September 2018

बोले तैसा चाले,‘ या म्हणीनुसार आपण नेहमीच पाहतो की कोणत्याही समाजसुधारकाच्या शिकवणींचा प्रभाव केवळ अशाच परिस्थितीत होत असतो की स्वतः समाजसुधारक त्या शिकवणींवर आचरण करीत असतो. अन्यथा ‘लोकां सांगे विश्वज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण‘ अशी अवस्था असेल तर त्याच्या शिकवणीचा कोणताही प्रभाव इतरांवर पडत नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आचरण हे नेमके कुरआनाच्या शिकवणींचे परिपूर्ण स्वरूप होय. ईश्वरी आदेशावर कशाप्रकारे आचरण असावे, याचे परिपूर्ण प्रात्यक्षिक म्हणजेच त्यांचे समस्त जीवन होय. म्हणूनच त्यांचे आचरण हे एक आदर्श चरित्र आहे.
प्रेषित मुहम्मद (स.) हे बालपणापासून खरे बोलणारे आणि लोकांच्या अनामतींचे रक्षण करणारे असल्याची ख्याती पूर्ण समाजात होती. एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्या याच गुणविशेषणामुळे ‘अमीन‘ व ‘सादिक‘ अर्थात सत्यवचनी व अनामतदार अशा गौरवास्पद विशेषणानी लोक संबोधित असत. त्यांनी कधीही अरब समाजातील अज्ञानता व अमानवी परंपरांचा बालपणापासूनच स्वीकार केला नाही. अन्याय व अत्याचारांची कधीही साथ दिली नाही. ते अत्यंत गंभीर, मधुरभाषी आणि दयाळू स्वभावाचे होते. इतरांचे दुःख त्यांना पाहवत नसे. इतरांचे दुःख दूर करण्यासाठी स्वतः कष्ट उचलायचे, लोकांच्या आर्थिक अडचणी स्वतःचा कमाईतून खर्च करून सोडवायच्या, स्वतःजवळ पैसे नसल्यास इतरांकडून कर्ज घ्यायचे, मात्र कोणत्याही याचकास त्याची अडचण भागविल्याशिवाय परत करीत नसत. स्वतः भूकेले तहानलेले राहून इतरांचे पोट भरायचे. फक्त मानवच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांवर दया करायचे. अनाथ, वृद्ध, विधवा आणि गरिबांवर त्यांची विशेष कृपा असे. त्यांच्या याच दयाळू आणि कृपाळू वृत्तीमुळे ते समाजात सर्वांचे लाडके आणि प्रिय होते. त्यांनी दिलेला शब्द कधीही मोडला नाही. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांनी स्वतःकरिता काहीही ठेवले नाही. जे प्राप्त झाले, ते इतरांना वाटले.
दरिद्री आणि रंजल्यागांजल्यांविषयी त्यांच्या मनात कमालीची आपुलकी होती. त्यांनी रंजल्यागांजल्यांसाठी कल्याण केले. एवढेच नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणार्या या अंतिम प्रेषितास जीवनभर कधीही पोटभर जेवणसुद्धा मिळाले नाही. (संदर्भ : सीरतुन्नबी, प्रथम खंड) ते नेहमी म्हणत असत,
‘‘तुम्हास ईश्वराकडून जी सहायता आणि उपजीविका मिळते ती गरिबांच्या आणि दीनदुबळ्यांच्या मदतीकरिता मिळते.‘‘ (संदर्भ : सहीह मुस्लिम)
त्यांच्या या वचनावरून हीच बाब स्पष्ट होते की आपल्याकडे असलेल्या संपत्ती, सामर्थ्य आणि शक्तीवर दीनदुबळ्यांचासुद्धा अधिकार आहे. त्यांचीच सेवा करण्यासाठी ईश्वराने आपल्याला हे ‘तन-मन-धन‘ प्रदान केलेले आहे.
संयम, शांती, दया आणि कृपाळू वृत्ती असलेल्या आदरणीय मुहम्मद (स.) यांची ही घटना अवश्य लक्षात घ्यावी. एकदा काय झाले की प्रेषित नेहमीप्रमाणे नमाज पढण्यासाठी मस्जिदकडे जात होते. रस्त्यात एका ‘ज्यू‘ समाजाच्या म्हातारीने त्यांच्या अंगावर कचरा फेकला. ते कचरा धुवून व कपडे बदलून परत मस्जिदीकडे गेले. हा नित्याचाच क्रम झाला. एके दिवशी म्हातारीचा कचराच अंगावर पडला नाही आणि प्रेषित अस्वस्थ झाले. ते सरळ म्हातारीस पाहायला व तिच्या खुशालीची विचारपूस करायला तिच्या घरी पोचले. म्हातारी आजारी पडली होती. प्रेषितांनी मोठ्या आपुलकीने तिची विचारपूस केली म्हणाले, ‘‘माते! आज तू माझ्या अंगावर कचरा फेकला नाही. म्हणून मला वाटले की कदाचित तू आजारी असावी. म्हणूनच तुला पाहायला आलो.‘‘ तिची शुश्रूषा केली. हा प्रकार पाहून म्हातारी दंग झाली. तिच्या डोळ्यांतून ढळा-ढळा अश्रु वाहायला लागले. प्रेषित मुहम्मद (स.) यांची हीच सहानुभूती आणि त्यांच्या मनातील सर्वांविषयी असलेले अपार प्रेम जेव्हा राजकीय आणि सामाजिक नभांच्या क्षितीजावर उगवले, तेव्हा समस्त मानवसमाज या सोनेरी किरणांनी उजळून निघाला. प्रत्येकाच्या मनातील द्वेष, मत्सर, ईर्ष्या आणि वैरभावाचे अंधकार नष्ट झाले. कोणी स्वीकारो अथवा न स्वीकरो! वस्तुस्थिती तर हीच आहे की, समाजाची अशा प्रकारे निःस्वार्थ भावाने सेवा केल्याशिवाय लोकांच्या मनमस्तिष्कावर आणि हृदयावर कोणासही अधिराज्य गाजविता येत नाही, हा सृष्टीचा नियमच आहे. त्यागाशिवाय प्रेम आणि सहानुभूती निरर्थक होय! हेच सत्य प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मक्का शहरावरील विजयाप्रसंगी स्पष्टपणे दिसून आले. त्यांनी याप्रसंगी लोकांना आणि समस्त मानवजातीस आपल्या अंतिम प्रवचनात स्पष्टपणे संबोधून म्हटले,
‘‘आज अज्ञानतेने बरबटलेल्या या वांशिक अभिमान आणि अहंकाराचा ईश्वराने नाश केला आहे. समस्त मानवजात आदम (अ.) अर्थात जगातील प्रथम मानवाची संतती असून आदमची निर्मिती मातीपासून झालेली आहे.‘‘ (संदर्भ : सीरतुन नबी, भाग - १)
मुळात हाच संदेश समस्त विश्वातील मानवांना ऐक्याची जबरदस्त आधारशिला उपल्बध करून देतो. प्रवचन संपल्यावर प्रेषितांनी प्रचंड जमलेल्या जवळपास सव्वालाख लोकांवर दृष्टी टाकली आणि मग कुरैश कबिल्यावर दृष्टी टाकली. या ठिकाणी ते अन्यायी व अत्याचारी लोकसुद्धा होते, ज्यांनी प्रेषितांनी सुरु केलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला होता, प्रेषित आणि त्यांच्या सहकार्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, त्यांना रक्तबंबाळ करून सोडले होते, त्यांना परिवार, संपत्ती आणि मायभूमीचा त्याग करण्यास भाग पाडले होते, कित्येकांना शहीद केले होते, कटकारस्थान कले होते, प्रत्येक प्रकारचा छळ केला होता. समस्त विश्वाकरिता दया आणि कृपा असलेल्या या अत्यंत उदार मनाच्या प्रेषितांनी त्यांना संबोधित करून विचारले,
‘‘आज मी तुमच्याबरोबर कसा व्यवहार करणार आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय?‘‘
या निष्ठूर, कठोरहृदयी, अन्यायी व अत्याचारी स्वभावाच्या लोकांनासुद्धा या गोष्टीचा पूर्ण विश्वास होता की प्रेषित मुहम्मद (स.) यांचा स्वभाव किती उदार आणि दयाळू आहे! ते किती थोर आहेत! त्यांनी साद घातली,
‘‘तुम्ही आमचे परम बंधु आहात!‘‘
विश्वबंधुत्वाचे आणि सत्य व न्यायाचे स्थापक प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सार्वजनिक अभयदानाची व क्षमादानाची घोषणा करीत म्हटले,
‘‘आज तुम्हा सर्वांना अभय देण्यात येत आहे! तुम्हा सर्वांना क्षमा करील आहे!‘‘
ही क्षमाशीलता, दया, प्रेम, त्याग आणि सहनशीलतेचे विलक्षण उदाहरण जगाच्या मानवेतिहासात कोठेच सापडू शकत नाही. आज म्हणजे मक्केच्या विजयाच्या प्रसंगी प्रेषितांकडे सर्वकाही होते. सत्ता होती, लष्करी सामर्थ्य होते. त्यांच्या फक्त एकाच इशार्यावर इस्लामविरोधी कृत्य करणार्यांच्या रक्तने मक्का शहराची भूमी लाल झाली असती. मक्का त्यागण्याच्या प्रसंगी विरोधकांनी हडपलेल्या संपत्ती आणि मालमत्ता परत घेता आली असती, मात्र प्रेषितांच्या या उदारपूर्ण स्वभावाचे कौतुक करण्याचा मोह इतिहासतज्ञ आवरू शकला नाही. एवढेच नव्हे तर आजपर्यंतच्या इस्लामविरोधक विचारवंतांनासुद्धा हे सत्य नाकारण्याचे धारिष्ट्य, झाले नाही. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली ही क्रांती खरोखरेच अहिंसापूर्ण क्रांती होय.
इतिहासात ही बाब आपल्याला सातत्याने दिसून येते की एखाद्या समूहाने दुसर्या समूहावर जर का विजय प्राप्त केला की समजा विजेत्या पक्षाकडून लूटमार, हिंसा, सूड, अन्याय, अत्याचार, जाळपोळ, मानभंग यासारख्या असंख्य बाबी घडतात. पराजयाची नामुष्की पत्करलेल्या पक्षाच्या संपत्ती ताब्यात घेण्यात येतात. सर्वत्र अन्याय व अत्याचाराची आग लागलेली असते. दुसर्या महायुद्धाचे उदाहरण आजही इतिहासात प्रत्यक्ष पाहायला मिळते. या महायुद्धात फक्त पावने दोन कोटी लोकांच्या रक्तने लाल क्रांतीची लाल पहाट उगवली. या रक्तरंजित क्रांतीने इतिहासाची पाने आजही रक्तळलेली आहेत. अर्थात क्रांती म्हणजेच रक्तपात असे जणू समीकरणच झाले. मात्र इस्लामी क्रांती ही अहिसात्मक क्रांती होय, एवढे मात्र निश्चित! या क्रांतीची पहाट उगवली आणि मानवतेस अभय मिळाले. म्हणूनच मायकेल हार्टसारख्या ख्रिस्ती धर्मीय विचारवंताने अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांना जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती घोषित केले.
एक सामाजिक विश्लेषण
प्रारंभीच आपण इस्लामपूर्वीच्या अरब समाजाचे ‘सी.राइट मील्स‘ यांच्या दृष्टिकोनाच्या आधारावर तीन प्रकारे विश्लेषण केले आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे जी क्रांती मानवजातीने अनुभवली, त्यानंतर अरब समाजाचे याच तीन प्रकारांच्या आधारे विश्लेषण करण्यात आले तर ते अशा प्रकारे होईल.
 1. समाजातील सर्व प्रकारची विषमता नष्ट झाली. मानवसमाज ऐक्य आणि न्यायाच्या भक्कम आधारावर उभा राहिला. समाजाच्या प्रत्येक भागात शोषण आणि विरोधपूर्ण संबंध नष्ट होऊन त्या ठिकाणी न्यायसंगत आणि शोषणरहित संबंध स्थापित झाले. वांशिक आणि वर्णावर आधारित तसेच गरिबी आणि श्रीमंतीच्या आधारावर असलेला भेदभाव नष्ट झाला. उच्च-नीच आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या आधारावरील विषमता कायमची नष्ट झाली.
 2. मानवी इतिहासात या नवीन समाजास अत्यंत उच्च स्थान प्राप्त झाले. मानवतेच्या तुलनेत संपत्ती, द्रव्य आणि धनास श्रेष्ठत्व देण्याऐवजी मानवता आणि सदाचारास संपत्तीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले. अर्थात मानवतेच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला.
 3. या नवनिर्मित समाजात जे लोक सत्तेमध्ये आले ते मानवतावादी, विनयशील, दयाळू, मानवसमानतेचे ध्वजवाहक, शोषणविरोधी मानसिकता असलेले आणि मानवतेचे खर्या अर्थाने प्रेरक होते. असत्यापासून दूर आणि सत्याची जीवंत उदाहरणे आहेत.
आजही जगाला याच परिवर्तनाची नितांत आवश्यकता आहे. आजच्या शोचनीय परिस्थितीत विव्हळत असलेल्या, व्याकूळ आणि भेदभावाच्या आगीत होरपळत असलेल्या मानवतेस मुक्ती देण्याची गरज आहे. सर्वत्र फक्त न्याय, प्रेम, बंधुत्व आणि त्यागाचे नंदनवन फुलविण्याची गरज आहे, शेवटी एवढेच!

अरब समाजाची तर ही परिस्थिती होतीच, शिवाय अरब देशाव्यतिरिक्त जगाच्या पाठीवरील इतर देशांची परिस्थितीसुद्धा कमी-अधिक प्रमाणात अशीच दयनीय होती. मानवता शांती, समाधान आणि संरक्षणासाठी विषम परिस्थितीत सर्वत्र ठेचाळत भटकत होती. तिला कुठेही थारा मिळत नव्हता. अगदी रोम आणि पर्शियासारख्या सुसंस्कृत समजल्या जाणार्या साम्राज्यांतसुद्धा मानवता रक्तबंबाळ होती. मानवाधिकारांची पायमल्ली करणे हा शब्द तर खूपच कमी, अगदी शेकडो माणसांना भुकेल्या वाघ, लांडग्यसारख्या हिंस्र पशुंसमोर फेकून देऊन मानवसंहाराचा खेळ पाहण्याची मौजमजा राजे-रजवाडे पाहण्यात दंग असत. असा प्रकार या सुसस्कृत देशात घडत असे.
अशा अमानवी परिस्थितीत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईश्वराच्या आदेशाने कंबर कसली. सत्य आणि न्याय स्थापनेचे हे जागतिक पातळीवरील आव्हान मोठ्या संयम आणि शौर्याने स्वीकारले आणि समाजसुधारणेचा पाया प्रथम आपल्याच समाजात रोवून एक आदर्श समाज घडविला.
वयाच्या चाळीसाव्या वर्षी जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रेषितत्व प्राप्त झाले, तेव्हा त्यांनी या अमानवी आणि रूढीवादी परिस्थितीचे आव्हान स्वीकारले आणि एका नवीन दृष्टिकोनाचे हत्यार उपसले. हा दृष्टिकोन कुरआनाच्या शब्दांत अशा प्रकारे सादर करण्यात आला,
‘‘जेव्हा त्यांना सांगितले जाते की तुम्ही त्या आज्ञांचे अनुसरण करा ज्या अल्लाहने अवतरल्या आहेत तेव्हा ते म्हणतात की ‘‘आम्ही त्याच गोष्टींचे अनुसरण करू ज्याचे अनुसरण आमचे वाडवडील करीत होते.‘‘ त्यांना काहीही कळत नसताना व ते सन्मार्गावर नसतानादेखील त्यांचेच अनुसरण करणार का? इन्कार करणार्या लोकांची अवस्था अशी आहे जणू गुराखी जनावरांना हांक देतो आणि जनावरे ओरड व हांकेखेरीज अन्य काहीच ऐकत नाहीत. ते बहिरे, मुके आणि आंधळे आहेत त्यामुळे त्यांना काहीही कळत नाही.‘‘ (कुरआन: २ - १७०)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असत्याविरुद्ध आणि रूढीवादाविरुद्ध प्रत्यक्ष आवाज उठवला? एका न्यायहीन, अमानवी, शोषणवादी, जीर्ण-शीर्ण, विषमता असलेल्या रुढीवादी समाजाचे स्वरुप बदलून जागतिक क्रांतीच घडविली. सत्य, न्याय, बंधुत्व, समता, मानवता आणि आधुनिकतेची स्थापना केली. हा निश्चितच एक चमत्कार असून त्यांच्या या चमत्काराचे अगदी इस्लामविरोधकांनीसुद्धा तोंडभरून कौतुक केले. रात्रंदिवस दारुच्या झिंगेत वावरणारा, समता, न्याय, बंधुत्वाचा लवलेशही नसलेला, तुरळक कारणांवरुन माणसांचे मुडदे पाडणारा, मुलींना जीवंत गाडून फाजील अभिमान आणि प्रतिष्ठेचे रक्षण करणारा, लूटमार करणारा आणि सावत्र आईस बापाची जागीर समजून शय्येवर ओढणारा हा समाज, व्याजासारख्या भांडवलशाहीच्या भावनेने मस्तीला येऊन आर्थिक शोषण करणारा हा समाज, गुलाम आणि दासींची खरेदी-विक्री करणारा आणि प्राण्यांपेक्षाही तुच्छ वागणूक देणारा हा समाज, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सादर केलेल्या शिकवणुकीचा स्वीकार करतो, सदाचार आणि सत्यप्रियतेच्या शाश्वत मानवी मूल्यांना उराशी कवटाळतो, महिलांचे वस्त्रहरण करणारा हा समाज महिलांना प्रतिष्ठेच्या सिंहासनावर बसवितो, मुलींच्या जन्मावर आनंदोत्सव साजरा करतो, हा चमत्कार जागतिक इतिहासाच्या क्षितिजावर आजपर्यंत प्रखर सूर्याप्रमाणे तळपताना दिसत आहे.
कबीला बंदी
जो समाज विविध कबिल्यांमध्ये विखुरलेला होता आणि कबिलावादाच्या वैरभावाने फणफणत होता, एक-दुसर्याच्या जिवावर बेतलेला होता, एका कबिल्याच्या तलवारी इतर कबिल्याच्या लोकांच्या रक्तसाठी आसुसलेल्या होत्या, अशा असभ्य लोकांमध्ये स्नेह, प्रेम, ममत्व, समता आणि बंधुभाव निर्माण केला. समस्त वैरभाव आणि उच्च-नीचतेच्या भावनांना कायमची मूठमाती दिली. दुभंगलेली मने आणि फाटलेल्या हृदयांना जोडले. विखुरलेल्या समाजास जोडून जातीभेद आणि वर्णभेद नष्ट केला. एकास काटा रुतला तर दुसर्याच्या काळजास वेदना होऊ लागल्या. दुभंगलेल्या आणि विखुरलेल्या मानवतेने एका शरीराचे रूप धारण केले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केलेल्या कामगिरीचे उदाहरण अवघ्या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे. समाजातील आर्थिक, वांशिक आणि वर्णावर आधारित विषमता नष्ट करण्याचे समाजसुधारकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भारतामध्ये गांधीजींनी दलित बांधवांना उच्चवर्णीयांबरोबर समान अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी असाधारण प्रयत्न केलेत, कनिष्ठ समजल्या जाणार्यांच्या वस्तीत जाऊन राहिले. १९५५ साली स्पृश्यास्पृश्यतेविरुद्ध कायदासुद्धा करण्यात आला, मात्र जातीय विषमतेचे वातावरण आजही भारतामध्ये मानवतेस होरपळून काढणारे बाकी आहेच, हे विशेष!
समता
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी समाजातील विषमता नष्ट केली. संपत्तीचा भक्त, भौतिकवाद व चंगळवादासमोर मान तुकविणार्या ज्या समाजात संपत्तीच्या आणि शक्ती व सामर्थ्याच्या आधारावर माणसाची किंमत ओळखण्यात येत असे आणि श्रीमंत व सामर्थ्यवान म्हणजे प्रतिष्ठित, उच्च व सन्मानित तसेच दीन-दुबळा, गरीब आणि दरिद्री म्हणजे नीच, कनिष्ठ समजण्यात येत असे. अशा ठिकाणी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी समाजाच्या मानसिकतेमध्ये आणि अगदी आत्म्यामध्ये अशी विचारसरणी निर्माण केली की माणूस हा साधन-संपत्ती, शक्ती व सामर्थ्यामुळे मोठा होत नसून सदाचार, उच्च नैतिकता आणि ईशपरायणतेमुळेच मोठा होतो. अर्थातच ईशपरायणता म्हणजे अंतरात्म्यातील अशा स्वरुपाच्या अनुभूतीचे नाव आहे, जिच्या आधारावर माणूस प्रत्येक कार्य ईश्वराच्या आदेशानुसार पार पाडण्याची अत्याधिक श्रद्धा आणि ईश्वरी आदेशांविरुद्ध असलेल्या कार्याप्रति अत्याधिक घृणा करतो. कुरआनात ही बाब अशा शब्दांत मांडलेली आहे,
‘‘आणि जे लोक न दिसणार्या आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगतात, त्याच्याकरिता उत्तम बक्षीस आणि मोबदला आहे.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-मुल्क – ६७ : १२)
ईश्वर हाच सर्वशक्तीशाली आणि महान असल्याचा निश्चितपणे स्वीकार करण्यात आला आणि सर्वांत जास्त त्याचेच भय मन-मस्तिष्कात असेल तर माणसाचे मोठेपण हे संपत्ती, वर्ण व वंशाच्या आधारे नव्हे तर उच्च नैतिकता आणि सदाचाराच्या आधारावर ठरविण्यात येईल. यावरून निश्चितच समाजाचे विषम स्वरुप समानतेमध्ये परिवर्तीत होईल. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कुरआनाच्या याच आदर्श विचारसरणीच्या आधारावर समाजात समता, न्याय व बंधुभाव निर्माण केला. समाजशास्त्रज्ञ ‘अॅलेक्स इंकलस‘ याने स्पष्टपणे म्हटले आहे की मानवाच्या महानतेमध्ये विश्वास आणि न्यायाची वाटणी आधुनिकता हे प्रमुख अंग होय.
अशा प्रकारे इस्लामने एक आधुनिक दृष्टिकोन सादर केला आणि केवळ सादरच केला नसून त्यास व्यावहारिक स्वरुपदेखील प्रदान करण्याची किमया घडवून आणली.
दारुबंदी
जगातील समस्त दुराचारांची जननी असलेली ही दारू अरबवासीयांच्या जीवनाचा कसा अविभाज्य घटक होता, याचा वरील प्रकरणात आपण उहापोह केलेलाच आहे. दारूच्या विरहात एक क्षणही सहन न करणार्या या समाजासमोर जेव्हा कुरआनाची ही शिकवण अवतरित झाली की,
‘‘हे श्रद्धावंतांनो! ही दारू, जुगार, वेदी व शकुन ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, त्यांच्यापासून दूर राहा. आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-अलमाईदा - ८९)
माननीय अनस (रजी.) यांचे कथन आहे की,
‘‘मी एकदा अबू उबैदा, उबई इब्ने कअब आणि अबू तलहा वगैरेंना दारू पाजीत होतो. एवढ्यात अचानक एका व्यक्तीने येऊन इस्लाममध्ये दारू निषिद्ध झाल्याची सूचना दिली. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इस्लामचा हा आदेश पाठविताच त्या मैफलीत बसलेल्या सर्वांनीच दारू भरलेले माठ फोडून टाकले. ही अवस्था केवळ अबू तलहा यांच्याच घराची नसून समस्त मदीना शहरातील लोकांनी आपापल्या हातांनी दारूचे माठ फोडून टाकले. पूर्ण शहरातील रस्त्यांवर लोकांनी फेकलेल्या दारूमुळे नद्या वाहत होत्या.‘ (संदर्भ : बुखारी - वचनसंग्रह)
जीवापाड प्रिय असलेली दारू इस्लामच्या केवळ एकाच इशार्यावर लोकांनी ठोकारून लावली. विशेष म्हणजे कोणतीही पोलिसयंत्रणा व कोणताही दारूबंदीचा अधिकारी नसताना हे अद्भूत कार्य घडले.
जुगार, व्याजखोरी आणि इतर दुष्कर्म
त्याचप्रमाणे जुगार, व्याजखोरी, व्यभिचार, स्त्रियांवरील अत्याचार, कन्या-हत्या, गुलामांवर अत्याचार आणि यासारख्या अनेक दुष्कर्मांवर कायमचा आळा बसला. व्याजखोरीवर कायमचा आळा बसवून मानवजातीस महाजनी वा भांडवलदारी व्यवस्थेच्या विळख्यातून कायमची मुक्ती मिळाली.
गुलामीची अमानवी प्रथा
गुलामीची अमानुष प्रथासुद्धा नष्ट करण्यात आली. गुलामांचे व दासींचे स्वातंत्र्य आणि त्यांच्याशी उत्तम व्यवहार हा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आंदोलनाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू होता. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्पष्ट शब्दांत शिकवण दिली की,
‘‘जे लोक तुमच्या स्वाधीन आहेत (अर्थात गुलाम व दासी) त्यांनादेखील तेच खाऊ घाला, जे तुम्ही स्वतः खाता आणि वापरण्यासाठीही तेच वस्त्र द्या, जे तुम्ही स्वतः वापरता. त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम देऊ नका. त्यांच्यावर कामाचे जास्त ओझे झाल्यास तुम्ही स्वतः त्यांची मदत करा.‘‘ (संदर्भ : बुखारी - भाग २ वचनसंग्रह)
प्रेषित मुहम्मद (स.) यांची ही सूचना मिळताच त्यांच्या तात्कालीन अनुयायांनी आपापल्या गुलामांशी असा सद्व्यवहार केला की गुलाम कोण आणि स्वामी कोण, हे ओळखणे अशक्य होऊन बसले. लोक आपल्या कमाईतून गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करू लागले. अशा प्रकारे गुलामीची प्रथा नष्ट करण्यात आली.
वस्तुतः हा सगळा चमत्कार प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या व्यक्तीमत्त्वाच्या असाधारण प्रभावाचा होता. गुलामांना पायाखाली ठेवणार्यांनी गुलामांना उराशी कवटाळले, सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम व सहानुभूती देऊ लागले. त्यांचा मान-सन्मान वाढला. वर्ण आणि वंशवादाला मूठमाती मिळाली. काळा-गोरा भेद नष्ट पावला. जो अरब समाज कृष्णवर्णीयांना तुच्छ लेखत होता आणि गुलामांना जनावरांपेक्षाही खालच्या पातळीची वागणूक देत होता, तोच अरब समाज आता मात्र कृष्णवर्णीय असलेले गुलाम माननीय बिलाल (रजी.) यांना प्रतिष्ठा व सन्मानाच्या दृष्टीने पाहण्यात धन्यता समजू लागला. त्यांना इस्लामी समाजात इतका मान व सन्मान मिळाला की मस्जिदे नबवीमध्ये आणि काबागृहावर त्यांनी अजान दिली. हा सन्मान इस्लाममध्ये इतर कोणालाही हेवा वाटावा असाच आहे.
आर्थिक परिवर्तन
दारु, जुगार, सट्टा, व्याजखोरी, व्यभिचार व गुलामीची तसेच कन्या-हत्यांची प्रथा नष्ट झाली. व्याजखोरी महाजनी व्यवस्थेच्या आर्थिक शोषणास बळी पडलेल्या सामान्य जनतेला मुक्ती मिळाली. व्याजावर आधारित कर्जाच्या ठिकाणी व्याजरहित कर्जाची आणि अनाथ, गोरगरीब, विधवा, वृद्ध, आजारी, वाटसरू, बेरोजगारांसाठी शासकीय अर्थसाह्याची व्यवस्था करण्यात आली. कुरआनात म्हटले आहे की,
‘‘हे श्रद्धावंतांनो! या ग्रंथधारकाच्या बहुतेक धर्मपंडित व साधु सन्यासी लोकांची स्थिती अशी आहे की ते लोकांचा माल लबाडीने खातात आणि त्यांना अल्लाहच्या मार्गापासून रोखतात. दुःखदायक शिक्षेची खुशखबर द्या त्यांना जो सोने आणि चांदी साठवून ठेवतात आणि ते अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाहीत. एक दिवस येईल की याच सोने व चांदीवर नरकाची आग धगधगीत केली जाईल आणि नंतर यानेच त्या लोकांचे कपाळ, बाजु आणि पाठींना डागले जाईल. हा आहे तो खजिना जो तुम्ही स्वतःसाठी साठविला होता, घ्या आता आपल्या साठवलेल्या संपत्तीचा आस्वाद.‘‘ (संदर्भ : कुरआन, ९:३४,३५)
अशाप्रकारे इस्लामने भांडवलशाही विचारसरणीच्या ठिकाणी एका समाजहितवादी विचारसरणीची स्थापना केली. आणि ‘सामाजिक न्याय व बंधुत्व‘ सारख्या मानवी मूल्यांची जोपासना होऊ लागली.
सामाजिक परिवर्तन
सामाजिक स्तरावर असमानतेच्या ठिकाणी समतेची स्थापना झाली. वंशभेद, गरिबी-श्रीमंतीतला भेद, वर्णभेद व आपला नि परक्यातील भेद नष्ट झाला. कारण इस्लामने अशी शिकवण दिली की, माणसाची प्रतिष्ठा आणि मोठेपणा हे वर्ण, वंश, संपत्ती आणि सौंदर्याच्या आधारावर नसून ईश्वरी आदेशांवर आचरण करण्याच्या आधारावर आहे.
सांस्कृतिक परिवर्तन
मद्यपान, जुगार, व्यभिचार, लूटमार, चोर्या-मार्या, बलात्कार, गुलामीची प्रथा, भेदभाव आणि यासारख्या अनैतिक आचरण पद्धती नष्ट झाल्या आणि एका आदर्श संस्कृतीवर आधारित आदर्श समाजाची स्थापना झाली. स्त्रियांवरील अन्याय व अत्याचार बंद झाले, स्त्री-पुरुषांतील अश्लीलतेने शीलतेचे स्वरुप धारण केले, व्यभिचार, नग्नता व लैंगिक शोषणाविषयी समाजात घृणा निर्माण झाली. व्यभिचार आणि बलात्कारासाठी कडक शिक्षा लागू करण्यात आली. स्त्रियांना संपत्तीमध्ये वारसा अधिकार देण्यात आला. भ्रूणहत्या आणि मुलींना जिवंत गाडण्याची प्रथा बंद करण्यात आली. तिच्या सर्वोपरी रक्षणास्तव लोक प्राणांची बाजी लावू लागले.
या ठिकाणी ही बाब मुळीच विसरता कामा नये की, आजही राजस्थान, तामिळनाडू आणि अन्य भागांत नवजात मुलींची हत्या करण्याची प्रथा सुरु आहे. शासनाने याकरिता कायदा करूनही ही प्रथा बंद झालेली नाही. सतीच्या अमानुष प्रथेविरुद्ध एकोणिसाव्या शतकात राजाराम मोहन रॉय यांनी आंदोलन केले आणि तात्कालीन ब्रिटीश शासनाने सती प्रथेविरुद्ध कायदासुद्धा केला. मात्र १९८७ साली राजस्थानात ‘देवराला‘ या ठिकाणी धूमधडाक्यात सतीची प्रथा आयोजित करण्यात आली. रुपकुंवर नावाच्या विधवेने सतीच्या नावावर आत्मदहन वा आत्महत्या केली.
यापूर्वीदेखील सतीच्या असंख्य घटना घडल्या आणि मानवतेची सर्रास राखरांगोळी झाली. अन्याय आणि अत्याचाराच्या भयानक आगीत मानवता सती गेली, तिच्या अवार्त टाहोने आजही भारतासारख्या आधुनिक देशाच्या संस्कृतीचे कान फाटत आहेत. देशातील समाजसुधारकांचे समस्त प्रयत्न निष्फळ ठरले, कायदा हतबल ठरला. मात्र ही बाब निश्चितच लक्षणीय आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्त्री-अत्याचारांचा समूळ नायनाट करण्याचा इतिहास घडविला.
राजनैतिक न्यायाची स्थापना
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी घडविलेल्या क्रांतीने कबिल्यांवर अधिनायकत्वाच्या ठिकाणी परामर्शदायी सभेची स्थापना केली. परंपरागत पेशवाई नष्ट होऊन रयतेच्या मतदानावर आधारित राज्याची स्थापना झाली. सामान्यजनांना राजकीय घडामोडींमध्ये भाग घेण्याची संधी प्रदान करण्यात आली. शासक हा जनतेसमोर उत्तरदायी ठरविण्यात आला आणि हेदेखील निश्चित करण्यात आले की शासकास सामान्य रयतेच्या जीवनस्तरापेक्षा उच्च स्तरावर जगणे निषिद्ध ठरविण्यात आले. इस्लामने अशा प्रकारचे सत्यनिष्ठ शासन स्थापन करून दाखविले.
अशा प्रकारे एकीकडे समस्त जनतेच्या मानसिकता, स्वभाव आणि विचारसरणीत सुधारणा घडविण्यात आली, व्यक्तीगत आचरणाच्या सर्व पद्धतींत परिवर्तन घडविण्यात आले, तर दुसरीकडे मात्र अमानवी असलेले सामाजिक स्वरुप हे मानवताप्रिय स्वरुपात परावर्तीत करण्यात आले. हे अत्यंत मौलिक स्वरुपाचे परिवर्तन व्यक्तीगत स्तरावरच नव्हे तर सामूहिक स्तरावरसुद्धा झाले आणि ईश्वराच्या प्रेषित मुहम्मद (स.) यांनी हे महान कार्य प्रेषितत्वांच्या अवघ्या तेवीस वर्षांतच पार पाडले.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा विलक्षण कमाल
या समस्त मौलिक परिवर्तनामागे जी आश्चर्यकारक आणि चमत्कारिक बाब आहे, ती बाब अशी की, या ऐतिहासिक परिवर्तनामागे केवळ २३ वर्षांत प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केलेले कार्य होय. हा बदल एका अशा समाजात घडवून आणला, जो समाज अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेला होता. त्या ठिकाणी छापखाने नव्हते, वृत्तपत्रे, दैनिके, साप्ताहिके, मासिके नव्हती, टी.व्ही. आणि इंटरनेटसारखी गतिमान प्रसारमाध्यमे नव्हती. टेलिफोन, मोबाईलसेवा नव्हती, रेल्वे, मोटारगाड्या, विमानसेवा नव्हती, अत्याधुनिक शिक्षण संस्था नव्हत्या, ज्ञान व संशोधनाची व्यवस्था नव्हती, ए.टी.एम.सारख्या व्यवस्था नव्हत्या. एखादे संघटित शासनही नव्हते आणि लष्कर व पोलिसयंत्रणा तसेच कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात नव्हती. ‘हम करे सो कायदा‘ आणि ‘बळी तो कानपिळी‘ सारख्या अवस्थेत वयाच्या चाळीसाव्या वर्षी मुहम्मद (स.) यांना प्रेषितत्व मिळाले आणि त्यांनी अवघ्या २३ वर्षांच्या अल्पावधीतच एवढी महान क्रांती घडवून आणण्याचा चमत्कार दाखविला.
धर्माचा कट्टर विरोधक असलेल्या कार्लमाक्र्सने ‘दास कॅपिटल‘ १८८७ मध्ये लिहिले आणि रशियातील समाजवादी क्रांती १९१७ मध्ये अर्थात तीस वर्षानंतर घडली. शिवाय ही क्रांती घडण्यापूर्वी रशियन जनतेत शिक्षण आणि विवेकशक्ती होती, विचारसरणीच्या प्रसारासाठी आधुनिक प्रसारमाध्यमे उपलब्ध होती. सर्वकाही असताना ही विचारसरणी शंभर टक्के जनतेने स्वीकारलेली इतिहासात कोठेही दिसत नाही. शिवाय जी क्रांती घडली तिच्यातील मानवी हिंसा आणि संहार जगजाहीर आहेच. मग आणखीन एक बाब लक्षणीय अशी की या विचारसरणीवर आधारित क्रांती १९९४ साली अर्थात ७७ वर्षानंतर सोविएत संघाची शकले विखुरल्यावर आपला उरला-सुरला प्रभावदेखील हरवून बसली.
‘न्यूज टाइम्स‘ च्या सप्टेंबर १९८८ च्या अंकामध्ये ‘आयगर अॅरिविक‘ यांनी लिहिले आहे की,
‘‘१९१७ साली रशियामध्ये क्रांती घडली आणि समाजाचे स्वरुपसुद्धा बदलले, मात्र यामुळे राष्ट्राची मानसिकता बदलली नाही. पूर्वीची भांडवलशाही मानसिकता तशीच राहिली. हीच मानसिकता अर्थात भांडवलशाही विचारसरणी घेऊन रशियात समाजवादी स्वरुपाचा समाज तयार झाला.‘‘
सदरील लेखकानुसार आतून भांडवलशाहीची कीड लागलेली ही समाजवादी समाजव्यवस्था रशियात उभी करण्यात आली. परिणामी समस्त जनतेच्या शक्तीवर कम्युनिस्ट दलाची शक्ती प्रस्थापित झाली आणि या शक्तीवर केवळ एकट्या व्यक्तीचा अर्थात स्टॅलीनचे प्रभुत्व स्थापन झाले. देशामध्ये खर्या अर्थाने सामाजिक व्यवस्था निर्माण होऊच शकली नाही. जनतेचे वैयक्तीक अधिकार समाजवादी नावाच्या एकाधिकारशाहीने गिळंकृत केले. मान्यवर लेखकाच्या कथनानुसार जनतेस पदव्या आणि नोकर्या त्यांच्या क्षमता आणि पात्रतानुसार न देता सामाजिक स्तराच्या आधारावर देण्यात येऊ लागल्या. आणि म्हणूनच या अन्यायाच्या परिणामस्वरुपी रशियामध्ये स्वतंत्र चिंतन आणि नवनिर्माणाच्या आधारावर जोरदार आंदोलने सुरु झाली. समाजवादाच्या नावावर सुरु असलेल्या एकाधिकारशाहीचे पितळ उघडे पाडण्यासाठी ही आंदोलने जोमाने कार्य करू लागली. स्वतः रशियन विचारवंतानीच रशियात समाजवादी क्रांती खर्या अर्थाने आलीच नसत्याच्या सत्यावरून पडदा उचलला आणि रशियात ख्रिस्ती धर्माने पाय पसरले. मात्र येथील शोकांतिका संपता संपत नव्हती. मायकल हार्ट या अमेरिकी लेखकाने लिहिले की,
‘‘येशू मसीह हे ख्रिस्ती धर्माच्या विशिष्ट नैतिक आणि धार्मिक श्रद्धांचे कर्णधार असले तरी ख्रिस्ती धर्मज्ञानास सेंट पॉल यांनी विशिष्ट प्रगती दिली. त्यांनीच नवीन करारनाम्याचे अधिकांश भाग लिहिले.‘‘
तात्पर्य एवढेच की, जगात मोठमोठे समाजसुधारक आलेत, त्यांनी समाजसुधारणेचे कार्यदेखील केले. मात्र जगाच्या निर्मितीपासून आजपर्यंत जेवढे समाजसुधारक येऊन गेले, त्यापैकी कोणताही असा समाजसुधारक सापडणे अशक्य आहे, ज्याने अवघ्या वीस-बावीस वर्षांच्या अत्यल्प काळामध्ये अरबच्या एका अशा अज्ञानी, अशिक्षित, मानवताविरोधी भावनांनी पेटलेल्या समाजातील एकेक व्यक्तीच्या व्यक्तीगत स्वभावात समस्त समाजात पूर्णपणे परिवर्तन घडवून आणण्यात यश मिळविले असेल. हा ऐतिहासिक विश्वविक्रमी प्रयोग म्हणजे केवळ एक चनत्काराच असू शकतो आणि असा चमत्कार प्रेषितांकडूनच आणि विशेषतः प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडून घडू शकतो. मात्र आश्चर्याची बाब अशी की, या सर्व शंभर महानतम व्यक्तीमध्ये मान्यवर लेखकांनी प्रथम स्थानावर प्रेषित मुहम्मद (स.) यांना ठेवले असून पहिला अध्याय त्यांच्यावर आधारित लिहिला आहे, तो अशा प्रकारे,
‘‘जगातील सर्वाधिक प्रभावी व्यक्तीमध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रथम स्थानावर ठेवण्याच्या माझ्या या निर्णयामुळे काही लोकांना आश्चर्य वाटले असेल आणि काहीजण विरोध करतील मात्र इतिहासामध्ये प्रेषित मुहम्मद (स.) हे एकच असे व्यक्तीमत्त्व होते जे धार्मिक आणि व्यावहारिक या दोन्ही स्तरांवर पूर्णरुपाने यशस्वी ठरले.‘‘ (पृष्ठ : ३३)
मान्यवर लेखकांनीसुद्धा तेच लिहिले, जे मी वरील मजकुरात सांगितले आहे,
‘‘या पुस्तकात उल्लेखलेल्या अधिकांश व्यक्तीना ही फायदेशीर संधी मिळाली होती की त्यांचा सभ्य व प्रगत संस्कृती असलेल्या समाजात जन्म झाला, शिक्षण-प्रशिक्षण झाले आणि समाजसुधारणेसाठी आवश्यक असलेली साधने त्यांना उपलब्ध होती. मात्र आदरणीय मुहम्मद (स.) यांना अशा संधी प्राप्त नव्हत्या. ते दक्षिणी अरब प्रदेशामध्ये जन्मले. त्या काळी हा प्रदेश जगाच्या पाठीवरील सर्वांत जास्त मासागलेला, पिछाडलेला, अज्ञानी, अशिक्षित आणि मानवताविरोधी मानसिकतेने पिसाळलेला होता. व्यापार, कला, ज्ञान-विज्ञान आणि संशोधनाचा लवलेशही नव्हता. धार्मिक आणि व्यावहारिक प्रक्रियेचा हा विलक्षण संबंध होता. मला असे मनापासून वाटते की यामुळे आदरणीय मुहम्मद (स.) यांना मानवेतिहासातील सर्वांत जास्त प्रभावशाली व्यक्तीत्व असण्याचा अधिकार प्राप्त आहे.‘‘ (पृष्ठ - ४०)
या ठिकाणी मायकेल हार्टसारख्या ख्रिस्ती धर्मीय विचारवंताच्या आत्म्याची हाक ऐकल्यावर आपल्यासमोर निश्चितच एक प्रश्न उभा राहतो आणि तो म्हणजे असा की, हे कोणते आकर्षण होते, कोणती शक्ती होती, कोणता सत्यवाद होता, आणि कोणता चमत्कार होता की ज्यामुळे इतक्या कठीण संकटमय परिस्थिती आणि पावलो-पावली असह्य अडचणी असतानासुद्धा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जीवनाच्या अत्यंत अल्पशा काळामध्ये एका नवीन समाज निर्माण केला आणि हा समाज आदर्श नियमानुसार प्रत्यक्ष चालवूनही दाखविला. एक आदर्श आचरणशैली, आदर्श संस्कृतीचा प्रत्यक्ष नमुना जगासमोर ठेवला. एक न्यायसंमत जीवन आणि सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्यायावर आधारित समाजाचे केवळ सिद्धान्तच स्पष्ट केले नसून अशा आदर्श समाजाची प्रत्यक्ष स्थापनासुद्धा करून दाखविली.
मुस्लिम जगत आणि आदर्श आचरण
आता आपण या ठिकाणी या विषयावरसुद्धा थोडक्यात चर्चा करू या की, आदरणीय मुहम्मद (स.) हे अंतिम प्रेषित आहेत. त्यांच्यानंतर आता या भूतलावर ईश्वरी वाणी अगर दैवी शिकवणी घेऊन कोणीही येणार नाही. शिवाय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर जो ग्रंथ अवतरित झाला अर्थात कुरआन, ग्रंथदेखील मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी अंतिम ग्रंथ असल्याने प्रेषितांनी केलेल्या समाजसुधारणेच्या महान कार्याची जवाबदारी त्यांच्या अनुयायांवर अर्थात मुस्लिम जगतावर आहे. कुरआनात स्पष्टपणे ईश्वराचा हा आदेश मुस्लिम जगतास संबोधून आहे,
‘‘आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात, ज्यास मानवांच्या मार्गदर्शन व सुधारणेकरिता निवडण्यात आले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता आणि दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.‘‘ (संदर्भ : कुरआन, आलिइम्रान - ११०)
कुरआनाच्या या संदर्भानुसार समाजसुधारणेचे जे कार्य प्रेषित मुहम्मद (स.) यांनी केले, त्याची जवाबदारी आता मुस्लिम समुदायावर टाकण्यात आली आहे. कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आदर्शाचे (अर्थातच कुरआनाची प्रत्यक्षात अंमलबजावणीची कार्यशैली) मार्गदीप आज मुस्लिमंच्या हाती आहे. याच मार्गदीपाच्या प्रखर असलेल्या सत्यप्रकाशाच्या माध्यमाने मानवताविरोधी आणि असत्याच्या अंधारातून स्वतः जीवनाची वाटचाल तर करायचीच आहे, मात्र इतरांना असत्य, अज्ञान आणि अन्यायाच्या अंधारात खितपत पडायला सोडून देणे हा अक्षम्य अपराध आहे. ईश्वराने हा जो मार्गदीप प्रदान केला आहे, तो समस्त मानवजातीस मार्गदर्शन करण्यासाठी दिला आहे. स्वतः पोटभर खाऊन शेजार्यास उपाशी ठेवणेदेखील ईश्वरास पसंत नहा. मग जीवनाच्या सर्वांत जास्त महत्त्वाच्या विषयी ही बाब ईश्वरास मुळीच पसंत नाही की स्वतः मार्गदीपाच्या प्रकाशात चालावे आणि इतरांना मात्र अंधारात चाचपडत सोडून द्यावे. खरे पाहता मुस्लिमांच्या जन्माचा उद्देशच समाजसुधारणेचे हे महान कर्तव्य पार पाडण्यासाठी झालेला आहे.
ही गोष्ट प्रत्येक मुस्लिम आणि मुस्लिमेतर जनतेने नीट लक्षात घ्यावयास हवी की, केवळ मुस्लिमाच्या घरी जन्म घेतल्यामुळे अथवा मुस्लिमासारखे नाव ठेवल्याने कोणी पूर्णपणे मुस्लिम होत नसतो. कारण मुस्लिम हा केवळ जन्मानुसार नव्हे तर कर्मानुसार होतो. कारण जात-पात आणि वंश व वर्णाचा इस्लामशी फक्त परिचय करून देण्याइतकाच संबंध आहे. ही बाब कुरआनात अशा शब्दांत मांडण्यात आलेली आहे,
‘‘हे बदावी (ग्रामीण अरबी) समजतात की, ‘‘आम्ही श्रद्धा ठेवली (अर्थात पूर्णपणे मुस्लिम झालो.) (मात्र) त्यांना सांगा की तुम्ही श्रद्धा ठेवली नाही, तर असे म्हणा की, आम्ही समर्पित झालो. (खर्या अर्थाने) श्रद्धा अद्यापही तुमच्या हृदयात दाखल झालेली नाही. जर तुम्ही अल्लाह आणि त्याचे प्रेषित (स.) यांची अज्ञाधारकता स्वीकारली तर तो तुमच्या कर्ममोबदल्यात कोणतीही कमतरता करणार नाही. खचितच अल्लाह मोठा क्षमाशील आणि परमकृपाळू आहे. खरोखर श्रद्धावंत तर ते आहेत, ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या प्रेषितांवर (अर्थात प्रेषित मुहम्मद (स.)) यांच्यावर श्रद्धा ठेवली, मग त्यांनी कोणतीही शंका मनात येऊ दिली नाही. आणि आपल्या जीवितवित्तानिशी अल्लाहच्या मार्गात पराकाष्ठा केली तेच खरे श्रद्धावंत लोक होत.‘‘ (संदर्भ : कुरआन, सूरह-ए-हुजरात - १४,१५)
अर्थातच प्रेषित मुहम्मद (स.) यांनी एका सद्क्रांतीचे प्रत्यक्ष स्वरुप मानवजगतासमोर सादर केले आहे. म्हणून मुस्लिमांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी मानवतेच्या कल्याणास्तव सामाजिक व आर्थिक अन्यायाविरुद्ध दंड थोपटावे आणि सत्य, न्याय, स्नेह व बंधुत्वासाठी प्रयत्नशील असावे.

आदरणीय प्रेषितांच्या जन्माविषयी माहिती मिळविण्यापूर्वी हे पाहणे आवश्यक आहे की त्यावेळी जगाची अवस्था काय होती? जगाच्या पाठीवर किती शासक आणि विजेते, दार्शनिक व मर्मज्ञ, उपदेशक व वक्ते कित्येक धर्मसंस्थापक आणि चरित्र व नैतिकतेच्या शिकवणी देणारे समाजसुधारक आणि कायदेतज्ज्ञ निर्माण झाले. नेते उठले त्यांनी संघटन उभे केले, वादळी व्यक्तिमत्त्व आले व त्यांनी तर्हेतर्हेच्या क्रांत्या आणल्या. प्रत्येकाने जीवनातील सर्व समस्या उलगडण्याचा व त्यांचे निराकरण करण्याचा दावा केला. प्रत्येकाला वाटत होते की, तो मानवतेस सुख-समाधानाच्या संपत्तीने मालमाल करील. परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला. काहीअंशी भरभराट दिसली तरी अन्याय व अमानुषतेने त्यांचा पिच्छा सोडलाच नाही. या बाबतीत एवढे मात्र निश्चितच सांगता येईल की, ईश्वराने पाठविलेल्या प्रत्येक प्रेषिताने केवळ सत्य आणि चांगुलपणाच्या बळावरच क्रांती घडवून आणली. हे वैशिष्ट्य केवळ प्रेषितांमध्येच आढळते. त्यांच्या सत्यमार्गास लोकांनी स्वीकारल्याने त्यांच्यात विलक्षण परिवर्तन घडले. त्याच्या वैयक्तिक जीवनासह त्याच्या परिवार व त्याच्या संपूर्ण समाजातच विलक्षण परिवर्तन घडले. संपूर्ण समाजाचा व्यवहार, नीतिमत्ता आणि पूर्ण वातावरणच प्रेषितप्रणालीने ढवळून निघाले.
अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांनी ज्या काळात या धरतीवर पहिला श्वास घेतला, त्या वेळी संपूर्ण विश्वातील मानवता अज्ञानाच्या तिमिर काळोखात बुडालेली होती. काही ठिकाणी असभ्यतेचे भयानक वादळ उठले होते, काही ठिकाणी एकमेव ईश्वराची उपासना सोडून कितीतरी कृत्रिम उपास्यांची उपासना करण्याची कुप्रथा चालू होती, तर काही ठिकाणी मानवजातीत रक्ताची होळी खेळण्यात येत होती. इजिप्त, भारत, बाबिल व नेनवा (वर्तमान इराक देशाचा काही भाग) चीन व ग्रीसमधील संपूर्ण संस्कृती व सभ्यता काळवंडून गेली होती. ‘कन्फ्यूशस’ आणि ‘मानी’ या थोर तत्त्वज्ञांचे सिद्धान्त तसेच वेदांत आणि बौद्ध मतांचे विचार अनाकलनीय झाले होते. ‘जस्टेनन’सारख्या कायदेतज्ञाची संहिता आणि ‘सोलन’सारख्या विद्वानांचे नियम धाब्यावर बसवून मानवी जीवन कायदाहीन बनले होते. रोमन आणि इराणी संस्कृतीच्या वरपांगी चकाकणार्या प्रतिभा असूनही तेथील सम्राट ईश्वरी प्रभुत्वाचा आणि स्वामित्वाचा आव आणित होते. मानवजातीवर जागीरदारवर्ग आणि धार्मिक तत्त्वांच्या संगनमताने अन्याय व अत्याचाराची न संपणारी शृंखला चालू होती. जनतेकडून त्यांच्या ऐपतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त कर वसूल करून तिचे कंबरडे मोडण्यात आले होते. मानवांकडून अक्षरशः प्राण्यापेक्षाही जास्त अमानुषपणे कष्टाची कामे करून घेतली जात होती. दोन्ही साम्राज्यांच्या दरम्यान होणार्या नेहमीच्या संघर्षात बिचारी पामर जनताच रगडली जात होती. त्यांना ‘ब्र’ काढण्याचा देखील अधिकार नसे. लोक कधीच अन्याय व अत्याचाराविरुद्ध उठाव करण्याची साधी कल्पनाही करू शकत नव्हते. त्यांच्या समस्या व दारिद्रयास सीमाच नव्हती. त्यांचा आत्मा अवार्त टाहो फोडत असे, परंतु ऐकणारा मात्र कोणीही नसे.
खुद्द अरब प्रदेशात ‘आद’ व ‘समूद’ यांच्या काळात आणि ‘सबा’, ‘अदन’ आणि ‘येमेन’च्या शासनाच्या छत्रछायेत सभ्यतेने जन्म तर घेतला होता, परंतु आता मात्र या नष्ट झालेल्या राष्ट्रांच्या पुरातन वास्तुंचे केवळ अवशेषच पाहायला तेवढे मिळत होते. नेहमीच्या लढाया, तंटे, लूटमार आणि रक्तपाताचे साम्राज्य होते. मद्यपान, व्यभिचार आणि जुगाराने ठासून भरलेल्या अज्ञानतापूर्ण संस्कृतीचे या विश्वास भयानक ग्रहण लागले होते. अरबच्या ‘कुरैश’ कबिल्याने मूर्तीपूजेवर आधारित असलेल्या धार्मिकतेच्या मुळावर पवित्र काबागृहाच्या पौरोहित्याचा धंदा सुरु केला होता. ‘ज्यू’ समाजाने ईश्वरीय ग्रंथात हेराफेरी करून संशोधनाच्या नावावर धर्माचा धंदा सुरु केला होता. ‘मक्का’ आणि ‘ताईफ’ येथील महाजनांनी मानवांना व्याजाच्या भयानक विळख्यात जखडले होते.
अशी ही अत्यंत भयानक व विदारक संकटमय परिस्थिती होती व याच विदारक व उग्र स्वरुपाच्या अगदी प्रतिकूल परिस्थितीच्या समोरासमोर क्रांतिदूत अंतिम प्रेषित मुहम्मद(स) हे एका मोठ्या परिवर्तनाचा ईश्वरी संदेश घेऊन उठले. प्रेषित मुहम्मद(स) यांचा जन्म ‘मक्का’ शहरात झाला. हे ‘मक्का’ शहर म्हणजे मागे होऊन गेलेल्या प्रेषित इब्राहीम(अ) यांनी वसवलेले शहर आणि एकेश्वरवादाचे केंद्र होय. या ठिकाणी प्रेषित इब्राहीम(अ) यांनी ईश्वरासमोर केलेल्या प्रार्थनेनुसार परत एकदा इब्राहीमी जीवन शैलीच्या प्रकटीकरणाचे महान कार्य अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या परिश्रमातून पूर्ण होणार होते.
मानवजातीचे उद्धारक आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचा जन्म हिजरी हि सन पूर्व ५२ च्या ‘रबिऊल अब्बल’ महिन्या (अर्थात २२ एप्रिल ५७१ इ.स.) मध्ये झाला. प्रेषित मुहम्मद(स) यांच्या पितावर्यांचे नाव ‘अब्दुल्लाह’ आणि मातावर्यांचे नाव ‘आमिना’ असे होते. त्यांच्या जन्मामुळे संपूर्ण घर प्रकाशमान झाले. त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब’ त्यांना उचलून पवित्र ‘काबा’मध्ये घेऊन गेले आणि ईश्वरासमोर प्रार्थना केली. आजोबांना पडलेल्या एका शुभ स्वप्नानुसार त्यांनी आपल्या या नातवाचे नाव ‘मुहम्मद(स)’ म्हणजेच ‘प्रशंसनीय’ असे ठेवले.
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे पितावर्य मात्र त्यांच्या जन्माच्या काही काळापूर्वीच वारले होते. प्रेषित मुहम्मद(स) यांनी अनाथ बालकाच्या स्वरुपातच जन्म घेतला. त्याचप्रमाणे त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातेनेदेखील जगाचा निरोप घेतला. आता या बालकाच्या पालनपोषणाची जवाबदारी त्यांचे आजोबा ‘अब्दुल मुत्तलिब’ यांच्यावर आली. परंतु दोनच वर्षे लोटली की तेदेखील वारले. ईश्वराची योजना प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर ऐहिक संकटे टाकून आणि ऐहिक आश्रयांनी वंचित ठेवून एका महान व कठीण कार्यपूर्तीसाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची होती. ही संकटे व अरिष्टे आणण्याचा ईश्वरी हेतूच मुळात असा होता की, प्रेषित मुहम्मद(स) यांच्यात प्रचंड सहनशक्ती व प्रचंड संयम निर्माण व्हावा. त्यांचे आजोबा अब्दुल मुत्तलिब यांनी मृत्युसमयी आपल्या या लाडक्या नातवाच्या पालकत्वाची जवाबदारी त्यांचे काका अबू तालिब यांच्यावर सोपविली होती. काका अबू तालिब यांनी ही जवाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.
तारुण्यात पाऊल ठेवण्यापर्यंत हा अनोखा मुलगा सामान्य मुलांसारखा नव्हताच मुळी. तो एका गंभीर आणि विवेकशील वृत्तीच्या स्वभावाच्या एखाद्या अनुभवी माणसासारखा वाटायचा. त्याने तारुण्यात पाऊल ठेवले. नैतिक बिघाड असलेल्या वातावरणातसुद्धा या तरुणाचे तारुण्य निष्कलंक आणि नजरा पवित्र होत्या. त्याचे विचार पवित्र होते. ज्या ठिकाणी गल्लोगल्ली आणि घरोघरी मद्य निर्मितीचे कारखाने होते, दारु पिणे व पाजणे अभिमान व गर्वाचे आणि प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात असे; परंतु हा तरुण मात्र या दारुच्या आहारी जाण्याची कल्पनादेखील करीत नसे. ज्या ठिकाणी जुगार आणि सट्टा हा राष्ट्रीय प्रतिष्ठेचा खेळ समजला जात असे, तसेच नृत्य, शृंगार व संगीत देशाच्या संस्कृतीचा भाग बनला होता, त्या ठिकाणी हा पावन वृत्तीचा तरूण या सर्व बाबींपासून खूप दूर असायचा. ज्या ठिकाणी कित्येक देवीदेवतांची पूजा होत होती, त्या ठिकाणी एकेश्वरवादाचे प्रतीक असलेला हा तरूण केवळ एकमेव निर्मात्याचीच अर्थात ईश्वराचीच उपासना करीत असे. अरब समाजात होणार्या नेहमीच्या रक्तपातापासून हा तरूण नेहमीच दूर असायचा. या तरुणाने आपल्या समविचारी सवंगड्यांना घेऊन अत्याचारी जणांच्या अत्याचारास बळी पडलेल्या निर्धन आणि दुर्बलांना दुष्ट वृत्तींच्या विळख्यातून सोडविले.
प्रेषितत्व मिळाल्यावरसुद्धा त्यांनी ही घटना स्मरण करून एकदा म्हटले की, ‘‘जर मला अरब देशाची बहुमूल्य संपत्ती म्हणजेच लाल रंगांचे उंट देऊन सांगितले असते की, दुर्बलांचे समर्थन करू नये तरीसुद्धा मी ही बहुमूल्य संपत्ती झुगारून अत्याचारपीडितांचे सर्वशक्तीनिशी समर्थन करून त्यांना जोखडातून मुक्त केले असते आणि आजही जर मला एखाद्या अत्याचारपीडिताचा टाहो ऐकू आला तरी मी सर्व शक्तीनिशी हजर आहे.’’
‘पवित्र काबा’च्या पुरोहित आणि पुजारी परिवारात जन्म घेतलेल्या या तरुणाने पौरोहित्य स्वीकारुन काबागृहास मिळणार्या भेटवस्तू आणि नजराने मुळीच न स्वीकारता आपली उपजीविका भागविण्यासाठी व्यापाराचा पवित्र व प्रतिष्ठित मार्ग स्वीकारला. व्यापारासाठी भांडवल नसताना त्याने इतरांकडून व्याजमुक्त बटाई तत्त्वावर भांडवल घेऊन व्यापार उभारला. ‘सीरिया’ देशाचा दोन वेळा व्यापारी दौरा केला. त्याच्या अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिक व्यवहाराच्या चर्चा दूर दूर पसरल्या. खरेदीदार आणि व्यवहार करणारे त्याच्या स्वच्छ व प्रामाणिक व्यवहार पद्धतीने अत्यंत प्रभावित झाले. ‘साईब’, ‘कैस’, ‘खदीजा(र)’ आणि इतर सर्वच व्यापारी भागीदारांना त्यांच्या प्रामाणिकतेचा आणि व्यवहारातील पवित्र नीतिमत्तेचा जेव्हा अनुभव आला, तेव्हा ते हुरळून गेले. त्या सर्वांनीच मुहम्मद(स) यांना ‘अनामतदार व्यापारी’ अशी उपमा दिली.
ज्या वेळी या अत्यंत सुशील आणि प्रामाणिक तरुणाने जीवनसाथी निवडण्याचा विचार मनात आणला, त्या वेळी ‘मक्का’ या शहरात कित्येक तरूण व सुंदर मुलींवर दृष्टी न टाकता त्यांनी आपल्यापेक्षाही पंधरा वर्षे वयाने मोठी असलेली विधवा महिला ‘माननीय खदीजा(र)’ यांना विवाहास्तव पसंत केले. ही महिला सुशील, प्रामाणिक, चारित्र्यवान व उत्तम आचरणाची असल्याने मुहम्मद(स) यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयावरून असेच सिद्ध होते की, हा तरुण किती महान चारित्र्यवान होता.
शिवाय हा तरूण परिवाराच्या आणि व्यापार व धंद्याच्या अनेकानेक व्यस्ततेतून सवड काढून या सवडीचा वेळ मनोविहार आणि विलासात न घालवता ‘हिरा’ नामक एका गुहेत जाऊन एकांतात ईशस्मरण करण्यात व्यतीत करीत असे. सृष्टीची वास्तविकता आणि मानवी जीवनाच्या रचना व बिघाडावर सखोल आणि गंभीर शोधपूर्ण विचारमग्न होत. संपूर्ण मानवतेस अज्ञानाच्या तिमिरातून सत्यप्रकाशात आणण्याच्या बाबतीत विचार करीत. मुहम्मद(स) यांनी कित्येक दिवस त्या गुहेत चितन केले. ही गुहा मक्का शहरापासून तीन मैलाच्या अंतरावर आजही आहे.

अरब समाज ज्या अनैतिक गोष्टीने ग्रस्त होता त्यांचा येथे थोडक्यात आपण उहापोह करू या.
युद्धप्रियता आणि भांडखोर वृत्ती
अरब समाजात असलेल्या अहंकारी वृत्तीमुळे ते आपसांत खूप लढाया करीत असत, सूडबुद्धीने पेटलेल्या या लोकांची आपसांतील युद्धे पिढ्यान्पिढ्या चालत आणि अगदी क्षुल्लक कारणावरून रक्तपात होत असे. म्यानातून तलवारी बाहेर निघण्यासाठी साधे निमित्तच पुरेसे असे.
समाजातील भेदभाव
हा समाज संघटित नव्हता. छोट्या-छोट्या कबिल्यांत दुभंगलेला होता. प्रत्येक परिवार एकदुसर्यांविरुद्ध सुडाने पेटलेला, डोळ्यांत प्रचंड द्वेश आणि मत्सराच्या धगधगत्या ज्वाला आणि सर्वत्र आपसांत रक्तपात सुरुच. शांती आणि सद्भावनेचा मागमूसही कोठे दिसत नव्हता. त्यांच्या सामरिक वृत्तीचे चित्र एका इतिहासकाराने ‘अय्यामुल अरब‘ (अर्थात - अरब समाजाच्या संकटमय काळाचे स्मरण) या ग्रंथात शेकडो पृष्ठांवर रेखाटलेले आहे. ‘मीदानी नेशापुरी‘ (मृत्यू ११२४) या इतिहासकाराने ‘किताबुल अमसाल‘ या ग्रंथात १३२ युद्धांचे वर्णन करताना लिहिले की,
‘‘या युद्धांची गणना करणे हे कोणत्याही गणनाशास्त्रानुसार शक्यच नाही. म्हणून मी या ठिकाणी या युद्धांचे शक्यतोपरी वर्णन करण्याचा प्रयत्न केला.‘‘
मुळात ही युद्धे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आगमनापूर्वी लढण्यात आली होती. अर्थातच हिंसा, निर्दयीपणा, हत्या, लूटमार आणि यासारख्या अत्यंत क्रूर घटनांची एक कधीही न संपणारी शृंखला सुरुच होती.
दारुचे व्यसन
जगामध्ये प्रत्येक अनैतिकता, अन्याय, अत्याचार, दुष्कर्म, व्यभिचार आणि वैरभावाची जननी असलेली ही दारू! ही दारू समस्त अरब समाजाच्या कंठात रिचलेली होती. अरब समाजाचे साहित्य म्हणजे दारू, प्रतिष्ठा म्हणजे दारू, पाहुणाचार म्हणजे दारू, अभिमान म्हणजे दारू, मान-सन्मान म्हणजे दारू, त्यांचे सर्वकाही दारूच असे समीकरणच झालेले होते. मद्यपनाच्या मैफली सजन असत. सहकुटुंब सहपरिवार मिळून दारूचा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा. दारुच्या प्रत्येक घोटावर आपल्या वंश-प्रतिष्ठेचे काव्यात्मक गुणगान होत आणि अश्लील कवन होत. दारूचे २५० प्रकार या समाजात अस्तित्वात होते. पूर्ण समाजास दारूने आपल्या कंठात रिचविले होते.
जुगार
पायापासून डोक्यापर्यंत दारूत चिंब झालेल्या या समाजास जुगाराची भंयकर कीड लागलेली होती. आपली धन-संपत्ती डावावर लावण्याची आणि ती संपली की बायका-मुलेसुद्धा डावावर लावायची, विजय-पराजयाच्या या खेळीमुळे आधीच सुडाने पेटलेल्या समाजात रक्तपात सुरु व्हायचा. धन-संपत्ती आणि अहंकाराच्या आहारी जाऊन पिढ्यान्-पिढ्या नष्ट व्हायच्या.
व्याज आणि सावकारी धंदा
अरबांच्या या विविध कबिल्यांत दुभंगलेल्या समाजामध्ये समस्त वाईट प्रथांप्रमाणेच मानवी शोषण आणि उत्पीडनाचे आणखीन एक भयानक स्वरूप होते आणि ते म्हणजे ‘व्याजखोरी‘. एका निश्चित व्याजदरावर कर्ज देऊन वेळेवर कर्ज परत न मिळाल्यास परतफेडीची संधी वाढवून देताना मुद्दल आणि व्याज एकत्र करून त्यावर वाढीव व्याज आकारण्यात येत असे. हे वाढीव व्याज इतके वाढीव होते की याची परतफेड करण्यासाठी पूर्ण संपत्तीच सावकाराच्या तिजोरीत जात असे. हा प्रकार शेतकरी आणि मजुरांच्या नशिबी येत असे. यामुळे शेतकरी आणि मजूर सावकारी करणार्यांच्या गुलामीत जखडलेले असत. मूठभर सावकार आणि श्रीमंतवर्ग मूठभर पैसा देऊन शेतकर्यांच्या सर्व जमिनी बळकावून घेत आणि यातूनही कर्जाची फेड न झाल्यास त्याला आजीवन गुलाम करून घेत आणि केवळ त्यालाच नव्हे तर त्याच्या बायकोला आणि मुलांना गुलामीच्या दावणीस बांधत असे. (संदर्भ: बुखारी)
म्हणजेच ‘सोने सत्य-मानव मिथ्या‘ असा प्रकार होता. संपत्तीसमोर माणसाची कवडीकिंमत नव्हती. प्रतिष्ठा, स्वाभिमान, अहंकार व प्रसिद्धीचा हव्यास, भोगविलास, कठोरता आणि क्रूरतेच्या या रखरखत्या वाळवंटात प्रेम आणि बंधुत्वाचा एक दवबिंदूसुद्धा नव्हता. भांडवलशाहीचा या काळात उदय झाला नसला तरी समस्त अरब समाज क्रूर आणि जुलमी भांडवलशाहीच्या अभिशापाने शापित झालेला होता.

लूटमार
दररोजची लुटालूट सुरुच होती. वाटमारी आणि दरोड्यांचे वातावरण होते. सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण होते. दरोडेखोरांचे विशिष्ट जत्थे होते. दरोडे आणि लूटमारीवर या जत्थ्यांचे अर्थार्जन, पोटपाणी व भोगविलास अवलंबून होते. दरोडे टाकण्याची पद्धतसुद्धा विलक्षण होती. दरोडे फक्त द्रव्य आणि संपत्तीवरच नव्हे तर बायकापोरांवरसुद्धा टाकण्यात येत असत. व्यापारीवर्ग मालवाहतूक करताना खंडणी दिल्याखेरीज पुढे सरकू शकत नव्हता. सफल आणि विजयी कामगिरी करणारे डाकू आपली कामगिरी आणि कर्तृत्व कविताबद्ध करीत असत आणि मोठ्या गर्वाने आपली ‘अहंकार गाथा‘ वाचून दाखवत असे.
चोरी
दरोडे टाकण्याव्यतिरिक्त गरिबी आणि दारिद्र्यास बळी पडून ग्रामीण भागातील लोक लहानसहान चोर्या आणि वाटमारी करायचे. काहीजणांनी तर पूर्णपणे हाच धंदा वा उपजीविका पत्करली होती. शिवाय हा धंदासुद्धा एक प्रकारे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून ते मिरवित असत.
बलात्कार, व्यभिचार आणि अश्लीलता
हा समाज व्यभिचार आणि लैंगिक मार्गभ्रष्टतेत खितपत पडलेला होता. स्त्रियासुद्धा यात कमी नव्हत्या. व्यभिचारीणी बाया आपापल्या घरांवर लैंगिक आमंत्रणाची खूण असलेले झेंडे लावून व्यभिचारी पुरुषांना आमंत्रित करीत असत. मोठमोठे प्रतिष्ठित व श्रीमंत लोक आपल्या दास्यांकडून पाहुण्यांचा पाहुणचार करीत, आपल्या दास्यांकडून देहविक्रीचा व्यवसाय करीत आणि यातून संपत्ती मिळवीत असत. या प्रकारच्या व्यभिचारांवर प्रशंसापूर्ण काव्य करण्यात येत असे.
निर्लज्जता आणि नग्नता
निर्लंज्जतेने सर्व सीमा ओलांडलेल्या होत्या. अगदी धर्माच्या आधारावरसुद्धा मानवतेच्या छातीवर या नग्नतेने तांडव माजविले होते. काबागृहात हजच्या प्रसंगी हजारो लोक हज करण्यासाठी येत असत. मात्र कुरैश कबिल्याव्यतिरिक्त सर्वजन बिनधास्त कपडे काढून काबागृहाची प्रदक्षिणा करीत.
महिलांवरील अत्याचार
जग अस्तित्वात आल्यापासून अत्याचारांमध्ये सुसंस्कृत देश काय आणि असंस्कृत देश काय, धार्मिक काय आणि निधर्मी काय, सर्वांच्याच अन्याय, अत्याचार, शौर्य आणि इतर सर्व बाबींचे जुलमी भोग महिलांनाच भोगावे लागतात. भूत असो, भविष्य असो की वर्तमान असो, प्रत्येक काळात तिचाच बळी जात आहे. हीच अवस्था नारीची होय. त्यातल्या त्यात अगदी असंस्कृत आणि असभ्य समजल्या जाणार्या अरब प्रदेशात तर विचारता सोय नाही. महिलांना वारसासंपत्तीत कोणताही अधिकार नसायचा, असंख्य महिलांशी लग्न करायची पुरुषांना पूर्ण मुभा असे आणि कधीही घटस्फोट देऊन घराबाहेर काढून देण्यात पुरुषार्थावर कोणतीही बाधा येत नसे. यामुळे कुटुंबव्यवस्था पूर्णतः कोलमडून गेलेली आणि महिला अन्याय व अत्याचारांच्या अÎalÉपरीक्षेतून कधीही बाहेर निघण्याची संभावना दिसत नव्हती. (संदर्भ: सीरतुन्नबी - लेखक सय्यद सुलैमान नदवी)
मुलींची हत्या
क्रूर सावकारी बाहूपाशात आवळलेली मानवता, सर्वत्र दारिद्र्य, अज्ञान आणि उपासमारी, अहंकार आणि वंश-श्रेष्ठत्वाच्या विखारी झिंगेमुळे पेटलेला वैरभाव, द्वेष आणि मत्सर, गरीब व सर्वसामान्यांच्या मानगुटीवर भांडवलदारांचा जुलमी पाय, सर्वत्र चालू असलेली लूटमार आणि अशा परिस्थितीत पोटात उठलेली भुकेची आग, मान-सन्मानाच्या असुरक्षिततेची भावना आणि याच अवस्थेतून नको वाटत असलेला मुलीचा जन्म, काळजाचा तुकडा असलेल्या मुलींचा निर्घृण वध करून मानवता भरडून निघाली होती. मुलगी जन्मली की तिच्या रक्षणाचा, तिच्या पोटापाण्याचा प्रश्न बापाला भेडसावत असे. कोणीतरी आपला जावई होईल आणि आपली प्रतिष्ठा धुळीस मिळेल, या कल्पनेने त्याच्या आत्म्याचा थरकाप उडत असे. म्हणून तो आपल्या प्रेम, ममत्वाची मुस्कटदाबी करून तिला जीवंत पुरुन टाकायचा आणि संपूर्ण अरब समाजात ही प्रथा बर्याच अंशी रुढ होती.
गुलामी
आपसात भेदभाव आणि वैरभावाने पेटलेल्या या समाजाचा आणखीन एक भयानक अभिशाप म्हणजे गुलामीची प्रथा होय. माणसांचा बाजार भरायचा, गुलाम पुरुष आणि स्त्रियांची जनावरांप्रमाणे खरेदी-विक्री व्हायची. गुलाम आणि दासींबरोबर पशुपेक्षाही जास्त जुलमी व्यवहार करण्यात येत असे.

सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजेच ५७१ साली अरबच्या मरुभूमीवर मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला. या वेळी समस्त अरबसमाज अज्ञानतेच्या अंधकारात खितपत पडलेला होता. या समाजात समग्र अनिष्ट परंपरा आणि अमानवी रीती प्रचलित होत्या. तो श्वापदांपेक्षाही भयानक झाला होता, मानवतेचे क्रूरपणे लचके तोडत होता, हे अंधार युग होते. मानवता पशुच्या स्तराहून खालावली होती.
सामाजिक निरीक्षण
सुप्रसिद्ध समाजतज्ञ सी.राइट मिल्स यांनी एखाद्या समाजाचे अचूक निरीक्षण करण्यासाठी तीन पद्धती सांगितल्या आहेत.
 1. त्या समाजाचा ढाचा कशा स्वरुपाचा आहे आणि त्याच्या विभिन्न भागांचा परस्पर संबंध कसा आहे, याचे निरीक्षण करणे.
 2. मानव-इतिहासात त्या समाजाचे कोणते स्थान आहे आणि मानवतेच्या सर्वांगीण विकासाची त्या समाजात कोणती व्याख्या आहे, याचा मागोवा घेणे.
 3. त्या समाजावर कोणत्या प्रकारच्या लोकांचे वर्चस्व आहे, याचे निरीक्षण करणे.
  सी. राइट मिल्स यांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार अरब समाजाचे निरीक्षण केल्यास आपल्याला त्याची निम्नलिखित तथ्ये प्राप्त होतात.
  1. हा समाज विभिन्न कबिल्यांमध्ये दुभंगलेला होता. कबिल्यांतर्गत प्रचंड भेदभाव होता. समाजातील विविध घटक एक-दुसर्यांचे शोषण करीत होते. ‘बळी तो कान पिळी‘ अशी या समाजाची स्थिती होती. आपसांत हेवे-दावे, इर्ष्या, द्वेश, मत्सर आणि वैरभावासारख्या अमानवी भावनांच्या ज्वालांनी पेटलेला होता, अक्षरशः धगधगत होता. वंश-वर्ण आणि श्रेष्ठत्व व कनिष्ठत्वाच्या अहंकारी भावनांच्या आहारी होता हा समाजाचा विशिष्ट गुणधर्म होता.
  2. मानव-इतिहासात या समाजाचे स्थान अत्यंत खालच्या पातळीवर होते. मानवतेचा वैरी असलेला हा समाज पूर्णतः भौतिकवादी आणि संपत्तीचा भक्त होता. थोड्या लोभापायी कोणाचाही गळा कापण्यासाठी किंचितही मागेपुढे पाहत नव्हता. दीन-दुबळ्यांना पायाखाली तुडवून त्यांची संपत्ती हस्तगत करून आपलेच वर्चस्व गाजविण्यापेक्षा जीवनाचा कोणताही हेतू शिल्लक नव्हता. अशा या दयनीय आणि शोचनीय परिस्थितीत मानवतेची अन्याय व अत्याचारांच्या धगधगत्या भट्टीतून सुटका होण्याची मुळीच संभावना दिसत नव्हती.
  3. समाजात दीन-पददलितांचे रक्त शोषून जे लोक गब्बर झाले होते आणि स्वतः सर्वांचे स्वामी व प्रभू झाले होते, ते संपत्तीची भक्ती, पूजा आणि भोगविलासात बरबटलेले होते. स्वतःस वरिष्ठ, श्रेष्ठ, स्वामी व प्रभू समजून इतरांना गुलाम समजत होते. गर्व, व्यर्थ अभिमान आणि अहंकारी भावनेने पिसाळून जाऊन सर्वांना आपले गुलाम व दास समजत होते. इतरांचे शोषण आणि पिळवणूक करून त्यांच्या रक्तने दात लाल करणेच जणू त्यांचा परमधर्म होता. सत्य, समता, न्याय आणि बंधुत्वाच्या शाश्वत मूल्यांची साधी कल्पनाच तेवढी बाकी होती. एकूणरित्या असत्य, अन्याय व अनैतिकतेची एक परिपूर्ण व्याख्या नीट समजून घ्यायची असेल तर या समाजास पाहावे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सामाजिक शास्त्राच्याच दृष्टीने जर निरीक्षण करावयाचे झाल्यास या समाजाचे उपरोक्ती चित्र समोर आलेले आहेच. ही बाब स्पष्ट करण्याचे कारण एवढेच आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) जेव्हा या भूतलावर जन्मले, तेव्हा त्यांच्यासमोर किती प्रचंड मोठे आव्हान होते. अर्थातच एका अत्यंत बिघडलेल्या आणि शाश्वत मानवी मूल्यांचा आधार हरवून बसलेल्या या समाजात सुधारणा घडवून आणणे किती अवघड कार्य होते!

खरे पाहता जगाची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत हजारो प्रेषित आणि सुधारक येऊन गेले आहेत. सर्वांनीच समाजसुधारणेचे खूप कार्य केले मात्र अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे जी क्रांती जेवढ्या अल्प काळात घडली, त्याचे उदाहरण या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे.
या ठिकाणी ही गोष्ट लक्षणीय आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी प्रस्तुत केलेला धर्म अर्थात इस्लाम हा इतर सर्वच धर्मांपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. कारण हा केवळ धर्म नसून एक अत्यंत महान सामाजिक आंदोलन होय. इस्लाम धर्माचा उद्देश जगातून अन्याय, अत्याचार, शोषण व उत्पीडन समूळ नष्ट करून न्यायाची स्थापना करणे आहे. या आंदोलनाच्या माध्यमाने केवळ मानसिकताच बदलली नसून समाजाच्या आर्थिक, नैतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये पूर्णतः क्रांती घडली. हा एक असा चमत्कार घडला की जगातील मोठमोठ्या विचारवंतांनी आश्चर्यचकीत झाले.

कुरआनच्या आदेशाचा सारांश असा की, वाचा, शिका त्या परमेश्वराच्या नावाने ज्याने ज्ञान दिले, माहीत नसलेले, लेखणीच्या द्वारे. शिक्षण ही जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी  प्रक्रिया आहे. ती कधीच थांबत नसते आणि ही विकासात्मक प्रक्रिया असते. ही जीवनाच्या सर्वच क्षेत्रात घडत असते, परिवर्तनशील आणि गतिशील असते.
पैगम्बर हजरत मुहम्मद (स.अ.स.) यांच्या काळातील हदीस आहे की, ज्ञान प्राप्त करायचे असेल तर चीन ला देखील जा. पैगरबर (स.अ.स.) यांच्या काळात मक्का हे तत्कालीन  आंतर्राष्ट्रीय व्यापाराचे केंद्र होते. या बाजारपेठेत विविध देशाचे जीन्नस, कपडे, भांडी, विविध यंत्रे व नवसंशोधित बाबींची माहिती व वस्तू येत असत. कुरआन आणि पैगरबर (सल्ल)  यांच्या मार्गदर्शनाचे केंद्र चिंतन आहे. चिंतन हा मानवाच्या अंगी असलेला ईेशरदत्त आणि शक्तिशाली गुणधर्म आहे. यालाच चेतना माणून ही प्रत्येक समयी क्रीयाशील ठेवण्याचे  संशोधनात्मत आवाहन वारंवार कुरआन करीत असतो. आणि त्याच अनुषंगाणे पैगरबर सल्ल. यांनी नविन ज्ञान प्राप्त करायचे असेल तर चीन पर्यन्त जाण्याची आज्ञा केलेली आहे.  मक्का शहराच्या बाजारात चीन निर्मीत विविध वस्तू जिन्नस येत असते. त्यांच्या उत्पादनाचे ज्ञान चीनमधे होते. तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी मुस्लिमांनी चीनला देखील जायला पाहिजे,  हा स्पष्ट संदेश होता.
याचा दुसरा अर्थ अगदी स्पष्ट आहे की, इस्लाम, कुरआन आणि पैगरबरांच्या शिक्षणात आध्यात्मिक शिक्षणाएवढेच भौतिक शिक्षणही महत्वाचे, आवश्यक व त्यासाठी कुठेही जाण्याची,  खर्च व त्याग करण्याची दिशा स्पष्ट आहे! इस्लाम, कुरआन यांचा शिक्षणाकडे पाहन्याचा दृष्टिकोण हा वास्तविक जगताच्या समाज विकास व भौतिक विकासाच्या संदर्भात देखील स्पष्ट  आहे.मानवाच्या, समाजाच्या विकासासाठी ज्ञानाकडे, शिक्षणाकडे इस्लाम निरपेक्ष (म्हटल्यास धमनिर्पेक्षपने!) दृष्टीने पहात असतो.
खलीफांच्या काळात व अनेक सुलतान,बादशाह यांच्या काळात (७ वे शतक ते १७ व्या शतकापर्यंत) मोठाल्या विद्यापीठांचि निर्मिति, विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहांची निर्मीती, संशोधनाना  दिलेले उत्तेजन, आणि विशेष म्हणजे, अरब पंडितानी विविध भाषेतील ग्रन्थांचे केलेले भाषांतरण अत्यंत महत्वाचे व इस्लामच्या वैश्विक शैक्षणिक दृष्टिकोणाचे मार्गदर्शक आहेत.  इजिप्त आणि यूनान च्या तत्वज्ञानांचे, राज्यशास्त्र ते अर्थशास्त्र, खगोलशास्त्र, गणीत, वैद्यकशास्त्र, तर्कशास्त्र आणि विविध क्षेत्रातील वैज्ञानिकांचे केलेले संशोधन, त्यांच्या ग्रंथांचे विश्लेषण, भाषांतरण यावर मुस्लिम पंडितांनी केलेले श्रम त्यांच्या ज्ञान प्राप्तिच्या सन्दर्भातील तृष्णेचि ग्वाही देणारे आहे! कुरआन व पैगम्बर प्रणीत निरिक्षण करा, शोध घ्या, विचार  करा, निसर्गात दडलेल्या घटनांचे कार्यकारण भाव शोधा ईत्यादी मार्गदशन ज्ञानाच्या क्षेत्राच्या व्याप्तिला समजून घेण्यासाठीच आहे.
ज्ञान हे बंदिस्त, साचेबंद व स्तिथिवादी कधीच नसते! म्हणून ते नीट समजून घेण्यासाठी कुरआन दोन प्रकारच्या ज्ञान प्रवाहांचा मार्ग स्पष्ट करतो. एक प्रवाह ज्ञान प्रवाह तो, जो  प्रेषित, ईश्दूत यांच्या मार्फत दिल्या जातो! यात अध्यात्म, ईेशरीय रचना, प्रेरणा आदींचा समावेश असतो.
दुसऱ्या प्रकारात ज्ञान हे निसर्गात अस्तीत्वात आहेच! त्याचा शोध स्वतःच्या प्रज्ञेनें घ्यायचा असतो. यासाठी प्रत्यक्ष निरिक्षण, संशोधन, विश्लेषण व तर्क-परीक्षण या द्वारे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे मार्गदर्शन आहे. यालाच वैज्ञानिक ज्ञान प्राप्तिचा मार्ग, असे इस्लामिक संशोधनांचे तत्वज्ञान आहे.
हे सर्व असतानांही, विशेष करून भारतीय मुस्लिमांत आणि महाराष्ट्रातील मुस्लीमात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत अल्प म्हणजे वर्तमानातील ६ टक्केच शिक्षित आहेत! मुसलमांनातील  आर्थिक- समाजिक दुर्बलतेच्या अनेक कारकांपैकी हे महत्वाचे कारण आहे.  मध्ययुगाच्या अंतापर्यंत जगात आद्योगिक व वैज्ञानिक क्रांतिने उचल खाल्लेली  होती. उत्पादन साधने तांत्रिक, आधुनिक बाजारपेठ, विपणन व्यवस्थेतील बदल, यासह वेगाने बदलत असलेले आर्थिक, सामाजीक व राजकीय व्यवस्थेतील बदल वेगाने घडत होते. या  बदलांच्या मुळाशी होते. मानवाला प्राप्त होत असलेले ज्ञान. त्याने संशोधन, प्रयोग, विज्ञानाच्या सहाय्याने लावलेले नवे शोध व नवे तंत्र व यंत्र. याबाबतचे त्याने लिपीबद्ध केलेले, ग्रंथांच्या स्वरूपात लिहिलेले फार्मुले, आणि पुढच्या ज्ञानासाठी सुचविलेला आणि प्रशस्त केलेले मार्ग. या ज्ञानाच्या विस्ताराने पारम्पारीक ज्ञान देणाऱ्या संस्था यांचे पारम्पारिक ज्ञान व  पद्धति ही कालबाह्य ठरू लागली. नव्या शाळा, कॉलेजेस, शिक्षण संस्था स्थापन व्हायला लागल्या. ज्ञानाच्या भाषा संशोधकांच्या व देश निहाय भाषांच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था निर्माण व्हायला लागली.
ज्या मुस्लिम देशांनी हे वास्तव ओळखले आणि ज्ञानाच्या बाबतीत खऱ्या इस्लामिक मार्गदर्शनाचे वास्तव समजून घेतले, त्या-त्या देशांनी आपआपल्या शैक्षणिक व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवून आणला. कुराणाची भाषा अरबी, म्हणून कुरआन समजून घेण्यासाठी या भाषेसोबत स्थानिक भाषांचा वापर हा ९ व्या, १० व्या शतकापासूनच या देशांनी चालू केला  (भारतात याला १८ वे शतक यावे लागले) मात्र, वास्तविक भौतिक ज्ञानासाठी इंग्रजी, भाषा व तत्सम ज्ञान देणारी भाषा शैक्षणिक म्हणून वापरली व जगातील ज्ञान, तंत्रज्ञान, व समस्त  स्पर्धेत अस्तित्वात राहिले! इजिप्त, तुर्कस्तान, ईरान, सीरिया, लेबनान असे असंख्य देश उदाहरणादाखल घेता येतील.
भारतातही इंग्रज राज्यानंतर शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल घडत होते! या बदलात किमान त्याही काळी सुशिक्षित असलेला मुस्लिम (उर्दू भाषिक) वर्ग (मुस्लिमातील २० टक्के होता)  हा या स्पर्धेत तिकला पाहिजे म्हणून सर सय्यद अहमद, मौलाना आजाद, तुफेल अहमद मंगलोरी, मौलाना हसरत मोहानी यानी इंग्रजी शिक्षणाची कास धरण्याची, शिक्षणासाठी स्थापन  होत असलेल्या  मुस्लिमेतर शिक्षण संस्थांमधे शिक्षण घेण्याचे मार्गदर्शन, तांत्रिक शिक्षण घेण्याचे मार्गदर्शन करितच होते.
भारतीय मुस्लिमातील ८० टक्के समाज हा श्रम संस्कृतीतून आला असल्याने परम्परागत व्यवसायात जीवन जगणे व आपल्या धर्माचे पालन करणे एवढेच त्याच्या आवाक्यात होते!  म्हणून स्वातंत्र्यानंतरही भारतातील मुस्लिमांच्यां ७० ते ७५ टक्के अशिक्षित असण्याचे कारण सहज लक्षात येते. 
दूसरीकडे कुरआन स्पष्ट सांगत आहे की, ज्ञान घेणे मुस्लिमांसाठी फर्ज आहे, व हे सांगणारे आलीम, मौलाना साहेब कितीही घसा ओरडून सांगते झाले तरीही, शिक्षण घ्यायला व  द्यायला एका व्यवस्थेची गरज असते. शिक्षण संस्थेसह, वास्तुसह, मोठ्या नियोजनाची आणि आर्थिक व्यवस्थेची गरज असते. ही जबाबदारी दोन स्तरावर असते. एक तर सरकारने ही व्यवस्था पूरवायची असते. कारण हा समूह नागरिकांचा असतो व मतदान करून सरकार निवडून देत असतो.
दुसरे, भारताच्या संविधानाने असली व्यवस्था प्रत्येक समाजाला दिलेली आहे की त्यांनी आपल्या समाजाच्या शिक्षणाच्या सोयी स्वतः उभाराव्यात. ही जबाबदारी त्या त्या समाजातील  उच्चवर्ग, साधन सम्पन्न वर्ग, जागरूक वर्गाची, सत्ताधारी वर्गाची असते. आज महाराष्ट्रात मराठा, जैन, मारवाड़ी, कुनबी, माळी आणि इतर समाजाच्या अनेक शैक्षणिक संस्था भौतिक  ज्ञान व स्पर्धेच्या युगात आपल्या समाज समुहांच्या अस्तित्व व सहभागासाठी उभ्या टाकलेल्या आहेत. या स्तरावर मुस्लिम समाजाचा विचार केला असता काही मोजक्या, अपवादात्मक  कॉलेज, शाळा सोडल्या तर दुःखदायक स्थिती आहे. मुस्लिमातील वरिष्ठ वर्गीय समाजाकडे भरपूर पैसा आहे. अफाट जमीनी आहेत. पण नाइलाजाने म्हणावे लागते, कुरआनने दिलेले  आदेश की ज्ञान प्राप्त करा, जे दिलेत लेखनीच्या माध्यमातून हे वास्तवात उतरविण्यासाठी कॉलेजेस, हॉस्टेल्स, शाळा, ग्रंथालय स्थापन करण्याची चळवळ उभारण्यासाठी दृष्टी नाही.  मोहल्ल्यातील शाळा बंद झाली, मात्र त्याच मोहल्ल्यात ४ मस्जिदी लोकवर्गनितून उभ्या झाल्याचे चित्र आहे. विचार करा, या मस्जिदीसोबत भौतिक-अभौतिक ज्ञान देणाऱ्या शाळा उभ्या  राहिल्यात तर, जगाचा विज्ञानाचा इतिहास लिहीणारा जॉर्ज सरटोंन आणि रॉबोर्ट ब्रिफोल्ट म्हणतात त्या प्रमाणे कुरआनच्या मार्गदर्शनाने ७ व्या शतकातील अंधकार युगात विज्ञानाची  प्रकाशमय दारे उघडली हे सत्य आजच्या युगात वास्तवतेत आणता येईल.

- हाजी प्रा.जावेद पाशा कुरेशी
9422154223

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हांपैकी सर्वोत्तम माणूस तो आहे जो आपल्या कुटुंबियांशी सर्वोत्तम वर्तन करीत असावा. आपल्या कुटुंबियांशी सद्वर्तन करण्यात मी तुम्हा सर्वांत  अग्रेसर आहे. (कुटुंबियांपैकी) एखाद्याला मृत्यू आला तर त्याच्या दुर्गुणांची चर्चा कदापि करू नका.’’ (तिर्मिजी)

निरुपण- कुटुंब समाजाचा एक घटक आहे. उपरोक्त हदीसमध्ये आदर्श कुटुंबाचे विवरण आहे. पैगंबरांनी जो माणूस आपली पत्नी, मुलेबाळे आणि इतर नातेवाईकांशी सद्वर्तन करतो,  त्याला सर्वोत्तम माणूस संबोधले आहे. माणसाच्या चारित्र्यसंपन्नतेची कसोटी त्याचे आपल्या घरातील वर्तन आहे. घराबाहेर अर्थात समाजात चांगले वाकायचे पण घरात मात्र उलट  वागायचे, ही चारित्र्यसंपन्नता नव्हे! मातापित्यांशी, बायकोशी, मुलाबाळांशी, भावाबहिणींशी अर्थात सर्वच नातलगांशी सद्वर्तन करीत असेल तो सर्वोत्तम माणूस आहे, असा पैगंबरांचा  संकेत आहे.
पत्नीशी सद्वर्तन करणे म्हणजे तिची हमदर्दी करणे, तिच्यावर प्रेम करणे, तिच्या भावनांचा आदर करणे, तिला न दुखावणे, शिवीकाळ न करणे, तिच्या क्षमतेपेक्षा अधिक जबाबदारी  तिच्यावर न टाकणे, तिच्या रास्त इच्छाआकांक्षांना पूर्ण करणे इ. आहे. कारण लग्नानंतर ती आपले मातापिता, घरदार सोडून पतीच्या घरी येते व नवजीवनाची सुरूवात करते. अशा  वेळी तिला पतीच्या प्रेम आणि सद्वर्तनाची, आपुलकीची नितांत गरज असते. आजारपणात तिची सेवा करणे, घरकामांत तिला सहकार्य करणे, इ. म्हणजे तिच्याशी सद्वर्तन करणे  होय.
घरात मुलाबाळांशी सद्वर्तन करणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या शिक्षणाची, सुसंस्कारांची व चांगल्या संगोबनाची काळजी घेणे म्हणजेच त्यांच्याशी सद्वर्तन होय. घरातील इतर  नातेवाईकांशी सद्वर्तन करण्याने अभिप्रेत त्यांच्याशी आदरसन्मानाने वागणे, त्यांची सेवा करणे, त्यांच्या चूकभुलींकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांच्या हितासाठी व उत्कर्षासाठी प्रयत्न करणे  होय.
‘‘मी आपल्या कुटुंबियांशी सद्वर्तनामध्ये तुम्हां सर्वांत अग्रेसर आहे.’’ हे एक वास्तव आहे. पैगंबरांसारख्या श्रेष्ठतम चारित्र्यसंपन्न व परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाला इतिहासात जोड नाही!  त्यांच्या उदात्त चारित्र्याची साक्ष त्यांच्या हाडाच्या वैऱ्यांनीही दिली आहे.
‘‘ज्याला कालपरवापर्यंत पत्थर फेकून मारीत होते, त्याला ठार करण्यासाठी जंग जंग पछाडीत होते, त्यानेच नऊ-दहा वर्षांच्या अवधीत आपल्या लोकांना नैतिक अध:पतनाच्या दरीतून  पावित्र्य व न्याय यांच्या शिखरावर नेऊन बसविले. प्रणाम! सहृदय प्रणाम त्या महापुरुषाला!’’ पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबद्दल साने गुरुजींचे हे खूप बोलके आहेत. ‘‘तुमच्या कुटुंबियांपैकी कुणाला मृत्यू आला तर त्याच्या दुर्गुणांची चर्चा करू नका.’’ याचा अर्थ हा आहे की ज्याने इहलोकाचा निरोप घेतला आहे त्याची निंदानालस्ती करू नका. किती महान  उपदेश आहे हा! जित्यापणी तर त्यांच्याशी सद्वर्तन कराच, पण त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याशी चांगलेच वागा, त्यांच्या चागल्या गुणांचीच चर्चा करा, वाईट कुणांची नको! असे उदात्त  चारित्र्य ज्या माणसाचे असेल, तो सर्वोत्तम माणूस होय! यात शंका ती कसली?

संकलन : डॉ. सय्यद रफीक

- नसीम गाझी फलाही
    अल्लाहची महानता व सर्वसत्ताधिशता स्वीकार करण्यासाठी इस्लामने जी उपासना व्यवस्था प्रस्तुत केली आहे. त्यापैकी नमाज एक महत्त्वपूर्ण आहे. नमाजचे महत्त्व व आवश्यकतेचा उल्लेख पवित्र कुरआन व हदीसमध्ये अनेक ठिकाणी आला आहे.
    दिवसातून पाचवेळा नमाज अदा करणे प्रत्येक मुस्लिम पुरुष व स्त्रीसाठी अनिवार्य आहे. या पुस्तकात नमाजसंबंधी सुचिर्भूतता, अटी, आजान, नमाजची पद्धत, स्त्रियांची नमाज व इतर नमाज या विषयींचा खुलासा आला आहे.

आयएमपीटी अ.क्र. 55     -पृष्ठे - 24   मूल्य - 16          आवृत्ती - 4 (2014)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/tjs0205o7he9pd9196ha3mjvtd7sz7ha

- अमरपाल सिंह
    प्रस्तुत पुरनकाचा एकमेव उद्देश मानवतेशी संबंधित इस्लामच्या नैतिक चेतनेशी प्रत्येकाला परिचित केले जावे ज्यामुळे मनुष्याने स्वत:चे जीवन सुधार व जीवन सुशोभित करण्यासाठी या चेतनेचा उपयोग करावा.
या पुस्तकात इस्लाम धर्माच्या नैतिकचेतना प्रदर्शित करताना पवित्र कुरआनचे आदेश, कुरआन शिकवणीचे शाब्दिक अर्थासह भावनात्मक हेतुला देखील व्यक्त केले आहे. हे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य या ग्रंथाचे आहे. कुरआन ग्रंथांत जागोजागी विखुरलेल्या नैतिक शिकवणींना या पुस्तकात विषयानुरूप एकत्रित केले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 49              -पृष्ठे - 64                  मूल्य - 15               आवृत्ती - 2 (2005)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/tk8zo0p20wpvm2417nc4l1lhkm1cz1er

- मुहम्मद फारूक खान
    मनुष्य या जगात येतो परंतु तो या जगात जगासाठी येतो काय? कदापि नाही, जर तो या जगासाठी आला असता तर तो येथून परत गेला नसता. त्याचे शाश्वत ठिकाण तर पारलौकिक जीवन आहे. या जगातील जीवन फळ कापून तोंडात घालण्यासारखे आहे.
या फळाची चव पारलौकिक जीवन आहे ज्याने फळच खाल्ले नाही त्याला चव कशी कळू शकते? ज्याने कडू फळ खाल्ले त्याला गोडी कशी मिळणार? या जगातील जीवनाच्या शेतीत जो चांगले बी पेरील त्यालाच परलोकात चांगले पीक मिळेल. काटे पेरणाऱ्याच्या वाट्याला तर तिथे काटेच येतील.
आयएमपीटी अ.क्र. 48              -पृष्ठे - 136                  मूल्य - 50               आवृत्ती - 2 (2011)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/83f2xfgfkhws9j3jbrb5wq3cmm6k8j9t

- प्रा. के. एस. रामाकृष्णराव
   
    प्रसिद्ध तत्त्वेत्ते प्रा. के. एस. राव यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनाचा आणि त्यांच्या शिकवणींचा सखोल अभ्यास केला आहे.
    त्यांनी आपल्या सखोल अभ्यासंगति आपले मत बुद्धीवादी लोकांसमोर मांडावयाचे ठरविले आणि त्यानुसार त्यांनी `मुहम्मद-द प्राफेट ऑफ इस्लाम' (मुहम्मद (स.) इस्लामचे पैगंबर) या नावाने पुस्तक प्रकाशित केले अनेक वेळा हे पुस्तक भारतात व भारता बाहेर अनेक भाषेत प्रकाशित झाले आहे.

    आयएमपीटी अ.क्र. 47     -पृष्ठे - 24      मूल्य - 16               आवृत्ती - 9 (2013)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/j1iw0e3fo2cpqnezym1rihj7usms68vq

आदरणीय अब्दुल्लाह बिन मसऊद (र.) म्हणतात, मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले की, अल्लाहला कोणते कर्म सर्वाधिक प्रिय आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, वेळेवर नमाज अदा  करणे. मी विचारले, त्यानंतर? पैगंबर म्हणाले, माता-पित्यांशी सद्वर्तन. मी पुन्हा विचारले, त्यानंतर? पैगंबर (स.) म्हणाले, ईशमार्गात जिहाद करणे.

निरुपण
उपरोक्त हदीसमध्ये पैगंबरांनी मानवी जीवनाचे सार्थक करण्यासाठी तीन सर्वश्रेष्ठ कर्म करण्याचा उपदेश केला आहे.
(१) माणसाने जीवनात अल्लाहशी सदैव कृतज्ञ राहावे. हे अनंत विश्व अल्लाहचे आहे. त्यानेच मला निर्माण केले आणि या अनंत कृपा त्याच्याच आहेत ही जाणीव सतत ध्यानीमनी  ठेवावी. हे ईशऋण व्यक्त करण्याचे श्रेष्ठतम माध्यम नमाज आहे. दिवसातून पाच वेळा वक्तशीरपणे आयुष्यभर अल्लाहसमोर नतमस्तक होऊन नमाज अदा करणाऱ्याचे जीवन  यशस्वी, सफल होईल. यात शंकाच नाही.
(२) जीवनाचे सार्थक करण्यासाठी दुसरे श्रेष्ठ कर्म ज्याचा पैगंबर उपदेश करतात, ते आहे माता-पित्यांशी सद्वर्तन! खरे तर अल्लाहनेच माणसाला माता-पित्यांशी सद्वर्तन करण्याचा  आदेश दिला आहे. ही माणसाच्या सात्विकतेची लिटमस टेस्ट आहे. जो माता-पित्यांशीच सद्वर्तन करत नसेल त्याच्यात सात्विकता ती कोणती? माता-पित्यांशी सद्वर्तन हे इस्लामी  समाजाचे पायाभूत तत्त्व आहे, जे कुटुंब व्यवस्थेला मजबूत बनवते. ज्या कुटुंबात माता-पिताच दुर्लक्षित, उपेक्षित असतील, ते कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहात नाही.
(३) यानंतर ज्या श्रेष्ठ कर्माचा पैगंबरांनी उपदेश केला आहे ते जिहाद. माणसावर सामाजिक जबाबदारीदेखील आहे, जिला पूर्ण केल्याशिवाय त्याच्या जीवनाचे सार्थक होणार नाही.  समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच गुलामीविरूद्ध संघर्ष करणे व मानवजातीला स्वार्थी लोकांच्या गुलामीतून मुक्त करणे, शोषणमुक्त समाज निर्माण करणे. सामाजिक विषमता, परस्पर द्वेष आणि अन्यायाविरूद्ध बंड करणे हाच जिहाद आहे. दुर्दैवाने समाजकंटकांनी जिहादविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवलेले आहेत. ते दूर करून जिहादचे वास्तव समाजासमोर आणणे गरजेचे आहे. समाजामध्ये शांती, सद्भावना आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच जिहाद होय. याकामी आपले सर्वस्व पणाला लावणे, त्यात येणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जाणे आणि प्रसंगी प्राणाची आहुती देणे हाच खरा जिहाद आहे.
समाजामध्ये अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार बोकाळलेला असताना सज्जनांचे शांतपणे, निष्क्रियपणे जगणे इस्लामला कदापि मान्य नाही. या उलट इस्लामला असे नमाजी व असे हाजी  अपेक्षित आहेत जे सामाजिक स्वास्थ्यासाठीही संघर्ष करण्यास तत्पर असावेत. आपल्या देशातील सर्व शांतीप्रिय नागरिकांनी संघटित होऊन आदर्श, सत्याधिष्ठित, समताधिष्ठित व  न्यायाधिष्ठित भारताच्या नवनिर्माणासाठी जिहाद करणे ही आज काळाची गरज आहे. अन्यथा सर्व भारतीयांना या निष्क्रिय राहण्याची कटु फळे भोगावी लागतील व पश्चात्तापाची वेळ  येईल. अल्लाह आम्हा सर्वांना वेळीच सद्बुद्धी देवो, आमीन.

(संकलन : डॉ. सय्यद रफीक)

- श्री नाथू राम
हिंदू विद्वान लेखक श्री नाथू राम एक विचारंवत असून त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग मध्यपूर्वेच्या इस्लामी संस्कृतीत व्यतीत केला. त्यांना ही संस्कृतीजवळून पाहण्याची व समजून घेण्याची संधी मिळाली.
धर्मास बंधीच्या गैरसमजूतींचे निवारण झालेच पाहिजे आणि धर्माचा निष्पक्षपणे अभ्यास केला जावा हेही अत्यावश्यक आहे. याच भावनेने श्री नाथू राम यांनी एक लेखमाला इस्लामविषयी सादर केली होती आणि तोच लेखसंग्रह पुस्तक रूपात आज उपलब्ध आहे.

आयएमपीटी अ.क्र. 46     -पृष्ठे - 56      मूल्य - 28            आवृत्ती - 4 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/eg8zohhft5ncdritpfizrj7arbkf3mzhहजरत अबू उमामा (रजि.) म्हणतात की, एका व्यक्तीने पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘हे प्रेषिता! माता-पित्यांचे संततीवर काय हक्क आहेत?’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले,  ‘‘माता-पिताच तुमची जन्नत (स्वर्ग) आहेत आणि माता-पिताच तुमची जहन्नुम (नरक).’’ (इब्ने माजा)
निरुपण
माता-पित्यांशी सद्वर्तन करणारेच जन्नतमध्ये (स्वर्गात) जातील. माता-पित्यांशी दुर्वर्तन करणारे कदापि स्वर्गात जाऊ शकत नाहीत. असे लोक जहन्नुममध्ये (नरकात) टाकले जातील. कुटुंब हे मानवी समाजाचा एक घटक आहे. समाजातील सारे कुटुंब आदर्श असतील तरच समाजही आदर्श होईल. प्रत्येक कुटुंबामध्ये माता-पिता हे महत्त्वाचे घटक असतात. ज्या  कुटुंबात माता-पित्यांचा सन्मान होत असेल, त्यांच्याशी सद्वर्तन होत असेल व त्यांची सेवा घडत असेल तेच कुटुंब सुखी-समाधानी व आदर्श कुटुंब म्हणता येईल. उलटपक्षी ज्या घरात  माता-पिता उपेक्षित असतील, त्यांचा सन्मान होत नसेल, त्यांची सेवा होत नसेल त्या घराला सुखी-समाधानी म्हणता येणार नाही. 
आपल्या राज्यात गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटना यासंबंधी अतिशय गांभीर्याने चिंतन करण्यास बाध्य करणाऱ्या आहेत. पहिली घटना आहे नांदेडचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.  अरुण गोधमगावकरांची. अहमदपूरमधील रुक्मिनी वृद्धाश्रमात दि. १८ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले. अमेरिकेत असणाऱ्या डॉ. मुलाला व डॉ. मुलीला कळल्यावर त्यांनी  अंत्यविधी उरकून घ्या, आमचा काहीएक आक्षेप नाही व आम्ही येऊ शकत नाही, असे उत्तर दिले. अखेर वृद्धाश्रमाच्या चालकांनी त्यांचा विधी पूर्ण केला. 
दुसरी घटना नीराबाई पटेल या वृद्ध महिलेची आहे. पालघर जिल्ह्यातील मधोर येथे या वृद्ध मातेचे निधन झाले. वृद्ध पिता धीरज पटेल यांनी अहमदाबादमध्ये राहणाऱ्या आपल्या  एकुलत्या एक मुलीला फोन करून कळवलं. ती आली नाही. गावातील हिंदू-मुस्लिम ग्रामस्थांनी या वृद्धेचा अंत्यविधी केला. नंतर गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तीने त्या मुलीला  अस्थिविसर्जनासंबंधी विचारल्यावर ती फोनवर म्हणाली, ‘अस्थी कुरिअरने मला पाठवून द्या.’ मुलीचे असे वागण्याने बापाच्या काळजाचे पाणी केले. आजचा समाज कुठे चाललाय आणि  कुटुंब व्यवस्थेची कशी वाट लागली आहे त्याची ही दोन बपोलकी उदाहरणे आहेत. ज्यांना मातापित्यांचीच ओळख नाही ते इतर कुणाची ओळख ठेवणार? समस्या गंभीर आहे. त्यावर  वेळीच उपचार करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी घरात आणि शालेय जीवनातही मुलांवर योग्य संस्कार महत्त्वाचे आहेत.
इस्लामची माता-पित्यांसंबंधी काय भूमिका आहे ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपरोक्त उपदेशावरून आपल्या लक्षात येईल. ते म्हणाले, ‘माता-पिताच तुझा स्वर्ग आणि माता-पिताच  तुझा नरक.’ म्हणजे त्यांच्याशी सद्वर्तन कर आणि स्वर्गात जा अन्यथा त्यांच्याशी दुर्वर्तन कर आणि खुशाल नरकात जा!

- संकलन : डॉ. सय्यद रफीक 

- लातूर (बशीर शेख) 
 सन्माननीय मित्रानों अल्लाहचे कोटी- कोटी उपकार आहेत की त्याने आपल्या सर्वांना इस्लाम सारख्या वैभवशाली धर्मामध्ये जन्म दिला. त्यातल्या त्यात भारतात जन्म दिला. आज आपण या ठिकाणी ईदच्या पावन पर्वावर नमाज अदा करण्यासाठी एकत्रित जमा झालो आहोत. आज जगातून लाखो मुस्लिम एकत्रितरित्या मक्कामध्ये नमाज अदा करत आहेत आणि आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी नमाज अदा करत आहोत, ही समानता इस्लामचे वैशिष्ट्ये असल्याचे जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी सांगितले. ईद उल अजहा निमित्त लातूर येथील ईदगाह मैदानावर आयोजित नमाज प्रसंगी खुत्बा देताना ते बुधवारी बोलत होते. 
ते पुढे म्हणाले, पैगम्बर इब्राहीम अलै. संबंधी कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ” आठवण करा जेव्हा अल्लाहने इब्राहीमची काही गोष्टींमध्ये परीक्षा घेतली आणि जेव्हा तो परीक्षेमध्ये पूर्ण उतरला तेव्हा अल्लाहने त्यांना म्हटले, ”मी तुला सर्व लोकांचा नेता म्हणून नियुक्त करीत आहे.” तेव्हा इब्राहीमने विचारले, ” आणि माझ्या संततीसाठीही हेच अभिवचन आहे का?” तेव्हा अल्लाहने उत्तर दिले, ” माझे अभिवचन अत्याचार्‍यांसाठी नाही.”( सुरह अलबकरा आयत नं. 124).
इब्राहीम अलै. यांच्या काळात काबागृहामध्ये अनेक मूर्त्या ठेवलेल्या होत्या आणि लोक त्यांची पूजा करीत होते. त्यांचे वडील स्वत: मूर्तीकार होते. त्यांची समाजात मोठी प्रतीष्ठा होती. मूर्तीपूजा त्या काळी प्रस्थापित अशी पूजा पद्धती होती. मात्र लहानपणापासूनच इब्राहीम अलै. सलाम यांना  -(उर्वरित पान 7 वर)
मूर्तीपूजेमध्ये रस नव्हता. ते सारखा विचार करायचे की, ईश्‍वर कोण आहे? एकदा त्यांना आकाशात तारा चमकताना दिसला. त्यांना वाटले हा एवढा प्रकाशमान आहे तर हा ईश्‍वर असावा. पण तो लोप पावताच त्यांना वाटले की हा तर लोप पावला हा कसा ईश्‍वर असू शकतो. असेच चंद्र आणि सूर्या बाबतीत झाले. विचार प्रक्रियेनंतर त्यांच्या लक्षात आले की, ईश्‍वर तो आहे ज्याने हे चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी व सौरमंडल तयार केेली आहेत. पृथ्वीवरील सर्व जीव जंतू आणि मनुष्य यांना जन्माला घातले आहे. त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध केल्या आहेत. हे सत्य लक्षात आल्याबरोबर इब्राहीम अलै. यांनी  एकदा गावातील सर्व लोक यात्रेमध्ये गेल्याची संधी साधून  काबागृहात घुसून सर्व मुर्त्या कुर्‍हाडीने तोडून टाकल्या आणि कुर्‍हाड सर्वात मोठ्या मुर्तीच्या हातात ठेवून दिली. यात्रेतील लोक परत आल्यानंतर त्यांनी काबागृहातील मुर्त्यांची अवस्था पाहिली व त्यांचा संशय इब्राहीम अलैह सलामवर आला. त्यावर ते म्हणाले, मला काय माहित त्या मोठ्या मूर्तीला विचारा त्याच्या हातात कुर्‍हाड आहे. तेव्हा लोकांनी आश्‍चर्याने विचारले तो कसा काय तोडील तो तर हालचालच करू शकत नाही? तेव्हा इब्राहीम अलैह सलाम म्हणाले, लोक हो! जो स्वत: हालचाल करू शकत नाही तो तुमचा ईश्‍वर कसा असू शकतो? लोकांच्या लक्षात हे सत्य आले की, मूर्ती पूजेमुळे काही साध्य होत नाही. मात्र परंपरेपासून चालत आलेली मूर्तीपूजा आणि त्यासोबत येणारे पौरोहित्याचे फायदे सोडण्यासाठी ते तयार झाले नाही. यानंतर अग्नीकुंड पेटविण्यात आले व त्यात इब्राहीम अलै. यांना टाकण्यात आले. मात्र ईश्‍वरीय आदेशाने आगीने इब्राहीम अलै. यांना कुठलीही हानी पोहोचली नाही आणि ते सुखरूप बाहेर आले. 
इब्राहीम अलै. सलामच नव्हे तर जेवढे काही प्रेषित या पृथ्वीवर आले, त्यांनी एका ईश्‍वराची भक्ती करण्याचा संदेश दिला. त्या सर्वांना त्या-त्या काळच्या लोकांनी अभूतपूर्व असा त्रास दिला. अनेकांना देशोधडीला लावले. अनेकांच्या हत्या केल्या. आजही एक ईश्‍वराची भक्ती करण्याची हाक दिली की, अनेक लोक त्याच्या विरोधात उठून उभे राहतात. 
21 व्या शतकातल्या आधुनिक विज्ञानालासुद्धा आज हे सांगता येत नाही की, सौरमंडल किती मोठे आहे? आपल्याला एक चंद्र, एक सूर्य दिसतो पण सौर मंडलमध्ये लाखो चंद्र, सूर्य आहेत आणि आपल्याला दिसणार्‍या चंद्र, सूर्यापेक्षा मोठ्या आकाराचे आहेत. इब्राहीम अलै. यांनी सांगितले की, माझा ईश्‍वर तो आहे ज्याने हे सौरमंडल नुसते निर्माणच केले नाही तर ते व्यवस्थित संचलित सुद्धा केलेले आहे. सूर्य आणि चंद्र वेळेवर निघतात. त्यांच्या उगवण्या आणि मावळण्याचे जे वेळापत्रक आज आहे तेच हजारो वर्षापूर्वीही होते. हे सहज शक्य आहे का? लाख प्रयत्न करून सुद्धा रेल्वे वेळेवर धावू शकत नाही मात्र लाखो वर्षापासून सूर्य, चंद्र, तारे वेळेवर धावत आहेत. ही सर्व ईश्‍वरीय व्यवस्था आहे. इब्राहीम अलै. यांचे वारस प्रेषित मुहम्मद सल्ल. होत व त्यांचे उम्मती म्हणून आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आहे की, एक ईश्‍वराच्या संकल्पनेपासून लांब असलेल्या सर्व बांधवांना एक ईश्‍वराच्या आराधनेचे महत्व समजावून सांगावे.
इब्राहीम अलै सलाम यांना मूलबाळ होत नव्हते. त्यांनी मुलासाठी विशेष अशी प्रार्थना केली व 80 वर्षाच्या पेक्षा जास्त वयात त्यांना मुलगा झाला. त्यालाही वाळवंटात एकटा सोडून देण्याबद्दल ईश्‍वरीय आज्ञा झाली. तेव्हा इब्राहीम अलै. यांनी आपली प्रिय पत्नी हाजरा अलै. आणि लहान बाळ ईस्माईल अलै. यांना मक्का येथील सफा व मरवा पर्वताच्या मध्ये वाळवंटात सोडून दिले. उतारवयात झालेल्या मुलाविषयी माणसाला किती प्रेम असते याचा अंदाज आपण करू शकतो. असे असतांनाही अल्लाहच्या आदेशाने त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला तेथे सोडले. मुलगा तहान लागल्याने रडू लागला. हाजरा अलै. यांनी कुठला काफिला दिसतो का म्हणून सफा आणि मरवा पर्वतांमध्ये सात फेर्‍या मारल्या. इकडे बाळ आक्रस्ताळपणे रडत-रडत पाय खोरत होते. त्याच्या पायाच्या हालचालीने वाळू सरकू लागली आणि ईश्‍वरकृपेने वाळवंटात पाण्याचा प्रवाह सुरू झाला. ही ईश्‍वरीय लीला होती. आजही त्या ठिकाणी गोड पाण्याचा स्त्रोत अस्तित्वात आहे. त्याला आब-ए-जम-जम असे म्हणतात. आब म्हणजे पाणी जमजम म्हणजे थांब-थांब, असे हाजरा अलै. यांनी म्हटल्याने त्या पाण्याचा प्रवाह एकाच ठिकाणी थांबला. सार्‍या जगातील लोक हजला गेल्यानंतर ते पाणी पितात आणि सोबत घेऊनही जातात. आजही त्या ठिकाणी शक्तीशाली दोन मोटारीने रात्रंदिवस पाण्याचा उपसा केला जातो. परंतु, पाणी संपत नाही. हजारो वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. रूक्ष वाळवंटात ज्या ठिकाणी पाणीच मिळत नाही अशा ठिकाणी गोड्या पाण्याचा एवढा मोठा स्त्रोत हजारो वर्षापासून अखंडपणे प्रवाहित राहणे ही एकच गोष्ट बुद्धीमान व्यक्तीसाठी अल्लाहचे अस्तित्व मान्य करण्यासाठी पुरेशी आहे. 
जगातील प्रमुख तीन संप्रदाय ज्यू, ख्रिश्‍चन आणि मुस्लिम हे इब्राहीम अलै., हाजरा अलै., इस्माईल अलै. सलाम आणि या तिघांच्या जीवन प्रवासावर विश्‍वास ठेवतात. हे तीन्ही संप्रदाय मिळून जगातील दोन तृतीयांश लोक होतात. मात्र अजूनही एक तृतीयांश लोक एक ईश्‍वराच्या संकल्पनेपासून लांब आहेत. त्यांच्यापर्यंत इब्राहीम अलै. यांचा संदेश पोहोचविणे आवश्यक आहे. 
कालांतराने ईश्‍वरीय आदेशाने इब्राहीम अलै. पुन्हा आपल्या परिवारात परत येतात. एव्हाना इस्माईल अलै. सलाम तरूण झालेले असतात. अशा अवस्थेत असतांना सतत तीन दिवस पुन्हा इब्राहीम अलै. यांना स्वप्न पडते की ते इस्माईल अलै. यांची कुर्बानी देत आहेत. प्रेषितांचे स्वप्न हे निव्वळ स्वप्न नसून ईश्‍वरीय मार्गदर्शनाचा एक स्त्रोत असतो. त्यांनी आपल्या या स्वप्नाची कल्पना हाजरा अलै. आणि इस्माईल अलै. सलाम यांना दिली. ते दोघेही कुर्बानी देण्यासाठी तयार झाले. इब्राहीम अलै. सलाम यांची ही शेवटची परीक्षा होती. त्यातही ते उत्तीर्ण झाले. त्यांनी आपल्या मुलाला गावापासून दूर निर्जनस्थळी नेले व आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून इस्माईल अलै. सलाम यांना जमिनीवर पाडून मानेवर सुरी चालविली. मात्र क्षणार्धात ईश्‍वरीय दूत हजरत जिब्राईल अलै. त्या ठिकाणी प्रकट झाले व त्यांनी स्वर्गातील मेंढा आणून इस्माईल अलै. सलाम यांच्या ठिकाणी ठेवला. येणेप्रमाणे इस्माईल अलै. यांच्या ठिकाणी मेंढ्याची कुर्बानी झाली. स्वत:च्या तरूण मुलाची कुर्बानी तेही ईश्‍वरीय आदेशाचे पालन म्हणून देणे हे किती कठीण काम आहे हे, एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेल. इब्राहीम अलै. यांनी ती कुर्बानी दिली. अर्थात डोळ्याची पट्टी सोडल्यानंतर खरा प्रकार त्यांच्या लक्षात आला. मात्र सुरी तर त्यांनी मुलाच्या मानेवरच चालविली होती. ही घटना मानवी इतिहासातील एवढी मोठी घटना ठरली की, प्रलयाच्या दिवसापर्यंत संपूर्ण मुस्लिम समाजातील ऐपतदार लोकांना दरवर्षी त्या घटनेची आठवण रहावी म्हणून जनावर कुर्बान करण्याचा आदेश देण्यात आला. 
म्हणून ईद-उल-अजहा ही आईचा त्याग, वडिलांची कुर्बानी आणि मुलाचे समर्पण या तिन्ही उच्च मानवी मुल्यांचा समुच्चय आहे. इब्राहीम अलै. सलाम हे आयुष्यातील प्रत्येक ईश्‍वरीय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना सार्‍या जगाचे इमाम (नेता) केले जात असल्याची घोषणा अल्लाहने केली. त्यावर इब्राहीम अलै. यांनी हे नेतृत्व त्यांच्या वंशाकडेही राहील का अशी विचारणा केली. तेव्हा उत्तर मिळाले की, तुमच्या वंशामध्ये जर कोणी अत्याचारी निपजला तर त्याला नेतृत्व बहाल करण्यात येणार नाही. 
आज ईब्राहीम अलै. यांचा हा संदेश तसेच कुरआनचा आदेश सार्वजनिक करण्याची आवश्यकता आहे. अल्लाहच्या सोबत कोणालाही सामिल करणे अर्थात शिर्क करणे यापेक्षा मोठा अपराध दूसरा नाही. हे सत्य पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे. वरील प्रमाणे नमूद ईश्‍वरीय आदेश जर का जाणते किंवा अजाणतेपणे आपण मानवजातीपासून लपवत असू तर आपल्यावर ईश्‍वराची अवकृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत जे काही अपराध आपल्याकडून झाले, कुरआनचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यामध्ये आपण गफलत केली, तरी शेवटचा एक मार्ग अजून मोकळा आहे तो म्हणजे तौबा (माफी) मागणे. आपल्या या नाकर्तेपणाची माफी मागून जर का आपण इस्लामचा संदेश जगापर्यंत पोहोचविण्याचा मार्ग पत्करला तर आजही आपल्यावर ईश्‍वरीय कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. अल्लाहने म्हटलेले आहे, मी माफी स्विकारणारा आहे. एवढी संधी असतानांसुद्धा जर आपण ईश्‍वरीय आदेश सर्व मानवजातीपर्यंत पोहोचविण्यामध्ये हयगय केली तर मात्र आपल्यावर ईश्‍वरीय कोप झाल्याशिवाय राहणार नाही. आज मुस्लिम समाजामध्ये या कर्तव्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती बळावते आहे, म्हणून त्यांना चारही बाजूने त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 
इस्लामला स्वत: समजणे आणि दुसर्‍यापर्यंत त्याचा संदेश पोहोचविणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. यापासून सुटका नाही. मला माहित नव्हते, मला कोणी सांगितले नाही, अशा प्रकारची बहानेबाजी करता येणार नाही. केली तरी अल्लाहपुढे चालणार नाही. आज इस्लामसंबंधी कोणतीच गोष्ट लपून राहिलेली नाही. हजारोंच्या संख्येत मुफ्ती, आलीम उपलब्ध आहेत, लाखो पुस्तके उपलब्ध आहेत, कुरआनचे भाषांतरे जवळजवळ प्रत्येक मोठ्या भाषेत झालेली आहेत. इंटरनेटवर इस्लामसंबंधी सर्व बारिक सारीक माहिती अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे, असे असतांना आपण मागे राहिलो तर मात्र आपली काही खैर नाही. 
  इस्लामचा अभ्यास करताना भौतिक शास्त्रांचा अभ्यास करण्यापासून कोणीही रोखलेले नाही. उलट असे ज्ञान हस्तगत करण्यासाठी चीनपर्यंत जाण्याची प्रेरणा स्वत: प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिलेली आहे. तुम्ही दोन्ही विधींमध्ये अभ्यास करून मोठ्या पदावर जावू शकता. एस.पी. बनू शकता, कलेक्टर बनू शकता पण हे कशासाठी बनायचे? तर न्याय करण्यासाठी. याशिवाय, दूसरा तुमचा कुठला उद्देश असता कामा नये. इस्लामची इमारत  न्यायावर उभी आहे. त्यासाठी स्वत: न्यायप्रिय असणे आवश्यक आहे, चारित्र्यवान असणे आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही दुसर्‍यासाठी न्याय करू इच्छिता तेव्हा अगोदर लोक तुमच्याकडे पाहतील, तुम्ही कसे आहात, तुमचा व्यवहार कसा आहे, तुमचे चारित्र्य कसे आहे? याकडे पाहूनच लोक तुमच्याबद्दल मत बनवतील. 
इब्राहीम अलै. हे सगळ्यांचे इमाम आहे. कुरआन सगळ्या जगासाठी आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना काळजी फक्त मुस्लिमांचीच नव्हती त्यांना सगळ्यांची काळजी होती. तीच काळजी आपणासर्वांची असायला हवी, हाच आजच्या ईदुल अजहाचा संदेश आहे. कुर्बानी तर करावीच लागणार आहे. कुर्बानी करण्यापासून कोणत्याही ऐपतदार व्यक्तीची सुटका नाही. कुठलेही कारणं सांगून कुर्बानी टाळता येत नाही. तुम्ही दुसर्‍या तर्फे कुर्बानी देऊ शकत नाही. तुम्हाला स्वत:ला कुर्बानी द्यावी लागेल. कारण त्यामुळे समाजातील अनेक दुर्बल घटकांचा उदा. पशुपालक व गरीबांचा फायदा होतो. 
आपण आपल्या देशाच्या उन्नतीसाठी योगदान देणेही गरजेचे आहे. आपला देश लोकशाहीप्रधान देश आहे. आमचं भाग्य आहे की आम्ही या देशात जन्मलो. या देशाच्या उन्नतीसाठी आमचं मोठं योगदान असलं पाहिजे. सगळ्यांच हित हे आमचं हित आहे. जनकल्याणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करणं हे जरी अवघड असलं तरी यासाठी आम्ही स्वत:ला झोकून देऊन आमच्या आशा, आकांक्षाची कुर्बानी देत कार्य केलं तर नक्कीच आम्ही प्रगतीपथावर जाऊ शकू, सगळ्यांची मनं जिंकू शकू. आपसातील भेदभाव मिटविण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आमच्या देशाचं ब्रिदच ’सत्यमेव जयते’ हे आहे. म्हणजेच सत्यच विजयी होणार. देशात स्वच्छ भारत अभियान राबविलं जातंय. इस्लामच सांगणंच आहे की, ’पाकी आधा ईमान है’ याचा अर्थच स्वच्छता हे आमचं ईमान आहे, त्यासाठी आम्ही आपलं घर, परिसर, शहर, राज्य, देश स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करावा. याकामी सर्व मुस्लिम बांधवांनी स्वतला झोकून द्यावे. धार्मिक शिक्षणाबरोबरोच आधुनिक शिक्षणही घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 
केरळ हे राज्य सर्वांच्या मदतीला धावते. जेथे जेथे आजपर्यंत आपत्ती आली केरळवासियांनी मदतीसाठी सर्वात अधिक योगदान दिले. ते मोठ्या मयाळू प्रवृत्तीचे लोक आहेत. आज ते नैसर्गिक संकटात सापडलेले आहेत. आता आपली जबाबदारी आहे की आपण सर्वांनी आपसातील मतभेद विसरून त्यांच्या मदतीला धावले पाहिजे, शेवटी असे आवाहनही तौफिक असलम खान यांनी केले.

माननीय अबू बक्र सिद्दीक (रजि.) यांचे पुत्र अब्दुर्रहमान यांच्या कथनानुसार,
सुफ्फावाले गरीब लोक होते. एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याच्या घरात दोन मनुष्यांचे अन्न आहे त्याने येथून तिसऱ्याला घेऊन जावे आणि ज्याच्याजवळ चार  मनुष्यांचे अन्न आहे त्याने एक अथवा दोन मनुष्यांना घेऊन जावे.’’
तेव्हा माझ्या वडिलांनी (अबू बक्र (रजि.) यांनी) आपल्या घरी तीन लोकांना आणले आणि पैगंबरांनी आपल्या घरात दहा लोकांना नेले. (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण : 
पैगंबर मुहम्मद (स.) लोकांचे नेता व सेनापती होते. जर त्यांनी त्यांच्या घरी दहा लोकांना घेऊन गेले नसते तर सर्वसामान्य लोक दोन, चार, सहा आणि आठ लोकांना  आनंदाने का घेऊन जातील. कायद्यानुसार जबाबदार लोकांनी त्याग व बलिदान केले तर त्याच्या मागे चालणाऱ्यांमध्ये अधिकाधिक त्याग व बलिदानाची भावना उद्दिपित होईल आणि  पुढे चालणारेच जर मागे राहिले तर मागे चालणाऱ्यांमध्ये आणखीन मागे जाण्याच्या भावनेस चालना मिळेल.
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, इस्लामकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने पैगंबर मुहम्मद (स.) लोकांना देत होते. पैगंबरांना जे काही मागण्यात आले, त्यांनी मागणाऱ्याला  ती वस्तू अवश्य दिली. एकदा एक मनुष्य पैगंबरांकडे आला तेव्हा पैगंबरांनी त्याला दोन टेकड्यांदरम्यान चरणाऱ्या सर्व शेळ्या देऊन टाकल्या. तो मनुष्य आपल्या कबिल्यात गेला आणि  म्हणाला, ‘‘हे लोकहो! इस्लामचा स्वीकार करा कारण दारिद्र्य व उपासमारीला न घाबरणाऱ्या मनुष्यासारखे मुहम्मद (स.) देतात.’’
कथनकार (माननीय अन रजि.) पुढे म्हणतात की मनुष्य फक्त जगाच्या इच्छेपोटी ईमान बाळगतो, परंतु अधिक काळ लोटला नाही तोच इस्लाम त्याच्या आत्म्यामध्ये पैगंबरांच्या  शिक्षण व प्रशिक्षणाद्वारे प्रवेश करतो आणि जग व जगातील साधनसामुग्रीपासून इस्लामच्या दृष्टीने अधिक प्रिय बनतो. (हदीस : मुस्लिम)
माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या कथनानुसार,
एका ‘नबी’ (पैगंबर)चा परिचय करून देताना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ते दृष्य माझ्या डोळ्यांसमोर आहे.’’ पैगंबर पुढे म्हणाले, ‘‘धर्माचा प्रसार (आवाहन) करण्याच्या अपराधापोटी त्या ‘नबी’च्या समुदायातील लोकांनी त्यांना इतके मारले की ते रक्तबंबाळ केले आणि ‘नबी’ची स्थिती अशी होती की त्यांनी आपल्या चेहऱ्यावरील रक्त पुसत पुसत  म्हणायचे की हे अल्लाह! माझ्या समुदायाचा हा अपराध क्षमा कर. (आणि आता यांच्यावर प्रकोप कोसळवू नकोस.) कारण हे लोक अज्ञान आहेत, सत्य स्थिती जाणत नाहीत.’’ (हदीस  : बुखारी) 

"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे''

१. अल्‌फातिहा

परिचय
शीर्षक :
या प्रथम सूरहचे (अध्याय) नाव "अल्‌फातिहा' त्यातील तपशीलाच्या अनुषंगाने आलेले आहे. "फातिहा' एखाद्या कार्याच्या शुभारंभाला अथवा ग्रंथाच्या प्रारंभाला म्हटले जाते. दुसऱ्या शब्दांत यास ग्रंथाचा प्रारंभ (प्रस्तावना) म्हटले जाते.
अवतरण काळ :
कुरआनचा हा सूरह (अध्याय) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाच्या प्रारंभकाळात अवतरित झालेला आहे. विश्वसनीय सूत्रांद्वारे स्पष्ट होते की पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर  सर्वप्रथम पूर्णरुपेण अवतरित अध्याय हाच आहे. या अगोदर फक्त वेगवेगळी वचने (आयत) अवतरित झाली होती जे अध्याय "अलक', "मुजम्मिल' आणि "मुदस्सिर' यात समाविष्ट आहेत.
विषय :
खरे तर हा अध्याय एक प्रार्थना आहे. ही प्रार्थना अल्लाहने त्या प्रत्येक मनुष्याला शिकविली आहे जो दिव्य कुरआन अध्ययन प्रारंभ करतो आहे. दिव्य कुरआनच्या प्रारंभी या सूरहला (अध्यायाला) निश्चित करण्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही या ग्रंथापासून लाभ घेऊ इच्छिता तर सर्वप्रथम अल्लाहशी ही प्रार्थना करा. स्वभावत: मनुष्य प्रार्थना त्या गोष्टीसाठी करतो जिला प्राप्त करण्याची त्याची मनोमन इच्छा असते आणि त्याच विभूतिकडे करतो जिच्याकडून आपल्या अपेक्षेची परिपूर्त होण्याची त्याला खात्री असते. कुरआनने प्रारंभी या प्रार्थनेची शिकवण देऊन मनुष्याला जणूकाही सावध केले आहे की सत्य जाणून घेण्यासाठीच सत्यशोधक वृत्तीने या ग्रंथाचे पठण करावे. प्रथमत: मनुष्याने याची खूणगाठ मनात बांधून घेतली पाहिजे की ज्ञानाचा मूळस्त्रोत एकमेव अल्लाह आहे. म्हणून मार्गदर्शनासाठी अल्लाहजवळ प्रार्थना करूनच दिव्य कुरआन अध्ययन करावे.
या विषयावरून हेच सिद्ध होते की दिव्य कुरआन आणि सूरह अल्‌फातिहा या दोहोंतील वास्तविक संबंध ग्रंथ आणि त्याच्या प्रस्तावनेचा प्रथम सूरह (अध्याय) नसून एक प्रार्थना आणि प्रार्थनेला दिलेल्या उत्तरासमान आहे. "सूरह अल्‌फातिहा' ईशदासाने केलेली एक प्रार्थना आहे आणि प्रार्थनेचे अल्लाहाने दिलेले उत्तर म्हणजेच दिव्य कुरआन आहे. दास प्रार्थना करतो, "हे अल्लाह, तू माझे मार्गदर्शन कर.' उत्तरादाखल अल्लाह पूर्ण कुरआन दासापुढे ठेवतो आणि सचेत करतो, ""हाच तो सरळ मार्ग आणि मार्गदर्शन आहे ज्यासाठी तू माझ्याजवळ प्रार्थना केली आहेस.''

[next]
page २

१. अल्‌फातिहा

(मक्काकालीन, एकूण ७ आयती)

अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.१
(१) स्तवन फक्त अल्लाहसाठीच आहे२ जो सर्व सृष्टीचा रब (पालनकर्ता)३ आहे. (२) एकमात्र असीम करुणामय आणि परम दयावंत,४ (३) निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहे.५१) इस्लाम मनुष्याला ज्या संस्कृतीचे धडे देतो त्यापैकी एक नियम हासुद्धा आहे की, मनुष्याने आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात अल्लाहच्या नावाने करावी.
२) हा अध्याय एक प्रार्थना आहे. मात्र ही प्रार्थना त्या अस्तित्वाचे स्तुतीगान करून होत आहे ज्याच्याकडे मनुष्य याचना करीत आहे. प्रार्थना करण्याच्या योग्य पद्धतीचीच ही शिकवण आहे. म्हणजे ज्याच्याशी प्रार्थना केली जात आहे त्याची सर्वप्रथम स्तुती आणि प्रशंसा केली जावी. त्याचे गुण, कृपा आणि श्रेष्‌ठत्व स्वीकार करावे. ""स्तुती तर फक्त अल्लाहसाठीच आहे'' असे सांगून एक मोठे वास्तव स्पष्ट करण्यात आले आहे. जगात कुठेही आणि कोणत्याही स्वरूपात सौंदर्य दिसते व श्रेष्ठत्व व प्रभुत्वाची प्रचिती होते; त्या सर्वांचा मूळस्त्रोत अल्लाह आहे. म्हणूनच प्रशंसा आणि स्तुतीला पात्र तोच निर्माता आहे, निर्मिती मुळीच पात्र नव्हे. सामर्थ्य व श्रेष्ठत्व प्रदान करणारा अल्लाह स्तुतीला पात्र आहे.
३) "रब' हा शब्द प्रयोग अरबी भाषेत तीन अर्थाने प्रयुक्त आहे. १) मालक व स्वामी २) पालनपोषण, खबरगिरी व देखभाल करणारा, ३) शासक, प्रशासक, स्वामी, व्यवस्थापक. अल्लाह या सर्व अर्थाने सृष्टीचा "रब' आहे.
४) अल्लाहचे स्तुतीगान करताना "रहमान' (परम कृपाळू) यानंतर पुन: रहीम (परम दयाळू) या शब्दाचा प्रयोग यासाठी केला आहे की, अल्लाहची कृपा अनंत आहे. दया असीम आहे.
५) अल्लाहचे स्तुतीगान असीम दयाळु व कृपाळु असे केल्यानंतर अल्लाह न्याय-निवाड्याच्या (अंतिम) दिवसाचा स्वामी आहे, असे म्हटले गेले आहे. यावरून हेच स्पष्ट होते की अल्लाह फक्त दयाळू व कृपाळूच नाही तर तो न्यायीसुद्धा आहे. न्याय देणारासुद्धा असा की अंतिमदिनी न्याय-निवाडा करण्याचा पूर्ण अधिकार त्याच्याच हातात असेल. म्हणून आम्ही अल्लाहशी फक्त प्रेमच करीत नाही तर त्याच्या न्यायी गुणवैशिष्ट्यांमुळे  त्याचे  भय बाळगून आहोत.

[next]
(४) आम्ही तुझीच इबादत (उपासना)६ करतो आणि तुजपाशीच मदत मागतो.७
(५) आम्हाला सरळ मार्ग दाखव.८ (६) त्या लोकांचा मार्ग ज्यांना तू अनुग्रहित केलेस.९ (७) जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत.१०
६) "इबादत' (उपासना, भक्ती) हा शब्दसुद्धा अरबी भाषेत तीन अर्थाने प्रयोग केला जातो.                 १) उपासना, पुजाअर्चा, २) आज्ञापालन, ३) दास्यत्व व गुलामी. येथे हे तिन्ही अर्थ अपेक्षित आहेत. म्हणजे आम्ही तुझे उपासक, आज्ञाधारक आणि गुलामसुद्धा आहोत.
७) म्हणजे आम्ही आमच्या गरजपूर्तसाठी तुझ्याकडेच रुजू होतो. केवळ तुझ्याच मदतीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. याच कारणास्तव आम्ही विनंतीसह तुझ्या सेवेत हजर होत आहोत.
८) म्हणजे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आचार, विचार व वागणुकीचा असा मार्ग आम्हाला दाखव जो निव्‌वळ सत्य असावा. ज्यावर चालून आम्ही आमच्या जीवनात वास्तविक सफलता आणि सौभाग्य प्राप्त करू शकावे.
९) हा तो सरळ मार्ग आहे ज्याचे ज्ञान आम्ही अल्लाहजवळ मागत आहोत. तो सरळ मार्ग जो  तुझ्या प्रियजनांनी अंगीकारला आहे.
१०) "अनुग्रह' म्हणजे खरी आणि शाश्वत कृपा आहे जी सरळ मार्गावर चालून आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करूनच मनुष्याला मिळते. तो क्षणिक आणि दिखाव्याचा अनुग्रह नव्हे जो मार्गभ्रष्ट लोकांना जगात मिळतो आणि पूर्व फिरऔन, नमरूद आणि कारूनसारख्या अनेक अत्याचारींना मिळाले आहेत आणि आजही आमच्या डोळ्यांदेखत मोठमोठ्या अत्याचारींना, दुष्टांना आणि मार्गभ्रष्ट लोकांना मिळत आहेत.

[next]

page ४

"अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे''

२. अल्‌बकरा

परिचय
शीर्षक :
या अध्यायाचे नाव "बकरा' यासाठी आहे की यात एके ठिकाणी गाईचा (बकरा) उल्लेख आला आहे. "बकरा'चा अर्थ होतो गाय. दिव्य कुरआनच्या प्रत्येक अध्यायात (सूरह) अनेक विषय आल्यामुळे त्या प्रत्येकाचे विषयानुरूप नामकरण अशक्य आहे. यासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहच्या मार्गदर्शनात कुरआनच्या बहुतेक अध्यायासाठी (सूरह) विषयानुसार शीर्षक देण्याऐवजी प्रतिकात्मक नावे निश्चित केली आहेत ज्यामुळे अध्याय ओळखले जाते. या अध्यायाला (सूरह) "बकरा' हे नाव देण्याचा अर्थ हा मुळीच नाही की यात गाईविषयी तपशील आला आहे तर फक्त हाच अर्थ आहे की तो सूरह (अध्याय) ज्यात गाईचा उल्लेख आला आहे.
अवतरण काळ :
या अध्यायाचा (सूरह) बहुतांश भाग मदिनेला हिजरत (स्थलांतर) केल्यानंतर "मदनीकाळा'च्या प्रारंभी अवतरित झाला आणि कमी भाग नंतर अवतरित झालेला आहे. परंतु विषयानुकूल यात समाविष्ट केला आहे.
पार्श्वभूमी :
या अध्यायाला समजून घेण्यासाठी प्रथमत: याची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे.
१) "हिजरत'पूर्व मक्का शहरात इस्लामचे आवाहन प्रामुख्याने अरब अनेकेश्वरवादी लोकांसाठी होते. हे आवाहन त्या लोकांसाठी नवीन व अनोळखी असे होते. हिजरतनंतर आता संबंध यहुदी लोकांशी आला. हे यहुदी लोक एकेश्वरत्व, प्रेषित्व, परलोकत्व, दिव्यप्रकटन, फरिश्ते आणि ईशग्रंथाशी परिचित होते. तत्वत: त्यांचा दीन (धर्म) इस्लामच होता ज्याची शिकवण पैगंबर मुहम्मद (स.) देत होते. परंतु शतकानुशतकात झालेल्या फेरबदलाने व विकृतीने त्या लोकांना खऱ्या धर्मापासून फार दूर हाकलून दिले होते. तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) मदीना येथे आल्यानंतर अल्लाहने आदेश दिला की त्यांना (यहुद्यांना) सत्यधर्माचे (इस्लामचे) आवाहन द्या. म्हणून या अध्यायातील प्रारंभीच्या एकशे एक्केचाळीस (१४१) आयती या विषयाशी निगडीत आहेत.
२) मदीना येथे पोहचल्यानंतर "इस्लामी आंदोलन' एका नव्या स्थितीला सामोरे जात होते. मक्केतील कार्य फक्त इस्लामी मूलतत्वांचा प्रचार आणि नवमुस्लिमांचे नैतिक प्रशिक्षणापुरतेच

[next]

मर्यादित होते. परंतु हिजरतनंतर मदीना शहरात एका लहानशा स्वरुपातील "इस्लामी शासन' प्रणालीचा पाया घातला गेला. तेव्हा अल्लाहने सभ्यता, संस्कृती, कौटुंबिक, कायदेविषयक, सामाजिक, आर्थिक आणि राज्य व्यवस्थेसंबंधी मूलभूत मार्गदर्शन अवतरित करण्यास प्रारंभ केला. अल्लाहने दाखवून दिले की जगात इस्लामी मूलतत्वांच्या आधारे एक आदर्श जीवनप्रणाली कशी स्थापित करावी. हा अध्याय आयत क्रमांक १४२ पासून ते शेवटपर्यंत याच विषयाला वाहिलेला आहे.
३) हिजरतपूर्व "इस्लामी आवाहन' अनेकेश्वरवादी मक्कावासीयांना दिले जात होते. त्यांच्यापैकी जे कोणी इस्लामचा स्वीकार करीत असत ते स्वत: आपल्या कुवतीने आपल्या ठिकाणी इस्लाम प्रसारकार्य करीत असत. यास्तव प्रसंगी त्यांना भयानक अत्याचारांना सामोरे जावे लागत असे. परंतु हे विखुरलेले मुस्लिम हिजरतनंतर मदीना येथे एक समुदाय बनले तेव्हा त्यांनी एक लहानसे स्वतंत्र इस्लामी राज्य स्थापन केले. तेव्हा अशी स्थिती निर्माण झाली होती की एकीकडे लहानसी इस्लामी वस्ती आणि दुसरीकडे तिला नष्ट करण्यासाठी तुटून पडलेले समस्त अरब विश्व! आता या मूठभर लोकांच्या यशप्राप्तीचाच नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न यावर आधारित होता की त्यांनी आपल्या सर्वशक्तीनिशी प्रथमत: इस्लामचा प्रचार करून जास्तीतजास्त लोकांना आपल्या विचारांना मानणारे बनवावेत. दुसरे, विरोधक असत्यावर आहेत हे प्रमाणित आणि पुर्णत: स्पष्ट करावे की कोणत्याही विचारी व्यक्तीला त्यात शंका राहू नये. तिसरे, ज्या संकटात ते चोहोकडून घेरले गेले होते त्यात हताश न होता संपूर्ण धैर्याने आणि दृढतेने या स्थितीचा मुकाबला करावा. चौथे, या इस्लामी आंदोलनाला नेस्तानाबूत करण्यासाठी उभ्या ठाकलेल्या सशक्त शक्ती¨चा मुकाबला करण्यासाठी सर्वशक्तीनिशी व सशस्त्र सिद्ध व्हावे. पाचवे, त्यांच्यात (मुस्लिमांत) एवढे साहस निर्माण केले जावे की विरोधकांनी इस्लामच्या नवीन व्यवस्थेच्या अधिपत्याला समजाविण्याने स्वीकारत नसतील तर त्यांच्या रानटी, अन्यायी व दूषित व्यवस्थेला बळपूर्वक नष्ट करण्यातही त्यांना संकोच वाटू नये. अल्लाहने या अध्यायात या पाचही बाबीविषयी आरंभिक उपदेश केला आहे.
४) इस्लामी आंदोलनाच्या या टप्प्यात दांभिकांचा एक नवीन उपद्‌व्याप डोके वर काढू लागला होता. हा उपद्‌व्याप मक्केच्या शेवटच्या टप्प्यातच दिसू लागला होता. मात्र मक्केतील दांभिक इस्लामच्या सत्यतेला मानत होते आणि श्रद्धाही ठेवत असत. परंतु त्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार नव्हते. मदीनेत मात्र या दांभिकांव्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे दांभिकही निर्माण झाले. म्हणूनच या दांभिकांबद्दलही योग्य ते आदेश येणे आवश्यक होते.
सूरह (अध्याय) "बकरा' अवतरण होताना या विविध दांभिकांच्या प्रादुर्भावाला केवळ सुरवातच झाली होती म्हणून याविषयी अल्लाहने संक्षिप्त मार्गदर्शन केले. मात्र नंतरच्या काळात जसजसे त्यांचे अवगुण आणि उपद्‌व्याप समोर येत गेले तसतसे त्या अनुषंगाने नंतरच्या अध्यायांत सविस्तर मार्गदर्शन केले गेले.

[next]

page ६

२. अल्‌बकरा

(मदीनाकालीन, एकूण २८६ आयती)अल्लाहच्या नावाने, जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे.
(१) अलीफ लाऽऽम मीऽऽम.१ (२) हा अल्लाहचा ग्रंथ आहे. यात काही संशय नाही.२ मार्गदर्शन आहे अल्लाहचे भय बाळगणाऱ्या त्या लोकांसाठी३ (३) जे परोक्षवर श्रद्धा४ ठेवतात, नमाज कायम करतात५ आणि जी
१) अशाप्रकारचे विलग शब्द (मुकत्तआत) कुरआनच्या काही अध्यायांच्या सरुवातीला सापडतात. ज्या काळात दिव्य कुरआनचे अवतरण झाले त्या काळात ही शैली प्रचलित होती. त्यामुळे लोक जाणत असत की या शब्दांचा अर्थ कोणता आहे. परंतु पुढे असा शब्दप्रयोग होणे बंद झाले. परिणामी या विलग शब्दांचा अर्थ निश्चित करणे भाष्यकारांसाठी कठीण झाले. परंतु हे स्पष्ट आहे की, कुरआनपासून मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी अशा विलग शब्दप्रयोगांचा अर्थ जाणणे मुळीच आवश्यक नाही.
२) याचा एक सरळ सोपा अर्थ हा आहे, ""नि:संशय हा अल्लाहचा ग्रंथ आहे'' परंतु दुसरा अर्थ हासुद्धा होतो की हा असा ग्रंथ आहे ज्यात शंकेला अजिबात वाव नाही आणि सत्याधिष्ठित आहे. कारण याचा लेखक (निर्माता) तो आहे जो पूर्ण वास्तवतेची जाण ठेवून आहे. म्हणून यात शंकेला काहीच जागा शिल्लक राहत नाही.
३) हा ग्रंथ तर पूर्ण मार्गदर्शन आहे. परंतु यापासून लाभान्वित होण्यासाठी मनुष्यामध्ये काही गुण असणे आवश्यक आहे. त्यापैकी सर्वप्रथम अट म्हणजे मनुष्य अल्लाहचे भय बाळगणारा असणे आवश्यक आहे, मनुष्याने दुराचारापासून अलिप्त असावे आणि सदाचाराची त्याला मनापासून आवड असली पाहिजे.
४) मनुष्याने परोक्षवर (गैब) विश्वास ठेवणे आवश्यक आहे. ही कुरआनपासून लाभान्वित होण्यासाठी दुसरी अट आहे. परोक्षाने अभिप्रेत त्या वास्तविक गोष्टी आहेत ज्या माणसाच्या आकलनापलीकडे आहेत आणि कधीही सर्वसामान्यांच्या प्रत्यक्ष अनुभवात व दृष्टिक्षेपात येत नाहीत. जे वास्तव मनुष्याच्या ज्ञानापलीकडचे आहे त्याला परोक्ष म्हटले जाते. उदा. अल्लाहचे अस्तित्व व त्याचे गुणवैशिष्ट्ये, फरिश्ते, दिव्य प्रकटन (वही), स्वर्ग (जन्नत) व नरक (जहन्नम)इ. या वास्तवांना न पाहता त्यावरश्रद्धा ठेवणे आणि यास्तव विश्वास ठेवणे की, पैगंबर त्यांची माहिती देत आहे. यालाच परोक्षवर विश्वास ठेवणे म्हणतात. या आयतीचा अर्थ, जी व्यक्ती पैगंबर देत असलेल्या या परोक्षाच्या ज्ञानावर श्रद्धा ठेवून आहे; तीच व्यक्ती दिव्य कुरआनपासून मार्गदर्शन प्राप्त करू शकते. राहिला प्रश्न त्याचा जो मानण्यासाठी दिसण्याची, चवीची आणि गंध होण्याची अट लावतो, असा मनुष्य या ग्रंथापासून काहीएक मार्गदर्शन प्राप्त करू शकत नाही.

[next]
उपजीविका आम्ही त्यांना दिली आहे तिच्यामधून खर्च करतात६ (४) जो ग्रंथ (हे मुहम्मद स.) तुमच्यावर अवतरला आहे (अर्थात कुरआन) आणि जे (ग्रंथ) तुमच्या पूर्वी अवतरले गेले होते त्या सर्वांवर (देखील) जे श्रद्धा ठेवतात७ आणि परलोक जीवनावर दृढ विश्वास ठेवतात.८ (५) असेच लोक आपल्या पालनकर्त्याकडून सन्मार्गावर आहेत आणि तेच सफल होणारे आहेत.
५) ही तिसरी अट आहे. ती म्हणजे मनुष्याने ईमान धारण केलानंतर त्वरित व्यावहारिक स्वरुपात. आज्ञापालनार्थ प्रत्यक्ष आचरण करण्याला तयार व्हावे आणि या आचरणाची (व्यावहारिक आज्ञापालन) सर्वप्रथम आणि शाश्वत लक्षण "नमाज' आहे. एखादी व्यक्ती इमानचा दावा तर करत आहे, परंतु मोअज्जिनच्या (अजान देणारा) अजानला प्रतिसाद देत नाही तर ही व्यक्ती आज्ञाधारक सिद्ध होत नाही. नमाज कायम करणे हा एक व्यापक पारिभाषिक शब्द आहे. याचा अर्थ म्हणजे एकट्याने वैयक्तिकपणे नेहमी नमाज अदा करणे नव्हे तर सामुदायिकरित्या विधिवत नमाजची कायमस्वरूपी व्यवस्था स्थापित होणे आहे.
६) कुरआनच्या मार्गदर्शनाचा लाभ उठविण्यासाठी ही चौथी अट आहे. ती म्हणजे मनुष्य संकुचित मनाचा नसावा की तो धनपूजकही नसावा. त्याच्या मिळकतीत अल्लाह आणि दास यांचा  हक्क निश्चित केले जावे व तो देण्यास मनुष्याने तत्पर राहावे.
७) ही पाचवी अट आहे की मनुष्याने त्या सर्व ईशग्रंथंावर विश्वास ठेवला पाहिजे जे दिव्य प्रकटनाद्वारे पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या पूवvच्या पैगंबरांवरकालपरत्वे विभिन्न देशांत अवतरित झाले होते. या अटीवर कुरआन मार्गदर्शनाचे द्वार त्या सर्व लोकांसाठी बंद आहे, ज्यांना मूळत: ईशमार्गदर्शनाची गरजच भासत नाही किंवा ही गरज मान्य करतात परंतु ईशमार्गदर्शनासाठी दिव्य प्रकटन आणि पैगंबरत्वाला ते आवश्यक समजत नाहीत किंवा स्वयंम एखादी विचारसरणी निश्चित करून तिलाच ईशमार्गदर्शन समजून बसतात. ते त्याच ग्रंथ किंवा ग्रंथाचे समर्थक आहेत, ज्यांना त्यांचे वाडवडील मानत आले आहेत, त्याच ग्रंथांवर ते विश्वास ठेवतात. ईशग्रंथांनासुद्धा मानतात परंतु त्याच स्त्रोताच्या इतर ग्रंथांना ते मान्य करीत नाहीत.
८) ही सहावी आणि शेवटची अट आहे. परलोक (आखिरत) एक व्यापक शब्द असून ज्याचा संबंध खालील श्रद्धांविषयी आहे. १) मनुष्य या जगात बेजबाबदार नाही तर आपल्या प्रत्येक कृत्यासाठी तो अल्लाहसमोर उत्तरदायी आहे. २) ही प्रचलित विश्व व्यवस्था शाश्वत नाही. एका निश्चित समयी ज्याला फक्त अल्लाहच जाणतो हे विश्व नष्ट पावणार आहे. ३) या विश्वाच्या समाप्तीनंतर अल्लाह एक नवे विश्व  निर्माण  करील  आणि आदिपासून कयामतपर्यंत जमिनीवर निर्मित सर्व मानवांना  अल्लाह

[next]
(६) ज्या लोकांनी (या गोष्टींचा स्वीकार करण्यास) नकार दिला,९ त्यांच्यासाठी सर्वकाही समान आहे, तुम्ही त्यांना सावध करा अथवा करू नका, ते कदापि मानणार (श्रद्धा ठेवणार) नाहीत. (७) अल्लाहने त्यांच्या हृदयांवर आणि त्यांच्या कानांवर मुहर लावली आहे१० व डोळ्यांवर पडदा पडलेला आहे. (त्यामुळे) त्यांना कठोर शिक्षा आहे.
(८) काही लोक असे आहेत जे सांगतात की आम्ही अल्लाहवर आणि अंतिम न्यायदिनावर श्रद्धा ठेवतो. वास्तविक ते ईमानधारक नाहीत. (९) ते अल्लाह आणि ईमानधारकांची फसवणूक करीत आहेत. वस्तुतः ते स्वतःचीच फसवणूक  करीत  आहेत.
पुन्हा एकाच वेळी जिवंत करील.  समस्त  मावनजातीला  एकत्रित  करून  प्रत्येकाच्या  कर्मांचा  हिशेब घेईल आणि प्रत्येकाला त्याच्या कार्यांचा पुरेपूर मोबदला दिला जाईल. ४) अल्लाहच्या या निर्णयानुसार जे लोक सदाचारी सिद्ध होतील ते स्वर्गात (जन्नत) जातील आणि जे लोक दुराचारी (पापी) सिद्ध होतील त्यांना नरकात (जहन्नम)टाकले जाईल. ५) सफलता आणि असफलतेचे मापदंड या जगातील खुशहाली अथवा हालअपेष्टा नाहीत. वास्तविकत: सफल मनुष्य तो आहे, ज्याला न्यायनिवाड्याच्या अंतिमदिनी अल्लाहच्या न्यायालयात यश प्राप्त होईल. असफल तो मनुष्य आहे जो तिथे अयशस्वी ठरेल. या सर्व मौलिक धारणांवर (सत्यतेवर) ज्यांचा विश्वास नाही त्यांना दिव्य कुरआनातून मार्गदर्शन लाभणे शक्य नाही.
९) म्हणजे वरील सहा अटी पूर्ण न करता अथवा त्या सर्व अटींना अथवा त्यांच्यापैकी एकही अट मान्य न करणे.
१०) याचा अर्थ असा होत नाही की अल्लाहने मुहर (सील) लावली म्हणून त्यांनी मान्य करण्यास नकार दिला, तर अर्थ असा आहे की जेव्हा त्यांनी या मूलभूत तत्वांना मान्य करण्यास नकार दिला आणि कुरआनने दाखविलेल्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग अवलंबला तेव्हा अल्लाहने अशा लोकांच्या मनावर, कानावर सील ठोकून दिले.

[next]परंतु  त्यांना  त्याची  जाण  नाही.११ (१०) त्यांच्या हृदयात विकृती (आजार) आहे. ज्याला अल्लाहने अधिक वाढू दिली आहे१२ आणि जे काही खोटे ते बोलताहेत त्याबद्दल त्यांना यातनामय शिक्षा आहे. (११) जेव्हा त्यांना सांगितले जाते की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका तेव्हा ते म्हणतात की, ‘‘आम्ही तर सुधारणा करणारे आहोत!’’ (१२) सावधान! हेच लोक उपद्रवी आहेत, परंतु त्यांना त्याची जाणीव नाही. (१३) आणि जेव्हा त्यांना सांगितले गेले की, ‘‘ज्याप्रमाणे इतरांनी श्रद्धा ठेवली त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा श्रद्धा ठेवा.’’१३ तेव्हा ते म्हणाले, ‘‘काय, आम्ही मूर्खासारखी श्रद्धा ठेवावी१४? सावधान! हेच लोक मूर्ख आहेत, परंतु त्यांना त्याचे ज्ञान नाही. (१४) जेव्हा ते श्रद्धावंतांना
११) ते स्वत:ला या गैरसमजूतीत गुरफटून घेत आहेत की त्यांची ही दांभिक विचारसरणी त्यांच्यासाठी लाभकारक ठरेल. खरेतर प्रत्यक्षात जगातसुद्धा यामुळे त्यांना नुकसान पोहचेल आणि मरणोत्तर जीवनातसुद्धा. जगात असा दांभिक मनुष्य काही काळ लोकांना धोका देऊ शकतो, परंतु तो नेहमी असे करू शकत नाही. शेवटी त्याच्या दांभिकतेचा पर्दाफाश होतोच आणि तेव्हा समाजात अशा व्यक्तीची पत राहात नाही. परलोकातसुद्धा अशा दांभिकांच्या श्रद्धेचा तोंडी दावा काहीच कामी येणार नाही. आचरण त्याविरुद्ध असेल तर ती व्यक्ती तिथे असफल ठरते.
१२) आजारपणाचा अर्थ दांभिकतेचा आजार आहे. अल्लाहद्वारा या आजारात वाढ करण्याचा अर्थ असा आहे की अल्लाह दांभिकांना त्यांच्या दांभिकतेची व विद्रोहाची शिक्षा लगेच देत नाही, तर त्यांना या कामी ढील देतो. परिणामस्वरूप दांभिक आपल्या चालींना यशस्वी होताना पाहून आणखीन जास्त दांभिक बनतात.
१३) म्हणजे तुमच्या समाजाचे दुसरे लोक मनापासून आणि स्वखुशीने आज्ञाधारक (मुस्लिम) बनलेले आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही जर इस्लाम स्वीकारत असाल तर मनापासून इस्लामचा स्वीकार करा.
१४) ते अशा लोकांना मुर्ख समजत होते जे खरोखर इस्लाम कबूल करून स्वत:ला अडचणीत, संकटात व धोक्यात टाकत होते. त्यांना हा मूर्खपणा वाटत होता की फक्त सत्य व खऱ्यासाठी संपूर्ण समाजाचे आणि राष्ट्राचे शत्रुत्व विकत घ्यावे. बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ ही होती की मनुष्याने सत्य आणि असत्याच्या विवादात पडू नये तर प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थ पाहावा.

[next]भेटतात तेव्हा म्हणतात, ‘‘आम्हीही श्रद्धा ठेवली आहे’’ पण जेव्हा ते एकटे आपल्या शैतानांना१५ भेटतात तेव्हा म्हणतात, ‘‘आम्ही तर तुमच्याच बरोबर आहोत आणि या लोकांची थट्टा करीत आहोत. (१५) (वास्तविक) अल्लाहच त्यांची थट्टा करीत आहे. त्यांना त्यांच्या बंडखोरीमध्येच राहू देत आहे. (त्यामुळे) ते या बंडखोरीमध्ये असेच भरकटत चालले आहेत. (१६) हेच ते लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शनाच्याऐवजी मार्गभ्रष्टता खरेदी केली आहे. परंतु त्यांच्या या व्यवहारामध्ये न त्यांना फायदा झाला न ते सन्मार्गावर आहेत. (१७) त्यांचे उदाहरण असे आहे जसे एखाद्या व्यक्तीने अग्नी प्रज्वलित करावा, त्यामुळे सर्व परिसर प्रकाशमान व्हावा आणि (त्याचवेळी) अल्लाहने यांची दृष्टी हिरावून घ्यावी व याना अशा अवस्थेत सोडावे की अंधारात यांना काहीही दिसू नये.१६ (१८) हे बहिरे, मुके (व) आंधळे आहेत.१७ तेव्हा हे मागे परतणार नाहीत.
१५) अरबी भाषेत शैतान शब्द अहंकारी, उदंड आणि मर्यादाभंग करणाऱ्यासाठी वापरला जातो."शैतान' हा शब्द मनुष्य आणि जिन्न या दोहोंसाठी उपयोगात आणला जातो. कुरआनमध्ये हा शब्द जास्त करून शैतान जिन्नसाठी वापरला जातो. परंतु काही ठिकाणी शैतानी गुण असलेल्या माणसासाठीसुद्धा वापरला गेला आहे. संदर्भ व प्रसंग पाहुन कुठे हा शब्द शैतान, जिन्न अथवा मनुष्यासाठी वापरला हे स्पष्ट होते. येथे शैतान हा शब्द मोठमोठ्या सरदारांसाठी (पुढाऱ्यांसाठी) वापरला गेला आहे. हेच लोक त्यावेळी इस्लामच्या विरोधात पुढे पुढे नेतृत्व करीत होते.
१६) अर्थ हा आहे की अल्लाहच्या एका दासाने प्रकाश प्रसारित केला आणि सत्याला असत्यापासून, खऱ्याला खोट्यापासून तसेच मार्गदर्शनाला पथ भ्रष्टतेपासून स्पष्टत: विलग केले. म्हणून जे लोक डोळस होते, त्यांना तर सत्य कळून चुकले. परंतु हे दांभिक जे आपल्या इच्छा-आकांक्षेच्या मागे लागून अंध बनले त्यामुळे त्यांना त्या प्रकाशात काहीच दिसले नाही. "अल्लाहने त्यांची दृष्टी हिरावून घेतली.' या वाक्याने कोणी हा गैरसमज करून घेऊ नये की अंधारात भटकत राहण्यासाठीची जबाबदारी त्यांच्यावर येत नाही. अल्लाह प्रकाशाची ओळख अशा व्यक्तीपासून काढून घेतो जो स्वत: प्रकाशापासून तोंड फिरवून बसलेला असतो. जेव्हा अशा व्यक्तीने सत्य प्रकाशापासून तोंड फिरवून असत्याच्या अंधारात भटकणेच पसंत केले तेव्हा अल्लाहने त्याला तशीच प्रेरणा दिली.
१७) सत्य ऐकण्यासाठी बहिरे, सत्य बोलण्यासाठी मुके आणि सत्य पाहण्यासाठी आंधळे बनले.

[next](१९) किंवा यांचे उदाहरण असे आहे की, आकाशातून पर्जन्याचा वर्षाव होत आहे त्याचबरोबर अंधार, कडकडाट आणि लखलखाटही होत आहे. विजेचा कडकडाट ऐकून जीवाच्या भीतीने कानात बोटे खुपसून घेत आहेत आणि अल्लाहने या सत्य नाकारणाऱ्यांना चोहिकडून वेढले आहे.१८ (२०) लखलखाटामुळे यांची अवस्था अशी आहे जणू काही लवकरच यांची दृष्टी विजेच्या लखलखाटाने हिरावून घेतली जाईल. जेव्हा त्यांच्यावर वीज चमकते तेव्हा त्या प्रकाशात ते पुढे चालू लागतात. आणि जेव्हा त्यांच्यावर अंधार पसरतो तेव्हा ते उभेच राहतात.१९ अल्लाहने जर इच्छिले असते तर यांची श्रवणशक्ती व दृकशक्ती (दृष्टी) पूर्णतः हिरावून घेतली असती.२० निःसंशय अल्लाह सर्व गोष्टींवर  सामर्थ्यवान  आहे.
१८) म्हणजे कानात बोटे ठोसून ते स्वत:ला काही वेळेपुरते या गैरसमजुतीत फसवू शकतात की विनाशापासून वाचले जाऊ; परंतु खरेतर ते वाचू शकतच नाहीत कारण अल्लाह सर्वशक्तीनिशी अशा लोकांना व्यापून आहे.
१९) पहिले उदाहरण त्या दांभिक लोकांचे आहे जे मनातून द्रोही होते आणि गरजेपोटी मुस्लिम बनले होते. दुसरे उदाहरण त्यांचे आहे जे शंकेत गुरफटलेल्या, स्थितीत आणि श्रद्धेमध्ये ते कमजोर होते. काही प्रमाणात सत्याला मान्य करीत होते परंतु सत्यावर एवढे दृढ नव्हते की त्यासाठी ते संकटाना आणि अडचणींना सामोरे जाऊ शकतील. येथे पावसाने अभिप्रेत इस्लाम आहे जो समस्त मानवतेसाठी कृपा बनून आला आहे. अंधार आणि विजांचा कडकडाट आणि चमकणेने अभिप्रेत संकटे व अडचणीचे प्रचंड वादळ आणि तो पराकोटीचा संघर्ष आहे जो इस्लामी आंदोलनाच्या विरोधात अज्ञानी लोकांकडून केला जात होता. शेवटी दांभिकांच्या त्या स्थितीची रूपरेखा आखली गेली की जेव्हा सोपी गोष्ट होते तेव्हा हे आगेकूच करतात आणि जेव्हा त्यांच्या मनोकामनांविरुद्ध आणि अनिष्ट रूढी-परंपराविरुद्ध आदेश दिले जातात तेव्हा स्तब्ध होतात. त्यांच्या इच्छा आकांक्षेविरुद्ध व मनाविरुद्ध काही घडले तर त्यांना कठीण जाते.
२०) म्हणजे ज्याप्रकारे पहिल्या प्रकारच्या दांभिक लोकांची पाहण्याची शक्ती अल्लाहने नष्ट करून टाकली होती, त्याचप्रमाणे तो यांनादेखील सत्यासाठी आंधळा व बहिरा बनवू शकला असता. परंतु अल्लाहचा हा शिरस्ता नाही की जो कोणी एखाद्या मर्यादेपर्यंत पाहू व ऐकू इच्छित असेल त्याला पाहू व ऐकू देऊ नये. ज्या मर्यादेपर्यंत ते सत्य जाणून घेण्यास म्हणजेच सत्य ऐकण्यास व पाहण्यास तयार होते त्या  मर्यादेपर्यंत अल्लाहने त्यांची पाहण्याची व ऐकण्याची तेवढी शक्ती कायम ठेवली.

[next](२१) लोकहो,२१ बंदगी (आज्ञाधारकता) करा आपल्या पालनकर्त्याची ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वी जे होऊन गेले त्या सर्वांनाही निर्माण केले. जेणेकरून तुम्ही दुष्कृत्यांपासून२२ परावृत्त व सुरक्षित राहू शकाल. (२२) तोच तर आहे ज्याने तुमच्यासाठी पृथ्वीचा बिछाना आणि आकाशाचे छत बनवले. आणि आकाशातून पर्जन्य वर्षविले आणि त्यापासून सर्व प्रकारची पिके व फळे तुमच्या उपजीविकेसाठी उत्पन्न केली. तेव्हा हे तुम्ही जाणत असताना अन्य कुणालाही अल्लाहचे समवर्ती२३ ठरवू नका.
(२३) जर तुम्हाला आमच्या दासांवरील या ग्रंथाचे अवतरण आमच्याकडून (साक्षात अल्लाहकडून) असण्याबद्दल शंका असेल तर यातील सूरह (अध्याया)समान एकच सूरह रचून दाखवा. आपल्या सर्व समर्थकांना बोलवा. एक अल्लाहशिवाय ज्या कुणाची हवी असेल त्याची मदत घ्या आणि जर तुम्ही खरे असाल तर हे कार्य करून दाखवा.२४
२१) कुरआनचे आवाहन समस्त मानवजातीसाठी जरी असले तरी त्यापासून फायदा घेणे अथवा न घेणे हे सर्वस्वी लोकांच्या इच्छेवर आणि त्यानुसार त्यांना लाभणाऱ्या अल्लाहच्या कृपेवर अवलंबून आहे. म्हणून आधी मानवामध्ये फरक करून स्पष्ट केले गेले की कोणत्या प्रकारचे लोक या ग्रंथापासून मार्गदर्शन प्राप्त करू शकतील आणि कोणत्या प्रकारचे लोक हा लाभ उठवू शकत नाहीत. यानंतर समस्त मानवतेसमोर मूळ गोष्ट ठेवली जात आहे ज्याकडे आवाहन करण्यासाठी कुरआन अवतरित झाला आहे.
२२) म्हणजे जगात दुराचार व विकृतदृष्टी आणि परलोकात ईशप्रकोपापासून सुरक्षित राहण्याची अपेक्षा.
२३) म्हणजे तुम्ही स्वत: या गोष्टीला मान्य करता आणि तुम्हाला माहीत आहे की हे सर्व कार्य अल्लाहचेच आहे; तर तुमची भक्ती फक्त अल्लाहसाठीच असली पाहिजे. दुसरा कोण यासाठी पात्र आहे ज्याची तुम्ही पूजाअर्चा करावी.? दुसऱ्यांना अल्लाहचा भागीदार ठरविण्याचा अर्थ भक्ती व पुजाअर्चेमध्ये अल्लाहसोबत दुसऱ्या एखाद्याचीसुद्धा पूजा केली जावी. पुढे कुरआन याविषयी तपशीलवार माहिती देत आहे की उपासनेच्या त्या कोणत्या पद्धती आहेत ज्या फक्त अल्लाहसाठीच निश्चित असाव्यात आणि दुसऱ्यांना त्यात सामील करणे म्हणजे ईशद्रोह (शिर्क) आहे ज्याला रोखण्यासाठी कुरआन आला आहे.

[next](२४) मात्र जर तुम्ही तसे केले नाही आणि कदापि करू शकणार नाही, तर भिऊन असा त्या भयंकर अग्नीला ज्याचे इंधन असेल मानव व दगड२५ जो सत्याचा विरोध करणाऱ्यांसाठी भडकावलेला असेल. (२५) आणि हे पैगंबर (स.)! जे या ग्रंथावर ईमान धारण करतील व (यानुसार) सद्वर्तन करतील त्यांना खूशखबर द्या की त्यांच्यासाठी अशी नंदनवने असतील ज्यांच्या खालून झरे वाहत असतील. या बागांतील फळे दिसण्यात जगातील फळांसारखीच असतील. जेव्हा त्यांना एखादे फळ खाण्यासाठी दिले जाईल तेव्हा ते म्हणतील की अशीच फळे यापूर्वी जगात आम्हाला दिली जात असत.२६ त्यांच्यासाठी तिथे पवित्र व चारित्र्यवान पत्नीं असतील.२७ आणि ते सदैव तिथेच राहतील. (२६) नि:संशय डास किंवा त्यापेक्षाही क्षुल्लक गोष्टींचे उदाहरण देण्यास अल्लाहला मुळीच संकोच वाटत
२४) यापूर्व मक्का येथे अनेकदा आव्हान दिले गेले की जर तुम्ही या कुरआनला मनुष्य लिखित समजता तर त्याच्यासारखे एखादा ग्रंथ लिहून दाखवा. आता मदीना येथेसुद्धा याची पुनरावृत्ती केली जात आहे.                                             (पाहा. कुरआन,  १०:३८, ११:१३, १७:८८, ५२:३३-३४)
२५) यात सूक्ष्म संकेत आहे की नरकाग्नीचे इंधन फक्त तुम्हीच राहणार नाही तर ते उपास्य (मूर्त) सुद्धा इंधन बनतील ज्यांची तुम्ही अल्लाहव्यतिरिक्त पुजाअर्चा करत आहात आणि ज्यांच्यापुढे तुम्ही नतमस्तक होत आहात. तुम्हाला तेव्हा स्वत: माहीत होईल की त्यांचा ईशत्वात कितपत सहभाग होता.
२६) म्हणजे अनोळखी आणि निराळी फळे नसतील तर त्यांच्यासारखीच ती फळे असतील, ज्यांचा आस्वाद तुम्ही दुनियेत घेत होता. चवीत मात्र ते कैक पटीने गोड व चवदार असतील. स्वर्गातील लोक त्या फळांना पाहुन ओळखतील की हा आंबा, डाळींब आणि संत्रा आहे. परंतु चवीने मात्र जगातील फळांपेक्षा खूपखूप श्रेष्ठ असतील.
२७) अरबी भाषेत "अज़वाज' या शब्दाचा प्रयोग "जोडी' साठी होतो. हा शब्द पती आणि पत्नी या दोघांसाठी उपयोगात येतो. पतीसाठी पत्नी "जौज' आहे आणि पत्नीसाठी पती "जौज' आहे. परंतु स्वर्गात ही जोडी पवित्र असेल. जगात जर पती सदाचारी व पत्नी दुराचारी असेल तर परलोकात त्यांचे संबंध तुटतील आणि त्या सदाचारी पतीला दुसरी एखादी सदाचारी पत्नी दिली जाईल.  याउलट जगात जर पत्नी सदाचारी आहे आणि तिचा पती दुराचारी तर तिथे परलोकात तिला त्या वाईट पतीपासून सुटका मिळेल आणि दुसरा एखादा सदाचारी मनुष्य तिचा पती म्हणून  जीवनसाथी बनविला जाईल.

[next]नाही.२८ जे लोक श्रद्धा ठेवतात ते जाणतात की हे त्यांच्या पालनकर्त्याकडून आलेले सत्य आहे. आणि जे नाकारणारे आहेत ते त्यास ऐकून म्हणतात की ‘‘या उदाहरणात अल्लाहचे काय प्रयोजन आहे?’’ अल्लाह याचव्दारे कित्येकांना मार्गभ्रष्ट होऊ देतो तर कित्येकांना सन्मार्ग दाखवितो.२९ आणि याव्दारा तो त्यांनाच मार्गभ्रष्ट करतो जे अवज्ञाकारी (फासिक) आहेत.३०(२७) अल्लाहशी केलेल्या वचनाशी दृढबद्ध झाल्यानंतरही जे वचनभंग करतात३१ आणि अल्लाहने ज्यांच्याशी संबंध जोडण्याचा आदेश दिला आहे त्याच्याशी संबंध तोडून टाकतात३२
  जर जगात पती-पत्नी दोघे सदाचारी आहेत तर परलोक जीवनातसुद्धा हाच त्यांचा संबंध राहील. ते दोघे त्या शाश्वत जीवनात पती-पत्नी म्हणून राहतील.
२८) येथे एका आक्षेपाचा उल्लेख केल्याविना त्याचे उत्तर दिले आहे. कुरआनमध्ये अनेक ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी कोळी, माशी, मच्छर इ.ची उदाहरणे दिली गेली आहेत. याविषयी विरोधकांचा आक्षेप होता की हा कसा ईशग्रंथ आहे ज्यात अशा क्षुल्लक उपमा दिल्या आहेत. त्यांचे म्हणणे होते की ही जर ईशवाणी असती तर अशा क्षुल्लक गोष्टींचा उल्लेख त्यात नसता.
२९) म्हणजे जे कोणी सत्य जाणून घेऊ इच्छित नाही व त्यांना सत्याची चाडही नाही, त्यांची दृष्टी फक्त बाह्य शब्दांवर टिकून राहाते आणि ते त्या गोष्टीपासून उलटे निष्कर्ष काढून सत्यापासून आणखीन दूर जातात. मात्र जे सत्य जाणून घेणारे आहेत आणि सद्‌विवेकबुद्धीला बाळगून आहेत, त्यांना तर येथे चातुर्याचे गुण सापडतात. त्यांचे मन ग्वाही देऊ लागते की अशा तात्विक गोष्टी अल्लाहकडूनच असू शकतात.
३०) फासिक म्हणजे अवज्ञाकारी व मर्यादांचे उल्लंघन करणारा.
३१) बादशाह आपले नोकर-चाकर व प्रजेच्या नावे जो आदेश देतो त्यास अरबी भाषेत "अहद' (वचन) म्हणतात. कारण त्याची अंमलबजावणी प्रजेवर बंधनकारक आहे. अल्लाहचा "अहद' म्हणजे तो स्पष्ट आदेश ज्यान्वये समस्त मानवजात त्याचीच पूजा, बंदगी व आज्ञापालन करण्यास बाध्य आहे. "पक्का निर्धार केल्यानंतर' (दृढबद्ध झाल्यानंतरही) ने अभिप्रेत आहे की आदम (अ.) (प्रथम मानव) च्या निर्मितीच्या वेळी समस्त मानवजातीकडून या आदेशाचे काटेकोर पालन केले जाईल असे वचन घेण्यात आले होते. कुरआन ७:१७२ मध्ये याविषयी तपशीलवार माहिती आली आहे.
३२) म्हणजे जे संबंध स्थापित व दृढ करणे यावर मनुष्याचे व्यक्तीगत व सामुदायिक यश अवलंबून आहे आणि ज्यांना दुरुस्त राखण्याची अल्लाहने ताकीद केली आहे; त्या संबंधाचा हे लोक विच्छेद करतात.

[next]आणि पृथ्वीवर अनाचार माजवितात३३ हेच ते आहेत जे नुकसान भोगणार आहेत.
(२८) अल्लाहला तुम्ही कसे नाकारता? जेव्हा तुम्ही निर्जीव होतात तेव्हा त्याने तुम्हाला जीवन प्रदान केले. नंतर तोच तुमचे प्राण हरण करील. नंतर तुम्हाला तोच पुन्हा जिवंत करील. नंतर त्याच्याकडेच तुम्हाला परत जावयाचे आहे. (२९) तोच तर आहे ज्याने पृथ्वीमध्ये तुमच्यासाठी सर्व गोष्टी निर्माण केल्या. नंतर आकाशाभिमुख झाला आणि सप्तआकाश३४ व्यवस्थित बनविले. आणि तोच प्रत्येक गोष्टीला जाणतो आहे.३५
३३) येथे तीन वाक्यात अवज्ञा आणि अवज्ञाकारींचा (फासिक) तपशील आला आहे. अल्लाह आणि दासांदरम्यानचा संबंध आणि माणसामाणसातील संबंध विच्छेद करण्याचे अनिवार्य परिणाम उपद्रव आहे. जो या उपद्रवाला कारणीभूत होतो तोच दुराचारी, उपद्रवी आहे.
३४) सात आकांशाची वस्तुस्थिती काय आहे हे सांगणे कठीण आहे. मनुष्य आकाश म्हणजेच पृथ्वीच्या पलीकडील सृष्टीसंबंधी निरीक्षण आणि संकल्पनेनुसार विविध निष्कर्ष काढत आला आहे जे सदैव बदलत राहिले आहेत. म्हणून त्यांच्यापैकी एखाद्या संकल्पनेला मूलाधार समजून कुरआनच्या या शब्दांचा अर्थ लावणे योग्य नाही. एकंदरीत असे म्हणता येईल की पृथ्वी पलीकडे सृष्टी आहे. तिचे अल्लाहने सात मजबूत टप्पे पाडलेले असावेत किंवा जमीन या सृष्टीच्या ज्या भागात आहे त्या सृष्टीचे एकूण सात विभाग आहेत.
३५) येथे दोन महत्वपूर्ण गोष्टींपासून सचेत केले आहे. एक म्हणजे तुम्ही अल्लाहविरुद्ध विद्रोह आणि नाकारण्याचे धाडस कसे करता जो तुमच्या प्रत्येक कृत्यास जाणून आहे. दुसरे असे की जो अल्लाह समस्त वस्तुस्थितीचे ज्ञान राखून आहे, त्याच्याशी विमुख होऊन तुमचे अंधारात भटकण्याव्यतिरिक्त दुसरा काय परिणाम निघू शकतो?

[next](३०) आणि आठवण करा३६ जेव्हा तुमच्या पालनकर्त्याने दूतांना३७ सांगितले, ‘‘मी पृथ्वीवर एक खलीफा३८ (माझा प्रतिनिधी) बनविणार आहे.’’ तेव्हा त्या दूतांनी विचारले, ‘‘काय, तू धरतीच्यामध्ये त्याला नियुक्त करणार आहेस, जो धरती व्यवस्थेला बिघडवील आणि रक्तपात करील?३९ (पण) आमच्याकडून तर तुझे स्तवनासह गुणगान व
३६) वरच्या प्रभागात (रुकू) मध्ये अल्लाहची बंदगी (भक्ती) चे आवाहन या आधारे दिले की तो तुमचा मालक, पालक व शासक आहे. त्याच्याच हातात तुमचे जगणे आणि मरणे आहे आणि ज्या सृष्टीत तुम्ही राहत आहात त्याचा नियंता आणि मालक तोच आहे. म्हणून त्याचीच भक्ती व उपासनेशिवाय दुसरा प्रकार योग्य नाही. आता या प्रभागात हेच आवाहन या आधारे दिले जात आहे की या जगात अल्लाहने तुम्हाला त्याचा प्रतिनिधी (खलीफा) नियुक्त केले आहे. प्रतिनिधीच्या नात्याने तुमची हीच निव्‌वळ जबाबदारी नाही की त्याची उपासना करावी; तर तुम्ही त्याच्या अवतरित आदेशानुसार जीवनयापन करावे. या संदर्भात मनुष्याची वस्तुस्थिती आणि सृष्टीत त्याचे स्थान स्पष्ट केले आहे आणि मानवी इतिहासातील तो अध्याय वर्णन केला गेला आहे, ज्याला माहीत करून घेण्यास मनुष्यासमोर दुसरा मार्ग उपलब्ध नाही. येथे जे निष्कर्ष निघतात ते अमोल निष्कर्ष आहेत. जमिनीतून हाडे काढून त्यावरून जे कपोलकल्पित निष्कर्ष काढले जातात ते सर्व यापुढे शुल्लक आहेत.
३७) अरबी शब्द "मलक'चा अर्थ "संदेश देणारा' होतो. याचा शाब्दिक अर्थ "पाठविलेला' किंवा "फरिश्ता' आहे. मात्र अशा शक्ती नव्हेत ज्यांचे अस्तित्व नसावेत. परंतु त्या स्वतंत्र व्यक्तिमत्व असणाऱ्या शक्ती आहेत ज्यांच्याकडून अल्लाह आपल्या या महान साम्राज्याचे व्यवस्थापन व नियोजनाचे कार्य घेतो.
३८) "खलीफा' जो आपल्या स्वामीने बहाल केलेल्या अधिकारांचा वापर करून  त्याच्या साम्राज्यात त्याचा नायब म्हणून कार्यरत राहातो. (स्वामी इच्छेला पूर्णत्वास नेतो.)
३९) हा फरिश्त्यांचा आक्षेप नव्हता तर त्यांचा तो प्रश्न होता. फरिश्त्यांची काय बिशाद की अल्लाहच्या निर्णयावर आक्षेप घ्यावा. "खलीफा' या शब्दाने फरिश्ते उमजून बसले होते की पृथ्वीवर मनुष्याला काही अधिकार अल्लाह बहाल करू इच्छितो. परंतु त्यांना हे उमजत नव्हते की सृष्टी व्यवस्थेत अधिकारप्राप्त एखाद्या निर्मितीला काय वाव असू शकतो. जर एखाद्याला थोडेफार अधिकार दिले तर राज्यातील त्या भागातील व्यवस्था कशी सुरक्षित राहील, ते जाणू इच्छित होते.

[next]पवित्र्यगान होत आहे,४० (तेव्हा अल्लाह) म्हणाला, ‘‘मी जाणतो जे तुम्ही जाणत नाही.’’४१ (३१) नंतर अल्लाहने आदमला सर्व नावे शिकविली.४२  नंतर त्यांना (सर्व वस्तूंना) दूतांसमोर ठेवले आणि म्हणाला, ‘‘जर तुम्ही सत्यवादी असाल, (की प्रतिनिधी  नियुक्त केल्याने व्यवस्था बिघडून जाईल) तर जरा या वस्तूंची नावे सांगा!’’ (३२) ते म्हणाले, ‘‘तूच महिमावंत आहेस. तू जे काही आम्हाला शिकवलेस तेवढेच ज्ञान आम्हाला आहे.४३ नि:संशय तूच सर्वज्ञ आणि तत्त्वज्ञ आहेस.’’ (३३) मग अल्लाहने आदमला सांगितले ‘‘यांना या सर्व वस्तूंची नावे सांग.’’ नंतर जेव्हा त्याने (आदमने) दूतांना सर्व नावे
४०) येथे ईशदूतांचा (फरिश्ते) हेतू खिलाफत (प्रतिनिधित्व) स्वत:ला मिळावे असा मुळीच नव्हता आणि त्यांची भूमिका अशी नव्हती की तो आमचा हक्क आहे, तर अर्थ हा होता की ईशआदेशाचे पालन पूर्णत: होत आहे. अल्लाहच्या मर्जप्रमाणे संपूर्ण सृष्टी पवित्र ठेवली जात आहे आणि अल्लाहचे स्तवन आणि स्तुतीगान आम्ही फरिश्ते मोठ्या आदराने सतत करीत आहोत. अशा स्थितीत कमी कोणत्या गोष्टीची राहिली आहे की ज्यासाठी "खलीफा' ची नियुक्ती केली जात आहे? यामागचे कारण आम्हाला समजू शकले नाही. ("तसबिह'चा अर्थ स्तुतीगान करणे आणि स्फूर्तने काम करणेसुद्धा होतो).
४१) ईशदूतांच्या (फरिश्ते) दूसऱ्या शंकेचे हे उत्तर आहे. अर्थात खलीफा नियुक्तीचे रहस्य आणि आवश्यकता मी जाणतो तुम्ही नव्हे. आपल्या ज्या सेवांचा उल्लेख तुम्ही करत आहात त्या पुरेशा नाहीत तर त्याहून अधिक काही अपेक्षित आहे. याचसाठी भूतलावर एक अशी निर्मिती करण्याचा निर्णय घेतला गेला ज्याला काही अधिकार दिले जावेत.
४२) मनुष्याच्या ज्ञानाचे स्वरुप हेच आहे की तो नामनिर्देश करून वस्तूंबद्दल जाणून घेतो. मनुष्याचे सर्व ज्ञान हे वास्तविकपणे त्या त्या वस्तूंच्या नावांवर अवलंबून आहे. आदम (अ.) यांना सर्व नावं शिकविण्यामागचा उद्देश त्यांना सृष्टीचे ज्ञान देणे हा होता.
४३) असे कळते की प्रत्येक प्रकारच्या ईशदूताचे (फरिश्ता) ज्ञान फक्त विशिष्ट मर्यादित क्षेत्रापुरतेच आहे ज्यांच्याशी त्यांचा संबंध आहे. उदा. हवेसाठी जे ईशदूत नियुक्त केले आहेत त्यांना हवेविषयी पूर्ण ज्ञान देण्यात आले, परंतु ते पाण्याविषयी काहीच जाणत नाहीत. हीच स्थिती दुसऱ्या विभागांच्या ईशदूतांची आहे. या विपरीत मनुष्याला व्यापक ज्ञान दिले गेले आहे. परंतु मनुष्य एक एका क्षेत्राविषयी जरी संबंधित क्षेत्रातील फरिश्त्याच्या तुलनेत कमी जाणत असला तरी एकंदरीत जी सर्वसमावेशकता मानवाच्या ज्ञानाला दिली गेली ती फरिश्त्यांना प्राप्त नाही.

[next]सांगितली४४ तेव्हा (अल्लाह) म्हणाला, ‘‘काय, मी तुम्हाला सांगितले नव्हते की, आकाश आणि पृथ्वीमधील सर्व गुप्त गोष्टी मीच जाणतो आणि मी तेही जाणतो जे काही तुम्ही  प्रकट  करता  आणि  जे  काही  लपविता’’ (३४) आणि जेव्हा आम्ही दूतांना (फरिश्त्यांना) आदेश दिला की, आदमच्या पुढे नतमस्तक व्हा. तेव्हा सर्वजण४५ नतमस्तक झाले. परंतु इब्लीस४६ झाला नाही. त्याने नाकारले व अहंकार केला आणि अवज्ञाकारींपैकी झाला.४७(३५) मग आम्ही आदमला सांगितले, ‘‘हे आदम,
४४) हे ईशदूतांच्या (फरिश्ते) पहिल्या शंकेचे उत्तर आहे. अल्लाहने त्यांना स्पष्ट सांगितले की आदम (अ.) यांना फक्त अधिकारच देण्यात आले नाही तर ज्ञानसुद्धा देत आहे. त्याच्या नियुक्तीने पृथ्वीवर उपद्रव होण्याविषयीची जी शंका ईशदूतांना आली होती, तो केवळएक भाग आहे व दुसरा भाग सुधार आणि विकासाचासुद्धा आहे आणि तो उपद्रवापेक्षा जास्त महत्वाचा आणि मूल्यवान आहे.
४५) म्हणजे जमीन आणि तिच्या संबंधित सृष्टीच्या विभिन्न क्षेत्रांत जितके फरिश्ते (ईशदूत) कार्यरत आहेत त्या सर्वांना मनुष्याच्या आधीन होण्याचा आदेश दिला आहे. सृष्टीच्या या भागात पृथ्वीवर मनुष्याला अल्लाहच्या आदेशाने त्याचा प्रतिनिधी (खलीफा) नियुक्त करण्यात येत होते म्हणून आदेश देण्यात आला की मनुष्य ज्याला अल्लाहने अधिकार बहाल केले त्यांना तो सत्य किंवा चुकीच्या कोणत्याही मार्गात वापरात आणू इच्छित असेल ज्याचे त्याला अल्लाहने स्वातंत्र्य दिले आहे; तेव्हा तुमचे कर्तव्य आहे की त्या त्या क्षेत्रातील नियुक्त फरिश्त्यांनी त्यासाठी सहकार्य करावे. परंतु हेसुद्धा शक्य आहे की केवळ आधीन होण्यासच सजदाच्या नावाने व्यक्त करण्यात आले असावे किंवा या आधीन होण्याच्या स्वरुपात एखाद्या प्रत्यक्ष कृतीचा आदेशसुद्धा दिला गेला असावा, हे जास्त योग्य वाटते.
४६) "इब्‌लीस' शब्दाचा अनुवाद "आत्यंतिक निराश' आहे. परिभाषेत हे त्या "जिन्न'चे नाव आहे ज्याने अल्लाहच्या आदेशाची अवज्ञा केली आणि आदम (अ.) यांच्या संततीच्या आधीन राहण्यास नकार दिला. यालाच शैतान म्हटले आहे. हे केवळ एखाद्या शक्तीचे नाव नसून तेसुद्धा मानवाप्रमाणे एक निश्चित असे व्यक्तित्व धारण केलेले अस्तित्व आहे. म्हणून कुरआन याचापुढे खुलासा करतो की इब्‌लीस जिन्नपैकी होता जे ईशदूत (फरिश्ते) पेक्षा वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व आहे.
४७) यावरून असे ज्ञात होते की संभवत: इब्‌लीस नतमस्तक होण्यास नकार देणारा एकटाच नव्हता तर जिन्नचा एक गट अवज्ञेवर प्रवृत्त झाला होता. इब्‌लीसचे नाव याकरिता घेतले गेले की तो या गटाचे नेतृत्व करत होता व अवज्ञेत पुढाकार घेत होता. या आयतचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो, ""तो (इब्‌लीस) नाकारणाऱ्यांपैकी होता.'' याने तात्पर्य असे की जिन्नांचा एक गट पहिल्यापासूनच अस्तित्वात होता जो बंडखोर आणि अवज्ञाकारी होता. इब्‌लीसचा संबंध याच गटाशी होता. कुरआनमध्ये शैतान या शब्दाचा प्रयोग या जिन्न आणि त्यांच्या वंशासाठी प्रयुक्त झाला आहे. जिथे शैतान शब्द मनुष्यासाठी वापरला गेल्याचा संकेत नसेल तिथे शैतान जिन्नच अभिप्रेत असतात.

[next]तू आणि तुझी पत्नी दोघेही स्वर्गामध्ये राहा आणि इथे मनसोक्त हवे ते खा. परंतु या झाडाच्या जवळ जाऊ नका.४८ अन्यथा तुम्ही अत्याचारी४९ व्हाल.’’ (३६) शेवटी शैतानाने त्यादोघांना त्या झाडाचे प्रलोभन दाखऊन आमची अवज्ञा करविली आणि त्यांना ज्या स्थितीत ते होते तिथून बाहेर काढविले (तेव्हा) आम्ही आदेश दिला, ‘‘खाली उतरा तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात.५० आणि तुम्हाला एका निश्चित काळापर्यंत पृथ्वीवर राहावयाचे आहे आणि तिथेच निर्वाह करायचा आहे. (३७) त्यावेळी आदमने आपल्या पालनकर्त्याकडून काही वचने
४८) यावरुन माहीत होते की धरती अर्थात आपल्या नियुक्तीस्थळावर प्रतिनिधी म्हणून पाठविण्याअगोदर या दोघांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने त्यांना स्वर्गात ठेवले होते जेणेकरून त्यांचा कल कुणीकडे आहे, हे पाहिले जावे आणि हे माहीत व्हावे की शैतानाच्या बहकविण्याच्या विरोधात मनुष्य कोणत्या मर्यादेपर्यंत अल्लाहच्या आदेशाचे पालन करील. याची परीक्षा घेण्यासाठी एका वृक्षाची निवड करण्यात आली आणि आदेश देण्यात आला की त्याच्या जवळही फिरकू नये. याचा परिणामसुद्धा स्पष्ट करण्यात आला की असे कराल तर आमच्या नजरेत अवज्ञाकारी सिद्ध व्हाल. वृक्षाचे नाव व तपशील सांगितला गेला नाही कारण तपशील अवाजवी होता. परीक्षेसाठी स्वर्गाची जागा निवड करण्याचा उद्देश वास्तवात माणसाच्या मनात ही गोष्ट दृढ करणे होते की मनुष्यासाठी त्याच्या पदानुसार स्वर्गाचे ठिकाणच योग्य आहे. (म्हणून मनुष्याने असेच आचरण करणे योग्य आहे व आवश्यक आहे ज्यामुळे त्याला त्याचे पात्र ठिकाण प्राप्त व्हावे.)
४९) "जुल्‌म' (अत्याचार) म्हणजे हक्कांची पायमल्ली करणे आहे. जो माणूस अल्लाहची अवज्ञा करतो, तो वस्तुत: तीन मुख्य हक्क पायदळी तुडवितो. प्रथम, अल्लाहचा हक्क. कारण त्याचे आज्ञापालन केले जावे. याचा तो   हकदार आहे.  दुसरे, त्या सर्व गोष्टींचे हक्क ज्यास त्याने या नाफरमानीच्या अपराधात वापरले कारण की या सर्वांचा त्याच्यावर हा हक्क होता की त्याने फक्त त्यांच्या स्वामीच्या मर्जनुसार त्यांच्यावर आपले अधिकार वापरावेत. तिसरा प्रकार म्हणजे स्वत:च्या हक्कास पायदळी तुडविणे कारण मनुष्यावर त्याचा स्वत:चा हा हक्क आहे की अल्लाहच्या आदेशाच्या अवज्ञेपासून दूर राहून विनाशापासून स्वत:चा बचाव करावा. याच कारणामुळे कुरआनमध्ये अनेक ठिकाणी "जुल्‌म' (अत्याचार) हा शब्द गुन्ह्यासाठी आणि गुन्हेगारासाठी जालीम (अत्याचारी) वापरला गेला  आहे.
५०) म्हणजे ""मनुष्याचा शत्रू शैतान व शैतानाचा शत्रू मनुष्य'' आहे. शैतान मनुष्याचा शत्रू असणे तर उघड आहे पण माणसाने शैतानाचा शत्रू असणे याचा अर्थ माणसाने तर शैतानाशी शत्रुत्व ठेवलेच पाहिजे हे रास्त आहे. परंतु ही मनुष्याची स्वत:शी धोकेबाजी आहे की तो शैतानाला आपला मित्र बनवितो.

[next]शिकून घेतली आणि पश्चात्ताप५१ व्यक्त केला. तेव्हा अल्लाहने त्याच्या पश्चात्तापाचा स्वीकार केला. नि:संशय तो क्षमावंत आणि दयावंत आहे.५२
(३८) आम्ही सांगितले, ‘‘तुम्ही सर्वजण इथून खाली उतरा.५३ नंतर जर माझ्याकडून तुमच्याकडे काही मार्गदर्शन लाभले तर जे माझ्या मार्गदर्शनाचे अनुसरण करतील तर त्यांना
५१) जेव्हा आदम (अ.) यांना आपली चूक समजली आणि त्वरित अवज्ञेऐवजी अल्लाहच्या आज्ञाधारकतेकडे वळण्यास प्रवृत्त झाले. त्यांच्या मनात ही इच्छा निर्माण झाली होती की आपल्या पालनकर्त्याशी आपल्या चुकीची क्षमायाचना करावी. तेव्हा आदम (अ.) यांना क्षमायाचनेसाठी शब्द सापडत नव्हते. अल्लाहने त्या दोघांवर दया दाखवून प्रार्थनेचे शब्द त्यांना शिकविले. "तौबा' याचा अर्थ परत येणे व क्षमायाचना करणे असा आहे. दासाने "तौबा' करणे म्हणजे दास बंडखोरी सोडून  आज्ञाधारकतेकडे परतला आणि अल्लाहकडून "तौबा'चा अर्थ असा आहे की तो आपल्या लज्जित झालेल्या दासांकडे आपल्या कृपेसह आकृष्ट झाला. अशा स्थितीत अल्लाह आपल्या दासांवर कृपावर्षाव करून त्याच्याकडे आकृष्ट होतो.
५२) कुरआन या विचारसरणीचे खंडण करतो की गुन्ह्याचे दुष्परिणाम निश्चित आहेत आणि ते मनुष्याला भोगावेच लागणार आहे. ही मानवनिर्मित भ्रष्ट विचारसरणींपैकी एक घातक विचारसरणी आहे. मनुष्याने जर गुन्हा केला तर यानुसार तो या विचाराने नेहमीसाठी निराश होतो. परंतु कुरआन या विचारसरणीविरुद्ध तत्व मांडतो की सदाचाराचा मोबदला व दुराचाराची शिक्षा देणे अल्लाहच्याच हातात आहे. तुम्हाला ज्या सदाचाराबद्दलचा चांगला मोबदला मिळतो तो त्या सदाचाराचा स्वाभाविक परिणाम नसून अल्लाहची कृपा आहे, हवे तर करील किंवा नाही. याचप्रमाणे ज्या दुराचाराची तुम्हाला शिक्षा मिळते तीसुद्धा दुराचाराचा स्वाभाविक परिणाम नाही की तसेच व्हावे किंबहुना अल्लाहला पूर्ण अधिकार आहे की त्याला माफ करावे अथवा शिक्षा द्यावी. (अल्लाह आपल्या निर्मितीविषयीचा निर्णय पूर्ण न्यायानिशीच घेतो.)
५३) वर हा उल्लेख आला आहे की आदम (अ.) यांनी पश्चात्ताप व्यक्त केला आणि अल्लाहने त्यांचा पश्चात्ताप स्वीकारला. याचा अर्थ हा आहे की, गुन्हेगारीचा जो डाग त्यांना लागला होता तो धूवून टाकला गेला. हा डाग त्यांच्यावर आणि त्यांच्या संततीवर अजिबात शिल्लक राहिला नाही त्यासाठी आता अल्लाहचा एकमात्र पुत्र बनवून (अल्लाहचा आश्रय करोत) समस्त मानवजातीच्या गुन्ह्याच्या मोबदल्यात (कफ्फारा) सुळीवर चढण्यासाठी कोणाला पृथ्वीवर पाठविण्याची गरज राहिली नव्हती. आता स्वर्गातून बाहेर पडण्याचा जो आदेश पुन्हा दिला गेला तो म्हणजे आदम (अ.) यांची क्षमायाचना कबूल करण्याचा अर्थ हा नव्हता की त्यांना स्वर्गातच राहू देणे. त्यांना तर भूतलावरील प्रतिनिधित्वा (खिलाफात) साठीच निर्माण केले होते. स्वर्ग त्यांचे निवासस्थान नव्हते. स्वर्गातून त्यांना बाहेर काढणे म्हणजे शिक्षा नव्हती. मूळ योजना त्यांना (आदम (अ.) आणि हव्वा (अ.)) भूतलावर उतरविण्याचीच होती. या अगोदर त्यांना जन्नत (स्वर्ग) मध्ये परीक्षा घेण्यासाठी ठेवले गेले होते ज्याचा उल्लेख वर आला आहे. (टीप नं. ४८)

[next]न कोणते भय असेल, न ते कधी शोक करतील. (३९) आणि जे लोक हे मान्य करणे नाकारतील आणि आमच्या आयतींना५४ खोटे लेखतील तेच नरकाग्नीमध्ये पडतील आणि तिथेच सदैव खितपत राहतील.५५
(४०) ‘‘हे इस्राईच्या संततींनो!५६ आठवण करा माझ्या त्या अनुग्रहाची जो मी तुमच्यावर केला होता आणि माझ्याशी केलेल्या वचन-कराराची तुम्ही पूर्तता करा. तुमच्याशी केलेल्या कराराची मी पूर्तता करीन आणि फक्त माझेच भय बाळगा. (४१) आणि जो ग्रंथ मी अवतरला आहे त्यावर श्रद्धा ठेवा. जो तुमच्याजवळ असलेल्या ग्रंथाचे समर्थन करणारा आहे. आणि त्याला सर्वांपेक्षा अगोदर नाकारणारे
५४) आयतचे अनेकवचन आयात होते. आयत म्हणजे संकेत, चिन्ह जे एखाद्या गोष्टीकडे निर्देश करते. कुरआनमध्ये हा शब्द चार वेगवेगळ्या अर्थाने आला आहे. एक निशाणी, चिन्ह, दुसरे कुठे सृष्टी निशाण्यांना अल्लाहची आयत म्हटले गेले आहे. कारण सृष्टीच्या निरीक्षणाने कळते की सृष्टीतील प्रत्येक वस्तू या सत्यतेकडे इशारा करीत आहे जी या बाह्य आवरणापलीकडे आहे. तिसरे, पैगंबरांच्या चमत्कारांना (मोजिजा) आयात म्हटले आहे,  कारण हे चमत्कार या सत्यतेचे प्रतीक होते की पैगंबर सृष्टी निर्माणकर्त्या अल्लाहचे प्रतिनिधी आहेत. चौथे, कधी ईशग्रंथाच्या भागांना आयात संबोधले गेले आहे, कारण ते फक्त सत्याकडेच मार्गदर्शन करतात, असे नव्हेतर त्यांच्यामध्ये खरेतर या ग्रंथाच्या महिमावान लेखकाच्या व्यक्तित्व निशाण्या स्पष्टत: जाणवतात.
५५) मानवजातीच्या बाबतीतील निर्मितीपासून ते प्रलयापर्यंतचा हा शाश्वत ईशादेश आहे. अल्लाहने यास तिसऱ्या प्रभागात (रुकु) अल्लाहचा अहद (वचन) या नावाने संबोधन केले आहे. स्वत: मार्गाची निश्चिती करणे मनुष्याचे काम नाही, तर अल्लाहचा दास आणि त्याचा प्रतिनिधी या दोन्ही भूमिकेतून त्याने त्याच मार्गावर चालावे जो मार्ग अल्लाहने दाखवून दिला आहे.
५६) इस्राईलचा अर्थ होतो अल्लाहचा दास (अब्दुल्लाह). ही उपाधी आदरणीय याकूब (अ.) यांना अल्लाहकडून देण्यात आली होती. त्यांच्याच संतती (यहुदी) ला बनीइस्राईल असे म्हणतात. (मदीना आणि त्याच्या आजूबाजूला यहुदी मोठ्या संख्येने राहात होते म्हणून) आता येथून ते चौदाव्या प्रभागापर्यंत (आयत ४० ते १२१ पर्यंत) या समुदायाला संबोधन निरंतर आले आहे ज्यात काही ठिकाणी ख्रिश्चन व अनेकेश्वरवादी अरबांकडे तसेच मुस्लिमांनासुद्धा संबोधन आले. या व्याख्यानाला वाचतांना खालील गोष्टींना डोळ्यांसमोर ठेवले पाहिजे.

[next]तुम्हीच होऊ नका. आणि माझ्या आयतींना अल्पश:लाभासाठी विकू नका.५७ माझ्या कोपापासून स्वत:ला वाचवा (४२) आणि सत्याला असत्याचे आवरण घालून सत्याला संदिग्ध करू नका आणि हेतुपुरस्सर सत्य लपवू नका जेव्हा तुम्ही जाणता.५८ (४३) नमाज कायम करा, जकात अदा करा५९ आणि जे माझ्यापुढे झुकत आहेत
१) मागील काळातील पैगंबरांच्या अनुयायांपैकी जे काही थोडे लोक अद्याप हयात (जिवंत) आहेत, त्यांच्यात सत्याचा अंश बाकी आहे. त्या सर्वांना या सत्यावर श्रद्धा ठेवण्याचे व सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात यावे ज्याला घेऊन पैगंबर मुहम्मद (स.) आले आहेत.
२)सर्व यहुदींसमोर पूर्ण सत्य प्रकट करणे आणि त्यांच्या नैतिक आणि आध्यात्मिक तसेच जीवनपद्धतीच्या सद्यस्थितीला स्पष्ट उघडे करून देणे. याचा फायदा असा झाला की यहुदींपैकी जे सदाचारी होते त्यांचे डोळे उघडले, तर दुसरीकडे मदीनेतील लोकांवर व अनेकेश्वरवादींवर यहुद्यांचा धार्मिक व नैतिक प्रभाव होता तो नष्ट झाला. तसेच स्वत:चे पितळ उघडे पडल्यावर त्यांचे धैर्य इस्लामच्या विरोधात खचले गेले.
३)मागील चार प्रभागांमध्ये (आरभांपासुन ते ३९ आयतीपर्यंत) इस्लामचे आवाहन करतांना समस्त मानवजातीला संबोधन होते. त्याच संदर्भात एका राष्ट्राचे उदाहरण देऊन लोकांना ईशमार्गदर्शनाकडे विमुखता स्वीकारण्याचा काय दुष्परिणाम होतो हे उदाहरणासह दाखवून दिले.
४)चौथे, यावरून पैगंबर (स.) यांच्या अनुयायींना  शिकवण दिली गेली आहे की त्यांनी ईशमार्गदर्शनाची अवहेलना करून अध:पतित होऊ नये जसे पूर्वच्या पैगंबरांचे अनुयायीं झाले होते.
५७) थोड्याशा किंमतीचा अर्थ भौतिक फायदे आहेत, ज्यांच्यासाठी हे लोक अल्लाहच्या आदेशाला आणि मार्गदर्शनाला रद्द करीत होते.
५८) या आयतीला समजण्यासाठी हे लक्षात ठेवले पाहिजे की अरब लोक सामान्यत: अशिक्षित होते तर यहुदी सुशिक्षित होते. त्यामुळे अरबांवर यहुदी लोकांचा शिक्षित होण्याचा प्रभाव जास्त होता. त्यांच्या पुरोहित व पंडितांनी याचा चांगलाच फायदा उठविला होता. अशा स्थितीत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांना जेव्हा इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन देणे सुरु केले तेव्हा स्वाभाविकपणे अशिक्षित अरब लोक ग्रंथधारक यहुदी लोकांकडे जाऊन याविषयी विचारणा करू लागले. ते विचारू लागले की तुम्हीसुद्धा एका पैगंबराचे अनुयायी आहात आणि एका ग्रंथाला मानतात. तुम्ही आम्हाला सांगा की हे जे आमच्यापैकी आहेत आणि पैगंबर असण्याचा दावा करतात; तर तुमचा त्यांच्या शिकवणीविषयी काय विचार आहे ? उत्तरादाखल यहुदींना हे सांगणे तर कठीण होते की पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आवाहन खोटे आहे. परंतु ते हे स्पष्ट सांगण्यास तयार नव्हते. या दोन्ही स्थितीतून त्यांनी एक मार्ग काढला की,  प्रत्येक प्रश्नकर्त्याच्या मनात पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या ध्येयाविरोधात भ्रम निर्माण करू लागले. एखादा खोटा आरोप पैगंबर मुहम्मद (स) यांच्यावर लावला जात असे. काही असे कुंभाड रचत की लोकांच्या मनात शंकाकुशंका निर्माण व्हाव्यात. त्यांची हीच कपट-कारस्थानं होती ज्यामुळे त्यांना सांगितले जात आहे, ""सत्यावर असत्याची आवरणे टाकू नका'' आपल्या खोट्या प्रचाराने आणि खोडसाळ आक्षेपांनी सत्याला दाबून टाकण्याचे प्रयत्न करू नका व सत्य व असत्याची सरमिसळ करून जगाला धोका देऊ नका.

[next]त्यांच्यासोबत तुम्हीही झुका. (४४) तुम्ही तर इतरांना सन्मार्गाचा अंगीकार करण्यास सांगता परंतु स्वतःला मात्र विसरता? वास्तविक तुम्ही ग्रंथाचे वाचन करीत आहात. काय तुम्ही बुद्धीचा मुळीच उपयोग करीत नाही? (४५) संयम व नमाजाचे६० सहाय्य घ्या. नि:संशय नमाज हे अत्यंत कठीण कर्म आहे. परंतु त्या आज्ञाकारी सेवकांसाठी कठीण नाही (४६) जे जाणतात की सरतेशेवटी आपल्या पालनकर्त्याला भेटावयाचे आहे  आणि  त्याच्याचकडे  परत  जावयाचे  आहे.’’६१
(४७) ‘‘हे इस्राईलच्या संततीनों! आठवण करा माझ्या अनुग्रहाची ज्याने मी तुम्हाला उपकृत केले होते. आणि जगातील सर्व जनसमूहावर श्रेष्ठत्व प्रदान केले होते.६२ (४८) आणि त्या दिवसाचे भय बाळगा जेव्हा कुणीही कुणाच्या यत्किंचितही उपयोगी पडणार नाही.
५९) नमाज आणि जकात प्रत्येक काळात इस्लामचे मूलतत्व राहिले आहेत. सर्व पैगंबरांप्रमाणे  बनीइस्राईलच्या पैगंबरांनीसुद्धा याची सक्त ताकीद केली होती; परंतु यहुदी यापासून गाफील बनले होते. सामुदायिक नमाज पठणाची परंपरा त्यांच्याजवळ नष्ट झाली होती. समाजात वैयक्तिकरित्या नमाजचे प्रचलनसुद्धा बंद झाले होते आणि जकात देण्याऐवजी हे लोक व्याज खाऊ लागले होते.
६०) म्हणजे तुम्हाला सन्मार्गावर चालणे कठीण जाते तर याचा उपाय नमाज आणि संयम आहे. या दोन्ही गोष्टीमुळे तुम्हाला ती ताकत प्राप्त होईल ज्यामुळे हा मार्ग सोपा होईल. "सब्र' याचा अर्थ रोखणे व बांधणे आहे. म्हणजेच हेतूची मजबूती, दृढ संकल्प आणि वासनांवर दृढ नियंत्रण ज्यामुळे मनुष्य वासनेच्या व इच्छेच्या आहारी न जाता तसेच बाह्य संकटाला न डगमगता आपल्या आंतरमनाने निश्चित केलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत जातो. अल्लाहच्या आदेशाचा अर्थ आहे की या नैतिक गुणाला आपल्या मनात रूजवा आणि बाहेरून त्याला सामर्थ्य प्रदान करण्यासाठी नमाज नियमित अदा करा.
६१) म्हणजे जी व्यक्ती अल्लाहची आज्ञाधारक नाही आणि परलोकावर श्रद्धा नाही त्याच्यासाठी नमाज असे संकट आहे ज्यास तो प्रत्येक वेळी टाळण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्याने स्वेच्छेने व आवडीने अल्लाहला समर्पित केले असेल आणि अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारली आणि ज्याचा असा विश्वास आहे की मृत्यूनंतर अल्लाहसमोर जाब द्यावा लागेल, अशा व्यक्तीला नमाज अदा करणे नव्हे तर नमाज सोडणे कठीण जाते.
६२) याचा हा अर्थ होत नाही की नेहमीसाठीच तुम्हाला जगातील इतर लोकसमुदायांपेक्षा श्रेष्ठ बनविले होते, तर एक काळ होता जेव्हा जगात तुम्ही एक समुदाय होता ज्याच्याजवळ अल्लाहने दिलेले सत्यज्ञान

[next]कुणाकडून शिफारसही स्वीकारली जाणार नाही व कुणालाही मोबदला घेऊन सोडले जाणार नाही. आणि गुन्हेगारांना कुठूनही मदत मिळू शकणार नाही.’’६३ (४९) ‘‘आठवण करा त्या वेळेची६४ जेव्हा आम्ही तुम्हाला फिरऔनी६५ सत्तेच्या गुलामगिरीतून मुक्त केले. ज्यांनी तुम्हाला भयंकर यातनेत अडकवून ठेवले होते; तुमच्या मुलांना ठार करीत होते आणि तुमच्या मुलींना जिवंत ठेवीत होते. (वास्तविक) त्या स्थितीत तुमच्या पालनकर्त्याकडून तुमची परीक्षा पाहिली जात होती.६६ (५०) आठवण करा जेव्हा आम्ही समुद्र दुभंगून तुमच्यासाठी रस्ता बनविला आणि त्यातून तुम्हाला सुखरूप पार केले. नंतर तिथेच तुमच्या डोळ्यांदेखत फिरऔनच्या लोकांना बुडवून टाकले. (५१) आठवण करा, जेव्हा आम्ही मूसा (अ.)
होते आणि तुम्हाला जगाचे नेतृत्व बहाल केले होते. हे याचसाठी होते की तुम्ही लोकांना अल्लाहकडे बोलवावे आणि सर्वांना सत्य मार्गाकडे बोलवावे व चालवावे.
६३) बनीइस्राईलच्या बिघाडाचे एक अतिमहत्वाचे कारण हे होते, की त्यांची परलोकजीवनाची श्रद्धा विकृत झाली होती. ते चुकीच्या समजुतीत होते की आम्ही अत्यंत प्रतिष्ठित पैगंबरांची संतती आहोत आणि मोठमोठे संत, समाजसुधारक व ईशपरायण लोकांशी संबंधित आहोत. म्हणुन आमच्या मुक्तीसाठी हेच पुरेसे आहे. याच खोट्या विश्वासामुळे ते लोक सत्य मार्गापासून गाफील झाले आणि गुन्ह्यांच्या चक्रव्यूहात अडकले. म्हणून त्यांच्यावरील कृपेचे स्मरण करून त्वरित त्यांच्या गैरसमजुतीला दूर केले गेले.
६४) येथून पुढे अनेक प्रभागांपर्यंत (आयत ४९ ते १२३ पर्यंत) बनीइस्राईलच्या महत्वाच्या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख आला आहे, या प्रसिध्द ऐतिहासिक घटनांना या समाजातील प्रत्येकजण जाणून होता. म्हणून तपशील सांगण्याऐवजी एक एक घटनेकडे संक्षिप्तपणे इशारा करण्यात आला आहे. या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करण्यामागे हा उद्देश आहे की एकीकडे हे अल्लाहने केलेले, असंख्य उपकार आणि अनंत कृपा, आणि दुसरीकडे अनेक अशी कुकृत्ये आहेत जे या उपकाराच्या बदल्यात तुम्ही करत आहात.
६५) "आलेफिरऔन' म्हणजे फिरऔनचे कुटुंब आणि इजिप्तचा शासकवर्ग या दोन्हींचा समावेश होतो.
६६) परीक्षा अशी की तुम्ही त्या भट्टीतून विशुद्ध सोने बनून बाहेर येता किंवा खोटे ठरता आणि परीक्षा या गोष्टीची की इतक्या महानतम संकटातून चमत्कारिकरित्या तुम्हाला सोडवल्यानंतरही तुम्ही अल्लाहचे कृतज्ञ व आज्ञाधारक दास बनून राहता किंवा नाही.

[next]यांना चाळीस रात्रींच्या करारावर बोलविले६७ तेव्हा तुम्ही त्याच्या मागे वासराची पूजा६८ केलीत. तेव्हा तुम्ही घोर अत्याचार केलात. (५२) परंतु तरीही आम्ही तुम्हाला क्षमा केली जेणेकरून तुम्ही कृतज्ञ व्हाल.
(५३) आठवण करा (जेव्हा तुम्ही हा अत्याचार करीत होतात तेव्हा) आम्ही मूसाला ग्रंथ व सत्यासत्यतेची कसोटी६९ प्रदान केली होती, जेणेकरून त्याव्दारे तुम्ही सन्मार्ग प्राप्त करू शकाल.(५४) आठवण करा जेव्हा मूसा (अ.) (हा कृपाप्रसाद घेऊन परतला तेव्हा तो) आपल्या लोकांना म्हणाला , ‘‘लोकहो! तुम्ही वासराला उपास्य ठरवून स्वत:वर भयंकर अत्याचार केलात. तेव्हा तुम्ही आपल्या निर्मात्याच्या पुढे पश्चात्ताप व्यक्त करा आणि आपल्या लोकांना मारा७० (ज्यांनी हा घोर अन्याय केला) यातच तुमच्या पालनकर्त्यापाशी तुमचे भले आहे. त्यावेळी तुमच्या निर्मात्याने तुमचा पश्चात्ताप स्वीकारला. तो अत्यंत क्षमावंत
६७) म्हणजे इजिप्तहून बाहेर पडल्यानंतर जेव्हा बनीइस्राईलचे लोक सीना प्रदेशात आले तेव्हा अल्लाहने मूसा (अ.) यांना चाळीस दिवसांसाठी "तूर' या पर्वतावर बोलावून घेतले होते. जेणेकरून त्या समाजाकरिता जो आता स्वतंत्र होता, अल्लाह त्यांना आचारसंहितेचे कायदे आणि व्यावहारिक जीवनाविषयी मार्गदर्शन देणार होता आणि जीवनपध्दतीविषयीचे काही निर्देश देणार होता  (पाहा बायबल, पुस्तक निर्गमन, अध्याय २४ ते ३१)
६८) गाय आणि बैलांना ईश्वर मानून त्यांच्या पूजेची परंपरा बनीइस्राईलच्या शेजारी लोकांत व जवळपासच्या लोकांत पसरलेली होती. इजिप्त व कनान देशात ही प्रथा जोरात प्रचलित होती. आदरणीय पैगंबर यूसुफ (अ.) यांच्यानंतर बनीइस्राईल जेव्हा अध:पतित झाले व कालांतराने किब्ती समुदायाचे गुलाम बनले होते, तेव्हा त्यांनी इतर विकृतीसह आपल्या शासकवर्गाची ही कुप्रथा स्वीकारली होती (वासरू पूजनाचा हा वृत्तान्त पाहा बायबल, निर्गमन प्रकरण ३२)
६९) "फुरकान' म्हणजे कसोटी ज्याद्वारे सत्य व असत्य या दोहोंत फरक स्पष्ट केला जातो. म्हणजे धर्माचे ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य सत्य व असत्य जाणून घेतो.
७०) म्हणजे आपल्या त्या माणसांना ठार करा. ज्यानी वासराला पूज्य बनवून त्याची पूजा केली.

[next]आणि दयावंत आहे. (५५) आठवण करा जेव्हा तुम्ही मूसाला सांगितले होते की, आम्ही तुमच्या सांगण्यावर कदापि विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत आमच्या डोळ्यांनी उघडपणे अल्लाहला (तुझ्याशी बोलताना) पाहात नाही. त्यावेळी एका कडकडाटाने तुम्हाला गाठले आणि (५६) तुम्ही अचेत होऊन कोसळलात. परंतु आम्ही तुम्हाला पुन्हा सचेत उभे केले जेणेकरून या उपकारानंतर तरी तुम्ही कृतज्ञ राहाल.७१
(५७) आम्ही तुमच्यावर ढगांची सावली केली.७२ ‘मन्न’ आणि ‘सल्वा’चे अन्न तुम्हाला उपलब्ध करून दिले.७३ तेव्हा तुमच्यासाठी ज्या पवित्र वस्तू तुम्हाला प्रदान केल्या आहेत त्याचा उपभोग घ्या. (परंतु तुमच्या पूर्वजांनी) जे काही केले तो त्यांनी आमच्यावर केलेला अत्याचार नसून त्यांनी स्वतःच त्यांच्यावर अत्याचार केला होता.
७१) हा संकेत ज्या घटनेकडे केला आहे त्याचा खुलासा असा आहे की, चाळीस दिवसांसाठी आदरणीय पैगंबर मूसा (अ.) तूर पर्वऱ्या वर गेले होते तेव्हा त्यांना आदेश देण्यात आला होता की बनीइस्राईलचे सत्तर प्रतिनिधीसुद्धा बरोबर घेऊन यावे. अल्लाहने जेव्हा मूसा (अ.) यांना ग्रंथ आणि कसोटी दिली तेव्हा त्यांनी तिला त्या प्रतिनिधींसमोर ठेवले. या घटनेसंदर्भात कुरआनचे स्पष्टीकरण आहे की त्यांच्यातील काही खोडसाळ लोक म्हणाले की, केवळ तुमच्या म्हणण्यास्तव आम्ही कसे मान्य करावे की अल्लाहने तुमच्याशी संवाद केला. यावर अल्लाहचा कोप झाला आणि त्यांना शिक्षा दिली गेली. परंतु बायबलचे म्हणणे आहे, ""त्यांनी इस्राईलच्या देवाला पाहिले. त्याच्या पायाखाली निलम दगडांचा चबुतरा होता जो आकाशासारखा प्रखर होता. त्याने बनीइस्राईलच्या स‚ानांवर आपला हात ठेवला नाही. त्यांनी देवाला पाहिले आणि खाल्ले व प्‌याले.'' (निर्गमन, प्रकरण २४, श्लोक नं. १०-११) मात्र विपर्यास असा आहे की याच ग्रंथात पुढे म्हटले आहे, जेव्हा पैगंबर मूसा (अ.) यांनी म्हटले, ""हे देवा, मला तुझे दर्शन दे.'' त्यावर देवाने सांगितले, ""तू मला पाहू शकत नाही,'' (निर्गमन, प्रकरण ३३, श्लोक १८-२३)
७२) म्हणजे सीना प्रदेशात उन्हापासून बचाव करण्यासाठी काहीएक आश्रय तुमच्यासाठी नव्हता. तेव्हा आम्ही ढगांचे आच्छादन करून तुमचा बचाव केला होता. या ठिकाणी हे लक्षात असावे की बनीइस्राईल लोक लाखोंच्या संख्येने इजिप्तहून बाहेर पडले होते आणि सीना प्रदेशात राहण्यासाठी घरे तर सोडाच त्यांच्याकडे तंबूसुद्धा नव्हते. त्यावेळी जर अल्लाहने दीर्घकाळ आकाशात ढगांचे आच्छादन केले नसते तर ते सर्व लोक तळपत्या उन्हामुळे नष्ट झाले असते.
७३) "मन्न व सलवा' एक नैसर्गिक खाद्य होते जे सतत चाळीस वर्ष स्थलांतरित काळात त्या लोकांना मिळत होते. मन्न हे धण्याच्या बीसारखी वस्तू होती, जी दवबिंदूप्रमाणे  वरून जमिनीवर पडून जमा

[next](५८) आठवण करा जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितले होते की, जी वस्ती७४ तुमच्यासमोर आहे त्यामध्ये दाखल व्हा. तिथे जे उत्पन्न होते त्याचा मनसोक्त उपभोग घ्या परंतु वसाहतीच्या दरवाजातून नतमस्तक होऊन प्रवेश करा आणि ‘हित्ततून’ ‘हित्ततून’७५ म्हणत जा. आम्ही तुमच्या अपराधांना दुर्लक्षित करू आणि सदाचाऱ्यांना खूप कृपा व दयेने उपकृत करू. (५९) परंतु जी गोष्ट त्यांना सांगितली होती तिला अत्याचाऱ्यांनी बदलून वेगळीच बनविली. सरतेशेवटी अत्याचार करणाऱ्यांविरूद्ध आम्ही आकाशातून प्रकोपाचा वर्षाव केला. ही शिक्षा होती त्या अवज्ञाकारांसाठी जी ते करीत होते.
(६०) आठवण करा जेव्हा मूसा (अ.) यांनी आपल्या लोकांसाठी पाणी मिळावे म्हणून प्रार्थना केली तेव्हा आम्ही सांगितले,
  व्हायची आणि सलवा बटेरसारखे लहानलहान पक्षी होते. अल्लाहच्या कृपेने हे विपुल प्रमाणात उपलब्ध होते म्हणून ते एका पूर्ण राष्ट्राचे (बनीइस्राईल) जीवन खाद्य होते. यामुळे कधीच उपासमारीची त्यांच्यावर वेळ आली नाही. आज एखाद्या राष्ट्रात अचानक काही लाख शरणार्थ लोक आले तर त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न बिकट बनतो. (निर्गमन, प्रकरण १६ : १-३६ पाहा गिनती ११:७-९ व ३१-३२)
७४) अद्याप शोध लागला नाही की या वस्तीने अभिप्रेत कोणती वस्ती आहे. ज्या संदर्भात हे स्पष्टीकरण आलेले आहे त्यावरून असे कळते की तो काळ बनीइस्राईलच्या सीना प्रदेशात वास्तवाचाच काळ होता. बहुदा हे त्याच सीना प्रदेशातील एखादे शहर असावे. ही पण शक्यता आहे की याने अभिप्रेत "शत्तीम' शहर असावे, जे यरोहोसमोर जॉर्डन नदीच्या पूर्वेला समुद्रकिनारी वसलेले होते. बायबलचे वर्णन आहे की बनीइस्राईलच्या लोकांनी पैगंबर मूसा (अ.) यांच्या जीवनाच्या शेवटी या शहराला जिंकून ताबा मिळविला होता. त्यांनी तिथे अतोनात दुराचार केला म्हणून अल्लाहचा त्यांच्यावर कोप (महामारी) कोसळला त्यात चोवीस हजार लोक ठार झाले होते. (गिनती-२५, श्लोक १-८)
७५) म्हणजे आदेश होता की अन्यायी व अत्याचारी विजेत्यासारखे उद्दामपणे दाखल न होता, ईशभीरू दासांसारखे नम्रतापूर्वक दाखल व्हा जसे पैगंबर मुहम्मद (स.) मक्का विजयानंतर मक्का शहरात दाखल झाले होते. "हित्ततून' या शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतात. एक म्हणजे आपल्या अपराधांची क्षमायाचना अल्लाहजवळ करीत करीत जा. दुसरा म्हणजे लुटमार व मानव संहार न करता शहरातील लोकांना सार्वजनिक माफी देऊन प्रवेश करावा.

[next]‘‘अमुक खडकावर आपली काठी मारा’’ त्यामुळे बारा स्रोत७६ उसळून आले. आणि प्रत्येक टोळीने ओळखले की कोणता पाणवठा आपल्यासाठी आहे. (त्यावेळी हे मार्गदर्शन केले होते की) अल्लाहने दिलेल्या उपजीविकेचा उपभोग घ्या आणि पृथ्वीवर अनाचार माजवत फिरू नका.
(६१) आठवण करा, जेव्हा तुम्ही सांगितले होते की, ‘‘हे मूसा! आम्ही एकाच प्रकारच्या अन्नाचा उपभोग घेऊन संयम करू शकत नाही. आपल्या पालनकर्त्याकडे याचना करा की आमच्यासाठी जमिनीमधून पिके, भाजीपाला, गहू, लसूण, कांदा, डाळी वगैरे उत्पन्न करावे.’’ तेव्हा मूसा (अ.) ने सांगितले, ‘‘एक उत्तम प्रकारच्या वस्तूऐवजी तुम्ही कनिष्ठ दर्जाच्या वस्तू घेऊ इच्छिता?’’७७ ठीक, कोणत्यातरी शहरी वस्तीमध्ये जाऊन राहा, जे काही तुम्ही मागता ते तिथे मिळेल.’’ सरतेशेवटी इतकी पाळी आली की त्यांच्यावर अपमान, अधोगती व दुर्दशा ओढवली. आणि
७६) (हा पर्वत अद्याप सीना द्वीपावर आहे. पर्यटक त्याला पहावयास जातात. त्यात झऱ्यांच्या निशाण्या आहेत. ) बारा (१२) झऱ्यांच्या प्रयोजनामागे हेतू हा होता की बनीइस्राईलच्या बाराच (१२) टोळ्या होत्या. अल्लाहने प्रत्येक कबिल्यासाठी एक स्वतंत्र झरा निर्माण केला जेणेकरून त्यांच्या दरम्यान पाण्यावरून भांडणतंटा होऊ नये.
७७) हा अर्थ नाही की मन्न आणि सलवा जे सहजासहजी मिळत आहे त्यास सोडून ते मागत आहात ज्यांच्यासाठी शेतीवाडी करावी लागते. अर्थ हा आहे की ज्‌या महान उद्देशासाठी तुम्हाला वाळवंटात भटकंती करविली जात आहे ते सोडून तुम्ही लालसेत पडून या महान उद्देशाला विसरून जात आहात? आणि काय या क्षुल्लक गोष्टींचा तात्पुरता त्याग त्या महान उद्देशासाठी तुम्ही सहन करू शकत नाही? (पाहा गिनती, अध्याय ११, श्लोक ४-९)

[next]ते अल्लाहच्या कोपाने वेढले गेले. हा परिणाम यामुळेच झाला की, अल्लाहच्या आयतींशी ते द्रोह करू लागले७८ आणि पैगंबरांची नाहक हत्या करू७९ लागले. हे यामुळेच घडले की त्यांनी अवज्ञा केली आणि शरिअत कायद्याचे वारंवार उल्लंघन केले.
(६२) नि:संशय जे मुहम्मद (स.) यांच्यावर श्रद्धा ठेवणारे असोत. तसेच यहुदी, इसाई किंवा साबिईन असोत जे जे कोणी अल्लाह व मरणोत्तर जीवनावर श्रद्धा ठेवतील आणि सत्कर्मे करतील त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्यापाशी आहे. त्यांना न कोणते भय असेल न ते कधी शोक करतील.८०
७८) आयतींचा इन्कार करण्याचे अनेक रूपे आहेत. उदा. अल्लाहच्या अवतरित शिकवणींपैकी ज्या आपल्या इच्छेविरुद्ध आहेत त्यांचा स्पष्ट इन्कार केला. दुसरे म्हणजे एका गोष्टीला हे जाणूनसुद्धा की ती अल्लाहने सांगितली आहे, पूर्ण धिटाईने व बंडखोरीने त्याविरुद्ध केले आणि अल्लाहच्या आदेशाची काही एक पर्वा केली नाही. तिसरा प्रकार म्हणजे अल्लाहच्या अवतरित शिकवणींना चांगल्या प्रकारे जाणून व उमजून घेऊनसुद्धा आपल्या इच्छेनुसार त्यात फेरबदल केला.
७९) बनीइस्राईलनी आपल्या या अपराधाला आपल्या इतिहासात स्वत: तपशीलवार नमूद केले आहे. (पाहा, जकरिया पैगंबराला हैकल सुलैमानी मध्ये दगडांनी ठेचून मारण्याचा प्रसंग, (२ इतिहास-२४ : २१) यरमिहा पैगंबराला कैद करून दोरखंडाने बांधून मारझोड करून व बंदिस्त करून गाळाने भरलेल्या विहिरीत लटकवून ठेवण्याचा प्रसंग. (पाहा यरमिहा प्रकरण १५, १०, १८, २०-२३, २०: १ ते १८, प्रकरण ३६ ते ४०) पैगंबर यहया (योहना) यांच्या पवित्र शिराला तत्कालिन बादशाहाच्या प्रेयसीच्या इच्छेखातर धडा वेगळा करून तिच्यापुढे नजराणा देण्याची घटना (मरकुस ६ : १७-२९) स्पष्ट आहे की, ज्या लोकांनी आपले नेतृत्व नालायक व दुराचारींच्या सुपूर्द केले व याउलट सुधारक व पुण्यवान लोकांना कैदेत टाकले आणि फासावर लटकवले, अशा लोकांना अल्लाहने आपल्या धिक्कारासाठी निवडले नसते तर शेवटी काय केले असते?
८०) हे वृत्तान्त समोर ठेवल्यावर ही गोष्ट स्पष्ट होते की येथे इमान आणि सदाचाराचा तपशील देणे हा उद्देश नाही. कोणकोणत्या गोष्टी माणसाने कराव्यात आणि कोणते आचरण करावे जेणेकरून अल्लाहजवळ त्याला मोबदला मिळेल, हे पुढे तपशीलाने स्पष्ट केले जाईल. येथे यहुदींच्या असण्याप्रती असलेल्या दुराग्रहाचे खंडन अभिप्रेत आहे की ते फक्त यहुद्यांनाच मुक्तीस पात्र समजत होते. या भ्रमात ते होते की त्यांच्याशी अल्लाहचे खास संबंध आहेत जे इतरांशी नाहीत. परिणामी जो त्यांच्या समूहाशी संबधित आहे, त्याची श्रद्धा आणि आचरण भल कसेही असोत, त्याला मुक्ती मिळणारच आणि इतर सर्व लोक जे   त्यांच्या   समुदायाव्यतिरिक्त   आहेत,  ते   केवळ  नरकाग्नीसाठीच  निर्मिले  आहेत. या  भ्रमाला  दूर

[next](६३) आठवा तो प्रसंग, जेव्हा आम्ही तूर पर्वताला तुमच्यावर अधांतरी उचलून धरले व तुमच्याकडून पक्के वचन घेतले आणि सांगितले,८१ ‘‘जो ग्रंथ आम्ही तुम्हाला देत आहोत त्यानुसार आचरण करण्याच्या दृढ निश्चयाने त्याचा स्वीकार करा आणि जे आदेश त्यामध्ये दिले आहेत त्याचे स्मरण ठेवा. जेणेकरून तुम्ही धर्मपरायणतेच्या मार्गावर चालू शकाल’’. (६४) परंतु त्यानंतर तुम्ही आपल्या वचनाकडे पाठ फिरवली तरीदेखील अल्लाहचा अनुग्रह आणि त्याच्या दयेने तुमची साथ सोडली नाही अन्यथा तुम्ही केव्हाच उद्ध्वस्त झाला असतात. (६५) तसेच तुम्हाला आपल्या जमातीपैकी त्या लोकांची गोष्ट तर माहितच आहे ज्यांनी सब्तच्या८२ नियमाचा भंग केला होता. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले,‘‘माकडे व्हा आणि अशा अवस्थेमध्ये राहा की सर्व बाजूंनी तुमचा धिक्कार होवो.’’८३ (६६) अशा तNहेने आम्ही त्यांच्या झालेल्या परिणामांना तत्कालीन लोकांसाठी आणि नंतर
करण्यासाठी सांगितले गेले की अल्लाहजवळ तुमच्या जात व वंशाला महत्व नाही. तेथे तर महत्व ईमान आणि सदाचारालाच आहे. जो कोणी या गोष्टी घेऊन हजर होईल तो अल्लाहकडून आपला मोबदला प्राप्त करील. अल्लाहजवळ न्यायनिवाडा माणसाच्या गुणानुसार होईल, तुमच्या जनगणनेच्या नोंदीनुसार नव्हे.
८१) या घटनेला कुरआनमध्ये निरनिराळ्या ठिकाणी ज्याप्रकारे स्पष्ट केले गेले आहे त्यावरून कळून येते की त्याकाळी बनीइस्राईल लोकांमध्ये ही घटना प्रसिद्ध होती. आता त्याचा खुलासा व तपशील माहीत करून घेणे अशक्यप्राय आहे. संक्षिप्तपणे असे समजावे की डोंगराच्या कुशीत वचन घेताना भयावह स्थिती निर्माण केली गेली होती जेणेकरून त्यांना वाटावे की डोंगर त्यांच्यावर येऊन कोसळेल. असाच प्रसंग सूरह आअराफ आयत नं. १७१ मध्ये आला आहे. (पाहा सूरह ७ (आअराफ), टीप १३२)
८२) सब्त म्हणजे शनिवारचा दिवस. बनीइस्राईलसाठी हे विधीवत केले होते की त्यांनी शनिवारचा दिवस विश्रांती आणि उपासनेसाठी राखीव ठेवावा. त्या दिवशी कोणत्याही प्रकारचे ऐहिक काम अगदी खाणे व स्वयंपाक स्वत:ही बनवू नये आणि नोकरांकडूनही करून घेऊ नये. याविषयी सक्त ताकीद होती की जो कोणी या दिवसाचे पावित्र्य भंग करील, तो मृत्यूदंडास पात्र ठरेल. (निरगमन, प्रकरण ३१, श्लोक १२-१७) मात्र जेव्हा बनीइस्राईलच्या नैतिक व धार्मिक अध:पतनाचा काळ आला तेव्हा ते राजरोस शनिवारचे पावित्र्य भंग करू लागले येथपावेतो की शहरामध्ये त्या पवित्र दिवशी (सब्त) खुलेआम व्यापार होऊ लागला.
८३) या घटनेचा तपशील पुढे सूरह आअराफ मध्ये (७:१६३-१६४)आलेला आहे. त्यांना माकड बनविण्याच्या  घटनेबद्दल  विवाद आहे. काहींचे म्हणणे आहे  की  त्यांचे  शरीर  बिघडवून

[next]येणाऱ्या पिढ्यांसाठी बोध आणि शिकवण बनवून ठेवली.
(६७) नंतर तो प्रसंगही आठवा जेव्हा मूसाने आपल्या लोकांना सांगितले की अल्लाह तुम्हाला एका गाई जुब्ह (कापणे) करण्याचा आदेश देत आहे. तेव्हा ते म्हणू लागले, ‘‘तुम्ही आमची थट्टा करता काय? तेव्हा मूसा म्हणाला की असे अज्ञानी कृत्य करण्यापासून (परावृत्त राहण्यासाठी) मी अल्लाहकडे शरण मागतो. (६८) तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे. आपल्या पालनकर्त्याकडे प्रार्थना करा की त्याने गाईविषयी सविस्तर सांगावे. मूसाने म्हटले, ‘‘अल्लाहचा आदेश आहे की, गाय न वृद्ध असावी न अतिलहान किंबहुना मध्यम वयाची हवी. आता ईशआज्ञेचे अनुपालन करा.’’ (६९) म्हणू लागले ‘‘अल्लाहला पुन्हा विचारा, तिचा रंग कसा असावा?’’ मूसा (अ.) ने सांगितले, ‘‘अल्लाहची इच्छा आहे, पिवळ्या जर्द रंगाची गाय हवी की पाहणाऱ्यांचे मन प्रसन्न व्हावे.’’ (७०) पुन्हा म्हणू लागले, ‘‘अल्लाहला स्पष्ट विचारून सांगा की, गाय कशी असावी? आम्ही तिच्यासंबंधी संभ्रमात आहोत. अल्लाहने इच्छिले तर आम्ही ती शोधून काढू’’. (७१) मूसाने उत्तर दिले, ‘‘अल्लाह फर्मावितो की ती गाय अशी असावी जी राबविण्यांत आलेली नसेल किंवा जमीनही नांगरत नसेल अथवा पाणीही उपसत नसेल, धष्टपुष्ट परंतु डाग नसलेली असावी.
करण्यात आले होते तर काही जण म्हणतात की त्यांच्यामध्ये माकडांचे गुण निर्माण झाले होते. परंतु कुरआनातील शब्द आणि वर्णनशैलीने हेच स्पष्ट होत आहे की हा बदल मानसिक नव्हता तर शारीरिक होता. मलासुद्धा असेच वाटते की त्यांची बुद्धी पूर्ववतच ठेवली गेली मात्र शरीर बिघडवून माकडाप्रमाणे केले गेले.

[next]त्यावर ते म्हणाले, ‘‘होय, आता तुम्ही ठीक ठीक सांगितलेत. त्यानंतर त्यांनी तिला जुब्ह (कापले) केले. एरव्ही ते असे करतील असे वाटले नव्हते.८४ (७२) तुम्हाला आठवतो तो प्रसंग जेव्हा तुम्ही एका व्यक्तीचे प्राण घेतले होते. मग तिच्यासंबंधी भांडू लागला होतात व एकमेकांवर खुनाचा आरोप ठेवू लागला होतात, आणि अल्लाहने निर्णय घेतला होता की जे काही तुम्ही लपवीत आहांत तो ते उघडकीस आणील.   (७३) त्यावेळेस आम्ही आज्ञा केली की खून झालेल्या व्यक्तीच्या शवाला तिच्या एका भागाने आघात करा. पाहा, अशाप्रकारे अल्लाह मृतांना पुन्हा जिवंत करतो आणि तुम्हाला आपल्या निशाण्या दाखवितो जेणेकरून तुम्ही समजावे.८५ (७४) परंतु अशा निशाण्या पाहूनदेखील शेवटी तुमची हृदये कठोर झाली, अगदी दगडाप्रमाणे कठोर. किंबहुना कठोरतेमध्ये त्यापेक्षाही अधिक. कारण दगडांमध्ये एखादा असा असतो ज्याला
८४) बनीइस्राईलींना इजिप्तवासी आणि आजूबाजूच्या लोकांमुळे गाईला पूजनीय व पवित्र समजून गाई पूजनाची लागण झाली होती आणि याकारणास्तव त्यांनी इजिप्तहून बाहेर पडल्यावर लगेच एका वासराला पूज्य बनविले. म्हणून त्यांना आदेश दिला गेला की गाईला जुबाह करावे. ही अत्यंत कठोर परीक्षा होती. त्यांच्या मनात पूर्णपणे ईमान परिपूर्ण नव्हते. म्हणून त्यांनी टाळण्याचा प्रयत्न केला आणि गाईसंबंधी तपशील विचारू लागले. परंतु जितका तपशील व खुलासा ते विचारत गेले तितकेच ते अडकत गेले. सरतेशेवटी त्याच विशिष्ट सोनेरी गायीकडे जिची त्याकाळी पूजा होत होती, निर्देश केला गेला की ही गाय जुबह करा. बायबलमध्येसुद्धा या घटनेचा उल्लेख आला आहे. परंतु तिथे बनीइस्राईल लोकांनी टाळण्याचा जो प्रयत्न केला त्याचा उल्लेख आला नाही. (पाहा गिणती, प्रकरण १९, श्लोक १ - १०)
८५) या ठिकाणी हे स्पष्ट होते की ठार केलेल्या व्यक्तीला एवढ्या वेळेपुरते पुन्हा जिवंत केले गेले की त्याने खुन करणाऱ्याचे नाव सांगावे. मात्र यासाठी जी युक्ती केली गेली अर्थात प्रेताच्या शरीराला तिच्या एका भागाने जरब लावावी, हे शब्द काहीसे अस्पष्ट वाटतात. तरीसुद्धा याचा निकटचा अर्थ तोच आहे जो अनेक भाष्यकारांनी सांगितला आहे. म्हणजे वर उल्लेखित ज्या गाईला जुबह करण्याचा आदेश दिला गेला तिच्या मांसाच्या तुकड्याने ठार केलेल्या व्यक्तीच्या प्रेतावर आघात करावा. अशाप्रकारे एका दगडात दोन पक्षी मारले गेले. एक अल्लाहच्या सामर्थ्याची निशाणी त्यांना दाखविली गेली. दुसरे, असे की गाईचे श्रेष्ठत्व, पावित्र्य व तिच्या पूज्य असण्यावरही कठोर आघात करण्यात आला. या तथाकथित उपास्याजवळ थोडेदेखील सामर्थ्य असते तर तिला जुबह केल्यामुळे एक मोठे संकट कोसळले असते. उलट तिला जुबह करून खुन्याचा शोध लागला, हे फायद्याचेच ठरले.

[next]पाझर फुटतो. आणि फुटून त्यामधून पाणी बाहेर पडते. व अल्लाहच्या भयाने तो खालीही कोसळतो. अल्लाह तुमच्या कारवायांपासून अनभिज्ञ नाही. (७५) हे मुस्लिमांनो! काय तुम्ही या लोकांकडून अशी अपेक्षा करता की हे तुमच्या आवाहनावर ईमान धारण करतील?८६ वास्तविक यांच्यापैकी एका गटाची प्रवृत्ती अशी आहे की अल्लाहची वाणी त्यांनी ऐकली आणि त्यानंतर चांगल्याप्रकारे समजून उमजूनदेखील हेतुपुरस्सर तिला विकृत केले.८७ (७६) (अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर) ईमान धारण करणाऱ्यांना जेव्हा हे भेटतात तेव्हा म्हणतात,‘‘आम्हीदेखील ईमानधारक आहोत.’’ परंतु जेव्हा
८६) हे संबोधन  मदीनेतील त्या नवमुस्लिमांशी आहे ज्यांनी नुकताच इस्लामचा स्वीकार केला होता. त्यांना पैगंबर,  ईशदूत, परलोक, धर्मशास्त्र व ग्रंथविषयी अगोदरच शेजारील यहुद्यांकडून माहिती प्राप्त झाली होती. हेसुद्धा त्यांनी यहुद्यांकडूनच ऐकले होते की जगात आणखी एक  पैगंबर येणार आहे. जे लोक त्याला साथ देतील ते संपूर्ण जगावर अधिपत्य गाजवतील. याच आधारवर त्यांना (नवमुस्लिमांना) आशा होती की जे पूर्वपासून ईशग्रंथ व  पैगंबरांचे अनुयायी आहेत (म्हणजे यहुदी) आणि ज्यांच्या माहितीवरच आम्ही मुस्लिम बनलो आहोत, ते जरूर आम्हाला साथ देतील. नव्हे ते पुढाकार घेतील व  पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुयायित्व स्वीकारतील. याच अपेक्षा घेऊन हे जोशीले नवमुस्लिम आपल्या यहुदी मित्र आणि शेजाऱ्यांकडे जात असत आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याचे आवाहन करत असत. मात्र जेव्हा ते या आवाहनाला नाकारत असत तेव्हा दांभिक आणि इस्लामचे विरोधक त्या आधारे हा दावा करीत की प्रकरण काही संदिग्धच आहे. जर हे खरेच  पैगंबर असते तर जाणकार यहुद्यांनी त्यांना का स्वीकारले नाही आणि निष्कारण आपले पारलौकिक जीवन धोक्यात का आणले? या आधारे बनीईस्राइलींच्या इतिहासाचे वर्णन केल्यानंतर या साध्याभोळ्या मुस्लिमांना सांगितले जात आहे की ज्यांचा इतिहास असा काही आहे, त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा बाळगू नये. जेव्हा हे पाषाणöदयी लोक तुमच्या आवाहनाला नाकारतील तेव्हा तुमची मने दुखावतील. हे लोक तर शतकांपासून बिघडलेले आहेत. अल्लाहच्या ज्या आयतींना ऐकूण तुमचा थरकाप होतो, त्याच आयतींची टिंगलटवाळी करताना यांच्या पिढ्या गेल्या. सत्य धर्माला विकृत करून यांनी आपल्या वासनानुरूप बनविले आहे आणि याच विकृत धर्माकडून ते मुक्तीची आशा लागून आहेत, यांच्याकडून ही अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे की, सत्य आवाहन कानावर पडताच त्याच्या समर्थनार्थ हे चोहोकडून धावत येतील.
८७) एका गटाने अभिप्रेत त्यांच्यातील धर्मपंडित व धर्माधिकारी आहेत. ते विज्ञानी आणि धर्ममार्तंड लोक आहेत. अल्लाहची वाणी म्हणजे तौरात ग्रंथ, जबुर आणि इतर ईशग्रंथ आहेत जे त्या लोकांना त्यांच्या  पैगंबरांकरवी प्राप्त झाले होते. "तहरीफ' म्हणजे विकृत करणे. मूळ गोष्टीला आपल्या फायद्यासाठी  बदलून  टाकणे व अर्थाचा अनर्थ करणे. बनीइस्राईली धर्मपंडितांनी ईशग्रंथाला विकृत

[next]आपसांत एकमेकांशी एकांतात बोलतात तेव्हा म्हणतात, ‘‘काय मूर्ख झालांत?’’ या लोकांना त्या गोष्टी सांगता ज्या अल्लाहने तुम्हांवर उघड केल्या आहेत की ज्यामुळे त्यांनी तुमच्या पालनकर्त्याजवळ तुमच्या विरोधात त्या प्रमाणस्वरुप सादर कराव्यात?८८      (७७) काय हे जाणत नाहीत की जे काही ते लपवितात आणि जे काही ते प्रकट करतात ते सर्वकाही अल्लाह जाणतो आहे? (७८) यांच्यामध्ये दुसरा एक गट निरक्षरांचा आहे. ज्यांना धर्मग्रंथाचे ज्ञान तर नाहीच, फक्त आपल्या निराधार इच्छा-आकांक्षांना ते कवटाळून बसले आहेत आणि केवळ भ्रामक कल्पनेंत भरकटत चालले आहेत.८९ (७९) तेव्हा त्या लोकांचा विनाश व विध्वंस आहे जे आपल्या हातांनी ग्रंथ लिहितात आणि लोकांना सांगतात,‘‘हा अल्लाहकडून आलेला आहे.’’ जेणेकरून त्याच्या मोबदल्यात काही लाभ करून घ्यावा.९०
केले आहे. मूळ गोष्टीला आपल्या फायद्यासाठी आणि इच्छेनुसार बदलून टाकणे आणि त्याला विरोधी रंग चढविणे. अर्थाचा अनर्थ करणे आहे शब्दांमध्ये फेरबदल करणेसद्धा विकृती आहे. बनीइस्राईलच्या धर्मपंडितांनी ईशग्रंथामध्ये या दोन्ही प्रकारच्या विकृती केल्या आहेत.
८८) म्हणजे ते एक दुसऱ्याशी सांगत असत की तौरात आणि इतर ईशग्रंथात  पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी ज्या भविष्यवाणी आल्या आहेत, अथवा अशा शिकवणी आमच्या पवित्र धर्मग्रंथात आहेत ज्यांच्याद्वारा आमच्या आचरणाची पकड होऊ शकते त्यांना मुस्लिमांसमोर वर्णन करू नका. अन्यथा हे लोक तुमच्या रबसमोर तुमच्याच विरुद्ध प्रमाण बनवून सादर करतील. अशी अल्लाहविषयी या जालिमांच्या श्रद्धेच्या विकृतीची ही दशा होती. जणूकाही ते समजत असत की जर जगात त्यांनी आपल्या विकृतीवर आणि सत्यावर टाकलेल्या पडद्याला लपविले तर परलोकजीवनात त्यांच्यावर कारवायी होणार नाही. याचकरता नंतर आलेल्या वाक्यात त्यांना सचेत केले गेले की काय तुम्ही अल्लाहला अनभिज्ञ समजता?
८९) येथे त्यांच्या प्रजेची स्थिती सांगितली गेली. ते ग्रंथाच्या ज्ञानापासून  निव्‌वळ कोरे होते. त्यांना काहीच माहीत नव्हते की अल्लाहने आपल्या ग्रंथात कोणती शिकवण व आदेश दिले आहेत. मनुष्याचे जीवनसाफल्य कशात दडलेले आहे आणि कशामुळे त्याचा विनाश होतो. या ज्ञानाविना ते आपल्या मनाप्रमाणे व मनोकामनांच्या मागे लागून बनावटी गोष्टींना जीवन धर्म समजून बसले होते आणि खोट्या आशेवर जगत होते.
९०) हा त्यांच्या धर्मपंडितांविषयीचा उल्लेख आहे. या लोकांनी केवळ एवढेच केले नाही की ईशग्रंथाच्या अर्थाला  आपल्या  इच्छेनुसार  विकृत  केले,  तर  हेसुद्धा केले की बायबलमध्ये आपल्या भाष्यांना,

[next]त्यांच्या हातांनी हे लिहिलेलेदेखील त्यांच्यासाठी विध्वंसाची सामुग्री आहे आणि त्यांची ही कमाईदेखील त्यांच्यासाठी विनाशकारक आहे. (८०) ते म्हणतात की नरकाग्नी आम्हाला कदापि स्पर्ष करू शकणार नाही, फक्त काही थोड्या दिवसांची शिक्षा कदाचित झाली तर होईल.९१ त्यांना विचारा, ‘‘काय तुम्ही अल्लाहकडून एखादे वचन घेतले आहे जे तो भंग करू शकणार नाही? किंवा अल्लाहच्या नावावर अशा गोष्टी बोलता ज्याविषयी तुम्हाला ज्ञान नाही?’’ काय त्यांची जबाबदारी अल्लाहने घेतली आहे? तुम्हाला नरकाग्नि का शिवणार नाही. (८१) जो कोणी वाईट (कर्मे) कमवील आणि अपराधाच्या दुष्चक्रांत अडकून पडेल तो नरकवासी असेल आणि नरकामध्येच सदैव खितपत पडेल. (८२) परंतु जे ईमान धारण करतील व सदाचार करतील तेच स्वर्गात वास करणारे  असतील  आणि  ते  सदैव  स्वर्गात  राहतील.

आपल्या जातीच्या इतिहासाला, आपल्या अंधश्रद्धा आणि अटकळींना, आपल्या कल्पित तत्वज्ञानाला तसेच आपल्या तर्कानुसार घडलेल्या नियमांना ईशग्रंथाबरोबर सरमिसळ केले. या सर्व गोष्टी लोकांसमोर अशा प्रकारे मांडल्या की त्या अल्लाहतर्फे आलेल्या आहेत. प्रत्येक ऐतिहासिक कथानक, प्रत्येक भाष्यकाराचे भाष्य, प्रत्येक तत्वज्ञाची दैवीश्रद्धा, प्रत्येक धर्मशास्त्रीची शास्त्रगत धारणा, ज्यांना बायबलमध्ये स्थान मिळाले, ते सर्व ईशवाणी म्हणून प्रसिद्ध पावले. त्यावर श्रद्धा ठेवणे अनिवार्य झाले आणि त्याला नाकारणे धर्माला नाकारण्यासारखे बनले.
९१) हे यहुद्यांच्या आम गैरसमजुतीचे वर्णन आहे ज्यात त्यांचे सामान्यजन व धर्मपंडित सर्वच अडकलेले होते. ते समजत होते की आम्ही भले कसेही वागलो तरी केवळ यहुदी असल्याने नरकाग्नि आमच्यावर निषिद्ध आहे. यदाकदाचित आम्हाला शिक्षा झालीच तरी मोजक्या दिवसांसाठीच आम्हाला ती भोगावी लागेल आणि नंतर आम्ही स्वर्गात जाणारच!

[next](८३) आठवण करा, इस्राईलच्या संततीकडून आम्ही दृढ वचन घेतले होते की अल्लाहशिवाय अन्य कुणाचीही भक्ती (बंदगी) करू नका. मातापित्याशी, नातेवाईकांशी, अनाथ व गोरगरीबांशी चांगले वागा. लोकांशी चांगले बोला. नमाजचे पालन करा आणि जकात द्या. परंतु थोडे लोक वगळता तुम्ही सर्वांनी या वचनाकडे पाठ फिरवलीत. आणि अजूनही पाठ फिरवीत आहात.(८४)  तसेच आठवण करा, आम्ही तुमच्याकडून दृढ वचन घेतले होते की आपसांत एकमेकांचे रक्त सांडू नका. एकमेकांना आपल्या घरापासून बेघर करू नका. तुम्ही ते मान्यही केले होते आणि स्वत: त्याचे साक्षीही आहात. (८५) परंतु आज तुम्ही तेच आहात जे आपल्या बांधवांची हत्या करता. आपल्या बांधवांपैकी काही लोकांना देशाबाहेर काढीत आहात. अत्याचार आणि अतिरेक करून त्यांच्याविरूद्ध कटकारस्थान करता. आणि जेव्हा ते युद्धबंदी होऊन तुमच्यापुढे येतात तेव्हा त्याना बंधमुक्त करण्यासाठी आर्थिक दंड घेता. वास्तविक त्यांना घराबाहेर काढणेच तुमच्यासाठी निषिद्ध होते. तर काय तुम्ही ग्रंथाच्या एका भागावर श्रद्धा ठेवता आणि दुसऱ्या भागाला नाकारता?९२ तुमच्यापैकी
९२) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आगमनापूर्व मदीना शहराच्या आजूबाजूच्या यहुदी लोकांनी आपल्या शेजारी अरब टोळ्यांशी (औस व खजरज) मैत्रीपूर्ण संबंध ठेवले होते. जेव्हा एक अरब टोळी दुसऱ्या अरब टोळीशी युद्ध करत तर यहुदी लोक आपापल्या मित्रांना साथ देत असत आणि एक दुसऱ्यांशी युद्ध

[next]जे लोक असे करतील त्यांच्यासाठी याशिवाय अन्य कोणती शिक्षा असेल की या जगातील जीवनामध्ये अपमानित व धिक्कारीत होतील. आणि निवाड्याच्या दिवशी कठोरत्तम शिक्षेच्या दिशेने नेण्यात येईल. अल्लाह त्या कारवायांपासून अनभिज्ञ नाही ज्या तुम्ही करीत आहात. (८६) हे तेच लोक आहेत ज्यांनी मरणोत्तर जीवनाचा सौदा करून हे नश्वर जीवन खरेदी केले आहे. न याची शिक्षा कमी होईल न यांना कोणती मदत लाभेल.(८७) आम्ही मूसा (अ.) ला ग्रंथ दिला त्यानंतर सतत पैगंबर पाठविले. शेवटी मरयमपुत्र इसाला स्पष्ट संकेत देऊन पाठविले. आणि पवित्र आत्म्याद्वारे त्याला मदत केली.९३ पण तुमची ही कोणती रीत आहे की जेव्हा जेव्हा कुणी पैगंबर तुमच्या इच्छेविरूद्ध कोणती गोष्ट घेऊन तुमच्याकडे

करीत असत. हे कृत्य अल्लाहच्या आदेशाविरुद्ध (ग्रंथाविरुद्ध) होते तरी हे जाणूनसुद्धा ते विरोधी कृत्य करत असत. परंतु लढाईनंतर जेव्हा एका यहुदीला दुसऱ्या यहुदीचे युद्धकैदी सापडत असे तेव्हा ते प्रतिदान देऊन त्यांना परत करीत असत आणि या व्यवहाराला धर्मसंमत ठरविण्यासाठी  ईशग्रंथाचा प्रमाण घेतला जात असे. परंतु आपापसात युद्ध न करणारा आदेश पायदळी तुडवित असत.
९३) रूहेपाक (पवित्र आत्मा) म्हणजे दिव्य प्रकटनसुद्धा आहे आणि जिब्रिल (अ.) हे ईशदूतसुद्धा आहेत जे दिव्य प्रकटन घेऊन येत असत. तसेच आदरणीय पैगंबर इसा (अ.) यांचा पवित्र आत्मा ज्यास अल्लाहने कुदसी (पवित्र) बनविले होते. रोषण निशाणी (स्पष्ट संकेत) म्हणजे उघडउघड निशाण्या ज्यंना पाहून सत्यप्रिय मनुष्य जाणून घेत असे की इसा (अ.) अल्लाहचे पैगंबर आहेत.

[next]


 आला तेव्हा तुम्ही त्याविरूद्ध बंडखोरी केलीत, काहीना खोटे ठरविलेत तर काहींची हत्या केलीत! (८८) ते म्हणतात, ‘‘आमची हृदये सुरक्षित आहेत.’’९४ कदापि नाही! सत्य गोष्ट ही आहे की त्यांच्या द्रोहामुळे अल्लाहने त्यांना धिक्कारलेले आहे म्हणून अल्पशीच श्रद्धा ते ठेवतात. (८९) तसेच आता जो ग्रंथ अल्लाहकडून त्यांच्याकडे आला आहे त्याच्याशीही त्यांचे वर्तन कसे आहे? इतकं असूनही की तो ग्रंथ त्यांच्यापाशी आधीपासून असलेल्या ग्रंथाचे समर्थन करीत आहे आणि तो येण्यापूर्वी हे स्वत: नास्तिकांविरूद्ध विजय व मदत मिळण्यासाठी प्रार्थना करीत होते. परंतु ती गोष्ट जेव्हा आली जिला त्यांनी ओळखलेदेखील तरीही त्यांनी ती मान्य करण्यास नकार दिला.९५ अल्लाहकडून धिक्कार होवो या नाकारणाऱ्यांचा! (९०) किती वाईट साधन आहे ज्याद्वारे

९४) म्हणजे आम्ही आमच्या श्रद्धेत इतके दृढ आहोत की तुम्ही काहीही सांगा आमच्या मनावर अजिबात परिणाम होणार नाही. ही तीच गोष्ट आहे जे दुराग्रही लोक करतात ज्यांच्या मनावर व बुद्धीवर अज्ञानपूर्ण पक्षपात प्रभावित झालेले असते. यास ते दृढ श्रद्धा म्हणून एक गुणविशेष म्हणत असत, परंतु यापेक्षा मोठा दुर्गुण मनुष्याचा असू शकत नाही की तो आपल्या पूर्वजांच्या विश्वासांवर आणि विचारसरणीवर दृढ राहतो जरी या श्रद्धेला कितीही पुराव्यानिशी असत्य सिद्ध केले . ९५) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आगमनापूर्व यहुदी बेचैन होऊन त्या पैगंबराच्या प्रतिक्षेत होते ज्यांची भविष्यवाणी त्यांच्या पैगंबरांनी सांगितली होती. ते प्रार्थना करीत असत की लवकर तो पैगंबर यावा म्हणजे ईशद्रोही लोकांचे वर्चस्व नष्ट होऊन आमचे वर्चस्व बहाल होईल. मदीनावासी लोक याचे साक्षीदार होते की हेच यहुदी येणाऱ्या पैगंबराच्या आशेवर जगत होते. ते नेहमी म्हणत असत, ""ठीक आहे. आता आमच्यावर वाटेल त्यांनी अत्याचार करावे जेव्हा तो पैगंबर येईल तेव्हा आम्ही या सर्व अत्याचारींना पाहून घेऊ.'' मदीनावासी हे सर्व ऐकत असत. म्हणूनच जेव्हा त्यांना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी माहीत पडले तर ते आपापसात म्हणू लागले, ""पाहा, या यहुद्यांनी आपल्यावर बाजी मारू नये. चला प्रथम आपणच या पैगंबर मुहम्मद (स.) वर ईमान धारण करु या.'' मदीनावासीयांना आश्चर्य वाटले की जे यहुदी येणाऱ्या पैगंबराची प्रतिक्षा डोळ्यांत तेल घालून करीत होते तेच आता त्याच्या आगमनानंतर सर्वात जास्त त्याचे विरोधक बनले. आणि हे म्हटले गेले, [next] हे लोक आपल्या मनाचे समाधान करून घेत आहेत!९६ की जे मार्गदर्शन अल्लाहने अवतरले आहे त्याचा स्वीकार करण्यास केवळ याच दुराग्रहामुळे ते नकार देत आहेत की अल्लाहने आपल्या अनुग्रहाने (अवतरण व पैगंबरत्व) आपल्या ज्या सेवकाला इच्छिले स्वेच्छापूर्वक त्यास उपकृत केले.९७ तेव्हा आता ते प्रकोपापाठोपाठ प्रकोपांस पात्र ठरले आहेत. अशा नाकारणाऱ्यासाठी अपमानास्पद शिक्षा ठरलेलीच आहे. (९१) जेव्हा त्यांना सांगितले जाते की अल्लाहने जे काही अवतरले आहे त्यावर ईमान धारण करा तेव्हा ते म्हणतात, ‘‘आम्ही तर केवळ त्यावर ईमान धारण करतो जे आमच्याकडे (अर्थात इस्राईलच्या संततीकडे) अवतरले आहे. त्याव्यतिरिक्त जे काही आले आहे ते मानण्याचे नाकारतात. वास्तविक ते

""त्यांनी त्याला ओळखलेसुद्धा.'' म्हणजे त्यांना याविषयी ठोस पुरावे मिळाले होते. सर्वात मोठा ठोस पुरावा आदरणीय माता सुफीया (रजि.) यांचा आहे ज्या स्वत: एक महान यहुदी विद्वानाची मुलगी आणि एका दुसऱ्या यहुदी धर्ममार्तंडाची पुतनी होती. त्या सांगतात, ""जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मदीना येथे आगमन झाले तेव्हा माझे पिता आणि चुलते दोन्ही त्यांना भेटावयास गेले. बराच वेळ बातचीत झाली. जेव्हा ते घरी परत आले तर मी स्वत:च्या कानाने त्यांचे संभाषण ऐकले, चुलते : काय ते हेच पैगंबर आहेत ज्याविषयी आमच्या ग्रंथात उल्लेख आहे? वडील : अल्लाह शपथ, होय! चुलते : काय तुम्हाला याविषयी पूर्ण विश्वास आहे? वडील : होय! चुलते : मग काय विचार आहे? वडील : जोपर्यंत जीवात जीव आहे त्याचा विरोध करीतच राहीन आणि याचे काही चालू देणार नाही.'' (इब्‌ने हिश्शाम, दुसरा खंड, पृष्ठ क्रमांक १६५) ९६) या आयतीचे दुसरे भाषांतर असेही होऊ शकते, ""किती वाईट गोष्ट आहे ज्याच्यासाठी त्यांनी आपल्या जीवांचा सौदा केला.'' म्हणजे आपल्या यशाला, सौभाग्याला व मुक्तीला त्यागून दिले आहे. ९७) हे लोक इच्छित होते की येणारा पैगंबर त्यांच्याच लोकांत जन्माला यावा परंतु जेव्हा तो दुसऱ्या एका लोकसमूहात ज्याला ते तुच्छ समजत होते, जन्माला आला तेव्हा ते विरोध करू लागले. तात्पर्य असे की अल्लाहने त्याना विचारूनच पैगंबराला पाठवावयास हवे होते. जेव्हा अल्लाहने त्यांना विचारले नाही आणि आपल्या कृपेने ज्याला इच्छिले उपकृत केले तेव्हा बनीइस्राईल भडकले.

 [next]


 सत्य आहे आणि त्या शिकवणीचे समर्थन करीत आहे जे यांच्याकडे आधीपासून आहे. त्यांना सांगा , ‘‘जर तुम्ही फक्त त्याच शिकवणीवर विश्वास ठेवणार असाल जी तुमच्याकडे आली आहे तर यापूर्वी अल्लाहच्या त्या पैगंबरांची (जे खुद्द इस्राईलच्या वंशामध्ये जन्मले होते) हत्या का केली? (९२) तुमच्याकडे कसकशा स्पष्ट संकेतांसह मूसा आले, तरीही तुम्ही असे अत्याचारी झालांत की त्यांची पाठ फिरताच वासराला उपास्य बनविले. (९३) जरा त्या दृढ वचनाचे स्मरण करा जे तूर पर्वताला तुमच्यावर उचलून धरून तुमच्याकडून आम्ही घेतले होते. आणि ताकीद दिली होती की ‘‘जो आदेश आम्ही देत आहोत त्याचे दृढतेने पालन करा आणि लक्षपूर्वक ऐका.’’ तेव्हा तुमच्या पूर्वजांनी सांगितले, ‘‘आम्ही ऐकले परंतु ते आम्ही मानणार नाही.’’ त्यांच्या नकाराची अवस्था अशी होती की त्यांच्या मनांत वासरूच वास करून बसले होते. त्यांना सांगा, ‘‘जर तुम्ही ईमानधारक असाल तर तुमचे हे ईमान किती वाईट आहे जे अशा वाईट कृत्यांचा तुम्हाला आदेश देत आहे. (९४) त्यांना सांगा की जर खरोखरच अल्लाहच्या जवळ मरणोत्तर जीवनाचे घर सर्व लोकांना सोडून खास तुमच्यासाठीच असेल तर तुम्ही मृत्यूची इच्छा केली पाहिजे,९८ जर तुम्ही आपल्या विचारामध्ये खरे असाल. (९५) लक्षात ठेवा की हे कदापि तशी इच्छा करणार नाहीत. कारण आपल्या हाताने कमवून जे काही त्यांनी तिथे पाठविले आहे त्यांची निकड हीच आहे. (की त्यांनी तेथे जाण्याची इच्छा करू नये.)

९८) हा त्यांच्या भौतिकतेवर विलक्षण असा टोमणा आहे, जी त्याची निकड हीच आहे. (की त्यांनी तेथे जाण्यांची इच्छा करू नये.) लोकांना परलोकध्यास राहतो, त्यांना जगाशी आणि भौतिकतेशी लगाव राहात नाही. ते मृत्युशी घाबरत नाहीत. परंतु यहुदी लोकांची स्थिती याहून वेगळी होती आणि आहे.

[next]


९९) "आला हयातीन' म्हणजे ""कशाही प्रकारचे जीवन'' म्हणजे त्यांना जगण्याचा हव्यास आहे भले ते कशाही प्रकारचे असोत. इज्जतीचे व प्रतिष्ठेचे किंवा धिक्कारित आणि निचतेचे जीवन का असेना. १००) यहुदी फक्त पैगंबर मुहम्मद (स.) यांना आणि त्यांच्या अनुयायींनांच वाईट म्हणत नव्हते तर ईशदूत जिब्रिल (अ.) यांच्याविषयीसुद्धा वाईट शब्दप्रयोग करीत होते आणि म्हणत असत की तो आमचा शत्रू आहे. तो कृपेचा नव्हे तर अवकृपेचा दूत आहे. १०१) म्हणजे या आधारावर तुमचे शिव्याशाप जिब्रिल (अ.) यांना लागत नाही तर अल्लाहला लागत आहेत. १०२) म्हणजे या शिव्या तुम्ही यासाठीच देता की जिब्रिल (अ.) हा कुरआन ग्रंथ घेऊन आले आहे आणि खरेतर हा कुरआन तौरात ग्रंथाचे स्पष्टपणे समर्थन करीत आहे. परिणामी तुमच्या शिव्या तौरात ग्रंथालासुद्धा लागत आहेत. १०३) हा सूक्ष्म इशारा त्याकडे आहे की, ""मूर्खांनो; तुमची पूर्ण नाराजी मार्गदर्शन आणि तुम्ही या सत्याधिष्ठित शिकवणीविरुद्ध उभे राहिला आहात. तुम्ही या सत्यमार्गदर्शनाच्या विरोधात लढत आहात ज्याला तुम्ही मान्य केले तर तुमच्याचसाठीच त्यात सफलता आहे.'' [next] page ४२ (९९) आम्ही तुझ्याकडे अशी संकेतवचने अवतरली आहेत जी स्पष्टपणे सत्य व्यक्त करणारी आहेत. आणि त्यांचे अनुसरण करण्यास केवळ तेच लोक नाकारतात जे फासिक (मार्गभ्रष्ट) आहेत. (१००) नेहमी असेच घडत आले नाही काय की जेव्हा जेव्हा त्यांनी एखादे वचन दिले तेव्हा त्यांच्यापैकी एखाद्यातरी गटाने त्याचा भंग केला. किंबहुना त्यांच्यापैकी बहुतेक असेच आहेत जे मनापासून ईमानधारक नाहीत. (१०१) आणि जेव्हा त्यांच्याकडे अल्लाहकडून कुणी पैगंबर त्या ग्रंथाची ग्वाही आणि समर्थन करणारा आला जो ग्रंथ यांच्याकडे पूर्वीपासून उपलब्ध होता– तेव्हा या ग्रंथधारकांपैकी एका गटाने अल्लाहच्या ग्रंथाला अशारीतीने पाठीमागे टाकून दिले जणू काही त्यांना काहीच माहीत नव्हते. (१०२) आणि त्या गोष्टीचे अनुसरण करू लागले ज्या गोष्टी शैतान, सुलैमानच्या राज्याच्या नावाने सादर करीत असत.१०४ खरे पाहता सुलैमानने कधीही द्रोह केला नाही. द्रोहामध्ये तर ते शैतान पडले होते जे लोकांना जादूटोण्याचे शिक्षण देत होते. ते त्या गोष्टींच्या मागे लागले ज्या बाबीलमध्ये दोन दूत हारूत

१०४) येथे शैतान म्हणजे शैतान जिन्न आणि शैतान मनुष्य दोन्ही अभिप्रेत आहेत. जेव्हा बनीइस्राईल लोकांवर चारित्र्यहीनता आणि भौतिकतेने घट्ट पकड केली आणि गुलामी, अज्ञान, मजबुरी, असहायतेने त्यांच्यामध्ये धैर्यशीलता, उत्साह आणि इच्छाशक्ती¨ना नष्ट केले व त्यांना श्रद्धाशीलतेपासून दूर नेले तेव्हा त्यांनी जादूटोणा, ताईत, गंडेदोरे, झाडफुंक इ. शैतानी प्रथेचा आधार घेतला. ते अशा युक्त्या शोधू लागले की काही मेहनत न करता मंत्र, जप, झाडफुंकीने काम फत्ते व्हावे. अशा वेळी शैतानांने त्यांना मार्गभ्रष्ट केले. शैतानाने त्यांना पटवून दिले की सुलैमान (अ.) यांचे अतिभव्य राज्य आणि महान शक्ती निव्वळ काही मंत्राच्या आधारे होती आणि ते सर्व आम्ही तुम्हाला दाखवित आहोत. परिणामी हे लोक पूर्णत: शैतानाच्या जाळ्यात अडकू लागले. तेव्हा त्यांना अल्लाहच्या ग्रंथाविषयी आवड बाकी राहिली नाही की सत्यमार्गाकडे बोलाविणाऱ्याचे त्यांनी ऐकले नाही.

[next]


व मारूतवर अवतरल्या होत्या. वास्तविक ते (दूत) जेव्हा कधी कुणाला याची शिकवण देत असत तेव्हा आधी स्पष्टपणे बजावीत असत की, ‘‘पाहा आम्ही एक सत्व परीक्षा आहोत तेव्हा तुम्ही द्रोहामध्ये पडू नका.१०५ तरीही हे लोक त्यांच्याकडून त्याच गोष्टी शिकत आले ज्यामुळे पती-पत्नीमध्ये दूही निर्माण व्हावी.१०६ ही तर स्पष्ट गोष्ट होती की अल्लाहच्या अनुज्ञेशिवाय ते यापासून कुणालाही हानी पोहोचवू शकत

१०५) या आयतीच्या अर्थ स्पष्टीकरणार्थ अनेक अर्थ लावले आहेत. माझ्या ज्ञानानुसार ज्या काळात बनीइस्राईलचे सर्व लोक बाबीलमध्ये गुलाम आणि कैदी बनविले गेले होते; तेव्हा अल्लाहने दोन दूतांना त्यांच्याकडे मनुष्यरूपात त्यांची परीक्षा घेण्यासाठी पाठविले असेल, ज्याप्रकारे लूत (अ.) च्या लोकांकडे ईशदूत सुंदर मुलांच्या रूपात गेले होते. अशाप्रकारचे दोन दूत साधू फकीरच्या रूपात बनीइस्राईलकडे गेले असणार. तिथे जादूगरीच्या बाजारात त्यांनी आपले दुकान लावले असेल आणि दुसरीकडे सर्वांना सावधान करीत सांगत असतील की आम्ही तुमच्यासाठी परीक्षा म्हणून आहोत. तुम्ही आपले परलोक बिघडवू नका. तरी लोक त्यांनी दाखविलेल्या जादूटोणे, कुंडली, मंत्र-तंत्र, गंडेदोरे, झाडफुंकवर तुटून पडतच होते. फरिश्त्यांचे मानवी रूपात येऊन काम करणे आश्चर्यकारक वाटू नये. ते अल्लाहच्या व्यवस्थेचे कार्यकर्ते आहेत. आपल्या कर्तव्यपालनात त्यांना ज्या वेळी जे रूप गरजेचे आहे, त्यांना ते धारण करू शकतात. आम्हाला काय माहित की सध्यासुद्धा अनेक फरिश्ते मनुष्यरुपात येत असतील आणि आपापली कामे करून जात असतील. फरिश्ते (दूतांनी) एखादी वाईट गोष्ट शिकविणे म्हणजे असे आहे की साध्या पोषाखातील पोलिसांनी विशिष्ट नोटा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला याचसाठी द्याव्यात की तो रंगेहाथ पकडला जावा आणि त्याच्या सुटकेचा पर्याय बाकी राहू नये. १०६) म्हणजे या बाजारात असे गंडेदोरे, ताईत आणि मंत्रतंत्र यांची जास्त मागणी होती जेणेकरून एखाद्याच्या पत्नीला त्या दुष्ट प्रभावाने आपल्यावर फिदा करून द्यावे. ही चारित्र्यहीनतेची नीचतम स्थिती आहे, ज्यात ते लोक लिप्त होते. पतीपत्नी संबंध हे तर मानवतेच्या संस्कृतीचा व एकतेचा पाया आहे. या संबंधावरच मानवी शिष्टाचार आणि संस्कृती अवलंबून आहे. या दोघांचे संबंध बिघडले तर मानवी संस्कृती बिघडली जाते. असा मनुष्य तर नीचतम आहे जो त्या वृक्षाच्या खोडावरच करवत चालवतो ज्यावर त्याच्या स्वत:चा आणि मानवतेचा मूळाधार आहे. हदीसमध्ये आहे, ""इब्‌लीस आपल्या केंद्रातून पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात आपले एजंट पाठवितो. मग ते सर्व एजंट परत जाऊन त्याला आपापली कारवाई सांगू लागतात. कोणी सांगतो, मी असा उपद्रव माजविला, तर कोणी सांगतो मी तसा उपद्रव माजविला. परंतु इब्‌लीस प्रत्येकाला सांगतो, "तू काहीच केले नाही'. मग एक एजंट येतो आणि म्हणतो, "मी एक स्त्री आणि तिच्या पतीमध्ये दुफळी माजवून आलो आहे.' हे ऐकून इब्‌लीस त्या एंजटला मिठी मारतो आणि म्हणतो, तू खरे काम करून आला आहेस.'' या हदीस कथनावर विचार केल्यावर स्पष्ट कळून येते की, बनीइस्राईल लोकांची परीक्षा घेण्यासाठी जे ईशदूत पाठविले होते, त्यांना आदेश का दिला होता की पतीपत्नीमध्ये फूट पाडणाऱ्या गोष्टी (अंमल)

[next]नव्हते. परंतु तरीही ते अशी गोष्ट शिकत आले जी खुद्द त्यांच्यासाठी लाभदायक तर नव्हतीच उलट हानिकारक होती आणि त्यांना चांगले माहीत होते की जो या गोष्टीचा ग्राहक होईल त्याच्यासाठी मरणोत्तर जीवनात काहीही हिस्सा नाही. किती वाईट सामुग्री होती ज्यासाठी स्वत:च्या जीवाच्या मोबदल्यांत त्यांनी सौदा केला आहे! किती चांगले झाले असते जर ते जाणत असते! (१०३) ईमान आणि अल्लाहचे भय बाळगले असते तर अल्लाहपाशी जो मोबदला त्यांना मिळाला असता तो त्यांच्यासाठी अधिक चांगला झाला असता. किती चांगले झाले असते जर त्यांना हे कळले असते! (१०४) ईमानधारकांनो,१०७ ‘राईना’ म्हणू नका तर ‘उन्जूरना’ म्हणा आणि लक्षपूर्वक ऐका.१०८ हे नाकारणारे तर दु:खदायी प्रकोपास पात्र आहेत. (१०५) हे लोक,

त्यांच्यासमोर सांगाव्यात. हीच एक अशी कसोटी होती ज्याद्वारे त्यांच्या चारित्र्यहीनतेला परखले जाऊ शकत होते. १०७) या रुकू (प्रभागात) आणि पुढील प्रभागात पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुयायित्व स्वीकारणाऱ्यांना त्या कृत्यांपासून सावध केले आहे जे इस्लाम आणि इस्लामच्या अनुयायींविरुद्ध यहुदी करीत होते. त्या शंकांचे उत्तर देण्यात आले जे यहुदी मुस्लिमांच्या मनात निर्माण करीत होते आणि त्या विशिष्ट विषयांवर चर्चा करण्यात आली जी मुस्लिम आणि यहुदी लोकांदरम्यान होत असे. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मदीना येथे आगमन झाले आणि आजूबाजूला इस्लामचा प्रचार प्रसार होऊ लागला तेव्हा यहुदी लोक मुस्लिमांना धार्मिक चर्चा घडवून अडचणीत आणत असत. यहुदी आपली दुष्‌प्रवृत्ती, संशयीवृत्ती, प्रश्नांचा भडीमार करून संभ्रम निर्माण करणे इ. वाईट सवयीं या भोळ्या-भाबड्या नवमुस्लिमांना लाऊ इच्छित होते. यहुदी लोक खुद्द पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सभेत हजर होऊन मोठ्या धिटाईने खोटे बोलत आणि आपल्या तुच्छ मनोवृत्तीचे खुलेआम प्रदर्शन करीत असत. १०८) यहुदी लोक जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सभेत येत तेव्हा आपल्या शिष्टाचाराद्वारे मनातील गरळ ओकत असत आणि (पैगंबर मुहम्मद (स.) यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करीत असत.) द्विअर्थ शब्दप्रयोग करत मोठ्याने एक आणि हळू आवाजात दुसरे काहीतरी बरळत असत. बाह्य शिष्टाचाराचे पालन करून पैगंबर मुहम्मद (स.) यांना आतून अपमानित करण्याची कोणतीच कसर ठेवीत नसत. कुरआनमध्ये पुढे याविशेष अनेक उदाहरणे आली आहेत. येथे ज्या विशेष शब्दप्रयोगाविषयी मुस्लिमांना रोखण्यात आले आहे तो एक द्विअर्थ शब्द होता. जेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी चर्चा करताना यहुदी लोकांना एखादा मुद्दा समजून घेण्याची गरज भासत असे की थांबा आम्हाला हे समजू द्या तेव्हा ते "राईना' म्हणत असत. याचा शाब्दिक अर्थ असा आहे की थोडे थांबा आणि आमचे

[next] ज्यांनी सत्य संदेश स्वीकारण्याचे नाकारले आहे ते ग्रंथधारकांपैकी असोत किंवा अनेकेश्वरवादी असोत ते कदापि इच्छित नाहीत की तुमच्या प्रभुकडून तुमच्याकडे काही भले अवतरावे. परंतु अल्लाह ज्याच्यासाठी इच्छितो त्याला आपल्या कृपेसाठी खास निवडतो आणि तो अत्यंत कृपावंत आहे. (१०६) ज्या एखाद्या आयतीला आम्ही रद्द करतो किंवा त्याचे विस्मरण करवितो तेव्हा त्यापेक्षा अधिक चांगली किंवा तशाच प्रकारची दुसरी आयत पाठवितो.१०९ (१०७) काय तुम्ही जाणत नाही की अल्लाहला प्रत्येक गोष्ट करण्याचे सामर्थ्य प्राप्त आहे? काय तुम्हाला ठाऊक नाही की पृथ्वी आणि आकाशामध्ये अल्लाहचेच अधिपत्य आहे आणि त्याच्याशिवाय अन्य कुणीही तुमची काळजी घेणारा व मदत करणारा नाही? (१०८) मग काय, तुम्ही आपल्या पैगंबराकडे तशाच प्रकारचे प्रश्न आणि मागण्या करू इच्छिता

ऐका. परंतु दुसरे अनेक अर्थ निघत होते. इबरानी भाषेत ""ऐक तर, तू बहिरा व्हावा'' हा एक अर्थ होतो. अरबीत या शब्दाचा अर्थ अज्ञानी व मूर्ख असापण होतो. आणि जिभेला जरा वळवून म्हटले ""रआईना'' तर अर्थ होतो ""हे आमच्या गुराख्‌या''. म्हणून मुस्लिमांना आदेश दिला की तुम्ही हा शब्दप्रयोग करू नका आणि त्याऐवजी ""उनजूरना'' म्हणावे म्हणजे ""जरा आम्हाला समजून घेऊ द्या.'' नंतर आदेश दिला की एकदिलाने, लक्ष देऊन ऐका. यहुदी लोकांनी असे करण्याचे मूळ कारण ते पैगंबर मुहम्मद (स.) यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाहीत आणि त्यांचे प्रवचन ऐकताना या यहुदी लोकांचे लक्ष दुसरीकडे असते. परंतु तुम्हाला लक्षपूर्वक पैगंबर मुहम्मद (स.) यांचे म्हणणे ऐकले पाहिजे जेणेकरून असे म्हणण्याची आवश्यकताच भासू नये. १०९) हे एका विशिष्ट शंकेचे निरसन आहे ज्याला यहुदी लोक मुस्लिमांच्या मनात टाकण्याचा अटोकाट प्रयत्न करत असत. त्यांचा आक्षेप होता की जर मागील सर्व ग्रंथ अल्लाहकडून आलेले आहेत आणि हा पवित्र कुरआनसुद्धा अल्लाहकडून आहे, तर मग यात पूर्वच्या काही आदेशांऐवजी दुसरे आदेश कसे आले आहेत? एकाच अल्लाहकडून निरनिराळ्यावेळी निरनिराळे आदेश कसे असू शकतात? तुमचा कुरआन दावा करतो की यहुदी व ख्रिस्ती लोक ग्रंथाच्या एका भागाला विसरले आहेत जो

[next]जशा यापूर्वी मूसाकडे करण्यात आल्या होत्या?११० वास्तविक ज्या व्यक्तीने ईमानच्या आचरणाऐवजी द्रोहाचे आचरण केले तो खचितच सरळ मार्गापासून भरकटला आहे. (१०९) ग्रंथधारकांमध्ये बहुतेक लोक हे इच्छितात की, कसेही करून तुम्हाला ईमानपासून दूर करून द्रोहाकडे न्यावे. जरी त्यांच्यावर सत्य प्रकट झाले आहे, तरीही आपल्या मनातील द्वेषामुळे तुमच्यासाठी त्यांची ही इच्छा आहे. त्यांना त्याबद्दल क्षमा कर व त्यांना तसेच सोडून दे.१११ इथपर्यंत की अल्लाह स्वत: आपला निर्णय लागू करील. नि:संशय अल्लाहला सर्व गोष्टींवर सामध्र्य आहे. (११०) नमाज अदा करा आणि जकात द्या. तुम्ही आपल्या मरणोत्तर जीवनासाठी जे काही भले कमवून पाठवता ते

त्यांना दिला गेला होता. हे कसे शक्य आहे की अल्लाहची शिकवण लोकांकडून विसरली जावी? हे सर्व ते मोकळ्या मनाने व शोधवृत्तीने नव्हे तर मुस्लिमांच्या मनात कुरआनचा निर्माता अल्लाह आहे याविषयी संशय निर्माण व्हावा म्हणून करत होते. उत्तरादाखल अल्लाह आदेश देतो, ""मी मालक आहे, माझे अधिकार अमर्याद आहेत. माझ्या ज्या आदेशाला मी इच्छिले तर रद्द करतो आणि ज्यांना इच्छिले त्यांना स्मृतिपटलावरुन रद्द करुन टाकतो. परंतु ज्या गोष्टीला मी रद्द करतो अथवा बदलतो तिच्या जागी त्यापेक्षा उत्तम गोष्ट आणतो. किंवा कमीतकमी ती वस्तू आपल्या जागी तितकीच फायद्याची आणि उपयुक्त असते जितकी पहिली होती.'' ११०) यहुदी लोक मोठ्या चातुर्याने अनेकानेक प्रश्न करून व एखाद्या गोष्टीचा कीस काढून मुस्लिमांना गोंधळात टाकत असत आणि म्हणत की तुमच्या पैगंबरांना हे विचारा ते विचारा. यावर अल्लाह मुस्लिमांना सचेत करीत आहे की यहुदींची ही वाईट सवय तुम्ही लावून घेऊ नका. याविषयी पैगंबर मुहम्मद (स.) स्वत: मुस्लिमांना नेहमी सावध करीत असत. संशयी वृत्तीने तर्क-वितर्काने आणि प्रश्नांचा भडीमार करून तसेच एखाद्या गोष्टीचा कीस काढून मागील अनुयायीसमाज नष्ट झाले आहेत. तुम्ही या वाईट सवयीपासून दूर राहा. ज्या प्रश्नांना अल्लाह आणि त्याचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी दुर्लक्षित केले होते त्यांच्या मागे लागू नका. १११) म्हणजे त्यांच्या उपद्रवांना आणि द्वेषांकडे पाहून घाबरून जाऊ नका व निराश होऊ नका आणि आपले मानसिक संतुलन बिघडवू नका. त्यांच्याशी वादविवाद व भांडणतंटा करण्यात आपला अमूल्‌य वेळ वाया घालवू नका. संयम राखून पाहात राहा की अल्लाह पुढे काय करणार आहे. क्षुल्लक गोष्टीत आपली शक्ती वाया घालविण्याऐवजी अल्लाहचे स्मरण व सत्कार्यात ती खर्च करा, हे अल्लाहला प्रिय आहे. क्षुल्लक गोष्टीत वेळ वाया घालवणे व्यर्थ जाईल.

[next]


अल्लाहपाशी तुम्हाला आढळेल. जे काही तुम्ही करीत आहात ते अल्लाहच्या दृष्टीमध्ये आहे.(१११) त्यांचं म्हणणं असं आहे की कोणीही व्यक्ती स्वर्गा (जन्नत)मध्ये जाणार नाही जोपर्यंत ती यहुदी होत नाही किंवा (खिस्ती लोकांच्या दृष्टिकोनांतून) खिस्ती होत नाही. ही त्यांची मनोकामना (भ्रम) आहे.११२ त्यांना सांगा! तुम्ही सत्य असाल तर पुरावा सादर करा. कदापि नाही! (११२) (सत्य हे आहे की तुमची काही वैशिष्टय नाहीत किंवा इतर कोणाची) सत्य हे आहे की जो कोणी अल्लाहच्या आज्ञापालनामध्ये स्वत:ला समर्पित करील आणि सद्वर्तनी असेल त्याच्यासाठी त्याच्या पालनकर्त्याजवळ त्याचा मोबदला आहे आणि अशा लोकांना न कोणते भय असेल न ते कधी शोक करतील. (११३) यहुदी म्हणतात, ‘‘खिस्तींच्या जवळ काहीही नाही.’’ खिस्ती म्हणतात ‘‘यहुद्यांपाशी काहीही नाही.’’ वास्तविक दोघेही ग्रंथ वाचताहेत. आणि अशाच प्रकारे त्या लोकांचेही दावे आहेत ज्यांना ग्रंथाचे ज्ञान नाही.११३ ज्या ज्या मतभेदांमध्ये ते पडले आहेत त्यांचा निर्णय अल्लाह पुनरुत्थानाच्या दिवशी करील. (११४) आणि त्या

११२) म्हणजे खरे तर ही त्यांच्या मनाची इच्छा मात्र आहे परंतु त्यांना ते वर्णन अशा प्रकारे करतात की जणू काही तेच होणार आहे. ११३) म्हणजे अनेकेश्वरवादी अरब लोक.

[next]


व्यक्तीपेक्षा अधिक अत्याचारी कोण असेल जो अल्लाहच्या प्रार्थनास्थळामध्ये त्याचे नामस्मरण करण्यास प्रतिबंध करतो आणि त्या स्थळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो? असे लोक त्या प्रार्थनागृहामध्ये पाय ठेवण्यासही पात्र नाहीत आणि जर कधी गेले तर त्यांनी भीतभीतच जावे.११४ त्यांचा या नश्वर जीवनामध्येही धिक्कार आहे. आणि मरणोत्तर जीवनामध्येही त्यांना यातना आहेत. (११५) पूर्व आणि पश्चिम सर्व अल्लाहचेच आहेत. जिकडे तुम्ही तोंड कराल तिथे अल्लाहचे अस्तित्व आहे.११५ कारण अल्लाह सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहे.११६ (११६) त्यांचं म्हणणं आहे की अल्लाहला पुत्रही आहे. अल्लाह तर या गोष्टीपेक्षा कितीतरी पवित्र आहे. वास्तविक सत्य हे आहे की, पृथ्वी आणि आकाशामधील सर्व गोष्टींचा स्वामी अल्लाह आहे. सर्वजण त्याचेच आज्ञाधारक आहेत. (११७) तोच आकाश आणि पृथ्वीचा प्रवर्तक आहे.

११४) उपासनास्थळे अत्याचारी लोकांच्या ताब्यात राहाण्याऐवजी आणि असे दुराचारी तिथे पदाधिकारी बनून राहाण्याऐवजी ईशभक्त आणि सदाचारी लोकांच्या हातात तो अधिकार असला पाहिजे आणि असेच लोक उपासनास्थळांचे पदाधिकारी होणे आवश्यक आहे. कारण हे दुराचारी तिथे गेले तरी त्यांना भीती वाटावी की आपण काही दुष्कृत्य केल्यास पकडले जाऊ आणि निश्चित शिक्षेला पात्र होऊ. येथे एक स्पष्ट संकेत मक्केतील अत्याचारी लोकांकडे आहे जे नव मुस्लिमांना काबागृहात इबादत करण्यास मनाई करत होते. ११५) अल्लाह काही पूर्वेचा किंवा पश्चिमेचाच नाही तर तो चहुकडे आणि चहुबाजूचा मालक आहे. तो एका ठिकाणी अथवा एखाद्या दिशेला मर्यादित नाही. म्हणून त्याच्या उपासनेसाठी एखाद्या ठिकाणाला अथवा दिशेला निश्चित करण्याचा अर्थ असा होत नाही की अल्लाह त्या ठिकाणी किंवा त्या दिशेलाच राहातो. म्हणून ही चर्चा करणे अथवा भांडण करणे व्यर्थ आहे की तुम्ही तर पूर्व अशा अशा दिशेला आणि अशा ठिकाणी उपासना करत होता आता जागा आणि दिशा का बदलली? ११६) अल्लाह मर्यादित व संकीर्णहृदयी, छोट्या मनाचा व छोट्या नजरेचा आणि कमतरता असलेला मुळीच नाही जसे तुम्ही कल्पना करून समजून बसला आहात. त्याचे ईशत्व आणि त्याची नजर अमर्याद आहे. त्याची कृपा अनंत आहे, जो हेसुद्धा जाणून आहे की त्याचा कोणता दास कुठे कोणत्या वेळी आणि कोणत्या संकल्पनेने त्याचे स्मरण करीत आहे.

[next]


जेव्हा एखादी घटना घटित करण्याचे इच्छितो तेव्हा फक्त म्हणतो, ‘‘तथास्तु’’ आणि क्षणार्धात तसे घडते. (११८) ज्यांना ज्ञान नाही ते म्हणतात की अल्लाह स्वत: आमच्याशी का बोलत नाही? किंवा आमच्याकडे एखादा संकेत का येत नाही?११७ अशाच गोष्टी यापूर्वीचे लोकही बोलत होते. त्या सर्वांची (मागील पुढील मार्गभ्रष्ट लोकांची) मनोवृत्ती सारखीच आहे.११८ विश्वास ठेवणाऱ्यासाठी तर आम्ही स्पष्टपणे संकेतवचने उघड केली आहेत.११९ (११९) (यापेक्षा स्पष्ट संकेत कोणता असेल की) आम्ही तुम्हाला सत्य ज्ञानासह शुभवार्ता देणारा आणि सावध करणारा बनवून पाठविले आहे.१२० तेव्हा नरकाशीच ज्यांचा संबंध जुळला आहे त्यांच्याबद्दल तुम्ही मुळीच जबाबदार आणि उत्तरदायी नाही.

११७) त्यांना हे अपेक्षित होते की अल्लाहने स्वत: आमच्यासमोर येऊन सांगावे की हा माझा ग्रंथ आहे आणि हे माझे आदेश आहेत. तुम्ही याला अंमलात आणा किंवा एखादी अशी निशाणी अल्लाहने दाखवावी जेणेकरून आम्हाला विश्वास बसावा की पैगंबर मुहम्मद (स.) जे काही सांगत आहेत, ते सर्व अल्लाहकडूनच आहे. ११८) म्हणजे आताच्या मार्गभ्रष्ट लोकांनी एकही असा आरोप आणि मागणी केलेली नाही जी पूर्वच्या लोकांनी केली नव्हती. पूर्वपासून आजपर्यंत मार्गभ्रष्टतेची एकच रीत आहे आणि ती नेहमी नेहमी एकाच प्रकारची शंका, एकाच प्रकारचे आक्षेप आणि एकाच प्रकारचे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारित असते. ११९) म्हणजे अल्लाह स्वत: आमच्यासमोर येऊन आमच्याशी का बोलत नाही? हा प्रश्न इतका क्षुल्लक आहे की त्याचे उत्तर देणे क्रमप्राप्त ठरत नाही. उत्तर फक्त याचे दिले गेले की आम्हाला निशाणी का दाखविली जात नाही? उत्तर हे आहे की अनेक निशाण्या आजूबाजूला आहेत. परंतु ज्याला मान्यच करावयाचे नाही त्याला शेवटी कोणती निशाणी दाखवावी. १२०) दुसऱ्या निशाण्यांचा काय उल्लेख करावा. येथे सर्वाधिक स्पष्ट निशाणी तर पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्वत:चे व्यक्तिमत्व आहे. पैगंबरत्वबहाली पूर्वची त्यांची स्थिती आणि त्या समाजाची आणि देशाची परिस्थिती ज्यात पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जन्म झाला होता आणि ती परिस्थिती व वातावरण ज्यात पैगंबर (स.) यांचे चाळीस वर्षाचे जीवन आणि पैगंबर झाल्यानंतरच्या काळात त्यांनी केलेले महान कार्य आणि अद्वितीय क्रांती, या सर्व अशा स्पष्ट निशाण्या आहेत की यानंतर आणखी दुसऱ्या निशाणीची आवश्यकता नाही.

[next]


(१२०) यहुदी आणि खिस्ती तुमच्याशी कदापि सहमत होणार नाहीत जोपर्यंत त्यांच्या पद्धतीने तुम्ही वागणार नाही.१२१ त्यांना स्पष्टपणे सांगा की अल्लाहने सांगितलेला मार्गच योग्य आहे. अन्यथा तुमच्याकडे आलेल्या ज्ञानानंतर जर तुम्ही त्यांच्या इच्छांचे अनुसरण कराल तर अल्लाहच्या प्रकोपापासून वाचविणारा तुमचा कोणीही मित्र किंवा सहाय्यक असणार नाही. (१२१) ज्या लोकांना आम्ही ग्रंथ दिले ते अशा रीतीने त्याचे अध्ययन करीत आहेत जसे त्यांनी करायला हवे. ते या (कुरआन) वर मन:पूर्वक ईमान धारण करतात.१२२ परंतु जे त्याच्याशी द्रोह करतील तर त्यांनाच नुकसान सोसावे लागेल. (१२२) हे इस्राईलच्या१२३ संततीनो! स्मरण करा माझा अनुग्रह ज्याने मी तुम्हास उपकृत केले होते. आणि तुम्हाला जगातील सर्व जनसमुदायावर श्रेष्ठत्व बहाल केले होते. (१२३) तेव्हा त्या दिवसाचे भय बाळगा जेव्हा कुणीही

१२१) या लोकांच्या नाराजीचे एकमेव कारण म्हणजे तुम्ही अल्लाहच्या आयती आणि इस्लामी जीवनव्यवस्थेत त्याचप्रमाणे दांभिकतेला थारा का दिला नाही? ईशदासात अल्लाहभक्तीबरोबर त्या स्वभक्तीचा शिरकाव का केला नाही? जीवनव्यवस्थेच्या आदेशांना व नियमांना आपल्या इच्छेप्रमाणे लागू करण्याचे चातुर्य का दाखविले नाही? तुम्ही त्या दिखाव्याने आणि धोकेबाजीने काम का घेतले नाही जे वैशिष्ट्य आमचे व आमच्या समाजाचे आहेत. म्हणून अशा दांभिक, धोकेबाज लोकांना राजी करण्याची चिंता सोडून द्या, कारण जोपर्यंत तुम्ही त्यांचे रंगढंग स्वीकारत नाही आणि जीवनधर्माशी तोच व्यवहार करत नाही जो हे करत आहेत; तसेच श्रद्धाशीलतेच्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब जो यांनी केला आहे तो तुम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत हे तुमच्याशी सहमत होणार नाहीत. १२२) ग्रंथधारकांच्या सद्‌गुणीं लोकांकडे हा संकेत आहे की हे लोक स्वच्छ मनाने तो ग्रंथ वाचतात व त्याचे अध्ययन करतात जो त्यांच्याजवळ पूर्वपासून उपलब्‌ध आहे. म्हणून ते कुरआनला ऐकून किंवा वाचून त्यावर श्रद्धा ठेवतात. १२३) येथून दुसरा विषय सुरु होत आहे ज्याला समजून घेण्यासाठी खालील मुद्दे मनात ठेवणे आवश्यक आहेत. १)आदरणीय नूह (अ.) यांच्यानंतर आदरणीय इब्राहीम (अ.) हे पहिले पैगंबर आहेत ज्याना अल्लाहने इस्लामचा विश्वव्यापी प्रचार प्रसार करण्यासाठी नियुक्त केले होते. त्यांनी स्वत: इराकपासून ते इजिप्तपर्यंत आणि सीरिया आणि पॅलेस्टाईनपासून ते अरबस्थानपर्यंत वर्षानुवर्षे गस्त घालून (फिरत राहून) अल्लाहच्या आज्ञाधारकतेकडे म्हणजेच इस्लामकडे लोकांना बोलवत राहिले होते. नंतर आपल्या या चळवळीच्या फैलावासाठी वेगवेगळ्या प्रदेशांत आपले प्रतिनिधी नेमले होते. पूर्वी जॉर्डनमध्ये आदरणीय लूत (अ.) यांना नियुक्त केले तर सीरिया व पॅलेस्टाईनमध्ये आपले पुत्र इसहाक (अ.) यांना
 [next]

 page 51
जबाबदारी सोपविली आणि अरबस्थानाच्या मध्यभागी आपले ज्‌येष्ठ पुत्र आदरणीय इस्माईल (अ.) यांना नियुक्त केले होते. मग अल्लाहच्या आदेशाने मक्का शहरात काबागृह बनविले आणि अल्लाहच्याच आदेशाने ते काबागृह या चळवळीचे केंद्र बनले. 2) आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्या वंशात दोन मोठ्या शाखा निर्माण झाल्या. एक शाखा इस्माईल (अ.) यांची संतती जी अरबस्थानमध्येच राहिली. दुसरी इसहाक (अ.) यांची संतती जी बनीइस्राईलच्या नावाने प्रसिद्ध झाली. या शाखेत जेव्हा चारित्र्यहीनतेने परिसीमा गाठली व अन्याय अत्याचार चोहीकडे बोकाळला तेव्हा त्यांच्या या अध:पतनाचा परिणाम म्हणजे प्रथम यहुदियत (ज्यू धर्म) व नंतर ईसायियत (ख्रिश्चन धर्म) जन्माला आले. 3) आदरणीय इब्राहीम (अ.) यांचे मुख्य कार्य जगाला अल्लाहच्या आज्ञाधारकतेत आणून सोडणे आणि अल्लाहच्या शिकवणी व आदेशानुसार जगात लोकांचे वैयक्तिक व सामुदायिक जीवनसुधार करणे होते. हीच ती मानवतेची सेवा होती ज्यासाठी त्यांना जगाचा नेता (इमाम) बनविले गेले. त्यांच्यानंतर मानवतेची ही सेवा करण्याच्या चळवळीचे नेतृत्व त्यांच्या वंशातील आदरणीय इसहाक (अ.) व याकूब (अ.) यांच्या अनुयायींना मिळाले होते, ज्याना बनीइस्राईल म्हणून संबोधले जाते. या शाखेत पैगंबर येत राहिले आणि ते हे कार्य पार पाडत गेले आणि मानवतेचे सेवाकार्य करत गेले. आणि विश्वसमुदायाला या सन्मार्गाकडे निमंत्रित करावे. याच महान कार्याला अल्लाहने कृपा म्हणून संबोधले आहे. ही कृपा अल्लाहने बनीइस्राईलवर केली होती. या कृपेचे अल्लाह त्यांना स्पष्ट पुन्हा पुन्हा स्मरण करून देत आहे. या शाखेत आदरणीय सुलैमान (अ.) यांच्या काळात बैतुलमक्दिसला आपले केंद्र बनविले होते. म्हणून ही शाखा जोपर्यंत नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत राहिली होती, मस्जिदे अक्सा (पॅलेस्टाईन) हेच इस्लामी चळवळीचे केंद्र आणि अल्लाहची उपासना करण्याची दिशा होती. 4) कुरआनच्या या अध्यायातील मागील दहा प्रभागांत (रूकूअ) अल्लाहने बनीइस्राईल लोकांना संबोधन केले आणि त्यांच्या अपराधांचे पूर्ण ऐतिहासिक""चार्जशीट'' जगापुढे जसे की तसे ठेवले. तसेच त्यांची तात्कालिन परिस्थिती जेव्हा कुरआन अवतरण होत होते, तीसुद्धा मूळ रुपात प्रस्तुत केली. यानंतर अल्लाहने बनीइस्राईल लोकांना स्पष्ट तंबी दिली की त्यांनी अल्लाहच्या देणग्यांची व कृपेची अवहेलना केली. त्यांनी नेतृत्वाचे पदभार संभाळण्यास फक्त नकारच दिला नाही तर सत्यापासून आणि सदाचारापासूनसुद्धा स्वत:ला अतिदूर ठेवले. आता तर बनीइस्राईल समाजात बोटांवर मोजण्याइतकेच लोक सदाचारी आहेत अन्यथा हा पूर्ण समाज अयोग्य सिद्ध झाला आहे. 5) यानंतर त्यांना सांगितले जात आहे की नेतृत्व ही काही कुणाची जहागिरी नाही की आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्याशी रक्ताच्या नात्यातील लोकांनाच मिळेल. नेतृत्व तर आज्ञापालन आणि असीम भक्तीनेच प्राप्त होते. (तुम्ही तर आपल्या कर्तव्याला आणि सत्याला पूर्णपणे विसरून गेला आहात. आणि याचमुळे तुम्ही नेतृत्वाच्या अधिकाराला) पुरते अपात्र ठरला आहात म्हणूनच तुम्हाला या पदावरून हटविण्यात आले आहे. 6) तसेच इशाऱ्याइशाऱ्यात हे दाखवून देण्यात आले की जे समुदाय बनीइस्राईली नाहीत परंतु आपला संबंध ते आदरणीय पैगंबर मूसा व इसा (अ.) यांच्यामार्फत आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्याशी जोडतात, ते सर्व इब्राहीमी जीवनपद्धतीपासून अतिदूर गेले आहेत. तसेच अरबांतील अनेकेश्वरवादी लोक जे आदरणीय इब्राहीम व इस्माईल (अ.) यांच्या वंशातील असल्याने स्वत:वर गर्व करतात, तेसुद्धा फक्त आपल्या वंशाला आणि गोत्रालाच कवटाळून बसले आहेत. त्यांचा तर आता आदरणीय इब्राहीम व इस्माईल (अ.) यांच्या जीवनपद्धतीशी दूरवरच्यासुद्धा संबंध राहिला नाही. म्हणूनच यांच्यापैकीसुद्धा कोणीही नेतृत्वाच्या पदाला योग्य राहिला नाही. 7) नंतर सांगितले जाते की आता आम्ही आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या दुसऱ्या शाखेत
[next] कुणाच्या यत्किंचितही उपयोगी पडणार नाही, न कुणाकडून मोबदला स्वीकारला जाईल न कुणाची शिफारस कुणाच्या उपयोगी पडेल न अपराध्यांना कुठून कोणती मदत लाभेल. (१२४) आठवण करा जेव्हा अल्लाहने इब्राहीमची काही गोष्टींमध्ये परीक्षा घेतली१२४ आणि जेव्हा तो परीक्षेमध्ये पूर्ण उतरला तेव्हा अल्लाहने सांगितले,‘‘मी तुला सर्व लोकांचा नेता म्हणून नियुक्त करीत आहे.’’ तेव्हा इब्राहीमने विचारले, ‘‘आणि माझ्या संततीसाठीही हेच अभिवचन आहे?’’ तेव्हा अल्लाहने उत्तर दिले,‘‘माझे अभिवचन अत्याचाऱ्यांसाठी नाही.’’१२५ (१२५) आणि या काबागृहाला आम्ही साऱ्या लोकांसाठी ‘मध्यवर्ती शांतीस्थान’ निश्चित केले

म्हणजे बनीइस्माईलमध्ये पैगंबर पाठविला आहे, ज्यासाठी आदरणीय इब्राहीम व इस्माईल (अ.) यांनी प्रार्थना केली होती. याची जीवनपद्धत (धर्म) तीच आहे जी आदरणीय इब्राहीम व इस्माईल (अ.) इसहाक, याकूब आणि इतर सर्व पैगंबरांची जीवनपद्धत (धर्म) होती. म्हणून आता जगाचे नेतृत्व आणि सरदारीसाठी अधिकार प्राप्त फक्त तेच लोक आहेत जे या पैगंबर मुहम्मद (स.)यांचे अनुयायी आहेत. 8) नेतृत्वपरिवर्तनाची घोषणा होताना स्वाभाविकपणे किबलापरिवर्तन (दिशानिर्देश परिवर्तन)सुद्धा करणे आवश्यक होते. जोपर्यंत बनीइस्राईलच्या नेतृत्वाचा कालावधी होता तोपर्यंत तर बैतुलमक्दिसला (जेरुसलेम) एकेश्वरत्वाचे केंद्र होते आणि तेच सत्यान्वयींचे किबलास्थान होते. स्वत: पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायी समाजाचासुद्धा काही काळापर्यंत बैतुलमक्दिसला हेच ""किबलास्थान'' होते (नमाज पढताना ज्या दिशेकडे तोंडकेले जाते ती दिशा) परंतु जेव्हा बनीइस्राईल लोक नेतृत्वाच्या पदावरून अधिकृत रूपाने हटविले गेले तेव्हा बैतुलमक्दिसची केंद्रियता आपोआप नष्ट झाली. म्हणून ही घोषणा केली गेली की यापुढे आता तेच स्थान सत्यधर्माचे केंद्र आहे, जेथून पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आवाहनकार्य प्रारंभ झाले आहे. प्रारंभी आदरणीय इब्राहीम (अ.) यांच्या आवाहनाचे केंद्रसुद्धा हेच स्थळ होते. म्हणूनच ग्रंथधारक लोक आणि अनेकेश्वरवादी लोकांना मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता की किबला होण्याचा हक्क अधिकतर काबागृहालाच पोहचतो. हठधर्मीची (दुराग्रही लोकांची) गोष्ट दुसरी आहे की असे जिद्दी लोक सत्याला सत्य जाणूनसुद्धा मान्य करण्यास नकार देतात. 9) पैगंबर मुहम्मद (स.) अनुयायींचे नेतृत्व आणि काबागृहाची केंद्रियता घोषित झाल्यानंतरच अल्लाहने या अध्यायातील आयत 153 पासून ते अध्यायाच्या अंतापर्यंत सातत्याने या अनुयायी समुदायाला आचरणासाठी मार्गदर्शन केले आहे. 124) कुरआनमध्ये अनेक ठिकाणी कठीणतम कसोट्यांना उल्लेखित करण्यात आले आहे ज्यांना यशस्वीरित्या सामोरे जाऊन आदरणीय इब्राहीम (अ.) यांनी स्वत:ला मानवजातीचे नेतृत्व आणि मार्गदर्शकपदासाठी योग्यताप्राप्त सिद्ध केले होते. जेव्हा त्यांच्यावर सत्य प्रकट झाले तेव्हापासून ते मरेपर्यंत त्यांचे संपूर्ण जीवन साक्षात त्याग होते. जगातील अतिप्रिय वस्तुंपैकी एकही अशी वस्तु शिल्लक राहिली नाही जिचा आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांनी सत्यासाठी त्याग केला नसेल. जगातील ते
[next]


आणि लोकांना आदेश दिला की इब्राहीम ज्या ठिकाणी प्रार्थनेसाठी उभा राहतो त्या स्थानाला कायमस्वरूपी नमाजचे स्थान बनवा. आणि इब्राहीम व इस्माईलला आदेश दिला, ‘‘माझ्या या घराला परिक्रमा आणि एकांतवास तसेच रुकूअ व सजदा (नमाज अदा) करणाऱ्यांसाठी स्वच्छ (पवित्र) ठेवा.१२६ (१२६) त्यानुसार इब्राहीमने प्रार्थना केली, ‘‘हे माझ्या पालनकर्त्या, या नगराला शांतीनगर बनव आणि येथील निवासींपैकी जे लोक अल्लाह आणि मरणोत्तर जीवनावर श्रद्धा ठेवतील त्यांना उपजीविकेसाठी सर्व प्रकारची फळे दे.’’ त्याचा प्रतिसाद म्हणून त्यांच्या पालनकर्त्याने म्हटले, ‘‘परंतु जे मानणार नाहीत त्यांना ऐहिक नश्वर जीवनाची सामुग्री तर मी देईन१२७ परंतु शेवटी नरकयातनांकडे मी त्यांना फरफटत घेऊन जाईन आणि ते अत्यंत वाईट स्थान आहे.’’

सर्व धोके आणि संकटे ज्यांना मनुष्य अतिघाबरून असतो, त्या सर्व संकटांना सत्यासाठी ते सामोरे गेले. 125) म्हणजे हे वचन तुमच्या संततीच्या सदाचारी व नेक लोकांसाठीच संबंधित आहे. यांच्यापैकी जे कोणी अत्याचारी आहेत, त्यांच्यासाठी हे वचन लागू पडत नाही. अत्याचारी म्हणजे केवळ मनुष्यावर अत्याचार करणाराच नव्हे तर सत्य आणि सत्यशीलतेवर अत्याचार करणारासुद्धा आहे. 126) पवित्र ठेवण्याचा अर्थ केवळ हाच होत नाही की केरकचऱ्यापासून स्वच्छ ठेवले जावे. अल्लाहच्या गृहाचे खरे पावित्र्य म्हणजे त्या गृहात अल्लाहशिवाय इतर कोणाचाही धावा केला जाऊ नये. ज्याने अल्लाहच्या घरात अल्लाहच्या नावाव्यतिरिक्त कुण्या दुसऱ्याला स्वामी, उपास्य, कामनापूर्त करणारा आणि वि¿नहर्ता म्हणून पुकारले तर त्याने त्या गृहाला अपवित्र केले. ही आयत अतिसूक्ष्मशैलीत कुरैशच्या अनेकेश्वरवादींच्या अपराधांकडे संकेत करीत आहे की हे जालीम लोक इब्राहीम आणि इस्माईल (अ.) यांचे वारस असल्याचा गर्व तर करतात परंतु विरासतीचा हक्क अदा करण्याऐवजी उलट त्या हक्काला पायदळी तुडवीत आहेत. म्हणून जे वचन इब्राहीम (अ.) यांना दिले होते त्यापासून ज्याप्रकारे बनीइस्राईल विमुख झाले त्याचप्रमाणे हे अनेकेश्वरवादी बनीइस्राईलसुद्धा त्यापासून जास्त दूर गेले आहेत. 127) आदरणीय इब्राहीम (अ.) यांनी जेव्हा नेतृत्व व पेशवाईच्या पदाविषयी विचारणा केली, तेव्हा सांगितले गेले, ""या पदासाठीचे वचन तुमच्या संततीपैकी फक्त ईमानधारक सदाचारी लोकांसाठी आहे, अत्याचारी लोकांसाठी नव्हे.'' यानंतर पैगंबर इब्राहीम (अ.) उपजीविकेसाठी प्रार्थना करू लागले तेव्हा याच आदेशाला दृष्टिक्षेपात ठेवूनच त्यांनी फक्त आपल्या ईमानधारक सदाचारी संततीसाठीच प्रार्थना केली. तेव्हा अल्लाहने या भ्रमाला त्वरित दूर केले आणि त्यांना सांगितले, नेतृत्व व पेशवाई वेगळी गोष्ट आहे आणि जगातील रोजी दुसरी गोष्ट आहे. नेतृत्व तर फक्त ईमानधारक सदाचारींसाठी आहे परंतु जगातील रोजी अल्लाहला मानणारे व न मानणारे सर्वांना दिली जाईल. याने हे

[next](१२७) आणि स्मरण करा जेव्हा इब्राहीम आणि इस्माईल या गृहाच्या भिंती उभारीत होते व प्रार्थना करीत होते, ‘‘हे आमच्या पालनकर्त्या! आमच्याकडून या सेवेचा स्वीकार कर. तू सर्वांचे ऐकणारा आणि सर्वकाही जाणणारा आहेस. (१२८) हे पालनकर्त्या! आम्हा दोघांना तुझे आज्ञाधारक (मुस्लिम) बनव. आमच्या वंशामधून असा समाज घडव जो तुझाच आज्ञाधारक झालेला (मुस्लिम)असेल. आम्हाला आमच्या उपासनेचा विधी सांग आणि आमच्या उणिवांकडे दुर्लक्ष कर. नि:संशय तू असीम क्षमावंत आणि परम दयावंत आहेस. (१२९) आणि हे पालनकर्त्या! या लोकांमध्ये यांच्यातील एक पैगंबर उभा कर, जो तुझे संदेश यांना ऐकवील आणि यांना ग्रंथ आणि विवेकाची शिकवण देऊन यांचे जीवन उन्नत करील.१२८ तूच महान प्रभुत्वशाली व न्याय करणारा आहेस.१२९(१३०) इब्राहीमच्या पद्धतीकडे कोण पाठ फिरवील? जो स्वत:ला मुर्ख व अज्ञानी बनवील तोच इब्राहीमच्या धर्माकडे पाठ फिरवील. नि:संशय आम्ही त्याला जगामध्ये आमचे कार्य करण्यासाठी निवडले होते. आणि परलोकामध्ये त्याची गणना सदाचाऱ्यांमध्ये आहे. (१३१) जेव्हा पालनकर्त्याने

सिद्ध होते, की एखाद्याला जगात विपुल उपजीविका (रोजी) मिळत आहे तर त्याने या भ्रमात राहू नये की, अल्लाह त्याला प्रसन्न आहे आणि तोच अल्लाहकडून नेतृत्व करण्यायोग्य आहे. 128) जीवनाला उन्नत (पवित्र) करणे म्हणजे विचार, आचार, चारित्र्य, सवय, संस्कृती, राजनीती, अर्थनीती म्हणजेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला उन्नत करणे आहे. 129) याने अभिप्रेत हे दाखविणे आहे, की पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आगमन हे खरे तर पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या प्रार्थनेचे फळ आहे.

[next]त्याला सांगितले, ‘‘मुस्लिम हो’’ (स्वत:ला समर्पित कर)१३० तेव्हा तो त्वरित म्हणाला, ‘‘मी तर साऱ्या सृष्टीच्या पालनकर्त्याला समर्पित (मुस्लिम) झालो आहे!’’ (१३२) आणि अशाच प्रकारचे आचरण करण्याचा आदेश त्याने आपल्या मुलाबाळांना दिला होता. आणि तोच आदेश याकूबनेही१३१ आपल्या संततीला दिला होता. त्याने म्हटले की, ‘‘माझ्या मुलांनो, अल्लाहने तुमच्यासाठी हा धर्म१३२ पसंत केला आहे तेव्हा मरेपर्यंत अल्लाहला समर्पित होऊन राहा.’’ (१३३) ‘‘काय त्यावेळी तुम्ही उपस्थित होतात जेव्हा याकूब या नश्वर जीवनाचा निरोप घेत होता?’’ त्याने मृत्यूसमयी आपल्या मुलांना विचारले, ‘‘मुलांनो! माझ्या पश्चात तुम्ही कुणाची भक्ती कराल?’’ त्या सर्वांनी उत्तर दिले,'' आम्ही त्याच एक अल्लाहची भक्ती करू ज्याची तुम्ही आणि तुमचे पूर्वज इब्राहीम, इस्माईल आणि इसहाकने भक्ती केली. आणि आम्ही त्यालाच समर्पित झालो आहोत.१३३ (१३४) असे ते लोक होते जे होऊन गेले. जे काही त्यांनी कमाविले ते त्यांच्यासाठी आहे आणि जे

130) मुस्लिम तो जो अल्लाहसमोर नतमस्तक होतो. अल्लाहच आपला मालक, पालक, शासक, स्वामी व उपास्य आहे असे मान्य करतो. जो स्वत:ला पूर्णत: अल्लाहला समर्पित करतो आणि त्याच मार्गदर्शनानुसार जीवनयापन करतो, जे मार्गदर्शन अल्लाहकडून आले आहे. या धारणा व नीतीचे नाव "इस्लाम' आहे. हाच त्या सर्व पैगंबरांचा दीन (जीवनधर्म) होता, जे प्रारंभापासून विभिन्न काळात, विभिन्न देशात व विभिन्न लोकसमुदायात येत होते. 131) पैगंबर याकूब (अ.)यांचा उल्लेख मुख्यत: यासाठी आला आहे की बनीइस्राईल मुळात त्यांचीच संतती होती. 132) दीन (धर्म) म्हणजे जीवनपद्धती, जीवनव्यवस्था, जीवनशैली आणि ते विधीनियम ज्यानुसार मनुष्य जगात आपली संपूर्ण विचारप्रणाली व कार्यप्रणाली निश्चित करतो. 133) बायबलमध्ये पैगंबर याकूब (अ.) यांच्या मृत्यूचे सविस्तर वर्णन आले आहे. परंतु आश्चर्य आहे की या मृत्यूपत्राचा मुळीच उल्लेख आला नाही. परंतु तलमुदमध्ये जे सविस्तर मृत्यूपत्र लिहीलेले आहे त्याचा विषय कुरआनच्या वर्णनाशी मिळताजुळता आहे. त्यात पैगंबर याकूब (अ.) म्हणतात, ""खुदावंद, आपल्या खुदाची बंदगी करीत जा, तो तुम्हाला सर्व संकटापासून वाचविल जसे त्याने तुमच्या पूर्वजांना वाचविले आहे. आपल्या संततीला खुदाशी प्रेम करण्याची व त्याच्या आदेशाचे पालन करण्याची शिकवण द्या जेणेकरून त्यांना दीर्घायुष्य लाभेल उत्तरात त्यांच्या मुलांनी सांगितले, ""जे काही तुम्ही मार्गदर्शन केले आम्ही त्यानुसार चालू. खुदा आमच्याबरोबर असो.'' तेव्हा पैगंबर याकूब (अ.) यांनी सांगितले, ""जर तुम्ही खुदाच्या सरळमार्गाला सोडून उजवी व डावीकडे वळणार नाही तर खुदा निश्चितच तुमच्यासंगे राहील.''

 [next]

 


काही तुम्ही कमविणार आहांत ते तुमच्यासाठी असेल. तुम्हाला हे विचारले जाणार नाही की ते लोक काय करीत होते?१३४ (१३५) यहुदी म्हणतात, ‘‘यहुदी व्हा तर सन्मार्ग लाभेल.’’ खिस्ती म्हणतात, ‘‘खिस्ती व्हा तर तुम्हाला सन्मार्ग लाभेल.’’ त्यांना सांगा, ‘‘नाही! धर्म तर केवळ इब्राहीमचा धर्म आहे. जो अनेकेश्वरवादी नव्हता.१३५ (१३६) मुस्लिमांनो म्हणा, ‘‘आम्ही ईमान धारण केले अल्लाहवर आणि त्या मार्गदर्शनावर

134) म्हणजे तुम्ही तर त्यांची संतती जरूर आहात परंतु त्यांच्याशी तुमचा काडीमात्र संबंध नाही. त्यांचे नाव घेण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे जेव्हा की तुम्ही त्यांच्या जीवनपद्धतीपासून विमुख झालेला आहात. अल्लाह तुम्हाला हे विचारणार नाही की तुमचे आई-वडील (पूर्वज) काय करीत होते, तर विचारले जाईल की तुम्ही स्वत: काय करीत होता. आणि हे जे सांगितले गेले, ""जे त्यांनी कमविले ते त्यांच्यासाठी आहे आणि जे तुम्ही कमविणार आहात, ते तुमच्यासाठी आहे.'' ही कुरआनची वैशिष्ट्यपूर्ण वर्णनशैली आहे. आम्ही ज्याला करणी किंवा आचरण म्हणतो कुरआन त्यास "कमाई' हा शब्‌द वापरतो. मनुष्याचे प्रत्येक कृत्य चांगले किंवा वाईट परिणाम ठेवून असते आणि जे अल्लाहची प्रसन्नता व अप्रसन्नता यामध्ये प्रकट होईल. हेच कर्मफळ मनुष्याची "कमाई' आहे. कुरआनच्या दृष्टिकोनातून वास्तविक महत्व या कर्मफळालाच आहे. म्हणून कुरआन आमच्या कर्मांना व कामांना "काम' या शब्दाने व्यक्त करण्याऐवजी "कसब' (कमाई) या शब्दाने व्यक्त करतो. 135) या उत्तराचा मतितार्थ समजण्यासाठी खालील दोन गोष्टींना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 1) प्रथम म्हणजे यहुदी (ज्यू धर्म) आणि इसाई (ख्रिश्चन धर्म) विचारसरणी (धर्म) नंतरची निर्मिती आहे. यहुदी मत आपल्या या नावाने आणि धार्मिक वैशिष्ट्यांसह आणि पंरपरांसह इ.स. पूर्व तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात जन्माला आला. तसेच इसाई मत आपल्या या नावाने आणि धार्मिक वैशिष्ट्य व परंपरांसह आदरणीय पैगंबर इसा (अ.) यांच्यानंतर जन्माला आला. आता येथे हा प्रश्न निर्माण होतो की जर मनुष्याचे सरळमार्गावर