Articles by "परीचय"

Success
आतापर्यंत ज्या गोष्टींचा उहापोह करण्यात आला, त्या गोष्टी अत्यंत स्पष्ट आणि सहज लक्षात येण्यासारख्या आहेत. मात्र यासाठी आपले मनमस्तिष्क अतिशय निष्पक्ष आणि कोरे असणेही आवश्यक आहे. जर पूर्वीच आपण एखादा विशिष्ट विचार मनात घेऊन बसलो तर कोणतेही सत्य आपल्या अंत:करणास स्पर्श करू शकत नाही, हे निश्चित!शिवाय ज्या ज्या वेळी या जगात अथवा देशात धर्म हा आपल्या मूळ स्वरूपात आला, त्या प्रसंगी या मूळ धर्माकडूनसुद्धा हेच घोषित करण्यात आले. आजसुद्धा या गोष्टी कोणत्या न् कोणत्या स्वरूपात जगातील समस्त धर्मांत आढळतात. कारण असे की धर्म हा नेहमीच आपल्या मूळ स्वरूपानुसार एकच असतो आणि असे व्हावयासही हवे. अल्लाह एकच आहे! म्हणूनच त्याच्याकडून येणारा संदेशसुद्धा एकच असून त्याचे खरे नाव इस्लाम असे आहे. अर्थातच असा धर्म जो मानवास अल्लाहसमोर आत्मसमर्पण करण्याची शिकवण देतो. प्रत्येक काळात अल्लाहकडून प्रत्येक देश वा राष्ट्रात त्याच्या पैगंबरांच्या माध्यमाने जो धर्म आला, तो मुळात इस्लाम हाच धर्म होय. मात्र जसजसा काळ लोटत गेला तसतसे लोकांनी आपापल्या सवलतीनुसार परिवर्तन घडवून आणले. पाहिजे ते समाविष्ट केले आणि नको ते वजा केले. याच प्रकारातून मग विविध शाखा फुटल्या आणि बरेच कृत्रिम धर्म निर्माण झाले. मात्र धर्म हा मूळ स्वरूपात एकच असून या मूळ धर्माचा आधार निम्नलिखित तीन गोष्टींवर आहे. (१) हे विश्व अल्लाहशिवाय निर्माण झालेले नसून अल्लाहशिवाय कार्यरत नाही. तो सर्वगुणसंपन्न असून त्याच्या समान इतर कोणीही नाही.(२)अल्लाहने आपली महत्त्वपूर्ण निर्मिती अर्थात मानवजातीस आपला संदेश पैगंबरांच्या माध्यमाने पाठविला आणि प्रत्येक  काळ  व  प्रत्येक  भूभागात  पाठविला. कोणासही यापासून वंचित ठेवले नाही. (३) समस्त मानवांना एके दिवशी आपल्या खऱ्या स्वामीसमोर अर्थात अल्लाहसमोर आपल्या भल्या-बुऱ्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. प्रत्येकास त्याच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा चांगला आणि वाईट कर्माचा वाईट मोबदला मिळणारच.
या तीन गोष्टी इस्लामच्या मूलभूत गोष्टी असून इस्लाम हाच धर्म नेहमीकरिता अल्लाहकडून आलेला सत्यधर्म होय. सर्वांत शेवटी इस्लाम धर्म आपल्या मूळ, परिपूर्ण आणि अंतिम स्वरूपात अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत जगात आला. त्यांचे पूर्ण जीवन आजही आपल्या मूळ स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणत्याही पैगंबराच्या जीवनाचा मूळ इतिहास आज उपलब्ध नाही.याचप्रमाणे अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित झालेला ईशग्रंथ अर्थात कुरआनसुद्धा मूळ स्वरूपात उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त जगात इतर कोणताही ईशग्रंथ त्याच्या मूळ स्वरूपात कोठेही उपलब्ध नाही. आता जग अस्तित्वात असेपर्यंतच्या समस्त मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आणलेला धर्म अर्थात इस्लाम धर्म मार्गदर्शन करू शकतो. या काळात स्वत:ला इस्लाम धर्माचा अनुयायी असण्याचा दावा करणारे भरपूर लोक आहेत. मात्र अल्लाहच्या दृष्टिकोनात खरा मुस्लिम केवळ तोच आहे, जो इस्लामच्या नियमांवर आपले विचार आणि भावना तसेच आपले जीवन समर्पित करण्याचा प्रयत्न करतो. इस्लाम व कोण्या विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांचा, विशिष्ट भू-प्रदेशाचा अथवा विशिष्ट काळापुरता धर्म नसून तो अल्लाहकडून समस्त मानवजातीकरिता व जग अस्तित्वात असेपर्यंत एक विश्वव्यापी जीवनमार्ग आहे. या धर्माची सर्वप्रथम शिकवण अशी की मानवाने एकाच अल्लाहस या जगाचा निर्माता, पोशिंदा आणि पूज्य स्वीकारावे. त्याचीच एकट्याची आराधना करावी, त्याच्या आदेशांचे पालन करावे. इतर कोणासही त्याच्यासम ठरविता कामा नये. त्याच्याव्यतिरिक्त इतर कोणाचीही पूजा करता कामा नये, कोणाच्याही आदेशाचे पालन करता कामा नये. अर्थातच यावर पूर्ण विश्वाससुद्धा असावा की अल्लाहच पूज्य आणि आराध्य असून केवळ त्याच्या मर्जी व कायद्यानुसारच जीवनाची वाटचाल करावी, आपले तन-मन-धन केवळ त्याला समर्पित करावे, त्याच्याच समोर नतमस्तक व्हावे, त्यालाच मदत मागावी, त्याचाच धावा करावा आणि त्याच्याच मर्जीचे जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत पालन करावे. या विश्वाचा व आपला स्वामी त्यालाच मानावे. त्याच्याव्यतिरिक्त इतक कोणाचीही आज्ञा पाळता कामा नये. इतर कोणाही व्यक्तीने दाखविलेला मार्ग स्वीकारून जीवनाची वाटचाल करून स्वत:चे वाटोळे करून घेता कामा नये.
जी व्यक्ती अशा स्वरूपात अल्लाहचा स्वीकार करते, ती ईशमार्गाशिवाय इतर कोणाच्याही मार्गदर्शनाचा अवलंब करू शकत नाही. स्वत:च्या इच्छा-अभिलाशा आणि आवडीनिवडीसुद्धा अल्लाहच्या मर्जीच्या स्वाधीन करते. अल्लाहने आपल्या अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत दिलेल्या जीवनमार्गानुसार जीवन जगून यशस्वी व कल्याणकारी जीवनाची वाट धरावी. इस्लामची दुसरी अट अशी आहे की अल्लाहने जीवन जगण्यासाठी जो मार्ग दिला तो पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यामार्फत दिला आणि इस्लाम हेच त्याचे नाव होय. अर्थात माणसाने पैगंबर मुहम्मद (स.) यांना अंतिम पैगंबर मानावे आणि अशी धारणा ठेवावी की ते या समस्त जगवासियांकरिता अल्लाहचा संदेश घेऊन आले आणि सर्वांचे पैगंबर व कल्याणकारी सुधारक आहेत. त्यांच्यानंतर आता कोणीही पैगंबर येणार नाही. यासाठी त्यांच्यावर अल्लाहकडून अवतरित झालेला अंतिम ईशग्रंथ हा कुरआन असून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या ग्रंथानुसार स्वत: प्रत्यक्ष कर्म करून दाखविले. इस्लामची तिसरी धारणा अशी की मानवाने या गोष्टीवर श्रद्धा ठेवावी की त्यास मृत्यूपश्चात आपल्या प्रत्येक कर्माचा अल्लाहसमोर जाब द्यावा लागणार आहे. यासाठी त्यास परत जीवन प्राप्त होणार असून ते कधीही संपणारे नसेल. माणसास त्याच्या प्रत्येक चांगल्या कर्माचा चांगला मोबदला स्वर्गरूपी जीवनाच्या स्वरूपात मिळणार आणि वाईट कर्मांचा मोबदला नरकाच्या यातनामय जीवनाच्या स्वरूपात मिळणार आहे, हे निश्चित!
या इस्लामच्या मूलभूत आणि महत्त्वपूर्ण शिकवणी असून या शिकवणी माणसाच्या अंत:करणाची साद होय. हे समजून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही!

Dua
या सृष्टीचा निर्माता, पोशिंदा, स्वामी व प्रभू परम दयाळू व कृपाळू अल्लाह असून तो मानवजातीच्या कल्याणकारी मार्गदर्शनासाठी पैगंबर पाठवितो, जे या जगाच्या पाठीवर वसणाऱ्या समस्त मानवांना योग्य मार्गदर्शन करतात, सत्य-असत्य, खरे-खोटे, योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय आणि चांगल्या-वाईटाचा फरक सांगतात. सत्याची, न्यायाची आणि सदाचाराची स्थापना करतात. माणसास माणूस बनवितात.
मात्र आपण याबरोबरच हेसुद्धा पाहिले आहे की मानव हा एक स्वतंत्र आणि स्वावलंबी जीव आहे. तो इतर सजीवांप्रमाणे विवश, निष्प्रभ आणि हतबलसुद्धा नाही. चांगल्या आणि वाईट, सत्य आणि असत्य मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि सामर्थ्य त्याच्यात आहे. सत्याचा मार्ग हा पैगंबरांनी दाखविलेला मार्ग असून पैगंबरांच्या मार्गाविरूद्ध असलेला मार्ग म्हणजे असत्य, अन्याय व दुराचाराचा मार्ग होय. या जगाच्या इतिहासात लोकांनी याच दोन मार्गांपैकी एका मार्गाची निवड केली आहे. आजही याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. आज आपण पाहतो की या जगामध्ये चांगले आणि वाईट या दोन्ही प्रकारचे लोक आहेत. ईशमार्गावर चालणारेही आहेत आणि ईशद्रोहीसुद्धा आहेत.
या परिस्थितीवर गंभीरपणे जर आपण विचार केला तर हा प्रश्न उभा राहतो की सरळमार्गी आणि दुष्कर्मी वा अन्यायी लोकांत साम्य आहे काय? दोघांचा परिणाम सारखाच होईल काय? मुळीच नाही. शक्यही नाही. कारण अल्लाहकडून मार्गदर्शन अथवा जीवनाचा योग्य आणि सत्यमार्ग मिळाल्यास तसेच हा सत्यमार्ग स्वीकारण्याचे व न स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असूनही न स्वीकारणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा जाब विचारण्यात येणार नाही आणि स्वीकारणाऱ्यांना त्यांच्या आज्ञाधारकतेचा कोणताही बदला मिळणार नाही, हे तर बुद्धीला मुळीच पटणारे नाही.
अल्लाहच्या पैगंबरांनी अल्लाहचा संदेश मानवजातीला प्रदान केला व या संदेशाबरोबरच या वस्तुस्थितीबाबतही खबरदार केले आहे की वर्तमान जीवनाची ही मुदत मुळात एका परीक्षेपुरता कार्यकाळ आहे. अल्लाहने मानवास चांगले वा वाईट निवडण्याचे जे स्वातंत्र्य प्रदान केले, ते यासाठीच केले की मानवाची परीक्षा घ्यावी की कोणती व्यक्ती आपल्या स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने आणि चांगल्या प्रकारे वापर करते, सदुपयोग करते आणि कोणती व्यक्ती याचा दुरुपयोग करते. अल्लाहने मानवजातीस मार्गदर्शन देण्याचा एक पैलू हादेखील आहे की लोकांनी हे मार्गदर्शन स्वीकारावे आणि याचा योग्य व पुरेपूर मोबदला प्राप्त करावा. त्याचप्रमाणे ज्यांनी हे मार्गदर्शन डावलले आणि आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून मनमानी केली, त्यांना याची शिक्षाही भोगावी लागणार. म्हणूनच अल्लाहच्या पैगंबरांनी मानवजातीस स्पष्ट शब्दांत खबरदार केले की हे वर्तमान जीवन कर्म करण्याचे कार्यक्षेत्र आहे. या जीवनात जी व्यक्ती अल्लाहने दाखविलेल्या मार्गदर्शनानुसार जीवनाची  वाटचाल करील, अल्लाहने दाखविलेल्या सत्यमार्गावर जीवन व्यतीत करील, नेकी आणि सदाचाराचे जीवन व्यतीत करील, त्यास याचा उत्तम मोबदला मिळेल. त्याचप्रमाणे जी व्यक्ती या मार्गाविरूद्ध जीवन व्यतीत करील, त्या व्यक्तीस कठोर शिक्षा मिळेल. त्यांनी याविषयीदेखील मानवजातीस खबरदार केले की आम्ही (पैगंबर) अल्लाहने प्रदान केलेल्या ज्ञानाच्या आधारावर समस्त मानवांना हे दाखवू इच्छितो की हा विश्वरूपी कारखाना एके दिवशी नष्ट करण्यात येईल. समस्त मानवजातीस परत जीवित करण्यात येईल आणि प्रत्येकास प्रभु, अल्लाहसमोर आपापल्या कर्मांचा जाब द्यावा लागणार आहे. या गोष्टीचा जाब की अल्लाहने प्रदान केलेल्या शक्ती व सामर्थ्यचा, स्वातंत्र्य व क्षमतेचा, कौशल्य व पात्रतेचा वापर कोणत्या व कशा पद्धतीने केला. अल्लाहच्या मर्जीनुसार केला की त्याच्या अवज्ञेनुसार केला. याबरोबरच अल्लाहने आपल्या पैगंबरांच्या माध्यमाने हेदेखील स्पष्ट केले की अल्लाहच्या मर्जीनुसार जीवन व्यतीत करण्याचे प्रचंड बक्षीस मिळेल, अर्थात अविनाशी असलेली स्वर्गप्राप्ती होईल. याउलट अल्लाहची अवज्ञा करून इतर कुणाच्या आज्ञेनुसार वा मर्जीनुसार जीवन जगण्याचे फलित अत्यंत वाईट मिळेल, अर्थात कधीही न संपणाऱ्या नरकयातना मिळतील. यातून कधीही सुटका होणार नाही.
मृत्यूनंतर परत जीवन मिळणार की नाही, मृत्यूनंतरचे जीवन कसे असेल, याविषयीची माहिती मिळविण्याची साधने आपल्याकडे नाहीत. काहींचे मत आहे की आपले हेच वर्तमान जीवन एवढेच आहे. मृत्यूनंतर कोणतेही जीवन नाही. मृत्यूनंतर जीवनाची कल्पना करणे हे केवळ एक कपोलकल्पित बाब आहे. वास्तविकतेशी याचा कुठलाही संबंध नाही. मात्र जर असे असते तर प्रश्नच मिटला असता. यावर विचार करण्याची गरजसुद्धा पडली नसती. कसले पुण्य आणि कसले पाप? पद्धतशीरपणे मस्तपैकी जीवन भोगायचे नि मरून जायचे, संपले! मात्र ही वस्तुस्थिती विसरण्यासारखी मुळीच नाही की आपल्या वर्तमान जीवनाशी या कल्पनाविलास वाटणाऱ्या बाबीचा दृढ संबंध आहे. विशेषत: आपल्या नैतिक जीवनाचा तर याशीच संबंध आहे. उदाहरणार्थ, आपण थोड्या वेळेसाठी असे समजू या की मृत्यूनंतर कोणत्याही प्रकारचे जीवन नाही आणि आपल्या जीवनाचा वा भल्या-बुऱ्या कर्मांचा जाब द्यावा लागणार नाही, ज्या जीवनाच्या यशापयशाची मदार वर्तमान जीवनावर आहे. तर याचा परिणाम निश्चितच आपल्या वर्तमान जीवनावर असा होईल की आपल्या जीवनातून पाप-पुण्याचा कोणताही मोबदला जर मिळत नसेल आणि पापाची कोणतीही शिक्षा भोगावी लागणार नसेल तर मग चांगले आणि सदाचाराचे विनाकारण लचांड गळ्यात घालून घ्यायचेच कशाला? मग वाटेल तसे जगायचे. नैतिकता, मानवता आणि सदाचाराची बिनधास्त होळी करायची. आपले जीवन रंगवून घेण्यासाठी इतरांच्या रक्ताने बिनधास्त शिमगा खेळायचा, वाटेल त्याला खपवायचे, वाटेल ते हिसकावून घ्यायचे, साऱ्यावर आपलीच मनमानी स्थापन करायची. कारण जीवन हे एकदाच मिळालेले असते, ते वाटेल तसे भोगायचे, मौज-मजा करण्याची कोणतीही संधी चुकवायची नाही. कारण आपल्याला कोण विचारणार, आपला कोण जाब घेणार? मात्र हा विषय वाटतो तेवढा सोपा नाही. यावर गंभीरपणे विचार केल्याशिवाय मुळीच गत्यंतर नाही. आपल्याला यावर विचार करावाच लागणार आहे की मृत्यूनंतरच्या जीवनातील यशापयशाचे परिणाम आपल्या वर्तमान जीवनावर काय होतात.
आपण जर यावर खरोखरच विचार केला तर आपल्याला हे स्पष्टपणे आढळून येईल की या जगात बरेच लोक चांगले व वाईटही आहेत आणि बरेचजण सदाचारी व दुराचारीही आहेत. दुराचारी लोक अत्यंत मौज-मस्तीत जीवन व्यतीत करून जगाचा निरोप घेतात. त्यांच्या जीवनात समस्त सुखसाधने असतात. तर याउलट सदाचारी व सद्वर्तनी लोक दु:ख, समस्या, अडचणी आणि ना-ना प्रश्नांशी झुंजत असताना दिसतात. असेच समस्याग्रस्त जीवन कंठून ते या जगातून निघून जातात. या ठिकाणी विचार करण्यासारखी बाब अशी आहे की जे लोक सद्वर्तनी, सत्यनिष्ठ आणि सदाचारी असतात व याच सत्यनिष्ठतेपायी संकटमय जीवन जगत असतात, अल्लाहच्या निर्णयाचे प्रत्येक संकटमय पावलावर स्वागतच करीत असतात, मोठमोठ्या संकटांना न घाबरता आणि कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता सत्याची कास सोडत बसतात, न्याय आणि सदाचाराकरिता अख्खे जीवन अल्लाहला सर्मिपत करतात आणि याच सत्याच्या मार्गावर जीवनाची वाटचाल करून जीवनाची सांगता करतात, त्यांच्या मनात निश्चितच ही जाणीव तीव्रपणे उचंबळून येते की जगाचा निर्माता व पोशिंदा प्रभू अल्लाह निश्चितच न्यायी आहे, तो आपल्या सत्यनिष्ठा व सदाचाराचा, आपल्या भावनांच्या बलिदानांचा, आपल्या सत्य समर्पणाचा निश्चितच उत्तम मोबदला देईल. या सदाचाराच्या बदल्यात एका अशा स्थायी, समाधानकारक, दु:खरहित आणि आनंददायी जीवनाची नितांत आवश्यकता आहे. एका अशा जीवनाची गरज आहे जेथे निश्चितच सदाचाराचे चांगले फळ आणि दुराचाराची शिक्षा मिळावी. शिवाय ज्या माणसाला या गोष्टीवर विश्वास असेल की या विश्वाचा रचयिता, निर्माता, सृष्टा, पोशिंदा, प्रभु अल्लाह आहे आणि त्यानेच हे सारे काही आपल्या सामर्थ्यने निर्माण केले, आपले स्वामित्व गाजविले, आपल्या प्रभुत्वाने सारी सृष्टी पोसली, तोच प्रभु अल्लाह निश्चितच सहजरित्या परत ही सृष्टी निर्माण करील. यात त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येण्याचा प्रश्नच नाही. अशा अमर्याद सामर्थ्यशाली निर्मात्या प्रभु अल्लाहसाठी प्रत्येक मानवास परत जीवन देण्यात काहीही अडचण येणार नाही. मग शेवटी अल्लाहच्या पैगंबरांनी परलोकी जीवनाची जी खबर अथवा वार्ता दिली, त्यात मुळीच शंका वाटण्याचे कारण नाही.
आणखीन एक सांगायचे झाल्यास तुम्ही कदाचित म्हणाल की माणसाला चांगल्या आणि वाईट कर्माचे फलित मिळण्यासाठी दुसऱ्या जीवनाची काय गरज आहे? हे तर या जीवनातही शक्य आहे! येथेसुद्धा दु:ख आहे, कष्ट आहे, सुख-समाधान आहे. येथेही उच्च-नीच आहे आणि या आधारावर हेदेखील जर मान्य करण्यात आले की याच जगात आपल्या पाप-पुण्याईचा मोबदला प्राप्त करण्यासाठी याच जगात वारंवार माणूस जन्म घेऊ शकतो. पुण्याईच्या बदल्यात सुखी-समाधानी जीवन प्राप्त होऊ शकते, पापकर्मांच्या मोबदल्यात दु:ख व यातनामय जीवन मिळू शकते. मात्र यावर थोडाजरी विचार केला तर तुम्हाला निश्चितच या गोष्टीवर विश्वास येईल की पाप-पुण्याच्या बदल्यात या वर्तमान जीवनात तर काहीही मिळणे शक्य नाही. जर आपण हे मान्य केले की सध्या अडीअडचणीत असलेली व्यक्ती मागच्या जन्मीच्या पापाची फळे भोगत असून सुखी-समाधानी व्यक्ती मागील जन्माच्या पुण्याची फळे चाखत आहे, तर आपल्यासमोर एक मोठा प्रश्न असा उभा राहतो की या जगात सर्वप्रथम पाऊल ज्या व्यक्तीने ठेवले होते, त्यास कोणत्या जन्माच्या पुण्य अथवा पापाचे फळ भोगण्यासाठी या जगात पाठविण्यात आलेले होते?कारण यापूर्वी तर त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे व्यावहारिक जीवन नव्हते. यापेक्षाही आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी की आज जे लोक सुखी-समाधानी आहेत अथवा समस्या व संकटांनी ग्रस्त जीवन कंठीत आहेत, त्याच्यासंबंधी हे सांगता येणे शक्य नाही की ते पुण्यकर्माची बक्षिसे प्राप्त करताहेत की पापाची कडू फळे चाखत आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या दीन-दु:खी आणि संकटग्रस्त व्यक्तीस पाहा. कदाचित तो या अवस्थेच्या स्वरूपात शिक्षा भोगत असेल. कारण मागच्या जन्मी कदाचित त्यास धन-दौलत अगर सत्ता मिळालेली असेल आणि त्याने कदाचित दुराचार वा पापकर्मे केली असतील आणि त्याच्या परिणामस्वरूपी तो या जन्मी शिक्षा भोगत असेल. याबरोबरच हेदेखील शक्य आहे की ही अवस्था मागील जन्मातील चांगल्या कर्मांचे उत्तम बक्षीस भोगण्यासाठी असावी. कारण मागच्या जन्मी तो कदाचित एखादा प्रामाणिक कुत्रा असावा आणि त्याच्या प्रामाणिकतेचे फळ म्हणून त्यास हे मानवी जीवन मिळालेले असेल. मग हे जीवन समस्या आणि संकटांनी ग्रस्त का असेना. शिवाय या अडचणींव्यतिरिक्त आणखीन एक मोठी अडचण अशी दिसते की या जन्मात माणूस पुढील जन्मासाठी काही कष्ट करून पुण्याईची कमाई करीत असण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर असेही म्हणणे वावगे ठरणार नाही की या वर्तमान जीवनात माणूस पुढील जन्मासाठी काही पुण्य कमावित असेल अथवा पुढील जीवनाच्या यशापयशाची पूर्ण भिस्त या जीवनाच्या पुण्य व पापकर्मांवर असेल. मग यातदेखील आणखीन एक अडचण अशी निर्माण होते की एक माणूस एकीकडे शिक्षा भोगत आहे वा बक्षीस मिळवित आहे आणि दुसरीकडे तर हीच शिक्षा आणि बक्षीस त्याच्या पुढील जन्माकरिता यशापयशाचे कारण ठरत असेल, हे कोणत्याही पैलूने बुद्धिसंमत वाटत नाही.
या समस्त बाबींव्यतिरिक्त आणखीन एक पैलू असा की आपण जर कोणत्याही दृष्टिकोनानुसार या वारंवार जन्म घेण्यावर विचार केला तर ते शक्य वाटत नाही. या जीवात जो माणूस जेवढी कर्मे करतो, ती सर्व प्रकरणे त्याच्या जीवनाबरोबरच संपूर्ण जाणारी बाब मुळीच नाही. उदाहरणार्थ, एखाद्या नराधमाने एखाद्या निष्पाप माणसाचा वध केला आणि जर त्या खुन्यास या अपराधास्तव फाशीची शिक्षा देण्यात आली तर हे प्रकरणदेखील इथेच संपत नाही. कारण त्याचा एक गुन्हा असा होता का त्याने एका निष्पाप माणसाला जीवातून उठविले. मात्र याबरोबरच मृताच्या परिवारास असंख्य आर्थिक, मानसिक छळ सोसावा लागला. बिचाऱ्याची मुलेबाळे रस्त्यावर आली, पत्नी विधवा व निराधार झाली. मुले अनाथ झाल्याने शिक्षणाची सोय झाली नाही आणि दर-दर भीक मागून अख्खे जीवन व्यर्थ घालवावे लागले. शिवाय नंतरच्या कित्येक पिढ्या या दुष्कृत्यामुळे वाया गेल्या अर्थात त्याच्या खून करण्याच्या अपराधाचे परिणाम फक्त मृतकासच नव्हे तर परिवार, समाज आणि न जाणो कोणाकोणास भोगावे लागले असतील. जर सत्य आणि न्यायासहित त्यास त्याच्या पापाची पूर्णपणे शिक्षा द्यायची झाल्यास केवळ फाशी दिल्याने कसे चालेल?मृतकाच्या परिवारजनांचे जे जीवन उद्ध्वस्त झाले त्याचे काय? जर फाशी होताच त्याच्या पापाची शिक्षा म्हणून त्यास कुत्रा अथवा मांजराच्या जन्मी घालण्यात आले तर ते असे ठरेल जणू एखाद्याचे खाते बंद करण्यापूर्वीच त्याचा हिशेब पूर्ण करण्याचा एखाद्याने निर्णय घ्यावा. हीच परिस्थिती पुण्यकर्मांचीदेखील आहे. माणूस बरीच कर्मे अशी करतो, ज्यांचे उत्तम परिणाम त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा मानवजातीस प्राप्त होत असतात. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने एखादी शाळा काढली. जोपर्यंत लोक त्या शाळेत शिक्षण घेत राहतील तोपर्यंत त्यास याचे पुण्य लाभत असेल. कोण जाणे किती शतकांपर्यंत ही शाळा सुरू राहील आणि लोकांना शिक्षणासारखी अमूल्य संपत्ती प्राप्त होत राहील. अशा अवस्थेत त्याला मेल्यानंतर तात्काळ त्याच्या पुण्याचा मोबदला कसा देता येईल. कारण अद्याप त्याच्या पुण्यकर्माचे खातेच बंद झालेले नसणार.
अशाप्रकारे विचार केल्यास हीच बाब स्पष्ट होते की जर माणसाला त्याच्या पुण्य वा पापाचे योग्य फलित मिळावयास हवे असेल तर त्यास एक असे जीवन हवे जे हे जग नष्ट झाल्यानंतर सुरू व्हावे आणि ते परलोकी जीवन कायमस्वरूपी व स्थायी स्वरूपाचे असावे. ज्या ठिकाणी माणसाला पूर्ण रूपाने त्याच्या पुण्य वा पापांची फलिते मिळणे शक्य व्हावे. कारण या वर्तमान जगातील क्षणभंगूर जीवन या फलितांसाठी पुरेसे ठरू शकत नाही, मात्र निश्चित!

Madina
पूर्ण विश्व स्वयं अल्लाहने निर्माण केले, त्यानेच याची रचना केली. तोच एकटा या समस्त विश्वाचा स्वामी आहे. त्याच्याच मर्जी व आदेशाने समस्त कार्य सुरळीत आणि व्यवस्थितपणे सुरू आहे. सृष्टीतील प्रत्येक वस्तू ज्या कार्यासाठी तयार करण्यात आली ते कार्य ती करीत आहे. प्रत्येक वस्तूचे नियम ठरवून देण्यात आलेले आहेत. त्या ठराविक नियमांचे पालन प्रत्येक वस्तू विनातक्रार करीत आहे. पाणी वाहण्याचे, त्याचे बाष्पीभवन होण्याचे, बर्फ बनण्याचे विशेष नियम ठरवून देण्यात आले आहेत ते या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही. सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांचे, ग्रह आणि नक्षत्रांचे नियम ठरवून देण्यात आले आहेत. या नियमांचे किंचितही उल्लंघन कोणी करू शकत नाही. या नियमांबाहेर तसूभरही सरकण्याचे कोणातही सामर्थ्य नाही. आकाशातून पर्जन्यवृष्टी होते, जमिनीतून फळे, फुले आणि धान्य मिळते. मात्र ही समस्त वनस्पती-सृष्टी स्वत:च्या मर्जीने काहीही करू शकत नाही. अर्थातच या विश्वातली प्रत्येक निर्मिती ज्या कामासाठी तयार करण्यात आलेली आहे ती तेच नेमून दिलेले काम नेमून दिलेल्या नियमानुसार सुरळीत आणि व्यवस्थितपणे पार पाडीत आहे. विश्वातील सर्वच वस्तू ज्याप्रमाणे अल्लाहची निर्मिती आहेत, त्याचप्रमाणे मानवदेखील अल्लाहची निर्मिती आहे, उत्कृष्ट रचना आहे. मानवाची निर्मिती, त्याचे जीवित राहणे, मरणे वगैरे सर्वकाही निश्चित करून देण्यात आले आहे. याच नेमून दिलेल्या कायद्यानुसार जन्मापासून अर्थात मातेच्या गर्भातील निर्मितीपासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक कार्य मानवाकडून होत असते. मानवसुद्धा या नियमांचे तसूभरही उल्लंघन करू शकत नाही. जन्माचे जे नियम आहेत, त्याच नियमानुसार तो जन्म घेऊ शकतो.डोळ्यांनी ऐकण्याचे, कानांनी बोलण्याचे, पायांनी खाण्याचे, तोंडाने चालण्याचे काम करू शकत नाही. तो निश्चितच आपले पूर्ण कार्य अल्लाहने नेमून दिलेल्या निसर्ग-नियमांनुसार करू शकतो. या नियमांच्या किंचितही बाहेर जाऊ शकत नाही.
मानवाचा आणखीन एक पैलू आहे आणि तो असा की मानवाचा दर्जा आणखीन इतर वस्तूंपेक्षा विशेष आहे. मानव हा या सृष्टीची विशेष निर्मिती आहे. अल्लाहने इतर निर्मितींना प्रदान न केलेले विवेकसामर्थ्य आणि बुद्धी केवळ मानवालाच प्रदान केली आणि याबरोबरच त्याला कार्यस्वातंत्र्य प्रदान केले, विचारस्वातंत्र्य प्रदान केले, भूमिकास्वातंत्र्य प्रदान केले. चांगला आणि वाईट या दोन्ही मार्गांपैकी एकाची निवड करण्याचे स्वातंत्र्य दिले. ईशप्रदत्त शक्ती व सामर्थ्यचा चांगल्या आणि वाईट या दोन्ही पद्धतीने वापर करू शकतो. अशाप्रकारे अल्लाहने मानवास एका पैलूने कार्यस्वातंत्र्य दिले.
अल्लाहने मानवास जे कार्यस्वातंत्र्य दिले आहे, त्याचा वापर कसा करावा हा एक सर्वांत मूळ प्रश्न आहे. कारण याच स्वातंत्र्याचा वापर करण्यावर त्याच्या जीवनाचे यश आणि अपयश अवलंबून आहे. याच आधारावर जगाच्या व्यवस्थेचा सुधार आणि बिघाड अवलंबून आहे. तुम्ही कदाचित असेही म्हणू शकता की मानवास जे विवेकसामर्थ्य अल्लाहने प्रदान केलेले आहे, त्याचा वापर करून तो आपल्या कार्यस्वातंत्र्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. मात्र तुम्हाला हेदेखील स्वीकारावे लागेल की मानवाचे विवेकसामर्थ्यसुद्धा मर्यादित स्वरूपाचे आहे. शिवाय प्रत्येक व्यक्तीची विवेकशक्ती भिन्न असून तो आज घेतलेला निर्णय तीच व्यक्ती उद्या आपल्या अनुभवाच्या आधारावर आपला निर्णय बदलते. घेतलेला निर्णय आजच्या अनुभवाच्या आधारावर चुकीचा ठरविते. एकजण जो निर्णय योग्य ठरवितो, तोच निर्णय दुसराजण चुकीचा ठरवितो. भूतकाळातील घेण्यात आलेले निर्णय ज्याप्रमाणे आज आपण चुकीचे ठरवितो त्याचप्रमाणे आज आपण घेतलेला आणि योग्य वाटणारा निर्णय उद्या येणारी पिढी चुकीचा व अयोग्य ठरवू शकते. यावरून हेच सिद्ध होते की मानव हा केवळ आपल्या स्वत:च्या विवेकसामर्थ्यच्या आधारावर आपला जीवनमार्ग निश्चित करू शकत नाही. त्याला निश्चितच बिनचूक आणि कोणत्याहीत्रुटीपासून मुक्त असलेल्या मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. म्हणूनच अशा प्रकारचे परिपूर्ण आणि बिनचूक मार्गदर्शन, जे माणसाच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातही योग्य असावे, प्रत्येक वृत्तीच्या आणि भिन्न स्वभावाच्या व्यक्तीसाठी योग्य ठरावे.
आपण पाहतो की मानवास हे जीवन जगण्यासाठी असंख्य बाबींची आवश्यकता असते. श्वास घेण्यासाठी हवा, पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, पोषाख, निवारा आणि इतर बऱ्याच गोष्टींची गरज असते. त्याचप्रमाणे मानव हा या सृष्टीत जन्मला असून त्यास जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त गरजांची मोठ्या कौशल्याने निर्मिती करून देण्यात आलेली आहे. हवा, अन्न, पाणी, निवारा, स्वारी, कपडालत्ता आणि यासारख्या ना-ना वस्तू पुरविण्यासाठी पूर्णपणे प्रबंध अल्लाहने करून ठेवले आहेत. याचाच अर्थ असा की अल्लाहने मानवाची निर्मिती केली, जीवन प्रदान केले आणि त्यास जगण्यासाठी आवश्यक असलेल्या समस्त वस्तुंची योग्य प्रकारे व्यवस्था केली. म्हणजेच मानवास जीवन व्यतीत करण्यासाठी मार्गदर्शनाचीसुद्धा गरज आहे. आपले स्वातंत्र्य, आपली शक्ती आणि सामर्थ्यचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन त्यास नितांत आवश्यक आहे. कारण मार्गदर्शनाशिवाय मानव आपल्या स्वातंत्र्य, शक्ती आणि सामर्थ्यचा गैरवापर करू शकतो आणि अशा प्रकारे त्याचे जीवन विध्वंसाच्या मार्गावर जाऊ शकते. अर्थातच जीवन जगण्यासाठी भौतिक पदार्थ, अन्न, पाणी, निवारा वगैरेची ज्याप्रमाणे गरज आहे अगदी त्याचप्रमाणे योग्य मार्गदर्शनाचीसुद्धा मानवास नितांत गरज आहे. परमदयाळू आणि कृपाळू अल्लाहने मानवास जगण्याकरिता अन्न, पाणी, हवा आणि इतर वस्तूंची ज्याप्रमाणे पूर्णत: व्यवस्था केली, अगदी त्याचप्रमाणे त्याच्या मार्गदर्शनासाठीदेखील पूर्ण व्यवस्था केली आहे आणि यात नवल वाटण्यासारखेसुद्धा काहीही नाही. कारण हे तर मुळीच शक्य नाही की जो अल्लाह भावनांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी या विश्वात मातीच्या प्रचंड विशाल ग्रह-तारे, समुद्र, हवा, चंद्र व सूर्याला कामाला लावून अन्न, पाणी, निवारा आणि यासारख्या ना-ना अद्भूत वस्तूंची निर्मिती केली, तो दयाळू आणि कृपाळू अल्लाह मानवाच्या मार्गदर्शनाची गरज पूर्ण करणार नाही.
मानव इतिहास आपल्या समोर आहे. देश आणि राष्ट्रांत मानवास जीवन जगण्यासाठी काही असे कायदे आहेत ज्याविषयी असा दावा करण्यात येतो की हे अल्लाहचे कायदे आहेत. प्रत्येक राष्ट्रात असे बरेचजण होऊन गेले ज्यांचा असा दावा होता की त्यांच्याकडे मानवाच्या योग्य मार्गदर्शनासाठी ईशसंदेश आहे. या महामानवांनी प्रत्येक काळात हे दाखविले की अल्लाहची मर्जी काय आहे आणि त्याने मानवास जे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले आहेत, त्यांचा वापर कशा पद्धतीने व्हावा. या महामानवांनी प्रत्येक काळात सांगितले आहे की चांगले काय आहे नि वाईट काय आहे, सत्य काय आहे नि असत्य काय आहे, पुण्य काय आहे नि पाप काय आहे. ही वेगळी गोष्ट आहे की या बाबतीत बऱ्याच लोकांकडून मूळ सत्य अस्पष्ट होत गेले. उदा.- (१) काही लोकांनी या महामानवाच्या मूळ शिकवणीत इतर काहीजणांच्या शिकवणी समाविष्ट केल्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या आज मूळ शिकवणींना भेसळमुक्त करणे अशक्य होऊन बसले. (२) बऱ्याच लोकांनी या महामानवांच्या मूळ चारित्र्यास कथा-दंतकथा आणि साहित्याचा मुलामा दिला. यामुळे आज हे जाणून घेणे अशक्य झाले की कोणत्या महामानवाची शिकवण कोणती आहे. (३) काहीजणांनी या महामानवांना मानव म्हणून न स्वीकारता अल्लाहच्याच स्थानावर स्थानापन्न करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचजणांना भ्रम झाला की साक्षात ईश्वरच मानवाचा अवतार घेऊन पृथ्वीवर अवतरला आणि या जगातून असत्य व अन्यायाचा नाश केला. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहचे मानवरूपात प्रकट होणे हे कोणत्याही प्रकारे शोभणीय नसून तो आपल्या काही नेक भक्तांना मानवाचे मार्गदर्शन करण्यासाठी निवडतो.
ज्या नेक भक्तींची अल्लाहने मानवजातीस सत्यमार्ग दाखविण्याकरिता निवड केली, त्यांनाच मुळात पैगंबर असे म्हणतात. अल्लाह त्यांना प्रत्येक दुराचारापासून मुक्त ठेवतो. त्यांना आपला संदेश देतो जेणेकरून अल्लाहचा हा संदेश त्यांनी मानवजातीपर्यंत पोचवावा. जी व्यक्ती अल्लाहवर तर श्रद्धा ठेवते आणि मान्य करीत नसेल की अल्लाहकडून काहीजण धर्ममार्ग, सत्यमार्ग अथवा न्यायाचा मार्ग दाखविण्यासाठी पैगंबर पाठविण्यात आले, तर तो त्याला मान्य असलेल्या धार्मिक शिकवणी वा ईशमार्गदर्शन हे अल्लाहकडूनच प्राप्त असण्याचा दावा कशाच्या आधारे करू शकतो? पैगंबर हे तर अल्लाह आणि त्याचे दास अर्थात मानवजात या दोहोंदरम्यान एक दुवा आहे. अर्थात असा प्रामाणिक पुण्यकर्मी माणूस जो अल्लाहचा संदेश मानवजातीपर्यंत पोचवितो यालाच पैगंबर अथवा पैगंबर असे म्हणतात.

Allah
जर तुम्हाला कुणी असे सांगितले की ही रेल्वे, जी हजारो प्रवाशांची ने-आण करते, आपोआपच तयार झाली आणि आपोआपच चालते, वाटेल तेव्हा आपल्या मर्जीने थांबते आणि वाटेल तेव्हा आपल्या मर्जीने पुढच्या स्थानकाकडे रवाना होते, तर तुम्हाला विश्वास तरी होईल काय? तुम्ही म्हणाल की.... मी रेल्वे तयार करणाऱ्यास पाहिले नसले तरी मी तुमच्या बोलण्यावर मुळीच विश्वास ठेवणार नाही की रेल्वे कुणीही न बनविता आपोआपच तयार झाली आणि कुणीही न चालविता आपोआपच चालते.
रेल्वे तर खूप मोठी बाब आहे. तुम्ही तर हेदेखील मान्य करणार नाही की एखादे घर, एखादी खुर्ची, एखादे पेन अगर अशीच एखादी वस्तू कुणीही तयार न करता आपोआपच तयार झाली असावी. आता याच अनुषंगाने या जगाकडे पाहावे. ही पृथ्वी जिच्यावर आपण वास्तव्य करतो, हा चंद्र आणि हा तळपणारा सूर्य, ज्यांमुळे आपल्याला प्रकाश मिळतो, हे कोट्यवधींच्या संख्येत जगमगणारे तारे, हा प्रचंड समुद्र, हा वारा, हे विविध तऱ्हेचे प्राणी, चिवचिवणाऱ्या चिमण्या आणि हे खळखळणारे झरे याबरोबरच आपण सर्व मानव.... हे सर्वकाही आपोआपच तयार झाले आहेत काय? आणि कुणी सांगितलेच की होय! हे सर्व आपोआपच तयार झाले, तर तुमचा विश्वास तरी बसेल काय?
सूर्य हा पृथ्वीपेक्षा लाखो पटीने मोठा असून त्या विश्वात आणखीनही बरेच सूर्य आहेत आणि ते आपल्या या सूर्यापेक्षाही कितीतरी पटीने मोठे आहेत. शिवाय आकाशगंगेत असंख्य तारे आपापल्या भ्रमणकक्षेत व्यवस्थितरित्या फिरत आहेत. प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक तारा अगदी नियोजित कक्षेत आणि नियोजित गतीने नियोजित वेळेनुसार भ्रमण करीत असून त्यात तिळमात्र फरक पडत नाही. सूर्याच्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होते, हे बाष्प वारा पुढे घेऊन जातो आणि मग परत नियोजित वेळेवरच हेच बाष्प पर्जन्याच्या स्वरूपात बरसते. जणू हे त्यांचे निश्चित ठरवून दिलेले कार्यच! जणू आपापल्या कर्तव्याशी कुणीही तिळमात्र कुचराई करीत नाही.
पाऊस आपल्या जीवनाचा मुख्य सहारा आहे. पाऊस पडतो आणि सर्वत्र वनराई हिरवी होते. तऱ्हे-तऱ्हेची पिके, फुले, फळे, आपल्याला आणि प्राण्यांना प्राप्त होतात. पाऊसच जर पडला नाही तर काय-काय घडू शकते, याची कल्पना न केलेलीच बरी. असे स्पष्टपणे दिसते की ही प्रचंड सृष्टी आणि यातील प्रत्येक घटना अगदी नियोजनबद्धरित्या घडते. जणू हे प्रचंड विश्व एक प्रचंड मोठा कारखानाच आहे.
आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की हे कारखानारूपी प्रचंड मोठे विश्व आणि यातील या नियोजनबद्ध घटना-कार्य आपोआपच सुरू आहे काय? हे सर्वकाही चालविणारा आणि सांभाळणारा वा निगराणी करणारा कोणी आहे की नाही? तर वस्तुस्थिती अशी आहे की या विश्वाची निर्मिती करणारा निर्माता असून त्याच्याच आदेशाने हे संपूर्ण विश्व कार्यरत आहे. येथे जे काही होत आहे, ते त्याच निर्मात्या आणि संचालकाच्या मर्जीने होत आहे. येथे एक कणसुद्धा स्वत:हून अस्तित्वात आलेला नसून कोणतीही घटना व कार्य आपोआप घडत नाही.
आता आपण स्वत:लाच पाहावे. आपल्याला किती सुंदर आणि सुरेख शरीर मिळालेले आहे. या शरीरात कशा विविध शक्ती व सामर्थ्य आहे. आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण केवळ आपली जीभ, कंठ आणि ओठांना कार्यरत करतो आणि मग वाटेल तसा आवाज शब्दाच्या स्वरूपात बाहेर पडतो. या शब्दांना काही अर्थ असतो. जी भावना अगर विचार आपल्या मनात असते, ती शब्दांच्या माध्यमाने इतरांपर्यंत पोचवितो. हे कार्य प्रत्येकजण करू शकतो आणि हे करण्यासाठी कोणतेही कष्ट करावे लागत नाही. म्हणूनच आपले याकडे कधी लक्षदेखील जात नाही की हे बोलणे किती मोठी बाब आहे. आपण असे लोकसुद्धा पाहिलेत, ज्यांना बोलता येत नाही. ते जन्मजात मुके असतात. आजपर्यंत अशा कोणत्याही प्रकारच्या यंत्राचा शोध लागला नाही, ज्यामुळे जन्मजात मुक्या व्यक्तीस बोलता येणे शक्य व्हावे.
आपण आपल्या कर्णेंद्रियांनी ऐकतो, याचा अर्थ असा की इतरांच्या आवाजाचा ध्वनी कानांवर आदळतो आणि आपणास समजते की कोण काय बोलत आहे अथवा कोणते पशु-पक्षी कसला आवाज काढत आहेत, अथवा ढोल-ताशा कशा प्रकारे वाजत आहे. आपण हेसुद्धा जाणतो की जे लोक जन्मजात बहिरे असतात अथवा काहीजण नंतरच्या काळात बहिरे होतात, मात्र हरविलेली अथवा जन्मजात नसलेली दृकशक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य प्रदान करू शकत नाही. याच प्रकारे इतर ज्ञानेंद्रियांची अवस्था आहे. अर्थात पाहणे, वास घेणे, विचार करणे, स्पर्श करणे वगैरे हे सर्वकाही अत्यंत आश्चर्यकारक कर्म आहेत की यासाठीची इंद्रियशक्ती एकदा हरविली की जगात कोणातही ही शक्ती देण्याचे सामर्थ्य नाही.
आता विचार करण्याची गोष्ट अशी आहे की असा हा बोलणारा, पाहणारा, ऐकणारा गंध घेणारा, विचार करणारा आणि अशा ना-ना प्रकारचे सामर्थ्य असणारा हा विलक्षण आणि विचित्र माणूस, जो असे कार्य करतो, असे प्रताप दाखवितो की माणसाची अक्कल दंग होते. अर्थातच माणसाच्या शरीराचा एकेक अवयव हेच स्पष्ट करतो की हे संपूर्ण मानवी शरीर, हे विलक्षण सामर्थ्यशाली शरीर आपोआपच तयार झालेले नसून ते अत्यंत कौशल्यवान आणि प्रचंड कला-सामर्थ्य असलेल्या, हाडाचा कारागीर असलेल्या अत्यंत बुद्धिमान निर्मात्याने निर्माण केलेले असून त्याच्यासम इतर कोणताही कारागीर असूच शकत नाही. आपल्याला हेदेखील चांगलेच माहीत आहे की माणूस मातेच्या पोटात अथवा गर्भाशयात तयार होतो. मात्र खरे सांगायचे झाले तर मातेच्या गर्भाशयाच्या अथवा माणूस तयार करणाऱ्या या कारखान्याच्या कार्यात मातेचा वाटा नसतो. अखत्यार नसतो. आपण असे म्हणू शकत नाही की आईच मुलाची निर्माती असते. याचप्रमाणे मुलाचा पितादेखील या निर्मितीकार्यात सहभागी नसतो. अर्थात मुलाचे निर्माते माता-पिता नसतातच मुळी. एका लहानशा गर्भाशयात प्रवेश करणारा अत्यंत सूक्ष्म जीव (Sperm) याला मातेच्या रक्तातून पोषक घटक प्राप्त होतात. मग खरे पाहता हे पोषक घटक पुरविणारे रक्त माता स्वत: तयार करते काय? तिला तर हेदेखील माहीत नसते की बाळाला किती प्रमाणात रक्त मिळत आहे आणि त्याची वाढ कशी होत आहे. स्त्री जे काही खाते-पिते, त्यातूनच निर्माण होणारे रक्त हळूहळू मानवी शरीराचे स्वरूप धारण करते. मग असे कोण आणि कशाच्या आधारावर म्हणू शकतो की स्वत: आई हे कार्य करीत आहे?
थोड्याशा काळात या रक्ताचा गोळा शरीराचे स्वरूप धारण करू लागतो. डोळ्यांच्या ठिकाणी डोळे, कानाच्या ठिकाणी कान, हृदयाच्या ठिकाणी हृदय, मेंदूच्या ठिकाणी मेंदू, कानाच्या ठिकाणी कान, यकृताच्या ठिकाणी यकृत, जठराच्या ठिकाणी जठर, फुफुसाच्या ठिकाणी फुफुस, धमण्याच्या ठिकाणी धमण्या आणि मानवी शरीरास आवश्यक असणारे समस्त अवयव अगदी व्यवस्थित व नीटनेटके आपापल्या ठिकाणी तयार होतात. मग या परिपूर्ण शरीरात प्राण येतो आणि मानवात मानवी सामर्थ्य येते. मग मातेचे गर्भाशय अर्थात मानव तयार करणारा हा विलक्षण कारखाना नऊ महिन्यांनंतर बरोबर वेळेवर या अर्भकास बाहेर फेवूâन देतो. बाहेर येताच त्याचे सर्व अवयव कार्यरत होतात. पूर्वीच तयार झालेले आईच्या छातीतील दूध जे स्वत: आई तयार करीत नसते, बाळ गुटू-गुटू प्यायला लागते, श्वास घ्यायला लागते. अशाप्रकारे कोट्यवधी लोक या जगात तयार होत असतात आणि प्रत्येकाचा चेहरा-मोहरा व स्वरूप वेगळे व परस्पर भिन्न असते. प्रत्येकाची प्रवृत्ती भिन्न असते, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो, प्रत्येकाचा विचार, आवड-निवड, शक्ती, सामर्थ्य कौशल्य, पात्रता आणि भावना भिन्न असतात. या विषयावर जेवढा विचार करण्यात येईल, तेवढेच आश्चर्याचे डोंगर वाढत जाईल आणि आपल्या अंत:करणातून साद निघेल की अशा प्रकारचे विलक्षण कार्य एक प्रचंड कौशल्य-सामर्थ्य असणारा निर्माताच करू शकतो. हा निर्माता तोच अल्लाह ज्याने समस्त जगाची निर्मिती केली असून यात इतर कोणीही त्याचा भागीदार व वाटेकरू असू शकत नाही.
आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती अशी की या जगात लहान वा मोठे कोणतेही कार्य खऱ्या अर्थाने मार्गी लागत नाही. याच्या पूर्ततेकरिता एकावरच याची जबाबदारी असते. कोणत्याही राज्याला दोन राज्यपाल, दोन मुख्यमंत्री, कोणत्याही देशाचे दोन पंतप्रधान, दोन राष्ट्राध्यक्ष कधीच असू शकत नाहीत आणि अशी कल्पनासुद्धा करणे शक्य नाही. कारण असे असेल तर कोणतेही राज्य, कोणतेही राष्ट्र आणि कोणताही देश चालू शकत नाही. कारण कर्ताधर्ता आणि जबाबदार केवळ एकच असू शकतो. आता जर आपण आपल्या सभोवतालच्या या अतिविशाल आणि विलक्षण सृष्टीवर नजर टाकली आणि यावर जर विचार केला की ही सृष्टी कशी निर्माण झाली व कशी कार्यरत आहे, आकाशातून होणारी वर्षा, यामुळे फुलणारी, हिरवीगार होणारी वनराई, सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेपासून पाण्याचे होणारे बाष्पीभवन, हे बाष्प वाहून नेणारे वारे, रात्रंदिवस उजाडणारी ही पृथ्वी आणि ग्रह-ताऱ्यांची भ्रमणावस्था, हे सर्वकाही घडत आहे. वैज्ञानिकांनी हेसुद्धा सांगितले आहे की वनस्पतीच्या जीवनासाठी आवश्यक असलेली पोषक माती तयार करण्यासाठी सूक्ष्म कृमी-कीटक कार्य करीत आहेत. ते हवेतून नायट्रोजन प्राप्त करून वनस्पतींना पुरवितात. अर्थातच जमिनीत पेरण्यात आलेले बी मोठे झुडुप आणि वृक्ष होण्यासाठी या विश्वातील समस्त ग्रह-तारे, सूर्य, चंद्र, समूह, पवन, कृमी-कीटक आणि अशा असंख्य वस्तूंना कार्य करावे लागते आणि तेदेखील अगदी वेळेवर, विनातक्रार, व्यवस्थित व नीटनेटके. जणू हे संपूर्ण कार्य एकाच शक्तिशाली सत्तेच्या इशाऱ्यावर चालू आहे.
जरा या विस्तीर्ण आकाशाकडे पाहा, निरखून पाहा. सूर्य हा अगदी निश्चित पद्धतीनुसार कार्य करीत आहे. दिवस आणि रात्र अगदी वेळेवर होत आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा वेळेवर होत आहे. चंद्राचे कार्य नेमक्या पद्धतीनुसारच सुरू आहे. त्याच्या भ्रमण गतीमध्ये कसलाही फरक पडत नाही. एवढेच नव्हे तर आकाशातील समस्त ग्रह आणि तारे जे कोट्यवधींच्या संख्येत आहेत, अगदी व्यवस्थितपणे आपापले कार्य करीत आहेत. आपापल्या भ्रमणकक्षा सोडून इतरांच्या भ्रमणकक्षेला किंचित स्पर्शसुद्धा करीत नाहीत. नसता एक-दुसऱ्यांची टक्कर होऊन छिन्नविछिन्न झाले असते. असे वाटते जणू हे सर्व ग्रह-तारे एखाद्या यंत्राच्या भागांप्रमाणे आपापले कार्य व्यवस्थितपणे करीत आहेत.
विचार करण्यासारखी बाब आहे की शेवटी हे काय प्रकरण आहे की जमिनीतून वनस्पती उगविण्यासाठी अथवा पिके उगविण्यासाठी व ती वाढविण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टी व्यवस्थितरित्या घडत आहेत, समस्त वस्तू परस्पर सहकार्याने कार्य करीत आहेत. यापैकी एकही वस्तू आपले कार्य किंचितही सोडायला तयार नाही वा मुळीच हलगर्जी करीत नाही. शेवटी हे काय प्रकरण आणि कोणते गूढ आहे की या प्रचंड आणि विलक्षण विश्वरूपी कारखान्याचे समस्त कार्य वस्तूंच्या परस्पर सहकार्यातून सुरळीपतणे चालू आहे. या प्रश्नाचे केवळ एकच उत्तर असू शकते आणि ते असे की हे पूर्ण कार्य कोण्या एकाच सम्राट आणि प्रभुच्या इशाऱ्यावर होत आहे. केवळ एकाच व्यवस्थापक अर्थात अल्लाहच्या आदेशाने हे विश्व कार्यरत आहे. जर या विश्वाचे संचालक एकापेक्षा जास्त असते तर या कार्यात परस्पर सहयोग आणि सहकार्य शक्यच झाले नसते.

निरीक्षणाबरोबर अनुमान व भ्रामक कल्पनेच्या साहाय्याने निश्चित केले जाणारे दुसरे मत असे की, हे जग आणि ते शरीर मानवासाठी एक यातनागृह आहे. मानवाचा आत्मा एक शिक्षा भोगणारा कैदी म्हणून या बंदीगृहात कैद केला गेला आहे. सुखोपभोग, इच्छा व वासना आणि त्यासंबंधीने मानवाला भासणाऱ्या सर्व गरजा वास्तविकता या बंदीगृहाची साखळदंड आहेत. मनुष्य जितका या जगाशी व या जगातील वस्तूंशी संबंध ठेवील तितका जास्त तो या साखळदंडात अडकत जाणार आणि अधिक प्रकोपास पात्र ठरणार. मुक्तीचा मार्ग याशिवाय अन्य कोणताच नाही की, जीवनाच्या सर्व भानगडींपासून संबंध तोडले जावेत, इच्छा व वासना नष्ट केल्या जाव्यात, सुखोपभोगाशी काडीमोड घेतली जावी, शारीरिक गरजा आणि वासनापूर्तला नकार दिला जावा, रक्त व मांसाच्या संबंधामुळे निर्माण झालेले सर्व प्रेम मनातून बाहेर घालविले जावेत आणि आपला शत्रू म्हणजे मन व शरीराला इंद्रिय दमन आणि घोर तपश्चयेंद्वारे इतक्या यातना दिल्या जाव्यात की आत्म्यावर त्यांचे नियंत्रण राहू नये. अशाप्रकारे आत्मा हलका आणि स्वच्छ व निर्मळ होईल. त्यामुळे त्याला मुक्तीच्या उƒ स्थानाप्रत उÈाण घेण्याची शक्ती प्राप्त होईल.
या मतानुसार जे वर्तन निर्माण होते त्याची गुणवैशिष्टये अशी-
पहिले असे की, त्यामुळे माणसाची एकूण प्रवृत्ती व त्याचा कल सामूहिकतेकडून वैयक्तिकतेकडे आणि संस्कृतीकडून रानटी अवस्थेकडे वळतो. तो जग आणि जागतिक जीवनापासून तोंड फिरवून उभा राहतो. जबाबदाऱ्यांपासून पळ काढतो. त्याचे संपूर्ण जीवन असहकार आणि असहयोगाचे जीवन बनते. त्याचे आचरण जास्त करून नकारात्मक  स्वरूपाचे होते.
दुसरे असे की, या मतामुळे सदाचारी लोक जगाच्या व्यवहारापासून दूर होऊन आपल्या मुक्तीच्या काळजीत एकांतवासाकडे धाव घेतात आणि जगाचे सर्व व्यवहार दुष्ट लोकांच्या हातात येतात.
तिसरे असे की, या मताच्या संस्कृतीवर जितक्या प्रमाणात प्रभाव होतो तितक्याच प्रमाणात लोकांत नकारात्मक नीतिमत्ता, असंस्कृतपणा आणि व्यक्तिगत स्वरुपाच्या प्रवृत्ती आणि निराशात्मक विचार निर्माण होतात, म्हणून प्रत्येक अत्याचारी सत्ता त्यांना सहजपणे नियंत्रणात आणू शकते. खरे म्हणजे हा दृष्टिकोन सामान्यजणांना अत्याचारापुढे लोटांगण घालणारे बनविण्यात जादूसमान प्रभाव राखतो.
चौथे असे की, मानवी स्वभावाशी या विरक्तिवादी दृष्टिकोनाचा सतत संघर्ष होत राहतो, त्यात बव्हंशी या दृष्टिकोनाचा पराभवच होत असतो. मग जेव्हा याचा पराभव होतो तेव्हा आपली दुर्बलता लपविण्यासाठी त्याला निमित्तांच्या छत्राखाली आश्रय ¿यावा लागतो. म्हणून कोठे प्रायश्चित्ताचे तत्त्व निर्माण होते, कोठे भौतिक प्रेमाचे सोंग भरले जाते तर कोठे संन्यासाच्या पडद्याआड असा भोगवाद अवलंबिला जातो की, ज्याची भौतिकवादींनासुद्धा लाज वाटावी.

त्या मतांपैकी एक मत असे आहे की, सृष्टीची ही व्यवस्था विनास्वामी तर नाही, परंतु तिचा केवळ एकच स्वामी (अधिपती व पालनकर्ता) आहे असे नाही, तर तिचे अनेक स्वामी (अधिपती व पालनकर्ते) आहेत. सृष्टीच्या निरनिराळ्या शक्ती¨चे निरनिराळे सूत्रधार आहेत, तसेच माणसाचे सुदैव व दुदैव, त्याचे यशापयश आणि त्याची हानी व लाभ अनेक शक्ती¨च्या कृपा व अवकृपेवर अवलंबून आहे. सदरहू मत ज्या लोकांनी स्वीकारले आहे, ज्यांनी मग तर्क लढवून हे निश्चित करण्याचा प्रयत्न केला की, दैवी शक्ती कोठे कोठे आणि कोणाकोणाच्या हातात आहे. असे करताना ज्या ज्या वस्तूंवर त्यांची दृष्टी जाऊन खिळली त्यांना त्यांनी देव मानले आहे.
या मताच्या आधारे मनुष्य जे वर्तन अंगिकारतो त्याची गुणवैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत -
पहिले असे की, त्यामुळे माणसाचे उभे जीवन भ्रामक कल्पनेचे माहेरघर बनते. माणूस कोणत्याही शास्त्रोक्त पुराव्याविना केवळ आपल्या भ्रामक कल्पनेने बऱ्याचशा वस्तूंसंबंधी असे मत निश्चित करतो की, त्या चमत्कारिकरीत्या त्याच्या भाग्यावर इष्ट वा अनिष्ट प्रभाव टाकीत असतात. त्यामुळे तो इष्ट प्रभावाच्या भ्रामक आशेत आणि दुष्ट प्रभावाच्या काल्पनिक भीतीत गुरफटला जाऊन आपल्या बऱ्याचशा शक्ती¨ना व्यर्थरीतीने वाया घालवून बसतो, कोठे एखाद्या कबरी व समाधीशी अपेक्षा करतो की, त्या त्याचे कार्य सिद्ध करतील, तर कोठे एखाद्या मूर्तीवर भिस्त ठेवतो की, ती त्याचे भाग्य उजळेल, कोठे एखाद्या काल्पनिक वि¿नहत्र्याला खूश करण्यासाठी धावपळ करतो, तर कोठे अशुभ शकुनामुळे वैफल्यग्रस्त होतो व शुभ शकुनाच्या आधारे कपोलकल्पित किल्ले उभारतो. अशा सर्व गोष्टी त्याचे विचार व प्रयत्नांना स्वाभाविक कृतीच्या मार्गापासून दूर करून एका अगदी अनैसर्गिक मार्गावर टाकतात.
दुसरे असे की, या मतामुळे पूजाअर्चा, नवस व नैवेद्य आणि इतर विधी व रूढींची एक लांबलचक नियमावली तयार होते. त्यात गुरफटून माणसाच्या शक्ती व प्रयत्नांचा मोठा भाग निरर्थक उद्योगांत खर्च होतो.
तिसरे असे की, जे लोक अनेकेश्वरवादी भ्रामक कल्पनेत गुरफटलेले असतात त्यांना मूर्ख बनवून आपल्या जाळ्यात अडकविण्याची चलाख व्यक्ती¨ना चांगलीच संधी मिळते. एखादा राजा होऊन बसतो आणि सूर्य, चंद्र व इतर देवांशी आपला वंशसंबंध जोडून लोकाची अशी खात्री पटवितो की, ""आम्हीसुद्धा देवापैकी आहोत, तुम्ही आमचे दास आहात.'' एखादा पुरोहित अथवा मुजावर होऊन विराजमान होतो आणि म्हणतो की, ""तुमचा लाभ व तुमची हानी ज्यांच्याशी निगडीत आहे त्यांच्याशी आमचा संबंध आहे. तुम्ही आम्हाला माध्यम बनविल्याशिवाय त्यांच्याप्रत पोचू शकत नाही.'' कोणी ताईत, गंडे आणि मंत्र व तंत्र चे सोंग करून लोकांची अशी खात्री पटवितो की, आमच्या या गोष्टी चमत्कारिकरीत्या तुमच्या गरजा भागवतील, मग अशा चाणाक्ष लोकांच्या वंशजांना कायमस्वरूपी घराण्याचे व वर्गाचे रूप येते, मग कालांतराबरोबर त्यांचे हक्क व अधिकार आणि प्रभाव व प्रतिष्ठेत वाढ होत जाऊन त्यांची पाळेमुळे खोलवर रूतली जात असतात. अशा प्रकारे या धारणेद्वारे शाही घराणे, धार्मिक व आध्यात्मिक नेते व पदाधिकाऱ्यांच्या ईशत्वाचे जोखड सर्व माणसांच्या मानगुटीवर बसते. हे ढोंगी देव त्यांना अशा प्रकारे आपले सेवक बनवितात की, जणू ते त्यांच्यासाठी दूध देणारे व स्वारी आणि ओझे वाहणारी जनावरे आहेत.
चौथे असे की, हा दृष्टिकोन ज्ञानविज्ञान आणि कला व तंत्राज्ञानासाठी, साहित्य व तत्त्वज्ञानासाठी आणि संस्कृती व राजकारणासाठी कोणताही कायमस्वरूपी पाया उपलब्ध करीत नाही, तसेच या कपोलकल्पित देवांपासून माणसांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही की, ज्याचे नियमितपणे पालन व्हावे. या ढोंगी देवांशी माणसाचा संबंध केवळ या हद्दीत मर्यादित असतो की, माणसाने त्यांची कृपा व साहाæय प्राप्त करण्यासाठी केवळ पूजेच्या काही विधी पूर्ण कराव्यात, उरले जीवनाचे इतर व्यवहार तर त्यांच्यासंबंधी नियम व कायदे करणे, अंमलबजावणीच्या पद्धती ठरविणे माणसाचे स्वत:चे काम आहे.
अशा प्रकारे अनेकेश्वरवादी समाज प्रत्यक्षात त्याच सर्व मार्गांवर चालतो ज्या मार्गांचा उल्लेख निव्वळ अज्ञानासंबंधी आताच मी केला आहे. तीच नीतिमत्ता, तेच आचरण, तीच सांस्कृतिक पद्धत, तीच आर्थिकव्यवस्था आणि तेच शिक्षण व साहित्य, या सर्व दृष्टींनी अनेकेश्वरवादाच्या वर्तनात आणि निव्वळ अज्ञानाच्या वर्तनात कोणताही मौलिक स्वरूपाचा फरक नसतो.

ज्ञानेंद्रियांवर विश्वास करून मनुष्य जेव्हा या प्रश्नासंबंधी एखादे मत निश्चित करतो तेव्हा अशा विचारसरणीच्या अगदी स्वाभाविक तगाद्यामुळे तो या निष्कर्षापर्यंत येतो की सृष्टीची ही संपूर्ण व्यवस्था म्हणजे अचानकपणे या प्रकटित उत्पत्तीची धामधूम होय. तिच्या उत्पत्तीमागे कोणतेही उद्दिष्ट किंवा हेतू दडलेला नाही, उगीचच या सृष्टीव्यवस्थेने आकार घेतला आहे, उगीचच तिची वाटचाल होत आहे आणि उगीचच फलनिष्पत्तीविना ती अंत पावणार आहे. या सृष्टीव्यवस्थेचा कोणी स्वामी दिसत नाही, म्हणून एक तर त्याचे अस्तित्व असू नये व असले तरी मानवी जीवनाशी त्याचा कोणताही संबंध नाही. मानव एक प्रकारचा प्राणी आहे. कदाचित योगायोगानेच तो येथे उत्पन्न झाला आहे. त्याला कोणी निर्माण केले आहे की तो स्वत:च निर्माण झाला आहे, काही कळत नाही. असो, या प्रश्नांशी काही एक कर्तव्य नाही. आम्ही केवळ हेच जाणतो की, मानव पृथ्वीवर आढळतो, तो काही इच्छा व वासना बाळगतो, त्यांच्या पूर्ततेसाठी त्याची प्रकृती आतून जोर लावित असते, मानव काही सामथ्र्य आणि इंद्रिये व अवयव बाळगतो. ती इच्छा व वासनापूर्ततेची साधने बनू शकतात, त्याच्या सभोवती भूतलावर अमाप व अगणित सामग्री पसरलेली आहे, तिच्यावर मानव आपल्या अवयवांचा व कुवतींचा उपयोग करून आपल्या इच्छेची पूर्तता करू शकतो, म्हणून मानवाच्या कुवतींचा याशिवाय अन्य कोणताही उपयोग नाही की, त्याने आपल्या इच्छा व गरजांना कमाल पातळीने पूर्ण करावे. या जगाची योग्यता याशिवाय अन्य काहीच नाही की, ते लुटालुटीचे एक ताट आहे व ते यासाठी पसरले आहे की, मानवाने त्यावर ताव मारावे. वरती कोणीही शासक नाही, ज्यासमोर मानवाला जाब द्यावयाचे असावे. कोठे ज्ञानाचे उगमस्थान आणि मार्गदर्शनाचे मूलस्त्रोतही नाही की, जेथून मनुष्याला आपल्या जीवनासाठी नियम मिळू शकावेत, म्हणून मानव एक स्वतंत्र आणि बेजबाबदार प्राणी आहे. स्वत:साठी कायदे बनविणे आणि आपल्या कुवतींचा उपयोग ठरविणे, तसेच अस्तित्वात असलेल्या इतर सृष्टीशी आपले वर्तन ठरविणे हे त्याचे स्वत:चे काम आहे. त्याच्यासाठी एखादे मार्गदर्शन आहे तर ते पशुप्र्राण्याच्या जीवनात, दगडांच्या आत्मवर्जनात किंवा स्वत:च्या ऐतिहासिक अनुभवात आहे. त्याला एखाद्यासमोर जाब द्यावयाचा असेल तर त्याच्या स्वत: समोर किंवा त्या सत्तेसमोर जी स्वत: मानवामधूनच उत्पन्न होऊन लोकांवर आरूढ झाली असेल. जीवन जे काही आहे ते केवळ ऐहिक जीवन आहे. कर्माची जी काही फळे आहेत ती याच जीवनाच्या मर्यादेत आहेत, म्हणून योग्य अयोग्य, उपयुक्त आणि हानिकारक, घेण्याचा व त्याज्य करण्याचा निर्णय केवळ त्याच फळांना विचारात घेऊन घेतला जाईल जे या जगात प्रकट होणार आहेत.
असा हा संपूर्ण जीवनासंबंधी एक दृष्टिकोन आहे. यात जीवनाच्या सर्व मूलभूत प्रश्नांचे उत्तर केवळ ज्ञानेंद्रियविषयक निरीक्षणाने दिले गेले आहे. या उत्तरांचा प्रत्येक भाग दुसऱ्या भागाशी कमीतकमी तार्किक संबंध आणि स्वाभाविक अनुकूलता जरूर राखतो. त्यामुळे मनुष्य जगात एक समतल व एकरूप वर्तन अंगिकारू शकतो, याचा विचार न करता की हे उत्तर व त्यामुळे निर्माण होणारे वर्तन आपल्या जागी चूक आहे की बरोबर. आता या उत्तराच्या आधारावर मनुष्य जगात जे वर्तन अंगिकारतो त्या वर्तनावर एक दृष्टिक्षेप टाकू या.
वैयक्तिक जीवनात या दृष्टिकोनाचा अपरिहार्य परिणाम असा आहे की, मनुष्याने प्रथमपासून ते शेवटपर्यंत मुक्त आणि बेजबाबदार वर्तन अंगिकारावे. त्याने स्वत:ला आपल्या शरीराचा व आपल्या शारीरिक कुवतींना मालक समजावे म्हणून आपल्या इच्छेनुसार तो हवे त्याप्रमाणे त्यांचा उपयोग करील. जगाच्या ज्या वस्तू त्याच्या अधिकाराखाली येतील व ज्या माणसांवर त्याला सत्ता प्राप्त होईल, त्या सर्वांशी तो अशा प्रकारे वागेल जणू तो त्यांचा स्वामी आहे. त्याच्या अधिकारांना मर्यादित करणारी गोष्ट म्हणजे केवळ नैसर्गिक नियमांच्या मर्यादा आणि सामूहिक जीवनाची अनिवार्य बंधने असतील. त्याच्या स्वत:च्या मनात अशी कोणतीही नैतिक संवेदना, जबाबदारीची जाणीव आणि कोणाला जाब देण्याची भीती असणार नाही, जेणेकरून तो मोकाट होण्यापासून रोखला जात असावा. जेथे बाøस्वरूपाची बंधने नसतील किंवा जेथे ती बंधने असतानादेखील आपले काम करण्याचे त्याला सामथ्र्य प्राप्त असेल, अशा ठिकाणी तर त्याच्या या धारणेचा स्वाभाविक तगादा असाच आहे की, ती अत्याचारी, बेईमान आणि अपहारकर्ता, दुष्ट आणि उपद्रवकारी असावा. स्वभावत: तो स्वार्थ, भौतिकवादी आणि संधिसाधू असेल. आपल्या मनोकामना आणि पाशवी गरजांची सेवा करण्याशिवाय त्याच्या जीवनाचा अन्य कोणताही हेतू असणार नाही. त्याच्या या जीवनध्येयाच्या दृष्टीने ज्या गोष्टींची किंमत असेल अशाच गोष्टींना त्याच्या दृष्टीत महत्त्व प्राप्त असेल. लोकात अशा प्रकारची नीती व चारित्र्य निर्माण होणे सदरहू धारणेचा स्वाभाविक आणि तर्कशुद्ध परिणाम आहे. आपले हित आणि दूरदृष्टीमुळे अशा माणसाकडून दयाळूपणा, त्याग, आपल्या लोकसमूहाच्या कल्याण व प्रगतीसाठी जिवापाड परिश्रम आणि एकंदरीत त्याच्या जीवनात एक प्रकारची जबाबदारीपूर्ण नैतिकता प्रकट होणे शक्य आहे, यात शंका नाही. परंतु जेव्हा आपण त्याच्या वर्तनाचे पृथक्करण करू तेव्हा कळेल की, वास्तविकपणे त्याच्या स्वार्थपणा व वासनेचेच हे व्यापक रूप आहे. तो आपल्या देशाच्या व राष्ट्राच्या कल्याणात आपले कल्याण पाहतो, म्हणून तो त्यांचे कल्याण इच्छितो. हेच कारण आहे की, असा मनुष्य जास्तीतजास्त केवळ एक राष्ट्रवादीच होऊ शकतो.
मग जो समाज अशा नीतिमत्ता बाळगणाऱ्या माणसांनी बनेल त्या समाजाची गुणवैशिष्टये खालीलप्रमाणे असतील -
1)    राजकारणाचा पाया मानवी सत्तेवर आधारित असेल, मग ती सत्ता एकाधिकारशाही असो, घराणेशाही असो, एखाद्या वर्गाची सत्ता असो की लोकशाही. सामूहिकतेची जास्तीतजास्त उƒ जी कल्पना केली जाऊ शकेल ती केवळ राष्ट्रकुल कल्पना असेल. अशा प्रकारच्या राज्यसत्तेत मानवच कायदे रचणारे असतील, सर्व कायदे इच्छा आणि अनुभवात्मक हिताच्या आधारे बनविले जातील, तसेच हित आणि लाभवाद दृष्टीसमोर ठेवूनच धोरणेही ठरविली जातील व बदलली जातील.
अशा प्रकारच्या राज्यात जे लोक सर्वांत जास्त शक्तिशाली आणि सर्वांत जास्त चलाख, धूर्त, लबाड, दगलबाज, कठोर आणि दुष्ट वृत्तीचे असतील, तेच जोर करून पुढे येतील. समाजाचे मार्गदर्शन आणि राज्याची धुरा त्यांच्याच हातात असेल. त्यांच्या कायदेग्रंथात बळाचे नाव "सत्य' आणि दुर्बलतेचे नाव "असत्य' असेल.
2) कुटुंब आणि संस्कृतीची सर्व व्यवस्था भोगवादावर आधारलेली असेल. सुखोपभोगाची उत्कट इच्छा सर्व प्रकारच्या नैतिक बंधनांपासून मुक्त होत जाईल. नैतिक आचरणाचे सर्व प्रमाण अशा प्रकारे ठरविले जातील की, जेणेकरून सुखोपभोगाच्या मार्गात अडथळे कमीतकमी राहावेत.
3) अशाच विचारसरणीच्या कला व वाLमयावरसुद्धा पडसाद उमटतील. त्याच्यात नग्नता व विषयवासनांचे घटक वाढत जातील.
4) आर्थिक जीवनात काही जागिरदारी व्यवस्थांचे वर्चस्व राहील, तर कधी भांडवलशाही व्यवस्था तिची जागा घेईल, तर कधी कामगार गोंधळ माजवून आपली हुकूमशाही प्रस्थापित करतील. कोणत्याही परिस्थितीत अर्थकारणाचे नाते न्यायाशी जुळू शकणार नाही. कारण जग व संपत्तीसंबंधी या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीचे मूलभूत वर्तन अशा कल्पनेवर आधारित असेल की, ते लुटालूट करण्यासाठी पसरलेले एक ताट आहे. त्यावर आपल्या इच्छेनुसार व संधीनुसार ताव मारण्यासाठी ती मुक्त आहे.
मग अशा समाजात माणसांना तयार करण्यासाठी संस्कार व शिक्षणाची जी व्यवस्था असेल ती व्यवस्थासुद्धा जीवनाच्या त्याच कल्पनेशी व त्याच वर्तनाशी सुसंगती राखणाऱ्या स्वभावाची असेल. त्या समाजात येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीच्या मनात जग मानव आणि जगात माणूस म्हणून तीच कल्पना बसविली जाईल ज्या कल्पनेचे मी वर स्पष्टीकरण केले आहे. सर्व माहिती मग तिचा ज्ञानाच्या कोणत्याही शाखेशी संबंध का असू नये. येणाऱ्या नवीन पिढीला अशी मांडणी करून ती माहिती दिली जाईल की, आपोआपच त्यांच्या मनात ती कल्पना रुजेल. मग सर्व संस्कार अशा पद्धतीने घडविले जातील की, त्या पिढीने जीवनात समाजात विलीन होण्यासाठी तयार व्हावे. अशा पद्धतीच्या संस्कार व शिक्षणव्यवस्थेसंबंधी आपणास काही सांगण्याची गरज नाही, कारण आपणा सर्वांनाच याची प्रचिती आली आहे. ज्या विद्यालयांत आपण शिक्षण घेत आहात त्यांची नावे जरी इस्लामिया कॉलेज आणि मुस्लिम युनिव्हर्सिटी असली तरी याच विचारसरणीच्या आधारावर ती चालत आहेत.
हे वर्तन ज्याचे आताच मी आपल्यासमोर स्पष्टीकरण केले आहे, ते निव्वळ अज्ञानाचे वर्तन आहे. सदरहू वर्तन अगदी त्या लहान मुलाच्या वर्तनाच्या स्वरूपाचे आहे जो केवळ आपल्या ज्ञानेंद्रियांच्या निरीक्षणावर विश्वास ठेऊन अग्नीला एक सुंदर खेळणे समजतो. फरक केवळ इतकाच आहे की, तेथे निरीक्षणाची चूक अनुभव घेतल्यानंतर लगेच त्याला जाणवते. कारण ज्या अग्नीला खेळणे समजून तो हात टाकण्याचे वर्तन अंगिकारतो तो उष्ण अग्नी असतो. हात लावताक्षणीच त्याला दाखवितो की मी खेळणे नाही. याउलट येथे निरीक्षणातील चूक दीर्घ काळानंतर उघड होते, किंबहुना बहुतेकांवर तर उघडच होत नाही, कारण ज्या अग्नीवर हे हात टाकतात त्याची ज्वाला सौम्य आहे, परंतु चटका देत नाही तर शतकानुशतके तापवित राहते. तरीपण अनुभवापासून बोध घेण्यास एखादा तत्पर असेल तर जीवनाच्या सदरहू दृष्टिकोनामुळे लोकांच्या बेईमानी, पदाधिकाऱ्यांचे अत्याचार, न्यायमूतvचे अन्याय, श्रीमंताचे स्वार्थ आणि जनसामान्यांच्या दुराचारांचा रात्रंदिवस कटू अनुभव त्याला येत असतो. तसेच याच दृष्टिकोनामुळे व्यापक प्रमाणात जातीयवाद, राष्ट्रवाद, साम्राज्यवाद, युद्ध, दंगे व उपद्रव, विस्तारवाद आणि वंश व जातीसंहाराच्या ज्या ठिणग्या पडत असतात, त्यांच्या घावापासून तो या निष्कर्षापर्यंत येऊ शकतो की, सदरहू वर्तन शास्त्रोक्त वर्तन नाही तर अज्ञानाचे वर्तन आहे, कारण मानवाने स्वत:संबंधी व सृष्टीसंबंधी जे मत निश्चित करून सदरहू वर्तन अंगिकारले आहे ते वास्तविकतेला धरून नाही. एरव्ही त्याचे वाईट पडसाद उमटले नसते.
आता दुसरी पद्धत पडताळून पाहिली पाहिजे. जीवनाच्या मूलभूत समस्यांच्या निराकरणाची दुसरी पद्धत अशी की, प्रत्यक्ष निरीक्षणासह कल्पना व अनुमानाचा उपयोग करून सदरहू प्रश्नांसंबंधी एखादे मत निश्चित केले जावे. या पद्धतीद्वारे तीन प्रकारची मते निश्चित केली गेली आहेत. त्या प्रत्येक मतापासून एका विशिष्ट प्रकारचे वर्तन निर्माण झाले आहे.

Life
आता जरा अंशात्मक गोष्टीकडून व्यापक गोष्टीवर दृष्टिक्षेप टाका. मनुष्याला या जगात आपले अस्तित्व जाणवते. त्याचे एक शरीर आहे, त्यात बऱ्याचशा शक्ती भरलेल्या आहेत. मनुष्यासमोर पृथ्वी व आकाशाचे एक महाविशाल पट पसरलेले आहे. त्यात अमाप व अगणित वस्तू आहेत. त्या वस्तूंचा उपयोग घेण्याचे सामथ्र्य आपल्यात असल्याचे त्याला आढळते. त्यांच्या अवतीभोवती बरीचशी माणसे, पशूप्राणी, वनस्पती आणि जड पदार्थ इ. विखुरलेले आहेत. या सर्व वस्तू त्याच्या जीवनाशी संबंधित आहेत. मग जोपर्यंत तो सर्वप्रथम आपल्या स्वत:संबंधी, अस्तित्वात असलेल्या या सर्व वस्तूसंबंधी व त्याच्याशी स्वत:च्या संबंधाबाबत एखादे मत निश्चित करीत नाही, त्यापूर्वच तो त्यांच्याशी एखादे वर्तन अंगिकारू शकतो अशी कल्पनाही आपण करू शकतो का? जोपर्यंत मनुष्य हे निश्चित करीत नाही की, मी कोण आहे, कसा आहे, जबाबदार आहे की बेजबाबदार आहे, स्वतंत्र आहे की अधीन, अधीन आहे तर कुणाच्या आणि जबाबदार आहे तर कुणासमोर? माझ्या या ऐहिक जीवनाची काही निष्पत्ती आहे की नाही, असेल तर कोणती? त्याचप्रमाणे हे शरीर आणि शरीरातील कुवती त्याच्या स्वत:च्या मालकीच्या आहेत की अन्य कुणाच्या देणग्या आहेत. त्या कुवतीचा कोणी हिशोब विचारणारा आहे किंवा नाही? त्या कुवतींना उपयोगात आणण्याचा कायदा त्याला स्वत:ला निश्चित करावयाचा आहे की इतर कोणाला? जोपर्यंत तो या प्रश्नांसंबंधी निर्णय घेत नाही तोपर्यंत तो आपल्यातील कुवतीच्या उपयोगासाठी एखादा मार्ग ठरवू शकतो का? त्याचप्रकारे तो आपल्या अवतीभोवतीच्या वस्तूंसंबंधी एखादे वर्तन अंगिकारू शकतो का? जोपर्यंत हे निश्चित करीत नाही की त्या वस्तूंचा मालक तो स्वत: आहे की इतर कोणी, त्या वस्तूंवर त्याचा अधिकार मर्यादित स्वरूपाचा आहे की अमर्याद, मर्यादित आहे, तर मर्यादांच्या सीमा ठरविणारा कोण आहे? त्याचप्रमाणे तो परस्परांत आपल्या मानवजातीशी वर्तणुकीची एखादी पद्धत तोपर्यंत निश्चित करू शकतो का जोपर्यंत याबाबतीत एखादे मत निश्चित करीत नाही की माणुसकीचे स्वरूप काय आहे, माणसामाणसांदरम्यान फरक व श्रेष्ठत्व ठरविण्याचा आधार कोणता, शत्रुत्व आणि मित्रत्व, एकमत आणि मतभेद, सहकार आणि असहकार यांच्या आधारभूत गोष्टी कोणत्या? त्याचप्रमाणे ही सृष्टीव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे व त्यात मला कोणत्या प्रकारचे स्थान प्राप्त आहे, यासंबंधी तो एखाद्या निर्णयाप्रत येत नाही तोपर्यंत तो एकूणपणे या जगाशी एखादे वर्तन अंगिकारू शकतो का?
जी प्रस्तावना मी अगोदर मांडली आहे, त्या आधारावर नि:संकोचपणे असे म्हटले जाऊ शकते की, या सर्व गोष्टीसंबंधी कोणते ना कोणते मत निश्चित केल्याशिवाय कोणतेही वर्तन अंगिकारणे अशक्य आहे. प्रत्यक्षातसुद्धा जगात जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य या प्रश्नासंबंधी कळत वा नकळत कोणते न कोणते मत जरूर बाळगतो. तसे करणे त्याला भाग आहे, कारण त्या मताशिवाय तो कोणतेही पाऊल उचलू शकत नाही. प्रत्येक माणसाने हमखासपणे या प्रश्नावर तात्त्विक दृष्टीने विचारचिंतन केले असावे आणि स्पष्टपणे शंकानिरसन करून एकेका प्रश्नासंबंधी निर्णय घेतला असावा, असे असणे जरूरीचे नाही. वस्तुत: बऱ्याचशा माणसांच्या मनात हे प्रश्न एखाद्या निश्चित स्वरूपात असतच नाहीत. ते त्याच्यासंबंधी जाणीवपूर्वक  विचारही करीत नाहीत. परंतु असे असतानासुद्धा प्रत्येक माणूस ढोबळ स्वरूपात या प्रश्नासंबंधी होकारात्मक किंवा नकारात्मक स्वरूपात एखाद्या मतापर्यंत निश्चितपणे पोचलेला असतो. जीवनात त्याचे जे काही वर्तन असते ते निश्चितपणे त्याच्या त्याच मतानुसार असते.
व्यक्तीव्यक्तीसंबंधी ज्याप्रमाणे ही गोष्ट खरी ठरते, त्याचप्रमाणे जाती व जमातीसंबंधीसुद्धा ती खरीच आहे. हे प्रश्न मानवी जीवनाचे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणून कोणत्याही सांस्कृतिक व्यवस्थेसाठी व कोणत्याही प्रकारच्या सामूहिक स्वरूपासाठी कोणतेही कार्यक्रम तोपर्यंत ठरविले जाऊ शकत नाहीत जोपर्यंत या प्रश्नांची कोणत्या न कोणत्या प्रकारची उत्तरे निश्चित केली जात नाहीत. त्याची जी कोणती उत्तरे निश्चित केली जातील त्यानुसार नीतीमत्तेसंबंधीचा एक दृष्टिकोन निश्चित होईल. त्यानुरुपच जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांना आकार प्राप्त होईल आणि एकूणपणे त्या उत्तराच्या आवश्यकतेनुसारच एकूण संस्कृतीला रंग प्राप्त होईल. याबाबतीत कोणताही विपर्यास घडण्याची शक्यताच नाही. मग हे एका व्यक्तीचे वर्तन असो की एका समाजाचे, कोणत्याही परिस्थितीत त्याला अगदी तेच रूप प्राप्त होईल जे या प्रश्नाच्या उत्तरांचे स्वरूप असेल. इथपावेतो की, वाटल्यास एका व्यक्तीच्या किंवा एखाद्या जमातीच्या वर्तनाचे पृथ:करण करून त्या वर्तनाच्या मुळाशी जीवनाच्या सदरहू मूलभूत प्रश्नाची कोणती उत्तरे कार्यशील आहेत, हे सहजपणे आपणास माहीत होऊ शकते, कारण एखाद्या व्यक्तीच्या किंवा जमातीच्या वर्तनाचे स्वरूप एका दुसऱ्या प्रकारचे असावे व त्या प्रश्नांच्या उत्तराचे स्वरूप एका वेगळ्याच प्रकारचे असावे ही गोष्ट अगदी अशक्यप्राय आहे. विपर्यास तोंडाने केला जाणारा दावा आणि प्रत्यक्ष वर्तनादरम्यान तर असू शकतो, परंतु वास्तविकपणे या प्रश्नांची जी उत्तरे मनात ठाण मांडून बसली आहेत, त्यांचे स्वरूप आणि प्रत्यक्ष वर्तनाच्या स्वरूपात कदापि भिन्नता असू शकत नाही.
आम्हाला आणखीन एक पाऊल पुढे गेले पाहिजे. जीवनाचे हे मूलभूत प्रश्न ज्यांच्यासंबंधी आपण आत्ताच ऐकले की त्यांच्या उलगड्यासंबंधीचे एखादे उत्तर आपल्या मनात निश्चित केल्याशिवाय मनुष्य जगात एक पाऊलसुद्धा पुढे जाऊ शकत नाही. आपल्या मूळ स्वरूपात ते सर्व परोक्ष बाबींशी संबंधित आहेत. त्याचे कोणतेही उत्तर क्षितिजावर लिहिलेले नाही की, प्रत्येक माणसाने जगात येताक्षणी ते वाचावे, तसेच त्याचे उत्तर इतके सामान्यही नाही की प्रत्येकास आपोआपच ते माहीत व्हावे. म्हणूनच सर्वच माणसांचे ज्याच्यावर एकमत होईल असे त्याचे कोणतेही एक उत्तर नाही, तर त्याच्यासंबंधी नेहमी मानवजातीत मतभेद राहिले आहेत. नेहमी निरनिराळी माणसे निरनिराळ्या पद्धतींनी त्याची उत्तरे प्रस्तुत करीत राहिली आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो की, प्रश्नांच्या निराकरणांचे कोणकोणते मार्ग संभवतात, कोणकोणत्या पद्धतीचा जगात अवलंब केला गेला आहे व त्या निरनिराळ्या मार्गानी जी उत्तरे समोर येतात ती कोणत्या प्रकारची आहेत?
या प्रश्नांच्या सोडवणुकीचा एक मार्ग असा की, माणसाने आपल्या ज्ञानेंद्रियांवर विश्वास ठेवणे व त्यांच्याद्वारे जे काही वाटते त्या आधारावर त्या प्रश्नासंबंधी एखादे मत निश्चित करावे.
दुसरा मार्ग असा की, ज्ञानेंद्रियाविषयक निरीक्षणाबरोबरच कल्पना अनुमानाला जोडून एक निष्कर्ष काढला जावा.
तिसरा मार्ग असा की, पैगंबरांनी सत्याचे प्रत्यक्षपणे ज्ञान मिळविण्याचा दावा करताना सदरहू प्रश्नांची जी उत्तरे सांगितली आहेत ती मान्य केली जावी.
जगात या प्रश्नांच्या सोडवणुकीचे हेच तीन मार्ग अवलंबिले गेले आहेत व बहुतेक करून हे तीनच मार्ग त्याबाबतीत संभवनीयही आहेत. यापैकी प्रत्येक मार्गाने एका वेगळ्या पद्धतीने या प्रश्नांचे निराकरण होते. प्रत्येक प्रकारच्या निराकरणानंतर एका विशिष्ट प्रकारचे वर्तन जन्म घेते व एका विशिष्ट प्रकारची सांस्कृतिक व्यवस्था उदयास येते. ही सांस्कृतिक व्यवस्था आपल्या मूलभूत गुणवैशिष्ट्यांत इतर सर्व निराकरणांद्वारे जन्मास आलेल्या वर्तनापेक्षा वेगळी असते. अशा विभिन्न मार्गांनी प्रश्नाचे कोणकोणते निराकरण समोर येते व प्रत्येक निराकरणामुळे कोणत्या प्रकारचे वर्तन जन्म घेते हेच आता मी दाखवू इच्छितो.

Makkah
भूतलावर जेव्हापासून मानवी जीवनाची सुरुवात झाली, त्याच वेळी मनुष्यासाठी ‘इस्लाम’ चा आरंभ झाला. ‘इस्लाम’ चा अर्थ अल्लाहचे आज्ञापालन करणे आहे. इस्लाम मानवासाठी जन्मजात धर्म आहे. मनुष्यजातीचा निर्माणकर्ता आणि पालनकर्ता अल्लाहच आहे. मनुष्यांसाठी मुलभूत कर्तव्य हेच आहे की त्यांनी रचयिताचे आज्ञापालन करावे. अल्लाह पृथ्वीवर व प्रथम पुरुष हजरत आदम, पत्नी हव्वा (अ.) यांना अवतरविले. त्याच दिवसांपासून त्यांना आदेश दिला, की सर्वांची सर्वांगिण उन्नती केवळ माझ्या मार्गदर्शनाद्वारे जीवन व्यतीत करण्यात लाभेल. माझ्या आज्ञेचे पालन करा. ज्या गोष्टीची मी मनाई करतो त्यापासून दूर रहा. यावर तुम्ही अंमलबजावणी केली तर बक्षिसास पात्र व्हाल. विरुद्ध वर्तन केले तर माझा क्रोध व अप्रसन्नता लाभेल. हाच ‘इस्लाम’ चा उगम आहे.
पिता आदम व माता हव्वा यांनी हिच शिकवण आपल्या संततीस दिली. काही काळ यांवर लोक दृढ राहीले. नंतर असे लोक जन्मास आले ज्यांनी आपल्या निर्माणकर्ता अल्लाहची अवज्ञा केली. कांही लोकांनी एक अल्लाहच्या अस्तित्वामध्ये वा गुणामध्ये अन्य भागिदार नेमले. कोणी स्वतःच भगवान झाला. कोणी म्हणाला जीवन माझ्या परीनं आवडीनं जगण्यास मी स्वतंत्र आहे. माझ्या इच्छेप्रमाणे मी करीन, ईश्वराचे जे काही हुकुम असतील ते असोत पण मी मात्र माझ्या मनाप्रमाणे करीन. त्या हुकुमांना जुमानणार नाही. अशा पद्धतीने जगात कुफ्र (नकार देणे) ची उत्पत्ती झाली. याचाच अर्थ आहे, ‘‘एक अल्लाहशिवाय अन्य भिन्न भिन्न ईश्वर मानणे.’’
ज्यावेळी कुफ्र (एक अल्लाहस नकार देणे) वृद्धींगत होत गेला त्यामुळे जमिनीवर जुलुम, दंगे, हिसाचार, गुन्हे वाढत गेले. त्यावेळी अल्लाह ने आपल्या सद्वर्तनी दासांना या दुवर्तनी लोकांना समज देण्यास नियुक्त केले. त्यांना एकेश्वरवादाच्या सन्मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यास नेमले. हे सज्जन दास प्रेषित (पैगंबर) म्हटले गेलेत. प्रेषितांचा क्रम थोड्या थोड्या अंतराने तर कधी दीर्घ मुदतीनं जगाच्या निरनिराळ्या भूभागात, वंशात अंमलात आला. हे सर्व प्रेषित सत्यवादी, श्रद्धाधारक व सज्जन लोक होते. सर्व प्रेषितांनी एकाच धर्माची हाकं दिली. हाच इस्लाम होय. निश्चितच आपण नुह, इब्राहीम, मुसा व येशु यांची नावं ऐकलीत, हे सर्व एक अल्लाहचे पैगंबर आहेत. शिवाय हजारोच्या संख्येने प्रेषित होऊन गेलीत. गत हजारो वर्षाच्या इतिहासात हेच घडलं की जेव्हा अनेकेश्वरवाद (बहुदेववाद) वाढत गेला त्या त्या वेळी प्रेषित नियुक्त होत गेले. प्रेषितांनी लोकांना अनेकेश्वरवादापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. इस्लाम स्वीकारण्याची हांक दिली. काही लोकांनी इस्लामचा स्वीकार केला. काही लोक आपल्या अनेकेश्वरवादाच्या श्रद्धेतच राहीले. ज्यानी इस्लाम स्वीकार केला, ते ‘मुस्लिम’ होत. याच लोकांनी प्रेषिताद्वारे उच्चतम् नितीमत्ता स्वीकारली व आदर्श चारित्र्य जोपासण्याचा प्रसार केला. नंतर असं पण घडलं की या मुस्लिमांची पिढी ‘इस्लाम’ विसरुन कुफ्र (बहुदेववादी) च्या तावडीत सापडली. क्रमशः तद्नंतर पुढील प्रेषितांनी परत इस्लामची बीजं पुन्हा रोवली. हा क्रम वर्षानुवर्षे चालत राहीला. इस्लाम श्रद्धेत ताजं व्हायचं परत श्रद्धेत कोमोजुन जायचं. अल्लाहने सरतेशेवटी अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांना नेमलं. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी इस्लामचा संदेश असा पुनरुज्जीवीत केला जो आजपर्यंत ताजातवाना आहे, कायम आहे. अल्लाहच्या इच्छेनुसार इस्लामचा संदेश पृथ्वीच्या अंतापर्यंत दृढ राहील.
प्रेषित मुहम्मद (स.) १४७५ वर्षापुर्वी अरबस्थानात प्रसिद्ध शहर मक्केत जन्मले. त्याकाळी अरबस्थानाच काय, जगात कुठंही इस्लामचं अस्तित्व राहीलं नव्हतं. पुर्वीच्या प्रेषितांच्या शिकवणीचे थोडंफारं परिणाम सद्गुणी लोकांत आढळून येत. परंतु शुद्ध स्वरुपात एक ईश्वराची शुद्ध श्रद्धा भूतलावर आढळून येत नसे. या कारणास्तव लोकांचे जीवन चारित्र्यहीन होते. एक ईश्वरास विसरुन लोकं विभिन्न विशुद्ध धर्मात भोगी होते. या परिस्थितीत मुहम्मद (स.) जन्मले. वयाच्या चाळीस वर्षापर्यंत मक्का येथे शांत, एकांत, जीवन व्यतीत केलं. मक्कावासी आपणास सत्यवादी व प्रामाणिकपणामुळे प्रतिष्ठा देत असे. कोणी पण हे जाणू शकत नव्हतं की हीच व्यक्ती भविष्यात महान मार्गदर्शक बनणारी होती. प्रेषित मुहम्मद (स.) जगाच्या या बिघडलेल्या स्थितीस पाहून हळहळत. स्तब्ध होत. यापासून मानव समाज मुक्त होण्यास मार्ग काय? जगातील हा विध्वंस कसा संपेल? वयाच्या चाळीसाव्या वर्षी अल्लाहने मुहम्मद (स.) यांना प्रेषित नियुक्त केले. प्रथमतः सभोवतालच्या समाजास, तद्नंतर जगात अखिल मानवतेसाठी कुफ्र (अनेकेश्वरवाद) पासून अलिप्त होऊन इस्लाम (एकेश्वरवाद) स्वीकारण्यास मार्गदर्शन करणे, ही जबाबदारी मिळाल्यानं मक्केतील लोकांना स्पष्ट सांगणं सुरु केलं की एक अल्लाह शिवाय अन्य कोणाचीही भक्ति करु नका. तुम्हा सर्वांचा स्वामी व निर्माता केवळ एक अल्लाह आहे. त्या एकमेव अस्तित्वाचीच पुजा करावी, त्या एकमेव अल्लाहच्या आदेशाचं पालन करावं सर्वसाधारण लोकांनी विरोध केला. मुहम्मद (स.) यांचा आवाज बंद करण्याचा सर्वतोपरीने प्रयत्न केला. पण समाजातील प्रामाणिक व सद्गुणी लोकांनी हळूहळू मुहम्मद (स.) यांची साथ दिली. मक्केच्या बाहेर अरबस्थानातील विविध ठिकाणी इस्लामची शिकवण पोहोचु लागली. तेथे पण असेच घडले, अज्ञानी लोकांनी विरोध केला, सुजाण व खुल्या मनाच्या लोकांनी इस्लामच्या प्राकृतिक शिकवणींवर विश्वास ठेवला. मक्का शहरी तेरा वर्षे हा क्रम सातत्याने लोकांसमोर प्रस्तुत झाला. एकीकडे साऱ्या भूभागात हा संदेश पोहोचत होता आणि लोक इस्लामचा स्वीकार करत होते. तर दुसरीकडे अज्ञानी लोकांनी तीव्र विरोध केला व मुस्लिमांचा छळ सुरु केला. अंततः मक्का शहरातील सरदारांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना ठार मारण्याचा कट केला. रात्रीची वेळ निवडली, तद्नंतर कदाचित मुस्लिम संपून जातील. अशी घटकासमोर येऊन ठेपली. अल्लाहने प्रेषित मुहम्मद (स.) व मुस्लिमांना मक्केतुन मदिनेस स्थलांतर करण्याचा आदेश दिला. मदिनेत अनेक लोकांनी इस्लामचा स्वीकार केला होता. इस्लामसाठी त्याग करण्यास त्यांची तयार होती. त्या रात्री प्रेषित मुहम्मद (स.) मक्केहून मदिनेस रवाना झाले. ह्या घटनेस ‘हिजरत’ म्हणतात. याच्या स्मरणार्थ ‘हिजरी’ सना ची सुरुवात झाली.
प्रेषित मुहम्मद (स.) मदिनेस पोहोचल्यानंतर अरबस्थानाच्या कानाकोपऱ्यातुन मुस्लिम मदिनेस येऊ लागले. येथे तत्वतः इस्लामी राजवट स्थापन झाली. इस्लामचे विरोधक संतप्त झाले आणि विचार केला की ज्यावेळी मुसलमान विखुरलेले होते त्यांना संपविणं सोपे होते. परंतु आता मुसलमान एके ठिकाणी एकवटले, त्यांची सत्ता स्थापन झाली, आता यांना जर उसंत मिळाली तर एक प्रबळ शक्ती निर्माण होईल, म्हणून लवकरात लवकर असा प्रयत्न करणं अगत्याचं आहे की त्यांच्यावर आक्रमण करुन त्यांना संपवावं. या विचारानं मक्काच्या सरदारांनी प्रेषित मुहंमद (स.) च्या विरुद्ध युद्ध छेडलं, अरबच्या अन्य साथीदारांना इस्लाम विरुद्ध एकत्रित केलं. परिणामतः ते मुहमंद (स.) चा पराजय करु शकले नाही. इस्लामचा प्रसार रोखू शकले नाही. निकराचा विरोध करुन देखील इस्लामचा प्रचार प्रसार वाढू लागला. विरोधकामधून अनेक चांगली माणसं इस्लामकडे आकर्षित जाली. आठच वर्षात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्का काबीज केलं. मक्केच्या यशामुळे साऱ्या अरबस्थानात कुफ्र (अनेकेश्वरवाद) ची कंबर तुटली. तद्नंतर एक वर्षाच्या अल्पकाळात अरबस्थान इस्लाममय झाले. बारा लक्ष चौरस मैलापर्यंत शक्तिसाली इस्लामी राष्ट्र उदयास आलं. ज्यात सत्ताधिश ‘‘अल्लाह’’ आहे. शरीयतचे कायदे आहे, व्यवस्था अल्लाहच्या दासाकडे आहे. या राजवटीत जुलुम, अत्याचार, अनैतिकतेस थारा नव्हता. चोहीकडे शांती, समाधान, न्याय, कल्याण, प्रामाणिकता होती. अल्लाहच्या आज्ञापालनामुळे लोकांमध्ये उत्तम नैतिक चारित्र्य निर्माण झाले होते. २३ वर्षाच्या अल्पकाळात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अरबस्थानात अमुलाग्र बदल घडविला. अरब भूभागच केवळ इस्लाममय झाला असे नसुन साऱ्या जगात इस्लामची पताका घेऊन उभे राहीले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी या दैदिप्यमान यशानंतर वयाच्या ६३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
तद्नंतर मुहम्मद (स.) यांच्या सहकाऱ्यानी हे काम सांभाळले, ज्या कार्यासाठी मुहम्मद (स.) यांनी भूतलावर प्रयत्न केला. ह्या कतृत्ववान सहकाऱ्यानी इस्लामची शिकवण अखिल जगात पसरविली. प्रतिकार करणाऱ्यांचा बिमोड केला. हा प्रवाह कोणी थोपवु शकला नाही. अल्पकाळात सिधपासून स्पेनपर्यंत पसरले. परिणामतः विशाल लोकसमुहाने इस्लामचा स्वीकार केला. जेथे जेथे पोहोचले, अन्याय आणि अनैतिकता नाहीशी झाली. अल्लाहच्या विद्रोहींना अल्लाहचे अधीन बनविले. क्रुर व रानटी लोकांना ज्ञानाचा प्रकाश दिला. अमानवीय कृती करणाऱ्यांना नैतिक आदर्शाच्या कळसावर पोहोचवले. क्रुर सत्ताधिकाऱ्यांना नमविले. न्यायनिवाड्याचा असा आदर्श समोर ठेवला ज्याची इतिहासात तुलना नाही.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सहकाऱ्यानी अल्लाह कडून अवतरित झालेल्या पवित्र कुरआन मुखोद्गत केले. शब्द न शब्द पाठ केला. लिहून ठेवलं व कायमस्वरुपी सुरक्षित केले. सुरक्षित ठेवण्यास घेण्यात आलेली काळजी, ही अल्लाहकडून हमी आहे. पवित्र कुरआनचे शब्द न शब्द त्याचप्रमाणे आहेत जे चौदाशे वर्षापूर्वी प्रेषित मुहम्मद (स.) वर अल्लाहकडून अवतरले. यात कानामात्रा अनुस्वारचा कमी अधिकपणा नाही. दुसरे महान कार्य जे सहकाऱ्यानी केले, त्यात प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन चरित्र, उक्ति-कृती, वचने, कथनं, आज्ञा, शिकवणी, जागोगाजी पवित्र कुरआन आदेशाचे स्पष्टीकरण, आदर्श नैतिकता, संवयी अशी प्रत्येक गोष्ट व तपशीलवार विवरण पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित केली. यामुळे जगात नंतर प्रत्येक काळात लोकांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीस जणु काही समोर पाहात आहोत असे अनुभवले. चौदाशे वर्षानंतर देखिल अल्लाहचा आज्ञाधारक दास कसा असावा जो अल्लाहच्या प्रसन्नतेस पात्र होता ते माहीत होते. ह्या दोन गोष्टीद्वारे अर्थात पवित्र कुरआन आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांचे चरित्र सुरक्षित असल्याने ‘इस्लाम’ जगात सदासर्वदा सुरक्षित झाला.
प्रेषित मुहम्मद (स.) पूर्वी ‘इस्लाम’ त्या पूर्वीच्या प्रेषिताद्वारे होत असे, तदनंतरच्या प्रेषितांच्या मरणोत्तर लोक त्यांना विसरत असत. त्या लोकांनी देखील अल्लाहच्या आज्ञा व त्यावेळच्या प्रेषितांची चारित्रं सांभाळली नाहीत. त्यामुळे पुढील पिढ्यां हापाठ विसरत जात असे. परंतु आता अल्लाहची वाणी ‘पवित्र कुरआन’ व प्रेषित मुहम्मद (स.) यांचे जीवन चरित्र हे सुरक्षित, शाबुत आहेत. या कारणास्तव ‘इस्लाम’ सदैव सुरक्षित झाला आहे. कुरआन व हदीस (पैगंबर वचनं) द्वारा इस्लाम सदैव ताजंतवानं, सुरक्षित आहे. या कारणास्तव आता जगाला नवीन प्रेषितांची आवश्यकता राहीली नाही. ‘इस्लाम’ समजण्यासाठी असे लोक भरपुर आहेत जे कुरआन व मुहम्मद (स.) यांचे गाढे अभ्यासक आहेत, त्यासाठी ते जीवन अर्पण करतात. प्रत्येक आदेशावर कृती (अंमलबजावणी) करतात व लोकांना त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी प्रवृत्त करतात.

Galaxy
ही सृष्टी काय आहे, कशाकरिता अस्तित्वात आली आणि हिची नियमबद्ध कार्यव्यवस्था कशावर टिकलेली आहे? या प्रश्नांचे सामान्यतः चार स्वरूपात विश्लेषण करण्यात येत आहे.
  1. या सृष्टीची वास्तविकता ही एक भ्रामक कल्पना आहे.
  2. ही सृष्टी कधी निर्माण झालीच नाही. ती अनादी असून चिरकाल आहे.
  3. ही सृष्टी आपोआप निर्माण झाली आणि आपोआपच चालू आहे.
  4. या सृष्टीची निर्मिती एका असामान्य व जबरदस्त निर्माणकर्त्याने केली असून त्याच्याच नियमानुसार या सृष्टीचे प्रत्येक कार्य चालू आहे.
ही चार स्पष्टीकरणे अथवा भुमिकांचा संबंध इंद्रिये आणि शोध-साहित्याशी नसल्यामुळे सारख्याच दर्जाची आहेत. अशा वैचारिक भूमिकांचा आधार हा मानवी बुद्धीची विचारशक्ती आहे. विचार क्षमतांच्या पुराव्यांवरच ही चारही विश्लेषणे सिद्ध होऊ शकतात. हे खरे आणि खोटे ठरविण्याकरितासुद्धा विचारशक्तीचाच आधार घ्यावा लागतो. आता आपण एकेका वैचारिक भूमिकेवर स्वतंत्रपणे चर्चा करू या आणि पाहू या की, यातील कोणती विचारसरणी बुद्धिसंमत आहे, सृष्टीचे रहस्य उलगडण्यासाठी यात काय आहे आणि या भूमिका कोणत्या पुराव्यांवर आधारित आहेत आणि या पुराव्यांमध्ये किती सामर्थ्य असून यांच्या आधारांवर आपण कोणत्या निष्कर्षांपर्यंत पोहोचतो?
ही सृष्टी केवळ भ्रमाचा भोपळा आहे काय?
सर्वप्रथम आपण या पहिल्या वैचारिक भूमिकेवर चर्चा करू या. या विचारसरणीची भूमिका अशी आहे की, ही सृष्टी माणसाच्या भ्रामक कल्पनेतून निर्माण झाली आहे. म्हणून वास्तवाशी या सृष्टीचा काहीच संबंध नाही. मात्र आपण थोडा जरी विचार केला, तर या विचित्र भूमिका मांडणार्यांच्या विवेकशीलतेवर कीव येते, दया येते आणि रडावेसे किवा शोक करावेसे वाटते. कारण या ठिकाणी अगदी स्पष्टपणे वैचारिक पराभव पत्करल्यासारखे दिसून येते. ज्या वेळी आपण तत्त्वज्ञान आणि विज्ञानाचा अभ्यास करतो, त्या वेळी आपल्याला आपल्या बुद्धीक्षमतेवर अति विश्वास असतो. आपल्या ज्ञानावर खूपच जास्त भरवसा असतो. परिणामी कोणताही विचार न करता आपण बर्याच निराधार गोष्टींवर पटकण विश्वास करतो. नास्तिकतेवर विश्वास करणेसुद्धा याचाच एक भाग आहे. परंतु आपण जेव्हा तत्त्वज्ञान आणि विज्ञानाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करतो, तेव्हा आपल्या ज्ञान व माहितीचा गर्व आणि ज्ञानाभिमान आपोआपच गळून पडतो. असे वाटते की, आपण विनाकरणच असे समजत होतो की, आपले तत्त्वज्ञान आणि विज्ञान खूप पक्के होते. मात्र वस्तुस्थिती अशी की, आपले ज्ञानसामर्थ्य खरोखरच कमी पडले. आपले ज्ञान हे ज्ञान नसून केवळ वरवर पातळीवरील अथवा भ्रामक स्वरूपाचेच आहे आणि मग लगेच भ्रमाचा भोपळा फुटतो. एवढेच नव्हे तर केवळ शंकाकुशंका आणि कल्पनेसम आपले ज्ञान असल्याचे स्पष्ट होते.
आतापर्यंत असे वाटत होते की, शंका म्हणजे तत्त्वज्ञानाचीच पैदास. अनुभव आणि प्रयोगांती सिद्धप्राय असलेले विज्ञान मानवी बुद्धीत शंकाकुशंका आणि भ्रामक स्थितीस थारा देत नसून त्यामुळे माणसाला विश्वास आणि समाधान लाभते. परंतु या शतकातील होणार्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे विज्ञानजगताची परिस्थिती पार बदलून गेली. आता मात्र तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोन्हींपासून केवळ भ्रामक कल्पनाच आपल्या झोळीत पडत आहेत. तत्त्वज्ञान आणि विज्ञान या दोघांनी मानवाला शंकाकुशंका आणि भ्रामकतांच्या पाशवी जाळ्यात ओढले आणि यातून सुटकेचा मार्ग काही सापडत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, माणसाजवळ भ्रामक विचारांशिवाय काहीच नाही. वास्तविक ज्ञान हे केवळ ईश्वराजवळच असून विश्वास आणि समाधानाची फळे चाखण्याची संधी केवळ अशांनाच लाभते, ज्यांना ईश्वरीय ज्ञानावर विश्वास असतो. विज्ञानाच्या आधुनिक प्रगतीवर आपले मत मांडताना प्रख्यात वैज्ञानिक आणि भौतिकशास्त्राचे जगविख्यात तज्ज्ञ ‘जेम्स जेनिफर’ यांनी ‘रहस्यमय सृष्टी’ या पुस्तकात लिहिले आहे की,
‘भौतिकशास्त्राच्या आधुनिक विचारानुसार सृष्टीचे भौतिक वर्णन करणे मुळीच शक्य नाही आणि मला याचे कारण असे वाटते की, सृष्टीची प्रत्येक बाब अगर प्रत्येक विषय कल्पनांवर आधारित आहे.’
परंतु एक गोष्ट अशी आहे की, या सृष्टीशी संबंधित असलेले मानवी ज्ञान हे भ्रामक आणि कल्पनात्मक स्वरूपाचे आहे, तर दुसरीकडे मात्र अशी गोष्ट समोर येते की, ही सृष्टी म्हणजे केवळ भ्रम आणि कल्पना आहे. कोणत्याही प्रकारचे बाह्य अस्तित्व या सृष्टीस लाभलेले नाही. या दोन्ही गोष्टी परस्पर भिन्न आहेत आणि आपण यात फरक केला पाहिजे. पहिली गोष्ट खरी आहे. तत्त्वज्ञानाच्या माध्यमाने असो वा विज्ञानाच्या माध्यमाने मिळणारे ज्ञान असो, या ज्ञानाचा आधार विश्वास नसून कल्पनाच आहे. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान आणि विज्ञानात किती जरी प्रगती झाली तरी मानव भ्रम आणि कल्पनांच्या जंगलातून बाहेर येऊन विश्वासाचे लक्ष्य गाठू शकत नाही. या विश्वासपूर्ण ज्ञानाच्या प्राप्तीसाठी त्याला ईशवाणीवरच विश्वास ठेवणे आवश्यक ठरते. मात्र वर उल्लेख झालेल्या दुसर्या गोष्टीला कोणताच आधार नाही. ही द्वितीयोल्लेखित गोष्ट म्हणजे विचारकार्यापासून पळवाट काढणे होय. अर्थात सृष्टीचे रहस्य जाणून घेण्यासाठी कराव्या लागणार्या वैचारिक धडपडीतून पळवाट काढणे होय.
एखादी विचारसरणी किवा सिद्धान्त पडताळून पाहण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली ज्ञानात्मक आणि दुसरी कार्यात्मक बुद्धीच्या कसोटीवर पारखून आणि प्राप्त पुराव्यांना विवेकाच्या पारड्यात ठेवून वा त्यांचे वजन पाहून तपासण्यास ज्ञानात्मक पद्धती म्हणतात आणि एखाद्या विचारसरणी अगर उदाहरणास थोड्या वेळेपुरते खरे मानून या उदाहरणाच्या आधारावर प्रयोगाच्या माध्यमाने हे पाहावे की, हे खरे की खोटे आहे. पहिली पद्धत ही तत्त्वज्ञानावर आधारित असून दुसरी पद्धत ही वैज्ञानिक पद्धत आहे. आपण या दोन्ही पद्धतींचा वापर करून ही विचारसरणी चर्चेच्या ऐरणीवर घेऊ या.

सिद्धान्त - परीक्षणाची ज्ञानात्मक पद्धती
जी व्यक्ती म्हणते की, या सृष्टीचे मुळात अस्तित्वच नाही. जे काही डोळ्यांनी दिसते, ते केवळ भ्रम अथवा कल्पना आहे. आम्ही विचारू इच्छितो की, तिच्या या प्रश्नात कितपत तथ्य आहे? हा सुद्धा भ्रम आहे की, पूर्णपणे विचार करून हा सिद्धान्त मांडण्यात आला? जर ती व्यक्ती असे म्हणते की, मी जो दृष्टिकोन मांडला, तोसुद्धा भ्रामक आणि काल्पनिक आहे, तर हा सिद्धान्त आपोआपच संपुष्टात येतो. कारण भ्रामक आणि काल्पनिक बाबी अथवा सिद्धान्त किवा दृष्टिकोन मान्य करता येणे शक्य नाही. अशा सिद्धांतावर चर्चा करणेसुद्धा योग्य नाही. तसेच भ्रामक असूनदेखील यावर चर्चा करायची असेल तर सृष्टीविषयी चर्चा करण्यास प्राधान्य द्यावे लागेल.
मात्र प्रश्न असा आहे की, कोणता दृष्टिकोन स्वीकारावा? सृष्टी ही भ्रामक आणि काल्पनिक असल्याचा दृष्टिकोन अथवा हा दृष्टिकोनच मुळात भ्रामक वा काल्पनिक असण्याचा दृष्टिकोन? पहिला दृष्टिकोन स्वीकारण्याचा अर्थ असा की, आपण हा सिद्धान्त भ्रामक अगर काल्पनिक समजत नसून एक वस्तुस्थिती गृहीत धरतो. खरे पाहता हा सिद्धान्त मांडणारी व्यक्ती स्वतःच या सिद्धान्तांस भ्रम आणि कल्पना असल्याचा दावा करते. मात्र आपण द्वितीय बाबीचा स्वीकार जर केला, तर ही बाब आपोआपच सिद्ध होते की, ही सृष्टी भ्रम आणि कल्पना नसून एक ठोस वास्तविकता आहे. कारण हिच्या भ्रामक आणि कल्पनात्मक असण्यास याची दावेदार व्यक्ती स्वतःच भ्रम आणि कल्पना असल्याचा दावा करीत आहे.
परंतु ती जर असे म्हणते की, हा दृष्टिकोन भ्रम आणि कल्पना नसून ती एक ठोस वास्तविकता आहे आणि पूर्ण विचारांती सादर केलेला दृष्टिकोन आहे, तसेच ती व्यक्ती इतरांनासुद्धा सांगत आहे की, ही सृष्टी जर भ्रामक आणि काल्पनिक असल्याचे स्वीकार केले, तर अगदी एकाच वेळी कित्येक वास्तविकतांचे रहस्योद्घाटन होते. कितीतरी वास्तविकतांचा साक्षात्कार होतो. अर्थात आपल्या दृष्टिकोनाचा, आपल्या अस्तित्वाचा, आपल्या बुद्धीचा, इतर माणसांच्या अस्तित्वाचा, त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या विवेकतेचा आणि मग सृष्टीचा साक्षात्कार न का होईना, कमीतकमी मानवजातीचे अस्तित्व असणे तरी सिद्ध होतेच. मग परत आणखीन एक प्रश्न उभा राहतो की, मानव आपोआप निर्माण झाला की त्यास एखाद्या निर्मात्याने निर्माण केले?
एवढेच नव्हे तर मानवाचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर, हे सिद्ध होतेच की, मानव असल्यावर त्यास विचारक्षमता असून आपल्या या विचारशक्तीच्या माध्यमाने त्यास वस्तुस्थितीचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. त्याच्या सभोवतालचे लोक, सजीव आणि निर्जीव वस्तू, हवा, पाणी, अग्नी, सूर्य, चंद्र, पशु-पक्षी, पाऊस, शेती, थंडी, गरमी वगैरे या सर्व बाबींचा त्याच्याशी प्रत्यक्ष संबंध येत असून ज्यांशी त्याचा संबंध येतो आणि ज्या बाबींपासून तो लाभ घेतो व वापर करतो, हे सर्वच सिद्ध होते आणि मग हळूहळू संपूर्ण सृष्टी सिद्ध होते आणि परत हा प्रश्न उभा राहतो की, ही सृष्टी कोणी निर्माण केली व हिची पूर्ण व्यवस्था कोण सांभाळत आहे?

सिद्धान्त परीक्षणाची कार्यात्मक पद्धती
कार्यात्मक पद्धतीचा वापर केला तर हा सिद्धान्त पूर्णपणे चुकीचा सिद्ध होतो. या सिद्धान्तावर तुम्ही जर जीवनाची वाटचाल सुरू केली तर प्रत्येक पावलावर ठेच खावी लागेल आणि क्षणोक्षणी हा दृष्टिकोन चुकीचा असल्याचे स्पष्ट होईल. हा दृष्टिकोन स्वीकारण्याचा अर्थ असा होईल की, आपण स्वतःचा आणि स्वतःच्या दृष्टिकोनाचासुद्धा इनकार करतो. परंतु असे करावयाचे असल्यास स्वतःला आणि स्वतःच्या विचारसरणीला नाकारावे लागेल, तसेच हे काम काही सोपेसुद्धा नाही व यावर कायम राहणेही शक्य नाही, यावर जीवन जगणे शक्य नाही. समजा कोणी स्वतःला आणि स्वतःच्या विचारसरणीला नाकारले तरी एकार्थाने ही बाब आपोआपच मान्य करण्यासम आहे की, एक असे अस्तित्व आहे जे नाकारण्याची क्रिया करीत आहे आणि त्याच्याकडे निरीक्षण व विचार करण्याची शक्ती व क्षमता आहे. याच क्षमतेचा वापर करून त्याने पूर्णपणे विचार करून नाकारण्याचा निर्णय घेतला.
शिवाय तुमच्या या विचारसरणीनुसार असे होईल की, या ठिकाणी सर्व काही काल्पनिक आणि भ्रामक आहे. तुम्हाला कोणत्याच मातेने जन्म दिला नाही. कोणत्याच पित्याने तुमचे संगोपन केले नाही. तुमची पत्नी तुम्हाला देत असलेले तन-सुख आणि मनसुखसुद्धा नाहीत अगर परिवारही नाही. तुमच्या परिवारजणांच्या सर्व भावना आणि नाते हे काहीच नाही. तुमचा कोणी मित्र नाही व वैरीही नाही. तुमचे आचारविचार आणि भूमिका व कर्तेपणा जणू हे सर्व काहीच नाही. तुमचे मूल जर भुकेने व्याकूळ होत असेल तर तुम्ही असा विचार करून तर गप्प बसणार नाही की, याचे रडणे व भुकेने व्याकूळ होणे हे काहीच नसून केवळ कल्पना वा भ्रम आहे. कारण तुमच्या या विचारसरणीनुसार स्वतःचे अस्तित्व, इतरांचे अस्तित्व, नातेसंबंध आणि भावनांचे मुळात काहीच अस्तित्व नाही. अशा अवस्थेत तुमचे मूल भुकेने मरून जाईल. समजा, तुमच्या शत्रूने तुमच्यावर प्राणघातक हल्ला केला, तर तुम्ही असा विचार करून शत्रूशी प्रतिकारच करणार नाही. कारण हा शत्रू, हा हल्ला व हे शस्त्र हे सर्व काही काल्पनिक आहे.
हे तर मानवांसंबंधी झाले आणि आपल्याशी संबंधित समाजासंबंधी झाले. मानवाच्या सभोवतालच्या जगताचेसुद्धा असेच आहे. तुम्ही कधीही आणि कोठेही ही विचारसरणी अमलात आणू शकत नाही. तुमच्या या विचारसरणीनुसार पाणी ही केवळ काल्पनिक वस्तू आहे. तहान लागल्यास पाणी पिण्याची काहीच गरज नाही. घराला आग लागल्यास तुम्ही ती विझविणार नाही, कारण घर हे काल्पनिक, त्याला लागलेली आग ही काल्पनिक, होणारा विध्वंस हा काल्पनिक. अर्थात या सृष्टीत कोणतीही वस्तू आणि घडणारी घटना ही काल्पनिक व भ्रामक असून वास्तवाशी काहीच संबंध नाही. मात्र ही विचारसरणीच मुळात हास्यास्पद, काल्पनिक आणि भ्रामक आहे. वास्तवाशी कवडीमात्र संबंध नसलेली आहे. तहान लागल्यावर पाणी प्यावेच लागते, घराला आग लागली तर विझवावीच लागते. जगातील प्रत्येकजण जोपर्यंत त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली नसेल, तोपर्यंत तहान, पाणी पिणे, घराला लागलेली आग, तिला विझविणे आणि अशा स्वरुपाची प्रत्येक लहान-मोठी समस्या व तिचे समाधान काल्पनिक आणि भ्रामक असल्याचे स्वीकारू शकत नाही. जगातील प्रत्येक मानव सृष्टीची ठोस वास्तविकता मान्य केल्याशिवाय राहणार नाही व याशिवाय दुसरा पर्यायच नाही. ही सृष्टी काल्पनिक आणि भ्रमाचा भोपळा असण्याचा दावा करणारेसुद्धा आणि या विचारसरणीचा जोरदार प्रचार करणारे महाभागसुद्धा या भ्रामक आणि काल्पनिक विचारसरणीवर चालू शकत नाहीत. सृष्टीला आणि सृष्टीतील प्रत्येक घटनेला अगदी भ्रमाचा भोपळा समजणार्यांनी तहान लागल्यास पाणी का प्यावे? घराला आग लागल्यास का बरे विझवावी? आजारी पडल्यास उपचार का करावे अथवा इतर संकटांचा सामनाच का करावा? अर्थातच त्यांच्या दाव्यामध्ये काहीच तथ्य नाही. कथनी आणि करणीत असामान्य फरक आणि तफावत आहे. एवढेच नव्हे तर त्यांना स्वतःलासुद्धा त्यांची विचारसरणी पटत नाही. दावा तोंडी असतो, जिभेवर प्रचार असतो, मात्र स्वतःची बुद्धीच त्यांच्या दाव्याशी सहमत नसते.

ही सृष्टी अनादी आणि चिरकाल आहे काय?
दुसरी विचारसरणी अशी आहे की, ही सृष्टी निर्माण झालीच नाही, कोणी तिला निर्माण केलेदेखील नाही. अर्थात हिचा कोणीच निर्माणकर्ता नाही. ती अनादी असून कधीच नष्ट होणार नाही. ही विचारसरणीसुद्धा पहिल्याच विचारसरणीसारखी आहे. जे महाभाग ईश्वराचा स्वीकार करीत नाहीत, त्यांची हीच विचारसरणी आहे. या विचारसरणीचा आधार घेऊन ते सृष्टीनिर्मात्याचा स्वीकार करण्यातून पळवाट काढतात. तुम्ही जर त्यांना विचारले की, या विचारसरणीला कोणता पुरावा आहे? कोणत्या आधारांवर तुम्ही हा दावा करता की, ही सृष्टी अनादी व चिरकाल असून हिचा कोणीच निर्माता नाही? तर त्यांच्याकडे मात्र तुमच्या या प्रश्नाचे कोणतेच समाधानकारक उत्तर मिळणार नाही. त्यांना या सृष्टीचा निर्माता मान्य करायचा नसतो आणि यासाठी ते या सृष्टीला अनादी व चिरकाल म्हणण्याचा वा सिद्ध करण्याचा आटापिटा करतात. कारण सृष्टी निर्माण झाली असल्याचे जर कोणी मान्य करीत असेल, तर मग तिच्या निर्माणकर्त्याचा स्वीकार करावा लागेल. मग निर्माणकर्ता असण्याचा इन्कार करण्यासाठीच ते असा दावा करतात की, सृष्टी निर्माण झाली नसून ती अनादी व चिरकाल आहे. काही जरी असले तरी एक गोष्ट सर्वांनाच स्वीकारणे भाग पडते आणि ती गोष्ट अशी की.. जोपर्यंत एखादी अनादी आणि चिरकाल शक्ती असल्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत या सृष्टीचे रहस्य मुळीच उलगडत नाही. एक तर या सृष्टीच्या निर्माणकर्त्या ईश्वराचा स्वीकार करावा लागेल, जो अनादी, कायमस्वरूपी, सर्वशक्तिमान, चिरकाल असून त्यानेच या सृष्टीची निर्मिती केली आहे, अथवा हे स्वीकारावे लागेल की, ही सृष्टी अनादी आणि चिरकाल आहे. या दोन स्वरुपाच्या विचारसरणींपैकी एका विचारसरणीचा स्वीकार केल्याशिवाय या सृष्टीच्या रहस्याचा गुंता सुटणे शक्यच नाही. कारण ज्या वस्तूचे मुळात अस्तित्वच नव्हते, ती वस्तू आपोआपच कशी काय अस्तित्वात येऊ शकते अथवा तिचे अस्तित्व हे स्व-अस्तित्व असू शकते, म्हणजेच अनादी आणि चिरकाल असू शकते किवा एखाद्या निर्माणकर्त्याने तिला निर्माण कले असावे वा अस्तित्व प्रदान केले असावे. अर्थात याच निर्माणकर्त्यास ‘ईश्वर’ म्हणतात. हे दोनच पर्याय असून तिसरा पर्यायच नाही.
सृष्टी ही अनादी आणि चिरकाल नाहीच
सृष्टी ही अनादी व चिरकाल असण्याचा आटापिटा करणार्यांच्या या दाव्याचा वास्तवतेशी काहीच संबंध नाही. कारण त्यांच्या या दाव्याला कोणताच पुरावा आणि आधार नाही. या सृष्टीचे रहस्य जर जाणून घ्यायेचच असेल तर ही सृष्टी अनादी व चिरकाल असल्याची विचारसरणी मान्य केलीच पाहिजे, अशातला भाग नाही. सृष्टीचे रहस्य उलगडण्यासाठी हा सरळसरळ मार्ग आहे की, आपण या सृष्टीचा एक निर्माता स्वीकार करावा. ही सृष्टी अनादी व चिरकाल असल्याचे स्वीकार केले तर सृष्टीनिर्मितीचा प्रश्न काही अंशी सुटण्याचा केवळ भास होतो आणि तेसुद्धा अशा स्वरुपात की, तुम्ही या सृष्टीस निर्मिती अगर उत्पादन असल्याचे मान्य करावे. मूळ प्रश्नापासून स्वतःची सुटका करून घेताही येते. मात्र बाकीचे सर्व प्रश्न जशास तसे. त्यांची उत्तरे काही केल्याने सापडत नाहीत. या उलट आपण जर असे मान्य केले की, या सृष्टीचा निर्माणकर्ता ईश्वर आहे आणि तो अनादी व चिरकाल आहे तर सृष्टीनिर्मितीचा प्रश्नसुद्धा आपोआपच सुटतो आणि इतर सर्वच गुंते एकेक करून आपोआपच सुटत जातात. मग ही एवढी चांगली सोपी आणि सरळ पद्धत सोडून सृष्टीस अनादी व चिरकाल स्वीकारण्याची पद्धत कशासाठी स्वीकारायची. कारण ही दुसरी पद्धत अवघड तर आहेच, शिवाय बाकीचे प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्यसुद्धा यात नाही. मग वैज्ञानिक पद्धती अथवा अशी एखादी पद्धत स्वीकारावी, ज्यात प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्नांचा गुंता वाढतच जातो? प्रथमोल्लेखित पद्धतीचा स्वीकार करण्यात सृष्टीनिर्मात्याचे अस्तित्व स्वीकारावे लागते आणि द्वितीयोल्लेखित पद्धतीत मात्र सृष्टीनिर्मात्याचे अस्तित्व नाकारावे लागते. सृष्टीनिर्मात्याचा स्वीकार करायचा नाही म्हणूनच प्रथम पद्धतीचा अवलंब न करण्याचा हट्ट धरणे कितपत योग्य आहे? खरे पाहता ही परिस्थितीच या गोष्टीचा भक्कम पुरावा आहे की, या सृष्टीचा निर्माणकर्ता असल्याचे स्वीकारल्याशिवाय या सृष्टीचे रहस्य उलगडत नाही. वैज्ञानिक आणि बुद्धिसंमत असलेली भूमिका हीच आहे की, आपण प्रथमोल्लेखित पद्धतीचाच स्वीकार करावा. तत्त्वज्ञान, गणितशास्त्र वा अशा सर्वच शास्त्रांविषयी आपण अशाच पद्धतीचा स्वीकार करतो, ज्यामुळे सर्वच प्रश्न आणि समस्या सुटाव्यात. याकरिता अशा प्रकारच्या असंख्य वस्तुस्थितींचा स्वीकार करणे भाग पडते, ज्या कधी आपण पाहिल्यासुद्धा नाहीत. आपल्या पंचेंद्रियांना त्यांची कधी कल्पनासुद्धा नसते आणि प्रयोगाने सिद्धही करता येत नाही. कधीकधी तर यासाठी बौद्धिक मान्यतासुद्धा नसते. आपण या न जाणवणार्या व कधीकधी बुद्धीलाही न पटणार्या वस्तुस्थितींचा स्वीकार केवळ एवढ्याकरिता करतो की, याशिवाय संबंधित प्रश्न आणि समस्यांचे समाधान होऊ शकत नाही. ज्या अर्थी या सृष्टीतील घटकांविषयी आपली ही भूमिका आहे, तर मग पूर्ण सृष्टीसंबंधीसुद्धा हीच भूमिका स्वीकारणे आवश्यक आहे. कारण सृष्टीतील घटक तर आपल्याला साध्या डोळ्यांनीसुद्धा पाहणे शक्य आहे, त्यांचे परीक्षण करून त्यांचा भौतिक अर्थ आणि परिस्थिती जाणून घेऊ शकतो, मात्र संपूर्ण सृष्टीबाबत हे शक्य नाही. म्हणून या सृष्टीचे रहस्य जाणून घेण्यासाठी आपण जर अभौतिक आणि जाणीव न होणार्या वस्तुस्थितीचा स्वीकार केला तर हे बुद्धीविरोधी आणि विज्ञानविरोधी ठरणार नाही.
बर्याच वर्षांपासून या सृष्टीचे अस्तित्व आहे. मात्र यावरून असे मुळीच सिद्ध होत नाही की, ही सृष्टी अनादी आहे. केवळ एवढे म्हणता येईल की, ही सृष्टी कोट्यवधी वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र असे सिद्ध होण्याकरिता कोणताच पुरावा कोणाजवळही नाही की, ही सृष्टी अनादी आणि चिरकाल आहे. आपल्याला या सृष्टीतील अशा असंख्य वस्तू माहीत आहेत, ज्या पूर्वी कधी नव्हत्या आणि भविष्यात नष्ट होणार्या बर्यांच वस्तूसुद्धा आपल्याला माहीत आहेत. एवढेच नव्हे तर आपणसुद्धा पूर्वी अस्तित्वात नव्हतो आणि एका ठराविक काळानंतर आपले अस्तित्व राहणार नाही. मात्र अवघ्या सृष्टीत एकही अशी वस्तू आढळत नाही, जी अनादी आणि चिरकाल असेल. ज्या अर्थी कोणी ही सृष्टी अनादी आणि चिरकाल असण्याचा दावा करील, त्या अर्थी त्याला पुरावा तर मिळणार नाहीच आणि आम्ही त्याचा हा दावा स्वीकारणारही नाही. मात्र जर कोणी असा दावा करीत असेल की, ही सृष्टी एक दिवस नष्ट होणार आहे, तर ही बाब मात्र अगदी स्वीकारणीय आहे. कारण आपण नेहमीच पाहतो की, निर्माण होणारी प्रत्येक वस्तू एका ठराविक कालावधीनंतर नष्ट होते.
आणखीन एका पैलूने विचार करता येईल. एखाद्या वस्तूचे बरेच घटक असतील तर हे सर्व घटक अनादी आणि चिरकाल असतील, तरच ती वस्तू अनादी आणि चिरकाल असू शकते. मात्र एखाद्या वस्तूच्या घटकांची झीज होत असेल आणि ते नष्ट होत असतील तर हा मुळात या गोष्टीचा पुरावाच आहे की, ती वस्तू चिरकाल नाहीच. अशा वस्तूस अनादी आणि चिरकाल मुळीच म्हणता येणार नाही. आपण उघड्या डोळ्यांनी आणि बुद्धी ठिकाणावर ठेवून या सृष्टीतील कोणतीही वस्तू पाहिली तर हे आपोआपच आपल्या लक्षात येईल की, येथील प्रत्येक वस्तू सतत झिजत आहे, तिच्यावर सतत आघात होत आहेत, तिचे वय कमी होत आहे, ती नष्टतेकडे सरकत आहे. ही वस्तुस्थिती चोहीकडे आणि दाहीदिशा आपल्याला दिसते. या जगात कित्येक मानव आहेत, जन्मतात आणि मृत्यू पावतात. जन्म आणि मृत्यूची शृंखला सतत सुरू आहे. हीच अवस्था पशु-पक्ष्यांची आणि वनस्पतींची तसेच येथील सर्वच वस्तूंची आहे. ही लीला आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आणि अनुभवतो आहोत. कारण निर्माण होणारी प्रत्येक वस्तू नष्ट होणे, हा येथील नियमच आहे. मग ती सजीव असो वा निर्जीव वस्तू असो. यावरून हेच सिद्ध होते की, या सृष्टीतील प्रत्येक वस्तू नष्ट होणारी आहे, अर्थात कोणतीच वस्तू अनादी व चिरकाल नाही आणि यावरूनच ही बाब आपोआपच सिद्ध होते की, ही सृष्टी अनादी आणि चिरकाल नाहीच. ही सृष्टी एकदा निर्माण झालेली आहे आणि एके दिवशी ती अवश्य नष्ट होणार आहे. काही महाभागांची आमच्या या विचारसरणीशी सहमती नसून उत्तरादाखल ते असा दावा करतात की, कोणतीच वस्तू निर्माणही होत नाही आणि नष्टही होत नाही. तुमच्या दृष्टीत जी प्रक्रिया निर्माण होण्याची आणि नष्ट होण्याची आहे, ती म्हणजे मुळात पदार्थाचे स्वरूप बदलणे आहे. अर्थात पदार्थ विविध स्वरुपात रूपांतरित होत असल्याने आपल्याला निर्मिती आणि नाश होण्याचा भास होतो. विभिन्न प्रकारचे भौतिक घटक जेव्हा एका विशेष प्रमाणात रचित होतात तेव्हा परिणामस्वरूपी ते एका विशिष्ट वस्तू अगर पदार्थाचे स्वरूप धारण करतात. तसेच जेव्हा हे घटक पृथक होतात तेव्हा आपल्याला असे वाटते अथवा गैरसमज होतो की, ही वस्तू नष्ट झाली अथवा नाश पावली आहे.
केवळ एवढेच घडते की, एका विशिष्ट रचनेत असलेले घटक विखरून जातात आणि दुसर्या एखाद्या घटकांत मिसळून दुसर्या वस्तूमध्ये परिवर्तित होतात, त्यांचे एका विशिष्ट वस्तुच्या स्वरूपात रूपांतर होते. अर्थातच पदार्थ हा नष्ट होत नसून त्याचे केवळ स्वरूप बदलते आणि तिच्या स्वरूपातील हा बदल म्हणजे घटकांची रचना बदलणे होय.
मात्र वैज्ञानिकदृष्ट्या ही बाब खरी सिद्ध झाली नसली तरी थोड्या वेळासाठी आपण हे मान्य करू या. परंतु यावरून केवळ एवढेच मान्य करता येईल की, पदार्थाचे विभिन्न स्वरूप निर्माण होतात आणि नष्ट होतात. जणू पदार्थ हा अनादी आणि चिरकाल आहे आणि याचे स्वरूप नाश पावणारे आहे. परंतु यावरूनच हेसुद्धा सिद्ध होते की, ही सृष्टी अनादी व चिरकाल नाही, अर्थात नष्ट पावणारी आहे. कारण पदार्थाच्या स्वरुपाचेच दुसरे नाव हे ‘सृष्टी’ असे आहे. असे म्हटले जाते की, स्वरूप हे नष्ट पावणारे सिद्ध होत असल्याने ही सृष्टी नश्वर असल्याचे सिद्ध होत नाही. कारण पदार्थाचे स्वरूप हे नष्ट होत नसून ते केवळ बदलत असते. अर्थातच सृष्टीच्या स्वरूप बदलाची प्रक्रियासुद्धा सुरूच असते. मात्र यात थोडेही तथ्य नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, पदार्थाचे बदलणारे स्वरूप हे झिजणारे आणि नाश पावणारेच आहे. हे अनादी व चिरकाल असू शकत नाही. शिवाय या गोष्टीकडेसुद्धा लक्ष द्यावे लागेल की, पदार्थांच्या स्वरूपाची एक मर्यादित मुदत असते. या मुदती किती जरी एकत्र झाल्या तरी त्या अमर्याद होऊ शकत नाहीत. म्हणजेच सृष्टीची मुदतसुद्धा मर्यादितच असणार. मग ती कितीही जास्त का असेना.
आणखीन एका पद्धतीने विचार करता येईल. या सृष्टीत पदार्थाप्रमाणेच त्याच्या स्वरूपाचासुद्धा प्रारंभ आणि अंत आहे. अर्थात सुरुवात आणि शेवट होणार्या स्वरूपांचा संच म्हणजे ही सृष्टी. या सृष्टीत बदलणारे प्रत्येक स्वरूप ज्या अर्थी सुरू होऊन अंत पावते, त्या अर्थी ही सृष्टी कशी काय अंत पावणार नाही. अर्थात सृष्टीचीही कधीकाळी सुरुवात झालेली असणार आणि कधी ना कधी ती नष्ट होणारच. यावरूनच ही गोष्ट सिद्ध होते की, पदार्थसुद्धा अनादी व चिरकाल नाही. कारण त्याचे आणि त्याच्या स्वरूपाचे अस्तित्व काही भिन्न नाही. पदार्थ हा आपल्या स्वरूपाच्या रूपातच आपल्या समोर येत असतो. तसेच तो अनादी आणि चिरकाल नाही, हे सिद्ध झाले आहे.
आणखीन एका पैलूने विचार करता येईल. या भूतलावर मानवजात अनादी काळापासून अस्तित्वात नाही. प्राचीन अवशेष आणि भूगर्भशास्त्राच्या संशोधनावरून असे लक्षात येते की, एका विशिष्ट मुदतीपासूनच मानवाचे अस्तित्व आहे. त्यापूर्वी मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडत नाहीत. शिवाय हे आपल्याला चांगलेच माहीत आहे की, मानवांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून हे सिद्ध होते की, शंभर वर्षांपूर्वीची लोकसंख्या आजच्या लोकसंख्येपेक्षा निश्चितच कमी असणार. तसेच आणखीन शंभर वर्षे मागे गेल्यास लोकसंख्येचा दर आणखीन कमी होणार. अशाप्रकारे भूतकाळात जाता जाता त्या काळाची कल्पना करता येईल, जेव्हा या भूतलावर माणसांची संख्या केवळ ‘‘एक पुरुष आणि एक स्त्री’’ एवढीच असेल. मग त्याच्याही पूर्वीच्या काळाची कल्पना केली तर असे वाटेल की, मानवाचे मुळी अस्तित्वच नव्हते. अशाच प्रकारे पशु, पक्षी आणि वनस्पतीचेही अस्तित्व नव्हते. अर्थात एक काळ असा होता की, या भूतलावर काहीच नव्हते. कशाचेही अस्तित्व नव्हते. कोणत्याही प्रकारच्या सजीव सृष्टीचे मुळी अस्तित्वच नव्हते. इतर ग्रहांची सध्याची जी स्थिती आहे, अगदी तशीच स्थिती पृथ्वीचीही होती. वैज्ञानिकांचीसुद्धा या गोष्टीवर सहमती आहे.
प्रश्न असा आहे की, अशी परिस्थिती असण्याचे काय कारण असावे? अशी परिस्थिती का होती? जर तुम्ही एखाद्या निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाचा स्वीकार करीत नसाल तर तुमत्याकडे या प्रश्नाचे केवळ एवढेच उत्तर असेल की, त्या वेळी या भूतलाची आणि वातावरणाची परिस्थिती सजीव सृष्टी निर्माण होण्यासाठी मुळीच अनुकूल नव्हती. अर्थात सजीव सृष्टी निर्माण होण्यासारखे या भूतलावर काहीच नव्हते. या अत्यंत विलक्षण आणि विचित्र परिस्थितीत या वातावरणात, या भूतलावर क्रांती घडली. या भूतलावर अचानक सजीव सृष्टी निर्माण झाली. दुसर्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास या भूतलाची परिस्थिती जी आज आहे ती यापूर्वी नव्हती. पृथ्वीची जी स्थिती आज आहे ती यापूर्वी नव्हती. पृथ्वीची आज जी परिस्थिती आहे, ती सजीव सृष्टी निर्माण होण्यापूर्वी नव्हतीच. ही बाब आपल्या सर्वांनाच मान्य करावी लागते. सध्याची परिस्थितीच यापूर्वीसुद्धा होती आणि हीच परिस्थिती कायमस्वरूपी राहील, असे मुळीच शक्य नाही. परिस्थितीचा हा बदलाव वा परिवर्तन सर्वमान्य आहे. परिवर्तन होणे हे कायमचेच आहे. पदार्थाच्या परिवर्तनावर सर्वच वैज्ञानिक सहमत आहेत. अर्थात परिवर्तन हा पदार्थाचा विशेष गुणधर्म आहे. या सृष्टीचाही विशेष गुणधर्म आहे. दुसरी गोष्ट अशी की, या सृष्टीत परिवर्तनाचा गुणधर्म नसता तर सजीव सृष्टी निर्माण होण्यापूर्वीचीच परिस्थिती आजही जशासतशी राहिली असती. या भूतलवार जीवनाचे नामोनिशान राहिले नसते. किवा या उलट असे की, या भूतलावर यापूर्वीही आजच्यासारखीच सजीव सृष्टी नांदत असती. अर्थात परिवर्तनाची साधी कल्पनाही नसती. मात्र तुम्ही या परिवर्तनाशी सहमत नसाल तर तुम्हाला हे सांगावे लागेल की, भूतलावरील अनादी परिस्थितीत हे परिवर्तन का आणि कसे झाले आणि झाले तर या ठराविक मुदतीच्या प्रारंभबिदूवरच कसे झाले? यापूर्वी का झाले नाही? या प्रश्नाचे तुमच्याजवळ याशिवाय दुसरे कोणतेच उत्तर नाही की, परिसिथतीतील उत्क्रांतीसाठी एका विशिष्ट मुदतीची आवश्यकता असते. ही विशिष्ट मुदत पूर्ण झाल्यावर उत्क्रांती घडली. या मुदतीपूर्वीच्या परिस्थितीवर विचार केल्यास भूतलावरील अवस्था आणि वातावरण निश्चितच भिन्न होते. तुमचे उत्तर बरोबर आहे. मात्र तुम्ही या विशिष्ट कालावधीपूर्वीचा विचार केला तर तुम्हास या भूतलावरील आणि या वातावरणातील विभिन्न स्वरूपाच्या अवस्था चक्क लक्षात येतील. एवढेच नव्हे तर तुमची कल्पना अधिक खोलपर्यंत गेली तर असे लक्षात येईल की, सूर्यमंडलातील सर्वच ग्रह आणि तारे एकच आहेत. आज आपल्याला दिसणारे सूर्यमंडल त्या काळी अस्तित्वातच नव्हते. केवळ एक बिदू मात्र होते. तुम्ही या अवस्थेस सृष्टीचा ‘आरंभबिदू’ संबोधू शकता. या परिस्थितीपर्यंतच वैज्ञानिकांचे संशोधन पोहोचू शकले. मात्र सृष्टीच्या या अत्यंत प्राथमिक आणि प्रारंभी अवस्थेससुद्धा अनादी म्हणता येणार नाही. कारण वैज्ञानिकांच्या अगदी वर्तमान संशोधनानुसार ही सृष्टी पन्नास खर्व वर्षापूर्वीच अस्तित्वात आलेली आहे. मग हा दावा आपोआपच संपुष्टात येतो की, पदार्थ हा अनादी व चिरकाल आहे. म्हणून तुम्हाला आता हे स्वीकार करावे लागेल की, पदार्थ हा अनादी व चिरकाल नाही. एक वेळ अशी होती की, पदार्थसुद्धा अस्तित्वात नव्हता. मग पदार्थ अस्तित्वात आला आणि या पदार्थापासूनच संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आली. या स्पष्टीकरणाशिवाय इतर कोणतेच स्पष्टीकरण तुम्हाला सृष्टीविषयी देता येणार नाही. जर ही परिवर्तन पावणारी सृष्टी अनादी व चिरकाल नाही तर पदार्थसुद्धा अनादी व चिरकाल होऊ शकत नाही. जर तुम्ही या सृष्टीच्या प्रारंभबिदूचा स्वीकार करीत असाल तर तुम्हाला पदार्थाच्या प्रारंभबिदूचासुद्धा स्वीकार करावाच लागेल. वस्तुस्थिती अशी आहे की, ही सृष्टी अनादी व चिरकाल असण्याचा दावा करणे तर खूप सोपे आहे मात्र सिद्ध करणे खूप अवघड आहे की, नेमकी कोणती वस्तू अनादी व चिरकाल आहे. भूतलावरील जीवनव्यवहार की सूर्यमंडल अनादी व चिरकाल आहे, सृष्टीची व्यवस्था की यातील इतर कोणती वस्तू अनादी व चिरकाल आहे? कोणतीच वस्तू अनादी आणि चिरकाल असण्याचा पुरावा नाही. केवळ पदार्थाविषयीच तेवढे काय तुटपुंजे पुरावे देण्यात येतात आणि तेसुद्धा संपुष्टात येतात. कारण ज्या अर्थी सृष्टीच अनादी आणि चिरकाल नाही, त्या अर्थी पदार्थसुद्धा अनादी आणि चिरकाल असल्याचा दावा करता येत नाही.

पदार्थ अनादी आणि चिरकाल नाही
मागे काही काळापूर्वीपर्यंत वैज्ञानिकांचे असे मत होते की, पदार्थ हा कधीच नष्ट न पावणारी वस्तू आहे, अर्थात अविनाशी आहे. प्रयोगावरून त्यांना असा अनुमान आला की, कोणताही पदार्थ नष्ट होत नसून त्याचे केवळ स्वरूप बदलत असते. घनरूपी वस्तूस जाळल्यास त्याचे द्रवरूप अगर वायूरूपात परिवर्तन होते. पदार्थास जाळले असता त्यात घट होते. यावरून असे सिद्ध जरी झाले असले की, पदार्थ हा नष्ट होत नसून त्याचे स्वरूप बदलते आणि यावरून बर्याच जणांनी हा निश्कर्ष लावला की, पदार्थ हा अनादी व चिरकाल आहे. मात्र अनुच्या प्रयोगामुळे हा निश्कर्ष पार संपुष्टात आला. अणूविषयक प्रयोगावरून हे सिद्ध झाले की, पदार्थ हा नष्ट होतो. रेडियम, थोरियम, यूरेनियम वगैरेंच्या घटकासंबंधी ही माहिती समोर आली की, अणूचे तुकडे-तुकडे होऊन वातावरणात लीन होतात आणि त्याचे ऊर्जेत रूपांतर होते, तसेच ही ऊर्जा अदृष्य होते. दुसर्या शब्दांत असे की, पदार्थ अनादी व अविनाशी नसून नाशवंत आहे. ‘लेनीन’सारख्या भौतिकवाद्यालासुद्धा हे मान्य करावे लागले. त्याने आपल्या ‘भौतिक आणि प्रायोगिक समीक्षा’ या ग्रंथात एका फ्रेंच वैज्ञानिकाचा संदर्भ देऊन लिहिले आहे की,
‘‘अत्यंत क्रांतीशील घटक असलेले रेडियम हे ऊर्जास्थापत्य नियमाबाहेर आहे. एवढेच नव्हे तर ऊर्जेविषयी इतर कोणतेही नियम या घटकावर लागू होत नाहीत.’’(पृष्ठ २६०)
याच ग्रंथात ‘पदार्थ नष्ट झाला’ या शीर्षकाखाली त्याने विविध देशांतील भौतिक शास्त्रज्ञांच्या ‘पदार्थ आणि त्याची नष्टता’विषयी भूमिकेसंबंधी चर्चा करताना लिहिले आहे की, ‘पदार्थ हा नष्ट होतो’, ‘सर विल्यम डेम्परे’ याने ‘विज्ञानाचा इतिहास’ या पुस्तकात एकोणीसाव्या शतकापासून आजपर्यंतच्या मोठमोठ्या भौतिकशास्त्रांच्या विचारसरणींवर चर्चा करीत असा निष्कर्ष काढला की,
‘‘भौतिक वास्तविकता ही ‘हेमेल्टन’ या भौतिक शास्त्रज्ञाच्या गणितीय समीकरणाच्या लांबलचक शृंखलेत परिवर्तीत झाली असून प्राचीन भौतिकता नष्ट झाली आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनसुद्धा, अणुप्रमाणेच केवळ एखाद्या निराकार आत्म्याप्रमाणे अस्तित्वहीन स्वरूपात बाकी राहिले. इलेक्ट्रॉनमुळेसुद्धा केवळ लहरींची कल्पना निर्माण होते. या लहरीसुद्धा आपल्या या वातावरणात निर्माण होणार्या नाहीत, शिवाय मॅक्सिकोच्या ठराविक एथरमध्येही होत नाहीत. तर त्या एका निनावी अथवा माहिती नसलेल्या काल्पनिक ठिकाणी किवा भ्रामक व्यवस्थेत निर्माण होतात आणि त्याविषयी विचारशक्तीसुद्धा कल्पना करू शकत नाही.’’(पृष्ठ : ४७८)
सांगायचे तात्पर्य असे की, विज्ञान जगतामध्ये आता या बाबीवर वैज्ञानिकांचा विश्वास वाढत चालला आहे की, पदार्थ हा नाशवंत आहे. त्याची केवळ अवस्थाच बदलत नसून त्याचे विशेष गुणधर्म नाश पावतात. अर्थात पदार्थ चिरकाल नाही आणि चिरकाल नसल्यामुळे तो अनादीसुद्धा नाही. जी वस्तू नष्ट होते, ती कधी ना कधी निर्माण झालेली असते, तसेच जी वस्तू निर्माण झाली, तिचा एका ठराविक कालावधीनंतर नाश अटळ आहे. अखेर अथवा अंत स्वीकारला तर आरंभही स्वीकारावाच लागतो आणि आरंभ स्वीकारला तर अंतही स्वीकारावाच लागतो.
आता हे निश्चित झाल्यावर की, पदार्थ चिरकाल व अनादी नाही, ही बाब आपोआपच सिद्ध झाली की, ही सृष्टी अनादी आणि चिरकाल नाही. तरीसुद्धा आपण याविषयी विज्ञानाचे आधुनिक संशोधन पाहु या. ‘अॅडवर्ड लोथर केसल’ हे एक प्रसिद्ध आणि महान वैज्ञानिक आहेत. त्यांनी मांडलेला सिद्धान्त असा आहे.
‘‘काही लोकांची अशी विचारसरणी आहे की, ईश्वर हा अनादी आणि चिरकाल नाही. त्यांचा हा मोठा गैरसमजच आहे. कारण ऊर्जा ही नष्ट होत नाही आणि तयारही होत नाही. ती केवळ स्वरूप बदलत असते. मात्र ऊर्जासंबंधीचा हाच नियम असे सिद्ध करतो की, ईश्वर हा अनादी आणि चिरकाल आहे. तसेच ऊर्जा निर्माण होण्यासाठी गतीची आवश्यकता असते. कारण ए=चउ२ या नियमानुसार ऊर्जा निर्माण होते. मात्र ऊर्जेचे मूळ स्त्रोत हे कार्यशीलता अथवा गती आहे आणि या सर्व बाबी सर्वशक्तिमान ईश्वराच्या ताब्यात आहे.
विज्ञानाच्या अत्याधुनिक संशोधनावरून हे सिद्ध झाले आहे की, या सृष्टीचा एक प्रारंभबिदु आहे. यावरून ईश्वराचे अस्तित्वसुद्धा आपोआपच सिद्ध होते. कारण अनादी आणि चिरकाल नसणारी अर्थात नाश पावणारी प्रत्येक वस्तू ही कोणत्या ना कोणत्या निर्मात्याने निर्माण केली असणारच. कारण ती आपोआप निर्माण होत नाही. तसेच निर्मात्याकडूनच ती वस्तू कार्यरत असते. म्हणजे हे अवघे विश्व अगर सृष्टी ही एका अतिशक्तिशाली आणि सामर्थ्यशाली निर्मात्याने निर्माण केली व तोच निर्माता आपल्या सामर्थ्याने ही संपूर्ण सृष्टी अत्यंत नियमबद्धरीत्या कार्यरत ठेवतो. विज्ञानाने यासोबत हेसुद्धा सिद्ध केले की, पन्नास खरब वर्षांपूर्वी एक विलक्षण स्फोट झाला आणि ही सृष्टी अस्तित्वात आली. अर्थात वैज्ञानिकांनी ही बाब मान्य केली की, या सृष्टीस निर्माण करण्यात आले असून या निर्मितीचे नियम सृष्टीनियमांपेक्षा पूर्णतः भिन्न व कोण्या शक्तिशाली अस्तित्वाचा चमत्कार आहे. कारण सृष्टीची ही नियमावली अथवा कायदेसुद्धा एखाद्या निर्मितीचेच द्योतक व परिणाम आहेत. याच महान व अतिसामान्य शक्तिशाली निर्मात्याचे नाव ईश्वर असे आहे.’’(संदर्भ पाश्चिमात्य देशातील चाळीस वैज्ञानिकांची साक्ष ३, पृष्ठ क्र.८७ ते ८९)
‘जॉहन क्लेवी लॅन्डी’ लिहितात की, ‘‘रसायन शास्त्राच्या संशोधनावरून ही बाब समोर येते की, पदार्थ नाश पावत आहे. त्याचे काही घटक अत्यंत मंद गतीने नाश पावत आहेत, तर काही तीव्र गतीने नाश पावत आहेत. यावरून हेच स्पष्ट होते की, जी वस्तू नष्ट होत आहे, तिचा निश्चितच निर्मितीबिंदू आहे. नष्ट होणारी प्रत्येक वस्तू निर्माण झालेली असते आणि निर्माण झालेली प्रत्येक वस्तू नष्ट होत असते. ही बाब रसायनशास्त्रावरून तर सिद्ध होतेच शिवाय इतर सर्वच शास्त्रांवरून ही बाब स्पष्ट झालेली आहे. एवढेच नव्हे तर ही वस्तुस्थिती देखील समोर आली की ही सृष्टी अचानक अस्तित्वात आली.
आता ही बाब लक्षणीय आहे की, जर हे भौतिक विश्व स्वतःहून अस्तित्वात येऊ शकत नसेल, तसेच सृष्टीचे अस्तित्व आणि कार्य कायम व अबाधित ठेवण्यासाठी असे कायमस्वरूपी आणि यशस्वी नियम अगर कायदे स्वतः निर्माण करीत नसेल, तर हा महाप्रतापी कारनामा निश्चितच कोण्या अभौतिक अस्तित्वाचा आहे आणि याच अभौतिक अस्तित्वाचे नाव ‘ईश्वर’ किवा ‘अल्लाह’ असे आहे.’’(संदर्भ : ईश्वर आहे.., पृष्ठ! ६९ व ७०, लेखक, जॉहन क्लेवी लँडी)
हा असा प्रकार आहे की, वैज्ञानिक संशोधनावरून हे पूर्णतः सिद्ध होते, झाले की, पदार्थ हा अनादी व चिरकाल नाही आणि याच पदार्थापासून तयार करण्यात आलेली ही संपूर्ण सृष्टीसुद्धा अनादी व चिरकाल नाही. पदार्थ आणि सृष्टी या दोन्ही बाबी निर्माण करण्यात आलेल्या असून दोन्हींचा नाश निश्चितच होणार आहे. ही बाब स्वीकारण्यात आलेली असून यावरून ईश्वराचे अस्तित्व स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही, हे आपोआपच सिद्ध होते. जी बाब अनादी नाही, ती बाब कोण्या एके काळी अस्तित्वातच नव्हती आणि जी बाब अस्तित्वात नव्हती, ती आपोआपच अस्तित्वात येऊ शकत नाही. कोणीतरी निर्माण केल्याशिवाय ती निर्माण होत नाही. मग हा निर्माणकर्ता? तर हा निर्माणकर्ता अर्थातच ‘ईश्वर’ अगर ‘अल्लाह’ होय!
ही सृष्टी स्वतःहूनच कार्यरत आहे काय?
आता आपण क्रमांक तीनच्या स्पष्टीकरणावर चर्चा करु या. अर्थात ही सृष्टी आपोआपच निर्माण झाली आणि स्वतःहूनच कार्यरत आहे. या युक्तिवादास वास्तविकतेचा थोडासुद्धा आधार आहे काय? प्रश्न असा आहे की, या युक्तिवादाचा अर्थ काय आहे? असा अर्थ आहे काय की, ही सृष्टी अस्तित्वातच नव्हती आणि मग आपोआपच अस्तित्वात आली आणि आपोआपच कार्यरत झाली? हा युक्तिवाद केवळ भ्रामकच नसून ही बाब अशक्यप्राय आहे. जी बाब मुळी अस्तित्वातच नव्हती, ती स्वतःहून कशी काय अस्तित्वात येईल? या युक्तिवादाचा दुसरा अर्थ असा की, सृष्टी ही कोणत्याही निर्माणकर्त्याशिवायच अस्तित्वात आली आणि कोणत्याही चालकाशिवायच व्यवस्थितपणे कार्यरत झाली, अजूनही चालूच आहे. थोड्या वेळाकरिता आपण असे गहीत धरू या की, कोणत्याही संचालकाशिवाय ही सृष्टी स्वतःहूनच कार्यरत आहे. मात्र आपण जर विचार केला तर या युक्तिवादाने सृष्टीच्या निर्मिती आणि कार्यासंबंधी निर्माण होणार्या प्रश्नांची उत्तरे कशी मिळू शकतील?
प्रश्न असा आहे की, पदार्थापासून अस्तित्वात येणारी ही सृष्टी अशा एका विशिष्ट स्वरूपातच कशी अस्तित्वात आली आणि एका विशिष्ट वेळेवरच कशी अस्तित्वात आली? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूक्ट्रॉनपासून अगदी एकशे दोनच रासायनिक घटक कसे काय तयार झालेत? रासायनिक घटकांच्या रचनांची अगदी निश्चित ठेवण आणि जडणघडण कशी काय आणि यापासून सूर्यमंडल व यातील प्रत्येक वस्तू अगदी नियमबद्धरीत्या कशी काय तयार झाली? पृथ्वी नावाचा हा ग्रह सौरमंडलात एका विशिष्ट अंतरावर एका विशिष्ट त्रिज्या आणि परिघात, कसा काय भ्रमण करतो? मग या पृथ्वीला असलेला हा एक विशिष्ट आकार कसा काय आहे? रासायनिक घटकांच्या संमिश्र रचनेमुळे जीवन कसे काय प्राप्त झाले? या जीवनास असंख्य स्वरूप आणि आकार कसे प्राप्त झाले? दोन अत्यंत सूक्ष्म असलेल्या शुक्रजंतुपासून मानव नावाचे अतिशय विचित्र आणि विलक्षण अस्तित्व कसे काय निर्माण झाले? असे असंख्य प्रश्न असून हे प्रश्न अत्यंत पायाभूत दर्जाचे आहेत आणि जोपर्यंत या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत या सृष्टीच्या रहस्याचा उलगडा होत नाही. या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांची तुमच्याकडे काय उत्तरे आहेत?
या प्रश्नांचे एक उत्तर असे समोर येते की, जे काही घडले आणि घडत आहे, ते केवळ पदार्थाच्या आवश्यक आणि विशेष भौतिक गुणधर्मामुळेच. या प्रश्नांचे दुसरे उत्तर असे की, हे सर्वकाही योगायोग आहे. योगायोगानेच सृष्टीची निर्मिती झाली आणि योगायोगानेच ती कार्यरत आहे व तिच्यात उत्क्रांती घडत आहे.
या प्रश्नाचे तिसरे उत्तर मात्र तत्त्वज्ञानावर आधारित आणि अत्यंत विवेकपूर्ण आहे. या उत्तर देणार्याच्याच मर्जी आणि आदेशावर ही अवघी सृष्टी कार्यरत असून त्याचेच कायदे सृष्टीतील संपूर्ण बाबींवर लागू आहेत. कोणतेही लहान असो वा मोठे असो, सर्वकाही याच कायद्यानुसार होत असते. कारण त्यानेच या सृष्टीस अस्तित्व प्रदान करून एक विशिष्ट स्वरूप प्रदान केले आणि आपल्या नियमानुसार संपूर्ण सृष्टी कार्यरत आहे. त्यानेच सर्व कायदे आणि नियम लागू केलेले आहेत.
पहिल्या उत्तरासंबंधी विचार केल्यास असे वाटते की, हे उत्तर शिखर आणि प्रश्न गर्तता आहे. कारण तुम्ही पदार्थाच्या भौतिक गुणधर्मांचा उल्लेख करीत आहात आणि मी असा प्रश्न उपस्थित करीत आहे की, इलेक्ट्रान, प्रोट्रान व न्यूट्रानसारख्या अभौतिक बाबींपासून पदार्थ कसा काय अस्तित्वात आला? तुम्ही म्हणता की, पदार्थाचा आवश्यक आणि भौतिक गुणधर्म हा आहे की, यामुळे अशा स्वरूपाची एक सृष्टी अस्तित्वात यावी. मात्र ही बाब निराधार आहे. जर ही गोष्ट खरी असल्याचे मान्य केले तर आणखीन एक प्रश्न निर्माण होतो आणि तो असा की, तुमच्या दृष्टीनुसार पदार्थ हा अनादी व चिरकाल आहे, मग ही सृष्टी एका निश्चित वेळीच कशी निर्माण झाली? ती तर पदार्थाबरोबरच अस्तित्वात यावयास हवी होती. यावर तुम्ही म्हणाल की, एका दीर्घ मुदतीपर्यंत पदार्थात एका विशेष स्वरूपात उत्क्रांती घडली आणि मग सृष्टी अस्तित्वात आली. परंतु ही गोष्ट मुखावाटे काढताच तुम्ही हे स्वीकार केले की, सृष्टी पदार्थाचा आवश्यक आणि भौतिक परिणाम मुळीच नाही. प्रश्न असा आहे की, पदार्थात होणार्या उत्क्रांतीची ही विशेष पद्धतीच का? तुमच्याकडे याची केवळ दोनच उत्तरे असतील. पहिले उत्तर ‘योगायोगाने असे घडले’ आणि दुसरे उत्तर हे असेल की, कोणीतरी असामान्य व जबरदस्त कार्यक्षम शक्तीने आपल्या मर्जीने आणि पूर्ण विवेकशीलतेने पदार्थात या विशेष पद्धतीने उत्क्रांती घडविली. याशिवाय तिसरे उत्तर शक्य नाही.
आपल्याला माहीत आहे की, संपूर्ण रासायनिक घटक हे इलेक्ट्रॉन्स, प्रोट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्सपासूनच तयार होतात. मात्र या ठिकाणी मोठा विचित्र प्रश्न उभा राहतो. या इलेक्ट्रॉन्स, प्रोट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्सपासून भिन्न गुणधर्म असलेले एकशे दोन रासायनिक घटक कसे तयार होतात? कारण हे गुणधर्म तर इलेक्ट्रॉन्स, प्रोट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्समध्ये मुळीच नसतात. मग या १०२ रासायनिक घटकांपासून असंख्य सजीव, निर्जीव व भौतिक वस्तू आणि त्यासुद्धा भिन्न व परस्परविरोधी गुणधर्म असलेल्या वस्तू तयार झाल्या. हे गुणधर्म तर इलेक्ट्रॉन्स, प्रोट्रॉन्स व न्यूट्रॉन्समध्येही नसतात. शिवाय या प्रश्नाचेसुद्धा कोणाकडेच उत्तर नाही की, या रासायनिक घटकांपासून सौरमंडलातील कार्यरत असलेली प्रत्येक वस्तू विशिष्ट आकार व स्वरूपाची, विशिष्ट वातावरणात आणि विशिष्ट नियमानुसार कशी काय तयार झाली? तसेच त्या विशिष्ट गती आणि त्रिज्या व परिघातच का व कशा भ्रमण करतात? हा प्रश्न पृथ्वीविषयीसुद्धा विचारता येईल. पदार्थाच्या भौतिक गुणधर्माशी या प्रश्नांच्या उत्तरांचा कवडीमात्र संबंध नाही. शिवाय या प्रश्नाचेदेखील कोणाकडेच उत्तर नाही की, अत्यंत सूक्ष्म शुक्रजंतुपासून मानव नावाचे अतिशय विचित्र आणि विलक्षण अस्तित्व कसे निर्माण झाले?
मग तुम्ही जे म्हणता की, पदार्थास भौतिक गुणधर्म असतो, तर याची वास्तविकता काय आहे? तुम्हाला फक्त एवढेच माहीत करून घेता आले आहे की, विविध वस्तूंचे रचनात्मक घटक कोणते आहेत आणि या घटकांच्या विशेष प्रमाणातील मिश्रणाने अथवा रचनेने अमकी वस्तू तयार होते, त्या वस्तूचे अमके-तमके गुणधर्म आहेत. मात्र तुम्हाला आजपर्यंत हे माहीत होऊ शकले नाही(आणि संशोधनानेसुद्धा माहीत होणार नाही) की, असे का होते? तुम्ही पदार्थाचा जो भौतिक गुणधर्म म्हणता, तो केवळ ‘कसे’ चे उत्तर असू शकते. या उत्तराने सृष्टीचे रहस्य उलगडत नाही. यासाठी ‘का’ या प्रश्नाचे उत्तर आवश्यक आहे. मात्र तुमच्याकडे याचे कोणतेच उत्तर नाही.
एवढे सर्व काही समजल्यावर तुम्ही या वस्तुस्थितींकडे कसे दुर्लक्ष करता की, पदार्थाच्या अणूपरीक्षणानंतर पदार्थ आणि त्याचे कायदे व नियम, हे सर्वकाही फोल ठरले आहेत. एवढेच नव्हे तर लेनीनसारख्या भौतिकवादी शास्त्रज्ञाससुद्धा हे मान्य करावे लागले की,
‘‘पदार्थाचा रासायनिक गुणधर्म नष्ट होतो.’’ (संदर्भ : भौतिकवाद आणि परीक्षण, पृष्ठ क्र.२६१)
‘लेनीन’च्या या वाक्याने अशा लोकांचा जणू भरपूर खरपूस समाचार घेतला ज्या लोकांची ही विचारसरणी आहे की, सृष्टी ही एक भौतिक यंत्र असून भौतिक वैशिष्ट्यांसह ती आपोआपच कार्यरत आहे. वैज्ञानिकांनी मागे हे जाहीर केले होते की, निसर्गाची वाटचाल केवळ एकाच मार्गाने होऊ शकते आणि तो मार्ग ‘कारण आणि प्रभावा’च्या अखंड शृंखलेनुसार प्रारंभ ते अखेरपर्यंत ठरलेला आहे. मात्र सृष्टीसंबंधी ‘क्वांटम’च्या आधुनिक सिद्धान्तामुळे मागील सिद्धान्त संपुष्टात आला आहे. या आधुनिक सिद्धान्तानुसार, ही सृष्टी चालू यंत्र नसून ती चालविण्यात येत आहे.

सृष्टीतील प्रत्येक कार्य योगायोगाने होते काय?
पहिले उत्तर चुकीचे सिद्ध झाल्यावर आणि तिसरे उत्तर स्वीकार न करण्याच्या परिणामस्वरूपी केवळ दुसर्या क्रमांकाचे उत्तर शिल्लक राहते. ते असे की, ही सृष्टी केवळ योगायोगाने अस्तित्वात आली असून योगायोगानेच तिचे प्रत्येक कार्य सुरू आहे. मात्र या उत्तराला काही अर्थ आणि आधारच नाही. या उत्तराने कोणाचेच समाधान होत नाही. या सृष्टीच्या निर्माण करणार्याचे अस्तित्व मान्य न करण्याच्या हट्टापायी हे उत्तर घडविण्यात आले आहे. सृष्टी आणि तिच्या कार्यप्रणालीस पाहिल्यावर खरोखरच असे वाटते काय की, येथे घडणारी कोणतीही घटना अनियमित आणि अव्यवस्थित तसेच उद्देशहीन आहे. या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मी माझ्या ‘खरेच ईश्वराची गरज नाही काय?’ या पुस्तकात दिले आहे. या ठिकाणी मी केवळ दोन-तीन वैज्ञानिकांनी केलेली चर्चा आपल्यासमोर ठेवत आहे. ‘फ्रँक एलीन’ याने एक निबंध सादर केला. या निबंधाचे शीर्षक आहे, ‘सृष्टीची निर्मिती... एक अपघात की योजना’ या निबंधात त्याने लिहिले आहे की,
‘‘जर असे गृहीत धरले की, या जगामागे कोणतीच योजना अथवा उद्दिष्टच नाही तर सहसा हे मान्य करावे लागेल की, हे रंगबिरंगी आणि गंध असलेले विश्व केवळ योगायोगाने व अपघातानेच अस्तित्वात आले. मात्र कोणतीही बाब ही केवळ गृहीत बाब नसून एक आधुनिक गणितीय सिद्धान्त आहे. याच्याच आधारावर आपल्याला सत्य आणि असत्यातील फरक ओळखता येतो व एखाद्या विशेष स्वरूपाच्या संभावित घटनेचा हिशेब लावून या गोष्टीचा खरा अनुमान लावता येऊ शकतो की, योगायोगाने ही गोष्ट सादर होणे कुठपर्यंत शक्य आहे.
सर्व सजीवांमध्ये सजीव पेशींकरिता आवश्यक असलेले घटक म्हणजे प्रथिने होय. ही प्रथिने म्हणजे पाच घटकांवर आधारित आहेत, अर्थात कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सीजन आणि गंधक. एका प्रोटीनमध्ये ४०,००० घटक असावेत. या सृष्टीत ९२ रासायनिक घटक अत्यंत विस्कळीत स्वरूपात विखुरलेले असून आता या ९२ घटकांच्या विस्कळीत ढिगारामधून निघून हे पाचही घटक अशा रितीने संकलित व्हावे की, परिपूर्ण प्रथिन आपोआप अस्तित्वात यावे. पदार्थाचे असे प्रमाण जे सतत हलविल्यास योगा त्यातून मिळणारा निश्कर्ष आणि मुदत की, जिच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण होणे शक्य व्हावे, याचा हिशोब लावून माहिती करून घेता येते.
स्वीत्झरलँडच्या एका गणिततज्ज्ञाने अर्थात ‘चार्ल्स अबूजेनगाई’ याने हा हिशोब लावला आणि याद्वारे हे संशोधन केले की, अशा प्रकारच्या योगायोगी घटनेची संभावना असण्याचे प्रमाण हे १६० पैकी १ एवढीच असणे शक्य आहे. जणू ही बाब अशक्यप्रायच आहे. प्रथिने हे अॅमिनो अॅसिडच्या लांबलचक कार्यशृंखलेतून अस्तित्वात येतात. यामध्ये ही शृखला संकलित होण्यास सर्वांत जास्त महत्त्व आहे. जर हे चुकीच्या पद्धतीने संकलित झाले तर जीवनामृत सिद्ध होण्याऐवजी अथवा जीवनाचे अस्तित्व कायम राहण्याऐवजी हे एक अत्यंत तीव्र स्वरूपाचे विष तयार होईल. इंग्लंडचे प्रोफेसर ‘जे. बी. लेदर्झ’ यांनी म्हटले की, एका साध्यासुध्या प्रथिनाच्या शृंखलेस संकलित करण्याच्या लक्षावधी पद्धती असू शकतात. अर्थात(१०)४८ इतक्या पद्धती असू शकतात. यावरून हे लक्षात येते की, एवढ्या मोठ्या संख्येत असणार्या संकलन पद्धतीने संकलन होणे हे योगायोग नाही.
शिवाय प्रथिन हीसुद्धा रासायनिक वस्तू आहे. यामध्ये जीवनाचे मुळीच अस्तित्व नसते. जेव्हा यात आत्मा येतो, तेव्हा कुठे यामध्ये जीवन निर्माण होते. हे काही योगायोग नसून याकरिता अत्यंत आणि असामान्य बुद्धिमान असलेला ईश्वरच सर्वकाही करू शकतो.’’
हे आहे ‘चार्ल्स अबुजेनगाई’ या गणितज्ज्ञाचे मत की, एक प्रथिन संकलन हे योगायोगाने अस्तित्वात येऊच शकत नाही. यावरून लक्षात येते की, या महाकाय भूतलावर असलेली ही सृष्टी आणि या विश्वात घडणार्या अत्यंत नियमबद्ध घटना व घडामोडी योगायोगानेच कशा काय घडतील?
‘जॉन क्लेवी लँड’ या शास्त्रज्ञाने असे मत मांडले की, ‘‘अत्यंत सूक्ष्म घटकांच्या रसना विभिन्न प्रकारच्या संपूर्ण रासायनिक प्रक्रियांवरून हेच सिद्ध होते की, हे सर्व अत्यंत नियोजनबद्ध असलेल्या नैसर्गिक नियमांच्या अनुसार कार्य होत आहे. यात योगायोग नावाच्या बाबीचा लवलेश मात्र असणे अशक्य आहे. आपण जर थोडा विचार केला की, १०२ रासायनिक घटकांमध्ये किती विचित्र विषमता, विलक्षण साम्य आणि प्रमाणबद्ध संबंध आढळतात. हे सर्वकाही असून आणि कमालीची विषमता असूनसुद्धा अथवा साम्य असूनसुद्धा या १०२ रासायनिक घटकाचा प्रत्येक कण समानरीत्या तीन प्रकारच्या विद्युत घटकांवर आधारित असतो. प्रोटॉन, न्यूक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे खरे पाहता एका धन आणि एका ऋण घटकांच्या मिलनामुळे अस्तित्वात येतात. आता असे समजण्यास हरकत मुळीच नाही की, पदार्थ हा अणू आणि रेणूंच्या रचनेचेच दुसरे नाव आहे. यातील रचनात्मक घटक... न्यूट्रॉन्स, प्रोट्रॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स तसेच ऊर्जासुद्धा हे सर्वच्या सर्वच आपापल्या परिमंडलात अगर भ्रमण वर्तुळात एका सुनियोजित व्यवस्थेनुसार कार्यरत असतात, आहेत. यांच्या अवस्था अगर कार्यात कोणत्याही प्रकारच्या योगायोग किवा अपघाती घटनेची साधी कल्पना करणेसुद्धा शक्य नाही. नियजोनबद्धतेचे यापेक्षा जास्त उत्कृष्ट उदाहरण आणखीन कोणते असू शकते की, रासायनिक घटक(१०)१ ची ओळख आणि वैशिष्ट्य त्याच्या विशेष घटकां(१७) च्या अभ्यासावरून करून घेण्यात आली आहे. हा या वास्तविकतेचा स्वीकृत योग्य सबळ पुरावा आहे की, हे रंगीत व गंध असलेले विश्व एका विवेकपूर्ण, उद्दिष्ट्यपूर्ण आणि सुनियोजित व्यवस्थेनुसार कार्यरत आहे. मग कोणत्या विवेकी आणि सजग असलेल्या माणसाला असे वाटेल की, हा स्थिर आणि विचारशक्तीहीन असलेला पदार्थ अपघाती स्वरूपात आपोआपच अस्तित्वात आला आहे? मुळीच नाही. असे कदापि शक्य नाही. असे कसे शक्य होईल की, ही विश्वव्यवस्था कोणताही हेतु आणि उद्दिष्ट नसताना व या अथांग विश्वव्यवस्थेमागे कोणतीही कार्यकारी शक्ती नसताना अत्यंत नियमबद्ध योजनबद्धरीतीने कार्यरत आहे.’’‘जेरल्ड टी’ नावाच्या आणखीन एका शास्त्रज्ञाने आपल्या भावना व्यक्त करताना हे रहस्योद्गार काढले,
‘‘मला पूर्ण विश्वास आहे की, एक अत्यंत शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली ईश्वर आहे. तो सतत वनस्पती आणि पशु-पक्ष्यांच्या, ओथंबून आणि खळखळून वाहणार्या नद्या आणि अथांग पसरलेल्या सागरांच्या, न मोजता येणार्या व चमकणार्या नक्षत्रांच्या व आकाशगंगेच्या, विविध आणि विलक्षण कार्यात आपल्या सक्षम आणि नियोजनबद्ध व कलात्मक कार्याचे दर्शन घडवितो. त्याच्या या कार्यामध्ये प्रामुख्याने निम्नलिखित बाबींचे दर्शन घडते.
  1. व्यवस्थापन : एका पेशीतून अस्तित्वाची निर्मिती आणि कलात्मक विकास अत्यंत नियमबद्ध आणि विलक्षण व चमत्कारिकरीत्या होते.
  2. रचना : एका साध्या रोपट्याची निर्मितीसुद्धा इतक्या कलात्मक आणि रचनाबद्ध करण्यात आलेली आहे की, मानवी बुद्धी याची कल्पनासुद्धा करू शकत नाही.
  3. सौंदर्य : रोपटे, मुळे, पाने, फुले आणि त्यातील रंग आणि सुगंधात, ईश्वरीय सौंदर्यनिर्मितीची विलक्षण अनुभूती येते. असे विलक्षण सौंदर्य मानवनिर्मितीत निर्माण होणे अशक्य होय.
  4. जन्म : रोपटे आपल्या सजातीय वनस्पतीच जन्म देतात. गव्हातून गहूच, आंब्यातून आंबा किवा बाभळीतून बाभळीचेच झाड जन्म घेते. सहस्त्रावधी वर्षे लोटली तरी या नियमांत काहीच फरक पडला नाही.
या सर्वच पुराव्यांतून एकच बाब सिद्ध होते की, या नियोजनकार्यामागे एका असामान्य कार्यकुशल व सामर्थ्यशील अस्तित्वाची करणी आहे. त्याच्या निर्मितीसामर्थ्य आणि कार्यसामर्थ्याची मर्यादा मानवी कल्पनेच्या बाहेर आहे. याच अस्तित्वाचे नाव ‘अल्लाह’ असे आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget