Articles by "प्रेषित"

हे विश्व, एका भल्या मोठ्या पुस्तकासमान आपल्या समोर पसरलेले आहे, परंतु हे एक अजब पुस्तक आहे ज्याच्या कोणत्याही पृष्ठावर त्याचा विषय अथवा त्याच्या लेखकाचे नाव लिखित स्वरुपात नाही, तरीही या पुस्तकाचा एकेक शब्द बोलत आहे, की त्याचा विषय काय असू शकतो आणि त्याचा लेखक कोण आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती डोळे उघडते आणि पाहते की ती एका विशाल, भव्य विश्वामध्ये उभी आहे, तेव्हा स्वाभाविकपणे त्याच्या मनमस्तिष्कात प्रश्न उद्भवतो की, ‘‘मी काय आहे, कोण आहे आणि ही सृष्टी म्हणजे काय?’’ तो स्वतःला आणि विश्वाला समजून घेण्यास अस्वस्थ होतो. आपल्या प्रकृतीत समाविष्ट संकेतांचे वाचन करण्याचा प्रयत्न करतो, जगात ज्या परिस्थितीना त्याला तोंड द्यावे लागते, त्यामागील वास्तविक कारणांचा शोध घेण्याचे तो इच्छितो. त्याच्या मनमस्तिष्कात अगणित प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे माहित करून घेण्याकरिता तो अस्वस्थ असतो, परंतु त्याची उत्तरे त्याला सापडत नाहीत.
हे प्रश्न केवळ दार्शनिक अथवा तत्वज्ञानात्मक स्वरुपाचे नाहीत, तर मानवी स्वभाव, प्रकृती आणि परिस्थितीचा तो स्वभाविक परिणाम आहे. हे असे प्रश्न आहेत, जे जगातील जवळपास प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी भेडसावत असतात. त्याची उत्तरे न मिळाल्याने कोणी वेडा होतो, कोणी आत्महत्या करून घेतो, कोणाचे उभे आयुष्य अस्वस्थतेत संपते आणि कोणी आपल्या ‘वास्तविक’ प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने संसारिक जीवनाच्या मनोरंजनात गुरफटून जातो आणि त्यामध्ये गुंग होऊन सदर मानसिक दगदगीतून सुटका प्राप्त करण्याचे इच्छितो. तो जे काही प्राप्त करू शकतो, प्राप्त करण्याच्या प्रयत्नात त्याला त्याचे विस्मरण होते जे तो प्राप्त करू शकला नाही.
सदर प्रश्नाला आपण मोजक्या शब्दामध्ये ‘अंतिम सत्याचा शोध’ म्हणून संबोधू शकतो परंतु याचे आपण विश्लेषण केले तर हा बर्याच प्रश्नांचा संग्रह असल्याचे दिसून येईल. ते प्रश्न कोणते आहेत? वेगवेगळ्या अंगानी ती प्रश्ने विचारली जाऊ शकतात परंतु सोयीकरिता मी खालील प्रमाणे तीन शीर्षकात त्यांची विभागणी करू इच्छितो.

 1. सृष्टिकर्त्याचा शोध
 2. उपास्य (माबूद - ईश्वर) चा शोध
 3. आपल्या अंतिम परिणामाचा शोध
माझ्या मतानुसार ‘सत्याचा शोध’ खरे पाहता नामाभिदान आहे त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचे. कोणत्याही शब्दात तुम्ही ते प्रश्न मांडा, वस्तुतः ते त्यांचेच परिवर्तीत स्वरुप असेल आणि याच तिन्ही सदराखाली त्यांना एकत्र केले जाणे शक्य असेल.
वर वर पाहता हे प्रश्न असे आहेत ज्याबाबत आपणास काहीही कल्पना नाही. अथवा एखाद्या पर्वताच्या माथ्याशी एखादा असा फलक लावलेला दृष्टीस पडत नाही जेथे या प्रश्नांची उत्तरे लिहून ठेवलेली असतील. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की प्रश्नातच त्याचे उत्तरही सामावलेले आहे. विश्व आपल्या वास्तवतेकडे स्वतः संकेत करीत आहे. ते आपणास निश्चित ज्ञानापर्यंत पोहचवत नसले तरी हा संकेत व इशारा अगदी स्पष्ट व अंतिम आहे. कोणत्याही प्रकारे आपणास वास्तविकतेचे ज्ञान प्राप्त झाले तर आपले अंतःकरण, खरोखर हेच सत्य आहे, याखेरीज विश्वाची अन्य काहीही वास्तवता असणे शक्य नसल्याचे कबूल करील.

 1. सृष्टिकर्त्याचा शोध
 2. सृष्टीला पाहता क्षणीच सर्वप्रथम हा प्रश्न पडतो की हिचा निर्माणकर्ता कोण आहे आणि तो कोण आहे जो या भव्य कारखान्यास चालवित आहे. जुन्या काळात लोकांचा असा समज होता की बर्याच अदृश्य शक्ती या सृष्टीरूपी कारखान्याचे स्वामी आहेत. एका मोठ्या ईश्वराच्या देखरेखीत बरेचसे लहान सहान ईश्वर त्याची व्यवस्था पहात आहेत. आज देखील बरेच जण अशाच प्रकारची विचारप्रणाली बाळगतात. परंतु युक्तिवाद आणि सिध्दांताच्या जगात आता या विचारांना मान्यता नाही. आजमितीस हा एक सजीव नव्हे तर निर्जीव दृष्टिकोन आहे.
  वर्तमान जगात जे लोक स्वतःला प्रगतीवादी, सुसंस्कृत म्हणवून घेतात आणि स्वतःला नवयुगाचा मानव म्हणून संबोधितात, ते ‘शिर्क’ अर्थात अनेकेश्वरवादाऐवजी नास्तिकता आणि संयोग सिध्दांताचे समर्थक आहेत. त्यांच्या मतानुसार हे विश्व एखाद्या विवेकी आणि जागृत अस्तित्वाची निर्मिती नाही तर आकस्मिक अपघाताचा परिणाम आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की जेव्हा एखादी घटना आकस्मिक घडते तेव्हा परिणामस्वरूप आणखी प्रतिघटना अस्तित्वात येतात. अशा प्रकारे कारण आणि कार्याची एक लांबलचक श्रृंखला सुरु होते, आणि हीच श्रृंखला ते कारण आहे जिने संपूर्ण विश्वाला गतिमान केले आहे. या विचारप्रणाली मध्ये दोन मूलभूत गोष्टी आहेत. एक ‘योगायोग’ आणि दुसरी कार्यकारण सिध्दांत ( law of Causation )
  या विचारप्रणालीनुसार आजपासून जवळजवळ दोन लाख अरब वर्षा -पूर्वी या विश्व वा सृष्टीचे अस्तित्व नव्हते. त्या समयी ना तर तारे होते ना तर ग्रह परंतु वातावरणात जड पदार्थ अस्तित्वात होता. हा जड पदार्थ त्यावेळी स्थायी स्वरुपात नव्हता. त्याचे स्वरूप इतके जटिल नव्हते तर आपल्या सरळ आणि प्रारंभिक अवस्थेत होता. अर्थात हा पदार्थ इलेक्ट्रान आणि प्रोटानच्या रुपात संपूर्ण आकाशात वा संपूर्ण वातावरणात समानरित्या पसरला होता.
  दुसर्या शब्दात सांगावयाचे झाल्यास ही संपूर्ण सृष्टी, हे पूर्ण विश्व अगदी छोट्या छोट्या कणांमध्ये अथवा सूक्ष्म परमाणूंच्या धुळीच्या धूसर लोटा समान होते. त्या समयी पदार्थ अगदी समतोल अवस्थेत होता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया, कोणत्याही प्रकारची गती नव्हती.
  गणिताच्या दृष्टीने पाहिल्यास हा समतोल असा होता की जर त्यामध्ये एखाद्याने थोडासा जरी विघ्न निर्माण केला, तर ते स्थिर राहणे शक्य नसावे, अस्थिरतेची ती श्रृंखला सुरुच रहावी. जर त्या प्रथम हालचालीस - व्यत्ययास गृहीत धरले तर त्या दृष्टिकोनानुसार तद्नंतरच्या सर्व घटना गणिती पद्धतीने सिद्ध होतात.
  असो, मग असे झाले की पदार्थरूपी या आभाळात किचितशी हालचाल झाली जसे एखाद्या हौदातील पाणी कोणी हात घालून हलवावे तसे. विश्वाच्या या शांततामय दुनियेत हा विघ्न व गती कोणी उत्पन्न केला, याबाबत काही माहिती नाही, परंतु हालचालीची क्रिया घडली आणि त्यात वृध्दी होतच गेली. गतीची एक श्रृंखला अविरत सुरु झाली. परिणामतः पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी एकत्रित गोळा होणे सुरु झाले. हाच तो एकत्रित जमलेला पदार्थ होय ज्यास आपण तारे, ग्रह आणि नक्षत्रे म्हणतो.
  सृष्टीसंबंधी सदर व्याख्या विज्ञानाने प्रस्तुत केली होती परंतु हा युक्तीवाद कमकुवत व ठिसूळ आहे, हे सत्य आहे. कारण स्वतः वैज्ञानिकांची मनःस्थितीही यावर टिकू शकली नाही. ही विचारप्रणाली, विश्वाला सर्वप्रथम कोणी क्रियाशील केले, यापासून स्वतःच अनभिज्ञ असण्याची वास्तविकता स्वीकारते आहे. तरीही सदर विचारधारा प्रस्तुत करणार्यांचा, सृष्टीला सर्वप्रथम गती देण्याच्या बाबतीत माहिती प्राप्त केल्याचा दावा आहे. त्यांच्या मतानुसार या पहिल्या क्रियेला जन्म देणार्याने नाव अपघात वा योगायोग आहे.
  प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा विश्वाच्या पोकळीत केवळ एक निष्क्रीय आणि गतिहीन पदार्थाचे अस्तित्व होते, त्याखेरीज अन्य एखादी वस्तू अस्तित्वात नव्हती, तर हा विचित्र योगायोग मध्येच कोठून टपकला ज्याने संपूर्ण सृष्टीला गतिमान करून टाकले. ज्या घटनेचे कारण ना त्या पदार्थात होते, ना त्या पदार्थाबाहेर, मग ही घटना घडली तरी कशी?
  या विचारप्रणालीचा हा एक अत्यंत मजेशीर विरोधाभास आहे की त्यामध्ये प्रत्येक घटनेच्या आधी एक घटना, प्रत्येक प्रतिक्रिये आधी एक क्रिया असण्याचे आवश्यक मानले जाते, जे नंतर घटित अथवा जारी असणार्या घटनांचे कारण बनू शकेल, परंतु या विचारप्रणालीचा आरंभ एका अशा घटनेद्वारे होतो, ज्याच्या आधी त्याचे कारण अस्तित्वात नाही. हाच तो बिनबुडाचा विचार ज्याच्या पायावर विश्वाच्या आकस्मिक जन्माच्या सिद्धांताची इमारत उभी करण्यात आली आहे.
  या विश्वाची निर्मिती योगायोगाने वा आकस्मिक झाली असेल तर मग अनिवार्यतः काय त्या दिशेचाच अवलंब करण्यास त्या घटना विवश होत्या ज्या दिशेचा त्यांनी अंगिकार केला? याव्यतिरिक्त अन्य काही घडणे शक्य नव्हते काय? काय हे संभव नव्हते की तारे परस्परात टक्कर होऊन नष्ट व्हावेत? तथाकथित पदार्थामध्ये हालचालीची क्रिया निर्माण झाल्यानंतर, ती क्रिया त्यापुरतीच मर्यादित न राहता एक विकसनशील क्रिया बनली. आणि एका आश्चर्यजनक श्रृंखलेचा आरंभ होवून सर्व क्रमबध्दता वर्तमान विश्वाला साकार करण्याकरिता गतिमान झाली, काय हे आवश्यक होते?
  शेवटी तो कोणता तर्क, कोणता लॉजिक की ज्याने तार्यांच्या निर्मिती - नंतर त्यांना अनंत अवकाशात शिस्तबद्धरित्या पद्धतशीरपणे फिरावयास लावले. मग ते कोणते लॉजिक होते ज्याने सृष्टीच्या एका उपयुक्त ठिकाणी सूर्यमालेला अस्तित्वात आणले व त्याचे स्थान निश्चित केले? तद्नंतर तो कोणता युक्तीवाद होता ज्यामुळे आपल्या पृथ्वीवर ते चमत्कारिक परिवर्तन घडले, ज्याच्या परिणामस्वरुप येथे जीवसृष्टी निर्माण होणे शक्य होऊ शकले? आणि त्या परिवर्तनांचा आजपावेतो सृष्टीतील असंख्य जगतापैकी एका जगातही थांगपत्ता लागू शकला नाही? मग तो कोणता युक्तीवाद, तर्क होता, जो एखाद्या विशिष्ट अवस्थेत पोहचून निर्जीव पदार्थापासून सजीव प्राण्यांच्या जन्मास कारणीभूत ठरला? काय या गोष्टीची एखादी न्यायोचित व्याख्या करणे शक्य आहे की पृथ्वीवर जीवन का आणि कशा प्रकारे अस्तित्वात आले? आणि ते नियमानुसार का सातत्याने निर्माण होत चालले आहे?
  मग तो कोणता तर्क होता, ज्याने विश्वाच्या एका छोट्याशा भागात चमत्कारिकरित्या त्या सर्व वस्तू निर्मिल्या, जे आपल्या जीवन, आपल्या विकास आणि आपल्या संस्कृतीकरिता आवश्यक होत्या? मग तो कोणता तर्क आहे, ज्याने ही स्थिती आपल्याकरिता शाबूत ठेवली आहे? काय निव्वळ एक योगायोग - अपघात घडणे या गोष्टीस पुरेसे कारण होते की या सर्व घटना, इतक्या सुरेख पद्धतीने आणि अगदी क्रमबध्दरित्या निरंतरपणे घडत जाव्यात आणि कित्येक अरब, खरब वर्षानुवर्षे तो क्रम सुरू रहावा आणि त्यात कोणताही फरक आढळू नये?
  मग, योगायोगाने घडणार्या घटनामध्ये हे परस्पर सहकार्य - ताळमेळीचे वैशिष्टय कोठून आले? इतक्या चमत्कारिकपणे निरंतर विकास साधणेची प्रवृत्ती त्यामध्ये कशी काय आली, या गोष्टीची खरोखर एखादी व्याख्या केली जाऊ शकते का?
  या विश्वाची निर्मिती कशी झाली? या प्रश्नाचे हे उत्तर होते. तद्नंतर हा प्रश्न उद्भवला की या सृष्टीला चालविणारा कोण आहे? तो कोण आहे जो या महान व विशाल कारखान्यास इतक्या व्यवस्थितरित्या गतिशील ठेवित आहे? तत्संबंधी व्याख्या अशा प्रकारची आहे की दोन ईश्वराखेरीज त्याचे काम चालत नाही, कारण प्रारंभिक अवस्थेत हालचालीची क्रिया अथवा गतिला योगायोग म्हटले जाऊ शकते, परंतु तद्नंतरच्या निरंतर गतीला कोणत्याही परिस्थितीत योगायोग वा संयोग म्हटले जाणे अशक्य आहे. सदर व्याख्येनुसार दुसर्या ईश्वराचा शोध घेतला पाहिजे.
  हा पेच सोडविण्याकरिता कार्यकारण सिद्धांत (Principle of Causation) प्रस्तुत करणेत आला. याचा अर्थ असा की पहिल्या हालचालीच्या क्रियेनंतर विश्वामध्ये कारण आणि कार्याची एक श्रृंखला सुरु झाली आहे. त्यानुसार एका पाठोपाठ घटना घडत चालल्या आहेत, अगदी त्याप्रमाणे जसे बालकांनी अनेक विटा रचाव्या, एखादी मधली वीट पाडावी आणि तद्नंतर सर्व विटा आपोआप कोसळू लागाव्यात. ज्या घटना घडतात, त्याचे कारण विश्वाच्या बाहेर कोठे अस्तित्वात नाही तर अनियंत्रित नियमांतर्गत त्या आधीच्या घटनांचाच तो अपरिहार्य परिणाम तसेच त्या आधीच्या घटना देखील त्यांच्या तत्पूर्वीच्या घटनांचा अपरिहार्य परिणाम होत.
  अशा प्रकारे विश्वामध्ये कारण आणि कार्य व क्रिया - प्रतिक्रियेचा एक अखंड क्रम सुरु झाला आहे येथपावेतो की ज्या स्वरुपात सृष्टीच्या इतिहासाचा प्रारंभ झाला, त्यांने भावी घटनांचीही निश्चिती करून टाकली. जेव्हा विश्वाचे प्राथमिक स्वरुप एकदा निश्चित झाले तेव्हा निसर्ग देखील एकाच मार्गावर भ्रमण करण्यास विवश होते. अर्थात विश्व ज्या दिवशी जन्मले, त्याच दिवशी त्याच्या भावी दिनाची निश्चिती झाली.
  उपरोक्त सिध्दांताला निसर्गाचा पायाभूत नियम ठरविणे सतराव्या शतकातील सर्वात मोठी घटना होती. या अनुषंगाने संपूर्ण सृष्टीला एक यंत्र सिद्ध करण्याच्या आंदोलनास सुरूवात झाली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या आंदोलनाने आपली चरम सीमा गाठली. हा काळ वैज्ञानिक इंजिनिअरांचा काळ होता. शास्त्रज्ञ, निसर्गाचे यांत्रिक मॉडेल बनवू पहात होते. त्याच समयी हेल्म होल्टज् (Helm Holtz) ने म्हटले होते, ‘‘सर्व प्राकृतिक विज्ञानांचे अंतिम ध्येय स्वतःला यांत्रिकी (चशलहरळिली) मध्ये रुपांतरित करणे आहे.’’ जेव्हा की या नियमांतर्गत विश्वातील सर्व वस्तूंच्या व्याख्या निश्चित करण्यात अद्याप वैज्ञानिकांना यश प्राप्त झाले नव्हते, तरी विश्वाची व्याख्या यांत्रिक पध्दतीने केली जाऊ शकते, यावर त्यांचा विश्वास होता. त्यांना वाटत होते की केवळ थोड्याशा प्रयत्नांची गरज आहे, तद्नंतर संपूर्ण विश्व एक चलत यंत्र सिद्ध होईल.
  मानवी जीवनाशी उपरोक्त गोष्टींचा संबंध पूर्णतः स्पष्ट होता. कार्यकारण सिद्धांत आणि विश्वाची यांत्रिक व्याख्या पाहता मानव लाचार ठरतो, मानवाची शक्ती आणि त्याच्या सामर्थ्यावर विश्वास बाळगणे कठिण होते. जर हा नियम पूर्णतः निसर्गावर आच्छादलेला असल्यास मानवी जीवन त्यापासून कसे सुरक्षित राहू शकते?
  उपरोक्त विचारसरणीने सतराव्या व अठराव्या शतकातील यांत्रिक तत्वज्ञानाला जन्म दिला. जेव्हा सजीव पेशी (Living Cell) देखील निर्जीव पदार्थाप्रमाणे केवळ रासायनिक तत्वानी बनले असल्याचा शोध लागला तेव्हा प्रश्न उद्भवला की ज्या विशिष्ट मूलतत्वानी आपले शरीर व मेंदू बनले आहे, ते या कार्यकारण सिध्दांताच्या कक्षेबाहेर असणे कसे काय शक्य आहे ?
  शेवटी असा अनुमान लावला गेला किबहुना जोरदारपणे दावा करणेत आला की जीवन देखील एक यंत्र आहे. एवढेच नव्हे तर न्यूटन, बाख (Bach) आणि माइकल एंजिलो (Michel Angelo)यांच्या मेंदू आणि छपाई मशीन मध्ये फारसा फरक नव्हता याखेरीज की त्यांच्या मेंदूची संरचना कमी जास्त प्रमाणात अधिक गुंतागुंतीची होती आणि बाह्य प्रेरणांचे पूर्णतः उत्तर देण्याचेच केवळ त्यांचे कार्य होते, असेही म्हटले गेले.
  परंतु विज्ञान अशा प्रकारच्या अत्यधिक व समतोल सिध्दांताना आज मान्यता देत नाही. सापेक्षता सिध्दांत (Theory of Relativity) सदर नियमा - (कार्यकारण नियम) स एक धोका संबोधितो. यास तो भ्रम (Illusion) ची उपमा देतो. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटास, निसर्गातील बर्याच गोष्टी विशेषकरून प्रकाश आणि गुरुत्वाकर्षण, सृष्टीच्या यांत्रिक व्याख्येचे उच्चाटन करीत असल्याचे विज्ञानाला पटले होते. काय एखादे असे यंत्र बनविणे शक्य आहे ज्याद्वारे न्यूटनचे चितन, ‘बाखची भावनिकता आणि माइकल एंजिलोच्या कल्पना शक्तीचे पुनरुज्जीवन करता यावे, या चर्चा अद्याप झडत होत्या, तरी दिव्याचा प्रकाश आणि सफरचंदाचे खाली पडणे, याची पुनरावृत्ती मशीन करू शकत नाही, यावर वैज्ञानिकांचा जलद गतीने विश्वास बसत चालला होता.
  प्राचीन विज्ञानाने संपूर्ण विश्वासानिशी घोषित केले होते की निसर्ग, केवळ एकाच मार्गाचा अवलंब करू शकते, जो प्रथम दिनापासून कार्यकारणच्या निरतंर श्रृंखले अंतर्गत अंतापर्यंत निश्चित झालेला आहे, परंतु सरतेशेवटी विश्वाचा भूतकाळ इतक्या अटळपणे त्याच्या भविष्याचे कारण नव्हे, जसे पूर्वी समजले जात होते, हे विज्ञानाला स्वतः मान्य करणे भाग पडले. आता बहुतेक वैज्ञानिकांचे नव्या माहिती आधारे, आमचे ज्ञान आम्हास एका अयांत्रिकी (Non-Mechanical Reality) सत्याकडे नेत असल्याच्या गोष्टीवर एकमत आहे.१
  विश्वाचा जन्म आणि त्याच्या गती बाबत हे दोन्ही दृष्टीकोन ज्यांचा विज्ञानाच्या प्रगतीबरोबरच जन्म झाला होता, आजपावेतो खात्रीलायक मर्यादा गाठू शकले नाहीत. नवनवीन शोध त्यांचा पाया भक्कम करण्याऐवजी आणखी कमकुवत करीत आहेत. अशा प्रकारे विज्ञान स्वतःच उपरोक्त दृष्टिकोनाचे खंडन करीत चालले आहे. आता माणूस पुनश्च त्या उंबरठ्यावर येऊन पोहचला आहे, जे त्यज करून त्याने आपला प्रवास सुरु केला होता. आमच्या पुढ्यात पुनश्च हा प्रश्न आहे की विश्वाला कोणी निर्माण केले आणि कोण त्याचा चालक आहे?


 3. उपास्य (माबूद) चा शोध
 4. ही होती सृष्टीकर्त्याच्या शोध विषयक समस्या. यानंतर दुसरी गोष्ट जो मनुष्य जाणू इच्छितो, ती ही की ‘माझा उपास्य कोण आहे? तो कोण आहे ज्याच्यापुढे मी माझे सर्वकाही समर्पण करावे?’
  जीवनात एक प्रकारची पोकळी, शून्यत्व असल्याची आपणास स्पष्टरित्या जाणीव होत असते. परंतु ही पोकळी वा शून्यत्व कशा प्रकारे भरून काढायचे हे आपणास माहित नाही. याच पोकळीच्या जाणीवेस मी ‘उपास्य (माबूद) चा शोध’ म्हटले आहे. सदर पोकळीची अनुभूती दोन प्रकारे होत असते.
  आपले अस्तित्व आणि बाह्य जगताचे जेव्हा आपण निरिक्षण करतो तेव्हा दोन तीव्र स्वरुपाच्या भावना आपल्या अंतर्मनातून प्रकट होतात. पहिली आभार व कृतज्ञतेची आणि दुसरी दुबळेपणा व विनम्रतेची.
  जीवनात आपण जेथे कोठेही दृष्टिक्षेप टाकतो, तेव्हा आपले जीवन कोणाच्या तरी उपकाराने आच्छादले असल्याचे स्पष्टरित्या आपणास दिसून येते. हे पाहून ते प्रदान करणार्याच्या प्रती आपल्या अंतर्मनात अथांग कृतज्ञता व आभाराची भावना ओसंडू लागते आणि आपण आपल्या सर्व अमूल्य श्रद्धा - धारणा आपल्या उपकारकर्त्याच्या प्रती व्यक्त करू इच्छितो.
  याचा शोध, आपल्याकरिता केवळ एका तत्वज्ञानाची गोष्ट नाही तर आपल्या मानसशास्त्राशी त्याचा घनिष्ट संबंध आहे. हा प्रश्न केवळ एका बाह्य समस्या निराकरणा संदर्भातला नाही तर ती आपल्या अंतर्मनाची तहान आहे. आपले पूर्ण अस्तित्व त्या प्रश्नाचे उत्तर मिळवू इच्छिते.
  जरा विचार करा, मनुष्याच्या स्व-प्रयत्नांचा कोठेही अंतर्भाव नसतानाही तो या विश्वामध्ये स्थायी घटनेच्या रुपात उपस्थित आहे, या सत्यतेकडे एक सूज्ञ व्यक्ती डोळेझांक करू शकते का? मनुष्य स्वतःला एका अशा शरीरात पहात आहे ज्याची त्याहून उत्कृष्ट शरीराची तो कल्पना देखील करू शकत नाही, जेव्हा की शरीराची निर्मिती त्याने स्वतः केली नाही. त्यास अशा चमत्कारिक बौद्धिक क्षमता दिल्या गेल्या आहेत, ज्या अन्य प्राणीमात्रांना प्राप्त नाहीत.यद्यपि त्या क्षमता प्राप्त करण्याकरिता त्याने काहीच केलेले नाही वा करू शकत नाही. आपले अस्तित्व खासगी नव्हे तर ती एक भेट वस्तू आहे. ही भेटवस्तू कोणी दिली आहे ? त्या महान उपकारकर्त्याचे आभार प्रदर्शन करता येणे शक्य व्हावे याकरिता मानवी अंतर्मन त्या प्रश्नाचे उत्तर शोधते.
  आता आपल्या शरीराबाहेर डोकावून पहा. जगात आपण या अवस्थेत जन्मतो की आपल्यापाशी स्वतःचे असे काहीच नसते, ना तर विश्वावर आपला एखादा अधिकार चालतो की ज्यायोगे आपल्या आवश्यकतेनुसार त्यास बनविणे शक्य व्हावे. आपल्या हजारो प्रकारच्या गरजा आहेत परंतु एखादी गरज सुद्धा आपणहून पूर्ण करू शकत नाही. या जगात आश्चर्यकारकरित्या आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्याची व्यवस्था केली गेली असल्याचे आपण पाहतो. असे वाटते जणू विश्व आपल्या सर्व साधनानिशी मनुष्य जन्माची प्रतिक्षा करीत असावे जेणेकरून त्याच्या सेवेत रूजू होता यावे. उदाहरणार्थ ध्वनी घ्या ध्वनीच्या माध्यमाने आपण आपले म्हणणे दुसर्यापर्यंत पोहचवतो. हे कसे शक्य झाले की आपल्या मस्तिष्कात निमार्ण होणारे विचार जिव्हेचे स्पंदन रूपाने दुसर्याच्या कानापर्यंत पोहचावेत आणि त्याने समजण्यायोग्य ध्वनी रूपात त्यास ऐकू शकावे? याकरिता आपल्या अंतर्गत व बाह्य जगतात असंख्य व्यवस्था करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक मधले माध्यम आहे ज्यास आपण हवा म्हणतो. आपण जे शब्द उच्चारतो, ते ध्वनी विशिष्ट लहरींच्या रूपात हवेवर, जसे पाण्याच्या पातळीवर लहरी उत्पन्न होत असतात व त्याचे प्रसरण होत असते, त्याप्रमाणे तरंगत असतात.
  माझ्या तोंडून निघालेला ध्वनी तुम्हापर्यंत पोहचण्याकरिता दोहोदरम्यान हवा उपस्थित असणे गरजेचे आहे. हवेचे हे माध्यम दोहोदरम्यान नसल्यास तुम्ही माझ्या ओंठाची हालचाल पहाल परंतु माझा आवाज ऐकू शकणार नाही. उदाहरणार्थ एका काचेच्या बंद कंदिलात विद्युत बेल ठेवून वाजवली गेली तर त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येईल परंतु त्या कंदिलातील हवा पूर्णतः काढून टाकल्यास व नंतर बेल वाजविल्यास काचेच्या आत घंटी वाजत असल्याचे तर तुम्ही पहाल परंतु त्याचा आवाज काहीच ऐकू येणार नाही. कारण घंटी वाजल्याने जे स्पंदन निर्माण होते, ते ग्रहण करून तुमच्या कानापर्यंत पोहचविण्याकरिता कंदिलात हवेचे अस्तित्व नाही.
  परंतु हे माध्यम देखील पुरेसे नाही कारण हवेच्या माध्यमाने तर आपला ध्वनि पाच सेकंदात केवळ एक मैलाचे अंतर कापतो. याचा अर्थ असा की हवेचे माध्यम केवळ निकटच्या वातावरणात बोलणीकरिता उपयुक्त - गुणकारी असते. ते आपला आवाज दूरपर्यंत पोहचवू शकत नाही. जर ध्वनी निव्वळ हवेच्या माध्यमाने पसरला असता तर त्यास एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचविणे शक्य झाले नसते. याकरिता निसर्गाने आपणास एक अत्यंत द्रूतगतीचे साधन उपलब्ध करून दिले आहे. ते साधन म्हणजे प्रकाश अथवा विद्युत तरंग होय, ज्याची गती एक लाख श्याएशी हजार मैल प्रति सेकंद आहे. बिनतारी (Wireless) संदेश माध्यमात याच साधनांचा उपयोग केला जातो. जेव्हा एखादी व्यक्ती आकाशवाणी केंद्रात लावण्यात आलेल्या माइक्रोफोन समोर आवाज करते तेव्हा माइक्रोफोन तो ध्वनी ग्रहण करून त्याचे विद्युत लहरी मध्ये रूपांतर करतो आणि तारेद्वारे तो प्रसारण यंत्र वा ट्रान्समीटरपर्यंत धाडतो. ट्रान्समीटर कंपन पावून वायूमंडलात तेच कंपन निर्माण करते. अशा प्रकारे पाच सेकंदात एक मैलाचा पल्ला गाठणारा ध्वनी, विद्युत लहरीत रूपांतरित होऊन जवळपास दोन लाख मैल प्रति सेकंदाची गती प्राप्त करतो आणि क्षणार्धात संपूर्ण जगात प्रसरण पावतो. याच बिनतारी लहरीना आपल्या रेडिओ संचातील मशीन ग्रहण करते आणि स्पष्ट आणि उच्च स्वरात तिचा पुनरुच्चार करते. मग हजारो मैल अंतरावरून बोलण्यात आलेल्या आवाजास आपण त्या क्षणीच ऐकू लागतो.
  हे त्या अगणित व्यवस्थापैकी एक होय. त्याचे वर्णन मी केलेले नाही तर केवळ नावापुरता उल्लेख केला आहे. जर त्याचे आणि अन्य बाबींचे तपशीलवार वर्णन करावयाचे झाल्यास त्याकरिता हजारो पाने कमी पडतील आणि तरीही त्याचे वर्णन संपणार नाही.
  हे उपकार आणि सुख सुविधा ज्याचा मनुष्य प्रत्येक समयी उपभोग घेत आहे, याविना भूतलावर मानवी जीवन आणि संस्कृतीची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. हे सर्व त्याच्याकरिता कोणी उपलब्ध केले आहे, हे जाणून घेण्याची मानवाची इच्छा आहे. प्रत्येक क्षणी जेव्हा तो एखाद्या उपकार वा देणगीने लाभान्वित होतो तेव्हा त्याच्या अंतर्मनात आभार व कृतज्ञतेच्या भावना निर्माण होतात आणि आपल्या उपकारकर्त्याला भेटून स्वतःला त्याच्या चरणी झोकून द्यावे असे त्याला मनापासून वाटते. उपकारकर्त्याचे उपकार मानणे, त्याला आपल्या हृदयात खोलवर स्थान देणे आणि आपल्या उदात्त व श्रेष्ठतम भावना त्याच्यासमोर समर्पित करणे, ही मानवी प्रकृतीची शुध्द व उदात्त भावना आहे. मानवी स्वभावातील ही सभ्य भावना आहे. प्रत्येक मनुष्य जो आपल्या जीवन आणि या जगतावर विचार चितन करतो, त्याच्या अंतर्मनात ही भावना तीव्रतेने उत्पन्न होते. मग काय या भावनांचे उत्तर काहीच असू नये? काय या विश्वात मनुष्य एक अनाथ बालक आहे,ज्याच्या अंतःकरणात उत्पन्न होणार्या प्रेम आणि समर्पणाच्या भावना तृप्तीकरिता एखादे अस्तित्व उपस्थित नसावे ? काय हे असे विश्व आहे, जेथे उपकार व देणग्या तर असाव्यात परंतु उपकारकर्त्याचा थांगपत्ता नसावा, जेथे भावना आहेत, परंतु भावनांच्या तृप्तीचे एखादे साधन नसावे?
  उपास्याचा शोधासंबंधीचा हा एक पैलू आहे. मानवाचे स्थान व त्यास संबंधित परिस्थितीची निकड आहे की या सृष्टीमध्ये त्याचा एखादा आधार असावा, हा दुसरा पैलू होय. डोळे उघडून पाहिले तर या जगात आपण अगदी क्षुद्र व लाचार प्राणी असल्याचे आढळेल. जरा त्या अवकाश पोकळीची कल्पना करा, ज्यामध्ये आपली ही पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करीत आहे. तुम्हास माहित आहे की पृथ्वीचा वर्तुळाकार सुमारे पंचवीस हजार मैल एवढा आहे, आणि एखाद्या उसळणार्या भोवर्यासमान तो आपल्या आसाभोवती निरंतर अशा प्रकारे भ्रमण करीत आहे की प्रत्येक चोवीस तासात त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. अर्थात पृथ्वीची गती जवळपास एक हजार मैल प्रति तास आहे. त्याचबरोबर ती सूर्याभोवती अठरा करोड साठ लाख मैल लांबच्या कक्षेत अत्यंत द्रूतगतीने भ्रमण करीत आहे.
  अवकाश पोकळीत इतक्या द्रूतगतीने भ्रमण करणार्या पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकविण्याकरिता पृथ्वीच्या गतीला एका विशिष्ट प्रमाणबद्धतेत ठेवण्यात आले आहे. असे जर नसते तर पृथ्वीतलावर मनुष्याची अवस्था एका चालत्या चक्रावर बारीक खडी ठेवण्या समान झाली असती. त्याचबरोबर दुसरी सोय ही करण्यात आली आहे की पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपणास धरून ठेवले आहे आणि वरून हवेचा प्रचंड दाब आहे. हवेद्वारे जो दबाव पडत आहे. तो शरीराच्या प्रतिवर्ग इंचावर पंधरा पौंड इतका आहे, अर्थात एका सर्वसाधारण मनुष्याच्या संपूर्ण शरीरावर सुमारे २८० मनाचा दबाव आहे. या चमत्कारीक व्यवस्थेने आपणास अवकाशात निरंतर भ्रमण करणार्या पृथ्वीवर प्रत्येक बाजूनी टिकवून ठेवले आहे.
  मग जरा सूर्या संबंधी विचार करा. सूर्याचा गोलाकार आठ लाख पासष्ट हजार मैल आहे, याचा अर्थ असा की तो आपल्या पृथ्वीच्या मानाने दहा लाख पटीने मोठा आहे. हा सूर्य ज्वालांचा धगधगता समुद्र आहे. त्याच्या जवळपास कोणतीही वस्तू स्थायी स्वरूपात राहू शकत नाही. पृथ्वी आणि सूर्या दरम्यान सद्य समयी सुमारे साडे नऊ करोड मैलाचे अंतर आहे. यदाकदाचित तो याच्या निम्म्या अंतरावर असता तर सूर्याच्या उष्णतेने वस्तू पाघळण्यास सुरुवात झाली असती, अथवा तो चंद्राच्या ठिकाणी म्हणजे दोन लाख चाळीस हजार मैल अंतरावर आला तर पृथ्वी पाघळून बाष्पात तिचे रूपंातर होईल. हाच तो सूर्य आहे, ज्याच्या मेहरबानीने पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. या हेतुकरिता त्यास एका विशिष्ट अंतरावर ठेवण्यात आले आहे. जर तो दूर गेला तर जमीन बर्फ बनून राहील आणि जवळ आला तर आपल्या सर्वांची राखरांगोळी होऊन जाईल.
  मग विश्वाचा विस्तार व फैलावाकडे नजर टाका. आणि त्या गुरुत्वाकर्षण शक्तीकडे पहा जिने या महान विश्वाला सांभाळून ठेवले आहे. विश्व एक अमर्याद विशाल कारखाना आहे. प्रकाशाचा वेग एक लाख श्याएशी हजार मैल प्रति सेकंद आहे. विश्वाला चोहोबाजूनी एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यात कित्येक अरब वर्षे लागतील, असा खगोल शास्त्रीय दृष्टिकोनाने विश्वाच्या विशालतेचा अनुमान आहे. ही सूर्यमाला ज्यामध्ये आपली पृथ्वीही समाविष्ट आहे, दिसण्यात प्रचंड मोठी असल्याचे वाटते परंतु संपूर्ण विश्वाच्या मानाने तिचे स्थान नगण्य आहे. विश्वामध्ये याहूनही मोठमोठाले असंख्य तारे असीम विस्तारित स्वरूपात पसरले आहेत. ज्यापैकी बरेच इतके मोठे आहेत की आपली संपूर्ण सूर्यग्रहमाला त्याच्यावर ठेवली जाऊ शकते. ज्या गुरुत्वाकर्षण शक्तीने या अगणित जगतांना सांभाळून ठेवले आहे, तिच्या महानतेची कल्पना अशा प्रकारे केली जाऊ शकते की सूर्य ज्या अभूतपूर्व शक्तीनिशी पृथ्वीला स्वतःकडे खेचत आहे आणि तिला अनंत अवकाशात पडून नष्ट होण्यापासून रोखत आहे, ती अदृश्य शक्ती इतकी प्रचंड शक्तीशाली आहे की जर या हेतुकरिता एखाद्या भौतिक वस्तूने पृथ्वीला बांधावे लागले असते तर गवत जसे जमिनीला आच्छादून टाकते तसे धातूंच्या तार्यांनी पृथ्वीचे भूतल झाकोळून गेले असते.
  आपले जीवन पूर्णतया अशा शक्तीवर निर्भर आहे ज्यावर आपले प्रभुत्व नाही. मानवी जीवनाकरिता जगामध्ये ज्या व्यवस्था व सोयी आहेत आणि ज्या नसल्याने मानवी जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही, त्या इतक्या उच्च पातळीवर होत आहेत आणि त्या अस्तित्वात आणण्याकरिता इतक्या असाधारण शक्ती हव्यात की मनुष्य स्वतः त्या अस्तित्वात आणण्याची कल्पना देखील करू शकत नाही. सृष्टिकरिता जी कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे ती निश्चित करणे तर दूर राहो, त्याचे नियंत्रण करणे देखील मनुष्याच्या आवाक्याबाहेर आहे. विश्वातील अन्यसाधारण शक्ती त्याचेशी ताळमेळ सहकार्य केल्या नाहीत तर तो जमिनीवर टिकूच शकणार नाही, मग जमिनीवर एका सुसंस्कृत जीवनाची निर्मिती तर दूरवरची गोष्ट आहे, हे तो पाहतो आहे.
  अशा एका विश्वात जेव्हा मनुष्य आपल्या तुच्छ अस्तित्वाला पाहतो तेव्हा स्वतःला तो इतका जास्त लाचार अनभवु लागतो जसे समुद्राच्या लाटामध्ये एक मुंगी स्वतःचा जीव वाचविण्याकरिता धडपडत असते. या अथांग विश्वात त्याचा आधार बनू शकणारा कोणी असावा, अनायासे तो इच्छितो. तो एका अशा अस्तित्वाचा आश्रय शोधू इच्छितो, जे विश्वाच्या शक्ती पेक्षाही उच्चतर असेल आणि ज्याच्या आश्रयाखाली आल्यानंतर तो स्वतःस सुरक्षित अनभवु शकेल.
  या दोन भावना आहेत, ज्याना मी ‘उपास्य (माबूद) चा शोध’ हे नाव दिले आहे. उपास्याचा शोध वस्तुतः एक स्वाभाविक भावना आहे, ज्याचा अर्थ एका अशा अस्तित्वाचा शोध आहे जे मानवाच्या प्रेम आणि श्रद्धेचे केंद्र बनू शकेल. आधुनिक युगात मानवाच्या या तहानेला उत्तर म्हणून राष्ट्र - लोकसमुह, देश आणि राज्याला प्रस्तुत केले गेले आहे. आपले राष्ट्र, आपला देश आणि आपल्या राज्याला तुमच्या श्रद्धा-निष्ठेच्या केंद्रस्थानाचा दर्जा द्या असे नवीन संस्कृती सांगते. तसेच त्यानाच तुमच्या आत्मीयतेचा आधार बनवा, असे म्हणते. या गोष्टींना उपास्याच्या नावाखाली प्रस्तुत केले जात नाही. परंतु व्यवहारात त्याना जे स्थान प्राप्त आहे, ते जवळजवळ तसेच आहे जसे वास्तविकपणे एका उपास्याकरिता असले पाहिजे.
  परंतु उपरोक्त गोष्टींना उपास्याचे स्थान बहाल करणे म्हणजे अगदी तसेच आहे जसे एखाद्याला जीवन साथी हवा असेल आणि त्याच्या हाती तुम्ही एक दगडशिला सोपवून टाकावी. मानवामध्ये शोधाची जी भावना डोके वर काढते, त्याची कारणे मानवी अंतःकरणात अगदी खोलवर रूजली आहेत, हे स्पष्ट आहे. तो एका अशा अस्तित्वाच्या शोधात आहे ज्याने संपूर्ण विश्व व्यापले असावे. सदर इच्छेचे उत्तर एखाद्या भौगोलिक सीमाक्षेत्रात मिळणे अशक्य आहे. राष्ट्रभक्तीच्या या गोष्टी जास्तीत जास्त एका समाज निर्मितीकरिता सहाय्यक असू शकतात परंतु मानवाच्या उपास्या संदर्भातील असणार्या त्या तहान व भावनेची त्या तृप्ती करू शकत नाहीत. त्याकरिता एका विश्वव्यापी अस्तित्वाची गरज आहे. आपल्या श्रद्धा व प्रेमभावनेचे केंद्ररूपात मानवाला एक असे अस्तित्व हवे आहे ज्याने जमीन व आकाश निर्मिले आहे. स्वतःच्या आश्रयाकरिता त्याला एका अशा शक्तीचा शोध आहे, जी कोणाची गरजू-मोताद नसावी, जी संपूर्ण सृष्टीची सत्ताधीश असावी. जोपर्यंत मनुष्याला असे एखादे अस्तित्व भेटत नाही, तोपर्यंत त्याच्यातील शून्यत्व - पोकळी वा एकांतवास यथावत शिल्लक राहील, कोणत्याही अन्य गोष्टीने ते भरून निघणार नाही.

 5. अंतिम परिणामाचा शोध
 6. सत्याच्या शोधासंदर्भात तिसरा भाग आहे आपला शेवट अथवा आपल्या अंतिम परिणामाचा शोध. आपण कोठून आलो आहे व कोठे जाणार आहोत हे जाणून घेण्याची मानवाची इच्छा आहे. आपल्या अंतःकरणात अनेक इच्छा आकांक्षा, अनेक अभिलाषा तो बाळगतो. या इच्छा आकांक्षा आणि या अनंत अभिलाषा कशा प्रकारे पूर्ण होतील, हे तो जाणू इच्छितो. या वर्तमान मर्यादित जीवनाव्यतिरिक्त एक दीर्घकालीन जीवन त्यास हवे आहे परंतु ते कोठे भेटेल याबद्दल तो अनभिज्ञ आहे. त्याच्या आतमध्ये बर्याच नैतिक भावना आणि मानवी संवेदना आहेत ज्याना या जगात वाईट प्रकारे पायदळी तुडविले जात आहे. काय आपण आपल्या पसंतीची दुनिया कधीच प्राप्त करू शकणार नाही ? असा प्रश्न त्याच्या अंतर्मनात निर्माण होतो. हे आणि अशा प्रकारचे प्रश्न मानवी अंतर्मनातून कशा प्रकारे उसळत असतात आणि विश्वाचे निरीक्षण अध्ययन कशा प्रकारे त्याच्या मनमस्तिष्कात हे प्रश्न उभे करतात, याचे या ठिकाणी थोडे तपशीलवार वर्णन करणे उचित ठरेल.
  जीवशास्त्रज्ञांच्या मतानुसार मनुष्य, आपल्या सद्य रूपात तीन लाख वर्षापासून पृथ्वीवर अस्तित्व करून आहे. याच्या तुलनेने विश्वाचे आयुष्य हे फार जास्त आहे, अर्थात दोन लाख अरब वर्षे. या आधी विश्व, विद्युत कण रूपी एका धुळीच्या धूसर लोटासमान होते, तद्नंतर त्यामध्ये हालचालीची क्रिया घडली आणि पदार्थ वाह्त जाऊन भिन्न भिन्न ठिकाणी साचण्यास सुरुवात झाली. हाच तो साठलेला पदार्थ आहे ज्यास आपण तारे, ग्रह वा नक्षत्र संबोधितो. पदार्थाचे हे अवशेष गॅसरूपी भयानक गोळ्याच्या रूपात अगणित युगानुयुगे आकाशात भ्रमण करीत राहिले. सुमारे दोन अरब वर्षापूर्वी असे घडले की विश्वामधील कोणता तरी मोठा तारा भ्रमण करीत करीत सूर्याच्या जवळ येऊन ठेपला, जो त्या समयी आजच्या पेक्षा आकाराने फार मोठा होता. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे ज्याप्रमाणे समुद्रात उंचच्या उंच लाटा निर्माण होतात, तसे त्या दुसर्या तार्याच्या आकर्षणाने आपल्या सूर्यावर एक फार मोठे वादळ निर्माण झाले, जबरदस्त लाटा निर्माण झाल्या, ज्या हळूहळू जास्त उंच होत गेल्या आणि या आधी की तो तारा सूर्यापासून दूर हटू लागावा, त्याची आकर्षण शक्ती इतकी जास्त वाढली की सूर्याच्या त्या प्रचंड गॅसरूपी लाटा पैकी काही भाग विलग होऊन एका झटक्यासरशी अवकाशात दूरवर निघून गेला. नंतरच्या काळात थंड झाल्यानंतर हेच सूर्यमालेचे सदस्य बनले. सद्य समयी हे सर्व निखळलेले भाग सूर्याभोवती परिभ्रमण करीत आहेत आणि त्यापैकीच एक आपली पृथ्वी होय.
  सुरुवातीस पृथ्वी एका ज्वालाग्रही रूपात सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत होती, तद्नंतर वातावरणात निरंतर उष्मा सोडल्याने थंड होण्यास सुरुवात झाली. ही प्रक्रिया करोडो वर्षापर्यंत चालू राहिली. सरतेशेवटी पृथ्वी अगदी थंड झाली. तरीही सूर्याची उष्णता पृथ्वीवर पडत असल्याने वाफा निर्माण होण्याची क्रिया सुरु झाली आणि ढगांच्या स्वरुपात वायू मंडलावर ती वाफ आच्छादली गेली. तद्नंतर या ढगांचा वर्षाव सुरु झाला आणि पृथ्वी पाण्याने भरून गेली. पृथ्वीच्या पृष्ठभाग तर थंड झाला होता. परंतु तिचा आतील भाग अद्यापही उष्ण - गरम होता. त्याचा असा परिणाम निघाला की पृथ्वी आकुंचन पावू लागली. परिणामस्वरुप पृथ्वीच्या तळातील उष्ण वायुरूपी द्रव्यावर दबावात वाढ झाली आणि ते बाहेर पडण्यास उतावीळ झाले. थोड्या थोड्या अवधीने जमीन दुभंगू लागली. ठिकठिकाणी भेगा पडू लागल्या. अशा प्रकारे सागरी वादळे, भयानक भूकंप आणि आगी ओकणारे स्फोट यामध्ये हजारो वर्षे निघून गेली. याच भूकंपामुळे पृथ्वीचा काही भाग वरती उसळून आला आणि काही भाग खाली दाबला गेला. दबलेल्या खालच्या भागात पाणी साचले आणि ते समुद्र बनले. वरती आलेल्या पृष्ठ भागानी द्वीप आणि महाद्वीपांचे रूप धारण केले. कोठे कोठे तर हे उंचवटे इतके वरती आले की जणू उंचच्या उंच लाटा निर्माण झाल्या असाव्यात. जगातील ही पहिली पर्वते होत.
  भूगर्भशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनानुसार एक अरब तेवीस करोड वर्षापूर्वी प्रथमतः पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती झाली. लहान सहान जंतूंच्या रूपात पाण्याच्या किनार्यावर यांचा जन्म झाला. तद्नंतर भिन्न भिन्न प्रकारचे जीवजंतू जन्मत राहिले व नष्ट होत गेले. कित्येक हजार वर्षापर्यंत जमिनीवर केवळ पशू प्राणी यांचे अस्तित्व राहिले. त्यानंतर समुद्री रोप आढळू लागले आणि जमिनीवरही गवत पसरण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे दीर्घ कालावधीपर्यंत असंख्य घटना घडत राहिल्या येथपर्यंत की मानवी जीवनाकरिता अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि भूतलावर मनुष्याचा जन्म झाला.१
  उपरोक्त विचारसरणीनुसार मानवी जीवनाचा आरंभ गेल्या तीन लाख वर्षापूर्वी झाला आहे. हा अवधि अत्यंत कमी आहे. वेळ कालावधीचा जो दीर्घ पल्ला सृष्टीने गाठला आहे, ते पाहता मानवाचा इतिहास डोळ्याच्या पापण्या लवविण्यापेक्षाही जास्त लांबचा नाही. मग व्यक्तिशः एका मानवाकडे पाहिल्यास एका मनुष्याच्या आयुष्याची सरासरी शंभर वर्षापेक्षाही जास्त नसल्याचे दिसून येईल. एकीकडे हा प्रसंग डोळ्यासमोर ठेवा आणि मग या विश्वामध्ये मानवापेक्षा श्रेष्ठतर अशा एखाद्या अस्तित्वाचा शोध लागू शकलेला नाही, ही सत्यता पहा.
  पृथ्वी आणि आकाशाच्या कित्येक अरब खरब वर्षांच्या कालानंतर जी उत्कृष्ट निर्मिती अस्तित्वात आली आहे, ती म्हणजे मानव होय. परंतु हे चमत्कारिक अस्तित्व मानव ज्याचे जगात सर्वोच्च स्थान आहे, जो जगातील सर्व विद्यमान वस्तूंपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, त्याचे आयुष्य हे मोजक्या वर्षाचेच आहे. ज्यांचे अस्तित्व जड पदार्थानी बनले आहे, त्यांचे आयुष्य कित्येक करोडो वर्षांचे असावे आणि आपल्या मृत्यूनंतरही ते शिल्लक रहावेत, परंतु या आधि - भौतिक जड पदार्थांच्या संयोगाने ज्या श्रेष्ठ अस्तित्वाची निर्मिती होते, तिचे आयुष्य केवळ शंभर वर्षे असावे. सृष्टीचा जो सार, परिणाम आहे, सृष्टीपेक्षाही त्याचे वय कमी आहे. विश्वाच्या दीर्घकालीन इतिहासात असंख्य घटना, क्रिया - प्रतिक्रिया काय एवढ्याकरिताच घडल्या होत्या की एका मानवाला काही दिवसाकरिता जन्म देऊन नष्ट करून टाकले जावे?
  पृथ्वीवर आजमितीस जेवढी माणसे आढळतात, त्यापैकी प्रत्येक माणूस सहा फूट उंच, अडीच फूट रूंद आणि एक फूट जाड धरला तर या संपूर्ण जनसंख्येला एका अशा पेटीत जी लांबी रूंदी व जाडीने एक मैल असल्यास, सहजरित्या बंद केले जाऊ शकते. हे सगळे अजब वाटते परंतु हेच सत्य आहे. मग या पेटीला एका समुद्र किनारी नेऊन सावकाशरित्या ढकलून दिल्यास ती पेटी पाण्यात खोलवर जाऊन पडेल. शतके लोटतील. मानववंश आपल्या कफनात निरंतरपणे पडून राहील. मानव या नावाच्या एखाद्या वंशाची येथे वस्ती होती, हे कोणासही माहित पडणार नाही. समुद्रसपाटीवर अशाच प्रकारे नित्यनेमाने वादळांचे आगमन होत राहील, सूर्य अशाच प्रकारे चकाकत राहील, पृथ्वी आपल्या आसाभोवती नित्याप्रमाणे परिभ्रमण करीत राहील, सृष्टीच्या अमर्याद फैलावातील अगणित जग या इतक्या मोठ्या अपघाताला एका सामान्य घटनेपेक्षा जास्त महत्व देणार नाहीत. कित्येक शतकानंतर एक उंच मातीचा ढिगारा शांतपणे साक्ष देत उभा असेल की हे मानवजातीचे थडगे आहे, ज्यात शतकानुशतकापूर्वी एका लहानश्या पेटीत तिला दफन केले गेले होते.
  काय मानवाचे केवळ इतकेच मूल्य आहे, इतकेच त्याचे महत्व आहे? पदार्थाला कांडप करा, दळा वा जाळा, काहीही करा ते नष्ट होत नाही. प्रत्येक स्थितीत ते आपले अस्तित्व कायम राखते (मग ते धातू रूपात असो, द्रव रूपात असो वा वायू रूपात) परंतु मनुष्य जो पदार्थापेक्षा श्रेष्ठतर प्राणी आहे. काय त्याच्याकरिता अमरत्व नसावे ? हे जीवन जे संपूर्ण विश्वाचे सार आहे, काय इतके अवास्तव व मिथ्या आहे की इतक्या सहजतेने त्यास संपुष्टात आणले जाऊ शकते? मानवाने एका भूभागावर मोजक्या दिवसाकरिता जन्म घ्यावा आणि नंतर नष्ट होऊन जावे, काय मानवी जीवनाची हीच सर्वथा कहाणी आहे ? संपूर्ण मानवी ज्ञान, त्याने संपादन केलेले सर्व यश, त्याच्याबरोबर कायमचे नष्ट व्हावे आणि जग त्याच्या मागे अशा प्रकारे शिल्लक रहावे जणू मानवाचे, त्याचे निकट काहीच स्थान नव्हते?
  या अनुषंगाने दुसरी गोष्ट आम्हास ही जाणवते की जीवन हे केवळ वर्तमान जगापुरतेच मर्यादित आहे तर हे असे जीवन आहे ज्याद्वारे आपल्या आशा आकांक्षाची पूर्ती होऊ शकत नाही. मनुष्याची निरंतर जगण्याची इच्छा असते, मृत्यू कोणासही पसंत नाही परंतु जगात जन्मणार्या प्रत्येकाला माहीत आहे की तो अमर नाही. मनुष्य आनंद प्राप्त करू इच्छितो. दुःख यातना आणि हर प्रकारच्या त्रासाविना जीवन व्यतीत करण्याची प्रत्येक मानवाची इच्छा असते. परंतु खर्या अर्थाने काय असले जीवन कोणताही मनुष्य प्राप्त करू शकतो?
  प्रत्येक मनुष्याची इच्छा असते की त्याला त्याच्या आकांक्षापूर्तीकरिता शेवटच्या क्षणापर्यंत संधी मिळावी, आपल्या सर्व इच्छा साकार झाल्याचे तो पाहू इच्छितो परंतु या मर्यादित जगात त्याला असे करणे शक्य नाही. आपण जे काही इच्छितो, त्याकरिता हे जग अगदी अपुरे व अयोग्य वाटते. प्रत्येक पावलावर ते आपल्या मार्गात अडथळा उभा करत असते. एका ठराविक हद्दीपर्यंत जग आपला साथ देते, तद्नंतर आपणास निराश व अपयशी परतावे लागते.
  प्रश्न उद्भवतो, मानवी जीवन केवळ मार्गभ्रष्ट होऊन एका अशा जगात भरकटत आले आहे की काय जे त्याच्याकरिता बनविले गेले नव्हते आणि त्याच्या जीवन, समस्या व हिताशी ते परिचीत नसावे? काय आपल्या इच्छा, आशा - आकांक्षा, भावभावना, अनुभूती, आपले विचार अवास्तव व मिथ्या - खोट्या आहेत - ज्यांचा या जगाशी काहीच संबंध नाही?
  काय आपल्या मनातील सर्व उच्च कोटीचे विचार, कल्पना, विश्वाच्या मार्गापासून विमुख झाल्या आहेत आणि आपल्या मनमस्तिष्कात विनाकारण निर्माण होत आहेत? त्या सर्व जाणिवा, अनुभूती ज्यासह मानवजात गेल्या हजारो वर्षापासून जन्मत आहे व त्या आपल्या उराशी बाळगून प्राप्त न करताच दफन होत आहे, काय त्या अनुभूतींचे कोणतेच लक्ष्य नाही? मानवाच्या अंतःकरणात काय उगाच त्या निर्माण होत असतात, ज्यांचा ना तर भूतकाळात आधार आहे ना तर भविष्यात त्यांचे एखादे मूल्य?
  संपूर्ण विश्वात केवळ मानव हेच एक असे अस्तित्व आहे जे उद्या (Tomorrow) ची कल्पना करते. हे केवळ मानवाचेच वैशिष्टय आहे जो भविष्याबाबतीत विचार करतो, आणि आपले भविष्य उज्जवल बनवू इच्छितो. काही कीटक प्राणी जसे मुंग्या आपल्या भोजनाची साठवणूक करतात किवा बाया -एक पक्षी घरटे बनवितो, यात शंका नाही परंतु त्यांचे हे कार्य अविवेकी स्वरूपात केवळ नैसर्गिक स्वभावानुसार घडते. उद्याकरिता भोजन साठविले पाहिजे, तसेच हवामानापासून बचावाकरिता घरटे बनविले पाहिजे याचा निर्णय त्यांची बुद्धी घेत नाही. मानव आणि अन्य प्राण्या दरम्यान या फरकामुळे स्पष्ट होते की मानवाला इतरांपेक्षा जास्त संधी मिळाली पाहिजे. जनावराकरिता वर्तमान जीवनच जीवन आहे, जीवनाचा भविष्य ते बाळगत नाहीत. मग काय अशाच प्रकारे मानवाच्या जीवनाचेही भविष्य नाही? असे होणे हे प्रकृति विरुद्ध असेल. माणसामध्ये येणार्या उद्याच्या दिवसाची जी कल्पना आढळते, त्याची निकड ही आहे की जीवन त्यापेक्षा बरेच मोठे असावे जितके त्यास आज प्राप्त आहे. मानवास उद्याचा दिवस हवा आहे परंतु त्यास केवळ ‘आज’ देण्यात आला आहे.
  त्याचप्रमाणे जेव्हा आपण सामाजिक जीवनाकडे पाहतो तेव्हा आपणास प्रचंड विरोधाभास दिसून येतो. एकीकडे भौतिक जग आहे, जे आपल्या ठायी अगदी परिपूर्ण दृष्टीस पडते. ते एका निश्चित कायदा बंधनात जखडले आहे. आणि त्याची प्रत्येक गोष्ट आपल्या निर्णायक मार्गाकडे वाटचाल करीत चालली आहे. दुसर्या शब्दात सांगायचे झाल्यास भौतिक जग अशा स्वरुपात आढळते, जसे ते असले पाहिजे, परंतु मानवी जीवनाची स्थिती जशी ती असावयास होती, त्याहून विपरित आहे.
  उघड्या डोळ्यांनी आपण पाहतो की एक मनुष्य दुसर्या मनुष्यावर अन्याय करतो आणि दोघेही अशा अवस्थेत मृत्यू पावतात की एक जुलमी असतो व दुसरा अत्याचारपिडीत. मग काय अत्याचारीला त्याच्या अत्याचाराबद्दल शिक्षा आणि अत्याचारपिडीतास त्याच्या सहिष्णुतेची भरपाई मिळाल्याखेरीज दोघांच्या जीवनाला पूर्ण म्हटले जाऊ शकेल?
  एखादा मनुष्य खरे बोलतो, लोकांचे जे हक्क अधिकार आहेत, ते अदा करतो, त्याच्या परिणामस्वरूप त्याचे जीवन संकटाने वेढले जाते. दुसरा मनुष्य खोटेपणा व दगाबाजीने आपले काम निभावतो, ज्याचे काही हडप करता येते, ते हडप करतो. यामुळे त्याचे जीवन अगदी ऐषआरामात व्यतित होते. जर जग अशाच अवस्थेत संपले तर दोन्ही प्रकारच्या मनुष्याबाबत कोणता निर्णय व्हावा. यावर कोणता उपाय आहे? एक लोकसमूह दुसर्या लोकसमुहावर दरोडा घालतो, त्याच्या साधन सामग्रीवर कब्जा करतो; तरीही जगामध्ये त्याचे नाव लौकिक असते. कारण त्याच्यापाशी प्रचार प्रसारमाध्यमाची सर्व साधने आहेत. आणि या अत्याचारात भरडलेल्या लोकसमुहाच्या स्थितीशी जग अनभिज्ञ राहते. कारण त्याची ही आर्त हाक - विलाप जगापर्यंत पोहचण्याकरिता त्याचेपाशी कोणतेही साधन नाही. मग काय दोहोंचे वास्तविक रूप कधीच प्रकट होणार नाही? दोन व्यक्ती आणि दोन लोकसमुह वा जाती मध्ये एखाद्या बाबतीत मतभेद निर्माण होते आणि जबरदस्त संघर्ष होण्याची पाळी येते. दोघेही आपलीच बाजू खरी असल्याचा दावा करीत असतात आणि परस्परांना तुच्छ सिद्ध करू लागतात. परंतु जगात त्यांचा न्यायनिवाडा होत नाही. मग काय असे एखादे न्यायालय नाही जे त्यांच्या दरम्यान न्यायोचित निवाडा करू शकेल?
  वर्तमान युगाला अणु युग, परमाणु युग म्हटले जाते, परंतु त्यास स्वैराचाराचे युग संबोधिणे अधिक उचित ठरेल. आजचा मानव केवळ आपल्या स्वैराचारी मार्गाने चालू इच्छितो मग त्याच्या इच्छा व त्याचे मत कितीही चुकीचे का असेना. प्रत्येक मनुष्य भरकटलेला आहे, भ्रष्ट आहे. याउपर प्रत्येकजण मीच योग्य मार्गावर असल्याचे पूर्ण कुव्वतीनिशी सिद्ध करीत आहे. वर्तमानपत्रात नेतेमंडळी व शासनकर्त्यांच्या भाषणबाजीकडे पहा. जो तो अत्यंत निर्भयतेने, निर्लज्जपणे आपल्या अत्याचाराला, न्याय सिद्ध करीत असल्याचे आणि चुकीच्या कार्य पद्धतीला उचित सिद्ध करीत असल्याचे दिसून येईल. काय हा पडद्याआडचा सावळा गोंधळ कधीच उजेडात येणार नाही?
  हे जग याकरिता अपुरे असल्याचे वरील गोष्टीवरून स्पष्ट होते. त्याच्या परिपूर्णतेकरिता एक असे जग हवे आहे जेथे, ज्याचे त्याला उचित स्थान मिळू शकेल. भौतिक जड जगात आपण पाहतो की जेथे कोठे शून्यत्व वा पोकळी आढळते तेथे ते भरून काढण्याचा उपाय सापडतो. या जगात कोठेही एखादी उणीव दृष्टीस पडत नाही जेव्हा की माणसाच्या जीवनात प्रचंड शून्यत्व - पोकळी आढळते. ज्या निसर्गाने भौतिक जगाचा पूर्णतया विकास केला, त्याच्याकडे मानवी जीवनाची पोकळी भरून काढण्याचे एखादे साधन नाही का ?
  आपली जाणीव वा अनुभूती काही कर्मांना सत्कृत्य व काही कर्माना दृष्कृत्य समजते. काही गोष्टी घडाव्यात वा काही गोष्टी घडू नयेत असे आपणास वाटते. तरीही आपल्या या उच्च व उदात्त भावनांची गळचेपी होते आहे आणि जगात तेच सर्वकाही घडते आहे ज्यास मानवाचा मूळ स्वभाव वाईट समजत असतो. मानवामध्ये उदात्त भावना समाविष्ट असण्याचा अर्थ हा आहे की जग सत्यावर प्रस्थापित झाले आहे. याठिकाणी अन्याया ऐवजी न्यायाची प्रस्थापना झाली पाहिजे. मग काय पूर्ण न्याय मिळणार नाही वा सत्य प्रकट होणार नाही? भौतिक जगात जी गोष्ट पूर्ण होते आहे, काय ती मानवी जगात पूर्ण होणार नाही?
  हेच ते प्रश्न आहेत ज्यांना, मी वर ‘मानवतेच्या अंतिम परिणामाचा शोध’ म्हटले आहे. एक विवेकी मनुष्य जेव्हा या परिस्थितीला सामोरे जातो तेव्हा अत्यवस्थ होतो. जीवन सर्वस्वी हेच आहे, जिचे स्व चक्षूनी दर्शन घेत आहोत तर ते किती व्यर्थ व निरर्थक आहे, याची तीव्रतेने त्याला जाणीव होते. एकीकडे तो पाहतो की मानवी जीवनाकरिता इतक्या साधन सामग्री उपलब्ध आहेत, जणू सर्वकाही केवळ त्याच्याचकरिता असावे. दुसरीकडे मानवी जीवन इतके मर्यादित व अपयशी आहे की कोणत्या हेतुकरिता त्याचा जन्म झाला आहे हेच त्याला कळत नाही.
  उपरोक्त प्रश्नासंदर्भात अशा प्रकारच्या उपद्व्यापात गुरफटणे व्यर्थ व निरर्थक आहे, या सर्व प्रश्नांचे स्वरूप तात्विक आहे. जीवनाचा जो क्षणही तुम्हास प्राप्त आहे तो आनंदमय करण्याचा प्रयत्न करा, भविष्यात काय होईल अथवा जे काही घडत आहे, ते चुकीचे की बरोबर या भानगडीत पडण्याची आवश्यकता नाही, अशी सर्वसाधारण आज लोकांची विचार प्रवृत्ती आहे.
  याच्या उत्तरादाखल कमीत कमी शब्दात जे सांगितले जाऊ शकते ते हे की जे लोक अशा प्रकारच्या विचारांचे पुरस्कर्ते आहेत, त्यानी अद्याप मानवतेच्या स्थानाला काडीमात्र ओळखले नाही. अवास्तव ऐहिकवादालाच ते सत्य मानतात. अनंत जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी घटना त्याना आमंत्रित करीत आहेत परंतु क्षणभंगुर जीवनावरच ते संतुष्ट होऊन बसले आहेत. आपल्या इच्छा आकांक्षा, अभिलाषा पूर्तीकरिता एका मोठ्या जगताचा शोध घ्यावा ही मानवी स्वभाव मानसिकतेची निकड आहे. परंतु हे अडाणी, मूर्ख, प्रकाशाऐवजी त्याच्या सावलीवर संतुष्ट आहेत. वर्तमान जग तुमच्याकरिता अपुरे आहे, दुसर्या परिपूर्ण जगताचा शोध घ्या, अशी विश्वाची हाक आहे. परंतु या अपूर्ण विद्यमान जगातच आम्ही आपली जीवनरूपी इमारत उभी करु, आम्हाला परिपूर्ण जगाची आवश्यकता नाही, असा आम्ही निर्णय घेतला आहे. जीवनाचा एक शेवट असला पाहिजे, या गोष्टीकडे परिस्थिती स्पष्ट संकेत करीत आहे परंतु या लोकांनी केवळ आरंभाशी हातमिळवणी केली आहे. आणि अंतापासून डोळे मिटून घेतले आहेत. शहामृगाबाबतचा कथित मूर्खतेचाच हा प्रकार होय.
  खरोखरच जीवनाचा एखादा शेवट आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही आणि कोणी त्यापासून अनभिज्ञ असणे हे त्यास प्रतिबंध करण्याचे कारण बनू शकणार नाही. होय, मात्र अनभिज्ञ असणार्याकरिता ते अपयशाचा निर्णय अवश्य बनू शकते. सत्य हे आहे की विद्यमान जीवनाला संपूर्ण जीवन मानणे आणि केवळ वर्तमानालाच आनंदयुक्त बनविण्याच्या प्रयत्नांना आपले उद्दिष्ट समजणे भ्याडपणाची व मूर्खतेची गोष्ट आहे. मनुष्याने आपले जीवन आणि विश्वावर थोडासा जरी विचार केला तर उपरोक्त दृष्टिकोनातील निरर्थकपणा लगेच समोर येतो. सत्यापासून डोळे बंद करणारा आणि एक अविचारी जीवन जगणाराच चुकीचा निर्णय घेऊ शकतो.
  हे ते प्रश्न आहेत, जे विश्वाला पाहताक्षणीच आपल्या मनमस्तिष्कात गांभीर्याने निर्माण होतात. या सृष्टीचा एक सृष्टिकर्ता व निर्माता असला पाहिजे परंतु आपणाला त्याच्या बाबतीत काहीच माहिती नाही. सृष्टिला गती देणारा व सांभाळणारा असला पाहिजे परंतु आपणास ठाऊक नाही की तो कोण आहे. आपण ज्या कोणाच्या उपकाराने उफत झालो आहोत, कृतज्ञता व आभाराची साक्षात प्रतिमा बनून त्या अस्तित्वाचा शोध घेऊ इच्छितो जेणेकरून त्याच्यासमोर आपल्या श्रद्धा, भावना प्रकट करू शकावे. परंतु असले एखादे अस्तित्व आपल्या नजरेस पडत नाही. या विश्वात आपण अगदी लाचार व विवश आहोत. असले आश्रयस्थान जेथे पोहचून आपण स्वतःला सुरक्षित अनुभवू शकू आपणास हवे आहे. परंतु असले आश्रयस्थान आपल्या डोळ्या - समोर नाही. मग जेव्हा आपण आपले जीवन व आपल्या आयुष्यावर नजर टाकतो तेव्हा विश्वाचे आयुष्य खरबो वर्षे असावे आणि मानव, जो या सृष्टिचा सार आहे, त्याचे आयुष्य मात्र मोजकी वर्षे ! हा विश्वाचा विरोधाभास आपल्या डोक्यात शिरत नाही. निसर्गाने आपणास असंख्य इच्छा, आशा - आकांक्षा, अभिलाषांनी भरून टाकावे परंतु जगात त्याच्या तृप्तीच्या साधनांची व्यवस्था करू नये, हे कसे शक्य आहे?
  यानंतर सर्वाधिक मोठा विरोधाभास तो आहे, जो भौतिक जग आणि मानवी जगात आढळतो. भौतिक जग अत्यंत परिपूर्ण आहे. त्यामध्ये कोठे एखादे शून्यत्व, पोकळी किवा उणीव दृष्टीस पडत नाही परंतु मानवी जीवनात प्रचंडरित्या शून्यत्व - पोकळी आढळते. सर्वश्रेष्ठ समजल्या जाणार्या या प्राण्याची अवस्था अखिल प्राणी जगतात दयनीय असल्याचे दृष्टिस पडते. पेट्रोलच्या एखाद्या नव्या खाणीचा शोध लागला किवा शेळ्या मेंढ्याची पैदास वाढली तर यावर आपल्या आनंदाला पारावार उरत नाही. परंतु मानवी वंश वृद्धी आपल्यास खटकते, आपल्याला भेडसावण्यार्या समस्यांनी आपण इतके त्रस्त झालो आहोत की मानवाच्या जन्मावरच बंदी घालू इच्छितो, ही आपल्या दुर्भाग्याची चरमसीमा नव्हे तर आणखी काय?

मानवाची असमर्थता
हे प्रश्न आपणाला चोहोबाजूनी वेढले आहेत. आतून ही आपणास ते पोखरत आहेत आणि बाहेरूनही ग्रासून टाकले आहे. परंतु त्यांची उत्तरे आपणाकडे नाहीत. जीवनाचे सत्य माहिती करून घेण्यासंबंधीचा हा प्रश्न आहे परंतु जीवन तर आपणास मिळाले पण त्याची वास्तविकता आपणास सांगितली गेली नाही, ही अगदी अजब गोष्ट आहे.
या सत्याच्या शोधार्थ जेव्हा आपण आपली बुद्धी आणि आपल्या अनुभवाकडे रूजु होतो तेव्हा त्याचे बिनचूक व स्पष्ट उत्तर मिळविणे, हे आपल्या बुद्धी व अनुभवापलिकडचे असल्याचे उघड होते. या अनुषंगाने आजपावतो आपण जे मतप्रवाह स्थापित केले आहेत, त्यांचे एका अटकळी पेक्षा जास्त महत्व नाही. ज्याप्रमाणे आपली दृष्टी कक्षा सीमित आहे आणि आपण एका विशिष्ट आकारापेक्षा लहान वस्तूना पाहू शकत नाही, त्याचप्रमाणे विश्वाबाबत आपले ज्ञानही एका मर्यादित कक्षेपर्यंत आहे. त्याच्या मागील व पुढील गोष्टींशी आपण अनभिज्ञ आहोत. आपले ज्ञान अपूर्ण आहे. आपल्या पाहणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे व स्पर्श करणेच्या शक्ती अत्यंत सीमित आहेत. आपली संवेदनशक्ती एका ठराविक मर्यादेपर्यंत आपला साथ देते. आपण वास्तव पाहू शकत नाही. मैदा आणि काळ्या रंगाच्या पावडरचे मिश्रण केल्यास राखट रंगासारखी पावडर बनते परंतु त्या पावडर मधला एक सूक्ष्म कीटक ज्याचा आकार त्या पावडरच्या बारीक कणा एवढाच असतो आणि ज्यास सूक्ष्मदर्शक यंत्रानेच पाहता येणे शक्य आहे, तो मिश्रणास काळ्या रंगाची व पांढर्या रंगाची पर्वते समजू लागतो. त्याच्या दृष्टीच्या मूल्यमापनानुसार राखट रंगी - मिश्रित पावडरचे अस्तित्वच नाही.
मानवजातीचे जीवन त्यावेळेच्या तुलनेत जेव्हा की पृथ्वी अस्तित्वात आली, इतके सूक्ष्म व संक्षिप्त आहे की त्याची गणना करता येणार नाही. तसेच स्वतः पृथ्वी देखील विश्वरूपी या अथांग सागरात एका बारीक कणासमानही नाही. अशा परिस्थितीत विश्वाच्या वास्तवतेबाबत माणूस, जो विचार वा जी कल्पना करतो, त्यास अंधारात चाचपडण्यापेक्षा जास्त काही म्हटले जाऊ शकत नाही. सृष्टीच्या विस्ताराबाबत कल्पनाविलास करण्याचा प्रयत्न करताक्षणीच आपला परम अडाणीपणा उघडकीस येतो.
हे चित्र जर डोळ्यासमोर ठेवले की सूर्य एशी अरब वर्षापासून अस्तित्वात आहे, पृथ्वीचे वय दोन अरब वर्षे आहे आणि भूतलावर जीवसृष्टीची लक्षणे प्रकट होण्याला तीन करोड वर्षांचा कालावधि लोटला आहे. परंतु त्याच्या तुलनेत पृथ्वीवर विवेकसंपन्न मनुष्याचा इतिहास हा पंधरा वीस हजार वर्षाहून अधिक नाही, तेव्हा काही हजार वर्षातच मानवाने तत्संबधी आपली माहिती गोळा केली असल्याचे सत्य उघडकीस येते. त्याचबरोबर ती माहिती त्या दीर्घ कालावधीचा, जी वस्तुतः सृष्टीचे रहस्य उलगडण्याकरिता हवी आहे, एक अत्यल्प अंशच असल्याचे सत्य समोर येते.
सृष्टीच्या अत्यंत दीर्घ भूतकाळ आणि अनंत रहस्यमय भविष्या दरम्यान मानवी जीवन निव्वळ एका क्षणाचे स्थान बाळगते. आपले अस्तित्व अत्यंत क्षुद्र व मध्यम स्वरुपाचे आहे, ज्याच्या मागचे व पुढचे आपणास ज्ञात नाही. या सृष्टीची विशालता अमर्याद आहे आणि ती समजून घेण्यात आपली बुद्धी व आपला अनुभव हे फार तोकडे आहे, या गोष्टीचा आपल्या बुद्धीला नाइलाजास्तव स्वीकार करावा लागतो. आपणास प्राप्त सीमित क्षमताद्वारे कधीही त्यास आपण समजू शकत नाही. आजपर्यंतच्या प्रयत्नांना आलेले अपयश हे सिध्द करण्यास पुरेसे आहे.
अशा प्रकारे आपले माहितीरूपी ज्ञान व आपले अध्ययन आपणास एका अशा ठिकाणी आणून सोडते जेथे आपल्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित होतात. असले प्रश्न, निश्चितरित्या ज्यांचे उत्तर हवे आहे, ज्या विना मानवी जीवन अगदी व्यर्थ व निरर्थक वाटते. परंतु जेव्हा कधी आपण त्याबाबतीत विचार चितन करू लागतो तेव्हा आपल्या बुद्धी मार्फत त्यांचे उत्तर प्राप्त करू शकत नसल्याचे आपल्या निदर्शनात येते. आपणास ती दृष्टीच प्राप्त नाही ज्याद्वारे सत्याचे दर्शन करणे शक्य व्हावे. त्याचबरोबर तो मेंदू - मस्तिष्क ही आम्हास प्राप्त नाही ज्याद्वारे प्रत्यक्षात सत्य जाणू शकावे.

प्रेषित (स) यांची गरज
अशा प्रसंगी एक व्यक्ती आपल्या समोर येते आणि म्हणते, जे सत्य तुम्ही जाणून घेऊ इच्छिता, त्याचे ज्ञान मला दिले गेले आहे आणि ते असे आहे,
‘‘या सृष्टीचा एक ईश्वर आहे ज्याने संपूर्ण सृष्टीची रचना केली आहे, आणि आपल्या असामान्य शक्तीद्वारे त्याची व्यवस्था सांभाळली आहे. ज्या वस्तू तुम्हास प्राप्त आहेत, त्या सर्व त्यानेच देऊ केल्या आहेत आणि प्रत्येक बाब त्याच्याच अधीन आहे. हे जे तुम्ही पहात आहा की भौतिक जगात, निसर्गात कोणताही विरोधाभास नाही, ते व्यवस्थितरित्या आपले कार्य करीत आहे, जेव्हा की मानवी जग अपूर्ण असल्याचे दिसते. येथे प्रचंड अराजकता माजली आहे, त्याचे कारण, हे की मानवाला स्वातंत्र्य देऊन त्यास आजमाविले जात आहे. तुमच्या स्वामीची इच्छा आहे की त्याचा कायदा जो भौतिक जगात प्रत्यक्षात लागू होत आहे, तो मानवाने आपल्या जीवनाकरिता स्वतः लागू करावा. तेच अस्तित्व सृष्टीचा निर्माता आहे, तोच त्याची निगा राखणारा आहे. तुमच्या कृतज्ञता व आभार प्रकटनाचा तोच खराखुरा हक्कदार आहे आणि तोच आहे जो तुम्हास आश्रय देऊ शकतो. त्याने तुमच्याकरिता एका अनंत अमर्याद जीवनाची व्यवस्था करून ठेवली आहे, जे मृत्यूपश्चात येणार आहे, जेथे तुमच्या आशा, आकांक्षा, अभिलाषा पूर्ण होऊ शकतील. जेथे सत्य - असत्य विलग केले जाईल आणि सदाचारीना त्यांच्या सदाचाराबद्दल व दुराचारीना त्यांच्या दुराचाराबद्दल फलप्राप्ती होईल. त्याने माझ्या माध्यमाने तुमच्यापाशी आपला ग्रंथ पाठविला आहे, ज्याचे नाव ‘कुरआन’ आहे. जो यास मान्यता देईल तो यशस्वी होईल, जो अमान्य करील, तो अपमानित होईल.’’
हा आवाज प्रेषित मुहम्मद (स.) यांचा आहे, जो दिड हजार वर्षापूर्वी अरबस्तानच्या वाळवंटात बुलंद झाला होता. आणि आज सुद्धा आम्हास साद घालित आहे. सत्य जाणून घ्यावयाची इच्छा असेल तर माझ्या या आवाजाकडे तुमचे कान लावा आणि जे काही मी सांगत आहे, ते लक्षपूर्वक ऐका.
काय हा आवाज खरोखर सत्याचा आवाज आहे? काय आपण यावर श्रद्धा ठेवली पाहिजे, यावर विश्वास ठेवला पाहिजे? ते कोणते परिणाम वा मापदंड आहे, ज्याद्वारे हे चूक व बरोबर असणेचा निर्णय घेता यावा?
काही लोकांचे असे मत आहे की या सत्याचा आम्ही त्यावेळी स्वीकार करू ज्यावेळी प्रत्यक्षात ते आमच्या डोळ्यांना दिसेल. सत्याचे स्वचक्षूंनी ते दर्शन घेऊ इच्छितात परंतु जणू एखाद्याने अंकगणिताच्या माहितीविना खगोलशास्त्राचे अध्ययन करण्याचा प्रयत्न करावा व म्हणावे की तो खगोल शास्त्राच्या केवळ त्याच गोष्टींना मान्य करील ज्या उघड्या डोळ्यानी पाहता येतात, अंकगणिताचा तर्क मी मान्य करणार नाही, अशातलाच हा प्रकार होय. त्याचा हा आग्रह, मानवाला आपल्या स्वतःच्या क्षमता, सामर्थ्याचे वस्तुनिष्ठ ज्ञान नसल्याचे द्योतक आहे.
मानवाची पाहण्याची शक्ती मर्यादित आहे. वास्तवतेला पाहणे त्याच्या आवाक्यापलिकडचे आहे. वास्तवता आपण पाहू शकत नाही. त्याची अनुभूती मात्र आपणास होते. एकवेळ होती जेव्हा मानले जायचे की जगाची निर्मिती चार वस्तूंनी झाली आहे. आग, पाणी, हवा आणि माती. दुसर्या शब्दात पहिल्यांदा मनुष्याचा असा गैरसमज होता की सत्य, वास्तवता एक अशी वस्तू आहे जी पाहता येणे शक्य आहे. परंतु आधुनिक संशोधनाने त्यास चुकीचे सिद्ध केले आहे. आता जगातल्या सर्व वस्तू सूक्ष्म अणू (परमाणू) पासून बनल्या असल्याचे आपण जाणतो. अॅटम - अणू एका सर्वसाधारण सफरचंदाच्या आकारमानापेक्षा तितकाच लहान असतो जितका आपल्या जमिनीपासून सफरचंद असते.
अॅटम, एका अर्थाने सूर्यग्रहमाला (Solar System) आहे ज्याचे एक केंद्र आहे. या केंद्रामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रान असतात आणि त्याच्या चोहोबाजूनी इलेक्ट्रान वेगवेगळ्या कक्षा वर्तुळात अशा प्रकारे गतिमान असतात, जसे सूर्याच्या चोहोबाजूनी त्याच्या ग्रहांचे भ्रमण सुरु असते. आकारमानाने सेंटिमीटरच्या पाच हजार करोड भागापैकी एक भाग म्हणजे इलेक्ट्राॅन होय. आपल्या केंद्राच्या चोहोबाजूनी एका सेकंदात तो करोडो वेळा प्रदक्षिणा घालतो. त्याची नुसती कल्पना करणे देखील कठिण किबहुना अशक्यप्राय आहे. इतकेच नव्हे तर अंतर्विश्वातील ही अंतिम मर्यादा आहे किवा नाही याचीही आपणास कल्पना नाही. या आंतरविश्वामध्ये आणखीन लहान सहान विश्व असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावरून आपली पाहण्याची दृष्टी किती कमकुवत आहे, हे स्पष्ट होते. मग प्रश्न हा उद्भवतो की प्रोटॉन आणि न्यूट्रानचे अत्यंत सूक्ष्म कण एकत्रितरित्या जे केंद्र बनवितात, ते कशा प्रकारे स्थिर आहे. शेवटी त्या केंद्रातून न्यूट्रान व प्रोटॉन बाहेर का पडत नाहीत. ती कोणती वस्तू आहे जी त्याना परस्पर जखडून ठेवून आहे. शास्त्रज्ञांचे असे मत आहे की या भौतिक कणा दरम्यान एक ऊर्जा अस्तित्वात आहे आणि याच ऊर्जेने केंद्रातील न्यूट्रान व प्रोटॉन नामक कणाना परस्परात जखडून ठेवले आहे. त्यास प्रतिबद्ध ऊर्जा (Binding Energy) संबोधिले गेले आहे. अर्थात पदार्थ आपल्या अंतिम अंशरूपात ऊर्जा होय. मी म्हणतो, काय ही ऊर्जा डोळ्यांनी पाहिली जाऊ शकते? कोणत्याही सूक्ष्मदर्शी (माइक्रोस्कोप) द्वारे त्यास पाहिले जाऊ शकते? यावरून सत्य, वास्तव, आपल्या अंतिम रूपात एक दृष्टीस न पडणारी गोष्ट आहे, मानवी चक्षूंनी त्याचे दर्शन घेता येणे शक्य नाही, हे आधुनिक विज्ञानाने स्वतः मान्य केल्याचे सिद्ध होते.
आता जर प्रेषित (स.) यांचे कथन मान्य करण्यास आपण ही अट घातली की ते ज्या सत्याची, वास्तवतेची सूचना देत आहेत, त्या आम्हास पाहता व स्पर्श करता आल्या पाहिजेत, तेव्हाच आम्ही ते मान्य करू, तर ही अत्यंत मूर्खपणाची गोष्ट ठरेल. जसे भारतीय इतिहासाचा एखादा विद्यार्थी ईस्ट इंडिया कंपनी संदर्भात अध्ययन करते वेळी आपल्या अध्यापकांना म्हणावे की कंपनीची सर्व पात्रे माझ्यासमोर आणून उभी करा आणि त्यानी सर्व घडलेल्या घटनांची माझ्या समोर पुनरुक्ती करावी, तेव्हाच मी तुमचा इतिहास खरा मानीन, अशातलाच हा प्रकार आहे.
मग तो कोणता निकष आहे ज्या आधारे आपण, हा संदेश खरा की खोटा, आणि आपण तो स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय घेता येईल? माझ्या मते सदर संदेशाच्या पडताळणीची तीन विशिष्ट अंगे आहेत. पहिले हे की त्याची व्याख्या सत्याशी किती समानता बाळगते. दुसरे हे की जीवनाच्या अंत - परिणामाबाबत त्याने प्रस्तुत केलेला दावा हा निव्वळ दावाच आहे की त्याचा काही पुरावा देखील त्याचेकडे उपलब्ध आहे. तिसरी गोष्ट ही की त्याने प्रस्तुत केलेल्या संदेशामध्ये काय असे एखादे असामान्य वैशिष्टय आढळून येते की त्यास ईश्वरवाणी संबोधिले जाऊ शकेल? या तिन्ही दृष्टिकोनातून जेव्हा आपण प्रेषित (स.) यांच्या कार्याची पडताळणी करतो तेव्हा त्यापैकी प्रत्येक पैलू संदर्भात ते अत्यंत यशस्वीरित्या त्या निकषावर पूर्णतः सत्यावर असल्याचे माहित होते.
 1. प्रेषित (स.) यांनी सृष्टीची जी व्याख्या केली आहे, त्यामध्ये आपल्या सर्व समस्यांचे समाधान आहे. आपल्या आंतरबाह्य जगतात जितके प्रश्न निर्माण होतात, त्या सर्वांचे ते उत्कृष्ट उत्तर आहे.
 2. जीवनाच्या अंतिम परिणामाबाबत प्रेषित (स.) यांचा जो दावा आहे, त्याकरिता तो एक स्पष्ट पुरावाही स्वतःजवळ बाळगतो. तो हा की विद्यमान जीवनात त्या परिणामाचा नमुनाही आपणास दाखवून दिला जो नंतरच्या जीवनात येण्याची तो खबर देत आहे.
 3. तो ज्या वाणीला ईश्वराची वाणी म्हणतो, त्यामध्ये इतके असामान्य वैशिष्टय आढळते की निःसंशय ते एखाद्या महान अलौकिक दिव्य शक्तीची वाणी आहे, एखाद्या मनुष्याची ती वाणी असू शकत नाही, हे मान्य करावे लागते.
चला, आता या तिन्ही बाजूनी प्रेषित (स.) यांच्या संदेशाचे परीक्षण करून पाहू या.
प्रेषित (स.) यांची सत्यता
प्रेषिताच्या संदेशाचे पहिले स्पष्ट वैशिष्टय हे की ते मानवाच्या अंतर्मन-स्वभावाशी एकरूप होते. याचा अर्थ असा की मानवानी उपजत जी प्रकृती आहे, तीच सदर व्याख्येची प्रकृती आहे. सदर व्याख्येचा पाया एकमेव ईश्वराच्या अस्तित्वावर ठेवणेत आला आहे आणि एका ईश्वरा संबंधीचा विवेक मानवाच्या प्रकृतीत समाविष्ट आहे. त्यास दोन भक्कम पायाभूत आधार आहेत. एक हा की मानवी इतिहासाच्या सर्व ज्ञात युगामध्ये मानवाच्या बहुसंख्येने किबहुना जवळपास संपूर्ण जनसंख्येने ईश्वराचे अस्तित्व मान्य केले आहे. मानवाची बहुसंख्या ईश्वरी विवेकापासून रिक्त राहिली असावी असे एखादे युग कधीही मानवावर आलेले नाही. ईश्वराप्रती विवेक, मानवी स्वभावाचा अत्यंत शक्तिशाली विवेक असल्याचीच प्राचीन काळापासून आजतागायत मानवी इतिहासाची सर्वमान्य साक्ष आहे. दुसरा आधार हा की माणूस जेव्हा संकटात सापडतो तेव्हा अनायासे त्याचे अंतर्मन ईश्वराला पुकारु लागते. जेथे एखादे आश्रय दृष्टीस पडत नाही तेव्हा ईश्वराचा आश्रय तो शोधू लागतो. सुशिक्षित असो वा निरक्षर, धार्मिक असो वा नास्तिक, पुरोगामी असो वा संकुचित वृत्तीचा; जेव्हा कधीही त्याच्यावर असा प्रसंग ओढवतो ज्यावेळी त्याचे काहीच चालेनासे होते, त्यावेळी तो एका अशा अस्तित्वाकडे याचना करू लागतो जे सर्वशक्तीमान आहे, आणि जे सर्व शक्तींचा खजिना आहे. आपल्या नाजूक समयी ईश्वराचे स्मरण करण्यास मनुष्य विवश आहे. त्याचे एक बोलके मजेदार उदाहरण आपणास स्टालिनच्या जीवनात आढळून येते.

हा उल्लेख चर्चिलने दुसर्या महायुद्धाशी सबंधित आपल्या पुस्तकात भाग ४ पृष्ठ क्रमांक ४३३ वर केला आहे -
इ. स. १९४२ च्या नाजूक परिस्थितीत हिटलर संपूर्ण युरोपकरिता धोकादायक बनला होता. चर्चिलने मॉस्कोला भेट दिली होती. त्याप्रसंगी चर्चिलने आपल्या संयुक्त लष्करी कारवाई संबंधाची योजना स्टालिनला सांगितली. चर्चिल लिहतात की सदर योजनेवर चर्चा करता करता एक असा मुद्दा उपस्थित झाला ज्यावर चर्चिलचा उत्साह इतका वाढला की न राहवून त्याच्या तोंडून शब्द निघाले , “May God Prosper this undertaking.'' (ईश्वर या मोहिमेत यश देवो)
त्याचबरोबर प्रेषिताच्या आवाहनाचे हे वैशिष्टय आहे की मनुष्याला ज्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, तसेच विश्व व जगाला पाहताना आपल्या मनमस्तिष्कात जे प्रश्न निर्माण होत असतात, त्या सर्व प्रश्नांची ती व्याख्या आहे.
विश्वाच्या अध्ययनाने आपणास या निष्कर्षापर्यंत पोहचविले होते की केवळ योगायोगाने वा अपघाताने या सृष्टीची उत्पत्ती होऊ शकत नाही. त्याचा निर्माणकर्ता अवश्य असला पाहिजे. या प्रश्नाचे उत्तर या व्याख्येत आहे. जग केवळ भौतिक मशीन नाही. यामागे एखादे असामान्य मस्तिष्क असले पाहिजे, जे त्यास चालवित असावे असे आपणास वाटत होते. या व्याख्येत त्या प्रश्नाचे उत्तरही समाविष्ट आहे. त्या कृपाळू अस्तित्वाचा आपण शोध घेत होतो आणि आपला आश्रय बनू शकेल, अशा एका अस्तित्वाच्या शोधार्थ आपण होतो. सदर व्याख्येत त्याचे उत्तरही सापडते.
मानवी जीवन इतके अल्पायुषी का ही गोष्ट आपणास मोठी चमत्कारिक वाटत होती. मानवाला आपण अमर पाहू इच्छित होतो. आपण आपल्याकरिता एका विशाल विस्तृत मैदानाच्या शोधात होतो, जेथे आपल्या आशा, अभिलाषा साकार व्हाव्यात. या व्याख्येमध्ये त्याचे उत्तरही आहे. मग खर्याचे खरे व खोट्याचे खोटे उघड व्हावे आणि चांगले व वाईट विभक्त केले जावे, प्रत्येक मानवाला त्याचे योग्य स्थान दिले जावे, ही मानवी परिस्थितीची निकड होती. त्या प्रश्नाचे उत्तर देखील सदर व्याख्येमध्ये आढळते. तात्पर्य जीवना संदर्भातील सर्व प्रश्नांची पूर्णतः उत्तरे त्यामध्ये आहेत आणि ती उत्तरे अशी आहेत की याहून उत्कृष्ट उत्तरांची आपण कल्पना देखील करू शकत नाही. याद्वारे विश्वाच्या अध्ययनाने आपल्या मस्तिष्कात निर्माण झालेल्या त्या सर्व प्रश्नांचे निराकरण होते.
प्रेषितांच्या संदेश - आवाहनाचे दुसरे मोठे वैशिष्टय पाहू. जीवनाच्या परिणामाबाबत जो दृष्टिकोन तो प्रस्तुत करतो, त्याचा एक व्यवहारिक नमुना स्वतः आपल्या जीवनात प्रस्थापित करून आम्हास दाखवतो. तो म्हणतो, जगाचा अशाच तर्हेने जुलमी व अत्याचारपिडीतासह अंत होणार नाही तर त्याच्या अंतानंतर सृष्टीचा स्वामी प्रकट होईल आणि खर्या खोट्या व्यक्तींना एकमेंकापासून विभक्त करील. ती वेळ येण्यामध्ये जो विलंब होतो आहे, तो केवळ वर्तमान परिक्षेच्या कार्यकलापाच्या समाप्ती पुरता आहे, जे तुमच्याकरिता अध्याहृत आहे.
उपरोक्त नुसते कथन करून तो बाजूला हटत नाही तर त्याबरोबर मी जे काही करतो, ते खरे असण्याचा पुरावा, त्या न्यायालयाचा एक नमुना विश्वाचा स्वामी माझ्या माध्यमाने याच जगात तुम्हाला दाखवून देईल, असा तो दावा करतो. माझ्या माध्यमाने सत्याला तो प्रतिष्ठित करील व असत्याला पराजित करील, आपल्या आज्ञाधारकांना प्रतिष्ठा प्रदान करील आणि अवज्ञाकारींना अपमानित करून त्याना प्रकोपात टाकील. ही घटना घडूनच राहील मग जगातील लोकांचा कितीही विरोध का होईना आणि त्याला नष्ट करण्याकरिता त्यानी आपली सर्व शक्ती पणाला का लावेनात, असाही तो दावा करतो.
ज्याप्रमाणे परलोक (आखिरत) घडणे हे निश्चितरित्या ठरले आहे आणि कोणी त्यास प्रतिबंध करू शकत नाही. त्याप्रमाणे माझ्या जीवनात त्याचा नमुना प्रदर्शित होणे अनिवार्य आहे. ही एक निशाणी असेल येणार्या दिवसाची आणि हा पुरावा असेल या गोष्टीचा की सृष्टीची निर्मिती न्याय तत्वावर झाली आहे. तसेच या गोष्टीचा देखील की मी ज्या शक्तीचा प्रतिनिधी आहे, ती एक अशी शक्ती आहे जी सर्व शक्तींपेक्षा श्रेष्ठतर आहे. ही शक्ती एके दिवशी तुम्हाला स्वतःसमोर उभी करून सर्व आधीच्या व नंतरच्या मानवांचा निर्णय करील.
हे आव्हान तो त्या समयी देत आहे जेव्हा की तो एकाकी आहे. संपूर्ण राष्ट्र - लोकसमूह त्याचा शत्रू बनले आहे. त्याची स्वतःची मातृभूमी त्याला थारा द्यावयास तयार नाही. त्याच्या जवळच्या नातलगांनीही त्याची साथ सोडली आहे. त्याचेकडे भौतिक साधन सुविधा नाहीत, आणि तो पूर्ण विश्वासानिशी विजय माझा होईल आणि माझ्या माध्यमाने ईश्वरी न्यायलयाची धरतीवर प्रस्थापना होईल, अशी घोषणा करीत आहे.
ऐकणारे त्याची थट्टा मस्करी करतात,परंतु अत्यंत गंभीरतेने तो आपले कार्य तडीस नेत आहे. देशातील बहुसंख्य लोक त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतात, त्याचे सर्वकाही उध्वस्त करतात, देशत्याग करण्यास त्याला विवश करतात, त्याला संपविण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावतात. परंतु हे सर्वकाही त्याच्यापुढे निष्प्रभ ठरते, फार कमीच लोक त्याला साथ देतात. एकीकडे मूठभर साथीदार तर दुसरीकडे प्रचंड बहुसंख्या असते. एकीकडे साधन सामग्रीची विपुलता तर दुसरीकडे साधन सामग्रीचा तुटवडा. एकीकडे देश बांधवांचे, राष्ट्राचे समर्थन तर दुसरीकडे सगेसोयरे व इतरांचा एकत्रित विरोध. अशा कठिण परिस्थितीत त्याचे साथीदार वरचेवर भयभीत होतात, परंतु प्रत्येक वेळी तो असेच म्हणतो की प्रतीक्षा करा, ईश्वरी निर्णय प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही. कोणतीही शक्ती त्यास रोखू शकत नाही.
चौथे शतकही संपले नव्हते. त्याचे आव्हान पूर्णत्वास पोहचते, आणि इतिहासातील आपल्या पद्धतीची एकमेव अशी वेगळी घटना घडते. ज्या दाव्यानिशी एका व्यक्तीने आपल्या कामास सुरुवात केली होती, अगदी त्याच स्वरुपात त्याचा दावा पूर्णत्वास पोहचला आणि त्याचे विरोधक त्यात काही कमी जास्त करू शकले नाहीत. सत्य व मिथ्या वेगवेगळे झाले. ईश्वराच्या आज्ञाधारकांना प्रतिष्ठा मिळाली आणि अवज्ञाकारींचा प्रभाव संपुष्टात येऊन त्याना शासित बनविले गेले.
अशा प्रकारे या संदेशाने मानवांना ज्या परिणामाची सूचना दिली होती, त्याचा एक नमुना जगात प्रस्थापित केला गेला, जो प्रलया (कयामत) पर्यंत एक धडा व बोध आहे. या नमुन्याची परिपूर्णता परलोक (आखिरत) मध्ये होईल ज्यावेळी अखिल मानवजातीला ईश्वरी न्यायालयात उपस्थित करून त्यांच्याबाबत निर्णय होईल.
त्या मानवाचा दावा सत्य असणेचा तिसरा पुरावा, ती वाणी होय ज्यास तो ईशवाणी (कलामे इलाही) म्हणून प्रस्तुत करतो. सदर ईशवाणी येऊन कित्येक शतके लोटली. परंतु त्याचे महात्म्य, त्याची सत्यता आणि वास्तवते संदर्भात त्या मधील कथनाचा एक शब्द देखील चुकीचा सिद्ध होऊ शकला नाही, जेव्हा की त्रुटी, उणीवारहित कोणतेही असे मानवी पुस्तक आढळत नाही.
दुसर्या शब्दात कुरआन ईश्वरी ग्रंथ असल्याचा स्वतः कुरआनच पुरावा आहे. त्याची विविध अंगे आहेत परंतु या ठिकाणी मी केवळ त्याच्या तीन पैलू - संदर्भात वर्णन करीन. एक त्याची निवेदन शैली, दुसरा, त्याच्या अर्थामध्ये विरोधाभास नसणे, तिसरा त्याचे चिरस्थायित्व - शाश्वतपणा !

मुळात असा नियमच आहे की, सत्याच्या विरोधकांचे अत्याचार आपल्या संपूर्ण मर्यादा ओलांडतात आणि अत्याचारपीडितांचा आत्मा तळतळून हाक देतो की, ‘ईश्वराची मदत कधी येईल?’ तेव्हा ईश्वराच्या दयासागरात मोठी भरती येते आणि ईश्वरी उत्तर मिळते की,
‘‘बस आता पुरे झाले! ईश्वराची मदत आता खूप जवळ आहे!!!’’
याच नियमानुसार ‘मेराज’च्या डोळे दिपविणार्या उत्सवात ईश्वराकडून आदरणीय प्रेषित मुहम्मद (स) यांना शुभवार्ता आणि मार्गदर्शक बाबी सुचविण्यात आल्या.
‘मेराज’चे वास्तव असे आहे की, आदरणीय प्रेषितांना ईश्वरी सान्निध्याचे अत्युच्च स्थान प्राप्त झाले. परलोकाची सहल करविण्यात आली. परोक्षाचे दर्शन घडविण्यात आले. विशेष आयती आणि संकेतांचे अवलोकन करविण्यात आले व भविष्यकाळात येणार्या परिस्थितींबाबत ईश्वरी मार्गदर्शन करण्यात आले.
‘मेराज’ची घटना एक ईश्वरी चमत्कार आहे. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना बरेच ईश्वरी चमत्कार देण्यात आले. परंतु विरोधकांकडून अशा ईश्वरी चमत्कारांची वारंवार मागणी होत असूनही या चमत्कारांचे दर्शन घडविण्यात आले नाही. कारण दैवी चमत्कार पाहूनसुद्धा विरोधक प्रेषितांच्या प्रेषितत्वावर श्रद्धा ठेवण्यास तयार नव्हते. दैवी चमत्कारास ते ‘जादू’चे नाव देऊन ईश्वरी प्रकोपाचे हक्कदार ठरत होते. प्रेषित मुहम्मद(स) हे पुराव्यांवरच जास्त जोर देत असत. उत्तम प्रकारच्या मानवी भावनांना साद घालून, ईशद्रोह आणि मूर्तीपूजांनी बरबटलेल्या जीवनाचे अनिष्ट परिणाम समोर ठेवून, एकमेव उपास्य असलेल्या ईश्वरावर धारणा घेऊन असलेल्या उत्तम चारित्र्याचे प्रदर्शन करून आणि अन्याय व अत्याचाराचे उत्तर स्नेह आणि दयाभावाने देऊन या गोष्टीसाठी प्रयत्न करण्यात आले की, लोकांनी सत्याची पारख करून आणि सत्याला विवेकबुद्धीने स्वीकारून, तसेच असत्याला नाकारून जीवनाची योग्य दिशा निवडावी. शिवाय ईश्वरास जेव्हा आणि ज्या ठिकाणी आपला चमत्कार दाखविणे योग्य व उचित वाटले, त्या ठिकाणी व त्या प्रसंगी त्याने आपल्या प्रेषितांच्या माध्यमाने चमत्कार दाखविले. सत्यसमर्थकांनी आणि सत्यविरोधकांनी आपापल्या परीने त्यापासून प्रभाव ग्रहण केले.
‘मेराज’ची घटना २७ ‘रजब’ हिजरी सन पूर्व ३ मध्ये घडली. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) हे माननीय उम्मे हानी(र) यांच्या निवासस्थानी विश्रांती घेत होते. ती सोमवारची रात्र होती. ईश्वराचा फरिश्ता ‘जिब्रील’ आला आणि त्याने प्रेषितांना झोपेतून जागे करून आपल्यासोबत ‘काबागृहात’ नेले. मग त्यांना ‘बुराक’ नावाची स्वारी प्रदान केली. ही स्वारी एवढी तीव्र गतिमान होती की, प्रेषित मुहम्मद(स) या स्वारीवर स्वार होताच ‘बैतुल मक्दस’ला पोहोचले. हे ठिकाण पॅलेस्टाईनमध्ये आहे) अर्थात दैवी प्रवासाची ही पहिली मजल होती. हे ठिकाण दाखविण्याचा ईश्वरी हेतु असा होता की, इस्लामच्या ज्या भलाईच्या राष्ट्रीय आंदोलनास जीवित करण्यासाठी अंतिम प्रेषित उठले होते, त्या आंदोलनाचे मोठे आणि जुने केंद्र त्या अंतिम प्रेषितांना दाखविण्यात यावे आणि सत्यधर्माच्या चळवळीतील मागच्या काळात होऊन गेलेले मार्गदर्शक अर्थात प्रेषितांची भेट करून द्यावी.
‘‘बैतुल मक्दस’ येथील ‘अक्सा’ मस्जिदमध्ये मागे होऊन गेलेल्या सर्व प्रेषितांचा जमाव जमलेला होता. या संमेलनातील सर्व प्रेषितांनी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे हार्दिक स्वागत केले आणि मग सर्वच प्रेषितांनी त्यांच्या नेतृत्वात दोन रकअत नमाज अदा केली.
नमाज झाल्यावर जिब्रील फरिश्त्याने प्रेषित मुहम्मद(स) यांना ‘बुराक’वर स्वार करून आकाश मंडळावर घेऊन गेला. शेवटपर्यंत विभिन्न आकाश मंडळांचे द्वार उघडत गेले. या प्रवासात प्रेषितांना विभिन्न पापांच्या पापीजणांच्या शिक्षाप्रद घटनांचे दर्शन घडविण्यात आले.
मग जेव्हा विशेष सान्निध्याचे एक विशेष स्थान आले, तेव्हा कुरआनच्या प्रदानित ज्ञानानुसार प्रेषित मुहम्मद(स) यांना विशेष ईश्वरी बोध देण्यात आला. तो दिव्यबोध कुरआनातील ‘सूरह-ए-बकरा’ आणि ‘सूरह-ए-बनी इस्त्राईल’मध्ये स्पष्ट करण्यात आला आहे.
सूरह-ए-बनी इस्त्राईलमध्ये भविष्याची ही खूशखबर आहे की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांचे इस्लामी आंदोलन यशस्वी होईल. सत्यधर्म अर्थांत इस्लामचा विजय होईल आणि असत्य पराजित होईल. यामध्ये ही बाबसुद्धा स्पष्ट करण्यात आली आहे की, ‘मक्का’वासी प्रेषित मुहम्मद(स) यांना व त्यांच्या अनुयायांना वतन त्यागण्यावर विवश करतील. म्हणूनच ‘हिजरत’ अर्थात वतनत्यागाची म्हणजेच स्थलांतराची शिकवण देण्यात आली. हिजरतनंतर मग ‘जिहाद’ अर्थात सत्यधर्म प्रस्थापित करण्यासाठी वा मानवकल्याणासाठी ईशमार्गात प्रयत्न करण्याचा काळ येईल.
‘यहूदी’ अर्थात ‘ज्यू’ लोकांना स्पष्टपणे बजावण्यात आले की, ‘‘तुमच्या कुकर्मामुळे जगाच्या आणि मानवांच्या नेतृत्वाची धुरा तुमच्याकडून ईश्वराने हिसकावून घेतली आहे. आता तुमच्याकरिता केवळ एकच संधी आहे, अर्थात तुम्ही आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या संदेशाचा स्वीकार करावा. म्हणजेच ईश्वरास उपास्य स्वीकार करावे, मुहम्मद (स) यांना ईश्वराचे प्रेषित स्वीकार करावे आणि इस्लामी व्यवस्थेचा अंगीकार करावा. अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील.’’
मक्का शहरातील विरोधकांनाही तंबी करण्यात आली की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्याशी आणि त्यांच्या अनुयायांशी जसे वर्तन तुम्ही कराल, तसेच वर्तन तुमच्याशी करण्यात येईल. इस्लामी आंदोलनात जर तुम्ही बाधा आणली तर मुळीच खपवून घेतले जाणार नाही. आता निर्णयाची वेळ येऊन ठेवली आहे! ’’
या प्रसंगी ईश्वराकडून आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना राहणीमान आणि खाणपान व्यवस्थेचे मूळ नियम देण्यात आले. याच नियमांनुसार इस्लामी शासनास कार्य करावे लागेल. हे नियम संक्षिप्तरीत्या मांडण्यात येत आहेत.
 1. केवळ ईश्वरालाच उपास्य जाणून अनेकेश्वरांचा त्याग करा.
 2. मातापित्यांचा सन्मान करा व त्यांची आज्ञा पाळा.
 3. नातलग, गरीब व प्रवाशांचे अधिकार द्या आणि अवैध व अनुचित मार्गांनी पैसा व संपत्ती खर्च करू नका.
 4. हक्कदारांच्या मदतीचे कार्य एखाद्या कारणासाठी करता न आल्यास नम्रपणे नकार द्या.
 5. संपत्ती कमाविण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी मध्यममार्गाचा अवलंब करा.
 6. निर्धन होण्याच्या भीतीने संततीवध अथवा भ्रूणहत्या करू नका.
 7. व्यभिचार करू नका आणि अश्लीलतेच्या जवळही फटकू नका.
 8. हकनाक कोणाचाही वध करू नका.
 9. वयात न आलेल्या अनाथांचे व त्यांच्या संपत्तीचे रक्षण करा.
 10. आपण केलेल्या करारांची व समझोत्यांची अंमलबजावणी करा.
 11. देवाणघेवाण, व्यवहार, मोजमाप आणि तराजू चांगले ठेवा.
 12. जी गोष्ट तुम्हाला ज्ञात नाही, तिच्या मागे पडू नका, कारण मानवास श्रवण, दर्शन, मन व मस्तिष्काचा हिशोब ईश्वरासमोर द्यावा लागणार आहे.
 13. पृथ्वीवर गर्वाने आणि मटकत चालू नका.
‘मेराज’च्या प्रसंगी देण्यात येणारे हेच ते ईश्वरी नियम होते, ज्यावर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आदर्श इस्लामी राज्याची स्थापना केली. प्रेषित मुहम्मद(स) यांच्या नंतरसुद्धा धार्मिक नेते आणि न्यायप्रिय मुस्लिम शासकांनी हेच आदर्श समोर ठेवून शासन चालविले. शिवाय यापुढेसुद्धा ज्या ठिकाणी इस्लामी व्यवस्था लागू करण्याची योजना असेल, त्या ठिकाणी याच नियमांच्या आधारावर व्यवस्था लागू करण्यात येईल.
आकाश मंडलांमध्ये ईश्वरी कांतीमय वातावरणात ज्या वेळी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना या नियमांवर आधारित आदेश प्रदान करण्यात आले असतील तेव्हा त्यांना भविष्याच्या क्षितिजावर ज्योतीपुंज उदयास येत असताना दिसला असेल.
मक्का आणि तायफसारख्या अतिशय प्रतिकुल वातावरणात एखादा भौतिकवादी असता तर कदाचित त्याने कधीचाच निराश होऊन आपल्या आंदोलनकार्यास बंद केले असते. परंतु हा क्रांतिदूत प्रेषित मुहम्मद(स) यांचा प्रेषित्विक विवेक होता, जो ईश्वरी कांती आणि मार्गदर्शक प्रकाशांनी उजळून याची सत्यकल्पना बाळगत होता की, अंधाराचे साम्राज्य संपून आता कांतीमय प्रभात होणार आहे.
ईश्वराकडून प्रेषितांना दुसरा उपहार हा पाच वेळा नमाज अदा करण्याचा मिळाला. याच मंगलप्रसंगी आदरणीय प्रेषितांना ‘तहज्जुद’ (उत्तरार्धिची) नमाज अदा करण्याचा आदेश देण्यात आला आणि शुभ वार्ता कळविण्यात आली की, या ‘नमाज’च्या माध्यमाने प्रेषितांना ‘महमूद’चे स्थान (प्रशंसनीय स्थान) प्रदान करण्यात येणार आहे.
ईश्वरी वाणी आणि कांतीमय तेजांनी संपन्न होऊन प्रेषित मुहम्मद(स) जेव्हा परत आले, तेव्हा प्रथम ते बैतुलमक्दस (येरूशलेम) या ठिकाणी उतरले व नंतर ‘बुराक’वर स्वार होऊन मक्केस परतले. सकाळी सकाळी प्रेषितांनी ‘मेराज’च्या प्रसंगाचा कुरैश कबिल्याच्या लोकांसमोर उल्लेख केला, तेव्हा त्यांनी सुरुवातीस आश्चर्य व्यक्त केले आणि मग या दैवी चमत्काराचा उपहास उडविला. टाळ्या वाजविल्या. खिल्ली उडविली. कुरैश कबिल्याच्या ज्या लोकांनी ‘बैतुलमक्दस’ पाहिले होते, त्यांनी प्रेषितांच्या दाव्याची परीक्षा घेण्यासाठी तेथील ठळक खुणा विचारल्या. प्रेषितांनी बैतुलमक्दिसचे पूर्ण स्वरूप वर्णन केले. शिवाय त्यांनी हेदेखील सांगितले की, रस्त्यामध्ये अमक्या ठिकाणी एका व्यापारी काफिल्याचा उंट हरवला होता. हा काफिला ‘सीरिया’कडून ‘मक्केस’ येत होता. हा उंट शोधल्यावर त्यांना सापडला. या काफिल्याचा लाल रंगाचा उंट सर्वात पुढे होता. जवळपास तीन दिवसांत हा काफिला मक्का शहरात पोहोचेल.’ प्रेषितांनी सांगितल्याप्रमाणेच घटना घडली. तिसर्या दिवशी तो काफिला खरोखरच मक्का शहरी पोहोचला. खरोखरच लाल रंगाचा उंट सर्वात पुढे होता. काफिल्याच्या लोकांना उंट हरविल्याच्या घटनेबाबत विचारले असता त्यांनीही या घटनेची तीच सविस्तर हकिकत सांगितली, जी प्रेषित मुहम्मद(स) यांनी तीन दिवसांपूर्वी सांगितली होती. आता मात्र विरोधकांना प्रेषितांच्या दैवी चमत्कारिक मेराजच्या घटनेचा पूर्ण विश्वास झाला. परंतु माणसामध्ये अहं नावाची एक दुष्ट वृत्ती असते. याच अहंमुळे माणूस सत्याचा इन्कार करतो. विरोधकांचेदेखील असेच झाले. त्यांनी विरोध कायम राखला.
इकडे ही घटना चर्चेत येत असतानाच दुसरीकडे काही विरोधक माननीय अबू बकर(र) यांच्याकडे गेले आणि म्हणाले, ‘‘तुमचे प्रेषित मुहम्मद(स) तर दावा करायला लागलेत की, त्यांनी एकाच रात्रीत ‘बैतुलमक्दस’चा प्रवास करून सकाळ होण्यापूर्वीच परतही आले. तुम्हाला विश्वास वाटतो का?’ यावर माननीय अबू बकर(र) उत्तरले, ‘‘जर आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी दावा केला, तर निश्चितच हे खरे आणि सत्य आहे. कारण मीच काय, तुम्हीसुद्धा आणि संपूर्ण मक्कावासीयांनीसुद्धा प्रेषितांना खोटे बोलताना कधीच ऐकलेले नाही.’’
या ठिकाणी एक बाब विसरता येणार नाही ती अशी की, आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप लावण्यासाठी विरोधकसुद्धा धजावत नव्हते आणि अनुयायांबरोबरच विरोधकसुद्धा ही बाब निर्विवादपणे स्वीकारत असत की, आजपर्यंत मुहम्मद(स) कधीच खोटे बोलले नाहीत. अनुयायांची तर अशी परिस्थिती होती की, प्रेषितांच्या कोणत्याही गोष्टीवर त्यांच्या मनात साधी शंकादेखील येत नसे. प्रेषितांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीच्या पुराव्याची त्यांना कधीच गरज भासली नाही.
परोक्षापलीकडील सत्य ज्याने पाहिले आणि संपूर्ण विश्वाचा स्वामी एकमेव ईश्वराच्या विशेष आयती (वाणी) आणि देदीप्यमान मार्गदर्शनाचे ज्याने अवलोकन केले आणि पारलौकिक जगाची एक झलक पाहिली असेल, त्याच्यासाठी या ऐहिक जगातील क्षणिक जीवन आणि क्षणभंगूर असणार्या जीवनातील आरिष्टांचे काय महत्त्व असणार? तसे पाहता आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांची ईश्वरावरील धारणा सर्व जगातील लोकांच्या धारणांपेक्षा जास्त प्रबळ होती. शिवाय प्रेषित मुहम्मद(स) यांच्या सेवेत ‘फरिश्ते’ हजर होत, दिव्यबोध त्यांना होत. मग एवढे सर्व काही डोळ्यांसमोर असताना विरोधकांचा त्रास आणि शिव्याशापांचे काय मोल असणार? एवढेच नव्हे तर ‘मेराज’च्या दैवी प्रवासाच्या माध्यमाने ईश्वराने त्यांना सर्व प्रकारच्या बाबींचे दर्शन घडविले आणि याच परोक्षाच्या पडद्याआड असलेल्या सत्याचा ते प्रसार व प्रचार मोठ्या जिद्द व चिकाटीने आणि अथक परिश्रम घेऊन करीत होते. म्हणूनच त्यांच्या आंदोलनाच्या मार्गात येणारा प्रचंड पर्वतदेखील त्यांना किरकोळ वाटत असे.
अशा प्रकारे आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांच्यासमोर अतिशय उज्वल स्वरुपातील भविष्य दिवसेंदिवस जवळ येत होते.

‘मेराज’च्या दिव्य प्रवासात प्रेषित मुहम्मद(स) यांना परोक्षातील ज्या गोष्टींचे दर्शन घडविण्यात आले, त्यामुळे प्रेषित आणि त्यांच्यावर जीव ओवाळणार्या सर्वच अनुयायांत नवीन साहस आणि संकल्प निर्माण झाले. या प्रसंगी प्रेषितांना जी ईश्वरी वाणी ऐकविण्यात आली. त्यामुळे भविष्यातील वाटचालीचे मार्गदर्शन घडले. चांगुलपणा आणि सत्याच्या आंदोलनात नवीन प्रेरणा व गती निर्माण झाली.
मक्का शहरात श्रद्धा आणि नैतिकता जोपासण्याच्या संभावना संपल्याचे पाहून प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपल्या प्रचाराची दिशा ‘तायफ’कडे वळविली. परंतु तेथे तर मक्कापेक्षाही जास्त प्रतिकूल परिस्थिती त्यांनी अनुभवली. या दोन्ही ठिकाणी नकारार्थी उत्तर मिळाल्यावर मात्र ‘यसरब’कडून अतिशय धीमा होकार प्रेषितांच्या कानी पडला की, हा प्रदेश प्रेषितांचे शहर आणि सत्यधर्माचे केंद्र बनू शकतो. येथूनच सत्य प्रकाशाची मशाल पेटून संपूर्ण विश्वातील अज्ञान, अन्याय आणि अत्याचाराचा काळाकुट्ट अंधार नष्ट होईल. येथूनच सत्यधर्माची व मानवतेची स्थापना होण्यास सुरुवात होईल आणि एका नवीन इतिहासाचा प्रारंभ होईल.
मक्का अणि तायफ जवळच होते, परंतु ते खूप दूर गेले आणि यसरब (मदीना) दूर असूनही जवळ झाले. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांना स्वप्नावस्थेत एका अशा ठिकाणाकडे स्थलांतर करण्याचे दिव्य संकेत मिळाले होते की, ज्या ठिकाणी हिरव्यागार खजुरींच्या बागा, पाणी आणि थंड सावली होती. परंतु हे ठिकाण अद्याप सांकेतिक होते.
मदीना शहरास हे सौभाग्य प्राप्त होण्याचे नेमके कारण असे होते की, तेथील ‘औस’ आणि ‘खजरज’ परिवाराच्या काही सज्जनांनी अगदी आनंदाने इस्लामचा स्वीकार केला होता. जणू प्रखर उष्णतेने तळपत्या वाळवंटातील तहानलेला वाटसरू दयेच्या वर्षेची वाटच पाहत होता. खरोखर ते वाटच पाहत होते. मदीना शहरात ‘ज्यू’ लोकांचा विशेष प्रभाव होता. त्यांचे वीस कबिले तेथे वास्तव्यास होते. व्याजखोरीचा धंदा असल्याने अमाप संपत्ती त्यांच्याकडे असल्याने त्यांना खूप अहंकार वाढला होता. ‘औस’ आणि ‘खजरज’ परिवारांचे ‘ज्यू’ लोकांशी तंटेबखडे होते. त्यांच्यात गृहयुद्ध सुरुच होते. विशेषतः ‘बुआस’च्या युद्धात दोन्हीकडील प्रमुख सरदार ठार झाले होते.
‘ज्यू’ लोकांमध्ये एक अत्यंत व्यभिचारी भांडवलदार होता. त्याने सर्व ‘ज्यू’ लोकांवर फरमान जारी केला की, त्याच्या प्रभावक्षेत्रात जी मुलगी विवाह करील, तिने प्रथम या भांडवलदार असलेल्या ‘फतयून’ची लैंगिक तृष्णा भागवावी आणि मगच आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करावी. संपूर्ण ‘ज्यू’ जणांनी गुपचूपपणे त्याच्या आदेशाचे पालन केले. परंतु ज्या दिवशी एका अत्याचारपीडित ‘ज्यू’ स्त्रीच्या पित्याने एका ‘मालिक बिन अजलान’ नावाच्या अरब युवकासमोर याचना केली की, ‘‘माझ्या मुलीस ‘फतयून’च्या विळख्यातून मुक्त करावे, तेव्हा ‘मालिक बिन अजलान’ला त्याच्या अश्रूंवर दया आली आणि त्याने तलवार उपसून मस्तावलेल्या ‘फतयून’कडे अगदी धावतच जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि ‘ज्यू’ लोकांना एका मस्तावलेल्या ‘ज्यू’ च्याच तावडीतून मुक्त केले. परंतु प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. ‘फतयून’च्या काही गुंडांनी ‘मतयून’चा बदला घेण्यासाठी ‘मालिक बिन अजलान’वर हल्ला केला. ‘मालिक बिन अजलान’च्या समर्थनात ‘औस’ आणि ‘खजरज’ कबिल्याचे तरूण सरसावले. दोन्हीकडून तलवारी भिडल्या. या युद्धामध्ये ‘औस’ आणि ‘खजरज’च्या अरबांनी ‘ज्यू’ लोकांना चांगलेच पछाडले. ‘ज्यू’ जमातीचे मोठमोठे सरदार यामध्ये ठार झाले. ‘ज्यू’ लोकांची शक्ती संपली.
‘ज्यू’ लोकांचा प्रभाव संपला असला तरी त्यांना त्यांच्या धर्म आणि वंशाचा अजूनही खूप फाजील अभिमान होता. त्यांच्याकडे ‘तौरात’ हा ईश्वरी ग्रंथ होता. इतर दिव्य ग्रंथांप्रमाणेच ‘तौरात’मध्येसुद्धा अंतिम प्रेषित येण्याची भविष्यवाणी होती. ‘ज्यू’ जणांना वाटत होते की, अंतिम प्रेषित ‘ज्यू’ वंशात येतील. म्हणून ते अरबवासीयांना चेतावणी देत असत की, आमच्या वंशामध्ये शेवटचे प्रेषित येणार आहेत. ते आल्यावर आम्ही तुमचा समाचार घेऊ. त्यांच्या गोष्टी ऐकून अरबांनादेखील वाटायचे की, जर अंतिम प्रेषित आलेच, तर आम्हीसुद्धा त्यांचा स्वीकार करु. अशा प्रकारे अंतिम प्रेषितांच्या येण्याची वाट सर्वचजण पाहत होते.
मदीना शहरातील पहिला युवक की, ज्याने इस्लामची मशाल हाती घेतली तो ‘सुवैद बिन सामित’ होता. तो एक महान कवी आणि महान योद्धा होता. अशाच प्रकारचे कवीमनाचे आणि शूरवीर युवक क्रांतिकारी आंदोलनाचे लढवय्ये सेवक सिद्ध होत. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) ‘तायफ’वरून परत येताना या सज्जन युवकाने त्यांची भेट येतली. आदरणीय प्रेषितांनी ‘सुवैद’ला इस्लाम धर्म स्वीकारण्याचे निमंत्रण दिले. ‘सुवैद’ पूर्वी ‘लुकमान’ या प्राचीन तत्त्वज्ञानीच्या ग्रंथाने प्रभावित होता. त्याने या ग्रंथाविषयी प्रेषितांशी चर्चा केली. प्रेषितांनी त्यास सांगितले की, माझ्याजवळ तर अथांग तत्त्वज्ञानाने भरलेला कुरआन हा ग्रंथ आहे. मग कुरआनातील काही आयती प्रेषितांनी त्याच्यासमोर सादर केल्या. कुरआनाच्या आयती ऐकून तो खूप प्रभावित झाला. त्याने तत्काळ इस्लामचा स्वीकार केला. हा युवक मदीना शहरी पोहोचताच त्यास कोणीतरी ठार केले. प्राण जाताना त्याच्या मुखावर ‘अल्लाहु अकबर’ हेच शब्द होते.
प्रेषित मुहम्मद(स) यांच्या शिकवणीने प्रभावित होणारा मदीना शहराचा दुसरा युवक हा ‘इयास बिन मुआज’ होता. हा एका प्रतिनिधी मंडळासह होता. प्रेषित मुहम्मद(स) यांनी त्या प्रतिनिधी मंडळाची भेट घेऊन सत्य धर्माची शिकवण दिली. कुरआनाच्या आयती सादर केल्या. ‘इयास’ याने प्रतिनिधी मंडळाच्या लोकांना सांगितले की, ‘‘तुम्ही ज्या कारणास्तव येथे आला आहात त्यापेक्षाही प्रेषितांची वाणी उत्तम व श्रेयस्कर आहे. मुळात हे प्रतिनिधी मंडळ ‘कुरैश’ कबिल्याच्या लोकांशी वाटाघाटी करण्यासाठी आले होते. तसेच प्रेषितांशी बोलणे अथवा भेटणे म्हणजे वाटाघाटीचे मार्ग बंद करणेच होते. मंडळप्रमुख ‘अबुल हैसर’ यांनी ‘इयास’च्या चेहर्यावर संतापाच्या भरात माती फेकून मारली व म्हणाला, ‘‘आम्ही या हेतूने येथे आलो नाही.’’ प्रमुखासमोर ‘इयास’ गप्प बसला. परंतु मनोमन त्याने इस्लामचा स्वीकार केला. परंतु ‘बुआस’च्या लढाईत हा युवकदेखील ठार झाला.
मदीना शहरात प्रेषितांच्या सत्यधर्माची चर्चा होत गेली. प्रेषितत्वाच्या अकराव्या वर्षी ‘हज’ यात्रेवर मदीना शहरातून आलेले प्रतिनिधी मंडळ ‘अकबा’ या ठिकाणी थांबले होते. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) रात्रीच्या वेळी तेथे पोहोचले. या प्रतिनिधी मंडळासमोर प्रेषितांनी इस्लामचा उपदेश केला. दिव्य कुरआनची शिकवण दिली. वाईट कर्माची मनाई केली आणि सत्कर्माचा उपदेश दिला. प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी प्रेषितांना अगदी पहिल्याच नजरेत ओळखले आणि आपसात कुजबुजू लागले की, ‘‘आपण ज्या प्रेषितांची वाट पाहात होतो, ते हेच प्रेषित होय.’’ हे सहाजणांचे प्रतिनिधी मंडळ होते. ईश्वराने त्यांना इस्लाम स्वीकारण्याची सद्बुद्धी दिली. त्यांच्यात या गोष्टीची आशा निर्माण झाली की, हे प्रेषित आपल्या विभिन्न कबिल्यांना संघटित करतील. या प्रतिनिधी मंडळाने प्रेषित मुहम्मद(स) यांना आश्वासन दिले की, आम्ही आपल्या धर्माचा प्रसार आमच्या समाजात करू जर ईश्वराने त्यांना संघटित केले तर त्यांची संपूर्ण शक्ती आपल्याच पाठीशी राहील आणि आपल्यापेक्षा कोणतीच व्यक्ती शक्तिशाली असणार नाही.
हे छोटेसे प्रतिनिधी मंडळ मदीना शहरी परतले आणि त्याने मदीना शहरात इस्लामचा जोरदार प्रचार केला. मदीनावासीयांच्या प्रत्येक घरात इस्लामचा संदेश त्यांनी पोहोचविला. पुढच्या वर्षी म्हणजेच प्रेषितत्वाच्या बाराव्या वर्षी बारा व्यक्तींचे प्रतिनिधी मंडळ प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडे आले आणि प्रेषितांच्या हातावर इस्लामची दीक्षा घेतली. या प्रसंगी प्रेषितांनी त्यांच्याकडून वचन घेतले की, ईश्वराबरोबर कोणासही भागीदार ठरवू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, कोणाच्याही शीलतेवर आळ घेऊ नये, कोणासही बदनाम करू नये, कोणत्याही प्रकरणात प्रेषितांची आज्ञा मोडू नये. ही ‘अकबा’ची पहिली रीतसर दीक्षा होय.
या प्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी माननीय मुसअब बिन उमैर(र) यांना इस्लामच्या प्रचारासाठी प्रचारक म्हणून नियुक्त केले. माननीय मुसअब बिन उमैर-(र) यांनी प्रेषितांच्या आदेशाप्रमाणे मदीना शहरात इस्लामचा भरपूर प्रचार केला. तसेच लोकांना नमाज पढविली.
माननीय मुसअब बिन उमैर(र) यांनी अत्यंत कौशल्यपुर्णरीत्या ‘उसैद बिन हुजैर’ आणि ‘साद बिन मुआज’ या दोन सरदारांना सत्य धर्माचे निमंत्रण दिले आणि या दोन्ही सरदारांसमवेत त्यांच्या ‘अब्दुल अशहल’ या संपूर्ण कबिल्याने इस्लामचा स्वीकार करून इस्लामच्या मानवहित आंदोलनासाठी कंबर कसली. कबिल्यातील पुरुष आणि स्त्रियांपैकी केवळ ‘उसैरम’ नावाचा एकच माणूस विभक्त राहिला. त्यानेही नंतर ‘उहुद’च्या युद्धप्रसंगी इस्लाम स्वीकारला आणि मुस्लिमांसोबत लढताना हुतात्मा झाला. आदरणीय प्रेषितांनी त्यांस स्वर्गीय होण्याची शुभवार्ता दिली.
परत ‘हज’चा मोसम आला. या वेळेस एकूण बाहत्तर पुरुष आणि स्त्रियां प्रतिनिधी मंडळात होत्या. हा काफिलासुद्धा ‘अकबा’ या ठिकाणीच थांबला. आदरणीय प्रेषित मुहम्मद(स) यांनी आपले काका माननीय अब्बास(र) यांना सोबत घेऊन या प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. प्रतिनिधी मंडळाच्या सर्वच सदस्यांनी प्रेषितांचे मनापासून स्वागत केले आणि त्यांना ‘मदीना’ येण्याचे निमंत्रण दिले. तसेच सर्वोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले. माननीय अब्बास(र) म्हणाले की, ‘‘संपूर्ण मक्कावासी प्रेषितांच्या जीवावर उठलेले आहेत. तुम्ही प्रेषितांना पाठिबा दिला तर होणार्या परिणामांची जाणीव ठेवूनच पुढचे पाऊल उचला. कारण प्रेषित मुहम्मद(स) यांना पाठिबा देणे म्हणजेच मक्कावासीयांचा क्रोध आणि वैर ओढवून घेणे होय.’’
काही वेळापुरती वातावरणात निरव शांतता पसरली. मग प्रेषितांनी दिव्य कुरआनचा काही भाग त्यांच्यासमोर वाचला आणि क्षणार्धात वातावरण निवळले. प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी प्रेषितांना विनंती केली की, ‘हे प्रेषिता! तुम्ही मदीना शहरी वास्तव्य करावे, जेणेकरून आम्ही प्रत्यक्षात आपल्या शिकवणीचा लाभ घ्यावा.’ प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही सत्यधर्मासाठी मला पूर्ण सहकार्य करण्यास आणि माझ्या सोबत्यांचे आपल्या परिवार सदस्यांप्रमाणे समर्थन करण्यास तयार आहात काय?’’
प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी विचारले, ‘‘यात आमचा काय लाभ?’’
‘‘ईश्वराची प्रसन्नता, परलोकातील यश आणि स्वर्गाची प्राप्ती!’’ प्रेषित उत्तरले.
‘‘हे प्रेषिता! आपण आम्हास कधीच सोडू नये!’’
‘‘मी तुम्हास कधीच सोडणार नाही. माझे जीवन आणि मरण तुमच्याच सोबत असेल!’’
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे वाक्य ऐकून सर्वांनी अगदी मनापासून त्यांना वचन दिले. दीक्षाकार्य संपल्यावर प्रेषितांनी सत्य-स्थापनेच्या इस्लामी आंदोलनास्तव ‘खजरज’ कबिल्यात नऊ आणि ‘औस’ परिवारात तीन ‘नकीब’ (इस्लामी प्रतिनिधी किवा प्रमुख) नियुक्त केले. या नियुक्तीमुळे सुसंघटित समाज निर्माणकार्याची सुरुवात झाली.
आता हे मोठे प्रतिनिधी मंडळ प्रेषित मुहम्मद(स) यांच्याकडून इस्लामची नवीन प्रेरणा घेऊन ‘मदीना’ पोहोचले. इस्लामचा तीव्र गतीने प्रचार होऊ लागला. विशेषतः तरुणांना इस्लामने आकर्षित कले आणि इस्लामी आंदोलनाची शक्ती अफाट वाढत गेली.
गेल्या काही वर्षांपासून प्रेषित मुहम्मद(स) यांना मनापासून वाटत होते की, कुठेतरी स्थलांतर करून शक्ती निर्माण करावी आणि न्यायपूर्ण व्यवस्थेचा पाया रचावा. प्रेषितांनी याकरिता अॅबीसीनियाचा विचार केला. परंतु त्या ठिकाणी इस्लामी व्यवस्था लागू होणे शक्य नव्हते. ‘मदीना’ शहरातील बर्याच लोकांनी मनापासून इस्लामचा स्वीकार केल्यामुळे प्रेषितांनी याकरिता ‘मदीना’ शहर निवडले. शिवाय मुसअब बिन उमैर(र) यांच्यामार्फत मिळालेल्या मदीनाच्या सविस्तर वृत्तान्तामुळे प्रेषितांना तेथील वातावरण अनुकूल वाटू लागले. ‘अॅबीसीनिया’हून परत आलेल्यांना प्रेषित सरळ ‘मदीना’ शहरात पाठवित असत. ‘अकबा’ येथील दुसर्या इस्लामदीक्षेनंतर प्रेषितांनी बर्याच जणांना मदीना शहरी वास्तव्यास पाठविले.
‘मक्का’ येथील इस्लामद्रोही सरदारांना चांगलीच जाणीव होती की, जर ‘मदीना’ शहर इस्लामी आंदोलनाचे शक्तीकेंद्र बनले तर ते त्यांच्यासाठी अत्यंत अवघड सिद्ध होईल. कारण मक्कामधील व्यापार्यांना माल घेऊन ‘सीरिया’ला जाताना मदीनावरुनच जावे लागत असे. मदीना शहर इस्लामी आंदोलनाचे केंद्र बनल्यास मक्कावासीयांना व्यापार करणे अशक्य होईल. यासाठी मक्कावासीय मदीनास स्थलांतर करणार्यांचा छळ करीत, त्यांची संपत्ती हिसकावून घेत असत. यामुळे कित्येक वस्त्या उजाड झाल्या.

प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट अगदी प्रखरपणे जाणवते आणि ती म्हणजे प्रेषितांनी त्यांच्या कोणत्याही शत्रुशी वैयत्तिक बदला घेतला नाही, कोणत्याही प्रकारे सूड उगविला नाही. मुहम्मद (स.) यांना प्रेषितत्व मिळाले आणि त्यांच्यावर विरोधकाकडून अन्याय, अत्याचार आणि निष्ठूरतेचे पर्वत कोसळले. इतिहासात कधीही न दिसणारा अन्याय व अत्याचार मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायांवर व जवळच्या नातलगांवर करण्यात आला. त्यांना घर, परिवार आणि मायभूमी त्यागण्यासाठी विवश केले, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, आपली प्रिय मायभूमी अर्थात मक्का शहर त्यागून मदीनेस प्रस्थान करण्यास भाग पाडले. मदीना शहरी जाण्यापूर्वी प्रेषितांचा जीव काबागृहात अडकलेला होता. जाताना दर्शन घेण्याची त्यांची तीप इच्छा होती. मात्र विरोधकांकडून अन्याय व अत्याचारांमुळे काबागृहाचे दार त्यांच्यासाठी बंद करण्यात आले. काबागृहाच्या विश्वस्ताने काबागृहाच्या दर्शनासाठी दरवाजाच्या चाव्या देण्यास नकार दिला. मात्र इतिहास साक्षी आहे की ज्यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना काबागृहाच्या अंतिम दर्शनासाठी चावी देण्यास नकार दिला होता, मक्केवर जबरदस्त विजय मिळविल्यावर प्रेषितांनी त्यांच्यावर सूड न उगविता त्यांच्याच हाती चावी दिली. एवढेच नव्हे तर दयाळू व कृपाळू मुहम्मद (स.) यांनी त्यांना आशीर्वाद दिला की ही चावी त्यांच्याच वंशात असेल. हे इतिहासातील अप्रतिम औदार्य आहे.
मक्का शहरात प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या अनुयायांचा छळ सुरूच होता. मात्र प्रेषितत्व कार्याचे वारे मदीना शहरात वाहत होते आणि तेथे इस्लामचा प्रचार होत होता. विरोधकांना मात्र हे सहन होणे शक्य नव्हते. त्यांनी प्रेषितांचा प्रति प्रेमळ व दयापूर्ण व्यवहाराच्या नसून अगदी शत्रुबरोबरसुद्धा त्यांनी न्यायपूर्ण आणि सदाचारी व्यवहाराच्या शिकवणी दिल्या आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांचा खरा परिचय करून देताना कुरआनाने म्हटले आहे,प्रति प्रेमळ व दयापूर्ण व्यवहाराच्या नसून अगदी शत्रुबरोबरसुद्धा त्यांनी न्यायपूर्ण आणि सदाचारी व्यवहाराच्या शिकवणी दिल्या आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांचा खरा परिचय करून देताना कुरआनाने म्हटले आहे,
‘‘हे प्रेषित (स.) भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसरन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की ज्याच्याशी तुमचे शत्रुत्व होते, तो जीवलग मित्र बनला आहे.”(कुरआन – ४१:३४)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विश्वाच्या आणि जग अस्तित्वात असेपर्यंतच्या समस्त मानवांना कोणताही भेदभाव न पाळता समान रूपाने सत्यधर्माचा परिचय करून देण्याचे महान कर्तव्य पार पाडले. यात त्यांनी आपला-परका, मित्र-शत्रु असा मुळीच भेदभाव केला नाही. याशिवाय प्रेषितांनी असेही सुचित केले की नेकी, चांगुलपणा आणि भलाई व सदाचाराच्या कार्यात सर्वांचीच मदत करावी. त्याचप्रमाणे अन्याय व अत्याचाराच्या आणि दुष्कर्माच्या कार्यात कोणाची आणि कितीही जवळच्या माणसाचीही मुळीच गय न करता कोणत्याही प्रकारे मदत करू नये. कुरआनात ही बाब अशा शब्दांत सादर करण्यात आली आहे,
‘‘जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे, त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप व अत्याचारांची कामे आहेत, त्यात कोणाशीही सहकार्य करू नका.”(कुरआन – ५:२)
एके प्रसंगी आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे,
‘‘ईश्वराने मला केवळ एवढ्यासाठीच पाठविले आहे की मी नैतिक गुणांना त्यांच्या परमोच्च स्थानावर पोचवावे आणि या कार्यात मी कोणतीही कसर बाकी ठेवू नये.”(हदीस ग्रंथ)
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी रंजल्या-गांजल्यांना उराशी कवठाळले, बुडत्याला सहारा दिला, ठेचाळणार्यास हात दिला, अन्याय व अत्याचारपीडिताच्या हाकेवर धावून गेले, शोषित, पीडितांना प्रत्यक्ष न्याय मिळवून दिल्यावरच श्वास घेतला, काटाच काढण्याचे ठरविले. पूर्ण विचार-विमर्श केल्यानंतर त्यांनी असे ठरविले की प्रत्येक कबिल्यातून एका तरुणाची निवड करायची आणि मग त्या सगळ्यांकडून प्रेषितांची हत्या करायची. यामुळे या हत्येत सर्वच कबिले सामील असल्यासारखे होईल आणि या सर्वच कबिल्यांचा सामना करण्याचे धैर्य प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कबिल्यास होणार नाही. ठरल्याप्रमाणे सर्वच कबिल्यातील योद्धे गोळा झाले आणि प्रेषितांच्या घराला घेराव घातला. प्रेषित सकाळी घराबाहेर पडताच सर्वांनी मिळून त्यांच्यावर हल्ला करायचे ठरले.
आणखीन एक लक्षणीय गोष्ट अशी की प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सत्यधर्मविरोधी शत्रुंनादेखील त्यांच्या ईमानदारी आणि प्रामाणिकतेवर जबरदस्त विश्वास होता. याच विश्वासामुळे बर्याच लोकांच्या आणि शत्रुंच्यासुद्धा ठेवी त्यांच्याकडे ठेवण्यात आलेल्या होत्या. एखाद्यास आपली एखादी वस्तु, जिन्नस, द्रव्य, संपत्ती सुरक्षित ठेवावी वाटत असल्यास तो बिनधास्तपणे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे ठेवून निश्चिंत होत असे. अशा प्रकारे प्रेषितांकडे शत्रुंच्या बर्याच ठेवीदेखील सुरक्षिततेस्तव ठेवण्यात आलेल्या होत्या. प्रेषित मुहम्मद (स.) यांना शत्रुंच्या कटकारस्थानाची माहिती मिळाली होती. त्यांनी माननीय अली (रजी.) यांना बोलावले आणि सांगितले की मला मक्का शहर सोडून मदीना शहरी प्रस्थान करण्याचा ईश्वरी आदेश झाला आहे. मी आज मदीना शहरी प्रस्थान करणार आहे. तुम्ही माझ्या पलंगावर माझी चादर पांघरून झोपावे. सकाळ होताच लोकांच्या ठेवी त्यांना सोपवाव्यात.
विचार करण्याची गोष्ट आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांना ठार मारण्याकरिता येणार्या शत्रुंच्या ठेवी परत करण्यात येताहेत. ज्या रात्री प्रेषितांना ठार करण्याचा बेत आखण्यात आला, त्या रात्री प्रेषितांनी त्यांच्या ठेवी परत करण्याची पूर्ण व्यवस्था केली. हा प्रेषितांचा त्यांच्या जीवावर बेतलेल्या शत्रुंशी व्यवहार होता. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दया आणि कृपेचा जो व्यवहार केला आणि ज्या धर्मपरायण आचरणाचे प्रदर्शन केले, त्याचे उदाहरण इतरच कोठेही सापडणे शक्य नाही.
विरोधकांच्या अमानुष छळाला कंटाळून केलेल्या मदीना प्रस्थानाच्या दहा वर्षांनंतर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी मक्का शहरावर विजय मिळविला. ज्या विरोधकांनी प्रेषित आणि त्यांच्या अनुयायांचा अमानुषपणे छळ केला होता, त्यांचे जगणे कठीण केले होते, तीन वर्षांपर्यंतच्या सामाजिक व आर्थिक बहिष्कारांतर्गत अबू तालिब नावाच्या घाटीमध्ये ठेवून अन्न-पाण्यावाचून तडफडण्यासाठी सोडले होते, आज ते समस्त शत्रु पराजित होऊन थरथर कापत विजेता प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर उभे होते. मात्र फक्त मित्रांसाठीच नव्हे तर शत्रुंच्याप्रतिसुद्धा दया आणि कृपा असलेल्या प्रेषितांनी कोणत्याही प्रकारे रक्तपात केला नाही. किंचितही त्रास दिला नाही. सर्वांना माफ केले. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याविरुद्ध लढणार्या आणि क्रूर व अमानुष पाषाणहृदयी शत्रुच्या लष्कराचे नेतृत्व करणार्या अबू सुफियान (रजी.) यांना अभय दिले, मान दिला.
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा दयाळू व कृपाळू व्यवहार आणि महान चारित्र्याची या घटनेवरून कल्पना येते की पराजित झालेला शत्रुपक्ष त्यांच्या ताब्यात होता, भयाने थरथर कापत होता, त्यांच्याकडून कशारितीने बदला घेतला जाईल, हे सांगता येत नव्हते. मात्र प्रेषितांनी सर्वांना क्षमा केली, स्वतंत्र केले.
वहशी नावाची एक व्यक्ती मक्का शहरात होता. यानेच प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या प्रिय काका हमजा (रजी.) यांचा वध केला होता. मक्का शहरावर प्रेषितांनी विजय मिळविल्यावर तो तेथून पळून गेला होता. त्यास वाटले होते की, प्रेषित त्यास क्षमा करणार नाहीत. मात्र जेव्हा त्यास प्रेषितांच्या शत्रुंच्या प्रति दया आणि कृपापूर्ण व्यवहाराची सूचना मिळाली, तेव्हा तो परत आला आणि प्रेषितदरबारी हजर झाला. प्रेषितांनी त्याला अभयदान दिले.
प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याशी जीवनभर लढणार्या शत्रुंच्या लष्कराचा आणि मक्का शहराचा सरदार अबू सुफियान याची ‘हिंदा‘नावाची पत्नी होती. ती प्रेषितांविषयी अतिशय वैरभाव बाळगत होती. याच वैरभावापोटी तिने प्रेषितांचे प्रिय काका हमजा (रजी.) यांच्या हत्येची वहशीला सुपारी दिली होती. हमजा (रजी.) यांचा वध झाल्यावर त्यांची छाती फाडून काळीज बाहेर काढून दातांनी चावले, त्यांच्या नाक-कानांचा हार गळ्यात घालण्याचे क्रौर्य दाखविले होते. मक्केवर प्रेषितांनी विजय प्राप्त केल्यावर तिने चेहर्यावर पडदा टाकला, जेणेकरून त्यांनी तिला ओळखू नये आणि सार्वजनिक क्षमादानात सामील होऊन जीव वाचवावा. मात्र प्रेषित मुहम्मद (स.) यांनी तिला ओळखले. प्रिय काका हमजा (रजी.) यांच्या हत्येसंदर्भात मुळीच उल्लेख न करता तिलाही माफ करून दया आणि कृपेचे दर्शन घडविले. प्रेषितांच्या या व्यवहारामुळे तिला भयंकर आश्चर्य वाटले. ती खूप प्रभावित झाली आणि इस्लामचा स्वीकार केला.
सफवान-बिन-उमैया ही कुरैशजनांतील प्रमुख व्यक्ती होती. इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या कट्टर शत्रुंमध्ये त्याची गणना होत होती. यानेच उमैर-बिन-वहब यास मुहम्मद (स.) यांचा वध करण्यासाठी नियुक्त केले होते आणि बक्षीससुद्धा घोषित केले होते. मात्र प्रेषितांच्या मक्का विजयाची सूचना मिळताच त्याने पळ काढला आणि जद्दाला रवाना झाला. तेथून समुद्रमार्गाने तो येमेनला जाण्याचा विचार करू लागला. उमै-बिन-वहब याने प्रेषितांना सांगितले की सफवान-बिन-उमैया कबिल्याचा प्रमुख असून तो आपल्या भीतीने मक्का शहर सोडून पळून गेला आहे. यावर प्रेषितांनी त्यास अभयदान दिले. उमैर सरळ सफवान बिन उमैयास जाऊन भेटला आणि प्रेषितांच्या अभयदानाची खबर दिली. मात्र सफवानने सांगितले की ‘‘मला भीती वाटते. मी मुहम्मद (स.) यांना खूप छळल्याचे तुम्हाला माहीतच आहे. ते कसे काय मला क्षमा करतील?”
‘‘अद्याप तुम्ही मुहम्मद (स.) यांना ओळखलेच नाही! तुम्ही त्यांची सहनशीलता आणि औदार्य अजून पाहिलेच नाही.” उमैयाने सगळा प्रकार समजावून सांगितला. सफवान उमैर (रजी.) बरोबर प्रेषितांच्या सेवेत हजर झाले, म्हणाले, ‘‘आपण माझा गुन्हा माफ केला, मला अभयदान दिले, असे उमैरने सांगितले ते खरे आहे काय?”
‘‘होय! खरे आहे!” प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले ‘‘मला दोन महिन्यांची मुदत द्यावी,” सफवानने विनंती केली.
‘‘मी तुम्हाला चार महिन्यांची मुदत देतो,” प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले. यानंतर सफवान (रजी.) यांनी सहर्ष इस्लामचा स्वीकार केला.
याप्रमाणेच इस्लामचा कट्टर शत्रु असलेल्या अबू जहलचे पुत्र इक्रमा हे मक्केवर प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या विजयानंतर येमेनदेशी पळून गेले होते. त्यांच्या पत्नीने अगोदरच इस्लामचा स्वीकार केला होता. ती स्वतः येमेनला जाऊन नवर्याला भेटली आणि प्रेषितांकडून क्षमादानाचे आश्वासन दिले. यानंतर दोघे नवरा-बायको प्रेषितदरबारी हजर झाले आणि इक्रमा (रजी.) यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांचा दयाळूपणा अनुभवला. प्रेषितांनी आपल्या कट्टर विरोधक आणि शत्रुच्या या पुत्रास उराशी कवटाळले आणि इक्रमा (रजी.) यांनी इस्लामचा स्वीकार केला.
अरब कबिल्यांपैकी बनी हनीफा हा कबिला इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत विरोधक होता. सुमामा बिन अस्साल या कबिल्याचे प्रमुख होत. त्यांना मुस्लिमांनी अटक केली होती. प्रेषितांच्या आदेशाने त्यांना मस्जिदच्या खांबाला बांधून ठेवण्यात आले होते. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यास विचारले,
‘‘कसे आहात ‘सुमामा?”
‘‘हे मुहम्मद (स.)! मी ठीक आहे. तुम्ही जर माझी हत्या केली तर समजा एका कबिल्याच्या सरदाराची हत्या होईल आणि जर जीवदान द्याल तर एका कृतज्ञ व्यक्तीवर उपकार होईल आणि धन पाहिजे असल्यास तेही मिळेल!”
सुमामांचे उत्तर ऐकून प्रेषित मुहम्मद (स.) तसेच निघून गेले. दुसर्या दिवशी...
‘‘कसे आहात सुमामा?” प्रेषित मुहम्मद (स.) यांनी विचारले.
‘‘मी तसाच आहे, जसा काल होतो! जर जीवदान द्याल तर एका कृतज्ञ व्यक्तीवर उपकार होईल आणि धनसुद्धा मिळेल!!”
प्रेषित मुहम्मद (स.) परत निघून गेले. यानंतर तिसर्यांदा प्रेषित त्यांच्याकडे आले आणि विचारपूस केली, त्यांनी परत तेच उत्तर दिले. यावेळी मात्र प्रेषितांनी त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले. सुमामांना प्रेषितांकडून याच दयापूर्ण व्यवहाराची आशा होती. सुटका होताच त्यांनी जवळच्या एका बागेत जाऊन स्नान केले आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर इस्लामचा सहर्ष स्वीकार केला आणि आपल्या भावना अशा शब्दांत व्यक्त केल्या.
‘‘हे मुहम्मद (स.)! या अवघ्या धरतीवर तुमच्यापेक्षा जास्त अप्रिय व्यक्ती माझ्या दृष्टीत कोणीही नव्हती. मात्र आज तुम्हीच या समस्त जगामध्ये मला सर्वाधिक प्रिय आहात. ईश्वराची शपथ! पूर्वी तुमच्या धर्मापेक्षा वाईट धर्म माझ्या दृष्टीत कोणताही धर्म नव्हता, मात्र आज सर्वांत जास्त माझा आवडता धर्म ‘इस्लाम’ हाच आहे. ईश्वराची शपथ! समस्त जगात आज मला तुमचीच वसती प्रिय आहे!” पहिल्या दिवशी तर सुमामांना वाटले की त्यांची हत्या करण्यात येईल. मात्र त्यांनी जेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांना प्रत्यक्ष पाहिले तेव्हा त्यांची निराशा संपली आणि त्यांना मनापासून वाटले की प्रेषितांचा स्वभाव अत्यंत दयाळू आहे. म्हणूनच त्यांनी प्रेषितांशी बोलताना शालीन आणि सभ्य शब्दांचा वापर केला. जणू प्रेषितांचा हा चमत्कारच होता की त्यांच्या मृदू स्वभावामुळे त्यांचा विरोधक आणि वैरीसुद्धा त्यांचा मित्रच होत होता.
हुदैबियाच्या शस्त्रसंधीप्रसंगी माननीय अस्मा (रजी.) (प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या भार्या) यांची आई अद्याप मूर्तीपूजक होती. ती आपल्या मुलीकडे अर्थात अस्माकडे आली आणि आर्थिक मदत मागितली. माननीय अस्मा (रजी.) यांनी प्रेषित मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘माझी आई अद्याप मुस्लिम झालेली नाही आणि तिला माझ्याकडून आर्थिक मदतीची गरज आहे, मी तिला मदत करणे योग्य ठरेल काय?” यावर दयाळू आणि कृपाळू प्रेषितांनी सांगितले, ‘‘तिच्याशी दयापूर्ण व्यवहार करावा आणि शक्य होईल तेवढी मदत करावी!”
माननीय अबू हुरैरह (रजी.) हे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे कट्टर अनुयायी आणि हदीस संग्रहक होते. मात्र त्यांची आई प्रेषितांना रोज शिव्या-शापांची लाखोली वाहायची. माननीय अबू हरैरह (रजी.) यांना याचे खूप दुःख वाटायचे. त्यांनी प्रेषितांसमोर हा सगळा प्रकार ठेवला, प्रेषितांनी तिच्यावर राग न धरता तिच्यासाठी ईश्वरदरबारी प्रार्थना केली आणि त्यांची ही प्रार्थना स्वीकार झाली. तिने इस्लामचा स्वीकार केला.
सातव्या हिजरी सनात ‘फिदक‘वर विजय प्राप्त झाला. माननीय बिलाल (रजी.) हे प्रेषित मुहम्मद (स.) यांचे विशिष्ट निकटस्थ व्यक्ती आणि परिवाराचे प्रबंधक होते. पैसे नसल्यावेळी बाजारातून उसणे-पासणे सामान घेऊन येत आणि पैसे आल्यावर उधारी देऊन टाकीत असे. एकदा एक बिगरमुस्लिम व्यक्तीने त्यांना सांगितले, ‘‘तुम्हाला कर्ज हवे असल्यास माझ्याकडून घेत जा.”
माननीय बिलाल यांनी त्याच्याकडून कर्ज घेतले. एके दिवशी तो बिलाल (रजी.) यांच्याकडे आला आणि तावातावाने म्हणाला,
‘‘ए काळ्या-कुट्ट माणसा! कर्ज परतफेडीच्या मुदतीसाठी फक्त चारच दिवस बाकी आहेत. तू परतफेड नाही केलीस तर तुला माझ्या शेळ्या चारवाव्या लागतील.” या प्रकाराने दुःखी होऊन बिलाल (रजी.) थेट प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासमोर हजर झाले. सगळा प्रकार त्यांच्या समोर ठेवला. मात्र प्रेषितांनी त्या सावकाराच्या या दुष्टतापूर्ण व्यवहाराकडे दुर्लक्ष केले आणि त्याचे कर्ज देऊन टाकले.
नजरान शहरावरून ख्रिस्ती धर्मियांचे एक प्रतिनिधीमंडळ मदीना शहरी प्रेषित मुहम्मद (स.) यांना भेटण्यासाठी आले. प्रेषितांनी त्यांचा सत्कार केला आणि मस्जिदामध्ये त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. एवढेच नव्हे तर त्यांना त्यांच्या धार्मिक रिती-रिवाजानुसार उपासनेची पूर्ण परवानगीसुद्धा दिली.
सत्यधर्माचा प्रचार करण्यासाठी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ताईफ येथे दौरा केला. हा दौरा एक ऐतिहासिक घटना आहे. ताईफ येथील दौर्यावर असताना तेथील लोकांनी त्यांच्याबरोबर क्रूर आणि दुष्टतापूर्ण व्यवहार केला आणि त्यांच्यावर दगडांचा वर्षाव करून त्यांना रक्तबंबाळ केले, मात्र प्रेषितांनी त्यांना शाप न देता त्यांच्या हितातच ईश्वरदरबारी प्रार्थना केली.
प्रेषित शिरोमणी मुहम्मद (स.) यांचे अवघे व्यक्तीमत्त्व म्हणजे ईश्वरी देणगी असलेले दया आणि कृपेचे एक मूर्त स्वरूपच होते. त्यांच्या अवघ्या जीवनात त्यांच्याकडून कोणासही काय अगदी त्यांच्या प्राणांवर बेतलेल्या शत्रुंनासुद्धा दया आणि कृपा मिळाली. आणि हेच कारण आहे की प्रेषितांच्या याच दयाळू व कृपाळू स्वभावामुळे या जगात इस्लामचा प्रचार व प्रसार झाला.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget