अत्याचारी सर्वात मोठा दिवाळखोर आणि दरिद्री

प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘काय तुम्ही जाणता की दिवाळखोर आणि दरिद्री कोण आहे?’’ लोक म्हणाले की आमच्या इथे गरीब अशा माणसाला म्हंटले जाते,  ज्याच्याजवळ ना तर दिरहम (अरबी नाणं) असेल आणि ना कोणती सामग्री. प्रेषित यांनी सांगितले की, ‘‘माझ्या उम्मत (जनसमुहा) चा दिवाळखोर व दरिद्री तो होय, जो कयामतच्या (प्रलयकाळी) आपली नमाज, रोजा आदिसह हजर होईल आणि त्याच्याबरोबर जगात कोणाला शिवीगाळ केली असेल, कोणावर मिथ्या आरोप ठेवला असेल, कोणाचे धन गिळंकृत केले  असेल, कोणाची नाहक हत्या केली असेल आणि कोणाला त्याने नाहक मारले असेल. तेव्हा त्या सर्व अत्याचार पिडीतांमध्ये त्याची सत्कर्मे वाटून दिली जातील. जर त्याची सत्कर्मे  संपली तर अत्याचारपिडीतांचे हक्क अजूनही बाकी असतील तर त्या व्यक्तींचे अपराध (गुन्हा) अत्याचारी व्यक्तीच्या हिशेबात टाकले जातील आणि मग त्याला जहन्नुम (नरकात) फेकून दिले जाईल. (हदीस : मुस्लीम, अबू हुरैरा (रजि.))
प्रेषितांनी अत्याचार करणाऱ्यांची निर्भत्सना केली आहे. मॅन, मनी, मसलच्या वापराने सध्या लोक बेधूंद झाले आहेत. आपल्याला कोणी जाब विचारणारा नाही! अशी त्यांची (भ्रामक)  समज झाली आहे. परंतु उपरोक्त हदीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की जूलूम करणाऱ्याला मोकाट सोडण्यात आले नसून अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी, त्याचा जाब अल्लाहकडून घेतला जाणार आहे. त्याने रत्तीभर जरी अत्याचार केले असेल तर त्या दिवशी अत्याचारपिडीताला न्याय दिले जाईल. त्यादिवशी अत्याचाराला त्याची संपत्ती, शक्ती,  आणि सत्ता, कसल्याही प्रकारे कामाला येणार नाही.
औस बिन शुर्जील (रजि.) कथन करतात की, प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी ताकीद देताना ऐकले की, ‘‘जो मनुष्य एखाद्या अत्याचारीला साथ देऊन, त्याला सामथ्र्य पोहोचविल,  वस्तुत: तो जाणतो की ती व्यक्ती अत्याचारी आहे तर तो इस्लामबाह्य झाला. अर्थात हे की जाणून बुजून एखाद्या अत्याचारीचे समर्थन करणे व त्याला साथ देणे इमान व इस्लामच्या  विरूद्ध आहे.’’ (हदीस : मिश्कात)

भावार्थ
इस्लामने अत्याचार करण्यास सक्त मनाईच केली नाही तर अशा अत्याचारी व्यक्तीला परोक्ष वा अपरोक्ष पद्धतीने साथ देण्यास, सहकार्य करण्यास ही मनाई केली आहे. अशी व्यक्ती  इमान व इस्लामबाह्य होणे अतिशय चिंताजनक बाब आहे. कारण माणूस जर इमान (श्रद्धेच्या) संकुलातून बाहेर झाला तर मग त्याचे अस्तित्व अल्लाह, व त्याच्या प्रेषितांच्या दृष्टीने,  ‘काफीर’ आहे. श्रद्धावंतास मरणोत्तर जीवनांमध्ये, अल्लाहकडून ज्या देणग्या, कृपेचा वर्षाव होणार, त्यापासून अशी व्यक्ती वंचित राहील.

प्रेषित ह. मुहम्मद (स.) यांनी सांगितले की, ‘‘अत्याचार पिडीताच्या दु:खावेगाने टाकलेल्या उसासापासून (हुंदका, आक्रोश) आपला बचाव करा. पीडित अल्लाहच्या दरबारात तुमच्या  अत्याचाराचे गाऱ्हाणे मांडेल आणि अल्लाह मोठा न्याय करणारा आहे. तो कोणत्याही पिडीताला त्याच्या हक्कापासून वंचीत ठेवित नाही.’’ आणि या कारणास्तव तो अत्याचारी माणसाला  (जुलूम करणाऱ्याला) विविध प्रकारच्या संकटात व दु:ख यातनेत टाकतो. (हदीस - मिश्कात)
Labels:

Post a Comment

[blogger]

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget