Articles by "hadees"

माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे.


आम्ही अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासोबत अबू  सैफ लोहार यांच्याकडे गेलो (जे पैगंबरांचे पुत्र इब्राहीम यांना दूध पाजणाऱ्या मातेचे पती होते.) पैगंबरांनी इब्राहीम यांना कडेवर घेऊन त्यांचे चुंबन घेतले आणि त्यांचा वास घेतला. काही दिवसांनंतर आम्ही पुन्हा अबू सैफ यांच्याकडे गेलो, त्या वेळी इब्राहीम हे मरणासन्न अवस्थेत होते. हे पाहून पैगंबरांच्या डोळ्यांत अश्रू आले. अब्दुर्रहमान बिन औफ (रजि.) म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! तुम्हीसुद्धा रडता?’’

तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘हे इब्ने औफ! ही कृपाशीलता आहे.’’

यानंतर त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. पैगंबर म्हणाले, ‘‘डोळे अश्रुंनी डबडबलेले आहेत आणि हृदय दु:खी झाले आहे. तरीसुद्धा आमच्या तोंडून तेच निघेल ज्यामुळे आमचा प्रभु प्रसन्न होईल. हे इब्राहीम, निश्च्ति आम्ही तुझ्या विरहात शोकाकुल आहोत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

पुत्र इब्राहीम यांना प्रेम केले. त्यांचे चुंबन घेतले आणि त्यांचा वास घेतला. आपल्या तोंडासह नाक इब्राहीमच्या तोंडावर अशा प्रकारे ठेवले जसे कोणी फुलाचा वास घेत आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पुत्र इब्राहीम तेव्हा सोळा-सतरा महिन्यांचेच होते की त्यांचे देहावसान झाले. येथे त्यांच्या आजारपणाचा व मरणासन्न अवस्थेचा उल्लेख करण्यात आला आहे. पैगंबरांनी जेव्हा पाहिले की हृदयाचा तुकडा नेहमीसाठी विलग होत आहे, तेव्हा पैगंबरांच्या डोळ्यांत अश्रू आले.

माननीय अब्दुर्रहमान बिन औफ (रजि.) पैगंबर मुहम्मद (स.) यांना म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! तुम्हीसुद्धा रडता?’’ याचा अर्थ होतो की अशा परिस्थितीत मनुष्य दु:खी होतो आणि त्याच्या डोळ्यांत अश्रू येतात. हे महानतेच्या प्रतिकूल अजिबात नाही. पैगंबर जगात यासाठी तर पाठविले जात नाहीत की त्यांनी लोकांना भावनाशून्य व संवेदनाहीन बनवावे. पैगंबर तर लोकांना जीवनाचा स्वाभाविक व सत्य मार्ग दाखविण्यासाठी येतो. मानवी जीवनात सुख व दु:खाचे अवसर येतच राहतात. दु:खाच्या समयी मनुष्याने दु:ख प्रकट करावे, परंतु त्याला ईश्वराच्या निर्णयावर काही तक्रार असू नये. मनुष्यासाठी सर्वाधिक उत्तम व योग्य नीती हीच आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या नातवाच्या निधनावरसुद्धा आपली मुलगी फातिमा (रजि.) यांच्या घरी गेले होते. जाण्यासाठी निघण्यापूर्वी एक निरोप पाठविला होता, ‘‘ते अल्लाहचेच आहे जे त्याने परत घेतले आणि तेसुद्धा अल्लाहचेच आहे जे त्याने दिलेले आहे. म्हणून तुम्हाला धैर्य राखले पाहिजे आणि प्रतिदान (सदका) इच्छुक होणे आहे.’’

पुत्रीच्या आग्रहाखातर जेव्हा पैगंबर त्यांच्याकडे गेले आणि मुलाला त्यांच्या कडेवर देण्यात आले तेव्हा ते मूल मरणासन्न अवस्थेत होते. पैगंबरांचे डोळे पानावले गेले. माननीय साद (रजि.) यांनी सांगितले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर!हे काय आहे?’’

पैगंबर म्हणाले, ‘‘ही कृपाशीलता आहे, ज्यास अल्लाहने आपल्या दासांच्या मनात ठेवली आहे. म्हणून अल्लाह त्याच्या त्याच दासांवर कृपावर्षाव करतो ज्यांच्या मनात दयाभाव असतो.’’

(हदीस : बुखारी, मुस्लिम) अर्थात, हा दयाभाव आहे जो प्रशंसनीय आहे, अप्रशंसनीय नाही. अशा स्थितीत जे अवैध आहे ते म्हणजे कपडे फाडणे, मातम करून रडणे इ. दु:खाचा मनुष्यावर जो स्वाभाविक परिणाम होतो त्यास तुच्छ समजणे संकुचित दृष्टिकोन आहे आणि धर्माच्या मूळ स्वभावाशी अनभिज्ञ होण्याव्यतिरिक्त आणखीन काहीही नाही.


माननीय अबू  हुरैरा (रजि.). यांचे निवेदन आहे.


अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना निवेदन करण्यात आले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अनेकेश्वरवादींना तुम्ही शापित करावे.’’

पैगंबर म्हणाले, ‘‘मला वास्तविकपणे धिक्कार करणारा बनवून पाठविले नाही, किंबहुना मला तर सर्वस्वी कृपा व दया बनवून पाठविले आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

म्हणजे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘माझा प्रमुख गुण कृपा व दया आहे. हे मला अशोभनीय आहे की मी लोकांना शाप द्यावा जेव्हा की अनेकेश्वरवादी लोक माझ्या शत्रुत्वात अतिसक्रिय आहेत. मला या जगात पाठविण्याचा उद्देश तर हा आहे की मी लोकांना ईशकृपेच्या निकट नेण्यासाठी प्रयत्नशील राहावे. अशा स्थितीत मला अशोभनीय आहे की लोकांना मी शाप द्यावा.’’


माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.


अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हे अल्लाह! मी एक मनुष्य आहे. मी ज्या कुणा मुस्लिमास वाईट म्हणेन अथवा त्याचा धिक्कार करीन, मार देईन तर यास त्याच्यासाठी उत्कृष्ठता व दयालुता बनव.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

मी एक मनुष्य आहे आणि मनुष्य असल्याने कमतरता व उणिवा माझ्यात असू शकतात. शक्यतो रागाच्या भरात एखाद्या मुस्लिमास भले-बुरे म्हणावे, धिक्कार करावा किंवा त्यास मार दिल्यास, हे प्रभो! यास त्या व्यक्तीसाठी तुझ्या दयेचे व कृपेचे निमित्त बनव. माझे रागावणे त्या व्यक्तीसाठी वरदान ठरो. एका हदीसमध्ये आले आहे,

‘‘हे अल्लाह! ज्या कोणा मुस्लिमास मी भले-बुरे म्हटले असेल तर यास कयामतच्या दिवशी त्याच्यासाठी तुझ्या सान्निध्याचे साधन बनव.’’ (हदीस : बुखारी)माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांचे कथन आहे.

ते सर्व अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे ऐकणे व आज्ञापालनासाठी प्रतिज्ञा करीत असत तेव्हा ते म्हणत, ‘‘असेसुद्धा सांगा की जितके काही माझ्याकडून शक्य आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

हदीसकथन करणाऱ्यांचे वर्णन आहे की जेव्हा आम्ही यावर प्रतिज्ञा घेत असू की आम्ही आदेशपालन करू आणि त्यास स्वीकारू आणि त्यानुसार अनुसरण करू. तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) असे सांगत असत, ‘‘तुमच्या प्रतिज्ञेत या शब्दांची भर टाका की आम्ही आज्ञापालन आमच्या सामथ्र्यानिशी करू.’’ ही खरे तर पैगंबरांची करुणा होती. त्यांची अपेक्षा होती की एखादे कार्य त्या व्यक्तीच्या सामथ्र्यापलीकडचे असेल तर तो मनुष्य त्या कार्यासाठी अल्लाहकडे अपराधी ठरू नये.


माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे.


पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘कोणीच सच्चा मुस्लिम असा नाही ज्याला मी या जगात व पारलौकिक जीवनात सर्वाधिक प्रिय नसेन. जर इच्छिता तर वाचा की पैगंबर ईमानधारकांसाठी त्यांच्या जिवांपेक्षासुद्धा अधिक निकट आहे.’’

....म्हणून ज्या ईमानधारकास मृत्यु येतो आणि तो संपत्ती मागे सोडतो तर त्याचे जिवंत नातेसंबंधी त्याचे वारसदार असतील आणि जो कोणी मागे कर्जाची रक्कम सोडून जाईल किंवा लहान मुलं मागे सोडले आणि ते माझ्याकडे आले तर मी त्यांच्यासाठी जबाबदार आहे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे त्याने त्याच्या मागे धनसंपत्ती सोडली असेल तर ती त्या मृताच्या वास्तविक वारसदारांना मिळेल. जर कोणी आपल्या मागे कर्ज आणि लहान मुलं सोडून जाईल तर अशा मृताचा स्वजन व आत्मिय स्वत: पैगंबर मुहम्मद (स.) हे आहेत. त्याचे कर्ज फेडणे व त्याच्या लहान मुलांचे पालनपोषण करणे हे पैगंबरांचे दायित्व आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी इस्लामी राज्याच्या अध्यक्षाच्या अधिकारात वरील विवेचन केले आहे. यावरून स्पष्ट कळून येते की शासनदायित्व अतिविस्तृत व महत्त्वपूर्ण असते. यावरून इस्लामी राज्याची मानसिकतासुद्धा कळून येते.माननीय अनस बिन मलिक (रजि.) यांचे कथन आहे,

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘काय तुम्हाला माहीत आहे की सर्वांपेक्षा जास्त दानशूर कोण आहे?’’

साथीदारांनी (सहाबा) सांगितले, ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबर मुहम्मद (स.) हेच अधिक जाणणारे आहेत.’’

पैगंबर म्हणाले, ‘‘सर्वांपेक्षा जास्त दानशूर अल्लाह आहे. मग आदमच्या संततीत सर्वांपेक्षा जास्त दानशूर मी स्वत: आहे आणि माझ्यानंतर मानवआंत सर्वांत जास्त दानशूर तो आहे जो ज्ञान प्राप्त करून त्यास प्रसारित करतो. असा मनुष्य कयामतच्या दिवशी एका श्रीमंत मनुष्याच्यारूपात येईल किंवा अशा प्रकारे येईल की त्याला स्वत:मध्ये एक समुदायाची पात्रता प्राप्त होईल.’’ (हदीस : अबू  दाऊद)

स्पष्टीकरण

दानशीलता खरे तर जीवनाचे प्रतीक आहे. जिथे कुठे जितके जीवन आढळते तिथे तितकीच दानशीलतासुद्धा सापडेल. अल्लाह तर सर्वस्वी जीवन आणि जीवनस्रोत आहे. कारण याव्यतिरिक्त कोणत्याच दानशीलतेची मनुष्य कल्पना करू शकत नाही. हे आकाश व पृथ्वी अल्लाहची दानशीलता आणि त्याचे अनुग्रह व अनुकंपेचे बोलके प्रमाण आहे. अल्लाहनंतर दानशीलतेचे गुण सर्वांपेक्षा जास्त ईशपैगंबराला प्राप्त होते, कारण ईशगुणांची प्रतिछाया पैगंबरजीवनात सर्वांपेक्षा जास्त परिलक्षित होते.

दानशीलतेचा संबंध फक्त धनसंपत्तीशीच नसतो. सर्वांपेक्षा जास्त दानशीलता आणि उपकाराची गोष्ट म्हणजे जगाला ज्ञानप्रकाशाने प्रकाशित केले जावे.

याचमुळे या हदीसमध्ये आदमच्या संततीत सर्वांपेक्षा श्रेष्ठ दानशील त्या व्यक्तीला घोषित केले आहे जो ज्ञान व अंतर्दृष्टीने सुसज्जित होऊन जगातज्ञानप्रकाशाला पैâलावित असतो, जेणेकरून लोक पथभ्रष्टतेच्या अंधकारापासून मुक्त व्हावेत. त्या लोकांसाठी खरे सुख प्राप्त व्हावे आणि  त्यांना या जगात तसेच पारलौकिक जीवनात सफलता व कल्याण प्राप्त व्हावे.माननीय अनस (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.

एका मनुष्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे शेळ्यांची मागणी केली ज्या दोन पहाडांमध्ये चरत होत्या. पैगंबरांनी त्या सर्व शेळ्या त्या मनुष्याला देऊन टाकल्या. तो मनुष्य त्याच्या वस्तीत जाऊन म्हणाला, ‘‘हे लोकांनो! मुस्लिम व्हा. ईश्वरशपथ, मुहम्मद (स.) इतके काही देतात की दारिद्र्याची भीती नष्ट होते.’’ (हदीस:मुस्लिम)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मागणाऱ्याला कधीही परत पाठविले नाही तर देण्यात अत्यंत दयालुता दाखविली.

माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे की एक व्यक्ती जगासाठी मुस्लिम होतो तेव्हा इस्लाम त्याच्या दृष्टीत समस्त जगांपेक्षा अधिक प्रिय होतो. हा होता सत्यधर्म चमत्कार आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सान्निध्याचा प्रवाभ!अर्थात, भौतिकतेला प्राधान्य देणारेसुद्धा पैगंबरांच्या जवळ येऊन सत्य स्वीकारतात.माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांनी सांगितले,

पैगंबर मुहम्मद (स.) लोकांपैकी सर्वांत जास्त दानशूर होते आणि रमजान महिन्यात इतर महिन्यांपेक्षा अधिक दानशूर होत असत. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

रमजान महिना हा तर सदाचाराचा महिना आहे. म्हणून या महिन्यात दानशीलतेत वाढ होणे स्वाभाविक आहे.

सहीह बुखारीतील एका हदीसनुसार ज्ञात होते की जिब्रिल (अ.) रमजानच्या प्रत्येक रात्री पैगंबर मुहम्मद (स.) यांना भेटत असत आणि त्यांच्यासोबत कुरआन पठण करीत असत. जेव्हा पैगंबर जिब्रिल  (अ.) यांना भेटत असत तेव्हा दुसऱ्यांना लाभकारी सिद्ध होण्यास वाहत्या वाऱ्यापेक्षासुद्धा जास्त दानशूर होत असत.

माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांच्याकडून उल्लेखित आहे,

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जर माझ्याजवळ उहुद पर्वताएवढे सोन्याचे भांडार जरी असेल तरी माझ्या प्रसन्नतेची गोष्ट त्या भांडारातून तीन रात्रीत काहीच शिल्लक राहणार नाही की मी एखादे कर्ज फेडण्यासाठी त्यातून काही घ्यावे.’’(हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

या हदीसनुसार कळते की दानशीलता पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या चारित्र्याचे अत्यंत ठळक वैशिष्ट्य होते. धन प्राप्त करण्यात नव्हे तर धन वितरित करण्यात पैगंबर प्रसन्न होत असत. धन कितीही जास्त असो, त्याचे समाप्त होण्यावर पैगंबर दु:खी होण्याऐवजी आनंदित होत होते.माननीय अबू   सईद खुदरी (रजि.) सांगतात,

पैगंबर मुहम्मद (स.) हे पडद्यात (बुरखा) राहणाऱ्या कुमारिकेपेक्षाही जास्त लज्जाशील होते. जेव्हा एखादी अप्रिय गोष्ट त्यांना दिसल्यास तो अप्रियभाव त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत असे. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे एखादी अप्रिय व स्वभावाशी प्रतिवूâल गोष्ट पाहिल्यास लज्जाशीलतेमुळे तोंजाने जरी पैगंबर मुहम्मद (स.) काही सांगत नसत, परंतु त्या अप्रियतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत असत.

पडद्यात (बुरखा) असणाऱ्या कुमारिका अति लज्जाशील व लाजाळू असतात. परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यात लज्जाशीलता त्यांच्यापेक्षासुद्धा अधिक होती.

५७) माननीय अब्दुल्लाह बिन अम्र बिन आस (रजि.) सांगतात,

‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या स्वभावात अश्लीलता नव्हती आणि कोणतेच अश्लील कृत्य ते करत नसत.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)माननीय अली (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.

अबू जहलने पैगंबर मुहम्मद (स.) यांना सांगितले, ‘‘हे मुहम्मद (स.)!आम्ही कुरैश लोक तुम्हाला खोटे ठरवित नाही. आम्ही तर त्यास खोटे ठरवित आहोत ज्यास तुम्ही घेऊन आला आहात.’’


स्पष्टीकरण

अर्थात आम्हांवर तुमचे सत्य प्रकाशमान व दिवसाच्या उजेडाइतके स्पष्ट आहे. आम्ही कधीही तुम्हाला खोटे बोलताना ऐकले नाही. लोकांत सत्यवादिता व अमानतीच्या दृष्टीने तुम्ही ओळखले जाता. आम्ही खरेतर तुमचा ग्रंथ व शरीयतला अमान्य करतो. आम्ही त्या दिव्य अवतरणाला स्वीकारत नाही ज्यास तुम्ही प्रस्तुत करीत आहात.

कदाचित! सत्यविरोधकाला हे समजले व उमजले असते की जो मनुष्य या जगाच्या मामल्यात लोकांशी खोटे बोलू शकत नाही तो धर्माच्या मामल्यात खोटे कसे बोलेल? ज्या मनुष्याची स्पष्ट विशेषता ही सत्यवादिता आहे तो ईश्वराशी एखादी खोटी गोष्ट कशी संबोधित करील?

खरेतर मक्का येथील कुरैशचे मोठमोठे सरदार ईर्षा, द्वेष, अहंकार व पूर्वग्रहदूषित होते, ज्यामुळे सत्य स्वीकारणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.माननीय अब्दुल्लाह बिन औफ (रजि.) सांगतात.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) अधिकतर ईशस्मरणात राहत असत. व्यर्थ गोष्टींपासून सावध राहत आणि नमाजला दीर्घ व भाषण संक्षिप्त करत असत. ते विधवा व निर्धन गरीबांसोबत चालण्यात संकोच करीत नव्हते आणि विधवा व निर्धनांचे प्रत्येक काम ते करून देत असत. (हदीस : नसई, दारमी)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) अधिकतर ईश्वराला स्मरण करीत असत. ईशस्मरणाशी संबंधित प्रत्येक काम ईशस्मरणात समाविष्ट आहे. पैगंबर अल्लाहचे स्मरण विविध प्रकारे प्रत्येक क्षणी करीत असत.

खरे जीवन ईशस्मरण व त्याच्या आठवणीशी संबंधित आहे. ज्या जीवनात ईशस्मरण नाही, ते जीवन नाही तर ते संताप व अभावग्रस्तता आहे. हे वेगळे आहे की एखादा मनुष्य या गोष्टीची जाणीव ठेवून नसेल.

या जगाविषयी पैगंबर मुहम्मद (स.) यांना तर कमीच आवड होती. जगाविषयीच्या गोष्टी ते कमीच बोलत असत. तसे पाहता भौतिक गोष्टीसुद्धा बुद्धीविवेकपूर्ण व उद्देशपूर्ण असत. वास्तविकपणे त्यांना व्यर्थ म्हटले जाऊ शकत नाही. परंतु उपलक्षी त्यांना व्यर्थ म्हटले गेले आहे. व्यर्थ गोष्टींशी अभिप्रेत त्या गोष्टी आहेत ज्यांचा कोणताच वास्तविक उद्देश नसावा आणि जे ईशस्मरणाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबोधित नसतील. स्पष्ट आहे की पैगंबरांच्या तोंडून अशी व्यर्थ गोष्टनिघणे अशक्य होते.

मूळत: थोड्यासाठी ‘कलील’ शब्द प्रयुक्त झाला आहे. ‘़कलील’ शब्द निषेधच्या अर्थानेसुद्धा वापरला जातो. या अर्थाने काही लोकांनी या हदीसचा अर्थ असा सांगितला आहे की अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या तोंडून कधीही व्यर्थ बोलत नसत.

अल्लाहशी घनिष्ट संबंध असल्यास नमाज स्वाभाविकपणे दीर्घ होते. तसेच भाषणात अनावश्यक गोष्टींपासून दूर राहिल्यास आणि केवळ आवश्यक गोष्टी करणे पर्याप्त समजले तर भाषण कधीही लांबले जात नाही किंवा ते कंटाळवाणे होत नाही. म्हणूनच पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्याची दीर्घ नमाज आणि त्याचे संक्षिप्त भाषण त्याच्या बुद्धीमत्तेचे प्रतीक आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

मनुष्याच्या नादानपणाची व अविचारी गोष्ट ही आहे की त्याने भाषण तर लांबलचक द्यावे, परंतु नमाज जी अभिष्ट आहे तिला संक्षिप्त करावे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यात किंचितसासुद्धा अहंकार नव्हता जेव्हा की अल्लाहने त्यांना सर्वोच्च स्थान बहाल केले होते.माननीय आएशा (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापुढे दोन कामांपैकी एक काम करण्याचा विकल्प ठेवला असता पैगंबर अनिवार्यपणे जे काम सोपे आहे त्यास स्वीकारत. अट हीच होती की ते काम चुकीचे नसावे. जर ते चुकीचे असले तर त्यापासून सर्वप्रथम अलिप्त राहणारे पैगंबर होते. पैगंबरांनी स्वत:साठी कोणाशीही कधीही बदला घेतला नाही. परंतु अल्लाहच्या प्रतिष्ठेविरूद्ध जर एखादे कृत्य केले जाई तेव्हा ते अल्लाहसाठी त्याचा बदला अवश्य घेत असत. (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

जीवनधर्माला हे कधीही अपेक्षित नाही की मनुष्याने स्वत:ला कष्ट द्यावेत. इस्लामने या संन्यासी धारणेचा निषेध केला आहे की एखाद्या मनुष्याला कठोरतम तपस्येविना आणि जीवघेण्या साधनेविना पूर्णत: प्राप्त होत नाही. याचमुळे दोन कामांपैकी एकाचा विकल्प पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पुढे ठेवला जाई तेव्हा ते त्या कामाला करत जे सहजरित्या किंवा अधिक सोपे असे. पैगंबरांनी अनुयायींच्या सहजसोपेपणाला नेहमी प्राधान्य दिले. पैगंबरांची कार्यनीती अनुयायींसाठी एक आदर्श आहे.

ज्याप्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) मानवजातीत सर्वांपेक्षा श्रेष्ठ दानशूर होते जसे त्यांचे कथन आहे, ‘‘मी मानवांपैकी सर्वांत जास्त दानशूर आहे.’’ (हदीस : बैहकी) अगदी याचप्रमाणे सर्व मानवांपैकी सर्वांत जास्त ईशपरायण व्यक्ति पैगंबर मुहम्मद (स.) हेच होते. एका पैगंबराची हीच कार्यनीती व व्यक्तित्व असते.

पैगंबर मुहम्मद (स.) यांचे खरे अनुकरण हे आहे की मनुष्याने पैगंबरांच्या या दोन्ही वैशिष्टयांना आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील राहावे.माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे.

एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांनी उंटाच्या पाठीवरील जुन्या लाकडी हौद्यावर फाटलेल्या चादरीसह हजयात्रा केली होती. त्या जुन्या लाकडी हौद्याची किंमत चार दिरहम किंवा त्यापेक्षा कमी होती.

स्पष्टीकरण

ज्या प्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या अनुयायींना साधी राहणीची शिकवण दिली त्याचप्रमाणे पैगंबरांनी स्वत:सुद्धा साध्या रहाणीचा अंगीकार केला होता. त्यांनी भौतिक थाटमाटाकडे दुर्लक्ष केले होते. पैगंबरांची ही साधी राहणी त्या वेळची आहे जेव्हा पूर्ण अरब इस्लामच्या अधिनस्त झाला होता. ही घटना हिजरी सन १० ची आहे. पैगंबरांनी इच्छिले असते तर स्वत:साठी फार काही सुखसुविधा आणि थाटमाटाला हस्तगत केले असते.


माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) एका चटईवर झोपले आणि जेव्हा ते झोपेतून जागे होऊन उठून बसले तेव्हा त्यांच्या शरीरावर चटईचे वण पडलेले होते. यावर आम्ही पैगंबरांना विनंती केली की त्यांच्यासाठी एक बिछाना बनवून देऊ का?

त्यावर पैगंबर म्हणाले, ‘‘मला या जगाशी काहीही देणे घेणे नाही. मी या जगात तर त्या प्रवाशासमान आहे जो एखाद्या झाडाच्या सावलीत अल्पकाळ विसावतो. नंतर त्यास सोडून आपल्या गंतव्याकडे प्रस्थान करतो.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी स्वत:च्या व्यवहारनीतीद्वारा सिद्ध केले की हे जग यासाठी नाही की कोणी एखाद्याने जगाच्या मोहात पडून जगावे आणि मरून पडावे. हे जग तर एक मार्ग व साधन आहे आणि त्यासच गंतव्य व साध्य समजण्याची घोडचूक कधीही करू नये.

येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की चटई (गोणपाट) वर झोपण्याची ही घटना त्या काळातील आहे जेव्हा इस्लाम सत्तेत होता.

ही एक वस्तुस्थिती आहे की या जगाशी जो कोणी प्रेम करील तेव्हा पारलौकिक जीवनाचे महत्त्व व त्याचे मूल्य त्याच्या नजरेत शिल्लक राहू शकत नाही. म्हणून मनुष्याची नजर सतत पारलौकिक जीवनाकडे असली पाहिजे. या जगात स्वत:चे दायित्व निर्वाहण करण्याचीच चिंता लागून असली पाहिजे.माननीय जुंदुब बिन सुफियान (रजि.) यांचे कथन आहे.

कोणत्यातरी युद्धात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या करंगळीला दुखापत झाली आणि रक्त वाहू लागले तेव्हा आपल्या करंगळीला उद्देशून ते म्हणाले, ‘‘तू तर एक रक्तरंजित करंगळी आहेस. तुला जी दुखापत झाली आहे ती ईशमार्गात झालेली आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

म्हणजे हा त्रास जो ईशमार्गात झाला आहे त्यावर मी खेद व्यक्त का करावा?ईशमार्गात प्राणसुद्धा पणाला लावले जाऊ शकते. ईशमार्गावर मार्गस्थच्या मार्गाला संकट रोखू शकत नाही आणि ईशमार्गावर मार्गस्थ या मार्गात होणाऱ्या कष्टांविषयी दुसऱ्याकडे तक्रारसुद्धा करीत नाहीत.

माननीय अब्दुल्लाह बिन मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.

मी जणूकाही अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना एका पैगंबरांचा वृत्तान्त सांगताना पाहात आहे, ज्यांची त्यांच्या लोकसमुदायाने हत्या केली होती. ते आपल्या मुखावरील रक्त साफ करत होते आणि सांगत होते, ‘‘हे अल्लाह! तू माझ्या देशबांधवांना क्षमा कर कारण त्यांना माहीत नाही की ते काय करीत आहेत.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

खरेतर पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या स्वत:चा हाच वृत्तान्त आहे. लोकांनी त्यांना ताईफ शहरात सत्य आवाहन करताना आणि उहुद युद्धाप्रसंगी जखमी केले होते. परंतु पैगंबरांनी त्या वेळी असामान्य धैर्याने काम घेतले होते. पर्वताच्या ईशदूताने जेव्हा पैगंबरांना विचारले, ‘‘तुम्ही इच्छिले तर ताईफ शहराच्या बाजूचे दोन्ही पर्वत या वस्तीवर उलटून देऊ?’’ (म्हणजे वस्तीतील सर्व लोक चिरडून मरतील.)

तेव्हा पैगंबरांनी सांगितले, ‘‘नाही! मला आशा आहे की या लोकांच्या संततीत असे लोक जन्माला येतील जे एक ईश्वराची पूजा करतील आणि एकेश्वरत्वात दुसऱ्या कोणालाही भागीदार करणार नाहीत.’’

(हदीस : मुस्लिम, बुखारी, नसई) शारीरिक कष्टाव्यतिरिक्त पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मानसिक त्राससुद्धा सहन केला आहे. एकदा पैगंबरांना सूचना प्राप्त झाली की एक मनुष्य सांगत आहे की संपत्तीवाटपात पैगंबरांनी ईशभय व अंतिम दिनाला दृष्टीसमोर ठेवले नाही,

तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहची कृपा मूसा (अ.) यांच्यावर होवो, त्यांना यापेक्षासुद्धा जास्त त्रास दिला गेला आणि त्यांनी संयम बाळगला होता.’’ (हदीस : मुसनद अहमद, तिर्मिजी, अबू दाऊद)माननीय मुगीरा (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) रात्री अतिजास्त काळ नमाजमध्ये उभे राहिले. ज्यामुळे त्यांचे पाय सुजले होते. पैगंबरांना यावर विचारण्यात आले, ‘‘तुमच्या तर मागील पुढील सर्व उणिवांना अल्लाहने माफ केलेले आहे तेव्हा तुम्ही नमाज अदा करताना इतका त्रास का घेता?’’

यावर पैगंबर म्हणाले, ‘‘काय मी एक कृतज्ञ दास बनू नको?’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम, इब्ने माजा)


स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) दीर्घकाळ नमाजमध्ये उभे राहिले, ज्यामुळे त्यांचे पाय सुजले होते. ते उपासनेत असाधारण कष्ट घेत होते. त्यांना विचारण्यात आले, ‘‘इतके कष्ट का उचलता? जे अतिकष्ट तुम्ही उचलता त्याची तर आवश्यकताच नाही.’’ पैगंबरांच्या मागील-पुढील सर्व उणिवांना माफ करण्यात आलेले आहे. ‘कुरआनच्या सूरह अल फतह, आयत नं. २’नुसार सांगितले गेले आहे.

या प्रश्नाचे जे उत्तर पैगंबरांनी दिले त्याचा अर्थ असा होतो की जेव्हा अल्लाहने इतके असीम उपकार त्यांच्यावर केले तेव्हा त्यांचे कर्तव्य ठरते की पैगंबरांनी अल्लाहचे कृतज्ञ दास बनावे आणि अधिकाधिक ईशप्रसन्नतेचे इच्छुक व्हावे. या हदीसद्वारा माहीत होते की अल्लाहप्रति कृतज्ञ बनण्यासाठी आवश्यक आहे की दासाने ईश्वराचे अधिकाधिक सान्निध्य प्राप्त करावे आणि अल्लाहशी अधिकाधिक संबंध व्यक्त करावेत. यासाठी सर्वोत्तम साधन नमाज आहे आणि सजदा करणे (नतमस्तक होणे) तर विशेषरूपाने ईशसान्निध्यप्राप्तीचे साधन आहे, नव्हे तर सान्निध्यस्थितीचे दुसरे नाव आहे.माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा लोकांना आदेश देत असत तेव्हा त्यांना त्या कर्मांना करण्याचा आदेश देत ज्यांना करण्याची शक्ती व सामर्थ्य त्यांच्यात राहात होते. लोकांनी विनंती केली, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही तुमच्यासारखे अजिबात नाहीत. अल्लाहने तर तुमच्या मागील पुढील सर्व उणिवांना क्षमा केली आहे.’’

यावर पैगंबरांना जास्तच राग आला आणि त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. नंतर पैगंबर म्हणाले, ‘‘मी तुमच्यापेक्षा जास्त अल्लाहचे भय बाळगून आहे आणि तुमच्या सर्वांपेक्षा अल्लाहला जाणणारा मी आहे.’’

स्पष्टीकरण

एक हदीसकथन आहे,

‘‘मी सर्व लोकांपेक्षा जास्त अल्लाहला जाणून आहे आणि सर्वांपेक्षा जास्त ईशभय बाळगून आहे.’’

वरील हदीसचा अर्थ असा आहे की ईशआज्ञापालन व ईशउपासनेची खरी प्रेरक शक्ती अल्लाहची ओळख आणि ईशभय आहे. याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणासही याचा प्रेरणास्रोत तसेच प्रेरक शक्ती समजणे चुकीचे आहे, जेव्हा की ईशज्ञान व ईशभय या दोहोंत मी तुम्हा सर्वांपेक्षा जास्त आहे, तेव्हा ईशआज्ञापालन व उपासनेत तुम्हाला माझे अनुसरण केले पाहिजे. माझ्या पद्धतीपासून इतर दुसरी पद्धत जी तुम्ही स्वीकाराल ती चुकीची आणि अल्लाहच्या इच्छेविरूद्ध असेल.

अल्लाहला जाणणे आणि ईशभयाला धारण करण्यात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यापेक्षा जास्त दुसरा कोण असेल? पैगंबरांनी स्वत:चे आणखीन एक वैशिष्ट्य हे सांगितले की ठेव (अमानत) त्या परत देण्यात दुसरा कोणीच त्यांचा मुकाबला करू शकत नाही. एकदा एका यहुदी (ज्यू) माणसाने द्वेषापोटी व शत्रुत्वामुळे जेव्हा पैगंबरांच्या अमानतदारीवर शंका प्रकट केली तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तो खोटारडा आहे आणि तो स्वत: जाणून आहे की मी सर्व लोकांपेक्षा अधिक जास्त अल्लाहचे भय बाळगणारा आणि सर्वांपेक्षा जास्त अमानतींना (ठेव) परत करणारा आहे.’’माननीय आएशा (रजि.) सांगतात,

एकदा रात्री पैगंबर मुहम्मद (स.) बिछान्यावर न दिसल्याने मी त्यांना शोधू लागले. माझा हात त्यांच्या तळपायावर पडला तेव्हा ते सजदा करत होते (नतमस्तक) आणि म्हणत होते,

‘‘हे अल्लाह! मी तुझ्या प्रकोपापासून सुरक्षित राहण्यासाठी तुझ्या प्रसन्नतेचा आधार घेत आहे. तुझ्या यातनेपासून सुरक्षित राहण्यासाठी तुझ्या क्षमादानशीलतेच्या आश्रयाला येत आहे आणि तुझ्या पकडीतून वाचण्यासाठी तुझ्याच शरणात येत आहे. माझ्यात हे सामर्थ्य नाही की मी तुझी पूर्ण स्तुती करावी. तू असाच आहे जसा की तू स्वत:ची स्तुती आणि प्रशंसा करतो.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या प्रार्थनेचे हे शब्द समजून घेण्यासाठी पर्याप्त आहेत की पैगंबरांचे पवित्र हृदय कोणकोणत्या भावविश्वाने परिपूर्ण होते आणि पैगंबर ईशभयाने किती अधिक प्रमाणात भीत होते!माननीय मुतरीफ बिन अब्दुल्लाह बिन शिख्खीर  त्यांच्या पित्याच्या माध्यमातून निवेदन करतात.

त्यांनी सांगितले, ‘‘मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर झालो त्या वेळी ते नमाज अदा करीत होते आणि पैगंबरांच्या हृदयातून अशा प्रकारे आवाज येत होता ज्याप्रमाणे उकळत्या भांड्यातून आवाज निघतो. अर्थात, पैगंबर रडत होते.’’(हदीस : मुसनद अहमद, नसई)

स्पष्टीकरण

अबू दाऊदचे हदीसकथन आहे,

‘‘मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना नमाज अदा करताना पाहिले. त्या वेळी रडताना त्यांच्या छातीतून पिठाच्या गिरणीसारखा आवाज येत होता.’’

नमाजमध्ये ईशभयामुळे रडण्याने तसेच हुंकार भरण्याने नमाज व्यर्थ जात नाही. परंतु एखादा मनुष्य शारीरिक पीडा व कष्टामुळे मोठ्या आवाजात रडत असेल किंवा हुंदका देत असेल तर नमाज तुटेल. (हिदाया)माननीय आएशा (रजि.) सांगतात,

‘‘मी कधी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना अशा प्रकारे हसताना पाहिले नाही की तोंड पूर्णत: उघडे आहे आणि आतील कंठी दिसू लागेल. पैगंबर केवळ स्मितहास्य करीत असत जेव्हा आकाशात ढग व सोसाट्याचा वारा पहात तेव्हा त्यांचा चेहरा बदलून जात ज्याला सहज समजले जात असे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांचा चेहरा भयभीत होण्याची लक्षणे स्पष्ट दिसत असत. त्यांचे हृदय नेहमी ईशभययुक्त असे. आकाशात ढग आच्छादित होणे व सोसाट्याचा वारा वाहणे, यावर ते अधिक चिंतीत होत असत, कारण ढग व हवेच्या मागे एखादे वेळी ईशप्रकोपाची वीज तर दडलेली नसावी.

एका हदीसनुसार कळते की अशा परिस्थितीत त्यांची चिंता अधिक वाढत असे, ज्यामुळे ते घरात व घराबाहेर ये-जा करीत असत. त्यांची ही व्याकुळ स्थिती तेव्हाच संपत असे जेव्हा पाऊस पडणे सुरू होत असे.

माननीय आएशा (रजि.) यांनी पैगंबरांना त्यांच्या व्याकुळतेविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे आएशा! कोणास ठाऊक, हे ढग तेच तर नाहीत ज्यांच्याविषयी आदच्या राष्ट्रातील लोकांनी सांगितले होते, ‘हे ढग आहेत, पाऊस पडेल.’ परंतु आद लोकसमुदाय भ्रमात राहिला होता. ईश्वराने त्या राष्ट्राला नष्ट करून त्वरित त्यांचा हा भ्रम दूर केला.’’माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मी का म्हणून आनंद व सुखाचा उपभोग घ्यावा जेव्हा की वस्तुस्थिती तर ही आहे की नरसिंग फुंकणाऱ्या देवदूताने (फरिश्ता) नरसिंगास आपल्या तोंडात घेतले आहे. तो खाली मान करून उभा आहे आणि कान देऊन प्रतिक्षेत आहे की केव्हा त्याला सूर फुंकण्याचा आदेश दिला जातो.’’

साथीदारांनी विचारले, ‘‘या अवस्थेत तुम्ही आम्हाला कोणता आदेश द्याल?’’

पैगंबर म्हणाले, ‘‘सांगा! आम्हासाठी अल्लाह पुरेसा आहे आणि तो उत्तम कार्यसाधक आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण

अर्थात, ज्या व्यक्तीला या स्थितीचे गांभीर्य कळेल की देवदूत सूर फुंकण्यास अगदी तयार आहे, कोणत्याही वेळी कयामत येऊ शकते आणि ज्याला या स्थितीची पूर्ण जाणीव आहे तो चैनीत कसा राहू शकेल? जगातील कोणतेही सुख व आराम त्याला या स्थितीपासून निश्चिंत राहू कसे देतील? त्याला हीच चिंता लागून राहील की या जगात त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण कारणी लागावा आणि जीवनक्षण व्यर्थ जाऊ नये. तो मनुष्य सतत ईशभय बाळगून जीवन जगत राहील.

मनुष्य ज्या परिस्थितीतून जात आहे जर त्याला त्याची गंभीरता जाणवेल तर तो कदापि चैनीत राहणार नाही. अशा स्थितीत मनुष्यासाठी योग्य कार्यनीती ही आहे की त्याने अल्लाहची अवज्ञा व अपराधांपासून अलिप्त राहावे आणि ईशभक्तीची (बंदगी) कधीही उपेक्षा करू नये. परंतु दृढविश्वास मात्र त्याला स्वत:च्या कामगिरीवर नव्हे तर आपल्या अल्लाहवर असावयास हवा. कोणावर भरोसा व विश्वास ठेवला जाऊ शकतो तर ते दुसरे इतर काहीही नसून अल्लाहच आहे. मनुष्याने अल्लाहलाच आपला कार्यसाधक समजावे आणि आपला मामला त्याच्याच हवाली करावा आणि घोषित करावे की अल्लाह आमच्यासाठी पर्याप्त आहे. संकट काळात याचमुळे शांती प्राप्त होऊ शकते.

 

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget