Articles by "इस्लामी व्यवस्था"


हजरत    अबुबकर,    इस्लामचे   दुसरे खलीफा. यांच्या काळात अमरो  बिनुल  आस   हे पॅलेस्टाईनचे राज्यपाल होते. पॅलेस्टाईनच्या इतर शहरांवर विजय मिळविल्यानंतर बैतुलमुकद्दसकडे ते निघाले. तिथे ख्रिस्ती किल्लाबंद होऊन  त्यांच्याशी   लढत  देत राहिले. त्यांचा धीर खचल्यानंतर त्यांनी समेट घडवण्याचा प्रस्ताव सादर केला. अमरो बिनुल आस यांचे सहकारी अबु  उबैदा  यांना  पत्र पाठवून कळविले की बैतुलमुकद्दस जिंकण्यासाठी आपली प्रतिक्षा होत आहे. ह. उमर (र.) यांनी आपल्या इतर सहकऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला. ह. उस्मान यांनी म्हटले की ख्रिस्ती लोकांचे मनोबल   खचले  आहे.  जर  आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याशी करार केला नाही तर ते आणखीनच खचून जातील आणि  मुस्लिम लोक त्यांना मान देत नाहीत. त्यांना तुच्छ समजतात अशी त्यांची धारणा होऊन ते कोणत्याही अटी न घाल ता स्वतःच पराभूत होतील. ह. अली (र.) यांनी त्या उलट दुसरा विचार मांडला. उस्मान (र.) यांनी तो स्वीकारला. ह. उमर भले मोठे लष्कर आणि शस्त्रास्त्रे घेऊन बैतुलमुकद्दसच्या दिशेने निघतील असा कयास लोकांनी बांधला होता. भव्यदिव्य लष्कर तर सोडाच ते निघाले त्या वेळी त्यांचयाकडे तंबू उभारण्यासाठीही काही सामग्री नव्हती. एक घोडा होता पण ह. उमर यांच्या स्वारीची वार्ता सर्वत्र पोहोचली. जिथं जिथं ही बातमी पोहोचली तिथल्या लोकांचे धाबे दणाणले. शासकीय अधिकाऱ्यांना आधीच कळवले गेले होते. त्यांनी जाबिया या ठिकाणी येऊन त्याची भेट घेतली. यझीद बिन अबी सुफियान आणि खालिद बिन वलीद यांनी याच ठिकाणी त्यांचे स्वागत केले.

सीरिया या देशात रेशिम असल्याने त्यांच्या अधिकारीवर्गामध्ये  अरबांसारखे  साधेपण  गायब झाले होते. ह. उमर (र.) यांना भेटायला हे लोक आले तेव्हा त्यांनी रेशिमची वस्त्रे परिधान केलेली होती. आपल्या हावभावाने हे लोक बिगर अरबांसारखे दिसत होते. ह. उमर  यांना  ही    अवस्था  पाहून  राग  आल ा. ते घोड्यावरून खाली उतरले आणि जमिनीवरील खडे हातात   घेऊन   त्यांच्या   दिशेने  भिरकावल े. म्हणाले की एवढ्या लवकर तुम्हाला अरबांच्या साधेपणाच्या जीवनाचा विसर पडला?

जाबिया या ठिकाणी  बराच  काळ  ते थांबले होते. याच ठिकाणी बैतुलमकद्दसचा करार संमत झाला. त्या लिखित करारावर सर्वांच्या सह्या घेतल्या गेल्या. करार संमत झाल्यावर ह. उमर (र.) बैतुलमकद्दसकडे   निघाले.  त्यांच्या  घोड्याचे  नाल झिजले होते, म्हणून घोडा एकेका पावलावर थांबत होता. उमर (र.) घोड्यावरून खाली उतरले आणि  पायीच निघाले. बैतुलमकद्दसच्या जवळ अबु उबैदा आणि इतर अधिकारी त्यांच्या  स्वागतासाठी  पुढे आले. तिथल्या मुस्लिम लोकांना लाज वाटल्यासारखे झाले. एवढ्या बलाढ्या अधिराज्याचा अधिपती अशी वस्त्रे परिधान करतो हे त्यांना पसंत नव्हते. त्यांनी त्यांच्यासाठी तुर्की देशाचा एक घोडा आणि आलिशान वस्त्रे परिधान करण्यासाठी उपलब्ध करून दिली. ते घेण्यास नकार देत ह. उमर (र.) म्हणाले की आम्हाला मानसन्मान मिळाला तो इस्लाम धर्मामुळे मिळाला आहे आणि तोच सन्मान आम्हाला पुरेसा आहे.

(संदर्भ – अल-फारुक, अल्लामा शिबली नोमानी) 

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमदहे लोक दुर्बलांचे, शोषितांचे, वंचितांचे भार उचलतात, पाहुणचार करतात, गरीबांच्या तक्रारींना वाईट मानत नाहीत, जे अपंग आहेत त्यांच्या गरजा भागवतात, अनाथांशी दयेने वागतात. आपत्ती कोसळल्यास संयम ढळू देत नाहीत. वचनपूर्ती करतात. आदरसन्मानाचे रक्षण करतात. ज्ञानी लोकांचा मान राखतात. त्यांना हवी असलेली मदत करतात. ज्या गोष्टींपासून ज्ञानी लोक सत्ताधाऱ्यांना रोखतात त्याचे आचरण करतात. त्यांच्याविषयी चांगले विचार बाळगतात. धार्मिक लोकांवर प्रेम करतात. दुर्बलांशी चांगला व्यवहार करतात. त्यांच्याशी न्याय्य वर्तन करतात. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी पुढे येतात. सत्यासमोर नतमस्तक होतात. लोकांच्या तक्रारींचे निवारण करतात. धार्मिक प्रवृत्तीचे असतात. आराधना-उपासना करतात. म्हणजे त्यांचे एकूण राजकारण याच सद्गुणांवर आणि वैशिष्ट्यांवर आधारित असते. वरील सर्व सद्गुण चांगल्या राजकारण्याचे द्योतक आहेत. ते एखाद्या लहानशा भूभागाचे शासक असतो की एखाद्या अधिराज्याचे अधिपती असोत, हे राजकीय सद्गुण त्यांच्यामध्ये आवश्यक आहेत.

याउलट जेव्हा ईश्वर कुणा सत्ताधारी शासकाकडून त्याचे राज्य हिरावून घेतो तेव्हा तर अशा शासनकर्त्यामध्ये वाईट गुण निर्माण होतात. कारण त्यांच्यामध्ये राजकीय सद्गुण लयाला गेलेले असतात. त्यांच्या हातून त्यांचे राज्य काढून घेऊन ईश्वर दुसऱ्या एखाद्या जनसमूहातील शासकाच्या स्वाधीन करतो, त्यांना अशा शक्तींच्या लोकसमूहांच्या अधीन करतो, ज्यांच्यामध्ये वर उल्लेखित सद्गुण असतात. त्यांच्या कुकृत्यांमुळे त्यांची समृद्धी, त्यांचा मानसन्मान सर्वकाही त्यांना गमवावे लागते. पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की, “जेव्हा आम्ही एखाद्या देशाला, राष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचे ठरवतो तेव्हा त्या राष्ट्रात धनसंपन्न लोकांची संख्या काढतो, मग असे लोक कुकर्म करू लागतात आणि त्यासाठी त्यांच्यावर प्रकोप कोसळवतो. त्यांना नेस्तनाबूद करून टाकतो.” एखाद्या समुदायाची सत्ता काढून टाकण्याचे मोठे संकेत असे की तो समुदाय आपल्या राज्यातील विद्वान, ज्ञानसंपन्न आणि लोकहितासाठी झटणारे, मानवतेच्या कल्याणासाठी वाहून घेतलेल्यांचा मानसन्मान करत नाही. एखाद्या समुदायात अशी वृत्ती दिसायला सुरुवात झाली तर त्या समुदायाचे त्या अनुषंगाने त्या राष्ट्राचे पतन जवळ आहे असे समजावे. ज्या समुदायाचे ईश्वर काही वाईट करण्याचे ठरवतो तेव्हा कोणतीही शक्ती त्या समुदायाला, राष्ट्राला वाचवू शकत नाही. पराभूत राष्ट्र लवकरच नामशेष लोते.

गुलाम राष्ट्र सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्वाखाली गेले असल्याने त्यांच्या अमलाखाली असते. त्यांच्याच मेहेरबानीने ते जगू लागते. त्यांचे मनोबल खचून जाते. त्यांची संततीदेखील कमकुवत होत जाते. त्यांचा जन्मदरही खाली होत जातो. ते आळशी बनतात. आळशी झाल्याने आणखीनच धीर खचतो. दुसऱ्या राष्ट्राच्या, लोकसमूहाच्या वर्चस्वाखाली जगत असताना त्यांच्या आपसातील वांशिक संबंध ढिले पडत जातात. त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी होत जाते. अशा लोकांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या भावना दिवसेंदिवस कमी कमी होत जातात. जगण्यात रस नसतो. ते स्वतःचेदेखील रक्षण करू शकत नाहीत. अशा मनोबलाबरोबरच त्यांची शारीरिक शक्तीदेखील कमकुवत होत जाते. कारण सत्ताधारी समूह त्यांच्या गत वैभवाला नष्ट करू पाहात आहे. कोणत्याही आक्रमण करणाऱ्या शक्तीसमोर ते आत्मसमर्पण करत राहतात.

पराभूत राष्ट्र-जनसमुदाय आपल्यावर ताबा मिळविलेल्याच्या आहारी जातात. फक्त शारीरिक गुलामीच नव्हे तर मानसिक गुलामीसुद्धा पत्करतात. त्याचा असा गैरसमज झालेला असतो की ज्यांनी त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे त्यांच्यामध्ये खरेच कमालीचे सामर्थ्य असेल. ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये घर करून बसल्यानंतर तो विजयी राष्ट्राकडे आकर्षित होत जातो. त्याची प्रत्येक कृती आणि उक्ती त्यांना लोभनीय वाटू लागते. त्यांच्यासारखेच जगणे अंगीकारण्याच्या प्रयत्नात असतात. स्वतः आपल्यामध्ये त्याला अवगुण दिसू लागतात आणि स्वतःशीच ते घृणा करू लागतात.

(संदर्भ- इब्ने खल्दून, मुकद्दमा भाग-१)

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद


Samarkand

एकेकाळी म्हणजे रशिया येथील झार बादशाहांच्या सत्तेपूर्वी समरकंद नामक एक लहानसा देश होता. त्यावर मुस्लिम सैन्यांनी चढाई करून ते जिंकले होते. त्या वेळी तिथे एक रहस्यमय धर्माचे लोक राहात होते. आपल्या देशावर मुस्लिम सैन्यांनी हल्ला करून काबिज केल्याने ते दुःखी आणि रागावले होते. त्यांनी आपसात ठरवले की आपल्याकडील एका प्रतिनिधीला दमास्कस येथील मुस्लिम राजवटीचे अमीर-उल-मोमिनीन यांच्याकडे पाठवून त्यांना विनंती करावी. मुस्लिम लष्कराने आम्हाला अंधारात ठेवून कसा आमचा देश काबिज केला याची त्यांना माहिती देऊ.

यासाठी त्यांनी आपला प्रतिनिधी दमास्कसला पाठवला. त्याला अशी चिंता लागली की त्या मुस्लिम जगताचे सर्वेसर्वा अमीर-उल-मोमिनीनकडे जायचे कसे? त्याआधी त्यांचे अधिराज्य आशिया, आफ्रिका, यूरोप खंडांमध्ये होते. अशा अधिपती शासनकर्त्याकडे जायची त्याला भीती वाटू लागली. बऱ्याच खोट्या गोष्टी त्या वेळी त्या राजवटीबाबत प्रसिद्ध होत्या. लहानसहान चुकांना माफ केले जात नाही. त्यांना न आवडणारी गोष्ट जरी त्यांच्यासमोर कुणी बोलली तरी त्याला शिक्षा दिली जात असे. तो या गोष्टींमुळे विचलित आणि भयभीत अवस्थेतच कसाबसा दमास्कस येथे पोहोचल्यावर शहराच्या अलीशान इमारती पाहताच त्याच्यावर आणखीनच धाक बसला. चालता चालता एका भव्यदिव्य इमारतीसमोर जाऊन उभा राहिला. लोक त्या इमारतीतून बाहेर पडत होते, तर काही लोक आतमध्ये जात होते. कुणी कुणाशी बोलत नव्हते. तो प्रतिनिधी त्या इमारतीला राजाचा महाल समजत होता. पण इतक्यात भव्या इमारतीवर कुणाचा पहारा नसल्याचे त्याला दिसले. लोक स्वतंत्रपणे ये-जा करत होते. हे पाहून तो अचंबित झाला.

त्या लोकांमधून तोही चालू लागला. काय करावे त्याला सुचत नव्हते. एका अनोळखी इसमानं त्याला विचारलं, “काय हवंय? का आलात? कोण तुम्ही?”

याचं त्याने लगेच उत्तर दिलं, “मला खलीफांना भेटायचे आहे.”

एवढं सांगून तो स्वत:च घाबरू लागला. आपल्याकडून काही चुकलं की काय खलीफांचं नाव आदराणं म्हणायचं होतं की काय? अशा विचारांनी भिऊ लागला.

यावर तेथील माणसानं त्याला विचारलं, “मी तुला त्यांचं घर दाखवलं तर तुला आवडेल का?”

तो प्रतिनिधी म्हणाला, “म्हणजे हा त्यांचा महाल नाही वाटतं!”

“नाही, ही तर मशीद आहे. तुम्ही नमाज अदा केली का?” त्या अनोळखी व्यक्तीनं विचारलं.

तो प्रतिनिधी म्हणाला, “नाही. मला नमाज काय असते याची कल्पना नाही.”

यावर त्या अनोळखी माणसानं त्याच्या धर्माविषयी विचारलं. तो प्रतिनिधी म्हणाला, “मी समरकंदच्या काहिन पुरोहित लोकांच्या धर्माचं पालन करतो. ते सांगतात तसं करतो. धर्म काय असतो आणि काय नसतो याची मला कल्पना नाही.”

“तुमचा विधाता पालनकर्ता कोण?”

असं विचारल्यावर त्या प्रतिनिधीनं उत्तर दिलं, “समरकंद येथील धर्मस्थळातील भयभित करणारे देवता.”

“मग तुम्ही काही मागितल्यावर ते देतात काय आणि आजारी प़डल्यावर बरे करतात काय?”

प्रतिनिधी म्हणाला, “मला काहीही माहीत नाही.”

यावर त्या अनोळखी माणसानं समरकंदच्या त्या रहिवाशाला इस्लामविषयी सर्व माहिती दिली आणि म्हणाला, “चला आता मी तुम्हाला खलीफांचं घर दाखवतो.”

मशिदीच्या दुसऱ्या दरवाजातून ते दोघे बाहेर पडले आणि समोर एक सामान्य माणसाच्या घरासारखं एक घर होतं. समरकंदचा नागरिक म्हणाला, “तुम्ही मला इथं का आणलं? इथं तर ते गृहस्त मातीपासून भिंत बांधण्याचं काम करत आहेत.”

यावर दमास्कसच्या त्या नागरिकानं सांगितलं, “होय. हेच खलीफा आहेत.”

समरकंदचा प्रतिनिधी म्हणाला, “तुम्ही माझी चेष्टा करताय.”

तो माणूस म्हणाला, “नाही. मी अजिबात चेष्टा करत नाही. हेच अमीर-उल-मोमिनीन आहेत.”

दरवाजावर हाक दिल्यावर खलीफा स्वतः बाहेर आले. समरकंदच्या नागरिकाला येण्याचं कारण विचारलं असता त्याने सांगितलं, “आमच्या मर्जीविना मुस्लिम सैन्यानं आमच्या देशावर कबजा केलाय.”

हे ऐकल्यावर खलीफा यांनी एका कागदावर काहीतरी लिहून त्याला दिलं आणि म्हटलं, “हे पत्र तिथल्या राज्यपालांकडे द्या.”

बरेच दिवस चालत तो समरकंदला परतला. त्यानं आपल्या धर्मपंडितांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. सर्वांना विश्वास नव्हता की असे काही घडू शकेल. ते पत्र देण्यासाठी तेथील लोक मशिदीत आले. आणखीन एक माणूस त्या मशिदीत आला. दुवळे व सामान्य माणसासारखे दिसणारे ते काझी होते. त्यांनी ते पत्र वाचलं आणि समरकंदच्या सत्ताधाऱ्यांना वोलाबून घेतले. तिथल्या धर्मपंडितांना आपला अहवाल त्यांच्यासमोर देण्यास सांगण्यात आलं.

तेव्हा ते धर्मपंडित म्हणाले, “यांनी आमच्या देशावर आमची संमती नसताना ताबा घेतला आहे.”

मग काझींनी मुस्लिम सत्ताधिकाऱ्याला विचारलं, “हे सत्य आहे काय?”

त्यावर त्यांनी उत्तर दिलं, “नाही. युद्ध धोक्याचेच नाव आहे.”

यावर काझींनी त्यांना विचारलं, “तुम्ही इथल्या लोकांना आधी इस्लाम ध्रम समजावून सांगितला होता काय?”

याचं उत्तर त्यांनी नकारार्थी दिलं.

काझींनी निर्णय दिला की मुस्लिमांनी या देशातून निघून जावे आणि त्यांचा देश त्यांना परत करावा.

नंतर मुस्लिम सैन्य तो देश सोडून बाहेर निघताना पाहून तिथल्या धर्मपंडितांना आश्चर्य वाटलं. म्हणाले, “असा जर हा धर्म असेल तर आम्ही तो स्वीकारण्याची घोषणा करतो.”

त्यानंतर तिथले सर्व नागरिक इस्लामी राजवटीत सामील झाले.


(संदर्भ – मासिक ‘जिन्दगी’, दिल्ली, लेखक- शेख अली तनतानवी यांच्या उर्दू भाषांतरावरून)

(संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद)

इस्लामची आध्यात्मिक व्यवस्था काय आहे आणि जीवनाच्या संपूर्ण व्यवस्थेशी तिचा काय संबंध आहे? हा प्रश्न समजावून घेण्यासाठी हे आवश्यक आहे की प्रथम आम्ही त्या फरकाला चांगल्याप्रकारे जाणून घ्यावे जो आध्यात्माचा दृष्टीकोन आणि इतर धर्माच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनामध्ये आढळून येतो. हा फरक चांगल्या प्रकारे अवगत न झाल्याने पुष्कळदा असे होते की इस्लामच्या आध्यात्मिक व्यवस्थेवर चर्चा करीत असताना माणसाच्या मनात पुष्कळशा अशा कल्पना वावरू लागतात ज्या सर्वसाधारणत: "आध्यात्मिकता' या शब्दाशी संबंधित आहेत. या गोंधळात पडून माणसाला हे समजणे कठीण होते की शेवटी ही कसली आध्यात्मिक व्यवस्था आहे जी आत्म्याच्या सुपरिचित अशा क्षेत्रामधून जाऊन अस्तित्व व शरीराच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करते आणि केवळ हस्तक्षेप करत नसून त्यांच्यावर अधिकार गाजवू इच्छिते.
तत्वज्ञानाच्या व धर्माच्या जगामध्ये सामान्यपणे जी कल्पना अस्तित्वात आहे ती ही की आत्मा व शरीर परस्पर विरोधी आहेत, दोघांचे विश्व वेगळे आहे, दोघांच्या गरजा केवळ वेगळ्या नसून परस्पर विरोधी आहेत. या दोहोंची प्रगती एका वेळेस होणे शक्य नाही. आत्म्यासाठी शरीर आणि जडत्वाचे विश्व हा एक तुरूंग आहे. ऐहिक जीवनाच्या गरजा व आवडीनिवडी या त्या हातकडçा व बेडçा आहेत ज्यामध्ये आत्मा जखडला जातो. जगाचे व्यवहार व कारभार ही ती दलदल आहे, ज्यामध्ये रूतून आत्म्याची झेप संपुष्टात येते. या कल्पनेचा अनिवार्य परिणाम हा आहे की आध्यात्मिकता आणि भौतिकता यांचे मार्ग वेगवेगळे आहेत. ज्या लोकांनी भौतिकतेचा अंगीकार केला आहे ते पहिल्या पावलालाच निराश होतात की आध्यात्मिकतेचा अवलंब करणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. या गोष्टीने त्यांना भौतिकतेमध्ये गुरफूटन टाकलेले आहे. सामाजिक व्यवहार, संस्कृती, राजकारण, अर्थकारण वगैरे जीवनाची सारी क्षेत्रे आध्यात्मिकतेपासून वंचित झाली आणि त्यांनी आत्म्याच्या उन्नतीसाठी असे मार्ग शोधून काढले जे भौतिक जीवनाच्या बाहेरूनच निघून जातात. कारण त्यांच्या दृष्टीने आध्यात्मिक उन्नतीचा असा मार्ग तर शक्यच नाही जो सांसारिक जीवनामधून जातो. त्यांच्याजवळ आत्म्याच्या विकासासाठी शरीराला दुर्बल करणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी अशा शारीरिक कष्टाच्या पद्धती शोधून काढल्या ज्या मनाला आणि शरीराला अचेतन किंवा निर्जव करणाऱ्या होत्या. आत्म्याच्या प्रशिक्षणासाठी अरण्य, पर्वत आणि एकांतवासाला त्यांनी उचिततम स्थाने समजली. यासाठी संस्कृतीच्या गोंगाटाने ज्ञानध्यान साधनेमध्ये व्यत्यय न येवो, आत्म्याच्या विकासाची याशिवाय दुसरी कोणतीही पद्धत त्यांना आढळून आली नाही की जग आणि भौतिकतेपासून दूर व्हावे आणि या सर्व संबंधांना तोडून टाकावे जे तिला भौतिकतेच्या विश्वाशी निगडित ठेवतात.
शरीर व आत्म्याच्या या विरोधाने माणसाच्या पूर्णत्वाचेसुद्धा दोन वेगवेगळे अर्थ व उद्दिष्टे निर्माण केले. एकीकडे ऐहिक जीवनाचे पूर्णत्व, याचा अर्थ हा ठरला की माणसाने फक्त भौतिक साधनाने समृद्ध व्हावे. आणि त्याचा शेवट हा ठरला की माणसाने एक चांगला पक्षी, एक चांगली सुसर, एक उमदा घोडा व एक यशस्वी लांडगा बनावे. दुसरीकडे आध्यात्मिक जीवनाचे पूर्णत्व, ज्याचा अर्थ हा ठरला की माणसाने काही अलौकिक शक्ती¨चा स्वामी बनावे आणि त्याचा शेवट हा ठरला की माणसाने एक चांगला रेडिओ सेट, एक सामथ्र्यशाली दुर्बण आणि एक नाजुक सूक्ष्मदर्शक यंत्र बनावे किंवा त्याच्या दृष्टीने आणि त्याच्या शब्दांनी एका परिपूर्ण अशा दवाखान्याचे कार्य करावे.
इस्लामचा दृष्टिकोन याबाबतीत जगातील सर्व धार्मिक व तात्विक पद्धतीपासून वेगळा आहे. तो म्हणतो की मानवी आत्म्याला अल्लाहने जमिनीवर आपला प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे. त्याच्यावर काही जबाबदाऱ्या व काही कर्तव्ये सोपविली गेली आहेत आणि त्या पार पाडण्यासाठी त्याला एक उत्कृष्ट व अनुरूप असे शरीर दिलेले आहे. हे शरीर त्याला फक्त यासाठी दिले गेले आहे की त्याने आपल्या अधिकारांचा वापर आणि आपल्या संबंधित सेवेचे पालन करण्यासाठी त्याचा उपयोग करावा आणि म्हणून हे शरीर आत्म्याचा तुरूंग नसून त्याचा तो कारखाना आहे आणि या आत्म्याचा काही विकास जर शक्य आहे तर तो याच पद्धतीने शक्य आहे की त्याने या कारखान्यातील उपकरणे व शक्ती¨चा वापर करून आपली योग्यता प्रकट करावी आणि हे जगही एखादी शापित जागा नव्हे, ज्यामध्ये मानवी आत्मा येऊन फसलेला आहे, याउलट जग हे एक असे कार्यक्षेत्र आहे ज्यामध्ये कार्य करण्यासाठी अल्लाहने त्याला पाठविलेले आहे. येथील अगणित वस्तू त्याच्या अधिकारात दिल्या गेल्या आहेत. येथे प्रतिनिधीत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी इतर अनेक माणसेही त्याच्याबरोबर निर्माण केली गेली आहेत. येथे स्वाभाविक गरजेपोटी संस्कृती, समाज जीवन, व्यावहारिक जीवन, राजकारण आणि जीवनाची दुसरी क्षेत्रे त्याच्यासाठी अस्तित्वात आणली गेली आहेत. येथे जर आध्यात्मिक प्रगती शक्य असेल तर तिचे स्वरूप हे आहे की त्याने कार्यक्षेत्रात राहून कार्य करून आपली पात्रता सिद्ध करावी. हे जग म्हणजे त्याच्यासाठी एक परीक्षागृह आहे. जीवनाचा प्रत्येक पैलू आणि प्रत्येक क्षेत्र जणू एक प्रश्न पत्रिका आहे. घर, मोहल्ला, बाजार, मंडई, कार्यालय, कारखाना, शाळा, कचेरी, ठाणे, छावणी, संसद व रणमैदान या सर्व वेगवेगळ्या विषयावर प्रश्नपत्रिका आहेत. यापैकी एखादी जरी प्रश्नपत्रिका त्याने सोडविली नाही किंवा पुष्कळशा प्रश्नपत्रिका तशाच सोडून दिल्या तर परिणाम त्याला शून्य मिळण्याखेरीज दुसरा काय होऊ शकतो? यशाची आणि प्रगतीची शक्यता जर होऊ शकते तर ती याचप्रकारे होऊ शकते की त्याने त्याला देण्यात आलेला सर्व कालावधी आणि आपले सर्व लक्ष परीक्षा देण्यासाठी वापरावे आणि जितक्या प्रश्नपत्रिका त्याला दिल्या गेल्या असतील त्यामध्ये त्याने काही ना काही करून दाखवावे.
अशाप्रकारे इस्लाम जीवनाबद्दलच्या वैराग्याच्या कल्पनेला रद्द करतो आणि माणसासाठी आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग जीवनाबाहेर नसून तो जीवनामध्येच आहे हे स्पष्ट करतो. आत्म्याचा विकास, वृद्धी कल्याण व सफलतेची खरी जागा त्याच्या दृष्टीने जीवनाच्या ऐन प्रवाहामध्ये आहे, त्याच्या किनाऱ्यावर नव्हे. आता आम्हाला हे पाहिले पाहिजे की तो आमच्या प्रगती व अधोगतीची कसोटी काय ठरवितो? या प्रश्नाचे उत्तर याच प्रतिनिधीत्वाच्या कल्पनेमध्ये सामाविलेले आहे, ज्याचा मी नुकताच उल्लेख केलेला आहे. प्रतिनिधीच्या नात्याने माणूस आपल्या जीवनातील कृतीबद्दल अल्लाहसमोर उत्तरदायी आहे. त्याचे कर्तव्य हे आहे की जमिनीवर जे अधिकार आणि जी साधने त्याला दिली गेली आहेत त्याचा वापर त्याने अल्लाहच्या इच्छेनुसार करावा. ज्या निरनिराळ्या प्रकारच्या संबंधानी त्याला दुसऱ्या माणसांच्याबरोबर निगडित केले गेले आहे त्यांच्याबाबतीत त्याने अशी वर्तणूक ठेवावी जी अल्लाहला पसंत आहे आणि आपले एकूण एक प्रयत्न व श्रम या मार्गात कारणी लावावेत की ही पृथ्वी आणि त्याच्या जीवनाची व्यवस्था जितकी उत्कृष्ट व्हावी असे अल्लाह इच्छितो तितकी ती उत्कृष्ट व्हावी. या सेवेला माणूस जबाबदारी, कर्तव्यपालन, भक्ती व आज्ञापालन आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करणे इ. गोष्टीसह जितक्या जाणिवेने पार पाडील त्याचप्रमाणात तो अल्लाहच्या निकट होईल आणि अल्लाहची जवळीक इस्लामच्या दृष्टीने आध्यात्मिक प्रगती आहे. याउलट तो जितका आळशी, कामचुकार व कर्तव्यविन्मुख होईल किंवा तो जितका बंडखोर, द्रोही व अवज्ञाकारी होईल तितका तो अल्लाहपासून दूर होईल आणि ईश्वरापासून दूरत्वाचे नाव इस्लामी परिभाषेत आध्यात्मिक अवनती आहे.
या विवेचनावरून ही गोष्ट स्पष्ट होते की इस्लामी दृष्टिकोनानुसार धार्मिक व भौतिकवादी या दोघांचे कार्यक्षेत्र एकच आहे जेथे दोघे कार्य करतील, तथापि धार्मिक माणूस भौतिकवादी माणसांपासून अधिक तन्मयतेने कार्यम¾ असेल. घराच्या चार भिंतीपासून आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत जितके म्हणून जीवनाचे प्रश्न आहेत, धार्मिक माणूस भौतिकवादी माणसाप्रमाणे इतकेच नव्हे तर त्याच्यापेक्षा काही अधिक प्रश्नाचा तो विचार करील. तथापि जी गोष्ट त्या दोघांचे मार्ग वेगवेगळे करील ती त्यांचे अल्लाहसंबंधाने स्वरूप ही आहे. धार्मिक माणूस जे काही करील ते या जाणिवेने करेल की तो अल्लाहसमोर जबाबदार आहे. या गरजेपोटी करील की त्याला अल्लाहची प्रसन्नता प्राप्त व्हावी आणि या कायद्यानुसार करील जो अल्लाहने त्याच्यासाठी ठरवलेला आहे. याउलट भौतिकवादी माणूस जे काही करील ते बेजबाबदारीने करील. अल्लाहबद्दल बेपर्वा राहून करेल आणि आपल्या मनाला पटेल त्याच पद्धतीप्रमाणे करील. हाच फरक धार्मिक माणसाचे सारे भौतिक जीवन पूर्णपणे आध्यात्मिक जीवन बनवितो आणि भौतिकवादी माणसाचे सारे जीवन आध्यात्म्याच्या प्रकाशापासून वंचित करतो.
आता मी थोडक्यात आपणास दाखवून देईन की इस्लाम ऐहिक जीवनाच्या या बिकट मध्यप्रवाहातून माणसाच्या आध्यात्मिक उत्कर्षाचा मार्ग कसा तयार करतो.
1)    पहिला टप्‌पा- या मार्गाचे पहिले पाऊल ईमान आहे. म्हणजे माणसाच्या मनात व डोक्यात हा विचार कायम होतो की अल्लाहच त्याचा स्वामी, शासक व अल्लाह आहे. अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करणे हे त्याच्या सर्व प्रयत्नांचे उद्दिष्ट आहे आणि अल्लाहचीच आज्ञा हा त्याच्या जीवनाचा कायदा आहे. हा विचार जितका दृढ व प्रभावी होईल तितकीच दृढ इस्लामी विचारसरणी बनेल आणि त्या प्रमाणात दृढनिश्चर्याने माणूस आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर चालू शकेल.
2)    दुसरा टप्‌पा - या मार्गाचा दुसरा टप्‌पा आज्ञापालन हा आहे म्हणजे माणसाने जाणीवपूर्वक आपली स्वच्छंदता सोडावी, प्रत्यक्षात त्या अल्लाहची ताबेदारी पत्करावी ज्याला श्रद्धेने आपला ईश्वर मानतो. याच आज्ञापालनाचे नाव कुरआनच्या भाषेत "इस्लाम' आहे.
3)    तिसरा टप्‌पा- "तक्‌वा' संयम व विवेकाचा आहे. याला सर्वसामान्य भाषेत ""कर्तव्यपरायणता व जबाबदारीची जाणीव'' म्हणून ओळखले जाऊ शकते. तक्‌वा हा आहे की माणसाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये हे समजून कार्य करावे की त्याला आपल्या विचारांचा, वचनाचा आणि कृतीचा अल्लाहसमोर जाब द्यावयाचा आहे. अल्लाहने मनाई केलेल्या प्रत्येक कामापासून त्याने स्वत:ला रोखावे. अल्लाहने आज्ञा केलेली प्रत्येक सेवा पार पाडण्यासाठी त्याने तयार व्हावे आणि पूर्ण सावधानतेने हलाल व हराम, योग्य व अयोग्य आणि चांगले व वाईट यांच्यामध्ये भेदभाव करून तारतम्याने वागावे.
    शेवटचा व सर्वात उंच टप्‌पा "एहसान' (समर्पण) आहे. एहसानचा अर्थ हा आहे की माणसाची इच्छा अल्लाहच्या इच्छेशी एकरूप व्हावी जी काही अल्लाहची आवड आहे, माणसाची पण आवड तीच व्हावी आणि जे काही अल्लाहला नापसंत आहे त्यास त्यानेही मनापासून नापसंत करावे. अल्लाह आपल्या जमिनीवर ज्या वाईट गोष्टींना पाहू इच्छित नाही त्यापासून दासाने स्वत: वाचावे, इतकेच नव्हे तर त्यांना जगातून मिटवून टाकण्यासाठी त्याने आपली सारी शक्ती आणि आपली सारी साधने वापरावीत आणि ज्या चांगल्या गोष्टीनी अल्लाह आपल्या जमिनीला अलंकृत पाहू इच्छितो त्या चांगल्या गोष्टीनी माणसाने फक्त आपल्या स्वत:चे जीवनच अलंकृत करण्यात समाधान न मानता आपल्या प्राणाची बाजी लावून त्या चांगल्या गोष्टी जगामध्ये रुजविण्याचा व त्या प्रस्थापित करण्याचा त्याने प्रयत्न करावा. या स्थानावर पोहोचल्यावर दासास अल्लाहची अगदी जवळची निकटता प्राप्त होते आणि म्हणून हे माणसाच्या आध्यात्मिक विकासाचे उच्चतम स्थान आहे.
आध्यात्मिक प्रगतीचा हा मार्ग फक्त व्यक्तीसाठी नाही. तो जातिजमातीसाठी, समाजासाठी, देशासाठीसुद्धा आहे. एका व्यक्तीप्रमाणे एक समाजदेखील श्रद्धा, पुरेपूर पालन व ईशपरायणता या टप्‌प्यांवरून पुढे जाऊन "एहसान' च्या शेवटच्या टप्‌प्यांपर्यंत पोहचू शकतो आणि शासनदेखील आपल्या संपूर्ण व्यवस्थेसह श्रद्ध, आज्ञाधारक, संयमी व मोहसीन बनू शकते. इतकेच नव्हे तर वस्तुत: इस्लामचा हेतू त्याचवेळी पूर्णपणे पुरा होऊ शकतो जेव्हा एखादा देश संपूर्णपणे या मार्गावर चालू लागेल आणि एक संयमी व समर्पित असे शासन प्रस्थापित होईल.
आता आध्यात्मिक प्रशिक्षणाच्या व्यवस्थेवरदेखील एक नजर टाका जी व्यक्ती व समाज यांना याप्रकारे तयार करण्यासाठी इस्लामने निश्चित केली आहे. या व्यवस्थेचे चार स्तंभ आहेत.
1)    पहिला स्तंभ "नमाज' आहे. ही रोज पाच वेळा माणसाच्या मनात अल्लाहची आठवण ताजी करते, त्याचे भय दाखवते, त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करते, त्याचे आदेश वरचेवर समोर आणते आणि त्याच्या आज्ञापालनाचा सराव घडविते. ही नमाज केवळ वैयक्तिक नाही तर तिला सामूहिकपणे अदा करणे बंधनकारक ठरविले गेले आहे. म्हणजे सारा समाज सामूहिकरीत्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करण्यास तयार होतो.
2)    दुसरा स्तंभ "रोजा' आहे. तो प्रत्येक वर्ष संपूर्ण एक महिना मुस्लिम व्यक्तीला वैयक्तिकपणे व मुस्लिम समाजाला सामूहिकरीत्या संयमाचे प्रशिक्षण घडवितो.
3)    तिसरा स्तंभ "जकात' आहे. जी मुस्लिमांमध्ये संपत्तीचा त्याग एकमेकाबद्दल सहानुभूती व सहकार्याची भावना निर्माण करते. आजकाल लोक चुकीने "जकात' ला "कर' म्हणून संबोधितात. तथापि "जकात' कराहून अगदी भिन्न आहे. जकातचा अर्थ विकास व शुद्धी हा आहे. या शब्दाद्वारे इस्लाम ही वस्तुस्थिती माणसाच्या मनावर बिंबवू इच्छितो की अल्लाहच्या प्रेमापोटी आपल्या बांधवाचे जे आर्थिक साहाय्य तुम्ही कराल त्याने तुमच्या आत्म्याचा विकास घडून येईल व तुमचे आचरण शुद्ध होईल.
4)    चौथा स्तंभ "हज' आहे. जे ईशभक्तीच्या केंद्रबिंदूवर ईमानधारकांचा विश्वसमाज बनविते आणि असे एक आंतरराष्ट्रीय आंदोलन चालविते जे शेकडो वर्षांपासून सत्याच्या आवाहनाचा स्वीकार करण्याची तत्परता दाखवित आले आहे आणि अल्लाह इच्छिल तर शेवटपर्यंत ही तत्परता दाखवित राहील.

माणसाच्या आर्थिक व्यवहाराला न्याय व सचोटीवर कायम ठेवण्यासाठी इस्लामने काही तत्वे व काही मर्यादा ठरविलेल्या आहेत. संपत्तीचे उत्पादन, तिचा विनियोग व तिचे चलन यांची सारी व्यवस्था या तत्वांद्वारे व याच मर्यादेत झाली पाहिजे. संपत्तीच्या उत्पादनाच्या पद्धती आणि तिच्या चलनाचे स्वरूप काय असावे यासंबंधी इस्लामचा काही आग्रह नाही. या गोष्टी तर निरनिराळ्या काळात संस्कृतीच्या विकासाबरोबरच बनत व बदलत असतात. परिस्थिती व गरजेनुसार त्यांची निश्चिती आपोआप होत असचे. इस्लाम यासंबंधी फक्त ही गोष्ट इच्छितो की सर्व काळात व सर्व परिस्थितीत माणसाच्या आर्थिक व्यवहाराचे स्वरूप काही का असेना, ही तत्वे सतत कायम राहावीत आणि या मर्यादांचे पालन केले जावे.
इस्लामचा दृष्टिकोन हा आहे की ही पृथ्वी व तिच्या सर्व वस्तू अल्लाहने मानव जातीसाठी बनविल्या आहेत आणि प्रत्येक माणसाचा हा जन्मसिद्ध हक्क आहे की त्याने पृथ्वीपासून आपली उपजीविका प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. या हक्कांत सर्व मानव समान भागीदार आहेत. कोणासही या हक्कापासून वंचित केले जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे या बाबतीत एकास दुसऱ्यावर प्राधान्य दिले जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्ती वंश किंवा वर्गावर शरियतीनुसार असा कोणताही प्रतिबंध केला जाऊ शकत नाही की तो उपजीविकेच्या साधनापैकी काही साधने अवलंबण्याचा हकदार नाही अथवा काही धंद्याची दारे त्याच्यासाठी बंद आहेत. त्याचप्रमाणे शरियतनुसार असा भेदभावही केला जाऊ शकत नाही की एखादे अर्थार्जनाचे किंवा उपजीविकेचे साधन ठराविक वर्ग, वंश वा घराण्याची मिरासदारी बनून राहावे. अल्लाहच्या जमिनीवर त्याने निर्माण केलेल्या उपजीविकेच्या साधनांमधून आपला हिस्सा प्राप्त करण्याचा सर्व मानवांना समान हक्क आहे आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची संधी सर्वांना सारखी मिळाली पाहिजे.
नैसर्गिकरीत्या उपलब्ध असणाऱ्या सर्व देणग्या जर उपयुक्त बनविण्यामध्ये वा तयार करण्यामध्ये कोणाच्या मेहनतीचा वा कुशलतेचा संबंध नसेल तर त्या सर्वांसाठी मुक्त आहेत. प्रत्येक माणसाला हा हक्क आहे की त्याने आपल्या गरजेनुसार त्यांचा वापर करावा. नद्या, विहिरी व झऱ्यांचे पाणी, जंगलातील लाकूड, नैसर्गिक झाडांची फळे, आपोआप येणारे गवत व चारा हवा व पाणी, जंगलातील जनावरे, जमिनीच्या पुष्ठभागावर निघालेल्या खाणी- अशाप्रकारच्या वस्तूवर न कोणाची मिरासदारी कायम होऊ शकते न त्यांच्यावर असा प्रतिबंध लावला जाऊ शकतो की, ईश्वराच्या प्रजेने काही दिल्याशिवाय त्याचा उपयोग घेऊ नये. पण जे लोक व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर यापैकी कोणत्याही वस्तूचा वापर करू इच्छित असतील तर त्यांच्यावर कर बसविता येईल.
अल्लाहने माणसाच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी बनविल्या आहेत त्यांना ताब्यात घेऊन निष्कारण साठवून ठेवणे बेकायदेशीर. एक तर त्याचा स्वत: लाभ घ्या नाहीपेक्षा त्या सोडून द्या. म्हणजे निदान इतर लोक तरी त्याचा फायदा घेतील. याच तत्वांधारे कायदा हा निर्णय देतो की तीन वर्षांपेक्षा अधिक कालापर्यंत तुम्ही तुमची जमीन पडीक ठेवू शकत नाही. तिचा उपयोग शेतीसाठी, इमारतीसाठी व दुसऱ्या इतर कोणत्याही कामासाठी न कराल तर तीन वर्षानंतर ती जमीन तुम्ही सोडून दिलेली जमीन समजली जाईल आणि दुसरा कोणी तिचा वापर केला तर त्याविरूद्ध दावा चालणार नाही आणि इस्लामी शासनाला ही जमीन दुसऱ्या कोणासही देण्याचा अधिकार राहील.
जो माणूस प्रत्यक्षरीत्या निसर्गाच्या खजिन्यामधून एखादी वस्तू घेईल आणि आपल्या कष्टाने व कौशल्याने त्या वस्तूला उपयुक्त बनवील तर तो अशा वस्तूचा धनी आहे. उदा. एखादी पडीक जमीन जिच्यावर कोणाचाही मालकी हक्क नाही, ताब्यात घेऊन तिचा एखाद्या चांगल्या कामासाठी वापर केला तर अशा जमिनीवरून त्याला हकलले जाऊ शकत नाही. इस्लामी दृष्टिकोनानुसार जगामधील सर्व मालकी हक्काची सुरुवात अशाचप्रकारे झालेली आहे. सुरूवातीला जेव्हा जमिनीवर माणसाची वस्ती होऊ लागली तेव्हा सर्व वस्तू सर्वांच्यासाठी खुल्या होत्या. नंतर जेव्हा एखाद्याने एखाद्या खुल्या वस्तूला ताब्यात घेऊन तिला उपयुक्त बनविले तेव्हा तो तिचा मालक झाला म्हणजे त्याला हा हक्क प्राप्त झाला की त्याचा वापर त्याने निव्वळ स्वत:साठी करावा आणि इतर तिचा वापर करू इच्छित असतील तर त्यांचेकडून त्याने मोबदला घ्यावा. ही गोष्ट माणसाच्या साऱ्या आर्थिक व्यवहाराची स्वाभाविक अशी आधारशीला आहे आणि या आधारशीलेला आपल्या स्थानी कायम ठेवले पाहिजे. योग्य वैधानिक पद्धतीने जगामध्ये एखाद्याला जे मालकी हक्क प्राप्त होतात ते आदरास पात्र आहेत. प्रश्न होऊ शकतो तो फक्त या बाबतीत होऊ शकतो की एखादी मालकी वैधानिकरित्या योग्य आहे किंवा नाही? जी मालकी वैधानिकदृष्ट्या अनुचित असेल तिला नि:संशय रद्द केले गेले पाहिजे परंतु ती मालकी वैधानिकरीत्या योग्य व उचित असेल, तिला ताब्यात घेण्याचा किंवा त्यांच्या मालकांच्या वैधानिक हक्कांमध्ये कमीजास्त करण्याचा कोणत्याही शासनास किंवा कोणत्याही विधीमंडळास हक्क नाही. सार्वजनिक हिताचे नाव घेऊन एखादी अशी व्यवस्था प्रस्थापित केली जाऊ शकत नाही जी शरियतने दिलेल्या हक्कांना पायदळी तुडवते, समाजाच्या फायद्यासाठी व्यक्तीच्या मालकीवर जे प्रतिबंध शरियतने स्वत:च लावलेले आहेत त्यामध्ये कमी करणे हा जितका मोठा अत्याचार आहे तितकाच मोठा अत्याचार त्याच्यामध्ये वाढ करणे हा आहे. इस्लामी शासनाच्या कर्तव्यामध्ये हे आहे की त्याने व्यक्तीच्या वैधानिक हक्कांचे संरक्षण करावे आणि त्याच्याकडून समाजाचे ते हक्क प्राप्त करावेत ज्यांची जबाबदारी शरियतने त्यांच्यावर टाकलेली आहे.
अल्लाहने आपल्या देणग्यांच्या विभागणीमध्ये समानता अवलंबिलेली नाही परंतु बुद्धिमत्तेच्या आधारावर काही माणसांना दुसऱ्या काही माणसांच्यावर प्राधान्य दिलेले आहे. सौदर्य, चांगला आवाज, आरोग्य शारीरिक सामथ्र्य, बौद्धिक पात्रता, जन्मजात परिस्थिती आणि अशाचप्रकारच्या इतर गोष्टी साऱ्या माणसांना सारख्या लाभत नसतात. असाच प्रकार उपजीविकेचासुद्धा आहे. अल्लाहने बनविलेल्या प्रकृतीची ही निकड आहे की माणसांच्यामध्ये उपजीविकेबाबतीत फरक असावा आणि म्हणून त्या सर्व उपाययोजना इस्लामी दृष्टिकोनानुसार उद्दिष्ट व सिद्धान्त या दोहोबाबतीत चुकीच्या आहेत. या माणसामध्ये एक कृत्रिम समानता प्रस्थापित करण्यासाठी अवलंबिल्या जातात. इस्लाम जी समानता इच्छितो ती आजीविकेची समानता नव्हे तर आजीविका प्राप्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नामध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध व्हावी. तो इच्छितो की समाजामध्ये असा कायद्यांचे वा रूढींचे बंधन असू नये ज्यांच्या आधारावर एखादा माणूस आपली शक्ती व सामथ्र्यानुसार आर्थिक प्रयत्न करू शकत नाही आणि असा भेदभावही कायम राहू नये जो काही वर्गांना वांशिक आणि कौटुंबिक जन्मजात सुदैवाला कायमच्या कायदेशीर संरक्षणामध्ये बदलतो. या दोन्हीही पद्धती नैसर्गिक असमानतेच्या जागी जबरदस्तीने एक कृत्रिम समानता प्रस्थापित करतात आणि म्हणून इस्लाम त्यांना मिटवून समाजाच्या आर्थिक व्यवस्थेला अशा स्वाभाविक स्थितीवर आणून सोडू इच्छितो ज्यामध्ये प्रत्येक माणसाला प्रयत्नांची दारे खुली असतील. पण जे लोक इच्छितात की प्रयत्नांची साधने व परिणाम या बाबतीतदेखील सर्व लोकांना सक्तीने सारखे केले जावे, त्यांच्याशी इस्लाम सहमत नाही कारण ते स्वाभाविक असमानतेला कृत्रिम समानतेमध्ये बदलू इच्छितात. मानवी स्वभावाशी तीच व्यवस्था अधिक जवळची होऊ शकते ज्यामध्ये प्रत्येकजण आजीविकेच्या मैदानात आपल्या प्रयत्नांची सुरवात त्याच स्थानावरून आणि त्याच स्थितीमध्ये करील ज्यामध्ये अल्लाहने त्याला जन्मास घातले आहे. जो मोटार घेऊन आलेला आहे तो मोटारमधून जाईल. जो फक्त दोन पाय घेऊन आलेला आहे तो पायीच जाईल आणि जो लंगडा जन्मलेला आहे तो लंगडतच चालावयास सुरवात करील. समाजाचा कायदा ना असा झाला पाहिजे की मोटारवाल्याची मोटारीची कायमची मिरासदारी व्हावी आणि लंगडयासाठी मोटार प्राप्त करणे दुरापास्त व्हावे आणि ना तो असा असावा की सर्वांची दौड सक्तीने एका स्थानावरून व एका स्थितीत सुरू व्हावी आणि पुढे पावेतो त्यांना अनिवार्यपणे एक दुसऱ्याबरोबर जखडूनच जावे लागेल. याउलट कायदा असा असला पाहिजे की ज्यामध्ये या गोष्टीची उघड शक्यता असावी की ज्याने आपली दौड लंगडत सुरू केली होती तो आपल्या प्रयत्नाने व पात्रतेने मोटार मिळवू शकत असेल तर त्याला ती जरूर मिळावी आणि जो सुरूवातीस मोटारीमधून चालला होता तो नंतर आपल्या अपात्रतेमुळे लंगडा होऊन राहील तर राहील.
इस्लाम फक्त इतकेच इच्छित नाही की सामूहिक जीवनामध्ये ही आर्थिक संघर्ष खुली व निरंकुश असावा तर तो हेही इच्छितो की या मैदानामध्ये संघर्ष करणारे एक-दुसऱ्या बरोबर निर्दय व निष्ठुर असू नयेत. त्यांनी एक दुसऱ्याबरोबर सहानुभूती बाळगावी व एक दुसऱ्याचे साहाय्य करावे. तो एकीकडे आपल्या नैतिक शिकवणीने लोकांमध्ये ही विचारसरणी निर्माण करतो की आपल्या निराधार व लाचार बांधवांना आसरा द्यावा तर दुसरीकडे त्याची निकड ही आहे की समाजामध्ये कायम स्वरूपाची अशी एक संस्था असावी जी समर्थ व निराधार लोकांचे आश्रयस्थान राहील, जे लोक आर्थिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यास असमर्थ असतील ते या संस्थेचा फायदा घेतील. जे लोक काळाच्या दुर्घटनेमुळे या स्पर्धेत पडतील त्यांना या संस्थेने उठवून पुन्हा चालण्यास समर्थ केले पाहिजे आणि ज्या लोकांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आधाराची गरज असेल त्यांना या संस्थेकडून आधार मिळावा. या उद्दिष्टासाठी इस्लामने कायद्याने हे ठरविले आहे की देशातील सर्व एकत्रित मिळकतीवर वार्षिक अडीच टक्के आणि याचप्रकारे साऱ्या व्यापारी भांडवलावरसुद्धा वार्षिक अडीच टक्के जकात वसूल केला जावा. साऱ्या पिकाऊ शेतीच्या पिकावर दहा टक्के किंवा पाच टक्के हिस्सा घेतला जावा. गुराढोरांच्या एका विशिष्ट संख्येवर ठराविक प्रमाणात वार्षिक जकात घेतली जावी आणि ही सर्व धनदौलत गरीब, अनाथ आणि गरजवंताच्या साहाय्यासाठी वापरली जावी. हा एक असा सार्वजनिक विमा आहे ज्याच्या उपस्थितीत इस्लामी समाजामध्ये कोणीही व्यक्ती जीवनासाठी अत्यावश्यक अशा गरजांच्या बाबतीत कधीही वंचित राहू शकत नाही कोणी कष्ट करणारी व्यक्ती कधी इतकी विवश होऊ शकत नाही की उपासमारीच्या भयाने नोकरीच्या त्या अटी मंजूर करील ज्या कारखानदार व जामिनदार घालू इच्छित असेल. कोणत्याही व्यक्तीची शक्ती किमान पातळीच्या खाली येऊ शकत नाही जी आर्थिक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आवश्यक आहे.
व्यक्ती आणि समाजामध्ये इस्लाम असा समन्वय प्रस्थापित करू इच्छितो की ज्यामध्ये व्यक्तीचे आणि तिचे स्वातंÍय अबाधित राहावे आणि सार्वजनिक हितासाठी त्यांचे स्वतंÍय हानीकारक न ठरता ते एकमेकांना पूरक ठरावेत. इस्लाम अशा कोणत्याही राजकीय किंवा आर्थिक संघटनेला पसंत करत नाही जी व्यक्तिला समाजामध्ये मिसळवून टाकते आणि तिच्यासाठी ती स्वतंत्रता ठेवीत नाही जी तिच्या व्यक्तिमत्वाच्या योग्य विकासासाठी आवश्यक आहे. एखाद्या देशाच्या उत्पादनाच्या सर्व साधनांचे राष्ट्रीयीकरण करणे याचा अनिवार्य परिणाम हा होतो की देशातील सर्वजण समाजाच्या तावडीत सापडतात अशा स्थितीत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे संरक्षण करणे व ते कायम राखणे अत्यंत कठीणच नव्हे तर अशक्य आहे. व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी ज्याप्रमाणे राजकीय व सामाजिक स्वातंÍय आवश्यक आहे त्याप्रमाणे आर्थिक स्वातंÍयही फार मोठ्या मर्यादेपर्यंत आवश्यक आहे. आम्ही जर व्यक्तित्वाचे अगदी समूळ उच्चाटन करू इच्छित नसलो तर आमच्या सार्वजनिक जीवनात इतकी मोकळीक अवश्य असली पाहिजे की अल्लाहच्या कोणाही दासाला आपली आजीविका स्वतंत्रपणे प्राप्त करून आपल्या सद्‌सद्‌विवेक बुद्धीला स्थिर राखता आले पाहिजे आणि आपल्या मानसिक व नैतिक शक्ती¨चा आपल्या प्रवृत्तीनुसार विकास घडवून आणता आला पाहिजे. ठराविक प्रमाणात दिले जाणारे अन्न जरी ते भरपूर असले तरी जर त्याच्या किल्ल्या दुसऱ्याच्या हाती असतील तर ते अन्न उचित नाही कारण त्यामुळे उÈाणाला जी गवसणी बसते त्याची भरपाई शारीरिक लÇपणा कधीही करू शकत नाही.

इस्लामच्या सामाजिक व्यवस्थेची आधारशीला "जगाचे सर्व लोक हे एका मातापित्याची संतान आहेत' हे तत्व आहे. अल्लाहने सर्वप्रथम एक मानवी जोडपे जन्मास घातले, या जोडप्यापासून ते सर्व लोक जन्मास आले जे जगामध्ये वसलेले आहेत. सुरवातीस काही काळापर्यंत या जोडप्याच्या संततीचा एकच समाज होता, त्यांचा धर्म एक होता, त्यांची भाषा एक होती, त्यांच्यामध्ये कसलाही मतभेद नव्‌हता, परंतु जसजशी त्यांची संख्या वाढत गेली, ते जमिनीवर पसरत गेले आणि या फैलावामुळे स्वाभाविकरीत्या निरनिराळे वंश, राष्ट्रे व जातीजमातीमध्ये त्यांची विभागणी झाली. त्यांच्या भाषा वेगळ्या झाल्या, त्यांचे पोशाख वेगळे झाले, त्यांची राहणी - सरणी वेगळी झाली आणि ठिकठिकाणच्या हवामानामुळे त्यांचे रंगरूप व आकार बदलले गेले. ही सर्व विविधता स्वाभाविक आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात आहे आणि म्हणून इस्लाम तिचा एक सत्य म्हणून स्वीकार करतो. तो तिला मिटवू इच्छित नाही याउलट तो तिची उपयुक्तता मान्य करतो. एक दुसऱ्याशी परिचय व सहकार्य यामुळेच शक्य आहे. परंतु या विविधतेच्या आधारावर रंग, भाषा, राष्ट्रीयत्व व नागरिकत्व वगैरे जे पूर्वग्रह निर्माण झाले आहेत त्या सर्वांना इस्लाम चुकीचे ठरवितो. माणसामाणसामध्ये उच्चनीचता, पुनीत व पतीत, स्वकीय व परकीय वगैरे जे भेदभाव जन्माच्या आधारावर केले गेले आहेत ते सर्व इस्लामच्या दृष्टीने अज्ञानमूलक आहेत. इस्लाम जगातील साऱ्या लोकांना सांगतो की तुम्ही सर्व एका आई-बापाची संतती आहात, एक दुसऱ्याचे भाऊभाऊ आहात आणि माणसाच्या नात्याने समान आहात.
मानवतेबद्दलच्या या एकत्व विचाराचा स्वीकार केल्यानंतर इस्लाम सांगतो की माणसामाणसामध्ये खरा फरक जर कोणता होऊ शकतो तर तो वर्ण, वंश, राष्ट­, भाषेचा नव्हे तर विचार, आचार व तत्वांचा होऊ शकतो. एका आईची दोन मुले घराण्याच्या दृष्टीने एकच असली तरी त्यांचे आचार व विचार एकदुसऱ्याहून भिन्न असतील तर त्यांचे जीवनाचे मार्गही वेगवेगळे होतील. याउलट एक पूर्वेला व एक पश्चिमेला अशा दूरच्या अंतरावर राहणारी दोन माणसे जाहिरपणे एक दुसऱ्यापासून कितीही दूर असली तरी त्यांचे विचार एक व आचार मिळतेजुळते असतील तर त्यांच्या जीवनाचा मार्ग एक असेल. या दृष्टिकोनाच्या आधारावर इस्लाम जगातील सर्व वंश, जन्मभूमी आणि राष्ट्राच्या आधारावरील समाजाच्या ऐवजी एक वैचारिक, कृतीशील, तात्विक समाजाची उभारणी करतो, ज्यामध्ये माणूस माणसाला आपल्या जन्माच्या आधारावर भेटत नाही तर तो एक लक्ष्य व एक वैचारिक पद्धतीमुळे एक दुसऱ्यात मिसळतो. ती प्रत्येक व्यक्ती जी अल्लाहला आपला स्वामी व उपास्य मानते आणि पैगंबरांनी आणलेल्या शिकवणीला आपल्या जीवनाची नियमावली म्हणून मान्य करते ती या समाजामध्ये सामील होऊ शकते मग ती आफ्रिकेची राहणारी असो वा अमेरिकेची, सामी वंशाची असो वा आर्य वंशाची, मग ती काळी असो वा गोरी, मग ती हिंदी बोलणारी असो वा अरबी. जे लोक या समाजामध्ये सामील होतील त्या सर्वांचे हक्क व सामाजिक दर्जा समान असेल त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वांशिक, राष्ट्रीय वा वर्गय भेदभाव असणार नाहीत, कोणी उच्च-नीच असणार नाही, कसलीही अस्पृश्यता त्यांच्यामध्ये नसेल, एखाद्याचा हात लागला की कोणी अशुद्ध होणार नाही.
रोटीबेटी व्यवहार व परस्पर भेटीगाठीमध्ये त्यांच्या दरम्यान कसलीही अडचण राहणार नाही. व्यवसाय व जन्माच्या आधारावर कोणाला शूद्र व नीच समजले जाणार नाही. जातपात, कुलीनता व घराण्याच्या आधारावर कोणास खास हक्क प्राप्त होणार नाहीत. माणसाची श्रेष्ठता ही त्याच्या घराण्यावर वा त्याच्या संपत्तीवर अवलंबून असणार नाही तर ती फक्त त्याचे आचरण किती चांगले आहे व तो ईशभीरूतेत इतराहून किती पुढे आहे यावर अवलंबून राहील.
हा असा समाज आहे जो वंश, वर्ण आणि भाषा यांच्या तटबंदीला व भौगोलिक मर्यादांना तोडून पृथ्वीच्या पाठीवरील सर्व विभागांमध्ये अस्तित्वात येऊ शकतो आणि याच्या आधारावर लोकांमध्ये विश्वबंधुत्व प्रस्थापित होऊ शकते. वांशिक आणि राष्ट्रीय समाजामध्ये तर निव्वळ ते लोक सामील होऊ शकतात जे त्या वंशात अगर राष्ट्रात जन्मलेले आहेत. त्या बाहेरील लोकांना या समाजाची दारे बंद असतात. परंतु इस्लामच्या या वैचारिक व सैद्धान्तिक समाजामध्ये ती प्रत्येक व्यक्ती समान हक्कासह सामील होऊ शकते, जी एका निष्ठेचा व नैतिक व्यवस्थेचा स्वीकार करते. राहिले ते लोक जे या निष्ठेला आणि व्यवस्थेला मानत नाहीत, अशा लोकांना हा समाज आपल्यामध्ये सामील करून घेत नाही. परंतु मानवी बंधुभावाचा संबंध त्यांच्याबरोबर प्रस्थापित करण्यास आणि त्यांना मानवतेचे हक्क देण्यास तयार असतो. स्पष्ट आहे की, एका मातेच्या दोन मुलांचे विचार जर वेगवेगळे असतील तर साहजिकच त्यांचे जीवनमार्ग वेगवेगळे होतील. परंतु याचा हा अर्थ नव्हे की ते एक दुसऱ्याचे भाऊ राहिले नाहीत. अगदी याचप्रमाणे मानवी वंशाचे दोन गट निष्ठा व विचारामध्ये विरोध बाळगत असतील तर त्यांचे समाज खात्रीने वेगवेगळे असतील. परंतु मानवतेच्या नात्याने ते समानच असतील. या समान मानवतेच्या आधारावर अधिकाधिक हक्काची जी कल्पना केली जाऊ शकते ते सर्व हक्क इस्लामी समाजाने गैर इस्लामी समाजासाठी मान्य केलेले आहेत.
इस्लामी सामाजिक व्यवस्थेच्या आधारमूल्यांना समजावून घेतल्यानंतर आता आपण हे पाहू की ती कोणती तत्वे व त्या कोणत्या पद्धती आहेत ज्या इस्लामने माणसाच्या परस्पर संबंधाच्या निरनिराळ्या पद्धतीसाठी निश्चित केल्या आहेत.
कुटुंब ही मानवी समाजाची सर्वप्रथम पायाभूत संस्था आहे. एक पुरुष व एक स्त्री यांच्या संयोगाने कुटुंब अस्तित्वात येते या संयोगामुळे एक नवा वंश अस्तित्वात येतो. त्याच्यापासून आप्त संबंध, घराणी, बंधुभाव वगैरे दुसरे संबंध प्रस्थापित होतात आणि सरतेशेवटी ही गोष्ट पसरत पसरत एका समाजापर्यंत पोहोचते. कुटुंब हीच ती संस्था आहे ज्यामध्ये एक पिढी आपल्यानंतर येणाऱ्या पिढीला मानवी संस्कृतीची व्यापक जबाबदारी सांभाळण्यासाठी अत्यंत प्रेमाने, त्यागाने, कळकळीने व सद्‌भावनेने तयार करीत असते. ही संस्था मानवी संस्कृतीच्या अस्तित्वासाठी आणि तिच्या संवर्धनासाठी निव्वळ बाजारबुणग्यांचीच भरती करत नाही तर तिचे कार्यकर्ते मनापासून या गोष्टीची इच्छा बाळगून असतात की त्यांची जागा घेणारे लोक त्यांच्यापेक्षा अधिक चांगले असावेत. या आधारावर ही एक वस्तुस्थिती आहे की कुटुंबच मानवी संस्कृतीचे मूळ आहे. या मूळाच्या स्वास्थ्य व शक्तीवरच संस्कृतीचे स्वास्थ्य व शक्ती अवलंबून आहे. इस्लाम सामाजिक प्रश्नात सर्वप्रथम  या प्रश्नाकडे लक्ष देतो की कुटुंबसंस्थेला अत्यंत योग्य व अत्यंत दृढ अशा पायावर प्रस्थापित केले जावे.
इस्लामजवळ स्त्री-पुरुषांच्या संबंधाचे स्वरूप फक्त हे आहे की या संबंधाबरोबरच सामाजिक जबाबदाऱ्यांचासुद्धा स्वीकार केला जावा आणि ज्याच्या परिणामस्वरूप एका कुटुंबाची स्थापना व्हावी. स्वैर आणि बेजबाबदारीच्या संबंधांना तो निव्वळ एक निरागस मौज किंवा एक साधारणशी गैतवर्तणुक समजून त्याची उपेक्षा करीत नाही तर त्याच्या दृष्टीने ही गोष्ट मानवी संस्कृतीचे मूळ कापणारी आहे आणि म्हणून अशा संबंधाला तो हराम व कायदेशीर गुन्हा ठरवितो, त्याला कठोर शिक्षेची तरतूद करतो. हेतू हा की समाजामध्ये असे बेजबाबदारीच्या संबंधाना प्रवृत्त करणाऱ्या अथवा त्यासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या कारणांचे उच्चाटन करून समाजजीवन शुद्ध करावे. पडद्याचे आदेश, स्त्री-पुरुषांच्या मुक्त संबंधांना मनाई आणि संगीत व बीभस्त चित्रावर प्रतिबंध, अश्लीलतेच्या प्रसाराला बंदी हे सर्व उपाय ती गोष्ट थांबविण्यासाठीच आहे आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट कुटुंब संस्थेला सुरक्षित व मजबूत करणे हे आहे. दुसरीकडे जबाबदारीचा संबंध म्हणजे विवाहाला इस्लाम केवळ एक उचितच नव्हे तर त्याला एक सदाचार, एक सत्कृत्य व एक इबादत (उपासना) ठरवितो. वयात आल्यानंतर स्त्री-पुरुषांनी अविवाहित राहणे ही गोष्ट त्याला अप्रिय आहे. तो प्रत्येक तरुणाला प्रोत्साहन देतो की संस्कृतीच्या ज्या जबाबदारीचा भाग त्याच्या मातापित्यांनी वाहिला होता तो भाग त्यानेही आपला क्रम येताच वाहावा. इस्लाम वैराग्याला सदाचार समजत नाही. याउलट तो त्याला ईशप्रवृत्तीविरुद्ध एक अनिष्ट रूढी ठरवितो. तो त्या सर्व रीतीरिवाजांनासुद्धा नापसंत करतो ज्यामुळे विवाह ही एक मोठी व कठीण समस्या बनते. समाजामध्ये विवाह ही एक अत्यंत सोपी गोष्ट व्हावी हा त्याचा हेतू आहे. विवाह करणे अवघड व्हावे व व्यभिचार सोपा असावा हा त्याचा हेतू नाही आणि यासाठी त्याने काही आप्तसंबंधांना हराम ठरविल्यानंतर सर्व दूरच्या व जवळच्या नातलगांमध्ये विवाह संबंधांना उचित ठरविले आहे. जातपाताच्या भेदभावांना मिटवून सर्व मुस्लिमांमध्ये आपसात विवाहाला मुक्त परवानगी दिली आहे. "मेहर' व "जहेज' इतका थोडा असण्याबद्दल आदेश आहेत की संबंधित व्यक्तीना ते देणे सोपे जावे आणि विवाहसंपन्न करण्यासाठी एखाद्या काजी, पंडित व पुरोहित किंवा नोंदवहीची काही आवश्यकता नाही. पण प्रशासकीय व्यवस्थेच्या दृष्टीने विवाहसंबंधांची नोंद ठेवणे उचित आहे. इस्लामी समाजातील विवाह ही एक अशी साधी प्रथा आहे जी दोन साक्षीदारांसमोर वयात आलेल्या वधुवरांच्या "संमती व स्वीकृती' ने अंमलात येते पण हे मात्र आवश्यक आहे की ही "संमती स्वीकृती' गुप्त नसावी तर मोहल्ल्यामध्ये, वस्तीमध्ये व समाजामध्ये त्या बद्दल घोषणा व्हावी.
कुटुंबामध्ये इस्लामने पुरुषाला त्याने आपल्या घरात शिस्त राखावी म्हणून व्यवस्थापकाचे स्थान दिले आहे. पत्नीला पतीचे आणि मुलांना आईवडिलांचे आज्ञापालन व सेवेचा हुकूम देण्यात आलेला आहे. इस्लाम अशा ढिल्या कुटुंबव्यवस्थेस मान्य करत नाही, ज्यामध्ये शिस्त नसते आणि घरातील लोकांचे आचार व व्यवहाराचे योग्य नियंत्रणाला कोणी जबाबदार नसतो. शिस्त ही तर एका जबाबदार व्यवस्थापकामुळेच प्रस्थापित होऊ शकते आणि इस्लामच्या दृष्टीने या जबाबदारीसाठी कुटुंबाचा प्रमुख स्वाभाविकत: पुरुषच होऊ शकतो. परंतु याचा अर्थ हा नव्हे की पुरुषाला घराचा एक जुलमी व रागीट शासक बनविला गेला आहे. आणि स्त्रीला एक असाहाय्य दासी बनवून त्याच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे. इस्लामजवळ वैवाहिक जीवनाचा खरा अर्थ दया व माया हा आहे. पतीचे आज्ञापालन हे पत्नीचे कर्तव्य आहे आणि पतीचेही हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या अधिकारांचा वापर कुटुंबावर अत्याचार करण्यासाठी नव्हे तर त्यांच्या सुधारणेसाठी करावा. इस्लाम वैवाहिक संबंधाना तोपर्यंत चालू ठेवू इच्छितो जोपर्यंत त्यांच्यामध्ये प्रेमाचा ओलावा किंवा कमीतकमी स्नेहाची भावना शक्य असते. ही शक्यता नाहीशी झाल्यास इस्लाम पुरूषाला "तलाक' व स्त्रीला "खुलाअ' ची परवानगी देतो आणि काही बाबतीत इस्लामी न्याय संस्थेला हे अधिकार देतो की त्याने अशा विवाहांना रद्द करावे जे सुखाऐवजी दु:खास कारणीभूत होतात.
कुटुंबाच्या मर्यादित क्षेत्राच्या बाहेर-जवळची सरहद्द नातलगांची आहे. याचे क्षेत्र फार व्यापक असते. जे लोक आई-बाप अगर भाऊ-बहीण यांच्या संबंधामुळे वा सासरकडील संबंधामुळे एक दुसऱ्याचे नातलग असतात, त्या सर्वांना इस्लाम एक दुसऱ्याचे हितचिंतक, साहाय्यक व एक दुसऱ्याबद्दल सहानुभूती व प्रेम बाळगणारे पाहू इच्छितो. पवित्र कुरआनमध्ये जागोजागी ""जिल्‌कुर्बा'' म्हणजे नातलगांच्या बरोबर चांगली वागणूनक ठेवा अशी आज्ञा दिली गेली आहे. हदीसमध्ये आप्तजनाबरोबर प्रेम व त्यांचे साहाय्य करण्याबद्दल वरचेवर ताकीद दिली गेली आहे आणि त्याला मोठे सत्कृत्य म्हणून संबोधिले गेले आहे. ती व्यक्ती इस्लामच्या दृष्टीने अत्यंत नावडती आहे जी नातेवाईकाकडे कानाडोळा व दुर्लक्ष करते. त्याचप्रमाणे नातेवाईकाबद्दल पक्षपाताला इस्लाममध्ये स्थान नाही. आपल्या कुटुंबाचे व घराण्याचे अन्यायी समर्थन इस्लामच्या दृष्टीने रानटीपणा आहे. त्याचप्रमाणे शासनाचा एखादा अधिकारी सरकारी खर्चाने नातलगांना पोसू लागला किंवा न्याय निर्णयामध्ये आपल्या जवळच्या लोकांबद्दल पक्षपात करू लागला तर ते काही इस्लामी कार्य नव्हे- ते सैतानी कार्य आहे. इस्लाम ज्या आप्तजनांबद्दल प्रेम व साहाय्याची आज्ञा करतो ते स्वहस्ते व स्वत:कडून झाले पाहिजे आणि ते सत्य व न्यायाच्या मर्यादेत झाले पाहिजे.
नातलगांबरोबरच्या संबंधानंतर दुसरा जवळचा संबंध शेजाऱ्याशी येतो. पवित्र कुरआनच्या दृष्टीने शेजाऱ्यांचे तीन प्रकार आहेत. एक नातलग शेजारी, दुसरा परका शेजारी, तिसरा तो तात्पुरता शेजारी ज्याच्याबरोबर बसण्याचा व जगण्याचा योग आला असेल. हे सर्व शेजारी इस्लामी आदेशानुसार स्नेह, सहानुभूती सद्‌वर्तनास पात्र आहेत. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे.
""मला शेजाऱ्यांच्या हक्काबद्दल इतकी ताकीद केली गेली की मला वाटू लागले की त्यांना कदाचित वारसा हक्कसुद्धा दिले जाईल.''
दुसऱ्या एका ठिकाणी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी  सांगितले,
""तो माणूस मोमिन नाही ज्याच्या कटकटीपासून त्याचा शेजारी सुरक्षित नाही.''
एका दुसऱ्या हदीसमध्ये आले आहे,
""तो माणूस ईमान बाळगत नाही जो स्वत: पोटभर जेवतो पण त्याचा निकटचा शेजारी उपाशी असतो.''
एके प्रसंगी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,
""एक स्त्री पुष्कळ नमाज पढते, नेहमी रोजे करते आणि पुष्कळसा दानधर्मही करते परंतु तिच्या फटकळपणाने तिचे शेजारी त्रस्त झालेले आहेत.'' ""ती स्त्री दोजखी आहे, ती नरकात जाईल.''
लोकांनी सांगितले, ""दुसरी एक स्त्री आहे. तिच्यामध्ये पहिल्या स्त्रीचे हे सर्व गुण नाहीत (मात्र ती अनिवार्य उपासना करते) परंतु ती कधी शेजाऱ्यांना त्रास देत नाही.''
त्यावर पैगंबरांनी सांगितले,
""ही स्त्री जन्नती आहे, ती स्वर्गात जाईल.''
पैगंबरांनी लोकांना इथपावेतो ताकीद दिली होती की,""आपल्या मुलांच्यासाठी फळफळावळ आणाल तर शेजाऱ्यासाठीही आणा. नसता फळांच्या साली बाहेर फेकू नका. तुमचे गरीब शेजारी दु:खी होता कामा नये.''
एके प्रसंगी पैगंबरांनी सांगितले,
"तुझे शेजारी तुला चांगला म्हणत असतील तरच तू खरोखर चांगला आहेस आणि त्यांचे मत तुझ्या बाबतीत वाईट असेल तर तू वाईट आहेस.''
थोडक्यात हे की इस्लाम, त्या सर्व लोकांना जे एकदुसऱ्याचे शेजारी आहेत, आपसात एकदुसऱ्याचे हितचिंतक, साहाय्यक व सुख-दु:खाचे वाटेकरी बघू इच्छितो, त्या सर्वामध्ये अशाप्रकारचे संबंध प्रस्थापित करू इच्छितो की विश्वास ठेवावा आणि एकदुसऱ्याजवळ आपले प्राण, आपली धनदौलत व आपले शील सुरक्षित समजावे आणि ते समाज जीवन ज्यामध्ये फक्त एका भिंतीच्या आड वर्षानुवर्ष राहणारी दोन माणसे एकमेकाशी अपरिचित असतात त्याचप्रमाणे एका मोहल्ल्यात व पेठेत राहणाऱ्या लोकांमध्ये स्नेह, जिव्हाळा, सहानुभूती व विश्वास नसतो, असे समाज जीवन कदापिही इस्लामी समाज जीवन होऊच शकत नाही.
या जवळच्या संबंधानंतर संबंधाचे ते व्यापक क्षेत्र आहे जे साऱ्या समाजापर्यंत पसरलेले आहे. या क्षेत्रामध्ये इस्लाम आमच्या सामूहिक जीवनाला ज्या मोठमोठ्या तत्वांवर प्रस्थापित करतो ती थोडक्यात अशी,
1) सदाचाराच्या व संयमनाच्या कार्यामध्ये एकमेकांशी सहकार्य करा आणि दुराचाराच्या व अत्याचाराच्या कामामध्ये कोणास साथ देऊ नका.     (दिव्य कुरआन, 5:2)
2) तुमची मैत्री व तुमचे शत्रुत्व अल्लाहसाठी असले पाहिजे. जे काही द्याल ते अशासाठी द्या की ते देणे अल्लाहला पसंत आहे आणि जे काही रोखाल ते अशासाठी रोखा की ते देणे अल्लाहला पसंत नाही.             (हदीस)
3) तुम्ही तो उत्कृष्ट जनसमूदाय आहात ज्याला लोकांच्या भलाईसाठी निर्माण केले आहे. तुमचे कर्तव्य सदाचाराची आज्ञा देणे व दुराचारापासून रोखणे हे आहे.                   (दिव्य कुरआन, 3:110)
4) आपसात गैरसमज करून घेऊ नका. एकदुसऱ्याच्या व्यवहारांचा छडा लावण्याचा प्रयत्न करू नका. एकाविरुद्ध दुसऱ्याला भडकवू नका. हेव्यादाव्यापासून अलिप्त राहा. एकदुसऱ्याला खजिल करून नका. अल्लाहचे दास आणि आपसात भाऊ बनून राहा.                     (हदीस)
5) एखादा अत्याचारी आहे हे माहीत असता त्याचे साहाय्य करू नका.     (हदीस)
6) अन्यायाच्या कामी आपल्या समूहाचे समर्थन करणे म्हणजे विहिरीत पडत असलेल्या उंटाच्या शेपटीला धरून स्वत:ही विहिरीत पडणे होय.            (हदीस)
7) दुसऱ्यासाठी तेच पसंत करा जे तुम्ही स्वत:साठी पसंत कराल     (हदीस)

इस्लामच्या राजकीय व्यवस्थेचा पाया तीन तत्वांवर आधारलेला आहे.   
 1) तौहीद-एकेश्वरत्व 
2) रिसालत-पैगंबरत्व 
3) खिलाफत- प्रतिनिधित्व. 

या तत्वांना चांगल्या प्रकारे समजावून घेतल्याशिवाय इस्लामची संपूर्ण राजकीय व्यवस्था समजणे कठीण आहे. आणि म्हणून या तत्वांचा संक्षिप्त असा खुलासा करीत आहे.
""तौहीद'' चा अर्थ हा आहे की अल्लाह या जगाचा आणि या जगामध्ये राहणाऱ्या सर्वांचा निर्माता आहे, पालनकर्ता व स्वामी आहे. शासन व अधिकार त्याचाच आहे. तोच आज्ञा देण्याचा व मनाई करण्याचा अधिकार बाळगतो, आणि आज्ञापालन व गुलामी फक्त त्याचीच, त्यामध्ये इतर कोणीही भागीदार नाही. आपले हे अस्तित्व, आपली इंद्रिये व शक्ती ज्यांचा आपण उपयोग करतो आणि आपले ते अधिकार जे आपल्याला जगातील वस्तूंवर प्राप्त आहेत आणि त्या वस्तू ज्यांच्यावर आपण आपल्या अधिकाराचा वापर करतो- त्यापैकी कोणतीही गोष्ट आपण निर्माण केलेली व प्राप्त केलेली नाही. या गोष्टी आपल्याला बक्षिसादाखल देण्यामध्ये अल्लाहशिवाय दुसरा कोणीही सहभागी नाही आणि म्हणून आमच्या अस्तित्वाचे उद्दिष्ट, आपल्या शक्तीचा वापर आणि आपल्या अधिकाराच्या मर्यादा निश्चित करणे हे न आमचे काम आहे न दुसऱ्या कोणाला या प्रश्नात दखल देण्याचा अधिकार आहे. हे फक्त त्या अल्लाहचे काम आहे, ज्याने आपल्याला त्या शक्ती व अधिकारांसह निर्माण केले आणि पुष्कळशा गोष्टी आपल्या उपभोगासाठी दिल्या. एकेश्वरत्वाचे हे तत्व मानवी अधिकारशाहीचा मूळापासून इन्कार करते. एक व्यक्ती असो वा एक कुटुंब, एक वर्ग असो वा एक गट, एखादा समाज असो वा सामूहिकरीत्या साऱ्या जगाचे लोक असोत, अधिकारशाहीचा अधिकार कोणत्याही परिस्थितीत कोणासही पोहचत नाही. सत्ताधीश फक्त अल्लाह आहे आणि त्याची आज्ञा हाच कायदा आहे.
अल्लाहचा कायदा ज्या साधनाद्वारे मानवापर्यंत पोहोचला आहे त्याचे नाव "रिसालत' म्हणजे पैगंबरत्व आहे. याद्वारे आपल्याला दोन गोष्टी मिळतात. एक "ग्रंथ' ज्यामध्ये स्वत: अल्लाहने आपला कायदा निवेदन केलेला आहे. दुसरी ग्रंथाचे प्रमाणभूत स्पष्टीकरण जे पैगंबरांनी अल्लाहचा प्रतिनिधी या नात्याने आपल्या उक्ती व कृतीद्वारे केलेले आहे. अल्लाहच्या ग्रंथात ती सर्व तत्वे निवेदन केली गेली आहेत, ज्याच्यावर मानवी जीवनाची व्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे आणि पैगंबरांनी ग्रंथाच्या या मनिषेनुसार प्रत्यक्षात एक जीवनव्यवस्था तयार करून ती अंमलात आणली आणि तिचा आवश्यक तो खुलासा करून आपल्यासाठी एक आदर्श कायम केला आहे. या दोन्ही गोष्टीचे एकत्रित नाव इस्लामी परिभाषेत "शरियत' आहे आणि हीच ती मूलभूत घटना आहे जिच्यावर इस्लामी राज्य कायम होते.
आता "खिलाफत' चा विचार करू. अरबीमध्ये हा शब्द प्रतिनिधीत्वाबद्दल बोलला जातो. इस्लामी दृष्टिकोनानुसार जगामध्ये माणूस जमिनीवर अल्लाहचा प्रतिनिधी आहे. म्हणजे अल्लाहच्या राज्यात अल्लाहनेच दिलेल्या अधिकारांचा माणूस वापर करतो. आपण जेव्हा आपल्या मालमत्तेची व्यवस्था एखाद्या माणसाकडे सोपवितो तेव्हा आपल्यासमोर चार गोष्टी अवश्य असतात. एक ही की मालमत्तेचे खरे मालक आपण स्वत: आहोत, तो माणूस नव्हे. दुसरी ही की आपल्या मालमत्तेसंबंधी आपण दिलेल्या सूचनांनुसारच त्या माणसाला काम करावयाचे आहे. तिसरी गोष्ट ही की त्या माणसाला आपल्या अधिकारांचा वापर त्या मर्यादामध्येच करावयाचा आहे ज्या तुम्ही त्याला घालून दिल्या आहेत. चौथी गोष्ट ही की आपल्या मालमत्तेमध्ये आपल्या इच्छेला त्याने पुरे करावयाचे आहे, त्याच्या स्वत:च्या इच्छेला नव्हे. या चार अटी प्रतिनिधीचा शब्द उच्चारताच आपोआप माणसाच्या मनात येतात. एखादा प्रतिनिधी या चार अटींना जर पूर्ण करीत नाही तर आपण म्हणाल की त्याने प्रतिनिधीत्वाच्या जबाबदारीचे योग्य पालन केले नाही आणि त्याने तो करार मोडला, ज्याचा प्रतिनिधीत्वाच्या अर्थात समावेश आहे. ठीक याच अर्थ इस्लाम माणसाला अल्लाहचा प्रतिनिधी ठरवतो आणि खिलाफतीच्या कल्पनेमध्ये याच चार अटींचा समावेश आहे. या राजकीय दृष्टिकोनानुसार जी राज्यसत्ता प्रस्थापित होईल ती वस्तुत: अल्लाहच्या अधिपत्याखालील मानवी प्रतिनिधित्व असेल, ज्याला अल्लाहच्या राज्यात त्याने दिलेल्या आदेशानुसार आणि त्याने ठरविलेल्या मर्यादेत कार्य करून त्याची इच्छा पूर्ण करावयाची आहे.
खिलाफतीबद्दलच्या या खुलाशासंबंधी एवढी गोष्ट आणखीन समजून घेतली पाहिजे की इस्लामचा राजकीय दृष्टिकोन कोणा एका व्यक्तीला अगर कुटुंबाला अगर वर्गाला प्रतिनिधी ठरवित नाही. तर त्या सर्व समाजाकडे प्रतिनिधीत्वाचा अधिकार सोपवितो जो "तौहीद'(एकेश्वरत्व) व "रिसालत' (प्रेषित्व) च्या मूलभूत तत्वांचा स्वीकार करून प्रतिनिधीत्वाच्या अटी पुऱ्या करण्यास तयार व पात्र असतो. असा समाज, सामूहिकरीत्या प्रतिनिधीत्वाची जबाबदारी पत्करण्यास पात्र आहे आणि हे प्रतिनिधित्व त्या समाजातील प्रत्येक व्यक्तिप्रत पोहचते. याच बिंदूपासून इस्लाममध्ये "लोकशाही' ची सुरुवात होते. इस्लामी समाजाचा प्रत्येक घटक प्रतिनिधीत्वाचा हक्क व अधिकार बाळगतो आणि या हक्क व अधिकारामध्ये सर्व लोक समान भागीदार आहेत. कोणाचे कोणावर वर्चस्व नाही आणि ना कोणाला हा अधिकार आहे की त्याने दुसऱ्या कोणास या हक्क व अधिकारापासून वंचित करावे. राज्याची व्यवस्था पाहण्यासाठी शासन बनविले जाईल ते या सर्व लोकांच्या मर्जनुसार बनविले जाईल. हेच लोक आपल्या प्रतिनिधीत्वाच्या अधिकारांचा एक भाग या शासनाकडे सोपवतील. या शासनाची उभारणी त्याच्या मतानुसार होईल आणि त्यांच्या सल्ल्याने ते चालेल. जी व्यक्ती त्यांचा विश्वास संपादन करील ती त्यांच्यातर्फे खिलाफतीची कर्तव्ये पार पाडील आणि जी त्यांचा विश्वास गमावून बसेल तिला सत्तेच्या अधिकार पदावरून दूर व्हावे लागले. या दृष्टीने इस्लामी लोकशाही ही एक परिपूर्ण लोकशाही आहे. तितकीच परिपूर्ण जितकी परिपूर्ण एखादी लोकशाही होऊ शकते. परंतु जी गोष्ट इस्लामी लोकशाहीला पाश्चिमात्य लोकशाहीतून वेगळी करते ती ही आहे की पश्चिमेचा राजकीय दृष्टिकोन ""सार्वभौम लोकशाही'' चा आहे तर इस्लामचा ""लोकतांत्रिक खिलाफत'' चा आहे. तेथे लोक स्वत: सत्ताधीश आहेत तर येथे सत्ताधीश अल्लाह आहे आणि लोक त्याचे प्रतिनिधी आहेत. तेथे आपले राज्यशास्त्र (शरियत) स्वत: लोक तयार करतात, येथे त्यांना त्या शरियतचे पालन करावे लागते जी त्यांना त्यांच्या अल्लाहने पैगंबरामार्फत दिलेली आहे. तेथे शासनाचे काम लोकांच्या मनिषा पूर्ण करणे हे असते. येथे शासन व ते निवडणारे लोक या सर्वांचे कार्य अल्लाहची मनिषा पूर्ण करणे हे असते. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे पाश्चिमात्य लोकशाही म्हणजे अनियंत्रित अशी एक लोकसत्ता आहे जी आपल्या अधिकाराचा वापर अनिर्बंधपणे करते. याउलट इस्लामी लोकशाही कायद्याने नियंत्रित असे आज्ञापालन आहे, जेथे आपले अधिकार अल्लाहने दिलेल्या आदेशानुसार त्याने ठरवून दिलेल्या मर्यादेत वापरले जातात. आता मी आपल्यासमोर त्या राज्याची संक्षिप्त पण स्पष्ट अशी रूपरेखा मांडतो जी  "तौहीद' (एकश्वरत्व), "रिसालत' (प्रेषित्व) व "खिलाफत' (प्रतिनिधित्व)च्या तत्वावर आधारलेली आहे.
या राज्यसत्तेचा उद्देश पवित्र कुरआनमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे. अल्लाह मानवी जीवनाला ज्या सद्‌गुणांनी अलंकृत पाहू इच्छितो ते सद्‌गुण प्रस्थापित करणे, त्यांची बुद्धी व उत्कर्ष घडवून आणणे हे त्या राज्यसत्तेचे उद्दिष्ट राहील. याबरोबरच अल्लाहला मानवी जीवनात जे दुर्गुण असणे पसंत नाही त्या दुर्गुणांना रोखणे व मिटविणे हेसुद्धा तिचे उद्दिष्ट राहील. इस्लाममध्ये राज्यसत्तेचे उद्दिष्ट केवळ देशाचा कारभार पाहणे आणि एखाद्या विशिष्ट समाजाच्या सामूहिक इच्छांची पूर्त करणे हे नाही, याऐवजी इस्लाम, राज्यसत्तेसमोर हे ध्येयधोरण ठेवितो जे प्राप्त करण्यासाठी तिला आपल्या सर्व साधनांचा, मार्गाचा व शक्तीचा वापर केला पाहिजे. आणि ते ध्येयधोरण हे आहे की अल्लाह आपल्या जमिनीवर आपल्या दासांच्या जीवनामध्ये जी निर्मळता, जे सौंदर्य, जी खुशाली, जी सुधारणा व प्रगती व जी सफलता पाहू इच्छितो ती त्यामध्ये दृग्गोचर व्हावी आणि बिघाडाच्या त्या सर्व प्रकारांचे उच्चाटन व्हावे जे अल्लाहजवळ त्याच्या जमिनीला उद्‌ध्वस्त करणारे आणि त्याच्या दासांचे जीवन खराब करणारे आहेत. या ध्येयधोरणाबरोबरच इस्लाम आपल्यासमोर चांगल्या व वाईटाची एक स्पष्ट अशी कल्पना ठेवितो, ज्यामध्ये अपेक्षित सद्‌गुणांना व अप्रिय अशा दुर्गुणांना स्पष्ट केले गेले आहे. या कल्पनेला दृष्टिसमोर ठेवून इस्लामी राज्यसत्ता प्रत्येक काळात व प्रत्येक परिस्थितीत आपल्या सुधारणेचा कार्यक्रम आखू शकते.
इस्लामची स्थायी निकड ही आहे की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नैतिक तत्वांचे पालन केले जावे आणि म्हणून तो आपल्या राज्यसत्तेसाठीसुद्धा हे निश्चित धोरण ठरवितो की तिचे राजकारण नि:स्पृह न्याय, अकलंकित सत्य आणि खरा प्रामाणिकपणा यांच्यावर प्रस्थापित व्हावे. तो देशाच्या राज्यकारभाराच्या किंवा राष्ट्राच्या हितसंबंधासाठी खोटेपणा, धोकेबाजी आणि अन्याय यांना कोणत्याही परिस्थितीत सहन करण्यास तयार नाही. देशामधील राजा व प्रजा यांचे संबंध असोत वा देशाबाहेरील दुसऱ्या राष्ट्रांबरोबरचे संबंध असोत, दोहोमध्ये तो सत्य, प्रामाणिकपणा व न्याय यांना हेतू व उद्दिष्टांवर प्राधान्य देतो. मुस्लिम व्यक्तिप्रमाणेच मुस्लिम राज्य सत्तेवरही तो निर्बंध घालतो की करार कराल तर तो पुरा करा देवघेवीची परिमाणे सारखी ठेवा, उक्तीप्रमाणे कृती करा आणि जशी कृती कराल तशीच उक्ती ठेवा. आपल्या हक्काबरोबरच आपल्या कर्तव्याचीही जाणीव ठेवा आणि दुसऱ्यांच्या कर्तव्याबरोबर त्यांच्या हक्कांना विसरू नका. सामथ्र्याला, अत्याचाराऐवजी न्यायाच्या प्रस्थापनेचे साधन बनवा. हक्काला जाणा व तो अदा करा कारण या अमानतींचा तुम्हाला तुमच्या अल्लाहसमोर पुरा हिशेब द्यावयाचा आहे.

माणसामध्ये नैतिक संवेदना ही एक नैसर्गिक संवेदना आहे. ती काही गुणांना पसंत व काही गुणांना नापसंत करते. ही संवेदना वैयक्तिकरीत्या माणसामध्ये कमी अधिक प्रमाणात असली तरी मानवी बुद्धीने सामुदायिकपणे नेहमी नीतीच्या काही गुणांना चांगले आणि काही गुणांना वाईट ठरविलेले आहे. सत्य, न्याय, वचनपालन व विश्वासपात्रता यांना नेहमी मानवी नीतीमध्ये प्रशंसेस पात्र मानले गेले आहे आणि कोणत्याही काळात असत्य, अत्याचार, वचनभंग व विश्वासघात यांना पसंत केले गेले नाही. सहानुभूती, दया, उदारता व मनाचा मोठेपणा यांची नेहमीच कदर केली गेली आहे. स्वार्थ, निष्ठुरता, कंजूषपणा, संकुचित दृष्टी यांना कधीही मानाचे स्थान प्राप्त झालेले नाही. धैर्य व सहनशीलता, दृढनिश्चय, गंभीरता, धाडस व हिंमत व शौर्य हे ते गुण आहेत, ज्यांना सदैव प्रशंसा लाभली आहे. उतावळेपणा, पोरकटपणा, चंचलता, उत्साहीनता व भ्याडपणा यांना कधीही चांगल्या नजरेने पाहण्यात आलेले नाही. आत्मसंयम, स्वाभिमान, सौजन्य व मनमिळाऊपणा यांची गणना सद्‌गुणात होत आली आहे. विकारादीनता, क्षुद्रपणा, असभ्यता व उद्धटपणा यांचा कधीही चांगल्या गुणांच्या यादीमध्ये समावेश झालेला नाही. कर्तव्यतत्परता, एकनिष्ठता, दक्षता आणि जबाबदारपणा यांचा नेहमी आदर केला गेला. कर्तव्य पराड्‌मुख, अप्रामाणिक, कामचुकार व बेजबाबदार यांना कधी चांगल्या नजरेने पाहण्यात आलेले नाही. याचप्रमाणे सामूहिक जीवनाच्या चांगल्या व वाईट गुणांच्या बाबतीतसुद्धा मानवतेचा निर्णय एकमुखीच झालेला आहे.
ज्यामध्ये शिस्त व नियमबद्धता असते, परस्पर सहकार्य व सहयोग असतो, आपापसात प्रेम व सद्‌भाव असतो, सामूहिक न्याय व सामाजिक समता असत, प्रशंसेस पात्र नेहमी तो समाज झाला आहे. भेदभाव, गोंधळ बेशिस्त, अव्यवस्था, दुही, परस्पराबद्दल दुर्भाव, अत्याचार, असभ्यता यांची सामूहिक जीवनाच्या कल्याणकारक गोष्टीमध्ये कधी गणना झालेली नाही. असाच प्रकार चारिÍयाच्या सदाचार व दुराचाराबद्दलसुद्धा आहे. चोरी, व्यभिचार, खून, दरोडा, फसवेगिरी, लाच लुचपत यांना कधी चांगले आचरण मानले गेले नाही. शिवीगाळ, अत्याचार, कुचाळी, चहाडी, हेवा, मत्सर, आळ, बदनामी, दंगेखोरी यांना कधी सदाचार मानला गेला नाही. लबाड, अहंकारी, दंगलबाज, ढोंगी, हटधर्म व आधाशी लोकांचा कधी चांगल्या लोकांमध्ये समावेश करण्यात आला नाही. याउलट आईवडिलांची सेवा, नातलगांचे साहाय्य, शेजारपाजाऱ्यांशी चांगली वागणूक, मित्रांच्याबरोबर निष्ठा, दुर्बलांचे समर्थन, अनाथ व निराधारांची देखभाल, रोग्यांची शुश्रूषा आणि आपदग्रस्त लोकांचे साहाय्य यांना नेहमी सदाचार मानला गेला आहे. सुशील मधुरभाषी, सौम्य वृत्तीच्या व शुभचिंतक लोकांना नेहमी आदराने पाहिले गेले आहे. सरळमार्ग व शुभचिंतक लोकांनाच मानवता आपला चांगला घटक मानत आलेली आहे. प्रत्येक बाबतीत ज्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो, ज्यांचे बाह्यरूप व अंतरंग सारखे आहे, ज्यांच्या उक्ती व कृतीमध्ये मेळ व सुसंगती आहे, जे आपल्या हक्काच्या बाबतीत अल्पसंतुष्ट व इतरांच्या हक्काच्या बाबतीत उदार आहेत, जे स्वत: शांततेचे जीवन जगतात व इतरांना शांततामय जीवन जगू देतात, ज्यांच्याकडून प्रत्येकजण चांगल्याची आशा करतो व कोणालाही त्यांच्याकडून वाईट होण्याचे भय नसते, अशा लोकांचासुद्धा मानवतेने आपल्या चांगल्या घटकात समावेश केलेला आहे.
यावरून स्पष्ट होते की मानवी नैतिक तत्वे वस्तुत: अशी जागतिक सत्ये आहेत ज्यांना सर्व लोक नेहमी परिचित झालेले आहेत. सदाचार व दुराचार यांना शोधण्याची आवश्यकता नाही. त्या काही लपलेल्या गोष्टी नसून मानवाच्या चांगल्या परिचयाच्या आहेत. यांची जाणीव माणसाला स्वाभाविकरीत्या व्हावी अशी योजना केली गेली आहे आणि म्हणूनच पवित्र कुरआन आपल्या भाषेत सदाचाराला ""मअरुफ'' (चांगले) व दुराचाला "मुनकर'' (वाईट) या शब्दांनी संबोधितो, म्हणजे सदाचार तो आहे जो सर्वांना आवडतो आणि दुराचार तो ज्याला कोणीही पसंत करीत नाही. याच वस्तुस्थितीला पवित्र कुरआनने माणसाला अल्लाहने चांगले व वाईट ओळखण्याचे ज्ञान व विवेकशक्ती अंत:प्रेरणेने दिले आहे, असे म्हटले आहे.
प्रश्न हा आहे की नीतीचा चांगला व वाईटपणा सुपरिचित असताना आणि गुण सद्‌गुण व काही दुर्गुण असल्याबद्दल लोकांचे नेहमी एकमत असताना जगामध्ये निरनिराळ्या नैतिक व्यवस्था का अस्तित्वात आहेत? त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो कोणत्या आधारावर आहे? आणि आम्ही जेव्हा इस्लामची स्वतंत्र अशी एक जीवन व्यवस्था आहे असे म्हणतो ते कोणत्या आधारावर आणि नीतीच्या प्रश्नात इस्लामची ती खास वैशिष्टयपूर्ण देणगी कोणती?
हा प्रश्न समजावून घेण्यासाठी आपण जेव्हा जगातील निरनिराळ्या नैतिक व्यवस्थेची पाहणी करतो तेव्हा प्रथम नजरेस एक फरक आपल्याला आढळून येतो. निरनिराळ्या नैतिक गुणांना जीवनाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये सामावून घेणे आणि त्यांची मर्यादा, त्यांचे स्थान व त्यांचे कार्य ठरविणे आणि त्यांच्यामध्ये एकवाक्यता कायम करणे या बाबीमध्ये या सर्व व्यवस्था एकदुसऱ्याहून भिन्न आहेत. अधिक विचार केल्यास या फरकाचे कारणही स्पष्ट होते. वस्तुत: नैतिक उच्चनीचतेचे प्रमाण ठरविणे आणि चांगल्या व वाईटाच्या ज्ञानाचे साधन निश्चित करणे याबाबतीत त्याच्यामधील विभिन्नता हे त्या फरकाचे कारण आहे आणि त्यांच्यामध्ये या बाबतीतही मतभेद आहेत की नैतिक कायद्याच्या मागे अंमलबजावणीची शक्ती कोणती असावी की जिच्या सामथ्र्याद्वारे त्याची अंमलबजावणी व्हावी? आणि माणसाला या कायद्यानुसार आचरण करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? परंतु जेव्हा आपण या मतभेदाच्या कारणाचा शोध घेतो तेव्हा शेवटी ही वस्तुस्थिती उघड होते की या सर्व नैतिक व्यवस्थेचे मार्ग ज्या मूळ गोष्टीने वेगवेगळे केले आहेत ती ही आहे की त्याच्यामध्ये विश्वाची कल्पना, विश्वामधील माणसाचे स्थान व मानवी जीवनाचा उद्देश याबद्दल मतभेद आहेत आणि याच मतभेदाचे अथपासून इतिपर्यंत त्यांचा आत्मा, त्यांची वृत्ती व त्यांचे स्वरूप यांना एक दुसऱ्यापासून अगदी भिन्न करून टाकले आहे.
मानवी जीवनात खरे निर्णयात्मक प्रश्न हे आहेत की या विश्वाचा कोणी ईश्वर आहे किंवा नाही? आहे तर मग तो एक आहे की अनेक? ज्याचे ईशत्व मानावयाचे त्याचे गुण काय आहेत? मनुष्याशी त्याचा संबंध काय आहे? त्याने मनुष्याच्या मार्गदर्शनाची काही व्यवस्था केली आहे किंवा कसे? मनुष्य त्यांच्यासमोर उत्तरदायी आहोत किंवा नाही? उत्तरदायी आहे तर कोणत्या प्रकारचे उत्तरदायित्व आपल्यावर आहे? आणि ज्याला समोर ठेवून आपण कार्य करतो तो आमच्या जीवनाचा उद्देश व शेवट काय आहे? या प्रश्नांच्या उत्तराचे स्वरूप जसे असेल त्यानुसारच जीवनाची व्यवस्था ठरेल आणि त्याला अनुरूप अशी नैतिक व्यवस्था तयार होईल.
या छोट्याशा भाषणात जगातील निरनिराळ्या जीवनव्यवस्थेचा परामर्श घेऊन कोणत्या व्यवस्थेने या प्रश्नाचे काय उत्तर दिले आहे आणि त्या उत्तराचा, त्याचे स्वरूप व मार्गाच्या निश्चितीवर काय प्रभाव पडला आहे हे दाखवून देणे कठीण आहे. येथे फक्त इस्लामसंबंधी निवेदन आहे की तो या प्रश्नांचे काय उत्तर देतो आणि त्या आधारावर कोणत्या विशिष्ट प्रकारची नैतिक व्यवस्था अस्तित्वात येते.
इस्लामचे उत्तर हे आहे की या विश्वाचा स्वामी अल्लाह आहे आणि तो अल्लाह एकटाच आहे. त्यानेच या विश्वाला निर्माण केले आहे. तोच याचा एकमात्र स्वामी, शासक व पालनकर्ता आहे आणि त्याच्या आज्ञापालनावरच ही सारी व्यवस्था कार्य करत आहे. तो बुद्धिमान आहे, सर्व शक्तिमान आहे, दृश्य व अदृश्य गोष्टी जाणणारा आहे, तो सर्व दोषापासून व सर्व वैगुण्यापासून पवित्र आहे आणि त्याचे ईशत्व अशा पद्धतीवर कायम आहे ज्यामध्ये कसलीही वक्रता अगर गोंधळ नाही. माणूस त्याचा जन्मजात गुलाम आहे. त्याचे काम हेच आहे की त्याने आपल्या निर्मात्याची गुलामी व आज्ञापालन करावे. त्याचे जीवन म्हणजे अल्लाहची संपूर्ण गुलामी दुसरी कोणतीही पद्धत त्याच्यासाठी योग्य नाही आणि या गुलामीची - आज्ञापालनाची - पद्धत ठरविणे हे माणसाचे काम नसून तो ज्याचा गुलाम आहे त्या अल्लाहचे काम आहे. अल्लाहने त्याच्या मार्गदर्शनासाठी पैगंबर पाठविले आहेत आणि ग्रंथ उतरविले आहेत. माणसाचे हे कर्तव्य आहे की त्याने आपल्या जीवनाची व्यवस्था याच मूळ शिकवणीच्या आधारावर बनवावी. माणूस आपल्या जीवनाच्या सर्व कामाबद्दल अल्लाहसमोर उत्तरदायी आहे आणि हे उत्तरदायित्व त्याला या जगात नव्हे तर आखिरतमध्ये करावयाचे आहे. जगातील सध्याचे जीवन हा परीक्षेचा अवधी आहे आणि येथे माणसाची सारी धावपळ या ध्येयावर केंद्रित झाली पाहिजे की परलोकाच्या उत्तरदायित्वात अल्लाहसमोर त्याने यशस्वी व्हावे. या परीक्षेत माणूस आपल्या संपूर्ण अस्तित्वासह सामील आहे. त्याच्या सर्व शक्तीची व योग्यतेची परीक्षा आहे. माणसाचा साऱ्या विश्वात ज्या ज्या वस्तूशी जसा जसा संबंध येतो, त्याची निस्पृह चौकशी केली जाईल की त्याने त्यांच्याशी कसा कसा व्यवहार केला आणि ही चौकशी ती शक्ती करणार आहे. तिने जमिनीचा कणन्‌-कण, हवा, पाणी, सृष्टीच्या लहरी आणि खुद्द माणसाचे अंत:करण व मेंदू आणि त्याचे हात व पाय यावरील त्याच्या हालचाली व स्तब्धता यांनाच नव्हे तर त्याच्या विचारांचा व संकल्पांचा खराखुरा पुरावा तयार ठेविला आहे.
हे ते उत्तर आहे जे इस्लामने जीवनाच्या मूलभूत प्रश्नांसंबंधी दिलेले आहे. ही विश्वाबद्दलची व मानवाबद्दची कल्पना त्या खऱ्या व परम कल्याणाला निश्चित करते, ज्यापर्यंत पोहोचणे हा माणसाच्या आचरणाचा, प्रयत्नांचा व त्याच्या धावपळीचा उद्देश असला पाहिजे आणि हे कल्याण म्हणजे ईशप्रसन्नता. इस्लामच्या नैतिक व्यवस्थेत याच प्रमाणाधारे एखाद्या आचरण पद्धतीची पारख करून हा निर्णय केला जातो की ही पद्धत चांगली आहे की वाईट. हे ठरविल्याने नीतीला तो कणा प्राप्त होतो ज्याच्याभोवती नैतिक जीवन फिरत असते आणि त्याची स्थिती नांगर नसलेल्या, जोराच्या वाऱ्यांनी, समुद्राच्या लाटांनी सैरावैरा हिंदोकळणाऱ्या जहाजासारखी होत नाही. ही निश्चिती एक केंद्रिय उद्देश समोर ठेविते. त्यानुसार जीवनामधील साऱ्या नैतिक गुणाची योग्य मर्यादा, योग्य स्थान व योग्य व्यावहारिक स्वरूप ठरविले जाते आणि आपल्याला ती कायमस्वरूपाची नैतिक मूल्ये लाभतात जी बदलत्या परिस्थितीतदेखील आपल्या जागी स्थिर व कायम राहू शकतात आणि सर्वांत मोठी गोष्ट ही आहे की ईशप्रसन्नता हे उद्दिष्ट ठरल्यानंतर नीतीला एक उच्चतम उद्देश प्राप्त होतो, ज्याआधारे नैतिक उन्नतीच्या संभावना अनंत होऊ शकतात आणि कोणत्याही परिस्थितीत त्या स्वार्थपणाच्या घाणीने मलीन होत नाहीत.
प्रमाणाबरोबरच इस्लाम आपल्या विश्वाबद्दलच्या व माणसाबद्दलच्या दृष्टिकोनाद्वारे नैतिक उच्चनीचतेच्या ज्ञानाचे एक कायमचे साधनसुद्धा उपलब्ध करून देतो. त्याने आपल्या नैतिक ज्ञानाला निव्वळ बुद्धी, इच्छा, अनुभव वा मानवी विद्येवर अवलंबून ठेवलेले नाही. तसे असते तर, त्याच्या सतत बदलणाऱ्या निर्णयाने आपले नैतिक आदेशसुद्धा बदलत गेले असते व त्यांना कधीच स्थिरता लाभली नसती. याउलट त्याने आपल्या एक निश्चित ज्ञानाचा झरा दिलेला आहे, म्हणजे ईशग्रंथ आणि त्याच्या पैगंबराची सुन्नत (पद्धत), याद्वारे आम्हाला प्रत्येक काळात नैतिक शिकवण लाभते आणि ही शिकवण वैयक्तिक जीवनाला लहान सहान प्रश्नापासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मोठमोठ्या समस्यांपर्यंत जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात व पैलूमध्ये आमचे मार्गदर्शन करते. त्यांच्यामध्ये जीवनाच्या व्यवहारावर नैतिक तत्वांचा अतिव्यापक असा वापर केला गेल्याचे आढळून येते. त्यामुळे कोणत्याही अवस्थेत दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाच्या साधनाची आवश्यकता भासत नाही.
विश्वाबद्दलच्या व मानवाबद्दच्या इस्लामच्या याच कल्पनेमध्ये ती अंमलबजावणीची शक्तीसुद्धा आहे जी नैतिक कायद्याच्या पाठीशी असणे आवश्यक असते आणि ती शक्ती म्हणजे अल्लाहचे भय. आखिरतच्या (पारलौकिक) चौकशीची काळजी आणि कायमचे भवितव्य खराब होण्याचा धोका. इस्लाम जरी अशी एक शक्ती व लोकमत तयार करू इच्छितो जी सार्वजनिक जीवनामध्ये व्यक्ती¨ना व गटांना नीतीनियमाचे पालन करण्यावर विवश करणारी असेल आणि इस्लाम अशी एक राजकीय व्यवस्थादेखील प्रस्थापित करू इच्छितो जिच्या शासनाद्वारे नैतिक कायद्याला सक्तीने लागू केले जाईल, परंतु त्याचा खरा विश्वास या बाह्य दबावावर नाही तर त्या आंतरिक दबावावर आहे, ज्याचा अल्लाहवरील व आखिरतवरील (परलोकावरील) ईमान(श्रद्धा) मध्ये समावेश आहे. नैतिक आदेश देण्यापूर्व इस्लाम माणसाच्या मनात ही गोष्ट वसवितो की, तुझा व्यवहार "वस्तुत: त्या अल्लाहबरोबर आहे, जो प्रत्येक क्षणी, प्रत्येक जागी तुला पाहात आहे. तू साऱ्या जगापासून स्वत:स लपवू शकतोस, परंतु त्याच्यापासून स्वत:स लपवू शकत नाहीस. साऱ्या जगाला धोका देऊ शकतोस, परंतु त्याला धोका देऊ शकत नाहीस. जगापासून पळून जाऊ शकतोस, परंतु त्याच्या पकडीपासून वाचून कोठे जाऊ शकत नाहीस. जग फक्त तुझ्या बाह्य रूपाला पाहू शकते, परंतु अल्लाह तुझ्या संकल्पांना व तुझ्या हेतूंनासुद्धा जाणतो. जगामधील या अल्पशा जीवनात तू जे वाटेल ते कर. परंतु तुला शेवटी एके दिवशी मरावयाचे आहे आणि त्या न्यायालयात तुला हजर व्हावयाचे आहे जेथे वकिली, लाचलुचपत, शिफारस, खोटी साक्ष, धोकेबाजी व फसवेगिरी हे काही चालू शकणार नाही आणि तुझ्या भविष्याचा निस्पृह निवाडा केला जाईल.'' ही निष्ठा निर्माण करून इस्लाम प्रत्येक माणसाच्या मनात एक पोलिस चौकीच बसवित आहे, जी आतून त्याला आदेशांचे पालन करण्यास विवश करीत असते, मग बाहेरून या आदेशांचे पालन करावयास लावणारे एखादे फौजदारी न्यायालय वा तुरूंग असो वा नसो. इस्लामच्या नैतिक कायद्यामागे खरी शक्ती हीच आहे जी त्याला अंमलात आणते. लोकमत व शासनाची शक्ती याच्या समर्थनार्थ असल्यास दुधात साखरच. नाहीपेक्षा फक्त ही श्रद्धा मुस्लिम व्यक्ती¨ना व मुस्लिम समाजाला सरळमार्ग लावू शकते, फक्त ही श्रद्धा माणसाच्या मनात रूजणे आवश्यक आहे.

Islamic Law
न्याय म्हणजे काय हे सर्वांनाच माहीत आहे. अन्यायग्रस्ताला वस्तुतः न्यायाची खरी व्याख्या ताबडतोब समजते. परिभाषा करायची असेल तर दोन वस्तु अगदी तंतोतंत समान प्रमाणात वाटणे म्हणजे न्याय, अर्थात अफरातफरीमध्ये समतोल कायम करणे म्हणजेच कायद्याच्या भाषेत न्याय होय. दुसर्या भाषेत असे की एखाद्या प्रकरणात सत्यानुसार निवाडा करण्यात यावा.
कोणत्याही समाजाची सामाजिक बंधने अबाधित ठेवायची असेल तर न्याय हाच मूळ आधार होय. या शिवाय समाजव्यवस्था टिकू शकत नाही. हेच कारण आहे की समाज आणि राज्य टिकविण्यासाठी इस्लामने न्यायव्यवस्थेला असे महत्त्व दिले, जे इतर कोणत्याच धर्मात देण्यात आले नाही. ईश्वराने कुरआनात म्हटले आहे,
‘‘ईश्वर न्याय, भलाई आणि नातेवाईकांचे हक्क अदा करण्याची आज्ञा देतो आणि दुष्कर्म व स्वैराचार आणि अन्याय व अत्याचाराची मनाई करतो.‘‘(संदर्भ : सूरह-ए-नहल - ९०)
न्यायपूर्ण वर्तन हेच ईशपरायणतेचा परमोच्च दर्जा असल्याचे कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतांनो! ईश्वरासाठी सत्यावर अढळ राहणारे आणि न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-माइदा - ८)
न्याय स्थापन करण्याचे विविध प्रसंग असतात. पहिल्या प्रसंगी मानवाने स्वतः आपल्यावरच न्याय स्थापन करावा. याचा अर्थ असा आहे की त्याने इतरांसाठीही तेच पसंत करावे, जे स्वतःसाठी करतो. त्याच प्रमाणे स्वतःच्या अधिकारांइतकीच त्याला इतरांच्या अधिकारांचीही जाणीव असावी. म्हणून कुरआनात ही बाब सविस्तरपणे वर्णन करण्यात आली आहे की, न्यायाची स्थापना करायची असेल तर सर्वप्रथम स्वतःवर आणि आपल्या नातलग आणि सगेसोयर्यांवर स्थापन करा. कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे श्रद्धावंतांनो! न्यायावर दृढ राहणारे आणि ईश्वरासाठी साक्षीदार बना. यद्यपि तुमच्या न्यायाचा आणि तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वतःवर अथवा तुमच्या आई-बापावर व नातेवाईकांवर जरी होत असेल तरीदेखील मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो वा गरीब, ईश्वर तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा सत्याला बगल दिली, तर समजून असा की जे काही तुम्ही करता, ईश्वराला त्याची पूर्ण माहिती आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-निसा - १३५)
हीच गोष्ट प्रेषित मुहम्मद(स.) यांनी अशाप्रकारे वर्णन केली आहे,
‘‘शपथ आहे त्या ईश्वराची, ज्याच्या हाती माझे प्राण आहे, ती व्यक्ती श्रद्धावंत(मुस्लिम) असूच शकत नाही, जो आपल्या शेजार्यासाठी तीच बाब पसंत करीत नाही, जी स्वतःकरीता पसंत करते.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - मुस्लिम)
नेमक्या याच विचारसरणीचा अभाव असल्याचे आज पूर्ण समाजात आणि जगामध्ये अरेरावी माजली आहे. इतरांची चिता जळू द्या, मात्र आपली पोळी तुपात भाजली पाहिजे, या आधुनिक काळातील विचारसरणीमुळे असंख्य जणांचे अधिकार पायदळी चिरडले जात आहेत. यातूनच गुन्हेगारीचे अक्राळविक्राळ राक्षस न्याय, मानवता आणि नैतिकताचा बळी घेत आहे. मात्र इस्लामच्या या मोजक्या विचारसरणीचा अवलंब केला तर निश्चितच गुन्हेगारीवर आळा बसेल आणि मानवतेला अन्यायास बळी पडून न्यायासाठी दारोदार ठेचाळत हिडण्याची दुर्दैवी पाळी येणार नाही.
न्याय स्थापन करण्याचा दुसरा प्रसंग हा राज्य अगर शासन होय. राज्यशासनानुसार न्याय स्थापन करता येते, मात्र हे लक्षात असावे की, याआधारावर शासन स्थापन जर करायचे असेल तर शासकाने स्वतः आपल्यावर न्यायाची स्थापना करावी. प्रेषित मुहम्मद(स.) आणि सुरुवातीच्या काळातील चारीही इस्लामी शासकांची न्यायव्यवस्था हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे स्वतः सक्तीने यावर कार्यरत होते.

Earth
न्यायाचे तीन पैलू आहेत
वैधानिक न्याय, सामूहिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय न्याय.
वैधानिक न्याय
वैधानिक न्याय म्हणजे सर्वांना समान न्याय मिळावा. कोणत्याही प्रकारचा वांशिक, आर्थिक, प्रादेशिक, धार्मिक भेद न पाळता आणि आपला व परका न समजता अन्यायपीडितास न्याय देणे हे इस्लामी कायद्याचे पहिले दंडविधान होय. इतिहासामध्ये इस्लामने प्रस्थापित केलेल्या न्यायव्यवस्थेची असंख्य उदाहरणे विरोधकांना तोंडघशी पाडणारे आहेत. विस्तार भयास्तव येथे केवळ एका घटनेचाच उल्लेख करण्यात येत आहे.
प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या काळामध्ये एका उच्चकुलीन अर्थात कुरैश परिवारातील स्त्रीने चोरी केली व प्रेषित मुहम्मद(स.) यांनी इस्लामी दंडविधानानुसार तिचे हात कापण्याचा निवाडा दिला. मात्र कुरैश परिवारजणांना प्रेषितांचा हा निर्णय त्यांच्या प्रतिष्ठेस धक्का लावणारा वाटला. त्यांना वाटले की आपण इतके उच्चकुलीन आहोत आणि समाजामध्ये आपली प्रतिष्ठा राहणार नाही. हात कापण्याच्या शिक्षेमुळे आपण समाजात तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. म्हणून त्यांनी प्रेषितांच्या जवळचे असलेले उसामा बिन झैद(र.) यांना या बाबतीत शिफारस करण्यास सांगितले की, या शिक्षेत काही कमी करावी. मात्र जेव्हा ही सगळी हकीकत उसामा(र.) यांनी सांगितली, तेव्हा प्रेषित मुहम्मद(स.) यांना खूप संताप चढला आणि त्यांनी स्पष्टपणे बजावले की,
‘‘हे तुम्हाला काय झाले की ईश्वराने निश्चित केलेल्या शिक्षांमध्ये कमतरता करण्याची शिफारस करतात. तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तुमच्या पूर्वीचे मानवसमुदाय याच कारणास्तव नष्ट झाले आहेत. त्यांच्यातील प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा गुन्हा करीत, तेव्हा तिला शिक्षा देत नसे आणि साधारण व्यक्ती जेव्हा एखादा अपराध करीत तेव्हा तिला शिक्षा देत असे. मी तुम्हाला स्पष्टपणे बजावतो की, जर माझी मुलगी फातिमा(र.) हिने जरी चोरी केली असती तर तिलासुद्धा शिक्षा देण्यात माझी आत्मप्रतिष्ठा आडवी आली नसती. ईश्वराची शपथ! मी तिचेही हात कापले असते.‘‘(संदर्भ : प्रेषित वचन संग्रह - बुखारी)
इस्लाममध्ये वैधानिक न्यायाचे हेच वैशिष्ट्य आहे की न्याय हा सर्वांसाठी कोणाताही भेदभाव न पाळता करणे आवश्यक आहे. प्रेषित मुहम्मद(स.) यांनी म्हटले आहे,
‘‘तुम्ही मुस्लिमांपैकी जेव्हा कोणी न्यायाधीश न्यायनिवाडा करीत असेल, तेव्हा त्याने रागाच्या भरात निर्णय देता कामा नये, आणि न्यायालयात हजर असलेल्या पक्ष प्रतिपक्षादरम्यान बसविण्यात आणि पाहण्यातसुद्धा भेदभाव करता कामा नये. एवढेच नव्हे तर इशारा करण्यातसुद्धा भेदभाव करता कामा नये.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - जामिउस्सगीर)
सामूहिक न्याय अगर सामाजिक न्याय
कोणत्याही मानवास स्पृश्य-अस्पृश्य, प्रतिष्ठित-अप्रतिष्ठित, श्रेष्ठ-कनिष्ठ, गरीब-श्रीमंत आणि आपला परका न मानता समाजातील प्रत्येक व्यक्तीस केवळ माणूस या नात्याने समानरित्या न्यायदानास सामाजिक न्याय असे म्हणता येईल. याच न्यायाची शिकवण इस्लामने दिली आणि केवळ शिकवणच न देता ही न्यायव्यवस्था स्थापन करण्याचा जागतिक आणि ऐतिहासिक विक्रम नोंदविला. कुरआनाने श्रेष्ठत्वाचा अगर प्रतिष्ठेचा आधार सदाचार आणि ईशपरायणतेस देऊन समस्त मानवजातीतील सडक्या व बुरसटलेल्या स्पृश्यास्पृश्यतेचे कृत्रिम भेदभाव नष्ट करून लोकांना केवळमात्र मानवाचा दर्जा दिला आणि याच आधारे न्यायव्यवस्था स्थापन केली. कुरआनात सडेतोडपणे म्हटले आहे,
‘‘तुमच्यापैकी सर्वांत जास्त प्रतिष्ठित माणूस तो आहे, जो तुमच्यापैकी सर्वांत जास्त ईशपरायण आणि सदाचारी आहे.‘‘(संदर्भ : सूरह-ए-हुजरात - १३)म्हणजेच प्रतिष्ठा ही ईशपरायणता आणि सज्जनतेतच आहे.
दुसरी गोष्ट अशी की सामाजिक जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीस या गोष्टीचा जन्मसिद्ध अधिकार आहे की त्याने आपल्या पात्रता व शिक्षण-प्रशिक्षणानुसार काम करावे. शिक्षण-प्रशिक्षण, प्रगती आणि विकासाची दारे सर्वांसाठीच खुली आहेत. कोणावरही कोणतेही काम करण्याची बळजबरी करणे अगर त्याचे शोषण करणे मुळीच खपवून घेतले जाणार नाही. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांनी परखडपणे घोषणा केली आहे की, ‘‘ज्या व्यक्तीने ज्या माणसाकडून मजुरी करून घेतली आणि त्याची मजुरीची रक्कम दिली नाही, त्या व्यक्तीविरुद्ध(स्वयं) ईश्वराने युद्धाचे रणशिंग फुंकले.‘‘(संदर्भ : प्रेषितवचन संग्रह - बुखारी)
अर्थातच एखाद्या माणसाकडून काम करून घेतल्यावर त्याच्या कामाचा मोबदला न देणे म्हणजे ईश्वरी कोपास बळी पडणे होय. म्हणजे कोणाची मजुरीची रक्कम बुडविणारा माणूस हा मुस्लिम होऊच शकत नाही.
आंतरराष्ट्रीय न्याय
इस्लामने न्याय स्थापन्याची गोष्ट केवळ मुस्लिमांपर्यंतच मर्यादित ठेवली नसून समस्त जगात मुस्लिम आणि मुस्लिमेतरांतही काहीच भेदभाव न बाळगता न्याय स्थापन करण्याची शिकवण दिली आहे. जे लोक अद्यापही इस्लामच्या न्यायप्रिय छत्रछायेत आलेले नाहीत अशा लोकाशीही धर्माच्या आधारावर द्वेष आणि कलह ठेवण्याची इस्लामने मुळीच परवानगी दिली नाही. न्याय म्हणजेच न्याय आणि तो प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध हक्क असल्याने मुस्लिमेतरांनाही सारख्याच प्रमाणात मिळावा, मुस्लिमेतरांशीही मुस्लिमांनी स्नेहपूर्ण संबंध ठेवावेत, समता व बंधुभावाची जोपासना करावी, हीच इस्लामची मुख्य भूमिका आहे. ईश्वराने कुरआनात स्पष्टपणे म्हटले आहे,
‘‘ईश्वर तुम्हास या गोष्टीची मनाई करीत नाही की तुम्ही अशा मुस्लिमेतर जणांशी सदाचार आणि न्यायपूर्ण रितीने वागावे, जे धर्माच्या बाबतीत तुमचा विरोध करीत नाहीत आणि ज्यांनी तुम्हाला तुमचे घरदार सोडण्यास भाग पाडले नाही.(अर्थात घर परिवार त्यागण्यास विवश करण्याचे अत्याचार केले नाही.) ईश्वर न्याय करणार्यांना पसंत करतो.‘‘(संदर्भ : सूरह-ए-मुमतिहना - ८)
याच शिकवणीवर आपले आचरण असावे आणि याच आचरणास प्रकारच्या न्यायपूर्ण आधार बनवून इस्लामी कायदा असलेल्या राज्यात मुस्लिमतरांचेही अधिकार मुस्लिमांसम ठरविण्यात आले आहेत. ज्या सवलती आणि संधी व प्रगतीची दारे मुस्लिमांसाठी उघडी आहेत, तीच दारे मुस्लिमेतरांसाठीही उघडी आहेत. इस्लामी शासनाने ज्या जवाबदार्या मुस्लिम रयतेवर टाकल्या आहेत, त्या मुस्लिमेतर रयतेवरसुद्धा टाकल्या आहेत. मुस्लिम आणि मुस्लिमेतर या दोघांना एकच कायदा अगर दंडविधान लागू असेल. उदाहरणार्थ, खून करण्याची शिक्षा इस्लामी कायद्याने देहदंड अगर मृत्यूदंड निश्चित केली आहे. या संविधानानुसार एखाद्या मुस्लिम व्यक्तीने मुस्लिमेतराचा खून केला असेल तर खुन्यास देहदंड अगर मृत्यूदंडाची शिक्षा होणारच.(संदर्भ : इस्लामी शासनात मुस्लिमेतरांचे अधिकार, लेखक : सय्यद जलालुद्दीन उमरी, इस्लामिक मराठी पब्लिकेशन्स ट्रस्ट मुंबई) इस्लामी न्यायव्यवस्थेच्या या सर्वसामान्य परिचयातून आपल्या लक्षात आलेलेच असेल की, इस्लामने न्यायव्यवस्थेला किती जबरदस्त महत्त्व दिले आहे. एवढेच नव्हे तर इस्लाम धर्म हा मुळात या विश्वामध्ये न्यायाची स्थापना करण्यासाठीच आला आहे. इस्लामी न्यायप्रणाली ही मानवाच्या प्रत्येक क्षण आणि प्रत्येक पडणारे पाऊल आणि प्रत्येक कर्म व क्षेत्राला व्यापलेले आहे. अगदी धंदा-व्यापारातही आणि माणसाच्या अर्थार्जनातही न्याय हीच कसोटी ठरविण्यात आली आहे. कुरआनात म्हटले आहे,
‘‘हे लोकहो! अगदी तंतोतंत न्यायानुसार मोजमाप करून देवाणघेवाण करा आणि लोकांना त्यांच्या हक्कांच्या वस्तूंमध्ये घट करून देऊ नका आणि भूतलावर उपद्रव माजवू नका!‘‘(संदर्भ : सूरह-ए-हूद - ८५)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget