March 2019

सामान्यतः दुर्बलांना आपले अधिकार मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. त्या शिवाय त्याला त्याचे नैतिक अधिकार तर मिळत नाहीतच परंतु मान्य सुद्धा केले जात नाहीत. वर्तमान काळात मोठ्या वाद-विवाद व कठोर प्रयत्नांअंती स्त्रिचे काही मूलभूत अधिकार मान्य करण्यात आले आहेत. हे उपकारच मानावे लागेल. खरे तर हे उपकार इस्लाम धर्माचेच आहेत. सर्व प्रथम विश्वामध्ये इस्लामनेच स्त्रिला ते अधिकार प्रदान केलेत ज्या अधिकारांची याचना स्त्रि खूप पूर्वी पासून करीत होती. हे सर्व अधिकार इस्लामने स्त्रिला यामुळे दिले नाहीत की ती अत्याचारित व पीडित होती व सर्व बाजूंनी या बाबतीत निषेध व्यक्त होत होता व तिचा पक्ष घेऊन प्रतिनिधीत्व करण्यात येत होते. तर यासाठी दिलेत की हे अधिकार स्त्रीचे नैसर्गिक व स्वाभाविक अधिकार होते जे तिला मिळायलाच पाहिजे होते. इस्लामने विवश होऊन हे अधिकार दिले नसून स्त्रि अत्याचारित व पिडीत होती आणि अत्याचारितांना न्याय देणे हे इस्लामचे परम-कर्तव्य होते, आहे व असणार.
या ठिकाणी काही अधिकारांचा उल्लेख करण्यात येत आहे जे इस्लामने स्त्रिला प्रदान केले आहेत. इस्लाम या अधिकारांचे वर्णन केवळ कायद्यांच्या भाषेत करून गप्प बसत नसून त्यास प्रोत्साहणाच्या माध्यमाने त्यांना प्रदान करण्याची तीव्र भावना निर्माण करतो.
१) जिवंत राहण्याचा अधिकार
स्त्रिची जी अवस्था संपूर्ण जगात होती तीच अरब देशात होती. अरबचे काही कबीले आपल्या मुलींना जिवंत पुरुन टाकायचे. दिव्य कुरआनच्या आदेशामुळे हा प्रकार थांबविण्यात आला. व तिला जिवंत राहण्याचा अधिकार दिला. आणि सांगितले की जी व्यक्ती तिचा जिवंत राहण्याचा अधिकार हिरावून घेईल. कयामत (महाप्रलय) च्या दिवशी त्यास याचा हिशोब द्यावा लागेल.
‘‘आणि स्मरण करा ती वेळ, जेव्हा जिवंत गाडलेल्या मुलीस विचारले जाईल की, ती कोणत्या अपराधा पायी ठार केली गेली.’’ (सूरह-ए-अलतकवीर ८:९)
एकीकडे निरपराध मुलींवर अत्याचार करण्यास नरकाच्या यातनामय जीवनाचे भय दाखविण्यात आले व दुसरीकडे त्या लोकांना आनंदाची खबर देण्यात आली ज्यांनी निरपराध मुलींवर अत्याचार न करता त्यांच्याशी सद्व्यवहार केला. आणि मुलींबरोबर सुद्धा तोच व्यवहार करतात जो मुलांबरोबर करतात. अर्थात मुलगा आणि मुलगी दोघांबरोबर समान वागणूक व वर्तन करतात. वा दोघांच्या वागणुकीत किचितही फरक करीत नाहीत. माननीय अब्दुल्लाह बिन अब्बास प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन कथित करतात की प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘ज्या माणसाला मुलगी झाली, त्याने ना तिला जिवंत पुरावे, ना तिला अपमानास्पद वागणुक द्यावी व ना तिच्यावर आपल्या पुत्रास श्रेष्ठत्व द्यावे. तेव्हा ईश्वर त्याला जन्नत (स्वर्ग) मध्ये दाखल करील.’’ (अबुदाऊद, कीताबुल अदब)
या नैतिक शिक्षणाबरोबर इस्लामने पुरुषाप्रमाणे स्त्रिच्या जीवनाच्या सुरक्षेची शिकवण दिली. आणि तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्याचा तिला अधिकार देण्यात आला. आणि यालाच इस्लामच्या भाषेत ‘कसास’ हा शब्द वापरण्यात आला. एवढेच नव्हे तर कोणी एखाद्याचा खुन केला तर मृताचे वारस खुन्याच्या बदल्यात जीव सुद्धा घेऊ शकतात. आणि हा कायदा स्त्रि व पुरुष दोघांसाठी समान आहे. दिव्य कुरआनात आहे की,
‘‘‘तौरात’ मध्ये मी (स्वयं ईश्वर) यहूदी (ज्यू) वर हा आदेश लिहीला की, प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्याच्या बदल्यात डोळा, नाकाच्या बदल्यात नाक, कानाच्या बदल्यात कान,दाताच्या बदल्यात दात आणि जखमांच्या बदल्यात त्याच्या समान (जखम) मग त्याने कीसास माफ केला असेल तर ते त्याच्या साठी प्रायश्चित्त आहे. आणि जे लोक ईश्वराने अवतरित केलेल्या कायद्याप्रमाणे निर्णय करीत नाहीत तेच अत्याचारी आहेत.’’ (सूरह-ए-बकरा : ४५)
‘तौरात’ च्या या कायद्याचे इस्लामने पुनरुज्जीवन केले व तो इस्लामी शरीयत (विधी) चा एक भाग बनला. या कायद्याने केवळ स्त्रि वरच नव्हे तर प्रत्येक दुर्बलावर होणाऱ्या अत्याचारा वर विळखा कसला व त्यांना न्याय दिला.
२) पालन पोषणाचा अधिकार
इस्लाम शिकवण देतो की प्रत्येक जन्म घेणारे मुल हे नैतिक व कायदेशीर अधिकार घेऊनच जन्मास येते. जेणेकरून त्याच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यात याव्यात व त्यास मृत्यूच्या विळख्यात जाऊ न द्यावे. त्याचे संगोपन व पालन पोषण करावे. व हे कार्य कठीण कार्य आहे. सामान्यतः मुलाचे संगोपन जेवढया काळजीने केले जाते तेवढया काळजीपूर्वकपणे मुलीचे संगोपन होत नाही. इस्लाम धर्माने ही तफावत अजिबात पसंत केली नाही. तसेच मुलीच्या पालन पोषणास विशेष प्रोत्साहन दिले. व याला एक मोठे व परम कर्तव्य घोषित केले. प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की,
‘‘कन्यादान देऊन जर ईश्वराने एखाद्या माणसाला आजमावले आणि जर त्या माणसाने आपल्या मुलींशी सद्व्यवहार केला. तर त्याचा हा मुलींप्रती सद्व्यवहार नरकाग्नी पासून बचावाचे साधन होईल.’’ (बुखारी व मुस्लिम)
प्रेषित मुहम्मद (स) यांच्या या कथनामध्ये मुलीवर ‘एहसान’ व सद्व्यवहाराचा उल्लेख आहे. ‘एहसान’ म्हणजे पालन-पोषण, शिक्षण व प्रशिक्षण व त्यांच्याशी उत्तम व्यवहार व प्रेमळ वागणूक हे सर्व काही आहे. माननीय अनस (र) यांनी प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन कथित केले की, प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘जो माणुस आपल्या दोन मुलींचे संगोपन त्या तरुण होई पर्यंत करील ‘कयामत’ च्या दिवशी (अंतीम निवाड्याच्या दिवशी) मी आणि तो असे असतील. हे सांगताना प्रेषित (स) यांनी आपली दोन बोटे जोडलीत.’’ (मुस्लिम)
याचे कायदेशीर स्वरूप पाहिल्यास लक्षात येईल की इस्लामी विधीनुसार ‘मुलांचा नान नफका’ अर्थात अन्न पाणी पुरविणे, पासून पोषण करणे या सर्व जबाबदाऱ्या पित्यावर आहेत. मग या मुलांमध्ये मुलगा असो वा मुलगी त्याच्या संगोपानात फरक करता येणार नाही किवा जबाबदारीतून कोणतेही कारण दाखवून परावृत्त होता येणार नाही. ‘रजाअत’ च्या बाबतीत कुरआनात आहे की,
‘‘मूल ज्याचे असेल (अर्थात पिता) त्याच्यावर दूध पाजणाऱ्या स्त्रिचे अन्न व वस्त्र कायद्याप्रमाणे (रीतसर) वाजिब (अनिवार्य) आहे.’’ (सूरह-ए-बकरा : २३३)
या बाबतीत इस्लामी विद्वानांनी भरपूर वर्णनात्मक माहिती उपलब्ध केली आहे. ‘हनफी’ विद्वानांनी लिहिलेत की पुत्रास अन्न पुरवण्याची जबाबदारी त्याच्या तरुणावस्थेत पोहोचण्यापर्यंत आहे. या नंतर पिता या जबाबदारीतून मुक्त होऊ शकतो. परंतु मुलगा अपंग नसावा. परंतु मुलीस अन्न पुरविण्याची जबाबदारी तिच्या तारूण्यानंतर सुद्धा (लग्नापर्यंत) जन्मदात्या पित्यावर आहे. काहींच्या मते हे की तरुणावस्थेत आल्यावर ही जबाबदारी माता व पिता या दोघांत विभागली जाते. या खर्चाच्या एकूण रकमेंपैकी दोन भाग वडीलावर आणि एक भाग आई वर असेल. अशा प्रकारे जी तरुण स्त्रि आहे परंतु तिला अन्न पाणी मिळत नाही, तिची जबाबदारी सुद्धा जवळच्या नाते वाईकावर आहे.
३) शिक्षणाचा अधिकार
मानवाचा विकास ज्ञानाशी जुळलेला आहे. जी व्यक्ती अथवा समूह विद्या व ज्ञानापासून वंचित राहील ते जीवनाच्या प्रवासात इतरांच्या तुलनेत मागे राहतील. अज्ञाना मुळे त्यांची विचारसरणी उंच भरारी घेऊ शकत नाही, तसेच भौतिक प्रगतीत ही त्याची पीछेहाट होत असते. हे सर्व काही असून सुद्धा इतिहासाचा एक मोठा काळ असा होता की स्त्रि करिता ज्ञानार्जनाची महत्वाची जाणीवच झाली नाही. ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रांत केवळ पुरुषांचीच मक्तेदारी समजली गेली. पुरुषांमध्ये सुद्धा काही विशेष वर्गच ज्ञानार्जन करीत असे. स्त्रि ज्ञानार्जनाच्या कल्पने पासून खितपत खूप दूर अज्ञानाच्या गर्ततेत चांचपडत होती.
इस्लाम ने ज्ञानार्जनाचे सर्व मार्ग स्त्रि व पुरुष दोघांकरिता उघडलेत. या मार्गातील प्रत्येक अडसर दूर करून प्रत्येक प्रकारची सवलत व सरळ पद्धती उपलब्ध करून दिली. इस्लामने विशेष करून मुलींच्या शिक्षण व प्रशिक्षणाकडे विशेष लक्ष केंद्रित कले. तिच्या शिक्षण व प्रशिक्षण कार्यास पुण्य कार्य घोषित केले. माननीय अबु सईद खदरी (र) प्रेषित मुहम्मद (स) यांचे कथन कथित करतात की प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘ज्याने तीन मुलींचे संगोपान केले, त्यांना शिक्षण दिले, त्यांचे विवाह केले, आणि लग्नानंतर सुद्धा सद-व्यवहार केला तर त्याच्यासाठी (निश्चितच) स्वर्ग आहे.’’ (अबुदाऊद)
इस्लाम धर्म स्त्रि व पुरुष दोघांना संबोधित करतो. त्याने प्रत्येक स्त्रि पुरुषास भक्ती, नैतिकता व शरीयतचे नियम यांच्या पालनाचा आदेश दिला. आणि ज्ञाना शिवाय या नियमांचे पालन शक्य नाही. स्त्री करिता पुरुषाशी संबंधाचा प्रश्न एक महत्वाचा प्रश्न आहे. हे संबंध अतिशय नाजुक व कीचकट असतात. यामध्ये स्त्रिचे अधिकार आणि जबाबदाऱ्या व कर्तव्य सुद्धा आले. आपले अधिकार मिळविणे आणि आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तिला ज्ञानार्जन करणे अत्यावश्यक आहे.
इस्लामी विद्वानांनी लिहिले की स्त्रि व पुरुष या दोघांसाठी कमीत कमी धर्माच्या मुलभूत नियमांचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. स्त्री या बाबतीत अज्ञानी असेल तर पतीचे कर्तव्य आहे की त्याने तिला याचे ज्ञान द्यावे अथवा अशी व्यवस्था करावी की तिला या बाबतीत शिक्षण मिळावे. किवा स्त्रिने स्वतःहून हे नियम शिकण्याचा व जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि हा तिचा कायदेशीर अधिकार आहे. या शिक्षणासाठी (नैतिक मर्यादांचे पालन करून) ती घराबाहेर पडू शकते. आणि पती तिच्यावर बंधन लादू शकत नाही. (या सखोल माहिती साठी माझे ‘‘इस्लामी समाजात स्त्रिचे स्थान’’ हे पुस्तक आवश्य अभ्यासावे)
या संपूर्ण गोष्टींचा परिणाम असा झाला की सुरुवातीच्या काळात ज्या प्रकारे पुरुषांत ज्ञानाचा सुकाळ झाला त्याच प्रकारे स्त्रिया सुद्धा विद्या-विभूषित झाल्या. प्रेषित मुहम्मद (स) यांच्या सवंगड्यात कुरआन व हदीस (प्रेषिताची प्रवचने) चे ज्ञान असणाऱ्या प्रगल्भ स्त्रिया मुबलक प्रमाणात पाहावयास मिळतात. दिव्य कुरआन व प्रेषित कथनाच्या प्रकाशात प्रश्न सोडविणे व समस्यांचे निराकरण करणे हे एक कठीण व विद्वत्तापूर्ण कार्य आहे. या क्षेत्रात सुद्धा स्त्रियांची विद्वत्ता वाखाणण्या जोगी आहे. या प्रगल्भ स्त्रियांमध्ये माननीय आयेशा (र) माननीय उम्मे सलमा (र), माननीय उम्मे अतिया (र), माननीय सफया (र), माननीय उम्मे हबीबा (र), माननीय अस्मा बिन्त अबु बकर (र), माननीय उम्मे शरीफा (र), माननीय फातेमा बिन्त कैस (र), माननीय खौला बिन्तनवीत (र) उल्लेखनीय आहेत.
४) विवाहाचा अधिकार
स्त्रिला ज्या प्रमाणे जीवनातील महत्वाच्या व्यवहार व प्रश्नांबाबत ‘ब्र’ काढण्याचा अधिकार नव्हता, त्याच प्रमाणे विवाहाच्या बाबतीत ही तोंड उघडण्याचा अधिकार नव्हता. तिचे आईवडील वा परिवाराची बुजुर्ग मंडळी ज्या व्यक्ती बरोबर विवाह करतील त्या विरुद्ध एकही शब्द बोलण्याचा तिला अधिकार नसे. अर्थात आई वडील व परिवाराच्या निर्णया विरुद्ध आपला अभिप्राय देणे म्हणजे अतिशय कू-कर्म, महापाप समजले जाई व समाजात तऱ्हेतऱ्हेची चर्चा करण्यात येई. आपल्या भावी जीवन सवंगड्याच्या बाबतीत मत व्यक्त करणे. आणि परिवाराच्या निश्चित केलेल्या वरास नाकारणे या बाबींना व्यभिचार समजले जात असे.
हे पण म्हटले जाते की मुलीला तिच्या पसंतीचा वर निवडण्याचा अधिकार देणे हे तिच्याच स्वार्थाच्या विरोधात आहे. ती तिच्या अज्ञानामुळे आणि कच्च्या अनुभवामुळे चुकीचा वर निवडते. मुलीचे आई-वडील आणि परिजन तिच्या पेक्षा जास्त अनुभवी आणि व्यवहार ज्ञानी असल्या कारणाने तेच मुलीच्या बाबतीत योग्य निर्णय करू शकतात. तसेच ते मुलीचे शत्रू नसून शुभचितक असतात. आणि तिच्या भल्या-बुऱ्याची त्यांना पण खूप काळजी असते. म्हणून ते तिच्या भविष्याशी कधीच दगा करू शकत नाही.
हे दाही दिशा सत्य आहे की मुलीचे पालक व परिवारजन तिच्या करिता उत्तम वर निवडू शकतात. परंतु हे पण तेवढेच सत्य आहे की कधी-कधी वर निवडण्यात आई वडीला कडून सुद्धा अन्याय होतो. ते वैयक्तिक स्वार्थ साधण्याकरिता या संबंधांचा वापर करतात. कमीत कमी हे तर नाकारताच येत नाही की वर निवडणाऱ्या पालकांच्या समोर ते आदर्श नसतातच ज्यांना मुलगी महत्व देते. या परिस्थितीत मुलीच्या विवाहाचा अधिकार पूर्णपणे पालकांना देणे बरोबर असणार नाही.
हे एक कटू सत्य आहे की, कोणत्याही स्त्रि व पुरुषांचे विवाह-बंधनात बांधले जाणे एक अति महत्वाची घटना आहे, दोघेही या घटनेपासून जीवनाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात करतात. करिता या संबंधांची प्रस्थापना दोघांच्या राजी-मर्जी ने व्हावी. ही गोष्ट कधीच योग्य होणार नाही की स्त्रिवर तिच्या आवडी विरुद्ध विवाहाचा निर्णय थोपविण्यात यावा.
इस्लाम धर्माने विवाहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास महत्व अवश्य दिले,परंतु हे पण स्पष्ट केले की तिचा विवाह तिच्या परवानगीनेच व्हावा. स्त्री विधवा किवा घटस्फोटित असल्यास स्पष्टपणे आपली मर्जी कळवील आणि कुमारिका असल्यास गप्प बसणार व यालाच तिची परवानगी समजण्यात येईल. माननीय अबु हुरैरा (र) प्रेषिताचे कथन कथीत करतात की प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘‘विधवा आणि तलाक पीडित स्त्रिचा विवाह त्यांचे मत माहिती होई पर्यंत होणार नाही. तसेच कुमारीकेचा विवाह तिच्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही.’’ (बुखारी व मुस्लिम)
यावर प्रेषित मुहम्मद (स) यांच्या तत्कालीन सोबत्यांनी विचारले की कुमारिका तर लाजत असल्यामुळे काहीच बोलणार नाही. मग तिची परवानगी कशी घ्यावी? तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले की तिचे मौन धरणेच परवानगी समजण्यात येईल. (अर्थात मौन स्वीकृती)
‘‘जर एखाद्या स्त्रिच्या पालकाने तिचा विवाह केला व त्या स्त्रिने या विवाहास मान्यता दिली नाही, तर हा विवाह ‘रद्द-बातल’ ठरणार. या बाबतीत माननीय खन्सा बिन्त खुद्दाम (र) चा विवाह तिच्या मर्जी विरुद्ध तिच्या वडिलांनी करून दिला तेव्हा प्रेषित मुहम्मद (स) यांनी हा विवाह रद्द बातल ठरविला.’’ (बुखारी)
५) मेहेरचा अधिकार
इस्लामने पुरुषाला आदेश दिला की तो ज्या स्त्रिशी विवाह करील तिला मेहेर अवश्य देण्यात यावा. कारण पती तर्फे पत्नीस मेहेर दिल्या शिवाय विवाह होत नाही. इस्लाम च्या पूर्वी अज्ञानाच्या युगात ही पत्नीला पती तर्फे मेहेर देण्याची प्रथा होती. परंतु अरब वासीयांनी स्त्रिचा हा अधिकार हिरावून घेतला होता. याचे विविध स्वरूप होते. ते या प्रमाणे,
  1. स्त्रिचा पालक या मेहेरच्या राशीला स्वतःची मिळकत समजून त्यावर स्वतःच ताबा मिळवत असे. तसे पाहता मुलगी म्हटल्यावर तिला तो स्वतःप्रती अडसर समजत. तिच्या जन्म घेण्यावरच तो छाती बदडून घेत आणि दुःख व संताप व्यक्त करीत असे. या दृष्टीकोनाने तिच्या विवाहाच्या वेळी मिळणाऱ्या मेहेरच्या संपत्तीवर हक्क बजावयाचा आणि स्त्रि जन्माच्या दुःखाची या आनंदाने परत फेड करायचा. या कारणाने तो मुलीला ‘अलनाफेजा’ (संपत्तीत वाढ करणारी) या शब्दाने संबोधित करीत असे. तसेच तिच्या जन्म घेण्यावर ‘तुमच्या करिता संपत्तीत वाढ करणारी आली’ या शब्दात शुभ कामना स्वीकार करीत असे. मेहेर मध्ये ते उंट स्वीकारित असे अर्थातच मुलीच्या विवाहासमयी उंटाची संख्या वाढून संपत्तीत वाढ व्हायची.
  2. हे सुद्धा घडत असे की पतीच्या मृत्यूनंतर त्या विधवेचा सावत्र मुलगा अथवा नातेवाईक तिच्या अंगावर चादर टाकायचा आणि म्हणायचा की, मरणाऱ्याच्या संपत्ती प्रमाणेच मी या स्त्रीचा सुद्धा वारसदार झालो. यामुळे त्या विधवा स्त्रिवर त्याचा अधिकार स्थापित व्हायचा. मग कोणी दुसरा इसम तिच्या वर दावा करू शकत नसे व स्वतः त्या विधवा स्त्रिला पण त्याच्या विरोधात काहीही करता येत नसे. जर या नवीन तथाकथित वारसास त्या विधवेशी विवाह करायचा झाल्यास पूर्वीचाच ‘मेहेर’ ग्रहित धरून लग्न लावण्यात येई व नवीन ‘मेहेर’ देण्याची गरज नसायची. अथवा कोण्या दुसऱ्या इसमाशी तिचे लग्न करून दिल्यास त्या नवीन घरोब्या पासून मिळालेल्या मेहेर वर ताबा मिळवित असे. (तफसीरे कबीर)
  3. कधी-कधी तिच्या विवशतेचा व दौर्बल्याचा फायदा उचलून अत्यल्प मेहेर देण्यात येई. माननीय आयेशा (र) सांगतात असे की एखाद्या वडिल व आई वारलेल्या अनाथ मुलीचा पालक तिच्या सौंदर्यावर आणि संपत्ती वर भाळून स्वतः तिच्याशी विवाहाचा इच्छूक असल्यास दुसऱ्याशी तिचा विवाह न करता स्वतःच लग्न करायचा आणि एवढे ‘मेहेर’ सुद्धा देत नसे जेवढे ‘मेहेर’ दुसरा इसम देण्याकरिता तयार असायचा. दिव्य कुरआनने या प्रथे वर प्रतिबंध लावला. आणि म्हटले की या अनाथ मुलींशी जर विवाह करायचा असेल तर त्यांना पूर्ण मेहेर द्या ! नसता दुसऱ्या स्त्रियांशी विवाह करा. (बुखारी)
  4. अज्ञानाच्या (अर्थात इस्लाम पूर्व) काळात मेहर नष्ट करण्याची आणखी एक शक्कल होती. तिला प्रेषित वचनात ‘शिघार’ असा शब्द वापरण्यात आला आहे. याचा अर्थ असा होतो की, एक इसम आपल्या कन्येचा विवाह दुसऱ्या इसमाशी या अटीवर करतो की त्याच्या कन्येच्या मोबदल्यात त्याला आपली मुलगी विवाह करिता द्यावी आणि या साट्या-लोट्यात दोन्ही मुलींचा ‘मेहेर’ देण्यात येत नसे.
इस्लाम धर्माने ही पदभ्रष्ट प्रथा संपुष्टात आणली. प्रेषितांचे तत्कालीन सोबती माननीय अब्दुल्लाह बिन उमर (र) यांनी सांगतिले की,
‘‘प्रेषित मुहम्मद (स) यांनी शिधारची मनाई केली आहे.’’ (बुखारी व मुस्लिम)
इमाम बुखारी यांच्या प्रेषित कथनांच्या संग्रहात विनामेहेर कन्यांच्या अदला-बदली चा उल्लेख आहे. इमाम मुस्लिम यांच्या प्रेषित कथन संग्रहास बहिणींच्या अदला बदलीचा उल्लेख आढळतो. ही दोन्ही उदाहरणे आहेत. या व्यतिरिक्त ‘इमाम नूदी’ सांगतात की ‘इस्लामी विचारवंत सहमत आहेत की त्या काळात कन्या आणि बहिणीच्या व्यतिरिक्त पुतण्या, आत्या आणि चुलत बहिणी सुद्धा या साट्यालोट्यांत बळी पडत आणि इस्लामी पंडितांनी यावर सहमती व्यक्त केली की इस्लाम पूर्व काळातील या मार्गभ्रष्ट प्रथा इस्लामने मुळापासून नष्ट केल्या आहेत. मात्र या बाबतीत वाद आहे की या प्रकारच्या विवाहाच्या बाबतीत नेमका आदेश काय आहे ?
इमाम अबूदाऊदच्या कथन संग्रहात आहे की अब्दुल्लाह बिन अब्बास यांचे सुपुत्र अब्बास यांनी त्यांच्या कन्येचा विवाह अब्दुर्रहमान बिन हकमशी केला. आणि अब्दुर्रहमान बिन हकम यांनी त्यांच्या कन्येचा विवाह अब्बास यांच्याशी केला. आणि याच साट्या-लोट्यास ‘मेहेर’ साठी पर्याय ठरविला. माननीय मावियां (र) याना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांनी (ही गोष्ट माननीय मावियांच्याशासन काळातील आहे) मदिनाचा राज्यपाल ‘मरवान’ यास पत्र पाठविले की हा विवाह संपुष्टात आणण्यास फरमान जारी करावा. कारण या प्रथेलाच अंतिम प्रेषित मुहम्मद (स) यांनी ‘शिघार’ म्हटले आहे व प्रथा कायमची बंद केली आहे.
इमाम मालिक, इमाम शाफई व इमाम अहमद बिन हम्बल या इस्लामी विद्वानांच्या दृष्टिकोनांनुसार हा विवाह रद्द-बातल आहे. परंतु इमाम अबू हनीफा आणि सुफयान ‘सूरी’ यांच्या दृष्टिकोनांनुसार, हा विवाह तर झाला परंतु मेहेर अदा न करण्याचा अपराध त्यांच्या कडून घडला. जर त्यांनी मेहेर निश्चित करून अदा केला. तर हा विवाह अबाधित राहील. (मआलिमुस्सुनन)
अशा प्रकारे इस्लाम धर्माने ‘मेहेर’ ला केवळ मात्र विवाह करणाऱ्या एकट्या स्त्रीचाच अधिकार घोषित केला आणि या अधिकारांवर होणाऱ्या संपूर्ण बाधांना समूळ नष्ट करून स्पष्ट शब्दांत आदेश दिला की,
‘‘स्त्रियांचे मेहेर आनंदाने कर्तव्य समजून अदा करा.’’ (दिव्य कुरआन सुरह-ए-निसा : ४)
धर्म-पंडित अबु बकर जस्सास यांनी याचे वर्णन अशा शब्दांत केले की,
‘‘मेहेर पत्नीची स्व-संपत्ती असून केवळ तिचाच त्यावर अधिकार आहे. आणि तिच्या पालकाचा त्यावर कोणताच अधिकार नाही.’’ (एहकामुल कुरआन २-६९)
शरीयतने (अर्थात इस्लामी विधीने) मेहेरच्या राशी वा संपत्तीची कोणतीची मर्यादा निश्चित केली नाही. ती माणसाच्या अर्थिक क्षमतेच्या प्रमाणात कमी जास्त होऊ शकते. परंतु एवढे मात्र निश्चित की कोणत्याही व्यक्ती करिता त्याच्या ऐपती नुसार ‘मेहेर’ ची अदायगी कठीण होता कामा नये. इस्लामी कायदे तज्ञांच्या दरम्यान ‘मेहेर’ च्या रकमेच्या कीमान मर्यादेबाबतीत वाद आहे. हनफई कायदे तज्ञांच्या मतानुसार मेहेरची रक्कम कमीत कमी दहा दिरहम पेक्षा कमी नसावी.
अशा प्रकारे ही बाब स्पष्ट होते की ‘मेहेर’ ची राशी कमी असो वा जास्त असो शेवटी तो केवळ मात्र स्त्रिचाच कायदेशीर अधिकार आहे. इस्लामी कायद्याच्या नुसार तिला या अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. काही वेळा ‘मेहेर’ ला स्त्रीच्या सम्माना विरुद्ध समजले जाते. आणि यावर आणखीन काही आक्षेप व हरकती आहेत. त्यावर सखोल चर्चा पुढील भागात करण्यात आली आहे.
६) नान व नफ्का चा अधिकार
लग्नापर्यंत मुलीच्या संगोपनाची जबाबदारी तिच्या पित्याची आहे. लग्नानंतर तिच्या ‘नान व नफ्क्यांची जबाबदारी पूर्णपणे तिच्या पतीची आहे. इस्लामी विधीनुसार पत्नी श्रीमंत असो अथवा गरीब तिच्या ‘नान-नफ्क्या’ ची पूर्तता करणे पतीचे परम कर्तव्य आहे. ‘हनफी फिक्ह’ मध्ये म्हटले गेले की पती आणि पत्नी जर दोघेही अर्थिक सबळ असल्यास पत्नीचा ‘नफ्का’ तिच्या आर्थिक दर्जानुसार असावा. पत्नी गरीब व पती श्रीमंत असल्यास त्यांचा ‘नफ्का’ गरीब व श्रीमंताच्या मधल्या दर्जाचा असेल. अर्थात श्रीमंता पेक्षा थोडा कमी आणि गरीबांपेक्षा थोडा जास्त असेल. परंतु जर पत्नी श्रीमंत आणि पती गरीब असल्यास पती त्याच्या आर्थिक ऐपती नुसार तिला लागणारा खर्च पुरवेल व बाकीची रक्कम त्याच्यावर कर्जाच्या स्वरूपात असेल व त्याची तो सवडीनुसार परत फेड करू शकतो.
पत्नी जर श्रीमंत असेल तर तिच्यासाठी नोकरचाकर सुद्धा पुरविण्यात यावे. पत्नी पतीच्या परिवारात किवा परिजनात किवा नातलगांसोबत राहण्यास तयार नसल्यास तिच्यासाठी वेगळ्या आवासाचा बंदोबस्त करण्यात यावा. हा तिचा वैधानिक अधिकार आहे. आणि त्या अधिकाराची पूर्तता करणे पतीचे कर्तव्य आहे.
या विषयांत हे स्पष्टीकरण करणे सुध्दा आवश्यक आहे की पतीची सेवा व घराचे काम-काज करणे पत्नी वर बंधनकारक नाही. किवा तिची जबाबदारी सुद्धा नाही. ती हे सर्व कांही करीत असल्यास तिचे ते उपकारच समजावे. परंतु पतीची सेवा व घरकाम करण्याकरिता तिच्यावर बळजबरी करता येणार नाही. (याचे तपशीलवार वर्णन हनफी फिकह मध्ये विस्तारित स्वरूपात आहे. संदर्भ - हिदाया २/४१७-४१९)
७) व्यवसाय आणि कार्य स्वातंत्र्याचा अधिकार
इस्लाम धर्माने स्त्रिला व्यवसाय आणि कार्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तिच्या करिता व्यापार, कृषी, देवाण-घेवाण, उद्योग व निर्मिती, नोकरी, ज्ञानदान, पत्रकारिता व लेखन या सर्व कार्यांची परवानगी आहे.या कार्यांसाठी ती घरा बाहेर पण जाऊ शकते. मात्र गोशा-पर्दाच्या सुरक्षेसहीत या सुरक्षात्मक बंधनांची दोन उद्दीष्टे आहेत. प्रथम हे की परिवार व्यवस्थेत कोणतीही ढवळा-ढवळ होऊ नये व त्याच्या स्थैर्यात बाधा येऊ नये. द्वितीय हे की स्त्रिने मानाने व अब्रु शाबुत ठेवून जीवन जगावे. व तिला अशा परिस्थितीत कोणी ढकलू नये की तिच्यासाठी नैतिक मर्यादा जपणे कठीण व्हावे. (या विषयावर विस्तारित वर्णनांकरिता ‘स्त्रि आणि आर्थिक समस्या’ या विषयावरील चर्चा अभ्यासावी)
८) धन संपत्तीचा अधिकार
जगातील कीती तरी राष्ट्रांमध्ये ‘स्त्री’ ला संपत्तीच्या अधिकारापासून वंचित केले. माता-पित्याच्या संपत्तीत तर तिचा वाटा नव्हताच या उलट तिने स्वतः काबाडकष्ट करून मिळविलेल्या पैशावर पती, मुले व बाप किवा इतर परिवारात किवा परिजन ताबा मिळवून फस्त करीत. इस्लाम धर्मात स्त्रिच्या मिळकतीस मान्यता देऊन तिच्या मिळकतीत ढवळा-ढवळ करण्यास प्रतिबंध करण्यात आला. तिने नैतिकरित्या कमावलेल्या संपत्ती वर ज्या प्रमाणे पुरुषांचा मिळकतीचा अधिकार आहे. त्याच प्रमाणे स्त्रिलाही हा अधिकार देण्यात आला. दिव्य कुरआनात म्हटले आहे की,
‘‘जे काही पुरुषांनी कमावले आहे त्या नुसार त्यांचा वाटा आहे आणि जे काही स्त्रियांनी कमावले आहे, त्या नुसार त्यांचा वाटा आहे.’’ (सुरह-ए-निसा : ३२)
स्त्रिला इस्लामी वैधानिक सुत्रानुसार माता-पिता पती अथवा संतती वगैरे पासून जी संपत्ती मिळते किवा तिच्या स्व प्रयत्नांनी जी संपत्ती मिळते तिच्यावर तिचा मालकी हक्क आहे. तिच्या वापराचा तिलाच पूर्ण अधिकार आहे. ती तिच्या स्वतंत्र आवडी-निवडी नुसार स्वतःवर, पती व मुलांवर, माता-पिता व परिवार जणांवर खर्च करू शकते व विधायक कार्यावर खर्च करू शकते. संपत्तीची खरेदी-विक्री व दान-धर्म चा अधिकार तिला आहे. तिच्या अधिकारांत ढवळा-ढवळ कोणीही करता कामा नये.
९) शील व अब्रू सुरक्षेचा अधिकार
मानसम्मान व अब्रू मानवाची अनमोल संपत्ती आहे. तिच्या अब्रूशी खेळ करणे वा तिचा मानभंग करण्याचा कोणालाही अधिकार नाही. स्त्रिच्या अब्रू व इज्जतीवर नेहमीच आक्रमणे होत असतात. ती तिच्या दुर्बलतेच्या कारणास्तव स्वःरक्षणात जास्त यशस्वी झालेली दिसत नाही. तिच्या वरील हल्ल्यांचे दोन स्वरूपे आहेत. प्रथम स्वरूप म्हणजे तिच्यावर व्यभिचाराचे आरोप लावून तिला मानसिक ताप देणे व दुसरे स्वरूप म्हणजे तिच्यावर लैंगिक अत्याचार करणे. इस्लाम धर्मात हे दोन्ही अपराध अति भीषण स्वरूपाचे आहेत. स्वतः प्रेषित मुहम्मद (स) यांनी माणसास जगातून नष्ट करणाऱ्या सात अपराधांपैकी एकाचा उल्लेख अशा प्रकारे केला की,
‘‘सत्शील, श्रद्धावंत आणि निरागस स्त्रियांवर आळ घेणे.’’ (मिश्कात, बुखारी व मुस्लिम)
इस्लाम धर्माने या भीषण अपराधांवर शक्तीशाली विळखा आवळला. तो अशा प्रकारे की जर कोण्या इसमाने एखाद्या स्त्रिवर व्यभिचाराचा आरोप लावला तर त्याला तब्बल ऐशी (८०) फटक्याची शिक्षा ठोठावली. व नंतर कोणत्याही प्रकरणांत त्याची साक्ष मान्य करण्यात आली नाही. कुरआनत सांगितले आहे,
‘‘आणि जे लोक मर्यादाशील स्त्रियांवर आळ घेत असतील, मग चार साक्षीदार घेऊन येत नसतील, त्यांना एेंशी फटके मारा. व त्यांच्या साक्षी कधी स्वीकारू नका, आणि ते स्वतःच अवज्ञाकारी आहेत. त्या लोकां व्यतिरिक्त जे आपल्या कर्मावर पश्चात्ताप करतील व सुधारणा घडवून आणतील. कारण ईश्वर अवश्य (त्यांच्या बाबतीत) क्षमाशील व परम दयाळू आहे.’’ (सूरह-ए-नूर : ४,५)
आता व्यभिचार आणि बलात्काराचा विषय चर्चेला घेऊया. इस्लामी विधी नुसार कोणत्याही इसमाने एखाद्या स्त्रिवर जबरी लैंगिक अत्याचार केल्यास अ-विवाहितास शंभर कोरड्यांची शिक्षा आणि विवाहितास ‘रजम’ म्हणजे समाजातील लोकांकडून त्याचा दगडाने ठेचून वध केला जाईल. तसेच स्त्रि व पुरुषाच्या राजी मर्जीने हे पातक घडल्यास दोघांना ही शिक्षा भोगावी लागेल.
१०) टीका आणि ‘जाब’ घेण्याचा अधिकार
हे खरे आहे की इस्लाम धर्माने स्त्रिला काही सामुहिक आणि राजनैतिक जबाबदाऱ्यांतून मुक्ती दिली. (या विषयावर आपण वेगळी चर्चा करूया) परंतु याचा अर्थ अजिबात असा होत नाही की ती या प्रकरणांशी बिल्कुल अलिप्त आणि सामुहिक व सामाकिड स्वार्थ व फायदे व तोट्यांशी तिला काहीच देणेघेणे नाही. दिव्य कुरआनने स्त्रि आणि पुरुष दोघांनाही ‘सत्याचा आदेश व वाईट कर्मांचा त्याग’ करण्याचा आदेश दिला. दिव्य कुरआनात ईश्वरीय आदेश आहे की,
‘‘श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया हे सर्व एक दुसऱ्यांचे मित्र आहेत. भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टींपासून रोखतात.’’ (सूरह-ए-तौबा : ७१)
‘सत्याची प्रस्थापना व दुष्कर्मांना आळा घालण्याचा विषय अतिशय विस्तृत आहे. या आदेशाच्या चौकटीत इस्लामचा प्रसार व प्रचार, समाज सुधारणेचे कार्य आणि शासनाच्या अयोग्य नीतीवर टीका व त्याचे परिक्षण हे सर्व काही आलेच. स्त्रिची जबाबदारी आहे की तिने तिच्या मर्यादा पाळून हे सर्व कार्य करावे. (याच्या तपशीलाकरिता माझे ‘मुस्लिम स्त्रीयांची जबाबदारी’ अवश्य अभ्यासावे)
इतिहासाने ठळक आणि स्पष्टपणे याची साक्ष दिली की इस्लामच्या प्रारंभी काळातील स्त्रियांनी हे कर्तव्य यशस्वीपणे व शौर्याने पार पाडले आहे.

- डॉ. मुहम्मद अहमद
   
    लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी माहिती नसल्यामुळे पैगंबर मुहम्मद (स.) आणि त्यांच्यामध्ये जो मधुर संबंध आहे त्याची लोकांना मुळीच जाणीव नाही. डॉ. मुहम्मद अहमद यांनी पैगंबर (स.) यांच्या पवित्र जीवनावर हा ग्रंथ लिहून फार मोठे कार्य केले आहे.
    या पुस्तकाच्या अध्ययनाने वाचकांना मानवतेचे उद्धारक अंतिम पैगंबर (स.) यांच्याविषयी सत्य माहिती प्राप्त होईल.

    आयएमपीटी अ.क्र. 104      -पृष्ठे - 128   मूल्य - 50                आवृत्ती - 4 (2013)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/dmxdhxc8t5u5qrgypn5kozss2mbhqqd6

हजरत अबु हुरैराह (र.) कथन करतात की, इस्लामचे अंतीम प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘व्याजखोरीच्या (व्याज घेणे-देणे) व्यवहाराचे ७० भाग आहेत. शेवटचा  महत्वपूर्ण भाग असा की, माणसाने तिच्या सख्या आईशी लग्न करावे (म्हणजे आईशी शरीरसंबंध करण्याएवढे मोठे पाप आहे.) (इब्ने माजा, हदीस क्रमांक २८२६) ह. अब्दुल्ला इब्ने  हंजला कथन करतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी फर्माविले, ‘‘व्याज म्हणून कोणी व्यक्ती मुद्दामहून एक दिरहम (एक अरब नाणं) देखील घेत असेल तर हे छत्तीस वेळा व्यभिचार  करण्यापेक्षाही जास्त गंभीर (पाप) आहे. (तिरमिजी शरीफ, हदीस क्रमांक - २८२५)

भावार्थ-
उपरोक्त दोन्ही हदीसमध्ये व्याजासंबंधी इतकी कठोर तंबी देण्यात आली आहे. मानवी समाज हा इतर प्राणी, पक्ष्यापेक्षा जास्त सभ्य समाज म्हणून ओळखला जातो. स्त्री आणि पुरुष  यांचे नाते परस्परपूरक म्हंटले जाते. ईश्वर, त्याचे प्रेषित यानंतर जगात सर्वात जास्त आदरणिय अशी कोणी व्यक्ती असेल तर ती आई. प्रेषितांनी आईच्या तळव्याखाली जन्नत  (स्वर्ग) आहे असे म्हंटले. पण वरील हदीसमध्ये व्याज खाण्यासंबंधी कठोरतम निर्भत्सना केली आहे. स्वत:च्या सख्या आईशी शरीरसंबंध ठेवणे? केवळ विचारानेच माणसाच्या काळजाचे  पाणी होते. जगातील सर्वात आदरणीय, आईशी शरीरसंबंध? शक्य नाही. पण प्रेषितांनी फर्माविले, व्याज खाणे म्हणजे आईशी शरीरसंबंध ठेवणे, इतके महापाप आहे. दुसऱ्या हदीसमध्ये  व्याज खाणे म्हणजे ३६ वेळा व्यभिचार करण्यापेक्षाही जास्त गंभीर आहे. इस्लामने व्यभिचाराला हराम ठरविले आहे.
पवित्र कुरआनने म्हंटले आहे, ‘‘व्यभिचाराच्या जवळही जाऊ नका. ही उघड अशी निर्लज्जता आहे व अतिशय वाईट मार्ग.’’ (१७:३२)
ही आयत चारित्र्यसंपन्नतेचे महत्व विषद करते. निर्लज्जतेच्या गोष्टीमध्ये व्यभिचार, कुकर्म, नग्न आणि अश्लील चित्रे (पोरनोग्राफी), प्रेमाचे चाळे करणे, शारिरीक आकर्षण निर्माण  करणारी गाणी गाणे अथवा पाहणे, चित्रपट पाहणे, स्त्रियांचे बिभत्स चाळे, नृत्ये, हावभाव या सर्व गोष्टी निलज्जतेत प्रथम क्रमांकांच्या मानल्या जातात. व्याज खाणे हे व्यभिचाराहून  जास्त गंभीर पाप आहे. सुसंस्कृत व सत्शील जीवन हे समजाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. कुरआन आणि हदीसमध्ये दर्शविलेल्या नितीनियमांचे पालन जो समाज  करेल, स्विकारेल व अंगीकारेल, तो समाज निश्चितच स्वकल्याण साधू शकेल यात संशय नाही.
व्याजाची परिणिती आर्थिक तंगीतच होते– माननिय अब्दुल्ला बिन मसऊद (र.) कथन  करतात की प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘जो मनुष्य व्याजाच्या माध्यमाने  संपत्ती गोळा करतो, त्याची परिणिती आर्थिक तंगीमध्ये होते.’’ दुसऱ्या एका हदीसमध्ये असे शब्द आहेत, ‘‘व्याजाने गोळा केलेली संपत्ती कितीही जास्त असली तरी, त्याची परिणिती  आर्थिक तंगीमध्येच होते. (हदीस : तरगीब व तरहीब)

‘मेराज’च्या दिव्य प्रवासात प्रेषित मुहम्मद(स) यांना परोक्षातील ज्या गोष्टींचे दर्शन घडविण्यात आले, त्यामुळे प्रेषित आणि त्यांच्यावर जीव ओवाळणार्या सर्वच अनुयायांत नवीन साहस आणि संकल्प निर्माण झाले. या प्रसंगी प्रेषितांना जी ईश्वरी वाणी ऐकविण्यात आली. त्यामुळे भविष्यातील वाटचालीचे मार्गदर्शन घडले. चांगुलपणा आणि सत्याच्या आंदोलनात नवीन प्रेरणा व गती निर्माण झाली.
मक्का शहरात श्रद्धा आणि नैतिकता जोपासण्याच्या संभावना संपल्याचे पाहून प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या प्रचाराची दिशा ‘तायफ’कडे वळविली. परंतु तेथे तर मक्कापेक्षाही जास्त प्रतिकूल परिस्थिती त्यांनी अनुभवली. या दोन्ही ठिकाणी नकारार्थी उत्तर मिळाल्यावर मात्र ‘यसरब’कडून अतिशय धीमा होकार प्रेषितांच्या कानी पडला की, हा प्रदेश प्रेषितांचे शहर आणि सत्यधर्माचे केंद्र बनू शकतो. येथूनच सत्य प्रकाशाची मशाल पेटून संपूर्ण विश्वातील अज्ञान, अन्याय आणि अत्याचाराचा काळाकुट्ट अंधार नष्ट होईल. येथूनच सत्यधर्माची व मानवतेची स्थापना होण्यास सुरुवात होईल आणि एका नवीन इतिहासाचा प्रारंभ होईल.
मक्का अणि तायफ जवळच होते, परंतु ते खूप दूर गेले आणि यसरब (मदीना) दूर असूनही जवळ झाले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना स्वप्नावस्थेत एका अशा ठिकाणाकडे स्थलांतर करण्याचे दिव्य संकेत मिळाले होते की, ज्या ठिकाणी हिरव्यागार खजुरींच्या बागा, पाणी आणि थंड सावली होती. परंतु हे ठिकाण अद्याप सांकेतिक होते.
मदीना शहरास हे सौभाग्य प्राप्त होण्याचे नेमके कारण असे होते की, तेथील ‘औस’ आणि ‘खजरज’ परिवाराच्या काही सज्जनांनी अगदी आनंदाने इस्लामचा स्वीकार केला होता. जणू प्रखर उष्णतेने तळपत्या वाळवंटातील तहानलेला वाटसरू दयेच्या वर्षेची वाटच पाहत होता. खरोखर ते वाटच पाहत होते. मदीना शहरात ‘ज्यू’ लोकांचा विशेष प्रभाव होता. त्यांचे वीस कबिले तेथे वास्तव्यास होते. व्याजखोरीचा धंदा असल्याने अमाप संपत्ती त्यांच्याकडे असल्याने त्यांना खूप अहंकार वाढला होता. ‘औस’ आणि ‘खजरज’ परिवारांचे ‘ज्यू’ लोकांशी तंटेबखडे होते. त्यांच्यात गृहयुद्ध सुरुच होते. विशेषतः ‘बुआस’च्या युद्धात दोन्हीकडील प्रमुख सरदार ठार झाले होते.
‘ज्यू’ लोकांमध्ये एक अत्यंत व्यभिचारी भांडवलदार होता. त्याने सर्व ‘ज्यू’ लोकांवर फरमान जारी केला की, त्याच्या प्रभावक्षेत्रात जी मुलगी विवाह करील, तिने प्रथम या भांडवलदार असलेल्या ‘फतयून’ची लैंगिक तृष्णा भागवावी आणि मगच आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करावी. संपूर्ण ‘ज्यू’ जणांनी गुपचूपपणे त्याच्या आदेशाचे पालन केले. परंतु ज्या दिवशी एका अत्याचारपीडित ‘ज्यू’ स्त्रीच्या पित्याने एका ‘मालिक बिन अजलान’ नावाच्या अरब युवकासमोर याचना केली की, ‘‘माझ्या मुलीस ‘फतयून’च्या विळख्यातून मुक्त करावे, तेव्हा ‘मालिक बिन अजलान’ला त्याच्या अश्रूंवर दया आली आणि त्याने तलवार उपसून मस्तावलेल्या ‘फतयून’कडे अगदी धावतच जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि ‘ज्यू’ लोकांना एका मस्तावलेल्या ‘ज्यू’ च्याच तावडीतून मुक्त केले. परंतु प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. ‘फतयून’च्या काही गुंडांनी ‘मतयून’चा बदला घेण्यासाठी ‘मालिक बिन अजलान’वर हल्ला केला. ‘मालिक बिन अजलान’च्या समर्थनात ‘औस’ आणि ‘खजरज’ कबिल्याचे तरूण सरसावले. दोन्हीकडून तलवारी भिडल्या. या युद्धामध्ये ‘औस’ आणि ‘खजरज’च्या अरबांनी ‘ज्यू’ लोकांना चांगलेच पछाडले. ‘ज्यू’ जमातीचे मोठमोठे सरदार यामध्ये ठार झाले. ‘ज्यू’ लोकांची शक्ती संपली.
‘ज्यू’ लोकांचा प्रभाव संपला असला तरी त्यांना त्यांच्या धर्म आणि वंशाचा अजूनही खूप फाजील अभिमान होता. त्यांच्याकडे ‘तौरात’ हा ईश्वरी ग्रंथ होता. इतर दिव्य ग्रंथांप्रमाणेच ‘तौरात’मध्येसुद्धा अंतिम प्रेषित येण्याची भविष्यवाणी होती. ‘ज्यू’ जणांना वाटत होते की, अंतिम प्रेषित ‘ज्यू’ वंशात येतील. म्हणून ते अरबवासीयांना चेतावणी देत असत की, आमच्या वंशामध्ये शेवटचे प्रेषित येणार आहेत. ते आल्यावर आम्ही तुमचा समाचार घेऊ. त्यांच्या गोष्टी ऐकून अरबांनादेखील वाटायचे की, जर अंतिम प्रेषित आलेच, तर आम्हीसुद्धा त्यांचा स्वीकार करु. अशा प्रकारे अंतिम प्रेषितांच्या येण्याची वाट सर्वचजण पाहत होते.
मदीना शहरातील पहिला युवक की, ज्याने इस्लामची मशाल हाती घेतली तो ‘सुवैद बिन सामित’ होता. तो एक महान कवी आणि महान योद्धा होता. अशाच प्रकारचे कवीमनाचे आणि शूरवीर युवक क्रांतिकारी आंदोलनाचे लढवय्ये सेवक सिद्ध होत. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) ‘तायफ’वरून परत येताना या सज्जन युवकाने त्यांची भेट येतली. आदरणीय प्रेषितांनी ‘सुवैद’ला इस्लाम धर्म स्वीकारण्याचे निमंत्रण दिले. ‘सुवैद’ पूर्वी ‘लुकमान’ या प्राचीन तत्त्वज्ञानीच्या ग्रंथाने प्रभावित होता. त्याने या ग्रंथाविषयी प्रेषितांशी चर्चा केली. प्रेषितांनी त्यास सांगितले की, माझ्याजवळ तर अथांग तत्त्वज्ञानाने भरलेला कुरआन हा ग्रंथ आहे. मग कुरआनातील काही आयती प्रेषितांनी त्याच्यासमोर सादर केल्या. कुरआनाच्या आयती ऐकून तो खूप प्रभावित झाला. त्याने तत्काळ इस्लामचा स्वीकार केला. हा युवक मदीना शहरी पोहोचताच त्यास कोणीतरी ठार केले. प्राण जाताना त्याच्या मुखावर ‘अल्लाहु अकबर’ हेच शब्द होते.
प्रेषित मुहम्मद(स) यांच्या शिकवणीने प्रभावित होणारा मदीना शहराचा दुसरा युवक हा ‘इयास बिन मुआज’ होता. हा एका प्रतिनिधी मंडळासह होता. प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेऊन सत्य धर्माची शिकवण दिली. कुरआनाच्या आयती सादर केल्या. ‘इयास’ याने प्रतिनिधी मंडळाच्या लोकांना सांगितले की, ‘‘तुम्ही ज्या कारणास्तव येथे आला आहात त्यापेक्षाही प्रेषितांची वाणी उत्तम व श्रेयस्कर आहे. मुळात हे प्रतिनिधी मंडळ ‘कुरैश’ कबिल्याच्या लोकांशी वाटाघाटी करण्यासाठी आले होते. तसेच प्रेषितांशी बोलणे अथवा भेटणे म्हणजे वाटाघाटीचे मार्ग बंद करणेच होते. मंडळप्रमुख ‘अबुल हैसर’ यांनी ‘इयास’च्या चेहर्यावर संतापाच्या भरात माती फेकून मारली व म्हणाला, ‘‘आम्ही या हेतूने येथे आलो नाही.’’ प्रमुखासमोर ‘इयास’ गप्प बसला. परंतु मनोमन त्याने इस्लामचा स्वीकार केला. परंतु ‘बुआस’च्या लढाईत हा युवकदेखील ठार झाला.
मदीना शहरात प्रेषितांच्या सत्यधर्माची चर्चा होत गेली. प्रेषितत्वाच्या अकराव्या वर्षी ‘हज’ यात्रेवर मदीना शहरातून आलेले प्रतिनिधी मंडळ ‘अकबा’ या ठिकाणी थांबले होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) रात्रीच्या वेळी तेथे पोहोचले. या प्रतिनिधी मंडळासमोर प्रेषितांनी इस्लामचा उपदेश केला. दिव्य कुरआनची शिकवण दिली. वाईट कर्माची मनाई केली आणि सत्कर्माचा उपदेश दिला. प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी प्रेषितांना अगदी पहिल्याच नजरेत ओळखले आणि आपसात कुजबुजू लागले की, ‘‘आपण ज्या प्रेषितांची वाट पाहात होतो, ते हेच प्रेषित होय.’’ हे सहाजणांचे प्रतिनिधी मंडळ होते. ईश्वराने त्यांना इस्लाम स्वीकारण्याची सद्बुद्धी दिली. त्यांच्यात या गोष्टीची आशा निर्माण झाली की, हे प्रेषित आपल्या विभिन्न कबिल्यांना संघटित करतील. या प्रतिनिधी मंडळाने प्रेषित मुहम्मद(स) यांना आश्वासन दिले की, आम्ही आपल्या धर्माचा प्रसार आमच्या समाजात करू जर ईश्वराने त्यांना संघटित केले तर त्यांची संपूर्ण शक्ती आपल्याच पाठीशी राहील आणि आपल्यापेक्षा कोणतीच व्यक्ती शक्तिशाली असणार नाही.
हे छोटेसे प्रतिनिधी मंडळ मदीना शहरी परतले आणि त्याने मदीना शहरात इस्लामचा जोरदार प्रचार केला. मदीनावासीयांच्या प्रत्येक घरात इस्लामचा संदेश त्यांनी पोहोचविला. पुढच्या वर्षी म्हणजेच प्रेषितत्वाच्या बाराव्या वर्षी बारा व्यक्तींचे प्रतिनिधी मंडळ प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडे आले आणि प्रेषितांच्या हातावर इस्लामची दीक्षा घेतली. या प्रसंगी प्रेषितांनी त्यांच्याकडून वचन घेतले की, ईश्वराबरोबर कोणासही भागीदार ठरवू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, कोणाच्याही शीलतेवर आळ घेऊ नये, कोणासही बदनाम करू नये, कोणत्याही प्रकरणात प्रेषितांची आज्ञा मोडू नये. ही ‘अकबा’ची पहिली रीतसर दीक्षा होय.
या प्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय मुसअब बिन उमैर(र) यांना इस्लामच्या प्रचारासाठी प्रचारक म्हणून नियुक्त केले. माननीय मुसअब बिन उमैर-(र) यांनी प्रेषितांच्या आदेशाप्रमाणे मदीना शहरात इस्लामचा भरपूर प्रचार केला. तसेच लोकांना नमाज पढविली.
माननीय मुसअब बिन उमैर(र) यांनी अत्यंत कौशल्यपुर्णरीत्या ‘उसैद बिन हुजैर’ आणि ‘साद बिन मुआज’ या दोन सरदारांना सत्य धर्माचे निमंत्रण दिले आणि या दोन्ही सरदारांसमवेत त्यांच्या ‘अब्दुल अशहल’ या संपूर्ण कबिल्याने इस्लामचा स्वीकार करून इस्लामच्या मानवहित आंदोलनासाठी कंबर कसली. कबिल्यातील पुरुष आणि स्त्रियांपैकी केवळ ‘उसैरम’ नावाचा एकच माणूस विभक्त राहिला. त्यानेही नंतर ‘उहुद’च्या युद्धप्रसंगी इस्लाम स्वीकारला आणि मुस्लिमांसोबत लढताना हुतात्मा झाला. आदरणीय प्रेषितांनी त्यांस स्वर्गीय होण्याची शुभवार्ता दिली.
परत ‘हज’चा मोसम आला. या वेळेस एकूण बाहत्तर पुरुष आणि स्त्रियां प्रतिनिधी मंडळात होत्या. हा काफिलासुद्धा ‘अकबा’ या ठिकाणीच थांबला. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपले काका माननीय अब्बास(र) यांना सोबत घेऊन या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. प्रतिनिधी मंडळाच्या सर्वच सदस्यांनी प्रेषितांचे मनापासून स्वागत केले आणि त्यांना ‘मदीना’ येण्याचे निमंत्रण दिले. तसेच सर्वोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले. माननीय अब्बास(र) म्हणाले की, ‘‘संपूर्ण मक्कावासी प्रेषितांच्या जीवावर उठलेले आहेत. तुम्ही प्रेषितांना पाठिबा दिला तर होणार्या परिणामांची जाणीव ठेवूनच पुढचे पाऊल उचला. कारण प्रेषित मुहम्मद(स) यांना पाठिबा देणे म्हणजेच मक्कावासीयांचा क्रोध आणि वैर ओढवून घेणे होय.’’
काही वेळापुरती वातावरणात निरव शांतता पसरली. मग प्रेषितांनी दिव्य कुरआनचा काही भाग त्यांच्यासमोर वाचला आणि क्षणार्धात वातावरण निवळले. प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी प्रेषितांना विनंती केली की, ‘हे प्रेषिता! तुम्ही मदीना शहरी वास्तव्य करावे, जेणेकरून आम्ही प्रत्यक्षात आपल्या शिकवणीचा लाभ घ्यावा.’ प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही सत्यधर्मासाठी मला पूर्ण सहकार्य करण्यास आणि माझ्या सोबत्यांचे आपल्या परिवार सदस्यांप्रमाणे समर्थन करण्यास तयार आहात काय?’’
प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी विचारले, ‘‘यात आमचा काय लाभ?’’
‘‘ईश्वराची प्रसन्नता, परलोकातील यश आणि स्वर्गाची प्राप्ती!’’ प्रेषित उत्तरले.
‘‘हे प्रेषिता! आपण आम्हास कधीच सोडू नये!’’
‘‘मी तुम्हास कधीच सोडणार नाही. माझे जीवन आणि मरण तुमच्याच सोबत असेल!’’
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे वाक्य ऐकून सर्वांनी अगदी मनापासून त्यांना वचन दिले. दीक्षाकार्य संपल्यावर प्रेषितांनी सत्य-स्थापनेच्या इस्लामी आंदोलनास्तव ‘खजरज’ कबिल्यात नऊ आणि ‘औस’ परिवारात तीन ‘नकीब’ (इस्लामी प्रतिनिधी किवा प्रमुख) नियुक्त केले. या नियुक्तीमुळे सुसंघटित समाज निर्माणकार्याची सुरुवात झाली.
आता हे मोठे प्रतिनिधी मंडळ प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडून इस्लामची नवीन प्रेरणा घेऊन ‘मदीना’ पोहोचले. इस्लामचा तीव्र गतीने प्रचार होऊ लागला. विशेषतः तरुणांना इस्लामने आकर्षित कले आणि इस्लामी आंदोलनाची शक्ती अफाट वाढत गेली.
गेल्या काही वर्षांपासून प्रेषित मुहम्मद(स) यांना मनापासून वाटत होते की, कुठेतरी स्थलांतर करून शक्ती निर्माण करावी आणि न्यायपूर्ण व्यवस्थेचा पाया रचावा. प्रेषितांनी याकरिता अॅबीसीनियाचा विचार केला. परंतु त्या ठिकाणी इस्लामी व्यवस्था लागू होणे शक्य नव्हते. ‘मदीना’ शहरातील बर्याच लोकांनी मनापासून इस्लामचा स्वीकार केल्यामुळे प्रेषितांनी याकरिता ‘मदीना’ शहर निवडले. शिवाय मुसअब बिन उमैर(र) यांच्यामार्फत मिळालेल्या मदीनाच्या सविस्तर वृत्तान्तामुळे प्रेषितांना तेथील वातावरण अनुकूल वाटू लागले. ‘अॅबीसीनिया’हून परत आलेल्यांना प्रेषित सरळ ‘मदीना’ शहरात पाठवित असत. ‘अकबा’ येथील दुसर्या इस्लामदीक्षेनंतर प्रेषितांनी बर्याच जणांना मदीना शहरी वास्तव्यास पाठविले.
‘मक्का’ येथील इस्लामद्रोही सरदारांना चांगलीच जाणीव होती की, जर ‘मदीना’ शहर इस्लामी आंदोलनाचे शक्तीकेंद्र बनले तर ते त्यांच्यासाठी अत्यंत अवघड सिद्ध होईल. कारण मक्कामधील व्यापार्यांना माल घेऊन ‘सीरिया’ला जाताना मदीनावरुनच जावे लागत असे. मदीना शहर इस्लामी आंदोलनाचे केंद्र बनल्यास मक्कावासीयांना व्यापार करणे अशक्य होईल. यासाठी मक्कावासीय मदीनास स्थलांतर करणार्यांचा छळ करीत, त्यांची संपत्ती हिसकावून घेत असत. यामुळे कित्येक वस्त्या उजाड झाल्या.

अगदी प्राचीन काळापासून स्त्रिवरील अन्याय व अत्याचाराने इतिहासाची पाने भरलेली आहेत. तिच्या अश्रू व रक्ताने इतिहासाची पाने रक्ताळलेली आहेत...
तो प्रत्येक राष्ट्र व प्रदेशात अत्याचारित व पिडत होती. ग्रीस, रोम, इजिप्त, इराक, भारत, चीन व अरब देशांत प्रत्येक ठिकाणी तिच्यावर अन्याय होत होता. बाजारात आणि उत्सवांमध्ये तिची खरेदी विक्री होत असे. जनावरापेक्षाही वाईट वर्तणूक तिच्या बरोबर करण्यात येइ असे ‘ग्रीस’ मध्ये तर बऱ्याच काळापर्यंत यावरच चर्चा होत होती की स्त्रिच्या शरीरात आत्मा आहे किवा नाही? अरबी जनता स्त्रिच्या अस्तित्वास अडसर समजत असे. काही पाषाण हृदयी तर आपल्या मुलींना जन्मताच जिवंत पुरत असत. भारता मध्ये मृतपतीच्या चितेवरच सतीच्या नावावर तिला जाळण्यात येइ असे वैराग्याच्या धर्मात स्त्रिची व्याख्या ‘‘दुष्टतेचे उगमस्थआन’’‘‘अपराध्यांचे द्वार’’ आणि ‘‘पापाची प्रतिमा’’ या अर्थाने करण्यात येत असे. तिच्याशी संबंधांना आत्मिक विकासात रोधक मानण्यात येत असे. जगाच्या बऱ्याचशा संस्कृती व समाज-व्यवस्थेत तिला स्थान नव्हते. तिला अतिशय क्षूद्र व कीरकोळ समजले जात होते. तिला आर्थिक राकडीय अधिकार नव्हते. स्वंतत्ररित्या व्यवहाराचा तिला हक्कच नव्हता. ती सुरवातीस पित्याच्या, नंतर पतीच्या व त्यानंतर पोटच्या मुलाच्या ताब्यात जीवन जगत असे. त्यांच्या विरोधात ‘ब्र’ काढण्याची तिला कधीच परवानगी नसे. एवढेच नव्हे तर तिच्यावर होत असलेल्या अन्यायाची दखल कधीच घेतली जात नसे व न्याय मागण्याची कल्पना करण्याचा अधिकार पण तिला नसे.
यात पण शंका नाही की कधी-कधी स्त्रिच्या हातात संपूर्ण शासन असे. व असेही घडले की शासन व साम्राज्य तिच्या इशाऱ्यावर नाचत असे. बहुतेक वेळा हे पण दिसते की कुटुंब व कबिल्यावर तिचे प्रभुत्व असायचे. काही असंस्कृत समाजात स्त्रिला पुरुषावर एक प्रकारे प्रभुत्व असायचे. व तीच स्वामित्व गाजवायची आणि आज सुद्धा काही ठिकाणी ही परिस्थिती आहे. परंतु हे सर्व काही असून देखील स्त्रि-जातीच्या दर्जात्मक अवस्थेत काही विशेष फरक आढळत नाही. ती अत्याचारित व पिडीतच होती व आज ही आहेच. तसेच तिच्या अधिकारावर गदा आणण्याची मालिका अद्याप चालूच आहे.
इस्लाम धर्माने स्त्रिला अन्याय व अत्याचाराच्या गर्तेतून बाहेर काढले. तिला न्याय दिला. तिला मानवाधिकार दिले. मान सम्मान दिला आणि समाजास तिला सन्मानाने जगण्याचा शिकवण दिली. परंतु पश्चिमी राष्ट्रे, जे इस्लामच्या कृपाशील छत्र-छायेत येऊ शकली नाहीत, व त्याच्या वरदान व मधुर फळांपासून वंचित राहिली. परिणामस्वरूप त्यांच्यात महिलाधिकारांची पायमल्ली झाली. व ‘स्त्री’ प्रत्येक अत्याचार मुकाट्याने सहन करीत राहिली. वर्तमान काळात या राष्ट्रांमध्ये याची प्रतिक्रिया उमटली ती स्त्री-स्वातंत्र्य व समानतेच्या कल्पनेच्या स्वरूपात. तिच्या पुरस्कारात सिद्धांत उभे करण्यात आले व हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला की स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा किचितही कमी नाही. दोघे सुद्धा प्रत्येक बाबतीत एक दुसऱ्याशी समान आहेत. या दोघांत कोणत्याही प्रकारचा फरक करणे वा विषमता बाळगणे योग्य नाही. ती प्रत्येक काम सुरळीत पार पाडू शकते. प्रत्येक जबाबदारी पार पाडण्यास सक्षम आहे. तसेच हर प्रकारे स्वतंत्र आणि स्वावलंबी आहे. करिता पुरुषाचे प्रभुत्व तिच्यावरून संपावयासच हवे आणि तिला तिचे संपूर्ण अधिकार मिळायला पाहिजेत जे पुरुषांना मिळतात.
ही कल्पनाच मुळात स्त्रि हृदयास भुरळ पाडणारी होती. तिने झपाट्याने ही कल्पना हृदयाशी कवटाळली जणू तिची हरवलेली संपत्तीच तिला परत मिळाली आणि हळूहळू ती आर्थिक, सामाकिड व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यात पुरुषांबरोबर सामिल होत गेली. ती कारखान्यांत, कार्यालयात, शैक्षणिक संस्थांत पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रयत्नशील असायची, तसेच पार्क, क्लब, घर व मनोरंजनालयात त्याच्या बरोबर क्रीडा व मनोरंजनात भाग घ्यायची. तिचे अस्तित्व प्रत्येक जीवन-क्षेत्रात अवश्य समजले गेले. तिच्या शिवाय व्यवहारिक जीवन नीरस व उदास वाटू लागले. स्त्रिला हा ‘विकासाचा’ मार्ग वाटू लागला आणि एका नंतर दुसरे पाऊल पटापट उचलत ती या मोहिनीस बळी पडत गेली. ती या जीवन-कल्पनेच्या दर्शनीय सौंदर्यावर मोहित झाली. परंतु त्याच्या आत दडलेल्या अंधकारमय धोक्यापासून अज्ञानीच राहिली. पाश्चात्य विचार सरणीने स्त्रिला स्वातंत्र्याची कल्पना प्रस्तुत केली. या कल्पनेच्या काही बाजू लाभकारी होत्या. परंतु काही बाजू तिच्या साठी घातक व विनाशक होत्या. यामध्ये एकीकडे स्त्रिला पुरुषांच्या अत्याचारांतून मुक्ती देण्यात आली, तर दुसरीकडे तिची शक्ती व कार्यक्षमता, स्वभाव व मानसिकतेची अजिबात गय केली नाही. वास्तविक पाहता पुरुषी अत्याचारा विरुद्ध ही तीव्र प्रतिक्रियाच होती. या मध्ये त्या संपूर्ण विषमता होत्या ज्या अशा प्रकारच्या प्रतिक्रियांच्या स्वरूपात परिणामतः आढळतात.
स्त्रिच्या या स्वैर स्वातंत्र्यामुळे पाश्चात्यांचे संपूर्ण जीवन चुकीच्या मार्गी लागले व परिणाम स्वरूप परिस्थिती अगदी स्फोटक व आवाक्या बाहेर गेली. अशा अगदी नाजुक व कठीण परिस्थितीत इस्लाम आपले मार्गदर्शन करतो. तो स्त्रिचे मूलभूत अधिकारही प्रदान करतो व तिच्या विकासाची जबाबदारीही स्वीकारतो. तसेच समाजास या स्फोटक परिणामापासून सुरक्षिततेची हमी देतो. या बाबतीत काही सामाकिड व राकडीय परिणामांचा आढावा घेण्यात येत आहे.
लैंगिक स्वैराचार
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री-पुरुषांच्या स्वैर व स्वतंत्र देवाण घेवाणी मुळे लैंगिक स्वैराचाराची मानसिकता बळावली आहे. या स्वैराचाराने सार्वजनिक रूप धारण केले. मग याच्याच मुळावर एका नग्न-विवस्त्र आणि निर्लज्ज संस्कृतीने जन्म घेतला की तिच्या विषारी प्रभावाने नैतिकतेची फुलबाग जळून भस्म झाली. आज लाज व शरम आणि प्रामाणिकता टाहो फोडत राहिली आहे.
इतिहासाने प्रत्यक्ष अनुभवले की जेंव्हा जेंव्हा स्त्रिने आपले घर सोडून चार चौघांत आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन केले, तेव्हा तेव्हा लैंगिक स्वैराचाराने उग्र स्वरुप धारण केले. जी क्लिष्टता चार भितीच्या आत असहनीय असते ती मार्केट-बाजारात व सार्वजनिक ठिकाणी उफाळत गेली. अतिशय पवित्र नाते सुद्धा या आगीत होरपळून निघालेत. सर्व सामान्य माणुस तर सोडाच त्यांचे पूजनीय स्थान असलेले महाभाग सुद्धा आणि देवी-देवता सुद्धा यामध्ये गुरफटलेले आढळलेत. व त्यांच्या लैंगिक दंत-कथा ऐकून लाज व शरमेने पार टाहो फोडला. रखेली आणि वारांगणांना ते स्थान प्राप्त झाले जे घरातील अगदी सावित्री सम स्त्रियांना मिळावयास हवे होते. कला आणि संस्कृतीतून लैंगिक व कामुक भावना व्यक्त होऊ लागल्यात. नग्न छाया-चित्रे काढण्यात येऊ लागली व नग्न मूर्त्या तयार होत गेल्या. नाच आणि संगीताच्या नावावर स्त्रिपासून रस घेण्यात येऊ लागला. कथा, नाटक, वांडःमय, काव्य आणि साहित्याच्या माध्यमाने लैंगिक कार्याचे वर्णन होऊ लागले. स्त्रि ही पुरुषाच्या हातातील बाहुली बनली. व या साऱ्या उचापतींचा फक्त एकच उद्देश की पुरुषांची लैंगिक तृष्णा भागविणे होय. अर्थात पूर्ण संस्कृतीतूनच लैंगिक वासना व्यक्त होत गेली व या वासनेच्या तालावर नाचू लागली. लैंगिक भावनांच्या या क्रूर साम्राज्याने ग्रीस, रोम, इजिप्त व इतर कीतीतरी प्राचीन संस्कृती नष्ट केल्यात. नव-संस्कृती सुद्धा याच वाटेवर चालू लागली आहे. कदाचित ती वेळ जवळ येऊन ठेपली आहे, जेव्हा हे तेज लोप पावून एका नवीन संस्कृतीस जन्म देईल.
कुटुंब विघटन
कौटुंबिक व्यवस्था स्त्रिच्या मुळावरच आधारलेली होती. त्याच्या अंतर्गत व्यवस्थेस तीच सांभाळत होती. स्त्रिच्या घराबाहेरील व्यवहारामुळे तिची घरातील व्यवस्था पार कोलमडली. तिने घराबाहेर जे काही केले त्याची भक्कम व मोठी किमत तिला परिवार विघटनाच्या स्वरूपात चुकवावी लागली. परिवार ही संपूर्ण समाजाची मूळ आधारशीला आहे. या आधारशीलेच्या सरकण्यामुळे पूर्ण समाजाची इमारत कोलमडून पडली. स्त्रि पुरुषा करिता शांतीचे साधन होती. परंतु आता ती अशी राहिलेली नाही. त्यांच्या दरम्यान प्रेम व सहानुभुतीचे व जिव्हाळ्यांचे संबंध होते. ज्यामुळे जीवनाच्या उतार चढावावर ते एक दुसऱ्यांच्या बरोबर होते. परंतु आता या भावना दुभंगल्या आहेत. माता-पिता व त्यांच्या संततींचे नाते दुभंगले आहेत. पुत्रांसाठी माता पिता प्रेमाचे केंद्र बिदू आहेत. परंतु या ममत्वास ते मुकले असून आईच्या प्रेमळ कुशी ऐवजी नर्सींग हाऊस मध्ये कैद झालेत. माता-पित्यांच्या वृद्धत्वाची काठी त्यांची मुले असतात. परंतु ही काठी कधीची त्यांच्या हातातून सुटली. आणि ते या म्हातारपणात यातनामय जीवन जगण्यास विवश झाले आहेत. एवढेच नव्हे तर स्त्रिच्या घर सोडल्यामुळे परिवाराचे संपूर्ण संबंध दुभंगले, जे त्याचे अस्तित्व अबाधित ठेवण्याकरिता आवश्यक असतात. आणि परिणामतः मानव सुखी व शांततामय जीवनास मुकला. परिवार दुभंगणे म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. हे नुकसान इतके प्रचंड आहे की कोणताच समाज जास्त काळापर्यंत सहन करू शकत नाही. शेवटी हे नुकसान समाजाला नष्ट करण्याच्या मार्गावर आहे.
इस्लाम स्थिर परिवारास समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक समजतो. कारण की परिवाराच्या मुळावरच समाज उभारलेला आहे. परिवाराचे स्थैर्य म्हणजेच समाजाचे स्थैर्य आणि परिवाराचे विघटन म्हणजेच समाजाचे विघटन असे समीकरण इस्लामने मांडले आहे. इस्लाम परिवाराच्या उभारणी करिता अतिशय भक्कम पाया उपलब्ध करतो. तसेच त्याच्या स्थैर्यास अबाधित ठेवणाऱ्या साधन सामग्री सुद्धा पुरवितो. याची एक संपूर्ण व्यवस्थाच त्याने प्रस्थापित केली आहे. व त्याचा तपशील देऊन त्याचे पूर्ण सुत्र आणि मर्यादा निश्चित केल्या आहेत. तो याचा पूर्ण आग्रह करतो की, ही व्यवस्था अबाधित ठेवून ईश्वराने निश्चित केलेल्या मर्यादांना सांभाळण्यात यावे. या विशेष व्यवस्थेत स्त्रिलाच मुलभूत महत्व आहे. व तिची निर्माण कार्यात महत्वाची भुमिका आहे. या मध्ये तिचे अधिकार व कर्तव्ये सुद्धा आहेत. तिने या कर्तव्यापासून दूर होऊन एकाग्रतेने जबाबदाऱ्या न सांभाळल्यास ही व्यवस्था पार कोलमडून जाईल. ही व्यवस्था केवळ स्त्रिच्या आटोकाट प्रयत्न आणि लक्ष केंद्रीकरणामुळेच अबाधित व सुरक्षित राहू शकते.
अधिकार व जबाबदाऱ्या मधील असमतोल
स्त्रीचे अधिकार व जबाबदाऱ्या मधील प्रमाण बिघडले व त्या मधील असणारी समानता संपली. स्त्रिचा शारिरीक व मानसिक विकास सृष्टी अशारितीने करते की तिला मातृत्व लाभून तिच्या कुशीत मानव जातीचे पालन व्हावे. या करिता आवश्यक असलेल्या भावना आणि जाणीवा आणि शक्ति व उर्जा व कार्यक्षमता, नैसर्गिकरित्या तिला मिळते. म्हणूनच प्रत्यक्षात स्वभावतः तिच्या मानसिकतेत नैसर्गिक गरजांच्या पूर्ततेची असामान्य कार्यक्षमता असते. परंतु माता बनून मानवजातीचा विकास म्हणजे क्षणिक व तात्पुरते कार्य नाही. तर तो एक कठीण व अवघड मार्ग आहे. या मध्ये गरोदरपण, जन्मदान, मुलाचे पालनपोषन व त्याचे शिक्षण व प्रशिक्षण आलेच आहे. या संपूर्ण कार्य मालिकेत पुरुष हा काही कार्यात तिच्या बरोबर असतो व अप्रत्यक्षरित्या सहकार्य सुद्धा करतो. परंतु प्रत्यक्षरित्या जबाबदाऱ्या सांभाळ्ण्यास असमर्थ असतो. मग ही संपूर्ण जबाबदारी एकटी स्त्रिच सांभाळते. या कार्यात तिच्या उर्जेचा आणि कार्य क्षमतेचा मोठा भाग खर्च होतो. मग एवढे काही असताना तिच्यावर सामाकिड आणि आर्थिक जबाबदाऱ्या सोपविणे म्हणजे तिच्यावर घोर अन्यायच होईल. करिता सामाकिड व आर्थिक जबाबदाऱ्या सोपविण्याकरिता हे आवश्यक आहे. की, स्त्रिला तिच्या मातृत्वाच्या व कुटुंब पालण पोषण व परिवार उभारणीच्या जबाबदाऱ्या ज्या निसर्गतःच पार पाडण्याची कार्यक्षमता तिच्यात आहे. यापासून मुक्ति देऊ नये. स्त्रि जेव्हा निसर्गतःच स्त्रि आहे व तिच्या पवित्र भावना व तिची उत्तम कार्यक्षमतांची मानवजातीच्या पोषणाला आवश्यकता आहे तेव्हा ही तिची नैसर्गिक जबाबदारी तिच्यावर असणारच कोणत्याही अनैसर्गिक वा कृत्रीमरितीने तिला परावृत्त ही करता येणार नाही अथवा कोणताच बदल ही करता येत नाही.
या बाबतीत ‘इस्लाम धर्म’ अत्यंत समान व समतोल दृष्टिकोण प्रस्तुत करतो. इस्लामने स्त्रिला ते संपूर्ण अर्थिक, सामाकिड व राजनितिक अधिकार प्रदान केले आहेत जे पुरुषाला प्रदान केले आहेत. मात्र तिला काही जबाबदाऱ्यातून अलिप्त ठेवण्यात आले आहे की, ज्या तिच्या स्वभाव आणि शारिरीक स्वरूपाशी विसंगत आहेत. व या जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्यामुळे ती तिच्या नैसर्गिक जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही. उदाहरणार्थ इस्लामी राष्ट्राचा शासक पुरुषच होऊ शकतो. तसेच राष्ट्र सुरक्षेची जबाबदारी सुद्धा प्रत्यक्षात त्याच्यावरच आहे. अर्थातच या अवघड जबाबदाऱ्या तिच्या वर टाकण्यात आलेल्या नाहीत. परंतु तिला इतर सर्व राकडीय अधिकार दिलेले आहे. ती राकडारणात मत आणि अभिप्राय देऊ शकते. टीका करू शकते व खरपूस समाचार सुद्धा घेऊ शकते. ती राज्याच्या अधिकाऱ्यास तसेच शासनकर्त्यास सर्वा समक्ष अंकुश लावू शकते. तिचे हे अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणखी एक उदाहरण देता येईल. ते असे की, स्त्रिवर कोणतीही आर्थिक जबाबदारी लादलेली नाही. परंतु तिला अर्थार्जनाचा अधिकार अवश्य देण्यात आलेला आहे. ती इस्लामने निश्चित केलेल्या मर्यादांच्या आंत राहून अर्थार्जनाचे प्रयत्न करू शकते.
इस्लाम धर्माने पुरुषावर ज्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत त्यांच्या पुर्ततेकरिता त्यांना काही अतिरिक्त अधिकार सुद्धा देण्यात आले आहेत. परंतु या बाबतीत न्यायपूर्ती व स्त्रीवरील अन्याय न होण्याकडे पूर्ण लक्षसुद्धा दिले आहे. या हेतू पूर्तीकरिता इस्लामने एकीकडे पुरुषांवर कायदेशीर बंधने लावलीत की, जेणेकरून त्याला त्याच्या अधिकारांचा दुरुपयोग करता येऊ नये. व दुसरीकडे स्त्रिचे अधिकार सुरक्षित ठेवून त्यांची पायमल्ली करण्याची कोणत्याही परिस्थितीत परवानगी देण्यात आलेली नाही. परिवारामध्ये पुरुषच स्वामी व काळजी वाहक आहे. परंतु कायदेशीररित्या तो स्त्रिवर कसलाही अन्याय करू शकत नाही. जेव्हा त्याच्या कडून स्त्रिवर अन्याय व अत्याचार होईल, कायदा त्याला तावडीत घेण्यास सज्ज असणार. एवढेच नव्हे तर राष्ट्राचा शासनकर्ता सुद्धा तिच्या जीवन, संपत्ती, मान व अब्रु व इतर वैयक्तिक वा सामुहिक अधिकारांवर गदा आणू शकत नाही. नसता तो कायद्या समोर एक सामान्य अपराध्याप्रमाणे उत्तरदायी असेल.
स्त्रिच्या प्रती सहानुभूतीच्या भावनेत कमतरता
शेवटची बाब म्हणजे पुरुषाने स्त्रिवर निःसंशय मोठे अन्याय केले आहेत. परंतु याच बरोबर त्याच्यामध्ये स्त्रि विषयी प्रेम, सहानुभूतीची एक नैसर्गिक भावना सुद्धा आहे. इस्लाम धर्म नेमक्या याच भावनांना प्रेरित करून त्यांना खत पाणी घालतो. तो पुरुषाला या गोष्टीची प्रेरणा देतो की स्त्रीच्या कायदेशीर अधिकारांची पूर्तता करण्याबरोबरच तिच्या बरोबर सहानुभूती व प्रेमपूर्वक व्यवहार करण्यात यावा. ती सद्वर्तनास पात्र आहे. व पुरुषांच्या प्रेमळ वर्तनावर तिचा हक्क आहे. करिता तिला तो मिळालाच पाहिजे. या प्रेमळ भावनांचे स्त्रि पुरुष संबंधात केंद्रीय महत्व आहे. वर्तमान काळात स्त्रि-पुरुषां दरम्यान अधिकारांच्या हस्तगत करण्याच्या स्पर्धेने या भावनां नष्ट केल्या आहेत. कधी-कधी तर मनात असा विचार स्पर्श करून जातो की कदाचित ही पवित्र भावना पूर्णतः नष्ट झाली आहे, व त्यामुळे स्त्रिचे अतोनात व प्रचंड नुकसान झाले आहे. कारण की सोनेरी शब्दांत लिहीला गेलेला कायदा सुद्धा तिच्या समस्यांचे समाधान करू शकत नाही. याचाच परिणाम असा झाला की, स्त्री व पुरुषा दरम्यान समानतेचा डंका तर वाजविला जात आहे परंतु वास्तविक समानतेचा लवलेषही दिसत नाही. कायद्याने तिला जे सामाकिड, आर्थिक व राकडीय अधिकार दिले आहेत, त्या पासून ती पूर्णतः वंचित आहे. आणि काही ठिकाणी तर तिच्यावरील होणाऱ्या अत्याचाराने परिसीमाच ओलांडली आहे. पुरुषी तहान भागविण्यासाठी तिची खरेदी विक्री सुद्धा होत आहे. तिच्यावर आणि तिच्या प्राण व संपत्ती वर हल्ले होत आहेत. आणि तिची अब्रू बेधडक व बेदरकारपणे लुटली जात आहे. असे वाटते की पावलोपावली तिच्यावर होणाऱ्या नवीन-नवीन हल्ल्यांचा सामना करणे अति कठीण काम होऊन बसले आहे.
वस्तुस्थिती अशी आहे की, एखाद्या अबलेचे अधिकार मान्य केल्या नंतर सुद्धा ते अधिकार तिला मिळणे सोपे नाही. स्त्री भांडूण सुद्धा तिचे अधिकार प्राप्त करू शकत नाही. ते अधिकार केवळ अशाचपरिस्थितीत तिला मिळू शकतात जेव्हा पुरुष तिला ते देऊ इच्छितो. या करिता हे अति अवश्यक आहे की त्यांनी त्यांच्या अंतःकरणात तिच्या विषयी प्रेम व सहानुभुतीची भावना बाळगावी आणि तिच्यावर होणाऱ्या अत्याचारास अक्षम्य अपराध समजावे. इस्लाम धर्माने या बाबतीत अद्वितीय व अविस्मरणीय यश संपादन केले आहे. इतिहासाच्या या प्रयोगाचे जेव्हा पुनरावलोकन होईल तेव्हा समाजामध्ये परत एकदा चैतन्य येईल जे जगाने या पूर्वी अनुभवले आहे.

- सय्यद अबुल आला मौदूदी
   
    या पुस्तिकेत मौलाना साहेबांचे दोन लेख आले आहेत, एकेश्वरत्व आणि अनेकेश्वरत्व या विषयावर विचार मांडले आहेत. या वर्णनाने वाचकास एकेश्वरत्व आणि अनेकेश्वरत्वातील फरक कळतो आणि त्या दोहोंतील वैशिष्ट्ये लक्षात येतात.
    एकेश्वरत्व किती सार्थक व अनेकेश्वरत्व किती भयानक व दुष्परिणामी आहे. आणि एकेश्वरत्व किती प्रकाशमय असून अनेकेश्वरत्व किती अंधकारमय आहे याचा अनुभव येतो. अनेकेश्वरत्वाने किती नीतिहीन समाज निर्मिती होते आणि एकेश्वरत्वामुळे पवित्र व सुंदर समाज नव-निर्माण होते, हे उघड होते.

    आयएमपीटी अ.क्र. 102     -पृष्ठे - 16     मूल्य - 10               आवृत्ती - 4 (2013)
डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/cqlogb0ugyp2pdhhrm3oi367btu9nbg7

जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या दिनाची खरी सुरूवात स्त्रियांविषयीच्या सामुहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. त्यावेळी तयार कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रिया व मुले यांना काम भरपूर पण मजूरी कमी असे प्रमाण होते. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये महिलांनी याविरूद्ध लढा पुकारला. जगाच्या इतिहासात स्त्रियांनी संघटित होवून स्वतःचे अधिकार मागण्यासाठी केलेला हा पहिला संघर्ष मानला जातो.
    1908 साली विविध देशांमधील महिला प्रतिनिधीसह कार्यकर्ती्नलारा झेटगी हिने सुचविल्याप्रमाणे 8 मार्च या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून मान्यता मिळाली. भारतात मुंबईमध्ये 8 मार्च 1943 ला पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.
    सामान्यतः प्रत्येक समाजात स्त्रियांना हीन समजले जात असे. त्यांचा अपमान केला जात असे आणि तèहेतèहेच्या अत्याचारांचे त्यांना लक्ष्य बनविले जात असे. भारतीय समाजात, पतीचा मृत्यू झाल्यास पतीच्या प्रेताबरोबर पत्नीला सुद्धा जीवंत जाळले जात असे. चीन मधील स्त्रिच्या पायात आखूड लोखंडी बूट घातले जात असत. अरबस्तानात मुलींना जीवंत पुरले जात असे.
    इतिहास साक्षी आहे की या अत्याचाराविरूद्ध आवाज उठविणारे सुधारक अलिकडच्या युगात जन्मले आहेत. परंतु, या सर्व सुधारकांपूर्वी शेकडो वर्षे अरबस्तानात पैगंबर मुहम्मद सल्ल. हे स्त्रियांचे मोठे हितचिंतक असल्याचे दिसते व ते स्त्रियांवर केल्या जाणाऱ्या अत्याचाराचा बिमोड करतात.  स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे पण सत्य काही वेगळेच आहे. स्त्री जन्मा तुझी ही कहानी हृदयी अमृत नयनी पाणी.
    21 व्या शतकात आधुनिकतेचे वारे वाहत असताना आजही स्त्रियांचे हुंडाबळी जातात, लैंगिक छळ व अत्याचार केला जातो. त्यांना हीन वागणूक दिली जाते. लिंग तपासणी करून स्त्री जन्माला येण्याअगोदर कोवळा जीव गर्भात मारला जातो. तेव्हा वाटते कोवळी कळी खुडण्याचा अधिकार समाजाला दिला कुणी?
    अल्लाहचे अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे या जगात जेव्हा आगमन झाले तेव्हा देखील मुलींना ओझे समजले जात होते. त्या लोकांना नेहमीच ही आशंका राहत असे की, योग्य स्थळ न मिळाल्यास त्यांना आपल्या मुली इतर टोळीमध्ये द्याव्या लागतील. ही देखील एक आशंका सदैव असे की, लुटारू त्यांना पकडून नेऊन दासी बनवून ठेवतील. या सर्व कारणांमुळे ज्या घरी मुलगी जन्माला येत असे, त्याचा चेहराच उतरून जात असे. (आणि आताच्या काळामध्ये सुद्धा काही प्रमाणात हीच परिस्थिती आहे).  ‘‘आणि त्यापैकी एखादयाला जेव्हा मुलीच्या जन्माची खुषखबर देण्यात येते. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळीमा पसरते व तो तो र्नतासमान घोट गिळून बसतो. लोकांच्यपासून लपत-छपत फिरतो की या वाईट बातमीनंतर काय तोंड दाखवावयाचे, विचार करतो की  अपमानित होऊन मुलीला घेऊन रहावे अथवा मातीत पुरावे? पहा, कसे वाईट निर्णय आहेत. (कुरआन : सुरह 16ः 58,59)
    स्वतःला प्रगत समजणारा वर्ग तर इतका निर्दयी आहे की, शिशुच्या जन्माची देखील वाट पहात नाही. गर्भावस्थेतच स्कॅनिंग करून मुलगा की मुलगी हे पाहिले जाते. मुलगी असेल तर गर्भपातच होतो. याचसाठी 1994 मध्ये एक कायदा बनविला गेला होता. छशींरश्र ऊळरसपेीींळल ढशलहपर्ळिींश ठशर्सीश्ररींळेप रपव झीर्शींशपींळेपेष चर्ळीीीश अलीं. या कायद्यान्वये गर्भलिंग निदान गुन्हा ठरविला गेला असून, देखील दरवर्षी 5 ते 8 लाख मुलींची गर्भामध्येच हत्या केली जाते.
     इस्लाम भ्रूणहत्येला घोर अपराध ठरवितो व याला थोपविण्यासाठी विविध मार्ग चोखाळतो. ज्या-ज्या कारणांमुळे अथवा आशंकामुळे भ्रूणहत्या केली जाते, त्यांनाच इस्लाम दूर करतो. इस्लामनुसार मुलगी ही अहोभाग्य, शालिनता व कल्याणपद आहे. तिच्या पालनपोषणाची व उत्तम प्रशिक्षणाची शिकवण तो देतो. सामाजिक पातळीवर हे उत्तम प्रद सिद्ध झाले आहे.’’आणि जेव्हा जिवंत गाडल्या गेलेल्या मुीला विचारले जाईल ती कुठल्या अपराधापायी ठार केली गेली? (कुरआन 81ः 8,9)
    देशातील कित्येक राज्यामध्ये मुलां-मुलींच्या जन्मदरात खूपच तफावत आहे. विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली व हिमाचल प्रदेशमध्ये. या राज्यांमध्ये 1000 मुलामागे 800 मुली आहेत. 1991 च्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये 1000 मुलांमागे 875 मुली होत्या आणि 2009 मध्ये ती तफावत 793 वर पोहोचली. ज्या समाजामध्ये इतके मुलींचे अधिकार नाकारले जातात अथवा त्यांना कनिष्ठ समजले जाते त्या ठिकाणी मुलींची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांना वर उचलण्याकरिता या शिकवणीची गरज आहे. तरीही आज भारतीय स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगती पथावर आहे.
    शेतातील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत तिची यशस्वी घौडदौड चालू आहे. ती शिक्षिका, डॉ्नटर, ग्रामसेविका, सरपंच, तलाठी, जिल्हाधिकारी पोलीस निरीक्षक, पायलट, ड्रायव्हर, खेळाडू अशा एक ना अनेक क्षेत्रात आपली यशस्वी भूमिका बजावत आहे. सलाम या नारी श्नतीला.  जगाने स्त्रीला अबला असे गोंडस नाव दिले आहे. ती अबला नसून सबला आहे. महिला आज खरच स्वतंत्र सक्षम झाली आहे का? हा प्रश्न समाजाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो हे ही तितकेच खरे आहे.
    कालामानाप्रमाणे मुली शाळा, कॉलेजात, शिकत आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहेत. त्या स्वतःची ओळख निर्माण करीत आहेत.आजची स्त्री आता पेटून उठली आहे. तिला तिच्या हक्काची जाणीव झाली आहे. खरंच ती स्वतंत्र आहे? असा प्रश्न पडतोच.  बालिकेपासून ते वृद्धेवर ही अत्याचार होताना दिसतात. गर्दीत, समाजात, शाळेत, नातेवाईकात आज एकटी स्त्री असेल तर ती खरोखरच सुरक्षित आहे का? तर नाही हेच उत्तर येईल. ही परिस्थिती खेड्या, पाड्यापासून मोठ्या शहरापर्यंत एकच आहे. मला वाटते महिलांपुढे अनेक आव्हाने आहेत सर्वात जास्त आहे ते म्हणजे तिची सुरक्षितता, तिचे आरोग्य आणि घरगुती हक्क.
    निरोगी, हसतमुख आणि शांत स्त्री घराचे वैभव असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्त्रियांनी स्वतः आत्मपरिक्षण करून स्वतःमधील न्युनतेची भावना कमी करावी, अंग प्रदर्शन न करता आपल्या क्षेत्रात कष्टाने जिद्दीने उत्तूंग गरूड झेप घ्यावी, शिक्षणाची कास सोडू नये स्वतःचे आरोग्य जपावे. पुढची पिढी सुसंस्कारित घडावी म्हणून प्रत्येक आईने मुलीच्या मागे खंबीरपणे उभे रहावे. हुंडाविरोधात, स्त्री भ्रुणहत्या विरोधात मोठे पाऊल उचलावे, नवीन काहीतरी निर्माण करावे, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण व्हावे, मनाशी खरे रहावे.
दर्या की कसम मौजों की कसम ये ताना, बाना बदलेगा, तु खुद को बदल के देख जरा तब ही जमाना बदलेगा
    इस्लामने स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व मानले आहे. तिच्या हक्काचा व अधिकाराचा विचार फक्त एका दिवसापुरता किंवा एका वर्षापूरता केलेला नसून तिच्या संपूर्ण जीवनालाच इस्लामने सुरक्षित केले आहे. एक मुलगी म्हणून तिची जबाबदारी पित्यावर सोपवण्यात आली आहे. बहिण असेल तर भावावर, व बायको म्हणून नवऱ्यावर व एक आई म्हणून तिच्या मुलांवर पूर्णपणे जबाबदारी सोपवण्यात आली आहे आणि जो ही जबाबदारी पूर्ण करणार नाही त्याला अत्यंत वाईट शिक्षेची पूर्वसूचना कुरआनमध्ये देण्यात आली आहे. कुरआनचा अभ्यास केल्यास असे दिसते की स्त्रीयांना त्यांचे जीवन स्वतंत्रपणे व सुरक्षितपणे जगता यावे, याचाच जास्त विचार केला गेला आहे. तीला सर्व अधिकार देण्यात आले आहे. आजचा समाज स्त्री भ्रुणहत्या या समस्येने ग्रस्त आहे पण इस्लामने भ्रुणहत्येला फार मोठे पाप ठरवले आहे. स्त्री-भ्रुणहत्या करणे हा फार मोठा गुन्हा असून त्यासाठी परलोकात तुम्हाला जाब द्यावा लागेल, अशी सूचनाही कुरआनमध्ये करण्यात आली आहे. मुलगी जन्माला आली तर माणसाला खुशखबरी देण्यात आली आहे, की त्याने जर आपल्या मुलीचे समानतेने पालनपोषण केले तर त्याला त्याचा चांगला मोबदला दिला जाईल.  या सर्व बाबी पाहता असे दिसते की स्त्री-पुरूष समानतेचा पुरस्कर्ता स्त्री-जन्माला व तिच्या सुरक्षित व स्वतंत्र जीवनाला व हक्काची समाजाला जाणीव करून देणारा एक सत्यमार्ग व एक परिपूर्ण अशी जीवनपद्धती म्हणजे इस्लाम होय.

- सय्यदा यास्मीन आरा

 माननीय अब्दुल्ला (र.) यांचे निवेदन आहे की, एक मनुष्य प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांच्याजवळ आला आणि प्रेषित यांना म्हणाला, मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषितांनी सांगितले, जे तुम्ही बोलता, त्यावर विचार करा. त्याने तीन वेळा म्हटले की, ईश्वराची शपथ, मी तुमच्याशी प्रेम राखतो. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तुम्ही आपल्या बोलण्यात सच्चे असाल तर दारिद्र्य आणि तंगीचा मुकाबला करण्यासाठी शस्त्रे जमा करा. जे लोक माझ्याशी प्रेम राखतात, त्यांच्या दिशेने गरीबी, भूक, तंगी पुरापेक्षा जास्त वेगाने सरसावून येतात.       (हदीस - तिर्मिजी)
भावार्थ- एखाद्याशी प्रेम करणे व त्याला प्रिय बनविण्याचा अर्थ काय असतो? हाच की त्यांच्या पसंतीस आपली पसंत व त्यांच्या नापसंतीस आपली नापसंत ठरवून घेणे. आपला ‘प्रिय’ ज्या मार्गावर चालतो. त्यास आपला जीवन मार्ग बनवावे. त्याच्या सानिध्यासाठी, सहवासासाठी आणि त्याच्या प्रसन्नतेसाठी सर्वस्व अर्पण केले जावे आणि बलिदानासाठी सदैव तत्पर असावे. प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रिय बनविण्याचा अर्थ, त्यांचे एक एक पाउलचिन्ह जाणून घ्यावे व त्यानुसार आचरण करावे. प्रेषित (स.) यांनी ज्या मार्गात आघात सहन केले त्या मार्गात आघात सोसण्याचा दृढ संकल्प केला जावा. ‘गारे हिरा’ हे प्रेषित (स.) यांचा मार्ग आहे तसेच ‘बद्र व हुनेन’ देखील प्रेषितांचा मार्ग आहे. सत्य धर्माच्या मार्गावर चालण्याचा परिणाम दारिद्र्य, तंगी, उपासमार, इत्यादि गोष्टींचा मारा होईल. हे सर्वविदीत आहे की आर्थिक आघात सर्वात मोठा आघात आहे. याचा मुकाबला फक्त अल्लाहवर भरवसा आणि अल्लाहशी असलेल्या प्रेमानेच होऊ शकतो. ईमानधारक मनुष्य अशावेळी असा विचार करतो की, अल्लाह माझा कार्यसाधक आहे. तो माझा पाठीराखा आहे. मी निराधार नाही. आणि शेवटी मी एक अल्लाहचा गुलाम आहे. गुलामाचे काम फक्त आपल्या मालकाची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीनुसार चालणे. मी ज्याच्या कामावर लागलो आहे तो अतिशय दयावान आणि न्यायी आहे. माझी मेहनत वाया जाऊ शकत नाही, त्याचे (ईश्वराचे) अशा प्रकारे विचार करणे प्रत्येक संकटाला सोपे करणे. शैतानाच्या प्रत्येक शस्त्राला निष्काम करून टाकते. नबुवत/प्रेषितत्त्व, हे एक अधिकारपद आहे. सर्वोच्च अल्लाहकडून त्यासाठी विशिष्ठ व्यक्तीची निवड व नियुक्ती होत असते. अशा निवडलेल्या व नियुक्ती झालेल्या व्यक्तीच्या स्वत:च्या इच्छेलाही काही वाव नसतो. माणसाच्या स्वत:च्या निर्धार व इरादा, धडपड व प्रयत्नांनी, प्रेषितत्त्व प्राप्त होत नसते. आपला प्रेषित कुणास करावा याचा निर्णय घेणारा तो अल्लाहच आहे. ‘‘अल्लाह उत्तम प्रकारे जाणतो की आपल्या प्रेषितत्त्वाचे कार्य कुणाकडून घ्यावे व कसे घ्यावे. (सूरह अनआम). जपजाप्य व ध्यानमग्न आणि तपश्चर्येमुळे मनुष्य अध्यात्मिक दृष्टीने उच्च होऊ शकतो. परंतु हे शक्य नाही की आपल्या या खडतर तपश्चर्येच्या बळावर तो प्रेषितत्त्वपदापर्यंत पोहोचावा व आपल्या तपांमुळे प्रेषितत्त्वाने उपकृत व्हावा. प्रेषितत्त्व हे एक अधिकारपद आणि ठराविक कामगिरी आहे. कोणतेही अधिकारपद स्वत: होऊन केवळ आपल्या प्रयत्नांनी मिळत नसते तर कुणा समर्थ अधिकारीच्या फर्मानाने व नियुक्तीनेच ते प्राप्त होऊ शकते. म्हणून प्रेषितत्त्व, जे एक महान रब्बानी-दैवी पदाधिकार आहे, त्यालाच मिळू शकते ज्यासाठी सृष्टीच्या व मानवजातीच्या खऱ्या शासकाकडून नियुक्ती आदेश मिळाला असेल. प्रेषित जे काही आदेश देतात, आणि दीन, शरिअत (धर्म व शास्त्र) म्हणून ज्या ज्या गोष्टींची शिकवण देतात, ती त्यांच्या स्वत:कडून नसते तर सर्वोच्च अल्लाहकडून असते. सर्वच प्रेषित म्हणतात, ‘‘मी तुम्हाला आपल्या पालनकत्र्याच्या आज्ञा ऐकवित आहे व त्याचाच संदेश ऐकवित आहे पोहोचवित आहे.’’ (सूरह आअराफ) ‘‘ज्याने प्रेषिताचे आज्ञापालन केले त्याने अल्लाहचे आज्ञापालन केले.’’ (सूरह निसा).

प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट अगदी प्रखरपणे जाणवते आणि ती म्हणजे प्रेषितांनी त्यांच्या कोणत्याही शत्रुशी वैयत्तिक बदला घेतला नाही, कोणत्याही प्रकारे सूड उगविला नाही. मुहम्मद (स.) यांना प्रेषितत्व मिळाले आणि त्यांच्यावर विरोधकाकडून अन्याय, अत्याचार आणि निष्ठूरतेचे पर्वत कोसळले. इतिहासात कधीही न दिसणारा अन्याय व अत्याचार मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायांवर व जवळच्या नातलगांवर करण्यात आला. त्यांना घर, परिवार आणि मायभूमी त्यागण्यासाठी विवश केले, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, आपली प्रिय मायभूमी अर्थात मक्का शहर त्यागून मदीनेस प्रस्थान करण्यास भाग पाडले. मदीना शहरी जाण्यापूर्वी प्रेषितांचा जीव काबागृहात अडकलेला होता. जाताना दर्शन घेण्याची त्यांची तीप इच्छा होती. मात्र विरोधकांकडून अन्याय व अत्याचारांमुळे काबागृहाचे दार त्यांच्यासाठी बंद करण्यात आले. काबागृहाच्या विश्वस्ताने काबागृहाच्या दर्शनासाठी दरवाजाच्या चाव्या देण्यास नकार दिला. मात्र इतिहास साक्षी आहे की ज्यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना काबागृहाच्या अंतिम दर्शनासाठी चावी देण्यास नकार दिला होता, मक्केवर जबरदस्त विजय मिळविल्यावर प्रेषितांनी त्यांच्यावर सूड न उगविता त्यांच्याच हाती चावी दिली. एवढेच नव्हे तर दयाळू व कृपाळू मुहम्मद (स.) यांनी त्यांना आशीर्वाद दिला की ही चावी त्यांच्याच वंशात असेल. हे इतिहासातील अप्रतिम औदार्य आहे.
मक्का शहरात प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायांचा छळ सुरूच होता. मात्र प्रेषितत्व कार्याचे वारे मदीना शहरात वाहत होते आणि तेथे इस्लामचा प्रचार होत होता. विरोधकांना मात्र हे सहन होणे शक्य नव्हते. त्यांनी प्रेषितांचा प्रति प्रेमळ व दयापूर्ण व्यवहाराच्या नसून अगदी शत्रुबरोबरसुद्धा त्यांनी न्यायपूर्ण आणि सदाचारी व्यवहाराच्या शिकवणी दिल्या आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांचा खरा परिचय करून देताना कुरआनाने म्हटले आहे,प्रति प्रेमळ व दयापूर्ण व्यवहाराच्या नसून अगदी शत्रुबरोबरसुद्धा त्यांनी न्यायपूर्ण आणि सदाचारी व्यवहाराच्या शिकवणी दिल्या आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांचा खरा परिचय करून देताना कुरआनाने म्हटले आहे,
‘‘हे प्रेषित (स.) भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसरन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व होते, तो जीवलग मित्र बनला आहे.”(कुरआन – ४१:३४)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विश्वाच्या आणि जग अस्तित्वात असेपर्यंतच्या समस्त मानवांना कोणताही भेदभाव न पाळता समान रूपाने सत्यधर्माचा परिचय करून देण्याचे महान कर्तव्य पार पाडले. यात त्यांनी आपला-परका, मित्र-शत्रु असा मुळीच भेदभाव केला नाही. याशिवाय प्रेषितांनी असेही सुचित केले की नेकी, चांगुलपणा आणि भलाई व सदाचाराच्या कार्यात सर्वांचीच मदत करावी. त्याचप्रमाणे अन्याय व अत्याचाराच्या आणि दुष्कर्माच्या कार्यात कोणाची आणि कितीही जवळच्या माणसाचीही मुळीच गय न करता कोणत्याही प्रकारे मदत करू नये. कुरआनात ही बाब अशा शब्दांत सादर करण्यात आली आहे,
‘‘जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे, त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप व अत्याचारांची कामे आहेत, त्यात कोणाशीही सहकार्य करू नका.”(कुरआन – ५:२)
एके प्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे,
‘‘ईश्वराने मला केवळ एवढ्यासाठीच पाठविले आहे की मी नैतिक गुणांना त्यांच्या परमोच्च स्थानावर पोचवावे आणि या कार्यात मी कोणतीही कसर बाकी ठेवू नये.”(हदीस ग्रंथ)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी रंजल्या-गांजल्यांना उराशी कवठाळले, बुडत्याला सहारा दिला, ठेचाळणार्यास हात दिला, अन्याय व अत्याचारपीडिताच्या हाकेवर धावून गेले, शोषित, पीडितांना प्रत्यक्ष न्याय मिळवून दिल्यावरच श्वास घेतला, काटाच काढण्याचे ठरविले. पूर्ण विचार-विमर्श केल्यानंतर त्यांनी असे ठरविले की प्रत्येक कबिल्यातून एका तरुणाची निवड करायची आणि मग त्या सगळ्यांकडून प्रेषितांची हत्या करायची. यामुळे या हत्येत सर्वच कबिले सामील असल्यासारखे होईल आणि या सर्वच कबिल्यांचा सामना करण्याचे धैर्य प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कबिल्यास होणार नाही. ठरल्याप्रमाणे सर्वच कबिल्यातील योद्धे गोळा झाले आणि प्रेषितांच्या घराला घेराव घातला. प्रेषित सकाळी घराबाहेर पडताच सर्वांनी मिळून त्यांच्यावर हल्ला करायचे ठरले.
आणखीन एक लक्षणीय गोष्ट अशी की प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सत्यधर्मविरोधी शत्रुंनादेखील त्यांच्या ईमानदारी आणि प्रामाणिकतेवर जबरदस्त विश्वास होता. याच विश्वासामुळे बर्याच लोकांच्या आणि शत्रुंच्यासुद्धा ठेवी त्यांच्याकडे ठेवण्यात आलेल्या होत्या. एखाद्यास आपली एखादी वस्तु, जिन्नस, द्रव्य, संपत्ती सुरक्षित ठेवावी वाटत असल्यास तो बिनधास्तपणे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे ठेवून निश्चिंत होत असे. अशा प्रकारे प्रेषितांकडे शत्रुंच्या बर्याच ठेवीदेखील सुरक्षिततेस्तव ठेवण्यात आलेल्या होत्या. प्रेषित मुहम्मद (स.) यांना शत्रुंच्या कटकारस्थानाची माहिती मिळाली होती. त्यांनी माननीय अली (रजी.) यांना बोलावले आणि सांगितले की मला मक्का शहर सोडून मदीना शहरी प्रस्थान करण्याचा ईश्वरी आदेश झाला आहे. मी आज मदीना शहरी प्रस्थान करणार आहे. तुम्ही माझ्या पलंगावर माझी चादर पांघरून झोपावे. सकाळ होताच लोकांच्या ठेवी त्यांना सोपवाव्यात.
विचार करण्याची गोष्ट आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांना ठार मारण्याकरिता येणार्या शत्रुंच्या ठेवी परत करण्यात येताहेत. ज्या रात्री प्रेषितांना ठार करण्याचा बेत आखण्यात आला, त्या रात्री प्रेषितांनी त्यांच्या ठेवी परत करण्याची पूर्ण व्यवस्था केली. हा प्रेषितांचा त्यांच्या जीवावर बेतलेल्या शत्रुंशी व्यवहार होता. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दया आणि कृपेचा जो व्यवहार केला आणि ज्या धर्मपरायण आचरणाचे प्रदर्शन केले, त्याचे उदाहरण इतरच कोठेही सापडणे शक्य नाही.
विरोधकांच्या अमानुष छळाला कंटाळून केलेल्या मदीना प्रस्थानाच्या दहा वर्षांनंतर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्का शहरावर विजय मिळविला. ज्या विरोधकांनी प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांचा अमानुषपणे छळ केला होता, त्यांचे जगणे कठीण केले होते, तीन वर्षांपर्यंतच्या सामाजिक व आर्थिक बहिष्कारांतर्गत अबू तालिब नावाच्या घाटीमध्ये ठेवून अन्न-पाण्यावाचून तडफडण्यासाठी सोडले होते, आज ते समस्त शत्रु पराजित होऊन थरथर कापत विजेता प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर उभे होते. मात्र फक्त मित्रांसाठीच नव्हे तर शत्रुंच्याप्रतिसुद्धा दया आणि कृपा असलेल्या प्रेषितांनी कोणत्याही प्रकारे रक्तपात केला नाही. किंचितही त्रास दिला नाही. सर्वांना माफ केले. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याविरुद्ध लढणार्या आणि क्रूर व अमानुष पाषाणहृदयी शत्रुच्या लष्कराचे नेतृत्व करणार्या अबू सुफियान (रजी.) यांना अभय दिले, मान दिला.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा दयाळू व कृपाळू व्यवहार आणि महान चारित्र्याची या घटनेवरून कल्पना येते की पराजित झालेला शत्रुपक्ष त्यांच्या ताब्यात होता, भयाने थरथर कापत होता, त्यांच्याकडून कशारितीने बदला घेतला जाईल, हे सांगता येत नव्हते. मात्र प्रेषितांनी सर्वांना क्षमा केली, स्वतंत्र केले.
वहशी नावाची एक व्यक्ती मक्का शहरात होता. यानेच प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या प्रिय काका हमजा (रजी.) यांचा वध केला होता. मक्का शहरावर प्रेषितांनी विजय मिळविल्यावर तो तेथून पळून गेला होता. त्यास वाटले होते की, प्रेषित त्यास क्षमा करणार नाहीत. मात्र जेव्हा त्यास प्रेषितांच्या शत्रुंच्या प्रति दया आणि कृपापूर्ण व्यवहाराची सूचना मिळाली, तेव्हा तो परत आला आणि प्रेषितदरबारी हजर झाला. प्रेषितांनी त्याला अभयदान दिले.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी जीवनभर लढणार्या शत्रुंच्या लष्कराचा आणि मक्का शहराचा सरदार अबू सुफियान याची ‘हिंदा‘नावाची पत्नी होती. ती प्रेषितांविषयी अतिशय वैरभाव बाळगत होती. याच वैरभावापोटी तिने प्रेषितांचे प्रिय काका हमजा (रजी.) यांच्या हत्येची वहशीला सुपारी दिली होती. हमजा (रजी.) यांचा वध झाल्यावर त्यांची छाती फाडून काळीज बाहेर काढून दातांनी चावले, त्यांच्या नाक-कानांचा हार गळ्यात घालण्याचे क्रौर्य दाखविले होते. मक्केवर प्रेषितांनी विजय प्राप्त केल्यावर तिने चेहर्यावर पडदा टाकला, जेणेकरून त्यांनी तिला ओळखू नये आणि सार्वजनिक क्षमादानात सामील होऊन जीव वाचवावा. मात्र प्रेषित मुहम्मद (स.) यांनी तिला ओळखले. प्रिय काका हमजा (रजी.) यांच्या हत्येसंदर्भात मुळीच उल्लेख न करता तिलाही माफ करून दया आणि कृपेचे दर्शन घडविले. प्रेषितांच्या या व्यवहारामुळे तिला भयंकर आश्चर्य वाटले. ती खूप प्रभावित झाली आणि इस्लामचा स्वीकार केला.
सफवान-बिन-उमैया ही कुरैशजनांतील प्रमुख व्यक्ती होती. इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कट्टर शत्रुंमध्ये त्याची गणना होत होती. यानेच उमैर-बिन-वहब यास मुहम्मद (स.) यांचा वध करण्यासाठी नियुक्त केले होते आणि बक्षीससुद्धा घोषित केले होते. मात्र प्रेषितांच्या मक्का विजयाची सूचना मिळताच त्याने पळ काढला आणि जद्दाला रवाना झाला. तेथून समुद्रमार्गाने तो येमेनला जाण्याचा विचार करू लागला. उमै-बिन-वहब याने प्रेषितांना सांगितले की सफवान-बिन-उमैया कबिल्याचा प्रमुख असून तो आपल्या भीतीने मक्का शहर सोडून पळून गेला आहे. यावर प्रेषितांनी त्यास अभयदान दिले. उमैर सरळ सफवान बिन उमैयास जाऊन भेटला आणि प्रेषितांच्या अभयदानाची खबर दिली. मात्र सफवानने सांगितले की ‘‘मला भीती वाटते. मी मुहम्मद (स.) यांना खूप छळल्याचे तुम्हाला माहीतच आहे. ते कसे काय मला क्षमा करतील?”
‘‘अद्याप तुम्ही मुहम्मद (स.) यांना ओळखलेच नाही! तुम्ही त्यांची सहनशीलता आणि औदार्य अजून पाहिलेच नाही.” उमैयाने सगळा प्रकार समजावून सांगितला. सफवान उमैर (रजी.) बरोबर प्रेषितांच्या सेवेत हजर झाले, म्हणाले, ‘‘आपण माझा गुन्हा माफ केला, मला अभयदान दिले, असे उमैरने सांगितले ते खरे आहे काय?”
‘‘होय! खरे आहे!” प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले ‘‘मला दोन महिन्यांची मुदत द्यावी,” सफवानने विनंती केली.
‘‘मी तुम्हाला चार महिन्यांची मुदत देतो,” प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले. यानंतर सफवान (रजी.) यांनी सहर्ष इस्लामचा स्वीकार केला.
याप्रमाणेच इस्लामचा कट्टर शत्रु असलेल्या अबू जहलचे पुत्र इक्रमा हे मक्केवर प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या विजयानंतर येमेनदेशी पळून गेले होते. त्यांच्या पत्नीने अगोदरच इस्लामचा स्वीकार केला होता. ती स्वतः येमेनला जाऊन नवर्याला भेटली आणि प्रेषितांकडून क्षमादानाचे आश्वासन दिले. यानंतर दोघे नवरा-बायको प्रेषितदरबारी हजर झाले आणि इक्रमा (रजी.) यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांचा दयाळूपणा अनुभवला. प्रेषितांनी आपल्या कट्टर विरोधक आणि शत्रुच्या या पुत्रास उराशी कवटाळले आणि इक्रमा (रजी.) यांनी इस्लामचा स्वीकार केला.
अरब कबिल्यांपैकी बनी हनीफा हा कबिला इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विरोधक होता. सुमामा बिन अस्साल या कबिल्याचे प्रमुख होत. त्यांना मुस्लिमांनी अटक केली होती. प्रेषितांच्या आदेशाने त्यांना मस्जिदच्या खांबाला बांधून ठेवण्यात आले होते. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यास विचारले,
‘‘कसे आहात ‘सुमामा?”
‘‘हे मुहम्मद (स.)! मी ठीक आहे. तुम्ही जर माझी हत्या केली तर समजा एका कबिल्याच्या सरदाराची हत्या होईल आणि जर जीवदान द्याल तर एका कृतज्ञ व्यक्तीवर उपकार होईल आणि धन पाहिजे असल्यास तेही मिळेल!”
सुमामांचे उत्तर ऐकून प्रेषित मुहम्मद (स.) तसेच निघून गेले. दुसर्या दिवशी...
‘‘कसे आहात सुमामा?” प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारले.
‘‘मी तसाच आहे, जसा काल होतो! जर जीवदान द्याल तर एका कृतज्ञ व्यक्तीवर उपकार होईल आणि धनसुद्धा मिळेल!!”
प्रेषित मुहम्मद (स.) परत निघून गेले. यानंतर तिसर्यांदा प्रेषित त्यांच्याकडे आले आणि विचारपूस केली, त्यांनी परत तेच उत्तर दिले. यावेळी मात्र प्रेषितांनी त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले. सुमामांना प्रेषितांकडून याच दयापूर्ण व्यवहाराची आशा होती. सुटका होताच त्यांनी जवळच्या एका बागेत जाऊन स्नान केले आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर इस्लामचा सहर्ष स्वीकार केला आणि आपल्या भावना अशा शब्दांत व्यक्त केल्या.
‘‘हे मुहम्मद (स.)! या अवघ्या धरतीवर तुमच्यापेक्षा जास्त अप्रिय व्यक्ती माझ्या दृष्टीत कोणीही नव्हती. मात्र आज तुम्हीच या समस्त जगामध्ये मला सर्वाधिक प्रिय आहात. ईश्वराची शपथ! पूर्वी तुमच्या धर्मापेक्षा वाईट धर्म माझ्या दृष्टीत कोणताही धर्म नव्हता, मात्र आज सर्वांत जास्त माझा आवडता धर्म ‘इस्लाम’ हाच आहे. ईश्वराची शपथ! समस्त जगात आज मला तुमचीच वसती प्रिय आहे!” पहिल्या दिवशी तर सुमामांना वाटले की त्यांची हत्या करण्यात येईल. मात्र त्यांनी जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रत्यक्ष पाहिले तेव्हा त्यांची निराशा संपली आणि त्यांना मनापासून वाटले की प्रेषितांचा स्वभाव अत्यंत दयाळू आहे. म्हणूनच त्यांनी प्रेषितांशी बोलताना शालीन आणि सभ्य शब्दांचा वापर केला. जणू प्रेषितांचा हा चमत्कारच होता की त्यांच्या मृदू स्वभावामुळे त्यांचा विरोधक आणि वैरीसुद्धा त्यांचा मित्रच होत होता.
हुदैबियाच्या शस्त्रसंधीप्रसंगी माननीय अस्मा (रजी.) (प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या भार्या) यांची आई अद्याप मूर्तीपूजक होती. ती आपल्या मुलीकडे अर्थात अस्माकडे आली आणि आर्थिक मदत मागितली. माननीय अस्मा (रजी.) यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझी आई अद्याप मुस्लिम झालेली नाही आणि तिला माझ्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे, मी तिला मदत करणे योग्य ठरेल काय?” यावर दयाळू आणि कृपाळू प्रेषितांनी सांगितले, ‘‘तिच्याशी दयापूर्ण व्यवहार करावा आणि शक्य होईल तेवढी मदत करावी!”
माननीय अबू हुरैरह (रजी.) हे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कट्टर अनुयायी आणि हदीस संग्रहक होते. मात्र त्यांची आई प्रेषितांना रोज शिव्या-शापांची लाखोली वाहायची. माननीय अबू हरैरह (रजी.) यांना याचे खूप दुःख वाटायचे. त्यांनी प्रेषितांसमोर हा सगळा प्रकार ठेवला, प्रेषितांनी तिच्यावर राग न धरता तिच्यासाठी ईश्वरदरबारी प्रार्थना केली आणि त्यांची ही प्रार्थना स्वीकार झाली. तिने इस्लामचा स्वीकार केला.
सातव्या हिजरी सनात ‘फिदक‘वर विजय प्राप्त झाला. माननीय बिलाल (रजी.) हे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विशिष्ट निकटस्थ व्यक्ती आणि परिवाराचे प्रबंधक होते. पैसे नसल्यावेळी बाजारातून उसणे-पासणे सामान घेऊन येत आणि पैसे आल्यावर उधारी देऊन टाकीत असे. एकदा एक बिगरमुस्लिम व्यक्तीने त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला कर्ज हवे असल्यास माझ्याकडून घेत जा.”
माननीय बिलाल यांनी त्याच्याकडून कर्ज घेतले. एके दिवशी तो बिलाल (रजी.) यांच्याकडे आला आणि तावातावाने म्हणाला,
‘‘ए काळ्या-कुट्ट माणसा! कर्ज परतफेडीच्या मुदतीसाठी फक्त चारच दिवस बाकी आहेत. तू परतफेड नाही केलीस तर तुला माझ्या शेळ्या चारवाव्या लागतील.” या प्रकाराने दुःखी होऊन बिलाल (रजी.) थेट प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर हजर झाले. सगळा प्रकार त्यांच्या समोर ठेवला. मात्र प्रेषितांनी त्या सावकाराच्या या दुष्टतापूर्ण व्यवहाराकडे दुर्लक्ष केले आणि त्याचे कर्ज देऊन टाकले.
नजरान शहरावरून ख्रिस्ती धर्मियांचे एक प्रतिनिधीमंडळ मदीना शहरी प्रेषित मुहम्मद (स.) यांना भेटण्यासाठी आले. प्रेषितांनी त्यांचा सत्कार केला आणि मस्जिदामध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्या धार्मिक रिती-रिवाजानुसार उपासनेची पूर्ण परवानगीसुद्धा दिली.
सत्यधर्माचा प्रचार करण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ताईफ येथे दौरा केला. हा दौरा एक ऐतिहासिक घटना आहे. ताईफ येथील दौर्यावर असताना तेथील लोकांनी त्यांच्याबरोबर क्रूर आणि दुष्टतापूर्ण व्यवहार केला आणि त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करून त्यांना रक्तबंबाळ केले, मात्र प्रेषितांनी त्यांना शाप न देता त्यांच्या हितातच ईश्वरदरबारी प्रार्थना केली.
प्रेषित शिरोमणी मुहम्मद (स.) यांचे अवघे व्यक्तीमत्त्व म्हणजे ईश्वरी देणगी असलेले दया आणि कृपेचे एक मूर्त स्वरूपच होते. त्यांच्या अवघ्या जीवनात त्यांच्याकडून कोणासही काय अगदी त्यांच्या प्राणांवर बेतलेल्या शत्रुंनासुद्धा दया आणि कृपा मिळाली. आणि हेच कारण आहे की प्रेषितांच्या याच दयाळू व कृपाळू स्वभावामुळे या जगात इस्लामचा प्रचार व प्रसार झाला.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget