July 2021


माननीय अनस बिन मलिक (रजि.) यांचे कथन आहे,

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘काय तुम्हाला माहीत आहे की सर्वांपेक्षा जास्त दानशूर कोण आहे?’’

साथीदारांनी (सहाबा) सांगितले, ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबर मुहम्मद (स.) हेच अधिक जाणणारे आहेत.’’

पैगंबर म्हणाले, ‘‘सर्वांपेक्षा जास्त दानशूर अल्लाह आहे. मग आदमच्या संततीत सर्वांपेक्षा जास्त दानशूर मी स्वत: आहे आणि माझ्यानंतर मानवआंत सर्वांत जास्त दानशूर तो आहे जो ज्ञान प्राप्त करून त्यास प्रसारित करतो. असा मनुष्य कयामतच्या दिवशी एका श्रीमंत मनुष्याच्यारूपात येईल किंवा अशा प्रकारे येईल की त्याला स्वत:मध्ये एक समुदायाची पात्रता प्राप्त होईल.’’ (हदीस : अबू  दाऊद)

स्पष्टीकरण

दानशीलता खरे तर जीवनाचे प्रतीक आहे. जिथे कुठे जितके जीवन आढळते तिथे तितकीच दानशीलतासुद्धा सापडेल. अल्लाह तर सर्वस्वी जीवन आणि जीवनस्रोत आहे. कारण याव्यतिरिक्त कोणत्याच दानशीलतेची मनुष्य कल्पना करू शकत नाही. हे आकाश व पृथ्वी अल्लाहची दानशीलता आणि त्याचे अनुग्रह व अनुकंपेचे बोलके प्रमाण आहे. अल्लाहनंतर दानशीलतेचे गुण सर्वांपेक्षा जास्त ईशपैगंबराला प्राप्त होते, कारण ईशगुणांची प्रतिछाया पैगंबरजीवनात सर्वांपेक्षा जास्त परिलक्षित होते.

दानशीलतेचा संबंध फक्त धनसंपत्तीशीच नसतो. सर्वांपेक्षा जास्त दानशीलता आणि उपकाराची गोष्ट म्हणजे जगाला ज्ञानप्रकाशाने प्रकाशित केले जावे.

याचमुळे या हदीसमध्ये आदमच्या संततीत सर्वांपेक्षा श्रेष्ठ दानशील त्या व्यक्तीला घोषित केले आहे जो ज्ञान व अंतर्दृष्टीने सुसज्जित होऊन जगातज्ञानप्रकाशाला पैâलावित असतो, जेणेकरून लोक पथभ्रष्टतेच्या अंधकारापासून मुक्त व्हावेत. त्या लोकांसाठी खरे सुख प्राप्त व्हावे आणि  त्यांना या जगात तसेच पारलौकिक जीवनात सफलता व कल्याण प्राप्त व्हावे.आयीन-ए-मुस्तफा के सिवा हल हों मुश्किलें

सब अ्नल का फरेब निगाहों का फेर है

भांडवलशाही व्यवस्थेमध्ये नाव जरी शेतकरी आणि शेतमजुरांचे घेतले जात असले तरी सत्ता ही कायम चालाक आणि धोरणी लोकांच्या हातात असते. सरकारचे समर्थक भांडवलदार आणि कट्टर कार्यकर्ते वगळता बाकी जनता कायम गरीब, अशिक्षित व रोगट कशी ठेवता येईल याकडेच राजकारण्यांचे लक्ष असते. त्यांना हे ही माहित असते की, शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रांमध्ये पुरेशी गुंतवणूक केली तर जनतेची कायमची गरीबी दूर होऊ शकते परंतु राजकारणी असे करत नाहीत. त्यांचेे धोरणच असे असते की, शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रामध्ये पुरेशी गुंतवणूक केल्या जाऊ नये. एवढेच नव्हे तर या क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे जेणेकरून सरकार समर्थक भांडवलदार आणि कार्यकर्त्यांना तारांकित शिक्षण संस्थानाचे जाळे विनता येईल व त्यात त्यांनाच लाभ होईल. अलिकडे शेतकऱ्यांविषयक केंद्र सरकारने मान्य केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांचे नव्हे तर भांडवलदारांच्या हितासाठी काढलेले आहेत हे वरील धोरणाचाच एक भाग आहे. लोकशाहीमध्ये त्याच व्यक्ती आणि व्यक्ती समुहांची प्रगती होत असते जे राजकीयदृष्ट्या जागरूक असतात. सरकारवर कुठल्या न कुठल्या पद्धतीने प्रभाव ठेवून असतात. याच कारणामुळे दर पाच वर्षांनी,’’गरीबी निर्मुलनाचे’’ आश्वासन देऊनही गरीबी निर्मुलन होत नाही. 

जनता गरीब व अशिक्षित रहावी म्हणून सरकारी रूग्णालये, शाळा आणि कृषी क्षेत्र ठरवून बकाल ठेवले जातात. म्हणून कुठलीही अस्पृश्यता न बाळगता आपोआप गरीब जनता या तारांकित शाळा आणि रूग्णालयाच्या परिघाबाहेर फेकली जाते आणि यावर कडी म्हणजे कोणाकडे याची तक्रार करता येत नाही. भारतातच नव्हे तर जगातील प्रत्येक लोकशाहीमध्ये हेच धोरण अघोषितपणे राबविले जाते. जनता अशिक्षित किंवा अर्धशिक्षित असेल आणि त्यांच्यातील बहुतेकांचे आरोग्य चांगले नसेल तर गरीबी आपोआप येते व तिच्यासोबत येणाऱ्या वाईट सवई सुद्धा ’एकावर एक फ्री’ या तत्त्वावधानाप्रमाणे आपोआपच येतात. जनतेची पोटा आणि हाताची गाठ घालता-घालता पाच वर्षे कधी निघून गेली व पुढची निवडणूक कधी आली हे जनतेलाच कळत नाही. निवडणुकांच्या तारखा घोषित होताच राजकारणाचा पारा गरीब वस्त्यांमध्ये आपोआप चढतो. कार्यकर्त्यांना अचानक महत्त्व प्राप्त होते, त्यांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागतो आणि निवडणुकांना उत्सवाचे रूप प्राप्त होते. गरीब कार्यकर्त्यांना खूप महत्त्व दिले जाते. चार पैसे मिळत असल्यामुळे ते ऊर फाटेपर्यंत ढोल, ताशे बढवून साहेबांचा प्रचार करतात. निकाल लागले की साहेब नॉट रिचेबल होऊन जातात. त्यांना मंत्रिपदाचे तर कार्यकर्त्यांना रोजगार हमी योजनेचे वेध लागतात. साधारणपणे या विष्यस्सर्कल मधून बाहेर पडणे कोणालाही शक्य होत नाही. 

थोडक्यात गरीबी हटविण्यासाठी सरकारची स्थापना केली जाते मात्र सरकारच्या गरीबांच्याविरोधी धोरणामुळेच जर गरीबी येत असेल तर तक्रार कोणाकडे करावयाची? एरव्हीपेक्षा यावेळेस तर परिस्थितीही वेगळी आहे. कोविडच्या साथीचे दोन टप्पे पार पडलेले असून, येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये तिसरा टप्पा सुरू होईल, अशा बातम्या अधूनमधून कानावर येत आहेत. कोविडमुळे सरकारचे उत्पन्न लक्षणीयरित्या घटले असून, सरकारच्या मनात आले तरी ते जनतेची आर्थिक मदत करू शकणार नाहीत,अशी एकंदरित परिस्थिती आहे. अश्या परिस्थितीमध्ये ’अपनी मदत आप’ या तत्वावधानानुसार आपली गरीबी आपणच दूर कशी करू शकतो, यावर गांभीर्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. 

गरीबीचे मुख्य कारण

गरीबीचे मुख्य कारण भ्रष्ट-आचरण आहे. शेती वगळता इतर प्रत्येक क्षेत्राला भ्रष्टाचारी अजगराचा मजबूत विळखा पडलेला आहे. भारतासारख्या अध्यात्मिक पार्श्वभूमी असलेल्या देशात एवढे भ्रष्टाचारी लोक निर्माण का झाले, याचा जर विचार केला तर लक्षात येते की, आधुनिक जगात यशाची व्याख्याच बदलून गेलेली आहे. यशस्वी तोच ज्याच्याकडे संपत्ती आहे. मग ती संपत्ती त्याने कशी कमावली, याचा कोणीच विचार करायला तयार नाही. त्यामुळे दारू आणि ड्रग्जपासून खाद्य पदार्थात भेसळ आणि औषधांमध्ये काळाबाजार करून संपत्ती कमावण्यास मोकळीक आहे. ज्ञान, त्याग, प्रेम, सदाचार, सम्मान, दया, करूणा या मुल्यांचा यशस्वी होण्यामध्ये काहीएक संबंध राहिलेला नाही. मुंबईच्या सिनेउद्योगामध्ये भरपूर पैसा आहे हे माहित असून देखील पूर्वी चांगल्या घरच्या मुली त्या उद्योगात जात नसत. आता पैशासाठी सिनेउद्योग तर सोडाच पॉर्न उद्योगातही चांगल्या घरच्या मुलींना जातांना लाज वाटत नाहीये. नव्हे राजकुंद्रासारखे उद्योगपती या क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी हातभार लावताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या स्वदेशी उद्योगाला भरभराटीत आणण्यामध्ये यास्मीन रसूल बेग (40), मुहम्मद आतिफ नासीर अहेमद सैफी (32) अशी सोज्ज्वळ नावे असलेल्या मुस्लिमांचाही सहभाग असल्याची बातमी 19 जुलै 2021 च्या सर्वच वर्तमानपत्रातून झळकलेली आहे. थोडक्यात अवैध मार्गाने संपत्ती मिळविणाऱ्यांना समाजामध्ये सन्मान मिळत असल्यामुळे अनेक मुस्लिमही हा सन्मान मिळविण्याच्या स्पर्धेमध्ये सामील झालेले आहेत. 

संपत्तीचा संचय दुराचारी लोकांच्या हातात झाल्याने सदाचारी लोकांकडे राष्ट्रीय संपत्तीचा फार कमी वाटा येतो. हे गरीबीचे सर्वात मोठे कारण आहे. देशात संपत्ती संचयाची एक आंधळी स्पर्धा सुरू असून, प्रत्येकजण कुठल्याही परिस्थितीत ती स्पर्धा जिंकण्यासाठीच तिच्यात सहभागी होत आहेत. म्हणून राष्ट्रीय संपत्तीचे अभिसरण अनैतिक उद्योगामध्येच होत आहे. यासाठी सर्व समाज जबाबदार आहे. ज्याप्रमाणे रक्ताचे डाग रक्ताने स्वच्छ होत नाहीत त्याचप्रमाणे वाममार्गाचे मध्ये अडकलेल्या संपत्तीला वाममार्गाने स्वच्छ करता येत नाही. त्याला हराम आणि हलालच्या कसोटीवर कसून सद्मार्गाकडे वळवावे लागते. तेव्हाच संपत्तीचे अभिसरण समाजातील सदाचारी लोकांकडे सुरू होते. त्यासाठी ज्यांच्याकडे कुरआन नावाचा ईश्वरी ग्रंथ आहे त्यांना पुढे यावे लागेल आणि संपत्ती कमाविण्याची व ती खर्च करण्याची ईश्वरीय व्यवस्था काय आहे? हे जनतेसमोर मांडावी लागेल. थोडक्यात गरीबी निर्मुलनाची इस्लामी पद्धत काय आहे? याचा परिचय जनतेला करून द्यावा लागेल. तो परिचय करून देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे हा लेख आहे. 

इस्लाममध्ये संपत्तीचे स्थान

एकेश्वरवादाचा त्याग केल्यामुळे माणसाला कोणतीच भीती राहत नाही व तो संपत्ती कमावण्यात आणि खर्च करण्यात  कुठल्याही आचार संहितेला बांधिल राहत नाही. म्हणून लोक आपल्या खऱ्या-खोट्या ऐपतीचे प्रदर्शन करण्यासाठी अमाप पैसा मिळेल त्या मार्गाने गोळा करत असतात व तो मिळेल त्या मार्गाने खर्च करत असतात. एकेश्वरवादावर विश्वास  माणसाच्या याच प्रवृत्तीला लगाम लावतो. भांडवलशाही व्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचा पाठीचा कणा व्याज आहे तर इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेचा कणा जकात आहे. व्याजाधारित अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती ही खालून वर म्हणजे गरीबांकडून श्रीमंतांकडे जाते. या उलट जकात आधारित इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये संपत्ती ही वरून खाली म्हणजे श्रीमंतांकडून गरीबाकडे येते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कमाईवर कर लावला जातो त्यामुळे कमाई लपविता येऊ शकते आणि कर वाचविता येऊ शकतो. मात्र इस्लाममध्ये कर बचतीवर लावला जातो आणि बचत मात्र लपविता येत नाही. त्यामुळे जकात अदा करावीच लागते. 

इस्लाममध्ये संपत्तीचे सर्व व्यवहार शरियतच्या कोंदनात बसविलेले असल्यामुळे आर्थिक व्यवहाराचे अधिष्ठान नैतिक मुल्यांवर ठेवलेले असते. म्हणून या व्यवस्थेमध्ये सदाचार, ज्ञान, त्याग, प्रेम, सम्मान, दया, करूणा यांना फार महत्त्व असते. या सर्व कारणामुळे संपत्तीचे अभिसरण समाजामध्ये समप्रमाणात होत असते. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,’’नमाज कायम करा, जकात द्या आणि पैगंबर (सल्ल.) यांच्या आज्ञा पाळा, आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल.’’ ( संदर्भ : सूरे अन्नूर : आयत नं. 56). या आयातीमध्ये नमाजसारख्या अत्युच्च उपासनेसोबत जकातची सांगड घातलेली आहे आणि अशा अनेक आयाती कुरआनमध्ये विखुरलेल्या आहेत ज्यामुळे जकातीचे महत्त्व श्रद्धावान मुस्लिमांच्या मनावर बिंबवले गेले आहे. यामुळे जकात न अदा करण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनामध्ये येत नाही आणि दरवर्षी नियमितपणे कोट्यावधी रूपये कुठल्याही ईडी आणि सीबीआयच्या बडग्याशिवाय गरीबांच्या खिशात जातात. 

याशिवाय मरण पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपत्तीमध्ये एकीकडे नातेवाईकांचा वाटा ठरविण्यात आलेला असला तरी दूसरीकडे वारस नसलेल्या पण गरीब असलेल्या लोकांचाही समावेश वारसांसोबत केलेला आहे. सुबहान अल्लाह (अल्लाह पवित्र आहे)! किती उच्च आणि दैदिप्यमान असा हा नैतिक विचार आहे. म्हणूनच कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,’’आणि जेव्हा वाटणीच्या वेळी कुटुंबातील लोक आणि अनाथ व गोर-गरीब आले तर त्या संपत्तीमधून त्यांनादेखील काही द्या आणि त्यांच्याशी भल्या माणसासारखे बोला.’’(संदर्भः सुरे अन्निसा : आयत नं.8).

इस्लामी अर्थव्यवस्थेमध्ये गरीबी निर्मुलनासाठी शासनावर जेवढी जबाबदारी टाकली आहे तेवढीच व्यक्तीवरही टाकलेली आहे. शासनाने आपल्या बैतुलमाल (ट्रेझरी)मधून जनकल्याणाच्या अशा योजना हाती घ्याव्यात ज्यामुळे जनतेची गरीबी दूर होईल तसेच प्रत्येक श्रद्धावान मुस्लिमाने आपल्या बचतीमधून जकात द्यावी. त्याशिवाय, सदका (दान), उश्र (कापणीच्या वेळेस धान्याचा विशिष्ट भाग) गरीबांसाठी राखीव ठेवणे, फित्रा इत्यादी मार्गाने गरीबांना आर्थिक लाभ वर्षभर व्यक्तीगत पातळीवरून होत राहील, अशी व्यवस्था केलेली आहे. यामुळे गरीबी निर्मुलनास मदत होते. 

अलिकडे गरीबांना मोफत जेऊ घालण्यासारख्या महत्वाच्या बाबीकडे मुस्लिमांचे दुर्लक्ष होत असून यात शीख बांधवांनी बाजी मारल्याचे दिसून येते. इस्लाममध्ये गरीबांना मोफत जेवण देण्याची अनेक ठिकाणी ताकीद करण्यात आली आहे. यासंदर्भात कुरआनमध्ये गरीबांना जेवण न देणाऱ्यांच्या बाबतीत तंबी करताना म्हटले आहे की, 1.’’व गरीबांना जेवण देण्यास लोकांना उद्युक्तही करीत नव्हता’’ (संदर्भ : सुरे अलहा्नका आयत नं.34).

2. ’’आणि गरीबांना जेवू घालत नव्हते’’ (संदर्भ : अलमुदस्सीर आयत नं. 44).

3. ’’आणि गरीबाला जेवू घालण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देत नाहीत’’ (सुरे अल्फज्र आयत नं. 18).

वरील आयातींवरून एक गोष्ट तर वाचकांच्या लक्षात येईलच की, गरीबांना मोफत जेवण न घालणाऱ्या लोकांबद्दल ईश्वराने नाराजी व्यक्त केलेली आहे. या संदर्भातील अधिक तपशील या लेखात देणे शक्य नाही. म्हणून ज्यांना या संबंधी माहिती हवी असेल त्यांनी रास्त कुरआनमधील या आयातींचा अभ्यास करावा. 

याशिवाय इस्लाममध्ये अनावश्यक खर्च टाळण्यासाठी मुस्लिमांना प्रेरित करण्यात आलेले आहे. एके ठिकाणी तर अनावश्यक खर्च करणाऱ्यांना सैतानाचा भाऊ सुद्धा म्हटलेले आहे. अनावश्यक परंपरा आणि रितीरिवाजांचे पालन करण्यामध्ये अनेक मुस्लिम लोक आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करतात. विशेषतः लग्न सोहळ्यांमध्ये असा अमाप खर्च केला जातो की त्यामुळे अनेक कुटुंबेही लग्नानंतर दारिद्ररेषेखाली जातात. ब्रँडेड कपडे, सुगंध आणि मॉलमध्ये अनावश्यक खरेदी करून मुस्लिम लोक कोट्यावधी रूपये खर्च करत असतात. श्रद्धावान मुस्लिमांना अशा अनावश्यक खर्चापासून अलिप्त राहण्याची ताकीद करूनच कुरआन थांबत नाही तर आपण गरजवंत असतांना सुद्धा दुसऱ्या गरवंतांचा आपल्यापेक्षा जास्त विचार करण्याची उच्च नैतिक शिक्षा तो देतो. म्हणून म्हटलेले आहे की, 

3.‘’वायफळ खर्च करणारे सैतानचे बंधू होत, आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी कृतघ्न आहे’’ (बनी इस्राईल आयत नं. 27).

4. हे मानवानों! खा, प्या मात्र मर्यादाभंग करू नका. अल्लाह मर्यादा भंग करणाऱ्या लोकांना पसंत करत नाही. (संदर्भ : सुरे आराफ आयत नं. 31). 

या तिन्ही आयातीमध्ये मुस्लिमांना वायफळ खर्च टाळण्यासंबंधी सक्तीने बजावण्यात आलेले आहे. मोफत अन्नछत्र चालवणे आणि वायफळ खर्च टाळणे म्हणजे गरीबीच्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या लोकांची मदत करण्यासारखे आहे. ह उदात्त शिकवण आजच्या स्वार्थी वर्तणुकीच्या अगदी उलट आहे. कुरआन येथेच थांबत नसून यापुढे म्हणतो की, ’’आणि ते स्वतः (मुस्लिम) गरजवंत असतांना दुसऱ्या गरजूंना आपल्यावर प्राधान्य देतात.’’ (संदर्भ : सुरे अलहश्र, आयत नं.9)

मदीना येथील भातृभाव योजना

एकेश्वरवादाची शिकवण म्नकाच्या मूर्तीपूजकांना मुळीच आवडत नव्हती. त्यामुळे मूठभर मुस्लिम एकीकडे आणि कुरेशचे बलवान मूर्तीपूजक दुसरीकडे असा विषम सामना जेव्हा रंगात आला तेव्हा नाईलाजाने प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना आपल्या साथीदारांसोबत मदीना येथे हिजरत करावी लागली. अचानक हिजरत करावी लागल्यामुळे मुस्लिमांना अंगावरच्या कपड्यानिशी जावे लागले. त्यामुळे मदीना शहरात पोहोचल्यानंतर त्यांच्याकडे स्वतःच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचीही व्यवस्था नव्हती. अशा वेळेस इस्लामी ब्रदरहुड (भातृभाव योजना)ची ऐतिहासिक घटना घडली. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्नकाहून आलेल्या एका मुहाजीरची मदीना येथील एका अन्सारी मुस्लिमांबरोबर जोडी लावून दिली आणि घोषित केले की आजपासून तुम्ही एकमेकांचे भाऊ आहात. अशा तऱ्हेने मक्का येथील सर्व स्थलांतरीतांच्या जोड्या मदीना येथील स्थानिकांशी लावण्यात आल्या. तेव्हा जगाने पाहिले की त्यांच्यात असे बंधुत्व निर्माण झाले होते की, त्याचे दूसरे उदाहरण त्यापूर्वी किंवा त्यानंतर जगाने पाहिलेले नाही. अन्सारी मुस्लिमांनी आपल्या भावांसाठी आपल्या सर्व चल-अचल संपत्तीची उभी विभागणी करून अर्धी आपल्या स्थलांतरित भावांना दिली. येणेप्रमाणे स्थलांतरित मुस्लिमांची गरीबी दूर  झाली. म्नकाहून येणारे मुस्लिम व्यापारी होते त्यांना शेती येत नव्हती तर मदीना येथील स्थानिक मुस्लिम शेतकरी होते त्यांना व्यापार येत नव्हता. दोघांच्या जोड्या लागल्यामुळे शेतीबरोबर व्यापारही सुरू झाल्याने अन्सार आणि मुहाजीर दोघांचीही भरभराट झाली. आज जर कोविडच्या परिस्थितीमध्ये रोजगार हरवलेल्या आपल्या शेजाऱ्याची जबाबदारी प्रत्येक मुस्लिमाने स्वीकारली आणि मदीना भातृभाव योजनेप्रमाणे त्यांचे पालकत्व स्वीकारले आणि आपल्या संसाधनामधून अर्धे नाहीतरी किमान त्याच्या गरजेपुरती मदत केली तर त्याला स्वतःच्या पायावर उभे राहता येईल व बंधूभाव वाढेल तो वेगळा. तसेच वर नमूद कुरआनच्या इतर आयातींप्रमाणे आचरण केले तर कुठलीही फीत न कापता, कुठल्याही पॅकेजची घोषणा न करता, कुठलाही गाजावाजा न करता गरीबी निर्मुलनाची प्रक्रिया आपोआप सुरू होईल. यात माझ्या मनात तरी किमान शंका नाही. परंतु असे करण्यासाठी मोठ्या त्यागाची आवश्यकता आहे. मोठा त्याग करण्यासाठी मोठे मन लागते आणि मोठे मन इस्लामवर अढळ श्रद्धा असल्याशिवाय मिळत नाही. नुकतीच त्यागाची शिकवण देणारी ईदुल अज्हा झालेली आहे. 

यानिमित्ताने प्रत्येक मुस्लिमाने आपला एक गरीब शेजारी आर्थिक मदतीसाठी म्हणून दत्तक घ्यावा म्हणजे नक्कीच गरीबी दूर होईल. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ’ऐ अल्लाह ! आम्हाला आपल्या देशबांधवांची गरीबी दूर करण्यासाठी मदीना येथील भातृभाव योजनेप्रमाणे त्याग करण्याची समज आणि शक्ती दे.’’ आमीन. 

- एम.आय.शेखअल्लाहने श्रद्धावंतांना केवळ परलोकातील देणग्यांचीच हमी दिली नाही तर त्यांना या जगातदेखील वैभवाचे आणि या धरतीवर सत्ता देण्याचे वचन दिले आहे. पण यासाठी अल्लाहने जी अट ठेवली आहे ती महत्त्वाची आहे, “जे लोक श्रद्धा बाळगतात आणि चांगले कर्म करतात त्यांना अल्लाहने वचन दिले आहे की पूर्वी जशी इतर लोकांना धरतीवर सत्ता बहाल केली होती तशीच त्यांनाही देईल.” त्यांना अराजकतेपासून वाचवील. यासाठी माणसाने अल्लाहची उपासना करावी आणि कुणालाही त्याचा भागीदार बनवू नये. अल्लाहने माणसाला या धरतीवर मालक बनवलेले नाही तर माणसाला आपला उत्तराधिकारी बनवून पाठवलेले आहे. अशात त्यास सत्ता दिल्यावर माणसाने ईश्वराच्या आदेशांनुसार राज्य कारभार चालवावा. तसे केल्यास त्यांना या जगात आणि परलोकात देखील सर्व काही मिळेल. अल्लाहचे म्हणणे आहे की “ज्यांना या जगातच सर्व काही हवे असेल, धनसंपत्ती, ऐश्वर्य, वैभव, संतती – आम्ही सर्व काही त्यांना भरभरून देऊ, पण परलोकात त्यांना कसलाच वाटा नसेल.” पण ज्या लोकांना या जगात आणि परलोकात देखील अल्लाहच्या देणग्या हव्या असतील त्यांनी अल्लाहचे आदेश पाळले तर त्यांना दोन्ही ठिकाणी सर्व काही देण्याचे अल्लाहने वचन दिलेले आहे.

इस्लाममध्ये माणसाला बादशाह, अधिपती असे काहीच मानले गेले नाही. तो धरतीवर कशाचाही मालक नसून त्याला अल्लाहचा उत्तराधिकारी आणि विश्वस्त या भूमिकेतून आपली जबाबदारी पार पाडायची आहे. खऱ्या अर्थाने केवळ अल्लाहच साऱ्या चराचराचा अधिपती आहे. “तोच (अल्लाह) साऱ्या विश्वाचा स्वामी, साऱ्या मानवांचा अधिपती, त्यांचा ईश्वर.”

याचबरोबर माणसांना दिलेल्या वैभवांचे आणि आपल्या देणग्यांचे वर्णन करताना अल्लाह म्हणतो, “आम्ही मानवाला आमचा उत्तराधिकारी नेमलेले आहे. आणि हे कारे विश्व, पृथ्वी, आकाश, समुद्र, नद्या, शेती सर्व काही त्यांच्या सेवेसाठी निर्माण केले आहे.” या अर्थाने माणूस या धरतीवर माणसांच्या सेवेसाठी पाठवला गेला आहे. त्यांना सत्ता दिलेली आहे, मग कशा प्रकारे तो आपल्या सत्तेचा कारभार चालवतो, याबाबत त्याची विचारणा केली जाईल.प्रत्येक संस्कृती-सभ्यतेत जनसमूहात आनंद साजरा करण्याचे प्रसंग येत असतात, सण साजरे केले जातात. हे प्रसंग मानवी स्वभावाचा अविभाज्य अंग आहे. प्रत्येक माणसाला आनंद लुटण्याची इच्छा असते आणि ती साहजिकच स्वाभाविक आहे. त्याचबरोबर माणसांना संकटांनी घेरले तर तो घाबरून जातो. कारण संकट येणे माणसाला पसंत नाही. पसंत नसले तरीदेखील सुख आणि दुःख हे जीवनाचे कालचक्र आहे. अल्लाह म्हणतो की आनंदाने भारावून जाऊ नका आणि दुःख कोसळल्यास घाबरून जाऊ नका. लोक दुःखासाठी नैसर्गिक, दैवी शक्तींना जबाबदार ठरवतात, तर आनंदाच्या प्रसन्नतेच्या प्रसंगांचे स्वतःला श्रेय देतात. पवित्र कुरआनात अल्लाहने म्हटले आहे, “जगातील जीवन खेळ करमणूक देखावा एकमेकांशी दुराभिमान, संतती व संपत्तीविषयी ऐश्वर्याच्या चुरशीशिवाय काही नाही, शेतात आलेल्या पिकामुळे शेतकरी आनंदित होतो. ती वाढत जाऊन पिवळी पडते आणि नंतर तिचा भुसा होऊन जातो.” असेच या जगातील माणसाचे जगणे आहे. सुख-दुःखाचे प्रसंग येत असतात आणि निघून जातात तेव्हा माणसाने प्रसन्नतेच्या वेळी घमेंड करू नये. एकमेकांशी दुराभिमान बाळगू नये. “तुमच्या हातातून निसटून जात त्यावर निराश होऊ नये आणि जे तुम्हाला देणगीने मिळेल त्यावर फुलून जाऊ नये.” तात्पर्य हे की माणसाला जेव्हा प्रसन्नता लाभते तेव्हा त्याने त्यासाठी अल्लाहचे आभार मानावे. जास्तच काही मिळाले असल्यास त्याने अल्लाहसमोर नतमस्तक व्हावे. प्रेषित मुहम्मद (स.) असेच करत होते. त्यांचे अनुयायी सुद्धा अशाच प्रकारे प्रेषितांचे पालन करायचे. आनंद साजरा करणे म्हणजे त्या दिवशी काहीही करण्याचा अधिकार प्राप्त होतो असे नाही. कुठल्याही प्रकारे नैतिक मर्यादा ओलांडण्याची अनुमती नाही. जुगार, दारू, इत्यादी करमणुकीची मुभा नाही. सामान्य दिवसांमध्ये ज्या मर्यादा घातलेल्या असतात त्या मर्यादा कितीही मोठा आनंद प्राप्त झाला तरी त्यांना ओलांडण्याचा प्रश्नच नाही. प्रेषित मुहम्मद (स.) काळात ईदच्या दिवशी प्रचलित परंपरा पाळल्या जात होत्या. डफ-वाजवून गीत गायले जाई, खेळांच्या स्पर्धा भरविल्या जात, परंतु कसल्याही प्रकारचा अनैतिक जल्लोष साजरा केला जात नव्हता. ईदचा मानवतेसाठी ‘पयाम’ म्हणजे सणासुदीच्या जल्लोषात गोरगरीब वंचितांना विसरून जाऊ नये.


जर असे नाही तर मग विचार करा की दोहोंमध्ये मूळ फरक काय आहे? याचे उत्तर केवळ एक आहे आणि ते असे की दोहोंमध्ये फरक इस्लाम व अनेकेश्वरत्वामुळे पडतो. इस्लामचा अर्थ अल्लाहची आज्ञा पाळणे आहे. आणि अनेकेश्वरत्वाच अर्थ अल्लाहची अवज्ञा करणे आहे. मुस्लिम व अनेकेश्वरवादी (अल्लाहचा इन्कार करणारे) दोघे मनुष्य आहेत. दोघे अल्लाहचे दास आहेत. परंतु एक मनुष्य अशा कारणाने श्रेष्ठ बनतो की तो त्याच्या स्वामीला ओळखतो, त्याच्या आज्ञेचे पालन करतो आणि त्याच्या अवज्ञेच्या परिणामाचे भय बाळगतो. दुसरा मनुष्य उच्च स्थानावरून या कारणास्तव खाली कोसळतो की तो त्याच्या स्वामीला ओळखत नाही आणि त्याची अवज्ञा करतो. यामुळेच अल्लाह आज्ञाधारकांवर (मुस्लिमांवर) प्रसन्न आहे व अनेकेश्वरवाद्यावर (अवज्ञाकारींवर) अप्रसन्न. तो आज्ञाधारकांना (मुस्लिमांना) जन्नत देण्याचा वायदा करतो आणि अनेकेश्वरवाद्यांना (अवज्ञाकारींना) म्हणतो की जहन्नममध्ये टाकीन.

फरकाचे कारण - ज्ञान व कर्म

यावरून असे कळते की आज्ञाधारकाला (मुस्लिमाला) अनेकेश्वरवादी (काफिर) पासून वेगळे करणारी मूळ कारणे हीच आहेत- एक ज्ञान व दुसरे कर्म. म्हणजे प्रथम तर त्याला हे जाणून घेतले पाहिजे की त्याचा स्वामी कोण आहे? त्याचे आदेश काय आहेत? त्याच्या इच्छेनुसार चालण्याचा अर्थ काय आहे? कोणते कर्म केल्याने तो प्रसन्न होतो व कोणत्या कर्मामुळे तो अप्रसन्न होतो? मग जेव्हा या गोष्टी त्याला कळल्या तेव्हा माणसाचे हे कर्तव्य ठरते की त्याने स्वत:ला स्वामीचा दास बनवावे. जशी मालकाची इच्छा असेल त्याप्रमाणे वागावे आणि जी स्वत:ची इच्छा असेल व मालकाची आज्ञा त्याच्या विरूद्ध असेल तर त्याने मनाचे म्हणणे ऐवूâ नये आणि स्वामीच्या आज्ञेचे पालन करावे. एखादे कर्म त्याला चांगले वाटत असेल आणि स्वामीने त्याला वाईट म्हटले तर त्याला वाईट समजावे. एखादे दुसरे कर्म त्याला वाईट वाटत असेल, परंतु स्वामीने सांगितले की ते चांगले आहे तर त्याला चांगलेच समजावे. एखाद्या कामात त्याला नुकसान दिसत असेल आणि स्वामीची आज्ञा आहे की त्याने ते करावे तर ते त्याने केलेच पाहिजे. मग ते करण्यात त्याला प्राणार्पण करावे लागो अथवा कितीही सांपत्तिक हानी त्याला सोसावी लागो ते त्याने अवश्य करून दाखवावे. एखाद्या दुसऱ्या कामात त्याला लाभच लाभ दिसत असेल आणि स्वामीची आज्ञा आहे की ते त्याने करू नये तर मग जरी त्या कामात विपुल संपत्ती त्याला मिळत असेल तरी ते कार्य कदापि करू नये.

हेच ते ज्ञान व कर्म आहे ज्यामुळे मुस्लिम अल्लाहचा प्रिय दास बनतो व त्यावर अल्लाहचा कृपाप्रसाद अवतरित होतो आणि अल्लाह त्याला गौरव प्रदान करतो. अवज्ञाकारी- अनेकेश्वरवाद्याजवळ हे ज्ञान नसते, त्यामुळे त्याचे कर्मसुद्धा तसे नसते. म्हणून तो ईश्वराचा अज्ञानी व अवज्ञाकारी दास बनतो आणि ईश्वर त्याला आपल्या कृपाप्रसादापासून वंचित ठेवतो.

आता स्वत:च न्यायाची कास धरून विचार करा की जो मनुष्य स्वत:ला आज्ञाधारक (मुस्लिम) म्हणत असेल आणि तसाच अज्ञानी असेल जसा एक अनेकेश्वरवादी- अवज्ञाकारी (काफिर) असतो व तसाच अवज्ञाकारी असेल जसा एक अनेकेश्वरवादी असतो तर मग केवळ नाव, पोशाख आणि खाण्यापिण्याच्या फरकामुळे एखाद्या अनेकेश्वरवाद्याच्या- अवज्ञाकारींच्या तुलनेत तो कशा प्रकारे श्रेष्ठ ठरू शकेल? कोणत्या आधारे या जगात व पारलौकिक जीवनात अल्लाहच्या कृपाप्रसादाचा तो अधिकारी ठरू शकेल? इस्लाम कोणत्याही वंश किंवा घराणे अथवा जातीचे नाव नाही. इस्लाम पित्याकडून पुत्रास व पुत्राकडून पौत्रास आपोआप मिळत नाही. इस्लामला मान्य नाही की ब्राह्मणाचा मुलगा कितीही अज्ञानी असो आणि त्याने कितीही दुष्कृत्ये केली तरी तो उच्च कुलीनच राहील, कारण त्याने ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला आहे आणि उच्च जातीचा आहे. तसेच चांभाराचा मुलगा मग तो ज्ञान व कर्माच्या दृष्टीने सर्वप्रकारे श्रेष्ठ असला तरी तो नीचच राहील, कारण त्याने चांभाराच्या घरी जन्म घेतला आहे व नीच आहे. इस्लाममध्ये तर अल्लाहने आपल्या ग्रंथात (पवित्र कुरआनमध्ये) स्पष्ट सांगितले आहे,

‘‘अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे.’’ (कुरआन-४९:१३)

प्रेषित इब्राहीम (अ.) एका मूर्तिपूजकाच्या घरी जन्मले. परंतु त्यांनी अल्लाहला ओळखले आणि त्यांनी त्याच्या आज्ञेचे पालन केले म्हणून अल्लाहने त्यांना संपूर्ण जगाचा नेता बनविले. प्रेषित नूह (अ.) यांच्या मुलाने एका प्रेषिताच्या घरी जन्म घेतला, परंतु त्याने अल्लाहला ओळखले नाही आणि त्याची अवज्ञा केली. म्हणून अल्लाहने त्याच्या घराण्याचा विचार केला नाही आणि त्याच्यावर असा प्रकोप केला की ज्यापासून जगाने धडा घ्यावा. म्हणून चांगल्याप्रकारे समजून घ्या की अल्लाहच्या दृष्टीने माणसामाणसात काही फरक आहे तर तो ज्ञान व कर्मामुळे आहे. या जगात व पारलौकिक जीवनातसुद्धा त्याची कृपा केवळ त्याच लोकांसाठी आहे जे त्याला ओळखतात आणि त्याने दाखविलेल्या सरळमार्गाचे ज्ञान बाळगतात व त्याच्या आज्ञेचे पालन करतात. ज्या लोकांत हे गुण नसतील, मग त्यांची नावे अब्दुल्लाह आणि अब्दुर्रहमान असोत अथवा दीनदयाल आणि कर्तारसिंह; अल्लाहच्या दृष्टीने या दोघांत काहीही फरक नाही आणि त्याच्या कृपेतील काहीही हक्क त्यांना प्राप्त होत नाही.माननीय अनस (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.

एका मनुष्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे शेळ्यांची मागणी केली ज्या दोन पहाडांमध्ये चरत होत्या. पैगंबरांनी त्या सर्व शेळ्या त्या मनुष्याला देऊन टाकल्या. तो मनुष्य त्याच्या वस्तीत जाऊन म्हणाला, ‘‘हे लोकांनो! मुस्लिम व्हा. ईश्वरशपथ, मुहम्मद (स.) इतके काही देतात की दारिद्र्याची भीती नष्ट होते.’’ (हदीस:मुस्लिम)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मागणाऱ्याला कधीही परत पाठविले नाही तर देण्यात अत्यंत दयालुता दाखविली.

माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे की एक व्यक्ती जगासाठी मुस्लिम होतो तेव्हा इस्लाम त्याच्या दृष्टीत समस्त जगांपेक्षा अधिक प्रिय होतो. हा होता सत्यधर्म चमत्कार आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सान्निध्याचा प्रवाभ!अर्थात, भौतिकतेला प्राधान्य देणारेसुद्धा पैगंबरांच्या जवळ येऊन सत्य स्वीकारतात.जसे वचनबद्धता अल्लाहचे वैशिष्ट्य आहे तसेच क्षमा करणेदेखील अल्लाहचे मानवतेला मोठे वरदान आहे. जर असे नसते तर अल्लाहने या जगाला आणि यातील मानवजातीला कधीच नष्ट केले असते. पवित्र कुरआननात म्हटले आहे की, “तोच आपल्या मानवांचा पश्चात्ताप स्वीकारतो आणि त्यांच्यातील अवगुणांना माफ करून टाकतो.” (कुरआन) जर अल्लाहची तशी इच्छा असती तर माणसांच्या वाईटपणासाठी त्यांचा नाश केला असता. अशाच प्रकारे मानवांना म्हटले आहे की, “जर तुम्ही कुणाच्या वाईट कृत्यांना क्षमा केले तर अल्लाह तुम्हालादेखील माफ करण्याचे सामर्थ्य राखतो.” (कुरआन-३) माणसांनी एकमेकांना क्षमा केली पाहिजे. असे केल्यास अल्लाह माणसांना क्षमा करतो, कारण तो परमदयाङू आहे. अल्लाह म्हणतो, “तुमच्या विधात्याने आपल्या दयेने आणि क्षमाशीलतेने तुमच्यासाठी जो स्वर्ग निर्माण केला आहे त्या स्वर्गाकडे धाव घ्या, ज्याचा विस्तार सबंध आकाश आणि साऱ्या धरतीसमान आहे. हा स्वर्ग अशा सदाचारी लोकांसाठी तयार केला गेला आहे जे टंचाईत असोत की भरभराटीत आपली साधने लोकांच्या सेवेत बहाल करतात. आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात, लोकांना क्षमा करून टाकतात. अशाच लोकांना अल्लाह पसंत करतो.” (कुरआन)

या आयतींनुसार सदाचारी लोक म्हणजे जे कुणावर रागवत नाहीत आणि लोकांकडून झालेल्या चुकांबद्दल त्यांना क्षमा करतात. प्रेषित मुहम्मद (स.) यांचे एक अनुयायी अबू मसऊद आपल्या गुलामास मारहाण करत होते. त्यांच्या मागून आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले तर स्वतः प्रेषित मुहम्मद (स.) होते आणि म्हणत होते की, “जितके नियंत्रण या गुलामावर तुमचे आहे त्यापेक्षा अधिक अल्लाहचे तुमच्यावर आहे.” अबू मसऊद म्हणतात या घटनेनंतर मी पुन्हा आयुष्यात कधी कुणावर रागवलो नाही. तसेच एका अन्य अनुयायींनी प्रेषितांना विचारले, “मी माझ्या सेवेत असणाऱ्यांच्या किती चुका माफ करू?” प्रेषित म्हणाले, “दररोज शंभर वेळा.” क्षमाशीलतेचे वर्णन पवित्र कुरआनात फार सुंदररित्या केले आहे.

“जो लोकांना अल्लाहकडे बोलावतो, नेक कर्म करतो आणि म्हणतो की मी श्रद्धावंत आहे त्यापेक्षा चांगले कुणाचे बोलणे. भले आणि वाईट समान नसतात. जे चांगले असेल त्याद्वारे वाईटावर उपाय करा. त्यामुळे ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व होते तोच तुमचा जीवलग मित्र होईल. पण जे संयमी लोक असतात त्यांनाच हे लाभते आणि ज्यांचे नशीब मोठे त्यांच्याच भाग्यात हे येते.” (कुरआन-४१)दिलेले वचन पूर्ण करणे हे स्वतः अल्लाहचे वैशिष्ट्य आहे. पवित्र कुरआनात अल्लाह स्वतःविषयी असे म्हणतो की, निश्चितच अल्लाह कधीही वचनभंग करत नाही. अल्लाहने केलेले हे वचन आहे आणि तो कधीच आपल्या वचनाच्या विरोधात जात नाही. अल्लाह कधीही आपला शब्द टाळत नसतो. अल्लाहपेक्षा आपल्या वचनाशी बांधिल इतर कोण असू शकतो? (पवित्र कुरआन, विविध अध्यायांतील आयती) साधारणपणे दोन माणसांनी आपसात केलेल्या करारास वचन म्हटले जाते. पण जीवनातील प्रत्येक क्षेत्रात वचनपूर्ती करावी लागत असते. मग ते सामाजिक असो की आर्थिक, संस्कृती-सभ्यतेशी निगडीत असो की राज्यव्यवस्थेशी संबंधित असो; प्रत्येक क्षेत्रात माणसाने वचनबद्धता पाळली पाहिजे. मुस्लिमांच्या बाबतीत असे म्हटले गेले आहे की जर ते आपले वचन पाळत नसतील तर त्यांची श्रद्धा परिपूर्ण होऊ शकत नाही. जे वचन पाळतात अशा श्रद्धावंतांसाठी कुरआनात म्हटले आहे की, “असे लोक त्यांच्याकडील अमानती परत करतात. वचनभंग करत नसतात. आपल्या नमाजांविषयी (उपासना) ते दक्ष असतात. तेच लोक स्वर्गाचे वारस असतील. अशाच लोकांना उच्च दर्जाच्या स्वर्गांचा वारसा लाभेल, कारण ते लोक आपल्या विधात्याच्या आयतींवर श्रद्धा ठेवतात, त्यास भागीदार जोडत नाहीत. त्यांना जे काही जमेल ते इतरांना देतात. अशाच लोकांच्या हृदयांना आपल्या विधात्याकडे परतण्याची सतत भीती असते.” (पवित्र कुरआन-२३)

लोकांना पुरेपूर माप करून देणे हे अल्लाह आणि समाजाशी केलेले वचन आहे. “माप करताना पुरेपूर द्या. वजन करताना प्रमाणित तराजूने तोलून द्या.” (कुरआन-१७)

सगळ्यात महत्त्वाचे वचन म्हणजे माणसांनी अल्लाहशी केलेले वचन होय. हे वचन माणसाने अल्लाहशी केलेले असल्याने समस्त मानवांशी, समाजाशी, जनसमूहांशी त्याचा संबंध आहे. जे लोक अल्लाहशी केलेले वचन पूर्ण करतात, आपसातला करार मोडत नाहीत, असे लोक खऱ्या अर्थाने ज्या नातेसंबंधांना अल्लाहने जोडून ठेवण्याचे आदेश दिले आहेत ते जोडून ठेवतात. (कुरआन-१६)ईद-उल-अज़्हा ला आपल्याकडे बकरी ईद ही म्हटले जाते जे की चुकीचे आहे. ही ईद केवळ बकऱ्याची कुर्बानी देण्यापर्यंत मर्यादित नसून या ईदच्या मागे फार मोठा इतिहास आहे. हजरत इब्राहिम अलै. आपले एकुलते एक सुपूत्र इस्माईल अलै. यांची अल्लाहच्या आदेशाने कुर्बानी देण्याची तयारी असल्याच्या घटनेची आठवण म्हणून ही ईद साजरी केली जाते. या ईदचा थोडक्यात संदेश त्याग आहे. आपण स्वतः या घटनेपासून प्रेरणा घेऊन गरीबांसाठी, देशासाठी काय त्याग करू शकतो याचा वार्षिक आढावा घेण्याची संधी प्रत्येकाला ही ईद उपलब्ध करून देते.   ईदनिमित्त आजच्या महामारीच्या युगात रक्त, प्लाज्मा दान तसेच वंचित घटकांसाठी आपण काय त्याग करु शकतो, हा विचार मनात येणे आणी तो प्रत्यक्षात रुजविने हे जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने ईदुल अज्हा  साजरी करण्याचे सार्थक होईल आणी खऱ्या अर्थाने आपण इब्राहीम अलै. यांचे अनुयायी असल्याचे सिद्ध होईल.

ईद-उल-अज्हा संपूर्ण जगभर साजरी केली जात आहे. इस्लामी कॅलेंडरच्या बाराव्या महिन्यामध्येच ज्याला जिलहज्जा म्हणतात जगाच्या काना-कोपऱ्यामधून लाखो हाजी (भाविक) अल्लाहच्या मार्गामध्ये म्हणजेच हज यात्रे मध्ये सामिल होत असतात व तेथे इब्राहीम अलै. च्या आपल्या सुपूत्राच्या कुर्बानीच्या घटनेची आठवण ठेवून प्रतिकात्मकरित्या बकऱ्याची किंवा उंटाची कुर्बानी देत असतात. जे हजला जावू शकत नाहीत ते आपापल्या ठिकाणी कुर्बानी देवून आपण मानवतेच्या मार्गामध्ये त्याग करण्यासाठी बांधिल असल्याची ग्वाही देतात. परंतु दुर्दैवाने कोरोनामुळे गत आणी ह्या वर्षी सऊदी अरेबिया व्यतिरिक्त इतर देशातील हज यात्रेकरूंना सामिल होण्याची परवानगी नाही.

हज  हा खरे तर  अरबी शब्द-- त्याचा अर्थ होतो - दर्शन करण्याचा  निश्चय करणे. हजसाठी जगभरातील लाखोंच्या संख्येने मुस्लिमबांधव काबाच्या दर्शनाचा निश्चय करुन मक्का या शहराकडे निघतात. हज मुस्लिम बांधवाना संपूर्ण  आयुष्यात  एकदाच पार पाडण्याचे  संकेत देण्यात  आले आहेत जो कोणी मक्का शहरापर्यंत जाण्या-येण्याचा   खर्च करण्याची क्षमता  बाळ्गतो केवळ त्या व्यक्तीवरच हे कर्तव्य अनिवार्य करण्यात  आले  आहेत. हा खर्च स्वकष्टार्जित असेल तर उत्तमच. त्यामुळेच अवैधमार्गार्तून कमाविलेल्या संपत्तीतून हज यात्रा करता येत नाही.  

हजचा इतिहास फार उद्बोधक आहे. आजपासून 4 हजार 500 वर्षापूर्वी हजरत इब्राहिम (अलै.) यांनी अल्लाह ची उपासणा  करण्याखातर एक  छोटेसे  घर बांधले होते. त्याचा उद्देशच जणू असा होता की जगातील कोणत्याही भाविकाने जो शरिराने तंदुरूस्त असेल  आणी आर्थिक क्षमता  बाळगू  शकतो, त्यानेच काबाचे दर्शन घेण्यासाठी निघावे. परंतु निघताना आपली अंत:करणे निर्मळ ठेवावीत तसेच वासनांवर आवर घालावा. रक्तपात, अनाचार , अर्वाच्य बोलणे ह्या पासून जो संयम राखू शकेल त्यानेच अल्लाहचा गुलाम बनून मार्गस्थ व्हावे. हे नियम अर्थात बंधन घालण्याचे कारण म्हणजे तो काळ असा होता कि बहुतेक सर्वांना अल्लाहचे विस्मरण झाले होते. भानामती, जादुटोना व ताईत्त-गंड्याचे स्त्तोम माजले होते. ह्या अनिष्ट प्रथा, चालीरिति त्यांना सहन होनाऱ्या  नव्हत्या. म्हणूनच त्यांनी परिवर्तनचा हा विडा उचलला. 

हजरत इब्राहीम (अलै.) व हजरत ईस्माईल (अलै.) यांच्या कारकिर्दित हजला महत्त्वाचे स्वरुप प्राप्त झाले. परंतु त्यांच्या हयातीनंतर हजमध्ये एवढ्या बिघाडाचे स्वरुप आले की अहंकार, स्वार्थ, स्वैराचार, अश्लिलतेने थैमान घातले होते. जणू हा काळ अंधःकारमय म्हणून गणला जावू लागला होता. ही स्थिती अशीच पुढे हजारो वर्षे चालत राहिली. 

या काळात कोणी पैगम्बर जन्माला आला नाही की, पैगम्बरांची शिकवण देखील लोकापर्यंत पोहोचली  गेली नाही. अखेर हजरत इब्राहीम (अलै.) ह्यांचे भाकित खरे ठरले. त्यांच्या  संततीमधून एक परिपूर्ण व्यक्तीमत्व 6 व्या शतकात  जन्मास  आले. ज्यांचे नाव मुहम्मद बिन अब्दुल्लाह (स.) असे होते. त्यांचा जन्म झाला व अरबस्थानात जणू नवचैतन्य निर्माण झाले. भविष्यातील ज्या कार्याचा आराखडा हजारो वर्षापूर्वी हजरत इब्राहिम (अ.) ह्यानि बांधला होता. ते पूर्णत्वास तर आलेच परंतु केवळ 23 वर्षाच्या कालखंडात सर्व अनिष्ट प्रथांना पायबंद घालून एक वेगळाच आदर्श जगासमोर ठेवला गेला. असे धाडस आणी कार्य करणारी व्यक्ती सामान्य असूच शकत नव्हती.  त्यांचे हे कार्य त्या काळात तर उल्लेखनिय  होतेच परंतू आजही 1442 वर्षानंतर सर्व मानव जातीला प्रेरणा देणारे असेच आहे. अज्ञान आणि अंधकारमय युगातील सर्व अनिष्ट प्रथा नष्ट   केल्या गेल्या.

’’हज्जचे महिने नियत (निश्चित केलेले) आहेत. जी व्यक्ती ह्या निश्चित महिन्यामध्ये हज करण्याचे ठरवील तर त्याने वैषयिक वासनेपासून दूर रहावे. आणि अभद्र बोलू नये आणि भांडणतंटे करू नये. जे काही तुम्ही सत्कर्मे कराल ते अल्लाह जाणतो आहे आणि हज्जच्या काळांत सोबत शिदोरी घ्या. सर्वोत्तम शिदोरी म्हणजे अल्लाहचे भय बाळगणे होय. आणि हे ज्ञानीजनहो माझे भय बाळगा.’’  (सुरे बकरा :197)

’’नंतर जेव्हा हज्जसंबंधीचा विधी तुम्ही पूर्ण कराल तेव्हा त्यानंतर तुम्ही अल्लाहचे स्मरण करा जसे तुम्ही आपल्या पूर्वजांचे स्मरण करीत होतात. किंबहुना त्याहीपेक्षा अधिक स्मरण करा, (परंतु अल्लाहचे स्मरण करणार्यांमध्येही खूप फरक आहे.) त्यांच्यापैकी काही तर असे आहेत जे म्हणतात कि, ’’हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला या लोकीच सर्वकाही दे. अशा व्यक्तीसाठी परलोकमध्ये काहीही वाट्याला येणार नाही.’’  (सुरतुल बकरा :200) 

जगभरातून सामील झालेले हाजी यांचा देश, प्रांत बोलीभाषा ही निरनिराळी असू शकते, परंतू त्यांनी परिधान केलेला पोशाख (एहराम) मात्र सारखाच असतो. गरीब असो अथवा श्रीमंत सर्वजण अल्लाहसमोर समसमान. हाच संदेश ह्या यात्रेतुन पहावयास मिळ्तो. हज यात्रेत श्रद्धावंतांच्या समोर जसजसा काबागृह जवळ येवू लागतो, तसतसा हा हाजी अल्लाहच्या भेटीसाठी बेभान होतो. जीवनात केलेली दुष्कृत्यांबद्दल मनात अपराधी भावना निर्माण होतात. तसेच या यात्रेतून मिळालेल्या सकारात्मक उर्जेतून हाजी भविष्यकाळात एक चांगला, आज्ञाधारक व सुजान नागरीक बनण्याची प्रतिज्ञा मनात करूनच मक्का सोडतो.जणू एक वेगळीच उर्जा त्याच्या अंगात संचारते. हज यात्रेत सामिल झालेल्या सर्वच हाजींची हीच अवस्था असते. हज प्रक्रियेच्या दरम्यान प्रत्येक हाजी हा साक्षात अल्लाहच्या भेटीसाठी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीका लकलब्बैक  (मी हजर आहे, तुझ्या घराच्या दर्शनासाठी) अशा घोषणा करत पुढे सरकत असतो.

मुहम्मद पैगम्बर (स.) हे अंतिम प्रेषित होत त्यांच्यानंतर कोणी प्रेषित जन्माला  येणार नाही हे सत्य आहे. त्यांनी  हजमध्ये सामील झालेल्या यात्रेकरुसाठी दिलेले शेवटचे भाषण आजही  तेवढेच समर्पक व प्रत्येकाने अनुकरण करावे असेच आहे. ह्या शेवटच्या संवादातून त्यानी सर्व मानव एकमेकांचे  बंधूच असून मानवतावाद आणी विश्व- बंधुत्वाचा संदेशच दिला. वास्तविक पाहता जगातील मानवाधिकाराची ही पहिलीच सनद असून, त्यानंतर पुढच्या कालखंडात मानवाधिकाराच्या संवेदना जागतिक स्तरावर लोकांमध्ये जाग्या झाल्या.

- अस्लम जमादार, पुणे

(लेखक परिवर्तन - अल्पसंख्यांक शैक्षणिक चळ्वळीचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.)

पूर्ण जगामध्ये इस्लामि कॅलेंडर नुसार जिल्हज्जा या बाराव्या महिन्याच्या दहा तारखेला बकरीद ईद साजरी करण्यात येते या ईदच्या दिवसाला आणि या महिन्याला इस्लाम मध्ये अन्यन साधारण महत्व आहे याच महिन्यामध्ये इस्लामच्या अनुयायांसाठी जे पात्र आहेत अर्थात जे हज यात्रेसाठी अरबस्थानातील मक्का याठिकाणी जाऊ शकतात खर्च करण्याची आर्थिक ऐपत आणि शारीरिक ऐपत धारण करतात त्यांच्यासाठी हज यात्रा आवश्यक आहे, हज यात्रा ही एक उपासना विधी आहे ती या महिन्यात आठ ते बारा या ठराविक तारखांना ठराविक पद्धतीने करावयाची असते याच हज यात्रेदरम्यान दहा ते बारा या तारखांना जगातील इस्लामचे संपूर्ण अनुयायी ज्यांना शक्य आहे ते अल्लाहच्या नावाने जनावरांची कुर्बानी करतात आणि गोर गरीबांमध्ये वितरित करतात 

जगभरातील मुस्लिम बांधव बकरीद मध्ये जनावरांची कुर्बानी का करतात हे जाणून घेण्यासाठी प्रेषित इब्राहीम अलै सलाम यांच्या जीवनाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आज पासून सुमारे चार हजार वर्षापूर्वी अर्थात ईसा पूर्व 2100 वर्षापूर्वी आदरणीय इब्राहीम यांचा जन्म इराकमधील उर शहरात आजर  नावाच्या प्रमुख महांताच्या घरी झाला जे राजपुरोहित तर होतेच मूर्ती बनवून विकण्याचा त्यांचा व्यापारही होता. त्यांच्याकडे अपार संपत्ती होती परंतु हे सर्व मूर्तिपूजक होते स्वतःला चंद्रवंशी व सूर्यवंशी म्हणून घेत मूर्ति तयार करणे आणि तिच्यासमोर नतमस्तक होणे ही बाब आदरणीय इब्राहीम आलै सलाम यांना पटत नव्हती म्हणून ते आपल्या वडिलांना विविध प्रश्न विचारीत परंतु त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. प्रेषित इब्राहीम आलै सलाम यांनी लोकांना विविध प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सर्वांना काही ना काही गरजा आहेत माझा अल्लाह, ईश्वर गरजवंत नाही तो एकमेव आहे जमीन आणि आकाशामध्ये जेवढ्या वस्तू आहेत त्यांचा निर्माता, सर्वांना निर्माण करणारा ,जन्म देणारा, पालन पोषण करणारा, मृत्यु देणारा माझा तुमचा आणि विश्वाचा अल्लाह, ईश्वर आहे तो एकच आहे म्हणून त्यांनी  इतर देवी-देवतांचा इंकार केला येथूनच त्यांची पहिली परीक्षा सुरू झाली.   तेथील राजाने त्यांना जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावली पुजाऱ्याचा मुलगा म्हणून अनेकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु अल्लाह, ईश्वरा वरील तो एक असल्याचा दृढ विश्वास असल्यामुळे ते डगमगले नाहीत माघार घेतली नाही वडिलांनी घरातून काढून टाकले. राजाच्या आदेशाने अतिशय मोठा अग्निकुंड तयार करण्यात आला अग्निकुंडाची आग भयंकर होती तरीपण पर्वता पेक्षा अधिक दृढ हृदय बाळगणाऱे एका ईश्वरावर विश्वास ठेवणारे प्रेषित इब्राहीम विचलित झाले नाहीत त्यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केले "ज्यांना तुम्ही ईश्वरत्वात भागीदार ठरविता त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही".

राजाच्या आदेशाने शिपायांनी प्रेषित इब्राहीम यांना धगधगत्या अग्निकुंडात फेकून दिले. आदरणीय इब्राहीम अल्लाचे प्रेषित होते अल्लाहने त्यांचे रक्षण केले. अग्नीला आदेश दिला " हे अग्नी, थंड हो शांती, सुरक्षा, सुखदायी हो इब्राहीम साठी " अल्लाह, ईश्वराच्या आदेशाने अग्नी इब्राहीम साठी थंड व शांत बनली अग्नित फेकून देणे इतके महाभयंकर होते की, त्याजागी आदरणीय प्रेषित यांना त्या लोकांमध्ये वास्तव्य करणे अशक्य होते. म्हणून अल्लाने त्यांना स्वदेश त्यागाचा आदेश दिला उर शहराला सोडून निघून जावे.  प्रेषित इब्राहीम यांनी आपली पत्नी व पुतण्या लूत अलैसलाम यांना सोबत घेऊन आपला देश सोडला त्यांनी राजपुरोहिताची गादी, धनसंपत्ती सोडून सीरिया , पॅलेस्टाईन, इजिप्त आणि अरबस्तानातील विविध देशात फिरत राहिले. अल्लाहलाच माहित या प्रवासात त्यांना किती अडचणी आल्या असतील. ते धनसंपत्ती कमविण्याच्या चिंतेत भटकत नव्हते तर लोकांना प्रत्येकाच्या गुलामगिरीतून मुक्त करून फक्त एका अल्लाचे, ईश्वराचे गुलाम बनावे हा संदेश देत होते. आज सुद्धा हीच परिस्थिती आहे आणि आमची ही परीक्षि आहे. या भ्रमंतीमध्ये लोकांना सत्याची जाणीव करून देताना त्यांना कोठेही शांती लाभली नाही. वर्षानुवर्षे विना बिऱ्हाड भटकत राहिले. अशाच प्रकारे तारुण्य निघून जाऊन केस पांढरे झाले आणि जीवणाची दुसरी परीक्षा सुरू झाली. वयाच्या 86 व्या वर्षापर्यंत त्यांना संतती प्राप्त झाली नव्हती. अल्लाहने त्यांना 86 व्या वर्षी संतती दिली. ते करत असलेल्या कार्यास पुढे नेण्यासाठी कोणीतरी वारस हवा म्हणून त्यांनी अल्लाकडे प्रार्थना,  संततीची याचना केली होती.पुत्र प्राप्ती नंतर अल्लाहने त्यांची दुसरी परीक्षा घेतली म्हातारपणी पुत्ररत्न प्राप्तीचा आनंद काही औरच होता. कृतज्ञता व्यक्त केली याच काळात अल्लाहचा आदेश मिळाला की काबागृहासाठी जागा निश्चित केलेली आहे तुम्ही तिकडे जा. आपल्या पत्नीला व लहान मुलाला घेऊन आज काबागृह जिथे उभा आहे तेथे पोहोचले हा परिसर निर्जन निर्जल ओसाड निर्मनुष्य होता.

या ठिकाणी दूरदूरपर्यंत वस्ती आणि पाणीही नव्हते. अल्लाहाने पुन्हा आदेश दिला पत्नी व मुलाला येथे सोडून निघूनजा. आदरणीय इब्रहिम  अल्लाहच्या आज्ञेपुढे नतमस्तक झाले विरान वाळवंटात निर्मनुष्य जागी आपल्या पत्नीला, लहान मुलाला सोडून जाताना त्यांच्या मनस्थितीची कल्पनाही केली जाऊ शकत नाही म्हातारपणी नुकतेच  पुत्रप्राप्ति झाली होती की हा आदेश प्राप्त झाला.

पुढे गेल्यावर काबागृहाकडे तोंड करून प्रार्थना केली "हे माझ्या निर्माणकर्त्या प्रभू, मी अशा निर्जन व ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागास तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे. हे पालनकर्त्या प्रभू असे मी अशासाठी केले आहे की, या लोकांनी येथे नमाज कायम करावी म्हणून तू लोकांच्या हृदयांना यांच्याकडे आकर्षित कर आणि यांना खावयास फळे दे कदाचित ते कृतज्ञ होतील " प्रेषितांची पत्नी आणि लहान मुल आदरणीय  इस्माईल त्या वाळवंटात एकटे पडले थोडं फार अन्नपाणी होती ते संपले अन्नपाणी नाही म्हणून आईला दूध एत नव्हते. मुलाची परिस्थिती वाईट होती भुकेने व्याकुळ होते कोठे पाणी मिळते काय किंवा कुणीप्रवासी दिसतील तर पाणी मागता येईल कारण मुल रडत होते म्हणून आई हजरा त्या ठिकाणी असलेल्या दोन टेकड्या सफा ,मरवा यावर चढून इकडे तिकडे पाहत होती, प्रार्थना करत होती, दोन्ही टेकड्या मध्ये त्यांनी सात फेऱ्या मारल्या टेकडीवर जात पुन्हा मुल एकटे आहे म्हणून धावून परत येत. जीव कासावीस होत होता मूल रडत होते अल्ला पाहत होता दोन्ही टेकड्यांमध्ये किमान 450 मीटर अर्थात चौदाशे 80 फूट एवढं अंतर होतं 7व्या फेरी  मध्ये 3.15 किमी अंतर त्यांनी पार केलं होतं. शेवटी सातव्या फेरीनंतर त्या ठिकाणी देवदूतांनी पाण्याचा झरा निर्माण केला.  जो जमजम च्या नावाने आजही अस्तित्वात असून जगातील सर्वात वैज्ञानिक दृष्टीने शुद्ध असून अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. दरवर्षी कोट्यवधी लिटर पाणी संपूर्ण जगातून येणारे लोक घेऊन जातात. पाण्यासाठी आईची ती पराकाष्ठा जगभरातील अनुयायासाठी हज यात्रेतील आवश्यक परंपरा म्हणून अनिवार्य केली  गेली.त्या सात फेऱ्या तशाच पूर्ण केल्याशिवाय हजपूर्ण होत नाही. दुसऱ्यापरीक्षेमध्ये ही प्रेषित इब्राहीम यशस्वी झाले. पाण्यामुळे त्या ठिकाणी वस्ती झाली होती. अधून मधून प्रेषित मुलास भेटण्यासाठी येत. अशाप्रकारे मुलगा, प्रेषित इस्माईल 14 वर्षाचे झाले. आतापर्यंत अल्लाहने प्रेषित इब्राहीम यांना ज्या ज्या परीक्षेत आजमावले त्या सर्व परीक्षेमध्ये ते खरे उतरले. 

आता तिसरी परीक्षा सुरू झाली होती. मुलास भेटावयास गेले असताना आपल्या मुलास त्यांनी जे सांगितले ते कुराणाच्या शब्दात खालील प्रमाणे आहे "तो मुलगा जेव्हा त्यांच्यासमोर धावपळ करण्याच्या वयात आला तेव्हा एके दिवशी प्रेषित इब्राहीम यांनी त्याला सांगितले हे माझ्या मुला मी स्वप्नात पाहतो की, मी तुझा बळी देत आहे आता सांग तुझा काय विचार आहे, मुलाने सांगितले हे पिताजी जी काही आज्ञा आपणास दिली जात आहे तसे करा अल्लाहाने इच्छिले तर आपणास मी  धैर्यशील आढळेल. पूर्ण विश्व पिता पुत्राचा संवाद स्तब्ध होऊन ऐकत होता. कुराणाची स्पष्टोक्ती आहे "सरते शेवटी जेव्हा या दोघांनी अल्लाच्या आज्ञापालनात मान तूकविली आणि प्रेषित इब्राहीम यांनी पुत्राला ओणवे केले." पुत्राला ओणवे करणे यासाठी 

की बळी देताना पुत्राच्या चेहऱ्याकडे पाहून प्रेषित यांचे याचे प्रेम उफाळून येऊ नये आणि त्यांचे हात डगमगायला नको. पुत्राच्या गळ्यावर सुरी फिरवणार तोच अल्लाहने आवाज दिला, आकाशवाणी झाली कुराणात आहे "आणि आम्ही पुकारले हे इब्राहीम तू स्वप्न साकार केलेस,आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो निश्चितच ही एक उघड परीक्षा होती." परीक्षा तर होतीच परंतु अल्लाहने आदरणीय इस्माईल यांना वाचविले. ह्या परीक्षेत आदरणीय प्रेषित इब्राहीम खरे उतरल्यानंतर त्यांना अल्लाहने जे बक्षीस दिले त्याचा उल्लेख कुराणाच्या शब्दात "आम्ही एक मोठे बलिदान देऊन त्या मुलाची सुटका केली आणि त्याची प्रशंसा व गुणगाण भावी पिढ्यांत सदैव ठेवले.  सलाम आहे इब्राहीम अलैसलाम वर आम्ही सत्कर्म करणाऱ्यांना असाच मोबदला देत असतो. अल्लाहने एक सुदृढ मेंढा बळी देण्याचा आदेश दिला हे याच्या साठी होते की आदरणीय इब्राहीम आपल्या मुलाचा बळी देत होते परंतु अल्लाहने योग्य वेळी त्यांना रोखले ह्याचे बक्षीस अल्लाहने अशाप्रकारे दिले की या बलिदानास आदरणीय प्रेषित इब्राहीम यांची परंपरा आणि कार्य घोषित केले. बलिदानाची ही परंपरा श्रद्धावंतासाठी अंतिम दिनापर्यंत जिवंत ठेवली.प्रत्येक वर्षी याच दिवशी म्हणजे या महिन्याच्या दहा तारखेला जनावरांची कुर्बानी दिली जाते. ही कुर्बानी करताना आदरणीय इब्राहीम यांचे ते बलिदान आठवते जे त्यांनी उर शहरापासून येथपर्यंत केले होते कुर्बानीचा उद्देश ईश्वराचे आज्ञापालन आहे म्हणून जगभरातील मुस्लिम बांधव बकरीदच्या दिवशी विश्वाच्या अल्लाहच्या नावाने जनावरांची कुर्बानी देतात. गोर गरीबांमध्ये वाटतात. ही एक उपासना आहे जी अल्लाच्या आदेशानुसार इब्राहीम आले सलामच्या परंपरेनुसार प्रतीकात्मक देण्यात येते. तसे पाहिले तर हजरत इब्राहीम यांचे पूर्ण जीवन कुर्बानीची, बलिदानाची गाथा आहे. जगातील प्रत्येक वस्तू पेक्षा आपल्या म्हातारपणात प्राप्त झालेल्या मुलांच्या जीवनापेक्षा निर्माणकर्त्या अल्लाचा आदेश महत्त्वाचा आहे. आणि हेच अल्लाच्या दासाचे कर्तव्य आहे. माणसाची परीक्षा आहे आमचं सुध्दा कर्तव्य आहे पालन कर्त्याचा निर्माण कर्त्या, मालकाचा आदेश सर्वपरी म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपले जीवन जगावे त्यातच आमचं आमच्या विश्वासचे कल्याण आहे.

- अ. मजीद खान

नांदेड, 

Mo. 9403004232माझ्या बंधुनो! प्रत्येक मुस्लिम स्वत: असे समजतो आणि तुम्हीसुद्धा असेच समजत असाल की मुस्लिमाचा दर्जा अनेकेश्वरवादीपेक्षा अधिक उच्च आहे. अल्लाहला मुस्लिम (आज्ञाकारी) प्रिय आहेत व अनेकेश्वरवादी (अवज्ञाकारी-काफिर) अप्रिय आहेत. मुस्लिमाला अल्लाहकडून क्षमा मिळेल व अनेकेश्वरवाद्यांना क्षमा मिळणार नाही. आज्ञाधारक स्वर्गामध्ये जाईल व अनेकेश्वरवादी नरकामध्ये जाईल. मला वाटते की आज तुम्ही यावर विचार करा की शेवटी मुस्लिम व अनेकेश्वादीमध्ये इतका मोठा फरक का आहे? अनेकेश्वरवादीसुद्धा प्रेषित आदम (अ.) यांची संतती आहे आणि तुम्हीसुद्धा. अनेकेश्वरवादीसुद्धा असाच मनुष्य आहे जसे तुम्ही आहात. त्याचेसुद्धा तुमच्याप्रमाणेच हात, पाय, डोळे, कान आहेत. तोसुद्धा याच हवेत श्वास घेतो. हेच पाणी पितो. याच पृथ्वीवर राहतो. हेच उत्पन्न खातो. अशाप्रकारे जन्म घेतो व अशाच प्रकारे मरतो. याच अल्लाहने त्यालासुद्धा निर्माण केले आहे ज्याने तुम्हाला निर्माण केले आहे. मग शेवटी त्याचा दर्जा का खालचा आहे आणि तुमचा उच्च? तुम्हाला जन्नत का मिळेल आणि त्याला जहन्नममध्ये का घातले जाईल?

केवळ नावाचा फरक आहे का?

हे विचार करण्यासारखे आहे. मनुष्यामनुष्यात इतका मोठा फरक केवळ इतक्या क्षुल्लक गोष्टीमुळे तर असू शकत नाही की तुम्हाला अब्दुल्लाह व अब्दुर्रहमान आणि अशाच अन्य नावाने बोलविले जाते आणि त्यांना दीनदयाळ व कर्तारसिंह आणि रॉबर्टसनसारख्या नावाने ओळखले जाते. अथवा तुम्ही खतना करवून घेता व तो करवून घेत नाही किंवा तुम्ही मांस भक्षण करता आणि तो ते खात नाही. अल्लाह ज्याने सर्व मानवांना निर्माण केले आहे आणि जो सर्वांचा पालनकर्ता आहे असा जुलूम तर कदापि करू शकत नाही की अशा लहान सहान गोष्टीवरून त्याने आपल्या निर्मितीत फरक करावा आणि एका दासाला जन्नत पाठवावे व दुसऱ्याला जहन्नममध्ये पोहचवावे.माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांनी सांगितले,

पैगंबर मुहम्मद (स.) लोकांपैकी सर्वांत जास्त दानशूर होते आणि रमजान महिन्यात इतर महिन्यांपेक्षा अधिक दानशूर होत असत. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

रमजान महिना हा तर सदाचाराचा महिना आहे. म्हणून या महिन्यात दानशीलतेत वाढ होणे स्वाभाविक आहे.

सहीह बुखारीतील एका हदीसनुसार ज्ञात होते की जिब्रिल (अ.) रमजानच्या प्रत्येक रात्री पैगंबर मुहम्मद (स.) यांना भेटत असत आणि त्यांच्यासोबत कुरआन पठण करीत असत. जेव्हा पैगंबर जिब्रिल  (अ.) यांना भेटत असत तेव्हा दुसऱ्यांना लाभकारी सिद्ध होण्यास वाहत्या वाऱ्यापेक्षासुद्धा जास्त दानशूर होत असत.

माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांच्याकडून उल्लेखित आहे,

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जर माझ्याजवळ उहुद पर्वताएवढे सोन्याचे भांडार जरी असेल तरी माझ्या प्रसन्नतेची गोष्ट त्या भांडारातून तीन रात्रीत काहीच शिल्लक राहणार नाही की मी एखादे कर्ज फेडण्यासाठी त्यातून काही घ्यावे.’’(हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

या हदीसनुसार कळते की दानशीलता पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या चारित्र्याचे अत्यंत ठळक वैशिष्ट्य होते. धन प्राप्त करण्यात नव्हे तर धन वितरित करण्यात पैगंबर प्रसन्न होत असत. धन कितीही जास्त असो, त्याचे समाप्त होण्यावर पैगंबर दु:खी होण्याऐवजी आनंदित होत होते.पवित्र कुरआनात म्हटले आहे की, “लोकहो, आपल्या विधात्याची भीती बाळगा, ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केले. त्यापासून त्यांची जोडपी निर्माण केली आणि त्या उभयतांपासून असंख्य पुरुष व स्त्रिया विखुरल्या. अल्लाहचे भय बाळगा, ज्याच्या नावानं तुम्ही एकमेकांशी आपल्या हक्कांची मागणी करता. तसेच आपल्या नातेसंबंधांची जाण ठेवा. अल्लाह तुमच्यावर लक्ष ठेवून आहे.” (४:१) इस्लामपूर्व काळात लोक पत्नींना काहीच महत्त्व देत नव्हते. त्यांना क्षुल्लक कारणांनी मारझोड केली जायची. तलाक द्यायचे आणि पुन्हा परत घ्यायचे. त्यांना आईवडील असो की पती, मुले-मुली- कुणाच्याही वारसामध्ये हक्क दिला जात नव्हता. एका पत्नीशी विवाहसंबंध संपवायचा असेल तर तिला आई म्हणून जाहीर करायचे. म्हणजे स्त्रीला कोणताही मानवाधिकार नव्हता. इस्लामने जाहीर केले की पतीवर पत्नीचा तेवढाच अधिकार असेल जेवढा एका पतीचा त्याच्या पत्नीवर. पुढे जाऊन पवित्र कुरआनने स्त्रीला प्रत्येक नात्यात पती असो की त्याचे आईवडील, बहीण-भाऊ, तिची संतती, सर्वांच्या मालमत्तेत वारसाहक्क दिला. पती आणि पत्नींना आपल्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी एकमेकांचा आधार बनविला. ते एकमेकांचे सहचर आहेत. एकमेकांसाठी वस्त्र आहेत ज्यापासून त्यांच्या उणिवांचे रक्षण होते. वस्त्राद्वारे जसे सौंदर्य लाभते तसेच पतीपत्नी एकमेकांचे सौंदर्य आहेत. ते एकमेकांची पूर्तता करतात. पवित्र कुरआनने म्हटले आहे की, “त्या तुमची वस्त्रे आहेत आणि तुम्ही त्यांची वस्त्रे आहात.” वैवाहिक जीवनात पतीला कुटुंबाच्या प्रमुखपदी ठेवतो. कारण आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात तो व्यस्त असतो. पत्नी आपल्या पतीच्या मागे स्वतःचे रक्षण करते. त्याच्या परवानगीशिवाय इतर कोणा पुरुषाला घरी येऊ देत नाही. वैवाहिक जीवनासंबंधी कुरआनात म्हटले आहे की, “अल्लाहच्या संकेतांमधील हे एक संकेत आहे की त्याने तुमच्याच अस्तित्वातून तुमच्यासाठी पत्नींना जन्म दिला जेणेकरून तुम्ही त्यांच्यापासून सुखसमाधान प्राप्त करावे. तुमच्यामध्ये एकमेकांसाठी प्रेम आणि कृपा निर्माण केली.” (३०:२१)

संकलन

- सय्यद इफ्तिखार अहमदस्त्री म्हटले की अन्याय सहन करणारी अशी परिभाषा सर्वमान्य झालेली आहे. अगदी त्रेतायुगापासून स्त्री वर अन्याय होत आहे आणि आजही तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने चालूच आहे. स्त्री युगानयुगे अन्याय सहन करत आलेली आहे. जगाच्या पाठीवरील सर्वच राष्ट्रात तिच्यावर अन्याय होत आहेत. इतिहासात डोकावून पाहिले तर इराक, भारत, चीन, अरब प्रत्येक ठिकाणी तिच्यावर अन्याय व तिची अवहेलना व्हायची. यत्र नारिस्ते पूजेतम रमते तत्र देवता, असे म्हणणाऱ्या आणि मानणाऱ्या भारत देशांमध्ये स्त्रीला जिवंत जाळण्याची प्रथा होती. ग्रीकमध्ये तर स्त्रीला आत्मा आहे की नाही यावर वाद विवाद होते. स्त्री अगदी अन्यायाने ग्रासून गेली होती. स्त्रीला अधिकार किंवा हक्क हे शब्द सुद्धा माहित नव्हते. मात्र इस्लाम धर्माने स्त्रियांना अन्याय, अत्याचारापासून वाचविले व तिला न्याय दिला. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार व गुलामी विरुद्ध आवाज उठविला. 

रात स्त्रीच्या तीन स्पष्ट भूमिका असतात. आई, पत्नी व कन्या. इस्लामने या तिनी भूमिकांना अत्युच्च स्थान प्रदान केले आहे.

1.आईच्या रूपात स्त्रीचा दर्जा

      इस्लाममध्ये अल्लाह आणि पैगंबर यांच्या नंतर आईला सर्वोच्च दर्जा प्राप्त आहे. मुलांना आई-वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि आज्ञा पालनाचा आदेश देतो. कुराणमध्ये याचा उल्लेख आहे. आई आपल्या बालकास नऊ महिने पोटात वाढविते व दोन वर्षे आपले दूध पाजवीते. त्यामुळे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यामुळे असे म्हटले जाते की, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. मुहम्मद पैगंबरांनी तर आईच्या बाबतीत सद्व्यवहाराची ताकीदच केली आहे. माननीय अबू हुरैरा रजि. यांनी सांगितले की, एक इसम पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्याकडे आला व त्याने  पैगंबर (सल्ल.) यांना विचारले, माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, तुझी आई! पुन्हा त्याने तोच प्रश्न दोन वेळेस विचारला. प्रेषितांनी दोन्ही वेळेस आईच सद्व्यवहारास अधिक पात्र असल्याचे सांगितले. व नंतर वडील असे म्हटले. अल्लाहने आईला खूप मोठे श्रेष्ठत्व बहाल केले आहे.

2. पत्नीच्या रूपात स्त्रीचा दर्जा 

इस्लाममध्ये स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. इस्लामची अशी मान्यता आहे की, विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्व पतीच्या व्यक्तिमत्त्वात विलीन होत नाही अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही. पैगंबरांना त्यांच्या एका साथीदाराने पत्नीच्या अधिकारा बाबतीत विचारले असता पैगंबर (सल्ल.)  म्हणाले, जेव्हा तुम्ही भोजन कराल तेव्हा तिलाही भोजन द्या जेव्हा तुम्ही वस्त्रे परिधान कराला तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. रागाच्या भरात तिला मारहाण करू नका तिला बरे वाईट बोलू नका तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त रहा. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर तिची दुसरी चांगली सवय कोणती आहे त्यावर लक्ष द्या. प्रेषित (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नीशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे. 

3. कन्येच्या रूपात स्त्रीचा दर्जा -

अज्ञानकाळात म्हणजेच इस्लामपूर्व काळात मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते. परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेशदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलताना देखील त्यांची मान शरमेने खाली जात होती इतकेच नव्हे तर कठोर हृदयी बाप आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी मुलींच्या पालनपोषणाची प्रेरणा दिली तसेच पैगंबर यांचे म्हणणे असे होते की, तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिणी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर त्याला स्वर्गात निश्चितच स्थान प्राप्त होईल. तसेच एका प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद  (सल्ल.) यांनी सांगितले जी व्यक्ती दोन मुलींची त्यांच्या तारुण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील,  अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने एकत्र येऊ असे म्हणून पैगंबरांनी दोन बोटे जुळवून दाखवली. तसेच मुलींशी घृणा करू नका त्या सहानुभूतीची प्रतिमा व अति मौल्यवान आहेत. (हदीस मसनद अहमद). पैगंबर (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार ’’आपल्या त्या मुलीवर उपकार करा जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुमच्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुमच्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.’’

पैगंबर (सल्ल.) यांचे हे विचार ऐकूणच मन भरून येते. वरील नैतिक स्वरूपाचे अधिकार व उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे ज्ञान इस्लामने मानवाला प्रदान केले आहेत. इस्लामी शिकवणीचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे अधिकार खालील प्रमाणे सांगितले आहेत.

1. एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे. कुरआननेे हे अधिकार दिले आहेत. जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जवाब द्यावा लागेल.

2. इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालनपोषण त्यांचे शिक्षण प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभ सूचना दिली आहे. 

3. इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलींच्या परवानगीनेच होईल असे स्पष्ट सांगितले आहे. जोपर्यंत विधवा वा घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत तिचा विवाह केला जाणार नाही आणि कुमारीकेची अनुमती घेतल्या शिवाय तिचा विवाह होणार नाही.

4. इस्लाममध्ये ’महेर’ दिला जातो. म्हणजेच लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची रक्कम. हा महिलेचा अधिकार आहे. महिलेला महेर दिलाच जातो तो देणे अनिवार्य राहील. महेर विना विवाह वैध नसेल. विवाह प्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दागदागिने व संपत्ती देणे अनिवार्य आहे. तिची स्वतःची संपत्ती आहे. यास महेर म्हटले जाते. परंतु ते निश्चित करणे अनिवार्य असते. 

5. इस्लाममध्ये स्त्रीच्या पालनपोषणाची जबाबदारी विवाहापूर्वी पित्यावर विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी पतीवर येते.  तसेच महत्त्वाची बाब म्हणजे जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटुंबात राहू इच्छित असेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते हा तिचा वैधानिक अधिकार आहे. इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग धंद्याचेे स्वातंत्र प्रदान केले आहे. स्त्रियांना वारसा हक्कांबाबत पुरुषांप्रमाणेच हक्क दिलेले आहेत. इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मौल्यवान संपत्ती असते. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. उत्तम चारित्र्यवान श्रद्धावंत भोळ्याभाबड्या स्त्रीयांच्या चारित्र्यावर आरोप करण्यास मनाई करण्यात आली आहे. याविरूद्ध इस्लामी कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की जो कोणी एखाद्या स्त्रीवर व्याभिचार व चारित्र्य हिनतेचा मिथ्या आरोप करील त्याला 80 फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरले जाऊ नये. इस्लाम स्त्रीस समीक्षण व आपले मत व्यक्त करण्याचा देखील अधिकार प्रदान करतो. अशा प्रकारे वरील सर्व बाबीचे सूक्ष्म निरीक्षण केले तर इस्लाम धर्माने स्त्रियांवर होणारे अनेक अन्याय व अत्याचार दूर करून त्यांना प्रतिष्ठेचे व श्रेष्ठत्वाचे स्थान दिले आहे. 

- पूजा वडगावकरबंधुनो! हे ज्ञान ज्याच्या गरजेविषयी मी तुम्हाला सांगत आहे त्यावर तुमचे आणि तुमच्या संततीचे मुस्लिम असणे, मुस्लिम म्हणून राहणे अवलंबून आहे. ही काही हलकी गोष्ट नाही की त्यापासून निष्काळजी बनून राहावे. तुम्ही तुमच्या शेतीवाडीच्या कामात गाफील राहात नाही. तुमच्या शेतीला पाणी देणे आणि पिकाचे रक्षण करण्यातसुद्धा गाफील राहात नाही. जनावरांना चारा देण्यात गाफील राहात नाही. तुमच्या धंद्याच्या कामात गाफील राहात नाही; ते केवळ या कारणासाठी की त्यात गाफील राहाल तर उपाशी मराल आणि प्राणासारखी प्रिय गोष्ट व्यर्थ होईल. मग मला सांगा की ते ज्ञान प्राप्त करण्यात का गाफील राहाता ज्यावर तुमचे मुस्लिम बनणे आणि मुस्लिम राहणे अवलंबून आहे? काय यात हा धोका नाही की ईमानसारखी प्रिय गोष्टनष्ट होईल? काय ईमान जिवापेक्षा अधिक प्रिय नाही? तुम्ही प्राणाचे रक्षण करण्यासाठी जितका वेळ व जितके श्रम खर्च करता तितका वेळ व त्या श्रमाचा दहावा भागसुद्धा ईमानचे रक्षण करण्यासाठी खर्च करू शकत नाही का?

मी तुम्हाला असे सांगत नाही की तुमच्यापैकी प्रत्येकाने मौलवी (धर्मपंडित) बनावे, मोठमोठ्या ग्रंथांचे अध्ययन करावे आणि आपल्या आयुष्याची दहा-बारा वर्षे शिकण्यात खर्च करावीत. मुस्लिम बनण्यासाठी इतक्या शिक्षणाची गरज नाही. माझी केवळ इतकी अपेक्षा आहे की तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्तीने रात्र व दिवसाच्या चोवीस तासांपैकी केवळ एक तास धार्मिक शिक्षण घेण्यासाठी खर्च करावा. कमीतकमी इतके ज्ञान प्रत्येक मुस्लिम मुलाला, म्हाताऱ्याला व तरुणाला प्राप्त झाले पाहिजे की पवित्र कुरआन ज्या उद्देशासाठी व जी शिकवण घेऊन अवतरित झाले आहे त्याच्या सारांशाचेज्ञान त्याला व्हावे. प्रेषित मुहम्मद (स.) जे नष्ट करण्यासाठी व त्या जागी ज्याची स्थापना करण्यासाठी या जगात आले होते त्याविषयीची चांगली ओळख प्रत्येकाने करून घ्यावी. तसेच त्या विशिष्ट जीवनपद्धतीशी परिचित व्हावे जी अल्लाहने मुस्लिमासाठी ठरवून दिली आहे. इतक्या ज्ञानासाठी काही जास्त वेळेची गरज नाही आणि ईमान (धर्मावरील विश्वास) प्रिय असेल तर त्यासाठी दररोज एक तासाची वेळ काढणे काही कठीण नाही.माननीय अबू   सईद खुदरी (रजि.) सांगतात,

पैगंबर मुहम्मद (स.) हे पडद्यात (बुरखा) राहणाऱ्या कुमारिकेपेक्षाही जास्त लज्जाशील होते. जेव्हा एखादी अप्रिय गोष्ट त्यांना दिसल्यास तो अप्रियभाव त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत असे. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे एखादी अप्रिय व स्वभावाशी प्रतिवूâल गोष्ट पाहिल्यास लज्जाशीलतेमुळे तोंजाने जरी पैगंबर मुहम्मद (स.) काही सांगत नसत, परंतु त्या अप्रियतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत असत.

पडद्यात (बुरखा) असणाऱ्या कुमारिका अति लज्जाशील व लाजाळू असतात. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यात लज्जाशीलता त्यांच्यापेक्षासुद्धा अधिक होती.

५७) माननीय अब्दुल्लाह बिन अम्र बिन आस (रजि.) सांगतात,

‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या स्वभावात अश्लीलता नव्हती आणि कोणतेच अश्लील कृत्य ते करत नसत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)अल्लाहने धनवान मुस्लिम पुरुष व स्त्रियांवर दरवर्षी जकात देणे अनिवार्य कर्तव्य ठरवले आहे. ज्याच्याकडे साडेसात तोळे सोने किंवा साडेबावन तोळे चांदी किंवा तेवढ्याच किंतीची रोख रक्कम वर्षाखेरीस शिल्लक राहिल्यास त्या रकमेतून अडीच टक्के जकात अदा करायची आहे. साडेतास तोळे सोने किंवा साडेबावन तोळे चांदी किंवा तेवढ्याच किमतीची रक्कम म्हणजे या प्रमाणापेक्षा  जितकी संपत्ती शिल्लक राहील त्या सर्व संपत्तीवर जकात द्यावी लागेल. संपत्तीमध्ये नुसती रोख रक्कम नसून व्यापारी माल, पशुधन असल्यास ते आणि शेतजमीन असेल तर त्यातील पिकांवर सुद्धा जकात द्यावी लागेल. व्यापारी मालामध्ये दुकानात, कारखान्यात वर्षाखेरीस जेवढ्या किंमतीचा माल शिल्लक राहील त्यावरसुद्धा जकात द्यावी लागते. या अर्थासंबंधी अल्लाहने जी योजना केली आहे त्याचे उद्दिष्ट असे की “जो माल अल्लाहने आपल्या प्रेषितांना (आणि त्यांच्यानंतर) मुस्लिमांना दिलेला आहे तो नातेवाईकांसाठी, अनाथांसाठी, वंचितांसाठी आणि प्रवाशांसाठी दिला जावा. कारण धनसंपत्ती फक्त धनवान लोकांमध्येच फिरत राहू नये.” (पवित्र कुरआन) जकात व्यवस्थापन आणि तिच्या वाटपासंबंधी असे म्हटले आहे की “जकात, गोरगरीबांसाठी, निराधारांसाठी आणि त्या्चया व्यवस्थापनावर जे कर्मचारी नियुक्त केले जातात त्यांच्यासाठी आणि ज्यांची दिलजमाई करावयाची आहे अशांसाठी तसेच जे गुलामगिरीत खितपत पडलेले आहेत त्यांना गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी आहे.” (पवित्र कुरआन-९:६०) जकात तर अनिवार्य कर्तव्य आहे ती द्यावीच लागेल, जशी नमाज अदा करावी लागते, उपवास करावा लागतो तसेच त्याव्यतिरिक्त इतर दानधर्मही करावे लागतात. आणि किती दानधर्म करावा त्यास मर्यादा नाही. “ते विचारतात, काय खर्च करावा? याचे उत्तर अल्लाह देतो की आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करून जे काही शिल्लक राहील ते सर्व दानधर्मात खर्च करून टाकावे.” (पवित्र कुरआन) जकात आणि दानधर्म मानवाधिकार आहेत आणि उपासना, नमाज रोजा हे अल्लाहचे अधिकार आहेत. दोन्हींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. दानधर्म इस्लामी व्यवस्थेचा मूळ गाभा आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमदमाणसांच्या चुकांचे दोन प्रकार आहेत. एक असे कृत्य आणि चुका ज्या अल्लाहच्या अधिकारांविरूद्ध असतात. दुसऱ्या प्रकारच्या चुका म्हणजे ज्या अल्लाहच्या निर्मिती- माणूस असो की पशू-पक्षी, त्यांच्या हक्कांविरूद्ध केल्या जातात. इतर माणसे आणि सजीव निर्मितीच्या हक्कांविरूद्ध जे कृत्य माणसे करतात त्या गुन्ह्यांना अल्लाह क्षमा करत नाही. अशा अपराधांना माफ करण्याचा अधिकार ज्यांच्यावर अन्याय-अत्याचार केला गेला असेल त्यांना आहे. माणसाविरूद्ध आणि इतर सजीवांविरूद्ध अत्याचार करणे म्हणजे अल्लाहच्याही अधिकारांचे हनन करणे होय. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की एका माणसाला फक्त या कारणावरून नरकात टाकले जाईल की त्याने एका मांजराला बांधून ठेवले होते. आणि त्याच्या खाण्यापिण्याची सोयदेखील केली नव्हती. एकेठिकाणी प्रेषितांनी असेही सांगितले आहे की जे पशुपक्ष्यांच्या खाण्यापिण्याची सोय करत नाहीत, प्राण्यांकडून त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करवून घेतात त्यांना भयंकर शिक्षा मिळेल. झाडांना विनाकारण तोडण्यासही प्रेषितांनी मनाई केली आहे. जर माणसाने कुणास त्रास दिला असेल तर त्याची माफी मागण्याने प्रकरण संपून जाते, मात्र जर कुण्या माणसाने इतरांच्या मालमत्तेवर कब्जा केला असेल, त्यांचे अधिकार त्यांना परत देत नसेल तर फक्त क्षमा मागणे पुरेसे नसून त्यांना त्यांची मालमत्ता परत करावी लागेल. एकमेकांवर रागावण्याचीही मनाई आहे. कुरआनात म्हटले आहे की “जे लोक टंचाईत असोत की त्यांना भरभराट लाभलेली असो, दोन्ही अपस्थांमध्ये अल्लाहच्या निर्मितीवर खर्च करतात, आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात, लोकांना क्षमा करतात, असे लोक अल्लाहला आवडतात.” (कुरआन-३:१३४) श्रद्धावंतांना संबोधून अल्लाह म्हणतो की, “अल्लाहच्या बाजूने न्यायाची साक्ष देण्यास उभे राहा. एखाद्या जनसमूहाशी शत्रुत्व तुम्हाला त्याच्यावर अन्याय करण्यास प्रवृत्त करता कामा नये. न्याय करा, हा सदाचार आहे. अल्लाहची भीती बाळगा. तुम्ही जे काही करता अल्लाहला ते माहीत असते.” (कुरआन-५:८)

- सय्यद इफ्तिखार अहमदआपण म्हणतो की इस्लाम स्वीकारल्यास मनुष्य मुस्लिम बनतो. प्रश्न असा आहे की इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ काय आहे?काय इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ असा आहे की माणसाने केवळ जिभेने सांगावे की मी मुस्लिम आहे अथवा मुस्लिम झालो आहे, तर काय तो मुस्लिम होतो? अथवा इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे एखादा ब्राह्मण पुजारी काहीही अर्थ न समजता उमजता संस्कृतच्या काही मंत्रांचे पठण करतो, तसेच एका मनुष्याने अरबी भाषेतील काही वाक्ये अर्थबोध न होता जिभेने उच्चारले आणि बस्स, तो मुस्लिम झाला? तुम्ही स्वत: सांगा की या प्रश्नाचे तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही स्वत: म्हणाल की इस्लामचा स्वीकार करण्याचा अर्थ प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जी शिकवण दिली आहे तिचा माणसाने समजून उमजून मनापासून स्वीकार करावा आणि त्यानुसार कृती करावी. जो असे करील तो मुस्लिम आहे आणि जो असे करणार नाही तो मुस्लिम नाही.

प्रथम आवश्यकता - ज्ञान

जे उत्तर तुम्ही द्याल त्यावरून आपोआपच हे स्पष्ट होते की इस्लाम प्रथमत: ज्ञानाचे नाव आहे आणि ज्ञानानंतर कर्म अथवा कृतीचे नाव आहे. एखादा मनुष्य ज्ञानाशिवायसुद्धा ब्राह्मण असू शकतो, कारण त्याचा जन्म ब्राह्मण म्हणून झाला आहे आणि तो ब्राह्मणच राहील. एखादा मनुष्य ज्ञान नसतानाही जाट असू शकतो, कारण तो जाट म्हणून जन्मला आहे आणि तो जाटच राहील. परंतु एखादा मनुष्य ज्ञानाशिवाय मुस्लिम असू शकत नाही कारण मुस्लिम जन्मत: मुस्लिम असत नाही तर तो ज्ञानाने मुस्लिम बनतो. जोपर्यंत त्याला प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कोणती शिकवण दिली आहे हेज्ञान मिळत नाही, तोपर्यंत तो त्यावर ईमान धारण कसे करू शकेल? आणि त्यानुसार कसे कर्म करू शकेल? आणि जर त्याने समजून उमजून ईमान धारण केले नसेल तर तो कसा मुस्लिम होऊ शकेल? म्हणून अज्ञानासह मुस्लिम असणे आणि मुस्लिम म्हणून राहणे अशक्य आहे. प्रत्येक मनुष्य ज्याने मुस्लिमाच्या घरी जन्म घेतला आहे, ज्याचे नाव मुस्लिमासारखे आहे, जो मुस्लिमासारखे वस्त्र परिधान करतो आणि जो स्वत:ला मुस्लिम म्हणवितो, वास्तविकत: तो मुस्लिम नाही. खऱ्या अर्थाने मुस्लिम तर केवळ तो मनुष्य आहे जो इस्लामचे ज्ञान बाळगतो आणि समजून उमजून त्याला मानतो. एक अनेकेश्वरवादी व एक मुस्लिमात मौलिक अंतर नावाचे नाही. तो रामप्रसाद आहे आणि हा अब्दुल्लाह आहे, म्हणून तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम. अशाप्रकारे एक अनेकेश्वरवादी व एका मुस्लिमात मौलिक फरक पोषाखाचासुद्धा नाही की तो धोतर नेसतो आणि हा विजार घालतो म्हणून तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम! तर मूळ फरक या दोहोंमध्ये ज्ञानाचा आहे. तो अनेकेश्वरवादी अशासाठी आहे की त्याला माहीत नाही की अल्लाहचा त्याच्याशी व त्याचा अल्लाहशी काय संबंध आहे? त्याला माहीत नाही की सृजनकर्त्याच्या इच्छेनुसार या जगात जीवन व्यतीत करण्याचा सरळमार्ग कोणता आहे? अशीच स्थिती एखाद्या मुस्लिमाच्या मुलाचीसुद्धा असेल, तर तुम्हीच सांगा की त्याच्यात आणि एक अनेकेश्वरवाद्यामध्ये कोणत्या आधारे फरक कराल आणि म्हणाल की तो अनेकेश्वरवादी आहे आणि हा मुस्लिम आहे?

बंधुनो! हे मी सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि शांत मनाने यावर विचार करा. हे चांगल्याप्रकारे समजून घेतले पाहिजे की अल्लाहची ही सर्वांत मोठी देणगी आहे ज्यावर तुम्ही आभार व कृतज्ञता व्यक्त करता ती प्राप्त होणे अथवा प्राप्त न होणे, हे ज्ञानावर अवलंबून आहे. ज्ञान नसेल तर ही देणगी त्याला प्राप्तच होऊ शकत नाही. समजा थोडी बहुत प्राप्तसुद्धा झाली तर अज्ञानामुळे सदैव ही भीती असते की ही वैभवशाली देणगी त्याच्या हातातून निसटून जाईल. केवळ अज्ञानामुळे तो स्वत:ला मुस्लिम समजत राहील, वास्तविकत: तो मुस्लिम नसेल. ज्या माणसाला ही जाणीवच नसेल की इस्लाम व अनेकेश्वरवादात काय फरक आहे आणि इस्लाम व बहुदेववादात काय अंतर आहे, त्याची स्थिती तर अगदी अशी आहे जणू एखादा मनुष्य अंधारात एखाद्या पायवाटेवरून चालत आहे. सरळ रेषेवर चालता चालता स्वत: त्याचे पाय एखाद्या अन्य मार्गाकडे वळणे शक्य आहे आणि त्याला सरळ मार्गावरून भटकल्याची कल्पनासुद्धा येत नाही. असेसुद्धा शक्य आहे की मार्गात एखादा धोकेबाज उभा असेल आणि त्याने म्हणावे की तुम्ही अंधारात मार्गावरून भटकला आहात, या मी तुम्हाला तुमच्या गंतव्यापर्यंत पोहचवितो. बिचारा अंधारातून प्रवास करणारा स्वत:च्या डोळ्याने पाहू शकत नाही की सरळमार्ग कोणता आहे. म्हणून तो अज्ञानाने आपला हात त्या धोकेबाजाच्या हातात देईल आणि तो त्याला मार्गभ्रष्ट करून कोठल्या कोठे घेऊन जाईल. त्या माणसाला या अडचणी तर अशासाठी येतात की त्याच्या स्वत:जवळ कोणताही प्रकाश नाही आणि तो स्वत: आपल्या मार्गावरील खुणा पाहू शकत नाही. त्याच्याजवळ प्रकाश असता तर हे स्पष्ट आहे की तो मार्गही चुकला नसता आणि त्याला दुसरा कोणी मार्गभ्रष्टही करू शकला नसता. बस्स! याच्यावरूनच कल्पना करा की मुस्लिमासाठी सर्वांत मोठा जर कोणता धोका असेल तर हाच आहे की तो स्वत: इस्लामच्या शिकवणींपासून अनभिज्ञ आहे, स्वत:ला हे माहीत नाही की पवित्र कुरआन काय शिकवितो आणि प्रेषित मुहम्मद (स.) कोणता आदेश देऊन गेले आहेत? या अज्ञानामुळेच तो स्वत:ही मार्गभ्रष्ट होऊ शकतो आणि दुसरे धोकेबाजसुद्धा त्याला मार्गभ्रष्टकरू शकतील. परंतु त्याच्यापाशी ज्ञानाचा प्रकाश असेल तर तो जीवनाच्या प्रत्येक पावलावर इस्लामचा सरळमार्ग पाहू शकेल, प्रत्येक पावलावर अनेकेश्वरवाद, बहुदेववाद, मार्गभ्रष्टता, दुष्कृत्य आणि दुराचाराचे जे वक्र-मार्ग मध्ये येतील ते ओळखून त्यांच्यापासून अलिप्त राहू शकेल, जो कोणी मार्गभ्रष्ट करणारा रस्त्यात त्याला आढळेल त्याचे ऐवूâनच तो या निष्कर्षाप्रत पोहचेल की हा मनुष्य मार्गभ्रष्ट करणारा आहे, याचे अनुयायित्व स्वीकारणे चुकीचे आहे.माननीय अली (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.

अबू जहलने पैगंबर मुहम्मद (स.) यांना सांगितले, ‘‘हे मुहम्मद (स.)!आम्ही कुरैश लोक तुम्हाला खोटे ठरवित नाही. आम्ही तर त्यास खोटे ठरवित आहोत ज्यास तुम्ही घेऊन आला आहात.’’


स्पष्टीकरण

अर्थात आम्हांवर तुमचे सत्य प्रकाशमान व दिवसाच्या उजेडाइतके स्पष्ट आहे. आम्ही कधीही तुम्हाला खोटे बोलताना ऐकले नाही. लोकांत सत्यवादिता व अमानतीच्या दृष्टीने तुम्ही ओळखले जाता. आम्ही खरेतर तुमचा ग्रंथ व शरीयतला अमान्य करतो. आम्ही त्या दिव्य अवतरणाला स्वीकारत नाही ज्यास तुम्ही प्रस्तुत करीत आहात.

कदाचित! सत्यविरोधकाला हे समजले व उमजले असते की जो मनुष्य या जगाच्या मामल्यात लोकांशी खोटे बोलू शकत नाही तो धर्माच्या मामल्यात खोटे कसे बोलेल? ज्या मनुष्याची स्पष्ट विशेषता ही सत्यवादिता आहे तो ईश्वराशी एखादी खोटी गोष्ट कशी संबोधित करील?

खरेतर मक्का येथील कुरैशचे मोठमोठे सरदार ईर्षा, द्वेष, अहंकार व पूर्वग्रहदूषित होते, ज्यामुळे सत्य स्वीकारणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.त्याचे नाव घेतले की अंगावर शहारे येतात. बहुतांश लोक त्याचे नाव घेणेही पसंत करत नाहीत. किंबहुना अधिकतर लोक भयभीत होतात यातही महिलांची आघाडी आहे. 

मृत्यूला जरी माणूस पसंत करत नसेल तरी माणसाला मृत्यू येणारच. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. यापासून माणसाला सुटका नाही. हे माहित असतानाही आपण गाफील असतो. मृत्यूनंतर काय? हा प्रश्न सहसा आपल्याला पडत नाही का? आपल्यापैकी बहुतेक लोक आपल्या, जीवनाची अगदी मायक्रोप्लानिंग करतात. पण जगणं संपल्यानंतर काय? याला काहीच महत्त्व देत नाही, याची प्लानिंग करायची असते हे ही पुष्कळ लोकांना माहित नसते. कोणी मरण पावलं की आपल्याला थोडसं दुःख होतं, जवळची व्यक्ती असली की जास्त दुःख होते. हे दुःख सहसा तीन दिवस ताजे राहते. पुन्हा आपण हळूहळू त्या व्यक्तीला विसरून जातो. एक वर्ष गेले की असं वाटतं ती व्यक्ती कित्येक वर्षांपासून आपल्यापासून लांब गेली आहे. 

कोरोनाच्या आधी आपल्याला कोठे जायचे झाल्यास आपण किती योजना करत होतो आठवते ना? कोणी जायचे? कधी जायचे? कसं जायचे, किती दिवस राहायचे? सोबत काय घेवून जायचे? शिदोरीला काय करायचे? परत येताना काय आणायचे? अश्या अनेक प्रश्न आपल्याला पडत होते. मृत्यूही दुसऱ्या जीवनाचा एक प्रवास आहे. अशीच योजना आपल्याला मृत्यूची करायची आहे, कारण कधी जावं लागेल? कसं जावं लागेल? आपली किती मानसीक व अध्यात्मीक तयारी करायची आहे हे आपल्याला काहीच माहित नाही.

मृत्यू म्हणजे कम्पलसरी ए्नप्लोजन. बळजबरीने आपल्याला या जीवनापासून त्या जीवनात घेवून जाणे, खुशीने अथवा नाखुशीने जायचे मात्र आहेच. मृत्यू हा जीवनाचा अंत  नसून एक नव्या जीवनाची सुरूवात होय. मृत्यू असा प्रतिस्पर्धी आहे ज्याच्याशी संघर्ष करताना शेवटी पराजयच आपल्या नशीबी येतो. मृत्यूशी काही वेळा आपल्याला जिंकल्यासारखे वाटत जरी असले तरी एक न एक दिवस आपण हारणारच.

मृत्यू असे द्वार आहे ज्याच्यातून प्रत्येकाला जायचेच आहे. मलीकलमौत कधीच आपली परवानगी घेवून येत नाहीत की कोणाच्या अडचणीची काळजी करत नाहीत. न सांगता कधीही मृत्यू येवू शकतो म्हणून अत्यंत हुशार आहे ती व्यक्ती जी आपल्या प्रत्येक दिवसाला शेवटचा दिवस समजून चांगले आचरण करते. 

खरोखर जीवंत कोण? 

जी व्यक्ती दुसऱ्यांच्या मृत्यूमध्ये आपला मृत्यू बघते म्हणजेच जी व्यक्ती दुसऱ्यांच्या मृत्यूपासून शिकते तीच खरोखर जीवंत होय. मरणारे मेले पण आपल काय? 

आपल्यालाही एक दिवस मरण येईल आणि जग सोडून जावे लागणार म्हणून हे निश्चित केले पाहिजे की आपल्या मृत्यूनंतर लोक आपली आठवण काय म्हणून करतील त्या प्रमाणे आपण आपले जीवन व्यतीत करावे. उदाहरण जर आपल्याला वाटत असेल की मेल्यानंतर मला सत्यवादी म्हणून ओळखले जावे तर ’’खोटं ’’ हे शब्द आपल्या जीवनाच्या शब्दकोषातून काढून टाकले पाहिजे. जर तुम्ही लोकहितचिंतक म्हणून ओळख बनवू इच्छितात तर लोककल्याणाच्या कामाला जीवनाचा उद्देश बनवायला हवे. पण हे सगळे करताना लोकांसाठी नाही तर अल्लाहला खुश करण्याची नियत ठेवली पाहिजे. अन्यथा लोकतर खुश होतील पण अल्लाहच्या दरबारी ते स्वीकार होणार नाही. 

मनुष्य आपली सगळी शक्ती खर्च करून जास्तीत जास्त पैसे कमाविण्यासाठी प्रयत्न करत असतो. का तर सुख उपभोगण्यासाठी? पण खरोखर तो खुश असतो का? त्याला सुख मिळते का? क्षणिक सुख मिळाले तरी डिप्रेशनमध्ये जाणे, मानसीक ताण जे सावरता न आल्याने आत्महत्या करून घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. 

माणूस आपल्या लेकरांच्या तेजस्वी भविष्यासाठी स्वतः झीजत असतो. तेवढ्यातच मृत्यू येतो आणि त्याला अशा भविष्याकडे नेतो ज्याची त्याने काहीच तयारी केलेली नसते. माणूस जास्तीत जास्त जीवन जगण्याची इच्छा बाळगतो परंतु, मृत्यू त्याचे स्वागत करण्यासाठी नेहमी सज्ज असतो. 

कोणाची पदवी, कोणची लोकप्रियता, कोणाचे ऐश्वर्य, कोणाची सत्ता, काही म्हणजेच काहीच त्याला मृत्यू पासून वाचवू शकत नाही. जीवंत लोकांसाठी मृत्यू हे एक रिमायंडर आहे. 

आपण वाढदिवस साजरा का करतो? 

आपल्याला वाटते आपण मोठे झालो पण खऱ्या अर्थाने काय होते? एक एक वर्षे आपण जुनं होतो, मृत्यूच्या एक वर्ष जवळ जात असतो. आपण साजरा करत असलेल्या वाढदिवस पार्टीमध्ये मृत्यूही येवून जणू आपल्याला सांगत असतो की, तू तुझ्या नातेवाईक, मित्र मैत्रीण पासून एक वर्ष लांब गेला आणि माझ्या एक वर्ष जवळ आला आहेस. पण ही बाब आपल्या लक्षात येत नाही तर आपण मोठे झाल्याच्या भ्रमात मृत्यूचे सिलेब्रेशन करत असतो.

खरंतर आपण विचार केला पाहिजे की माझे वय एवढे झाले आणि मी काय चांगले काम केले आहे? दुसऱ्यांसाठी ? स्वतःसाठी तर जनावरे जगतात, माणसाला ईश्रवाने जनहितासाठी निर्माण केले आहे. बसून विचार करा कधी कुण्या गरीब परिवाराची मदत आपण केली आहे का? आपल्या नातेवाईकांपैकी कोणी गरजवंत तर नाही? कोणी दुःखी तर नाही? त्यांची विचारपूस करण्याचा विचार आपण केला आहे का? रंजले, गांजलेल्यांसाठी आपले नियोजन काय आहे? कधी समाजात रूजलेल्या रूढी, परंपरा पासून माणसाला मुक्त करण्याचा विचार आपण केला का? जेवढा खर्च आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी करतो तेवढा कुण्या गरजवंताला देऊन पहा मनास समाधान वाटेल नक्कीच.

आपण लहान असताना शाळेत मातीचा प्रकार शिकलेले असतो आठवते ना? पण मोठे झाल्यावर ते सगळे विसरून माणसाला दोन प्रकार दिसतात. 1. उभी माती 2. आडवी माती. आणि माणसाचा पैसा, वेळ हे सर्व आडव्या मातीला उभारण्यात खर्च होत असते म्हणजेच माणूस घर बांधणीवर त्याच्या डेकोरेशनवर खूप लक्ष देत आहे पण कधी विचार केला का एवढा खर्च करून बांधलेले आलीशान घर, बंगले, महाल सोडून माणूस का बरं जातो (माफ करा त्याला बाहेर काढले जाते)

श्वास संपला की सारे संपले असे आपल्याला वाटत असले तरी हे जग फक्त एक ट्रेलर आहे. अस्सल चित्रपट तर मेल्यानंतरच सुरू होणार. हे जीवन एक परीक्षागृह आहे. आपल्याला एक ठरावीक वेळ दिलेला आहे. (माहित नाही किती) ती संपताच आपल्याला जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, म्हणून ईश्वराने दिलेल्या प्रश्नपत्रिका आपल्याला अगदी अचूक सोडविणे गरजेचे आहे जेणेकरून जेव्हा निकाल समोर येईल तेव्हा आपण यशस्वी व्हावे.

मृत्यू अगोदर माणसाला खूप कामे दिसतात, करायची असतात, पण मृत्यूला याच्याशी काही देणे घेणे नाही, ईश्वराचा आदेश आला आणि यमदूत हजर! आपण म्हणतो एखादी व्यक्ती अपघाताने मेली हे आपल्यासाठी व त्याच्यासाठी अपघात होवू शकते पण हे पूर्णनियोजित असते. आपण जेव्हा आईच्या पोटात असतो. तीन महिन्यानंतर सगळे लिहिले जाते आपण कोठे जन्मनार, काय होणार, कोठे मरणार एवढे की (उर्वरित आतील पान 7 वर)

जेथे मरणार त्या ठिकाणची मातीही आपल्या शरीरात टाकली जाते (आहे ना अद््भूत). मेडिकल सायन्स अजून हे सिद्ध करू शकले नाही हे वेगळेपण एक दिवस जरूर सिद्ध करेन. जसं डीएनएला शोधलं ज्याच्यात आपल्या पूर्ण अस्तित्वाची माहिती असते. माणूस म्हणून ही माणसाची आत्मा नेहमीच राहणार आहे. तिला मरण नाही म्हणून आपल्याला गैरसमज होतो किंवा आपल्याला मृत्यूची आठवण सहसा येत नाही कारण आपल्या डीएनएमध्ये ती कोडिंग नाही. आपण मेल्यानंतर ही मरत नाही फक्त या जगातून त्या जगात प्रवेश करतो. प्रत्येक माणूस चालत आहे, त्याचे चालणे हे मृत्यूवर संपते. मग येथून तो उडायला लागतो, स्वर्ग किंवा नर्काकडे. आपल्याला माहित आहे की मेल्यानंतर पटकन आपल्याला स्वर्गात किंवा नर्कात टाकले जात नाही तर बरजख (एक आड पडदा) आहे. या दुनियेत आणि त्या दुनियेमध्ये. चांगल्या आत्म्यांना इल्लियीन मध्ये आकाशांच्या वर तर वाईट आत्म्यांना सिज्जिन जमीनीखाली ठेवण्यात येते. प्रलयाचा दिवस येईपर्यंत. न्यायनिवाडा होईपर्यंत. 

मृत्यूनंतर काय होते?

1. माणसाचे नाव सर्वप्रथम हरवते, लोक त्याला डेडबॉडी शव (मय्यत) म्हणून ओळखायला लागतात. ज्या नावाला गाजवण्यासाठी त्याने पूर्ण जीवन समर्पित केलेले असते. नमाजे जनाजा अदा करण्यासाठी ’जनाजा आणा’ म्हणतात. माणसाचे नाव घेऊन नाहीत म्हणत. साहेबांना कबरमध्ये घालताना ’मय्यत’ म्हटले जाते. 

2. त्याचा माल वारसदार वाटून घेतात.

3. लेकरं जगविण्यासाठी तो रात्रंदिवस एक करतो. त्याला फक्त कब्रस्तान किंवा स्मशानघाटापर्यंतच साथ देतात. परंतु त्याने केलेली पुण्याई मेल्यानंतरही साथ देते आणि त्याचा मोबदला त्याला मिळणार म्हणून चांगले कर्म करावे हेच आपला खरे इन्व्हेस्टमेंट (निवेश) आहे.

ज्यांना आपण जीवापाड प्रेम करतो ते आपल्याला सोडून का जातात? कोठे जातात? हे असे नियम का आहे? आपण याला मोडू शकतो का? आपली भेट आपल्याला सोडून गेलेल्या आई, वडील, भाऊ, बहीण, पती, पत्नी वगैरे यांचयशी पुन्हा होऊ शकते. एक मोठी स्पेस निर्माण होते आयुष्यात प्रियजन गेल्यावर भेटावेसे वाटते पण कधी? 

वरील प्रश्नांचे उत्तर :

हे अल्लाहने केलेले नियम आहेत. प्रत्येक सजीवाला मृत्यू येणार म्हणजे येणारच. म्हणूणच आपले प्रियजन आपल्याला सोडून जातात. आपल्याला जन्म आणि मृत्यू देणारा अल्लाहच आहे. त्याच्या आदेशाविना कोणी बाळ जन्मू शकत नाही की कोणी मरू शकत नाही. बळजबरीने जसे टाईम ओव्हर झाल्याने उत्तरपत्रिका आपल्यापासून हिसकावून घेतली जाते तशीच मृत्यू येवून आपली आत्मा हिसकावणार. 

हा अल्लाहचा नियम आपण मोडूच शकत नाही. आपली भेट आपल्या पालकांशी व नातेवाईकांशी नक्की होणार आहे म्हणून उदास होऊ नका. मृत्यू ही झोपेची थोरली बहीण आहे. जसं दररोज आपण झोपेतून उठतो तसेच मेल्यानंतर ही कित्येक वर्षे ओलांडले असतील. अल्लाह प्रलयाच्या दिवशी सगळ्यांना परत उठविणार म्हणून मृत्यू हे जीवनाचा अंत आहे असं समजण्याची घोडचूक करू नका. जसं 6,7,8 तास झोपून उठल्यानंतर ही आपल्याला वाटते की काही मिनीटच आपण झोपले तसंच माणसाला प्रलयाच्या दिवशी वाटेल या जगात अर्धा किंवा एकच दिवस राहिले. 

आपल वय काय आहे? अगदी बरोबर सांगा आणि विचार करा की यांच्या आदी आपण कोठे होतो? या जगात आपण आपल्या इच्छेने आलो का? का आपण आपल्या इच्छेने आपले राष्ट्र, जिल्हा, शहर, गांव, घर, आई-वडिल, भाऊ-बहीण, पती-पत्नी, मातृभाषा, रंग, उंची वगैरे निवडले आहे का? मग हे सगळे आपल्यासाठी निवडणारा कोण? निश्चितच एक मात्र अल्लाह. आपले इतके चांगले सुंदर अस्तित्व ही अल्लाहची देणगी आहे. आभार मानावे आणि तोच आपल्याला मृत्यूही देणार. मृत्यूला चव ही असते? माहित आहे का? ’’प्रत्येक जीवाला मृत्यूचा आस्वाद घ्यावा लागणार आहे. मग तुम्ही सर्व आमच्याकडेच परतवून आणले जाणार आहात.’’ (सुरे अल अनकबूत)

म्हणून चिंता करण्यासाठी हा मुद्दा मुळीच होऊ शकत नाही की या जगात आपला जीव कसा वाचवावा. परंतु, चिंतेची बाब तर ही आहे की या जगात ईमान कसे शाबूत ठेवावे आणि ईशभक्तीची निकड कशी पूर्ण करावी. अल्लाहकडे हीच प्रार्थना आहे की आपल्या सर्वांचा अंत चांगला होवो आणि मृत्यूचा आस्वाद आपल्याला चांगला लागो. (आमीन.)


- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935अल्लाहचे सर्वांत मोठे उपकार

बंधुनो! प्रत्येक मुस्लिम अंत:करणपूर्वक असे समजतो की जगात सर्वांत मोठी अल्लाहची देणगी म्हणजे इस्लाम होय. प्रत्येक मुस्लिम याबद्दल अल्लाहचे उपकार मानतो की त्याने प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उम्मत (अनुयायी समाज) मध्ये त्याला सामील केले आणि इस्लामची देणगी त्याला प्रदान केली. खुद्द सर्वश्रेष्ठ अल्लाहसुद्धा याला आपल्या दासांना त्याने प्रदान केलेली सर्वांत मोठी देणगी ठरवितो. त्या संबंधाने पवित्र कुरआनमध्ये सांगितले गेले आहे,

‘‘आज रोजी मी तुमचा धर्म तुमच्याकरिता परिपूर्ण केला आहे आणि आपली कृपा तुम्हावर परिपूर्ण केली आहे. आणि तुमच्यासाठी इस्लाम तुमचा धर्म म्हणून संमत केला आहे.’’ (कुरआन-५:३)

कृतज्ञ वृत्तीची मागणी

हा उपकार अल्लाहने आपणावर केला आहे त्याचा हक्क अदा करणे आपले कर्तव्य आहे. कारण जो मनुष्य एखाद्याच्या उपकाराची परतफेड करीत नाही किंवा हक्क अदा करीत नाही तो कृतघ्न असतो. सर्वांत वाईट कृतघ्नता माणसाने ईश्वराच्या उपकाराच्या हक्काचे विस्मरण करावे, ही आहे.

आता तुम्ही विचाराल की ईश्वराच्या उपकाराचा हक्क कशाप्रकारे अदा केला जातो? मी उत्तरादाखल असे म्हणेन की अल्लाहने आपणास प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या उम्मत (अनुयायी समाज) मध्ये जन्म दिला आहे, तर या उपकाराची योग्य कृतज्ञता प्रेषित मुहम्मद (स.) यांचे पूर्णार्थाने अनुयायी बनणे ही आहे.

अल्लाहने तुम्हाला मुस्लिमांच्या मिल्लत (समाज) मध्ये सामील केले आहे, तर त्याच्या या मेहेरबानीचा हक्क अदा होऊ शकतो, पूर्णार्थाने मुस्लिम बनूनच! याशिवाय अल्लाहच्या या महान उपकाराचा हक्क कोणत्याही प्रकारे अदा होऊ शकत नाही. समजा जर तुम्ही हा हक्क अदा केला नाही तर जितका मोठा अल्लाहचा उपकार तितकाच मोठा त्याच्या कृतघ्नतेचा प्रकोपसुद्धा असेल. अल्लाहने आम्हा सर्वांना त्या प्रकोपापासून वाचवावे. आमीन. (तथास्तु.)

मुस्लिम बनण्यासाठी पहिले पाऊल

यानंतर तुम्ही दुसरा प्रश्न कराल की मनुष्य सर्वार्थाने कशाप्रकारे मुस्लिम बनू शकतो? याच्या उत्तरासाठी खूप तपशीलाची आवश्यकता आहे आणि पुढील शुक्रवारच्या प्रवचनात याच्या एक एक भागाचे आपल्यापुढे पूर्ण स्पष्टीकरण केले जाईल. परंतु आजच्या प्रवचनात मी आपल्यासमोर त्या गोष्टीचे वर्णन करतो जी मुस्लिम बनण्यासाठी सर्वांत महत्त्वाची आहे. त्यास या मार्गातील प्रथम पाऊल समजले पाहिजे.

काय मुस्लिम एखाद्या वंशाचे नाव आहे?

बुद्धीला थोडे ताण देऊन विचार करा की तुम्ही ‘मुस्लिम’ शब्दाचा प्रयोग करता त्याचा अर्थ काय आहे? काय मनुष्य आईच्या पोटातूनच इस्लाम आपल्याबरोबर घेऊन येतो? काय एखादा मनुष्य केवळ यामुळेच मुस्लिम ठरतो की तो मुस्लिमाचा मुलगा व मुस्लिमाचा पौत्र आहे? काय मुस्लिमसुद्धा अशाप्रकारे मुस्लिम म्हणून जन्म घेतो ज्याप्रकारे एखाद्या ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण म्हणून जन्म घेतो, एखाद्या राजपुताचा मुलगा राजपूत आणि एका शूद्राचा मुलगा शूद्र? काय मुस्लिम एखाद्या वंश अथवा जाती अथवा भावकीचे नाव आहे, जसे एखादा इंग्रज, इंग्रजाच्या घरी जन्मल्यामुळे इंग्रज होतो आणि एखादा जाट हा जाट जातीत जन्मल्यामुळे जाट होतो, अशाच प्रकारे एखादा मुस्लिम केवळ या कारणाने मुस्लिम होतो की तो मुस्लिम नावाच्या जातीत जन्माला आला? हे प्रश्न मी तुम्हाला विचारीत आहे, त्यांची उत्तरे तुम्ही काय द्याल?

तुम्ही असेच म्हणाल ना की नाही साहेब! याला मुस्लिम म्हणत नसतात. मुस्लिम जातीमुळे मुस्लिम होत नसतो, तर इस्लामचा स्वीकार केल्याने तो मुस्लिम बनतो आणि त्याने इस्लामचा त्याग केला तर तो मुस्लिम राहत नाही. एखाद्या माणसाने मग तो ब्राह्मण असो अथवा राजपूत, इंग्रज असो किंवा जाट, पंजाबी असो की निग्रो, जेव्हा त्याने इस्लामचा स्वीकार केला तेव्हा त्याचा मुस्लिमांत समावेश होतो आणि दुसरा एक मनुष्य मुस्लिमाच्या घरात जन्मला आहे आणि त्याने इस्लामचा अवलंब करण्याचे सोडून दिले तर तो मुस्लिमाच्या जमातीतून बाहेर टाकला जाईल, मग तो सय्यदचा मुलगा असो की पठाणचा.

सज्जनहो, तुम्ही माझ्या प्रश्नांची हीच उत्तरे द्याल ना? बरे तर आता खुद्द तुमच्याच उत्तरावरून कळते की अल्लाहची सर्वांत मोठी देणगी म्हणजे मुस्लिम असण्याची देणगी तुम्हाला मिळाली आहे ती काही अशी वांशिक गोष्ट नाही जी आईवडिलांकडून वारसा म्हणून आपोआप तुम्हाला मिळते आणि आपोआपच तुम्हाला आयुष्यभर चिकटून राहणार आहे. मग तुम्ही त्याची पर्वा करा अथवा करू नका. ती तर अशी देणगी आहे ज्यास प्राप्त करण्यासाठी स्वत: प्रयत्न करणे आवश्यक आहेत. तुम्ही प्रयत्न करून ती प्राप्त केली तरच मिळेल आणि जर त्याची पर्वा केली नाही तर ती तुमच्याकडून fहरावूनसुद्धा घेतली जाऊ शकते.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget