September 2021


इस्लामने आवश्‍यकतेपेक्षा अधिक धन जमा करण्यास निषिद्ध ठरविलेआहे. इस्लामची अपेक्षा आहे की जो काही माल आपल्याजवळ आहे एक तर त्याला आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यावर खर्च करा अथवा दुसऱ्यांदा द्या. ते आपल्या गरजेच्या वस्तू विकत घेतील आणि अशा प्रकारे पूर्ण संपत्ती समाजात फिरत राहील एका ठिकाणी जामा राहणार नाही.परंतु तुम्ही जर असे करत नाही आणि जमा करण्याची जिद्द करता तर आपल्या त्या जमा केलेल्या संपत्तीतून कायद्याप्रमाणे अडीच टक्के रक्कम प्रति वर्ष काढून घेतली जाईल आणि तिला त्या लोकांच्या सहय्यतेत खर्च केले जाईल जे आर्थिक संघर्षात भाग घेण्याच्या योग्य नाहीत किंवा संघर्ष अथवा प्रयासाव्यतिरिक्त जे आपला पूर्ण वाटा मिळण्यापासून वंचित आहेत याचे नाव जकात आहे. याच्या प्रबंधाची पद्धत इस्लामने प्रस्तुत केली आहे. जकात समाजाच्या संयुक्त कोषात जमा केली जाते. कोषागार त्या सर्व लोकांच्या गरजांचा जबाबदार बनून जातो ज्यांना मदतीची गरज आहे ही समाजासाठी विम्याची अतिशय चांगली पद्धत आहे. यामुळे त्या सर्व बिघाडांचे उच्चाटन होऊन जाते जी सामूहिक मदत आणि सहयोगाला समुचित प्रबंधन असल्याने निर्माण होत असतात. भांडवलदारी व्यवस्थेत जी वस्तू लोकांना संपत्ती जमा करण्यावर आणि तिला लाभदायक कामांमध्ये लावण्यावर विवश करीत असते आणि जिच्या कारणास्तव जीवन विमा आदींची गरज असते ती ही आहे की प्रत्येक व्यक्ती जीवन व्यवस्थेत आपल्या साधनावरच निर्भर असते. ती वृद्ध झाली आणि काहीही शिल्लक ठेवले नसेल तर उपाशी मरेल. मुलाबाळांसाठी काही सोडल्याविनाच जर कोणी व्यक्ती मेली तर ते दारोदार भटकतील आणि भिकेचा तुकडा ही मिळवू शकणार नाहीत. आजारी पडल्यावर शिल्लक नसेल तर उपाय सुद्धा करू शकणार नाही.

घर जळाले अथवा व्यवसायात तोटा झाला किंवा कोणती आणखी आपत्ती आली तर कुठूनही त्याला साह्यता मिळण्याची आशा नाही. याचप्रकारे भांडवलदारी व्यवस्थेमध्ये जी वस्तू श्रमिक वर्गाच्या लोकांना भांडवलशाहीचा गुलाम बनण्यावर आणि त्याच्या अटीवर काम करण्यासाठी विवश करून टाकत असते. जो काही कष्टाचा मोबदला भांडवलदार देतो त्याला गरीब माणूस जर घेणार नाही तर उपाशी राहिल. भांडवलशाहीच्या इनामा पासून तोंड फिरवून त्याला दोन वेळची भाकरी मिळणे कठीण आहे. मग हा मोठा तिरस्कार जो आज भांडवलदारी व्यवस्थेच्या जग विळख्यात आहे की, एकीकडे लाखो करोडो माणसे वंचितावस्थेत आहेत आणि दुसरीकडे जमिनीची उपज आणि कारखान्यात बनलेल्या सामानाचे ढीग लागलेले आहेत. परंतु त्याला विकत घेतले जाऊ शकत नाही. लाखो टन गहू समुद्रात फेकला जातो आणि भुकेल्या मानवांच्या पोटापर्यंत पोहोचत नाही. याचे कारण हेच आहे की वंचित लोकापर्यंत जीवन सामग्री पोहोचविण्याचा कोणताही प्रबंध नाही. या सर्वामध्ये क्रयशक्ती निर्माण केली जावी आणि ती आपली गरज आणि इच्छेनुसार वस्तू विकत घेणे योग्य होऊन जावेत. सारांश हा की व्यापार उद्योग आणि कृषी अशा प्रत्येक उद्योगाची प्रगती व्हावी इस्लाम जकात आणि बैतुलमाल अर्थात सरकारी खजिना याद्वारे सर्व बिघडाना दूर करतो. बैतूलमाल प्रत्येक वेळी आपल्या मागे सहाय्यकाच्या भूमिकेने हजर आहे. आपणास काळजी करण्याची गरज नाही. आपणास गरज असेल तेव्हा बायतुल माल मधून आपला हक्क घेऊन यावा. मग बँक डिपॉझिट आणि जीवन विमा पॉलिसीची काय गरज. आपण आपल्या मुलाबाळांना सोडून समाधानाने जगाचा निरोप घेऊ शकता. आपल्या मागे सरकारी खजिना त्यांचा जवाबदार आहे. आजारपण वृद्धत्व आणि प्राकृतिक संकटे मग ती आसमानी असो वा जमिनी प्रत्येक परिस्थितीत बैतुलमाल आपला स्थाई सहाय्यक आहे. भांडवल शाही आपणास आपल्या अटीवर काम करण्यासाठी विवश करू शकत नाही. बैतूलमाल अस्तित्वात असताना आपणास भूक, निवारा आणि निर्धनतेचे कोणतेही भय नाही. बैतूलमाल धन कमविण्यात पूर्णतः असमर्थ अथवा कमी निर्मिती करणाऱ्या लोकांना गरजेचे सामान विकत घेण्यास सक्षम बनवून टाकतो. या प्रकारे मालाचे उत्पादन आणि त्याची खपत यामध्ये निरंतर संतुलन बनून राहते. आता याची आवश्यकता उरत नाही की आपण आपल्या दिवाळखोरीपणाला जगभरातील लोकांच्या डोक्यावर थोपवावे आणि शेवटी दुसऱ्या ग्रहापर्यंत पोहोचण्याची गरज पडावी. जकात व्यतिरिक्त दुसरा उपाय जो एका ठिकाणी साठलेल्या संपत्तीला फैलावण्यासाठी इस्लामने अवलंबिला आहे तो वारसा हक्काचा कायदा आहे. इस्लाम शिवाय अन्य कायद्यांचा झुकाव याकडे आहे की जी संपत्ती एका व्यक्तीने साठविली आहे ती त्याच्या मृत्यूनंतरही साठवलेली राहावी. इस्लाम या विपरीत हि पद्धत अवलंबवीत की ज्या संपत्तीला एक व्यक्ती साठवूण -साठवून एका ठिकाणी कैद करत राहिला होता, तो मरताच ती वाटून दिली जावी. इस्लामी कायद्यात मुले -मुली ,आई वडील, भाऊ बहिण आणि पत्नी सर्व एका व्यक्तीचे वारस आहेत. आणि एका नियमानुसार सर्वांमध्ये पैतृक संपत्तीचे वाटणे जरुरीचे आहे. जवळचे नातेवाईक अस्तित्वात नसतील तर लांबचे नातेवाईक शोधले जातील आणि त्यांच्यामध्ये ही संपत्ती वाटण्यात येईल. कोणी नातेवाईकच नसतील तेव्हा सुद्धा व्यक्तीला कोणास आपल्या जीभेने म्हटलेला मुलगा मानण्याचा हक्क नाही. या स्थितीत पूर्ण समाज त्याचा वारस आहे. त्याची साठवलेली सर्व संपत्ती बैतुलमाल मध्ये जमा केली जाईल या प्रकारे मग कोणी व्यक्ती करोडो अथवा अब्जावधीची संपत्ती जमा करो, त्याच्या मृत्यूनंतर दोन-तीन पिढ्यांमध्ये ती सर्व लहान लहान तुकड्या मध्ये वाटून दिली जाईल आणि संपत्तीचा प्रत्येक साठा क्रमशः वितरित होत राहील.

मी येथे इस्लामच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थांचा उल्लेख केलेला नाही. पृथ्वीचा प्रबंध औद्योगिक विवाद त्यांचे जे नीपटारे तथा उद्योग धंद्यासाठी धन गोळा करण्याच्या ज्या पद्धती इस्लामच्या सिद्धांतानुसार अवलंबिल्या जिऊ शकतात आणि ज्यांच्यासाठी इस्लामी कायद्यात पूर्ण संभावना सुद्धा ठेवली गेलेली आहे. त्यांना या संक्षिप्त लेखात प्रस्तुत करणे कठीण आहे. मग इस्लामने ज्याप्रकारे आयात-निर्यातीचा कर आणि देशाचे व्यापारी माल आणण्यावर आणि घेऊन जाण्याच्या प्रतिबंधाना हटवून गरजेच्या सामानांचा स्वतंत्र विनिमयाचा मार्ग अवलंबिला आहे. त्याचा मी उल्लेख करू शकलो नाही. या सर्वापेक्षा हे सांगण्याची संधी सुद्धा मिळाली नाही की प्रशासनिक व्यवस्था सिविल सेवा आणि सेनेच्या खर्चांना संभावित सीमेपर्यंत घटवून आणि न्यायालयाच्या स्टॅम्प ड्युटी ला पूर्णपणे हटवून इस्लामने समाजावरुन त्या आर्थिक ओझ्याला इतके हलके केले आहे की, करांना आर्थिक प्रशासनाच्या सीमेहुन वाढलेल्या खर्चामध्ये खपून टाकण्याऐवजी समाजाच्या सुख सुविधा आणि फायद्यासाठी खर्च करण्याची संधी प्रदान केलेली आहे. यामुळे इस्लामची अर्थव्यवस्था मानवासाठी किती मोठी कृपा बनून जाते. पक्षपात सोडून दिला जावा आणि वाडवडिलांपासून अज्ञांतापूर्ण संकीर्णता वारसाहक्कात मिळालेली आहे तसेच गैर सलामी शासनयंत्रणेने आपले प्रभुत्व जमविल्याने जो प्रभाव बुद्धीवर पडला आहे, त्याला दूर करून स्वतंत्र अन्वेक्षणात्मक दृष्टीने या व्यवस्थेचे अध्ययन केले जावे. आशा, आहे की एकही न्यायप्रिय व्यक्ती असा भेटणार नाही की जे मानवाच्या आर्थिक हितासाठी या व्यवस्थेला सर्वात अधिक उपयोगी, योग्य आणि बुद्धीसंगत स्वीकार करणार नाही. परंतु जर कोणाला हा गैरसमज असेल की इस्लामच्या संपूर्ण धोरणात्मक नैतिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेतून फक्त तिच्या आर्थिक प्रणालीस घेऊन सफलतेने चालविले जाऊ शकते तर मी त्याला निवेदन करीन की कृपया या गैरसमजाला मनातून काढून टाकावे. या आर्थिक व्यवस्थेचा घनिष्ठ संबंघ इस्लामच्या राजनैतिक, न्यायिक, कायदेविषयक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेशी आहे. मग या सर्व गोष्टीचा पाया इस्लामच्या नैतिक व्यवस्थेवर कायम आहे आणि ती नैतिक व्यवस्था ही स्वतःवर कायम नाही तर ती पूर्णपणे या गोष्टीवर टिकून आहे की आपण एका सर्वशक्तिशाली आणि सर्वज्ञ अल्लाहवर श्रद्धा ठेवावी आणि स्वतःला त्याच्यासमोर उत्तरदायी समजावे. मृत्यूनंतर पार लोकिक जीवनाला मानावे आणि हे सुद्धा स्वीकार करावे की परलोकात अल्लाच्या न्यायालयासमोर जीवनाच्या सर्व कामांना परखले जाईल आणि तपासणी नुसार बक्षीस अथवा शिक्षा मिळेल. हेही मानावे लागेल की पैगंबर मुहम्मद सल्लम यांनी जे नियम आणि कायदे आपल्यापर्यंत पोहोचले आहेत, त्याचा एक भाग आर्थिक व्यवस्था सुद्धा आहे, ती पूर्णतः अल्लाहच्या आदेशावर आधारित आहे, यावर दृढ विश्वास ठेवा जर या धारणा, नैतिक व्यवस्था आणि संपूर्ण जीवन प्रणालीस आपण जसेच्या तसे स्वीकारले नाही तर केवळ इस्लामी अर्थव्यवस्था एक दिवसहि आपल्या योग्य आत्म्याने चालू शकणार नाही आणि न तुम्ही तिच्यापासून कोणतेही उल्लेखनीय लाभ उठवू शकाल.

(भाग - ४ समाप्त)

- अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232‘‘दुर्दैवाने भारतात राष्ट्रवादाला असे महत्त्व प्राप्त झालेले आहे की, बहुसंख्यांक लोक आपल्या मर्जीनुसार अल्पसंख्यांकांवर दैवी हक्क असल्यासारखे वर्चस्व गाजवितात. अल्पसंख्यांकांनी जर सत्तेमध्ये भागीदारी मागितली तर त्याला जातीयवादी मागणी समजले जाते आणि बहुसंख्यांक हे सर्व सत्तेवर आपला एकाधिकार प्रस्थापित करू इच्छितात तर त्याला राष्ट्रीयत्व म्हटले जाते. याच राजकीय तत्वज्ञानापासून प्रतिनिधीत्व प्राप्त करून बहुसंख्य कुठल्याही स्तरामध्ये अल्पसंख्यांकांना सत्तेमध्ये भागीदार बनविण्यासाठी तयार नाहीत. त्यासाठी कुठलीही कायदेशीर आणि घटनात्मक तरतूद करण्याचीही त्यांची तयारी नाही.’’ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.\

‘‘ ज्या मुल्यांमुळे माणसाचे सर्वोच्च नैतिक कल्याण होते त्या मुल्यांचा धर्म म्हणजे सेक्युलॅरिझम (धर्मनिरपेक्षता)’’ - जॉर्ज जॅकब दोलिओ (फ्रेंच तत्ववेत्ता)

धर्मनिरपेक्षता ही आधुनिक काळातील जागतिक जीवनशैली आहे यात शंका नाही. विशेष करून फ्रेंच राज्यक्रांती (1789 ते 1799) नंतर जगात धर्मनिरपेक्षतेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. समता, स्वातंत्र्य व बंधुत्व या फ्रेंच राज्यक्रांतीच्या मुल्ल्यांचा उदो-उदो केला गेला व आजही केला जातो आहे. तुम्ही जर गुगलला प्रश्न विचारला की फ्रेंच राज्यक्रांतीचे जगावर परिणाम काय? तर तुम्हाला उत्तर देईल की, ’’फ्रेंच राज्यक्रांतीमुळे आर्थिक, सामाजिक समतेची भावना जगभर पसरली. धार्मिक स्वातंत्र्य आणि सहनशिलतेचा प्रचार वाढला. नागरिकांना स्वातंत्र्य प्रदान केले गेले. व्यक्ती स्वातंत्र्याला मान्यता मिळाली. या क्रांतीने जगाला लोकशाही, समानता, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीयतेची प्रेरणा दिली.’’ धर्मनिरपेक्षतेनंतर अलिकडे ज्या लोकशाही मुल्याला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे ते म्हणजे राष्ट्र होय. आधुनिक जगामध्ये राष्ट्रवादाच्या स्थानाइतके उंच स्थान दुसऱ्या कुठल्याच मुल्याला नाही.  

निर्विवादपणे वरील सर्व मुल्य ही उच्च मानवी मुल्य आहेत मात्र प्रत्यक्षात ही मुल्य जमीनीवर कुठेच दिसून येत नाहीत. धर्मनिरपेक्षतेचे स्थान बहुसंख्यवादाने घेतलेले आहे. या संदर्भात डॉ. आंबेडकर यांचे म्हणणे खालीलप्रमाणे-’’दुर्दैवाने भारतात राष्ट्रवादाला असे महत्त्व प्राप्त झालेलेे आहे की, बहुसंख्यांक लोक आपल्या मर्जीनुसार अल्पसंख्यांकांवर दैवी हक्क असल्यासारखे वर्चस्व गाजवितात. अल्पसंख्यांकांनी जर सत्तेमध्ये भागीदारी मागितली तर त्याला जातीयवादी मागणी समजले जाते आणि बहुसंख्यांक हे सर्व सत्तेवर आपला एकाधिकार प्रस्थापित करू इच्छितात तर त्याला राष्ट्रीयत्व म्हटले जाते. याच राजकीय तत्वज्ञानापासून प्रतिनिधीत्व प्राप्त करून बहुसंख्य कुठल्याही स्तरामध्ये अल्पसंख्यांकांना सत्तेमध्ये भागीदार बनविण्यासाठी तयार नाहीत. त्यासाठी कुठलीही कायदेशीर आणि घटनात्मक तरतूद करण्याचीही त्यांची तयारी नाही. (संदर्भ : डॉ. आंबेडकर 1947 स्टेट अँड मायनॉरिटीज, https://drambedkar.co.in/wp-content/uploads/books/category2/11states-and-minorities.pdf, retrived on 10-07-2021)


स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, लोकशाही, आर्थिक स्वातंत्र्य,  धर्मनिरपेक्षता ही सर्व मानवनिर्मित मुल्य आहेत आणि ही मुल्य जर प्रत्यक्षात जमिनीवर लागू केली गेली नाहीत तर जनता सत्ताधाऱ्यांचे काहीच वाकडे करू शकत नाही. म्हणूनच ट्रम्प सारखे धटिंगन बायबलवर हात ठेवून शपथ घेतल्यानंतरही सत्तेत येताच सर्व लोकशाही मुल्यांना पायाखाली चिरडून फक्त गोऱ्यांच्या हितासाठीच सरकारची सर्व शक्ती पणाला लावतो. आपल्याच देशातील काळ्या नागरिकांना शत्रु सारखी वागणूक देतो. बाहेरून येऊन अमेरिकेला महान बनविणाऱ्या अप्रवासी लोकांना पक्षपाती वागणूक देतो. प्रसंगी त्यांचे मुडदे पाडण्यासाठी लोकांना प्रेरित करतो. एवढेच नव्हे तर देशाच्या संसदेवर चालून जाण्यासाठी चिथावणी देतो. थोडक्यात ही मानवनिर्मित जीवनपद्धती असल्याने त्रुटीपूर्ण आहे आणि याच त्रुटींचा लाभ उठवत धोरणी राजनेते आपल्या जाती-धर्माचे राजकारण करतात व बाकींच्यांना वाऱ्यावर सोडून देतात. 

इस्लामी जीवनशैली

तुफानों से आँख मिलाओ

सैलाबों पर वार करो

मल्लाहों का चक्कर छोडो

तैर के दरिया पार करो

धर्मनिरपेक्ष लोकशाही जीवनशैली शिवाय इस्लामवर आधारित लोकशाही जीवनशैलीही जगात अस्तित्वात असून ती ईश्वरनिर्मित असल्यामुळे त्रुटीविरहित आहे. प्रसारमाध्यमे हाती नसल्यामुळे ही जीवनशैली जगामध्ये फारसी परिचित नाही  उलट प्रसारमाध्यमे हाती एकवटलेली असल्यामुळे धर्मनिरपेक्ष लोकशाही जीवनशैलीचा परिचय सर्व जगाला आहे. इस्लामी जीवनशैलीचे वैशिष्ट्ये म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधूता, धर्मनिरपेक्षता, आर्थिक आणि व्यक्ती स्वातंत्र्यच नव्हे तर समग्र मानवकल्याण हे या जीवनशैलीमध्ये निहित आहे. इस्लामी लोकशाही जीवनशैलीचा दुरूपयोग धर्मनिरपेक्ष लोकशाही पद्धतीप्रमाणे करता येत नाही, हे या शैलीचे दूसरे वैशिष्ट्ये आहे. कारण याचा दुरूपयोग केल्यास या जीवनात व मरणोपरांत जीवनात दोन्हीमध्ये त्याचा हिशोब घेतला जाणार आहे हे इस्लामी सत्ताधाऱ्यांना कायम लक्षात ठेवावे लागते. 

प्रत्यक्षात ही जीवनशैली कशी आहे याचा परिचय खालीलप्रमाणे - 

1. अल्लाहजवळ दीन (धर्म) केवळ इस्लामच आहे. या ’दीन’पासून दूर जाऊन जे विभिन्न मार्ग अशा लोकांनी अवलंबिले, ज्यांना ग्रंथ दिले गेले होते, त्यांच्या आचरणाचे कारण याशिवाय अन्य काही नव्हते, की त्यांनी ज्ञान पोहचल्यानंतर, आपापसात एकमेकांशी अतिरेक करण्यासाठी असे केले आणि जो कोणी अल्लाहचे आदेश व त्याच्या सूचनांचे पालन करण्यास नकार देईल, त्याचा हिशेब घेण्यास अल्लाहला विलंब लागत नाही. (सुरे आलेइमरान : आयत क्र.19) 

या आयातीमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रत्येक मुस्लिमाची ही श्रद्धा आहे की, इस्लामी जीवनशैली हीच खरी जीवनशैली असून याद्वारेच मानवाचे खरे कल्याण साधले जाऊ शकते. हा केवळ माझा अंदाज नसून कुरआनने ही बाब अधिक स्पष्ट करताना स्वतःच म्हटले आहे की, 

2. ’’आणि ह्या अपेक्षेने कि माझ्या आदेशांच्या पालनाने तुम्हाला त्याचप्रकारे कल्याणाचा मार्ग लाभावा ज्या प्रकारे (तुम्हाला या गोष्टीने सफलता लाभली की) मी तुमच्यामध्ये खुद्द तुमच्यामधूनच एक प्रेषित पाठविला जो तुम्हाला आमचे संदेश ऐकवीत आहे. आणि तुमचे जीवन पवित्र करून तुम्हाला ग्रंथ व विवेकाची शिकवण देत आहे. आणि तुम्हाला त्या गोष्टी शिकवीत आहे ज्या तुम्हाला माहीत नाहीत.’’(सुरे बकरा : आयत नं. 151).

स्पष्ट आहे की, पृथ्वीवर जेव्हा पहिल्यांदा माणसा-माणसांंमध्ये भांडण झाले तेव्हापासून मानवी समुहामध्ये समन्वयासाठी अनेक संस्था अस्तित्वात आल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची संस्था धर्म आहे. धर्माद्वारे एक विशिष्ट अशी जीवनशैली निश्चित केली जाते. त्या जीवनशैलीच्या परिघाबाहेर कोणालाच जाता येत नाही. हे अशासाठी केले जाते की त्यातून सर्वच माणसांचे कल्याण साधता यावे, परंतु इस्लाम व्यतिरिक्त इतर सर्व धर्म ही मानवनिर्मित असल्यामुळे किंवा मानवांनी हस्तक्षेप केल्यामुळे विकृत झाल्यामुळे, त्यातून मानवकल्याण साध्य होणे शक्य नाही. जेव्हा जग सभ्य युगात पोहोचले तेव्हा ईश्वराने शेवटचे प्रेषित म्हणून मुहम्मद सल्ल. यांना पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व माणसांचा मार्गदर्शक म्हणून पाठविले आणि कुरआनला मानवी जीवनाची आचारसंहिता म्हणून अवतरित केले. यामुळे आता मनाप्रमाणे वागण्याची सोय राहिलेली नाही. 

3. इस्लामी जीवनशैली जरी ईश्वराला पसंत असली आणि तीच सर्व मानवांनी अंगीकारावी अशी जरी ईश्वरीय इच्छा असली तरी या जीवनशैलीला बळजबरीने ईश्वराने मानवावर लादलेले नाही. म्हणूनच कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे की,’’ धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे. आता ज्याने कोणी, तागूत (ईश्वराशिवाय इतर शक्ती) चा इन्कार करून अल्लाहवर श्रद्धा ठेवली त्याने एक असा मजबूत आधार ग्रहण केला की जो कधीही तुटणार नाही, आणि अल्लाह (ज्याचा आधार त्याने घेतला आहे) सर्वकाही ऐकणारा व जाणणारा आहे.’’  (सुरे बकरा : आयत नं. 256).

या आयातीनुसार एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की, इस्लामी जीवनशैली ही ऐच्छिक जीवनशैली आहे. ज्यांनी तिचा अंगीकार केला ते यशस्वी झाले व ज्यांनी तिला नाकारले त्याचे त्यांना मुल्य चुकवावे लागले व प्रलयाच्या दिवसापपर्यंत चुकवत रहावे लागेल. कुरआनच्या अवतरणाचा मुख्य उद्देशच मानवाला उच्च नैतिक मुल्यांचे मार्गदर्शन करणे होय. या व्यतिरिक्त जेवढेही मार्गदर्शन जगामध्ये आहे ते कुठे ना कुठे जाऊन मानवाला अपाय करते. उदा. धर्मनिरपेक्ष लोकशाही ही अतिशय उत्कृष्ट जीवन पद्धती जरी असली तरी तिचे प्रत्यक्ष स्वरूप काय आहे हे डॉ. आंबेडकरांच्या वर नमूद विचारावरून एव्हाना स्पष्ट झालेले आहे व या जीवन पद्धतीचा किती दुरूपयोग होतो हे आपण आपल्या डोळ्यांनी रोज पाहत असतो. 

अल्लाहचे सहाय्यक कोण?

ना शरियत ना तरिकत ना हकीकत ना मजाज

कौन काफीर तुझको कहेता है के मुसलमान है तू

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’ हे लोकहो ज्यांनी श्रद्धा ठेवली आहे, अल्लाहचे सहाय्यक बना ज्याप्रकारे मरयमपुत्र ईसाने हवारींना उद्देशून सांगितले होते, ’’कोण आहे अल्लाहकडे (बोलविण्यात) माझा सहायक?’’ आणि हवारींनी उत्तर दिले होते, ’’आम्ही आहोत अल्लाहचे सहायक.’’ त्यावेळी बनीइस्राईलच्या एका गटाने श्रद्धा ठेवली आणि दुसर्या गटाने इन्कार केला. मग आम्ही श्रद्धावंतांचे त्यांच्या शत्रुविरूद्ध समर्थन केले आणि तेच विजयी ठरले.’’  (सुरे सफ : आयत नं.14)

वर नमूद आयत जरी येशू ख्रिस्तांना उद्देशून कुरआनमध्ये आलेली आहे तरी त्यातील आदेश येशू ख्रिस्तानंतरचे प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या अनुयायांना सुद्धा लागू पडते. या आयाती संदर्भात स्पष्टीकरण देतांना मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी लिहितात, ’’अल्लाहचे सहाय्यक बना याचा अर्थ असा मुळीच नाही की (अल्लाह क्षमा करो) अल्लाह मानवकल्याणाचे काम स्वतः करू शकत नाही व त्याला माणसाच्या सहाय्यतेची गरज आहे, असे यासाठी म्हटलेले आहे की, अल्लाहची जरी इच्छा असली की मानवाने इस्लामी जीवन शैलीचा अंगीकार करावा त्यासाठी इस्लामवर श्रद्धा बाळगावी, कुरआनच्या मार्गदर्शनाचे पालन करावे, वाईट कृत्यांपासून दूर रहावे तरी तो आपली ही इच्छा आपल्या (ईश्वरीय) शक्तीने मानवावर थोपवू इच्छित नाही’’ ( संदर्भ : तफहिमुल कुरआन सुरे सफचे भाष्य)

ईश्वराने मानवाला सर्वश्रेष्ठ जीव बनवून बुद्धी प्रदान केली आणि चांगला आणि वाईट यामधील फरक करण्याची समज दिली, पृथ्वीवर कुरआनचे मार्गदर्शन पाठविले, प्रेषित सल्ल. आणि त्यांचे सहकारी साहबा रजि. यांच्या मार्फतीने ते मार्गदर्शन यशस्वीपणे सातव्या शतकात अरबास्थानामध्ये यशस्वीपणे राबवून दाखविले. तो समाज उत्कृष्ट मानवी समुह होता. ज्याने 100 वर्षे एक तृतीयांश पृथ्वीवर आपला ठसा उमटविला. तेच मार्गदर्शन माणसाने आपल्या मर्जीने स्वीकारावे ही ईश्वराची मर्जी आहे. त्यासाठी ईश्वराने उपदेशाची पद्धत अवलंबिलेली आहे; जबरदस्ती केलेली नाही. मौलाना मौदूदी म्हणतात, ’’या ईश्वरीय मार्गदर्शनाचा स्वतः मर्जीने ज्यांनी स्वीकार केला त्यांना मोमीन (खरे मुस्लिम) म्हणतात, ज्यांनी त्याची जीवनात प्रत्यक्ष अंमलबजावणी केली त्याला विश्वसनीय आणि आबिद (भक्त) म्हणतात, जो त्या पुढच्या पायरीवर पोहोचतो आणि ईश्वरीय मर्जीप्रमाणे स्वतः रूपांतरित होऊन जातो त्याला मुत्तकी (चारित्र्यवान) म्हणतात, जो चांगल्या कामामध्ये आणखीन एक पाऊल पुढे जातो आणि इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याचा जीवापाड प्रयत्न करतो आणि इस्लामी जीवनशैलीला स्वतःच्या आणि सामुहिक जीवनामध्ये लागू करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नरत राहतो त्याला ईश्वर, स्वतःचा सहाय्यक (मददगार) म्हणून मान्यता देतो आणि इस्लामी जीवनशैलीचे हे सर्वात उंच शीखर होय.’’ ( संदर्भ : तफहिमुल कुरआन सुरे सफचे भाष्य)

जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रचे अभियान

देखी गई ना मुझसे अंधेरों की सरकशी

खुद आफताब बनके निकलना पडा मुझे

भौतिक जीवनशैलीच्या अतिरेकामुळे आज जीवनाचा उद्देश फक्त कमाविणे, खाणे आणि मनोरंजनात व्यस्त राहणे इतकेच राहून गेलेले आहे. जनता आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक अदृश्य अशी दरी निर्माण झालेली आहे. सत्ताधारी हे जनकल्याणाच्या नावाखाली स्वतःचे पोटभरण्याचे धंदे करत आहेत. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे, स्त्रीयांवर अत्याचार वाढलेले आहेत, मुलांची तस्करी होत आहे, दारू आणि ड्रग्ज यांचा मुक्त हस्ते वापर होत आहे, व्याजाधारित अर्थव्यवस्थेने शेतकरीच नव्हे तर शहरी भागातील नागरिकांनाही आत्महत्या करण्यास विवश केलेले आहे, सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांनी कोट्यावधी रूपयाचे घोटाळे करून विदेशात पलायन केलेले आहे, त्यांना परत आणण्याची सरकारची मुळीच इच्छा नाही, त्यामुळे अनेक बँका बुडालेल्या आहेत, बँकिंग व्यवस्थेवरचा विश्वास हळूहळू कमी होत आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, महागाईने सर्व मर्यादा ओलांडलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टींवरून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने राष्ट्रवाद आणि जातीयतेची मात्रा जनतेला देऊन व्यस्त ठेवण्याचे काम सुरू केले आहे. 

एकंदरित या सर्व नकारात्मक परिस्थितीमध्ये केवळ सकारात्मक विचारांची मात्राच आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी उमेद देऊ शकते म्हणून जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने ’कूनू अन्सारूल्लाह अर्थात अल्लाहचे सहाय्यक बना’ हे अभियान सुरू केलेले आहे. यातून जास्तीत जास्त लोकांना जमाअते इस्लामीचा परिचय करून देऊन त्यांना अल्लाहचे सहाय्यक म्हणून तयार करण्याचा मानस व्यक्त करण्यात आलेला आहे. शीतल पवित्र आणि उच्च नैतिकतेने परिपूर्ण जीवन जगण्याची जगातील सर्वात प्रभावशाली पद्धत जर कुठली असेल तर ती इस्लामी जीवनपद्धती आहे. या पद्धतीचे महत्त्व दुसऱ्यांना पटवून त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक प्रभाव वाढविणे आणि कोविडमुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीनंतर हलाखीचे जीवन जगत असलेल्या जनतेमध्ये अंतर्गत ऊर्जा निर्माण करून भविष्यातील आव्हानांना पेलण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे हा जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राचा उद्देश असून, या मोहिमेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त लोकांनी जमाअतचे तत्वज्ञान समजून घेऊन स्वतःला अल्लाहचे सहाय्यक बनविण्यासाठी प्रयत्न करावा. इस्लामचा हा सर्वोच्च दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची समज, अल्लाह आपल्या सर्वांना देओ आणि आपल्या या प्रिय देशाला जगामध्ये नैतिक दृष्ट्या उच्च स्थानावर नेण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये निर्माण करो, हीच प्रार्थना. आमीन. 

- एम.आय.शेखहे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व  दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाला स्थलांतरित केले जाऊ शकेल. मग हे आवश्यकता भासते की मंगळ, बुध आणि शुक्र ग्रह मध्ये पैसे लावले जावेत आणि अतिरिक्त माल खपविण्यासाठी बाजार शोधले जावेत.

या जागतिक संघर्षात बँका पतपेढ्या आणि उद्धव व्यापाऱ्यांची, भांडवलदारांची लहान अशी टोळी सर्व जगाची आर्थिक सामग्री आणि संसाधनावर या प्रकारे प्रभावी झालेली आहे. समस्त उपाय त्यांच्याविरोधात पूर्णपणे निरुपाय झालेले आहे. आता कोण्या व्यक्तीसाठी हे असंभव झालेले आहे की तो आपल्या कष्टाने आणि आपल्या बुद्धीच्या योग्यतेने एखादे काम स्वतंत्र रूपाने करू शकेल. तसेच ईश्वराच्या धरतीवर अस्तित्वात असलेल्या जीवन साधने स्वतः काही भाग प्राप्त करू शकेल. लहान व्यापारी, लहान कारागीर आणि लहान शेतकऱ्यांसाठी आज जगात हात-पाय मारण्याची काही एक संधी बाकी राहिलेली नाही. सर्वच्या सर्व भांडवलदारांचे गुलाम, नौकर, मजूर बनण्यास विवश आहेत. हे लोक कमीत कमी जीवन सामग्रीच्या मोबदल्यात त्यांच्या शरीर आणि बुद्धीच्या सर्व शक्तीआणि त्यांचा पूर्ण वेळ घेतात. या कारणास्तव सर्व मानव जात एक आर्थिक पशु बनून राहिलेली आहे खूप कमी भाग्यशाली लोकांना या आर्थिक संघर्षामध्ये इतका वेळ मिळू शकतो की आपल्या आध्यात्मिक विकासासाठी काही करू शकतील. कोण अशा उद्देशा कडे लक्ष देऊ शकेल जो पोट भरण्याच्या उद्देशा पेक्षा श्रेष्ठ आहे.आपल्या व्यक्तीत्वाच्या त्या तत्त्वांना विकसित करू शकेल जे उपजीविकेच्या शोधा पेक्षा दुसऱ्या पवित्र उद्देशासाठी ईश्वराने त्याच्या मध्ये ठेवले होते. वास्तवात या सैतानी व्यवस्थेमुळे आर्थिक संघर्ष इतके कठोर रूप धारक करते की, जीवनाचे इतर दुसरे विभाग निष्क्रिय हो होऊन बसतात.यापेक्षाही मोठे मानवाचे दुर्भाग्य हे आहे की जगाचे नैतिक दर्शन राजनीतिक व्यवस्था आणि कायदे सिद्धांत या सैतानी अर्थव्यवस्थेने प्रभावित झालेले आहेत. पूर्वेपासून पश्चिमे पर्यंत नैतिकतेचे आचार्य अतिरिक्त खर्चापासून वाचण्यावर जोर देत आहेत. जितके कमवायचे तितकाच खर्च करून टाकणे एक मूर्खता समजली  जाते . प्रत्येक व्यक्तीला शिकवण दिली जाते की, आपल्या मिळकतीतून काही न काही वाचवून बँकेत डिपॉझिट ठेवावे अथवा विमा पॉलिसी खरेदी करावी अथवा कंपन्याचे शेअर खरेदी करावेत. म्हणजे जी गोष्ट मानवतेचा विनाश करणारी आहे तीच नैतिकतेच्या दृष्टीत चांगुलपणाचे मापदंड करणारी ठरली आहे. राहिली राजनीतिक शक्ती तर ती व्यवहारतः पूर्णपणे एका सैतानी व्यवस्थेच्या ताब्यात आलेली आहे. ती या अत्याचारापासून मनुष्याला वाचविण्या ऐवजी स्वतः अन्याय करणारी मशीन झालेली आहे. जगाचे कायदे सुद्धा या व्यवस्थेच्या प्रभावात संयोजित होत आहेत.

या कायद्यांनी लोकांना व्यवहारतः पूर्ण सूट देऊन ठेवली आहे की ते ज्याप्रकारे इच्छितील समाजहिताच्या विपरीत आपल्या आर्थिक उद्देशासाठी प्रयास करतील. पैसे कमविण्याच्या पद्धतीत वैथ आणि अवैधतेचा फरक जवळजवळ लुप्त झालेला आहे. प्रत्येक ती पद्धत जिच्याने व्यक्ती दुसऱ्यांना लुटून अथवा नष्ट करून धनवान बनवू शकतो, कायद्याच्या दृष्टीत पात्र आहे दारू बनवा आणि विका व्यभिचाराचे अड्डे स्थापन करा, कामोत्तेजक चित्रपट बनवा, अश्लिल निबंध लिहा वासनालय, भावना भडकवणारी चित्रे प्रकाशित करा, सटृयाचा व्यवहार पसरवा, व्याजखोरीच्यासंस्था स्थापन कराजुगाराच्या नवनवीन पद्धती काढा. सारांश हा की वाटेल ते करा. कायदा फक्त याची परवानगीच देणार नाही तर तुमच्या अधिकारांचे रक्षण ही करेल.

इस्लामी उपाय-

1: इस्लामने जीवनाच्या सर्व समस्यांना या नियमात समोर ठेवले आहे की, जीवनाचे जे सिद्धांत स्वाभाविक आणि नैसर्गिक आहेत, त्यांना शिल्लक ठेवले जावे आणि जिथे नैसर्गिक मार्गाने विचलित झाले आहे, तेथूनच त्याला वळवून नैसर्गिक मार्गावर लावून दिले जावे.

2: दुसरा महत्वपूर्ण नियम ज्यावर त्याची सर्वच सुधारात्मक कार्य निर्भर असतात, तो हा आहे की समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये केवळ काही वरवरचे उपाय लागू करण्यावर न थांबता, सर्वात जास्त जोर नाही नैतिक आणि मानसिक सुधारावर दिला जावा. कारण मानवी मनात निर्माण होणाऱ्या बिघाडाची मुळे कापली जावीत.

3: तिसरा मौलिक नियम ज्याची झलक आपणास संपूर्ण इस्लामी जीवन प्रणालीत मिळेल, हा आहे की शासनाच्या बळावर आणि कायद्यांच्या शक्तीने फक्त तीच कामे घेतली जावीत जिथे याशिवाय काम चालू शकत नसेल. या तिन्ही नियमांना दृष्टीसमोर ठेवते इस्लाम जीवनाच्या आर्थिक विभागामध्ये त्या सर्वच अभाविक सिद्धांतांना अधिकाहुन अधिक नैतिक सुधार आणि कमीत कमी प्रशासनिक हस्तक्षेपाद्वारे मिटवीत असतो, जे सैतानाच्या प्रभावाने मानवाने अंगीकारले आहेत. मानव आपल्या जिविकेसाठी प्रयास करण्यास स्वतंत्र असावा. मानव आपल्या श्रमाने जे काही प्राप्त करेल ती त्याची मिळकत स्वीकार केली जावी आणि मानवामध्ये योग्यतांच्या आणि त्यांच्या परिस्थितीच्या प्रमाणानुसार अंतर असावे. या सर्व बाबींना इस्लाम त्याच मर्यादेपर्यंत स्वीकार करतो ज्या मर्यादेपर्यंत हे निसर्ग अनुकूल असते. मग तो यांच्यावर असे प्रतिबंध लावीत असतो ज्यांच्यामुळे न ही निसर्गाच्या सीमेच्या पुढे वाढू शकते आणि न अन्याय आणि अत्याचाराचे कारण बनते.

सर्वात अगोदर धन कमविण्याच्या प्रश्नाला घ्या इस्लामने मनुष्याच्या या अधिकाराला स्वीकारले आहे. अल्लाहच्या धरतीवर आपल्या रुची, क्षमता आणि योग्यतेनुसार स्वतः आपली जीविका त्याने शोधावी. परंतु तो त्याला हा अधिकार देत नाही की त्याने आपली जीवीका प्राप्त करण्यासाठी नैतिकतेला बीघडविणारी व सभ्यतेच्या व्यवस्थेला बिघडविणारी साधने वापरावीत. तो धन कमविण्याच्या साधनांमध्ये अवैध आणि वैधतेचे अंतर निर्धारित करतो. अत्यंत विस्तारासहीत वेचून वेचून प्रत्येक हानिकारक पद्धतीला अवैध करून टाकतो. त्याच्या कायद्यामध्ये दारू आणि दुसरे मादक पदार्थ केवळ आपल्या जागेवर अवैध आहेत तर त्यांचे बनविणे, विकणे, विकत घेणे आणि बाळगणे सर्व अवैध आहे. तो व्यभिचार, संगीत आणि याच प्रकारच्या इतर दुसऱ्या साधनांना सुद्धा संपत्तीच्या कमाईचे वैध साधन मानत नाही. तो अशा सर्व साधनांना अवैध ठरवितो, ज्यात एका व्यक्तीचा लाभ दुसऱ्या लोकांच्या अथवा समाजाच्या हानीवर निर्भर करीत असेल.

लाच, चोरी, जुगार ,सट्टा तसेच धोका, दगाबाजी चे व्यवहार जमा खोरी अर्थात गरजेच्या साधनांना यासाठी रोखून ठेवणे की किमती वाढाव्यात. उत्पादनाच्या साधनांना एक व्यक्ती अथवा काही व्यक्तीचा अधिकारी ठरविणे की दुसऱ्यासाठी प्रयास क्षेत्र तंग व्हावे. या सर्व पद्धतींना त्यांनी अवैध ठरवले आहे. या व्यतिरिक्त व्यवसायाच्या अशा सर्व प्रकारांना त्याने वेचून वेचून अवैध घोषित केले आहे जे आपल्या आकाराच्या दृष्टीने विवाद निर्माण करणारे आहेत इस्लामच्या या व्यापारी कायद्यांचे विस्तृत रूपाने अध्ययन कराल तर आपणास माहित होईल की आज ज्या पद्धतीने लोक करोडपती बनत आहेत. त्यांच्यातून अधिकांश त्या पद्धती आहेत ज्याच्यावर इस्लामने अत्यंत कडक कायदेशीर प्रतिबंध लावले आहेत. तो धन कमविण्याच्या ज्या साधनांना अवैध ठरवितो, त्यामध्ये सीमित राहून काम केले तर लोकांसाठी अपार धन जमा करत जाण्याची खूप कमी संभावना शेष राहते.

आता पहा, मनुष्य मान्य पद्धतीने जे काही प्राप्त करेल, त्याला इस्लाम त्या व्यक्तीची मिळकत म्हणून परवानगी देतो. परंतु तिच्या उपभोगात त्याला पूर्णतः हा स्वतंत्र सोडत नाही तर त्यावरही अनेक बंधने घालतो. विदित आहे की या कमाविलेल्या संपत्तीच्या वापराचे तीन प्रकार संभव आहेत. एक तर ती खर्च करून टाकावी, किंवा तिला लाभदायक कामावर लावावे, अथवा ती जमा करावी. यामधून एक एकावर इस्लामने जी बंधने घातली आहेत संक्षेपात अशी आहेत. खर्च करण्याचे जितके प्रकार नैतिकतेला हनी पोचवितात अथवा ज्यांच्यामुळे समाजाला नुकसान पोहोचते ते सर्व वर्जित आहेत. आपण आपली संपत्ती जुगारात उडवू शकत नाही व दारू पिऊ शकत नाही. आपण व्याभिचार करू शकत नाही. आपण गाणे वाजविणे, नाच रंग आणि विलासितेच्या दुसऱ्या प्रकारांमध्ये आपला पैसा वाहू शकत नाही. तुम्ही रेशमी वस्त्र परिधान करू शकत नाही. सोने व जवाहीर यांच्या दागिन्यांचा वापर करू शकत नाही. असे दागिने फक्त स्त्रिया घालू शकतात. आपण छायाचित्रांनी आपल्या भिंतींना समजू शकत नाही. सारांश हा की इस्लामने त्या सर्व दारांना बंद करून टाकले ज्यांच्यामुळे मांनवाच्या संपत्तीचा अधिकांश भाग आपल्या विलासितेवर खर्च होत असतो. तो खर्चाच्या ज्या पद्धतींना मान्य करतो त्या या प्रकारच्या आहेत की माणसाने फक्त एका सामान्य दर्जाचे शिष्टता पुर्ण आणि पवित्र जीवन व्यतीत करावे. त्याहून अधिक जर काही शिल्लक राहत असेल तर त्याला खर्च करण्याचा मार्ग इस्लामने हा सुचविला आहे की त्याला पुण्य आणि भलाईच्या कामांमध्ये जनहितार्थ आणि त्या लोकांच्या सहाय्यता कार्यात खर्च करावे जे आर्थिक संपत्ती मधून आपल्या गरजांनुसार वाटा मिळविण्यापासून वंचित राहिले आहेत. इस्लामच्या दृष्टीत सर्वात अधिक योग्य पद्धती आहे की माणूस जे काही कमवितो त्याला आपल्या मान्य आणि उचित गरजांवर खर्च करावे आणि मग जे काही शिल्लक राहील त्याला दुसऱ्यांना देऊन टाकावे. म्हणजे ते आपल्या या गुणाला इस्लामने उच्चतम स्तराच्या नैतिकतेत सम्मिलित केले आहे. एका आदर्शाच्या रूपात याला इतक्या शक्तीनिशी प्रस्तूत केले आहे की जेव्हा कधी समाजात इस्लामच्या नैतिकतेचा गाजावाजा असेल सामाजिक जीवनामध्ये ते लोक अधिक आदराच्या दृष्टीने पाहिले जातील जे कमवितात खर्च करून टाकतात आणि त्या लोकांना चांगल्या दृष्टीने पाहिले जाणार नाही जी संपत्तीला साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतील किंवा कमिविलेल्या संपत्तीतून शिल्लक राहिलेल्या वाट्याला पुन्हा कमविण्याच्या कामी लावतील.तरीसुद्धा विशुद्ध नैतिक शिकवणी द्वारा आणि समाजाच्या नैतिक प्रभाव आणि दबावाने अत्याधिक लोभ आणि लोलुपता ठेवणाऱ्या लोकांच्या कमतरतेचे पूर्णतः उन्मूलन केले जाऊ शकत नाही. असे असताना सुद्धा अनेक असे लोक बाकी राहतील जे आपल्या गरजा पेक्षा अधिक असलेल्या संपत्तीला आणखीन जास्त संपत्ती कमविण्यात लावू इच्छितात. यासाठी इस्लामने त्यांच्या वापराच्या पद्धतीवर काही कायदेशीर प्रतिबंधलावलेले आहेत. इस्लामी कायद्यात पूर्णतः निषिद्ध आहे आपण कोणाला आपला माल कर्जावर देत आहात जरी त्याने ते कर्ज आपल्या गरजा वर खर्च करण्यासाठी घेतले असेल अथवा जिविकेच्या साधन निर्मिती साठी इत्यादी, प्रत्येक दशेत आपण त्याच्याकडून केवळ आपली मूळ रक्कम परत घेण्याचे अधिकारी आहेत. या प्रकारे इसलाम अन्याया वर आधारित भांडवलदारी ची कंबर तोडून टाकतो आणि त्या सर्वात मोठ्या शास्त्राला बोथट करून टाकतो. ज्याला आपण व्याज म्हणतो. ज्याच्या द्वारे भांडवलदार केवळ आपल्याच बळावर आसपासच्या आर्थिक धनसंपत्तीला साठवत जातो. शिल्लक धन व्यक्ती वाटेल तर आपल्या व्यापार उद्योग अथवा दुसऱ्या व्यवसायात लावू शकतो अथवा दुसऱ्याच्या सोबत लाभा मध्ये सामील होऊन त्याने संपत्ती जमा करावी याला इस्लाम वैध करार देतो आणि यापेक्षा जी आवश्यकतेपेक्षा अधिक धन लोकांजवळ साठत जाते त्याचा उपाय   दुसऱ्या प्रकारे करीत असतो.

(क्रमशः, भाग - ३)

-अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232’’इस्लाम तहेजीबो अख्लाक (सांस्कृतिक शिष्टाचार) और तकमिले फजाईल (ईश्वरीय कृपा) की शहेंशाही है’’ - अल्लाम्मा शिबली नोमानी रह.

ऑगस्ट 2021 रोजी तालीबानकडून अफगानिस्तानचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी जाहीर केले की, ’’ते देशामध्ये पाश्चिमात्य पद्धतीची लोकशाही व्यवस्था लागू करणार नाहीत तर शरई व्यवस्था लागू करतील.’’ या घोषणेनंतर साहजिकच जागतिक स्तरावर खळबळ माजली. 1999 ते 2001 या कालावधीत तालीबानच्या काळात या व्यवस्थेच्या नावाखाली अनेक अत्याचार केले गेले होेते. त्यामुळे यावेळी पुन्हा तसेच अत्याचार अफगानी जनतेवर केले जातील, अशी साधार भीती संयुक्त राष्ट्र संघापासून ते लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या अनेक देशांकडून व्यक्त केली जात आहे. म्हणूनच या आठवड्यात या व्यवस्थेबद्दल चर्चा करण्याचा मानस आहे.  

शरई व्यवस्थेबद्दल एका लेखात सर्व काही लिहिणे शक्य नाही परंतु या व्यवस्थेसंबंधी सर्वात मोठा हरकतीचा  जो मुद्दा उपस्थित केला जातो तो त्यातील दंड संहितेचा आहे. जगाच्या मते ही दंड प्रक्रिया रानटी आहे, अश्मयुगीन आहे, मानवाधिकाराचे हनन करणारी आहे. खरेच असे आहे का? हे तपासण्याची हीच योग्य वेळ आहे. 

या संदर्भात एक रोचक घटना वाचकांच्या समोर मांडावीशी वाटते. ती अशी की, अमेरिकेच्या पत्रकारांचा एक समूह सऊदी अरबमध्ये अभ्यास दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्याचा एक भाग म्हणून त्या काळाचे शासक शहा फैसल यांना तो भेटला. त्या भेटीदरम्यान एका महिला पत्रकाराने तावातावाने शहा फैसल यांना विचारले की, तुम्ही चोरांचे हात कापता, व्याभिचार किंवा बलात्कार करणाऱ्यांना दगडाने ठेचून मारता, छोट्या मोठ्या कारणासाठी फटके मारता ते ही भर बाजारात. जग कुठे पोहोचले आहे आणि तुम्ही कोठे आहात? त्यावर काही क्षणासाठी शहा फैसल गप्प बसले. इकडे पत्रकाराच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. तिला वाटले की आपण बादशाहाला निरूत्तर करून टाकले आहे. तेवढ्यात शाह फैसल त्या व तिच्या सोबत असलेल्या महिला पत्रकारांना संबोधित करून म्हणाले की, ’’तुम्ही रियादच्या सराफ मार्केटमध्ये जा. तेथून कोणत्याही दुकानातून तुम्हाला जेवढे दागिने घ्यायचे तेवढे घ्या. त्याचे बिल मी अदा करतो आणि ते दागिने घालून सऊदी     -(उर्वरित पान 2 वर)

अरबच्या कोणत्याही शहरात एकट्या फिरून या. तुमच्या केसालाजरी धक्का लागला तर त्याची जबाबदारी माझी. पण माझी एक शर्त आहे तेच दागिने घालून तुम्हाला तुमच्या देशात एकट्याने फिरून दाखवावे लागेल.’’ त्यावर सर्व पत्रकार भांबावून गेले. त्यांच्यापैकी काहींनी सांगितले की, ’’शहरात तर सोडा विमानतळावरून दागिने घातलेली एकटी महिला तिच्या घरापर्यंत सुद्धा सुरक्षित जाऊ शकणे शक्य नाही.’’ ही आहे शरई व्यवस्थेतील शिक्षा आणि लोकशाही व्यवस्थेतील शिक्षांमधील फरक. ही घटना आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्यांना विश्वास नसेल त्यांनी सर्च करून वाचावी. 

सप्टेंबर 2019 मध्ये मदिनाच्या एका मोठ्या बिन-दाउद नावाच्या मॉलमध्ये खरेदी करतांना, एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली की तेथे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खाद्य पदार्थांची गुणवत्ता अतिशय उच्च दर्जाची आहे. एका बांग्लादेशी विक्रेत्याला ज्याला हिंदी येत होती, मी या संबंधी विचारणा केली असता तो म्हणाला, ’’सहाब ये सऊदी अरब है, यहां मिलावट करनेवाले को चौक में कत्ल किया जाता है. यहां किसी भी दुकानपर आपको हर चीज शुद्ध मिलेगी.’’ 

ही झाली विदेशातील उदाहरणे. आता आपल्या देशातील फक्त या आठवड्यात देशभरात घडलेल्या शेकडो गुन्ह्यांच्या घटनांपैकी फक्त दोन घटनांचा या ठिकाणी उल्लेख करून थांबतो. पहिली घटना दिल्ली सारख्या राजधानीच्या शहरातील आहे. एका सेवानिवृत्त सैनिकाने आपली सून आणि भाडेकरू कृष्णा तिवारी यांच्यातील आक्षेपार्ह जवळीक पाहून कृष्णा तिवारीसह त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा खून केला. या संबंधीची मीडियाला माहिती पोलीस उपायुक्त दीपक सहारण यांनी दिली. दुसरी घटना मुंबईच्या विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. पोलीस इन्स्पे्नटर प्रकाश बेळे यांनी मीडियाला सांगितले की, त्यांच्या हद्दीमध्ये एका 16 वर्षाच्या एका तरूणीला तिच्या वडिलांनी ऑनलाईन्नलाससाठी स्मार्ट फोन घेऊन दिला त्यातून तिला पॉर्न पाहण्याची इतकी सवय जडली की तिने स्वतःच्या 13 वर्षाच्या भावाला पॉर्न्निलप्स दाखवून उत्तेजित करून स्वतःशी लैंगिक संबंध स्थापित करण्यास बाध्य केले व त्यातून ती पाच महिन्याची गर्भवती झाली. या बातमीत असेही म्हटलेले आहे की, हे बहिण-भाऊ रोज रात्री एकत्रच झोपत होते. या पार्श्वभूमीवर शरियतची ही तरतूद किती उपयुक्त ठरते की, शरितयने म्हटलेले आहे, मुलं 8 ते 10 वर्षाची होताच त्यांचे बिछाने वेगळे करा. ह्या दोन्ही बातम्या सर्वच आघाडीच्या वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेल्या आहेत. या दोन घटनांची निवड यासाठी केलेली आहे की, अशा घटनांमुळे समाजाच्या नैतिक स्थितीचा अंदाज येतो. आज कुठलाही दिवस, कुठलेही वर्तमानपत्र आणि कुठलेही चॅनल अनैतिक संबंधातून होत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या वर्णनाशिवाय प्रकाशितच होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज तुरूंगात असलेल्या कैद्यांपैकी बहुसंख्या अशाच कैद्यांची आहे जे नैतिक अधःपतनामुळे गुन्हेगारीकडे वळले आहेत. आज अशा गुन्हेगारांचे समर्थन तिरंगा झेंडा घेऊन करण्याइतपत प्रगती आपल्या लोकशाहीने साधलेली आहे. 

शरई शिक्षांचे प्रकार

शरई शिक्षा एकूण तीन प्रकारच्या असतात. 1. ताज़ीर, 2. हद, 3. कफ्फारा.

1. ताज़ीर : ही किरकोळ गुन्ह्यासाठी दिली जाणारी शिक्षा असते. ही सौम्य असते. स्थानिक काझी (न्यायाधीश) आरोपीला, पती-पत्नीला, आई-वडिल आपल्या पाल्यांना, मालक आपल्या गुलामांना, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतात. रागाने, तुच्छतेने पाहणे, गोश्माली (कान दुमडणे), तंबी करणे आणि फटके मारणे इत्यादी शिक्षा देण्याचा समावेश या गटात होतो. या शिक्षेचे वैशिष्ट्ये असे की, या शिक्षा किती द्याव्यात याची निश्चिती शरियतने केलेली नाही. हा अधिकार शरियतने शिक्षा देणाऱ्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सोडला आहे.  ही गोष्ट किती सुंदर आहे पहा. 

2. हद - ही शिक्षा निश्चित अशी शिक्षा आहे. यामध्ये चोरी, डाका, देशद्रोह, व्याभिचार, भ्रष्टाचार, भेसळ, बलात्कार, हत्या इत्यादी सारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. कुरआनच्या विविध आयातींमधून अशा गुन्ह्यात लिप्त गुन्हेगारांना किती शिक्षा द्यावी याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. यात काझीला शिक्षा कमी करण्याचे अधिकार नाहीत. 

3. कफ्फारा : या प्रकारच्या शिक्षा म्हणजे नुकसान भरपाई करून देणे होय. यात फिर्यादीला आरोपीकडून किंवा आरोपीची ऐपत नसेल तर सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे अधिकार कोर्टाला देण्यात आलेले आहेत. ही नुकसान भरपाई द्यावीच लागते. त्यातून कुठली पळवाट नाही. अपवाद फक्त जखमी झालेल्या फिर्यादीचा किंवा खून झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांचा आहे. त्यांनी जर गुन्हेगाराला क्षमा केली तर कोर्ट गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकत नाही. आपल्याकडे खुन्यातील गुन्हेगाराला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. ही अतिशय अतार्किक आणि आश्चर्याची बाब आहे. वास्तविक पाहता शरियतने माफीचा अधिकार मयताच्या जवळच्या नातेवाईकाला दिलेला आहे. हीच बाब सद्सद्विवेक बुद्धीला पटणारी आहे. 

शरई शिक्षा तार्किक आहेत

मेरे किरदार में मुज्मर है तुम्हारा किरदार

देखकर क्यूं मेरी तस्वीर खफा हो तुम लोग

कल्पना करा की आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये अ ने ब च्या वडिलांचा खून केला तर त्याचे तीन संभाव्य परिणामांपैकी एक परिणाम होतो. पहिला परिणाम असा की, त्याला शिक्षाच होत नाही. दूसरा परिणाम असा की, त्याला फाशी होऊ शकते. पण असे फार क्वचितच होते. तीसरा परिणाम त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते आणि सर्वसाधारणपणे अशीच शिक्षा होते. यातील गंमत पहा. अ ने ब च्या वडिलांचा खून केला आणि अ ला जन्मठेप झाली. आता जन्मभर अ तुरूंगामध्ये ब ने दिलेल्या वेगवेगळ्या करातून (टॅक्स) पोसल्या जातो. म्हणजे एक तर ब चे वडील गेले आणि दूसरे अ गुन्हेगाराला पोसण्याची जबाबदारी ब वर आली. किती हा उरफाटा न्याय? या उलट शरई शिक्षांमध्ये एक तर अ ला तात्काळ मृत्यूदंड दिला जातो किंवा त्याला ब कडून क्षमादान मिळू शकते. येथे आयुष्यभर गुन्हेगाराला पोसण्याची व्यवस्था नाही. वाचकांनी स्वतः निर्णय करावा की शिक्षेची कोणती पद्धती योग्य आहे? 

दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा

लोकशाहीमध्ये बलात्काराला शिक्षापात्र अपराध मानले गेलेले आहे व्याभिचाराला नाही. मात्र शरियतमध्ये दोन्ही गुन्ह्यांमध्ये कॅपिटल पनिशमेंटची तरतूद आहे. यातील आरोपी अविवाहित असतील तर 100 फटके आणि विवाहित असतील तर दगडाने ठेचून मारणे. बलात्काराला बळी पडलेल्या महिलेला अर्थातच शिक्षा होत नाही. 

या शिक्षेची खूप चर्चा होत असते. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली जात नाही ती ही की, व्याभिचार असो का बलात्कार हे असे सामाजिक अपराध आहेत की ज्यामुळे समाज उध्वस्त होतो म्हणून याची शिक्षाही कठोर आहे. 

इस्लामी शिक्षांसंबंधीची कारण मिमांसा

इस्लामी शिक्षांना भले ही रानटी म्हटले जात असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे ती ही की माणसं जर रानटी असतील त्यांना शिक्षा सुद्धा रानटीच देणे योग्य होईल ना? एका निरपराध तरूणीवर बलात्कार करणे रानटीपणा नव्हे काय? मग त्याला भर चौकात लटकविले तर तो रानटीपणा कसा? त्याने केलेले कृत्य रानटी नाही आणि शिक्षा मात्र रानटी. हा उरफाटा तर्क त्याच लोकांच्या गळी पडू शकतो ज्यांना इस्लामोफोबिया नामक आजार झालेला आहे. बलात्कार आणि व्याभिचार हे किती घृणित अपराध आहेत हे दिल्ली येथील वर उल्लेखित घटनेमधून स्पष्ट झालेले आहे. कृष्णा तिवारी आणि त्या सैनिकाच्या पुत्रवधू यांच्यातील अनैतिक संबंधाचे मुल्य कृष्णा तिवारीच्या पत्नी आणि तीन मुलांना आपले जीव देवून चुकवावे लागले, शिवाय हे हत्याकांड करणाऱ्या माजी सैनिकाला शिक्षा होईल ती वेगळीच. समाजामध्ये बदनामी झाली त्याचा तर काही हिशोबच नाही, असे हत्याकांड देशात अनेक ठिकाणी कुठे ना कुठे घडतच असतात. प्रचलित कायदा, कोर्ट, पोलीस, वकील आणि न्यायाधीश हे सर्व मिळून अशा गुन्ह्यांना नियंत्रणात आणू शकत नाहीत, हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. अशा परिस्थितीत सऊदी अरबसारख्या देशात जेथे शरई शिक्षांची तरतूद आहे. तिथल्या महिलाच नव्हे तर सगळा समाज गुन्हेगारांपासून सुरक्षित आहे, याची नोंद सुजान वाचक घेतीलच. असेही नाही की सऊदी अरबमध्ये सगळीकडे हात तुटके लोक दिसत असतात किंवा रोज कोणाला ना कोणाला दगडाने ठेचून मारले जाते. एकाचा हात कापला तर अनेक वर्षे कोणी चोरी करण्याचे धाडस करू शकत नाही. मक्का आणि मदिना दोन्ही ठिकाणी हरम शरीफ (परिसर) ला खेटूनच अनेक सोन्या-चांदीची दुकाने आहेत. ते लोक अजान होताच शटर न डाऊन करता नमाजला जातात व परत येतात. पण एक गुंज सोन्याची चोरी होत नाही. आपल्याकडे साध्या अपघात झालेल्या ट्रकमधील दारूच्या बाटल्या अपघात स्थळाजवळच्या गावातील संभ्रांत लोक लुटून नेतात. हा लोकशाही व्यवस्था आणि शरई व्यवस्थेमधील फरक आहे.

शरई शिक्षा कठोर आहेत यात वाद नाही. पण त्या देण्यापूर्वी ईश्वराने लोक गुन्हेगारीकडे वळू नयेत याची तरतूद करण्याची जबाबदारी शासन तसेच जनतेवर टाकलेली आहे. इस्लामी इबादती विशेषतः पाच वेळेसची नमाज अनिवार्य करून अगोदर सामाजिक वातावरण पवित्र करण्याची जबाबदारी सरकार आणि नागरिकांवर आहे. त्यानंतर नागरिकांना सर्व सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. या सर्व सोयी सुविधा मिळूनही जर कोणी गुन्हे करत असेल तर मात्र त्याला कठोर शिक्षेची तरतूद केलेली आहे, यात चुकीचे काय आहे? उदा. पुरूषांच्या पॉलिगामस प्रवृत्तीचा विचार करून चार विवाह करण्याची सोय करून दिलेली आहे. मात्र या सोयीचा लाभ घेऊनही कोणी बलात्कार किंवा व्याभिचार करत असेल तर मात्र त्याला दगडाने ठेचल्याशिवाय पर्याय नाही. अशा लिंगपिसाटांसाठी हीच शिक्षा योग्य आहे की नाही? याचा निर्णय वाचकांनी स्वतः करावा. रोजगार देण्याची जबाबदारी शरियतने सरकारवर टाकलेली आहे. रोजगार उपलब्ध असूनही जर कोणी चोरी करत असेल तर त्याचा हात कापण्याशिवाय कुठली योग्य शिक्षा होऊ शकेल? याचाही विचार वाचकांनी करावा. 

थोडक्यात मणुष्यप्राणी हा ईश्वरीय प्रॉड्नट आहे व तो किती गुणी आहे हे ईश्वराला माहित आहे. तसेच शरई व्यवस्था ही ईश्वरीय व्यवस्था आहे म्हणून ती त्रुटीविरहित आहे. कायदा आणि शिक्षा यांच्या बाबतीत एक अंतिम सत्य येथे नमूद करतो ते असे की, अशा शिक्षांची भीती सज्जनाला असण्याची गरजच नाही आणि दुर्जनाला ती असायलाच हवी, तरच समाज सुरक्षित राहील अन्यथा नाही. मला आशा आहे शरई व्यवस्थेअंतर्गत कठोर शिक्षेचा भाग वाचकांच्या लक्षात आलेला असेल. ज्यांच्या लक्षात आला नाही त्यांच्या बाबतीत दुआ करतो की, ’’ऐ अल्लाह ! त्यांना क्षमा कर ते भौतिकतेमध्ये एवढे गुरफटलेले आहेत की त्यांची सद्सद्विवेकबुद्धी सुद्धा बाधित झालेली आहे.’’ खरे पाहता मटेरियालिस्टीक जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये एवढी उच्च आणि पवित्र संवेदनाच नसते जी की इस्लामी आयडियालॉजीला समजण्यासाठी आवश्यक असते. ’’अल्लाह आपल्या सर्वांना अशी पवित्र संवेदना आणि सद्बुद्धी देओ.’’ आमीन.

- एम.आय.शेख


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget