April 2021


तिसऱ्या आयतीमध्ये ईशभय आणि धर्मपरायणतेबरोबरच एक अत्यंत महत्त्वपूर्ण शिकवण देण्यात आली आहे, ``(नेहमी) सत्य बोला.'' हृदयानंतर सर्वात महत्त्वाचा अवयव जीभ आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ``कर्मांची भिस्त कशावर आहे?'' नंतर पैगंबर (स.) यांनी आपली जीभ पकडून सांगितले, ``याला आपल्या काबूत ठेवा.'' (हदीस : तिर्मिजी, इब्नेमाजा, मुसनद अहमद)

आणखी एके ठिकाणी म्हटले,

``जी व्यक्ती मला मुख आणि गुप्तांगाच्या (वाईट बोलण्यापासून आणि व्यभिचारी कर्मांपासून) संरक्षणाची हमी देईल, त्यास मी स्वर्ग-प्रवेशाची हमी देतो.'' (हदीस : तिर्मिजी, इब्ने माजा, मुसनद अहमद)

आणखी एके प्रसंगी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे, 

``जी व्यक्ती अल्लाहवर आणि अंतिम निवाड्याच्या दिवसावर श्रद्धा ठेवते, तिने फक्त सत्यच बोलावे अन्यथा गप्प बसावे.'' (हदीस : बुखारी, मुस्लिम)

वास्तविकता अशी आहे की, अल्लाहच्या आणि मानवाच्या हक्कांची जितकी अधिक पायमल्ली मुखावाटे होते, अन्य अवयवाद्वारे क्वचितच होते आणि कधी कधी मनुष्याला याचे ज्ञान नसते. भांडण-तंट्याची सुरवात जिभेनेच होते. जेव्हा आम्ही कमी बोलू, विचारांति बोलू, अपराधात्मक बोलणार नाही आणि तोंडाद्वारा इतराना दु:ख देणार नाही आणि नेहमी भले व सत्य बोलू तेव्हाच घरातील व बाहेरील जीवन आनंददायी बनेल.माननीय इब्ने अब्बास (रजि.) हे वर्णन करतात. 

पैगंबर मुहम्मद (स.) बद्रच्या युद्धाप्रसंगी एका राहुटीत खालीलप्रमाणे प्रार्थना (दुआ) करत होते. ‘‘हे अल्लाह मी तुझ्यापाशी तुझ्या आश्रयासाठी याचना करतो आणि तुझे वचन पूर्ण व्हावे याची याचना करतो. हे अल्लाह! तू जर इच्छिले की (मुस्लिम नष्ट व्हावेत) तर आजनंतर तुझी इबादत (भक्ती) होणार नाही.’’

यावर अबू  बकर (रजि.) यांनी पैगंबरांचा हात धरून विनंती केली, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! बस, इतके पर्याप्त आहे. तुम्ही अत्यंत द्रवणशीलतेसह व रुदनभाविभोर होऊन प्रभुशी याचना केली आहे.’’

यानंतर पैगंबरांनी चिलखत परिधान केले आणि तंबूतून त्वरित बाहेर आले आणि पुढील आयतचे ते पठण करीत होते, ‘‘सत्यविरोधकाचा हा दल लवकरच पराजित होईल आणि हे पाठ दाखवून पळत सुटतील.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

ईश्वराने पैगंबर मुहम्मद (स.) यांना वचन दिले होते,

‘‘आणि स्मरण करा जेव्हा अल्लाह तुम्हाला वचन देत होता की दोन दलांपैकी एक दल तुमच्या स्वाधीन केला जाईल.’’ (दिव्य कुरआन, ८:७) 

अल्लाहच्या या वचनाचा हवाला देऊन पैगंबर दुआ (प्रार्थना) करीत होते. अल्लाहच्या वचनावर विश्वासाव्यतिरिक्त दासाचे कर्तव्य आहे की त्याने प्रभुशी प्रार्थना व विनयपूर्वक याचना करण्याकडे दुर्लक्ष करू नये. दासाचे दास्यत्व व अल्लाहच्या महानतेची हीच मागणी आहे की दासाने अतिद्रवित भावनेसह प्रभुशी प्रार्थना करत राहावी. या प्रार्थनेमुळे इस्लामी सैन्याच्या मनाला बळ प्राप्त झाले आणि त्यांच्या उत्साहात अपार वृद्धी झाली होती.

पैगंबर चिलखत परिधान करून बाहेर आले तेव्हा त्यांच्या जिव्हेवर कुरआनची ही आयत होती जिचा उल्लेख वर आला आहे. या आयतद्वारा पैगंबर ईमानधारकांना अल्लाहकडून शुभसूचना देत होते की शत्रूवर मुस्लिमांना विजय प्राप्त होणार आहे.- माईल खैराबादी

या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनाची काही वैशिष्ट्ये संक्षिप्तरित्या वर्णन करण्यात आली आहेत. लहान मुलांनासुद्धा समजेल अशा सोप्या भाषेत पैगंबराविषयी सांगण्यात आले आहे.

त्यांचे व्यिक्तमत्व, पोषाख, भोजन, स्वच्छता, दिनचर्या, संभाषणशैली, अल्लाहवर दृढ विश्वास, समानता, लाजाळूपणा, सत्यवचनी, धैर्यशील, वचनपूर्ती, वाईटाच्या बदल्यात चांगुलपणा, लहान मुलांशी प्रेम, मृदुस्वभावी, क्षमाशील इ.वर चर्चा करण्यात आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 255      -पृष्ठे - 32 मूल्य - 18        आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/grjz0jk5g7447o81ql1zqlnoehrvskqc
- सय्यद सआदतुल्लाह हुसैनी

जगातील संसाधनावर कब्जा करुन जगाला आर्थिक शक्तीद्वारे  गुलाम बनविणे हा भांडवलशाहीचा मूळ उद्देश आहे. उद्देशप्राप्तीसाठी साम्राज्यवाद वेगवेगळी रुपे धारण करतो यासाठी कळसूत्री शासकांना नियुक्त करतो.

साम्राज्यवादामुळे स्थानिक व्यवसाय नष्ट होतो आणि त्याची जागा मोठ्या कंपन्या घेतात. जी राष्ट्रे भांडवलदारांविरुद्ध अडथळा निर्माण करतात, त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई करुन त्यांना नष्ट केले जाते. याविषयीची चर्चा या पुस्तिकेत करण्यात आली आहे. शेवटी इस्लामची पर्यायी आर्थिक व्यवस्थेवर चर्चा आली आहे.

आयएमपीटी अ.क्र. 254     -पृष्ठे - 44 मूल्य - 20        आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/vtyf385cmpqphc7qr8yu0wea3ugygw3q


dua

इस्लाम म्हणजे परमेश्वराची आज्ञा मानणे होय. परंतु जोपर्यंत मनुष्याला काही गोष्टींचे ज्ञान प्राप्त होत नाही व त्यावर त्याचा विश्वास असत नाही तोपर्यंत तो परमेश्वराचा आज्ञाधारक होऊच शकत नाही.

सर्वप्रथम मनुष्याला परमेश्वर आहे हा विश्वास असला पाहिजे. त्याला हे ही माहित असले पाहिजे की परमेश्वर फक्त एकच आहे जेणेकरून तो दुसऱ्यासमोर हात जोडणार नाही. परमेश्वर सर्व काही बघत आहे व ऐकत आहे हा विश्वास ज्याला असेल तो त्या परमेश्वराची आज्ञाभंग करणार नाही. इस्लामवर चालण्यासाठी ज्या विचारांची व कर्मांची आवश्यकता आहे ते परमेश्वराला ओळखल्याशिवाय व्यक्तीत येणार नाहीत व तो वाईट विचारांनी व परमेश्वराच्या मर्जीविरूद्ध काम करण्यापासून तो स्वतःला वाचवेल.

यानंतर मनुष्याला परमेश्वराच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा मार्गही माहित असायला हवा. कुठल्या गोष्टी करायला हव्यात व कुठल्या गोष्टींपासून दूर रहायला हवे हे माहित पाहिजे.

यासाठी त्याला परमेश्वराने मानवांसाठी जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचे ज्ञान असले पाहिजे. त्याला जर नियमच माहित नसतील तर तो पालन कशाचे करणार? मनुष्याला परमेश्वराची आज्ञा पाळण्याचे फळ काय मिळणार आहे व आज्ञाभंगाची काय शिक्षा मिळणार आहे हे पण माहित असायला हवे. त्यासाठी त्याचा पारलौकीक जीवनावर परमेश्वराच्या न्यायालयात सादर होण्यावर, आज्ञाधारकतेच्या बक्षीसावर व आज्ञाभंगाच्या शिक्षेवर विश्वास असला पाहिजे. ज्याला आखिरतच्या जीवनावर विश्वास नाही तो आज्ञाधारक राहणार नाही. त्याच्यासाठी आज्ञाधारक व्यक्ती व आज्ञाभंग करणारा व्यक्ती दोन्ही समान आहेत. दोन्ही मातीत मिळणार आहेत. काही व्यक्तींना आखिरत (पारलौकिक) चे ज्ञान असते पण ते त्यावर विश्वास ठेवत नाहीत ते भटकलेले आहेत. 

ईमान म्हणजे काय?

वरील भागात आपण ज्ञान व विश्वास पाहिला ते म्हणजेच ईमान. ईमान म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेणे व त्यावर विश्वास ठेवणे. जो व्यक्ती परमेश्वराच्या एक असण्यावर आणि त्याच्या नियमांना जाणतो व त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो, तो मोमिन (ईमान असणारा) असतो आणि ईमान असणारा व्यक्ती ’मुस्लिम’ म्हणजेच परमेश्वराच्या आज्ञाधारक बनतो.

ईमान असल्याशिवाय कुठलाही व्यक्ती मुसलमान बनू शकत नाही. ईमान हे मुसलमानरूपी झाडाचे बीज आहे. ईमान व इस्लामच्या दृष्टीने मनुष्याचे चार प्रकार पडतात. 

1. जे ईमान राखतात आणि परमेश्वराच्या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करतात हे सच्चे मुस्लिम आहेत.

2. जे ईमान तर राखतात पण पूर्णपणे परमेश्वराचे आज्ञाधारक नसतात हे मुसलमान तर आहेत पण गुन्हेगारसुद्धा आहेत. 

3. ज्यांच्याकडे ईमान असत नाही पण त्यांचे कर्म परमेश्वराच्या नियमाप्रमाणेच असतात हे लोक बंडखोर आहेत.

4. जे ईमान राखत नाहीत व वाईट कृत्ये करतात हे लोक सर्वात खालच्या दर्जाचे आहेत. हे बंडखोर तर आहेतच तसेच समाजात अशांतता पसरविणारे सुद्धा आहेत. 

ज्ञान मिळवण्याचे मार्ग

परमेश्वराने निसर्गातच आपल्या असण्याचे संकेत दिलेले आहेत. पण मनुष्याची बुद्धी व त्याचे कौशल्य बहुदा त्या संकेतांना समजण्यात चुका करतो. कोण म्हणतो ’आनंद’ देव आहेत, कोण म्हणतो ’अग्नीचा’ देव वेगळा, ’हवेचा’ देव वेगळा म्हणजे वेगवेगळ्या शक्तींचे वेगवेगळे देव व त्या देवांचा एक वेगळा देव. हे लोक अज्ञानी आहेत. 

आखिरतच्या जीवनासंबंधीही बरेचसे गैरसमज आहेत. काही म्हणतात मृत्यूनंतर पुन्हा जीवन नाही. काही म्हणतात मनुष्य पुन्हा पुन्हा या धरतीवर जन्म घेईल व त्याला त्याच्या कृत्याचे फळ मिळेल.

परमेश्वराने आपल्याला ज्ञानापासून वंचित ठेउन आपली कठोर परीक्षा घेतली नाही. परमेश्वराने मनुष्यांमध्येच असे मनुष्य जन्माला आणले ज्यांनी परमेश्वराचे खरे ज्ञान मनुष्याला दिले. मनुष्य म्हणजेच अल्लाहचे पैगंबर किंवा अल्लाहचे नबी. अल्लाहने त्यांना जे ज्ञान दिले त्याला ’वह्य’ असे म्हणतात आणि ज्या पुस्तकात अल्लाहने हे ज्ञान दिले ते पुस्तक (कुरआन ग्रंथ) अल्लाहचा संवाद आहे. आता मनुष्याची खरी परीक्षा आहे की तो पैगंबरांच्या पवित्र जीवनाला व त्यांच्या उच्च ज्ञानाला बघून त्यांच्यावर ईमान आणतो की नाही. जो मनुष्य सतप्रवृत्तीचा आहे तो पैगंबरावर ईमान आणेल पण ज्याने सद्सद्विवेकबुद्धीचा त्याग केला आहे तो यापासून वंचित राहील. 

परोक्षावर ईमान

जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसते तेव्हा आपण ज्ञान असणाऱ्याचा शोध घेतो व त्याने सांगितलेल्या गोष्टी पाळतो. आपण आजारी असतो तेव्हा डॉ्नटरांकडे जातो. त्याने दिलेले औषध घेतो. आपल्याला त्या औषधांबद्दल काही माहित नसते तरी आपण डॉ्नटरावर विश्वास ठेवून ते औषध घेतो. याचाच अर्थ असा की आपल्याला पृथ्वीच्या प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मिळवण्यासाठी कोण्या जाणकारावर ईमान ठेवावा लागतो व त्याने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे लागते यालाच परोक्षावर ईमान असणे किंवा गैबवर ईमान असणे म्हणतात. परोक्षावर ईमान असणे म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट माहित नाही व आपण ती गोष्ट जाणणाऱ्यांवर विश्वास ठेवतो. आपल्याला परमेश्वराबद्दल काही माहित नाही, आपल्याला परमेश्वर खुश होईल असे जीवन जगण्याचा मार्ग माहित नाही. आखिरतच्या जीवनाबद्दल माहित नाही. या गोष्टींचे ज्ञान आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपल्याला एक असा व्यक्ती मिळते जी सतप्रवृत्ती असणारी, परमेश्वराला मानणारी व पवित्र असतेे. तिला परमोच्च ज्ञान असते. त्या व्यक्तीला बघून आपल्याला हा विश्वास बसतो की, ही व्यक्ती जे बोलेल ते सत्य बोलेल. हे विश्वास करणे म्हणजेच परोक्षावर ईमान असणे विश्वास असणे. अल्लाहच्या आज्ञा पाळण्यासाठी व त्याच्या ईच्छेनुसार जीवन जगण्यासाठी परोक्षावर ईमान आवश्यक आहे. पैगंबराशिवाय आपल्याला हे ज्ञान मिळू शकणार नाही व आपण इस्लामच्या मार्गावर चालू शकणार नाही. (संदर्भ : दीनियात)


- अबु सकलैन रफिक अहमद पटेल

लातूर 

9860551773


prayer

गेल्या दोन महिन्यापासून काउंटडान सुरू होता तो आता संपलेला आहे. रमजानुल मुबारकचा पवित्र महिना आपल्या सगळ्यांना लाभला आहे. यानिमित्ताने आपण ईश्वराचे जितके आभार मानले तितके कमी. कारण आपण जीवंत आहोत, निरोगी आहोत, कित्येक लोक जे मागच्या रमजानमध्ये जिवंत होते हा रमजान बघू शकले नाही. (अल्लाह त्यांची मग्फिरत करो). 

आपणास माहित आहे का असा एक पाहूणा ज्याची वाट संपूर्ण जगभरातील 249 देशांतील लोक पाहतात आणि तो एकमेव असा पाहूणा की वाट पाहत असलेल्या सर्वांच्या घरी एकदाच हजर होतो? तो आहे तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका रमजानुल मुबारक!

रमजानुल मुबारक हा हिजरी कॅलेंडरमधला नववा महिना आहे. त्याला मुबारक (पवित्र) का म्हणतात? तर पवित्र कुरआन हा या महिन्यात अवतरित होण्यास सुरूवात झाली. जो की समस्त मानवतेचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. आणि याच महिन्यात ’शबे कद्र’ एक रात्र आहे जी हजार रात्रींपेक्षा जास्त महत्त्वाची आहे. रमजान हा पाहूणा फक्त महिनाभर आपल्या सोबत असतो मात्र आपल्याला पूर्ण वर्षभराची ट्रेनिंग देऊन जातो.

रमजानच्या महिन्यात पहाटेपासून ते सूर्य मावळेपर्यंत अन्न, पाणी आणि कामवासना त्यागने याला ’रोजा’ म्हणतात. अरबीमध्ये याला ’सौम’ म्हणतात. हा इस्लामच्या पाच मूलतत्त्वांपैकी एक मूलतत्व आहे.

‘रोजा’चा उद्देश काय?

फक्त उपाशी राहणे हा रोजाचा हेतू नसून माणसात ईश्वराची भीती येणे जेणेकरून तो दुष्टकर्मांपासून लांब राहील व प्रत्येक वाईट गोष्ट करण्याआधी विचार करेल की अल्लाह मला बघत आहे. ही ’’इशपारायणता’’ माणसात निर्माण करणे हाच रोजाचा उद्देश आहे. नमाज (सलात) जकात, हज हे दिसणाऱ्या इबादती आहेत. मात्र रोजा हे अल्लाह आणि बंद्यालाच माहित असते, म्हणून अल्लाह म्हणतो रोजा माझ्यासाठी आहे आणि मीच त्याचा मोबदला देणार आहे. 

रोजा हा पोटाचाच नसून, डोळ्यांचा असतो. डोळ्यांनी काही वाईट बघू नये, कोणावर वाईट नजर टाकू नये, हाताचा असतो, हातांनी कोणाचे वाईट करू नये, पायांचा असतो, पायांनी कोठे वाईट मार्गाला जावू नये, तोंडाचा असतो,  तोंडानी कोणाला वाईट म्हणू नये, खोटे बोलू नये, कोणाच्या पाठीमागे किंवा समोर वाईट म्हणूच नये. कानाचा असतो, वाईट  गोष्टी ऐकू नयेत इत्यादी.

आपण पाहूणे येण्याआदी कितीतरी तयारी (पूर्व नियोजन) करतो, घर साफ ठेवणे, त्यांचे पाहूणचार कसे करायचे हे ठरविणे, कोणते खाद्यपदार्थ बनवायचे? वगैरे. सर्वकाहीचे नियोजन केले जाते. तसेच रमजान या पाहूण्यासाठी ही काही नियोजन आपल्याला करावया लागतील. खरं तर रमजानच्या आधी जो महिना येतो तो असतो ’शाबान’ चा महिना. या महिन्यापासून आपल्याला रमजानची तयारी करावी लागते. पैगंबर मुहम्मद सल्ल. हे शाबान मध्येही रोजे करत होते. बीबी आयशा (रजि.) सांगतात की, ’’आम्ही बघीतले आहे की पैगंबर मुहम्मद सल्ल. हे शाबानमध्येही रोजे ठेवत होते. दुसऱ्या महिन्यापेक्षा जास्त.  

सलमा बिन कुहेल म्हणतात की, शाबानला ’किराअतचा महिना’ कुरआन वाचण्याचा महिना म्हणतात. आमीर इब्ने कैस हे शाबानमध्ये आपले दुकान बंद ठेवून ’’किराअत ’’ करायचे.

सहसा आपण शाबान महिन्याबाबत गाफिल असतो. त्याकडे दुर्लक्ष करतो पण अबुबकर बलखी (रहे.) म्हणतात रजब महिन्याचे उदाहरण शेती लावायची, पेरणी करायची शाबानमध्ये पाणी द्यायचे आणि रमजानमध्ये तिची रास करायचे तर मग ज्याने परेणीच केली नसेल त्याला काय मिळणार? निराश नका होवू, रजब, शाबानचे महिने आपल्या हातातून गेलेत. यंदा मात्र पुढच्या रजब, शाबानमध्ये आपण भरपूर मेहनत करू अशी आशा ठेवत आणि अल्लाहकडे प्रार्थना करत की आम्हा सगळ्यांना पुढचा रजब, शाबान आणि रमजान लाभो आपण रमजानचे स्वागत करू. 

आधीचे लोक 6 महिन्या अगोदरपासून प्रार्थना करायचे.     

’’ हे अल्लाह आम्हाला रमजानपर्यंत पोहोचव’’ रमजान झाल्यानंतर 5 महिन्यांपर्यंत प्रार्थना करायचे की आम्ही केलेले चांगले कर्म स्वीकार कर.

रमजानुल मुबारकच्या पवित्र महिन्यात दाखल होत आहात तर खालील कामे जरूर करा. 

1. सर्वप्रथम आपण केलेले आतापर्यंतच्या चुकांची माफी मागा. अल्लाह अत्यंत दयाळू, कृपा करणारा आहे. तुमच्या सर्व चुकांना तो माफ करेल. अल्लाहकडे माफी तर मागायचीच सोबत कुणाला वाईट बोलले असेल तर त्यांची पण माफी मागायची, गुन्ह्यांचे ओझे घेऊन नाही तर ते त्यांच्यापासून मुक्त होवून रमजानमध्ये दाखल व्हा. 

2. आपल्याला खास प्रार्थना करावी लागणार की ह्या कोरोना महामारीपासून मानवजातीला मुक्ती दे. कोणताही त्रास रमजानमध्ये होऊ नये. शारीरिक, मानसिक, सामाजिकदृष्ट्या चांगले ठेव. 

3. आपली नियत साफ ठेवणे, नियत दुरूस्त करणे, मी जे काही चांगले कार्य करीन, उपासना करेन, रोजा हा सर्व काही फक्त अल्लाहसाठीच कोणाला दाखविण्यासाठी नव्हेच.

4. मनाच्या खुशीने व पुण्याई मिळेल या आशेने रोजे ठेवणे, खूप उन्हं आहे रोजे कसे होतील ही चिंता करायची नाही, मागील 2 वर्षांचा अनुभव आहे ना सुरूवातीला थोडेफार सहन होत नाही तर पुन्हा सवय होऊन जाते आपल्या शरीराला रिफ्रेश करणारे हे रोजे असतात. रिसर्च मध्ये हे आढळून आले आहे की, रोजामुळे शरीरात अ‍ॅटोफॅगी म्हणजे वाईट पेशी संपतात व कँसर सारख्या खतरनाक रोगापासून संरक्षण होते. 

5. मनाची स्वच्छता अतिशय मोलाची. मनात ’’इमान’’ येण्यासाठी त्याला स्वच्छ करणे गरजेचे. मनाला इर्षा, छळ, कपट, वाईट भावनांपासून स्वच्छ करणे हे घर आणि परिसर स्वच्छ करण्याइतकेच महत्त्वाचे. अब्दुल्ला इब्ने मसउद (रजि.) यांना कोणी विचारले की पैंगबरांचे अनुयायी रमजानचे स्वागत कसे करीत असत? त्यांनी उत्तर दिले कोणीही अनुयायी जेव्हा रमजानचा चंद्र पाहत होता त्याच्या मनात थोडाही द्वेष कोणाबद्दल नसायचा. आधीच्या लोकांना मान मिळाला ते जास्त नमाज, रोजामुळे नव्हे हे तर अनिवार्यच आहेत पण त्यांचे हृदय (मन) खूप सुंदर होते ते जनकल्याणाबाबत जागरूक होते. दुसऱ्यांची मदत करणे हे त्यांचे मूलमंत्र होते. साद बिन मुआझ (रजिअल्लाहु अनहु) एक अनुयायी होते. एकदा पैगंबर (सल्लम.) त्यांच्या अनुयायींसोबत बसले होते आणि म्हटले आता जो माणूस येईल त्याला स्वर्ग भेटणार, साद बिन मुआज आले. एका व्यक्तीला खूप आश्चर्य झाले. त्याला फार उत्सुकता झाली की हे असे काय करतात की ह्यांना स्वर्ग मिळणार. जेव्हा ते घरी चालले तर ती व्यक्ती सुद्धा त्यांच्या घरी गेली, 3 दिवस राहिली त्यांना विचारले मी बघायला आलो होतो तुम्ही काय चांगले काम करता, त्यांनी सांगितले माझे मन स्वच्छ आहे. मी कुणाबद्दल वाईट मनात ठेवत नाही आणि अल्लाहच्या आदेशाचे पालन करतो, फर्ज आणि नफील नमाज अदा करतो. 

6. आई-वडिलांचे आज्ञाधारक बनले पाहिजे. त्यांची सेवा करणे, त्यांना ’’उफ’’ सुद्धा न म्हणणे, आई-वडिलांची अवज्ञा करून केलेले चांगले कर्म अल्लाह स्वीकार करत नाही.

7. वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे. रमजान हे फक्त खाणेपिणे आणि झोपण्याचा महिना नसून जास्तीत जास्त ’’इबादत’’ करण्याचा महिना आहे. त्यामुळे जसे विद्यार्थी टाईम-टेबल बनवितात तसेच आपल्यालाही टाईम-टेबल बनवायचा आणि त्याप्रमाणे चालायचे आणि रमजानमध्ये यशस्वी व्हायचे आहे. 

8. जास्त वेळ सोशल मीडियामध्ये घालवू नये. बंद करणे शक्य नसेल तर थोडेसे वेळेचे नियोजन करून बघा. 

9. ह्या महिन्यात कुरआन वाचने, त्याच्यावर विचार करणे आणि त्यामधील शिकवणी आचरणात आणणे गरजेचे. फक्त वाचल्यामुळे पुण्याई मिळेल पण ज्या उद्देशासाठी कुरआन अवतरले ते साधता येणार नाही. म्हणून जास्तीत जास्त लक्ष कुरआन समजून वाचण्याकडे देणे हे महत्त्वाचे. हा एकमेव ग्रंथ आहे जो मानवाचे आयुष्य बदलू शकतो. 

10. आपले चरित्र दुरूस्त ठेवणे. तरूणाईत, आपल्याला कोणीतरी काळजी करणारा, स्तुती करणारा, प्रेम करणारा पाहिजे असतो. मग कोणाची तरी स्टाईल आवडते, कोणाचे सौंदर्य आपल्या मनाला भावते, कोणाचे स्टेटस, कोणाच्या ऐश्वर्यावर आपण प्रेम करायला लागतो किंवा कोणीतरी आपल्याला समजून घेतो म्हणून आपण प्रेमात अडकतो. प्रेम करा परंतु, परमेश्वराशी. हेच खरे प्रेम. तोच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा. बाकी सर्व प्रेम श्वासापुरते पण परमेशवराचे प्रेम हे नेहमी राहणारे. मृत्यूनंतरही कामात येणारे, आपण दररोज मृत्यूचे तांडव बघत आहोत मग प्रश्न हा मृत्यू पावलेल्या लोकांचा आत्मा कोठे जाणार? विज्ञान याचे उत्तर देऊ शकत नाही. येथे धर्म आपले मार्गदर्शन करतो की, चांगली आत्मा स्वर्गात व वाईट आत्मा नरकात जाईल. जे कोणी स्वर्गाला नाकारत असतील किंवा परमेश्वरालाच नाकारत असतील त्यांच्यासाठी एक उदाहरण आईच्या पोटात असलेल्या बाळाला आई दिसत नाही म्हणून का त्याने आईचे अस्तित्व नाकारावे? त्या बाळाला आपण पोटाबाहेरच्या जगाची कल्पना देऊ शकतो का? आणि दिली तरी तो त्याच्या बुद्धी बाहेरीलच. तशीच आपली व्यथा, ईश्वर दिसत नाही म्हणून मानायचेच नाही आणि स्वर्ग-नर्क तर आपल्याबुद्धी पलीकडील. मेलं की संपलं असं नाही, सर्व मानवजात आपसात बंधुत्वाच्या नात्याने बांधली गेलेली. त्या एक निर्मात्याच्या प्रेमात पडून आपसात प्रेम करा. कारण त्याचे हेच शिक्षण माणसाचे ऑक्सीजन. 

अनैतिक प्रेमप्रकरणातून दररोज कितीतरी आत्महत्या होतात म्हणून अल्लाहवरच प्रेम करा त्याची सर्व वचने हे खरी आहेत. त्याने मानवासाठी असा स्वर्ग बनवून ठेवला आहे की तो कोणी बघितलेला नाही, न ऐकले, न कुणाच्या मनात, विचारातही आला नाही म्हणून प्रेम फक्त अल्लाहवरच. पूर्ण जगाचा मालक तरी आपल्यावर प्रेम करायला तयार आहे. त्याचा चेहरा पाहण्यासाठी आपल्याला चांगले कर्म करायचे. कारण तो स्वर्गातल्या लोकांना दर्शन देणार.

11. जकात देणे, गोरगरीबांची काळजी करणे आपल्या राशनसोबत त्यांचेही राशन भरणे.

12. आपण पैसा गोळा करतो लग्नासाठी, घर बांधण्यासाठी वगैरे पण आधीचे लोक पैसा गोळा करायचे रमजानमध्ये गोरगरीबांची मदत करण्यासाठी.

13. शेजाऱ्यांची खबरगीरी घेणे, त्यांची मदत करणे. 

14. मोलकरणीचे ओझे हलके करणे तिची मदत करणे ही पुण्याई. घाम वाळण्या अगोदर मजुरी देणे ही पुण्याई.

15. कोणाशी चांगले बोलणे, आनंदीत होवून भेटणे हे ही पुण्याईच.

16. बी.पी. शुगरच्या रूग्णांनी डॉ्नटरांचा सल्ला घेऊन रोजे ठेवावेत. स्वर्गाची आठ दारे आहेत. त्यापैकी एका दरवाजाचे नाव अर-रिय्यान आहे. त्या दाराहून फक्त रोजा ठेवणारे लोकच स्वर्गात प्रवेश करू शकतील, आणि रमजानमध्ये एक पुण्याईचे 10, 70, 700 पर्यंत पुण्य दिले जाते. जणू काही पुण्याई करण्याचेच हे दिवस आहेत. कोठे सेल लागल्यास आपण कसा त्वरा करतो तसेच आपल्याला त्वरा करायची आहे. अर-रिय्यान मधून प्रवेश करण्यासाठी अल्लाह सर्वांना सदबुद्धी देवो आणि सत्कर्मांना स्वीकार करो. (आमीन.)


- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935


iftar

पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की पूर्वीच्या लोकांसाठी जसे रोजा (उपवास) करणे अनिवार्य केले होते, तसेच तुमच्यावरही अनिवार्य केले. पवित्र कुरआनच्या अवतरणासाठीही अल्लाहनं रमजान महिन्याचीच निवड केली होती. कुरआन म्हणजेच लोकांसाठी मार्गदर्शनपर ग्रंथ आहे. रोजाचा प्रमुख उद्देश कुरआनमध्ये जो सांगितला आहे, अल्लाहने मानवाला जे मार्गदर्शन दिले आहे त्याचे त्याने आभार मानावे.

मानवाचे अस्तित्व म्हणजे शरीर आणि आत्मा. माणूस आपल्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यात सदैव व्यस्त असतो. जगण्यासाठी लागणाऱ्या गरजा जरी क्षुल्लक असल्या तरी त्या कधीही संपत होत नसतात. एकानंतर दुसरी गरज. त्या गरजा पुढे जाऊन आशा-आकांक्षांचे रूप घेतात. माणसाच्या या सुख-सुविधा कधीही संपत नाहीत. एकानंतर दुसऱ्याची इच्छा होत असते.

रमजानचे रोजे महिनाभर एक प्रकारचा प्रशिक्षणकाळ आहे. महिनाभर सारे मुस्लिम श्रीमंत असोत की गरीब राजा असो की प्रजा सर्वचे सर्व रोजाचे पालन करतात. सगळ्यांसाठी एकच नियम. जे सक्षम नसतील, शारीरिकदृष्ट्या दुर्बल असून त्यांना १२ तास जेवण-पाण्याविना राहणे शक्य नाही त्यांना सवलत दिली गेली, पण ती सवलत अशी की त्यांना रमजान महिनाभर एखाद्या वंचित गरीब व्यक्तीला दोन वेळचे जेवण पुरवावे.

रोजा म्हणजे आध्यात्मिक समृद्धी प्राप्त करण्याचे साधन आहे. शारीरिक इच्छापूर्तींना महिनाभर (दिवसा) वर्ज्य करून आत्मिक समाधानासाठी स्वतःला वाहून घ्यावे. अरबी भाषेत रोजाचा अर्थ स्वतःला रोखून ठेवणे, असा होतो. संयम बाळगणे आणि ठामपणे उभे राहण्यासाठीही अरबी भाषेत ‘सौम’ या शब्दाचा वापर केला जातो. ज्याला उर्दू भाषेत रोजा म्हटले जाते. रोजा किंवा उपवास प्रत्येक जनसमूह आणि धर्मात कोणत्या ना कोणत्या प्रकारे आढळतो. म्हणजे मानवजातीसाठी ईश्वराने रोजा (उपवास) करणे अनिवार्य केले आहे.

पवित्र कुरआनविषयी अल्लाहनं असे सांगितले आहे की हे साऱ्या मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे. केवळ मुस्लिमांसाठीच किंवा मुस्लिमांचा हा ग्रंथ नाही. साऱ्या मानवांचा हा ग्रंथ आहे. यातील मार्गदर्शनदेखील साऱ्या मानवांसाठी आहे. या कुरआनच्या दुसऱ्या अध्यायातील सुरुवातीला असे सांगितले आहे की हे त्यांच्यासाठी मार्गदर्शन आहे जे लोक परोक्षावर श्रद्धा ठेवतात, उपासना करतात (नमाज अदा करतात) आणि एवढ्यावरच न थांबता त्यांना जी काही साधने अल्लाहने बहाल केली आहेत त्यातून ते साऱ्या गरजवंतांना पुरवितात. त्यांच्या जगण्यासाठी लागणाऱ्या साधनांची पूर्तता करतात, असे लोक सदाचारी आहेत. म्हणजे सदाचारी असण्यासाठी फक्त श्रद्धा पुरेशी नाही तर आपल्या अवतीभवती असलेल्या मानसांची, त्यांच्या गरजांची, त्यांच्या अडीअडचणींची जाणीव ठेवणेदेखील आवश्यक आहे. मग हे लोक कोणत्या का जातीधर्माचे असोत, फक्त मुस्लिमांची काळजी घेणे असे म्हटले नाही. पुढे जाऊन असे म्हटले आहे की असे लोक तुमच्यावर जे अवतरले आहे आणि तुमच्या पूर्वीच्यांवर जे काही पाठवले गेले होते यावर श्रद्धा ठेवतात तर मग हे लोकया जगात आणि परलोकातदेखील यशस्वी ठरतील.

अनाथांना झिडकारणे, त्यांना हाकलून देणे म्हणजे धर्म नाकारणे आहे. जे लोक अनाथांना, गरजूंना जवळ करत नाहीत, त्यांची विचारपूस करत नाहीत, त्यांच्या देखभालीसाठी एकमेकांना प्रोत्साहित करत नाहीत अशा लोकांविषयी पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की ते धर्माचरणाचा देखावा करतात. हे लोकतर आपसातील छोट्यामोठ्या गरजांचीसुद्धा पूर्तता करत नाहीत. हे नमूद करण्याची गरजच नाही की कुरआन साऱ्या मानवजातीसाठी असल्याने त्यातील शिकवणी सगळ्या मानवजातीसाठी आहेत, मग ते कोणत्याही जातीधर्माचे का असेनात.

- सय्यद इफ्तिखार अहमदउपरोक्त दुसऱ्या आयतीमधील पहिल्या भागात धर्मपरायणता व ईशभयाची विशेष शिकवण देण्यात आली. धर्मपरायणतेचा हक्क असा की, अल्लाहचे आज्ञापालन करीत आपल्या जीवनाची वाटचाल करावी आणि अगदी अंतिम श्वासापर्यंत याच पद्धतीने जीवन व्यतीत करावे.

अर्थात आपण इस्लामकरिता जीवन समर्पित करावे. व्यक्तिगत व सामूहिक जीवनात, घरात किंवा घराबाहेर, हवेतील किंवा पाण्यावरील प्रवासात प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक वेळेस आम्ही अल्लाहचे सच्चे दास व पैगंबर मुहम्मद  (स.) याचे अनुयायी आहोत. जोवर शक्य आहे आपल्या सर्व पात्रता अल्लाहच्या दासत्वासाठी समर्पित कराव्यात आयतच्या दुसऱ्या भागात ईशआज्ञाधारकतेची नीती जीवनाच्या शेवटापर्यंत कायम राहावी. मृत्यूदूत जेव्हा कधी येईल तेव्हा आम्हाला त्याने धर्मपरायण व ईशपरायणशील पाहावे आणि आम्ही आपल्या पालनकर्त्याचे दासत्व करत करत त्याच्यासमोर हजर व्हावे. याचा अर्थ हासुद्धा आहे की जेव्हा इस्लाम आणि प्राण यापैकी एक निवडण्याचा प्रसंग आल्यास डोळे झाकून इस्लामची निवड करावी. शाश्वत प्रकोप व शिक्षेला कारणीभूत कुफ्र (द्रोह) व विरोधकाच्या स्थितीत मरण आहे आणि त्या मरणापेक्षा श्रेष्ठ मरण दुसरे नाही जे अल्लाहसाठी आणि अल्लाहच्या मार्गात येते. शहीद मरताक्षणी जन्नत प्राप्त करतो. शहादत श्रद्धावंतांचे जीवन ध्येय आहे. शहादाची (वीरमरणाची) तर अल्लाहचे पैगंबर मुहम्मद  (स.) यांची सुद्धा कामना होती.माननीय अब्बास (रजि.) हे वर्णन करतात.

‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) पावसासाठीची प्रार्थना (इस्तिस्का) करण्यासाठी बाहेर पडले. पैगंबर साज-सज्जारहित साधी राहणी, विनम्रता, विनीत आणि अल्लाहसमोर नतमस्तक होऊन याचना करणारे होते.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या चेहऱ्यावरून विनम्रता व विनीतभाव प्रकट होत असे. त्यांच्या चेहऱ्यावरून रुदन व द्रवणशीलतेचा भाव व्यक्त होत होता. पैगंबर पाऊस पडण्यासाठी याचना करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांना याचे पूर्ण भान होते की ईशकृपेला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मग ती कृपा पावसाच्या रूपात किंवा अन्य रूपात असोत, आवश्यक आहे की दासाने आपल्या प्रभुपुढे विनीतभावविभोर होऊन गरजेला प्रस्तुत करावे. मनुष्याला तर प्रत्येक वेळी व प्रत्येक स्थितीत विनीत व आश्रित दास बनूनच राहिले पाहिजे, परंतु संकटसमयी तर अनिवार्यत: दासाला त्याच्या विवशतेचे व आश्रितपणाच्या पूर्ण भान असणे आवश्यक आहे. दासाच्या शरीरावर जे कापड त्याची शोभा वाढवतात ते फक्त विनयशीलतेचे कापड आहे, अन्य दुसरे कोणतेही कापड नाही. ईशप्रेति याच बावनेला मनुष्याच्या आचरणात पूर्णत: आपल्या मार्गदर्शनाद्वारा जागृत करतात.- सय्यद सआदतुल्लाह हुसैनी

साम्राज्यवाद दमन आणि शोषणावर आधारित आहे. परंतु जेव्हा साम्राज्य भांडवलदारांच्या हातात जाते तेव्हा त्याचे परिणाम अतिभयानक होतात. या संपूर्ण व्यवस्थेत प्रसारमाध्यमं महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असतात. प्रसारमाध्यमं भांडवलदारांच्या इशाऱ्यावर कशी नाचू लागतात याचा खुलासा या पुस्तिकेत आहे.

या पुस्तिकेत या व्यवस्थेत स्त्रियांवर होणाऱ्या दुष्परिणामांना विशद करण्यात आले आहे. स्त्रियांचे शोषण, स्त्री शरीर एक वस्तू, वेश्यावृत्ती, सौंदर्यप्रसाधणे, फॅशन, उपभोक्तावाद यावर चर्चा आली आहे आणि शेवटी यावर इस्लामी उपाय कुरआन व हदीसच्या प्रकाशात विशद करण्यात आले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 253     -पृष्ठे - 44 मूल्य - 20        आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/ehr15oakjpubcux9ix4o3ed5xfajmqzr
Ramzan

गत वर्षापासून अख्ख जग कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे जगण्याशी झूंजत आहे लहान, थोर, गरीब, श्रीमंत सर्व स्तरातील नागरिकांची फरफट सुरू आहे अशातच या महामारीमुळे भारतात 1 लाख 66 हजार लोक जग सोडून गेले आहेत तर जगात 28 लाख 7 हजार मृत्यू पावले आहेत. मात्र आपणा सर्वांना यंदाचा रमजान पाहण्याची संधी मिळाली आहे, आपल्या भाग्याची रेषा गडद असल्याचं सध्यातरी वाटत आहे कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा लॉकडाऊन लागलं त्यामुळे यंदाच्या रमजानमधील रौनकही फिक्कटच राहणार. मात्र जबाबदारी वाढली आहे रमजानचा खरा हक्क अदा करण्याची

संयम, शांती, त्याग, एकात्मता, चारित्र्यसंपन्नता, ईशपरायणता, दानशुरता, प्रेमभाव,  शारीरिक संपन्नता आदी सद्गुणांनी भरपूर रमजान आम्हाला मेजवानी देणार आहे त्याचा लाभ घेणं श्रद्धावान ईमानधारकांसाठी अनिवार्य आहे रोजा इस्लामच्या पाच मुलभूत अनिवार्य कार्यापैकी एक. रोजा इमानधारकांसाठी अध्यात्मिक पर्वणीबरोबरच ऐहिक आणि पारलौकिक जीवनाचे सखोल मार्गदर्शन करतो रमजानमध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल यांच्यावर कुरआनचे अवतरण सुरू झाल्यामुळे सर्वात मोठं गिफ्ट ईश्वराकडून आम्हाला कुरआन स्वरूपात रमजानमध्येच मिळालेले आहे  म्हणून रमजानचे अनन्यसाधारण महत्व आहे. कुरआनमध्ये एकूणएक मानवहितासाठी आवश्यक सर्वच बाबींचा उलगडा करण्यात आला आहे यशस्वी जीवनाची गुरूकुल्ली कुरआनमध्ये सापडते यासाठी प्रत्येक व्यक्ती जो जीवनाचे खरे रहस्य, खरे महत्व व खरे साफल्यता जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे, ईश्वराशी संवाद साधायचा आहे अशी मनोमन इच्छा बाळगतो त्याने कुरआनचं समजून पठन करणं अनिवार्य आहे 

ईश्वराची कृपा पदरी पाडून घेण्यासाठी जगातील सर्व मानवांकरिता रमजानचा महिना अतिमहत्वाचा आहे रोजांचे महत्व अधोरेखित करताना कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘‘ हे ईमानधारकानो, विहित केले तुमच्यावर उपवास जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल.’’ 

‘‘ हे काही ठराविक दिवसांचे उपवास आहेत. तर तुमच्यापैकी जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उपवास करावेत आणि ज्या लोकाना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल (परंतु उपवास करणार नाहीत) त्यांनी दुर्बलांना मोबदला (फिदिया) म्हणून जेवू घालावे. एका उपवासासाठी एका दुर्बलाला जेवू घालावे आणि जो स्वेच्छापूर्वक अधिक भले करील तर ते त्याच्या स्वत:साठीच भले आहे. परंतु जर तुम्ही जाणलेत तर तुमच्यासाठी हेच अधिक उचित आहे कि तुम्ही उपवास करावा.’’ 

‘‘ रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला ह्या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यांत पूर्ण उपवास करावेत. आणि जे आजारी असतील किंवा प्रवासांत असतील त्यांनी उपवास काळानंतर उरलेल्या उपवासांची संख्या पूर्ण करावी. अल्लाह तुमच्यासाठी सुविधा इच्छितो अडचणी इच्छित नाही. ही पद्धत ह्यासाठीच सांगितली जात आहे की तुम्ही उपवासांची संख्या पूर्ण करावी व ज्या सरळ मार्गावर अल्लाहने तुम्हाला आणले आहे आणि जे मार्गदर्शन अल्लाहने तुम्हाला प्रदान केले आहे त्यावर तुम्ही अल्लाहची थोरवी वर्णावी तसेच तुम्ही अल्लाहचे ऋण व्यक्त करावे.’’  (संदर्भ : कुरआन सुरे अलबकरा आयत नं 183 ते 185)

सदर आयातींमध्ये रोजाची अनिवार्यता आणि त्याबद्दल मार्गदर्शक सूचनाही सांगितल्या आहेत तसेच रमजान रोजेधारकांसाठी तर पर्वणी आहेच शिवाय जे गरीब, गरजवंत आहेत त्यांच्याकरिताही आनंदाचा महिना आहे या महिन्यात जकात, सदका, फित्राच्या माध्यमातून गरीब, गरजवंतांची सेवा करण्याचा मान ऐपतदार ईमानधारकांना मिळतो 

यंदा कोरोनाचा काळ असल्यामुळे आपसुकच लॉकडाऊनमुळे आपल्यावर बाहेर पडण्यासाठी, व्यवहार करण्यासाठी, बाजारात फिरण्यासाठी, हॉटेल आदी ठिकाणी मिष्टांनाचा आस्वाद घेण्यावर बरीचशी बंधने आल्यामुळे रमजानच्या रौनकपासून काही प्रमाणात आम्हाला मुकावं लागणार आहे मात्र स्वत:मध्ये मानवकल्याणासाठी आवश्यक ते बदल करून घेण्याची संधी आहे रोजा फक्त उपवासाचं नावं नाही तर सर्व इंद्रियांचा विकास करण्याची संधी देतो त्यामुळे रमजान महिन्याचं स्वागत करतो आणि आपणां सर्वांना रमजानचा हक्क अदा करण्याची सद्बुद्धी मिळो, हीच अल्लाहकडे प्रार्थना करतो. आमीन.  

- बशीर शेख
धर्मपरायणता आणि ईशभयच्या शिकवणी-व्यतिरिक्त वर पठण करण्यात आलेल्या आयतीमध्ये मानवांचे आणि नातलगांचे हक्क पूर्ण करण्याची विशेष शिकवण देण्यात आली आहे. समस्त मानवांना अल्लाहने निर्माण केले आहे. सर्व मानव हे एकाच माता-पित्याची संतती असल्याने आपण समस्त मानव एकाच परिवाराचे सदस्य आहोत. आपसांत बंधु आणि नातलग आहोत. म्हणून प्रत्येकाचे एकमेकांवर हक्क आहेत. हे हक्क पूर्ण करणे नितांत आवश्यक आहे. जसी अल्लाहची दासत्व हदीसद्वारा माहीत होते अल्लाह कुफ्र व शिर्कशिवाय अल्लाहस वाटल्यास  इतर अपराधांची माफी देईल, मात्र मानवी हक्कांची पायमल्ली मुळीच खपवून घेणार नाही व माफ करणार नाही जोपर्यंत मनुष्य स्वत: माफ करत नाही.

विवाहप्रसंगी मानवाधिकार आणि नातलगांचे अधिकार पूर्ण करण्याची शिकवण अत्यंत महत्त्वपूर्ण असून नववधू आणि वराच्या नातलग व याप्रसंगी हजर असलेल्या लोकांसाठी अमूल्य भेट आहे. पतीने पत्नीचे हक्क पूर्ण केल्यास, मुलांनी मात्यापित्यांचे, मातापित्यांनी मुलांचे आणि नातलगांनी एकदुसऱ्यांचे आणि शेजाऱ्यांने शेजाऱ्याचे तसेच प्रत्येकाने दुसऱ्याचे हक्क जर पूर्ण केले तर या भूतलावर स्वर्गरूपी नंदनवन बहरेल.

या आयतीवरून हे स्पष्ट होते की सर्व मानव एकाच माता-पित्याची संतती असून सर्वजण एकाच परिवार आणि एकाच वंशाचे सदस्य आहेत. म्हणून वर्ण आणि वंश तसेच जाती-पातीच्या आधारे कोणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही. त्या आधारावर वरिष्ठ-कनिष्ठ आणि उच्च-नीच भेदभाव इस्लामने नष्ट केला आहे.माननीय आएशा (रजि.) यांचे निवेदन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माझा आधार घेऊन बसले असताना सांगितले, ‘‘हे अल्लाह! मला क्षमा कर आणि माझ्यावर दया कर आणि माझ्या जगतसखा! मला तुझी भेट घडू दे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

आयुष्यभर ईशमार्गात सक्रिय राहूनसुद्धा अल्लाहपाशी क्षमादान आणि दयेची, कृपेची याचना करीत आहेत आणि कामना करीत आहेत की ‘जीवनसखा’ची भेट घडावी. हीच विनम्रता आणि भक्तीभाव आहे जो ईमान (श्रद्धाशीलते) चा वास्तविक आत्मा, हृदय तथा प्राणसौंदर्य आहे.- सय्यद सुजाअत हुसैनी

भांडवलशाही दमनकारी व शोषणावर आधारित व्यवस्था आहे. भांडवलदारांच्या हातात सत्ता आल्यास देशाला भयानक परिणामांना सामोरे जावे लागते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण इ. पूर्ण वातावरणच भक्ष्यस्थानी येते. चंगळवादी जीवनशैलीचा परिणाम म्हणून उपभोक्तावाद फोफावतो व सामाजिक समस्या विक्राळ रुप धारण करतात.

ही पुस्तिका वाचकांना भांडवलशाही व्यवस्थेला पूर्णपणे समजून घेण्यास उपयुक्त ठरेल. तसेच यावरील इस्लामीक उपाय कुरआन प्रकाशात कोणते आहेत, याचे विवेचन करण्यात आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 252     -पृष्ठे - 48 मूल्य - 22  आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/50ia0bgr9huh60hjr2lputz6jsfkevph


हजरत उमर (र.) यांनी सर्वप्रथम प्रतिनिधी सभा आणि मार्गदर्शक मंडळाची संकल्पना प्रस्थापित केली. त्यांनी अनेकदा हे स्पष्ट केले होते की सल्लामसलतीविना खिलाफत अवैध आहे. विशेष प्रसंगी मजलिसे शूरा (मार्गदर्शक मंडळ) भरविल्या जात होत्या. या व्यतिरिक्त दैनंदिन कामकाजासाठी मस्जिदे नबवीमध्ये सभांचे आयोजन होत होते. विविध प्रांत आणि जिल्ह्यांचे जे अहवाल प्राप्त होत असत ह. उमर या सभेत सर्वांना त्याची माहिती देत असत. एखाद्या समस्येविषयी ह. उमर या सभेतील सभासदांशी विचारविनिमय करून त्यांचे म्हणणे ऐकून घेत आणि त्यानुसार त्यांचे निवारण केले जात असे.

मजलिसे शुराच्या सभासदांव्यतिरिक्त सामान्य नागरिकांनाही शासकीय कामकाजाच्या नियोजनात सहभागी करून घेतले जात असे. जिल्ह्यावर प्रभारींची नियुक्ती जनतेच्या सहभागानने केली जाई. काही प्रसंगी तर निवडणुकीच्या प्रक्रियेतून जिल्ह्यांचे प्रभारी निवडला जात असे. कुफा, बसरा आणि शाम (सीरिया) या जिल्ह्यांतील नागरिकांना असा आदेश दिला होता की त्यांनी आपापल्या जिल्ह्यातील अशा व्यक्तींची निवड करावी जो सदाचारी, प्रामाणिक आणि सक्षम असावेत.

लोकतांत्रिक शास्त्र पद्धतीचे सौंदर्य असे की राज्यकर्ता – सत्ताधारी आणि सामान्य नागरिकांना एकसारखे अधिकार प्राप्त असावेत. या उलट कोणते कायदे – नियम केले जाऊ नयेत.

सत्ताधारीला आपल्या दैनंदिन गरजांची पूर्तता होईल यापेक्षा जास्त त्याने राज्याच्या खजिन्यातून घेऊ नये. सामाजिक क्षेत्रात शासनकर्त्याला कोणते विशेष अधिकार, मानमरातब दिले जाऊ नयेत. त्याचे अधिकार मर्यादित असावेत. सामान्य नागरिकांना आपल्या राज्यक्त्यावर टीका-टिप्पणी करण्याची मुभा असावी. यापेक्षा अधिक अधिकार ह. उमर यांच्या पूर्वीच्या कोणत्याही काळात, कोणत्याही राष्ट्रात, कुण्या शासक-राज्यकर्त्याने दिलेले नव्हते. ह. उमर यांनी आपल्या एका प्रवचनात म्हटले होते की,

"मला राष्ट्राच्या तिजोरीतून इतकाच खर्च दिला जावा, जो एका अनाथाच्या दैनंदिन गरजांची सोय करणअयासाठी आवश्यक असेल. जर मला श्रीमंती लाभली असती तर मला काहीही घेण्याचा अधिकार नसता. माझ्यावर तुमचे अनेकविध हक्काधिकार आहेत, ज्यांचा तुम्ही मला हिशोब मागितला पाहिजे. दुसरे असे की वाममार्गांनी राज्याच्या तिजोरीत भर घालू नये. माझ्या हाती कर आकारणी आणि युद्धापासून मिळालेल्या मालमत्तेच्या संपत्तीचा कोणत्याही परिस्थितीत गैरवापर होता कामा नये. देशाची सुरक्षा आणि तुम्हाला खर्चासाठी सोय करणे माझ्यावर बंधनकारक आहे. त्याचबरोबर कोणत्याही हानीकारक परिस्थितीपासून तुमची सुरक्षा करणं माझे कर्तव्य आहे."

(संदर्भ – अल-फारुक, मौलाना शिवली नुअमानी)

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद


जगात जेवढे काही धर्म आहेत त्यांना काहीतरी नाव आहे. धर्माचे नाव एका विशिष्ट व्यक्तीवर ठेवले जाते किंवा त्या वंशाच्या धर्मावर असते ज्यात तो वंश उदयास येतो.  उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्म हा ईसा (अलैहिस्सलाम) यांच्या नावावर आहे. बौद्ध धर्म गौतम बुद्धांच्या नावावर आहे. ज्यू धर्माचे नाव ज्यूमधील एका कबिल्याच्या नावावर यहूदी ठेवलेले आहे ज्याचे नाव यहुदा होते. असाच प्रकार इतर धर्मांच्याबाबतीत आहे. पण इस्लाम धर्माचे नाव कोणत्या व्यक्ती अथवा वंशाच्या नावावर नाही. इस्लाम ही एक खास / विशिष्ट प्रवृत्तीला जाहीर करतो जी इस्लाम या शब्दात आहे. हे नाव कुठल्याही व्यक्तीने शोधून काढलेले नाही किंवा हे नाव एखाद्या वंशाच्या नावावर ठेवलेले आहे. याचा सबंध कोणा व्यक्ती किंवा देशाशीही नाही. फक्त इस्लामची गुणवैशिष्ट्ये लोकांमध्ये बानवणे याचा उद्देश आहे. प्रत्येक काळात ते लोक जे सत्य बोलत होते, पवित्र आचरण करत होते ते सर्व मुस्लिम होते आहे आणि भविष्यातही राहतील. (अरबी भाषेत इस्लामचा अर्थ होतो आदेश मानने. इस्लाम या शब्दाचा दूसरा अर्थ शांती, आश्रय देणे, संरक्षण करणे सुद्धा आहे.) 

आपण पाहतो जगात आज जितक्या काही वस्तू आहेत ते एका नियमात बांधलेल्या आहेत. सूर्य, चंद्र, पृथ्वी सर्व आपल्या ठरवून दिलेल्या कक्षेतच फिरतात. पाणी, हवा, झाड-झुडपे सर्व काही एक नियमानुसार चालतात. मनुष्यासाठीही हे नियम आहेतच तो सुद्धा या नियमाप्रमाणेच श्वास घेतो, पाणी पितो, जेवन करतो त्याच्या शरीराचे सर्व अवयव काम करत असतात.  

या सर्व गोष्टी ज्या निर्मात्याने बनविल्या त्यानेच या नियमात या गोष्टींना बांधले आहे. संपूर्ण सृष्टी त्याचा आदेश मानणारी आहे. त्याप्रमाणे या सर्वांचा धर्म इस्लाम आहे व त्या सर्व गोष्टी मुसलमान आहेत. कारण ते आपल्या निर्मात्याचे म्हणजेच अल्लाहच्या आदेशाचे पालन करीत आहेत. 

सूर्य,चंद्र, तारे, जमीन, वृक्ष, दगड, प्राणी या सर्व गोष्टी मुस्लिम आहेत व सर्व मनुष्यही मुस्लिम आहेत पण काही मनुष्य शिर्क व कुफ्र सारखे गुन्हा करून मुस्लिम बनण्यापासून वंचित राहतात. 

मनुष्याला आपले मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, तो इस्लाम आत्मसात करून मुस्लिम होऊ शकतो पण हे त्याच्या निवडीची बाब आहे. 

एक व्यक्ती आहे जो आपल्या निर्मात्याला ओळखतो व त्यालाच आपला मालक समजतो आणि तो आपल्या जीवनात आपल्या निर्मार्त्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतो तो पूर्णपणे मुस्लिम आहे तो आता सत्य व शांतीच्या मार्गाने अनुकरण करेल. 

कुफ्र म्हणजे काय?

आता एक दुसरा व्यक्ती जो जन्मतः तर मुस्लिम आहे पण त्याने अल्लाहचे आदेश मानले नाहीत तर तो व्यक्ती काफीर आहे. कुफ्रचा अर्थ लपवने, नकार देणे किंवा पडदा टाकणे असा होतो. 

कुफ्रचे नुकसान

कुफ्र हे एक अज्ञान आहे, अथवा खरे अज्ञान कुफ्रच आहे. जो व्यक्ती आपल्या निर्मात्याला मानण्यास मनाई करत असेल ज्याने कार्बन, सोडियम व कितीतरी गोष्टींना मिळवून मनुष्य तयार केले. ज्याने एवढे सुंदर जग अगदी काटेकोरपणे बनवले ज्याच्याकडे सर्व ज्ञान आहे त्याचा आदेश मानण्यास नकार करणाऱ्याला अज्ञानीच म्हणावे लागेल.

त्याने आता जीवनात कितीही ज्ञान आत्मसात केले तरीही त्याचा उपयोग नाही कारण त्याला ज्ञानाचे पहिले टोकच मिळाले नाही. 

सर्वात मोठे अत्याचार / दडपण कुफ्र आहे कारण आपल्या प्रवृत्तीच्या विरोधात त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. सर्व गोष्टींची प्रवृत्ती आहे कि ते अल्लाहच्या आदेशाचे पालन करावेत. पण कुफ्र करणारा व्यक्ती या प्रवृत्तीच्या विरूद्ध कामे करतो. 

कुफ्र म्हणजे दडपणे नव्हे तर बंड, कृतघ्नता व नमक-हरामीपण आहे. ज्या अल्लाहने बुद्धी दिली त्याच बुद्धीचा वापर अल्लाहविरूद्ध होत असेल तर त्याला बंड म्हणणार. ज्या अल्लाहमुळे आपण जगतो आहोत त्या अल्लाहचे आभार न मानणे व त्याविरूद्धच कारवाया करणे यालाच नमक-हरामी म्हणतात. 

कुफ्रमुळे जे काही नुकसान होते ते मनुष्याचेच होते. ज्या बादशाहची सल्तनत एवढी मोठी आहे कि वैज्ञानिकांनाही याच्या शेवटच्या टोकाचा शोध घेता आला नाही. त्या अल्लाहचे मनुष्याचे त्याला मानण्या न मानण्याने काही नुकसान होणार नाही.

कुफ्र करणाऱ्याला कधीच सत्याचा मार्ग सापडणार नाही व ज्ञान प्रप्त होणार नाही. त्याचे सामाजिक जीवन खराब होईल त्याची आर्थिक स्थिती खराब होईल. त्याची सत्ता खराब होईल, तो जगात अशांतता पसरवेल. हिंसा करेल, दुसऱ्यांचे हक मारेल, दडपशाही करेल कारण जो आपल्या निर्मात्याला ओळखत नाही त्यात काय नितीमत्ता आणि काय सत्य असणार तो आपली संपत्ती गैरप्रकारे कमवेल. आखिरतच्या दिवशी त्याचेच हात, पाय व इतर अवयव त्याच्या विरूद्ध अल्लाहच्या दरबारात ग्वाही देतील. 

इस्लामचे फायदे

अल्लाहने मनुष्याला विचार करण्याची, बरोबर-चूक कोणते ही ओळखण्याचा विवेक दिला आहे तसेच स्वातंत्र्यही दिले आहे. हे स्वातंत्र्यच खरी परीक्षा आहे. आपण या स्वातंत्र्याचा वापर कसे करतो यावर आपले यश अवलंबून आहे. आपण ईश्वराला ओखळून सत्य व त्याच्या कायद्याचे पालन करत असू तर आपल्याला यश मिळेल अन्यथा नाही. 

जो मुसलमान असेल तो आपल्या ज्ञानाचा उपयोग मनुष्याचा कल्याणासाठी करेल तो कधीच स्वतःला कुठल्याही गोष्टीचा मालक समजणार नाही त्यात अहंकार असणार नाही. 

तसेच इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्राचे ज्ञान मिळवून एक मुस्लिम आपल्या प्रयत्नाने एका काफीरापेक्षा मागे नसेल. पण दोघांत अंतर असेल. एक मुस्लिम चांगल्या पद्धतीने या ज्ञानाचा वापर करेल. भूतकाळात तो वंश ज्या जमाती नष्ट झाल्या त्यांच्यापासून तो बोध घेईल. 

मुसलमानाचे विचार हे सत्य. अल्लाहला मानणारे असतील तो सर्व काही अल्लाहचे आहे असे मोल व अल्लाहने दिलेल्या गोष्टींचा वापर अल्लाहच्या मर्जीच्या प्रमाणे तो करेल. कारण त्याला एकादिवशी सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागणार आहे. 

असे ज्याचे विचार असतील तो स्वतःला वाईट कामांपासून मुक्त ठेवेल. तो आपल्या बुद्धीला वाईट विचारांपासून रोखेल. डोळ्यांनी, कानांनी वाईट काम करणार नाही. त्यांच्या तोंडून वाईट गोष्टी निघणार नाहीत. तो आपले हात अत्याचार करण्यासाठी उचलणार नाही, त्याचे पाय चुकीच्या जागी जाणार नाहीत. तो गैरप्रकारे ऐशआरामाचे जीवन जगणार नाही तर तो साधे जीवन जगेल. 

या व्यक्तीसारखा सभ्य कोणीही नसेल तो दोन्ही जगात यश संपादन करेल. त्याच्यासारखा सन्मान कोणाचा नसेल कारण तो अल्लाहशिवाय कोणासमोर झुकत नाही. त्याच्यासारखा ताकतवान कोणी नसेल कारण त्याच्या मनात अल्लाहशिवाय कोणाचीही भीती नाही. तो थोड्या संपत्तीवरच समाधान मानणारा असेल तो सर्वांना प्रिय असेल कारण तो सर्वांची मदत करेल. सर्वांचे हक अदा करेल. 

मुस्लिमाची ही प्रवृत्ती बघितल्यानंतर एक मुस्लिम कधीच अस्वाभीमानी व खालच्या दर्जाचा राहूच शकत नाही.

या जगात अल्लाहच्या आदेशाचे पालन करून व सन्मानाने जीवन जगल्यानंतर त्या जगात अल्लाह कधीही न संपणारे खजीने आपल्या गुलामासाठी खुले करेल व अशाप्रकारे इस्लामचे अनुयायी दोन्ही जगांत यश संपादन करतात. 

इस्लाम हा धर्म कुण्या एका विशिष्ट देशाचे किंवा वंशाचे लोकांचे नाव नसून तो संपूर्ण मानवजातीच्या मालकीचे आहे. प्रत्येक युगात प्रत्येक देशात जो व्यक्ती अल्लाहला जाणला व सत्याचे आचरण ज्याने केले ते सर्व मुस्लिम होते. त्यांचा धर्म इस्लाम होता. (संदर्भ : दिनीयात भाग 1 चा सार. )


- अबु सकलैन रफिक अहमद पटेल, 

लातूर 

9860551773


लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलहजरात आयत नं. 13)

आजच्या धावपळीच्या जगामध्ये जीवनाचा गांभीर्याने विचार करायला लोकांकडे वेळच नाही. उपजिविकेची काळजी लोकांना जीवनासंबंधी आणि विशेषतः मरणोत्तर जीवनासंबंधी विचार करण्याची संधीच देत नाही. जीवन काय आहे? शाप आहे की वरदान? ठरवून केलेली खेळी आहे की निव्वळ योगायोग? परिपूर्ण आहे का अपूर्ण ? आपल्याला कोणी जन्माला घातले की आपण आपोआप जन्माला आलो? जन्म देण्यामध्ये आई-वडिलांव्यतिरिक्त तिसरी कोणती शक्ती कार्यरत होती काय? होती तर मग ती शक्ती कोणती? ती कशी आहे? का तिने आपल्याला जन्माला घातले? या सर्व प्रश्नांची उत्तरे कोठे सापडतील? ही सारी प्रश्नावली केवळ काल्पनिक नसून या मागे निश्चित असा कार्यकारणभाव आहे व तो कुरआनने मोठ्या सुंदर पद्धतीने उलगडून दाखविलेला आहे. 

मुळात कुरआन एक नसून दोन आहेत. एक पुस्तक स्वरूपात तर दुसरा प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या स्वरूपात. जर फक्त पुस्तकाचे अवतरण झाले असते तर त्याचा परिणाम तेवढा झाला नसता जेवढा आज आहे. आज जवळ-जवळ 200 कोटी लोक मुस्लिम आहेत व ते गर्वाने स्वतःला मोहमेडन अर्थात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे पाईक असल्याचा उल्लेख करतात. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे वारस म्हणून कुरआनचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे काम मुस्लिमांचे आहे. फक्त कुरआन वाटप करून जमणार नाही तर स्वतः कुरआनचे प्रात्यक्षिक दाखविल्याशिवाय इतरांना कुरआन काय आहे समजणार नाही. 

ज्याप्रमाणे गुलाबासोबत काटे असतात तसेच सामाजिक स्वातंत्र्यासोबत वाईट गोष्टी असतात. इस्लाम स्वतंत्र समाजामधून ’इव्हील’ म्हणजे वाईट गोष्टी समाप्त करू इच्छितो. दुसऱ्या जीवन व्यवस्थेमध्ये वाईट गोष्टींना उत्तेजन दिले जाते. 

प्रसिद्ध समाजशास्त्री अनिल उपाध्याय यांच्या मते इस्लाममध्ये कट्टरता आहे, हे सत्य आहे. पण ती कट्टरता सत्यासाठीची आहे, न्यायासाठीची आहे, मानव कल्याणाविषयी आहे. हीच कट्टरता लोकांना नकोय. या कट्टरतेमुळेच ते नाराज आहेत. त्यांना लवचिक व्यवस्था पाहिजे. इस्लाम त्याच्यासाठी तयार नाही. 

कुरआनचे मानवीय स्वरूप

कश्ती-ए-हक का जमाने में सहारा तू है

असरे नौरात है धुंदलासा सितारा तू है

मागच्या आठवड्यात आपण ’त्या 24’ आयातीचे विश्लेषण केले होते ज्या संंबंधी धिक्कारपात्र वसीम रिझवीने  सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या आठवड्यात कुरआनच्या त्या आयातींचा उहापोह करण्याचा विचार आहे. ज्यांच्याकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. 

1. ’’पृथ्वीवर उपद्रव माजवू नका’’ (सुरे बकरा आयत नं.11)

2. ’’ईश्वर न्याय करणाऱ्यांना पसंत करतो’’ (सुरे अलमायदा आयत नं. 42)

3. ’’ निवाडा न्यायपूर्ण पद्धतीने करा’’ (सुरे अलमायदा आयत नं.42)

4. ’’हे श्रद्धावंतांनो, अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत राहा. जे काही तुम्ही करता, अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे.’’(सुरे अलमायदा आयत नं. 8)

जगाला न्यायाशिवाय दुसऱ्याच कुठल्याच गोष्टीची गरज नाही. - ताब्दुक ऍम्रे (प्रसिद्ध तुर्की सुफी संत) 

वरील सर्व आयातींमध्ये पृथ्वीमध्ये राहणाऱ्यांचे सर्वोच्च कल्याण करण्यासाठी त्या मुलभूत गोष्टींचा उल्लेख केलेला आहे ज्यांची गरज एका आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. पहिल्या आयातीमध्ये म्हटलेले आहे की, पृथ्वीवर उपद्रव माजवू नका. म्हणजेच सभ्यतेने रहा. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या आयातीमध्ये न्यायाचे महत्त्व विशद केलेले आहे. न्याय निष्पक्षपणे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्याय करतांना तुम्हाला अशा लोकांचाही विचार करावा लागेल जे तुम्हाला आवडत नाहीत किंवा ज्यांच्याशी तुमचे वैर आहे. त्या वैराचा परिणाम तुमच्या न्यायबुद्धीवर होवू नये याची काळजी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. न्यायाशिवाय सामाजिक शांतता प्रस्थापित होवू शकत नाही. राजकीय शक्तीने, लष्करी बळाने जरी लोकांची मुस्कटदाबी करता येत असली तरी तो एक ’सप्रेस्ड वॉर’ असतो. म्हणून इस्लाममध्ये न्याय करण्यास फार महत्त्व दिलेले आहे. न्याय करण्यासाठी न्यायबुद्धी अत्यंत जरूरी असते. न्यायबुद्धी निर्माण करण्यासाठी जागतिक दृष्टीकोण आवश्यक असतो आणि तो दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी कुरआन म्हणतो की, ’’लोकहो! आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविक पाहता अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलहजरात आयत नं. 13)

जेव्हा जगातील सर्व लोक एका आई-वडिलांची संतती आहे एवढा व्यापक दृष्टीकोण माणसाच्या विचारांचा ताबा घेतो तेव्हाच तो न्याय करू शकतो. संकुचित दृष्टीकोणाने न्याय कधीही होवू शकत नाही, ही सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ गोष्ट आहे. धर्माच्या बाबतीत कुरआनचे म्हणणे स्पष्ट आहे की, 

1.’’ धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही.’’ (सुरे बकरा आयत नं. 256).

2. ’’ जर तुझ्या पालनकर्त्याची अशी इच्छा असती की, पृथ्वीतलावर सर्व (लोक) श्रद्धावंत / आज्ञाधारक अर्थात मुस्लिमच असावेत.’’ तर सर्व भूतलवासियांनी (तशी) श्रद्धा ठेवली असती. मग तू (काय) लोकांना भाग पाडशील. की ते श्रद्धावंत बनावेत?’’ (सुरे युनूस आयत नं.99)

इस्लामच्या बाबतीत असा एक व्यापक गैरसमज लोकांमध्ये पसरलेला आहे की, इस्लाम हा तलवारीच्या बळावर पसरलेला धर्म आहे. ही धारणा अतिशय चुकीची आहे. भारताच्या पूर्वेकडील मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनोई या मुस्लिम व 8 कोटी उइगर मुस्लिम असलेल्या चीन सारख्या देशांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल की, मुस्लिमांनी कधीच या देशावर आक्रमण केलेले नव्हते. तरी सुद्धा ही राष्ट्रे मुस्लिम आहेत. इंडोनेशिया तर जगातील सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र आहे. स्पष्ट आहे, येथे इस्लाम आपल्या वैचारिक क्षमतेच्या आणि मुस्लिमांच्या चारित्र्याच्या बळावर विस्तारपावला. भारतासारख्या देशात जरी मुस्लिम आक्रमणकर्ते आले आणि इथे शेकडो वर्ष त्यांनी राज्य केले, तरी त्यांची आक्रमणे ही राजकीय स्वरूपाची होती, संयोगाने ते मुस्लिम होते. अपवाद वगळता इस्लामचा प्रचार आणि प्रसार हे त्यांचे कधीच धोरण नव्हते. मुळात ताकदीच्या बळावर श्रद्धा बदलता येते, हेच गृहितक चुकीचे आहे. 

वरील पहिल्या आयातीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही. इस्लामच्या बाबतीत कोणावर जबरदस्ती करताच येत नाही. साधे अतिक्रमण करून मस्जिद बांधता येत नाही तर लोकांच्या श्रद्धेवर अतिक्रमण कसे करता येईल? दुसऱ्या आयातीमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, ईश्वराची ही इच्छाच नाही की, पृथ्वीवरील सर्व लोकांना बळजबरीने मुस्लिम बनविण्यात यावे. स्पष्ट आहे त्याची जर तशी इच्छा असती तर पृथ्वीवर एकही माणूस बिगर मुस्लिम राहिला नसता. म्हणूनच मुस्लिमेत्तरांबरोबर विनाकारण युद्ध करण्याची परवानगी इस्लाम देत नाही. कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की, 

1. ’’ आणि तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात परंतु अतिरेक करू नका. अल्लाहला अतिरेक करणारे आवडत नाहीत.’’ (सुरे अलबकरा आयत नं. 190)

पहा! यात स्पष्ट म्हटलेले आहे की, ईश्वराच्या मार्गात त्या लोकांशी लढा जे तुमच्याशी लढतात. यात मुस्लिम आणि मुस्लिमेत्तर असा फरक नाही. जे तुमच्याशी लढतील त्यांच्याशी लढण्याची परवानगी दिलेली आहे. ही किती न्यायसंगत बाब आहे, हे वाचकांनी स्वतःच ठरवावे. उलट यात असे म्हटलेले आहे की, लढतांना अन्याय करू नका. म्हणजे या ठिकाणी शत्रुंशी लढतांना सुद्धा अतिरेक करण्यापासून रोखण्यात आलेले आहे. म्हणूनच माझे स्पष्ट मत आहे की, कुरआन म्हणजे तीन गोष्टींचा समुच्चय आहे. कृपा, कृपा आणि कृपा.

2.  ’’जर अल्लाह अशा प्रकारे मानवाच्या एका समुदायाला (दंगलखोर आणि अत्याचारी) दुसऱ्या समुदायाच्या हस्ते हटवत नसता तर पृथ्वीची व्यवस्था बिघडली असती.  परंतु जगातील लोकांवर अल्लाहची मोठी कृपा आहे की (तो अशा तर्हेने हिंसाचाराच्या विनाशाची व्यवस्था करीत असतो.)’’  (सुरे अलबकरा आयत नं.:251)

या आयातीमध्ये अल्लाहच्या त्या वैशिष्ट्याचे वर्णन केलेले आहे ज्यात ईश्वराने अत्याचारी गटांचा बिमोड दुसऱ्या न्याय गटांच्या माध्यमातून करण्याची व्यवस्था ठेवली नसती तर पृथ्वीवरची सर्व व्यवस्थाच बिगडून गेली असती. हे असे सत्य आहे जे की, कोणत्याही सामान्य बुद्धिच्या माणसाच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. 

3. ’’मग काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या असहाय पुरुष-स्त्रियां आणि मुलांकरिता लढत नाही जे दुर्बल असल्यामुळे त्यांचे दमन केले गेले आहे आणि (असे लोक) धावा करीत आहेत की, हे पालनकर्त्या! आम्हाला या वस्तीतून बाहेर काढ ज्याचे रहिवाशी अत्याचारी आहेत, आणि तुझ्याकडून आमचा एखादा वाली व सहायक निर्माण कर.’’  (सुरे अन्निसा आयत नं.:75). 

आयीन-ए-नौ से डरना तर्ज़े कुहन पे अड़ना

मंज़िल यही कठीण है कौमों की ज़िंदगी में 

या आयातीमध्ये एका अशा मुद्याकडे सभ्य आणि सक्षम लोकांना ईश्वराने आवाहन केलेले आहे की, तुम्ही सक्षम असून, त्या स्त्री- पुरूष आणि मुलांकरिता का लढू इच्छित नाही, ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत. साधारणपणे दुर्बलांचे रक्षण करणे हे सबलांचे नैतिक कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याकडे या आयातींमध्ये न्यायप्रिय लोकांचे लक्ष वेधण्यात आलेले आहे. आणि त्या अत्याचारग्रस्त लोकांच्याकडून अत्याचार कणाऱ्या लोकांविरूद्ध लढताना जी हिंसा होणार आहे त्या हिंसेला ईश्वराने ’न्याय हिंसा’ ठरवलेले आहे आणि हे सत्य समजण्यासारखे आहे. 

सरसकट बिगर मुस्लिमांच्याविरूद्ध कुठलेही कारण नसतांना ’लढा’ असे निर्देश देणारी एकही आयत कुरआनमध्ये नाही. उलट कुरआन म्हणतो की, 

1. ’’अल्लाह तुम्हाला या गोष्टीची मनाई करीत नाही की तुम्ही त्या लोकांशी सद्व्यवहार आणि न्यायाचे वर्तन करावे, ज्यांनी धर्माच्या बाबतीत तुमच्याशी युद्ध केले नाही आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढले नाही. अल्लाह न्याय करणाऱ्यांना पसंत करतो.’’  (सुरे अलमुम्तहना आयत नं. 8).

ही आयत स्वयंस्पष्ट आहे. त्याच लोकाशी लढण्याची परवानगी आहे ज्यांनी तुमच्यावर अत्याचार केलेले असतील. धर्माच्या कारणावरून तुम्हाला घरातून बाहेर काढले असतील. बाकी कोणत्याही धर्माचे लोक असो त्यांच्याशी न्यायपद्धतीने वागा. कारण असे लोकच ईश्वराला प्रिय आहेत. एवढे स्पष्ट उदाहरण दिलेले असतांना असे म्हणायला कुठे जागा राहते की, इस्लाम हा इतर धर्मियांचा द्वेष शिकवितो. त्यांच्याविरूद्ध हिंसा करायला प्रेरित करतो. 

या काही मोजक्या आयाती आहेत ज्या मी वाचकांच्या सेवेमध्ये सादर केलेल्या आहेत. अशा अनेक आयातींनी कुरआन भरलेले आहे. प्रश्न फक्त त्या आयातींचा मतीतार्थ समजून घेण्याचा आहे व याची प्राथमिक जबाबदारी मुस्लिमांची आहे. मुस्लिमेत्तरांना त्यांच्या भाषेत कळेल अशा पद्धतीने कुरआनचा उपदेश पोहोचविणे हे त्यांच्या जीवनाचे उद्देश आहे. मुळात मुस्लिम समाजातील एक मोठा वर्ग कुरआनपासून व्यवहार्यरित्या तुटलेला असल्यामुळे कुरआनमधील निर्देशांचा परिणाम त्यांच्या जीवनात दिसून येत नाहीत. म्हणून अशा लोकांचे जीवनसुद्धा तणावग्रस्त आहे आणि भौतिकवादी लोकांच्या जीवनापेक्षा वेगळे नाही. 

वस्तुस्थिती अशी आहे, इस्लाम तीन प्रकारच्या लोकांना पसंत नाही. एक- ज्यांच्या पर्यंत त्यांच्या मातृभाषेत इस्लामबद्दल पुरेशी माहिती पोहोचलेली नाही. दोन - ते लोक जे मीडियाच्या अपप्रचाराला बळी पडलेले आहेत. तीन - ते लोक   ज्यांना जगामध्ये मनमानी करावयाची आहे. अनैतिक जीवन जगायचे आहे. अनैतिक कृत्य करायची आहेत. अनैतिक पद्धतीने व्यवहार करायचे आहे. अनैतिक पद्धतीने साधन सामुग्री गोळा करायची आहे. अनैतिक व्यवसाय करायचे आहेत. जे लोक नैतिकतेचे पाईक आहेत, नैतिकतेला पसंत करतात. त्यांच्यासाठी गरज आहे ती या गोष्टीची की कुरआनचा परिचय प्रत्येक मुस्लिमाने आपल्या सद्वर्तनातून करून द्यावा. तेव्हाच कुरआन विषयी असलेले गैरसमज बहुसंख्य बांधवांच्या मनातून दूर होतील.


- एम. आय. शेखयानंतर  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरआनच्या चार आयती पठण केल्या. या चारही आयतीत अशी शिकवण आहे,

``अल्लाहचे भय बाळगा आणि त्याची अवज्ञा करू नका.'' अर्थात अल्लाहचे भय हे जीवनाच्या म्हणजे इहलोकी आणि परलोकी जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. म्हणून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी वारंवार याचे स्मरण करून दिले आणि प्रामुख्याने लग्नसमारंभाच्या आनंदाच्या प्रसंगी. माणूस आनंदाच्या भरात अल्लाहची अवज्ञा करण्याची जास्त शक्यता असते. वस्तुस्थिती अशी आहे की माणूस हा अल्लाहच्या तुलनेत शून्य आहे. तो अन्न-पाणी आणि एकेका श्वासासाठी अल्लाहवरच अवलंबून आहे. मात्र संपत्ती आणि सामथ्र्याच्या झिंगेत त्याला अल्लाहचा विसर पडतो आणि कधी-कधी तर संपत्ती आणि सामर्थ्य नसतानादेखील तो आपला विवेक हरवून बसतो. वाटेल ते करीत राहतो. आपल्या इच्छा-आकांक्षाची पूर्तता करताना अल्लाहच्या आज्ञांची पायमल्ली करीत जातो. मात्र एक दिवस असा येतो की त्याचे सर्वकाही नष्ट होते. त्याची संपत्ती आणि सामर्थ्य त्याच्याकडून हिरावून घेण्यात येते. याच दुष्प्रवृत्तीमुळे मोठमोठी राष्ट्रे नष्ट पावली. मनुष्य हा मुळात अतिशय दुर्बल आणि परावलंबी आहे. तो आत्मबळावर काहीही करू शकत नाही. त्याने अल्लाहस शरण राहूनच जगावयास हवे. त्याचे दास्यत्व पत्करून आणि त्याच्या अभयछत्रात राहून जगावयास हवे. एके दिवशी समस्त मानवांना त्याच्या न्यायालयात हजर होऊन आपल्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. अल्लाहच्या आज्ञांचे पालन करून जीवन जगणाऱ्यांसाठी निश्चितच स्वर्गाची प्राप्ती होईल आणि अवज्ञाकारीसाठी भयावह नरकाग्नीच्या उग्र ज्वाला पेटविण्यात आलेल्या आहेत. धन्य ते लोक ज्यांनी ईशपरायणशील व आज्ञाधारकतेने जीवन व्यतित केले आणि सुखदु:खाच्या कोणत्याही स्थितीत त्याना आपल्या कामगिरीचा जाब अल्लाहला धावा लागेल याचा विसर पडत नाही.माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘कोणालाही त्याच्या स्वत:च्या कर्माने स्वर्गात जाता येणार नाही.’’

पैगंबरांना लोकांनी विचारले, ‘‘आपणाससुद्धा नाही हे अल्लाहचे पैगंबर?’’

सांगण्यात आले, ‘‘नाही, मलासुद्धा नाही. परंतु अल्लाहने त्याच्या कृपेने व दयेने आच्छादित केले तर. म्हणून तुम्ही दृढता व सुनीती स्वीकारा आणि सान्निध्य स्थापित करा, तसेच तुमच्यापैकी कोणी मृत्युची कामना करू नये. कारण तो सत्कर्मी असेल तर त्याच्या सत्कर्मांत वृद्धी करेल आणि जर तो दुष्कर्मी आहे तर कदाचित तो पश्चात्ताप करून (तौबा करून) अल्लाहला प्रसन्न करील.’’

स्पष्टीकरण

एक हदीसकथन आहे, ‘‘जाणून असा की तुमच्यापैकी कोणीही स्वकर्माने मुक्ती प्राप्त करू शकणार नाही.’’

कुरआनमध्ये आले आहे,

‘‘आणि त्यांना विचारले जाईल : हा स्वर्ग (जन्नत) आहे ज्याचे तुम्हाला वारस बनविले आहे, त्या कर्मांच्या मोबदल्यत जी तुम्ही करीत होता.’’

(दिव्य कुरआन, ७:४३) कुरआन आणि हदीसवर्णनात कसलीही विसंगती सापडत नाही. स्वर्गाचे महान उत्तराधिकारीचे स्थान तर ईश्वरकृपा व दयेनेच प्राप्त होईल. मनुष्याची सत्कर्मे तर निमित्तमात्र असतील. सत्मार्गांनी तर हीच आशा केली जाऊ शकते की ईश्वर दया होईल. स्वर्गप्रवेशाचे वास्तविक कारण ईशकृपा व दयेव्यतिरिक्त अन्य काहीही नाही. ईशकृपा व दयेविना मनुष्यकर्मांचे महत्त्व व स्थिती नगण्य आहे.

अल्लाह कोणा जीवावर त्याच्या सामर्थ्यानुसारच दायित्वाचा भार टाकत असतो.(कुरआन, २:२८६) म्हणून सुनीती आणि सुदृढता स्वीकारा, परंतु मध्यममार्गाला नेहमी तुम्ही दृष्टीसमोर ठेवा ज्यामुळे संतुलित मार्गावर मार्गस्थ होणे तुमच्यासाठी सुकर होईल. जर स्वत:वर अतिरेक कराल तर हे जास्त काळ चालणार नाही. यात शंका आहे की कर्मध्येय तुम्ही विसरून जाल. हे लक्षात ठेवा, ‘‘अल्प जे शिल्लक आहे त्या अधिकपासून श्रेष्ठ आहे जे शिल्लक राहात नाही.’’ सुदृढता, अनुसरण व सान्निध्य त्या मध्यममार्गाला म्हणतात ज्यात अतिरेकाने काम घेतले जात नाही की अत्यल्पतेनेसुद्धा घेतले जात नाही.

एखाद्यास सत्कर्माची संधी प्राप्त होत नसेल तरी त्याने मृत्युची कामना करू नये. जीवनात शक्य आहे की त्याला पश्चात्ताप करण्याचा सुअवसर प्राप्त होईल आणि ईशप्रकोपापासून तो गृहस्थ सुरक्षित होईल.

‘‘अल्लाहव्यतिरिक्त अन्य सर्वकाही नष्टप्राय आहे.’’- सय्यद जलालुद्दीन उमरी

या पुस्तिकेत कुरआन व हदीसच्या प्रकाशात सय्यद जलालुद्दीन उमरी यांनी या विषयाची उत्तमरित्या मांडणी केली आहे. संपूर्ण समाजासाठी बालकाचे अतिमहत्त्व आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. पाश्चिमात्य राष्ट्र प्रत्येक चांगल्या कार्याचे श्रेय स्वत:कडे घेतात. बालकल्याणाच्या प्रयत्नांना ते स्वत:चीच कामगिरी मानतात.

याविषयी इस्लामची शिकवण काय आहे, बालहत्येचा निषेध, मातापित्याच्या विशुद्ध भावनेचा आदर, नवजात शिशु, तहनिक, उत्तम नाम, अकिका, बालसंगोपण, शिक्षण-प्रशिक्षण, इ. विषयांवर या पुस्तिकेत विवेचन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 251        -पृष्ठे - 16   मूल्य - 10      आवृत्ती - 1 (2014)

डाऊनलोड लिंक :  https://app.box.com/s/smuz0bplvmrqtrrsm586jrz2hfa23p62``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.''

दोन प्रकारच्या साक्षीचे हे दोनच शब्द आहेत, मात्र यावर इस्लामची पूर्ण भव्य इमारत उभी आहे आणि यापासून त्या वृक्षाची निर्मिती होते, ज्यासंबंधी कुरआनात म्हटले आहे,

``अल्लाहच्या या कलिम्याचे (धर्मसूत्राचे) उदाहरण एका अत्यंत पवित्र वृक्षासम असून त्याचे मूळ अत्यंत मजबूत आणि त्याच्या फांद्या आसमंतात सर्वत्र विस्तारलेल्या आहेत. तो आपल्या पालनकर्त्याच्या कृपेने प्रत्येक क्षणी चांगली फळे देतो. अल्लाह या उदाहरणाच्या आधारे श्रद्धावंतांना वर्तमान आणि परलोकी जीवनात स्थैर्य प्रदान करतो.''

याच कलिम्यासंदर्भात पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उघड आवाहन दिले आहे,

``लोकहो या कलिम्याचा स्वीकार करा. अरब आणि बिगरअरबांचे पूर्ण नेतृत्व तुमच्या हाती येईल.''

आणि इतिहास साक्षी आहे की ज्यांनी या धर्मसूत्राचा स्वीकार केला, ते समस्त जगाचे शासक बनले. अल्पसंख्येत असूनही रोम आणि पर्शियासारख्या साम्राज्यांना गुलामी पत्करावी लागली. कारण या धर्मसूत्राचा चमत्कारच असा आहे की माणूस समस्त प्रकारची गुलामगिरी झुगारून देतो आणि एकाच अल्लाहची गुलामी स्वीकारतो. या धर्मसूत्रामागे एकमेव अल्लाहची प्रचंड शक्ती असून जगात यामुळे अद्वितीय क्रांती घडली. म्हणूनच हा कलिमा प्रत्येकाच्या मानसिकतेत रूजावयास हवा. यासाठीच मूल जन्मताच त्याच्या कानात हे शब्द उच्चारून त्यास याचे बाळकडू पाजण्यात येते. प्रत्येक नमाजीत याच विचारधारेचे स्मरण करून देण्यात येते आणि प्रत्येक भाषणात आणि लग्न प्रवचनात याची साक्ष देण्यात येते. हे यासाठी की, आम्हाला सतत स्मरण राहावे की आम्ही प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक वेळी अल्लाहचे दास आहोत आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचे अनुयायी आहोत.माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहव्यतिरिक्त दुसरा कोणीही पूज्य प्रभु नाही. तो एकमेव आहे. त्याने आपल्या सेनेला प्रभावी बनविले आहे आणि त्याच्या दासाची मदत केली आणि विधर्मिय दलाला पराभूत केले. तो एकमेव आहे. त्याच्यानंतर काहीही नाही.’’

स्पष्टीकरण

स्पष्ट आहे की वरील शब्द पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या तोंडून श्रद्धावंतांना जेव्हा विधर्मियांवर विजय प्राप्त झाला तेव्हा निघाले असतील. या विजय व सफलतेवर फुलून न जाता पैगंबरांनी यास ईशकृपा व ईश्वराचे उपकार घोषित केले. या विजयास त्यांनी स्वत:च्या प्रयत्नाचे फळ समजले नाही आणि श्रद्धावंतांच्या सेनेला स्वत:ची सेना न मानता पैगंबरांनी त्यास अल्लाहची सेना म्हटले आहे. तसेच पैगंबरांनी स्वत:ला एक ईशदास व आज्ञाधारक दास घोषित केले आहे.

‘‘तो एकमेव आहे, त्याच्यानंतर काहीही नाही.’’ याचा अर्थ एक अल्लाहनंतर काहीही शिल्लक राहात नाही की ज्यामुळे ते आमच्या संबंधांचे केंद्र बनावेत. अल्लाहव्यतिरिक्त जे काही आहे ते काहीही नसल्याचा पर्याय आहे. याच वास्तवास कुरआनने या शब्दांत स्पष्ट केले आहे,


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget