January 2019

समलिंगी संभोग अत्यंत घृणास्पद पाप आहे. प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हा एक असा अपराध आहे ज्यापासून समाजाला पवित्र ठेवण्याचे दायित्व इस्लामी शासनाचे  अनिवार्य कर्तव्य आहे.’’ तसेच या अपराध करणाऱ्याला कडक शिक्षा दिली गेली पाहीजे. हदीस कथन आहे की, ‘‘भोगी आणि भोग्य दोघांना ठार करा. ते विवाहित असोत की  अविवाहीत.’’ प्रेषित लुत (अ.) यांच्या काळातील जनसमुहास, कौमे लूत असे म्हणतात. लूत जनसमुह एका किळसवाण्या विकृतेने पछाडला होता. आणि ती किळसवाणी विकृती  म्हणजे, पुरुषांनी पुरुषांशी शारिरीक संबंध (होमो सेक्स्युअ‍ॅलिटी) ठेवणे. या अनैतिकतेने जणू सांसर्गिक रोगाचे स्वरूप धारण केले होते. मानवी इतिहासात हा पहिला जनसमूह होय,  ज्याने जगात निर्लज्जतेचे अत्यंत हीन उदाहरण कायम केले. घृणायोग्य काम या जनसमुहाने केल्याने मानवी इतिहासात ते कुप्रसिद्ध आहेत. या कुकृत्याने हे लोक कधीही थांबले नाहीत. परंतु युनानच्या (सध्याच्या ग्रीसच्या) तत्त्वज्ञानी लोकानी या घृणास्पद अपराधाला नैतीक गुणात समावेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी जी उणीव शिल्लक राहिली  होती, तिला आजच्या चंगळवादी पाश्चात्य देशांनी पूर्ण केली आहे. यावरून समजते की नैतीक पतनाच्या आणि दुष्टतेच्या सर्व सीमा या लोकांनी पार केल्या होत्या. सुधारणा करण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नव्हता. ह्याच सीमेला पोहोचल्यानंतर, अल्लाहकडून त्यांना समूळ नष्ट करण्याचा निर्णय झाला. ज्या समाजाच्या सामुहिक जीवनात पावित्र्याचा लवलेशही शिल्लक राहत नाही, त्या समाजास जमिनिवर जिवित राहण्याचे कारण राहत नाही.
‘‘आम्ही त्या वस्तीला उलथेपालथे करून टाकले व त्यांच्यावर भाजलेल्या मातीच्या, दगडांचा वर्षाव केला, ज्यापैकी प्रत्येक दगड चिन्हांकित होता. तेव्हा पहा त्या अपराध्यांचा शेवट कसा  झाला?’’ (दिव्य कुरआन, सु. हिज्र, आयत- ७३ ते ७५)
स्वत:च्या पत्नीशी कुकर्म करणे हराम आहे.- प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘जो आपल्या पत्नीशी, लूत जनसमुहांसारखा कुकर्म करील त्यावर धिक्कार आहे.’’ (हदीस : अबु दाऊद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा आदेश आहे, ‘‘अल्लाह त्या पुरुषांवर आपली कृपादृष्टी करणार नाही, जो आपल्या पत्नीशी असे कुकर्म करतो.’’ (हदीस : इब्ने माजा, अहमद)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला आहे, ‘‘ज्याने मासीक पाळी आलेल्या पत्नीशी शारिरीक सहवास केला किंवा पत्नीशी लुत लोकांसारखे कुकर्म केले तर अशा माणसाने प्रेषित  मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित शिकवणींना नाकारले आहे.’’ हदीस : तिर्मिजी)
शिक्षा- प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात असा कुकर्माचा दावा कोणी पेश केला नाही म्हणून पूर्णत: याविषयी शिक्षा कशी दिली जाते, हे कळू शकले नाही. माननीय अली (रजी.) यांच्या मतानुसार अपराध्यांना तलवारीने ठार केले जावे व त्याचे प्रेत जाळून टाकावे. याच मताला माननिय अबुबकर (रजी.) यांनी सहमती दर्शविली होती. माननिय उमर (रजी.) आणि  माननिय उस्मान (रजी.) मतानुसार, जुन्या पडक्या इमारतीच्या खाली अपराध्यांना उभे करून त्यांच्यावर ती इमारत पाडून टाकावी.

‘निकाह को आसान करो’ मोहीम :  मौ. अब्दुल कवी फलाही यांचे प्रतिपादन

आकुर्डी (वकार अहमद अलीम) - ”अन् निकाह मिन् सुन्नती” निकाह करणे ही माझी कार्यधारणा आहे, असे प्रेषित ह. मुहम्मद (सल्ल.) यांचे वचन आहे (हदीस) म्हणजेच ’सुन्नत’ आहे. प्रत्येक सुन्नत (अनुकरण) ही एक उपासना आहे. नमाज, रोजा, जकात आदी यासुद्धा उपासना आहेत. उपासना करण्याची जी पद्धत इस्लामने शिकविली आहे त्याप्रमाणेच ती उपासना केली पाहिजे. प्रेषितांनी दाखविलेल्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने जरी विविध उपासना केल्या तरी त्या उपासना होऊ शकत नाही. निकाहसुद्धा एक ’उपासना’ आहे. मात्र ती सुद्धा प्रेषित ह. मुहम्मद (सल्ल.) यांच्या आदेश आणि पद्धतीनुसारच झाली पाहिजे तरच ती उपासना म्हणून इस्लामला मान्य होईल व त्याचे परिणामसुद्धा अतिशय फलदायी होतील. म्हणून समस्त मुस्लिमांनो! निकाहला उपासना समजून, अतीशय सोप्या पद्धतीने ती करावी, असे भावस्पर्शी आवाहन मौलाना अब्दुल कवी फलाही यांनी येथे केले. 
पुणे स्थित आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे रविवार 13 जानेवारी 2019 रोजी, सायंकाळी 6.30 वाजता ”निकाह को आसान करो” या मोहिमे अंतर्गत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शोब-ए-खवातीन जमाअत-ए- -(उर्वरित पान 7 वर)
इस्लामी हिंद (महिला शाखा), एस.आ. ओ., जी.आय.ओ. पिंपरी-चिंचवड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन कण्यात आले होते. 13 ते 20 जानेवारी पर्यंत, संपूर्ण पूणे जिल्ह्यात, मोहेमीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी, अध्यक्षीय समारोप करताना मौ. अब्दुल कवी बोलत होते. 
’निकाह’ इस्लाममध्ये केवळ प्रेषित आचरण नव्हे तर अनिवार्य कर्तव्य (फर्ज) ही आहे. निकाहमुळेच समाजात दृष्टीची जपणूक होते. निकाहमुळे स्त्री, पुरूष, समाजाचा एक आवश्यक भाग, बेसिक युनिट बनतात. घरगृहस्थी त्याचा पाया आहे. निकाहमुळेच एका सभ्य घराची, समाजाची स्थापना होते. पण निकाह हे केवळ रितीरिवाजाचे नाव नसावे तर ते एक ईश्‍वरी आदेशानुसार एक उपासना असावी, अशी अपेक्षा व्यक्त करून, मौलाना कवी म्हणाले, ’निकाह’ मुळे इतके फायदे समाजाला मिळतात, म्हणूनच निकाहला ’आसान’ केले पाहिजे. यासाठीच जमाअतच्या महिला विभागकडून आयोजलेली ही मोहिम, प्रशंसनीय आहे, असेही मौलानांनी सांगितले. 
समाजामध्ये निकाह (विवाह) एक समस्या होत चालली आहे. दहेज, कपडा-लत्याची रक्कम, मंगनी आणि वेगवेगळ्या रिती-रिवाजामुळे ’निकाह’ ला अवघड व दुष्प्राप्य बनविले गेले आहे. यावेळी प्रस्तावनेमध्ये ”निकाह ला इतके सोपे करा की ़िजना (व्याभिचार) करणे अशक्य व्हावे”. अनावश्यक रिती-रिवाज विरूद्ध जनजागृती करणे हाच या मोहिमेचा उद्देश असल्याची ग्वाही, महिला विभाग प्रमुखाद्वारे, प्रास्ताविकेत स्पष्ट करण्यात आली. 
पिंपरी चिंचवड शहर, उलेमा कौन्सिलचे सेक्रेटरी, मौलाना नय्यर नूरी साहेबांनी, ”निकाह को आसान करो” हा संदेश नवीन नाही, प्रेषित ह.मुहम्मद (सल्ल.) यांनी आपल्या आयुष्यातच केवळ याची उद्घोषणाच केली नाही तर, प्रात्यक्षिकरित्या कृतीसह ते सिद्ध करून दाखविले. मुस्लिम समाज, प्रेषितांच्या कृतीला (आचरणाला) सुन्नत समजतो पण त्याची अंमलबजावणी करीत नाही. निकाहची सुन्नत अंमलबजावणीसाठी मोठ्या हॉलची जरूरी नाही. मस्जिदमध्ये निकाह व्हावा. वायफळ खर्च न करता, निकाह साधेपणाने झाले तर सामाजिक गरीबीचे उच्चाटन होऊ शकते असा आशावाद ही मौ. नूरी यांनी व्यक्त केला. 
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य,मौ. निजामुद्दीन फख्रुद्दीन यांनी, निकाह अजमत (सन्माननीय) आणि बरकतवाला असल्याचे सांगून, आजकाल लग्नासाठी महागड्या निमंत्रण पत्रिका तयार करण्याच्या ’फॅशन’ची टर उडविताना सांगितले की, प्रेषित सल्ल. यांचे सहकारी आपल्या लग्नात, प्रेषितांना सुद्धा आमंत्रित करीत नसल्याचीही काही उदाहरणे इस्लामी इतिहासामध्ये आहेत.
नकीबे मिल्लत, पिंपरी चिंचवड शहराचे मौ. मुहम्मद अलीम अन्सारी यांनी, प्रेषित मुहम्मद (सल्ल.) हे जगाचे ’रोल मॉडेल’ आहेत. प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. खरेच आमचे जीवन प्रेषित सल्ल. यांच्या आदेशानुसार आहे का? हे पहावे. इस्लामी शरियत शिवाय होणारी प्रत्येक कृती ही बरबादी आहे, असा रोखठोक इशारा यावेळी मौ. अन्सारी यांनी दिला. 
आता जगात तो सर्वश्रेष्ठ मानवी समुह तुम्ही (मुस्लिम) आहात, तुम्हाला समस्त जगवासियांच्या मार्गदर्शनासाठी आणि सुधारणा करण्यासाठीच अस्तित्वात आणण्यात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता, दुराचापासून रोखता, असे कुरआनच्या आयातींद्वारे आवाहन करून, जमाअत-ए-इस्लामी हिंद, पुणे विभागाच्या प्रमुख नाजिमा सईद साहेब यांनी, ’निकाह’ याची व्याख्या स्पष्ट केली. अनोळखी पुरूष आणि स्त्री, यांनी सन्मानाने जीवन व्यतीत करणे म्हणजे ’निकाह’ होय. निकाह हा अश्‍लिलता, व्याभिचार आदी सामाजिक दुर्व्यवस्थेपासून दूर ठेवतो. केवळ निकाहमुळेच समाजाची योग्य पद्धतीने सुधारणा होऊ शकते असे सांगून नाजेमा यांनी निकाहाची कारण मिमांसा स्पष्ट केली. यहूदी संपत्तीमुळे निकाह करतात, ईसाई सौंदर्यामुळे निकाह करतात, पण प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांना मानन्यार्‍यांनों, तुम्ही केवळ ’दीनदारी’ (धर्माचरण) वर निकाह करा. यामुळेच समाजात नितीमत्ता, चारित्र्य आदी गुणांची वाढ होते व सामाजिक सुधारणा होते. 
सूत्रसंचालन अजिमुद्दीन यांनी करताना विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. पुणे जिल्ह्याचे जमाअत-ए-इस्लामी हिन्दचे, नाजीमे शहर डॉ. उमर फारूख यांनी उपस्थितांचे आभार मानले. जवळपास साडेतीन तास, अत्यंत शांतपणे स्त्री, पुरूषांनी विषय समजावून घेतला.

वर्तमान काळातील हा एक बिकट, कीचकट व नाजुक प्रश्न आहे. या प्रश्नावर एवढी चर्चा झाली व होत आहे की, त्यांना गोळा केल्यास एक मोठे ग्रंथालयच तयार होईल. परंतु असल्या चर्चा मधून हा प्रश्न सुटला नाही. उलट या चर्चांमुळे हा प्रश्न अधिकच बिकट, कीचकट आणि नाजुक होत गेला. या प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरुपात इस्लाम धर्माची सुद्धा एक स्पष्ट भूमिका आहे. ही भूमिका आधुनिक काळाने प्रेरित नसून ती इस्लामच्या प्रारंभी पासूनच होती. आजही आहे व जग संपेपर्यंत जशीच्या तशीच राहणार. ही इस्लामी भूमिका त्या भूमिकेच्या अगदी विरोधात होती. जी शतकानुशतके जनमानसांत रूजलेली व मान्य करण्यात आलेली होती. या मध्ये स्त्रीच्या वयोमानानुसार पुरुषाच्या संबंधाच्या स्वरूपानुसार प्रेम व सहानुभूती आणि सहकार्य, समानता, तसेच तिच्या स्थायी व्यक्तीमत्वाची स्वीकृती आहे. यात तिचा जीव, संपत्ती व विनयाचे संरक्षण आले. शिवाय तिचे अर्थिक, सामाकिड व राजनैतिक अधिकार आहेत. असे म्हणावयास हरकत नाही की, या मध्ये तिच्या व्यक्तीमत्वा च्या परिपूर्णतेची सर्व साधन-सामग्री उपलब्ध आहे. ही अतिशय स्पष्ट, प्रमाणित व कणखर भूमिका आहे. या भूमिकेमुळे ते सर्व प्रश्न सुटतात जे वर्तमान काळाच्या भुमिकेने समाज जीवनात निर्माण करून ठेवलेत.
इस्लाम धर्माच्या बाबतीत काही लोकांची भूमिका अज्ञानी व पक्षपाती असते. ते त्यांच्या विशेष धार्मिक व राजनैतीक विचारसरणीमुळे इस्लाम धर्माच्या कोणत्याच विशेषत्वास पचवू शकत नाहीत. हे लोक स्त्रिच्या बाबतीत इस्लामच्या सकारात्मक भूमीकांकडे काना डोळा करतात. म्हणजेच द्वेष आणि शत्रुत्वाची सूड भावनाच माणसाला सत्यापासून दूर ठेवते. जो मनुष्य या क्लिष्ट मानसिक रोगास बळी पडतो तो महा महीम वास्तवांना पाहु शकत नाही. व पाहिल्यावर सुद्धा त्यांना न पाहण्याचे ढोंग करीत असतो. परंतु सत्य लपविल्याने व डोळे मिटवून घेतल्याने लपत नसते. ते आपले अस्तित्व प्रखरपणे प्रकाशमयरित्या मान्य करण्यास भाग पाडते. जो पर्यंत या भूतलावर दिव्य कुरआन व हदीसची स्पष्ट शिकवण अस्तित्वात आहे, ज्या नुसार शतकानु शतके संपूर्ण जगामध्ये निर्णय व त्यावर कार्य होत राहिल, स्त्री वरील इस्लामच्या उपकारांना नाकारता येत नाही.
काहींना वाटते की इस्लाम-पूर्व काळात स्त्रिची जी दयनीय अवस्था होती. इस्लामने त्यात सुधारणा अवश्य केली व काही अधिकार सुद्धा दिलेत ज्यापासून ती वंचित होती. परंतु स्त्री बरोबर परिपूर्ण न्याय करण्यात आला नाही. पुरुषाला मिळालेल्या अधिकारापेक्षा स्त्रिला मिळालेले अधिकार तुलनात्मक दुष्टया खूप कमी आहेत. व ही तफावत अजूनही बाकी आहे जी पूर्वी ‘स्त्रि-पुरुषांत’ अधिकारांच्या बाबतीत होती. दुसऱ्यां शब्दांत इस्लामने पुरुष व स्त्रिला समान दर्जा दिला नाही व त्यांच्या दरम्यान परिपूर्ण समानता प्रस्थापित केली नाही.
इस्लामने स्त्रीला जे अधिकार दिले आहेत. त्यावर विषमतेच्या या दृष्टिकोनानुसार पुष्कळ आक्षेप व हरकती घेण्यात येतात. हे असे म्हणता येते की इस्लाम मध्ये पुरुष श्रेष्ठत्वाची कल्पना आहे. पुरुष घराचा स्वामी व मालक आहे. तो एका पेक्षा जास्त विवाह करू शकतो. त्याला तलाक (घटस्फोट) देण्याचा अधिकार आहे. वारशात स्त्री पेक्षा दुप्पट अधिकार पुरुषाला आहे. साक्ष, बदला आणि दैयत (भरपाई) च्या कायद्यात स्त्रिवर अन्याय झालेला आहे. असे व अशा प्रकारच्या कीतीतरी हरकती व आक्षेप घेणारे इस्लामी कायद्यात बदल घडविण्याच्या मानसिकतेत आहे. त्यांची मागणी आहे की पुरुषाचे अधिकार संपुष्टात आणावे. स्त्रिला खाजगी जीवनात पुरुषांना मिळालेले.डछएकअङ सर्व अधिकार देण्यात यावे. दोघांचे अधिकार समान असावेत. वारसा हक्कात दोघांचा समान वाटा असावा. पतीला तलाक देण्याचा अधिकार स्त्रिला सुद्धा असावा. तिला जेव्हा वाटल्यास पती पासून विभक्त होण्याचा अधिकार असावा. पुरुषाने तलाक दिल्यास आजीवन घटस्फोटित स्त्रिला पोटगी द्यावी. पुरुषाला एक पत्नी घरात असताना दुसऱ्या लग्नाची परवानगी नसावी. कधी-कधी तर जीभ एवढी अवाक्या बाहेर जाते की पुरुषांना असलेल्या बहुपत्नीत्वाच्या अधिकारा प्रमाणेच स्त्रिलाही बहुपतीत्वाचा अधिकार मिळावा. अशा प्रकारे स्त्रिला पण पुरुषांना मिळालेले, सर्वच राकडीय व सामाकिड अधिकार मिळावेत. हे सर्व आक्षेप इस्लाम विषयी अज्ञानाचे कडू फलीत आहेत. दुर्दैवाने या अज्ञानी मंडळी मध्ये बरेचसे जण सुशिक्षित आहेत व विचारवंत देखील आहेत. इस्लाम धर्माने जीवनाची जी विस्तारित आणि परिपूर्ण कल्पना सादर केली आणि ज्या प्रमाणे व्यक्तीगत व सामुहिक जीवनाची त्याने उभारणी केली. याच्या प्रकाशात हे आक्षेप आपोआप लोप पावतात.
हे आक्षेप काही नवीन नाहीत. हे फार जुने आहेत. या मुदतीत विविध अगांनी त्यांचे समाधान करण्यात आले. परंतु ही गोष्ट कीती आश्चर्याची व खेदजनक आहे की प्रत्येक वेळी या आक्षेपांना अगदी नवीन व आधुनिक स्वरूपात सादर करण्यात येते. आणि याचा प्रचार करण्यात येतो की ही समस्या जग निर्मिती पासून आज पर्यंत पहिल्यांदाच जगासमोर आणण्यात आली व इस्लामी विद्वांनाजवळ यांचे उत्तरच नाही. या त्यांच्या नीतीमुळे असे सहसा वाटते की यांच्यात इस्लाम धर्म समजण्याची भावना कमी आणि टिके चे लक्ष्य बनविण्याचीच भावना जास्त आहे. गरज याची आहे की ज्या आक्षेपांची उत्तरे त्यांना मिळालीत त्यावर त्यांनी गंभीरपणे विचार करावा आणि त्यातही त्रुटी आढळल्यास स्पष्ट करावे. या मुळे आकलन व विवेकशीलतेचे मार्ग मिळतील. गैरसमजुती दूर होतील आणि इस्लामच्या वास्तव स्वरूपाचे आकलन होईल.
हे सर्व आक्षेप अशा प्रकारचे लोक घेतात ज्यांच्या विचारांवर व बुद्धींवर स्त्रि-पुरुषांचा पाश्चात्यांनी दिलेला विषमतेचा पगडा बसलेला आहे. या पगड्याच्या विळख्यात ते स्वतः विवश आहेत. ही विचारसरणी आता केवळ विचारसरणी राहीलेली नसून तिला मोठ्या प्रमाणात आजमावण्यात आले आहे. आणि परिणामी लैंगिक स्वैराचार आणि परिवारांच्या विघटनाच्या स्वरूपात भीषणता ओढवून घेण्यात आली. (याचे तपशील वार वर्णन ‘स्त्रि स्वातंत्र्याची पाश्चात्य कल्पना’ या लेखात आपल्या समोर मांडण्यात आले आहे.) परंतु या भीषण परिणामांकडे काना-डोळा करून त्याचा अशारितीने पुरस्कार करण्यात येतो की ती केवळ उपयुक्त विचार सरणी नसून स्त्रिची मुक्ती आणि उत्तुंग यशाची गुरुकील्ली आहे. इस्लामने या विचारसरणीचा पुरस्कार केला नाही तर विवेकशीलतेची मागणी आहे की इस्लामलाच नेहमी करिता घटस्फोट देण्यात यावा. वस्तुस्थिती अशी आहे की स्त्रिच्या बाबतीत इस्लामने दिलेल्या विचारसरणीची उपयुक्तता व मोल आणि पावित्र्य इतिहासात सिद्ध झाले आहे. जेव्हा केव्हा पश्चिमच्या स्त्रि-पुरुष समानतेच्या कल्पनेत सुधारणा घडवून आणण्यात येईल व त्यातील विषमतेस दूर करण्यात येईल तेव्हा ती कल्पना इस्लामी-विचारसरणी च्या जास्त जवळ येईल. एवढेच नाही तर हे सांगणे अयोग्य होणार नाही की इस्लामच्याच माध्यमाने त्यात सुधारणा घडवून त्याच्या त्रूट्या संपविण्यात येतील.
स्त्रिच्या बाबतीत इस्लामच्या भुमिकेवर विरोधकांकडून टीकांची झोड उठविण्यात आली व सतत हल्ले होत आलेत. हे हल्ले एवढे तीव्र आहेत की बरेचसे इस्लामचे नाव घेणारे सुद्धा खूप प्रभावित झालेत आणि त्यांना इस्लामी शिकवणीत मोठ्या चुका व त्रुट्या आढळून येऊ लागल्या.
या न्यूनगंडाचेही भरपूर प्रकार आहेत. या सर्व प्रकारांना निश्चित करणे सोपे नाही. काही मंडळी मग ते तोंडी दावा करो अथवा न करो, परंतु इस्लाम धर्माच्या कायद्यापासून मुक्त होऊ इच्छितो. त्यांच्या दृष्टिकोनात वर्तमान काळात स्त्रिचे लक्ष्य इस्लाम धर्माने नव्हे तर पाश्चात्यांनी निश्चित केले आहे. ती इस्लामच्या बंधनात अडकून स्वतःचा विकास करू शकत नाही. यासाठी तिला त्या मुक्त वातावरणामध्ये बागडावयास हवे जे पाश्चिमात्यांच्या मार्गदर्शनात निर्माण झाले आहेत. त्याच्या या कामना व प्रयत्नांना एक मुस्लिम तो मुस्लिम असे पर्यंत तरी साथ देऊ शकत नाही. कारण त्या मुस्लिमांसाठी शरीयतच्या त्या मर्यादा आहेत ज्यांचे उल्लंघन करण्याची त्याला परवानगी नाही. यदाकदाचित त्याच्या कडून अशी चूक घडली तरी तो स्वतःला अपराधी आणि ईश्वरासमोर उत्तरदायी असण्याची जाणीव बाळगेल व तात्काळ ‘शरीयत’ च्या मर्यादा कक्षेत येण्याची धडपड करील. हीच त्याच्या श्रद्धेची मागणी आहे. यावेळी शरीयतचे संपूर्ण आदेश चर्चेत घेतलले नाहीत. केवळ पारिवारिक जीवन विषयक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. या आदेशांना दिव्य कुरआनने विविध ठिकाणी ‘ईश्वरीय मर्यादा’ च्या शब्दाने ने संबोधित केले आहे. आणि या मर्यादांचे उल्लंघन करण्यास सक्तीने बंदी घातली आहे. एका ठिकाणी ‘तलाक’ च्या कायद्याच्या उल्लेखा संबंधी दिव्य-कुरआनने सांगितले की,
‘‘ईश्वराने निश्चित केलेल्या या मर्यादा आहेत. त्यांचे उल्लंघन करू नका. जे लोक त्यांचे उल्लंघन करतील, तेच अत्याचारी आहेत.’’ (सुरह-ए-बकरा : २२९)
सुर-ए-तलाक मध्ये सुद्धा तलाकचे नियम वर्णन करण्यात आले आहेत. त्यांच्या नंतर तात्काळ नंतर सांगितले की,
‘‘कित्येक वस्त्या अशा आहेत ज्यांनी आपला पालनकर्ता आणि त्याच्या प्रेषितांच्या आज्ञे विरुद्ध दुर्लक्ष केले तर मी (स्वयं ईश्वराने) त्यांचा सक्तीने हिशोब घेतला आणि त्यांना कठोर शिक्षा दिली. त्यांनी त्यांच्या कर्मांची फळे चाखली आणि त्यांची कार्यपरिणती तोटाच तोटा आहे. ईश्वराने (परलोकात) त्यांच्यासाठी तीव्र प्रकोप उपलब्ध करून ठेवला आहे. म्हणून ईश्वराच्या प्रकोपाचे भय बाळगा. हे बुद्धीमान लोक हो ! ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे. ईश्वराने तुमच्याकडे एक आदेश अवतरला आहे.’’ (सुरह-ए-तलाक : ८ ते १०)
मग कोणतीही मुस्लिम व्यक्ती या मर्यादा आणि ताकीद व तंबी नंतर स्त्रिचे अधिकार किवा आदेश अथवा कोणत्याही शरीयतच्या कायद्याचा विरोध करण्याची कल्पनाच कशी करणार?
काही जणांच्या बुद्धी व विचारांवर पाश्चात्यांचा एवढा पगडा व प्रभाव नाही की ते कुरआन च्या नियमांना प्राचीन विधी समजून व प्राचीन परंपरा समजून रद्द बातल ठरवतील. परंतु त्यांना असे वाटते की, इस्लामी विधी ज्या परिस्थितीत अवतरली होती. ती परिस्थिती आता पार बदलून गेली आहे. बदलत्या परिस्थितीत शतकानुशतके प्राचीन नियम व कायदे आणि परंपरा वर कार्यरत असण्याचा हट्ट धरणे योग्य नाही. हा काळ स्पर्धेचा काळ आहे. इस्लामने स्त्रि विषयी जी भुमिका घेतली आहे. त्या भुमिकेवर ठाम राहून वर्तमान काळातील स्पर्धात्मक जीवनांत ती वावरू शकत नाही. स्त्रिच्या इतरांबरोबरील स्पर्धेत मागे पडण्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण समाज व राष्ट्रच मागे राहील. या करिता इस्लामी कायद्यात सुधारणा करून वर्तमान काळाशी साम्य साधण्याची नितांत आवश्यकता आहे. या मंडळीच्या दृष्टिकोनात हे आवश्यक झाले आहे. जे लोक असे पुनरुज्जीवन करण्याची भाषा करीत नाहीत त्यांच्यावर हे परिवर्तनवादी लोक परिस्थिती बद्दल अज्ञानी, पुरातनवादी व अगतीक असण्याचे आरोप करीत असतात.
काही मंडळी याही पुढे जाऊन मोठ्या साधेपणाने व भोळसुद पणाने असे म्हणतात की इस्लाम एक आधुनिक धर्म आहे. त्याने स्त्रिला आधुनिक युगातील संपूर्ण अधिकार बहाल केले आहेत. परंतु या पुरातन वादयांना कुरआन आणि हदीसचा अर्थच अशा प्रकारे वर्णन केला की गुलामगिरीच्या काळातील आठवण यावी. करिता इस्लाम धर्माचे आधुनिक व विकासवादी वर्णन करण्याची गरज आहे. कोण आहे जो या आकलन शक्ती आणि दूरदर्शिता व उच्च विचारांची दाद देणार ?
जे लोक इज्तेहाद (साकल्लयाने केलेला विचार) च्या नावावर इस्लामी कायद्यात सुधारणेचे इच्छूक आहेत ते कदाचित इस्लामी कायद्यांना मानव निर्मित कायदा समजतात की जो कायदा मानव निर्माण करतो व तो गरज भासल्यास त्याच्या मर्जीनुसार त्यात बदल करीत जातो. इस्लामी कायदा हा मानव निर्मित नसून ईश्वराने स्वतः अवतरित केलेला आहे. या करिता कोणत्याही व्यक्तीस त्यात सुधारणा व परिवर्तन करण्याचा अजिबात अधिकार नाही. हा अधिकार त्याने प्रेषितास सुद्धा दिला नाही ज्याच्यावर ‘शरीयत’ अवतरली. कारण दिव्य कुरआनात आहे की,
‘‘जेव्हा आमच्या स्पष्ट गोष्टी त्यांना ऐकविल्या जातात तेव्हा ते लोक जे आम्हाला भेटण्याची अपेक्षा करीत नाहीत म्हणतात, याच्या ऐवजी एखादा अन्य कुरआन आणा अथवा यांच्यात काही बदल करा.’’ हे पैगंबर (स) त्यांना सांगा, ‘‘माझे हे काम नव्हे की मी आपल्या कडून याच्यात काही फेर बदल करावा. मी तर केवळ त्या दिव्य प्रकटनाचे अनुसरण करणारा आहे, जे माझ्याकडे पाठविले जाते. मी जरी आपल्या पालनकर्त्याची अवज्ञा केली तर मला एका मोठ्या भयंकर अशा दिवसाच्या यातनेची भीती आहे.’’ (सूरह-ए-युनूस : १५)
दुसरी गोष्ट अशी की मानवाने निर्माण केलेले कायदे वेळ आणि परिस्थितीचे द्योतक असतात. ते काळ आणि परिस्थितीच्या प्रभावा पासून मुक्त नसतात. त्यांच्यात मोठी लवचिकता असते. ते काळानुसार बदलत असतात. मानवीय कायद्यांत लवचिकता असणे म्हणजे ती त्यातील त्रुटी आहे जी बदलत्या काळात त्यावर कर्म करण्यास अपात्र बनविते. परंतु ज्याने इस्लामचा शुद्ध अंतःकरणाने अभ्यास केला आहे तो या वास्तवास कधीच नाकारू शकत नाही की दिव्य कुरआनाने स्वतःस एका कायम स्वरुपी धर्माच्या स्वरुपात सादर केले व ज्या मध्ये कयामत (महाप्रलय) पर्यंत परिवर्तन घडणे शक्य नाही. इज्तेहाद (विचार साकल्य) म्हणजे कुरआनच्या नियमांना बदलण्याचे नाव नसून या नियमांना बदलत्या परिस्थितीवर लागू करण्याचे कौशल्य व त्याच्या प्रकाशात व मार्गदर्शनात नवीन नियमांचा शोध लावणे आहे. हे काम स्वतंत्र विचारसरणी व स्वैर विचारसहीत शक्य नसून त्या नियमांच्या मर्यादांचे पालन करणे आवश्यक आहे जे इस्लामने निर्माण केले आहेत.
येथे एक प्रश्न राहून-राहून डोक्यात येतो, तो म्हणजे शेवटी या सुधारकांना स्त्रीचे अधिकार आणि मुस्लिमांची सामाकिड सुधारणेची एवढी काळजी का लागली? मुस्लिमांमध्ये भरपूर बिघाड आहेत. श्रद्धेच्या बाबतीत ही आणि कार्याबाबतीतही बिघाड आहेत. त्याच प्रमाणे नैतिक आणि व्यवहारिक बिघाड आहेतच. परंतु हा सुधारक या सर्व बिघाडांना दूर करण्याऐवजी मुस्लिम स्त्रि वर होत असलेल्या अत्याचार व अन्यायावरच का चितित आहे?
या मंडळीच्या बुद्धी व विचारधारेचे निरिक्षण केल्यास याचे एक कारण लक्षात येते की त्यांच्या विचारा नुसार मानवाच्या जीवनाचे उद्दिष्ट व त्याचे लक्ष्य हे पाश्चात्यांनी निश्चित केलेले उद्दिष्ट आणि लक्ष्य आहे. म्हणून त्यांनीच निश्चित केलेला मार्ग यांनी स्वीकारला आहे. त्यांचे एक स्पष्ट वैशिष्टय हे की धर्म एक निरर्थक बाब आहे व त्याचा आपल्या जीवनाशी सुतराम संबंध नाही. कोणाला जर रस असलाच तर त्याने धर्माला केवळ त्याच्या व्यक्तिगत जीवना पर्यंतच मर्यादित ठेवावे. सामुहिक जीवन त्या पासून मुक्त असावे. जो पर्यंत मानव धर्माच्या बंधनात जखडलेला आहे. भुतकाळाच्या अंधकारमय युगात पडलेला असेल आणि विकासाचे मार्ग त्याच्यासाठी बंद असतील. आजच्या काळात त्याला जगण्याचा अधिकार नाही.
हे संपूर्ण इस्लामी अनुयायांना याच मार्गावर चालविण्याचे इच्छूक आहेत. या करिता प्रथम पाऊलाच्या स्वरूपात कदाचित ते ‘समाज-सुधारणे’ स जास्त लाभकारी समजतात आणि मुस्लिम स्त्रिच्या अधिकाराच्या माध्यमाने त्यांना या क्षेत्रात यशस्वितेची जास्त आशा आहे. कारण की जो पर्यंत मुस्लिम स्त्रि धर्माच्या प्राचिन कल्नपेच्या ‘दलदली’ मध्ये फसलेली आहे व नवीन पिढीला ईश्वर आणि प्रेषिताचे दास्यत्व आणि त्यांच्या आदेशांचे पालन करण्याची शिकवण देत आहे तो पर्यंत धर्माची बंधने इतकी सैल होणार नाहीत की इस्लामच्या अनुयायांना त्यांच्यात हजारो दुष्कर्म असूनही त्यांच्या मार्गाची दिशा बदलणे शक्य होईल. त्यांची दिशा बदलणे केवळ अशा प्रसंगीच शक्य होईल जेव्हा स्त्रिच धर्मांच्या दिशेत असलेले तिचे तोंड वळवील. व आपले अधिकार मिळविण्यासाठी धर्माविरुद्ध रणशिग फुंकेल. वस्तुस्थिती अशी आहे की विरोधक त्यांच्या उद्दिष्टात यशस्वी झालेले नाहीतच आणि त्यांना यशस्वी होण्याची आशा बाळगण्याची गरज सुद्धा नाही. याचाच संताप आणि राग ते धार्मिक नेत्यांवर काढतात व त्यांना अज्ञानी, प्राचीनवादी व पुरातनवादी आणि मूलतत्ववादी सारख्या संबोधनांद्वारे संताप व्यक्त करीत असतात. त्यांच्या मुखाद्वारे व लेखणी द्वारे निघालेला प्रत्येक शब्द ‘प्रमाण-पत्र’ आहे आणि आधुनिक काळाने त्यास विस्तारण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणून हे सर्व प्रयत्न विकास आणि संस्कृतीच्या नावावर मोठ्या बिनधास्तपणे विस्तारीत करण्यात येत आहे.
काही जण स्वतः धार्मिक वृत्तीचे आहेत. आणि पाश्चात्य संस्कृतीच्या कटू अनुभवांपासून दहा पावले दूर राहू इच्छितात. परंतु चारही बाजूंनी या संस्कृतीचा विळखा एवढा घट्ट आहे की ते तिच्या प्रभावापासून सुरक्षित राहू शकत नाहीत. हळू-हळू त्यांच्या समाज जीवनात बदल होत आहे आणि पाश्चात्य संस्कृतीचा विळखा घट्ट होत आहे. परंतु अजूनही ते या बाबतीत समाधानी व आनंदित आहेत की, पार्चिमात्यांच्या अनुकरणाच्या स्पर्धेत सामील होऊन सुद्धा तिच्या वाईट प्रभावापासून त्यांचे समाज जीवन सुरक्षित आहे व यापुढे सुद्धा असेच सुरक्षित राहील. परंतु हे खोटे समाधान व गैरसमज आहेत जे जास्त काळ टिकू शकणार नाही. अद्याप पर्यंत त्यांना पाश्चात्यांचे कडू फलित भोगावे लागले नसतील तरी हे केवळ इस्लामचे परिणाम आहेत जे या संस्कृतीच्या परिणामांना प्रगट होऊ देत नाहीत. जेव्हा हे परिणाम संपतील तेव्हा पाश्चात्य संस्कृती तिच्या संपूर्ण दुष्कर्मांसहीत त्यांच्या घरांत नांदणार आहे. वादळाच्या पूर्वानुमानांना पाहून जो माणुस सावध होणार नाही व आपल्या घराचे संरक्षण करणार नाही. त्याचे घर वादळाच्या एका तडाख्याने नेस्तनाबुद होईल. आणि कोणीही त्यास वाचविण्यासाठी येणार नाही.

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) गुरूवारी लोकांना उपदेश करीत असत. त्यावेळी त्यांना एका मनुष्याने विचारले, ‘‘हे अबू अब्दुर्रहमान! तुम्ही आम्हाला दररोज उपदेश व  मार्गदर्शन करावे, अशी माझी इच्छा आहे.’’ ते म्हणाले, ‘‘दररोज भाषण देण्यापासून जी गोष्ट मला रोखते ती म्हणजे तुम्हाला कंटाळा येईल आणि तुम्ही कंटाळलेले मला आवडणार
नाही. मी सुट्टी देऊन उपदेश व मार्गदर्शन करीत असतो, जसे पैगंबर मुहम्मद (स.) आम्हाला सुट्टी देऊन उपदेश करीत होते जेणेकरून आम्हाला कंटाळा येऊ नये.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : 
पैगंबर मुहम्मद (स.) आणि अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांच्या वर्तणुकीने ही गोष्ट सिद्ध होते की ‘दीन’चा प्रचार करणाऱ्यांनी कोणाच्या पाठी लागून उपदेश व मार्गदर्शन न करता  परिस्थितीनुरून वर्तन केले पाहिजे, वेळ, प्रसंग पाहिला  पाहिजे आणि त्या शेतकऱ्यासारखे राहिले पाहिजे जो प्रत्येक क्षणी पावसाची वाट पाहतो आणि जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा लगेच जमिनीची मशागत करू लागतो. उठसूट कधीही धर्मप्रचार करणे चुकीचे आहे आणि मनुष्य संधीच्या शोधात गाफील राहावा, संधी येत राहावी आणि तो आपल्या मोठेपणाच्या  मोजमापात त्या संधी नष्ट करीत राहावा, हेदेखील चुकीचे आहे. 

अल्लाहने दारूचा धि:कार केला आहे


माननीय इब्ने उमर (रजी.) यांचे कथन आहे की, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘अल्लाहने धिक्कार केला आहे दारूचा.’’
(१) तिच्या पिणाऱ्यावर, (२) पाजणाऱ्यावर, (३) विकणाऱ्यावर, (४) खरेदी करणाऱ्यावर, (५) तयार करणाऱ्यावर, (६) दारूला वाहून नेणाऱ्यावर, (७) तयार करून घेणाऱ्यावर, (८) त्या  माणसावर ज्याच्यासाठी वाहून नेली जात आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी हा नियमसुद्धा सांगितला– ‘‘ज्या गोष्टी अधिक मात्रेमुळे नशा निर्माण होते त्याची थोडी मात्रा सुद्धा हराम  आहे.’’ 
जर एक ग्लासभर दारूमूळे नशा होत असेल तर, त्याला घुटभर पिणे सुद्धा हराम आहे. इस्लामी शरियतनुसार, इस्लामी शासनाची जबाबदारी आहे की दारूबंदी सक्तीने लागू करावी.  प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दारू सेवन करणाऱ्यांबरोबर जेवण घेण्यास मनाई केली आहे. ‘खम्र’ म्हणजे द्राक्षाची दारू. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे स्पष्ट मत आहे की, ‘‘प्रत्येक नशा  निर्माण करणारी वस्तू ‘खम्र’ आहे. आणि प्रत्येक वस्तू जी नशा निर्माण करते, हराम आहे.’’
‘खम्र’ म्हणजे प्रत्येक ती वस्तू जी बुद्धीला झाकून टाकते. प्रेषितांनी दारूला भेट म्हणून देण्यासही मनाई केली आहे. औषध म्हणून दारूच्या वापरास मनाई केली आहे. प्रेषित मुहम्मद  (स.) यांनी म्हटले, ‘‘दारू औषध नव्हे तर आजार (रोग) आहे.’’

इस्लामशी संबद्ध असलेला एक बहुचर्चित विषय मुस्लिम महिलांचा आहे. इस्लाम महिलांना पक्षपाती वागणूक देतो, असा आरोप केला जातो. या आरोपांना मूलतः पाश्चात्य देशातून पुष्टी दिली जाते. पाश्चिमात्य लोक त्यांच्या महिलांशी जसे वर्तन करीत आहेत, महिलांना जसे स्वैर स्वातंत्र्य दिले जाते, तशाच प्रकारचे वर्तन इस्लामनेही आपल्या महिलांशी करावे, तसेच स्वैर स्वातंत्र्य आपल्या महिलांना द्यावे; असेच जर ते इच्छित असतील, तर त्याचे उत्तर स्पष्ट व ठाम शब्दात ‘नाही’ असेच राहील. या दोन्ही समाजाचे आदर्श, एकमेकांच्या नेमके उलट आहेत. इस्लाम आपल्या महिलांना शालीनता, आदर-प्रतिष्ठा व संरक्षण देतो. अशा समाजाची इस्लामशी जोड कशी लावली जाऊ शकते, जेथे मुलींना ‘कॉल गर्ल’ केले जाते, तिला नागडी करून नाचायला लावले जाते आणि पुरुषांच्या कामवासनेची पूर्तता करणारी भोग्य वस्तू, असे तिला मानले जाते. पाश्चिमात्यांच्या नैतिक मापदंडात इस्लामी महिला कशा बसू शकतात बरे? इस्लामने महिलांना जे हक्क व अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार कोठे कोठे त्यांना मिळत नाहीत, ही गोष्ट काही अंशी खरी आहे. त्यामुळे महिलांना त्रासही होत असतो. हेही एक मर्यादेपर्यंत ठीक आहे. याचे मुख्य कारण असे आहे की, आपले इस्लामी अधिकार कोणते आहेत व आपली कर्तव्ये कोणती आहेत, हे पूर्णपणे जाणत नाही अथवा ते पूर्णपणे आचरणात आणत नाहीत.
इस्लामने पुरुषांना व महिलांना समान हक्क दिलेले आहेत. आपला समाज आज सुद्धा कन्यांना डोक्यावर असणारे ओझे समजतो. इस्लाम पुत्र व कन्या यांच्यात कसलीही फरक करीत नाही. मानवाच्या तत्त्वाने दोहोंना समान मानतो. शारीरिक व मनोवैज्ञानिक दर्जाने त्या दोहोंमध्ये मोठाच फरक असतो. तो प्राकृतिक फरक दृष्टीपुढे ठेवून त्यांच्या हक्कांची व अधिकारांची तसेच त्यांच्या कर्तव्यांची यादी तयार करतो. हा फरक लक्षात घेऊन, महिलांना जे विशेष स्थान व दर्जा मिळणे आवश्यक आहे, ते सर्व महिलांना इस्लाम देतो, त्यांचे संरक्षणही करतो. महिलांना तो पुरुषांच्या दया-कृपेवर सोडून देत नाही. इस्लामची अशी इच्छा आहे की महिलांवर त्यांच्या कुवतीपेक्षा अधिक भार टाकला जाऊ नये. पुरुषांना महिला बनणे आणि महिलांनी पुरुष होणे ही गोष्ट प्रकृतीविरूद्ध आहे आणि इस्लामला ती स्वीकारार्ह नाही.
‘‘पत्नीशी चांगली वागणूक करण्याबाबतची माझी ताकीद स्वीकार करा.’’- बुखारी, मुस्लिम
कुरआनचे फर्मान आहे,
आणि त्यांच्याशी चांगली वागणूक करा - सूरह : निसा-१९
पत्नींचे अधिकार व हक्क जसे त्यांच्या पतीवर तितकेच उघड व स्पष्ट आहेत, तसेच पतीला पत्नीवरही अधिकार आहेत. पतींना एक दर्जा अधिक प्राप्त आहे.- सूरहः बकरा - २२८
विवाह व तलाक
महिलासंबंधी आणखी एक महत्त्वाचा विषय विवाह आणि तलाकचा आहे. विवाहाला ‘निकाह’ म्हटले जाते. एक पुरुष व एक महिला आपल्या स्वतंत्र मर्जीनुसार एकमेकाजवळ पति व पत्नीच्या स्वरूपात निर्णय घेतात. त्यासाठी तीन अटी आहेत. एक अशी की पुरुषाने वैवाहिक जीवनाच्या जबाबदार्या स्वीकारण्याची शपथ घ्यावी. आपसात विचार-विनिमयाने मान्य झालेली एक निर्धारित रक्कम, मेहेरच्या स्वरूपात पतीने पत्नीला द्यावी आणि या नव्या शरीरसंबंधाची उघडपणे घोषणा केली जावी. असे केल्याविना कोणाही स्त्री-पुरुषाने एकत्रित राहाणे आणि लैंगिक संबंध ठेवणे; अगदी चूक आहे, इतकेच नाही तर तो एक मोठा अपराध आहे.
हा वैवाहिक संबंध दोघंपैकी एकाच्या इच्छेनुसार संपुष्टातही आणला जाऊ शकतो आणि तो अधिकार इस्लाम देतो. याचेच नाव ‘तलाक’ अथवा घटस्फोट आहे. महिलेसाठी आणि पुरुषासाठी तलाकचा एक नियम व एक पद्धत अशी आहे की त्यांच्यापैकी कोणीही वैवाहिक जीवनापासून असंतुष्ट असेल आणि त्यांचे एकत्रित राहाण्याची जर शक्यताच राहिली नसेल, तर दाखवून दिलेल्या पद्धतीने, टप्प्याटप्प्याने त्यांनी वेगळे व्हावे आणि त्यांना वाटल्यास त्यांनी दुसरा विवाह करून घ्यावा. तलाक ही काही चेष्टा किवा मस्करी नाही. त्याकडे जर एखाद्याने गंभीरपणे पाहिले नाही, तर तो दोष त्या व्यक्तीचा असेल, नियमाचा दोष नाही.
अगदी अपरिहार्य व अनिवार्य स्थितीमध्येच तलाकची परवानगी दिलेली आहे. त्याच्या दुष्परिणामांकडे पाहाता पुरुषाला तलाकपासून रोखण्यात आलेले आहे. ईश्वराचे पैगंबर मुहम्मद(स.) यांचे फर्मान आहे,
‘कोणीही ‘मोमीन’ पतीने आपल्या पत्नीचा तिरस्कार करू नये. तिचा एखादा गुण किवा सवय त्याला पसंत नसेल, तर तिचा दुसरा एखादा गुण अथवा सवय त्याला आवडू शकते.’’- मुस्लिम
पती-पत्नींनी तलाक देण्याचा निश्चयच केला असेल तर इस्लामने अशी पद्धत ठरवून दिली आहे की तलाकचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नवर्याकडील एक-दोन माणसे व पत्नीकडील एकदोन माणसे एकत्र बसून बोलणी करावी आणि असा एखादा मार्ग शोधून काढावा, ज्यामुळे दोघातील मिलाफ वाढेल, त्यांची मने पुनः जुळतील आणि तलाक देण्याची वेळच येणार नाही. इतकेच करून जर समझोता होऊच शकला नाही आणि तलाकशिवाय दुसरा पर्यायच नसेल त्यावेळी पतीने एकच वेळ तलाक द्यावा व म्हणावे ‘मी तुला तलाक दिला आहे,’ दोन न्यायनिष्ठ साक्षीदारासमक्ष तलाक द्यायला हवा. ‘तुहर’(मासिक पाळी संपल्यानंतरच्या काळातील स्थितीत) च्या अवस्थेत तलाक दिला जावा, ज्यात पतीने पत्नीशी शैय्यासोबत केलेली नसावी. तलाकनंतर त्या स्त्रीला ‘इद्दत’ चा काळ म्हणजे एक ठराविक कालावधी काढावा लागेल. त्या मुदतीत पुरुष पुनः तिचा अंगिकार करू शकतो. तीचा स्वीकार करण्यास पुरुष जर राजी नसेल, तर स्त्री पूर्णपणे विभक्त होईल. त्यांची इच्छा असल्यास ते पुनः निकाह करू शकतात.
इस्लाममध्ये तलाकची हीच अचूक पद्धत आहे. त्याचा विचार करायला पुरुषाला पुरेसा अवधी मिळतो. स्त्रीच जर पुरुषापासूनच विभक्त होऊ इच्छित असेल, तर तिला पुरुषाकडून ‘खुलअ’(पत्नीने मागितलेला घटस्फोट) करून घेऊ शकते.

- सय्यदा परवीन रिझवी
    या पुस्तिकेत बुरखा पद्धतीने प्रगती होते की अधोगती या बाबतचा खुलासा आला आहे. समाजाच्या उन्नती व अवनतीमध्ये स्त्रियांची किती महत्त्वाची भूमिका असते याबाबत जगाच्या क्रांतीवर लक्ष ठेवणाऱ्या विचारवंतांना कल्पना आहेच.
    जेव्हा स्त्रिया लज्जाहीन होऊन अश्लिलता व नग्नतेचा मार्ग स्वीकारतात तेव्हा देशाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहत नाही. इस्लाम मानवी प्रवृत्तीस अनुकूल धर्म आहे. तो पुरुषांसह स्त्रियांच्या उन्नतीवर भर देते आणि बुरखा त्यातलाच एक भाग आहे.

आयएमपीटी अ.क्र. 88   -पृष्ठे - 8     मूल्य - 06      आवृत्ती - 4 (2013)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/3irnnxds6suwq2jgtsq0fgx2eou9e26r

अर्थ तंत्राशिवाय सामाजिक जीवनाच्या अन्य क्षेत्रांची प्रगतीसुद्धा नैतिक मूल्यांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, मानव वेग पारस्पारिक संबंधांचा पाया जोपर्यंत आपसातील प्रेम आणि सहयोगावर आधारित नसेल तर प्रत्येक प्रगती प्रकोप बनून जाते आणि सुधारणेचे प्रत्येक पाऊल उपद्रवाचे कारण बनून जाते. पारिवारिक जीवन सुधारासाठी जे पाऊल कठोर कायद्याच्या रूपात उचलले जाते, ते न्यायाऐवजी स्वतः हा अन्यायाचा बहाणा बनत असतो.
स्त्री शतकांपासून शक्तीहीन राहिली आहे. तिला ती साधनेसुद्धा उपलब्ध नाहीत जी पुरुषांना आज प्राप्त आहेत. यासाठी ती आपल्या अधिकारांसाठी फक्त हातपाय मारीत आहे. परंतु त्यांच्यापर्यंत पोहचणे तिला फार दुष्कर झाले आहे.
स्त्री-पुरुष समानतेच्या समस्त दाव्यांच्या अस्तिवासहित भारतीय महिला आज ही शक्तीहीन आणि अत्याचारपीडित आहे. तिचे प्रदत्त अधिकार त्याच वेळेस परिणामकारक होऊ शकते. जोपर्यंत असे नैतिक वातावरण उत्पन्न केले जाईल की ज्यात तिला पुरुषांचे अधीन समजले जाणार नाही, प्रेम आणि परस्पर सहयोगाची भावना वाढीस लागेल.
पारिवारिक जीवनाच्या सुरक्षेसाठी ख्रिश्चन समाजात एका काळापर्यंत घटस्फोटास जवळजवळ असंभव बनवून टाकले होते. परंतु यामुळे सामाजिक सुदृढता तर काय येईल, अत्याचार आणि शोषणाचे विभिन्न मार्ग विस्तृत झाले. पती-पत्नी स्वाभाविक संबंधांच्या जागी चुकीच्या आणि अनैतिक पध्दती स्वीकारल्या गेल्या.
भारतात पतीच्या स्वातंत्र्यावर बंदी आणण्यासाठी घटस्फोटानंतर पोटगीची जबाबदारी लागू करून दिली गेली. परंतु संख्या दाखविते की घटस्फोटानंतर पोटगी प्राप्त करण्यासाठी शक्तीहीन आणि असहाय स्त्रीला न्यायालयांचे इतक्या फेर्यामाराव्या लागतात की अंततः अधिकतर महिला नाराज होऊन जातात.
राजनैतिक जीवनात दलित वर्गांसाठी जी पाऊले उचलली गेली आहेत, ती बहुआयामी आहेत, परंतु हे असूनसुद्धा त्यांचे अत्याचार आणि दमन समाप्त झालेले नाही. त्यांच्या स्त्रियांसोबत बलात्कार आणि अत्याचारांच्या घटना दररोज वर्तमानपत्रातून येत असतात. त्यांच्या वस्त्या आजही उजाडल्या जातात, त्यांची प्राण-संपत्ती नष्ट केली जाते. आज यांना समाजात हीन दृष्टीने पाहिले जात असते आणि त्यांना व्यवहारातः आजसुद्धा समानतेचे स्थान समाजात प्राप्त होऊ शकले नाही. परंतु विडंबना आहे की इतर व दलीत नेता त्यांच्या पाठीवर स्वार होऊन त्यांच्या वाईट परिस्थितीची खिल्ली उडवीतात. आपले जग सुधारण्यासाठी त्या शक्तीहीनांच्या वाईट परिस्थितीला राजनीतिक शक्तीचे माध्यम बनवित असतात.
व्यापक नैतिक पतन
हे नैतिक पतन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभावी आहे. याचा बिघाड इतका व्यापक आणि याचा अंधार इतका गडद आहे की सर्वसामान्यांशिवाय विशिष्ट जनसुद्धा त्रस्त आहेत. सामाजिक जीवनात चारित्रिक आचरणाचा जो विकार उत्पन्न आहे. त्याच्या व्याख्येची आवश्यकता नाही. परंतु काही महत्त्वपूर्ण नैतिक विकार असे आहेत, ज्यांचा उल्लेख करणे प्रासंगिक ठरेल.
सामाजिक विकृती
सर्वांत प्रमुख विकृती आपल्या समाजात मानव-जीवन आणि मानसन्मानाचे हनन आहे. हिसा आणि उपद्रव आहे. ज्या कोणा जवळ शक्ती आणि संसाधने आहेत, तो आपल्या उद्देशाला प्राप्त करण्यसाठी हिसेला कायद्यावर वरिष्ठता देत असतो. आधी हे काम ते लोक करीत असत, ज्यांचा पेशा अपराध आणि मादक पदार्थ होता आणि त्यांचे समाजात कोणतेही स्थान नव्हते. परंतु आता ही रूची त्या लोकांमध्येसुद्धा निर्माण होत आहे जे स्वतःला सुसभ्य आणि शिक्षित म्हणत असतात. इथपर्यंत की किशोरवयीन मुले आणि मुलींमध्येसुद्धा हिसा आणि अपराधाची वृत्ती गतीने पसरत आहे. नेतागण आणि त्यांचे सहयोगीसुद्धा दुस्साहसाने हत्या करतात आणि करवितात, ज्यांचा पुरावा निवडणुकीतील हिसा आहे. अपराध(गुन्हेगारी) आणि हिसेला आपल्या समाजात आता सन्मान मिळायला लागलेला आहे. याचे एक रुप हे आहे की विभिन्न राजनैतिक दल निवडणुकांच्या वेळी अपराधींना आणि हत्यार्यांना केवळ तिकिट देतात असे नाही तर त्यांना मंत्रीपदावर आसीनसुद्धा करून टाकत असतात.
अहवालानुसार, उत्तर प्रदेशांच्या मंत्रीमंडळात अनेक लोक असे आहेत, ज्यांच्यावर हत्या आणि दंग्यांचे अनेक दावे(प्रकरणे) चालत आहेत. हत्या आणि दंगे आता धार्मिक उपद्रवाचेसुद्धा कारण बनले आहेत. जसे स्टेन्स आणि त्यांच्या दोन अबोध मुलांची हत्या, आताच एका ख्रिश्चन पादरीची हत्या, सांप्रदायिक दंग्यांच्या स्थळांवर आणि बाबरी मस्जिद विध्वंसानंतर मुंबई आणि अन्य स्थळांचे दंगे या सर्व घटना मानव जीवनाच्या अवमाननेचे ठोस पुरावे आहेत.
वैवाहिक जीवनात हत्येच्या घटना आता सार्वत्रिक होत चालल्या आहेत. यांच्यामधून काही प्रसारमाध्यमांमुळे समोर येत असतात. आता काही वर्षांआधी एका राजनैतिक पक्षाचे युवा नेता सुशील शर्माने आपली पत्नी नैना साहनीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करून तंदुरभट्टीत फेकून दिले. या जघन्य अपराधासाठी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. समाजात हिसा आणि हत्येची शिकार अधिकतर अत्याचारपीडित महिला होत आहेत. कितीतरी दलित महिला अशा आहेत, ज्यांची इज्जतअबू लुटल्यानंतर त्यांची हत्या करून टाकण्यात आली.
मानव जीवनाच्या अवमाननेचा सर्वांत दुःखदायक भाग हा आहे की आता हत्येसारखा घोर अपराध आपल्या भौतिक आणि राजनैतिक हितांच्या पूर्तीसाठीचा सार्वत्रिक मार्ग समजून घेतला गेलेला आहे. धन संपत्ती आदिसाठी हत्या पूर्वीसुद्धा होत होत्या परंतु ही प्रवृत्ती इतकी प्रगती करून गेलेली आहे की विचारांचे मतभेदसुद्धा याच प्रकारे हत्या करून सोडविले जात असतात. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की दिल्लीमध्ये दोन युवा मित्र कोणत्या मुद्दयावर चर्चा करीत होते. की एकाने दुसर्याची हत्या करून टाकली. रेल्वेमध्ये बैठकीचे भांडण आणि चित्रपटाचे तिकीट घेण्यावर भांडणसुद्धा कधीकधी हत्येचे कारण बनून जात असतात.(हिन्दुस्थान २७ जानेवारी २००४(दिल्ली) अनुसारष्ट प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतण्या महेंद्र कुमारांचे पुत्र मनीष तथा अन्य दोन युवकांना २४-१-०४ च्या सायंकाळी विलासपूरहून दिल्ली जाणार्या एक ट्रेनमधून कोसीजवळ चालत्या गाडीतून काही लोकांनी काही विवादावरून खाली फेकून दिले. या दुर्घटनेवरूनसुद्धा नैतिक संकटाचा अनुमान लावला जाऊ शकतो.)

मानव जीवनाच्या अवमानतेचे एक अत्यंत घृणास्पद रूप नवजात कन्या शिशुंची हत्या आहे. भारतात या युगातसुद्धा काही राज्यांमध्ये जसे केरळ, ओरिसा, बिहारमधे हा प्रकार आहे की माता स्वतः मोलकरणीच्या मदतीने आपल्या नवजात मुलींची निर्मम पध्दतींनी जन्माच्या काही महीन्यानंतर या भयाने हत्या करून टाकते की यांच्यामुळे हुंड्याचा प्रबंद करावा लागेल.
टाईम्स ऑफ इंडिया(२२ सप्टेंबर १९९९) मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित झाला आहे, ज्यामध्ये सांगितले गेले आहे की राजस्थनच्या एका गावात ११०(एकशे दहा वर्षांनी) पहिल्या वेळेस तिथल्या एका मुलीचे लग्न झाले. यासाठी की बाडमेर जिल्हाच्या या देवार गावात एका लांब कालावधीपर्यंत मुलीच्या जन्माचा रिपोर्ट मिळाला नाही. या स्थितीचे दुःखद कारण हे आहे की कोवळ्या निष्पाप मुली गळा दाबून किवा विष देऊन मरणाच्या दारात फेकल्या जातात. वृत्तपत्रानुसार आधुनिक प
ध्दतीचा भ्रूणहत्या करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो.
हुंड्यांच्या कारणामुळे नव वधूं हत्येच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये बरोबर येत राहतात.

उम्मुद्दरदा अल हुजैमा
(माननीय अबू दरदांच्या दोन पत्नी होत्या, दोघींचे आडनाव उम्मुद्दरदा होते. त्यांच्यापैकी ज्या थोरल्या होत्या त्या (महिला) सहाबी होत्या आणि धाकट्या सहाबींच्या शिष्या. थोरल्या पत्नीचे नाव खैरा व धाकट्या पत्नीचे हुजैमा होते. तहजीबुल असमाइवल्लुगात - २ : ३५९-३६०.) उस्मान बिन अबुल आतिका आणि उम्मे जाबिर म्हणतात की, उम्मे दरदांचे संगोपन अबू दरदांनी केले होते. त्या लहानशा होत्या तेव्हा बुर्नस (लांब सदरा, ज्याने डोकेदेखील झाकले जाते.) परिधान करून माननीय अबू दरदांच्या समवेत येत-जात असत. पुरुषांच्य रांगेत नमाज अदा करण्यासाठी उभ्या राहत असत. पवित्र कुरआनचे पठन करणाऱ्या मंडळीत बसत. जेव्हा वयात आल्या तेव्हा माननीय अबू दरदां त्यांना म्हणाले की, ‘‘तुम्ही स्त्रियांच्या रांगेत सामील व्हा.’’ (तहजीबुत्तहजीब - १२ : ४६६)
त्यांच्या ज्ञानाच्या आवडीची कल्पना औफ बिन अब्दुल्लाह यांच्या एका निवेदनावरून येते. ते म्हणतात, ‘‘आम्ही माननीय उम्मे दरदांच्या जवळ बसलो होतो.
जेव्हा बरीच वेळ झाली, तेव्हा आम्ही सांगितले की, आम्ही आपल्याला खूप त्रास दिला. आपल्याला कंटाळा आला असेल नाही का ?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘माझा प्रत्येक कामात अल्लाहची उपासना हा उद्देश्य राहिलेला आहे. परंतु ज्ञानी मंडळींच्या संगतीत बसल्याने व त्यांच्याशी चर्चा व संभाषण केल्याने जितके संतोष व समाधान प्राप्त होते तितके कोणत्याही अन्य गोष्टीने प्राप्त होत नाही.’’ मग त्या पडद्याआड गेल्या आणि एका व्यक्तीला कुरआनचे पठन करावयास सांगितले. त्याने ‘व लकद वस्सलना लहुमुल कौलु’ या आयतींचे पठन केले. त्या म्हणाल्या, ‘‘सर्वश्रेष्ठ ज्ञान तर अल्लाहला ओळखणे होय.’’
अबु रब्बह त्यांच्याजवळ शिकत होते. ते म्हणतात, एके दिवशी पाटीवर त्यांनी असे लिहिले -
‘‘बालपणातच विवेक व शहाणपण शिका. मोठे होऊन इतरांना शिकवाल.’’
‘‘प्रत्येक शेतकरी जे काही त्याने चांगले किवा वाईट पेरले आहे ते तो अवश्य कापील.’’ (तहजीबुल अस्माइ वल्लुगात - २ : ३६०-३६१)
त्यांनी माननीय अबू दरदा, सलमान फारसी (र), फुजाला बिन उबैद (र), अबू हुरैरा (र), कअब बिन आसिम (र) आणि आयेशा (र) कडून हदीसचे कथन केले आहे. हाफज इब्ने हजर (र) यांनी त्यांच्याकडून हदीस ऐकणारे व कथन करणाऱ्या १९ धर्मपरायण व्यक्तींच्या उल्लेखानंतर लिहिले आहे की, त्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांनीसुद्धा त्यांच्याकडून हदीसींचे कथन केले आहे. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४६५-४६६)
इमाम नबवींचे कथन आहे -
‘‘त्यांच्याकडून महान ताबिईनच्या एका मोठ्या संख्येने हदीसींचे कथन केले आहे.’’ (तहजीबुल अस्माइ वल्लुगात - २ : ३६०)
इमाम जहबी (र) यांनी त्यांचा उल्लेख या शब्दांत केला आहे -
‘‘त्या धर्मशास्त्रपंडित, विद्वान, उपासिका, रूपवान, लावण्यवती, विस्तृत ज्ञानी आणि मोठ्या बुद्धिमान होत्या.’’ (तज्किरतुल हुफ्फाज - १ : ५०)
आयेशा बिन्ते तलहा
यांच्या माता, माननीय अबू बकर (र) यांच्या सुपुत्री उम्मे कुलसूम होत्या. त्यांनी माननीय आयेशा (र) द्वारा उल्लेखित हदीसचे कथन केले आहे. त्यांच्याकडून त्यांचे पुत्र तलहा बिन अब्दुल्लाह, हबीब बिन अम्र, त्यांचे पुतणे तला बिन यहया, एक अन्य पुतणे मुआबिया बिन इसहाक, मूसाबिन उबैदुल्लाह, मिनहाल बिन अम्र, अता बिन अबी रिबाह आणि अम्र बिन सईद यांनी कथन केली आहेत.
इब्ने मुआीन त्यांच्यासंबंधी म्हणतात की, त्या विश्वसनीय व पुराव्यास पात्र आहेत. अजली व इब्ने हिब्बान यांनीसुद्धा त्यांची विश्वसनीय विद्वानांस गणना केलेली आहे. अबू जुआर् दमिश्कीसारख्या हदीसतज्ज्ञांचे म्हटले आहे -
‘‘लोकांनी त्यांच्या ज्ञान, प्रतिष्ठा, विनम्रता व सदाचारामुळे त्यांच्याकडून हदीसींचे कथन केले आहे.’’ (तहजीबुत्तहजीब - १२ : ४३६ - ४३७)
आयेशा बिन्ते साद बिन अबी वक्कास (र)
यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांच्या पुण्यशील पत्नींपैकी सहा पवित्र पत्नींना पाहिले होते. त्या म्हणतात, ‘‘बालपणात मी जेव्हा त्यांच्यापैकी कोणाकडे जात असे तेव्हा त्या मला मांडीवर बसवीत असत आणि उत्कर्षाचा आशीर्वाद देत असत.’’ असे दिसते की लोकांत त्यांच्याविषयी फार श्रद्धा होती. हबीब बिन मर्जूक म्हणतात की, ‘‘मी मस्जिदच्या बाहेर एका महिलेला पाहिले. त्यांच्याबरोबर आणखी काही स्त्रिया होत्या आणि दिवा जळत होता. चौकशी केल्यावर असे कळले की त्या माननीय साद बिन अबी वक्कास यांच्या सुकन्या आयेशा (र) आहेत.’’ (तबकात इब्ने साद - ८ : ४६७-४६८)
त्यांनी आपले वडील माननीय साद बिन अबी वक्कास (र) आणि उम्मे जर द्वारा उल्लेखित हदीसचे कथन केले आहे. त्यांच्या उल्लेखावरून कथन करणाऱ्यांत जईद बिन अब्दुर्रहमान, अय्यूब सुख्तियानी, हकम बिन उतैबा, खुजैमा, अबुज्जिनाद, मुहाजिर बिन मिस्मार, उबैदा बिन्ते नाबिल आणि इमाम मालिकसारख्या व्यक्तींचा समावेश आहे. खलील म्हणतात, ‘‘इमाम मालिक (र) यांनी त्यांच्याशिवाय कोणत्याही अन्य महिलेकडून कथन केले नाही. इब्ने हिब्बान यांनी ‘सिकात’ नामक पुस्तकात त्यांचा उल्लेख केला आहे. ‘आजली’ यांनीसुद्धा त्यांना विश्वसनीय मानले आहे. हिजरी सन ११७ मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४३६)
हफ्सा बिन्ते सीरीन
बारा वर्षांच्या वयात त्यांनी पवित्र कुरआनचे शिक्षण पूर्ण केले. यहया बिन सीरीन, अनस बिन मालिक (र), उम्मे अतिया अन्सारिया (र), उम्मुर्राइह, अबुल आलिया, अबू जुबियान, रबीअ बिन जयाद आणि माननीय हसन बसरी यांच्या मातोश्री खीरह यांच्याकडून त्यांनी हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्याकडून मुहम्मद बिन सीरीन, कतादा, आसिमुल अहवल, अयुब सख्तयानी, खालिदुल खुदाअ, इब्ने औन, हिश्शाम बिन हयानसारख्या विद्वानांनी हदीसींचे कथन केले आहे.
इमाम इब्ने मुआीन त्यांच्यासंबंधी म्हणतात,
‘‘त्या विश्वसनीय व युक्तिपूर्ण आहेत.’’ इब्ने हिब्बाननेसुद्धा त्यांना ‘सिकात’ अर्थात - विश्वसनीय - विद्वानांच्या पंक्तीत बसविले आहे.
अयास बिन मुआविया म्हणतात,‘‘मी कोणत्याही अशा व्यक्तीस पाहिले नाही जिला हफ्सा बिन्ते सीरीनपेक्षा श्रेष्ठ म्हणावे.’’ हिजरी सन १०१ मध्ये त्या स्वर्गवासी झाल्या. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४०९ - ४१०)
अमरा बिन्ते अब्दुर्रहमान
माननीय आयेशा (र) यांनी त्यांचे पालनपोषण केले होते आणि त्यांच्या खास शिष्यांपैकी होत्या. हिजरी सन ९८ मध्ये त्यांचा स्वर्गवास झाला. त्यांनी माननीय आयेशा (र) यांच्याशिवाय उम्मे हिशाम बिन्ते हारिसा, हबीबा बिन्ते हारिसा, हबीबा बिन्ते सहल आणि माननीय उम्मे हबीबा, हिम्ना बिन्ते जहशकडूनसुद्धा हदीसींचे कथन केले आहे. त्यांच्याकडून तत्कालीन महान विद्वानांनी हदीसींचे कथन केले आहे. त्या मंडळींत इमाम जुहरी, अब्दुल्लाह बिन अबू बकर बिन हज्म, यहया बिन सईद अन्सारी, उर्वा बिन जुबैर, सुलैमान बिन यसार आणि उमरु बिन दीनार यांसारख्या इमामांचा (धर्माचार्यांचा) समावेश होता.
त्यांच्या ज्ञानविषयक महानतेची कल्पना त्या मतावरून येते जी मोठमोठ्या मुहद्दिसीननी (महान हदीसतज्ज्ञ) त्यांच्यासंबंधी व्यक्त केली आहेत. इब्ने मुईन म्हणतात,
‘‘त्या विश्वसनीय व सयुक्तिक आहेत.’’ (ही हदीसच्या कलेची एक परिभाषा आहे. अशा प्रकारच्या परिभाषेचा पूर्ण अर्थ भाषांतराने देणे शक्य नाही.)
अहमद बिन मुहम्मद म्हणतात की, मी इब्ने मुईन यांना फारच चांगल्या शब्दांत त्यांचा उल्लेख करताना ऐकले आहे. ते म्हणाले की, माननीय आयेशाकडून कथन करणारे भरवशास योग्य व विश्वसनीय लोकांत त्यांची गणना होते. इब्ने हिब्बान आणि अजली यांनीसुद्धा त्यांना विश्वसनीय म्हटले आहे. इब्ने हिब्बान म्हणतात की, माननीय आयेशा (र) यांच्या हदीस कथनाचे सर्वांत अधिक ज्ञान त्यांनाच होते. माननीय सुफियान सौरी म्हणतात की, माननीय आयेशा (र) यांच्याकडून कथन करणाऱ्यांत अमरा बिन्ते अब्दुर्रहमान, कासिम बिन मुहम्मद आणि उर्वा बिन जुबैर सर्वांत अधिक विश्वसनीय आहेत. अब्दुर्रहमान बिन कासिम यांच्यासंबंधी उल्लेख आहे की, ते माननीय आयेशा (र) यांची कथने त्यांना विचारीत असत. माननीय उमर बिन अब्दुल अजीज यांनी मुहम्मद बिन अब्दुर्रहमान यांना लिहून कळविले की, माननीय आयेशा (र) यांच्या कथनांचे त्यांच्यापेक्षा अधिक ज्ञान असणारा कोणीही नाही. (तहजीबुत्तहजीब - १२ : ४३८-४३९)
इब्ने साद म्हणतात, ‘‘त्या विद्वान स्त्री होत्या. माननीय उमर बिन अब्दुल अजीज यांनी अबू बकर बिन मुहम्मद बिन हज्म यांना त्यांच्या हदीसी लिहिण्याची आज्ञा दिली होती.’’ (तबकात इब्ने साद - ८ : ४८०)

आदरणीय मुहम्मद (स.) यांनी पाच बाबींवर ईमान धारण करण्याची शिकवण दिलेली आहे.
१) एकेश्वरत्वावर दृढ विश्वास.
२) ईशदूतांवर दृढ विश्वास.
३) ईशग्रंथांवर विशेषकरून पवित्र कुरआनवर दृढ विश्वास.
४) ईश्वराच्या सर्व प्रेषितांवर आणि विशेषकरून अंतिम प्रेषित आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) वर दृढ विश्वास.
५) पारलौकिक जीवनावर दृढ विश्वास.
हा इस्लामचा मूळाधार आहे. या पाचही बाबींवर जेव्हा तुम्ही दृढ विश्वास धारण केला तेव्हा तुम्ही मुस्लिमांच्या समूहात दाखल झालात, परंतु अजून परिपूर्ण मुस्लिम बनला नाहीत. परिपूर्ण मुस्लिम मनुष्य तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईशआदेशांची जी शिकवण दिली तिचे पालन करून तिच्यानुसार आचरण करतो (आणि त्यानुसार आपले जीवनव्यवहार पार पाडतो) कारण असे आहे की, ईमान धारण करण्याबरोबरच आज्ञांचे पालन करणे व त्या आचरणांत आणणे तुमच्यावर अनिवार्य ठरते. आज्ञापालन व त्यानुसार आचरण करण्याचेच नाव इस्लाम आहे.
असे पाहा की, तुम्ही हे मान्य केले आहे की, ईश्वर केवळ तुमचा एकमेव ईश्वर आहे. याचा अर्थ असा आहे की तो तुमचा स्वामी असून तुम्ही त्याचे आज्ञापालनकर्ते आहात. आता तुम्ही त्याला स्वामी व आज्ञादाता मानून जर त्याची अवज्ञा केली तर तुमच्या स्वतःच्या कबुलीनुसारच तुम्ही बंडखोर व अपराधी ठराल. तसेच तुम्ही हे मान्य केलेत की पवित्र कुरआन हा ईशग्रंथ आहे. पवित्र कुरआनमध्ये जी वचने आहेत ती ईशवाणी व ईश आदेश आहेत, हे तुम्ही मान्य केलले आहे असा याचा अर्थ होतो. त्यातील प्रत्येक वचन मानून त्याच्या पुढे नतमस्तक होणे तुम्हाला क्रमप्राप्त ठरते. तसेच तुम्ही हेही मान्य केलेत की, प्रेषित मुहम्मद (स.) हे अल्लाहचे प्रेषित आहेत. वास्तविकपणे ही कबुली याच गोष्टींची आहे की प्रेषित मुहम्मद (स.) जे कृत्य करण्याचा आदेश देतात व जे करण्यापासून परावृत्त करतात ते सर्व ईश्वराकडूनच आहे. अशी कबुली दिल्यानंतर आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आज्ञांचे पालन व तदनुसार आचरण करणे तुम्हावर अनिवार्य कर्तव्य ठरते. म्हणूनच तुमचे प्रत्यक्ष आचरण जेव्हा तुमच्या ईमाननुसार होईल आणि तेव्हाच तुम्ही परिपूर्णपणे मुस्लिम व्हाल. तसे झाले नाही तर तुमच्या ईमानमध्ये व तुमच्या प्रत्यक्ष आचरणामध्ये जितकी तफावत असेल तितक्याच प्रमाणांत तुमच्या ईमानात उणीव राहील.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्याची कोणती पद्धत दाखवून दिली आहे. ते आता आपण पाहू या. तसेच काय करण्याचा आदेश दिला आहे व काय करण्यापासून मनाई केली आहे, तेही आपण पाहू या. या संदर्भात अनिवार्य कर्तव्य ईश्वर उपासना (इबादत) आहे.
उपासना (इबादत) चा अर्थ
‘इबादत’ या शब्दाचा खरा अर्थ ‘दास्यत्वाचे कर्तव्य’ असा आहे. आता आपण दास आहात. अल्लाह आपला उपास्य (ईश्वर) आहे. दास आपल्या उपास्याचे आज्ञापालन करताना जी कृत्ये करीत असतो ते सर्व उपासनेत मोडताच. उदा. तुम्ही इतरांशी संभाषण करीत असता. संभाषण करताना तुम्ही असत्याचा, निंदानालस्तीचा, अश्लीलतेचा त्याग केला आणि असे पथ्य केवळ यासाठीच पाळले की, ईश्वराने या सर्व गोष्टींना मनाई केली आहे. तुम्ही सतत सत्य, न्याय, भलेपणा व शिष्टाचारयुक्त संभाषण यासाठीच केले की या गोष्टी ईश्वरास प्रिय आहेत तर तुमचे संपूर्ण संभाषण ‘इबादत’ (उपासनेत) ठरते. मग ते संभाषण व्यवहारी जीवनातील कोणत्याही बाबीसंबंधी का असेना. तुम्ही इतरांशी देवाणघेवाण करीत असता बाजारात खरेदीविक्री करीत असता, तुमच्या घरात आईवडील व भावंडासमवेत राहात असता, मित्रमंडळीशी व आप्तेष्टांशी गाठीभेटी करीत असता. अशा वेळी आपल्या जीवनातील वरील सर्व व्यवहार करताना तुम्ही ईशआदेश व त्याचे नियम दृष्टीसमोर ठेवले व ईश्वराने जे आदेश दिलेले आहेत हे समजून घेऊन प्रत्येकाचा हक्क त्याला देऊन टाकला. तसेच कोणाचाही हक्क व हितसंबंध हिरावून घेण्याची ईश्वराने मनाई केली आहे हे जाणून तुम्ही कोणाचाही हक्क हिरावून घेतला नाही तर तुमचा संपूर्ण जीवनकाल जणू ईशउपासना करण्यातच गेला असे होईल. तुम्ही जर एखाद्या गरीबाला सहाय्य केले, एखाद्या भुकेलेल्याला जेऊ घातले, एखाद्या रोग्याची सेवा-सुश्रुषा केली आणि ही सर्व कृत्ये करताना तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर कसलेही स्वहित अगर आदर, प्रतिष्ठा व नावलौकिक न ठेवता, केवळ ईशप्रसन्नता प्राप्त होण्यासाठीच ती केली तर ती सर्व कृत्ये उपासनाच (इबादत) ठरतात. तुम्ही व्यापार- उदीम केला किंवा उद्योगधंदा अथवा शारीरिक कष्टाचे काम केले व ते करत असताना ईशभय मनात सतत बाळगून अगदी प्रामाणिकपणाने व सचोटीने ते केले, उचित मार्गाने (हलाल) कमाई केली व निषिद्ध (हराम) ठरविले गेलेल्या वाममार्गापासून दूर राहिलात व ही कृत्ये जरी तुम्ही उपजीविकेसाठीच केली असली तरी अशा कर्माचे कृत्यसुद्धा ईशउपासनेतच (इबादत) गणले जाईल. तात्पर्य असे की या जगातील जीवनकालात प्रत्येक वेळी व प्रत्येक व्यवहार करताना ईशप्रसन्नता नजरेसमोर ठेवणे, त्याच्या आदेशांचे पालन करणे, त्याची अवज्ञा करून मिळणारे लाभ व फायदे लाथाडून टाकणे आणि त्याच्या आदेशांचे पालन करताना होणारा तोटा अगर तसा तोटा होण्याचा धोका पत्करणे व सोसणे ही कृत्येही ईशोपासनेतच अंतर्भूत आहेत. अशा पद्धतीचे जीवन म्हणजे सरळ सरळ भक्ती व उपासनाच (इबादत) आहे. असे (ईशपरायणशील) जीवन जगताना खाणे, पिणे, हिंडणे, फिरणे, झोप घेणे व जागे होणे, बोलणे या सर्व कृती उपासनेतच (इबादत) दाखल आहेत.
भक्ती व उपासनेचा (इबादत) असा खरा अर्थ आहे व मुस्लिमांना (आज्ञाधारकांना) अशा तऱ्हेने उपासना करणारा दास बनविणे हेच इस्लामचे खरे उद्दिष्ट आहे. या गरजेपोटी इस्लाममध्ये अशा काही उपासना अनिवार्य व आवश्यक ठरविल्या गेल्या आहेत ज्यांची पूर्तता केल्याने मनुष्य एका विशाल उपासनेस सिद्ध होतो. असे समजा की या आवश्यक विशिष्ट उपासना जणू त्या विशाल उपासनेसाठी असणारे प्रशिक्षणच आहे. हे प्रशिक्षण जी व्यक्ती उत्तम तऱ्हेने प्राप्त करील तीच नंतरची विशाल व अस्सल उपासना योग्य तऱ्हेने पार पाडू शकेल. म्हणूनच या विशिष्ट उपासनांना अनिवार्य कर्तव्य ठरविण्यात आले आहे व त्यांना ‘अरकाने दीन’ म्हणजे इस्लामचे आधारस्तंभ असे म्हटले गेले आहे. जशी एखादी इमारत त्याच्या स्तंभावर आधारलेली असते त्याचप्रमाणे इस्लामी जीवनरुपी इमारतसुद्धा या स्तंभावरच आधारलेली आहे. हे स्तंभ पाडाल तर इस्लामी इमारत ढासळून टाकाल.
नमाज
नमाज या अनिवार्य कृत्यांमध्ये, प्रथम क्रमांक नमाजला दिला गेला आहे. ही नमाज काय आहे? ज्या गोष्टीवर तुम्ही ईमान धारण केले आहे त्या गोष्टींचा कृतीने तसेच मुखातून दिवसातून पाच वेळा पुनरुच्चार व उजळणी करणे याचेच नाव नमाज आहे. तुम्ही उठला व ईमान (श्रद्धा) ताजे करून पुन्हा जगरहाटीत गुंतून गेला. सकाळच्याप्रहरी उठून आधी शुचिर्भूत होऊन तुम्ही ईश्वरासमोर हजर झालात. त्याच्यापुढे उभे राहून वाकून, जमिनीवर कपाळ टेकवून आपले दास्यत्व मान्य केले, त्याच्याकडून मदतीची याचना केली व मार्गदर्शनासाठी त्याचीच करुणा भाकली. त्याच्या आज्ञापालनाचे वचन पुन्हा एकदा उच्चारले. त्याचीच प्रसन्नता प्राप्त करण्याचा व त्याच्या कोपापासून दूर राहण्याचा विचार मनात पुन्हा पुन्हा जागृत केला. त्याच्या ग्रंथातील धडा पुन्हा गिरविला. त्याच्या प्रेषिताच्या सत्यतेबद्दल ग्वाही दिली व ज्या दिवशी तुम्ही त्याच्या न्यायालयात आपल्या कृत्यांचा जाब देण्यासाठी हजर होणार आहात त्या दिवसाचेही स्मरण केले. अशा तऱ्हेने तुमच्या दिनक्रमाचा आरंभ झाला. काही तास तुम्ही आपल्या कामात गढून गेलात. मग पुन्हा ‘जोहर’ (दुपारची नमाज) च्या वेळी ‘अजान’ देणाऱ्याने ‘अजान’ (बांग) देऊन तुम्हाला आठवण करून दिली की या व पुन्हा एकदा काही मिनिटे एकदा तो धडा गिरवा. असे होता कामा नये की एखादे वेळी तुम्हाला त्याचा विसर पडून तुम्ही ईश्वरापासून गाफील होऊन जावे. दिवसभरात काही तास गेल्यानंतर ‘असर’ (तिसरे प्रहरची नमाज) च्या वेळी तुम्हाला पुकारण्यात आले व तुम्ही ईमान ताजा करून घेतला. नंतर सूर्यास्त झाला व सायंकाळ सुरवात झाली. जी उपासना करुन तुम्ही आपल्या दिनचर्येचा आरंभ केला होता, तीच उपासना करुन तुम्ही आपल्या दिनचर्येची सांगताही केली. असे केल्याने रात्र झाल्यावरही तुम्हास त्याच्या धड्याचा विसर पडू नये व तुम्ही त्याला विसरून भरकटू नये. पुन्हा काही वेळाने ‘इशा’ (रात्रीची नमाज) ची वेळ झाली व झोपण्याचीही वेळ झाली. आता शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला ईमानची सारी शिकवण व त्याचे स्मरण केले गेले, कारण ती वेळ शांत असते. दिवसभराच्या धावपळीत जर तुम्हाला पूर्णपणे एकाग्र होण्यास उसंत मिळाली नसेल तर या शांत वेळी पूर्ण समाधान व एकाग्रता आणू शकता.
पाहा, नमाज रोज पाच वेळा इस्लामच्या आधारस्तंभाला बळकटी आणीत असते. ती वारंवार तुम्हाला त्या विशाल उपासनेसाठी तयार करीत असते जिच्या स्वरुपाचे विवरण आम्ही या अगोदरच्या काही ओळीत केलेले आहे. तुमच्या मनाचे पावित्र्य, आत्म्याची प्रगल्भता, चारित्र्य सुधारणा व आचारशुचिता ज्यावर अवलंबून असते त्या सर्व श्रद्धांना ती ताजेपणाची टवटवी आणीत असते. ‘वझू’ (नमाजपूर्वी हात, पाय, तोंड, नाक धुऊन स्वच्छ करण्याची क्रिया) करताना प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दाखवून दिलेल्या पद्धतीचेच तुम्ही अनुकरण का करीत असता व नमाजमध्ये त्यांनी शिकवण दिलेल्या त्या सर्व वचनांचे पठन तुम्ही का करीत असता? प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शिकवणुकीचे पालन करणे तुम्ही अनिवार्य मानता एवढ्यासाठीच ना? कुरआनचे पठन तुम्ही जाणूनबुजून चुकीचे का करीत नाही? एवढ्यासाठीच ना की ती ईशवाणी आहे याची तुमच्या मनाची खात्री आहे? नमाजमध्ये जी वचने स्तब्धपणे मनातच स्मरण करावयाची असतात, ती जर तुम्ही मनात म्हटली नाही अगर त्यांच्याऐवजी अन्य वचने म्हटलीत तर त्याकरिता तुम्हाला कोणाचे भय असते? ते ऐकणारा कोणी मनुष्य तर असत नाही. यावरून हे उघड आहे की स्तब्धपणे जे काही पठन मनातल्या मनात तुम्ही करीत असता तेसुद्धा ईश्वर ऐकतो, असे तुम्ही समजत असता व आपल्या गुप्त हालचालीसुद्धा त्याला अनभिज्ञ नसतात. जेथे पाहणारा कोणी नसतो तेथे तुम्हाला नमाजसाठी उभी करणारी कोणती प्रेरणा असते? ईश्वर तुम्हाला पाहात आहे. या श्रद्धेचीच ती प्रेरणा असते ना? नमाजची वेळ आली म्हणजे आपल्या हातातील अत्यंत निकडीचे काम सोडून देऊन नमाजकडे तुम्हाला वळण्यास लावणारी कोणती शक्ती असते? नमाज ईश्वराने अनिवार्य व सक्तीचे ठरविलेले कर्तव्य आहे. हीच ती जाणीव असते ना? कडक थंडी पडली असताना सूर्योदयापूर्वी, कडक उन्हाळ्यात भर दुपारच्या वेळी तसेच सायंकाळच्या फिरावयास जाण्याच्या चित्ताकर्षक समयी तुम्हाला नमाज अदा करण्यास भाग पाडणारी कोणती शक्ती असते? ती कर्तव्यतत्परता नाही तर दुसरे काय आहे? तसेच नमाज अदा करताना अगर नमाजमध्ये जाणूनबुजून एखादी चूक करण्यापासून तुम्हाला कोणाचे भय वाटत असते? तुमच्या मनात ईशभय असते व तुम्हाला हे ठाऊक असते की, एके दिवशी ईशन्यायालयात तुम्हाला हजर होणे क्रमप्राप्त आहे एवढ्यासाठीच ना? तुम्हाला परिपूर्ण व सच्चा मुस्लिम बनवून सोडणारे नमाजपेक्षा अधिक चांगले असे कोणते प्रशिक्षण असू शकते? मुस्लिमासाठी यापेक्षा अधिक चांगली शिकवण व संस्कार कोणते असू शकते की, त्याने दिवसातून कित्येक वेळा ईश्वराचे स्मरण, त्याचे भय, तो सर्वसाक्षी असण्याबद्दल दृढ विश्वास आणि ईशन्यायालयात हजर केले जाण्याची श्रद्धा यांना तजेला द्यावा, अनिवार्यपणे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या आज्ञांचे पालन करावे, सकाळपासून रात्रीपर्यंत काही तासांच्या अवधीने त्याला कर्तव्यपूर्तीचा सराव करावयास लावला जातो. अशा व्यक्तीपासून अशी अपेक्षा केली जाऊ शकते की, जेव्हा तो नमाज अदा करून मोकळा होतो व जगातील व्यवहारात गढून जातो तेव्हा तेथेही त्याच्या मनात ईशभय असते व त्याच्या कायद्याचे तो पालन करतो. प्रत्येक दुष्कृत्याच्या समयी त्याला आठवण होते की, ‘‘ईश्वर मला पाहात आहे.’’ अशी उच्चदर्जाची शिकवण प्राप्त करुनही ईशभय बाळगत नसेल त्याची अवज्ञा करण्याचे सोडत नसेल तर हा दोष नमाजचा नसून त्या व्यक्तीचा आत्मदोष आहे.
आणखी असे पाहा की, महान अल्लाहने नमाज सामुदायिकपणे एकत्रित अदा करण्याची सक्त ताकीद दिलेली आहे. विशेषकरून आठवड्यात एकदा ‘जुमअ’ ची नमाज (शुक्रवारची दुपारची सामुदायिक नमाज) सामुदायिकपणे एकत्रित अदा करणे सक्तीचे केले गेले आहे. मुस्लिमांमध्ये समभाव, एकोपा व समानता निर्माण करणारी ही बाब आहे. ती मुस्लिमांना एकवटून त्यांचा मजबूत संघ निर्माण करते. ते सर्व मिळून एकत्रितपणे एकाच ईश्वराची उपासना करतात, एकत्रितपणे उठत व बसत असतात तेव्हा त्यांची मने आपोआपच परस्परांशी जुळत असतात आणि आपण सर्व बंधु आहोत ही जाणीव त्यांच्या मनात उत्पन्न होते. ह्यामुळे त्यांच्यात एकाच नेत्याचे आज्ञापालन करण्याची प्रवृत्ती निर्माण करत असते व त्यांना शिस्तबद्ध करीत असते. यामुळेच त्यांच्यात आपापसाबद्दल सहानुभूती निर्माण होते. तसेच त्यांच्यात समानता व एकात्मता निर्माण होते. श्रीमंत व गरीब, लहान थोर, उच्चपदाधिकारी व कनिष्ठ दर्जाचा शिपाई सर्व एकत्र उभे राहतात. त्यांच्यात कोणी उच्च नसतो, कोणी नीच नसतो.
हे त्या अगणित लाभांपैकी काही आहेत जे तुम्ही नमाज अदा केल्याने ईश्वराला प्राप्त होत नसून तुम्हाला स्वतःलाच ते प्राप्त होत असतात. तुमच्या कल्याणासाठीच ईश्वराने ती सक्तीची केली आहे. नमाज अदा न केल्याने तुम्ही ईश्वराचे काही नुकसान केलेले नसते. म्हणून त्याची गैरमर्जी होत नसते उलट तुम्ही स्वतःचेच नुकसान करून घेतले आहे. नमाजद्वारा केवढे महान सामर्थ्य ईश्वर तुम्हाला देत आहे व तिचा स्वीकार करण्यापासून तुम्ही तोंड चुकवीत आहात? मुखाने तर, तुम्ही ईश्वराचे ईशत्व, प्रेषिताचे अनुयायित्व व ‘आखिरत’चा जाब विचारणे यांचा स्वीकार करीत असता, पण तुमचे प्रत्यक्ष आचरण असे असते की, ईश्वराने व त्याच्या प्रेषिताने जे सर्वात मोठे कर्तव्य तुम्हासाठी ठरविले आहे त्याची पूर्तता केली जात नाही, ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. तुमचे हे आचरण पुढे दिलेल्यापैकी एका अवस्थेत निश्चित असते. एक तर नमाज अनिवार्य कर्तव्य असण्याचा तुम्ही इन्कार करता किंवा तुम्ही तिला अनिवार्य कर्तव्य मानता परंतु ते टाळण्याचा प्रयत्न करीत असता. जर अनिवार्य असण्याचा इन्कार असेल, तर अल्लाह व त्याच्या प्रेषिताला तसेच कुरआनला तुम्ही खोटे ठरविता व पुन्हा त्यांच्यावर ‘ईमान’-दृढविश्वास असल्याचा खोटा दावा करीत असता. नमाजला अनिवार्य कर्तव्य मानत असूनही जर तुम्ही ती आचरणात आणीत नसाल तर तुम्ही विश्वासपात्र नाही. जगातील इतर व्यवहाराच्या बाबतीतसुद्धा तुमच्याबद्दल कसलाही भरवसा बाळगला जाऊ शकत नाही.
जर तुम्ही ईशकर्तव्य चुकविण्याची चोरी करू शकता तर माणसांची कामे करताना तुम्ही चोरी करणार नाही, अशी कोण अपेक्षा करू शकतो.
रोजा /उपवास
रोजा /उपवास हे दुसरे अनिवार्य कर्तव्य आहे. हा रोजा म्हणजे काय? नमाज ज्या कर्तव्यांची दररोज तुम्हाला पाच वेळा आठवण करून देत असते, त्याच कर्तव्याची आठवण रोजा वर्षातून संपूर्ण एक महिनाभर सतत करून देत असतो. रमजान महिना येतो व सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचे खाणेपिणे बंद होते. ‘सहरी’ (उपास करण्यापूर्वीचा फराळ) करीत असताना ‘अजान’ (नमाजपूर्वीची बांग) ऐकू येते व खाताखाता तुम्ही हात आखडता. त्यानंतर कसलेही पक्वान्न तुमच्यासमोर आहे, कितीही भूक अगर तहान लागली, मनाची कितीही तीप इच्छा झाली तरी सूर्यास्तापर्यंत तुम्ही तोंडात अन्नाचा कणही घालीत नाही. केवळ लोकांसमक्षच खातपीत नाही एवढेच नव्हे तर जेथे कोणीही पाहाणारा समक्ष नसतो अशा एकांतातही पाण्याच एक थेंब घशाखाली घालणे अगर अन्नाचा एक कणही गिळणे तुम्हाला शक्य होत नाही. मग ही सर्व बंधने एका विशिष्ट वेळेपर्यंतच असतात. ‘मगरिब’ (सूर्यास्तानंतरची) अजान ऐकू आल्याबरोबर तुम्ही उपवास समाप्त करण्यासाठी फलाहार घेता. त्यानंतर रात्रभर तुम्ही बिनदिक्कत व बिनधास्तपणे हवा तो पदार्थ खात असता. हे सर्व काय आहे? यासंबंधी विचार करा. या कृत्याच्या मुळाशी ईशभय आहे. तो सर्वव्यापी व सर्वज्ञानी आहे यावर दृढविश्वास आहे. पारलौकिक जीवन व ईशन्यायालयावर ईमान आहे. कुरआन व प्रेषिताच्या आज्ञांचे कडक पालन आहे. कर्तव्याची प्रखर जाणीव आहे. सहनशीलता, सोशीकपणा व संकटांना सामोरे जाण्याच्या कर्तव्यांची उजळणी आहे. ईशप्रसन्नता प्राप्त होण्यासाठी मनाच्या इच्छावासनांना काबूत ठेवणारे बळ आहे. दरवर्षी ‘रमजान’ महिन्यात संपूर्ण तीस दिवस रोजाद्वारे तुम्हावर संस्कार होतात व तुमच्यात वरील सर्व गुण उत्पन्न होण्याचा प्रयत्न होतो, ज्यायोगे तुम्ही पक्के व परिपूर्ण मुस्लिम बनावे. या सर्व गुणांनी तुम्हाला अशा उपासनेस पात्र बनवतो जी उपासना एका सच्चा मुस्लिमासाठी आपल्या जीवनात पार पाडणे अनिवार्य आहे.
पुन्हा असे पाहा की, सर्वश्रेष्ठ अल्लाहने ‘रोजा’ सर्व मुस्लिमांसाठी एकाच महिन्यात अनिवार्य केला आहे जेणेकरून सर्वांनी मिळून एकत्रितपणे ‘रोजा’ (उपवास) करावा. प्रत्येकाने स्वेच्छेनुसार वेगवेगळ्या वेळी तो करू नये. असे केल्याने अन्य अगणित फायदेही आहेत. संपूर्ण मुस्लिम वस्तीत संबंध महिनाभर पावित्र्य व मांगल्य ओतप्रोत भरलेले असते. सर्व वातावरण ईमान, ईशभय व कर्तव्यपूर्तीची प्रबळ इच्छा, आचारशुद्धी व नैतिकता यांनी भरलेले असते. अशा वातावरणात दुष्कृत्ये गाडली जाऊन सत्कर्माना उधाण येते. सज्जन माणसे, सत्कर्म करण्यात एकमेकांना सहाय्य करीत असतात. दुर्जन दुष्कर्म करण्यात संकोचतात व लाजतात.
निर्धनांना मदत करण्याची भावना धनिकांमध्ये निर्माण होते. ईशमार्गात धनसंपत्ती खर्च केली जाते. सर्व मुस्लिम समान अवस्थेत असतात व असे समान अवस्थेत असणे त्यांच्यात अशी जाणीव निर्माण करते की ते एकाच समूहाचे घटक आहेत. त्यांच्यात बंधुभाव, सहानुभूती व आपसातील एकोपा निर्माण होण्यास हे अत्यंत प्रभावी साधन आहे.
हे सर्व आमच्याच हिताचे आहे. आम्हाला उपाशी ठेवण्यात ईश्वराचा कसलाही लाभ होत नाही. त्याने आमच्याच हितासाठी ‘रमजान’ महिन्यातील ‘रोजे’ आम्हासाठी अनिवार्य ठरविले आहेत. कसलेही योग्य कारण अगर सबब नसताना जे कोणी हे अनिवार्य कर्तव्य पार पाडीत नसेल तर ते खुद्द स्वतःवरच अन्याय करीत असतात. जे लोक रमजान महिन्यात दिवसा उघडपणे खात-पित असतात, त्यांची स्थिती सर्वांत जास्त लज्जास्पद आहे. असे करून जणू ते असे घोषित करतात की ते मुस्लिम समूहांपैकी नाहीतच. तसेच ते असे दर्शवित असतात की त्यांना इस्लामच्या अनिवार्य कर्तव्याची कसलीही पर्वा नाही. ते इतके निर्ढावलेले आहेत की ज्या ईश्वरास ते मानतात त्याच्या आज्ञा व आदेशही ते सरळ सरळ धाब्यावर बसवितात. त्यांच्या समाजापासून वेगळे होणे ज्यांना सोपे आहे ज्यांना त्यांच्या निर्माणकर्त्या व पालनकर्त्याच्या विरुद्ध बंड करताना थोडीसुद्धा शरम वाटत नाही आणि त्यांच्या धर्माच्या सर्वश्रेष्ठ नेत्याने ठरवून दिलेल्या नियमांचे जाहीर उल्लघंन करतात. अशाकडून कोणता मनुष्य कसली विश्वासार्हता, कसल्या प्रामाणिकपणाची व सदाचाराची, कसली कर्तव्यनिष्ठा व कायदापालनाची अपेक्षा करू शकतो ते दाखवा?
जकात
तिसरे अनिवार्य कर्तव्य जकात(१) आहे. महान अल्लाहने प्रत्येक धनवान मुस्लिमास हे कर्तव्य अनिवार्य ठरविले आहे की ज्याच्याकडे कमीतकमी साढे बावन्न तोळे चांदी किंवा तितकी रक्कम शिल्लक व बचत सतत एका संपूर्ण वर्षाच्या काळात उरली असेल, तर त्या शिलकीपैकी चाळीसवा भाग त्याने आपल्या एखाद्या गरीब नातेवाईकास किंवा एखाद्या लाचार माणसास, एखाद्या दारिद्र्यपीडितास, एखाद्या नवमुस्लिम, एखाद्या प्रवासी माणसास किंवा एखाद्या कर्जबाजारी माणसास देऊन टाकावा.
१) जकात केवळ रोख रकमेपुरतीच नसून सोने, चांदी, व्यापारी माल व पशुधनासही ती लागू आहे. या सर्व वस्तूमध्ये किती मालमत्तेसाठी किती जकात द्यावी याचे कोष्टक तुम्हाला इस्लामी कायदे पुस्तकात आढळेल. येथे केवळ जकातच्या मागे असलेली उद्दिष्टे, तसेच त्यापासूनचे कल्याण विशद करणे एवढाच हेतू आहे, म्हणून उदाहरणासाठी रोख रक्कमेचे वर्णन दिले गेले आहे.)
अशा तऱ्हेने, अल्लाहने धनवानाच्या संपत्तीमध्ये, गोरगरींबासाठी कमीतकमी अडीच टक्के हिस्सा नियुक्त(२) केला आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात एखाद्याने दान केले. तर ते उपकारक होईल व त्याचे पुण्य आणखी अधिक असेल.
हा तुमचा वाटा काही अल्लाहला पोहचत नाही. तो तुमच्या कसल्याही दानाचा गरजू नाही, परंतु त्याचे असे फर्मान आहे की, तुम्ही माझ्यासाठी आपल्या एखाद्या निर्धन बांधवास काही दान केले तर ते दान मला दिल्यासारखे आहे. त्या निर्धनातर्फे मी कितीतरी अधिक पटीने त्याचे फळ तुम्हाला देईन. अर्थातच त्यासाठी अट अशी आहे की दान दिल्यानंतर तुम्ही केलेल्या उपकाराचा उच्चार करता कामा नये, दान घेतलेल्या माणसाला तुच्छ लेखू नये, त्याच्याकडून आभारप्रदर्शनाची सुद्धा अपेक्षा बाळगू नका. तुम्ही केलेल्या दानकर्माचा लोकांत बोलबाला अगर प्रसिद्धी व्हावी व लोकांनी तुमच्या दानशौर्याचे कौतुक करावे अशी इच्छा बाळगू नका व तसा प्रयत्न करू नका. जर वरील सर्व अमंगळ विचार मनातून काढून टाकून अंतःकरण पवित्र राखले व केवळ अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी आपल्या संपत्तीमधून गोरगरीबांना हिस्सा द्याल, तर अल्लाह त्याच्या अमर्याद संपत्तीमधून तुम्हाला इतके काही देईल जे कधीही संपणार नाही.
महान अल्लाहने जसे नमाज, रोजा (उपवास) आमच्यावर अनिवार्य केले आहेत त्याचप्रमाणे जकातसुद्धा अनिवार्य केली आहे. हा इस्लामचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. जकातला आधारस्तंभ यासाठी ठरविले गेले आहे की तिच्यायोगे ईश्वरासाठी त्याग करण्याची व तिला प्राधान्य देण्याची भावना व जाणीव मुस्लिमात निर्माण होते. स्वार्थ, संकुचित मनोवृत्ती व संपत्तीलोलुपता यासारखे दुर्गूण नष्ट होते. धनाची पूजा करणारा धनासक्त लोभी व कृपण मनुष्य तसेच पैशावर जीव ओवाळणारा माणूस, इस्लामसाठी अगदी कुचकामी आहे. जो मनुष्य स्वतःचे रक्त आटवून व घाम गाळून मिळवलेली संपत्ती स्वतःच्या गरजेसाठी न वापरता अल्लाहच्या आज्ञेनुसार बलिदान करू शकतो, तोच इस्लामच्या सरळ मार्गाने जाऊ शकतो. जकात अशा त्यागाचे धडे मुस्लिमांना गिरवावयास लावते. अल्लाहसाठी जेव्हा संपत्तीचा व्यय करण्याचा प्रसंग येतो तेव्हा संपतीला उराशी कवटाळून बसू नये अशी त्याची मानसिकता करून सोडते.
२) अल्लाहचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आपल्या वंशाच्या लोकांना म्हणजे सय्यद व हाशमी लोकांना जकात स्वीकारणे निषिद्ध केले आहे, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. याचा अर्थ असा की सय्यद व बनी हाशीम यांना जकात देणे तर अनिवार्य आहे परंतु जकात स्वीकारणे त्यांना धर्मसंमत नाही. जी कोणी व्यक्ती एखाद्या गरीब सय्यद अगर हाशमी माणसास मदत करू इच्छित असेल, भेट व देणगी म्हणून तो मदत देऊ शकतो. दानधर्म खैरात किंवा जकात या नावाने तो देऊ शकत नाही.
जकातचा ऐहिक फायदा हा आहे की मुस्लिमांनी आपापसात एकमेकांना सहाय्य करावे. कोणीही मुस्लिम उघडानागडा, भुकेलेला, तुच्छ होऊ नये. श्रीमंतानी गोरगरिबांना सहाय्य करावे व गरिबांनी भीक मागत फिरू नये, कोणीही व्यक्तीने आपली धनसंपत्ती केवळ आपल्या ऐषआरामासाठी व आपल्या शान व लौकिकासाठीच उधळू नये. उलट आपल्या संपत्तीत आपल्या जातीतील विधवांचा, अनाथ व पोरक्यांचा तसेच निराधार व निर्धनाचाही वाटा आहे. हे सतत लक्षात ठेवावे. जे लोक एखादे काम करण्याची क्षमता बाळगतात परंतु केवळ भांडवलाअभावी ते करू शकत नाहीत, अशा असहाय्य लोकांचाही आपल्या संपत्तीत काही हक्क व हिस्सा आहे ही गोष्टही लक्षात असावी. उपजत बुद्धिमान असून केवळ दारिद्र्यामुळे ज्यांना शिक्षण घेणे दुरापास्त होते, अशा बालकांचाही त्यात वाटा आहे. अपंगाचाही त्यात वाटा असतो. कोणतेही काम करण्यास असमर्थ असलेल्यांचाही त्यात वाटा असतो. या सर्वांचा हक्क जी व्यक्ती मानीत नाही ती जुलमी आहे. तुमच्या जातीतील हजारो माणसे भाकरीसाठी तडफडत असताना, हजारो कामगार बेकारीमुळे वणवण करीत भटकत असताना, तुम्ही आपल्याजवळ पैशाच्या राशी बाळगून असावे. मोठमोठ्या हवेलीत विलासात व ऐष आरामात असावे, मोटारीत फिरावे यापेक्षा अधिक मोठा जुलूम व अन्याय कोणता असेल? इस्लाम अशा प्रकारच्या स्वार्थांधपणाशी शत्रुत्व करतो. विद्रोहींना (काफिर) त्यांची संस्कृती अशी शिकवण देते की जी काही संपत्ती प्राप्त होते तिचा संचय करून ठेवावा व व्याजापोटी तिची गुंतवणूक करून भोवतालच्या लोकांची मिळकतही आपल्याकडे ओरबाडून घ्यावी. परंतु मुस्लिमास त्यांचा धर्म अशी शिकवण देतो की ईश्वराने तुमच्या गरजेपेक्षा अधिक उपजीविका व मिळकत प्रदान केली तर तिचा नुसता संचय करून ठेवू नका तर आपल्या गरजू बांधवांना ते द्या, जेणेकरून त्यांच्याही गरजा भागवाव्यात व तुमच्याप्रमाणे तेही मिळवते बनावेत.
हज (पवित्र मक्का यात्रा)
हज हे चौथे अनिवार्य कर्तव्य आहे. आयुष्यभरात फक्त एकदाच ते पार पाडणे अगत्याचे आहे व जो कोणी पवित्र ‘मक्का’ शहरापर्यंत जाणे येण्याची क्षमता बाळगतो केवळ त्यावरच हे कर्तव्य अनिवार्य केलेले आहे.
आज ज्या ठिकाणी ‘मक्का’ शहर वसलेले आहे त्याच जागी हजारो वर्षापूर्वी आदरणीय प्रेषित इब्राहीम (अ.) यांनी अल्लाहची उपासना करण्यासाठी एक छोटेसे घर बांधले होते. त्यांच्या निष्ठेची व प्रेमाची अशी काही कदर अल्लाहने केली की त्या छोट्याशा
घराला अल्लाहने आपले घर घोषित केले. अल्लाहने असा आदेश दिला की ज्या कोणाला आमची उपासना, आराधना करावयाची असेल त्यांनी या घराच्या दिशेने आपले तोंड करूनच ती करावी. पुढे असाही आदेश दिला की मुस्लिम जगातील कोणत्याही भागात व कानाकोपऱ्यात राहणारा असो, त्याची ऐपत असल्यास आयुष्यातून एकदा तरी या घराचे दर्शन घेण्यासाठी यावे व अल्लाहचा अतिप्रिय दास इब्राहीम (अ.) जितक्या प्रेमाने व मनोभावाने या घराला प्रदक्षिणा घालीत असे तशाच प्रेमाने व मनोभावाने या घराला प्रदक्षिणा घालावी. पुढे असाही आदेश दिला की, ‘‘तुम्ही जेव्हा आमच्या घराकडे याल तेव्हा आपली अंतःकरणे निर्मळ करा. आपल्या वासनांना आवर घाला. रक्तपात, अनाचार, अर्वाच्च बोलणे, यापासून दूर राहा. आपल्या स्वामीच्या दरबारात जितक्या आदबीने व नम्रतेने जाणे आवश्यक असते तशाच पद्धतीने आमच्या घराचे दर्शन करावे. जो पृथ्वी, आकाशाचा धनी आहे व ज्याच्या तुलनेत सर्व मानव क्षुल्लक याचक आहेत, अशा सम्राटाच्या सेवेत रुजू होण्यासाठी आपण चाललो आहोत असे समजा.’’
अशा प्रकारची नम्रता धारण करून अगदी अंतःकरणापासून जेव्हा तुम्ही आमची उपासना कराल तेव्हा आम्ही आपल्या देणग्यांनी तुम्हाला धनसंपन्न करुन सोडू.
एका अर्थाने विचार केल्यास हज ही सर्वांत महान उपासना आहे. अल्लाहचे प्रेम जर माणसाच्या अंतःकरणात नसेल तर आपली सर्व कामे व व्यवहार टाकून देऊन आपल्या सर्व प्रियजनांचा व नातेवाईकांचा विरह सहन करून, इतक्या लांबच्या प्रवासाची दगदग कशासाठी सोशील? म्हणूनच हजयात्रेचा इरादा करणे हाच मुळी अल्लाहच्या प्रेमाचा व निष्ठेचा पुरावा आहे. हज यात्रेसाठी जेव्हा मनुष्य निघतो तेव्हा त्याची अवस्था इतर प्रवासाच्या प्रसंगासारखी नसते. या प्रवासात माणसाचे सर्व लक्ष अल्लाहकडे जास्त असते. त्याच्या मनात ध्यास व उत्कटता वाढत असते. ‘‘काबागृह’’ जसजसे जवळ येते तसतसे हा प्रेमाग्नी अधिकच उफाळतो. दुष्कृत्ये व पापकृत्ये याबद्दल माणसाचे मन आपोआपच तिरस्कार करू लागते. हातून घडलेल्या पापकर्माबद्दल मनात खजीलपणा निर्माण होतो. भविष्यकाळात आज्ञापालनाची सुबुद्धी व सन्मती प्रदान करण्याची अल्लाहची याचना करीत असतो. जप व अल्लाहचे स्मरण व उपासनेत अधिकाधिक रस वाटू लागतो. नमाजमध्ये असताना अल्लाहसमोर मस्तक टेकण्याचा काळ प्रदीर्घ होऊ लागतो व खूप वेळ तरी मस्तक वर करण्यास मन तयार नसते. कुरआन पठन करताना त्यातून आगळा आनंद मिळू लागतो. रोजा (उपवास) केला असताना त्याची वेगळीच गोडी अनुभवू लागतो. जेव्हा तो अरबस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवतो तेव्हा इस्लामचा संपूर्ण प्राथमिक इतिहास त्याच्या डोळ्यांपुढे येऊ लागतो. जागोजागी व पावलोपावली अल्लाहवर उत्कृष्ट प्रेम केलेल्यांची व त्यांच्यासाठी प्राण कुर्बान केलेल्यांची चिन्हे व अवशेष दृष्टीस पडू लागतात. तेथील वाळूचा कणकण इस्लामच्या महानतेची साक्ष देत आहे. प्रत्येक कण व दगडगोटे असा गजर करीत आहेत की ह्याच भूमितून अल्लाहच्या संदेशाचे प्राबल्य वाढले. अशा तऱ्हेने मुस्लिमांची अंतःकरणे अल्लाहचे प्रेम व इस्लामवरील प्रेमाने ओसंडू लागतात. त्याचा असा काही चिरकाल टिकणारा ठसा त्यांच्या मनावर उमटला जातो की मरेपर्यंत तो त्यांच्या मनातून पुसला जात नाही.
धर्मकर्माबरोबरच या जगातीलही अनेक फायदे हजयात्रा करण्यामध्ये कृपाळू अल्लाहने ठेवलेले आहेत. हजच्या कारणाने मक्का शहर हे जगातील सर्व लोकांचे मध्यवर्ती केंद्र केले गेले आहे. एकाच विशिष्ट वेळी अल्लाहचे नामस्मरण करणारे लोक जगातील विभिन्न ठिकाणाहून येऊन तेथे एकत्रित होतात. एकमेकांना भेटतात. आपापसात इस्लामी प्रेम प्रस्थापित होते. मुस्लिम मग तो कोणत्याही देशाचा अगर कोणत्याही वंशाचा असला तरी सर्व एकच राष्ट्र असून सर्व एकमेकांचे बंधु आहेत, असाच ठसा मनावर उमटतो. या आधारे जर एकीकडे हजयात्रा अल्लाहची उपासना आहे तर त्याच्याबरोबर दुसऱ्या अंगाने ती जगातील एकूण मुस्लिमांची ‘कॉनफरन्स’ही आहे, तसेच मुस्लिमांचे विश्वबंधुत्व व एकोपा निर्माण करण्याचे सर्वात मोठे साधन आहे.
जिहाद
ईश्वराकडून तुम्हावर जे अखेरचे अनिवार्य कर्तव्य लागू करण्यात आले आहे ते इस्लामची पाठराखण करणे आहे. हे अनिवार्य कर्तव्य जरी इस्लामच्या आधारस्तंभात मोडत नसले तरी ते इस्लाममधील अत्यंत महत्त्वाच्या अनिवार्य कर्तव्यांपैकी एक आहे. ‘कुरआन’ व ‘हदीस’मध्ये यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. इस्लामची पाठराखण व समर्थन म्हणजे काय? हे अनिवार्य कर्तव्य का ठरविण्यात आले आहे? या प्रश्नांचे उत्तर एका उदाहरणाने तुमच्या सहजपणे लक्षात येऊ शकते. कल्पना करा की एक मनुष्य तुमच्याशी मैत्री करतो. परंतु कसोटीच्या प्रत्येक प्रसंगी हे सिद्ध होते की तुम्हाबद्दल त्याच्याजवळ कसलीही सहानुभूती नाही. त्याला तुमच्या लाभहानीबद्दल किंचितही पर्वा नसते. एखाद्या कार्यामुळे तुमची हानी होत असली तरी स्वतःच्या हितापायी ते कार्य तो निःसंकोचपणे करतो. एखादे कृत्य तुम्हास लाभकारक असल्यास त्यापासून तो केवळ एवढ्यासाठीच अलिप्त राहतो की त्यात त्याला स्वतःला कसलाही लाभ नसतो. तुम्हावर एखादे संकट कोसळले तर तुम्हाला कसलीही मदत तो करीत नाही. तुमची निंदा जेथे कोठे होत असेल तर तो तुमच्या निंदकात सामील होतो अथवा कमीतकमी तुमच्याबद्दलची निंदा मूकपणे ऐकतो, तुमचे हितशत्रु तुम्हाविरुद्ध एखादे कारस्थान करीत असले तर त्यांच्याशी तो सामील होतो किंवा किमान तुम्हाला त्यांच्या कारस्थानापासून वाचविण्याचा कसलाही प्रयत्न करीत नाही. आता तुम्हीच सांगा की अशा माणसाला तुम्ही आपला मित्र म्हणाल? खचितच ‘नाही’, असे तुमचे उत्तर असेल, कारण तो जरी तोंडाने तुमच्याशी मैत्रीचा दावा करीत असला तरी वास्तविकपणे त्याच्या अंतःकरणात तुमच्याशी मैत्रीचा लवलेशही नाही. मैत्रीचा अर्थ तर असा आहे की जो मनुष्य तुमच्याशी मैत्री करीत असेल तर तुम्हाबद्दल त्याला अंतःकरणापासून विशुद्ध प्रेम हवे. तो तुमचा हितचिंतक, पाठीराखा असावा. प्रसंगी तो तुमच्या उपयोगी पडावा व शत्रूशी सामना करताना त्याने तुमचे सहाय्य करावयास हवे. तुमची निंदा ऐकून व तुमच्याबद्दल वाईट उद्गार ऐकून स्वस्थ बसण्याइतपत तो सहनशील नसावा. जर हे सर्व गुण त्याच्यात नसतील तर तो दांभिक आहे, त्याचा मैत्रीचा दावा फोल आहे.
या उदाहरणावरून तुम्ही अनुमान काढू शकता की जेव्हा तुम्ही मुस्लिम असण्याचा दावा करीत आहात तेव्हा तुम्हावर कोणकोणती कर्तव्ये येऊन पडतात. मुस्लिम असण्याचा अर्थ असा आहे की, तुमच्यात इस्लामबद्दल स्वाभिमान आहे. त्याच्यावरील ईमानबद्दल अभिमान आहे. इस्लामबद्दल खरेखुरे प्रेम व आपल्या श्रद्धावंत धर्मबांधवाबद्दल तुम्ही खरेखरे हितचिंतक आहात. जगात तुम्ही कसलेही ऐहिक कृत्य करीत असला तरी त्या पाठीमागे इस्लामचे इष्ट व मुस्लिमांचे कल्याण हाच दृष्टिकोन सतत तुमच्या डोळ्यांसमोर असेल. स्वहितापोटी अगर स्वतःची कसलीही हानी टाळण्यापोटी तुमच्याकडून असे एखादे कृत्य कदापिही घडू नये जे इस्लामच्या ध्येयधोरणाविरुद्ध अगर मुस्लिमांच्या कल्याणाविरुद्ध असेल. तसेच इस्लामला व मुस्लिमांना हितकारक असणाऱ्या कृत्यात तुम्ही तन-मन-धनाने सहभागी व्हावे व इस्लामला वा मुस्लिमांना अनिष्ट व हानिकारक असणाऱ्या प्रत्येक कृत्यापासून दूर राहावे. आपला धर्म व धर्मबांधवांची प्रतिष्ठा यांना स्वतःची प्रतिष्ठा मानली जावी. जसा स्वतःचा अपमान तुम्हाला सहन होत नाही अगदी तसेच इस्लामचा अवमान व अप्रतिष्ठा तुम्हाला सहन होता कामा नये. स्वतःचे हितरक्षण करताना तुम्ही जसे आपल्या वैऱ्याशी साथ करत नाही तसेच इस्लाम व मुस्लिमांशी वैरभाव बाळगणाऱ्यांशीही तुम्ही सहभागी होऊन त्यांची साथ करू नये. स्वतःच्या प्राणाच्या, मालमत्तेच्या व अब्रुच्या रक्षणार्थ सर्व प्रकारचा त्याग करण्यास तुम्ही जसे तयार होता त्याचप्रमाणे तुम्ही इस्लाम व मुस्लिमांच्या रक्षणासाठीही कसल्याही त्यागाची तयारी बाळगावी. स्वतःला मुस्लिम म्हणविणाऱ्या प्रत्येक माणसामध्ये वरील गुण असणे आवश्यक आहे, नाहीतर त्याची गणना दांभिकामध्ये होऊन त्याचे आचरण त्याच्या तोंडी दाव्याला फोल ठरविल.
इस्लामसमर्थनाचे एक अंग असे आहे ज्याला ‘शरिअत’च्या भाषेत ‘जिहाद’, असे म्हणतात. ‘जिहाद’चा शब्दशः अर्थ एखाद्या कृत्यासाठी आपली सर्व शक्ती पणास लावणे असा आहे. या अर्थाने अलहचा आदेश सर्वव्यापी करण्यासाठी जो कोणी शारीरिक कष्टाने, लेखणीने, धनसंपत्तीने, वाणीने प्रयत्नांची पराकाष्ठा करतो तोही ‘जिहाद’च करीत असतो. परंतु सर्व ऐहिक उद्दिष्टापासून संपूर्णपणे निर्मळ व केवळ ईश्वरेच्छेपोटी व इस्लामच्या वैऱ्याशी जे युद्ध केले जाते त्या युद्धासाठी विशेष करून ‘जिहाद’ शब्द प्रयुक्त झालेला आहे. वरील शेवटच्या ‘जिहाद’ला शरीअतमध्ये ‘फर्जे किफाया’ असे नामकरण आहे. ‘फर्जे किफाया’ हे एक असे कर्तव्य आहे जे सर्व मुस्लिमांवर येऊन तर पडते, परंतु ते कर्तव्य जर एका समूहाने पार पाडले तर त्या कर्तव्याची पूर्तता करण्याची इतर मुस्लिमांवरील जबाबदारी टळून जाते. खरेतर एखाद्या इस्लामी राष्ट्रावर शत्रूचा हल्ला झाल्यास त्या राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकावर शत्रूशी ‘जिहाद’ करणे हे नमाज व ‘रोजे’प्रमाणेच एक अनिवार्य कर्तव्य बनते. जर ते राष्ट्र आपले रक्षण करण्यास असमर्थ असेल तर त्याच्या शेजारी असणाऱ्या देशातील प्रत्येक मुस्लिमांनी तन-मन-धनाने त्याचे सहाय्य करणे हे अनिवार्य कर्तव्य होते. त्यांची कुमक मिळूनही जर शत्रूचे निवारण होऊ शकले नाही तर सर्व जगातील एकूण मुस्लिमांसाठी, ज्याप्रमाणे नमाज व ‘रोजे’ हे अनिवार्य कर्तव्य आहे त्याचप्रमाणे त्या आक्रमित राष्ट्राची पाठराखण करणे हेही अनिवार्य कर्तव्य ठरते. हे अनिवार्य कर्तव्य पार पाडण्यात चुकारपणा करील तर तो अल्लाहच्या दृष्टीने गुन्हेगार ठरेल. या परिस्थितीत ‘जिहाद’चे महात्म्य नमाज व रोजे यापेक्षाही अधिक होते. कारण ती परिस्थिती ‘ईमान’च्या कसोटीचा प्रसंग असते. संकटकाळात जो मनुष्य इस्लाम व मुस्लिमांस साथ देत नाही, त्याचा ‘ईमान’च संशयास्पद आहे. तसे झाले तर त्याची नमाज काय कामाची व त्याचे रोज्यांचे कसले मूल्य? एखादा नतदृष्ट असा असेल की त्या संकटकाळात तो मनुष्य इस्लामच्या व मुस्लिमांच्या शत्रूंना साथ देतो तर तो मनुष्य खात्रीने दांभिक आहे. त्याची नमाज, त्याचा रोजा, त्याची जकात व त्याचा हज हे सर्व काही निरर्थक आहे.

अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीनुसार इस्लामचे तिसरे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे ईश्वराने त्याच्या प्रेषितांवर वेळोवेळी अवतरित ग्रंथावर ईमान (दृढश्रद्धा) धारण करण्यास सांगितले आहे.
सर्वश्रेष्ठ अल्लाहने ज्याप्रमाणे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर कुरआन अवतरित केला त्याचप्रमाणे त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांवरही आपले ग्रंथ अवतरले होते. त्या ग्रंथांपैकी काहींची नावे आम्हाला सांगण्यात आली आहेत. उदा. ‘सुहुफे इब्राहीम’ म्हणजे आदरणीय इब्राहीम (अ.) वर अवतरलेला ग्रंथ, ‘तौरात’ म्हणजे प्रेषित मूसा (अ.) वर अवतरलेला ग्रंथ, ‘झबूर’ म्हणजे आदरणीय दाऊद (अ.) वर अवतरलेला ग्रंथ, ‘इंजील’ म्हणजे आदरणीय ईसा (अ.) वर अवतरलेला ग्रंथ, याशिवाय प्रेषितांकडे जे अन्य ग्रंथ पाठविले गेले होते त्यांच्या नावाची माहिती आम्हाला दिली गेली नाही. म्हणूनच अन्य कोणत्याही धर्मग्रंथाबाबत ते ईश धर्मग्रंथ आहेत अथवा नाहीत हे आम्ही विश्वासपूर्वक सांगू शकत नाही. अर्थातच आम्ही विश्वासपूर्वक मानतो की, ईश्वराकडून जे काही ग्रंथ अवतरले होते ते सर्व सत्य व वास्तव होते.
ईशग्रंथांची जी नावे आम्हाला सांगण्यात आली त्यापैकी ‘सुहुफे इब्राहीम’ तर आता पृथ्वीवर अस्तित्वात नाही. उरलेले ‘तौरात’, ‘इंजील’ व ‘झबूर’ हे ग्रंथ आज रोजी ज्यू लोकांजवळ आणि ख्रिश्चन लोकांजवळ उपलब्ध आहेत. परंतु पवित्र कुरआनमध्ये आम्हाला असे दाखवून दिले गेले आहे की, त्या सर्व ग्रंथांतील ईशवचनांत लोकांनी फेरबदल करून टाकले आहेत. आपल्यातर्फे त्यांत अनेक गोष्टी समाविष्ट करून टाकल्या आहेत. खुद्द ख्रिश्चन लोक व यहुदी लोकसुद्धा मान्य करतात की मूळ ग्रंथ त्यांच्याजवळ उपलब्ध नाही; केवळ त्यांच्या भाषांतरित प्रतीच उपलब्ध आहेत. त्या प्रतीमध्ये शतकानुशतकापासून फेरबदल होत आले आहेत. आजसुद्धा तसे फेरबदल होत आहेत. आणखी ते ग्रंथ वाचल्यानंतर त्यामध्ये काही स्पष्टपणे आढळून येते ज्यावरून ते सर्व ईश्वराकडून असूच शकत नाही याबद्दल खात्री पटते. यासाठीच जे ग्रंथ उपलब्ध आहेत ते तंतोतंत व परिपूर्ण ईशग्रंथ नाहीत. त्यामध्ये ईशवाणी व मानवी वचने यांची सरमिसळ झालेली आहे. त्यामधील ईशवाणी नेमकी कोणती आहे व मानवी वचने कोणती आहेत हे जाणण्याचे साधनही उपलब्ध नाही. तात्पर्य असे की पूर्वीच्या ग्रंथावर ईमान बाळगण्याचा जो आदेश आम्हाला दिला गेला आहे त्याची वास्तवता केवळ इतकीच की, ईश्वराने कुरआन अवतरित करण्यापूर्वीसुद्धा प्रत्येक जाती-वंशासाठी आपले आदेश, त्याच्या प्रेषितांद्वारा दिले होते. ते सर्व आदेश केवळ त्या एकमेव ईश्वराकडून देण्यात आले होते ज्याच्याकडून पवित्र कुरआन अवतरित करण्यात आले आहे. तसेच कुरआन काही एखादा नवीन व अद्भूत ग्रंथ नाही. त्याची शिकवण पूर्वीच्या काळातील लोकांना दिली गेली होती व नंतरच्या काळात त्यांना त्या शिकवणीचे विस्मरण झाले हते. तिच्यात त्यांनी फेरबदल घडवून आणले होते. ईशवाणीत मानवी वचनांची सरमिसळ करून टाकली होती. त्या सर्व चुकांची दुरूस्ती करून मूळ शिकवणीची उजळणी करण्यासाठीच हा पवित्र ग्रंथ ‘‘कुरआन’’ अवतरित करण्यात आला आहे.
दिव्य कुरआन हा ईश्वराने अवतरित शेवटचा ग्रंथ असून त्याच्यात व त्या अगोदरच्या ग्रंथांत अनेक दृष्टीने फरक आहे.
(१) कुरआनच्या आधी जे ग्रंथ अवतरित झाले होते त्यापैकी बहुतेकांच्या मूळ प्रती नाहीशा झालेल्या असून केवळ त्यांच्या अनुवादित प्रतीच आज उपलब्ध आहेत. परंतु पवित्र कुरआन ज्या ज्या शब्दानिशी अवतरले त्या सर्वच्या सर्व वचनांनिशी तंतोतंतपणे आजही उपलब्ध आहे. त्याच्यात एका अक्षराचा किंबहुना एखाद्या विरामचिन्हाचाही फेरबदल झालेला नाही.
(२) आधीच्या ग्रंथामध्ये माणसांनी ईशवाणीत मानवी वचनाची सरमिसळ करून सोडली आहे. एकाच ग्रंथात ईशवाणीही आढळते व त्याचबरोबर राष्ट्राचा इतिहास, महापुरूषांचे वृत्तान्त, टीका व समीक्षण तसेच धर्ममार्तंडांनी सांगितलेल्या समस्या व त्यांच्या सोडवणुकीचे मार्गसुद्धा आहेत. त्यात असे काही प्रदूषण व सरमिसळ झाली आहे की, केवळ ईशवाणी त्यातून वेगळी करणे अशक्य आहे. परंतु पवित्र कुरआनमध्ये शुद्ध ईशवाणीच आम्हाला आढळते. त्यामध्ये अन्य कसल्याही वचनांचा लवलेशही आढळत नाही. टीकाग्रंथ विवरण व विश्लेषण प्रेषित मुहम्मद (स.) यांची उक्ती व कृती दर्शविणारे त्यांचे जीवनचरित्र, धर्मशास्त्र, प्रेषितांच्या सोबत्यांची जीवनचरित्रे, तसेच इस्लामी इतिहास इ. विषयांवर स्वतंत्र लिखाण झाले आहे. या सर्व विषयांवर मुस्लिम लोकांनी जे काही लिखाण केले आहे ते सर्व कुरआनहून अगदी वेगळ्या अशा इतर पुस्तकांत लिहिलेले असून प्रत्यक्ष कुरआनमध्ये त्यातील एक अक्षरही आढळत नाही.
(३) जगातील विविध जातींमध्ये जितके धर्मग्रंथ आज उपलब्ध आहेत, त्यातील एखाद्याच्याही बाबतीत ऐतिहासिक पुराव्यानिशी हे सिद्ध होऊ शकत नाही की, ज्या प्रेषितांकडे तो ग्रंथ धाडला गेला होता तोच तो मूळग्रंथ आहे. या विपरित काही असेही धर्मग्रंथ आढळतात की ते कोणत्या काळात अवतरले व कोणत्या प्रेषितांवर ते अवतरले हेसुद्धा अनभिज्ञ आहे. परंतु पवित्र कुरआनच्या संदर्भात इतका भक्कम ऐतिहासिक पुरावा व आधार उपलब्ध आहे की त्याचा संबंध व संपर्क प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी नाही, अशी शंकाही कोणी घेऊ शकत नाही. त्यातील कोणत्या आयती (वचने) केव्हा व कोणत्या स्थळी अवतरित झाल्या यांचीही अगदी स्पष्ट माहिती उपलब्ध आहे.
(४) यापूर्वीचे धर्मग्रंथ ज्या भाषांमध्ये अवतरले होते, त्या सर्व भाषा बऱ्याच काळापासून मृत झालेल्या आहेत. जगभर आज त्या भाषा बोलणारे कोठेही आढळत नाहीत. तसेच त्या भाषा जाणणारेही क्वचितच आढळतात. असे ग्रंथ त्यांच्या खऱ्या मूळ अवस्थेत उपलब्धही झाले तरी त्यातील आदेश नीट समजणे व त्यांचे पालन करणे हे अशक्य आहे. परंतु ज्या भाषेत कुरआन उपलब्ध आहे ती एक जिवंत भाषा असून जगातील कोट्यवधी लोकांत ती बोलली व समजली जात आहे. तिच्या शिक्षणाची तरतूद जगात सर्वत्र आढळते. प्रत्येक मनुष्य ती भाषा शिकू शकतो. ज्याला ती शिकता येत नसेल त्याला पृथ्वीवर चहूकडे अशी माणसे भेटतील ज्यांच्यामध्ये कुरआनच्या वचनांच्या अर्थाचे स्पष्टीकरण करून सांगण्याची पात्रता आहे.
(५) जगात निरनिराळ्या मानव जातींजवळ जितके धर्मग्रंथ आज उपलब्ध आहेत, त्यातील प्रत्येक ग्रंथात त्यापैकी कोणा एकाच विशिष्ट जातीवंशाला संबोधित केले गेले आहे. त्यातील प्रत्येक ग्रंथात अशा आज्ञा व आदेश आढळतात जे त्या ठराविक काळापुरते व त्याकाळच्या विशिष्ट गरजांपुरतेच मर्यादित होते. हे आम्हाला कळून चुकते. परंतु आता तशी अवस्था व आवश्यकताही उरली नाही, तसेच ते आदेश आता अनुसरलेही जाऊ शकत नाहीत. यावरून ही गोष्ट स्फटिकासारखी स्वच्छ व स्पष्ट आहे की, ते सर्व ग्रंथ वेगवेगळ्या जातीवंशापुरतेच मर्यादित होते. त्यापैकी एकही ग्रंथ संपूर्ण जगासाठी अवतरला नव्हता. तसेच ज्या जातीवंशासाठी जे ग्रंथ अवतरले होते त्यांच्यासाठीसुद्धा ते कायमचे म्हणून नव्हते तर ते एका ठराविक काळापुरतेच होते. आता कुरआनवर दृष्टिक्षेप टाकू या. या ग्रंथात प्रत्येक ठिकाणी अखिल मानवजातीला संबोधित केले गेले आहे. त्यातील एका ओळीनेही अशी शंका निघत नाही की तो ग्रंथ कोणा एका विशिष्ट जातीसाठीच अवतरला आहे. म्हणून या ग्रंथात जे काही आदेश दिले गेले आहेत ते सर्व असे आहेत की प्रत्येक काळी व प्रत्येक स्थळी ते आचरणात आणले जाऊ शकतात. यावरून हे सिद्ध होते की, पवित्र कुरआन हे संपूर्ण जगासाठी चिरकालीन आहे.
(६) आधीच्या प्रत्येक ग्रंथात सत्यनिष्ठा व सदाचाराच्या गोष्टींचे वर्णन केले गेले होते. चारित्र्य व न्यायीपणाची शिकवण दिली गेली होती. ईश्वरेच्छेनुसार जीवनक्रम आचरण्याच्या पद्धती दर्शविण्यात आल्या होत्या. परंतु त्यापैकी एकही ग्रंथ असा नव्हता की त्यात वरील सर्व गोष्टी एकवटल्या असून त्यात कसलीही उणीव राहिलेली नाही. केवळ कुरआनचेच हे वैशिष्ट्य आहे की ज्या काही चांगल्या बाबी पूर्वीच्या ग्रंथात वेगवेगळ्या होत्या त्या सर्व यामध्ये एकवटल्या गेल्या आहेत. तसेच जी गुणवैशिष्ट्यें आधीच्या ग्रंथात राहून गेली होती ती सर्व कुरआनमध्ये समाविष्ट केली गेली आहेत.
(७) सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये मानवी हस्तक्षेपामुळेच अशा गोष्टींची भेसळ झाली आहे जे वास्तविकतेच्या अगदी विरुद्ध आहे, तसेच बुद्धिविरुद्ध आहेत आणि अन्यायावर आधारित आहेत. मानवांची श्रद्धा व त्यांची कर्मे दोन्हीही गोष्टी या कारणाने दूषित होतात. इतकेच नव्हे तर कित्येक ग्रंथात अश्लील व लैंगिक गोष्टी तसेच व्यभिचाराच्या गोष्टीसुद्धा आढळतात. पवित्र कुरआन अशा सर्व गोष्टींपासून स्वच्छ व निर्मळ आहे. बुद्धीविरुद्ध एकही उल्लेख त्यात आढळत नाही. युक्तिवादाने वा अनुभवाने खोटी ठरविली जाऊ शकते असा एकही उल्लेख नाही. त्यातील कोणताही आदेश अन्यायपूर्ण नाही, त्यातील कोणतीही गोष्ट माणसाला पथभ्रष्ट करणारी नाही. त्यात अश्लीलतेचा व व्यभिचाराचा लवलेशही नाही. आरंभापासून शेवटपर्यंत संपूर्ण कुरआन म्हणजे उच्च कोटीचे ज्ञान, न्यायाची शिकवण, सरळ मार्गदर्शन, सर्वोत्तम नियम व आदेश यांचा समूह आहे.
हीच ती वैशिष्ट्ये होत ज्यांच्या आधारे जगातील समस्त जातीवंशांना असा उपदेश केला गेला आहे की त्यांनी कुरआनवर ईमान धारण करावे व अन्य सर्व ग्रंथांचा त्याग करून या एकमेव ग्रंथानुसारच आचरण व अनुकरण करावे. माणसाला ईश्वरेच्छेनुसार जीवन व्यतीत करण्यासाठी उपदेश व मार्गदर्शनाची जेवढी आवश्यकता आहे ती सर्व या ग्रंथात उपलब्ध आहे. या ग्रंथाचे पृथ्वीवर आगमन झाल्यानंतर अन्य कोणत्याही ग्रंथाची गरजच उरलेली नाही.
कुरआन व इतर धर्मग्रंथ यामध्ये काय फरक आहे हे जेव्हा आपणास कळून चुकले आहे तर आता आपण स्वतःच हे समजू शकता की, अन्य ग्रंथांवरील ईमान (श्रद्धा) व कुरआनवरील ईमान यामध्ये काय फरक आहे. आधीच्या ग्रंथांवरील ईमान ते ईशग्रंथ होते व सत्य होते आणि ज्या हेतूसाठी कुरआन अवतरले आहे त्याच हेतूच्या सिद्धीसाठी ते ग्रंथही अवतरले होते; हे सत्य आहे. कुरआनवरील ईमानची वास्तवता व दर्जा असा आहे की ती शुद्ध ईशवाणी आहे, निखालस सत्य आहे, त्यातील प्रत्येक शब्द न शब्द सुरक्षित आहे, त्यातील प्रत्येक वचन खरे आहे, त्यातील प्रत्येक आदेशाचे पालन अनिवार्य आहे व त्याच्याविरुद्ध असणारी कोणतीही गोष्ट खंडनीय व रद्दबातल ठरण्यास पात्र आहे.
ईश्वराच्या प्रेषितांवरील ईमान
धर्मग्रंथानंतर आम्हाला ईश्वराच्या सर्व प्रेषितांवरही ईमान (दृढश्रद्धा) धारण करण्याचा आदेश दिला गेला आहे.
मागील प्रकरणात आपण पाहिले आहे की, ईश्वराने आपले प्रेषित जगातील सर्व जातीवंशांमध्ये पाठविले होते. त्या सर्वांनी त्याच इस्लामची शिकवण दिली होती जी अखिल मानवजातीला देण्यासाठी सरतेशेवटी प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आगमन पृथ्वीवर झाले. या अर्थाने पाहिल्यास ईश्वराने पाठविलेले एकूण एक सर्व प्रेषित एकाच पक्षाचे होते. त्यापैकी एकालाही खोटे ठरविण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याने सर्व प्रेषितांना खोटे ठरविण्यासारखे आहे. प्रेषितांपैकी एकाची वास्तवता जर कोणी स्वीकारली तर एकूण सर्व प्रेषितांची वास्तवता स्वीकारणे त्याच्यावर आपोआपच अनिवार्य होते. अशी कल्पना करा की, दहाजणांनी एकच विधान केलेले आहे. त्यापैकी एकाला जर तुम्ही सत्य मानले तर आपोआपच उरलेल्या नऊ जणांनाही सत्य मानल्यासारखेच आहे. याउलट जर एकाला तुम्ही खोटे म्हटले तर त्याचा अर्थ असा निघतो की, त्याने केलेले विधानच खोटे आहे. त्या अनुषंगाने सर्व दहाजणही खोटे ठरतील. इस्लाममध्ये ज्यासाठी सर्व प्रेषितांवर ईमान धारण करणे अनिवार्य व आवश्यक आहे, त्याचे हेच कारण आहे. एखादी व्यक्ती कोणा एका प्रेषितावरही ईमान धारण करीत नाही, तर बाकीच्या प्रेषितांवर ईमान धारण करीत असली तरी ती ‘विद्रोही’ (श्रद्धाहीन) काफिरच ठरते.
काही उल्लेखांनुसार जगातील विविध जातीवंशांमध्ये जे प्रेषित पाठविले गेले आहेत त्यांची एकूण संख्या एक लक्ष चोवीस हजार आहे. जगात मानव कधी काळापासून आहे व किती जातीवंश आजपर्यंत होऊन गेले आहेत, याचा जर तुम्ही विचार केलात, तर ती संख्या फार मोठी असल्याचे वाटणार नाही. या सव्वालाख प्रेषितांपैकी ज्यांच्या नावांचा कुरआनमध्ये उल्लेख आहे त्यांच्यावर तर स्पष्टपणे ईमान धारण करणे अगत्याचे आहे. उरलेल्या इतर प्रेषितांबाबत आम्हास केवळ अशी श्रद्धा बाळगण्याची शिकवण दिली गेली आहे की, जे कोणी ईश्वराकडून त्याच्या दासांच्या मार्गदर्शनार्थ व उपदेश करण्यासाठी पाठविले गेले होते, ते सर्व सत्य होते. हिंदुस्थान, चीन, इराण, इजिप्त, आफ्रिका, युरोप व जगातील अन्य देशांमध्ये ज्या प्रेषितांचे आगमन झाले असेल, त्या सर्वांवर आम्ही ईमान (दृढ श्रद्धा) बाळगतो, परंतु एखाद्या विशिष्ठ व्यक्तीसंबंधी ती प्रेषित होती असे आम्ही म्हणू शकत नाही. तसेच ते प्रेषित नव्हते असेही आम्ही म्हणू शकत नाही. कारण त्यासंबंधी आम्हाला काहीही सांगितले गेलेले नाही. खरेतर निरनिराळ्या धर्माचे अनुयायी ज्यांना आपले प्रेषित व मार्गदर्शक मानतात, त्यांच्याविरुद्ध काही सांगणे आम्हाला उचित व इष्ट नाही. वास्तविकपणे ते प्रेषितच असावेत अशी दाट शक्यता आहे व त्यांच्या अनुयायांनी नंतरच्या काळात त्यांच्या शिकवणीत अनेक दोष निर्माण केले असतील. जसा आदरणीय मूसा (अ.) यांच्या व आदरणीय ईसा (अ.) यांच्या अनुयायांनी बिघाड निर्माण केला. म्हणून आम्ही जे काही मतप्रदर्शन करू ते त्यांच्या धर्मासंबंधी त्यांच्या रूढी-परंपरासंबंधीच करु. परंतु प्रेषितांबद्दल आम्ही काहीही बोलणार नाही, जेणेकरून न जाणता, न समजता, एखाद्या प्रेषिताचा अनादर व अवमान आमच्या हातून घडू नये.
या अर्थाने तर पूर्वीच्या प्रेषितांमध्ये व प्रेषित मुहम्मद (स.) मध्ये कसलाही फरक नसून त्यांच्याइतकेच पूर्वीचे प्रेषितसुद्धा वास्तवच हते. ईश्वराकडूनच पाठविले गेलेले होते; ते सर्व इस्लामचा सरळमार्ग दाखविणारेच होते आणि त्या सर्वांवर दृढ श्रद्धा (ईमान) धारण करण्याचा आम्हाला आदेश दिला गेला आहे. परंतु या सर्व बाबतीत सारखेपणा असूनसुद्धा प्रेषित मुहम्मद (स.) मध्ये व अन्य प्रेषितांमध्ये तीन गोष्टींचा स्पष्ट फरकही आहे, तो खालीलप्रमाणे :
(१) पहिला फरक असा की, आधीचे सर्व प्रेषित विशिष्ट काळासाठी व विशिष्ट जातीवंशापुरतेच होते, परंतु प्रेषित मुहम्मद (स.) हे संपूर्ण जगासाठी सार्वकालिक तसेच अखिल मानवजातीसाठी प्रेषित बनवून पाठविले गेले आहेत. मागच्या प्रकरणात आम्ही विवरणासहित याविषयी वर्णन केले आहे.
(२) दुसरा फरक असा आहे की, आधीच्या प्रेषितांनी दिलेली शिकवण जगातून पूर्णतः नष्ट झालेली आहे. अथवा थोड्याफार प्रमाणात शिल्लक असली तरी तिचे निर्भेळ स्वरुप मुळीच उरलेले नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या जीवनासंबंधी खरीखुरी माहितीसुद्धा आज जगात कोठेच सापडत नाही. उलट त्या माहितीवर कथानकांचे थरावर-थर चढले आहेत. या स्थितीत जर एखाद्याने त्यांचे अनुकरण करण्याचे ठरविले तरीही त्याला तसे करणे आज शक्य नाही. याउलट प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेली शिकवण, त्यांचे पवित्र जीवनचरित्र, त्यांचे तोंडी आदेश व उपदेश, त्यांच्या आचारांच्या पद्धती, त्यांचे संस्कार, सवयी व गुणवैशिष्ट्यें किंबहुना त्यांच्यासंबंधीची सर्व माहितीची साधने आज जगामध्ये सुरक्षित आहेत. म्हणूनच वास्तविकपणे सर्व प्रेषितांमध्ये प्रेषित मुहम्मद (स.) आपल्या शिकवणुकीच्या रुपाने अमर आहेत. केवळ त्यांचेच अनुयायीत्व व अनुकरण करणे शक्य आहे.
(३) तिसरा फरक असा आहे की, आधीच्या प्रेषितांकरवी इस्लामची जी शिकवण दिली गेली होती, ती काही परिपूर्ण नव्हती. प्रत्येक प्रेषितानंतर दुसरा प्रेषित येऊन त्याने आधीच्या आदेश, उपदेशात, नियमात फेरबदल व कमी-जास्तपणा केला आणि अशाप्रकारे प्रगती व सुधारणेचे कार्य सतत पुढे चालू राहिले होते. म्हणूनच तो काळ निघून गेल्यानंतर त्या प्रेषितांची शिकवण ईश्वराने सुरक्षितपणे टिकवून ठेवली नाही. कारण प्रत्येक परिपूर्ण शिकवणीनंतर त्याआधीच्या अपूर्ण व अर्धवट शिकवणीची गरज उरलेली नव्हती. शेवटी प्रेषित मुहम्मद (स.) द्वारा इस्लामची अशी शिकवण देण्यात आली. जी सर्वच दृष्टीने परिपूर्ण होती. त्यानंतर आधीच्या सर्व प्रेषितांच्या शिकवणी आपोआपच रद्दबातल झाल्या. कारण परिपूर्ण शिकवण सोडून देऊन अपूर्ण शिकवणीनुसार आचरण करणे हे बुद्धिविरुद्ध ठरते. ज्याने प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायीत्व पत्करले त्याने आधीच्या सर्व प्रेषितांचे अनुयायीत्व केल्यासारखेच आहे. कारण त्या सर्व प्रेषितांच्या शिकवणीत जो काही चांगुलपणा होता तो प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीत एकवटलेला आहे. तसेच जो कोणी प्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण सोडून आधीच्या एखाद्या प्रेषिताचे अनुयायीत्व करील तर तो पुष्कळशा चांगुलपणापासून वंचित राहतो, कारण नंतरच्या शिकवणीत समाविष्ट असलेला भलेपणा (कल्याणकारकता) आधीच्या जुन्या शिकवणुकीत नव्हता.
या सर्व कारणांमुळे जगातील समस्त मानवजातीला प्रेषित मुहम्मद (स.) यांचे अनुयायीत्व पत्करणे अगत्याचे ठरते. मुस्लिम (आज्ञाधारक) होण्यासाठी, प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर तीन दृष्टीने ईमान (दृढ श्रद्धा) धारण करणे आवश्यक आहे.
(१) पहिले असे की, ते ईश्वराचे सच्चे प्रेषित आहेत.
(२) त्यांनी दिलेली शिकवण परिपूर्ण आहे, कोणताही दोष वा उणीव यापासून ती निर्मळ आहे.
(३) ते ईश्वराचे शेवटचे प्रेषित आहेत. त्यांच्यानंतर कोणाही प्रेषितांचे कोणत्याही जातीवंशासाठी कयामत (निवाड्याचा दिवस) पर्यंत आता पृथ्वीवर आगमन होणार नाही. तसेच मुस्लिम (आज्ञाधारक) होण्यासाठी ज्याच्यावर ईमान धारण करणे आवश्यक असेल; अशा एखाद्या व्यक्तीचेही आता आगमन होणार नाही की त्याला न मानल्याने एखादा मनुष्य श्रद्धाहीन (काफिर) ठरेल.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget