खरे पाहता जगाची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत हजारो
प्रेषित आणि सुधारक येऊन गेले आहेत. सर्वांनीच समाजसुधारणेचे खूप कार्य
केले मात्र अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याद्वारे जी क्रांती जेवढ्या
अल्प काळात घडली, त्याचे उदाहरण या जगाच्या इतिहासात सापडणे अशक्य आहे.
या ठिकाणी ही गोष्ट लक्षणीय आहे की प्रेषित मुहम्मद
(स.) यांनी प्रस्तुत केलेला धर्म अर्थात इस्लाम हा इतर सर्वच धर्मांपेक्षा
पूर्णतः भिन्न आहे. कारण हा केवळ धर्म नसून एक अत्यंत महान सामाजिक
आंदोलन होय. इस्लाम धर्माचा उद्देश जगातून अन्याय, अत्याचार, शोषण व
उत्पीडन समूळ नष्ट करून न्यायाची स्थापना करणे आहे. या आंदोलनाच्या
माध्यमाने केवळ मानसिकताच बदलली नसून समाजाच्या आर्थिक, नैतिक, सांस्कृतिक
आणि सामाजिक परिस्थितीमध्ये पूर्णतः क्रांती घडली. हा एक असा चमत्कार
घडला की जगातील मोठमोठ्या विचारवंतांनी आश्चर्यचकीत झाले.
Post a Comment