Articles by "परीचय"

एखादे सुंदर, विविध रंगांच्या व विविध प्रकारच्या फुलांनी नटलेल्या नंदनवनात वावरत असताना आपल्या बुद्धीत नंदनवन फुलविणार्या व त्याची जोपासना करणार्या माळ्याविषयी विचार आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याने हे सुंदर नंदनवन फुलविण्याकरिता जमिनीची मशागत केली, पाणी देऊन सुपीक बनविली, कष्ट पणाला लावले आणि विविध प्रकारच्या फुलझाडांची कौशल्यपूर्ण पेरणी करून हे अतिसुंदर नंदनवन अस्तित्वात आणले. तसेच एखाद्या सुंदर आणि सुरचित इमारतीस पाहून किवा जगातील सर्वात सुंदर असलेल्या ताजमहालास पाहून आपल्या मनात निश्चितच इमारत तयार करणार्या कुशल कारागिराची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आपण ताजमहालाबरोबरच ताजमहालासाठी आपले पूर्ण कौशल्य पणाला लावणार्या त्या कुशल कारागिराची प्रशंसा करणारच. एखादे यंत्र अथवा संगणक पाहून आपण त्यांच्या निर्मात्याची मुक्तकंठाने प्रशंसा केल्याशिवाय राहणार नाही. एखादे सुंदर आणि व्यवस्थित वस्तुचे उत्पादन करणार्या मोठ्या कारखान्यास पाहिल्यावर कारखान्याच्या निर्माता व चालक असलेल्याची प्रशंसा केल्याशिवाय मनास शांतीच लाभत नाही.
मात्र या उलट एखाद्या सुंदर आणि रमणीय नंदनवनास पाहून जर कोणी म्हटले की, हे नंदनवन आपोआपच अस्तित्वात आले आणि या नंदनवनाच्या नीटनेटकेपणात कोणत्याही माळ्याची काहीच दखल नाही. तर ही गोष्ट जगातील कोणतीच व्यक्ती मान्य करणार नाही, किवा जर कोणी असा प्रश्न केला की, या नंदनवनाचा निर्माता असलेल्या माळ्यास एखाद्या फुलातून बाहेर काढून दाखवा, तर हा प्रश्नच मूर्खपणाचा अथवा विवेकहीन ठरतो. पौर्णिमेच्या दुधाळ चंद्राच्या प्रकाशात न्हाऊन निघालेल्या ताजमहालात जाऊन जर कोणी असा प्रश्न केला की, मला तर या अतिसुंदर वास्तुचा निर्माताच दिसत नाही. या संगमरवरी शिलांमधून ताजमहालाचा निर्माता प्रकट करून दाखवा, तर मात्र हे बुद्धीचे दिवाळे निघाल्याचेच लक्षण ठरेल. जर कोणी असा विचार करीत असेल की, या भूगर्भातून अचानक आणि आपोआपच संगमरवरीच्या शिला बाहेर आल्या. एका विशिष्ट मापानुसार आणि विशिष्ट आकारात त्या आपोआप घडल्या गेल्या, आपोआपच त्यावर कलाकुसरीचे आणि नकाशीचे काम झाले, आपोआपच ताजमहालाच्या वास्तुचा भव्य आराखडा त्याच्या आकारानुरूप तयार झाला, मग आपोआपच शिला एकमेकांवर आराखड्यानुसार चढत गेल्या आणि ही भव्य-दिव्य आणि जगातील सर्वांग सुंदर वास्तु उदयास आली. मग असा विचार करून त्याने जर असा प्रश्न उपस्थित केला की, जर ही कौशल्यपूर्ण आणि सर्वांग सुंदर वास्तु आपोआप उदयास आली नसेल, तर मग या वास्तुचा निर्माता याच वास्तुमधून प्रकट होऊन का बरे छाती ठेवून सांगत नाही की, ‘‘होय, मीच आहे या अतिविशाल व भव्य दिव्य वास्तुचा निर्माता!’’ तर असा प्रश्न विचारणार्यास आपण काय उत्तर देणार? तर उलट त्याच्या बुद्धीच्या किवा अकलेच्या स्थितीवरच प्रश्नचिन्ह उभे करू. आपण त्याच्या बुद्धीचे अथवा विचारशक्तीचे दिवाळे निघाले असल्याचेच प्रमाणपत्र देऊ. एखादे उत्पादन तयार होत असलेल्या कारखान्यासंबंधीसुद्धा जर कोणी विचारित असेल की, या कारखान्याचा तर कोणीच निर्माता कारखान्यात दिसत नाही, मला या कारखान्याच्या सुट्या भागात अथवा उत्पादनातच या कारखान्याच्या निर्मात्याचे दर्शन घ्यावयाचे आहे, तर हे मात्र शक्य नाही. मुळात त्याचा प्रश्न आणि विचारप्रणाली चुकीची आहे. अशा स्वरुपाच्या प्रश्नांविषयी आपणांसर्वांची भूमिका अशी आहे की, कोणतीही सुंदर, कौशल्यपूर्ण, मनोरम, शक्तीशाली व भव्य-दिव्य वास्तु पाहून जर कोणी असा प्रश्न उपस्थित करीत असेल की, मला या भव्य-दिव्य, कौशल्यपूर्ण आणि नियमबद्ध वास्तु अथवा कारखान्याच्या निर्मात्याचे दर्शन अगदी येथेच घडावे, तर त्याचा प्रश्नच मुळात चुकीचा आणि निराधार आहे. आपणांसर्वांचीच भूमिका अशी असेल की, या प्रश्नकर्त्याची विचारशक्ती नष्ट पावलेली आहे.
नेमका असाच प्रकार एका अत्यंत आणि असामान्य विषयासंबंधी आहे. एखादी व्यक्ती जर हट्ट करीत असेल की, मी ईश्वराचे अस्तित्व अगदी तेव्हाच मान्य करील, जेव्हा तो स्वतःहून माझ्यासमोर प्रकट होईल, अथवा मी त्याला माझ्या डोळ्यांनी पाहीन किवा माझ्या कानाने त्याचा आवाज ऐकेन अथवा मी त्यास स्पर्श करून पाहीन. तर हे मात्र शक्य नाही. कारण सृष्टीतील प्रत्येक वस्तुला पाहून आपण त्या वस्तुच्या निर्मात्यास ओळखू शकतो. मात्र त्या प्रश्नकर्त्याची मागणी अशी आहे की, मी या सृष्टीतील वस्तूच्या निर्मात्यास याच सृष्टीत पाहून त्याचे अस्तित्व स्वीकार करेन, तर त्याची ही मागणी कोणत्याही प्रकारे योग्य नाही.
उत्पादकाचे दर्शन उत्पादनात घडत नसते
ही बाब स्वाभाविक आहे की, उत्पादनास पाहिल्यावर आपला विचार निश्चितच उत्पादक अथवा निर्मात्याकडे जातो. निर्मितीस पाहून निर्मात्याच्या अस्तित्वाचा स्वीकार करण्यासाठी फार मोठ्या तत्त्वज्ञानाची अथवा संशोधनाची गरज नसते. ही बाब अतिशय स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. वैज्ञानिक असो, तत्त्वज्ञ असो की साधारण विचारसरणीचा माणूस असो, उत्पादन अथवा निर्मितीस पाहून निर्मात्याचा विचार येणे हे स्वाभाविक आहे. मात्र या उत्पादित वस्तुंमध्ये सूक्ष्मदर्शी यंत्र लावून पाहिल्याने या वस्तुंचा निर्माता मुळीच दिसणार नाही. अशा प्रकारचा प्रयत्न केवळ निष्फळच नव्हे तर हे संपूर्ण कार्यच मूर्खपणाचे ठरेल. वस्तुस्थिती अशी आहे की, उत्पादन किवा निर्मिती आणि निर्मात्याचे अस्तित्व अत्यंत भिन्न असते. त्यामुळे निर्मितीमध्ये निर्मात्याचे अस्तित्व शोधणे, हे काही विवेकतेचे आणि बुद्धिमत्तेचे लक्षण नाही, शिवाय हे शक्यसुद्धा नाही. एखादी निर्मिती पाहिल्यावर आपण आपल्या केवळ विचार शक्तीच्या आधारावर हे ठरवू शकतो की, या निर्मितीचा निर्माता अवश्य आहे. आपण या जगात वावरत असताना प्रत्येक निर्मितीस पाहून निर्मात्याच्या अस्तित्वाचा मनोमन स्वीकार करतोच.
जर कोणी ईश्वराचे अस्तित्व आपल्या विचारशक्तीच्या आधारावर स्वीकारण्यास तयार नसेल, तसेच पाहिल्याशिवाय, चाखल्याशिवाय, ऐकल्याशिवाय जर कोणी ईश्वराचा अर्थात सृष्टीच्या निर्मात्याचा स्वीकार करण्यास तयार नसेल, तर मग त्याच्यासाठी नाकारण्याचा अथवा अस्वीकृतीचा मार्ग मोकळा आहे. मात्र या अस्वीकृतीबरोबरच अथवा ईश्वराचे अस्तित्व नाकारण्याबरोबरच त्याला हेसुद्धा स्वीकारावे लागेल की, ही सृष्टी आणि यातील प्रत्येक वस्तू(अर्थात निर्मिती) आपोआपच अस्तित्वात आली. या सृष्टीचा आणि यातील प्रत्येक वस्तूचा कोणीच निर्माता नाही.
एखाद्या निर्मितीस इंद्रिय-माध्यमाने पाहण्याच्या दोन अनिवार्य अटी आहेत. प्रथम अशी की, निर्मात्यास उद्योगनिर्मितीच्या आत नव्हे तर बाहेर शोधावे आणि द्वितीय अट अशी की, उद्योगनिर्मितीच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत संपूर्ण पर्व दृष्टीसमोर असावे. ज्या पेनाचा वापर करून मी लिहित आहे, त्या पेनाचा अगर लेखणीचा निर्माता जर मला पाहावयाचा असेल, तर मला पेनाचा निर्माता पेनाच्याआतमध्ये कधीच सापडणार नाही. उलट त्याचा निर्माता पेनाच्या बाहेरच सापडेल. शिवाय पेन अगर लेखणी निर्माण होण्याचे संपूर्ण पर्व पूर्णपणे पाहिल्यानंतरच हे ठरविता येणे शक्य आहे की, याच्या निर्मितीमध्ये कोणकोणते हात कार्यरत आहेत, याबरोबरच मला हेसुद्धा पाहावे लागेल की, पेन अगर लेखणीच्या निर्मितीचा कारखाना कोणी स्थापन केला? यामध्ये कोणाचे बुद्धीकार्य आणि भांडवल लागले आहे? या सर्व बाबी आपल्या डोळ्यांनी पाहिल्यानंतरच मी असे छातीठोकपणे सांगू शकतो की, मी पेनाच्या निर्मात्यास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे.
परंतु मी जर पेनाच्या आत त्याचा निर्माता शोधत असेल किवा ज्या वेळी पेन तयार होऊन माझ्या हातात आला, त्या वेळी मी या पेनाच्या निर्माणकर्त्यास आपल्या डोळ्यांनी पाहण्याचा हट्ट धरीत असेन, तर मात्र माझी ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. पेनाच्या निर्माणकर्त्यास पाहणे केवळ अशाच परिस्थितीत शक्य होईल, जेव्हा पेनाच्या उत्पादनाच्या सर्व प्रक्रिया आपल्या डोळ्यांसमोर घडतील. याशिवाय आपण ज्याला पेनाचा निर्माणकर्ता ठरवू, तर ते प्रयोगाने अथवा अनुभवाने नव्हे तर अंदाजानेच ठरवू. उदाहरणार्थ, पेनावरील शिक्क्यावरून आपण हे ठरवतो की, हा पेन कोणत्या कंपनीने आणि कोणत्या देशात तयार झाला. बर्याच वेळा असे घडते की, एखादे उत्पादन एके ठिकाणी होते आणि त्यावर दुसर्याच कंपनीचा शिक्का मारण्यात येतो. या शिवाय पेनावरील कंपनीचे नाव मिटले, तर आपण त्याच्या बनावटीवरून अंदाज लावू शकतो की, हा पेन कोणी तयार केला किवा कमीतकमी एवढा तरी विचार करतो की, हा पेन कोणा मानवाने तयार केला असेल. एखादी व्यक्ती असादेखील विचार करू शकते की, हा पेन आपोआपच तयार झाला असावा. मात्र या दोन्हीही परिस्थितीत पेन निर्माण करणार्यास पाहिलेले अथवा अनुभवलेले नसते. केवळ अनुमान अथवा कयासानेच ठरविण्यात आलेले असते. तसेच एखाद्या व्यक्तीस जर या पेनाचा निर्माणकर्ता स्वीकारण्यात आले, तर हेसुद्धा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून किवा स्वतः अनुभव घेऊन नव्हे तर विचारशक्तीच्याच आधारावर स्वीकारण्यात आलेले असते. अर्थात तुम्ही जर पेन निर्मिताची संपूर्ण कार्यप्रणाली प्रत्यक्ष डोळ्यांनी न पाहता इतर पद्धतीने पेन तयार करणार असाल तर, हे प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर नव्हे तर अंदाजावरच करीत आहात आणि हीच परिस्थिती इतर सर्वच उत्पादननिर्मितीची आहे.
निर्माणकर्त्यास आपण विवेकशक्तीने ओळखतो
वस्तुस्थिती अशी आहे की, आपल्याला निर्माणकर्ता हा उत्पादननिर्मितीत नव्हे, तर उत्पादननिर्मितीच्या बाहेरच सापडतो. तसेच डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहून नव्हे तर विचारशक्तीच्याच आधारावर आपण निर्मात्यास ओळखतो आणि स्वीकारतो. निर्माणकर्त्यास ओळखण्यासाठी व स्वीकारण्यासाठी इंद्रियांच्या किवा साधनांच्या माध्यमाने माहिती करून घेण्याची अट असेल, तर इतर सर्वच उत्पादननिर्मितीबाबतीत हे मान्य केल्याशिवाय चालणार नाही की, या उत्पादननिर्मितीचा कोणीच निर्माणकर्ता नसून या सर्व वस्तू आपोआपच तयार झाल्या. ही बाब निश्चितच निराधार आणि मूर्खपणाची ठरेल. मात्र या गोष्टीचा विलाज काय आहे की, या अथांग आणि भव्य-दिव्य सृष्टीच्या निर्माणकर्त्यासंबंधी मोठमोठे विचारवंत असण्याचा दावा करणारेसुद्धा नेमका हाच मूर्खपणा करीत आहेत. एकीकडे त्यांची अशी मागणी आहे की, या सृष्टीचा निर्माणकर्ता या सृष्टीतच दिसावा तर दुसरीकडे असा हट्ट आहे की, सृष्टीचा निर्माणकर्ता अर्थात ईश्वर त्यांना डोळ्यांनी दिसावा. एवढ्यावरही त्यांचे भागत नाही. दुसर्या प्रकारच्या मूर्खपणास ते प्रगत विचारधारा आणि विचारशक्तीचे नाव देतात आणि ईश्वराचा स्वीकार करण्यास बौद्धिक पुराव्यांविरुद्ध व प्राचीनवादी असल्याचा दावा करतात.
मात्र कोणी जर असा हट्टच धरीत असेल की, या समस्येचे समाधान इंद्रिय आणि साधनसामग्रीच्याच माध्यमाने करण्यात यावे, तर यासाठीसुद्धा आमची पूर्ण तयारी आहे. परंतु यासाठी आवश्यक अटींची पूर्तता त्याला करावी लागेल. या हट्ट करणार्या व्यक्तीस सृष्टीनिर्माणकर्त्याचा शोध सृष्टीच्या आत नव्हे, तर सृष्टीच्या बाहेर घ्यावा लागेल. मग यासाठी या गोष्टीचीसुद्धा नितांत गरज आहे की, तुम्हाला सृष्टीच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत घडणार्या सर्व प्रक्रिया आपल्या इंद्रियांनी अथवा साधनसामग्रीच्या माध्यमाने किवा आपल्या डोळ्यांनी पाहाव्या लागतील. मात्र जर या आवश्यक अटींची पूर्तता करणे शक्य नसेल,(निश्चितच या अटींची पूर्तता शक्य नाही) तर इंद्रिय आणि प्रायोगिक साहित्यांच्या माध्यमाने या समस्येचे समाधान शक्य नाही, अर्थात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणे शक्य नाही. तुम्ही या सृष्टीचा कोणीतरी निर्माणकर्ता आणि व्यवस्थापक स्वीकार करा अथवा ही संपूर्ण भव्य-दिव्य सृष्टी आपोआप अस्तित्वात आली असल्याचे स्वीकार करा. यापैकी कोणतीही बाब ठरविण्यासाठी इंद्रिय आणि प्रायोगिक साहित्यांच्या माध्यमांचा वापर शक्य होणारच नाही. याचा योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला विवेकशक्तीचाच वापर करावा लागेल. मात्र तुम्हाला ही निर्णयप्रणाली आवडत नाही!
आपण ज्या भव्य-दिव्य, अनंत व अथांग सृष्टीत जीवन जगतो, त्या सृष्टीचा प्रारंभ आणि शेवट या दोन्ही बाबतीत आपल्याला काहीही माहीत नाही. कारण या सृष्टीची निर्मिती आपल्या डोळ्यांसमोर झाली नाही, तर उलट ती परिपूर्ण स्वरुपात अगदी तयार परिस्थितीत आयती आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आपल्याला अद्यापही नेमके माहीत नाही की, ही सृष्टी निर्माण होऊन किती काळ लोटला आणि किती काळापर्यंत टिकणार आहे. आपण तर या सृष्टीच्या दरम्यानच्या काही मर्यादित काळासाठी जन्माला आलो आहोत. या ठिकाणी एका उर्दू कवीच्या दोन ओळी आठवतात,
‘‘सुनी हिकायतें हस्ती तो दरमियां से सुनी, न इब्तेदा की खबर है, न इन्तिहा मआलूम.’’
अर्थात : ‘‘कहानी ऐकली तर तीसुद्धा मध्यंतरातूनच, ना प्रारंभ माहीत आहे ना शेवट.’’ आपण विज्ञानाच्या क्षेत्रात किती जरी प्रगती केलेली असली, तरी आपण आपल्या इंद्रिय आणि प्रायोगिक साधनसामग्रीचा वापर करून या सृष्टीच्या निर्माणाचे स्त्रोत आणि काळ पाहू शकत नाही, सृष्टीतील सतत घडणार्या प्रक्रियासुद्धा पाहू शकत नाही. या सृष्टीचा अंत कधी होईल, हेसुद्धा माहीत करून घेऊ शकत नाही. या सृष्टीत ज्या प्रक्रिया सतत घडत असतात, त्यांपैकी भविष्यात घडणार्या प्रक्रियांची साधी कल्पना करण्याचेसुद्धा तंत्र आपल्याकडे नाही. या भव्य-दिव्य, अथांग आणि अनंत असणार्या सृष्टीच्या वय आणि क्षेत्रफळापेक्षा आपली ही मानवी विचारशक्ती अथवा विवेकशीलता खूपच क्षुल्लक आणि कमी आहे. केवळ विचार आणि विवेकशीलताच नव्हे तर आपले वय, कार्यक्षमता, इंद्रियक्षमता आणि दृष्य व श्रवणशक्तीसुद्धा अत्यंत किरकोळ आहे. आपले अनुमान, आपले निष्कर्ष आणि शोधबुद्धी वगैरे सर्वच बाबी कुचकामी ठरतात. ज्या सृष्टीच्या केवळ बाह्य दर्शनानेच आपल्या संपूर्ण शक्ती पार थकून जातात आणि संपूर्ण क्षमतांचे अवसान गळून पडते, त्या अथांग आणि अनंत सृष्टीची केवळ लांबी, रूंदी, परिघ, त्रिज्या, क्षेत्रफळ व घनफळ मोजणे शक्यच नाही. याकरिता कोणतेही साहित्य अपुरे पडेल, ज्या अनंत व अथांग सृष्टीच्या सीमासुद्धा ओलांडणे शक्य नाही, तिच्या मर्यादांची कल्पना करणेसुद्धा शक्य नाही. त्या सृष्टीची निर्मिती आणि तिच्यात घडणार्या प्रक्रिया, तसेच तिच्या व्यवस्थापन व व्यवस्थेविषयी आपण इंद्रिय आणि प्रायोगिक साधनसामग्रीच्या माध्यमाने एखादा निर्णय करण्याचे ठरविले तर हा किती मोठा आणि अतिभव्य, अतिदिव्य, अनंत आणि अथांग मूर्खपणाच ठरेल! ही वस्तुस्थिती स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच नाही की, आपल्या इंद्रियांची शक्ती आणि आपण तयार केलेली साधनसामग्री सृष्टीच्या संपूर्ण शोध प्रक्रियेत कुचकामी ठरतात. यासंबंधी तर आपल्याला आपल्या बुद्धी आणि विवेकशक्तीचाच वापर करावा लागेल. याच माध्यमाने आपण या मार्गात वाटचाल करावी.
विज्ञानाची सर्वच स्पष्टीकरण बौद्धिक आहेत
सृष्टीच्या बाबतीत तुमची विचारसरणी अशी जरी असली की, तिचे अस्तित्व हे केवळ काल्पनिक आहे किवा ती अनादी काळापासून असून अविनाशी आहे, तसेच तुमची अशी विचारसरणी जरी असली की, ती आपोआप अस्तित्वात आली आणि आपोआप तिचे कार्यचक्र चालू आहे किवा अशी विचारसरणी जरी असली की, एका सार्वभौम आणि सर्वशक्तिमान ईश्वराने तिची निर्मिती केली आहे आणि तोच या सृष्टीचे कार्य चालवीत आहे, तर यांपैकी तुमची कोणतीही विचारसरणी असू द्या, मग ती खरी असो अथवा खोटी असो, या सर्वच विचारसरणी अगर सिद्धान्ताचा आधार हा मुळात बौद्धिक विचारसरणीच आहे. या विचारसरणींशी इंद्रिय आणि प्रायोगिक सामग्रीचा कवडीमात्र संबंध नाही. तुम्ही या सृष्टीला अगदीच अनादी काळापासून स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले नाही, शक्यही नाही. तिच्या घडणार्या घटनाक्रमाच्या शृंखलेतील प्रत्येक कडी पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी तुमचे कोणतेच इंद्रिय अथवा साहित्यसामग्री कामी आले नाही. तसेच यासाठी कोणतेही प्रयोग करून निष्कर्ष मिळाला नाही आणि शक्यसुद्धा नाही. तर मग खरा प्रश्न असा आहे की, तुम्ही कशाच्या आधारे हा सिद्धान्त मांडता किवा असा निर्णय घेता की, ही सृष्टी अनादी काळापासून आणि चीरकालीन आहे. तुम्ही सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी हजर नसूनसुद्धा आणि सृष्टीची संपूर्ण व्यवस्था तुमच्या दृष्टीसीमांच्या आत नसूनसुद्धा तुम्ही इंद्रिय आणि शोध साहित्यांच्या आधारावर हा निर्णय कशासाठी घेऊ शकता की, ही सृष्टी आपोआपच अस्तित्वात आली आणि संपूर्ण कार्यचक्र हे आपोआपच चालू आहे अथवा या उलट असा निर्णयसुद्धा कशासाठी घेऊ शकता की, या सृष्टीचा निर्माणकर्ता आणि संचालक हा सर्वशक्तिमान ईश्वर आहे. एवढेच नव्हे तर तुम्हाला तुमच्या इंद्रियांच्या शक्तीमुळे आणि प्रायोगिक साहित्याच्या माध्यमाने हेसुद्धा समजले नाही की, या सृष्टीचे अस्तित्वच नसून ही केवळ एक कल्पना आहे अथवा केवळ कल्पनांवर आधारित मानवी भ्रम आहे. इंद्रिय आणि साहित्यांच्या माध्यमाने तुम्हाला मिळणारी माहिती केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित आहे की, आपण ज्या ठिकाणी जगत आहोत, त्या सृष्टीचे अस्तित्व आहे आणि तिचे कार्यचक्र चालू आहे.. बस, एवढेच! या शिवाय तुम्ही जे काही सादर करता, ते तुमच्या बौद्धिक विचारशक्तीवर आधारलेले निर्णय आहेत. या निर्णयांचा संबंध इंद्रियांच्या माध्यमाने मिळणार्या माहितीशी अथवा अनुभव किवा प्रयोगाशी मुळीच नाही.
विज्ञानाकडे ‘का?’ चे उत्तर नाही
ही सृष्टी का निर्माण झाली आणि तिचे हे सतत चालू असलेले कार्यचक्र कशाकरिता सुरू आहे? हिचा प्रारंभ झाला का आणि अंत होईल का? हिचा कोणी निर्माता आणि चालक आहे का अथवा ती आपोआपच अस्तित्वात आली आणि आपोआपच चालू आहे? तर या अतिमहत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीतच. पंचेंद्रियांच्या आणि साहित्यसामग्रीच्या आधारावर या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिकाने शोधून काढली नाहीत. पंचेंद्रियांचा आणि साहित्यांचा वापर करून अर्थात वैज्ञानिक प्रयोगाद्वारेसुद्धा केवळ एखाद्या क्षुल्लक बाबींविषयी जी माहिती अथवा ज्ञान प्राप्त होते, ते केवळ एवढेच की, या बाबीचे अगर पदार्थाचे गुणधर्म काय आहेत आणि त्याची घटकात्मक रचना कशी आहे. मात्र हे गुणधर्म का आहेत आणि त्यातील घटकांची रचना अशी का आहे, याच घटकांच्या अशाच स्वरुपाच्या रचनेमुळे हाच पदार्थ का तयार होतो वा अमुकच पदार्थ ‘का’ तयार होतो, तर मात्र विज्ञानाजवळ ‘का’ या प्रश्नाचे उत्तर मुळीच नाही. उदाहरणार्थ, आपल्याला हे माहीत आहे की, हायड्रोजन आणि ऑक्सीजनच्या मिश्रणाने पाणी तयार होते. मात्र या दोन्ही घटकांच्या मिश्रणाने पाणीच का तयार होते, शिवाय पाण्याचा गुणधर्म हा त्याच्या घटकांच्या गुणधर्मापेक्षा इतका विपरित का आहे? अर्थातच हायड्रोजनचा गुणधर्म आहे की, तो स्वतः जळतो आणि ऑक्सीजन जळण्यासाठी मदत करतो. तेव्हा या दोन्हींच्या मिश्रणाने तयार होणारे पाणी हा विझविणारा पदार्थ का तयार झाला? खरे पाहता जळणार्या आणि जळण्यास मदत करणार्या या दोन घटकांच्या मिश्रणाने तयार होणार्या पदार्थाचे गुणधर्म जाळणे अथवा जळणे असावयास हवे होते. अर्थात जळत असलेल्या आगीत पाणी ओतताच तिच्यात आणखी भडका व्हावयास हवा होता. मात्र पाण्याचा गुणधर्म आगीच्या गुणधर्माविरुद्ध आहे. असे का? या ‘का’ चे उत्तर विज्ञानाजवळ नाही. अशा असंख्य उदाहरणांपैकी आणखीन एक उदाहरण आपणास दैनंदिन जीवनात खाण्यासाठी वापरत असलेल्या मिठाचे देता येईल. कारण हेच मीठ सोडियम आणि क्लोरीन या दोन घटकांचे मिश्रण आहे. सोडियमचा गुणधर्म तर विचित्रच आहे. अगदी हाताचा स्पर्श होताच पेट घेणारा पदार्थ म्हणजे सोडियम आणि क्लोरीन म्हणजे एक विषारी गॅस. मात्र या दोन्हींचे मिश्रण होताच मीठ तयार होते आणि मिश्रित घटकांचे दोन्ही गुणधर्म अर्थात ज्वालाग्रही असणे व विषारी असणे मिठातून नष्ट झालेले आहे. मीठ हे स्पर्श होताच जळतही नाही आणि ते विषारीसुद्धा नाही. असे का बरे? तर अशा प्रकारच्या प्रत्येक ‘का’ चे उत्तर पंचेंद्रियांच्या अथवा वैज्ञानिक साहित्यांचा वापर करूनदेखील सापडले नाही. मग ही बाब खरोखरच विचार करण्यासाठी आहे की, या अत्यंत क्षुल्लक ‘का’ चे उत्तर विज्ञान देऊ शकत नाही, पंचेंद्रियांच्या आणि वैज्ञानिक साहित्याच्या माध्यमानेसुद्धा हे ‘का’ चे उत्तर सापडत नाही, ‘‘तर ही सृष्टी का निर्माण झाली?’’ या प्रश्नाचे उत्तर कसे सापडेल? या सृष्टीला कोणीतरी निर्माणकर्त्याने निर्माण केले का?’ याचे उत्तर कसे सापडेल की सृष्टी कोणाच्या आदेशावर एवढी व्यवस्थितपणे आणि नियमबद्धरीत्या चालते? याचे उत्तर कसे सापडेल. कारण वस्तुस्थिती अशी आहे की, या ‘का’ चे उत्तर पंचेंद्रिये आणि शोध-साहित्यांच्या माध्यमाने कधीच आणि कोणासही सापडणे शक्य नाही. अर्थातच ईश्वराचा ‘स्वीकार’ असो की ‘नकार’ या दोन्ही बाबी विज्ञानाशी संबंधित नसून माणसाच्या बुद्धीशी संबंधित आहेत. वैचारिक पुराव्यांच्याच आधारांवर ईश्वराचा स्वीकार अथवा नकार करता येईल. पंचेंद्रियांच्या आधारावर आणि साधन-सामग्रीच्या नास्तिकताही सिद्ध होत नाही व आस्तिकताही सिद्ध होत नाही.

१४ एप्रिल १९७६ साली ‘इस्लामिक कौंसिल ऑफ युरोप’ तर्फे लंडनमध्ये एक आंतर्राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात जगभरातून धार्मिक विद्वान व विचारवंतांनी इस्लामच्या विविध विषयांवर निबंध सादर केलेत. मला सुद्धा या अधिवेशनात निमंत्रित केले गेले होते. परंतु आजारपणामुळे मी या अधिवेशनात भाग घेऊ शकलो नाही. तरी पण यासाठी एक निबंध लिहून पाठविला होता. जो या अधिवेशनात सादर करण्यात आला.(अबुल आला)
सुरवातीला ही बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे की जगामध्ये व इतिहासामध्ये प्रथमतः प्रेषित मुहम्मद(स) यांनी सादर केलेला धर्म म्हणजे इस्लाम - ही कल्पनाच मुळात चुकीची आहे. तसेच प्रेषित मुहम्मद(स) यांना या कारणास्तव इस्लामचे संस्थापक म्हणून संबोधले जाणे सुद्धा चुकीचे आहे. दिव्य कुरआन या वस्तुस्थितीचे पूर्णपणे स्पष्टीकरण असे करतो की ईश्वराकडून मानव जातीच्या मार्गदर्शनाकरीता व कल्याणाकरीता नेहमी एकच धर्म पाठविला गेला आणि तो धर्म म्हणजेच ‘इस्लाम’ इस्लाम म्हणजे एकमेव ईश्वरासमोर आत्मसमर्पण करणे. जगाच्या विविध भागात आणि विविध समाजात जे जे प्रेषित ईश्वरातर्फे पाठविले गेले होते. ते त्यांच्या आणलेल्या धर्माचे अजिबात संस्थापक नव्हते. उदाहरणार्थ प्रेषित नूह ने आणलेला धर्म म्हणजे ‘नूह वाद’, प्रेषित ईब्राहीमचा धर्म म्हणजे इब्राहीम वाद, प्रेषित मूसाचा धर्म म्हणजे मूसावाद अथवा इस्त्राईल धर्म किवा प्रेषित येशूने आणलेला धर्म म्हणजे येशूवाद वगेरे असा प्रकार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की सुरुवातीपासून सादर करीत आलेल्या प्रेषितांच्या धर्मालाच त्यांच्यानंतर येणार्या प्रेषितांनी सादर केले.
या प्रेषितांपैकी प्रेषित मुहम्मद(स) यांचे मुळात वैशिष्टये हे आहेत की,
 1. ते ईश्वराचे अंतिम प्रेषित आहेत.
 2. त्यांच्या मार्फत ईश्वराने भुतकाळातील सर्व प्रेषितांमार्फत पाठविलेल्या मूळ धर्माचे पुनरुज्जीवन केले.
 3. मागच्या काळातील धर्मांत विविध भाषिकांनी विविध प्रकारे स्वयंविचारांची जी भेसळ करुन जे कृत्रिम धर्म निर्माण केले होते, एकमेव ईश्वराने त्या कृत्रिम धर्माचे अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या मार्फत शुद्धीकरण करुन शुद्ध व सुरक्षित इस्लामची शिकवण समस्त मानवजातीपर्यंत पोहोचविली.
 4. प्रेषित मुहम्मद(स) नंतर ईश्वराला कोणताच प्रेषित पाठवायचा नव्हता. करीता त्यांना जी अंतिम शिकवण दिली गेली तीस त्याने मूळ भाषेत शब्दन्शब्द सुरक्षित केले की जेणेकरुन मानवाला कोणत्याही काळात त्या शिकवणीपासून मार्गदर्शन प्राप्त करता यावे. ही एक संदेहमुक्त सत्यता आहे की अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांनी आणलेले दिव्य कुरआन कोणत्याही परिवर्तनाशिवाय आपल्या पूर्वीच्या मूळ स्थितीत आजपर्यंत जशास तसे सुरक्षित आहे. त्याच्या अवतरण काळाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेषित मुहम्मद(स) त्याला लिहून ठेवित असे. नंतर प्रथम खलिफा(प्रतिनिधी) यांनी त्याला ग्रंथाचे स्वरुप देऊन सुरक्षित केले व नंतर तिसर्या खलिफांनी त्याच्या प्रती इस्लामी जगताच्या संपूर्ण केंद्रात पाठविल्यात. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक देशातील, प्रत्येक शतकातील पत्रकीय व मुद्रनीय कुरआन जमा करुन त्यांची तुलना करुन पाहिल्यास त्यामध्ये कींचितही फरक आढळणार नाही. याशिवाय प्रत्येक नमाज(दिवसातील पाच वेळेची निश्चित केलेली प्रार्थना) मध्ये कुरआन पठणाचे आदेश प्रेषित मुहम्मद(स) यांच्या प्रेषित्वाच्या पहिल्याच दिवसापासून दिले गेले होते. त्यामुळे प्रेषित मुहम्मद(स) यांच्या शेकडो साहबांनी(तत्कालीन अनुयायांनी) संपूर्ण कुरआन व सर्वच साहेबांनी दिव्य कुरआनाचा काही भाग अंतिम प्रेषित मुहम्मद(स) च्या जीवनातच मुखपाठ केला होता. तेव्हापासून आजपर्यंत अर्थात गेल्या चौदाशे वर्षापासून आजपर्यंत दिव्य कुरआनाचा शब्दन शब्द मुखपाठ करणे आणि दरवर्षी रमजानच्या पवित्र महिन्यात तरावीहच्या नमाज मध्ये(अर्थात रमजान महिन्याच्या रात्रीच्या प्रार्थनेत) तोंडी पठनाचं परंपरा संपूर्ण इस्लामी जगतात चालू आहे. तसेच प्रत्येक काळात दिव्य कुरआनाचे लाखोंच्या संख्येत मुख पाठक उपलब्ध असतात. जगातील इतर कोणतेही धार्मिक ग्रंथ अशारितीने लिखित स्वरुपात अस्तित्वात नाही. व अशा प्रकारे मुखपाठकांमध्ये सुरक्षित नाही की त्याच्या वास्तव व मूळ स्वरुपात शंकेची कीमान शक्यताही नसावी. ५) अंतीम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या जीवन प्रणालीस त्यांच्या साहबांनी(तत्कालीन अनुयायांनी) व नंतरच्या इतिहासकारांनी अशा अतुलनीय पद्धतीने लिखीत स्वरुपात सुरक्षित केले की याहून जास्त सुरक्षित पद्धतीने कधीच कोणत्याही भुतकालीन प्रेषितांचे कथन व कर्म सुरक्षित केलेले नाही. त्याच प्रमाणे कोणत्याही एखाद्या ऐतिहासिक महत्वाच्या व्यक्तीचे कथन व जीवनी सुरक्षित केलेली नाही. थोडक्यात ती पद्धत अशी की जर एखाद्या व्यक्तीने प्रेषित मुहम्मद(स) शी संबंधीत एखादी बाब कथन केली असेल त्या व्यक्तीसाठी ही अट बंधनकारक असायची की त्याने कथीत केलेली बाब कोणत्या कथनकाराद्वारे त्याच्या पर्यंत पोहोचली. तसेच प्रेषित मुहम्मद(स) यांच्या समक्ष असलेल्या व्यक्तींपासून ही बाब इथपर्यंत पोहोचली अथवा नाही व कीती आणि कोणत्या कथानकाद्वारे ही बाब पोहोचते. या सर्व गोष्टींचे समाधानकारक स्पष्टीकरण आवश्यक आहे. मग ज्या ज्या कथनकाराच्या माध्यमाने ही शाब्दिक व कर्मिक कथानके नंतरच्या लोकांपर्यंत पोहोचलीत त्यांच्या संपूर्ण परिस्थितीचे खोल परिक्षण केले गेले. की जेणेकरुन त्यांनी केलेल्या कथानकाची सत्यता व विश्वसनीयता पडताळणे शक्य व्हावे. अशा प्रकारे अगदी बारकाईने व काटेकोरपणे अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या जीवन प्रणालीचे व कथनांचे संकलन केले गेले व या संकलित कथनांच्या कथनकारांचा क्रम सुद्धा उल्लेखित केला गेला. तसेच कथनकारांच्या समस्त परिस्थितीवर सुद्धा ग्रंथ लिहीले गेले की ज्यांच्या मदतीने आजही आपण अंतिम प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या जीवन प्रणालीचा संशोधनात्मक अभ्यास करु शकतो. तसेच त्यांच्या कथन व कर्मातून आपल्याला मिळणार्या शिकवणीचा पण संशोधनात्मक अभ्यास करु शकतो.
 5. अशा प्रकारे दिव्य कुरआन व त्याची शिकवण देणारे अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांची प्रमाणित जीवन-प्रणाली या दोन्ही बाबी हे माहित करण्याचे विश्वसनीय साधन बनले आहे की, एकमेव ईश्वराचा धर्म मुळात काय व कसा आहे? तो कशा प्रकारचे मार्गदर्शन करतो आणि आपल्याकडून त्याच्या काय अपेक्षा, इच्छा वा मागण्या आहेत.
जर आपण अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्या पूर्वीच्या काळातील प्रेषितांच्या प्रेषित्वावर आणि दिव्य कुरआनात उल्लेख नसलेल्या प्रेषितांच्या प्रेषित्वावर अनुकरण करू शकत नाही. तरीपण जीवन जगण्याचे मार्गदर्शन आपण केवळ मात्र अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडूनच प्राप्त करु शकतो त्यांनी आणलेली ईश्वरीय शिकवण ही ईश्वरातर्फे आलेले अत्याधुनिक मार्गदर्शन आहे. त्यांच्या माध्यमाने जी ईश्वर वाणी आपल्या पर्यंत पोहोचली आहे ती अगदी शुद्ध ईश्वरवाणी आहे व यामध्ये कोणत्याही मानववाणीची किचितही भेसळ झालेली नाही. ती तिच्या मूळ भाषेत नेहमी साठी त्रिकालीय सुरक्षित आहे. तिची भाषा एक जिवंत भाषा आहे व आजसुद्धा कोटयावधी लोकांमध्ये ती बोलली, लिहिली व समजली जाते. त्या भाषेचे व्याकरण, शब्दकोष, वाक्यप्रचार, उच्चार आणि शब्दरचनेत दिव्य कुरआनाच्या अवतरणापासून आजपर्यंत किचितही बदल झालेला नाही. आत्ताच मी वर्णन केल्याप्रमाणे की, अंतिम प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवनशैली, नैतिकता, भूमिका, कथन आणि कर्म या बाबतीत पूर्ण ऐतिहासिक रेकॉर्ड कमालीचा सुरक्षित व कमालीच्या बारकाव्या सहीत सुरक्षित आहे. मुळात ही बाब इतर दुसर्या प्रेषितांना लागू होत नसल्यामुळे त्यांच्या प्रेषित्वावर आपण केवळ श्रद्धा ठेवू शकतो परंतु त्यांचे अनुकरण करु शकत नाही.
इस्लामी श्रद्धेनुसार मुहम्मद(स) चे प्रेषित्व संपूर्ण विश्वाकरीता आणि सर्वकालीन आहे. कारण की, दिव्य कुरआनात याचे स्पष्टीकरण आहे. मुहम्मद(स) हे अंतिम प्रेषित असण्याची तार्कीक मागणी आहे. कारण की जगामध्ये एका प्रेषिताच्या अंतिम प्रेषित होण्यामुळे आपोआप हे अनिवार्य होते की तो प्रेषित समस्त मानवासाठी व आपल्या नंतरच्या प्रत्येक काळासाठी मार्गदर्शक आहे. त्याच्या माध्यमाने जीवनाचे मार्गदर्शन परिपूर्ण स्वरुपात दिलेले आहे. जे की सत्य मार्गावर चालण्याकरिता आवश्यक आहे. आणि ही बाब सुद्धा त्याच्या अंतिम प्रेषित असण्याचे तार्कीक फलीत आहे. कारण की परिपूर्ण मार्गदर्शनाशिवाय जे प्रेषित पाठविले गेले असतील त्यापैकी कोणीच अंतिम प्रेषित असू शकत नाही. उलट एका प्रेषिताची गरज शेष राहतेच. तसेच ही पण एक वस्तुस्थिती आहे की मुहम्मद(स) यांच्यानंतर गेल्या चौदाशे वर्षात कोणत्याही व्यक्तीने हा दावा केला नाही की तो ईश्वरातर्फे पाठविलेला प्रेषित आहे. तसेच कोणत्या ही व्यक्तीच्या जीवनशैलीत, कार्यात वा कथनात प्रेषिताच्या कीमान दर्जाची तुलनात्मक साम्यता सुद्धा आढळून आलेली नाही. तसेच कोणीही ईश्वरीय साक्षात्कारानुसार एखादा ग्रंथ सादर करण्याचा दावा केला नाही की ज्या ग्रंथामध्ये नावापुरतेच का असेना ईश्वरीय कथानकांशी साम्य असलेली शिकवण असेल. किवा ईश्वरीय कायदा प्रदान करणारा संबोधित करता येईल.
परिसंवादाच्या या अध्यायावर हे माहित करून घेणे आवश्यक आहे की ईश्वराकडून मानवाला कोणत्या प्रकारच्या विशेष ज्ञानाची गरज आहे जे केवळ प्रेषिताच्याच माध्यमाने दिले गेले आहे. जगामध्ये एका प्रकारच्या त्या गोष्टी आहेत की ज्याचे ज्ञानार्जन आपण पंचेद्रियांद्वारे अथवा आपण तयार केलेल्या कौशल्यपूर्ण साधन सामग्री द्वारे करता येते. ह्या माध्यमाने हस्तगत केलेली माहिती प्रयोग व विचारशक्ती आणि पुराव्या मार्फत संपादन करून नवीन नवीन निष्कर्षापर्यंत पोहोचू शकतो. अशा स्वरुपाच्या बाबींचे ज्ञान ईश्वराकडून प्रेषितामार्फत घेण्याची गरज नाही. हे आपले स्वतःचे संशोधन, ज्ञानार्जनाची धावपळ, विचारशीलता व शोधाचे एक वर्तुळ आहे. आणि ते सुद्धा आपल्या निर्मात्या ईश्वराने साथ दिली तर इतिहास काळात नकळत उल्लेखासहित ईश्वराच्या निर्मित जगातून आपला परिचय देत आला आहे. ज्ञान आणि माहितीचे मार्ग आपल्या साठी खुले करीत आला आहे. व कधी कधी साक्षात्काराच्या स्वरुपात एखाद्या मानवाला एखाद्या बाबींचे मार्गदर्शन करत आला ज्यामुळे तो एखादे नवीन संशोधन अथवा नवीन प्राकृतिक कायदा शोधण्यास पात्र झाला. शेवटी हे सर्व अपूर्णच आहे. शेवटी ही मानवीय बुद्धीची मर्यादा ज्या करीता ईश्वरातर्फे प्रेषित अथवा ईश्वरीय ग्रंथ येण्याची गरज नाही. या मर्यादावर्तुळात ज्या माहिती पाहिजेत त्या माहिती मिळविण्याची साधनसामग्री ईश्वराने मानवाला प्रदान केली आहे.
दुसर्या प्रकारच्या अशा बाबी आहेत ज्या पंचेद्वियांच्या व वैज्ञानिक साधनांच्या सीमापार आहेत ज्यांचे मोजमाप आपण करू शकत नाही. तसेच आपल्या ज्ञानार्जनाच्या वैज्ञानिक साधनांद्वारे सुद्धा या बाबींसंबंधी माहिती मिळवू शकत नाही. की ज्याला ‘‘ज्ञान’’ म्हणता येईल. विचारवंत व वैज्ञानिक सुद्धा केवळ अनुमान व अंदाजापर्यंत मत व्यक्त करू शकतील. परंतु याला ‘‘ज्ञान’’ अजिबात म्हणता येणार नाही. हे अंतिम वास्तव आहे की ज्यांच्या बाबतीत पुराव्या सहीत कल्पनांना ते लोक सुद्धा विश्वसनीय म्हणू शकत नाहीत. ज्यांनी जे जे सिद्धांत मांडले आहेत आणि जर त्यांना त्यांच्या ज्ञानाच्या मर्यादांची जाणीव असेल तर ते स्वतः त्यावर श्रद्धापूर्ण विश्वास ठेवू शकणार नाहीत तसेच इतरांना पण त्यावर पूर्णपणे श्रद्धापूर्वक विश्वास ठेवण्याचा प्रचार करु शकणार नाहीत.
अर्थात हेच ते मर्यादा वर्तुळ आहे ज्यात मानव वास्तवाला जाणून घेण्याकरीता विश्व निर्मात्या ईश्वराने प्रदान केलेल्या ज्ञानावर अवलंबून आहे. आणि ईश्वराने कधीच हे ज्ञान अशाप्रकारे प्रदान केलेले नाही की कोणी एखाद्याने ग्रंथ छापून एकेकाच्या हातात दिले असेल व त्याला सांगितले असेल की या ग्रंथाचा अभ्यास करून स्वतःच जाणून घ्या की विश्वाची व तुझी स्वतःची वास्तविकता काय आहे. तसेच या वास्तवानुसार तुझी भुमिका अथवा जीवन शैली कशी असेल. म्हणून या ज्ञानविशेषाला मानवापर्यंत पोहोचविण्या करीता ईश्वराने नेहमीच प्रेषितांना माध्यम बनविले आहे. आणि त्यांना या कार्यावरच नियुक्त केले की हे ज्ञानविशेष त्यांनी मानवा पर्यंत पोहोचवावे.
प्रेषितांची जवाबदारी कार्य व कर्तव्य केवळ एवढ्या पुरतेच मर्यादित नाही की त्यांनी केवळमात्र वास्तवाचे व सत्याचे ज्ञान समस्त जणांना द्यावे. या व्यतिरिक्त हे सुध्दा निदर्शणास आणावे की या ज्ञानविशेषानुसार ईश्वर, मानव आणि मानवा-मानवा दरम्यान कोणते वास्तविक संबंध असावेत. हे ज्ञानविशेष कोणत्या प्रकारच्या श्रद्धा, भक्तीप्रथा, नैतिकता व तसेच संस्कृती नियमांची मागणी करते. त्याच प्रमाणे या ज्ञानविषेशानुसार सामाकिडता आर्थिकता, वित्त व्यवहार राजनितीक, न्यायालय, युद्ध तह, अंतर्राष्ट्रीय संबंध अर्थात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील सर्व बाबी कोणत्या नियमानुसार असाव्यात. प्रेषित केवळ एकच भक्ती व प्रथा घेऊन येत नाही ज्याना प्रचलित भाषेत धर्म संबोधले जाते. या उलट प्रेषित एक परिपूर्ण जीवन व्यवस्था घेऊन येतो. ज्याचे नाव इस्लामी अर्थाने ‘‘दीन’’(जीवन मार्ग) असे आहे.
प्रेषिताची चळवळ ही केवळ ‘दीन’ अर्थात जीवन मार्गाचे ज्ञानविशेष लोकांपर्यंत पोहोचविण्या पर्यंतच मर्यादित नसून प्रेषिताने सादर केलेल्या ‘दीन’(जीवनमार्ग) स्वीकृत केलेल्या ईश्वराच्या दासांना या सत्य मार्गाची शिकवण देणे, त्यांची श्रद्धा व ईश्वरावरील वास्तविक विश्वास, नैतिकता, भक्तींच्या प्रथा, ईश्वरीय वैधानिक आदेश, तसेच एकूण जीवन व्यवस्था वगैरे ची शिकवण देणे, आणि या संपूर्ण शिकवणी नुसार स्वतःला एक आदर्श मुस्लिम बनून दाखविणे, की जेणे करून मानवाने प्रेषितांच्या जीवन शैलीचे अनुकरण करावे. व मानवांना वैयक्तिक आणि सामुहिक प्रशिक्षण देऊन एका खर्या खुर्या इस्लामी संस्कृती व सभ्यतेकरीता वास्तविकरित्या तयार करावे. त्याच प्रमाणे त्यांना शिस्त बद्ध संघटित करून एका अशा स्वच्छ समाजाची निर्मिती करावी की या संघटित समाजा मार्फत ईश्वरीय धर्म(अर्थात दीन) कार्यीत्मकरित्या प्रस्थापित करण्याचा जीवतोड प्रयत्न व्हावा आणि शेवटी ईश्वरीय सुत्रांस विजय प्राप्त होऊन इतर कृत्रीम व अवास्तव सुत्र नष्ट व्हावे. काही प्रेषित या चळवळीस यशस्वीतेच्या अंतिम टप्प्या पर्यंत पोहोचविण्यात अयशस्वी झाले. व बरेचसे प्रेषित काही कारणास्तव अथवा द्वेष व मत्सर बाळगणार्या लोकांच्या अहंकारी विरोधामुळे तसेच विरुद्ध व खडतर परिस्थिती मुळे या चळवळीला अयशस्वीचे स्वरूप देण्यात असमर्थ ठरले. ही बाब वेगळी परंतु हे मात्र निश्चित त्रिकाल सत्य आहे की सर्वच प्रेषितांची चळवळ मात्र हीच होती. मात्र प्रेषित मुहम्मद(स) यांचे हे वैशिष्टय इतिहासात अगदी स्पष्ट आहे की त्यांनी ईश्वरीय शासन भूतलावर नेमके तसेच स्थापन करून दाखविले जसे आकाशात ईश्वराचे शासन प्रस्थापित आहे.
दिव्य कुरआनचे सुरूवातीपासुन ते शेवटपर्यंत अध्ययन केल्यास आणि प्रेषित मुहम्मद(स) यांच्या भाषणांच्या व संवादाच्या संपूर्ण रेकॉर्ड चे अध्ययन केल्यास कुठेही आपल्या निदर्शनास येणार नाही की या ईश्वरीय ग्रंथाने, व त्याला सादर करणार्या प्रेषिताने एखाद्या विशेष राष्ट्राला अथवा विशेष समाजाला किवा विशिष्ट वंशीय व वर्णिय अथवा विशिष्ट जमातीलाच तसेच विशिष्ट भाषा बोलणार्यांनाच संबोधित केलेले आहे. प्रत्येक ठिकाणी त्याने(म्हणजे ईश्वराने) ‘‘या बनी आदम’’ म्हणजे ‘‘हे आदमची संतती’’(अर्थात समस्त मानवजाती) किवा ‘‘या अय्युन्नास’’ म्हणजे ‘‘हे मानवांनो’’ अशा संबोधांनी समस्त मानव जातीलाच ‘‘इस्लाम’’ चा स्वीकार करण्याची हाक दिली. किवा ज्यांनी ईश्वरासमोर आत्मसमर्पण केले.(अर्थात इस्लामचा स्वीकार केला) त्यांना सत्मार्गाचे आदेश आणि मार्गदर्शन करण्यासाठी ‘‘या अय्युहल लजीना आमनू’’ म्हणजे ‘‘हे लोकहो, ज्यांनी ईश्वरावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवला.’’ अशा संबोधनांनी संबोधित केले. या मुळे ही गोष्ट आपोआपच सिद्ध होते की, ‘इस्लामची’ ही चळवळ वर उल्लेखल्या प्रमाणे कोण्या विशिष्ट राष्ट्र समाज, वंश, वर्ण व भाषा बोलणार्या पर्यंतच मर्यादित नसून ती विश्वव्यापी आहे. आणि ज्याने या इस्लामी चळवळीस स्वीकारून इस्लामचा स्वीकार केला तो समाज अधिकारासहीत समान दर्जाचा मोमिन असणार. दिव्य कुरआनात ईश्वराने फर्मावले आहे की ‘‘ज्या मानवांनी ईश्वरावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवून इस्लामचा स्वीकार केला. ते सर्व आपसात बंधू आहेत. प्रेषित मुहम्मद(स) यांनी फर्माविले की ज्या लोकांनी इस्लामचा अंगीकार केला व मुस्लिमाप्रमाणे कार्य प्रणाली अंगीकारली त्यांचे अधिकार व कर्तव्य व आमचे अधिकार व कर्तव्य अगदी समान आहेत. याहुन अधिक स्पष्टपणे प्रेषित मुहम्मद(स) यांनी सांगितले की ‘‘लक्षपूर्वक ऐका की आपणा सर्वांचा पालनकर्ता एकच आहे आणि आपणा सर्वांचा पिता(अर्थात आदम) सुद्धा एकच आहे. कोणत्याही अरब वंशजाला अरबेतर वंशजावर श्रेष्ठत्व प्राप्त नाही. कोणत्याही गैर अरबी वंशजाला अरबवंशजावर श्रेष्ठत्व प्राप्त नाही. कोणी गौर वर्णीय कृष्ण वर्णीया पेक्षा श्रेष्ठ नाही व कोणताही कृष्ण वर्णीय गोर्या वर्णीयापेक्षा श्रेष्ठ नाही. श्रेष्ठत्व हे केवळ सत्मार्गावर चालणार्यांना प्राप्त आहे. तुमच्या पैकी सर्वश्रेष्ठ ती व्यक्ती आहे जी सर्वात जास्त सन्मार्गी आहे.
इस्लाम चा पाया ज्या वैचारिक श्रद्धांवर आधारित आहे त्यात सर्वात जास्त व सर्वात प्रथम महत्वाची श्रद्धा अगर विश्वास म्हणजे एकट्या ईश्वरावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवणे होय. आणि ते सुद्धा एवढ्यावरच नाही की ईश्वराचे अस्तित्व आहे व एवढ्यावरच नाही की तो एकच आहे. तर या गोष्टीवर सुद्धा अपार श्रद्धापूर्वक विश्वास आवश्यक आहे की ईश्वर हा एकटाच या समस्त विश्वाचा अथवा ब्रह्मांडाचा निर्माता, मालक, शासक, व्यवस्था लागू करणारा आहे. केवळ आणि केवळ त्याच्या एकट्याच्याच इच्छेमुळे हे ब्रह्मांड उभे आहे व अस्तित्वात आहे. तसेच कार्यरत आहे. या ब्रह्मांडाच्या प्रत्येक वस्तूला लागणार्या इंधन आणि उर्जा केवळ तो एकटाच पुरवितो. एका अती उच्च व असामान्य शासकाचे संपूर्ण गुणधर्म केवळ त्या एकमेव ईश्वरातच आढळतात. आणि इतर कोणीही त्या मध्ये कणभर सुद्धा सामिल नाही. ईश्वरीय गुणधर्म केवळ त्या एकट्या ईश्वरातच आहेत. आणि या गुणधर्मापैकी एकही गुणधर्म त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणातच नाही. समस्त ब्रह्मांडाला व त्यातील एकन एक प्रत्येक बाबीवर त्याची एकाच वेळी नजर आहे व त्याने त्याच्या दृष्टीत सर्वांना ठेवलेले आहे. तसेच प्रत्येक बाबी व घटनांचे त्याला प्रत्यक्षपणे ज्ञान आहे आणि हे ज्ञान सुद्धा त्रीकालीय(भूत, वर्तमान व भविष्य) आहे. हे सर्व समावेशक अपार ज्ञान त्याच्या व्यतिरिक्त कोणालाच नाही. त्याचे असामान्य व अबाधित अस्तित्व नेहमी पासून आहे व नेहमी पर्यंत राहणार, त्याच्या व्यतिरिक्त सर्वच्या सर्व नष्टप्राय आहेत व स्वतः आपणहून जीवंत आणि बाकी राहणारा तो एकटाच आहे. तो कुणाची संततीही नाही व त्याने कोणालाही त्याच्या उदरातून जन्म दिलेला नाही. त्याच्या अस्तित्वाशिवाय जगामध्ये जे काही आहे ते त्याचीच निर्मिती आहे. व जगामध्ये कुणाचीही एवढी लायकी व पात्रता नाही की कोणत्याच अर्थाने विश्वाचा पालनकर्त्या चा सह वंश(सहजातीय) किवा त्याची संतती वा पुत्र किवा पुत्री म्हटली जावी. केवळ मात्र तोच मानवाच्या दास्यत्वास पात्र आहे. इतर कोणालाच त्याच्या या पात्रतेत सामिल करणे सर्वात मोठे पाप व दगाबाजी आहे. तो एकटा मानवांच्या प्रार्थना ऐकूण सर्वांच्या मनोकामनांची पूर्तता करण्याचे वा न करण्याचे अधिकार सुरक्षित ठेवतो. त्याच्या समोर आपल्या गरजपुत्रतेसाठी प्रार्थना न करणे म्हणजे विनाकारण अहंकार बाळगणे होय. त्याच्या व्यतिरिक्त इतरासमोर कामनापुर्तींची प्रार्थना करणे म्हणजे घोर अज्ञान व मार्गभ्रष्टता आहे. तसेच ईश्वराबरोबर दुसर्यांशीही प्रार्थना करणे सुद्धा ईश्वरत्वामध्ये इतीश्वराला सामिल करण्याचे महापाप करणे आहे.
इस्लाम धर्माच्या अनुसार ईश्वरीय शासन हे केवळ चमत्कारिक नसून राकडीय आणि वैधानिक सुद्धा आहे. तसेच या शासनात एकमेव ईश्वराशिवाय कोणाचाही सहभाग नाही. त्याच्या निर्मित भूतलावर व त्याच्या निर्मित दासांवर त्याच्या शिवाय कोणालाच आदेश देण्याचा अधिकार नाही. मग तो कोणी सम्राट असो, शाही परिवार असो किवा अधिकारी वा शासकीय वर्ग असो अथवा अशी लोकशाही व्यवस्था असो जी लोकशासनाची समर्थक आहे. त्याच प्रमाणे जो स्वयंभूत शासक असतो तो पण बंडखोर असतो. आणि ईश्वराच्या दास्यत्वास सोडून इतरांचे दास्यत्व करतो तो पण बंडखोर आहे. तसेच ती व्यक्ती अथवा संस्था जी राकडीय आणि वैधानिक शासन आपल्या करीता दास्यत्वास पात्र समजून ईश्वरीय अधिकाराच्या मर्यादांना व्यक्तीगत कायदा किवा धार्मिक आदेशापर्यंत मर्यादित समजते, ती सुद्धा बंडखोर आहे. एकूण वास्तविकरित्या त्याच्या भूतलावर निर्माण केलेल्या संपूर्ण मानवांसाठी ‘‘शरियत’’(ईश्वरीय कायदा) प्रदान करणारा त्याच्या शिवाय कोणीच नाही. व असूही शकत नाही. व कोणालाही त्याच्या सर्वोच्च अधिकाराला चेतावणी देण्याचा किवा आव्हान करण्याचा अधिकार नाही.
इस्लामने दिलेल्या ईश्वराच्या कल्पनेनुसार काही बाबी आपोआप स्पष्ट होतात. त्या म्हणजे
 1. फक्त एकमेव ईश्वरच एकटा समस्त मानवजातीच्या भक्तीस व दास्यत्वास पात्र आहे. त्याच्या शिवाय इतर कोणा मध्येच ही पात्रता नाही की मानवाने त्याची पूजा अथवा भक्ती करावी. तसेच दास्यत्व पत्करावे.
 2. तोच एकटा संपूर्ण विश्वात असलेल्या शक्तींचा स्वामी आहे आणि मानवांच्या प्रार्थना याचना व मागण्या पूर्ण करण्याचा व न करण्याचा पूर्ण अधिकार त्याला एकट्यालाच आहे. करीता मानवाने अनिवार्यतः केवळ त्याचीच प्रार्थना करावी व मानवाने याची कल्पना सुद्धा करू नये की त्याने ईश्वरेतर कोणतीही व्यक्ती अथवा शक्ती त्याची प्रार्थना स्वीकारून त्याच्या मागण्या पूर्ण करतील.
 3. एकमेव एकटा ईश्वरच मानवाच्या नशीबाचा अथवा दैवाचा चा स्वामी आहे. आणि इतर कोणामध्ये पण एवढी ऐपत व लायकी नाही की त्याला मानवाचे नशीब बनविता किवा बिघडविता येईल. करीता मानवाची आशा व निराशा अथवा भय दोन्ही ईश्वराशीच संबंधीत आहे. तेव्हा मानवाने केवळ आपल्या आशा ईश्वराशीच संबंधीत ठेवाव्या व त्याच्या शिवाय इतर कोणाचीही भिती बाळगू नये.
 4. एकमेव एकटा ईश्वरच मानव व त्याच्या सभोवतालच्या जगाचा निर्माता व स्वामी आहे. म्हणून मानवाची वास्तविकता व समस्त विश्वाच्या वस्तुस्थितीचे प्रत्यक्ष संपूर्ण ज्ञान केवळ त्यालाच आहे व असणार तेव्हा तोच जीवनाच्या गुंतागुंतीच्या मार्गात मानवाचे खर्या अर्थाने मार्गदर्शन करू शकतो आणि जीवन जगण्याचा वास्तविक कायदा प्रदान करू शकतो.
 5. मग ज्या अर्थी एकमेव ईश्वरच मानवांचा व भूतलाचा आणि विश्व व त्यामधील प्रत्येक वस्तूंचा निर्माता व स्वामी आहे त्या अर्थी मानवावर इतर कोणत्याही व्यक्तीस व स्वयं मानवास शासन करण्याचा अधिकार असणे हे सत्त्यास नाकारणेच आहे. व याच प्रमाणे मानवाची स्वतःची स्वतःहून विधीनिर्माता बनने किवा इतर व्यक्ती अथवा संस्थांचे विधीनिर्मितीचे अधिकार स्वीकृत करणे सुद्धा याच प्रकारात मोडतात. ईश्वर निर्मित भूतलावर स्वतः ईश्वराने केलेल्या निर्मितीचा स्वामी आणि विधी निर्माता केवळ मात्र एकमेव ईश्वरच असू शकतो. तसेच
 6. सर्वोच्च शासनाचा वास्तविक स्वामी ईश्वरच असल्यामुळे, त्याचाच कायदा हा सर्वोच्च कायदा आहे. व मानवा करीता विधीनिर्मिती चा अधिकार केवळ मात्र ईश्वराच्या सर्वोच्च कायदयाच्या मर्यादा कक्षेत आहे अथवा त्याने प्रदान केलेल्या परवानगीच्या कक्षेत आहे.
या ठिकाणी आपल्या समोर इस्लाम धर्माच्या दूसर्या महत्वाच्या पायाभूत श्रद्धेचा उल्लेख येतो आणि ती म्हणजे प्रेषितावर श्रद्धा. प्रेषित अशी व्यक्ती आहे जिच्या मार्फत ईश्वर ईश्वरीय कायदा मानवास प्रदान करतो. हा कायदा आपल्याला दोन प्रकारच्या स्वरूपात प्राप्त होतो. पहिले स्वरुप म्हणजे ‘ईश्वर वाणी’ जी शब्दन शब्द प्रेषितावर अवतरीत झाली. अर्थातच ‘दिव्य कुरआन’. दुसरे स्वरुप म्हणजे ईश्वरीय आदेशा व इच्छेनुसार प्रेषिताचे कथन व कार्य आणि सत्वर्तनाचे आदेश व दुर्वतनापासुन परावृत्त होण्याचे आदेशानुसार जे प्रेषिताने आपल्या अनुयायांना ईश्वरीय मार्गदर्शनानुसार दिलेत. यालाच सुन्नत म्हणजे प्रेषिताची जीवन प्रणाली म्हणतात. त्या विश्वासपूर्ण श्रद्धेचे महत्व हे आहे की जर हे द्वितीय स्वरुप अर्थात सुन्नत नसेल तर ईश्वरावरील श्रद्धा ही केवळ एक सैद्धांतिक विचार व कल्पनाच राहणार. उदाहरणार्थ जी ‘बाब’ ईश्वर भक्तीच्या श्रद्धेला एक संस्कृती, सभ्यता व एक जीवन व्यवस्थेचे स्वरुप व आकार देते अर्थात ती ‘बाब’ म्हणजे प्रेषिताची वैचारिक आणि कार्यात्मक मार्गदर्शन आहे. याच्याच माध्यमाने आपल्याला कायदा प्राप्त होतो. आणि प्रेषित या कायद्यानुसार जीवन व्यवस्था प्रस्थापित करतो. म्हणूनच एकेश्वरवादानंतर प्रेषित्वावर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवल्या खेरीज कोणीही वास्तविक व खर्या अर्थाने ‘मुस्लिम’ होऊच शकत नाही.
इस्लाम धर्मात प्रेषिताचा दर्जाचे इतक्या स्पष्ट स्वरुपात वर्णन केले गेले आहे की आपण सहजरित्या व पूर्णपणे समजू शकतो की प्रेषित काय आहे व काय नाही.
प्रेषित हा मानवाला प्रेषिताचा दास बनविण्याकरिता आलेला नसून एकमेव ईश्वराचा दास बनविण्याकरीता आलेला आहे. आणि प्रेषित स्वतः सुद्धा स्वतःला ईश्वराचाच दास म्हणतो. इस्लामी प्रार्थनेत(नमाज मध्ये) सतरा वेळा ‘साक्ष वाणी’ उच्चारण्याची वा पठन करण्याची जी शिकवण प्रेषित मुहम्मद(स) यांनी मुस्लिमांना दिली आहे त्या मध्ये अनिवार्यतः हे उच्चारणे आवश्यक आहे की, ‘‘मी साक्ष देतो की मुहम्मद(स) ईश्वराचे दास आणि प्रेषित आहे. दिव्य कुरआन नुसार ही बाब अगदी स्पष्ट आहे की प्रेषित केवळ मात्र एक मानव आहे आणि ईश्वरीय अंशात कणभर ही त्याचा सहभाग नाही. तो परम मानव सुद्धा नाही. सर्व मानवीय गुणधर्म त्याच्यात आढळतात. तसेच ईश्वरीय संपत्तीचा स्वामी पण नाही व त्याला अज्ञात बाबींचे ज्ञान पण नाही की ईश्वराप्रमाणे प्रत्येक दृष्य व अदृष्य बाबींचे ज्ञान असावे. किबहुना तो इतरांना स्वयंशक्तीने लाभ व नुकसान पोहोचविणे तर सोडाच स्वतःला लाभ व नुकसान पोहोचविण्याचे त्याला अधिकार नाहीत. त्यांची जबाबदारी ही केवळ ईश्वराचे संदेश मानवापर्यंत पोहोचविणे एवढीच आहे. त्याच्या अख्त्यारित कोणाला सत्यमार्गावर आणणे नसुन व सत्यमार्ग नाकारणार्यांचा हिशोब पुरता करणे व त्यांच्यावर शाप अवतरीत करणे पण नाही. प्रेषिताने स्वतः सुद्धा ईश्वरीय आदेशांचे उल्लंघन केल्यास किवा स्वतः तर्फे एखादी गोष्ट तयार करुन ईश्वरीय संदेशात दाखल केल्यास किवा ईश्वरीय संदेशात किचीतही बदल करण्याची हिम्मत केल्यास ईश्वरीय प्रकोपापासून तो वाचू शकत नाहीत. तर मग प्रेषित मुहम्मद(स) सुद्धा प्रेषितांपैकीच आहेत आणि प्रेषित्वापेक्षा जास्त कोणत्याही अधिकाराचे स्वामी नाहीत. ते आपल्या अख्त्यारीने आणि अधिकाराने कोणत्याही बाबीस वर्ज्य अथवा अवर्ज्य घोषित करू शकत नाहीत. किवा दुसर्या शब्दात ईश्वरीय इच्छे शिवाय स्वतः विधी निर्मिती करण्याचा त्यांना कणभर ही अधिकार नाही. त्यांचे कार्य केवळ मात्र ईश्वरातर्फे अवतरीत झालेल्या आदेशांचे काटेकोर पालन करणे आहे.
अशा प्रकारे इस्लामी शिकवणीने अशा संपूर्ण अतिशयोक्ती पासून मानव जातीला सुरक्षित केले आहे. ज्या अतिशयोक्ती प्रेषित मुहम्मद(स) यांच्या पूर्वीच्या प्रेषितांच्या अनुयायांनी आपल्या धार्मिक नेत्यांच्या पुढारपणांच्या फायद्यासाठी केल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्यांना ईश्वराचा दर्जा दिला, किवा त्यांना ईश्वराचा वंशज किवा ईश्वराची संतती अथवा ईश्वराचा अवतार सुद्धा घोषित केले. अशा प्रकारे संपूर्ण अतिशयोक्तींच्या अतिरेकापासून मानवाला सुरक्षित केले व प्रेषिताचा मूळ दर्जा वर्णन केला तो असा आहे.
प्रेषितावर ईमान(श्रद्धा पूर्वक विश्वास) ठेवल्या शिवाय कोणीही व्यक्ती मोमीन(श्रध्दाळू) होऊ शकत नाही. जी व्यक्ती प्रेषितांचे आदेशांचे पालन करते ती मुळात एकमेव ईश्वराच्याच आदेशाचे पालन करते. कारण की ईश्वराने प्रेषित यासाठीच पाठविले की प्रेषिता मार्फत ईश्वरीय आदेशाचे पालन केले जावे. सत्य मार्गदर्शन केवळ त्यालाच लाभू शकते जो प्रेषिताच्या आदेशाचे पालन करतो. अर्थात प्रेषित ज्याचे आदेश देईल त्याचे पालन करावे व ज्या बाबींपासून परावृत्त ठेवील त्यापासून परावृत्त व्हावे.(या सल्याचे स्पष्टीकरण स्वतः प्रेषित मुहम्मद(स) यांनी अशा प्रकारे केले की ‘‘मी एक मानव आहे. ईश्वरीय धर्माच्या बाबतीत जे आदेश मी तुम्हाला देत आहे त्याचे पालन करा. व जी गोष्ट मी स्वतःच्या मतानुसार सांगतो त्या बाबतीत तर मी पण मानव आहे. तुम्हाला तुमच्या व्यवहारिक बाबी माझ्या पेक्षा चांगल्या प्रकारे ज्ञात आहेत.) प्रेषित मुहम्मद(स) यांची जीवन प्रणाली मुळात दिव्य कुरआनच्या इच्छेचे वर्णन आहे. आणि हे वर्णन दिव्य कुरआनचा निर्माता स्वतः ईश्वराने त्यांना स्वतः शिकविले आहे. करीता प्रेषित मुहम्मद(स) यांनी केलेले दिव्य कुरआनचे वर्णन ईश्वरीय प्रमाणपत्रीत आहे. म्हणून कुरआनच्या मुळ वर्णनापेक्षा किचितही वेगळे वर्णन करण्याचा कोणालाच कवडीचा पण अधिकार नाही. ईश्वराने प्रेषिताच्या जीवन प्रणालीस मानवाकरिता एक नमुना(व प्रमाण) ठरवून दिले आहे. कोणतीही व्यक्ती मोमिन(इस्लामचा खरा अनुयायी) होऊच शकत नाही जो पर्यंत प्रेषित मुहम्मद(स) चा निर्णय मान्य करीत नाही. मुस्सिलमांचे हे काम नाही की ज्या बाबतीत ईश्वराने व प्रेषिताने जो निर्णय दिला त्या निर्णयास सोडून स्वतः एखादा निर्णय घेण्याचा अधिकार प्रस्थापित करावा.
वर उल्लेखलेल्या विश्लेषणात ही बाब स्पष्ट होते की एकमेव ईश्वराने प्रेषितामार्फत मानवाला केवळ सर्वोच्च विधी प्रदान केलेला नसून कायम स्वरूपी मुल्ये पण प्रदान केली आहेत. दिव्य कुरआनात व प्रेषित मुहम्मद(स) च्या जीवन प्रणालीत ज्या बाबी मानव हितास फायदेशीर ठरविल्या आहेत त्या कायम स्वरुपी भल्या व फायदेशीरच राहणार. ज्या बाबी अनिवार्य ठरविल्या गेल्या त्या नेहमीसाठी अनिवार्यच असणार. ज्या बाबी अनैतिक ठरविल्या गेल्या त्या कायम स्वरूपी अनैतिकच ठरणार! या ईश्वर निर्मित कायद्यामध्ये कसलीच सुधारणा अथवा कमतरता करण्याचा कोणालाच अजिबात अधिकार नाही. ही गोष्ट मात्र वेगळी की कोणी व्यक्ती अथवा समूह इस्लाम धर्मच सोडण्याची इच्छा बाळगत असेल! परंतु जो पर्यंत कोणी व्यक्ती वा समूह मुस्लिम आहे त्यांच्यासाठी हे कधीच शक्य नाही की कालपर्यंत ज्या बाबी घातक होत्या त्या आज फायदेशीर व उद्यापरत घातक ठरविल्या जातील. कोणतेही तार्कीक अनुमान व सामुहिक संमतीने घेतलेले निर्णय अशा प्रकारचे परिवर्तन करण्याचा अधिकार ठेवू शकत नाही.
इस्लामची तीसरी मुलभूत श्रद्धा म्हणजे ‘‘परलोक’’ होय आणि याचे महत्व हे आहे की परलोकावर विश्वास न ठेवणारा ‘मुस्लिम’ कधीच असू शकत नाही. मग तो ईश्वर, प्रेषित, कुरआन वर विश्वास ठेवणारा का असेना. तो काफिर(सत्य नाकारणारा) आहे. ही भावना अर्थातच परलोकांवर विश्वास स्वरुपात सहा सिद्धांतावर आधारित आहे.
 1. जगामध्ये मानवाला गैर जबाबदार म्हणून सोडून दिले गेलेले नसून आपल्या निर्माणकर्त्या ईश्वरासमोर आपल्या बर्यावाईट कर्माचा जाब द्यावाच लागेल. जगातील वर्तमान जीवन मुळात मानवाची परिक्षा व कसोटी आहे. करिता हा परिक्षा काळ संपल्यावर त्याला त्याच्या जीवन कर्माचा हिशोब ईश्वरासमोर द्यावाच लागणार आहे.
 2. या कर्मपरिक्षणा करिता ईश्वराने एक वेळ निश्चित केली आहे. मानवजातीला जगामध्ये कर्म करण्यासाठी जेवढी मुद्दत देण्याचा ईश्वराने निर्णय घेतला आहे त्या मुदतीच्या अंतीम क्षणी जग नष्ट होईल. त्या वेळी जगाचे वर्तमान नष्ट करण्यात येईल आणि एक दुसरी व्यवस्था नवीन प्रणाली नुसार सुरु करण्यात येईल. या नवनिर्मित जगामध्ये वर्तमान जगाच्या सुरुवातीपासून शेवट पर्यंत जन्मलेल्या समस्त मानवांना पुनर्जिवीत करून ईश्वरासमोर हजर केले जाईल.
 3. त्यावेळी या समस्त मानवांना एकाच वेळी विश्वाच्या स्वामी अर्थात ईश्वराच्या न्यायालयात हजर केले जाईल. व तेथे प्रत्येक मानवास आपल्या कर्मांचा जाब द्यावा लागेल. जे त्याने स्वतः आपल्या जबाबदारीवर जगामध्ये केले होते.
 4. त्यावेळी ईश्वर न्यायाच्या सर्व अटी पूर्ण करून स्वज्ञानाने न्याय दान करील. प्रत्येकाच्या जीवनकर्माचा संपूर्ण रेकॉर्ड ईश्वराच्या सर्वोच्च न्यायालयात सादर केला जाईल आणि अनेक प्रकारच्या साक्षी त्याच्या गुप्त व दृष्य कर्माच्या पुराव्यासाठी तसेच त्याच्या अंतःकरणातील विचारा करीता असतील.
 5. ईश्वराच्या न्यायालयात कोणत्याच प्रकारची लाच, निरर्थक शिफारस व वशीलेबाजी अथवा वास्तवा विरुद्ध वकीली चालणार नाही. कोणाचेच ओझे दुसर्यावर लादले जाणार नाही. कोणीही निकटवर्तीय, नातेवाईक, मित्र अथवा नेता किवा धार्मिक पुढारी वा तथाकथीत पालनकर्ता कोणाच्याच मदतीला पुढे सरसावणार नाही. त्या ठिकाणी मानव अगदी एकटा कोणाचीही मदत व सहकार्य नसलेल्या अवस्थेत उभा आपल्या बर्यावाईट कर्माचा जाब देत असेल आणि अंतीम निर्णय केवळ मात्र एकमेव ईश्वराच्याच अधिकारात असेल.
 6. अंतीम निर्णय यावरच अवलंबून आहे की मानवाने जगामध्ये प्रेषिताने दाखविलेल्या सत्याचा मार्ग स्वीकारून आणि परलोकात आपल्या कर्माचा जाब देण्याची जाणीव ठेवून व्यवस्थित एकमेव ईश्वराचे दास्यत्व केले अथवा नाही. केले असेल तर त्याच्या करीता स्वर्ग आणि नसेल केले तर त्याच्या करीता यातनामय नरक असणार.
हा श्रद्धापूर्ण विश्वास तीन प्रकारच्या माणसांच्या जीवन प्रणालींना एक दुसर्या पासून विभक्त करतो. एका प्रकारचे मानव असे आहेत जे परलोकावर विश्वास ठेवित नाहीत आणि केवळ वर्तमान जगातील जीवनालाच संपूर्ण जीवन समजतात. ते साहजीकच चांगल्या व वाईटाचे प्रमाण कर्माच्या त्या फळांनाच समजतात जी फळे जगामध्ये प्रकट होत असतात. या ठिकाणी ज्या कर्माचे फळीत चांगले व लाभदायक मिळतील तेच कर्म त्यांच्या नुसार चांगले व ज्या कर्मांचे फलीत घातक मिळतील तेच कर्म त्यांच्या नुसार, वाईट असतील. एवढेच नाही तर कीत्येकदा असे घडते की एकाच कर्माचे फलीत एकदा चांगले व दुसर्यांदा घातक होत असते. दुसर्या प्रकारचे ती माणसे आहेत जे परलोकांवर श्रद्धा व विश्वास ठेवतात परंतु त्यांना गैरसमज होतो की कोणाची तरी शिफारस ईश्वराच्या न्यायालयात त्यांना तारू शकेल. किवा त्यांच्या कुकर्माचे दंड यापुर्वीच कोणीतरी भरलेला आहे. किवा ते ईश्वराचे लाडके आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्या मोठमोठ्या अपराधांची शिक्षा अगदीच कीरकोळ स्वरुपात मिळेल. अशा प्रकारच्या गैरसमजुती परलोकावर श्रद्धा असण्याच्या संपूर्ण नैतिक फायद्यांना नष्ट करतात. व दुसर्या प्रकारच्या लोकांना सुद्धा पहिल्या प्रकारच्याच लोकांच्या रांगेत उभे करतात. तिसर्या प्रकारची ती माणसे आहेत. जी इस्लामने सादर केलेल्या स्वरुपातील परलोकांवरील श्रद्धा ठेवतात आणि कोणत्याही गैर समजुतीला बळी न पडून(उदाहरणार्थ आपल्या कूकर्माचा दुसर्याने दंड दिला, अथवा निरर्थक शिफारस किवा ईश्वराचे आम्हीच लाडके वगैरे) इस्लाम च्या अनुसार परलोकावर विश्वास ठेवून सन्मार्गाने वागतात. अशा माणसांकरीता परलोकावरील हा विश्वास एक प्रचंड नैतिक शक्ती प्रदान करतो. ज्या माणसाच्या अंतःकरणात परलोकाविषयी दृढ विश्वास आपल्या मूळ स्थितीत अस्तित्वात असतो त्याची स्थिती अशी असते जसे प्रत्येक क्षणी त्याच्या सोबत एक पाहरेकरी आहे जो त्याच्या प्रत्येक अपराधीक भावनावर अंकुश ठेवतो व प्रत्येक दुष्कर्मावर त्याला समज देतो. मग त्याच्यावर अंकुश ठेवणारे पोलिस साक्ष देणारे साक्षीदार, शिक्षा देणारे न्यायालय आणि निषेध करणारे जनमत असो वा नसो. त्याच्या आत मध्ये एक कठोर परिक्षक प्रत्येक क्षणी बसलेला असतो. ज्याच्या भितीपोटी तो कधीही एकांतात, जंगलात किवा अंधारात ईश्वराने निश्चित केलेल्या कर्तव्यास पाठ दाखविणार नाही व अपराध करण्याचे धाडस करणार नाही. आणि जरी अपराध घडलाच तर त्याला कमालीचा पश्चात्ताप होईल व यापुढे कधीही हे अपराध न करण्याचा ठाम निश्चय करील व तोबा(क्षमायाचना) करील. नैतिक सुधारणा करण्याचा व मानवांमध्ये एक स्थिर आचरण व सदाचरण निर्माण करण्याचा या पेक्षा जास्त उत्तम आणि यशस्वी मार्ग दुसरा कोणताच नाही. ईश्वराचा सर्वोच्च कायदा जो मानवाला कायमस्वरूपी मुल्य प्रदान करतो व त्यावरच मानवाची तठस्थरित्या न हलता व न डगमगता कायम राहण्याची भीस्त याच श्रद्धेवर आहे आणि म्हणूनच इस्लाम अर्थात या परलोकांवरील विश्वासाला एवढे महत्व आहे की ते नसेल तर ईश्वर व प्रेषितावर विश्वास असूनही निरर्थक आहे.
पॅरेग्राफ क्र. ६ मध्ये वर्णन केल्या प्रमाणे ‘इस्लाम’ एक परिपूर्ण संस्कृती व सभ्यता आणि एक कायम स्वरुपी जीवन व्यवस्था आहे. तसेच मानवीय जीवनाच्या प्रत्येक ठिकाणी नैतिक मार्गदर्शक आहे. म्हणून याची नैतिकता वास्तविक सामाकिड जीवनापासून दूर पळणार्या गिरीजन वासियांसाठी, वैराग्यासाठी आणि संन्यासांकरिता नसून अशा लोकांसाठी आहे जे व्यावहारिक जीवनाच्या विविध जबाबदार्या सांभाळतात व काम करतात. नैतिकतेची उच्च मुल्ये या जगातील लोक आश्रम, एकांतवास, वैराग्य अशा ठिकाणी शोधत असतात. परंतु इस्लाम माणसांना व्यवहारिक जीवनाच्या मूळ प्रवाहात सामिल करू इच्छितो. इस्लामचा मुळातच हेतु असा की, शासनकर्ते, राज्यांचे राज्यपाल, न्यायालयांचे न्यायाधिश, लष्कर आणि पोलिस अधिकारी, लोकसभेचे सभासद, वित्त आणि उद्योगांचे संचालक, कॉलेज, महाविद्यालये व विद्यापिठांचे शिक्षक व विद्यार्थी, पाल्यांचे पालक, पालकांची पाल्ये, मुलांचे पिता व पितांची मुले, पत्नींचे पती आणि पतींच्या पत्नी, शेजार्यांचे शेजारी, कामगारांचे मालक व मालकांचे नोकर एकूण सर्वांनीच या नैतिकतेची मुल्ये जपावी. आणि गल्लीबोळात व बाजारात अर्थात प्रत्येक व्यवहारात प्रत्येक ठिकाणी जपली जावी. इस्लाम इच्छितो की व्यवहाराचे प्रत्येक क्षेत्र व शासनाच्या प्रत्येक क्षेत्रात व विभागात याचे अनुकरण व्हावे. राजनिती सत्य व न्यायावर आधारित असावी. प्रत्येकाने व प्रत्येक समाज व समूहाने सत्याची जाण ठेवून ज्यांचे त्यांचे अधिकार ज्यांचे त्यांना प्रदान करावे. युद्धामध्ये सुद्धा प्रामाणिक व सुसंस्कृत असावे. अर्थातच रक्त पिणार्या हिस्त्र पशू प्रमाणे व्यवहार करू नये. मानव जेव्हा सदाचारी होईल, ईश्वराच्या कायद्याला सर्वोच्च कायद्याचे स्थान देईल, ईश्वरासमोर आपल्या बर्या वाईट कर्माचे जाब देण्याची जाणीव ठेवून कायम स्वरूपी मुल्यानुसार कर्म करील तेव्हा त्याचे गुणधर्म व कर्म पूजा स्थळांपर्यंत व प्रार्थना स्थळापर्यंतच मर्यादित राहणार नाहीत. या उलट ज्या पात्रते व दर्जावर अथवा हुद्यावर जगामध्ये तो कार्यरत आहे ईश्वराच्या सच्च्या व प्रामाणिक दासा प्रमाणेच काम करील.
ही आहे संक्षिप्त स्वरुपातील क्रांतीची रूपरेखा ज्याचा इस्लाम इच्छुक आहे. हे केवळ कोण्या एखाद्या विचारवंताचे काल्पनिक स्वर्ग नसून प्रेषित मुहम्मद(स) यांनी वास्तव स्वरुपात प्रस्थापित करून दाखविले आहे. आणि आज चौदाशे वर्ष संपूनही याचे प्रभाव मुस्लिम समाजात स्पष्टपणे दिसतात.

इस्लाम आदर्श समाजाची निर्मिती करतो. तिथे शांति व स्वास्थ्य असते. तेथे उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्यता जात-पात किवा श्रीमंत-गरिबात कसलाही भेदभाव अगर पक्षपात केला जात नाही. तेथे माणूस दुसर्या माणसांचा दास नसतो. प्रत्येकाला खरेखुरे स्वातंत्र्य प्राप्त असते. प्रत्येक माणूस ताठ मानेने व अभिमानाने चालू शकतो. कोणीही भुकेलेला, उघडा-नागडा अथवा निराधार नसतो. लोक एकमेकांना आश्रय देणारे असावेत. प्रत्येकाला न्याय मिळावा. महिलांना आदर-प्रतिष्ठा मिळते. त्यांच्या हक्कांचे रक्षण व्हावे आणि त्यांना पुरुषांच्या कामवासनेला बळी पडावे लागू नये. अवैध कृत्ये करणार्यांना दहा वेळा विचार करावा लागतो. तेथे नीतीमूल्यांचा आदर केला जातो. तेथे तरुणाचे चारित्र्य विश्वास ठेवण्यासारखे असते आणि ते विधायक कार्यात गढलेले असतात. तेथे भलेपणाच्या कामात चढाओढ केली जाते आणि माणसे स्वच्छतेच्या आणि परिपूर्णतेच्या दिशेने पुढे जात असतात.
इस्लाम कसा माणूस घडवितो?
माणसाला सज्जन करण्यासाठी इस्लामपेक्षा अधिक चांगली कोणतीही जीवन व्यवस्था नाही. इस्लाम माणसाला त्याचे अचूक स्थान दाखवून देतो, त्याच्या महानतेचे रहस्य त्याला उलगडून दाखवितो, त्याच्या जबाबदारीची त्याला आठवण करून देतो आणि त्याच्यातील चेतना जागृत करतो. त्याला या गोष्टीची आठवण करून देतो की विशिष्ट उद्दिष्टासाठी त्याला जन्माला घातले गेले आहे. त्याला निरर्थक जन्माला घातले गेले नाही. या जगातील जीवन सुख-विलासासाठी नाही. आपल्या प्रत्येक कृत्याचा हिशेब आपल्या स्वामीला द्यावा लागणार आहे. तेथे नीट विचार करून प्रत्येक कृती करायला हवी.
आमच्या येथील कृत्यामुळे समाजात सुगंधही पसरू शकतो आणि दुष्कृत्यांमुळे हे जीवन एक शापही ठरू शकते. इस्लाम जो माणूस घडवितो तो इतरांचा आदर करणारा, सत्यावर अढळपणे राहाणारा, आपल्या वचनांचे पालन करणारा, दुर्बलांचा त्राता व आश्रयदाता बनणारा आणि सत्कृत्यात नेहमी पुढाकार घेणारा असतो. तो स्वतःही दुष्कृत्यांपासून दूर राहातो आणि इतरांनाही तो दुष्कृत्यांपासून रोखत असतो. इस्लामी आदर्शाच्या मुशीतून बाहेर पडलेला माणूस सदाचाराचे प्रतीक व दुराचाराचा शत्रू असतो.
शेवटची गोष्ट
इस्लामच्या या संक्षिप्त परिचयाने, त्याचा अर्थ व जीवनाकडे पाहाण्याचा त्याचा दृष्टिकोन आपल्या समोर येतो. धर्म पुरातन काळापासून आहे, हे तथ्यही स्पष्ट होते. ईश्वराने जेव्हा जेव्हा आपले प्रेषित धाडले, तेव्हा तेव्हा त्यांनी इस्लाम धर्मच आणला आणि लोकांपर्यंत तो पोचविला. सर्व ईश्वरी ग्रंथांपैकी फक्त कुरआनच आपल्यापाशी शाबूत व सुरक्षित आहे. तसेच सर्व धर्मगुरुंपैकी केवळ मुहम्मद(स.) चे जीवन चरित्र सविस्तरपणे आमच्यापाशी आहे. या दोन्ही गोष्टींकडे आपणाला अशी धाव घेतली पाहिजे, जशी एखाद्या हरवलेल्या व नंतर सापडलेल्या वस्तूकडे आपण आकर्षिले जातो. सत्यता अनेक भिन्न भिन्न स्थानी आढळू शकते, पण आपण परिपूर्ण व एकमेव सत्याकडेच आपला हात पुढे केला पाहिजे. शेवटी प्रेषित युसुफ(अ.) ची गोष्ट सांगून माझे मनोगत संपवू इच्छितो, ती गोष्ट त्यांनी बंदिवासात आपल्या साथीदारांना सांगितली होती. त्यांनी सांगितले होते.
ईश्वराशी कोणाला भागिदार ठरविणे, हे आपले काम नव्हे. खरे तर ईश्वराची आम्हांवर व सर्व लोकांवर मोठी कृपा आहे(की त्याच्याशिवाय अन्य कोणाचाही दास आम्हाला केले नाही.) परंतु अधिकांश माणसे कृतज्ञता दर्शवीत नाहीत. हे तुरुंगातील सोबत्यांनो! तुम्ही स्वतःच विचार करा, भिन्न भिन्न अनेक स्वामी चांगले आहेत की एकच स्वामी, ज्याचे सर्वांवर प्रभुत्व आहे, तो अधिक चांगला आहे? त्याला सोडून तुम्ही ज्यांचे दास्यत्व करीत आहात, ज्यांना तुमच्या पूर्वजांनी नावे दिली आहेत; या शिवाय त्याचे महत्व दुसरे काहीच नाही. आणि अल्लाहने त्यासाठी कसलीही सनद पाठविलेली नाही. शासन करण्याची सत्ता अल्लाहखेरीज अन्य कोणाच्याही हाती नाही. खुद्द त्याचाच आदेश आहे की त्याच्याखेरीज तुम्ही अन्य कोणाचेही दास्यत्व करू नये. हीच थेट व सरळ जीवनप्रणाली आहे, परंतु अधिकांश हे तथ्य जाणत नाहीत.- सूरह : अल् युसुफ - ३८ ते ४०

आपला स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी दहशतवादाचा वापर करण्याची पद्धत जुनी आहे. कधी कधी व्यक्तीकडून ते काम झालेले आहे, कधी लोकांच्या समूहाकडून ते झाले आहे, तर कधी कधी सत्ताधीशांकडून व सरकारांकडूनही ते झाले आहे. आधुनिक युगाचा इतिहास हे स्पष्टपणे दर्शवितो की दहशतवादाचा आरंभ युरोपातून झालेला आहे आणि तेथेच त्याला राजकारणाचे साधनही बनविण्यात आले आहे.
इस्लाममध्ये दहशतवादाला कसलाही वादच नाही. इस्लाम शांततेचा धर्म आहे आणि शांतिच त्याला पसंत आहे. तो माणसाच्या प्राणांचा व त्याच्या मालमत्तेचा आदर करण्यास शिकवितो. आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी उचित साधनांचा वापर करण्यास पाठिबा देतो.
धरणीवर बिघाड निर्माण करू नका.- सूरह : बकरा - १९ आणि जमिनीवर सुधारणा घडून आल्यानंतर तेथे बिघाड निर्माण होईल असा प्रसार करू नका, तसेच भयाने किवा लालसेने त्याला(बिघाडाला) बोलावू नका.- सूरह : आराप-५६
धरणीवर ज्या कोणी एखाद्याच्या खुनाचा बदला घेण्याखेरीज अथवा दंगल पसरविणार्याची हत्या करण्याखेरीज अन्य कोणत्याही कारणासाठी जर एखाद्या माणसाची हत्या केली, तर त्याने अखिल मानवजातीची हत्या करून टाकली आणि जर एखाद्या माणसाचा प्राण कोणी वाचविला तर त्याने सर्व माणसांना जिवदान दिले.’’- सूरह : माइदा - ३२

पाश्चात्य साम्राज्यांनी मध्ययुगीन कालखंडापासून जिहाद विरूद्ध प्रचंड प्रचार केला, जिहादचे भयानक चित्र रेखाटले आणि लोकांची मते कलुषित करण्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. हे सर्व अशा वेळी झाले, जेव्हा त्यांच्या स्वतःच्याच अत्याचारांनी अर्धे जग पीडित बनले होते. आजसुद्धा युरोप आणि अमेरिका स्वतःच्या आर्थिक आणि राजकीय हितासाठी तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रे बाँबफेकी विमाने व आधुनिक शस्त्रास्त्रानिशी वाटेल त्या देशावर हल्ला करून तुटून पडतात. त्यांचे तसे कृत्य अगदी तर्कसंगत व योग्य आहे, असे सभ्य व शिष्ट शब्दात जगाला पटविण्याचे प्रयत्न केले जातात पण इस्लाम व जिहाद हे शब्द त्यांच्या कानांवर पडल्याबरोबर दुष्प्रचाराची ‘टेप रेकॉर्ड’ लगेच सुरू केली जाते.
‘जिहाद’ हा अरबी भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ ‘अखंड प्रयत्नांची पराकाष्ठा करणे’असा आहे ‘भगिरथ प्रयत्न’ हा त्याचा समानार्थी शब्द होऊ शकतो. त्या प्रयत्नात कसलीही उणीव राहू नये, अगदी त्यासाठी प्राण पणाला लावण्याची गरज पडली, तरी मागे हटू नये. जिहाद केवळ रणांगणांवरच होतो, असे नसून अल्लाहच्या ‘दीन’(जीवनव्यवस्था) चा प्रसार करून, त्याची प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी, दुष्कर्मापासून निर्मळ असा सदाचारी समाज निर्माण करण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर केल्या जाणार्या पराकाष्ठेच्या प्रयत्नाला ‘जिहाद’ असे नाव देतात. अशा प्रयत्नात एखादे वेळी हातात शस्त्र घेण्याची गरज पडू शकते, परंतु मूलतः जिहाद केवळ शस्त्रांनीच केला जातो असे नाही. कुरआनमध्ये कित्येक वेळा जिहादची आवाहने केली आहेत, ती केवळ प्राण पणाला लावण्यासाठीच नव्हती, तर आपल्या धनसंपत्तीचे बलिदान करायला सांगितले गेले. इस्लाम जेव्हा आपल्या अनुयायींना जिहादचे आवाहन करतो, तेव्हा त्याचा अर्थ असतो, की धरणीवर होत असलेला कलह, अन्याय व अत्याचार नष्ट करण्यासाठी, आपले सर्वस्व पणाला लावून शिकस्तीचे प्रयत्न केले जावेत.
इस्लाम व न्याय
इस्लाम हे काही विशिष्ट धार्मिक विधी व ठराविक उपासना करण्याचे नाव नाही, तर ती एक संपूर्ण जीवनव्यवस्था आहे, ही गोष्ट स्पष्ट झालीच आहे. इस्लामची प्रस्थापना करण्यात पैगंबरासमोर जे उद्दिष्ट होते, त्याचा गाभा अथवा केंद्रबिदू ‘न्याय’ स्थापन करणे, हाच होता. अन्याय व शोषण यापासून मुक्त समाज निर्माण करणे, हेच तर इस्लामचे उद्दिष्ट आहे. न्याय स्थापन करण्याचे आदेश कुरआनने वारंवार दिले आहेत. प्रेषित मुहम्मद(स.) यांचीही तीच ताकीद होती. त्यांचे संपूर्ण जीवन न्यायस्थापनेच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.
इस्लाममध्ये न्यायाची अर्धवट कल्पना नाही. प्रत्येक व्यक्तीला कुरआनचे फर्मान आहे की तिने दृढतेने न्यायीपणावर राहावे. केवळ सामाजिक न्यायच नव्हे, तर व्यक्तिगत न्यायही प्रस्थापित केला जावा. माणसांनी आपल्या सर्व संबंधात व व्यवहारात न्यायाची कास सोडू नये. कुरआनचे फर्मान आहे,
हे ईमानधारकांनो! न्यायाचे ध्वजधारक व्हा आणि ईश्वरासाठी साक्षीदार बना. मग तो न्याय व ती साक्ष तुमच्या स्वतःच्या विरूद्ध, तुमच्या माता-पित्याच्या विरूद्ध अथवा तुमच्या नातलगांच्या विरूद्ध का असेना.- सूरह : आले इमरान - १३५
निःसंशय अल्लाह न्याय व भलाई करण्याचा व नातेवाइकांना(त्यांचा हक्क) देण्याचा आदेश देत आहे आणि अश्लील कृत्ये, दुष्कृत्ये व शिरजोरीपासून रोखत आहे. हे ईमानधारकांनो! अल्लाहखातर न्यायावर दृढतेने टिकून राहाणारे बना. न्यायाची साक्ष देताना, एखाद्या गटाशी असलेल्या वैराने तुम्हाला न्याय सोडण्यास उद्युक्त करावे, असे कदापि होता कामा नये. न्याय करा. तीच धर्मपरायणतेशी अनुकूल गोष्ट आहे.- सूरह : माईदा-८
इस्लाम केवळ त्या न्यायाची गोष्ट बोलत नाही, जो न्यायालयात मिळत असतो, किबहुना तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा, अशी व्यवस्था करतो. राजकारणाच्या बाबतीत, अर्थकारणाच्या बाबतीत तसेच माणसाच्या कौटुंबिक जीवनात तो न्याय स्थापन करतो. त्या न्यायाचा लाभ बालकांना, महिलांना, श्रमिकवर्गाला, गोरगरिबांना व समाजातील पीडित व शोषित माणसांपर्यंत पोचत असतो.
इस्लाम व गुन्हेगारी
उजेड व काळोख जसा एका ठिकाणी राहू शकत नाही, त्याचप्रमाणे इस्लामच्या उपस्थितीत गुन्हेगारी आपला तळ टाकू शकत नाही. इस्लामी कानून अशी नैतिक व आर्थिक व्यवस्था प्रदान करतो जी माणसाला गुन्हे करण्यापासून रोखते, त्याला परावृत्त करते. शिवाय इस्लाम असे सामाजिक वातावरण निर्माण करतो, ज्यात गुन्हा करण्याला कमीत कमी अवसर उरतो. त्यानंतरही घडलेल्या गुन्ह्यांसाठी अशी कडक सजा देण्याचा इस्लाम आदेश देतो, ज्यामुळे गुन्हेगारांना जरब बसावी.
इस्लामने निर्धारित केलेल्या कडक शिक्षांवर पाश्चिमात्य जगात फार मोठी ओरड व टीका केली जाते. ती सजा क्रूर व कठोर असल्याचे म्हटले जाते. वास्तवता अशी आहे की गुन्ह्याचे स्वरूप व सजा यामध्ये संतुलन राखले गेले आहे. जसा गुन्हा असेल तशी सजा दिली जाते. जघन्य व निर्घृण गुन्ह्यांबाबत शिक्षा दिली जाऊ नये, तर काय केले जावे? निर्घृण गुन्ह्यांसाठी कठोर सजा दिल्याने माणुसकीची बाजू दुर्बल पडत नाही, उलट ती प्रबळ बनते व एक स्वस्थ व अपराधविरहित समाजाच्या निर्मितीसाठी ती साहाय्यभूत ठरते. खून, बलात्कार, चोर्या-दरोडे यासारखे गुन्हे प्रत्येक कालखंडात होत आले आहेत, परंतु या तथ्याला इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा एखादा इस्लामी समाज स्थापन झाला, तेव्हा तेव्हा त्याने निर्घृण गुन्ह्यांचे पूर्ण निर्मूलन करून सोडले. अमेरिकेचे उदाहरण घ्या. तेथे प्रत्येक सेकंदाला चोरी होते, काही मिनिटांच्या अंतराने खून होतो आणि बलात्कार तर आता गुन्हा राहिलेलाच नाही. त्याच्या तुलनेत सौदी अरबस्तानाचे उदाहरण घ्या. खरे तर तेथेही संपूर्ण इस्लाम लागू नाही, पण इस्लामी शिक्षेचा नियम नक्कीच आहे. तेथे चोरीची घटना क्वचितच कधी तरी घडते आणि खून तर वर्षभरात क्वचित घडून येतो.

युरोपमध्ये धर्माविरुद्ध जी प्रतिक्रिया झाली ती वास्तविकपणे तेथील चर्चच्या व्यवस्थेतील दोषांचे स्वाभाविक फळ होते, हे यावरुन स्पष्ट होते. इस्लाममध्ये अशा तऱ्हेची कोणतीही व्यवस्था नाही, तसेच त्यात ख्रिश्चन धर्माप्रमाणे कसलेही कूट प्रश्न नाहीत ज्यायोगे माणसांत धर्मविन्मुखतेची भावना निर्मांण होऊन त्यांचा कल निरिश्वरवादाकडे झुकतो. इस्लाममध्ये कसलेही चर्च आढळत नाही. केवळ अल्लाह आहे जो समस्त जिवांचा व सृष्टीचा एकमेव निर्माता आहे. मृत्यूनंतर सर्व लोक त्याच्याच समोर हजर केले जातात. ही इतकी स्पष्ट व उघड श्रद्धा आहे की निसर्गवादी व नास्तिक मंडळींनी ती आहे असे सिद्ध करण्याचे ठरविले तरी विनासायास (व प्रामाणिकपणे) तसे सिद्ध करु शकत नाहीत.
धर्माच्या मक्तेदारीचा शेवट
इस्लाममध्ये ख्रिश्चन धर्मगुरुंच्या वर्गांप्रमाणे एखादा वर्ग आढळत नाही. तसेच धर्मावर कोणाही एका व्यक्तीचे अगर समूहाचे प्रभुत्व अथवा एकाधिकार नसतो. उलट ती सर्व मानवाची सार्वजनिक संपत्ती असून प्रत्येकास आपल्या प्राकृतिक, आध्यात्मिक व मानसिक कुवतीनुसार त्यापासून लाभ घेण्याचा समान हक्क असतो. इस्लामच्या दृष्टीने सर्व मानव एकमेकासमान आहेत. त्यांच्यात जो काही फरक आहे तो त्यांच्या कर्मानुसार वा कृत्यानुसार आहे. जे संयम करणारे असतात तेच आदरास प्राप्त आहेत मग व्यवसायाने ते इंजिनीयर असोत की प्राध्यापक असोत तसेच साधा मजूर असो की कारागीर. धर्म या विविध व्यवसायापैकी एक व्यवसाय नाही, की व्यावसायिक धार्मिक व्यक्तींच्या (ख्रिश्चन धर्मगुरुप्रमाणे) एखाद्या वर्गाला इस्लाम असे म्हटले जाऊ शकत नाही. इस्लामी उपासना करण्यास कोणत्याही ख्रिश्चन धर्मगुरूसारखी आवश्यकता नसते, त्याचे हेच कारण आहे. समाजात सामाजिक नियमांचे व तत्त्वांचे तज्ञ असण्याची गरज असते. इस्लामी धर्मशास्त्राचा तसेच इस्लामी कायदातज्ञांचा दर्जा इतर देशांत तशा तज्ञांचा सामान्यत जसा दर्जा असतो तसाच येथेही असतो. इतरांच्या तुलनेत त्यांना कसलेही प्राधान्य नसते व काही विशेष सवलती अगर संरक्षणही नसते. कायदातज्ञाच्या रुपाने ते राज्याचे सल्लागार म्हणून काम करतात. उदाहरण द्यायचे झाले तर जामिया अजहर एक धार्मिक संस्था आहे. परंतु युरोपियन चर्चप्रमाणे तिला विरोधकांना जिवंत जाळण्याचा अधिकार नाही किवा त्यांचा निर्घृणपणे छळ करून त्यांना नष्ट करून टाकण्याचाही अधिकार नाही. लोकांच{ तार्किक चर्चा करुन तिच्या चुका दाखवू शकतात. कारण इस्लामवर कोणाही व्यक्तीचा अगर वर्गांचा एकाधिकार नसून ज्यांना धर्माचे संपूर्ण ज्ञान प्राप्त आहे व जे जीवनातील व्यवहारी समस्या सोडविण्यासाठी आपली आवडनिवड बाजूला ठेवून निःपक्षपातीपणाने धार्मिक दृष्टिकोन व्यक्त करु शकतात, अशाच व्यक्तींना धर्माच्या संबंधात अधिकार प्राप्त असतो.
इस्लामी व्यवस्थेत उलेमांना म्हणजे इस्लामी कायदेतज्ञांना प्रभुत्व असेल व ते सर्व उच्च पदावर आरुढ असतील असा इस्लामी व्यवस्थेचा अर्थ कदापिही नाही. इस्लामी व्यवस्था स्थापन झाल्याने जो मुख्य बदल निर्माण होतो तो केवळ इतकाच की इस्लामी शरिअत अथवा ईश्वरी कायद्याच्या मूळ पायावरच शासन पद्धत उभारलेली असते. याखेरीज अन्य कसलाही बदल होत नाही. इंजिनीयर व डॉक्टर आपले काम पुरेपूर रीतीने करीत असतात. तसेच अर्थशास्त्रज्ञही आपल्या क्षेत्रात क्रियाशील असतात. होय एक फरक नक्कीच होतो, तो म्हणजे त्याच्या आर्थिक उलाढालींच्या मर्यादा, इस्लामी अर्थपद्धतीच्या प्रकाशात ठरविल्या जातात व त्याच्याच सहाय्याने ते आपल्या आर्थिक नीतीच्या रुपरेषा आखत असतात.
इतिहास या गोष्टीस साक्ष आहे की इस्लामी श्रद्धा व इस्लामी राज्य आणि विज्ञान व त्याचे सिद्धान्त लागू करण्याच्या बाबतीत कधीही टक्कर अथवा झुंज झाली नाही. इस्लामी इतिहासात, कोणाही विज्ञानशास्त्राला एखाद्या संशोधनाकरिता कधीही जिवंत जाळले गेले नाही व कोणालाही अशा अपराधाखातर कठोर यातना दिल्या गेल्या नाहीत. विज्ञान व इस्लामच्या या मूलभूत श्रद्धेच्या दरम्यान या संपूर्ण सृष्टीचा निर्माता केवळ एक ईश्वर आहे ही गोष्ट खोटी नाही. म्हणूनच इस्लाम मानवाला आकाश (अंतरिक्ष) व जमीन याचे अवलोकन व अभ्यास करण्याचे पुन्हा पुन्हा आवाहन करतो जेणेकरुन आपल्याला सान्निध्य मिळवावे. या सृष्टीनिरीक्षणामुळेच पश्चिमेतील अनेक असे वैज्ञानिक जे सुरुवातीला ईश्वराचे अस्तित्व मानत नव्हते आता ईश्वराचे अस्तित्व मान्य करतात.
आपल्या अनुयायांना निरीश्वरवादाकडे झुकण्यास भाग पाडणारी युरोपियन चर्चप्रमाणे कोणतीही व्यवस्था इस्लामध्ये नाही, हे आम्ही वर सांगितलेलेच आहे. असे असतानाही काही लोक जेव्हा इस्लामी देशात निरीश्वरवादाचा प्रचार करताना दिसतात, तेव्हा आमच्या मनात असा प्रश्न उभा राहतो की, शेवटी या लोकांना हवे तरी काय? हे लोक खरे तर आपल्या भूतपूर्व वसाहतवादी धन्याचे अंधानुकरण करणारे लोक आहेत. असे अंधानुकरण करताना धर्मावर व धार्मिक उपासनांवर उलटसुलट टीका-टिपणी करण्याचे व मुस्लिमांना धर्मविन्मुख बनविण्याचे उघड स्वातंत्र्य दिले जावे, असे त्यांना हवे आहे. यालाच ते विचारस्वातंत्र्य असे गोंडस नाव देतात.
याचकरिता तर युरोपवासियांनी आपल्या धर्माविरुद्ध लढा दिला होता की त्यांना धर्माच्या दडपणापासून व त्याने पसरविलेल्या अंधविश्वासातून त्यांची सुटका व्हावी व त्यांना खऱ्या अर्थाने वैचारिक स्वातंत्र्य प्राप्त व्हावे. अशा रितीने ते लोक आपल्या कार्यांत काही अंशी बाजूला होते व तसे करण्यास विवश होते. इस्लाममध्ये चर्चप्रमाणे दडपशाही करणारी यंत्रणा नाही, तसेच अंधविश्वासालाही वाव नाही. पुढे जाऊन तर तो माणसाला अशी सर्व स्वातंत्र्ये देतो जी त्याच्यासाठी आवश्यक आहेत. ज्याच्या नावाने आमचे हे तथाकथित प्रगतिवादी इतका आरडाओरडा करताना दिसतात, शेवटी याचे कारण तरी काय? इस्लामवर हे लोक इतके रुष्ट का झाले आहेत?
विचारस्वातंत्र्याचा ध्वज धारण करणाऱ्या या कथित लोकांना, कसलेही विशेष स्वारस्य नाही, हीच गोष्ट सत्य आहे. त्याच्या आडून समाजात नैतिक अधःपतन घडवून आणून स्वैर लैंगिक अराजकतेचा रोग लावणे हा त्यांचा वास्तविक उद्देश आहे. आपले घृणास्पद उद्दिष्ट झाकण्यासाठीच ते आपल्या विचार स्वातंत्र्याची घोषणा जोरजोरात देत असतात. धर्म व नीती यांच्या विरुद्ध या लोकांनी जो घृणास्पद लढा सुरू केला आहे त्यामध्ये विचारस्वातंत्र्याच्या घोषणेचा हेतू केवळ इतरांची फसगत करण्याचा आहे. इस्लाम मानवाच्या विचारावर बंधने घालतो म्हणून हे लोक इस्लामचा विरोध करीत आहेत असे नाही. धर्म मानवजातीला खालच्या दर्जाच्या व नीच विकारवादापासून व विचारांच्या दास्यत्वातून मुक्त करु इच्छितो. हीच गोष्ट या उनाड प्रवृत्तीच्या प्रेमिकांना पसंत नाही व तेच त्यांच्या धर्मविरोधाचे मूळ कारण आहे.
इस्लामवर हुकूमशाहीचा आरोप
विचारस्वातंत्र्याचे समर्थन करणारे असाही आरोप करीत असतात की इस्लामची राजकीय पद्धत वास्तवात एक हुकूमशाही पद्धत आहे. त्यात राज्याला व्यापक अधिकार असतात व राज्य अशा अधिकाराचा धर्माच्या नावाखाली निस्संकोचपणे उपयोग करीत असतो व धर्मांधपणामुळे अविचाराने लोक स्वतःला ईश्वरी कायद्यांच्या स्वाधीन करुन टाकतात. इस्लामी राज्याच्या हातात सत्तेचे असे केंद्रीकरण झाल्याने हुकूशाहीचा जन्म होतो. त्यामुळे एक अशी व्यवस्था आस्तित्वात येते ज्यामध्ये जनतेचा दर्जा गुलामापेक्षा अधिक काही नसतो. जनतेला आपल्या बऱ्यावाईटाबद्दल विचार करण्याचा, समजण्याचा तसेच आपले मत सांगण्याचा व एखादा निर्णय घेण्याचा अधिकार मुळातच प्राप्त नसतो. त्यांचे स्वातंत्र्य कायमचे हिरावून घेतले जाते व त्यानंतर शासनाच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचे धैर्यच कोणात उरत नाही. एखाद्या दुर्दैवी माणसाने तसा प्रयत्न केलाच तर त्याला धर्माविरुद्ध व ईश्वराविरुद्ध बंड करणारा असे म्हणून गप्प केले जाते.
या आरोपातील तथ्यांश
या निराधार आरोपाचे सर्वोकृष्ट उत्तर खुद्द कुरआननेच दिले आहे. एकेठिकाणी असे सांगितले गेले आहे,
‘‘त्यांची प्रत्येक कृती आपापसात सल्लामसतीने ठरविली जाते.’’ (कुरआन ४२:३८)
एकेठिकाणी असे आले आहे,
‘‘व जेव्हा तुम्ही लोकांमध्ये निर्णय घ्याल तेव्हा न्यायाने करा.’’ (कुरआन ४:५८)
पहिले खलीफा माननीय अबू बक्र सिद्दीक (र) यांनी सांगितले की, ‘व मी जर अल्लाहची व प्रेषित मुहम्मद (स) यांची अवज्ञा केली तर माझ्या आज्ञेचे पालन करणे तुमच्यावर बंधनकारक नाही.’
दुसरे खलीफा माननीय उमर (र) यांनी जेव्हा म्हटले, ‘जर तुम्हाला माझ्यात कसलाही दोष दिसला तर तो दुरुस्त करा’
यावर एका व्यक्तीने म्हटले की, ‘ईश्वराची शपथ! आम्हाला तुमच्यात कसलाही दोष आढळला असता तर आमच्या तलवारीने तो आम्ही दुरुस्त करुन टाकला असता.’
इस्लामच्या अशा शिकवणीमध्ये व त्याच्या अनुयायांच्या अशा उघड उदाहरणांमध्ये या निराधार आरोपात कसलेही तथ्य असल्याचे आढळून येते काय?
धर्मांच्या नावावर अनेकवेळा दडपशाही करण्यात आली हा इतिहास आहे व आजसुद्धा त्याच्या नावाने अनेक जुलूम केले जात आहेत. परंतु हे सर्व जुलूम व अत्याचार खरोखरच धर्मांसाठी केले जात आहेत काय? हिटलरची हुकूमशाही धर्मावर आधारलेली होती काय? स्टालिन एक जुलमी व अत्याचारी हुकूमशहा होता व त्याचे शासन एक सैनिकी राज्य होते ही गोष्ट आज रशियात उघडपणे मान्य केली जाते. मग स्टालिनचे शासन धर्माधिष्ठित होते काय? माऊत्सेतुंग असो की फ्रॅन्को, दक्षिण आफ्रिकेचा डॉक्टर म्लान असो की राष्ट्रवादी चीनचा चँग-कै-शैक असो. हे सर्व हुकूमशहा धर्मांच्या आधारावर सत्तारुढ होते काय? सत्य असे आहे की विसाव्या शतकातील माणसाने आध्यात्मिक क्रूरपणा पासून तर सुटका करून घेतली आहे पण अजूनही तो हुकूमशाहीच्या व दडपशाहीच्या अतिभयानक व घृणास्पद अशा स्वरुपाला बळी पडला आहे. त्यावर माणसांची दिशाभूल करण्यासाठी व त्यांना मूर्ख बनविण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या गोंडस नावांची लेबले लावली गेली आहेत. एकेकाळी धर्मांना जे पावित्र्य होते तसे पावित्र्य आजही त्यांना प्राप्त आहे.
कोणीही बुद्धिवान माणूस हुकूमशाहीचे समर्थन करु शकत नाही व ती योग्य आहे असेही समजू शकत नाही. उत्तमातील उत्तम कायद्यांनाही विकृत करून व त्यांच्यात दोष निर्माण करुन स्वतःच्या स्वार्थांसाठी व उद्दिष्टांसाठी, यंत्रासारखा त्याचा वापर केला जाऊ शकतो. यावरून हे स्पष्ट होते की दोष त्या कायद्यांचा नसून त्या स्वार्थांध व्यक्तींचा आहे जे आपले घृणास्पद हेतू झाकण्यासाठी त्याच्या नावाचा वापर करतात.
फ्रान्सच्या क्रांतीच्या वेळी स्वातंत्र्याच्या नावाने अतिघृणास्पद व हिडीस अत्याचार केले गेले. आम्ही अशा अत्याचारांचा आडोसा घेऊन संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीस विरोध करावा, असा याचा अर्थ कदापिही होत नाही. याचप्रमाणे इतिहासात कायदा व घटना या नावावर शेकडो निरपराध लोकांना अनेकवेळा तुरुंगात डांबले गेले, त्यांचा छळ केला गेला. त्यांना ठेचून काढण्याचा व दडपण्याचा प्रयत्न केला गेला, पण या सर्व गोष्टी, कायदा व घटना निरर्थक असून त्यांना नष्ट करु टाकण्यात यावे, असे म्हणण्यास पुरेशा आहेत काय? त्याचप्रमाणे जर एखाद्या देशात धर्माच्या नावाखाली दडपशाही चालली असेल तर केवळ एवढ्यासाठी आम्ही जीवनातून धर्म बाजूला काढून फेकून द्यावयास हवा काय? एखादा धर्म जर अन्याय, अत्याचार व क्रूरपणावर आधारलेला असेल तर अशा धर्माचा निस्संशयपणे त्यागच करणे अधिक चांगले आहे. पण इस्लामप्रमाणे जो धर्मन्याय शिकवितो व सर्व प्रकारचे अत्याचार नष्ट करु इच्छितो, तर त्याचा विरोध करण्यात कसले औचित्य आहे? इस्लामने केवळ मुस्लिमांमध्येच न्यायाची श्रेष्ठ व पवित्र उदाहरणे घालून दिली असे नाही तर, इस्लामने त्याच्या कट्टर शत्रूंच्या बाबतीतही न्यायाची अशी तेजस्वी परंपरा स्थापन केली आहे की त्यासारखे उदाहरण शोधूनही सापडत नाही.
दडपशाहीवर सर्वोत्तम उपाय
लोकांच्या मनामध्ये अल्लाहवरील इमान व श्रद्धा निर्माण करणे हा दडपशाहीला तोंड देण्याचा सर्वांत उत्कृष्ठ मार्ग आहे. तसेच त्यांना इतरांच्या स्वातंत्र्याचा (हक्काचा) आदर करण्यास शिकविले जावे. त्यांच्या रक्षणाची हमी खुद्द धर्मानेच दिली आहे. अशा प्रकारच्या ईश्वरवादी समाजातील व्यक्ती शासनाला आपल्या मर्यादांचे उल्लंघन करुन इतरांवर अत्याचार करण्याची परवानगी देऊच शकत नाहीत. इस्लामने जशी न्यायपूर्ण जीवनपद्धत स्थापन करुन दडपशाहीच्या विरोधावर भर दिला आहे, या प्रकारचे उदाहरण अन्य जीवनपद्धतीत आढळत नाही. इस्लाम जनतेवर हे कर्तव्य सोपवितो की शासनाने त्यांच्यावर जुलूम, अत्याचार केले तर त्याला सुधारण्याचा प्रयत्न करावयास हवा.
इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांचे असे सांगणे आहे, ‘‘तुम्हापैकी कोणी वाईट कृत्य पाहिले तर ते सुधारून टाका.’’ (बुखारी, मुस्लिम)
आणखी एकेसमयी प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले, ‘जुलमी शासकासमोर सत्य गोष्ट बोलणे, अल्लाहसमीप सर्वांत मोठे जिहाद आहे.’
जीवनातील हेच ते बहूमूल्य नियम होते, जे समजून घेतल्यानंतर लोकांना तिसरे खलीफा माननीय उस्मान (र) यांच्या संबंधात ते सरळ मार्गापासून ढळल्याचे जेव्हा लोकांना समजून आले तेव्हा ते त्यांच्याविरुद्ध उठले. त्यांनी केलेल्या या उठावामुळे बिघाडात आणखी वाढच झाली, ही गोष्ट वेगळी आहे.
शेवटी आम्ही आमच्या प्रगतिवादी मित्रांना हे सांगू इच्छितो की वास्तविक स्वातंत्र्य धर्माचा त्याग करण्यात नसून त्याचा समावेश आम जनतेमध्ये अन्याय व अत्याचार सहन न करण्याची भावना निर्माण करण्यात आहे. तसेच कोणी तसे करताना आढळल्यास त्याची सुधारणा करण्यात आहे. क्रांतीची हीच भावना इस्लामचा एक विशिष्ट गुण आहे.

इस्लामवर आरोप करणारे काही भ्रमिष्ट लोक असे म्हटल्याचे ऐकण्यात आहे, की इस्लामी जीवनपद्धत आधुनिक युगाच्या गरजांशी व निकडींशी एकरुप नाही. म्हणून वर्तमान युगातील लोकांना इस्लाम स्वीकारार्ह होऊ शकत नाही. इस्लामचे आदेश केवळ गतकाळाकरिताच होते व आता त्यांची उपयुक्तता संपलेली आहे. इतकेच नाही तर प्रगतीच्या मार्गात ते अडथळा होऊन राहिले आहेत, असे त्यांना वाटते ते असे म्हणतात,
 1. व्याज (जी सध्याच्या काळी एक अनिवार्य आर्थिक गरज आहे) देण्याघेण्याला तुम्ही अजून गैर व बेकायदा असे मानता काय?
 2. जकातची रक्कम ज्या वस्तीत गोळा केली जाते, तिचा खर्च निश्चितपणे तेथील रहिवाशांच्याच कल्याणासाठी करावयास हवा काय? पहिली गोष्ट अशी की जकात एक जुनाट व मागासलेली पद्धत आहे व त्यामुळे वर्तमान सरकारच्याही गरजा पुऱ्या होऊ शकत नाहीत. तसेच दुसरी गोष्ट अशी की एखाद्या गावात अगर शहरातील श्रीमंत लोकांकडून गोळा केलेली जकात, तेथील गरिबांना जेव्हा वाटली जाते तेव्हा त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. कारण त्यांच्या दृष्टीने त्या पैशांचा दर्जा ‘दाना’ पेक्षा काही अधिक नसतो.
 3. तुम्ही मदिरापान, जुगार, स्त्रीपुरुषाचे अनिर्बंध मिसळणे, नाचगाणी, बाई ठेवणे, कामविलास या सर्व गोष्टींवर बंधने घालून त्यांना अवरोध करु इच्छिता? या सर्व गोष्टी तर सामाजिक जीवनात अनिवार्य गरज होऊन राहिल्या आहेत.
  इस्लाम व्याज वर्ज्य करतो हे बरोबर आहे; पण व्याज ही एक आवश्यक निकड विवशता आहे. असे म्हणणे चुकीचे आहे. आजसुद्धा जगात दोन प्रकारच्या जीवनपद्धती इस्लाम व कम्युनिझम अस्तित्वात आहेत. ह्या दोन्ही व्याजावरील आधारलेली आर्थिक व्यवस्थेचा स्वीकार करत नाहीत. दोहोंत फरक एवढाच आहे की कम्युनिझमजवळ आपल्या दृष्टिकोनानुसार आचरण करण्यासाठी व जीवनाला त्याच्या नुसार आकार देण्यासाठी अनिवार्यपणे लागणारी शक्ती तसेच सत्ताही आहे व इस्लामला अशी शक्ती किवा सत्ता प्राप्त नाही. इस्लामला वास्तविक सत्ता प्राप्त असती तर व्याज ही अनिवार्य आर्थिक गरज नाही, हे त्याने शिकविले असते. इस्लामी आर्थिक व्यवस्था व्याजावर उभारली जात नाही, जशी आज रशियाची आर्थिक व्यवस्था व्याजावर उभारलेली नसून व्याजापासून पूर्णपणे मुक्त होऊन उभी आहे.
कोणत्याही दृष्टीने व्याज ही वर्तमान युगाची अनिवार्य आर्थिक गरज आहे असे म्हटले जाऊ शकत नाही. जर ती अनिवार्य आवश्यकता असेल तर ती भांडवलदारांकरिताच आहे. कारण त्याच्या शिवाय ते भांडवलशहा होऊच शकत नाहीत. खुद्द पश्चिमेतील काही अर्थतज्ञाच्या शिरोमणीचाही व्याजाला विरोध आहे. ते आम्हाला अशी चेतावनी देत आहेत, व्याजावर जर प्रतिबंध लावला गेला नाही तर हळूहळू सर्व संपत्ती एकवटून काही लोकांच्याच हातात साठली जाईल. गरीब जनता आर्थिकदृष्ट्या बरबाद होऊन ते भांडवलशहांच्या अधीन होऊन त्यांचे गुलाम बनतील. पश्चिमेतील भांडवलशाहीच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांत अर्थतज्ञांचे हे मत अगदी खरे असल्याचे दिसून येते. व्याज व मक्तेदारी पद्धत, जे भांडवलवादांचे दोन महत्त्वाचे स्तंभ आहेत या दोहोंना जेव्हा भांडवलवादाचे अस्तित्वही नव्हते, तेव्हा आजपासून सुमारे चौदा हजार वर्षांपूर्वीच इस्लामने व्याज वर्ज्य असल्याची घोषणा करुन टाकली आहे. इस्लामी जीवनपद्धतीला अवतरित करणारा सर्वशक्तिमान व सर्वज्ञ अल्लाह आहे व तो मागच्या पुढच्या सर्व पिढ्यांतील लोकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवतो व व्याजापासून कोणते बिघाड, आर्थिक दोष व पेच निर्माण होऊ शकतात हे तो चांगले जाणतो.
ज्या देशातील आर्थिक व्यवस्था परकीय मदतीवर अवलंबून असते त्याच्या बाबतीत तर व्याज ही एक मानहानीकारक बाब होऊ शकते, पण इस्लामी अर्थव्यवस्था स्वतंत्र असते आणि स्वंतत्र निकोप पायावर उभारलेली व आधारलेली असते. इतर देशांशी त्याचे संबंध समानतेच्या तत्त्वावर आधारलेले असतात. ते जीहुजुरीवर, आज्ञापालनावर किवा दास्यत्वावर नसतात. त्याचप्रमाणे आर्थिक बाबतीत मार्गदर्शन त्या इस्लामी आदेशानुसार व तत्त्वानुसार करतो जे व्याज निषिद्ध व वर्ज्य ठरवितात. या सिद्धान्तांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामी अर्थव्यवस्था आत्सित्वात येते, तिला जगात प्रगती व श्रेष्ठत्वाच्या ध्वजाचे स्वरुप असते.
जकातसंबंधी या अगोदर दाखवून दिले आहे, की हुकूम आहे व तो असा हक्क आहे ज्याच्या रक्षणाची जबाबदारी राज्यावर असते.
या प्रकरणात आम्ही जकातसंबंधी असणाऱ्या त्या शंकेचे उत्तर देऊ इच्छितो जी तिच्या स्थानिक बाबतीत म्हणजे जेथे जकात गोळा केली जाते, तेथील गरजू लोकांतच तिचे वाटप व्हावे, या नियमावर केली जाते.
येथील बहुतेक विद्वान पश्चिमेकडून आणलेल्या प्रत्येक व्यवस्थेला व पद्धतीला सुधारणांचे परमोच्च बिदू मानून त्यांना कवटाळीत असतात. ही अत्यंत खेदजनक अवस्था होय. पण तीच गोष्ट जर इस्लामने त्यांच्यापुढे ठेवली तर तिला ते प्रतिगामित्व व अंधश्रद्धा समजू लागतात.
या विद्वानांना, या गोष्टीची आठवण करुन देणे इष्ट ठरेल की, संयुक्त राज्य अमेरिकेची शासकीय चौकट पूर्णतः विकेंद्रीकरणावर आधारलेली आहे. संयुक्त राज्य अमेरिका व त्यामधील राज्यातील प्रत्येक गाव व वस्ती आपल्या सामान्य व्यवस्थेबाबत आर्थिक, राजनैतिक व सामाजिक दृष्टीने स्वयंपूर्ण व स्वतंत्र असते. या स्वतंत्र घटकांच्या नगरपरिषदा आपल्या हद्दीतील रहिवाशांवर कर लागू करतात, ते वसूल करतात व मग आपल्या गावाच्या अगर वस्तीच्या शैक्षणिक, औषधोपचार, परिवहन तसेच इतर सार्वजनिक कार्यावर गरजेनुसार तो खर्च करतात. हा सर्व खर्च करुन काही शिल्लक उरली तर ती राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवून त्यांच्या ताब्यात देऊन टाकतात. या उलट जर गावाचा एकंदर खर्च उत्पन्नापेक्षा अधिक असेल तर राज्याकडून तुटीची भरपाई करण्यात येते. निस्संशय ही एक चांगली पद्धत आहे. यात भिन्न मानवी प्रयत्नांना सुरेखपणाने एकवटून खर्चाचा एकंदर भार विभागला जातो व हा सर्व भार एकट्या केंद्रसरकारला वाहावा लागत नाही. या शिवाय खर्चाचा विनिमय, स्थानिक लोकांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या सर्व गरजाही चांगल्यारितीने पुऱ्या होत असतात. कारण स्थानिक मंडळी आपल्या हद्दीतील गरजा केंद्रापेक्षा अधिक चांगल्या रितीने जाणत असतात.
आमच्या देशातील विद्वान, अमेरिकेच्या या पद्धतीची फार प्रशंसा करतात, पण हीच पद्धत इस्लामने तेराशे वर्षापूर्वी स्थापन केली होती ही गोष्ट ते विसरुन जातात. प्रत्येक गावातील पदाधिकारी आपापल्या गावात कर वसूल करीत असत व त्यातून गावाच्या गरजा पुऱ्या करीत असत. खर्च व उत्पन्न यांत जी तफावत असे, त्यात शिल्लक असल्यास राज्याच्या खजिन्यात जमा करीत व तूट असल्यास राज्याकडून कर्जांच्या रुपाने रक्कम घेतली जात असे.
आता उरली जकात वाटपाची समस्या, तर या बाबतीत आम्ही या आधी असे सांगितलेले आहे, की जकात निश्चितपणे रोख रकमेत अथवा असेल त्या स्वरुपात लोकात वाटली गेली पाहिजे, असे सिद्ध करणारे कोणतेही कलम आमच्या कायद्यात नाही. जकात गरिबांच्या शिक्षणासाठी, औषधासाठी व सामाजिक सुखसोईसाठीही खर्च केली जाऊ शकते व त्यातून जे वार्धक्यामुळे, अशक्तपणामुळे व अल्पवयामुळे कामे करण्यास विवश आहेत अशा गरजूंना रोख आर्थिक मदतही दिली जाऊ शकते.
आम्ही आपल्या देशात असे लहान लहान शासकीय घटक स्थापावे, जे राज्यात इस्लामी जगतात व जगाच्या सामूहिक व्यवस्थेत राहून आपल्या स्थानिक समस्या व आर्थिक बाबींची स्वतः देखरेख करुन स्थानिक लोकांच्या गरजा भागविण्यास जबाबदार होतील. असे आज जर इस्लामचे आर्थिक सिद्धान्त वर्तमान समाजात स्थापू इच्छिले तर त्या उद्देशाकरिता आम्हाला फार काही करावे लागणार नाही.

इस्लामी आंदोलन सध्याच्या नवीन शोधांच्या विरुद्ध नाही, तसेच निरनिराळ्या अवजारांवर व शस्त्रांवर ‘बिसमिल्ला हिर्रमानिर्रहीम’ ही अक्षरे लिहली जावीत अशीही कोणा मुस्लिमांची इच्छा नाही व तसे झाले नाही तर आपल्या घरात, शेतात व कारखान्यात त्यांना वापरणार नाहीत असे नाही. इस्लाम केवळ इतकेच इच्छितो की ही अवजारे व शस्त्रे अल्लाहसाठी व त्याच्या इच्छेनुसारच वापरली जावीत. कारण ही निर्जीव शस्त्रे असून त्यांना कोणताही धर्म अगर मातृभूमी असत नाही परंतु त्यांच्या गैरवापराने सर्व जगातील माणसावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. उदाहरणार्थ, तोफ पाहा. तिला धर्म, वर्ण, मातृभूमी वगैरे काही नसते; पण कोणीही तिचा गैरवापर करुन तिच्या सहाय्याने इतरांवर जुलूम व अत्याचार करु लागावे, कोणाही मुस्लिमांचे ते कोणत्याही परिस्थितीत वैभव अगर शान नाही. उलट जुलूम व अत्याचारापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी तोफेचा उपयोग करण्याचे अथवा अल्लाहच्या दीनचा (जीवन) कलिमा उंच करण्यासाठी तिचा उपयोग करणे हे मुस्लिमांचे काम ठरते.
तसेच चित्रपटाचा शोध आहे. इस्लाम चित्रपटाविरुद्ध नसून सज्जन मुस्लिमांची मागणी एवढीच आहे, की चित्रपटाचा माणसाच्या पवित्र भावनांचे, चारित्र्याचे व मानवी समाजातील भल्या-बुऱ्यातील संघर्षांचे प्रतीक म्हणून वापर व उपयोग करावा. आजचे चित्रपट नागडेपणाचे तसेच घाणेरड्या वासनांचे व खालच्या दर्जाचे आहेत. कारण त्याद्वारे मानवी जीवनाचे निकृष्ठ दर्जाचे व निरर्थक चित्रण उभारले जातो. त्यामुळे माणसातील पाशवी वासना चळविल्या जातात. अशा प्रकारचे चित्रपट माणसाला आध्यात्मिक प्रगतीत सहाय्य करु शकत नाहीत हे उघड आहे, उलट त्याला ते हानिकारकच सिद्ध होतात.
इस्लामने मानवाच्या विज्ञान शोधांना कधीही विरोध केलेला नाही. सर्व चांगल्या विज्ञान शोधांचा उपयोग आपल्या उद्देशाकरिता करण्याची त्याने मुस्लिमांना शिकवण दिली आहे. इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांचे असे सांगणे आहे,
‘ज्ञान प्राप्त करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे अनिवार्य कर्तव्य आहे.’
ज्ञानाच्या व्याख्येत सर्व प्रकारच्या ज्ञानाचा समावेश असतो, हे येथे सांगण्याची कदाचित गरज नाही, जणू प्रेषित मुहम्मद (स) यांना असे अभिप्रेत होते, की मुस्लिमांनी ज्ञानाच्या व विज्ञानाच्या सर्व क्षेत्रांत पुढे गेले पाहिजे.
तात्पर्य असे की मानवतेची सेवा करणाऱ्या कोणत्याही संस्कृतीचा इस्लाम विरोध करीत नाही. पण जर एखाद्या संस्कृतीने मदिरापान, जुगार, नैतिक अधःपतन, वेश्यावृत्ती तसेच वसाहतवादी साम्राज्याला कोणत्या ना कोणत्या सबबीवर इतरांना गुलाम बनविण्याचा पर्याय होण्याचे ठरविले तर इस्लाम अशा संस्कृतीचा स्वीकार करीत नाही. उलट तिच्याविरुद्ध तो आवाज उठवितो. जेणेकरुन तिने आणलेल्या सर्वनाशापासून व रोगराईपासून लोकांचे रक्षण व्हावे.

येथे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की इस्लामची ही स्पष्ट जीवनपद्धती कुठल्याही आर्थिक कारणांचा अथवा परिस्थितीचा परिणाम नाही. तसेच त्याचे अस्तित्व भिन्न वर्गांच्या स्वार्थांनी बरबटलेल्या संघर्ष व कलहापासून उपजले नाही. ती एक ईश्वरनिर्मित आदर्श व्यवस्था आहे. ती अशा एका युगात मानवाला प्राप्त झाली, जेव्हा त्याच्या जीवनात आर्थिक बाबींना काही विशेष महत्त्व नव्हते. तसेच त्याला सामाजिक न्यायाचे वर्तमान अर्थ ठाऊक नव्हते. म्हणून माणसाच्या सामाजिक व आर्थिक बाबतीतील सुधारणेच्या दृष्टीने पाहिले तर इस्लामच्या तुलनेत कम्युनिझम तसेच भांडवलशाही हे दोन्ही फार नंतरच्या काळात निर्माण झाले. ऐतिहासिक दृष्टिकोनातून इस्लामला या दोहोंच्या तुलनेत प्रथमस्थान प्राप्त आहे.
जीवनातील मौलिक गरजा
उदाहरण म्हणून माणसाच्या जीवनातील मौलिक गरजाच घ्या. सामान्यपणे असे म्हटले जाते की कार्ल माक्र्सच पहिला माणूस होता ज्याने अन्न, निवारा व वासनांची तृप्ती या मौलिक गरजा आहेत असे म्हटले आणि सरकारचे हे अनिवार्य व बंधनकारक कर्तव्य म्हणून दाखविले की त्याने राष्ट्रातील सर्व व्यक्तींच्या गरजा एकत्र करुन त्यांची पूर्तता करावी. कार्ल माक्र्सच्या या विधानाला मानवी विचारामध्ये फार क्रांतिकारी समजले जाते. पण सत्य हे आहे की कार्ल माक्र्सच्या जन्माच्या १४ शतके आधी इस्लामद्वारा हे जग या क्रांतिपूर्ण विधानाशी चांगल्या तऱ्हेने परिचित होऊन चुकले होते. म्हणून या संदर्भात इस्लामचे प्रेषित मुहम्मद (स) यांनी असे उल्लेखित केले आहे की,
‘‘ज्या व्यक्ती आमचे (इस्लामी राज्याचे) कर्मचारी म्हणून कार्य करीत आहेत व त्यांना पत्नी नसेल तर त्यांचा विवाह केला जाईल, जर त्यांचे स्वतःचे घर नसेल तर त्यांना राहण्यासाठी घर दिले जाईल, जर चाकर नसतील तर त्यांना चाकर प्राप्त करुन दिले जातील व जर त्यांच्याकडे प्रवासाचे साधन म्हणून एखादे जनावर नसेल तर त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली जाईल.’’
त्यांच्या या ऐतिहासिक जाहीरनाम्यात केवळ सर्व मानवी मूळ अधिकारच आहेत असे नाही, ज्यांचे जाहीर निवेदन कार्ल माक्र्सने नंतरच्या काळात केले. अन्य बरेच काही त्यात सामील आहे. पण कम्युनिझमप्रमाणे इस्लाम त्याचे फळ, वर्गकलह, वर्गद्वेश व रक्तमय क्रांती आणि सर्व उच्च जीवनमूल्यांचा इन्कार करुन वसूल करीत नाहीत. ते अन्न, निवारा व वासनांची तृप्ती या मर्यादित क्षेत्रात कधीही बांधले जाऊ शकत नाही.
चिरकाल टिकणारी जीवनपद्धती
इस्लामी जीवनपद्धतीचे असे काही ठळक गुण आहेत. यावरुन ही गोष्ट चांगल्यारितीने स्पष्ट होते की धर्म म्हणून इस्लामला एका अशा विशाल, व्यापक व तर्कशुद्ध नियमांचे आणि सिद्धान्तांचे नामाभिदान दिले जाऊ शकते की मानवी जीवन आपल्या झगमगाटात व सुखवैभवात असूनसुद्धा त्याच्या स्पष्ट मर्यादा नजरेस पडतात व त्याचा कुठलाही भाग मग तो भावनेच्या जगाशी असो वा विचारांशी, कर्माशी, भक्तीशी, आर्थिक बाबी व सामाजिक सबंधाशी, नैसर्गिक प्रेरणांशी अथवा आध्यात्मिक आंदोलनाशी असो, त्याच्या पकडीपासून सुटत नाहीत. या अनेकविध पैलूंमध्ये समन्वय निर्माण करुन इस्लाम त्याला एक सुंदर, समतोल तसेच वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धतीचे रुप प्रदान करतो. अशा प्रकारची सर्वव्यापी समतोल अथवा वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती, कोणत्याही काळात आपली उपयुक्तता हरवून, गमावून बसू शकते काय? माणूस खऱ्या अर्थाने याकडे दुर्लक्ष करु शकतो काय? कारण आपल्या उद्देशांच्या अथवा लक्ष्याच्या दृष्टीने हे स्वतःच जीवनपर्याय आहेत किबहुना स्वयंजीवनच आहे. म्हणून जोवर या धरतीवर जीवमात्र आढळेल तोवर ही पद्धतीही अस्तित्वात असेल व टिकून राहील आणि सतत आढळणारे त्याचे अक्षय ठसे कधीही पुसले जाऊ शकत नाहीत.
आजच्या युगाची गरज
आज जी अवस्था आढळते व या वेळी ज्या ज्या समस्या आहेत ते पाहिल्यानंतर कोणताही बुद्धिमान माणूस असे माणने कठीण आहे की आजचा माणूस एखाद्या बौद्धिक आधारावर इस्लामशी विन्मुख होऊ शकतो व त्याने सादर केलेल्या जीवनपद्धतीशी दुर्लक्ष करुन तिची उपेक्षा करु शकतो. आज २१ व्या शतकातही मानवता तशाच प्रकारच्या सर्व दोषांमध्ये बरबटलेली आहे जशी ती मानवाच्या रानटी अवस्थेमध्ये होती. प्रगतीचा, प्रकाशाचा ध्यास ठरलेल्या या युगामध्ये मानवता, वंशद्वेष, वर्णद्वेष याच्या अत्यंत तिरस्करणीय अवस्थेत आहे. उदाहरण पाहिजे असेल तर अमेरिका व दक्षिण आफ्रिका या देशांवरच एक दृष्टी टाका. नैतिक, सदाचार, सुसंस्कार व मानवतेच्या बाबतीत या २१ व्या शतकातील माणसाला, अजून इस्लामपासून फार काही शिकण्यासारखे आहे. इस्लामने मानवतेला सर्व प्रकारच्या वांशिक संकुचित दृष्टिकोनातून मुक्त केले, त्याला आज बराच काळ लोटला आहे. आजसुद्धा इस्लामच जगाला या द्वेष व तिरस्काररुपी दलदलीतून बाहेर काढू शकतो. कारण इस्लाम मानवाच्या समानतेची एक सुंदर प्रतिमाच सादर करीत नाही तर व्यवहारी जगातही तो एक अशी समानता निर्माण करु दाखवून चुकला आहे, ज्यासारखे जगाच्या इतिहासात दुसरे कोणतेही उदाहरण आढळत नाही. इस्लामच्या या आदर्शकाळांत कोणत्याही काळ्या माणसाला गोऱ्या माणसावर, वर्ण अथवा वंशाच्या आधारावर कसलेही प्रभुत्व नव्हते. इस्लाम जवळ प्रमुखता व श्रेष्ठत्व यांचे एकमात्र साधन म्हणजे मानवाचा चांगुलपणा व त्याचा सदाचार आहे. म्हणूनच इस्लामने गुलामांना गुलामीच्या दैन्यावस्थेपासून मुक्ती प्राप्त करून दिली व त्यांना प्रगती व सुखांचा व्यापक संभवांची सूचनाही देऊन टाकली, येथपर्यंत की गुलामांना राष्ट्राध्यक्षपदावर बसविण्याचे अधिकारही स्वीकारण्यात आले. प्रेषित मुहम्मद (स) यांनी सांगितले,
‘आपल्या अमीराचे (अध्यक्षाचे) म्हणणे ऐकून घ्या व त्यांचे आज्ञापालन करा. मग हा अमीर निग्रो गुलाम जरी असला तरी त्याच्या आज्ञेचे पालन करा जोवर तो तुम्हाला ‘अल्लाह’च्या शरीअतीनुसार नेत आहे.’
नागरी स्वातंत्र्याचा आदर
आणखी एका दृष्टिकोनातूनही इस्लामच्या गरजेकडे आजचे जग अनास्था दाखवू शकत नाही, साम्राज्यवाद व हुकूमशाहीच्या हाताने आजची मानवता जे कष्ट, क्लेश व दुःख भोगीत आहे ज्या रानटीपणाचे व क्रोर्याचे भक्ष्य बनले आहे त्या पासून वाचण्याचा, सुटकेचा, इस्लामखेरीज दूसरा कुठलाही मार्ग दृष्टीस पडत नाही. इस्लामच मानवतेला साम्राज्यवाद व हुकूमशाहीच्या शापापासून सुटका करून देऊ शकतो, कारण तो साम्राज्यवाद व साम्राज्यवादी शोषणांचा अत्यंत विरोध करणारा आहे. आपल्या उत्कर्षकालामध्ये मुस्लिमांचे इतर राष्ट्रांशी व्यवहार इतके औदार्यपूर्ण, श्रेष्ठ व सभ्यतापूर्ण होते की आजच्या युरोपाची संकुचित दृष्टीसुद्धा त्याची उंच भरारी पाहू शकते.
या संदर्भात आदरणीय उमर बिन खत्ताब (र) यांनी न्यायदानात केलेल्या एका सुप्रसिद्ध निवाड्याचे उदाहरण सादर केले जाऊ शकते. या प्रकरणात एका इजिप्शियन आदिवासीला विनाकारण मारहाण करण्याच्या व छळ करण्याच्या आरोपावरुन ज्याने इजिप्त जिकले होते, तो प्रसिद्ध विजेता व प्रतिष्ठित गव्हर्नर आदरणीय अमर बिन आस (र) यांच्या चिरंजीवाला फटक्यांची शिक्षा दिली होती, किबहूना त्याच्या बापालाही अशी शिक्षा देण्यास तयार झाले होते. या एका उदाहरणावरुन हे सहज अनुमान केले जाऊ शकते की इस्लामी राज्यात नागरिकांना किती मोठ्या प्रमाणात नागरी स्वातंत्र्य होते.
आज भांडवलशाही पद्धतीचा जो शाप जगावर पसलरेला आहे, ज्यामुळे सारे जीवन विषारी बनले आहे; त्यापासून सुटकेचा मार्गही इस्लामखेरीज अन्य कुठलाही नाही. व्याज घेणे, नफाखोरी हा भांडवलशाही पद्धतीचा पाया असून इस्लाम या दोहोंचा अत्यंत तीव्र विरोध करतो व त्यांना वर्ज्य घोषित करतो. दुसऱ्या शब्दांत याचा अर्थ असा की आजच्या जगात भांडवलशाहीने निर्माण केलेले अनुभव व दोष फक्त इस्लामच दूर करु शकतो.
याचप्रमाणे भौतिकवादी व नास्तिकवादी साम्यवादाचे उच्छेदनही केवळ इस्लामच्या हस्तेच संभवनीय आहे. कारण इस्लाम केवळ पूर्ण सामाजिक न्याय स्थापन करुन त्याला टिकवून धरतो, तेवढेच तो उच्च मानवी तसेच आध्यात्मिक मूल्यांचे रक्षणही करतो. कारण तो साम्यवादाप्रमाणे कसल्याही प्रकारच्या संकुचित दृष्टीस बळी बनलेला नाही व त्याचे जग ज्ञानेंद्रियांनी जाणवणाऱ्या वस्तूपर्यंतच मर्यादित नाही. आपल्यात हे सर्व गुण असूनसुद्धा, इस्लाम आपली कुठलीही गोष्ट जबरदस्तीने लादून त्याला ती मानण्यास भाग पाडीत नाही. कारण धर्माच्या व श्रद्धेच्या बाबतीत तो आरंभीपासूनच कसल्याही जबरदस्तीशी सहमत नाही व मानत नाही. याबाबतीत त्याचा नियम असा आहे की -
‘‘धर्माच्या बाबतीत कसलीही जुलूम-जबरदस्ती नाही. सत्य गोष्ट चुकीच्या विचारापासून वेगळी काढून ठेवली गेली आहे.’’ (२:२५६)
या वेळी जगावर तिसऱ्या विश्वयुद्धाचे अंधकारपूर्ण ढग पसरलेले आहेत, ते दूर होण्यासाठीही इस्लामरुपी सूर्योदय होण्याखेरीज अन्य कुठलाही मार्ग दिसत नाही. पण हे त्याचवेळी शक्य आहे जेव्हा मानवजात इस्लामला आपल्या जीवनाचा मार्गदर्शक बनवून खऱ्या सुखशांतीच्या या मार्गाचा अंगीकार करण्यास तयार होईल.
तात्पर्य असे की इस्लामचा काळ संपलेला नसून तो आता सुरु झाला आहे. हा कुठलाही मृत दृष्टिकोन नसून ही क्रांतीपूर्ण जीवनपद्धती आहे. याचा भविष्यकाल तेवढाच उज्वल आहे जितका त्याचा भूतकाल वैभवशाली होता व युरोप त्या वेळी इतिहासाच्या काळोखात कालखंडात धडपडत, चाचपडत होता.

मानवतेच्या विकासामध्ये अडसर बनणाऱ्या व त्याला सन्मार्गांपासून रोखणाऱ्या, हरप्रकारच्या गुलामगिरीतून मुक्त करुन स्वातंत्र्य देण्याचे नाव इस्लाम आहे, असे एका वाक्यात आम्ही म्हणून शकतो. माणसांचे प्राण, संपत्ती, अब्रू, स्वाभिमान तसेच आत्मविश्वास या सर्वांची लूट करणाऱ्या हुकूमशहापासून तसेच अन्याय व अत्याचार करणाऱ्यापासून मुक्तीचा हा संदेश आहे. इस्लाम मानवाला शिकवितो की सत्तेचा खराखुरा स्वामी अल्लाह आणि अल्लाहच आहे. तोच मानवाचा खराखुरा शासक आहे, सारी प्रजा त्यानेच निर्माण केलेली आहे. तोच माणसाच्या दैवाचा धनी आहे, त्याच्या मर्जीशिवाय कोणीही कोणाला फायदा देऊ शकत नाही, तसेच कोणीही त्रास व दुःखे दूर करु शकत नाही. निवाड्याच्या दिवशी सर्व मानव त्याच्या समोरच गोळा केले जातील आणि तो त्यामधील प्रत्येकाच्या जीवनकार्यांचा हिशेब व आढावा घेईल. इस्लामचे हे शिक्षण माणसाला भय, अन्याय, अत्याचार व इतरांच्या संपत्तीचा अपहार व शोषण वगैरे गोष्टींपासून मुक्ती प्रदान करते.
एवढेच नव्हे तर एक पाऊल पुढे जाऊन इस्लाम माणसाला इच्छा, आकांक्षा यांच्या दास्यत्वातून मुक्त करतो. येथपर्यंत की जगण्याच्या इच्छेपासूनही त्यांचे संबंध तोडून टाकतो. ‘‘जीवनासक्ती’’ हाच मानवी कमकुवतपणा आहे व हुकूमशहा याच गोष्टीचा लाभ घेऊन इतर माणसांना आपले दास बनवित आले आहेत. जर माणसात हा कमकुवतपणा नसता तर तो कधीही व कोणतेही दास्यत्व पत्करण्यास तयार झाला नसता व या क्रूर दैत्यांना असे सैतानी नाच करु दिले नसते. अत्याचार व क्रौर्य यांच्या समोर गुडघे टेकून शरण जाण्याऐवजी वीरश्रीपूर्वक मुकाबला करण्याचे शिक्षण देऊन इस्लामने मानवतेवर महान उपकार केला आहे. कुरआनमध्ये आले आहे,
‘‘हे नवी ! त्यांना सांगा की जर तुमचे बाप व तुमचे मुलगे आणि तुमचे भाऊ व तुमच्या पत्नी व तुमचे सगेसोयरे व तुम्ही शिल्लक ठेवलेली संपत्ती व जो कारभार मंदावेल असे भय तुम्हाला वाटते तो सर्व व्यवहार व तुम्हास प्रिय असलेले तुमचे घर, जर तुम्हाला अल्लाह व त्याचा प्रेषित व त्याच्या मार्गाने प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यापेक्षा अधिक प्रिय आहे, तर तोवर प्रतीक्षा करा जेव्हा अल्लाह आपला निर्णय तुमच्यासमोर आणील व अल्लाह अवज्ञा करणारांचे मार्गदर्शन करीत नाही.’’ (कुरआन ९:२४)
इस्लाम माणसाला अल्लाहचे प्रेम शिकवितो. ज्याला सहानुभूती, चांगलुपणा, सत्य तसेच अल्लाहच्या मार्गात म्हणजेच जीवनातील सर्व उच्च, पवित्र उद्देशाकरिता जिहाद असे नाव दिले जाऊ शकते; ते तसेच वासनांशी व इच्छाआकांक्षांशी झगडण्यास प्रवृत्त करते व त्यांना आपल्या काबूत राखण्याचे शिक्षण देते. आधळ्या, बहिऱ्या इच्छा वासनारुपी माजलेल्या अश्वांना तो अल्लाहवरील प्रेमाद्वारे ताब्यात ठेवण्यास शिकवितो, तसेच जीवनात तो फक्त अल्लाहच्या प्रेमाला सर्वश्रेष्ठ मूल्य व मूळ कार्यशील शक्तीच्या स्वरुपात पाहू इच्छितो. जो या धनापासून वंचित आहे तो मुस्लिम होऊच शकत नाही.
इहलोकभक्तांचा गैरसमज
लोभ, लालसा व इच्छा वासनांचा एखादा दास आपल्या चुकीच्या अनुमानाच्या कारणास्तव असा विचार करु लागतो की इतरांच्या तुलनेत त्याचे जीवन अधिक सफल व सुखपूर्ण आहे; असे होणे संभवनीय आहे. परंतु त्याच्या उणिवांची शिक्षा त्याला फारच लवकर भोगावी लागते. जेव्हा तो आपल्या या स्वप्नवत अवस्थेतून बाहेर येतो तेव्हा त्याला आढळते की आपण इच्छा वासनांचे विवश गुलाम बनलो आहोत. त्याच्या भाग्यात वंचना, दुर्भाग्य तसेच हालअपेष्टा व विवशताखेरीज आणखी काही असत नाही. कारण एकदा माणूस आपल्या इच्छा लालसांना शरण गेला तर तो कधीही त्यांना आपल्या काबूत आणू शकत नाही, उलट त्याचा उदंडपणा जसजसा वाढत जातो तसतशी त्याची तृष्णाही वाढत जाते. अशाप्रकारे माणसाचे पशुपेक्षाही खालच्या स्थरावर पतन होते आणि आस्वाद घेण्यात तो अशाप्रकारे निमग्न होत जातो की त्यांना इतर कुठल्याही वस्तुचे भान राहत नाही. यावरुन हे स्पष्ट होते की जीवन व त्यातील अनेक समस्यांच्या बाबतीत अशातऱ्हेचे मार्गक्रमण मानवतेला कसल्याही भौतिक वा आध्यात्मिक प्रगतीपर्यंत नेऊन पोचवू शकत नाही. प्रगती मग ती भौतिक असो वा आध्यात्मिक असो त्याकरिता माणसाला आपल्या इच्छा लालसेच्या गुलामगिरीतून मुक्त होणे ही पहिली अट आहे. यानंतरच विज्ञान, कला व धर्माच्या क्षेत्रात प्रगती होणे संभवनीय आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget