Articles by "hadees"


माननीय इब्ने अब्बास (रजि.) हे वर्णन करतात. 

पैगंबर मुहम्मद (स.) बद्रच्या युद्धाप्रसंगी एका राहुटीत खालीलप्रमाणे प्रार्थना (दुआ) करत होते. ‘‘हे अल्लाह मी तुझ्यापाशी तुझ्या आश्रयासाठी याचना करतो आणि तुझे वचन पूर्ण व्हावे याची याचना करतो. हे अल्लाह! तू जर इच्छिले की (मुस्लिम नष्ट व्हावेत) तर आजनंतर तुझी इबादत (भक्ती) होणार नाही.’’

यावर अबू  बकर (रजि.) यांनी पैगंबरांचा हात धरून विनंती केली, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! बस, इतके पर्याप्त आहे. तुम्ही अत्यंत द्रवणशीलतेसह व रुदनभाविभोर होऊन प्रभुशी याचना केली आहे.’’

यानंतर पैगंबरांनी चिलखत परिधान केले आणि तंबूतून त्वरित बाहेर आले आणि पुढील आयतचे ते पठण करीत होते, ‘‘सत्यविरोधकाचा हा दल लवकरच पराजित होईल आणि हे पाठ दाखवून पळत सुटतील.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

ईश्वराने पैगंबर मुहम्मद (स.) यांना वचन दिले होते,

‘‘आणि स्मरण करा जेव्हा अल्लाह तुम्हाला वचन देत होता की दोन दलांपैकी एक दल तुमच्या स्वाधीन केला जाईल.’’ (दिव्य कुरआन, ८:७) 

अल्लाहच्या या वचनाचा हवाला देऊन पैगंबर दुआ (प्रार्थना) करीत होते. अल्लाहच्या वचनावर विश्वासाव्यतिरिक्त दासाचे कर्तव्य आहे की त्याने प्रभुशी प्रार्थना व विनयपूर्वक याचना करण्याकडे दुर्लक्ष करू नये. दासाचे दास्यत्व व अल्लाहच्या महानतेची हीच मागणी आहे की दासाने अतिद्रवित भावनेसह प्रभुशी प्रार्थना करत राहावी. या प्रार्थनेमुळे इस्लामी सैन्याच्या मनाला बळ प्राप्त झाले आणि त्यांच्या उत्साहात अपार वृद्धी झाली होती.

पैगंबर चिलखत परिधान करून बाहेर आले तेव्हा त्यांच्या जिव्हेवर कुरआनची ही आयत होती जिचा उल्लेख वर आला आहे. या आयतद्वारा पैगंबर ईमानधारकांना अल्लाहकडून शुभसूचना देत होते की शत्रूवर मुस्लिमांना विजय प्राप्त होणार आहे.माननीय अब्बास (रजि.) हे वर्णन करतात.

‘‘अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) पावसासाठीची प्रार्थना (इस्तिस्का) करण्यासाठी बाहेर पडले. पैगंबर साज-सज्जारहित साधी राहणी, विनम्रता, विनीत आणि अल्लाहसमोर नतमस्तक होऊन याचना करणारे होते.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या चेहऱ्यावरून विनम्रता व विनीतभाव प्रकट होत असे. त्यांच्या चेहऱ्यावरून रुदन व द्रवणशीलतेचा भाव व्यक्त होत होता. पैगंबर पाऊस पडण्यासाठी याचना करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांना याचे पूर्ण भान होते की ईशकृपेला आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मग ती कृपा पावसाच्या रूपात किंवा अन्य रूपात असोत, आवश्यक आहे की दासाने आपल्या प्रभुपुढे विनीतभावविभोर होऊन गरजेला प्रस्तुत करावे. मनुष्याला तर प्रत्येक वेळी व प्रत्येक स्थितीत विनीत व आश्रित दास बनूनच राहिले पाहिजे, परंतु संकटसमयी तर अनिवार्यत: दासाला त्याच्या विवशतेचे व आश्रितपणाच्या पूर्ण भान असणे आवश्यक आहे. दासाच्या शरीरावर जे कापड त्याची शोभा वाढवतात ते फक्त विनयशीलतेचे कापड आहे, अन्य दुसरे कोणतेही कापड नाही. ईशप्रेति याच बावनेला मनुष्याच्या आचरणात पूर्णत: आपल्या मार्गदर्शनाद्वारा जागृत करतात.माननीय आएशा (रजि.) यांचे निवेदन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी माझा आधार घेऊन बसले असताना सांगितले, ‘‘हे अल्लाह! मला क्षमा कर आणि माझ्यावर दया कर आणि माझ्या जगतसखा! मला तुझी भेट घडू दे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

आयुष्यभर ईशमार्गात सक्रिय राहूनसुद्धा अल्लाहपाशी क्षमादान आणि दयेची, कृपेची याचना करीत आहेत आणि कामना करीत आहेत की ‘जीवनसखा’ची भेट घडावी. हीच विनम्रता आणि भक्तीभाव आहे जो ईमान (श्रद्धाशीलते) चा वास्तविक आत्मा, हृदय तथा प्राणसौंदर्य आहे.माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘कोणालाही त्याच्या स्वत:च्या कर्माने स्वर्गात जाता येणार नाही.’’

पैगंबरांना लोकांनी विचारले, ‘‘आपणाससुद्धा नाही हे अल्लाहचे पैगंबर?’’

सांगण्यात आले, ‘‘नाही, मलासुद्धा नाही. परंतु अल्लाहने त्याच्या कृपेने व दयेने आच्छादित केले तर. म्हणून तुम्ही दृढता व सुनीती स्वीकारा आणि सान्निध्य स्थापित करा, तसेच तुमच्यापैकी कोणी मृत्युची कामना करू नये. कारण तो सत्कर्मी असेल तर त्याच्या सत्कर्मांत वृद्धी करेल आणि जर तो दुष्कर्मी आहे तर कदाचित तो पश्चात्ताप करून (तौबा करून) अल्लाहला प्रसन्न करील.’’

स्पष्टीकरण

एक हदीसकथन आहे, ‘‘जाणून असा की तुमच्यापैकी कोणीही स्वकर्माने मुक्ती प्राप्त करू शकणार नाही.’’

कुरआनमध्ये आले आहे,

‘‘आणि त्यांना विचारले जाईल : हा स्वर्ग (जन्नत) आहे ज्याचे तुम्हाला वारस बनविले आहे, त्या कर्मांच्या मोबदल्यत जी तुम्ही करीत होता.’’

(दिव्य कुरआन, ७:४३) कुरआन आणि हदीसवर्णनात कसलीही विसंगती सापडत नाही. स्वर्गाचे महान उत्तराधिकारीचे स्थान तर ईश्वरकृपा व दयेनेच प्राप्त होईल. मनुष्याची सत्कर्मे तर निमित्तमात्र असतील. सत्मार्गांनी तर हीच आशा केली जाऊ शकते की ईश्वर दया होईल. स्वर्गप्रवेशाचे वास्तविक कारण ईशकृपा व दयेव्यतिरिक्त अन्य काहीही नाही. ईशकृपा व दयेविना मनुष्यकर्मांचे महत्त्व व स्थिती नगण्य आहे.

अल्लाह कोणा जीवावर त्याच्या सामर्थ्यानुसारच दायित्वाचा भार टाकत असतो.(कुरआन, २:२८६) म्हणून सुनीती आणि सुदृढता स्वीकारा, परंतु मध्यममार्गाला नेहमी तुम्ही दृष्टीसमोर ठेवा ज्यामुळे संतुलित मार्गावर मार्गस्थ होणे तुमच्यासाठी सुकर होईल. जर स्वत:वर अतिरेक कराल तर हे जास्त काळ चालणार नाही. यात शंका आहे की कर्मध्येय तुम्ही विसरून जाल. हे लक्षात ठेवा, ‘‘अल्प जे शिल्लक आहे त्या अधिकपासून श्रेष्ठ आहे जे शिल्लक राहात नाही.’’ सुदृढता, अनुसरण व सान्निध्य त्या मध्यममार्गाला म्हणतात ज्यात अतिरेकाने काम घेतले जात नाही की अत्यल्पतेनेसुद्धा घेतले जात नाही.

एखाद्यास सत्कर्माची संधी प्राप्त होत नसेल तरी त्याने मृत्युची कामना करू नये. जीवनात शक्य आहे की त्याला पश्चात्ताप करण्याचा सुअवसर प्राप्त होईल आणि ईशप्रकोपापासून तो गृहस्थ सुरक्षित होईल.

‘‘अल्लाहव्यतिरिक्त अन्य सर्वकाही नष्टप्राय आहे.’’माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहव्यतिरिक्त दुसरा कोणीही पूज्य प्रभु नाही. तो एकमेव आहे. त्याने आपल्या सेनेला प्रभावी बनविले आहे आणि त्याच्या दासाची मदत केली आणि विधर्मिय दलाला पराभूत केले. तो एकमेव आहे. त्याच्यानंतर काहीही नाही.’’

स्पष्टीकरण

स्पष्ट आहे की वरील शब्द पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या तोंडून श्रद्धावंतांना जेव्हा विधर्मियांवर विजय प्राप्त झाला तेव्हा निघाले असतील. या विजय व सफलतेवर फुलून न जाता पैगंबरांनी यास ईशकृपा व ईश्वराचे उपकार घोषित केले. या विजयास त्यांनी स्वत:च्या प्रयत्नाचे फळ समजले नाही आणि श्रद्धावंतांच्या सेनेला स्वत:ची सेना न मानता पैगंबरांनी त्यास अल्लाहची सेना म्हटले आहे. तसेच पैगंबरांनी स्वत:ला एक ईशदास व आज्ञाधारक दास घोषित केले आहे.

‘‘तो एकमेव आहे, त्याच्यानंतर काहीही नाही.’’ याचा अर्थ एक अल्लाहनंतर काहीही शिल्लक राहात नाही की ज्यामुळे ते आमच्या संबंधांचे केंद्र बनावेत. अल्लाहव्यतिरिक्त जे काही आहे ते काहीही नसल्याचा पर्याय आहे. याच वास्तवास कुरआनने या शब्दांत स्पष्ट केले आहे,माननीय उम्मुल आला (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहशपथ! मला माहीत नाही की (अल्लाहजवळ) माझ्याविषयी कोणता मामला होईल, जेव्हा की मी अल्लाहचा पैगंबर आहे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

एका दीर्घ हदीसकथनाचा हा एक भाग आहे. माननीय उस्मान बिन म़जऊन (रजि.) यांच्या निधनानंतर उम्मुल आला (रजि.) यांनी त्यांना संबोधन करून सांगिले, ‘‘हे अबू साएब, तुम्हावर अल्लाहची कृपा. मी साक्ष देतो की अल्लाहने तुम्हाला अनुग्रहित  केले आहे.’’

यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे तुम्हाला कसे माहीत झाले की अल्लाहने त्यांना अनुग्रहित केले?’’

माननीय उम्मुल आला (रजि.) म्हणाल्या, ‘‘माझे माता-पिता तुमच्यावर कुर्बान! मला माहीत नाही की (त्यांना अनुग्रहित केले जाणार नाही). तर कोण आहे ज्यावर अनुग्रह होईल?’’

पैगंबर म्हणाले, ‘‘उस्मानचे तर निधन झाले, त्यांच्याविषयी चांगले विचार व इच्छा माझ्या मनातसुद्धा आहे.’’

यानंतर पैगंबर म्हणाले, ‘‘अल्लाहशपथ! मला माहीत नाही की (अल्लाहजवळ) माझ्याविषयी कोणता मामला होईल जेव्हा की मी अल्लाहचा पैगंबर आहे.’’

अर्थात, अल्लाहचा प्रताप व महानतेची निकड आहे की आम्ही त्याची भीती (ईशभय) बाळगावे, अल्लाहची पकड आणि अल्लाहच्या प्रकोपाविषयी आम्ही कधीही बेफिकीर राहू नये. ईश्वराशी चांगल्या आशा-आकांक्षा बाळगू शकता, परंतु खात्रीने कोणाविषयी काही सांगणे योग्य नाही.


माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘हे अल्लाह! मी मनुष्य आहे म्हणून ज्या मुस्लिम व्यक्तीला मी वाईट म्हणेन, त्याला मारेन किंवा धिक्कारेन तर यास त्याच्यासाठी तुझ्या दयेचा वर्षाव होण्याचे निमित्त बनव आणि यास त्याच्यासाठी उत्कृष्ठतेचे साधन बनव.’’

स्पष्टीकरण

मनुष्य असल्याकारणाने पैगंबर मुहम्मद (स.) यांना रागसुद्धा येत असे, परंतु ही दयालुतेची पराकाष्ठा आहे की पैगंबरांनी अल्लाहशी प्रार्थना केली, ‘‘जर मी एखाद्या मुस्लिमाला वाईट म्हणेन किंवा त्याला मारेन अथवा त्याचा धिक्कार करीन तर यास त्याच्यासाठी तुझ्या दयेसाठी निमित्त बनव आणि त्यास उत्कृष्ठता प्रदान कर.’’

एका कथनाद्वारे कळते की पैगंबर मुहम्मद (स.) नेहमी म्हणत, ‘‘हे अल्लाह!मी ज्या मुस्लिमाला वाईट संबोधित करेन तर तू कयामतच्या दिवशी यास त्याच्यासाठी तुझ्या सान्निध्याचे साधन बनव.’’ (हदीस : मुस्लिम)

एका हदीसमध्ये आहे, ‘‘यास त्याच्यासाठी त्याच्या अपराधांचे प्रायश्चित्त बनव.’’माननीय इब्ने मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘मीसुद्धा एक मनुष्य आहे. मलासुद्धा विसर पडतो ज्याप्रमाणे तुम्ही विसरता. म्हणून जेव्हा मी विसरलो तर मला स्मरण करून देत चला.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

एके दिवशी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जुहरच्या नमाजप्रसंगी चार रकअतऐवजी पाच रकअत नमाज अदा केली. तेव्हा साथीदारांनी (सहाबा) विचारले, ‘‘काय नमाजमध्ये वृद्धी झाली आहे?’’ (कारण नमाजमध्ये चार रकअत फक्त अनिवार्य आहे)

पैगंबरांनी विसरल्याबद्दल (भूल) दोन सजदे केले. (दोनदा नतमस्तक झाले) आणि वरील उद्गार काढले होते जे हदीसमध्ये सुरक्षित करण्यात आले आहे, ‘‘मीसुद्धा एक मनुष्य आहे. मीसुद्धा विसरतो. विसरणे तर मनुष्यस्वभाव आहे. जर मी विसरलो तर तुम्ही मला स्मरण करून द्यावे.’’माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मला दुसऱ्या कुणाची नक्कल करणे अजिबात आवडत नाही जरी त्यामुळे मला असे आणि असे होईल.’’ (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण

मला हे कदापि मान्य नाही की एखाद्या कोणाची नक्कल मी करावी. मग ती नक्कल मौलिक स्वरूपाची असो की शारीरिक स्वरूपाची असो. याचे कितीही भौतिक व आर्थिक फायदे जरी होत असतील तरी हे कृत्य मला कदापिही मान्य नाही.माननीय इब्ने मसऊद (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘माझ्या साथीदारांपैकी कोणी माझ्यापर्यंत कोणासंबंधी वाईट गोष्टीला सांगू नये कारण मला माझे मन साफ असलेले आवडेल जेव्हा मी तुमच्याजवळ येईन.’’

(हदीस : अबू  दाऊद)


स्पष्टीकरण

म्हणजे कोणी माझ्याजवळ दुसऱ्याविषयी वाईट बोलून माझ्या मनात गैरसमज निर्माण करू नये. एखाद्या साथीदारात तुम्हाला कमतरता आढळल्यास सहानुभूती व भले कृत्य हे असावे की त्याला एकांतात त्याविषयी सांगावे. त्याच्यातील वाईटाचा प्रचार करू नये. मी तुमच्याशी भेटलो तर कोणाविषयी माझ्या मनात नाराजीची भावना नसावी, हेच मला प्रिय आहे.

एखाद्याच्या मामल्यास वाढविणे आणि त्यास जबाबदार लोकांपुढे मांडण्याचा मामला सर्वांत शेवटचा आहे. जेव्हा सुधारणा करण्याचे सर्व प्रयत्न संपुष्टात आले असतील आणि मामलासुद्धा असा असेल की त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात एखाद्या मोठ्या बिघाडाची व धोक्याची शंका असेल.


 


माननीय उमर (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही माझी प्रशंसा अति करू नका, ज्याप्रमाणे खिश्चन लोकांनी मरयमपुत्र ईसा (अ.) यांच्या प्रशंसेत अतिशयोक्ती केली. मी तर अल्लाहचा एक दास आहे. म्हणून तुम्ही मला अल्लाहचा दास आणि अल्लाहचा पैगंबर म्हणत चला.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

‘‘पदप्रतिष्ठेतील अंतराला दृष्टीसमोर ठेवून असणे आवश्यक आहे. सामान्यत: लोक आपल्या थोरांची प्रशंसा करण्यात अतिशयोक्ती करतात. याच कारणाने ईसा मसीह (अ.) यांच्या अनुयायींनी ईसा मसीह (अ.) यांना ईशपुत्र घोषित करून टाकले, आणि भक्तीच्या (बंदगी) पंक्तीत प्रेषित्वाला सामील केले. यहुदी (ज्यू) लोकांनी आदरणीय उजैर (अ.) यांना ईश्वरपुत्र म्हटले. खरे तर ईश्वराच्या ईशत्वात कोणीही भागीदार बनू शकत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांनी त्यांची प्रशंसा करताना अतिशयोक्तीने काम घेण्यास रोखले.  साक्षवचन (कलमे शहादत) अर्थात ‘‘मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय दुसरा कोणी पूज्य नाही. तो एकमेव आहे, त्याचा कोणी भागीदार नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि त्याचे पैगंबर आहे.’’ या वाक्यातील शब्द ‘अब्दुहु व रसूलुहु’ (त्याचे दास व त्याचे पैगंबर) निरंतर स्मरण करून देतात की पैगंबर व रसूल अल्लाहचा एक दास असतो जरी ते श्रेष्ठत्व व पूर्णत्वप्राप्त व्यक्ती असतात. अशा प्रकारे इस्लामने अनेकेश्वरत्वाला समूळ नष्टकेले आहे.


माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे.

‘‘त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना एखाद्या व्यक्तीला धर्माव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीशी संबंधित करताना ऐकले नाही.’’

स्पष्टीकरण

म्हणजे प्रत्येक कामात पैगंबर मुहम्मद (स.) धार्मिक भावनेला दृष्टीसमोर ठेवत असत. त्यांच्या दृष्टिकोनातून धर्ममाहात्म्यापुढे सर्व गोष्टी तुच्छ होत्या. म्हणून रंगभेद व वंशभेदरहित प्राथमिकता नेहमी धर्माला प्राप्त होती. जो कोणी धर्मात श्रेष्ठ असेल त्याला पैगंबर दुसऱ्या लोकांवर प्राथमिकता देत असत, मग तो मनुष्य कोणत्याही कुटुंबाचा व कबिल्याचा का असेना.


माननीय अनस (रजि.) यांचे निवेदन आहे.

एकदा आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासोबत होतो. त्या वेळी पाऊस पडू लागला. अनस (रजि.) यांचे कथन आहे की त्यावेळी पैगंबरांनी अंगावरील कापड काढले आणि ते पावसात भिजू लागले. आम्ही विचारले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आपण असे का केले?’’

पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘यामुळे की पावसाचे हे पाणी आताच त्याच्या रब (स्वामी) कडून आले आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

‘‘आपल्या अंगावरील कापड काढले’’ म्हणजे डोक्यावरील किंवा पाठीवरील कापड काढले. या हदीसनुसार कळते की दासाला आपल्या प्रभुच्या कृपेविषयी अत्यंत संवेदनशील असले पाहिजे. आमच्यासाठी आवश्यक आहे की प्रभुची ताजी कृपा आमचे ईमान व जाणिवांना ताजेतवाणे करोत आणि आमच्याकडून अभिव्यक्ती व्हावी - प्रकट व्हावे की आम्ही ईशकृपेचे प्रत्याशी आहोत. आम्ही कधीही आणि कोणत्याच स्थितीत ईशकृपेची उपेक्षा करू शकत नाही.

पावसाचे पाणी ईशयोजनेनुसार पडत असते. या योजनेत दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ चालत नाही, अल्लाहशी याचा प्रत्यक्ष संबंध आहे. ते पावसाचे निरामय थेंब सर्वथा पवित्र असतात. कारण ईशद्रोही व अवज्ञाकारीचे हात तोपर्यंत त्याला स्पर्श करत नाहीत. म्हणून पावसाच्या या प्रथमसरी अत्यंत समृद्धशाली असतात. त्यांना आपल्या शरीरावर घेणे एक शुभेच्छा व शुभ मनोभाव व्यक्त करणे आहे.माननीय अब्दुल्लाह (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वर्ग (जन्नत) आणि याचप्रमाणे नरक (जहन्नम) सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या चपलांच्या तळव्यापेक्षासुद्धा त्याच्या अधिक जवळ आहे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे स्वर्ग व नरक यांना लांब समजून बसू नका. ते तर तुमच्या अतिनिकट आहेत. जन्नत (स्वर्ग) मधील देणग्या आणि त्यातील सुख-समाधान तसेच नरकातील आपत्ती, कष्ट इ. सर्वांचा आमच्या आचार-विचारांशी घनिष्ट संबंध आहे. आमचे कर्म व विचारांमुळेच आमचे जीवन स्वर्ग बनेल अथवा नरक बनेल. आमचे कर्म हे आमच्यापासून दूर व विलग असत नाही. कर्मानुसार आमचे अस्तित्व व व्यक्तिमत्त्व प्रकट होत असते. कर्म जर सदाचारी व ईशपरायणशील असतील तर आमची जन्नत (स्वर्ग) आमच्यापासून काहीच दूर नाही. अथवा याच्या विपरित आमचे चारित्र्य व कर्म असतील आणि त्यामुळे प्रभु-स्वामीला आम्ही इतर काहीr समजू लागतो आणि तो जीवनमार्ग स्वीकारून बसतो जो मार्ग प्रभुला अप्रिय आहे. अशा स्थितीत आम्ही जन्नतऐवजी नरकाशी (जहन्नम) दृढ संबंध स्थापित करून बसलेलो असतो.


माननीय हुजैफा (रजि.) यांचे कथन आहे.

‘‘पैगंबर मुहम्मद (स.) यांना एखादे वेळी काही संकटांना सामोरे जावे लागले तर नमाज अदा करू लागतात.’’ (हदीस : अबू दाऊद)

स्पष्टीकरण

हे यासाठी की दासासाठी सर्वांत मोठा आधार त्याचा प्रभु-स्वामी आहे. ईशसान्निध्याव्यतिरिक्त अन्य कोणते दुसरे शरणस्थळ असूच शकत नाही.माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे,

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दोन ‘रकअत’ फङ्का (प्रात:काळ) जग आणि जे काही त्यात आहे, त्यापेक्षा उत्तम आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

एक हदीस कथनात आले आहे की ‘दोन रकअत’विषयी पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘ते मला समस्त जगापेक्षा आणि भौतिक संसाधनांपेक्षा अधिक प्रिय आहे.’’


माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘जर मी ‘सुबहानल्लाही वलहम्दुलिल्लाही वलाइलाहा इल्लल्लाहु वलाहु अकबर’ म्हटले तर हे मला जगातील त्या सर्व संसाधनांपेक्षा प्रिय आहे ज्यावर सूर्य उगतो.’’(हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

हे शब्द जे पैगंबर मुहम्मद (स.) यांना सर्वांपेक्षा प्रिय आहेत त्यांचा अर्थ ‘‘महानता अल्लाहसाठीच आहे. सर्व स्तुती अल्लाहसाठीच आहे आणि अल्लाहशिवाय दुसरा कोणी पूज्य (पूजनीय) नाही. अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे.’’

 


माननीय मुगीरा बिन शोबा (रजि.) यांचे कथन आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) नमाजमध्ये दीर्घकाळ उभे राहात, त्यामुळे त्यांचे पाय सुजले जात असत. पैगंबरांना विचारण्यात आले, ‘‘तुम्ही इतकात्रास का घेता जेव्हा की तुमचे मागील पुढील सर्व अपराध माफ करण्यात आले आहेत?’’

तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘काय मी अल्लाहचा कृतज्ञ दास बनू नको?’’

स्पष्टीकरण

‘‘तुमचे मागील पुढील सर्व अपराध माफ करण्यात आले आहेत.’’ हा संकेत कुरआनच्या खालील आयतीकडे आहे,

‘‘हे पैगंबर (स.), आम्ही तुम्हाला उघड विजय प्रदान केला जेणेकरून अल्लाहने तुमची पुढील व पाठीमागील प्रत्येक उणीव माफ करावी आणि तुमच्यावर आपली देणगी परिपूर्ण करावी व तुम्हाला सरळमार्ग दाखवावा.’’ (दिव्य कुरआन, ४८:१-२) ‘‘मी ईश्वराचा कृतज्ञ दास बनू नको?’’ म्हणजे उपासनेचा उद्देश (इबादत) केवळ हाच नाही की आमचे अपराध व उणिवांना माफ केले जावे आणि ईश्वराकडून आमची पकड होण्याचे भय व शिक्षा देण्याचे भय व संशय राहू नये. इबादत (उपासना) व प्रणिपातचा एक उद्देश आपल्या प्रभुप्रति कृतज्ञता व्यक्त करणेसुद्धा आहे, याचे आमच्यावर अगणित उपकार आहेत. त्यानेच आमचे मागील पुढील सर्व गुन्हे माफ केले आहेत. आपल्या या प्रभुप्रति कृतज्ञता प्रकट करण्याचा सर्वोत्तम विधी हा आहे की दासाने आपल्या प्रभुसमोर कृतज्ञतेच्या प्रगाढ व उत्कट भावनेसह नतमस्तक व्हावे.


माननीय जुन्दुब बिन अब्दुल्लाह (रजि.) यांचे कथन आहे,

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अल्लाहव्यतिरिक्त मला हे स्वीकार्य नाही की तुम्हांपैकी कोणी माझा प्रगाढ मित्र असावा. कारण ईश्वराने मला त्याचा मित्र बनविले आहे जसे त्याने इब्राहीम (अ) यांना त्याचा मित्र बनविले होते.’’

स्पष्टीकरण

अल्लाहसोबत दासाचे प्रगाढ प्रेम असणे यास ‘खुल्लत’ म्हणतात. अशाच प्रकारे माणसासोबत अल्लाहच्या प्रेमातिरेकाससुद्धा ‘खुल्लत’ म्हटले जाते. हे प्रेम खरेतर अल्लाहच्या प्रभुत्वाची अनिवार्यता आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कथनाचा अर्थ, अल्लाहने मला त्याचा दोस्त (खलील) बनविले आहे. याचा अर्थ होतो की, तो माझा मित्र आहे. माझ्या हृदयावर खरेतर त्याचेच अधिपत्य आहे. मी त्याच्यात बिलवूâल हरवून गेलो आहे. त्याच्या प्रेमाने माझ्या हृदयात घर केले आहे.

अशा प्रकारचे अत्यंतिक प्रेम केवळ एकाचसाठी असू शकते. ‘खुल्लत’मध्ये दुसऱ्याची भागीदारी असंभव आहे. एका कविचे काव्य आहे, ‘‘माझी प्रियतमा माझ्या अंतरात आत्म्यासारखी व्याप्त आहे’’ आणि याचमुळे ‘खलील’ला ‘खलील’ म्हटले जाते.


माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे,

मी एकदा पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले की, ‘‘काय तुम्ही ‘वित्र’ची नमाज अदा करण्याअगोदर झोपता?’’ त्यावर पैगंबर म्हणाले, ‘‘हे आएशा (रजि.)! माझे डोळे झोपतात परंतु माझे हृदय मात्र झोपत नाही.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे झोपण्याच्या स्थितीतसुद्धा पैगंबर मुहम्मद (स.) गफलतीपासून अलिप्त राहत असत. त्यांचा आत्मा निद्रावस्थेतसुद्धा जागृत राहत असे, हे याचे स्पष्टप्रमाण आहे की पैगंबरांच्या पवित्र हृदयावर भौतिकेचे नव्हे तर आध्यात्मिकतेचे वर्चस्व होते. याचमुळे पैगंबरांचे हृदयदीप निद्रावस्थेतसुद्धा प्रज्वलित राहात असे.


माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे,

‘‘पैगंबर मुहम्मद (स.) अल्लाहचे स्मरण सतत करीत असत.’’ (हदीस : मुस्लिम)


स्पष्टीकरण

अल्लाहशी प्रत्येक स्थितीत व प्रत्येक वेळी पैगंबर मुहम्मद (स.) स्वत:चे संबंध स्थापित करून होते. ईशस्मरण प्रत्येक वेळी सतत व प्रत्येक स्थितीत सतत करणे मनुष्यासाठी  आवश्यक आहे कारण हे मनुष्याचे आध्यात्मिक खाद्यच नव्हे तर मनुष्यसामथ्र्याचा मूळदााोत आहे. मानव एक संवेदनशील व सक्रिय अस्तित्व आहे. मनुष्याची जगातील भूमिका शेतकरी व कर्मवीराची आहे. भोजन करणे, कर्म व सक्रियता मनुष्याची अनिवार्य विशेषता आहे. मनुष्य कधी संकल्प व हेतुविरहीत असू शकत नाही. म्हणून मनुष्यासाठी आवश्यक  आहे की त्याचा कोणी आदर्श व प्रियतम असावा जो त्याच्या प्रेमाचा व संकल्पाचा केंद्रबिंदू असावा. मनुष्यासाठी सर्वश्रेष्ठ बाब ही आहे की त्याचा प्रियतम अल्लाह असावा. मनुष्य  अल्लाहशी विमुख होत असेल तर त्याची आसक्ती इतर दुसऱ्याशी असेल. अशा प्रकारे मनुष्य स्वत: श्रेष्ठत्व व उच्च स्थानापासून खाली कोसळेल.


माननीय अबू  हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे,

तुफैल बिन अम्र (रजि.) अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर झाले आणि सांगितले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! दौस कबिल्याच्या लोकांनी अवज्ञा केली आणि नाकारले म्हणून तुम्ही त्या लोकांना शापित करावे, असा लोकांचा विचार आहे.’’ यावर पैगंबर म्हणाले, ‘‘हे अल्लाह! दौसच्या लोकांना मार्गदर्शन प्रदान कर आणि त्यांना माझ्याजवळ पाठव.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे हे अल्लाह, मी प्रार्थना करतो की दौस कबिल्याच्या लोकांना मार्गदर्शन प्राप्त व्हावे आणि ते सर्व तुझे आज्ञाधारक मुस्लिम बनून जावेत आणि त्या लोकांनी माझी अवज्ञा करू नये.

पैगंबरांची सर्वश्रेष्ठ अभिलाषा हीच असते की मार्गभ्रष्ट लोकांनी सन्मार्गावर मार्गस्थ व्हावे आणि मार्गदर्शनरुपी संपत्ती त्यांच्या नशिबी यावी जी मानवी जीवनाची सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. ईशदासांचा कल्याणभाव पैगंबर व नबींच्या हृदयात सामावलेला असतो. खरे तर हे ईशप्रेमाचे प्रतीक तसेच ईशप्रेमाची अपेक्षा असते की ईशदासांशी घनिष्ट संबंध तुमचा असावा. त्यांच्याशी प्रेम करावे आणि त्यांच्या भल्यासाठी व कल्याण करण्यासाठी सतत कार्यरत राहावे.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget