतकेच नव्हे तर मला तो आवडू लागतो  आणि जेव्हा तो मला प्रिय बनतो तेव्हा मी त्याचा कान बनतो ज्याद्वारे तो ऐकतो आणि त्याचा डोळा बनतो ज्याद्वारे तो पाहतो  आणि मी त्याचा हात बनतो ज्याद्वारे तो पकडतो आणि त्याचा पाय बनतो ज्याद्वारे तो चालतो.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : जो मनुष्य अल्लाहची जवळीकी प्राप्त करू इच्छितो तो सर्वप्रथम अल्लाहने अनिवार्य केलेल्या आदेशांची अंमलबजावणी  करण्याची काळजी घेतो. मग एवढे करून तो थांबत नाही तर तो स्वत:हून अल्लाहच्या प्रेमाच्या आधिक्यामुळे ऐच्छिक नमाज  (प्रार्थना) आणि ऐच्छिक रोजे (उपवास) आणि ऐच्छिक दान (सदका) आणि इतर पुण्याची कामे करीत राहतो; इतकेच नव्हे तर तो  अल्लाहचा प्रिय बनतो. याचा अर्थ असा की त्याच्या शरीराच्या व प्राणाच्या सर्व कुशलता व क्षमतांना अल्लाह आपल्या संरक्षणात व  देखरेखीत घेतो. आता त्याचे डोळे, कान, हात, पाय आणि त्याच्या सर्व कुशलता अल्लाहला प्रसन्न करू लागतात आणि शैतान त्याच्या कुशलतांना धक्का पोहोचवू शकत नाही. माननीय उम्मे सलमा (रजि.) यांच्या एके रात्री पैगंबर मुहम्मद (स.) झोपून उठले  आणि म्हणाले, ‘‘पवित्र आहे अल्लाहचे अस्तित्व, ही रात्र किती उपद्रवांनी व्यापलेली आहे, त्यांपासून वाचण्याची काळजी घेतली  पाहिजे आणि ही रात्र स्वत:मध्ये किती खजिने बाळगते, म्हणजे कृपेचे खजिने, ज्यांना समेटून घेतले पाहिजे. या पडद्यात  राहणाऱ्यांना (आपल्या पत्नींना) कोणी जागे करावे? अनेक लोक आहेत ज्यांचा दुर्गुण लपलेला आहे आणि परलोकात त्यांचा पडदा  बाजूला होईल.’’ (हदीस : बुखारी)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या पत्नींना ‘तहज्जुद’ (मध्यरात्रीनंतरच्या नमाज) करिता उठण्यास प्रोत्साहित करीत होते  आणि त्यांना म्हणत होते, ‘‘अल्लाहच्या कृपेचा खजिना समेटण्याची काळजी घ्या. जगात तुम्ही पैगंबराची पत्नी म्हणविल्या जाता  आणि तुम्हाला या पैलूने उच्च स्थान लाभलेले आहे, परंतु अनुसरण न केल्यास अल्लाहपाशी हे सर्व कामी येणार नाही, फक्त तुमचे  अनुसरणच कामी येईल. पैगंबराची पत्नी होणे तेथे काहीही उपयोगी पडणार नाही.’’
माननीय अली (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) एके रत्री ‘तहज्जुद’ (मध्यरात्रीनंतरच्या नमाज) च्या वेळी आमच्या  घरी आले आणि मला आणि फातिमा (रजि.) यांना म्हणाले, ‘‘तुम्ही दोघे ‘तहज्जुद’ची नमाज अदा करीत नाही?’’ (हदीस : बुखारी,  मुस्लिम)
स्पष्टीकरण : या हदीसवरून विशिष्ट बोध असा होतो की जबाबदार व वरिष्ठ लोकांनी आपल्या हाताखालच्या लोकांना  ‘तहज्जुद’बाबत प्रोत्साहित करावे. माननीय अब्दुल्लाह (रजि.) (अमर बिन अल-आस यांचे पुत्र) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद  (स.) यांनी सांगितले, ‘‘हे अब्दुल्लाह! तुम्ही त्या मनुष्यासारखे बनू नका जो ‘तहज्जुद’ची नमाज अदा करण्यासाठी उठत होता आणि  मग त्याने उठणे सोडून दिले.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय मसरूक (रह.) (ताबई) यांच्या कथनानुसार, मी माननीय आएशा (रजि.) यांना विचारले, ‘‘पैगंबर मुहम्मद (स.) यांना कोणत्या प्रकारचे अनुसरण अधिक पसंत होते?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘न चुकता केले जाणारे काम पैगंबरांना अधिक पसंत होते.’’ मी विचारले, ‘‘पैगंबर मुहम्मद (स.) रात्री कोणत्या वेळी (तहज्जुदकरिता) उठत होते?’’ माननीय आएशा (रजि.) यांनी उत्तर दिले,  ‘‘पैगंबर कोंबडा आरवण्याच्या वेळी उठत होते.’’ (म्हणजे रात्रीच्या अंतिम कालखंडात.) (हदीस : बुखारी, मुस्लिम)
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की जेव्हा रात्रीचा एकतृतीयांश भाग उरतो  तेव्हा अल्लाह या दृष्टीस पडणाऱ्या आकाशावर येतो आणि भक्तांना बोलवितो, म्हणतो, ‘‘कोण मला बोलवित आहे की त्याच्या  मदतीकरिता धावत येऊ? कोण मला मागतो की त्याला देऊ? कोण माझी क्षमायाचना करतो की त्याला क्षमा करू?’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget