May 2021


- मुहम्मद अहसन

- डोनाल्ड आर. हिल्ल

- अहमद वाय. अल-हस्सान


संकलन

- सय्यद इफ्तिखार अहमद

- प्रा. अब्दुर्रहमान शेख


आयएमपीटी अ.क्र. 260       -पृष्ठे - 80 मूल्य - 70      आवृत्ती - 1 (DEC 2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/3ll9vdl7abav30f51lnzn03v2lijp26k

माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा लोकांना आदेश देत असत तेव्हा त्यांना त्या कर्मांना करण्याचा आदेश देत ज्यांना करण्याची शक्ती व सामर्थ्य त्यांच्यात राहात होते. लोकांनी विनंती केली, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही तुमच्यासारखे अजिबात नाहीत. अल्लाहने तर तुमच्या मागील पुढील सर्व उणिवांना क्षमा केली आहे.’’

यावर पैगंबरांना जास्तच राग आला आणि त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. नंतर पैगंबर म्हणाले, ‘‘मी तुमच्यापेक्षा जास्त अल्लाहचे भय बाळगून आहे आणि तुमच्या सर्वांपेक्षा अल्लाहला जाणणारा मी आहे.’’

स्पष्टीकरण

एक हदीसकथन आहे,

‘‘मी सर्व लोकांपेक्षा जास्त अल्लाहला जाणून आहे आणि सर्वांपेक्षा जास्त ईशभय बाळगून आहे.’’

वरील हदीसचा अर्थ असा आहे की ईशआज्ञापालन व ईशउपासनेची खरी प्रेरक शक्ती अल्लाहची ओळख आणि ईशभय आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणासही याचा प्रेरणास्रोत तसेच प्रेरक शक्ती समजणे चुकीचे आहे, जेव्हा की ईशज्ञान व ईशभय या दोहोंत मी तुम्हा सर्वांपेक्षा जास्त आहे, तेव्हा ईशआज्ञापालन व उपासनेत तुम्हाला माझे अनुसरण केले पाहिजे. माझ्या पद्धतीपासून इतर दुसरी पद्धत जी तुम्ही स्वीकाराल ती चुकीची आणि अल्लाहच्या इच्छेविरूद्ध असेल.

अल्लाहला जाणणे आणि ईशभयाला धारण करण्यात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापेक्षा जास्त दुसरा कोण असेल? पैगंबरांनी स्वत:चे आणखीन एक वैशिष्ट्य हे सांगितले की ठेव (अमानत) त्या परत देण्यात दुसरा कोणीच त्यांचा मुकाबला करू शकत नाही. एकदा एका यहुदी (ज्यू) माणसाने द्वेषापोटी व शत्रुत्वामुळे जेव्हा पैगंबरांच्या अमानतदारीवर शंका प्रकट केली तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तो खोटारडा आहे आणि तो स्वत: जाणून आहे की मी सर्व लोकांपेक्षा अधिक जास्त अल्लाहचे भय बाळगणारा आणि सर्वांपेक्षा जास्त अमानतींना (ठेव) परत करणारा आहे.’’परमेश्वराची आज्ञा पाळण्यासाठी ईश्वरी ज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे. परमेश्वराने माणसांमधूनच काही माणसांना (प्रेषितांना) ’वह्य’ (बोध) देऊन पाठवले व ज्ञान दुसऱ्या मनुष्यात पसरवण्याची आज्ञा केली. खऱ्या प्रेषितांना ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवणे व त्याने जे सांगितले ते मानणेही आवश्यक आहे. 

प्रेषितांची वास्तविकता

परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला काही न काही गुण दिलेले आहेत. काही व्यक्तीत जन्मतःच नेतृत्वक्षमता असते काहींचे गणितात हात चांगले असते काही नवनवीन आविष्कार करत असतात. 

या जगात यशस्वी होण्यासाठी फक्त इंजिनियर, डॉ्नटर, वैज्ञानिक, व्यापारी इ.चीच गरज आहे असे नाही. अश्या व्यक्तींची पण गरज आहे की जो परमेश्वराचा मार्ग दाखवेल जेणेकरून मनुष्य नेहमी राहणारे यश संपादित करू शकेल. अश्या व्यक्तीत परमेश्वराला ओळखण्याची क्षमता खूप होती. परमेश्वराने या व्यक्तींना ईश्वरी ज्ञान दिले व त्याचा प्रसार मानवांत करण्यास सांगितले. हे व्यक्ती म्हणजेच परमेश्वराचे प्रेषित / पैगंबर. 

प्रेषितांची ओळख 

ज्याप्रमारे महान व्यक्ती काही न काही विशेष गुण घेऊन जन्माला येतात त्याप्रमाणेच प्रेषित ही काही विशेष गुणासह जन्माला येतात. 

एखादा व्यक्ती जन्मतःच कवी असतो. एखाद्या व्यक्तीत भाषण कला असते. एक व्यक्ती जन्मतःच नेतृत्व करणारा असतो. त्यांना आपण लगेच ओळखू शकतो. याचप्रमाणे प्रेषितांचेही असते. प्रेषित जे बोलतात त्याचा विचार सामान्य व्यक्ती कधी करूच शकत नाही. त्यांची नजर सूक्ष्म असते. तो जे काही बोलतो त्याला आपले मन मानते. जगाच्या अनुभवावरून व विश्वावर दृष्टीक्षेप टाकल्यास प्रेषितांचे बोलणे आपल्याला पटते. 

प्रेषितांचे व्यक्तीमत्व व चारित्र्य पवित्र असते. तो खरा बोलणारा सभ्य असतो. तो कधी चुकीची गोष्ट बोलत नाही. तो वाईट काम करत नाही. नेहमी चांगले कर्म करण्याची शिक्षा इतरांना देतो. तो दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी स्वतः नुकसान करवून घेतो. प्रेषितांमध्ये कुठल्याही प्रकारचे दुर्गूण नसतात. ते सर्वगुणसंपन्न असतात. या गोष्टी बघून ओळखले पाहिजे की हा व्यक्ती परमेश्वराचा खरा प्रेषित आहे. 

प्रेषितांप्रती आज्ञाधारकपणा

जेव्हा आपल्याला माहित होते की, हा व्यक्ती परमेश्वराचा खरा प्रेषित आहे तेव्हा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकणे. त्यांची आज्ञापाळणे व त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे आवश्यक असते. 

एखादा व्यक्ती प्रेषितांना मानतो पण त्यांची आज्ञा पाळत नाही तर तो मूर्ख आहे. प्रेषित जो बोलतो आहे ते परमेश्वराचे बोल असतात व परमेश्वराचे बोल नेहमी सत्यच असतात हे जाणून देखील तो व्यक्ती प्रेषितांनी सांगितलेल्या गोष्टींच्या विरूद्ध काम करतो. 

आपल्याला परमेश्वराचे ज्ञान मिळवायचे असल्यास आपल्याला ते प्रेषितांकडून मिळवावे लागेल व त्यासाठी आपला खरा प्रेषित कोण हे ओळखावे लागेल. चुकीच्या माणसाला आपण प्रेषित मानले तर तो आपल्याला चुकीचा मार्ग दाखवेल. खरा प्रेषित कोण हे ओळखल्यानंतर त्याची आज्ञा पाळावी.

प्रेषितांवर विश्वास ठेवण्याची गरज...

जेव्हा आपल्याला माहित होते की खरा मार्ग तोच जो प्रेषितांनी सांगितलेला आहे तेव्हा प्रेषितांवर विश्वास ठेवणे व त्यांची आज्ञा पाळणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती प्रेषितांना प्रेषित मानतो पण त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही त्यांची आज्ञा पाळत नाही असा व्यक्ती काफिर तर आहेच पण मूर्खही आहे. कारण त्याला सत्य काय हे माहित असूनही तो त्याचा स्विकार करत नाही. काही लोक म्हणतात आम्हाला प्रेषितांची आज्ञा पाळायची गरज नाही. आम्ही आमचा मार्ग स्वतः शोधू. गणितात जसे दोन बिंदूंना जोडणारी एकच रेषा असते तसेच माणसाला व परमेश्वराला जोडणारा मार्गही एकच आहे तो म्हणजे ’सिराते मुस्तकीम’(सत्य मार्ग). प्रेषितांनी सांगितलेला मार्ग हाच ’सिराते-मुस्तकीम’ आहे. इतर सर्व मार्ग चुकीचे आहेत. 

पण जो व्यक्ती प्रेषितांवर विश्वास ठेवत नाही त्याला परमेश्वरापर्यंत पोहचण्याचा मार्गच सापडणार नाही. प्रेषित हे परमेश्वराने पाठवलेले असतात त्यांच्यावर विश्वास ठेवणे व त्यांची आज्ञा पाळावी लागते. जे प्रेषितांवर विश्वास ठेवत नाहीत ते बंडखोर असतात. जो व्यक्ती परमेश्वराला मानतो पण त्याने पाठवलेल्या प्रेषिताला नाही तर तो काफिर आहे. 

प्रेषितांचा इतिहास...

आपल्याला माहितच असेल की अल्लाहने सर्वात प्रथम एक मानव तयार केला व त्या मानवापासूनच त्याचा जोडीदार जन्माला घातला व त्या दोघांपासून मानवजातीचा जन्म झाला. मोठमोठे वैज्ञानिक ही मानतात की माणवाचे वंशज हे एकच आहेत. 

इस्लाममध्ये या मानवाला ’आदम’ (अलैहि.) म्हणतात. या शब्दातूनच हिंदीतील ’आदमी’ शब्द निघतो. अल्लाहने सर्वप्रथम आदम (अलैहि.) ला बनवले व त्यांना आज्ञा केली की त्यांनी आपल्या संततीला इस्लामचे शिक्षण द्यावे. परमेश्वर एक आहे व त्याचीच पूजा करावी. त्याच्यासमोरच नतमस्तक व्हावे, त्याच्याशीच मदत मागावी आणि चांगले जीवन जगावे, हे ज्ञान संततीला द्यावे व यापासून भरकटाल तर त्याची शिक्षा मिळेल, याचीही कल्पना द्यावी.

हजरत आदम (अलैहि स.) यांची जी संतान चांगली निघाली त्यांनी आपल्या पित्याची शिकवण लक्षात ठेवली पण जी वाईट संतान होती त्याने सत्याचा मार्ग सोडला व काहींनी सूर्य, चंद्र, हवा, आग इत्यादींची पूजा चालू केली. यामुळे मूर्तीपूजा वाढीस लागली. आदम (अलैहि.)चे वंशज संपूर्ण जगात पसरले व त्यांचे वेगवेगळे वंश बनले. हे आता परमेश्वराला व त्याच्या नियमांना विसरले. त्यांनी सद्सद्विवेक बुद्धीचा त्याग केला.

आता अल्लाहने प्रत्येक वंशात आपले प्रेषित पाठवल्यास सुरूवात केली. या प्रेषितांनी आदम अलै. ने दिलेल्या शिक्षणाची आठवण या वंशांना करून दिली. त्यांना मूर्तीपूजेपासून रोखले. चुकीच्या रीवाजांपासून रोखले. परमेश्वराच्या मर्जीनुसार जीवन जगण्याचा मार्ग सांगितला. जगाच्या प्रत्येक भागात भारत, चीन, ईरान, ईराक, युरोप प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने आपले प्रेषित पाठवले व तेथील लोकांना ईश्वरी ज्ञान दिले. त्या सर्व प्रेषितांचा धर्म इस्लामच होता. मानवजातीचा सुरूवातीला तेवढा विकास झालेला नव्हता त्यामुळे त्यांना ईश्वरी ज्ञानही साध्या प्रकारचे दिले गेले. पण सर्व प्रेषितांचा संदेश एक ईश्वराची पूजा करणे समाजात चांगली माणसे वाढवणे व वाईट प्रवृत्ती नष्ट करणे हा होता. 

प्रेषितांसोबत मानवाने वेगळाच हिशोब ठेवला. सुरूवातीला त्यांना त्रास दिला. त्यांची शिक्षा मानण्यास निकार दिले. काहींचा  बहिष्कार केला. काहींचे खून केले. -(उर्वरित आतील पान 7 वर)

काही प्रेषितांना जीवनभर कष्ट करून हाताच्या बोटावर मोजण्या इतके अनुयायी भेटले तरीपण परमेश्वराचे पाठवलेले हे व्यक्ती आपले काम करत राहिले. काही प्रेषितांचा प्रभाव एवढा होता की एक संपूर्ण राज्य त्यांचे अनुसरन करू लागले. आता प्रेषितांच्या जाण्यानंतर काहींनी त्यांच्या शिक्षणात बदल केला. त्यांच्या ईश्वरी ग्रंथात स्वतःकडून काही लिहिले. काहींनी प्रेषितांची पूजा सुरू केली. कोणी प्रेषितांनाच ईश्वर मानायला लागले. काही प्रेषितांना ईश्वराचा मुलगा मानायला लागले. अशा परिस्थितीत नंतरच्या लोकांना प्रेषितांची खरी शिकवण मिळणे अवघड होते. 

प्रत्येक प्रेषितांनी आपापल्या लोकांत चांगूलपणा सतप्रवृत्ती चांगले आचरण या गोष्टी शिकविल्या व वेगवेगळ्या वंशांना तयार केले की जगात एक धर्म पसरवला जाऊ शकेल जो संपूर्ण मानवजातीसाठी आहे. 

जे काही प्रेषित आले होते ते एका विशिष्ट देशाकरिता वंशाकरिता आले होते. त्यांची शिकवण त्या भूभागापूर्तीच मर्यादित होती. वेगवेगळ्या राष्ट्रांत देवाणघेवाण नव्हती. अशा परिस्थितीत सर्व मानवजातीसाठी शिकवण या सर्व राष्ट्रांत पसरवणे अवघड होते. तसेच या राष्ट्रातील लोकांत अज्ञान वाढले होते. त्यांच्या व्यक्तीमत्वात बिघाड झाले होते. त्यामुळे परमेश्वराने हळूहळू सर्व राष्ट्रांत आपले प्रेषित पाठवून त्यांना सरळ मार्गावर आणले. आता मानवजातीचा विकास झालेला आहे. 

वेगवेगळ्या राष्ट्रातील लोकांचे एकमेकांशी संबंध येऊ लागले. व्यापाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या देशांत संचार वाढला. लोकांत काही प्रमाणात साक्षरता वाढली. याच काळात मोठमोठे राजे, बादशाह झाले त्यांनी त्यांनी आपले साम्राज्य बनवले. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांचा एकमेकांशी संबंध येऊ लागला. आजपासून अडची हजार वर्ष पूर्वी अशी परिस्थिती होती की संपूर्ण मानवजातीसाठी एकच धर्माची गरज वाढू लागली होती. बौद्ध धर्म एक संपूर्ण धर्म नव्हता, त्याच्यात आचरणाचे नियम होते. हा धर्म भारतातून निघून चीन, जापान व मंगोलियापर्यंत प्रसार पावला. या धर्माचे धर्मगुरू वेगवेगळ्या देशांत जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करायचे. याच्या काही शतकानंतर ख्रिश्चन धर्म उदयास आला. हजरत ईसा (अलैहि.) इस्लामचे शिक्षण घेऊन आले होते. परंतु, लोकांनी त्यांच्यानंतर ख्रिश्चन हा अपूर्ण धर्म बनवला. व ख्रिश्चन लोकांनी हा धर्म अफ्रिका, युरोप व दूरदूरच्या प्रदेशांत हा धर्म प्रसारला. यावरून असे लक्षात येते की जग स्वतःला यावेळी एक सर्वांसाठी असलेल्या धर्माची मागणी करत होता. यासाठी त्यांनी अपूर्ण धर्मांचाही स्विकार केला व त्याचा प्रसार केला. क्रमशः...


- अबु सकलैन रफिक अहमद पटेल, 

लातूर 

9860551773पवित्र कुरआनच्या शिकवणी येण्याआधी, अरबस्थानात विविध जाती-जमातींची व्यवस्था होती. प्रत्येकास आपल्या जमातीवर निष्ठा होती. संघटित समाज नव्हता. समाजाचे काही मापदंड विशिष्ट परंपरेवर आधारलेले होते. यासाठी सामाजिक, भौगोलिक सीमा, साधने, अर्थव्यवस्था, भावनात्मक आणि बौद्धिक परिमाण असावे लागते. यातला एकही निकष तत्कालीन अरब समाजाला लागू नव्हता. म्हणून प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सुरुवातीला समाजजीवनाच्या सुधारणेचे कार्य हाती घेतले. पवित्र कुरआनच्या मागदर्शक तत्त्वांनुसार शून्यातून नव्या समाजाची उभारणी करायची होती. त्या काळी अरबस्थानात सामूहिक जीवन नगण्य होते. प्रत्येक व्यक्ती वैयक्तिक जीवन जगत असे. म्हणून प्रेषितांनी वैयक्तिक जीवनात सुधारण घडवून आणल्या. पारंपरिक रुढी-श्रद्धांना तिलांजली दिली. यासाठी प्रेषितांना त्यांना आध्यात्मिक प्रशिक्षण द्यावे लागले. त्यांना पावन आणि पवित्र काय हे सांगिलते. अनिष्ठ रुढी-परंपरा नष्ट केल्या. प्रेषितांनी ज्या शिकवणी त्यांना देण्यास सुरू केली त्यांचा प्रभाव अनुयायांवर अनन्यसाधारण पडला. ते प्रेषितांकडे येऊन आपला गुन्हा कबूल करायचे आणि त्यांना पावन करण्यास प्रेषितांकडे विनंती करायचे. एका अनुयायीचे उदालरण असे की ते एकदा प्रेषितांचकडे आणि म्हणाले, मी चुकलो. माझ्याकडून व्यभिचार झाला आहे. मला शिक्षा करा. प्रेषितांनी त्यांना तीन वेळा परत पाठवले. त्यांच्या कुटुंबियांना विचारले असता ते म्हणाले की ते व्यवस्थित आहेत. परत चौथ्यांदा जेव्हा ते प्रेषितांकडे आले तेव्हा त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली गेली. एका महिलेचेदेखील असेच उदाहरण आहे. तिच्याकडूनही अशाच स्वरूपाचा गुन्हा घडला होता. त्यांनी प्रेषितांकडे शिक्षा करण्याची विनंती केली. प्रेषित म्हणाले, मूल जन्माला आल्यानंतर या. जन्मलेले मूल कडेवर घेऊन त्या परत आल्या. प्रेषित म्हणाले, हे बाळ जेव्हा अन्न खाऊ लागेल तेव्हा या. त्या परत गेल्या आणि दोन वर्षांनी मुलाच्या हातात भाकरीचा तुकडा देऊन परत आल्या आणि प्रेषितांकडे हट्ट धरला की आता तरी मला शिक्षा करा. आणि मग प्रेषितांनी त्यांना शिक्षा दिली – तीच मृत्युदंडाची! म्हणजे प्रेषितांचे अनुयायांना पवित्र जीवन जगण्याची किती उत्कटता होती हेच या उदाहरणांवरून दिसून येते. मापतोल करताना पुरेपूर मापून द्या. तोलताना प्रामाणिक राहा. जे तुम्हाला माहीत नाही अशा गोष्टीमागे पडू नका. ऐकणे, पाहणे आणि मनात ठेवणे या सर्वांविषयी विचारले जाईल. पृथ्वीवर उद्दामपणे संचार करू नकोस, तुम्ली पर्वतांएवढी उंची गाठू शकत नाही की धरतीला दुभंगू शकणार नाही. (संदर्भ – पवित्र कुरआन, १७)

नातीप्रधान समाजव्यवस्था

पवित्र कुरआनच्या शिकवणीनुसार समाजव्यवस्था न पुरुषप्रधान आहे न स्त्रीप्रधान. इस्लामी समाजव्यवस्था नातीप्रधान आहे. या नात्यांच्या केंद्रस्थानी पहिले स्थान मातेचे आणि दुसरे पित्याचे. अल्लाहने मानवांची निर्मिती एका पुरुष आणि एका स्त्रीपासून केली. आणि मग त्यापासून संतती चालत येऊन एक समाज निर्माण होतो. या समाजाच्या रचनेत केंद्रस्थानी माता-पिता आणि नंतर रक्ताची नाती, जवळचे नातेवाईस, शेजारी  असे करत हे वर्तुळ विस्तारले जाऊन समाज गोलाकार होतो. धार्मिक विधी, उपासना हे नंतरचे आहेत. पवित्र कुरआननुसार, “तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे केले की पश्चिमेकडे केले हा सदाचार नाही. सदाचार म्हणजे, जे लोक अल्लाहवर श्रद्धा ठेवतात, त्याच्या प्रेमापोटी आपल्या संपत्तीतून आपल्या नातलगांना, अनाथांना, निराधारांना आणि जे मागतील त्यांना देणे होय. (२:१७०)” दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे की, माता-पित्यांशी औदार्याने वागा, त्यांच्यासमोर ब्र देखील काढू नका. एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे आली आणि म्हणाली, मला परवानगी द्या जिहादमध्ये सहभागी होण्याची. प्रेषितांनी विचारले, तुमचे आईवडील हयात आहेत? त्यांनी उत्तर दिले, होय, हयात आहेत. मग प्रेषितांनी आज्ञा दिली की, जा त्यांची सेवा करा, हाच तुमचा जिहाद आहे. प्रेषितांचे सोबती अबू हुरैरा म्हणतात की एका व्यक्तीने प्रेषितांना विचारले, कोण माझ्या सदवर्तनास अधिक पात्र आहे? प्रेषित म्हणाले, तुझी आई. दुसऱ्यांदा त्यांनी विचारले, मग कोण? प्रेषित म्हणाले, तुझी आई. तिसऱ्यांदाही प्रेषितांनी हेच उत्तर दिले. मग त्या व्यक्तीने विचारल्यानंतर चौथ्यांदा उत्तर मिळाले, तुझे वडील. आणखी एका अनुयायींनी विचारले, सर्वोत्तम इस्लाम कोणता? प्रेषित म्हणाले, गरीब आणि वंचितांवर प्रेम करा. लोकांना अडचणीत टाकू नका. त्यांच्यासाठी सुलभता, सहजता निर्माण करा. हाच सर्वोत्तम इस्लाम आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सकारात्मक मूल्यांवर सामाजिक सहिष्णुता परस्परांसाठी संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी निर्माण केली. पवित्र कुरआनने यासाठी दिलेली शिकवण समाजरचनेचा पायाभूत बिंदू होता. अल्लाहने माणसांना एकमेकांशी नातेसंबंध जोडून ठेवण्याचे त्यांच्याकडून वचन घेतले असल्याने जर माणूस अल्लाहने सांगितलेले नातेसंबंध जोडण्याऐवजी ते तोडून टाकत असेल तर मग समाजात अराजकता आणि अनाचार माजेल. याचा अर्थ असा की सामाजिक नातेसंबंध जोपासणे माणसांच्या इच्छेवर सोडलेले नाही तर प्रत्येक माणसाने हे नातेसंबंध जोपासण्यासाठी अल्लाहला वचन दिलेले आहे. हा माणसाने माणसाशी करार केलेला नाही. त्याने आपल्या विधात्याला वचन दिलेले आहे. तसेच हा दोन गटांमधील करार नव्हे. करार करणारे दोघे परस्परांशी काही अटी-नियमांवर करार करत असतात. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला वचन देतो तेव्हा ज्याला वचन दिले जाते ते वचन त्याचा अधिकार असतो. वचन करणाऱ्यास मोडण्याचा अधिकार नसतो. अल्लाहशी वचनबद्धतेमुळेच समाजाचा प्रत्येक घटक प्रामाणिकपणे वागत असतो. कुणी दुसऱ्यावर अन्याय करत नाही. सर्वजण मिळून समाजामध्ये संतुलन कायम राखतात. हे संतुलन राखण्याची जबाबदारीदेखील पवित्र कुरआनद्वारे अल्लाहने माणसावर सोपवली आहे. “या ब्रह्मांडामध्ये जसे संतुलन कायम आहे, सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह ठराविक हिशोबाने भ्रमण करतात, उत्तुंग आकाश उभारून त्यास समतोल ठेवले.” त्याच प्रकारे माणसांनी संतुलन कायम ठेवावे. व्यवहारात संतुलन असावे. प्रेषितांनी ज्या मूल्यांवर समाज निर्माण केले ते असे (१) कुणाचा द्वेष करू नका, (२) एकमेकांशी शत्रुत्व बाळगू नका, (३) आपसात हेवेदावे करू नका, (४) आपसातील नाती तोडू नका, (५) एकमेकांशी बंधुभावाने वागा, (६) मुस्लिम एकमेकांचे बांधव आहेत. ते कुणावर अत्याचार करत नाहीत. कुणास एकाकी सोडून देत नाहीत. कुणाचा तिरस्कार करत नाहीत.

- सय्यद इफ्तिखार अहमदमाननीय आएशा (रजि.) सांगतात,

एकदा रात्री पैगंबर मुहम्मद (स.) बिछान्यावर न दिसल्याने मी त्यांना शोधू लागले. माझा हात त्यांच्या तळपायावर पडला तेव्हा ते सजदा करत होते (नतमस्तक) आणि म्हणत होते,

‘‘हे अल्लाह! मी तुझ्या प्रकोपापासून सुरक्षित राहण्यासाठी तुझ्या प्रसन्नतेचा आधार घेत आहे. तुझ्या यातनेपासून सुरक्षित राहण्यासाठी तुझ्या क्षमादानशीलतेच्या आश्रयाला येत आहे आणि तुझ्या पकडीतून वाचण्यासाठी तुझ्याच शरणात येत आहे. माझ्यात हे सामर्थ्य नाही की मी तुझी पूर्ण स्तुती करावी. तू असाच आहे जसा की तू स्वत:ची स्तुती आणि प्रशंसा करतो.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या प्रार्थनेचे हे शब्द समजून घेण्यासाठी पर्याप्त आहेत की पैगंबरांचे पवित्र हृदय कोणकोणत्या भावविश्वाने परिपूर्ण होते आणि पैगंबर ईशभयाने किती अधिक प्रमाणात भीत होते!2015 च्या एका अभ्यासानुसार संपूर्ण जगात जवळपास 180 कोटी इस्लामधर्मीय आहेत. म्हणजे विश्व लोकसंख्येच्या 24.1% इस्लामधर्मीय मुस्लिम लोक जगाच्या विविध देशामध्ये आपली आस्था टिकवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. विश्वातील बहुतांश देशात कमी-अधिक प्रमाणात मुस्लिमांचे अस्तित्व आहे. या साऱ्या मुस्लिमांमध्ये  समान असलेले धागे म्हणजे- त्यांची केवळ अल्लाहवर असणारी श्रद्धा, त्यांचा एक प्रेषित-मुहम्मद(स.अ.स.) , त्यांचा धर्म इस्लाम,त्यांचा एकच ग्रंथ कुरआन मजीद आणि त्यांच्यामध्ये समान असलेल्या काही सांस्कृतिक बाबी.  

        जगभरात मुस्लिम व्यक्ती कुठेही रहात असली तरी काही बाबींचा अवलंब आपल्या जीवनात नकळत करत असते. विश्वातील सारेच मुस्लिम ज्या समान बाबींनी जोडले गेले आहेत, आणि आपल्या दैनंदिन जीवनात इस्लाममुळे ते ज्या गोष्टी सहजपणे करत असतात त्या गोष्टी इतर धर्मीयांना माहीत नाहीत. मुस्लिमांच्या बाबतीतल्या अशा अनेक गोष्टींचा उहापोह या लेखाद्वारे करण्याचा मानस आहे.

कलमा

जगातील सारेच मुस्लिम एकमेकांशी एका विधानाने (लाईलाहा ईल्लल्लाह मुहम्मदुर्रसुल्लुल्लाह) जोडले गेले आहेत, यालाच कलमा असे म्हटले जाते. म्हणजे जगातील सर्व मुस्लिमांच्या या गोष्टीवर विश्वास असतो की अल्लाह शिवाय उपासने योग्य कोणीच नाही आणि मुहम्मद (स.अ.स) हे अल्लाहचे प्रेषित आहेत. मुसलमान फक्त अल्लाहची उपासना करतात आणि प्रेषितांना अल्लाहचा संदेश मानवजातीला सांगणारे दूत मानतात.

कुरआन मजीद आणि रिहाल

साधारणपणे जगातल्या सर्व मुस्लिम घरात  कुरआन मजीदची अरबी भाषेतील प्रत असते. तर काही जणांच्या घरी या प्रतीशिवाय स्थानिक भाषेतील कुरआन मजीदच्या भाषांतराची प्रत असते. हा ग्रंथ घरातल्या उंच आणि सुरक्षित ठिकाणी लाकडाच्या किंवा पीव्हीसीच्या फोल्ड होऊ शकणाऱ्या बैठकीवर ठेवले जातो ज्याला रिहाल असे म्हणतात. लहान मुलांकडून किंवा इतर कोणाकडूनही  कुरआन मजीदची बेअदबी होणार नाही याची प्रत्येकाकडून खास काळजी घेतली जाते. प्रत्येक मुस्लिम घरात  कुरआन मजीदची  प्रत असली तरी आपल्या मुलीच्या लग्नानंतर सासरी जाताना तिला कुरआन मजीदची एक प्रत,रिहाल आणि मुसल्ला दिला जातो. कुरआन मजीदचे पठण झाल्यानंतर पठण करणारी व्यक्ती कुरआन मजीद बंद करून ठेवण्याआधी त्याचा अत्यंत आदराने मुका घेते, डोळ्यांना लावते, कधी-कधी आपल्या छातीशीही घट्ट धरते.

मुसल्ला

  प्रत्येक मुस्लिम घरात किमान  एक मुसल्ला किंवा ज्याला जानमाज म्हटले जाते ते असतेच. हा मुसल्ला फक्त नमाज  पढण्यासाठी असतो. मुसल्ला  कापडी, चटईचा अथवा गालिचाच्यारुपात  असतो. कुटुंब कितीही गरीब असले तरी त्या मुस्लिम घरात कुरआन मजीदची प्रत आणि मुस्सल्ला हमखास असतो. या लहान चटईवर,कापडावर किंवा छोटेखानी गालिचावर घरात नमाज पढली जाते. घरातील महिलाही या मुसल्ल्यावर नमाज पढतात,आणि पुरुषही सुन्नत किंवा नफील नमाज याच जानमाजवर  पढतात. अनेक घरात एकापेक्षा जास्त जानमाज आढळतात. अनेकदा नातेवाईक, आप्त, मित्रमंडळी जेव्हा हज यात्रेस जातात तेव्हा आपल्या जवळच्या लोकांसाठी भेट म्हणून जानमाज आणतात. मुसल्ला किंवा जानमाजचा वापर फक्त नमाज पढण्यासाठीच केला जातो, नमाज  व्यतिरिक्त आणखी कशासाठी त्याचा उपयोग केला जात नाही. प्रत्येक मुलीच्या लग्नातही सासरी जाताना तिला माहेरकडून दिल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये जानमाज दिला जातोच.

किबला

                 मक्का या सौदीअरबस्थित शहरास इस्लामधर्मियांमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. या ठिकाणी मस्जिद अल-हरम म्हणजेच काबा ही वस्तू आहे. ही जगातील पहिली मस्जिद म्हणून ओळखली जाते. यालाच अल्लाहचे घर असेही संबोधले जाते. ही वास्तू चौकोनी असून अंदाज़े 42ु 36 फूट इतकी असून या वास्तुची उंची 43 फूट इतकी आहे. ही वास्तू काळ्या दगडांनी बांधलेली आहे. या वास्तूस एक दरवाजा असून ती आतून पूर्णपणे रिकामी आहे. ही मस्जिद असुन प्रेषित इब्राहिम (अ.स)यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. ही मस्जिद विश्वाच्या मधोमध आहे आणि विश्वातील सारे मुस्लिम या मस्जिदला आपला किबला मानतात. किबला म्हणजे ज्याकडे तोंड करून नमाज पढली जाते ती दिशा. जगातील सर्व मुसलमान म्नक्यातील काबा या किबला असलेल्या वास्तूकडे तोंड करून नमाज पढतात. आशियातील मुस्लिम पश्चिमेला तोंड करून तर पश्चिमेकडील राष्ट्रातील मुस्लिम पूर्वेकडे म्हणजे मक्का कडे तोंड करून नमाज पढतात.

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जगातील कोणताही मुस्लिम काबाकडे पाय करून कधीही झोपत नाही. त्याच प्रमाणे कोणत्याही मुस्लिम घराची रचना अशा प्रकारे केली जाते की ज्यामध्ये स्वच्छतागृह कधीही काबाकडे तोंड करून असत नाही. म्हणजेच मुस्लिम स्त्री-पुरूष शुचिर्भूत होतांना काबाकडे कधीही तोंड करत नाहीत. ते कधीच मल-मूत्र विर्सजन काबाकडे तोंड करून  करत नाहीत किंवा ते त्याकडे तोंड करून कधीही थुंकतही नाहीत.

दस्तरखान                   

 बहुतेक मुस्लिम कुटुंब शक्यतो सर्वजण  एकाचवेळी एकत्र बसून आपले भोजन करतात आणि शक्यतो जमिनीवर बसूनच आपले अन्नग्रहण करतात.  जेवताना ते शक्यतो एकमेकांसमोर बसतात, आणि त्याच्यामध्ये जे कापड अथंरले जाते त्यास दस्तरखान असे म्हणतात, हे दस्तरखान नेहमी स्वच्छ ठेवले जाते. बहुतेक वेळा हे कापड लाल रंगाचे असते. या कापडावरच जेवतांना ताटे ठेवली जातात. शक्यतो सारे कुटुंबिय स्त्री असो की पुरूष आणि मुलेही  एकत्रपणे जेवण करण्याचा  प्रयत्न करतात.  अनेकदा   एका ताटात बसून जेवले जाते. अशाने बरकत येते आणि आपसातील प्रेम वृध्दिगंत होते अशी मुस्लिमांची आस्था आहे.  मुस्लिम लोक एकत्र जेवताना एकमेकाचे उष्टे आहे असे काही मानत नाहीत. आणि ताटात उष्टे अन्नही सोडत नाहीत. अनेकदा दस्तरखानवर पडलेले अन्नही उचलून खाल्ले जाते. अनेकदा पेल्यात पिऊन राहीलेले पाणी दुसरी व्यक्ती त्यातच पाणी टाकून पिते ते पाणी उष्टे आहे असे समजले जात नाही.

सलाम

प्रत्येक मुस्लिम एकमेकांशी बोलण्याआधी अस्सलामु अलैकुम अर्थात तुमच्यावर (अल्लाहची) शांती असो असे अभिवादन करतात. प्रत्येकजण आधी अभिवादन करण्यात पुढाकार घेतो. मग समोरचा व्यक्ती वयाने,मानाने लहान असली तरी कमीपणा वाटून घेत नाही. ओळख असो वा नसो समोरील व्यक्ती मुस्लिम आहे असे वाटल्यास त्या व्यक्तीस तो सलाम करतोच. अशा प्रकारे ते शांतीचा संदेश पसरवत असतात. लहान-लहान मुलेही घरात प्रवेश करतांना सलाम करतात. खरेतर सलाम करणे ही प्रेषित मुहम्मद(स.अ.स) यांची प्रथा आहे. परंतु एखाद्याने सलाम केल्यास त्यास व अलैकुम सलाम अर्थात तुमच्यावरही (अल्लाहची) शांती असो असे प्रतिउत्तर देणे अनिवार्य असते. म्हणजेच दोन व्यक्ती जर एकमेकांशी अबोल्यामध्ये असतील आणि त्यातील एकाने सलाम केला तर दुसऱ्याला त्यास उत्तर देणे अनिवार्य ठरते. सलाममुळे अबोला, दुरावा कमी होण्यास मदतच मिळते.

  आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे जगातील कोणत्याही देशातील मुस्लिम एकमेकांना अस्सलाम अलैकुम असेच अभिवादन करतात. फारफार तर अस्सलाम अलैकुम रहमतुल्लाही व बरकातुहू  अर्थात तुमच्या वर (अल्लाहची)  शांती असो,अल्लाहची दया आणि आशीर्वाद असो असे प्रति उत्तर देतात.

            

इस्तिंजां

  इस्तिंजा  म्हणजे शुचिर्भूत होणे. अनेकदा आपण मुतारी मध्ये जातो तेव्हा सार्वजनिक मुतारीत काही वेळेला आपणास वीटकराचे  तुकडे आढळतात.  हे तुकडे कोण कशासाठी ठेवतो या प्रश्नाचे उत्तर असे आहे की- प्रत्येक मुस्लीम स्त्री-पुरुष जो पाच वेळा नमाज पडतो त्यास शुचिर्भूत राहणे आवश्यक असते.

     त्यामुळे प्रत्येक स्त्री-पुरुष खाली बसूनच मूत्र विसर्जन करतो. मुत्राचे थेंब आपल्या अंगावर, कपड्यांवर उडू देत नाही. कारण ज्या वस्त्रांवर मुत्राचे थेंब पडलेले आहेत त्या वस्त्रानिशी नमाज पढता येत नाही. त्यामुळे नमाज पढणारी प्रत्येक व्यक्ती मूत्रविसर्जना नंतर प्रत्येक वेळी आपली मूत्र विसर्जनाची जागा मूत्र विसर्जना नंतर पाण्याने धुवून स्वच्छ करते. त्यामुळे नमाजी मुस्लिम अशा ठिकाणीच मूत्रविसर्जन करण्याचा प्रयत्न करतात ज्या ठिकाणी पाण्याची सोय असते. परंतु जेव्हा केव्हा नमाजी पुरुषाला मूत्रविसर्जन करणे आवश्यक आहे असे वाटते तेव्हा सार्वजनिक ठिकाणी पाणी नसल्यास तो वीटकराच्या तुकड्यांचा  वापर करतो. मुत्राचा अखेरचा थेंब जो शिश्नाच्या टोकास असतो तो थेंब अंगावर, कपड्यावर पडू न देता वीटकराच्या तुकड्याने  टिपून घेतला जातो. मुस्लिम नमाजी स्त्री-पुरुष  वैयक्तिकरित्या किती स्वच्छ असतात हे यावरून लक्षात येते. ही बाब बहुतेक इतर धर्मीयांना माहिती नसते.

गुस्ल 

गुस्ल म्हणजे आंघोळ करणे. परंतु ही आंघोळ साध्या अंघोळी सारखी नसते. केवळ डोके आणि अंगा-खांद्यावर पाणी घेणे म्हणजे गुस्ल नव्हे. जेव्हा-केव्हा पुरुषाला वीर्यस्खलन होते,  एखाद्या स्त्रीस मासिक पाळी येते किंवा पती-पत्नीच्या समागमाने वीर्यस्खलन होते तेव्हा असे स्त्री-पुरुष धार्मिकदृष्ट्या अपवित्र किंवा अशुद्ध होतात. अशा स्थितीत गुस्ल केल्याशिवाय नमाज पढता येत नाही.  कुरआन मजीदचे पठण करता येत नाही. त्यामुळे अशा अशुद्ध किंवा अपवित्र  स्त्री-पुरुषांना गुस्ल  करणे अनिवार्य असते. गुस्ल  करण्याआधी मनात अशी नियत करणेही आवश्यक असते की - हे अल्लाह मी अपवित्र किंवा अशुद्ध आहे मला या गुस्लने शुद्ध आणि पवित्र कर. गुस्ल  करताना सर्व शरीर पाण्याने ओले व्हायला हवे. सर्व अंग पाण्याने भिजायला हवे. अंगावरचा एकही केस सुका राहता कामा नये.  नापाक अपवित्र किंवा अशुद्ध असलेली व्यक्ती गुस्ल  केल्याशिवाय घराबाहेर पाऊल टाकत नाही. अनेकदा मुस्लिम मंडळी जुमा के जुमा अंघोळ करतात असे म्हणून त्यांना हिणवले, चिडवले जाते. परंतु एक बाब लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे सर्व जगाच्या पाठीवर मुस्लिमांचे वास्तव्य आहे. वेगवेगळ्या प्रदेशांची भौगोलिक स्थिती ही वेगवेगळी असते . कुठे कुठे प्रचंड उकडा आणि कडक ऊन्ह  असते  तर काही प्रदेशात गोठवणारी थंडी असते. कडाक्याच्या थंडीत राहणारे लोक रोज आंघोळ करतीलच असे नाही. परंतु  प्रेषितांच्या आदेशानुसार कितीही थंडी असली तरीही नापाक अशुद्ध /अपवित्र झाल्यास गुस्ल अत्यावश्यक असते. त्याच प्रमाणे दर शुक्रवार या दिवशी गुस्ल करणे अनिवार्य असते. तसेच ईदच्या दिवशी ही गुस्ल करणे आवश्यक असते.

वुजू 

      कोणत्याही मशिदीत प्रवेश केल्यास त्या ठिकाणी चार कक्ष हमखास असतात. यामध्ये तहारतखाना (स्वच्छतागृह), गुस्लखाना( स्नान कक्ष), वुजूखाना आणि नमाज पढण्याचा कक्ष असतो. नमाज पढण्याआधी काही अटींचे पालन करावे लागते त्या म्हणजे - ती व्यक्ती पाक असावी, नापाक नसावी. वीर्यस्खलनाने, समागमाने, मासिकपाळीने अशुद्ध अपवित्र नसावी. त्या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत त्यावर मल-मूत्राचे, वीर्याचे किंवा रक्ताचे डाग नसावेत. त्याचबरोबर नमाज पढण्याआधी त्या व्यक्तीने वुजू केलेले असावे. म्हणजे नमाज पढण्या आधी किंवा कुरआन पठण करण्याआधी पाक साफ असणे अनिवार्य असते.

         वुजू करताना आधी दोन्ही हात मनगटापर्यंत धुतले जातात, तीन वेळा चूळ भरून तोंड स्वच्छ केले जाते. त्यानंतर तीन वेळा नाक आतून स्वच्छ केले जाते. मग तीन वेळा संपूर्ण चेहरा धुतला जातो. मग कोपरापर्यंत दोन्ही हात तीन वेळा धुतले जातात. हे केल्यानंतर दोन्ही हातात पाणी घेऊन ओले हात डोक्यावरून मानेपर्यंत फिरवले जातात व दोन्ही कानांची छिद्रे आणि कानामागील जागा हाताने स्वच्छ केली जाते. सर्वात शेवटी आधी उजवा पाय आणि मग डावा पाय घोट्यापर्यंत स्वच्छ धुतला जातो. नमाज पूर्वी स्वच्छ होण्याच्या प्रक्रियेस वुजू असे म्हणतात. म्हणून प्रत्येक मशिदीत नमाज पढणाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची आणि वुजू करण्याची व्यवस्था असतेच असते. 

एकच नमाज पद्धत

इस्लाम धर्मियांमध्ये वेगवेगळे पंथ असले तरी हे सर्व लोक फक्त अल्लाहलाच  पूजनीय मानतात. प्रेषित मुहम्मद( स. अ. स.) यांना अखेरचे प्रेषित मानतात. इस्लामधर्मीय उपासक अल्लाह शिवाय इतर कोणाचीही उपासना करत नाहीत.  कोणाच्या पायावर आपला माथा टेकत नाहीत. या साऱ्यांचा कयामत (महाप्रलय) वर ठाम विश्वास असतो आणि या कयामतच्या दिवशी सर्व मानवांना पुन्हा जिवंत केले जाईल आणि त्यांच्या पाप-पुण्याचा हिशोब  होईल यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. कयामत नंतरचे मरणोपरांत जीवन हे कधीही न संपणारे असून आपल्या ईहलोकातील जीवनात आपण केलेल्या पाप-पुण्यानुसार जन्नत (स्वर्ग) किंवा  जहन्नम (नरक) मध्ये आपण पाठवले जाणार आहोत यावर त्यांची दृढ श्रद्धा आणि विश्वास असतो. इस्लामधर्मीय सर्व पंथाचे लोक नमाज, रोजा, जकात आणि हजयात्रा याद्वारे अल्लाहची उपासना करतात. 

        कोणताही मुस्लिम मग तो कोणत्याही देशात असो किंवा कोणत्याही भाषेचा असो तो नमाज पढताना संपूर्ण नमाज अरबी भाषेतूनच पढतो. त्यासाठी त्याला कुरआन मजीदमधील छोटे छोटे का  असेना किमान दहा सूरह (प्रकरण) तरी मुखोद्गत असायला लागतात. नमाज नंतर मागितली जाणारी दुआ मात्र तो आपल्या भाषेत मागू शकतो. परंतु नमाज मात्र जगात सर्व ठिकाणी एकाच पद्धतीने अरबीत पढली जाते. नमाज पढताना हात छातीवर बांधायचे  की पोटावर यात मतभेद असू शकतात. 

     पण मुस्लिमांच्या अशाप्रकारच्या अनेक बाबी  इतर धर्मियांना माहिती नसतात. अशा अनभिज्ञ असणाऱ्या एकमेकांच्या अनेक गोष्टी माहीत करून घेतल्यास आपले सहजीवन सोपे, सहज आणि सुखकर होईल यात शंका नाही. 

- डॉ. इकबाल मिन्ने

7040791137पवित्र कुरआनच्या आदेशानुसार, वारसाचे अधिकार केवळ पुरुषांनाच प्राप्त नाहीत तर यात स्त्रियांचेही अधिकार आहेत. वारसा कमी प्रमाणात असो की जास्त प्रमाणात, त्याची मयताच्या सर्व नातेवाईकामध्ये वाटणी करून द्यावी. शेतजमीन असो की घरदार, एवढेच नव्हे तर मयताने मागे सोडलेल्या उद्योगधंद्याचीही सर्व वारसदारांमध्ये वाटणी व्हावी.

अल्लाह आदेश देतो की पुरुषांसाठी दोन स्त्रियांइतका वाटा आहे. जर फक्त मुलीच वारसा असतील आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त असतील तर त्यांच्यासाठी मयताने मागे सोडलेल्या वारसामध्ये २/३ वाटा मिळेल. पण जर एकच मुलगी असेल तर तिला निम्मा वाटा मिळेल, बाकीची मालमत्ता इतर नातलगांमध्ये वाटली जाईल.

महत्त्वाची गोष्ट अशी की वारसा हक्काची विभागणी मयताने करून ठेवलेल्या मृत्रुपत्राची पूर्तता करून आणि त्याने कोणते कर्ज मागे सोडलेले असेल तर त्या कर्जाची परतफेड करूनच केली जाऊ शकेल. मयताची संतती असेल तर त्याच्या मातापित्यांना देखील प्रत्येकास सहावा हिस्सा दिला जाईल. जर मयताची संतती नसेल आणि फक्त मातापिताच वारस असतील तर मातेला एकतृतियांश हिस्सा मिळेल आणि जर मयताचे भाऊ-बहिणी असतील तर मातेस सहावा हिस्सा मिळेल. (मयत) पत्नीला संतती नसेल तर तिने मागे सोडलेल्या संपत्तीत पतीचा अर्धा वाटा असेल, पण जर तिला संतती असेल तर पतीला तिच्या संपत्तीत एकचतुर्थांश वाटा आहे. (मयत) पतीला जर संतती नसेल तर त्याने मागे सोडलेल्या संपत्तीत पत्नीला एकचतुर्थांश वाटा मिळेल, पण जर पतीला संतती असेल तर पत्नीला १/८ वाटा मिळेल.

एखाद्या पुरुष अथवा स्त्रीला स्वतःची मुलंबाळं आणि वडीलही नाहीत पण भाऊबहीण असेल तर त्या दोघांना प्रत्येकास सहावा हिस्सा मिळेल. जर एकापेक्षा जास्त भाऊबहिणी असतील तर त्यांना संपत्तीचा एकतृतियांश वाटा मिळेल.

तुमचे वाडवडील अथवा तुमच्या मुलांपैकी कोणी तुम्हांस लाभदायी ठरतील हे तुम्हास माहीत नाही. अल्लाहने ठरवून दिलेल्या या मर्यादा आहेत. म्हणून त्यालाच सर्व बाबींची जाणीव आहे. (पवित्र कुरआन, अध्याय-४)

- सय्यद इफ्तिखार अहमद

- मुहम्मद फारूक खान

- डॉ. मुहम्मद रज़ी-उल-इस्लाम नदवी

- मुहम्मद इकबाल मुल्ला


अनुवाद

- शाहजहान मगदुम

आयएमपीटी अ.क्र. 258       -पृष्ठे - 40 मूल्य - 20      आवृत्ती - 1 (DEC 2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/exl7dhpbs21pi1cedce7h7isf1z2hwhd


माननीय मुतरीफ बिन अब्दुल्लाह बिन शिख्खीर  त्यांच्या पित्याच्या माध्यमातून निवेदन करतात.

त्यांनी सांगितले, ‘‘मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर झालो त्या वेळी ते नमाज अदा करीत होते आणि पैगंबरांच्या हृदयातून अशा प्रकारे आवाज येत होता ज्याप्रमाणे उकळत्या भांड्यातून आवाज निघतो. अर्थात, पैगंबर रडत होते.’’(हदीस : मुसनद अहमद, नसई)

स्पष्टीकरण

अबू दाऊदचे हदीसकथन आहे,

‘‘मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना नमाज अदा करताना पाहिले. त्या वेळी रडताना त्यांच्या छातीतून पिठाच्या गिरणीसारखा आवाज येत होता.’’

नमाजमध्ये ईशभयामुळे रडण्याने तसेच हुंकार भरण्याने नमाज व्यर्थ जात नाही. परंतु एखादा मनुष्य शारीरिक पीडा व कष्टामुळे मोठ्या आवाजात रडत असेल किंवा हुंदका देत असेल तर नमाज तुटेल. (हिदाया)आपल्या सर्वांच्या गरजापूर्ण करण्यासाठी कुटुंबामध्ये जी सतत धावपळ करत असते ती आई असते. आपल्याला जीवापाड प्रेम करणारी आई असते. आई म्हणजे आनंदाचे सागर असते. आईकडे जादूची कुशी असते जेथे सारे दुःख दूर होतात. आईचे प्रेम निःस्वार्थ असते. म्हणूनच आईच्या प्रेमाला सगळ्या प्रेमाची ’’आई’’ म्हणतात. आई अशी व्यक्ती असते जी आपल्याला दुसऱ्यांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखते. आईला जगात पर्याय नाही. 

आई आपल्यावर निःस्वार्थ प्रेम का करते?

रक्ताचे नाते असते म्हणून, का नऊ महिने पोटात ठेवले म्हणून, प्रसुती वेदना सहन करून जन्माला घातलं म्हणून, का रक्ताचे दूध करून पाजले म्हणून, आपल्या संगोपनासाठी रात्रंदिवस एक केले म्हणून की झोपमोड केली म्हणून? आईच्या अस्तित्वात एवढे मोठे प्रेम आले कोठून? कधी विचार केलात का?

आपण फक्त एक आई पाहिली आहे. म्हणजे आपण आपल्या एकच आईच्या प्रेमाशी परिचित आहोत, पण का आपल्याला माहित आहे असे कुणी की ज्याची माया 70 आईंपेक्षा जास्त आहे. होय, अल्लाह पूर्ण मानवजातीवर 70 आईंपेक्षा जास्त प्रेम करणारा आहे. कृपा दया करणारा आहे. आपल्या आईला निर्माण  करणाऱ्या अल्लाहने तिच्या अस्तित्वात प्रेम, दया, करूणा ठेवली आहे. हा अल्लाहच्या दये व प्रेम मधला एक वाटा आहे. जो त्याने मानवाला व जनावरांना सुद्धा प्रदान केला आहे. 

लहानपणी आईच आपले सर्वस्व असते. आईलाही आपले लहानसे गोंडस बाळ तिचे संपूर्ण विश्व असते. बाळामध्ये गुंतून ती दुसरीकडे (बाळाच्या बाबांकडे वगैरे) थोडेफार दुर्लक्ष ही करते. बाळाला पहिल्यांदा बघितले की तिला समाधान वाटते, त्यात ती स्वतःला विसरून जाते. ती प्रसुतीच्या त्या भयंकर वेदना, जे अनेक हाडे एकदा मोडल्यानंतर झालेल्या वेदनेपेक्षा जास्त असते, विसून जाते.

आईसाठी तिचे बाळ, बाळ असते मग तो मुलगा असो की मुलगी. तिचे प्रेम दोघांवर सारखेच असते. सुंदर असो की कुरूप (क्षमा करा हा शब्द आईच्या शब्दकोशात नसावा) म्हणून प्रत्येक आईला तिचे बाळ सुंदरच वाटते. म्हणजे तिच्या मायेच्या चष्म्यातून तिला आपल्या बाळाचे सौंदर्यच दिसते. 

आईसारख्या मायेचा चष्मा सगळ्यांना लागला असता तर जगच सुंदर झाले असते. कोणाला कोणाचे उणीव दिसली नसती. उलट चांगले गुण बघून माणसाने मानसावर प्रेम केले असते आणि माणुसकीचा उच्चांक गाठता आला असता. मग प्रयत्न करूया मायेचा चष्मा घालून जग बघायला, खरंच खूप सुंदर वाटेल.

मला तर वाटते माणुसकीची सुरूवातच आईपासून होते. आई ही बाळाला नाही तर एका व्यक्तीमत्वाला जन्म देते. आईची कुशी ही लेकराची पहिली शाळा असते. आई बोलण्या-चालण्या, लिहिण्या-वाचण्यापर्यंत आपले मार्गदर्शन नाही करत तर आपल्या पूर्ण चारित्र्याची निर्मिती करणारी असते.

ती आपल्या सर्व भौतिक गरजा पूर्ण करते. किती खूश असते ती आपले कपडे खरेदी करताना, आपल्या खेळणी निवडत असताना आपल्याला शाळेत घालताना, ने आण करताना, लहानपणी हवीहवीशी असणारी आई तारूण्यात पदार्पण केलेल्या लेकरांना नुसती किरकिरी वाटते. तरूणाईला आईचे चांगले बोलणे वाईट वाटते. आपल्या चांगल्यासाठी घातलेली बंधनं त्यांना नकोश्या असतात. ते तोडू इच्छितात. आई ही आपले संगोपण निसर्गाच्या नियमांवरच करत असते. आईचे प्रेम, घेतलेली काळजी, चांगले बोल हे किटकिट जरी वाटत असले तर पुन्हा आपल्या लक्षात येते की तेच आपल्यासाठी चांगले होते. आई ही एक चांगली टीकाकार असते. मात्र टिका करण्यामागचा शुद्ध हेतू आपल्याला कळत नसतो. म्हणून आपल्याला बोअर वाटते. मोठे झाल्यावर मित्र मैत्रीणीच्या प्रेमाचे पडदे आपल्या अकलेवर पडतात. त्याच्यामागे आईचे प्रेम लपून जाते. मग सुरूवात होते तिला क्रॉस करायची, तिला वाटेल ते बोलायची, तिच्यासोबत गैरवर्तन, दुर्व्यवहार करायची, तिच्या बोलण्यावर लक्ष न द्यायची, स्वतःला मोठे समजण्याची, आईला शत्रू समजण्याची. पण ती हे सर्व सहन करते मुकाट्याने. कारण की तिचे काळीज खूप मोठे असते. तिच्यात सहनशीलता असते, संयम असते. 

खूप अभ्यास करूनही तुमचे मार्क्स येत नसतील, तुमच्या जीवनात असमाधान, उदासीनता असेल तर हे आईचा नव्हे (कोणतीही आई आपल्या लेकरांना शापीत करत नाही) तर हे तुम्ही आई सोबत केलेल्या गैरवर्तनाचा मोबदला आहे, असे समजा.

आजकालची युवा पिढी तर मोबाईलमध्ये एवढी लीन झाली आहे की, रात्रंदिवस त्यात मग्न. आईने बोलविले तरी हातातला मोबाईल सोडण्याची तयारी नसते. आईने काही काम सांगितले की ते टाळायचे. आईचे काम हलके करायला तयार नाही. रात्रंदिवस आपल्यासाठी मरमर करणाऱ्या आईची आपण किती काळजी घेतो हा विचार करायला सुद्धा वेळ नाही. 

शिक्षणात सुरूवातीपासून आपली मदत करणारी, होमवर्क करून घेणारी, उजळणी पाठ करून घेणारी, परीक्षेचा सराव करताना आपल्या सोबत बसणारी, आपल्याला आवडेल ते पदार्थ करून देणारी, प्रश्नोत्तर पाठ झाले की नाही हे बघणारी, आपली परीक्षा जणू तिचीच परीक्षा असते. चांगला रँक आला तर सर्वात जास्त खुश होणारी, खरे आहे एका यशस्वी विद्यार्थ्यामागे तिचे आईचे मोठे योगदान असते. 

आई हा दोनच अक्षरांचा शब्द असला तरी आईला दोन्ही जगाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

आपली लेकरे दुनियेत तर यशस्वी झालेच पाहिजे पण पारलौकिक जीवनातही ते उच्च स्थान प्राप्त करावे ही तिची इच्छा असते म्हणून ती आपल्याला ईश्वराची ओळख करून देते, माणुसकीचे धडे शिकविते, प्रेषितांच्या जीवनाची माहिती देते, चांगले विचार व आचार, आपल्यात रूजविते, ती आपली अध्यात्मिक गुरू असते .

एक अल्लढ मुलगी जेव्हा पहिल्यांदा आई बनते तेव्हा तिच्यात खूप बदल होतो. मग तिला कळते की तिच्या आईने तिच्यासाठी काय केले आहे? ऐरवी घाणीपासून दूर राहणारी, घानीचा तिरस्कार करणारी, सेन्सेटिव्ह मुलगी आता बाळाच्या प्रेमात कितीवेळा त्याची घाण उचलण्यास तयार असते.

नेहमी जास्त झोपल्याबद्दल लवकर न उठल्याबद्दल आईच्या शिव्या खाणारी आई झाल्यानंतर आता बाळासाठी झोपमोड करून घ्यायला तयार असते.

लेकरं मोठी झाली, शिकली तर त्यांच्या लग्नांची चिंता तिला होते, चांगले घर मिळावे याची काळजी करत असते. मुले लग्न झाल्यानंतर आईपासून दुरावतील पण मुलींची माया आईची बांधिलकी कायम असते उलट जास्त होते. तिच्या सासरचा इतिहास सांगणारी आई. लग्नानंतर मुलींच्या बाळंतपण करणे, नातवंडाची काळजी घेणे हेच तिचे काम.

हे सारे करताना आपल्या आईची तब्येत कधी खराब होते व ती मुकाट्याने कधी आपल्यातून निघून जाते ते आपल्यालाही कळत नाही. कारण जीवनात सारंच सहन करण्याची एवढी सवय झालेली असते की लहानसहान आजारांना ती जुमानत नाही. कधीही विचारा आई तब्येत कशी तर चांगलीच म्हणणार. सहन करत करत आजार कधी शेवटच्या स्टेजला जातो हे तिलाही कळत नाही आणि हळूच निघून जाते. ती आपल्याला सोडून कायमचा आराम करायसाठी अशी शांत झोप घेण्यासाठी की आपण कितीही रडलो तरी ती उठणार नाही.

आईला मरण्याची भीती नसते, भीती असते ती मी मेल्यावर माझ्या लेकरांना कोण बघेल? ह्याचीच. कोणाची आई मरू नये, असे आपण बोलत जरी असलो तरी या जीवनात कोणी कायम राहण्यासाठी आलेलो नाही म्हणून जोपर्यंत आईचा सहवास आपल्याला लाभला आहे तिची कदर करा, आदर करा. आईची कदर होते आपण पोरके झाल्यावर, मग दुसऱ्यांच्या आईला बघून घोकत बसण्याची वेळ येते. आई आहे तोपर्यंत तिला दुखवू नका. कितीही दुखवाल तरी ती तुमची काळजी घेणारच. 

आई असो की वडील यांचे अस्तित्व खूप अनमोल असते. त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडण्याचा विचार ही करू नये कारण थोडीफार किटकिट सहन करून आपण स्वर्गात तर जाऊ शकतो पण सहन न केल्यास आपल्यालाही जीवंतपणी वृद्धाश्रमात आणि मेल्यानंतर नरकात जावे लागते. 

इस्लाममध्ये आईचा दर्जा एवढा मोठा आहे की, पैगंबर सल्ल. म्हणतात, ’’आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. लहान असताना हे ऐकल्यावर मी माझ्या आईला विचारले होते की मला तर दिसत नाही, ती हसली आणि तिने सांगितले की  आईची सेवा केल्यास स्वर्ग मिळते. मला वाटते लोकांनाही आईच्या पायाखाली लपलेले स्वर्ग दिसत नाही म्हणूनच आईला वृद्धामामध्ये सोडत असावेत.

एक व्यक्ती मुहम्मद पैगंबर (सल्ल.) यांच्याकडे आला आणि विचारले माझ्या चांगल्या वर्तुणुकीचा हकदार कोण? त्यांनी फर्माविले, तुझी आई, पुन्हा विचारले त्यानंतर कोण? फरमाविले, तुझी आई, पुन्हा विचारले त्यानंतर कोण परत फरमाविले तुझी आई. त्याने पुन्हा विचारले त्यानंतर कोण? मग फरमाविले तुझे वडील.आईचा दर्जा वडीलांपेक्षा तिप्पट अधिक आहे. आईचे पांग आपण फेडू शकत नाही. ती आपल्यासाठी स्वतःच्या हाडाचे चंदन करते. 

एक व्यक्ती आईला खांद्यावर घेऊन हज करतो आणि येऊन पैगंबर सल्ल. यांना विचारतो की मी, आईचे हक्क अदा केले का? ते म्हणतात नाही, तिने सहन केलेल्या प्रसूती वेदनेच्या एका कळेचाही ह्नक अदा झाला नाही. आई-वडिलांची अवज्ञा हे गुनाहे कबिरा. म्हणजे मोठे पाप आहे. असल्या व्यक्तीची नमाज, रोजा, हज, जकात काहीच अल्लाह कबूल करत नाही. 

रमजानचे शेवटचे दिवस राहिलेले आहेत म्हणून सावधान! आपले खोल निरीक्षण करा. आपण आपल्या आई-वडिलांना दुखावले तर नाही ना, त्यांचे आज्ञाचे पालन केेले आहे ना? जर नाही तर अजून वेळ गेेलेली नाही पटकन उठा आणि क्षमा मागा त्यांची ते आपल्याला नेहमी माफ करण्यास तयार आहेत. 

रमजानुल मुबारकच्या शेवटच्या दहा रात्री पैकी एक रात्र अशी आहे की त्या रात्री आराधना, उपासना, प्रार्थन करणे हे हजार रात्रींपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. तिला ’’ लैलतुल कद्र’’ म्हणतात. कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे. या रात्री अल्लाह सर्व क्षमा मागणाऱ्यांची क्षमा करतो. मात्र 4 लोकांची नाही. 1. दारू पिणाऱ्यांची. 2. आई-वडिलांच्या आज्ञेचे पालन न करणारे 3. मनात कपट ठेवणाऱ्यांची 4. नाती तोडणाऱ्यांची.

सुरे बनी इसराईल आयत 22-24. ’’ तुझ्या पालनकर्त्याने निर्णय दिलेला आहे की तुम्ही लोकांनी इतर कोणाचीही भक्ती करू नये. परंतु, केवळ त्याची. आई-वडिलांशी सद्वर्तन करा. जर तुमच्यापाशी त्यांच्यापैकी कोणी एक अथवा दोघे वृद्ध होऊन राहिले तर त्यांच्यासाठी ’ब्र’ शब्ददेखील काढू नका व त्यांना झिडकारून प्रत्युत्तरदेखील देऊ नका. तर त्यांच्याशी आदराने बोला आणि नरमी व दयाद्रेतेने त्यांच्यासमोर नमून रहा आणि प्रार्थना करीत जा की,’’ हे पालनकर्त्या, त्यांच्यावर दया कर ज्याप्रमाणे त्यांनी दया व वात्सल्याने बालपणी माझे संगोपन केले. या आयातीमध्ये फरमावले आहे की, अल्लाह आणि रसूल (सल्ल.) नंतर सर्वप्रथम हक्क आई-वडिलांचा आहे. संततीला आई-वडिलांचा आज्ञाधारक, सेवक आणि शिष्टाचारी होणे आवश्यक आहे. 

आई-वडिलांची सेवा, मुलांनी तशाच प्रकारे करावी जसे लहानपणात आई-वडिलांनी त्यांचे पालनपोषण केले होेते. 

होणाऱ्या आईंनी तसेच वागावे जसे ते आपल्या बाळाला बघू इच्छिते. कारण आईच्या सवयी डायरे्नट बाळात येतात. गर्भकाळात सत्य बोलणे, वाईट सवयी सोडून देणे, विनाकारण काळजी न करणे. संतुलित आहार घेणे आणि आपला अध्यात्मिक दर्जा वाढविणे महत्त्वाचे.

आई म्हणजे आई असते, तिला नेहमी घाई असते, स्वयंपाक करायची, बाळाला भरवायची, आंघोळ घालायची, बाळाला तयार करायची, बाळाला बोलायला शिकवायची, चालायला शिकवायची, शाळेला ने आन् करायची, स्वादिष्ट डबा बनवून द्यायची, गृहपाठ करून घ्यायची, लेकराला सर्वप्रथम आणायची, आई म्हणजे आई असते तिला नेहमी घाई असते. 

चांगले करिअर, चांगल्या नोकरीची, चांगला जावई, सुंदर सून आणायची, नातवंडे बघायची, नातवंडांसोबत खेळायची, सतत चिंता करायची. उन्हाळ्यात लोणचे, पापड, कुरड्या करायची, एवढेच तिचे विश्व.

या 9 मे ला मातृदिन साजरा झाला. आईबद्दल सुविचारांचा डोंगर, आपल्याला व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदींवर बघायला मिळला.

आईसोबत फोटो काढून सोशल मीडियावर टाकले जाणार. पण हे सगळे करून आईचे हक्क अदा होणार काय? आईबद्दल जितके आपण पोस्ट शेअर करू. प्रॅ्निटकली दररोज तिचा आदर करणे, तिच्यावर जीवापाड प्रेम करणे, तिचे आज्ञाचे पालन करणे गरजेचे आहे. तेव्हाच कोठे खऱ्या अर्थाने मातृदिन साजरा झाल्यासारखे होईल. स्वतःमध्ये बदल घडवा. अल्लाहकडे प्रार्थना आहे की, अल्लाह माझ्या आईची मग्फीरत करो. ज्यांच्या आई हयात आहेत त्यांना उदंड आयुष्य लाभो, ज्यांच्या आजारी आहेत त्यांना लवकर बरे करो आणि ज्यांच्या आई नाहीत त्यांच्या आईच्या आत्म्येस शांती लाभो. आमीन.


- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, लोकांशी नैतिकतेचा व्यवहार करा, याशिवाय तुम्ली सदाचारी असू शकत नाही. लोक असे समजतात की सदाचार म्हणजे केवळ अल्लाहच्या अधिकारांचे पालन करणे. तसे नाही. लोकांच्या कल्याणासाठी झटत राहणे म्हणजे सदाचार आहे. तुमच्या नैतिकतेत प्रामाणिकपणा असावात, एकमेकांशी बंधुभावाचा व्यवहार करा, हा सदाचार आहे. सर्वोत्तम मुस्लिम तो आहे ज्याचे चारित्र्य सर्वोत्तम असेल.

पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो की, अशा लोकांसाठी स्वर्ग तयार केले गेले आहे जे कोणत्याही परिस्थितीत आपला माल खर्च करतात. मग ते संपन्न असोत की गोरगरीब. जे लोक आपल्या रागावर नियंत्रण करतात, एकमेकांच्या चुकांना क्षमा करतात, असेच लोक नेक आहेत, ज्यांना अल्लाह पसंत करतो.

असे लोक आपल्या विधात्यावर निष्ठा व्यक्त करतात जे पापांपासून, व्यभिचारापासून अलिप्त राहतात. आपल्या कार्यात एकमेकांशी सल्लामसलत करतात. आम्ही जी काही साधने त्यांना दिलेली आहेत, त्यातून ते खर्च करतात. त्यांच्यावर अतिरेक केला जात असेल तर त्याचा सामना करतात. कुणी तुमच्याशी वाईट वर्तन केले असेल तर तितकाच वाईट व्यवहार तुम्ही करू शकता, पण जर तुम्ही क्षमा केली तर यासाठी अल्लाह तुम्हाला मोबदला देईल. अल्लाहला अत्याचारी लोक पसंत नाहीत. तुम्ही जर चांगले वर्तन करत असाल तर ते तुमच्यासाठीच भल्याचे असते. आणि जर तुम्ही कुणाशी वाईट केले तर त्याचा परिणाम तुम्हालाच भोगावा लागणार आहे. (पवित्र कुरआन सार)


आपसातील देवाणघेवाणीमध्ये व्यावहारिकता

गरीब, श्रीमंत, व्यापारी, कर्मचारी, मजूर कुणीही असो, प्रत्येकास कधी ना कधीया ना त्या कारणामुळे कुणाकडून तरी कर्ज घ्यावे लागते. देवाण-घेवाण करावी लागते. कुणाकडून कर्ज घेऊन आपल्या अडचणी सोडवण्यात काही गैर नाही. पण कर्ज घेण्याचे आणि त्याची परतफेड करण्याचे काही नियम-कायदे आहेत. तसे आपल्या देशात तर बँकांकडून कर्ज घेणे हा मोठ्या उद्योगपतींचा शंभर टक्के फायद्याचा एकमेव धंदा बनलेला आहे. ते कर्ज घेतात ते बुडविण्यासाठी. परतफेड करण्यासाठी नाही.

पवित्र कुरआनात दोन माणसांमध्ये कर्ज देवाणघेवाण कशी व्हावी यासाठी नियम दिले आहेत. यात सर्वप्रथम जी अट घातली आहे तीअशी की कर्ज ठराविक मुदतीसाठी घ्यावे म्हणजे परतफेड कधी करायची ते अगोदरच निश्चित केले जावे. दुसरे असे की कर्ज घेताना त्याचा लेखी करार करावा. उभय पक्षांतील एकाने ते लिहून घ्यावे, करार लिहिण्यास कुणी नकार देऊ नये. या करारात काय लिहायचे आहे, कोणत्या अटी आहेत, कर्जाचा अवधी काय असेल या सर्व बाबी कर्ज घेणाऱ्याकडून ठरवाव्यात. देणाऱ्याने आपल्या मर्जीत येईल तशा जाचक अटी घालू नयेत. कर्ज घेण्याची ज्याच्यावर पाळी असेल त्यालाच स्वतःची आर्थिक क्षमता माहीत असते. जर कर्ज घेणाऱ्यास स्वतः करार लिहून काढणे जमत नसेल तर त्याच्याकरवी त्याच्या पालकाने, वकिलाने लिहून द्यावे. लिहिणाऱ्याने यात कमीजास्त करता कामा नये. लिहून झाल्यावर ते कर्जदाराला वाचून दाखवावे. त्या करारावर दोन व्यक्तीच्या स्वाक्षरी घ्याव्यात. जर दोन पुरुष हजर नसतील तर एक पुरुष आणि दोन स्त्रियांनी साक्षीदार व्हावे. अल्लाह म्हणतो, कर्ज अल्पावधीचे असो की दीर्घावधीचे, हीच पद्धत न्याय्य आहे. साक्षीदारांनीही प्रामाणिकपणा दाखवावा. कर्ज घेणाऱ्यास कराराची भाषा समजत नसेल तर त्याला समजावून सांगावे. लिहिणारा आणि साक्षीदार यांनी संगनमत करू नये. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात एका व्यक्तीने कर्ज घेतले, पण त्याची परतफेड जमत नव्हती. अशा वेळी प्रेषितांनी इतर लोकांना त्याला मदत करण्यास सांगितले आणि ज्याच्याकडून कर्ज घेतले होते त्यास प्रेषितांनी काही कर्ज माफ करण्यास सांगितले. हे लक्षात असू द्यावे की इस्लाममध्ये व्याजावर कर्ज दिले जात नाही. (संदर्भ- पवित्र कुरआन, २:२८१)

- सय्यद इफ्तिखार अहमद- डॉ. अब्दुल हक अन्सारी 

ही पुस्तिका म्हणजे जाहीर सभेत दिलेले एक भाषण आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ईशप्रदत्त जीवनधर्माचे संपूर्ण अनुसरणच भक्तीची निकड आहे आणि पालनकर्त्यापुढे पूर्ण समर्पणच इहलोक व परलोकात सफलता व मुक्ती प्राप्तीचा मार्ग आहे.

इस्लाम अल्लाहने पाठविलेला जीवनधर्म (प्रणाली) आहे आणि ही एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. लोकांना दयाळुतेची, प्रसन्नतेची, सफलता व मुक्तीची शुभसूचना देणारा धर्म इस्लाम आहे. या पुस्तिकेत इस्लामी न्यायाचा सिद्धान्त कुरआनचे आवाहन, राजकीय, आर्थिक व सामाजिक न्याय, भारतातील न्यायाची स्थिती इ.विषयी चर्चिले गेले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 257       -पृष्ठे - 24 मूल्य - 16      आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/xpqf6swyv0cez669n3xwfckbk6d48nte


माननीय आएशा (रजि.) सांगतात,

‘‘मी कधी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना अशा प्रकारे हसताना पाहिले नाही की तोंड पूर्णत: उघडे आहे आणि आतील कंठी दिसू लागेल. पैगंबर केवळ स्मितहास्य करीत असत जेव्हा आकाशात ढग व सोसाट्याचा वारा पहात तेव्हा त्यांचा चेहरा बदलून जात ज्याला सहज समजले जात असे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांचा चेहरा भयभीत होण्याची लक्षणे स्पष्ट दिसत असत. त्यांचे हृदय नेहमी ईशभययुक्त असे. आकाशात ढग आच्छादित होणे व सोसाट्याचा वारा वाहणे, यावर ते अधिक चिंतीत होत असत, कारण ढग व हवेच्या मागे एखादे वेळी ईशप्रकोपाची वीज तर दडलेली नसावी.

एका हदीसनुसार कळते की अशा परिस्थितीत त्यांची चिंता अधिक वाढत असे, ज्यामुळे ते घरात व घराबाहेर ये-जा करीत असत. त्यांची ही व्याकुळ स्थिती तेव्हाच संपत असे जेव्हा पाऊस पडणे सुरू होत असे.

माननीय आएशा (रजि.) यांनी पैगंबरांना त्यांच्या व्याकुळतेविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे आएशा! कोणास ठाऊक, हे ढग तेच तर नाहीत ज्यांच्याविषयी आदच्या राष्ट्रातील लोकांनी सांगितले होते, ‘हे ढग आहेत, पाऊस पडेल.’ परंतु आद लोकसमुदाय भ्रमात राहिला होता. ईश्वराने त्या राष्ट्राला नष्ट करून त्वरित त्यांचा हा भ्रम दूर केला.’’जीवनात तोच व्यक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी असतो ज्याचे शरीर निरोगी आणि मन शुद्ध असते. ईश्वराने मानवानिर्मितीपासून त्याच्या कल्याणाची सोय करून ठेवलेली आहे. वेळोवेळी त्याच्या गरजेनुसार त्यामध्ये बदलही करण्यात आले आहेत. आजचा व्यक्ती तणावाने ग्रस्त असून, विषाणूजन्य आजारांनी त्रस्त आहे. यामुळे तो शरीर अन् मनाने खचत चालला आहे. दिवसेंदिवस माणसाचे आयुष्यमान हे कमी होत असून, सुखसुविधां असूनही तो तणावमुक्त नसल्याचे दिसून येत आहे. आजच्या परिस्थितीत माणसाच्या आरोग्य अन् मनाला निरोगी आणि चिंतामुक्त ठेवण्याचे काम रोजा करतो. रोजाची उपासना पद्धती फक्त विशेष समाजघटकांसाठी मर्यादित नसून ती सर्व मानवकल्याणाच्या हिताची आहे. 

रोजाचे शारीरिक फायदे

1. वजन कमी होते : सतत एक महिना नियमितपणे 14 तास उपाशी राहिल्यामुळे रोजेधारकांचे वजन कमी होते. टेक्सास विद्यापीठाने या संबंधी जे संशोधन केलेले आहे त्यात म्हटलेले आहे की, बराच काळ रिकाम्यापोटी राहिल्याने किंवा सातत्याने कमी खाल्ल्याने शरिराचे वजन कमी होते. रोजे केल्याने शरिरातील पेशींवर ताण पडतो व त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

2) बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतो : अनेक आहार तज्ज्ञांचे यावर एकमत आहे की रमजानचे रोजे ठेवल्याने वजन कमी होण्यासोबतच रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची मात्रा सुद्धा कमी होते. त्यामुळे हृदयाची क्षमता वाढते. हृदयघात आणि स्ट्रोक सारख्या गंभीर आजारापासून माणूस सुरक्षित राहतो. 

3) पचनक्रिया मजबूत होते : आपण वर्षभर भरपूर खात आणि पीत असतो. अनेकजणांना घास 32 वेळा चाऊन खाने गरजेचे असते याची एक तर माहिती नसते किंवा वेळ नसतो. घास व्यवस्थितरित्या चर्वन न करण्याच्या सवयीमुळ अर्धवट चावलेले अन्न नित्यनेमाने पोटात ढकलले गेल्यामुळे पचन क्रियेवर सातत्याने अतिरिक्त तान पडत असतो. ही जवळ-जवळ सर्वांचीच परिस्थिती आहे. पोटाला स्वतःच्या कामाबरोबर दातांचेही काम करावे लागते. रोजांच्या काळात दिवसभर काहीही पोटात जात नसल्यामुळे पोटाला अर्थात पचन संस्थेला आराम मिळतो. झोपल्याने जसे शरीर ताजे तवाने होते तसेच रोजे राहिल्याने पचनसंस्था ताजी तवानी होते. सातत्याने 14 तास लांब कालावधीसाठी उपाशी राहिल्याने शरिरात अ‍ॅडीपोने्निटन नावाचेे हारमोन तयार होते जे की पचन संस्थेला अन्नातील पौष्टिक घटक पचविण्यास मदत करते. थोडक्यात सतत 30 दिवस रोजे केल्याने पचन संस्था सुधारते. 

4) वाईट सवईपासून सुटका : तंबाखू, पान, बिडी, सिगारेट, दारू सतत काहीबाही खाने, सतत गोड आणि तळलेले पदार्थ खाने, पाकेट बंद फरसान फस्त करणे, चहा, कॉफी, कोल्ड्रींक्स पीनेे या सारख्या वाईट सवई रमजानच्या 30 दिवसांच्या रोजांच्या पालनामुळे सुटण्यामध्ये मदत होते.  

मनोवैज्ञानिक फायदे

फक्त दिवसभर काही न खाणे आणि न पिणे यालाच बहुतेक लोक रोजा समजतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. रमजानमध्ये दिवसा उपाशी राहणे हा शरिराचा रोजा झाला. पण वाईट न पहाणे, वाईट कृत्य न करणे, वाईट न बोलने, वाईट न ऐकणे, सतत इबादत करत राहणे, रात्रींची 20 रकाअत अतिरिक्त नमाज अदा करणे, सतत पवित्र वातावरणात रहाणे अपेक्षित आहे. एरव्ही माणसे छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल आपसात वाद घालत असतात. रोजांच्या अवस्थेत त्यापासून रोखलेले आहे. शांत राहणे, कुणाशीही वाद न घालणे, पुढचा स्वतः होऊन वाद घालत असेल तर तरी त्याला अतिशय नम्रपणे ’मी रोजादार आहे’ येवढंच उत्तर देणे, गरीबांना आपल्या बचतीतून 2.5 टक्के जकात देणे व घरातील प्रत्येक लहान-थोरांच्या नावे पावणे दोन किलो गहू अथवा त्याची किमत गरीबांमध्ये फितरा (दान) म्हणून ईदच्या नमाजला जाण्यापूर्वी अदा करणे, सातत्याने कुरआनचे पठण करणे, वगैरे क्रिया या महिन्यात महिनाभर केल्या जातात. ज्यांचे अतुलनीय असे मानसिक लाभ मिळतात व रोजादाराचे चारित्र्य या 30 दिवसांच्या कठीण उपासनेच्या मुशीतून ताऊन-सुलाखून निघते व रोजादारांना यातून एवढी ऊर्जा मिळते की पुढील रमजानपर्यंत चांगले चारित्र्य जपण्यासाठी ती पुरेशी ठरते. थोडक्यात रमजानच्या रोजांमुळे माणूस आरोग्यवानच नव्हे तर चारित्र्यवान सुद्धा बनतो. शरीरासोबत मनही शुद्ध होते.प्रेषित मुहम्मद (स.) यांनी शेजाऱ्यांशी आदर-सन्मानाचा व्यवहार करण्यास सांगितले आहे. शेजाऱ्याला त्रास देणे हा गंभीर गुन्हा असल्याचे म्हटले आहे. एकदा एका अनुयायाने प्रेषितांना विचारले की कोणता गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे? त्यावर प्रेषित म्हणाले की अल्लाहला भागीदार जोडणे आणि आपल्या आपत्यांना ठार करणे, ते तुमच्या सुखसुविधांमध्ये भागीदार होतील या भीतीने. आणि हे की तुम्ही आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करावा. प्रेषित पुढे म्हणाले की कुणी दहा स्त्रियांशी व्यभिचार केला तरी तो एखाद्या शेजाऱ्याच्या पत्नीशी व्यभिचार करण्यापेक्षा कमीच आहे. तसेच एखाद्याने दहा घरांमध्यो चोरी केली तरी ती शेजाऱ्याच्या घरी चोरी करण्याच्या तुलनेत कमीच समजली जाईल. प्रेषित पुढे म्हणतात की अशी व्यक्ती मुस्लिम होऊच शकत नाही ज्याचा शेजारी त्याच्या अत्याचाराला बळी पडत असेल. जर एखादी स्त्री आपल्या शेजाऱ्यांना त्रास देत असेल आणि त्याचबरोबर ती नमाज अदा करीत असेल आणि रोजे ठेवत असेल तरीदेखील ती स्वर्गात जाऊ शकत नाही. तसेच एखादी महिला नमाज अदा करते, दानधर्म करते, त्याचबरोबर जर ती शेजाऱ्यांशी सदवर्तन करत असेल तर ती स्वर्गात जाईल. प्रेषितांनी घोषणा केली की आपल्या घराच्या अवतीभवती ४० घरे शेजारी समजले जावेत. एकदा मुस्लिमांच्या माता ह. आयेशा यांनी प्रेषितांना विचारले की माझे दोन शेजारी आहेत. मी कुणाला भेटवस्तू देऊ? प्रेषित म्हणाले, ज्याचे दार तुमच्या दाराजवळ असेल. शेजाऱ्यांचे हक्काधिकार विशद करताना प्रेषित म्हणतात, त्याने तुमची मद मागितली तर त्याला मदत करा. त्याला कर्ज लवे असेल तर कर्ज द्या. तेवढ्यावर भागले नसेल तर पुन्हा द्या. आजारी पडल्यास त्याची विचारपुस करा. त्याला कोणते यश लाभले असेल तर शुभेच्छा द्या. अडचणीत सावडल्यास त्याच्या मदतीला धावून जा. त्याच्या घरात हवा जात नसेल तर आपल्या घराच्या भिंतीची उंची कमी करा. एखादे पक्वान्न केल्यास ते पदार्थ त्याच्या घरी पाठवा. जर फळे आणली असतील तर शेजाऱ्यालाही द्या. देऊ शकत नसाल तर तुमच्या मुलांना फळ घेऊन घराबाहेर पाठवू नका जेणेकरून शेजाऱ्यांच्या मुलांना दुःख होणार नाही.

पुरुष आणि स्त्री

पुरुष आणि स्त्री एकमेकांची वस्त्रे आहेत. (पवित्र कुरआन) वत्र् जसे माणसाचे थंडी, उष्णता आणि इतर त्रासांपासून रक्षण करते त्याचप्रमाणे पुरुष आणि महिलेचेही आहे. दोघे एकमेकांच्या सुरक्षेचीी काळजी घेतात. वस्त्र परिधान केल्याने जसे माणसाला सौंदर्य प्राप्त होते, तसेच सौंदर्य स्त्री-पुरुष यांच्या संबंधामुळे दोघांना प्राप्त होते. वस्त्र धारण करण्याने जसे शरीरावरील अवगुण झाकले जातात त्याचप्रमाणे स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकतात. स्त्री आणि पुरुष या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. जे जे अधिकार स्त्रीला प्राप्त आहेत तेच अधिकार पुरुषालाही प्राप्त आहेत. पवित्र कुरआनने आई-वडील आणि इतर नातलगांमध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना वाटा दिलेला आहे. स्त्री स्वत:चा व्यापार किंवा कोणताही दुसरा व्यवसाय करू शकते. या व्यवसायातल्या कमाईवर स्त्रीचा पूर्ण अधिकार असेल. जर तिच्याकडे मालमत्ता, शेत-जमीन, घरदार असेल तर कुणालाही न विचारता, कुणाचीही संमती न घेता ती विकू शकते. स्त्रीच्या चालचरित्रावर आरोप लावल्यास भयंकर पाप म्हटले गेले आहे. पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की, “जे लोक पावित्र्यसंपन्न महिलेवर आरोप लावतात आणि त्यासाठी ४ लोकांची साक्ष आणू शकत नाहीत अशा लोकांना ८० फटके मारून शिक्षा द्या आणि पुढे कोणत्याही प्रकरणात त्यांची साक्ष कबूल करू नका. (कुरआन, सूरह नूर-५)” आपल्या शेवटच्या हजप्रसंगी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जे प्रवचन दिले होते त्यामध्ये असे म्हटले आहे की, “लोकहो, तुमच्यावर तुमच्या पत्नीचे हक्काधिकार आहेत, तसेच त्यांच्यावर तुमचे अधिकार आहेत. तुमच्या पत्नींनी इतर पुरुषांना तुमच्या बिछान्यावर बसू देता कामा नये. ज्यांना तुम्ही पसंत करीत नाही त्यांनी तुमच्या घरी विना परवानगी येऊ नये. आपल्या पत्नीशी सौहार्दाने वागा, अल्लाहचे नाव घेऊन तुम्ही तिचा स्वीकार केला आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करा, कैद्यांप्रमाणे घरी बंदिस्त करून ठेवू नका. पत्नीसंबंधी कुरआनात म्हटले आहे की त्या सदाचारी आहेत अल्लाहच्या आज्ञा पाळतात. पतीच्या गैरहजेरीत त्याच्या हक्काधिकारांचे संरक्षण करतात.”

- सय्यद इफ्तिखार अहमद- प्रा. उमर हयात खान गौरी

बर्थ कंट्रोल ही एक यहुदी चळवळ आहे. यास िख्र्चाश्नांनी प्रथम प्रसिद्धी दिली आणि हळूहळू तिला जागतिक रुप देण्यात आले. सामाजिक नीतीमूल्ये यामुळे उद्ध्वस्त झाली. म्हणून आज या चळवळीच्या व्यावहारिक परिणामांना जाणून घेण्याची अत्याधिक आवश्यकता निर्माण झाली आहे. ही पुस्तिका विश्लेषनात्मक महत्त्व ठेवून असल्याने तिचे महत्त्व अधिक आहे.

या पुस्तिकेत या चळवळीचे दुष्परिणामांना स्पष्ट करुन वाचकांपुढे वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आयएमपीटी अ.क्र. 256      -पृष्ठे - 64 मूल्य - 30        आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/hkk64qggokzcl43lvo78fxncazeegnf9

माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मी का म्हणून आनंद व सुखाचा उपभोग घ्यावा जेव्हा की वस्तुस्थिती तर ही आहे की नरसिंग फुंकणाऱ्या देवदूताने (फरिश्ता) नरसिंगास आपल्या तोंडात घेतले आहे. तो खाली मान करून उभा आहे आणि कान देऊन प्रतिक्षेत आहे की केव्हा त्याला सूर फुंकण्याचा आदेश दिला जातो.’’

साथीदारांनी विचारले, ‘‘या अवस्थेत तुम्ही आम्हाला कोणता आदेश द्याल?’’

पैगंबर म्हणाले, ‘‘सांगा! आम्हासाठी अल्लाह पुरेसा आहे आणि तो उत्तम कार्यसाधक आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण

अर्थात, ज्या व्यक्तीला या स्थितीचे गांभीर्य कळेल की देवदूत सूर फुंकण्यास अगदी तयार आहे, कोणत्याही वेळी कयामत येऊ शकते आणि ज्याला या स्थितीची पूर्ण जाणीव आहे तो चैनीत कसा राहू शकेल? जगातील कोणतेही सुख व आराम त्याला या स्थितीपासून निश्चिंत राहू कसे देतील? त्याला हीच चिंता लागून राहील की या जगात त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण कारणी लागावा आणि जीवनक्षण व्यर्थ जाऊ नये. तो मनुष्य सतत ईशभय बाळगून जीवन जगत राहील.

मनुष्य ज्या परिस्थितीतून जात आहे जर त्याला त्याची गंभीरता जाणवेल तर तो कदापि चैनीत राहणार नाही. अशा स्थितीत मनुष्यासाठी योग्य कार्यनीती ही आहे की त्याने अल्लाहची अवज्ञा व अपराधांपासून अलिप्त राहावे आणि ईशभक्तीची (बंदगी) कधीही उपेक्षा करू नये. परंतु दृढविश्वास मात्र त्याला स्वत:च्या कामगिरीवर नव्हे तर आपल्या अल्लाहवर असावयास हवा. कोणावर भरोसा व विश्वास ठेवला जाऊ शकतो तर ते दुसरे इतर काहीही नसून अल्लाहच आहे. मनुष्याने अल्लाहलाच आपला कार्यसाधक समजावे आणि आपला मामला त्याच्याच हवाली करावा आणि घोषित करावे की अल्लाह आमच्यासाठी पर्याप्त आहे. संकट काळात याचमुळे शांती प्राप्त होऊ शकते.

 

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget