June 2021


माननीय अब्दुल्लाह बिन औफ (रजि.) सांगतात.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) अधिकतर ईशस्मरणात राहत असत. व्यर्थ गोष्टींपासून सावध राहत आणि नमाजला दीर्घ व भाषण संक्षिप्त करत असत. ते विधवा व निर्धन गरीबांसोबत चालण्यात संकोच करीत नव्हते आणि विधवा व निर्धनांचे प्रत्येक काम ते करून देत असत. (हदीस : नसई, दारमी)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) अधिकतर ईश्वराला स्मरण करीत असत. ईशस्मरणाशी संबंधित प्रत्येक काम ईशस्मरणात समाविष्ट आहे. पैगंबर अल्लाहचे स्मरण विविध प्रकारे प्रत्येक क्षणी करीत असत.

खरे जीवन ईशस्मरण व त्याच्या आठवणीशी संबंधित आहे. ज्या जीवनात ईशस्मरण नाही, ते जीवन नाही तर ते संताप व अभावग्रस्तता आहे. हे वेगळे आहे की एखादा मनुष्य या गोष्टीची जाणीव ठेवून नसेल.

या जगाविषयी पैगंबर मुहम्मद (स.) यांना तर कमीच आवड होती. जगाविषयीच्या गोष्टी ते कमीच बोलत असत. तसे पाहता भौतिक गोष्टीसुद्धा बुद्धीविवेकपूर्ण व उद्देशपूर्ण असत. वास्तविकपणे त्यांना व्यर्थ म्हटले जाऊ शकत नाही. परंतु उपलक्षी त्यांना व्यर्थ म्हटले गेले आहे. व्यर्थ गोष्टींशी अभिप्रेत त्या गोष्टी आहेत ज्यांचा कोणताच वास्तविक उद्देश नसावा आणि जे ईशस्मरणाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबोधित नसतील. स्पष्ट आहे की पैगंबरांच्या तोंडून अशी व्यर्थ गोष्टनिघणे अशक्य होते.

मूळत: थोड्यासाठी ‘कलील’ शब्द प्रयुक्त झाला आहे. ‘़कलील’ शब्द निषेधच्या अर्थानेसुद्धा वापरला जातो. या अर्थाने काही लोकांनी या हदीसचा अर्थ असा सांगितला आहे की अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या तोंडून कधीही व्यर्थ बोलत नसत.

अल्लाहशी घनिष्ट संबंध असल्यास नमाज स्वाभाविकपणे दीर्घ होते. तसेच भाषणात अनावश्यक गोष्टींपासून दूर राहिल्यास आणि केवळ आवश्यक गोष्टी करणे पर्याप्त समजले तर भाषण कधीही लांबले जात नाही किंवा ते कंटाळवाणे होत नाही. म्हणूनच पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्याची दीर्घ नमाज आणि त्याचे संक्षिप्त भाषण त्याच्या बुद्धीमत्तेचे प्रतीक आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

मनुष्याच्या नादानपणाची व अविचारी गोष्ट ही आहे की त्याने भाषण तर लांबलचक द्यावे, परंतु नमाज जी अभिष्ट आहे तिला संक्षिप्त करावे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यात किंचितसासुद्धा अहंकार नव्हता जेव्हा की अल्लाहने त्यांना सर्वोच्च स्थान बहाल केले होते.पवित्र कुरआनात नाहक हत्या करण्यास मोठा अपराध ठरवला गेला आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला हत्येपासून वाचवणे म्हणजे साऱ्या मानवजातीला जीवदान देण्यासारखे आहे. “जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा वध केला आणि ती हत्या न्याय्य मृत्युदंड नसेल अथवा धरतीवर उपद्रव माजवण्यासाठी नसेल तर अशा व्यक्तीने जणू साऱ्या मानवजातीची हत्या करण्यासारखे आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीने कुणाचा जीव वाचवला तर त्याने साऱ्या मानवजातीला वाचवण्यासारखे आहे.” (पवित्र कुरआन-५:३२) यावरून हे स्पष्ट होते की इस्लामच्या नजरेत नाहक हत्या करणे भयंकर अपराध आहे आणि जर कुण्या व्यक्तीने एखाद्या निष्पाप माणसाला वाचवले तर हे पुण्याचे कर्म आहे. नाहक जीव घेणारा खऱ्या अर्थाने समाजाशी बंड करून मानवतेविरूद्ध पाऊल उचलतो. अशा माणसास मानवी जीवनाची किंमत नसते, तेव्हाच तो असे अत्याचार करण्यास धजावतो. हा असा माणूस सबंध मानवजातीला धोकादायक ठरतो. या उलट जो मनुष्य निष्पाप व्यक्तीला मृत्युच्या दाढोतून वाचवतो तो फक्त एक पुण्यकर्म करतो. इतकेच नव्हे तर तो मानवजातीची आणि मानवी प्राणाची कदर करतो. मानवतेचा हितचिंतक असतो. अशीच माणसे समाजात वावरण्यायोग्य असतात. कारण तो समाजात रक्षक असतो. म्हणूनच कुरआनने असे म्हटले आहे की निष्पाप व्यक्तीला हत्येपासून वाचवणे म्हणजे साऱ्या मानवजातीला जीवदान देण्यासारखे आहे. दुसऱ्या ठिकाणी पवित्र कुरआन असे म्हणतो की नाहक हत्या करणे म्हणजे उपद्रव माजविण्यासारखे आहे आणि उपद्रव माजवणारे लोकच त्यास बळी पडतील असे नाही तर इतरांनाही त्याच्या झळा सोसाव्या लागतील. आपल्या समाजात जर उपद्रव माजविणारे काही लोक असतील तर त्यांच्यावर अंकुष ठेवणे सबंध समाजाचे कर्तव्य ठरते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा अर्थ अशा कृतींना समाजामध्ये थारा देण्यासारखे असेल जे समाजासाठी घातक आहे.जमीन माणसांना राहण्यालायक आहे का नाही हे माणसांच्या वर्तवणुकीवरूनच ठरते. माणसं जर सदाचारी असतील तर जमीन राहण्यालायक बनते आणि ते दुराचारी असतील तर जमीनीवर राहण्यापेक्षा जमीनीच्या पोटात राहणे जास्त योग्य असते. जनसमूहाचे वर्तन त्यांच्या श्रद्धेनुसार ठरत असते. ईश्वराने संपूर्ण मानव समुहांसाठी श्रद्धा म्हणून इस्लामला पसंती दिलेली आहे. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ’’अल्लाहजवळ धर्म केवळ इस्लामच आहे.’’ (संदर्भ : आले इमरान आयत नं. 19). 

जोपर्यंत मुस्लिम समाजातील बहुसंख्य लोक व्यवहारिकदृष्ट्या इस्लामचा संदेश इतर समाजापर्यंत परिपूर्णरित्या पोहोचविण्याचा संकल्प करणार नाहीत तोपर्यंत जगात होणारे अत्याचार कमी होणार नाहीत. कारणकी सदाचाराची स्थापना करण्यासाठी दुराचाराची पाळेमुळे खंदून काढल्याशिवाय आदर्श समाजाची निर्मिती शक्य नाही. दुराचारी व्यवस्थेतील वाईट गोष्टी हटविल्याशिवाय सदाचारी व्यवस्थेच्या चांगल्या गोष्टींची पेरणी करणे संभव नाही. या कामासाठी मौखिक उपदेशांपेक्षा व्यवहारिक प्रयत्नांची गरज आहे. पैगंबरी मिशनचा उद्देश नैतिक रूपाने श्रेष्ठ समाजाची निर्मिती करणे हाच होता. 

सत्याचा संदेश म्हणजे काय? 

लाईलाहा ईलल्लाह मुहम्मदुर्र रसुलुल्लाह (सल्ल.) म्हणजे अल्लाहशिवाय कोणी ईश्वर नाही आणि मुहम्मद सल्ल. हे त्याचे प्रेषित आहेत. या दोन वाक्याच्या श्रद्धासुत्राने रानटी प्रवृत्तीच्या अरबी टोळ्यांच्या जीवनामध्ये अभूतपूर्व अशी क्रांती घडवून आणली आणि पाहता-पाहता शंभर वर्षाच्या आत पृथ्वीवरील एक तृतीयांश भूमीवर या श्रद्धा सुत्राने ताबा मिळविला. हेच श्रद्धा सुत्र म्हणजे सत्याचा संदेश होय. 

सत्याचा संदेश का द्यावा?

पृथ्वीवर खऱ्या अर्थाने शांतता व सुव्यवस्थता  राखण्यासाठी हा संदेश द्यावा. या संदेशाशिवाय जगाकडे दूसरा पर्याय नाही.  

सत्याचा संदेश कसा द्यावा?

ईश्वर एक आहे आणि त्याचे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) आहेत. हे सत्य आहे आणि या सत्याचा संदेश जगाला कसा द्यावा? याचे मार्गदर्शन सुद्धा कुरआनमध्येच केले गेलेले आहे. म्हणून म्हटलेले आहे की, ’’हे पैगंबर सल्ल. ! आपल्या पालनकर्त्याच्या मार्गाकडे (लोकांना) आमंत्रित करा मुत्सद्देगिरीने व उत्तम उपदेशासहीत, लोकांशी विवाद करा अशा पद्धतीने जी उत्तम असेल.’’ (संदर्भ : सुरे नहेल आयत क्र. 125). प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फरमाविले आहे की,’’ तुम्ही जमिनीवर राहणाऱ्या लोकांवर दया करा आकाशात राहणारा ईश्वर तुमच्यावर दया करील.’’ (तिर्मिजी : खंड-2 हदीस क्र. 19).

भारतापुरता विचार केला तर भारताच्या संविधानामध्ये धर्माच्या आचरणाची व त्याच्या प्रचार व प्रसाराचा मुलभूत हक्क सर्व नागरिकांना दिलेला आहे. म्हणूनच भारताचे नागरिक म्हणून मुस्लिमांना इस्लामनुसार जीवन जगण्याची व त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा हक्क अनुच्छेद 25 नुसार मिळालेला आहे. मात्र हा हक्क प्रत्यक्षात वापरतांना तारतम्य बाळगण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे कारण या ह्न्नाच्या विरूद्ध अनेक राज्यांनी धर्मांतर विरोधी कायदा केलेला आहे. इस्लामच्या सुरूवातीच्या काळात इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक मुस्लिम व्यक्ती तळमळीने काम करता होता. मात्र अलिकडच्या काळात भौतिक प्रगती आणि उच्च राहणीमानाच्या हव्यासापोटी मुस्लिम समाजामध्ये इतरांपर्यंत इस्लामचा संदेश पोहोचविण्याच्या प्रक्रियेमध्ये संथपणा आलेला आहे. नव्हे अनेक मुस्लिम असे आहेत ज्यांच्या जीवनात इस्लाम नावापुरताच शिल्लक राहिलेला आहे. वास्तविक पाहता आज देशात भ्रष्टाचार, अनाचार, अन्याय, अत्याचार एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की तो नष्ट करण्यासाठी इस्लामची शिकवण संपूर्ण ताकदीने देणे गरजेचे झाले आहे. उदा. कल्पना करा तुम्ही कोविड-19 च्या औषधाचा शोध लावण्यात यशस्वी झालात तर तुमच्यात ते औषध इतर लोकांपर्यंत पोहोचविण्याची जी तळमळ उत्पन्न होईल तीच तळमळ किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त तळमळ इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी तुमच्यात आणि प्रत्येक मुस्लिमाममध्ये असायला हवी. 

सत्याचा संदेश दिला नाही तर?

इस्लामला श्रद्धा म्हणून अंगीकारणे यावरच पृथ्वीवरील शांतता आणि सुव्यवस्था तसेच मानवकल्याण अवलंबून असल्यामुळे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणे, त्यासाठी वेळ आणि संपत्ती खर्च करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे आद्य कर्तव्य आहे. ते कर्तव्य करण्यापासून मुस्लिम समाज कुचराई करत असेल तर त्याचे काय परिणाम होतील, याची भविष्यवाणी सुद्धा कुरआनमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणूनच म्हटलेले आहे की, ’’ तुम्ही जर तोंड फिरवाल तर अल्लाह तुमच्या जागी एका अन्य जनसमुहाला उभा करेल आणि ते तुमच्यासारखे असणार नाहीत.’’ (संदर्भ : सुरे मुहम्मद आयत क्र. 38).

सत्याचा संदेश देण्यासाठी कोण पात्र आहे?

तसे पाहता सत्याचा संदेश देणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती (च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता.’’ (सुरे आलेइमरान आयत क्र.110). परंतु काही लोकांवर याची विशेष जबाबदारी येते. म्हणूनच कुरआनच्या याच सुरहमध्ये म्हटलेले आहे की, ’’तुमच्या पैकी एक गट असा जरूर असावा जो सद्वर्तनाचे आवाहन करणारा व चांगुलपणाचा आदेश देणारा तसेच दुराचाराचा प्रतिबंध करणारा असेल. अशाच लोकांना साफल्य लाभेल.’’(सुरे आलेइमरान 104) 

अगदी प्रेषित काळापासून आजपर्यंत इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया अखंडपणे सुरू आहे. त्या प्रक्रियेतून आलेल्या अनुभवातून हा संदेश पोहोचविणारा व्यक्ती कसा असावा? या संदर्भाचे काही ठोकताळे ठरविण्यात आलेले आहेत. ते खालीलप्रमाणे -

1. संदेश देणाऱ्या व्यक्ती (दाई) मध्ये इस्लाम हाच एकमेव सत्यधर्म आहे याचा संपूर्ण आत्मविश्वास असावा. 

2. त्याला कुरआनची आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवन चरित्राची इत्यंभूत माहिती असावी. 

3. ज्याला संदेश दिला जात आहे (मदू) त्याच्याकडून इस्लाम आणि मुस्लिमांसंबंधी विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांचे उत्तर संदेश देणाऱ्याकडे तयार असावेत. 

4. संदेश देणाऱ्याचे चारित्र्य इस्लामच्या शिकवणी बरहुकूम असावे. त्याच्या बोलण्यात आणि चारित्र्यात विरोधाभास नसावा. 

5. त्याला इस्लामच्या इतिहासाची इत्यंभूत माहिती असावी. त्याच्या वागण्याबोलण्यात नम्रता असावी. अल्लाहने आपले प्रेषित हारूण आणि मुसा अलैसलाम यांना दुष्ट फिरऔन (फारेह)कडे भेटीसाठी पाठवितांना ताकीद केली होती की,’’त्याच्याबरोबर नरमाईने बोला. कदाचित तो उपदेश स्वीकारेल अथवा भीती बाळगेल’’ (सुरे ताहा आयत क्र. 44).

6. संदेश देतांना वापरली जाणारी भाषा आक्रमक किंवा विकृत नसावी. बोलण्यामधील अवाजवी आक्रमकता हे एक मानसिक रोगाचे लक्षण आहे. चरित्रहीन व्यक्तीच विकृत भाषेचा वापर करत असतात. 

7. संदेश देतांना जर का कोणी पलटून संदेश देणाऱ्याला उद्धट वागणूक दिल्यास किंवा इस्लामबद्दल अपशब्द काढल्यास ते सहन करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. म्हणून कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’कृपावंताचे (अस्सल) दास ते आहेत जे जमिनीवर नम्रपणे चालतात आणि अज्ञानी  (लोक) त्यांच्या तोंडी लागले तर (ते) म्हणतात की, तुम्हाला सलाम.’’ (सुरे फुरकान आयत नं.63).

संदेश देणाऱ्याने एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, आपले कर्म आणि आपला प्रत्येक शब्द फरिश्ते (ईशदूत) रेकॉर्ड करत आहेत. संदेश देणाऱ्याने वाईट बोलणाऱ्याला वाईट पद्धतीने उत्तर दिल्यास एक गोष्ट स्पष्ट होवून जाते की, त्याच्यामध्ये सहनशिलतेचा अभाव आहे व त्याला प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या संदेश देण्याच्या पद्धतीबद्दल पुरेसे ज्ञान नाही. लक्षात ठेवा मित्रांनों! कोणताही लोकसमुह त्याच्या नैतिक आचरणानेच ओळखला जातो आणि विनम्रतेशिवाय नैतिक आचरण शक्य नाही. 

8. संदेश देणारा चांगला श्रोता असावा. ज्याला संदेश दिला जात आहे त्याचेही म्हणणेही मन लावून ऐकण्याची त्याच्यात पात्रता असावी. 

9. संदेश देणाऱ्या व्यक्तीला तो संदेश ज्याला देत आहे त्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेची जाण असायला हवी. समोरची व्यक्ती जरी अपरिचित असेल तरी त्याच्या देहबोलीवरून त्याला चटकन ओळखता यावे की, संदेश ऐकणाऱ्याची मनःस्थिती कशी आहे? जर तो लक्षपूर्वक ऐकत असेल तर त्याला उत्तमोत्तम भाषेत, तार्किक दृष्टीने आणि मृदू वाणीने संदेश द्यावा. जर तो इकडे-तिकडे पहात असेल, उडवा-उडवीची उत्तरे देत असेल, तो एकाग्रचित्त नसेल, त्याला कुठेतरी जाण्याची घाई असेल तर संदेश देणाऱ्याने तात्काळ त्याला मोकळीक द्यावी. 

10. संदेश देणाऱ्याने संदेश ऐकणाऱ्यावर कधीच आपले श्रेष्ठत्व गाजवू नये. त्याला कमी लेखू नये उलट त्याला सन्मानजनक वागणूक द्यावी, त्याच्या हितासाठी आपल्याकडे बरेच काही देण्यासारखे आहे अशा भावनेने संभाषण करावे. बेजोड तर्क देवून कधीही पुढील व्यक्तीस निरूत्तर करू नये, यामुळे तो चिडून इस्लामच्या विरूद्ध जाईल. 

11. इस्लामचा संदेश पुन्हा-पुन्हा द्यावा. कारण माणूस चांगला उपदेश फारसा लक्षात ठेवत नाही. कोणत्या घटिकेला संदेश त्याच्या मनावर परिणाम करून जाईल, हे सांगता येत नाही म्हणून कंटाळा न करता वेगवेगळ्या दृष्टीकोनातून एकाच व्यक्तीला पुन्हा-पुन्हा संदेश द्यावा. 

12. एखादी व्यक्ती मोठ्या दुःखात असेल, निराश असेल, त्याने जवळचे लोक गमावलेले असतील, तो तणावग्रस्त असेल, अत्याचार सहन करत असेल किंवा वैफल्यग्रस्त असेल अशा व्यक्तीस धीर देऊन अल्लाहची कृपा किती विशाल आहे व तो नक्कीच त्याला दुःखातून काढेल, हे सत्य त्याच्या मनावर बिंबवावे. प्रत्येक दुःखानंतर सुख येतेेच ही ईश्वरी लीला आहे. हे त्याला पटेल अशा पद्धतीने सांगितले तर अशी व्यक्ती पटकन संदेश ग्रहण करते. 13. संदेश देणाऱ्याने बोलताना उच्च कोटीचे तर्क आणि मृदू भाषेचा वापर करावा व आपण समोरच्या व्यक्तीचे हितैशी आहोत याची त्याला खात्री पटवून द्यावी. 14. होता होईल तेवढे कुरआनच्या आयातीचे हवाले द्यावेत, संदेश जशाचा तसा द्यावा, त्यात मनाने काही घुसडू नये. कारण बऱ्याच वेळेस ऐकणारे हे सांगणाऱ्या पेक्षा जास्त समजदार असतात. 15. संदेश देणाऱ्याने आपल्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची मनोभावाने सेवा करावी. त्याच्या सुख-दुःखामध्ये सामील व्हावे. अडी-अडचणीमध्ये मदत करावी. त्याने लोकांसाठी नेहमी उपलब्ध असावे. अशा व्यक्तीचा संदेश लोक इतरांच्या तुलनेने लवकर स्वीकार करतात. 

संदेश देण्याच्या पद्धती

संदेश प्रत्येक भेट घेऊन बोलून देणे ही एक प्रभावशाली पद्धत आहे. शिवाय, लेखन, भाषण, डिबेटच्या माध्यमातूनही संदेश देता येतो. आजकाल समाज माध्यमाच्या मार्फतही उत्तमोत्तम पोस्ट करून संदेश देता येणे सहज शक्य आहे. संदेश एकट्याने देण्यापेक्षा सामुहिक प्रयत्नातून संदेश दिल्या गेल्यास तो जास्त प्रभावशाली ठरतो. अनेकवेळा संदेश देण्याच्या प्रक्रियेतून गैरसमज निर्माण होवून संदेश देणाऱ्याचे नुकसान होवू शकते, असे नुकसान सहन करण्याची सहनशक्ती त्याच्यामध्ये असावी. 

संदेश स्वीकारण्यामागील अडचणी

1. इस्लामचा संदेश स्वीकारणे म्हणजे आपल्या अनैतिक इच्छा-आकाक्षांचा बळी देणे होय. म्हणून इच्छेचे गुलाम लोक इस्लामचा संदेश सहजासहजी स्वीकारत नाहीत. 

2. इस्लामचा संदेश स्वीकारला तर आर्थिक नुकसानाची भीती ही मक्काकालीन कुरैशपासून ते आजच्या  आधुनिक काळातील लोकांच्या मनामध्ये एकसारखीच आहे. इस्लामचा संदेश स्वीकारताच व्याजापासून मिळणाऱ्या सहज लाभाला मुकावे लागते. दारूचा व्यवसाय बंद करावा लागतो, फॅशन, सिनेउद्योगावर पाणी सोडावे लागते. अनैतिक मार्गाने सत्तेतून मिळणाऱ्या लाभाचा त्याग करावा लागतो. खोटे बोलता येत नाही, धोका देता येत नाही, प्रत्येक बाबतीत हलाल आणि हराम (वैध आणि अवैध)ची अट पाळावी लागते. वाड-वडिलांकडून चालत आलेल्या चुकीच्या परंपरांचा त्याग करावा लागतो. चंगळवादी जीवनशैली सोडावी लागते. याप्रकारची एक ना अनेक बंधने येतात म्हणून सहसा लोक इस्लामचा संदेश खरा आहे हे पटल्यावर सुद्धा ते स्वीकारत नाहीत. 

अशा लोकांच्या बाबतीत मौलाना अबुल आला मौदूदी यांनी म्हटलेले आहे की, ‘‘ज्या व्यक्तीला खऱ्या आणि खोट्यामधील फरक व्यवस्थित पद्धतीने स्पष्ट करून दाखविला जातो तरी तो ते मान्य करत नाहीत. मग त्याच्या समोर काही लोक खऱ्या मार्गावर चालून सुद्धा दाखवून देतात की, अज्ञान काळात ते ज्या वाम मार्गाला लागलेले होते त्याचा त्याग करून, इस्लामचा मार्ग स्विकारल्याने त्यांचे जीवन किती सुखद झाले. तरी सुद्धा वाम मार्गी माणूस त्यापासून काही धडा घेत नाही. तर याचा अर्थ असा आहे की, आता तो फक्त आपल्या वाम मार्गाची शिक्षा भोगल्यावरच स्विकार करेल की हां, हा मार्ग चुकीचा होता. जो व्यक्ती डॉक्टरच्या अभ्यासपूर्ण सल्ल्यांना स्वीकारत नाही आणि आपल्यासारख्या अन्य आजारी माणसांना डॉक्टरांच्या सल्ल्यांची अंमलबजावणी करून रोगमुक्त झालेले पाहूनही धडा घेत नाही, तर मग असा व्यक्ती जेव्हा आजाराने खिळून मृत्यू पंथाला लागेल तेव्हाच स्वीकार करेल की, तो ज्या पद्धतीने जीवन जगत होता ती पद्धत त्याच्यासाठी खरोखरच जीवघेणी होती.’’(संदर्भ : तफहीमूल कुरआन खंड 2 पान क्र.35)

इस्लामचा संदेश न दिल्यामुळे भारतीय मुस्लिमांनी भरपूर हानी सहन केलेली आहे. जातीय दंगलीपासून मॉबलिंचिंग पर्यंत, बॉम्बस्फोटाच्या घटनेत खोटे आरोपी बनविण्यापासून डिटेन्शन सेंटरमध्ये टाकण्याची जी भाषा केली जात आहे त्यामागे मुस्लिमेत्तर बांधवांचा इस्लाम संबंधीचा चुकीचा समज / गैरसमज तसेच इस्लाम संबंधीची अवास्तव भीती कारणीभूत आहे. मुस्लिमांनी इस्लामचा संदेश त्यांच्या पर्यंत आपल्या वाणी आणि आचरणातून पोहोचविणे तर सोडाच नेमका त्याविरूद्ध संदेश त्यांच्यापर्यंत जाईल, याची व्यवस्था त्यांनी आपल्या आचरणातून केली. एवढे असले तरी - दिल नाउम्मीद नही नाकाम ही तो है, लंबी गम की शाम सही शाम ही तो है. चांगल्या कार्यासाठी इस्लामचा संदेश देण्याएवढे चांगले कार्य दूसरे कोणतेच नाही व चांगले कार्य करण्यामध्ये उशीर जरी झाला तरी हरकत नाही. आता तरी भारतीय मुस्लिमांनी इस्लामचा संदेश पूर्ण आत्मविश्वासाने देशबांधवांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. बाकी सर्व ईश्वराच्या हाती आहे. म्हणून शेवटी दुआ करतो की, ’’ऐ अल्लाह! आम्हाला इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचविण्याचे कल्याणकारी आणि महान कर्तव्य बजावण्याची समज, शक्ती आणि धैर्य प्रदान कर. आमीन.’’ 

- एम.आय.शेख


माननीय आएशा (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापुढे दोन कामांपैकी एक काम करण्याचा विकल्प ठेवला असता पैगंबर अनिवार्यपणे जे काम सोपे आहे त्यास स्वीकारत. अट हीच होती की ते काम चुकीचे नसावे. जर ते चुकीचे असले तर त्यापासून सर्वप्रथम अलिप्त राहणारे पैगंबर होते. पैगंबरांनी स्वत:साठी कोणाशीही कधीही बदला घेतला नाही. परंतु अल्लाहच्या प्रतिष्ठेविरूद्ध जर एखादे कृत्य केले जाई तेव्हा ते अल्लाहसाठी त्याचा बदला अवश्य घेत असत. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

जीवनधर्माला हे कधीही अपेक्षित नाही की मनुष्याने स्वत:ला कष्ट द्यावेत. इस्लामने या संन्यासी धारणेचा निषेध केला आहे की एखाद्या मनुष्याला कठोरतम तपस्येविना आणि जीवघेण्या साधनेविना पूर्णत: प्राप्त होत नाही. याचमुळे दोन कामांपैकी एकाचा विकल्प पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पुढे ठेवला जाई तेव्हा ते त्या कामाला करत जे सहजरित्या किंवा अधिक सोपे असे. पैगंबरांनी अनुयायींच्या सहजसोपेपणाला नेहमी प्राधान्य दिले. पैगंबरांची कार्यनीती अनुयायींसाठी एक आदर्श आहे.

ज्याप्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) मानवजातीत सर्वांपेक्षा श्रेष्ठ दानशूर होते जसे त्यांचे कथन आहे, ‘‘मी मानवांपैकी सर्वांत जास्त दानशूर आहे.’’ (हदीस : बैहकी) अगदी याचप्रमाणे सर्व मानवांपैकी सर्वांत जास्त ईशपरायण व्यक्ति पैगंबर मुहम्मद (स.) हेच होते. एका पैगंबराची हीच कार्यनीती व व्यक्तित्व असते.

पैगंबर मुहम्मद (स.) यांचे खरे अनुकरण हे आहे की मनुष्याने पैगंबरांच्या या दोन्ही वैशिष्टयांना आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.पवित्र कुरआनात अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) यांना उद्देशून असे म्हटले आहे की “दिवसाच्या तेजाची आणि शांत अंधार पसरत असलेल्या रात्रीची शपथ, तुझ्या विधात्याने तुला अधांतरी सोडलेले नाही. तुमच्यासाठी पहिल्या परिस्थितीपेक्षा नंतरची स्थिती चांगलीच असणार आहे.” याचा अर्थ असा की रात्र आणि दिवस एकामागोमाग परतत असतात. त्याचप्रमाणे माणसाची स्थितीदेखील बदलत असते. बदल हा सृष्टीचा नियम आहे. एकच परिस्थिती कधीच राहात नसते. जर हे नियम निसर्गाला लावून दिले नसते आणि फक्त दिवसच दिवस किंवा नेहमीच रात्र असती तर कालचक्रदेखील स्थिरावले असते. स्थिरता म्हणजे ज्यात जीवन नसते. बदल होत राहाणे हे जीवन आहे. या जीवनात सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात. ते येत राहाणार, कारण हाच जीवंत असल्याचा पुरावा आहे.

माणसाने या बदलांना घाबरून जाण्याचे कारण नाही. उलट एकच परिस्थिती असती तर विचलित अवस्था निर्माण होते. रात्रंदिवसाचे हे कालचक्र सबंध मानवजातीमध्ये फिरत असते. आज जे लोक श्रीमंत आहेत, ते काल गरीब होते. आज जे गरीब आहेत, जर सृष्टीच्या नियमात बदल झाला नसता तर हे सदैव गरीबच राहातील. हा अल्लाहचा न्याय नाही. श्रीमंती आणि वंचितावस्था माणसामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये बदलत असते. कठीण प्रसंग जसे येतात तसे ते निघूनही जातात, कारण त्यांनासुद्धा बदलांचा नियम लागू आहे. पवित्र कुरआनात अल्लाह म्हणतो की “तुमच्यावर कोसळणारी अनिष्ठ आपदा हे पूर्वीपासूनच नोंदवून ठेवलेली घटना आहे. त्यानुसारच मानवजातीला आपत्तींना सामोरे जावे लागते.” 

प्रेषितांना संबोधून याच अध्यायात अल्लाहने पुढे सांगिलते आहे की “तुम्ही अनाथ असताना तुम्हाला आश्रय दिला. तुम्हाला स्वावलंबी केले. एकाच परिस्थितीशी तोंड द्यावे लागत नाही, जसे तुम्ही गरीब होता तेव्हा तुम्हाला त्याने श्रीमंत केले. तसेच तुम्हीदेखील गरजूंची काळजी घ्या. कुणी मागिलत्यास झिडकारू नका. तुमच्या विधात्याने जी तुम्हाला देणगी दिली ती जाहीर करा.”माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे.

एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उंटाच्या पाठीवरील जुन्या लाकडी हौद्यावर फाटलेल्या चादरीसह हजयात्रा केली होती. त्या जुन्या लाकडी हौद्याची किंमत चार दिरहम किंवा त्यापेक्षा कमी होती.

स्पष्टीकरण

ज्या प्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या अनुयायींना साधी राहणीची शिकवण दिली त्याचप्रमाणे पैगंबरांनी स्वत:सुद्धा साध्या रहाणीचा अंगीकार केला होता. त्यांनी भौतिक थाटमाटाकडे दुर्लक्ष केले होते. पैगंबरांची ही साधी राहणी त्या वेळची आहे जेव्हा पूर्ण अरब इस्लामच्या अधिनस्त झाला होता. ही घटना हिजरी सन १० ची आहे. पैगंबरांनी इच्छिले असते तर स्वत:साठी फार काही सुखसुविधा आणि थाटमाटाला हस्तगत केले असते.


माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) एका चटईवर झोपले आणि जेव्हा ते झोपेतून जागे होऊन उठून बसले तेव्हा त्यांच्या शरीरावर चटईचे वण पडलेले होते. यावर आम्ही पैगंबरांना विनंती केली की त्यांच्यासाठी एक बिछाना बनवून देऊ का?

त्यावर पैगंबर म्हणाले, ‘‘मला या जगाशी काहीही देणे घेणे नाही. मी या जगात तर त्या प्रवाशासमान आहे जो एखाद्या झाडाच्या सावलीत अल्पकाळ विसावतो. नंतर त्यास सोडून आपल्या गंतव्याकडे प्रस्थान करतो.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्वत:च्या व्यवहारनीतीद्वारा सिद्ध केले की हे जग यासाठी नाही की कोणी एखाद्याने जगाच्या मोहात पडून जगावे आणि मरून पडावे. हे जग तर एक मार्ग व साधन आहे आणि त्यासच गंतव्य व साध्य समजण्याची घोडचूक कधीही करू नये.

येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की चटई (गोणपाट) वर झोपण्याची ही घटना त्या काळातील आहे जेव्हा इस्लाम सत्तेत होता.

ही एक वस्तुस्थिती आहे की या जगाशी जो कोणी प्रेम करील तेव्हा पारलौकिक जीवनाचे महत्त्व व त्याचे मूल्य त्याच्या नजरेत शिल्लक राहू शकत नाही. म्हणून मनुष्याची नजर सतत पारलौकिक जीवनाकडे असली पाहिजे. या जगात स्वत:चे दायित्व निर्वाहण करण्याचीच चिंता लागून असली पाहिजे.


books

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे, “ज्ञान संपादन करणे प्रत्येक मुस्लिम पुरुष आणि स्त्रीसाठी अनिवार्य कर्तव्य आहे.” ते पुढे म्हणतात की प्रतिभासंपन्न लोक आकाशातील ताऱ्यांसारखे असतात जे अंधार पसरला असताना लोकांना दिशा दाखविण्याचे कार्य करतात. ज्ञान अशी शक्ती आहे ज्यापासून माणसाचे व्यक्तिमत्त्व विस्तृत लोते. तो आपल्या स्वतःच्या अस्तित्वात बंदिस्त राहात नाही. आपल्या अवतीभवती असणाऱ्या लोकांना परिचित असतो. त्यांच्यावर चांगले संस्कार करतो. एका लोकाभिमुख समाजाच्या गरजा काय आहेत हे त्याच्या लक्षात येते. मग त्या पूर्ण करण्यासाठी तो आपल्या ज्ञानाचा उपयोग करतो. असे करत असताना तो खऱ्या अर्थाने मानवी समाजाची उन्नती करत असतो. ज्ञानाच्या बाबतीत जे वंचित असती, त्यांना शिकण्यासाठी लागणाऱ्या साधनसुविधांची पूर्तता करतो. तो स्वतः हे सर्व करत असताना इतरांच्या शिक्षण-प्रशिक्षणाची काळजी घेत असतो. याच ज्ञानाच्या आधारे तो आकाशाकडे पाहातो आणि इतर निर्मितींबाबत विचारविनिमय करतो आणि एक वेळ अशी येते जेव्हा तो धरतीवरून आकाशात झेपावतो आणि इतर ग्रहांविषयी माहिती गोळा करतो, ज्यांचा प्रभाव आपल्या धरतीवर पडत आहे. प्रतिभासंपन्न ज्ञानी लोकांचे हे सारे कार्य ईश्वराची उपासनाच असते. पवित्र कुरआनची सुरुवातच ज्ञान संपादनाने झालेली आहे. अल्लाह म्हणतो, “आपल्या विधात्याच्या नावाने वाचा, ज्याने माणसाला लेखणी व इतर साहित्याद्‌वारे असे ज्ञान दिले जे यापूर्वी कधी दिले गेले नव्हते.” (पवित्र कुरआन)

प्रेषितांनी सांगितले आहे की जो माणूस ज्ञान संपादनासाठी घराबाहेर पडतो, अल्लाह त्याच्यासाठी स्वर्गाचा मार्ग सुकर करतो. शिक्षण प्राप्त करण्यासाठी प्रवास करणे, घर सोडून जगात त्याचा शोध घेण्यासाठी जाणे, वाचन - लेखन करणे, एकमेकांशी विचारविनिमय करणे या सर्व बाबी पुण्याकार्यात गणल्या जातात. ज्ञानी लोकांविषयी पवित्र कुरआनात अल्लाह असे म्हणतो की जे लोक उभ्याने, बसून, कुशीवर टेकून अल्लाहची आठवण करतात, आकाश व पृथ्वीच्या उत्पत्तीविषयी विचारविनिमय करतात ते धन्यतेस पात्र आहेत. ते नरकाच्या शिक्षेपासून मुक्त होतात. (पवित्र कुरआन-३)माननीय जुंदुब बिन सुफियान (रजि.) यांचे कथन आहे.

कोणत्यातरी युद्धात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या करंगळीला दुखापत झाली आणि रक्त वाहू लागले तेव्हा आपल्या करंगळीला उद्देशून ते म्हणाले, ‘‘तू तर एक रक्तरंजित करंगळी आहेस. तुला जी दुखापत झाली आहे ती ईशमार्गात झालेली आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

म्हणजे हा त्रास जो ईशमार्गात झाला आहे त्यावर मी खेद व्यक्त का करावा?ईशमार्गात प्राणसुद्धा पणाला लावले जाऊ शकते. ईशमार्गावर मार्गस्थच्या मार्गाला संकट रोखू शकत नाही आणि ईशमार्गावर मार्गस्थ या मार्गात होणाऱ्या कष्टांविषयी दुसऱ्याकडे तक्रारसुद्धा करीत नाहीत.

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.

मी जणूकाही अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना एका पैगंबरांचा वृत्तान्त सांगताना पाहात आहे, ज्यांची त्यांच्या लोकसमुदायाने हत्या केली होती. ते आपल्या मुखावरील रक्त साफ करत होते आणि सांगत होते, ‘‘हे अल्लाह! तू माझ्या देशबांधवांना क्षमा कर कारण त्यांना माहीत नाही की ते काय करीत आहेत.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

खरेतर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या स्वत:चा हाच वृत्तान्त आहे. लोकांनी त्यांना ताईफ शहरात सत्य आवाहन करताना आणि उहुद युद्धाप्रसंगी जखमी केले होते. परंतु पैगंबरांनी त्या वेळी असामान्य धैर्याने काम घेतले होते. पर्वताच्या ईशदूताने जेव्हा पैगंबरांना विचारले, ‘‘तुम्ही इच्छिले तर ताईफ शहराच्या बाजूचे दोन्ही पर्वत या वस्तीवर उलटून देऊ?’’ (म्हणजे वस्तीतील सर्व लोक चिरडून मरतील.)

तेव्हा पैगंबरांनी सांगितले, ‘‘नाही! मला आशा आहे की या लोकांच्या संततीत असे लोक जन्माला येतील जे एक ईश्वराची पूजा करतील आणि एकेश्वरत्वात दुसऱ्या कोणालाही भागीदार करणार नाहीत.’’

(हदीस : मुस्लिम, बुखारी, नसई) शारीरिक कष्टाव्यतिरिक्त पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मानसिक त्राससुद्धा सहन केला आहे. एकदा पैगंबरांना सूचना प्राप्त झाली की एक मनुष्य सांगत आहे की संपत्तीवाटपात पैगंबरांनी ईशभय व अंतिम दिनाला दृष्टीसमोर ठेवले नाही,

तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहची कृपा मूसा (अ.) यांच्यावर होवो, त्यांना यापेक्षासुद्धा जास्त त्रास दिला गेला आणि त्यांनी संयम बाळगला होता.’’ (हदीस : मुसनद अहमद, तिर्मिजी, अबू दाऊद)पती-पत्नींत, भावा-भावात, भाऊ-बहीणीत, बहिणी-बहीणीत, आईवडील-मुलांत, सासु-सुणेत, शेजारी-शेजारी राष्ट्रांमध्ये भांडण लावणारा कोण आहे तो? कोण आहे तो माणसाला धर्म, जातपात मध्ये विभाजीत करणारा? कोण आहे तो माणसामध्ये धर्माच्या मोठ-मोठ्या भिंती उभी करणारा? कोण आहे तो धर्माचा नाव होऊन माणसात भांडण लावणारा? कोण आहे तो माणसाला निर्दयी, पापी, दुष्ट बनविणारा? कोण आहे तो दारू पिण्यास, गुटखा खाण्यास, बिडी, सिगारेट, तंबाखू, गांजा, चरस, जुगाराचे व्यसन लावणारा?

भ्रष्टाचार, व्याभिचार, सामुहिक, बलात्कार, आत्महत्या, व्याजाचे व्यवहार या सर्व गोष्टी करण्यास माणसास प्रवृत्त करणारा कोण आहे तो? न दिसणारा, पण आपल्या शरीरात रक्तासारखा भ्रमण करणारा, आपल्या मनात, डोक्यात विविध प्रकारचे वाईट विचार आणणारा कोण आहे तो? समस्त मानवजातींचा शत्रू कोण आहे आहे ते त्याला आपला हेवा आहे, मत्सर आहे, इर्शा आहे. त्याला आपण चांगले राहिलेले पहावत नाही आणि आपणही दुःखी, नाऊमेद झाल्यास तो खूप आनंदीत होतो. तो आपल्याला स्वर्गात जाण्यापासून रोखण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. त्याची मनोकामना आहे की आपण त्याच्यासोबत नर्कात जावेे. 

पवित्र रमजान महिन्यात तो बंदीस्त होता आता परत रमजान समाप्त झाले की तो सुटला आहे त्याचे अनुयायी आपल्या सोबत आहेत. होय तो सैतान आहे!   

शैतानाच्या प्रमुखाचे नाव इब्लीस आहे. ज्याने अल्लाहच्या आदेशाची अवज्ञा केली आणि आदम (अलैसलाम) यांच्या संततीच्या आधीन राहण्यास नकार दिला. यालाच शैतान म्हटले आहे. हे केवळ एखाद्या शक्तीचे नाव नसून ते सुद्धा मानवाप्रमाणे एक निश्चित असे व्यक्तीमत्व धारण केलेले  अस्तित्व आहे म्हणून कुरआन खुलासा करतो की शैतान, जिन्नपैकी होता जे इशदूत (फरिश्ते) पेक्षा वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. 

मानवाच्या निर्मिती अगोदर अल्लाहने फरिश्ते (इशदूत) आणि जिन्न यांची निर्मिती केली होती. आदम आणि हव्वा (अलैसलाम) यांच्या सत्य घटनेस नाकारणे म्हणजे येणाऱ्या पिढीने कोरोनाला नाकारणे होय. 

जगातील तीन मोठे धर्मांचे अनुयायी म्हणजेच  ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लामचे अनुयायी आदम आणि ईव्ह च्या घटनेला सत्य मानतात. एखादी गोष्ट आपल्यासमोर नाही घडली की त्याला नाकारायचेच का? आदम आणि इवचे अस्तित्व नाकारणे म्हणजे आपले आई-वडिलांना नाकारने आपले अस्तित्वच त्यांचा पुरावा आहे. 

कुरआनमधील सुरे अलऐराफ (11-25) मध्ये सविस्तर सांगण्यात आले आहे की,

11) आम्ही तुमच्या निर्मितीचा प्रारंभ केला मग तुम्हाला स्वरूप दिले मग दुतांना सांगितले की,  आदम समोर नतमस्तक व्हा (सज्दा करा) या आज्ञेनुसार सर्व नतमस्तक झाले परंतु इब्लीस नतमस्तक होणाऱ्यांमध्ये सामील झाला नाही. 

12) विचारले, ’’तुला कोणत्या गोष्टीने नतमस्तक होण्यासून रोखले. जेव्हा मी तुला आज्ञा दिली होती? ’’म्हणाला’’ मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तू मला अग्नीपासून निर्माण केले व त्याला मातीपासून. 13) फरमाविले, असे होय, तर तू येथून खाली उतर, तुला, अधिकार नाही येथे मोठेपणाचा अहंकार करावा. चालता हो, की वस्तूतः  तू त्यांच्यापैकी आहेस जे स्वतः आपला अपमान इच्छितात. 

14)  तो म्हणाला, ’’ मला त्या दिवसापर्यंत सवलत दे, जेव्हा हे सर्व दुसऱ्यांदा उपस्थित केले जातील. 15. फर्माविले, ’’ तुला सवलत आहे.  16. म्हणाला, ’’ बरे तर ज्या तऱ्हेने तू मला मार्गभ्रष्ट केले आहेस, मी सुद्धा आता तुझ्या सरळ मार्गावर असलेल्या या मानवाच्या पळतीवर राहीन.  17. पुढून आणि मागून, उजवीकडून व डावीकडून चोहोबाजूंनी मी त्यांना घेरेन आणि तुला त्यांच्यापैकी बहुतेक कृतज्ञ आढळणार नाहीत. 18. फर्माविले, चालता हो येथून, अपमानित व धिःकारित. विश्वास ठेव की यांच्यापैकी जे तुझे अनुकरण करतील तुझ्यासहीत त्या सर्वांनिशी नरक भरून टाकीन. 

19. आणि हे आदम तू आणि तुझी पत्नी दोघे या स्वर्गामध्ये रहा. येथे जी वस्तू खाण्याची तुमची इच्छा असेल खा, परंतु, त्या वृक्षाच्या जवळ फिरकू नका, नाहीतर अत्याचाऱ्यांपैकी व्हाल. 

20. मग शैतानने त्यांना बहकाविले जणेकरून त्यांचे गुप्तांग जे एकमेकांपासून लपविले गेले होते त्यांच्या समोर उघड झाले. त्याने त्या दोघांना सांगितले. ’’ तुमच्या पालनकर्त्याने तुम्हाला या वृत्ताची जी मनाई केली आहे त्याचे कारण याशिवाय काहीही नाही की एखाद्या वेळेस तुम्ही देवदूत बनू नये अथवा तुम्हाला अमरत्व लाभू नये.

21. आणि त्याने शपथ घेउन त्यांना सांगितले की मी तुमचा खरा हितचिंतक आहे. 

माणूस आपल्या हितचिंतकावर खूप विश्वास करतो आणि कोणी शपथ घेउन सांगतो तर अविश्वास दाखविण्याचा प्रश्नच येत नाही. 

22. अशा प्रकारे त्या दोघांना फसवून त्याने हळूहळू आपल्या वळणावर आणले. सरतेशेवटी जेव्हा त्यांनी त्या वृक्षाचा आस्वाद घेतला तेव्हा त्यांचे गुप्तांग एकमेकांसमोर उघडे झाले आणि ते आपल्या गुप्तांगाना स्वर्गातील पानांनी झाकू लागले तेव्हा त्यांच्या पालनकर्त्याने त्यांना पुकारले, ’’काय मी तुम्हाला त्या वृक्षापासून रोखले नव्हते आणि म्हटले नव्हते की शैतान तुमचा उघड शत्रू आहे? 

23. दोघे बोलते झाले, ’’हे पालनकर्त्या आम्ही स्वतःवर अत्याचार केला, जर आता तू आम्हाला क्षमा केली नाहीस व दया केली नाहीस तर खचितच आम्ही तोट्यात राहू’’ 24. फर्माविले, ’’ चालते व्हा, तुम्ही एकमेकांचे शत्रू आहात आणि तुमच्यासाठी एका विशिष्ट मुदतीपर्यंत पृथ्वीवर निवासस्थान व जीवनसामग्री आहे. 25. आणि फर्माविले, तेथेच तुम्हाला जगणे व तेथेच मरणे आहे आणि त्यातूनच तुम्हाला सरतेशवेटी काढले जाईल. 

या आयातींमधून आपल्याला स्पष्ट होते की कसं शैतानाने अहंकार आधीन जाऊन अल्लाहची अवज्ञा केली व अल्लाहच्या मार्गावर मानवाला चालू न देण्याची जणू शपथच घेतली आहे. आधी समस्त मानवजात एक अल्लाहच्या मार्गावर होती शैतानने मार्गभ्रष्ट करून माणसांत धर्म-जात-पात निर्माण केली. 

सैतानच्या चाली (ट्रिक्स)

1. लोकांना त्यांच्या परमेश्वर (अल्लाहच्या) उपासनेपासून रोखणे.

2. वाईट गोष्टींना चांगले करून दाखविणे जसं की मेकअप केल्यानंतर चेहरा चांगला दिसतो पण तो काही वेळासाठीच. मेकअप हा पूर्णपणे उणीवांना भरत नाही तर फक्त वरवरच चांगले भासवितो. तसेच शैतान व्याजाला नफा (इंट्रेस्ट) नाव देऊन कधी ... म्हणून त्याला चांगले करून दाखवतो, दारूला हेल्थ आणि बॉडी बिल्डींगचे आणि दुःख विसरण्याचे साधन म्हणून दाखवितो. 

3. दारू, जुगार मार्फत लोकांत शत्रूत्व घालतो. अ‍ॅक्सीडेंट, बलात्कार आणि गुन्ह्यांमागे दारूच असते. जॅकपॉट, कॅसिनो हे स्टँडर्ड जुगार आहेत.

4. अल्लाहची आठवण (जिक्र)पासून माणसाला रोखतो. 5. नमाज खराब करण्यासाठी सैतानचा स्पेशल टाईप आहे त्याचे नाव ’’खिनझीब’’ आहे हा नमाजमध्ये येऊन माणसाला बहकावितो. सर्व पेंडिंग कामाची आठवण करून देतो. 

6. रागात आणणे : आज कारागृहात जे लोक आहेत अधिकांश त्यांच्यातले रागामध्ये येऊनच गुन्हे केलेले आहेत. राग आल्यावर उभे असाल तर बसा, बसलेले असाल तर झोपा, राग आल्यानंतर पाणी अवश्य पिले पाहिजे कारण सैतान अग्नीपासून बनलेला आहे आणि पाणी अग्नीला विझवते. अल्लाहची शरण घेणे. आऊजू बिल्लाही मिनश्शैतानी निर्रजिम (मी अल्लाहची शरण घेतो शैतान धिःकारलेल्यापासून) चे पठण करणे. 7. शैतान आपल्याला चेहऱ्यांमध्ये बदल करायला लावतो. (प्लास्टिक सर्जरी, आयब्रोट्रिमिंग) आणि दातांमध्ये गॅप बनविण्यास लावतो. 8. आई-वडिलांचे आज्ञापालन करू न देणे. आई-वडिलांचे आज्ञापालन न करणारा नरकात जाणार आहे आणि हेच शैतान इच्छितो. 9. नातेवाईकांचे हक्क न अदा करण्यास प्रवृत्त करतो. एकमेकांविषयी वाईट विचार मनात घालतो. 10. वायफळ खर्च करणारे शैतानचे बंधू असतात. विनाकारण मॉलमध्ये जाऊन वायफळ खर्च केला जात आहे आजकाल तो शैतानच्या मोटीव्हेशन मुळेच. 12. गर्भपात करण्यास प्रोत्साहित करतो. संततीला ओझे आहे असे दाखवितो. लिव्हिंग स्टँडर्ड हाय करायचा असेल तर त्यांना मारून टाकावे जास्त संततीचे पालनपोषण कसे करावे? अश्या निगेटीव्ह थॉट्स माणसाच्या मनात घालतो, अल्लाह सुरे बनी इसराईल मध्ये फरमावितो की आपल्या संततीला दारिद्रयाच्या  भीतीने ठार करू नका. आम्ही त्यांनाही उपजीविका देऊ आणि तुम्हाला सुद्धा, वस्तुतः त्यांना ठार करणे एक मोठे अपराध आहे. 

13. व्याभिचार : शैतान माणसाला व्याभिचारासाठी प्रोत्साहित करतो आणि अल्लाहचा फरमान आहे की, व्याभिचाराच्या जवळपास फिरकू नका, ते फार वाईट कृत्य आहे आणि अत्यंत वाईट मार्ग. हा आदेश प्रत्येक व्यक्तीसाठी सुद्धा आहे आणि संपूर्ण समाजासाठी सुद्धा आहे. केवळ व्याभिचार कार्यापासूनच नाही तर त्याला प्रोत्सहन देणाऱ्या गोष्टींपासून व उत्प्रेरकांपासून. 14. शैतान खोट्या इच्छा आकांक्षा आणि आशा दाखवून आपल्या फेऱ्यात अडकवितो. 15. भयानक स्वप्न शैतानाकडूनच असतात म्हणून पैगंबरांचा आदेश आहे की भयानक स्वप्न आल्यास डाव्या बाजूला धुतकारून, आडंग बदलून झोपावे व 3 दिवस कोणाला सांगू नये. 16. माणसाला माणसावर जादू टोणे, करणी-धरणी करायला लावतो. 17. अश्लील गाणींद्वारा माणसाला इंन्टॉक्सीकेट करतो. 

शैतानची कमजोरी (निगेटीव्ह पॉईंटस्)

1. अल्लाह समोर सज्द-ए-तिलावत केल्यास शैतान रडतो, आदमच्या संतानला सजद्याच्या हुकूम झाला. त्यांनी केला आणि स्वर्गात जाणार, मलाही हुकूम झाला होता मी नाही केला आणि नर्कात जाणार. 

2. दुपारी थोडावेळ झोपणे (कैलूला करणे). सैतान कैलूला करत नाही. 

3. पाप झाल्यास अल्लाहकडे क्षमा मागितल्यासही शैतान चिडतो. आणि अल्लाह परम दयाळू, कृपाळू आणि क्षमा करणारा आहे. तो कितीही वेळा माफ करायला तैय्यार आहे, त्याला आवडते की माणसाने गुन्हा केल्यास त्याची क्षमा मागावी, ’’सर्वात चांगले गुन्हेगार ते आहेत की जे पटकन झालेल्या चुकांची माफी मागतात आणि परत न करण्याच्या निश्चय करतात. 

सैतानापासून बचाव कसं करावे?

1. कधीही राग आला, निगेटीव्हीटी आली. उदासीनता झाली तर अल्लाहच्या शरणी जा (अऊझुबिल्लाही मिनशैतानी निर्रजीम) म्हणत दररोज सकाळी 10 वेळा 3 सायंकाळी 10 वेळा.

2. कोणत्याही कामात जलदबाजी, घाई, गडबड न करणे केलेल्या गुन्ह्यांची माफी मागणे. 

3. अल्लाहशी संबंध मजबूत ठेवणे, 

4.कुरआन पठाण करणे. 

5. मृत लोकांची, आत्म्यांची भिती मनात न ठेवणे कारण मेल्यानंतर आत्मा परत येत नाही ती ’बरजख’ मध्ये असते. 6. संध्याकाळी दिवस मावळण्याच्या वेळी लेकरांना घरात घेऊन ’’ बिस्मील्लाह’’ म्हणून घराचा दार लावून घ्या अन्यथा शैतान घरात शिरतो आणि बिसमिल्लाह न बोलून जेवण केल्यास खूप आनंदीत होतो की राहण्यासोबत जेवण्याचीही सोय झाली. कारण अल्लाहचा नाव न घेता खाणे ही शैतानच्या पोटात जाते आणि जेवूनही न जेवल्यासारखे वाटतेे.

 7. कपडे बदलनाता बिस्मील्लाह म्हणणे, वॉशरूमचे दार नेहमी बंद ठेवणे आणि वॉशरूम जाण्याआदीही बिसमिल्लाह म्हणणे. प्रत्येक चांगल्या कामाची सुरूवात बिस्मील्लाहने केली की तेे लवकर पूर्ण होतेे. 

8. शक्यतो रागावर नियंत्रण ठेवणे. पैगम्बर सल्ल. ने सांगितले आहे की, खरा बहादूर (शूर) व्यक्ती तो असतो जो रागाच्या भरात स्वतःवर नियंत्रण ठेवतो. 

9. परस्त्री सोबत एकांतात बसू नये. 

10. एकट्या स्त्रीने लांबचे प्रवास करू नये. जेव्हा एकटी स्त्री घराबाहेर पडते तेव्हा शैतान तिचा मागे लागतो तिला टक लावून पाहतो. 

11. सूरे अलबकराची नित्याने तिलावत करणे. ज्या घरात या सुरहची तिलावत केली जाते सैतान त्या घरात शिरूच शकत नाही. 

12. आयतुल कुर्सींची तिलावत करणे. 

13. जांभळी आल्यानंतर तोंडावर डाव्या हाताच्या पाठीमागचा भाग ठेऊन लाहोलवला कुवता म्हणणे. 

14. शैतानाच्या प्लानींग लोकांना समजून सांगणे. 

15. शिवीगाळ करू नये. शिव्या दिल्याने शैतान खूश होतो. इस्लामची शिकवण आहे की कुणाला शिवी देऊ नये. शैतानालाही शिवी देऊ नये. तर माणसाला शिवी द्यायचा विचारही करू नये. 

16. सैतान आपल्या अंतिम श्वासापर्यंत आपल्याला बहकविण्याचा प्रयत्न करणार आहे तरी सावधान अल्लाह सर्वांचा शेवट चांगला करो. सैतानापासून आपले रक्षण करावे. 

आमीन. 

- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935जेंव्हा बुद्धीमान माणसे या ब्रह्मांडांच्या रचनेवर विचार करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की, या ब्रह्मांडाची रचना अतिशय गणिती पद्धतीने तयार केलेली आहे आणि ही गोष्ट चिकित्सक बुद्धीला पटत नाही की ज्या ईश्वराने मानवाला बुद्धी देऊन विचार करण्याची शक्ती दिली त्या मानवाला बुद्धीचा वापर करून चांगला किंवा वाईट मार्ग निवडण्याची शक्ती त्याने दिली नसेल. आज जगात बहुसंख्य लोक स्वतःच्या बुद्धीने वाईट मार्गाचा अवलंब करत असल्यामुळे संपूर्ण मानववंश संकटात सापडलेला आहे. 

कोविड-19 हे एक षडयंत्र असून, त्याद्वारे जागतिक लोकसंख्या कमी करून एक न्यू वर्ल्ड लागू करण्याचा अंतरराष्ट्रीय शक्तींची योजना आहे अशी एक थिअरी मांडली जात आहे, ज्यात मुठभर श्रीमंत देशांचा एकाधिकार असेल व ते आपल्या मनाप्रमाणे जगाची सुत्रे हलवतील. खरे तर यूएसएसआर (युनायटेड सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक)च्या पाडावानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली  भांडवलशाही देशांनी अशा एका न्यू वर्ल्ड ऑर्डरची घोषणा केलेलीच आहे. त्यांनी वर्ल्ड बँक, आयएमएफ सारख्या वित्तीय संस्था उभ्या करून आपल्या शर्तींवर गरीब देशांना कर्ज देऊन त्यांना आपले बटिक बनविलेलेच आहे. याच व्यवस्थेला अधिक सुदृढ करून कोविडनंतरच्या काळात नव्याने लागू करण्याचा त्यांचा मानस असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे जी की पूर्णपणे भांडवलशाही व्यवस्थेवर आधारित आहेत. 

न्यू वर्ल्ड ऑर्डरची सुत्रे अमेरिका, युरोप आणि इजराईलच्या हातात आहेत. ही सर्व राष्ट्रे ज्यू आणि ख्रिश्चन वंशाची आहेत म्हणून मुस्लिमांचा या न्यू वर्ल्ड ऑर्डरला विरोध आहे असे मुळीच नाही. उलटपक्षी ज्यू आणि ख्रिश्चन या लोकसमुहांना मुस्लिम,’’अहले किताब’’ समजतात व त्यांच्या पवित्र ग्रंथांना (तौरात आणि बायबल) ईश्वरीय ग्रंथ मानतात. त्यांच्या प्रेषितांना म्हणजेच सुलैमान अलै. (सॉलोमन) आणि ईसा अलै. (जीजस ख्राईस्ट) यांना ईश्वराचे प्रेषित मानतात. मुस्लिमांचे ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांशी मतभेद यासाठी नाहीत की ते वेगळ्या धर्माचे आहेत तर मतभेद आणि विरोध त्यांच्या धर्मद्रोही वर्तणुकीला आहे. 

अनेक वाईट प्रवृत्ती ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये खोलपर्यंत रूजलेल्या आहेत, त्यात त्यांना आनंद येत आहे. इस्लाम त्या प्रवृत्तींना संपवू इच्छितो आणि ते लोक त्यांना संपवू देत नाहीत. उदा. फ्री सेक्सचे शिक्षण तौरात किंवा बायबलमध्ये तर दिलेले नाही पण यांनी त्याला मान्यता दिलेली आहे. व्याज, जमाखोरी, नफाखोरी, भ्रष्टाचार, समलैंगिकता तसेच  अश्लिलतेचे शिक्षण त्यांच्या धार्मिक ग्रंथांनी दिलेले नाही मात्र त्यांनी त्याला सामाजिक मान्यता दिलेली आहे. मुस्लिमांचा त्यांच्या या प्रवृत्तीला विरोध आहे. या लोक समुहांनी आपल्या धार्मिक ग्रंथांच्या तरतुदींची अवहेलना केली म्हणून तर ईश्वराने अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर कुरआनचे अवतरण करून वर नमूद अपप्रवृत्तीचा नायनाट करण्याची जबाबदारी त्यांच्या व त्यांच्या अनुयायांवर टाकली आहे. प्रेषितांचे वारसदार म्हणून मुस्लिमांना या लोकांच्या खलप्रवृत्तींचा नायनाट करून एक न्यू वर्ल्ड ऑर्डर स्थापन करावा लागेल, ज्या योगे पृथ्वीवर राहणाऱ्या 7 अब्ज लोकांचे हित साधले जाईल. 

इस्लामिक न्यू वर्ल्ड ऑर्डर 

इस्लामिक न्यू वर्ल्ड ऑर्डर हा शब्द वाचून वाचकांना कदाचित आश्चर्य वाटत असेल मात्र ही काही नवीन संकल्पना नाही. प्रेषित सल्ल. यांच्यावर कुरआन अवतरित करून याची घोषणा 1442 वर्षांपूर्वीच करण्यात आलेली आहे.

न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हटल्याबरोबर जगातील गरीब देशांना आर्थिकदृष्ट्या गुलाम करून, त्यांच्या संसाधनांची लूट करून सैन्य शक्तीने जगावर सत्ता गाजविण्याचे  चित्र डोळ्यासमोर येते. मात्र इस्लामिक न्यू ऑर्डरमध्ये या गोष्टींना स्थान नाही. लोकांना त्यांच्या हिताच्या गोष्टी सांगून, तार्किकदृष्या वादविवाद करून, अत्यंत प्रेमाने त्यांचे मन परिवर्तन करून मानवकल्याणासाठी त्यांना प्रेरित करणे हा या न्यू इस्लामिक वर्ल्ड ऑर्डरचा उद्देश आहे. ज्यू आणि ख्रिश्चन धर्माचाही हाच उद्देश होता, ज्याचा त्यांना विसर पडला. आपल्या धार्मिक आस्थेला उध्वस्त करून त्यांनी राक्षसी आकाराची आणि प्रवृत्तीची भौतिक प्रगती साधली आहे. आता हीच प्रगती त्यांना नष्ट करू पाहत आहेत. कोविड-19 मुळे या नष्टचर्येची सुरूवात झालेली आहे हे नष्टचर्य एवढ्यावरच थांबणार नसून कोविड-19 पेक्षाही खतरनाक व्हायरसचा लवकरच जगाला सामना करावा लागेल असे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अ‍ॅन्टोनिओ गुटेरस यांनी याच आठवड्यात भाकित केलेले आहे. कोविड-19च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा चालू असतांनाच गुटेरस यांचे हे भीतिदायक वक्तव्य पुढे आलेले आहे. 

भांडवलशाही व्यवस्थेच्या आधीन देशांनी आपल्या सैतानी कृत्यांनी पृथ्वीला प्रचंड नुकसान पोहोचवलेले आहे. अवाजवी आणि अवाढव्य औद्योगिकरण करून ग्रीन हाऊस गॅसचे उत्सर्जन वाढवून पृथ्वीचे हिरवेपन ओरबडून घेतले आहे. अणुऊर्जेचा दुरूपयोग करून महाविनाशक युद्धास्त्रे तयार करून जगाला विनाशाच्या टोकावर आणून ठेवलेले आहे. चुकीच्या जीवन पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करून लोकांच्या आरोग्याशी खेळ केलेला आहे. साधे जीवन सोडून किचकट जीवनाकडे लोकांना बोलावून त्यांचे जीवन तणावग्रस्त केलेले आहे. आपल्या आर्थिक उन्नतीसाठी मानवी लैंगिक प्रवृत्तीचे बाजारीकरण करून लोकांना स्वैराचाकडे प्रवृत्त करून कुटुंब व्यवस्था उध्वस्त केलेली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून आसमानी असो का सुलतानी असो अनेक संकटे पृथ्वीवर एकानंतर एक कोसळत आहेत. या मागचा ईश्वरी मन्सुबा लक्षात घेऊन आपल्या जीवनामध्ये मुलभूत परिवर्तन आणून ईश्वराला अपेक्षित असा आदर्श समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे. आताही सावध झालो नाही तर गुटेरस यांनी केेलेल्या भाकीतासारखे अनेक भाकीते त्यांना करावी लागतील आणि लोकांचा असाच विनाश होत राहील. 

कुरआन प्रणित आदर्श समाज रचनेची मुलभूत तत्वे

आदर्श समाज हा, ’’समाज को बदल डालो’’ अशा घोषणा दिल्याने बनत नाही. त्यासाठी कुरआनने दिलेल्या तत्वांची जाणीवपूर्वक जोपासना करून सातत्याने प्रयत्न करावे लागतात. अशात ती तत्वे कोणती? असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. ती तत्वे खालीलप्रमाणे-

1.आदर्श समाजनिर्मितीचा पाया कुठलाही वंश, राष्ट्र, भाषा, त्वचेचा रंग आणि लिंगावर आधारित ठेऊन जमणार नाही. जगातील सर्व माणसं आपसात भाऊ-बहीण आहेत. या एकाच मुलभूत तत्वावर आदर्श समाजाची पायाभरणी केली जाऊ शकते. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, 1. ’’लोकहो! आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी  बनविली आणि एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एकमेकांकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर राहा. खात्री बाळगा की अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.’’ (सुरह अन्नीसा : आयत नं.1)

2. ’’अल्लाहशिवाय कोणाचीच भक्ती करू नका, माता पित्यांशी, नातेवाईकांशी, अनाथ व गोरगरीबांशी चांगले वागा’’ (संदर्भ : सुरे बकरा आयत नं.83). 

3. ’’जे लोक राग गिळून टाकतात व दुसऱ्याचे अपराध माफ करतात असे सदाचारी लोक अल्लाहला अतिशय प्रिय आहेत.’’ (संदर्भ : आलेइमरान आयत नं. 134).

4. ’’जी संपत्ती अल्लाहने तुम्हाला दिलेली आहे त्यापासून मरणोत्तर जीवन बनविण्याची काळजी घ्या आणि जगातीलही आपला वाटा विसरू नका. उपकार करा ज्याप्रमाणे अल्लाहने तुमच्यावर उपकार केलेले आहेत. आणि जमीनीवर उपद्रव माजविण्याचा प्रयत्न करू नका, अल्लाहला उपद्रवी (लोक) आवडत नाहीत.’’ (सुरे अलकसस आयत नं. 77). 

5. ’’अहंकार करू नका’’ (सुरह अल नहल आयत नं.23). 6. ’’लोकांच्या चुका माफ करा, त्यांच्याकडे कानाडोळा करा, काय तुम्हाला आवडत नाही की अल्लाहने तुम्हाला माफ करावे ’’ (सुरे अन्नूर आयत नं.22) .

7.’’लोकांशी नम्रतेने बोला. सर्वात वाईट आवाज गाढवाचा आहे’’ (सुरह लुकमान आयत नं.19) 8. ’’आपसात एकमेकांना टोमणे मारू नका. आणि एकमेकांचा उल्लेख वाईट नावाने करू नका.’’ (सुरे अलहुजरात आयत नं.11)

9. आई-वडिलांची सेवा करा (बनी ईसराईल आयत क्र. 23) 

10. आई-वडिलांना ब्र सुद्धा म्हणू नका (बनी ईसराईल आयत क्र. 23)

11. आई-वडिलांच्या आज्ञेशिवाय त्यांच्या खोलीत प्रवेश करू नका. (सुरे नूर आयत क्र. 58). 

12. देवाणघेवाणीच्या व्यवहाराचा दस्त तयार करत चला. (सुरे बकरा : 282)

13. कुणाचेही अंधानुकरण करू नका. (बनी इसराईल, आयत नं. 36). 

14. जर कर्जदार अडचणीत असेल तर त्याला मुदतवाढ द्या. (सुरे बकरा 280). 

15. व्याज घेऊ नका. (सुरे बकरा 278). 

16. लाच घेऊ नका. (सुरे मायदा : 42). 

17. वचनभंग करू नका (सुरे अर्रराद : 20). 

18. दुसऱ्यांवर विश्वास ठेवा. (सुरे हुजरात आयत नं.12). 

19. सत्यात- असत्याची भेसळ करू नका. (सुरे बकरा : आयत नं. 42).

20. लोकांमध्ये न्याय प्रस्थापित करा. (सुरे स्वॉद : 26). 

21. सत्यासाठी ताकदीने उभे रहा. (सुरे निसा : 135). 

22. मयताच्या वारसांमध्ये त्याची संपत्ती वाटून टाका. (सुरे निसा आयत नं.8). 

23. महिलांचाही मयताच्या संपत्तीमध्ये वाटा आहे. (सुरे निसा : 7). 

24. अनाथांच्या मालमत्तेवर कब्जा करू नका. (सुरे निसा : आयत नं.2). 

25. अनाथांचे संरक्षण करा (सुरे निसा : 127). 

26. दुसऱ्यांची संपत्ती गरजेशिवाय खर्च करू नका. (सुरे निसा : 6)

27. लोकांची आपसात तडजोड करत चला. ( सुरे हुजरात : 10). 

28. गैरसमज करून घेऊ नका. (सुरे हुजरात 12). 

29. चहाड्या लावू नका (सुरे हुजरात 12). 

30. लोकांचे रहस्य शोधत फिरू नका (सुरे हुजरात : 12)

31. दान करत चला. (सुरे बकरा : आयत नं. 271). 

32. गरीबांना जेवू घाला. (सुरे : मुदस्सीर : 44). 

33. गरजवंतांना शोधून त्यांची मदत करा. (सुरे बकरा : 273). 

34. वायफळ खर्च करू नका. (सुरे फुरकान आयत नं.67)

35. दान केल्यावर उपकार केल्यासारखे वागू नका. (सुरे बकरा : 262).

36. पाहुण्यांचा सन्मान करा. (सुरे अलजारियात : 24, 27)

37. अगोदर स्वतः पुण्य कर्म करा त्यानंतर लोकांना सांगा (सुरे बकरा : 44). 

38. जमिनीवर वाईट गोष्टींचा प्रसार करू नका. (सुरे  अनकबूत : आयत क्र. 36). 

39. लोकांना मस्जिदमध्ये जाण्यापासून रोखू नका. (सुरे बकराः 114)

40. फक्त त्यांच्याशी लढा जे तुमच्याशी लढतील. (सुरे बकरा : 190) 

41. युद्धाच्या दरम्यान शिष्टाचाराचे पालन करा. (सुरे बकरा 190). 

42. युद्ध समयी पाठ दाखवून पळून जावू नका. (सुरे अनफाल आयत नं. 15).

43. धर्माच्या बाबतीत कठोरता नाही. (सुरे बकरा : 256). 

44. सर्व प्रेषितांवर श्रद्धा ठेवा (सुरे निसाः 150). 

45. मासीकपाळदरम्यान पत्नीशी लैंगिक संबंध स्थापन करू नका. (सुरे अलबकरा : 222). 

46. बाळाला दोन वर्षापर्यंत आईचे दूध पाजवा (सुरे बकरा : 233)

47. लैंगिक दुराचारापासून दूर रहा. (बनी ईसराईल : 32). 

48. पात्र लोकांना सत्ताधारी बनवा. (सुरे बकरा : 247). 

49. कोणावरही त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओझे लादू नका (सुरे बकरा : 286). 

50. दांभिकतेपासून लांब रहा. (सुरे बकरा : 14-16). 

51. ब्रह्मांडाच्या रचना आणि आश्चर्यांवर सखोल विचार करा. (सुरे आलेइम्रान : 190). 

52. स्त्री-पुरूषांना आपापल्या कृत्यांचा बरोबर मोबदला दिला जाईल. (सुरे आलेइम्रान : 195).

53. काही नातेसंबंधांमध्ये लग्न निषिद्ध आहेत. (सुरे निसा : 23). 

54. पुरूष कुटुंबाचा प्रमुख आहे. (सुरे निसा : 34). 

55. कंजुशी करू नका. (सुरे निसा : 37). 

56 इर्ष्या करू नका. (सुरे निसा : 54). 

57. एकमेकाची हत्या करू नका (सुरे निसा : 29). 

58. चुकीच्या माणसाची वकीली करू नका (सुरे निसा : 135). 

59. गुन्हेगारी आणि अत्याचारीं लोकांची मदत करू नका. (सुरे मायदा : 2). 

60. चांगल्या कामामध्ये एकमेकांची मदत करा. (सुरे मायदा : 2.) 

61. बहुसंख्यांक म्हणजे सत्याची कसोटी नव्हे. (सुरे मायदा : 100). 

62. चांगल्या मार्गावर रहा. (सुरे अनआम : 153). 

63. गुन्हेगारांना शिक्षा देऊन त्याचे उदाहरण लोकांसमोर ठेवा (सुरे मायदा : 38). 

64. गुन्हेगारी आणि अत्याचार संपविण्यासाठी प्रयत्नशील रहा.  (सुरे अनफाल : 39). 

65. मेलेले जनावराचे व वराहाचे मांस तसेच रक्त निषिद्ध आहे. (सुरे मायदा : 3). 

66. दारू आणि इतर अमली पदार्थापासून दूर रहा (सुरे मायदा : 90). 

67. जुगार खेळू नका (सुरे मायदा : 90). 

68. हेराफेरी करू नका. ((सुरे एहजाब : 70). 

69. चहाडी करू नका. (सुरे हमजा : आयत क्र. 1). 

70. खा आणि प्या मात्र वायफळ खर्च करू नका. (सुरे अलआराफ : 31). 

71. नमाजच्या वेळेस चांगले कपडे परिधान करा. (सुरे आराफ : 31). 

72. तुमच्याकडे जे लोक मदत मागतील किंवा संरक्षण मागतील त्यांना ते द्या. (सुरे तौबा :6). 

73. स्वच्छता कायम राखा. (सुरे तौबाः 108). 

74. ईश्वराच्या कृपेपासून निराश होवू नका. (सुरे अलहज्र : 56). 

75. अनावधानाने झालेल्या चुकांना ईश्वर क्षमा करतो. (सुरे निसा : 17). 

76. लोकांना बौद्धिकतेकडे आणि चांगल्या उपदेशाद्वारे ईश्वराकडे बोलवा.  (सुरे नहलः125). 

77. कोणीही कोणाच्या दुष्कृत्यांचे ओझे वाहनार नाही. (सुरे फातीर : 18)

78. दारिद्रयाला घाबरून आपल्या संततीची हत्या करू नका. (सुरे नहेल :31).

79. ज्या गोष्टींचे आपल्याला ज्ञान नाही त्या संबंधी चर्चा करू नका. (सुरे नहेल : 36).

80. कोणाचाही मागोवा काढत फिरू नका. (सुरे हुजरात : 12). 81. परवानगीशिवाय दुसऱ्यांच्या घरात प्रवेश करू नका. (सुरे नूर :27)

82. ईश्वर त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे संरक्षण करतो. (सुरे युनूस 103). 83. जमीनीवर नम्रतेने चाला. (सुरे फुरकान : 63).

84. स्वतःच्या वाट्याचे काम स्वतःच करा. (सुरे तौबा : 105). 85. अल्लाहसोबत कोणाला सामील करू नका. (सुरे कहफ : 110 )

86. सत्याची साथ द्या, असत्यापासून लांब रहा. (सुरे तौबा 119). 87. स्त्रीयांनी आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन करू नये. (सुरे नूर : 31 )

88. अल्लाह शिर्क व्यतिरिक्त इतर गुन्हे माफ करू शकतो. (सुरे निसा : 48). 

89. अल्लाहच्या कृपेपासून निराश होऊ नका. (सुरे जमर : 53). 

90. वाईट गोष्टींचा नायनाट चांगल्या गोष्टीने करा. (सुरे हामीम सज्दा : 34). 

91. आपसात चर्चा करून मग निर्णय करा. (सुरे शुरा : 38)

92. तुमच्यापैकी तो जास्त प्रतिष्ठित आहे जो जास्त चारित्र्यवान आहे. (सुरे हुजरात :13)

93. इस्लाममध्ये वैराग्याला मान्यता नाही. (सुरे हदीद :27). 

94. अल्लाह ज्ञानी लोकांना महत्त्व देतो. (सुरे अल मुजदला : 11). 

95. मुस्लिमेत्तरांसोबत उदारता आणि शिष्टाचाराने वागा. (सुरे अल मुमतहेना : 8). 

96. स्वतःला लालसेपासून दूर ठेवा. (सुरे निसा : 32)

97. अल्लाहकडे क्षमा मागत चला. तो मोठा क्षमाशील आहे. (सुरे बकरा : 199). 

98. ज्याने भिक्षा मागितली त्याला झिडकारू नका. शक्य असेल तेवढे त्याला द्या. (सुरे अलजही : 10). 

99. मरणोत्तर जीवनामध्ये यशस्वी होणे ईश्वराकडे चारित्र्यवान लोकांसाठी आहे. (सुरे  अज्जुख्रुफ आयत 35). 

100. निर्विवादपणे अल्लाह चारित्र्यवान लोकांना पसंत करतो. (सुरे तौबा : 07).

तसे पाहता कुरआनमधील सर्व निर्देशांची अंमलबजावणी आदर्श समाजरचनेसाठी त्यातील 100 निर्देश मी वाचकांच्या सोयीसाठी या ठिकाणी उधृत केलेले आहेत. या तत्वांशिवाय दुसऱ्या कुठल्याच तत्वांवर आदर्श समाजाची रचना शक्य नाही. बुद्धिजीवी लोकांनी नक्कीच वरील तत्वांचा विचार करावा. हा केवळ एका लेखकाचा कल्पना विलास आहे, असे समजून याकडे दुर्लक्ष करू नये. शेवटी ईश्वराकडे दुआ करतो की, आम्हा सर्वांना आदर्श समाजरचनेसाठी पुढाकार घेण्याची सन्मती दे. आमीन. 

- एम.आय.शेखप्रेषित मुहम्मद (स.) यांची शिकवण आहे की, जर तुमच्या समोर प्रलय येऊलागला आणि आता काही क्षणांतच हे जग संपून जाणार आहे, जगाची शेवटची घटिका समोर येताना दिसत आहे. आणि अशा वेळी जर तुमच्या हातात एखाद्या फळझाडाचे रोपटे असेल तर ते लावून टाका, ते फेकून देऊ नका. घाबरून जाऊ नका. तुम्ही जे कार्य हाती घेतलेले आहे ते पूर्ण करा.

प्रेषितांनी असे सांगितले नाही की आता या भीतीच्या वातावरणात तुम्ही काय करू शकता, शेवटची घटिका समोर दिसत आहे, आता एखाद्या झाडाचे रोपटे लावल्याने काय होणार आहे, कितीतरी वर्षे लागतील त्याला फळे यायला. आता काही क्षणांतच सर्व काही संपून जाणार आहे. तुम्ही फक्त ईश्वराच्या नावाचे स्मरण करा. सर्व काही सोडून द्या. प्रेषित म्हणाले, तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. बाकी त्या झाडाचे काय होणार याची काळजी करणे तुमचे काम नाही.

मानवी जीवनात झाडाचे काय आणि किती महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे. झाड लावणे म्हणजे माणसाने स्वतःचे जीवन दान देण्यासारखे आहे. जगाचा शेवट समोर दिसत असताना देखील प्रेषितांनी अशी शिकवण दिली की तुम्ही आपल्या जगण्याची इच्छा सोडता कामा नये. पुढे काय होणार हे तुमच्या सकारात्मक क्रियाशक्तीवर अवलंबून आहे. जी काही आपत्ती कोसळणार आहे ती कोसळणारच, पण तिच्या कोसळण्याआधीच तुम्ही निराश होता कामा नये. शेवटपर्यंत संघर्ष करा. जगातले सर्व अडथळे, कठीण प्रसंग आणि नैराश्य माणसाच्या इच्छाशक्तीसमोर काहीच नसतात. या शिकवणीत प्रेषितांना हेच सांगायचे आहे की आणखी इच्छाशक्ती ढळू देऊ नका. समोर डोंगरासारख्या समस्या असल्या, शत्रुंचे बलाढ्य सैन्य असले तरी घाबरण्याचे कारण नाही. आपण प्रयत्न केलेच पाहिजेत, कारण जे काही माणसाला लाभते ते प्रयत्नांती लाभते. समोर उभ्या असलेल्या आव्हानांना तोंड दिल्याशिवाय आपले ध्येय साधता येत नाही. पक्का विश्वास करून संघर्ष करत राहा. पुढे काय होणार याची काळजी करू नका. अशा विश्वासाने आपण आपल्या हातातील रोपटे जमिनीत लावून टाका, पुढे काय होईल हे पाहणे तुमचे काम नाही.

प्रेषित मुहम्मद (स.) यांना जीवे मारण्याची एक योजना मक्केच्या लोकांनी आखली होती, ती प्रेषितांना कळली. प्रेषित आपले एक अनुयायी अबूबकर (र.) यांना घेऊन मक्केबाहेर एका गुहेत जाऊन लपून बसले होते. इतक्यात मारेकरी त्या गुहेपर्यंत पोहोचले. अबूबकर काहीसे घाबरले. त्यावर प्रेषित त्यांना म्हणाले, “घाबरू नका. दुःखी होऊ नका. ईश्वर आपल्या बाजूने आहे.” त्या मारेकऱ्यांनी इकडेतिकडे पाहिले आणि निघून गेले.माणसाकडे अमाप संपत्ती एकवटली तर मग त्यापासून अपराधी वृत्ती जन्माला येते. एक तर लुबाडून सार्वजनिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवणे, गडगंज संपत्ती गोळा करणे याला कोणतीही मर्यादा नसते. पवित्र कुरआनात म्हटले आहे की, अशा प्रवृत्तीचे लोक एकमेकांच्या पुढे जाण्यात कोणत्याही नैतिक नियमांचे पालन करत नसतात आणि धनसंपत्ती बाळगण्यात ते एकमेकांशी वैरभाव करतात. असे लोक स्वतःला आणि इतरांनादेखील कबरीपर्यंत पोहोचविल्याशिवाय राहात नाहीत. मोजक्या लोकांकडे संपत्तीची सर्व साधने एकवटल्यास साहजिकच वंचितांचा त्यांच्याविरूद्ध द्वेषभाव निर्माण होतो. आधुनिक विचारवंतांच्या दृष्टीनेदेखील समाजामध्ये काही उणिवा असतात. वंशवाद, पिळवणूक, नैसर्गिक साधनांची असमान वाटणी यामुळे समाजात आंतरिक कलह निर्माण होतो. पण या विचारवंतांकडे या उणिवांवर मात करण्याची विचारधारा नसते. म्हणून अशा संपन्नवर्गाविरूद्ध समाजामध्ये वैरभाव निर्माण होतो. पुढे जाऊन सामाजिक बंड होतात. जगात जिकडेतिकडे अनाचार माजलेले आपण पाहात आहोत ते याच कारणामुळे, पण सत्ताधारीवर्ग यावर युद्धाचे, आतंकवादाचे आवरण चढवितात. पवित्र कुरआनच्या शिकवणी फक्त गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांच्या सुधारासाठीच नाहीत. अल्लाहने प्रेषित पाठवून साऱ्या मानवजातीला गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याची ताकीद दिली. पवित्र कुरआनात म्हटले आहे की अल्लाहने जर माणसाला विपुल साधने दिली असती तर त्यांनी धरतीवर बंड माजवले असते. ज्यांना अल्लाहने विपुल प्रमाणात दिले आहे त्यांनी त्या साधनसंपत्तीचा लोककल्याणासाठी वापर करावा. हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. नुसते दानधर्म नाही. कारण त्यांनी हे स्वतः कमवलेले नसून तो अल्लाहचा वारसा आहे. म्हणून साऱ्या मानवांचा त्यावर हक्काधिकार आहे. (पवित्र कुरआन – ४२, ३०, ५०)माननीय मुगीरा (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) रात्री अतिजास्त काळ नमाजमध्ये उभे राहिले. ज्यामुळे त्यांचे पाय सुजले होते. पैगंबरांना यावर विचारण्यात आले, ‘‘तुमच्या तर मागील पुढील सर्व उणिवांना अल्लाहने माफ केलेले आहे तेव्हा तुम्ही नमाज अदा करताना इतका त्रास का घेता?’’

यावर पैगंबर म्हणाले, ‘‘काय मी एक कृतज्ञ दास बनू नको?’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम, इब्ने माजा)


स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) दीर्घकाळ नमाजमध्ये उभे राहिले, ज्यामुळे त्यांचे पाय सुजले होते. ते उपासनेत असाधारण कष्ट घेत होते. त्यांना विचारण्यात आले, ‘‘इतके कष्ट का उचलता? जे अतिकष्ट तुम्ही उचलता त्याची तर आवश्यकताच नाही.’’ पैगंबरांच्या मागील-पुढील सर्व उणिवांना माफ करण्यात आलेले आहे. ‘कुरआनच्या सूरह अल फतह, आयत नं. २’नुसार सांगितले गेले आहे.

या प्रश्नाचे जे उत्तर पैगंबरांनी दिले त्याचा अर्थ असा होतो की जेव्हा अल्लाहने इतके असीम उपकार त्यांच्यावर केले तेव्हा त्यांचे कर्तव्य ठरते की पैगंबरांनी अल्लाहचे कृतज्ञ दास बनावे आणि अधिकाधिक ईशप्रसन्नतेचे इच्छुक व्हावे. या हदीसद्वारा माहीत होते की अल्लाहप्रति कृतज्ञ बनण्यासाठी आवश्यक आहे की दासाने ईश्वराचे अधिकाधिक सान्निध्य प्राप्त करावे आणि अल्लाहशी अधिकाधिक संबंध व्यक्त करावेत. यासाठी सर्वोत्तम साधन नमाज आहे आणि सजदा करणे (नतमस्तक होणे) तर विशेषरूपाने ईशसान्निध्यप्राप्तीचे साधन आहे, नव्हे तर सान्निध्यस्थितीचे दुसरे नाव आहे.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget