Latest Post

- डॉ. मु. अब्दुलहक अन्सारी
   
    धर्मविरोधक तत्त्वांनी जनसामान्यांत अशी चुकीची भावना निर्माण केली आहे की धर्म राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सौजन्याच्या मार्गात एक फार मोठा अडथळा आहे आणि विशेषत: इस्लाम धर्म!
    या पुस्तिकेत विविध धर्मात एकमत कोणत्या गोष्टीत आहे? आणि मतभेद आहेत तर कोणत्या बाबतीत? वर्णन आले आहे आणि सर्वधर्मसमभावाच्या दृष्टिकोनाची समीक्षा सादर केली आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि शांतीपूर्ण सहजीवनाची चर्चासुध्दा आहे.

आयएमपीटी अ.क्र. 112    -पृष्ठे - 24     मूल्य - 16                आवृत्ती - 3(2013)डाउनलोड लिंक :  https://app.box.com/s/xilu4318du0d8hskmew2ewi7iht5gqbd

नमाजसाठी मुस्लिमांना हाक देण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. अशी पद्धत जगातील कोणत्याच धर्मीय वा निधर्मी समाजात प्रचलित नाही.
नमाजसाठी हाक देण्याचा एकाच प्रकारचा शब्दसमूह (अजान) जगातील प्रत्येक मस्जिदीतून दिवसातून पाच वेळा पुकारला जातो. ‘अजान’ देणाऱ्याची व ज्यांना बोलाविण्यात येत आहे त्यांची मातृभाषा कोणतीही असो, ‘अजान’ अरबी भाषेतच पुकारली जाते. जगातील कोणत्याही भागातील मुस्लिमास ‘अजान’ ऐकताच नमाजकरिता हाक दिली जात आहे असे समजते. अजानने हेही लक्षात येते की, त्यांना (अर्थात सर्व इस्लाम धर्मियांना) कोठे बोलाविले जात आहे?
अजान केवळ नमाजसाठी दिलेली हाक नसून इस्लामच्या मूलतत्त्वांचे जाहीर प्रकटन आहे. ‘ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे, त्याच्याशिवाय कोणीही आराध्य नाही, मुहम्मद (स.) ईश्वराचे प्रेषित आहेत, नमाज (अदा करण्या) साठी या, (ईशभक्तीने) कल्याण व सफलता प्राप्त करा,’ हा अजानचा संक्षिप्त अर्थ आहे. लोकांना बोलविण्याकरिता यापेक्षा चांगली उद्घोषणा होऊच शकत नाही. याच हाकेला प्रतिसाद म्हणून मुस्लिम बांधव सर्व कामकाज सोडून मस्जिदीकडे धाव घेतात व दिवसातून पाच वेळा शिस्तबद्धपणे एकत्रित नमाज अदा करतात.
नमाज
नमाजची वेळ, नमाज अदा करण्याची पद्धत व नमाजमध्ये जे पठण करायचे, ते जगात सर्वत्र एकाच प्रकारचे असून काही बाबतीत नाममात्र फरक वगळता, जगातील सर्वच देशांतील मुस्लिमांच्या नमाजमध्ये कोणताच विशेष फरक आढळून येत नाही. त्यामुळे जगातील मुस्लिमांत ईशभक्तीची भावना सतत जागृत ठेवली जाते आणि एकता व विश्वबंधुत्वाची भावना सतत तेवत राहते.
रोजा
‘रोजा’ (म्हणजेच उपवास) अशाच सामूहिकतेच्या स्वरुपात पाळला जातो. रोजाबाबतही विशिष्ट काळ, वेळापत्रक व अटी-शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. रोजे ठेवण्याकरिता रमजानचा महिना निश्चित करण्यात आला आहे. उद्देश हाच की, सर्व मुस्लिमांनी एकाच वेळी रोजाचे पालन करावे. रोजा सुरु होण्याची व संपण्याची वेळही निश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून सर्वांचा रोजा एकाच वेळी सुरू होऊन एकाच वेळी पूर्ण व्हावा. रोजाबाबतचे आदेशही समसमान देण्यात आले आहेत. त्यामुळे साऱ्या मुस्लिमांना आयुष्यभर दरवर्षी रमजान महिन्याचे ३० (किवा २९) दिवसांचे रोजे एकाच पद्धतीने, एकाच प्रकारच्या बंधनानुसार पूर्ण करायचे असतात. या पद्धतीमुळे जगातील सर्व मुस्लिमांमध्ये ते समान धार्मिक तत्त्वाचे पालन करीत आहेत, अशी एकतेची दृढ मानसिकता निर्माण होते. याशिवाय संपूर्ण जगात रमजान महिन्याच्या प्रत्येक रात्री (पाच वेळेच्या नमाजव्यतिरिक्त) तरावीहची नमाज एकत्रितरीत्या अदा केली जाते व तरावीहच्या नमाजमध्ये संपूर्ण कुरआनचे पठण केले जाते. अशा तऱ्हेने तरावीह प्रार्थनाही आहे व कुरआनचा प्रचार व पठणही आहे. त्यामुळे मुस्लिमांमध्ये धार्मिक चेतना निर्माण होते. दरवर्षी संपूर्ण कुरआनचे श्रवण करणाऱ्यांची भाषा अरबी असो वा नसो, त्यांना त्याचा अर्थ समजो वा न समजो, ते सर्वच्या सर्व एकाच (धर्म) ग्रंथावर श्रद्धा ठेवणारे आहेत व कुरआन निश्चितच ईश्वरीय ग्रंथ आहे, असा विश्वास त्या सर्वांच्या मनात दृढ होतो.
हज
इस्लाम धर्मियांच्या हज या धार्मिक विधीमुळे इस्लामच्या विश्वव्यापी सामाजिकतेचे अनुपम दर्शन घडते. जगातील प्रत्येक सधन मुस्लिम व्यक्तीला हज अनिवार्य करण्यात आले आहे व हे कर्तव्य (अनिवार्य) वर्षातील विशिष्ट तारखांना पार पाडले जाते. या तारखांच्या काळातच जगातील ज्या ज्या भागात सधन मुस्लिम राहतात, ते मक्का (सऊदी अरेबिया) येथे एकत्र येतात. हजनिमित्ताने जगाच्या विविध भागांतून सामान्य सधन मुस्लिम फार मोठ्या संख्येने एकत्र येतात. यू.एन.ओ. (संयुक्त राष्ट्रसंघा) च्या सभेला केवळ राजकीय मुत्सद्दी लोक प्रतिनिधित्व करतात. जागतिक चर्चासत्रात केवळ राजकीय पुढारी भाग घेतात, मात्र हजनिमित्ताने जगाच्या सर्व देशांतील मुस्लिम लाखोंच्या संख्येने डेरेदाखल होतात. एका सर्वशक्तिमान ईश्वराची एकत्र आराधना करणे, हाच त्यांचा एकमात्र उद्देश असतो. ते सर्व काबागृहाला प्रदक्षिणा घालतात. एकत्र मक्केहून मीना येथे जातात. तेथून ते अरफातला प्रस्थान करतात. अरफातहून मुझदल्फा व मुझदल्फाहून मीनाकडे परतीचा प्रवास करतात. एकाच वेळी जनावरांचे बळी देतात, एकत्रितरीत्या सैतानाला दगडाचे तुकडे फेकून मारतात. मीना व अरफातमध्ये एकत्र विश्राम करतात. एकाच (अरबी) भाषेत ‘लब्बैक’ च्या घोषणा देतात. एकाच वेळी काबागृहात चौतर्फा नमाज पढतात. याच काबागृहाच्या दिशेने जगातील सर्व मुस्लिम दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतात. त्या लोकांत जगातील सर्व वंशांच्या, वर्णांच्या, भाषांच्या व देशांच्या रहिवाशांचा समावेश असतो. सर्व लोक विविध प्रकारचे पोषाख धारण करतात, त्यात गरीब, श्रीमंत, राजे-महाराजे आणि दीन-हीन भिकारीही असतात. इतका विषम जनसमुदाय असूनही त्यांच्यात समतेचे अतुलनीय दृश्य पाहायला मिळते. काबागृहाच्या हद्दीत पोहचताच सर्व हाजी आपले खाजगी वेष काढून एकाच प्रकारचा अत्यंत शुभ्र व साधा वेष परिधान करतात. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ते कोणत्या देशाचे रहिवासी आहेत व त्यांचा सामाजिक दर्जा काय आहे, हे मुळीच लक्षात येत नाही. उच्च दर्जाच्या माणसाला, साधारण माणसाच्या पंक्तीत आणले जाते. अत्यंत सुसंस्कृत व श्रीमंत व्यक्तीस साधारण व्यक्तीची दशा प्राप्त होते. काबा मस्जिदीस प्रदक्षिणा घालताना गरीब व श्रीमंत, गोऱ्या व काळ्यामध्ये कोणताच फरक केला जात नाही. काबागृहाच्या आवारात पोहचल्यानंतर माणसातला अहं नष्ट होतो व स्वतःच्या श्रेष्ठत्वाची जाणीव लुप्त होते व त्यांच्यातला वंश, वर्ण, भाषा व देशाचा भेदभाव कायमस्वरुपी नष्ट होतो. जगातील कोणत्याच धार्मिक वा निधर्मी जनसमूहाकडे मानवी भेदभाव संपुष्टात आणून समतेची भावना जागृत करणारा व सतत दरवर्षीं ती प्रक्रिया चालू ठेवणारा असा कोणताच चमत्कारिक मार्ग वा उपाय उपलब्ध नाही. हा ईश्वरीय आदेशाचा चमत्कार आहे, सर्वशक्तिमान ईश्वराच्या एकत्वावर श्रद्धा ठेवून त्याच्या प्रेषिताचे उपदेश व कुरआनातील आदेशानुसार जीवन व्यतीत करण्याचा निश्चय करणारे श्रद्धाळू मुस्लिम एक सशक्त समाजाचे रुप धारण करतात.
ईदु द्दुहा / बकरी - ईद
ईश्वराचे उपकार मानायला हवे की, त्याने हजचे पुण्यकार्य व पवित्र वातावरण काबा या इस्लामच्या केंद्रस्थानापर्यंतच सीमित न ठेवता जगातील सर्वच मुस्लिमांना त्यात सामील करून घेतले आहे. जगात विविध स्थानी वास्तव्य करून राहणाऱ्या मुस्लिमांनासुद्धा हजच्या दिवसांत हजच्या प्रक्रियेत सामील होण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. बकरी ईद (ईदु द्दुहा) च्या तीन दिवसांत सामूहिक नमाज व जनावरांचे बळी देण्याची प्रथा त्याच प्रक्रियेतला भाग आहे.
जगातील सर्व मुस्लिम बांधवांना आदेश देण्यात आले आहेत की, हिजरी सनाच्या ९ जिल्हज्ज या तारखेला जेंव्हा हाजी ‘मीना’ या स्थानापासून अरफातला रवाना होतात, त्याच दिवसाच्या सकाळपासून प्रत्येक फर्ज (अनिवार्य) नमाजनंतर उच्च आवाजात ‘‘अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, ला इलाह इल्लल्लाहा वल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर व लिल्लाहिल हम्द’’ ची उद्घोषणा करण्यास सुरुवात होते. या घोषणा सतत चार दिवसांपर्यंत चालू ठेवाव्यात. कारण हज करणाऱ्यांचा या चार दिवसांचा काळ ‘मीना’ या भागात व्यतीत होतो. ईदुद्दुहाची नमाज इस्लामी महिना जिल्हजच्या दहा तारखेला आयोजित केली जाते, कारण हाजी त्या दिवशी कुरबानीचा (बलिदानाचा) दिवस साजरा करीत असतात. ईदच्या नमाजला जाताना व परत येताना याच घोषणा देत जावे, असे मुस्लिमांना सांगण्यात आले आहे. साऱ्या जगातील सधन मुस्लिम ईदच्या नमाजनंतर ‘मीना’ येथील हाजीप्रमाणे आपापल्या गावात कुरबानीचा कार्यक्रम करतात. अशा तऱ्हेने जगातील सर्व मुस्लिमांना तेसुद्धा हजच्या पुण्यकार्यात सहभागी असल्याचे समाधान प्राप्त होते. हजच्या मैदानावर एकत्र झालेल्या जनसमुदायाइतका विशाल समूह जगातील प्रत्येक गावात बकरी -ईदच्या दिवशी एकत्र येत नाही. तरीही आपापल्या गावात वा शहरात शक्य तितका मोठा जनसमूह ईदची नमाज अदा करतो व जागतिक पातळीवर बकरी ईद साजरी केली जाते. हे मुस्लिमांचे सामूहिक एकतेचे खुले प्रदर्शन सिद्ध होते.

हजरत अब्दुल्ला (रजी.) कथन करतात की, हजरत मुहम्मद (स.) यांनी फर्माविले आहे की, ‘‘तुमच्यामधील प्रत्येकाचा नुतफा (माद्दा) आपल्या आईच्या उदरात जमा होतो. नंतर चाळीस  दिवस घट्ट स्वरूपात रक्त म्हणून राहतो. नंतर चाळीस दिवस लोथळ्याच्या स्वरूपात असतो. त्यानंतर अल्लाह तआलाकडून एका फरिश्तेला (देवदूत) पाठविण्यात येते, आणि त्याला चार  बाबी लिहिण्याचा आदेश दिला जातो. आयुष्यातील क्रियाकर्मे (अमल), त्याची उपजीविका, आयुष्य आणि सत्चरित्र वा दुराचरित्र, या चार बाबी लिहून त्यामध्ये (रुह) आत्मा फूंकला जातो. यानुसार ती व्यक्ती आयुष्यातील सतकर्मे करीत असते इथपावेतो की त्याच्यामध्ये आणि जन्नतमध्ये (स्वर्ग) फक्त एक हात एवढे अंतर बाकी राहते.
त्यानंतर व्यक्तीवर त्याचे दुष्कर्म याचा पगडा बसतो, त्यानुसार तो दुष्कर्म करीत जातो इथपर्यंत की त्याच्यामध्ये आणि जहन्नम (नरक) मध्ये केवळ एका हाताचे अंतर बाकी उरते.  त्यानंतर त्याच्यावर त्याचे नशीब (तकदीर) चे प्रभुत्व वरचढ ठरते, त्यामुळे तो जन्नतवासीयाप्रमाणे कृती करीत राहतो.’’

भावार्थ-
डॉक्टर मुहम्मद अली अलबार यांनी गर्भ-वृद्धी शास्त्र (एम्बोयोलॉजी) च्या संशोधनास लक्षात घेता, कुरआन व हदीसने प्रस्तूत केलेल्या सत्यांना आपल्या, ‘खल्कुल इन्सान बैनत - तिब  वल कुरआन’ या अरबी भाषेतील ग्रंथामध्ये स्पष्टीकरण सादर करीत. गर्भपाताच्या समस्येविषयी लिहितो, ‘‘गर्भपात नेहमी आकार येण्यापूर्वी होतो आणि या अवस्थेस वैद्यकिय  परिभाषेत ‘इंद्रिय संपन्न-उत्पत्ती’ (ऑरगॉनो जेनिसीस) म्हंटले जाते. गर्भधारणेनंतर चौथ्या आठवड्यापासुन याचा आरंभ होतो आणि आठव्या आठवड्यांपर्यंत पडत असतो. तात्पर्य   गर्भाशय (वोम्ब) एक नैसर्गिक कारखाना घडवितो. अर्थात अशारितीने घडवितो की, घडविणाऱ्याचे हात दिसुन येत नाही. परंतु एक थेंब (वीर्याचा), ज्या उत्थानात्मक अवस्थांमधून जाऊन  मनुष्य रूप अंगीकारण्याच्या अवस्थेत पोहोचतो. ही मोठी विचीत्र प्रक्रीया आहे जी विचारचिंतनाचे आवानह करते, आणि विचार करणाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करते की, या मागे  एक सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ शक्तिचा हात आहे. गर्भात जीव टाकला जातो आणि तो ऐकणारा व पाहणारा मनुष्य बनतो. प्रथम एक निर्जीव गोळा होता नी आता एक परिपूर्ण मनुष्य  झाला. रक्ताच्या गोळ्यास पाहून हे अनुमान लावले जाऊ शकत नाही की हा गोळा असे अस्तित्व धारण करील. ज्याला पृथ्वीच्या प्रतिनिधीत्वाचा सन्मान लाभेल. परंतु काही  महिन्यांच्या अवधीत एवढे जबरदस्त परिवर्तन घडून येते की तो एक नवीन सृष्ट-जीव बनून उदयास येतो. रक्ताचा गोळा (अलक) वगैर सर्व सामान्यपणे अवलोकनात येणारी बाब होती  म्हणजे गर्भपाताच्या स्थितीत लोक हे पाहात असत की गर्भाची प्राथमिक अवस्था कशी राहते व नंतर त्यात कसे स्थित्यंतर घडून येते. कुरआनचा युक्तीवाद याच सामान्य अवलोकनात  येणाऱ्या गोष्टीवर आहे. राहिले आजचे गर्भवृद्धीशास्त्र, ज्याने आश्चर्यजनक रहस्ये उलगडली आहेत. तर हा जणू कुरआनच्या संकेतांचा खुलासा होय व याद्वारे कुरआनचे हे प्रमाण  अधीक जास्त स्पष्ट झाले आहे की, हे अवलोकन कुरआनच्या त्या निवेदनाबाबत विश्वास निर्माण करते की मनुष्याला त्याचा पालनकर्ता दुसऱ्यांदा उठविल. गर्भाचे या विविध  परिस्थितीतून व स्वरूपातून जाऊन मनुष्य बनणे सृष्टीनिर्मात्याच्या निर्मितीचा डोळस पुरावा होय. तसेच याद्वारे निर्मात्याचे वैभवही व्यक्त होते की तो मोठे नैपुण्य बाळगणारा आहे  आणि त्याच्या कृपालाभाला कसलीही मर्यादा नाही.

संपूर्ण जगात प्रत्येक व्यक्ती मिळकतीसाठी (पैशासाठी) स्पर्धा करीत आहे. यामध्ये स्त्री-पुरूष दोघांचाही समावेश आहे. मिळकत मिळविण्यासाठी कसल्याही प्रकारे (वैध) प्रयत्न करण्यास  हरकत नाही, पण या मिळकतीपेक्षा स्त्रीने सदाचारी पत्नी बनणे ही सर्वात मोठी मिळकत आहे. इस्लामनुसार स्त्रीला कमविण्याच्या (करियर) करण्याच्या अधिकाराप्रमाणेच  वारसाहक्काचा अधिकार प्रदान केला आहे. तसेच इस्लामने स्त्रीच्या मिळकतीमध्ये पिता, पती, पूत्र व नातेवाईक, आप्तगण या सर्वांना ढवळाढवळ करण्यास प्रतिबंध घातला.  कुरआनमध्ये स्पष्ट नोंद आहे. ’’जे काही पुरूषाने कमावले आहे त्यानुसार त्याचा वाटा आहे आणि जे काही स्त्रियांनी कमावले आहे त्यानुसार त्यांचा वाटा आहे.’’ (दिव्य कुरआन, 4 :  32).
इस्लाममध्ये स्त्रीच्या मिळकतीवर इतर कोणाचाही अधिकार नाही, पण स्त्रीची माता, पिता, पती व पुत्र यांची जी मिळकत आहे त्यामध्ये तिला अधिकार प्रदान केला आहे आणि हा अधिकार वापरण्याचे तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तिच्या संपत्तीची ती तीच्या आवडीनुसार स्वत:वर, पतीवर, मुलामुलींवर, माता- पित्यावर, परिवारातील नातेवाईकांवर खर्च करू शकते.  तसेच एखाद्या विधायक कार्यावरही खर्च करू शकते. संपत्तीची खरेदी- विक्री, दानधर्म याचा पूर्ण अधिकार तिला आहे आणि त्यात कोणीही बाधा आणू शकत नाही किंवा हस्तक्षेप करू  शकत नाही.
आजही समाजामध्ये वा अनेक तथाकथित धर्मांमध्ये स्त्रीला तिचा पती निवडण्याचे अधिकार नाही. पण इस्लामने स्त्रीला आपला पती निवडण्याचा अधिकार 1400 वर्षापूर्वी दिला. इस्लाम मध्ये विवाहाच्या वेळी स्त्रीची अनुमती असल्याखेरीज विवाहाला मान्यता दिली नाही. म्हणजेच मुलीच्या विवाहाचा पूर्णपणे अधिकार निव्वळ पालकांना दिलेला नाही आणि  इस्लामने स्त्रीच्या आवडीविरूद्ध होणारा विवाह थोपविला. मुलीच्या अनुमतीशिवाय विवाह होत नाही. जर स्त्री घटस्फोटित वा विधवा असेल तर विवाहाप्रसंगी तिची अनुमती स्पष्ट घेतली  जावी आणि वधू विवाह करण्याची मूक अनुमतीही देऊ शकते. घटस्फोटित व विधवेची स्पष्ट मौखिक अनुमती व मूक अनुमतीशिवाय विवाह होतच नाही.
जर एखाद्या पालकाने मुलीचा विवाह तिच्या परवानगी (अनुमती) विना केला आणि त्या विवाहास त्या मुलीची मान्यता नसेल, तर तो विवाह ’रद्दबातल’ ठरविण्यात येईल, असे स्पष्ट प्रतिपादन करण्यात आले आहे. इस्लामने निर्माण केलेल्या समाजव्यवस्थेचा पाया हा न्याय या शब्दावर आधारित आहे. त्यामुळे इस्लामचा अनुयायी कोणावर अन्याय करीत नाही आणि  होणारा अन्याय सहनही करीत नाही. त्यामुळे इस्लाममध्ये विवाह जुळवून आणत असताना वधूपिता आपली मुलगी जिचे तो अतिशय तन्मयतेने पालनपोषण करीत असतो, ती मुलगी  विवाहानंतर दुसऱ्याच्या कुटुंबाचा घटक बनते व पित्याच्या कुटुंबातील एकने संख्या कमी होते. यामुळे वधूपिता व वधूपित्याचे सर्व कुटुंब द्विधावस्थेत, मन दु:खी व व्यथित असते.  अशाप्रसंगी वरपिता आपल्या मुलाला वधूपित्याचा ’जावईपुत्र’ म्हणून कबूल करून घेऊन वधूपित्याच्या दु:खी भावनेचा विचार करून त्याचे उपकार व आभार मानतो. तसेच सहसा  वरपिताच आपल्या मुलास घेऊन वधूपित्याच्या घरी जातो आणि वधूपित्यास कसल्याही प्रकारच्या कमीपणाची जाणीव होऊ देत नाही. तो वधूपिता व त्याच्या परिवारावर  भावनात्मकदेखील अन्याय होणार नाही याची पूरेपूर काळजी घेतो. म्हणजे जेथे इस्लाममध्ये मानवी भावनांची एवढ्या मोठ्या प्रमाणात जपणूक केली जाते तेथे विवाहप्रसंगी व विवाह 
जुळवताना ’हुंडा देणे घेणे’ याला अजिबात थारा नाही.
इस्लाममध्ये ’दहेज’ हा शब्द ’जहेज’ या शब्दाच्या अपभ्रंशाने आला आहे. ’जहीज’ या शब्दापासून ’जहेज’ हा शब्द प्रचलित झाला. ’जहीज’ या शब्दाचा खरा अर्थ ’सामान’ असा होतो.  किंवा यापासून ’सामान उपलब्ध करून देणे’ असाही होतो. नंतर हाच शब्द भारतात विवाहप्रसंगी वधूपित्याने त्याच्या मुलीस दिलेले संसारोपयोगी साहित्य अशा अर्थाने रूढ झाला व सध्याच्या काळात भारतीय मुस्लिमांमध्ये जहेज (दहेज) म्हणजे मुलीला विवाहप्रसंगी संसारोपयोगी साहित्य भेट देणे इत्यादी. या प्रथेचा उगम भारतात झाला, पण याला प्रतिबंध  घालण्यासाठी केंद्र सरकारने 1985 व महाराष्ट्र शासनाने 1988 साली ’हुंडा प्रतिबंधक कायदा’ केला. भारतीय समाजामध्ये ’जहेज’ची प्रथा फार जुनी असली तरी या परंपरेचे अस्तित्व  ’वसीर’ नामक ऐतिहासिक ग्रंथात वा अरबस्थानाच्या इतिहासात कुठेही दिसून येत नाही. स्वत: पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी अनेक विवाह केले, पण त्यांच्या एकाही विवाहात ’जहेज’  च्या नावावर एकही वस्तू वधूपक्षाकडून घेतलेली आढळत नाही.
म्हणजेच इस्लाममध्ये जहेज, दहेज, हुंडा याला कठोर विरोध केला आहे. जगात अनेक राष्ट्रे इस्लामी आहेत तेथेही आज ही प्रथा (जहेज) अस्तित्वात नाही. मात्र भारतीय समाजात  अतिप्राचीन काळापासून ही प्रथा प्रचलित आहे. तसेच ज्या भारतीयांनी इस्लाम धर्म स्वीकारला, त्यांच्याकडूनही हुंडापद्धतीचा मुस्लिमांमध्ये शिरकाव झाला.
वास्तविक पाहता इस्लामने हुंडापद्धती म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी लांच्छनास्पद बाब मानली आहे. कारण इस्लाममध्ये मुलगी जन्मास येणे म्हणजे आनंदाची बाब समजली  आहे. तिच्या विवाहप्रसंगी आर्थिक ओझे तिच्या पित्यास सहन करावे लागले तर मुलगी पित्यासाठी आर्थिक संकट व आपत्ती ठरेल. या जाणीवेपोटी इस्लामने हुंडापद्धती निषिद्ध केली आहे. म्हणून इस्लाममध्ये हुंडा घेणे म्हणजे वधुपित्याच्या घरावर दरोडा टाकणे, तसेच विवाहातील एक मोठे विघ्न समजले आहे. अशा प्रवृत्तीतूनच स्वार्थी समाजाची निर्मिती होऊ  शकते. म्हणून मुस्लिम समाजामध्ये (भारतातील) दहेज (हुंडा) विरोधी असणारी मूळ इस्लामची भूमिका रूजविणे काळाची गरज आहे.
इस्लामने वधूपित्याकडून दहेज घेणे पाप समजले एवढेच नाही, तर विवाहक्षणी वधूला वराने ’महर’ म्हणून एक स्त्रीधन संबोधले आहे. ज्या विवाहात ’महर’ नसेल तो विवाह वैध  समजला जात नाही. विवाहप्रसंगी वधूला दिला जाणारा ’महर’ यावर फक्त तिचाच अधिकार असणार आहे, असे नमूद केले. इस्लाममध्ये विवाहव्यवस्था काही नैतिक मुलभूत सिद्धांतावर  आधारित आहे. स्त्रीवर पतित्वाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी तिच्याशी विवाह तर करावाच लागतो, त्याबरोबर विवाहाचा एक सिद्धान्त म्हणून ’महर’ची रक्कम वधूस अदा करावीच  लागते. विवाहाची जुळवणी करतानाच मध्यस्थांच्या सहाय्याने वधूपक्ष आणि वरपक्ष दोघांच्या संमतीने वधूला दिले जाणारे स्त्रीधन (महर) निश्चित होते व ती राशी विवाहपूर्वी वधूला  द्यावी लागते. इस्लामी धर्मशास्त्रानुसार वरपक्षाला दहेज देण्याची नोंद सापडत नाही. (म्हणजेच दहेज निषिद्ध आहे) तर ’महेर’ वधूसाठी बंधनकारक केलेला आहे. ’महर’ अदा करणे हे  पतीचे प्रथम कर्तव्य आहे. विवाहानंतर पत्नीच्या संरक्षणाची, तिच्या पालकत्वाची पूर्णपणे जबाबदारी तिच्या पतीवर येते.
स्त्रियांच्या ’महर’ खुशीने त्यांचा हक्क समजून देण्यात यावा असा आदेश पवित्र कुरआनातील अध्याय ’अन्-निसा’मध्ये देण्यात आला आहे. पतीला पत्नीवर जे पतित्वाचे हक्क प्राप्त  होतात, याचाच मोबदला ’महर’ आहे असाही आदेश पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी दिलेला आहे. विवाहप्रसंगी ठरलेली रक्कम (महर) वधूला न देण्याची इच्छा बाळगणाऱ्या पतीला  हदीसमध्ये ’व्याभिचारी’ असे नमूद केले आहे.
’’ज्याने महर देण्याच्या बदल्यात एखाद्या स्त्रीशी विवाह केला आणि त्याचा हेतू महरची परिपूर्ती न करण्याचा असेल तर तो वास्तवात व्याभिचारी आहे.’’
विवाह जुळविणाऱ्या मध्यस्थांनी ’महर’ची रक्कम निश्चित करताना समोरचा वरपक्ष याच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन, विचार करून निश्चित केला जातो. वास्तविक पाहता  ’महर’ चे वधूचे ’वरा’वर कर्ज आहे. ते कर्ज फेडणे वराचे कर्तव्यही आहे, पण वराच्या कुवतीचा विचार करूनच ’महर’ निश्चित होतो. म्हणून ’महर’ निश्चितीबाबत एक आदेश आहे तो  येथे सांगणे उचित आहे, ’’स्त्रियांचे पुरूषांशी विवाह करण्याचा प्रयत्न करा आणि महरच्या बाबतीत मर्यादेबाहेर जाऊ नका.’’
याचाच अर्थ महरची राशी निश्चित करताना पतीची आर्थिक कुवत ध्यानात घ्या आणि त्यापेक्षा अधिक ’महर’ची मागणी करू नका. तसेच ’महर’ निश्चित करताना एका स्त्रीने दुसऱ्या   स्त्रीशी स्पर्धा करू नये, त्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढत नाही. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी स्वत:च्या विवाहात किंवा स्वत:च्या मुलीच्या विवाहात बारा उकीया ’महर’ निश्चित केला. 
(उकीया - 40 दिरहम - इंग्लिश - एक औस चांदी)
चिलखत परिधान केल्याशिवाय लढता येते, पण त्याचा परिणाम जीवितास धोका होऊ शकतो, पण ’महर’शिवाय विवाह होऊच शकत नाही. यासाठी आपण खालील उदाहरण अभ्यासू. माननीय अली (रजि.) यांनी विवाहाची इच्छा व्यक्त केल्यावर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विचारले,’ महर देण्यासाठी तुमच्याजवळ काही आहे?’’ माननीय अली (रजि.) यांनी उत्तर  दिले, ’’एक घोडा आणि एक चिलखत. याशिवाय माझ्याजवळ काही नाही.’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ’’घोडा तर लढाईसाठी आवश्यक असतो, चिलखत विकून टाका.’’ माननीय  उस्मान (रजि.) यांनी ते चिलखत 48 दिरहमला खरेदी केले. माननीय अली (रजि.) यांनी ही रक्कम पैगंबरांना आणून दिली. पैगंबरांनी बिलाल (रजि.) यांना बाजारातून अत्तर व इतर  आवश्यक गृहोपयोगी साहित्य आणण्यास सांगितले आणि तद्नंतर विवाह संपन्न झाला.
एखाद्या विवाहात काही रक्कम ’महर’ म्हणून निश्चित झाली तर विवाहापूर्वी द्यावी लागते. पण काही आर्थिक अडचणीने महर अदा करण्यासाठी वरपक्षाकडे रक्कम नसेल तर ठरलेल्या  महरचा काही अंश हिस्सा महर म्हणून द्यावाच लागतो व उर्वरीत महरची रक्कम पत्नीकडून पतीवर कर्ज राहते. ती जेव्हा त्या महरची मागणी करेल तेव्हा ती पतीने द्यावी. तेव्हाही  जर त्यांची आर्थिक स्थिती नाजूक असेल तर आणखी काही काळ पत्नी थांबू शकते, पण पतीला त्याच्या जीवनात एक न् एक दिवस विवाहातील महर (स्त्रीधन) द्यावाच लागतो. याला  कोणताही पर्याय नाही. पत्नीला प्राप्त झालेल्या ’महर’च्या रक्कमेत कोणीही भागीदार असू शकत नाही. ’महर’ची रक्कम काही अंशी किंवा पूर्णपणणे पत्नी माफ करू शकते. अशा प्रकारे  ’महर’ माफ करण्यासाठी कोणाकडून जबरदस्ती होत असेल तर हे कृत्य इस्लामविरोधी म्हणजेच पाप आहे. जर एखाद्या पुरूषाकडे पत्नीची ’महर’ची रक्कम राहिली आणि दुर्देवाने त्याचे  निधन झाले तर त्याच्यावर पत्नीचे असणारे महरचे कर्जाची त्याला (मयत व्यक्तीला) वारसाहक्काने मिळणाऱ्या संपत्तीतून परिपूर्तता करावीच लागते.
इस्लामने विवाहाशिवाय स्त्रीशी व पुरूषांशी संबंध ठेवणे व प्रस्थापित करणे यास अवैध व पाप समजले. त्यामुळे सर्व प्रकारच्या स्त्री-पुरूषांच्या संबंधाला विवाह अनिवार्य आहे. विवाहाने  दोन व्यक्ती एकत्र येतात. ’’ त्या तुमच्यासाठी पोशाख आहेत व तुम्ही त्यांच्यासाठी पोषाख आहात.’’ (दिव्य कुरआन, 2:187). वरील कथनावरून हे स्पष्ट होते की स्त्री व पुरूष विवाहानंतर एकमेकांचे संरक्षक (पोषाख) आहेत. जसे पोषाख मानवाच्या शरीराचे, आरोग्याचे, चारित्र्याचे, अब्रूचे रक्षण करते किंवा संगोपन करते तसे वैवाहिक स्त्री-पुरूष एकमेकांचे  संरक्षक आहेत. त्यात जास्तीत जास्त संरक्षणाची जबाबदारी पुरूषांवर आहे. इस्लामने स्त्रीला अधिक अधिकार, सौजन्य, सन्मान बहाल केला आहे. पवित्र कुरआनमधून पुरूषांना वैवाहिक  जीवनात वर्चस्व गाजविण्याची कोणतीही मोकळीक दिलेली नाही.
- (सदर लेख आयएमपीटीद्वारा प्रकाशित ’इस्लामी सुरक्षित सावलीतली स्त्री’ यामधील आहे.)

रमजान पर्वाच्या सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा...! रमजान तो पवित्र महिना आहे ज्यात पवित्र कुरआनचे अवतरण झाले आहे. हे मार्गदर्शन आहे समस्त मानवजातीसाठी आणि  कसोटी आहे सत्य आणि असत्यातील. कुरआन मानवनिर्मित नाही. प्रेषित मुहम्मद (स.) हे कुरआनचे लेखक नाहीत. कुरआन साक्षात ईशवाणी आहे. कुरआनचा मध्यवर्ती विषय मनुष्य  आहे. कुरआनची भूमिका व त्याचे मार्गदर्शन समस्त मानवजातीसाठी आहे. रमजान या महिन्याला दोन महत्त्वाच्या कारणांमुळे पावित्र्य प्राप्त आहे. एक म्हणजे रोजा आणि दुसरे  म्हणजे पवित्र कुरआनचे अवतरण. हाच तो महिना आहे ज्यात सृष्टीनिर्मात्या अल्लाहने कुरआनद्वारा मानवतेसाठी परिपूर्ण आणि शोशत असे मार्गदर्शन उपलब्ध करून संपूर्ण  मानवतेवर कृपा केली. म्हणूनच जगभरातील श्रद्धावंत या महिन्यात रोजा ठेवतात. रोजाविषयी पवित्र कुरआनमध्ये स्पष्ट उल्लेख आला आहे. की, ’’हे श्रद्धावंतांनो! तुमच्यावर रमजान  महिन्याचे रोजे (उपवास) अनिवार्य केले आहेत, जसे पूर्वीच्या लोकांवर केले गेले होते. अपेक्षा आहे की तुम्ही ईशपरायणता धारण कराल.’’
या आयातीवरून स्पष्ट होते की रोजा हे काही कर्मकांड नाही की रुढी-परंपरा नाही. तर रोजा एका महान उद्देशप्राप्तीसाठी आहे. माणसाला माणुसपण देण्याचे, त्याला चारित्र्यवान  बनविण्याचे तसेच त्याचा व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे महान कार्य रोजा दरवर्षी करतो. नीतीमत्ता ही आपल्या देशाची निकड बनली आहे. एक भयानक पोकळी मानवाच्या जीवनात  निर्माण झाली आहे. हा रोजा या पोकळीला भरून काढण्याचे सामर्थ्य राखून आहे. पवित्र कुरआनचे अवतरण समस्त मानवांसाठी आहे. स्त्री असो की पुरुष, कोणा विशिष्ट  लोकसमुदायासाठी किंवा एका वर्गासाठी नव्हे किंवा राष्ट्रासाठी नव्हे, तर हे अखिल मानवजातीसाठी अवतरण केले गेले. तसेच यातील शिकवण केवळ उपासना, नमाज, रोजा अशा  धार्मिक विधींपर्यंतच मर्यादित नसून त्यात मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्राविषयीच्या बाबी, आचारविचार, वागणूक, आपसातील व्यवहार, युद्ध, शांतता, शासन, प्रशासन, राज्यव्यवस्था,  आर्थिक जीवन, सामाजिक जीवन, वगैरे सर्वांविषयी शिकवण आहे. पवित्र कुरआन हा अल्लाहने आपले संदेशवाहक जिब्रिल (अ.) यांच्याद्वारे आपले अंतिम प्रेषित मुहम्मद (स.)  यांच्यावर अवतरित केले. त्याची सुरूवात इ. स. 610 मध्ये मक्का शहरापासून दूर एका गुहेत झाली. सर्वांत पहिली वही (आयात) सुरह अलक च्या काही आयती होत्या. ’’वाचा (हे  पैगंबर स.) आपल्या पालनकर्त्याच्या नावासहीत ज्याने गोठलेल्या रक्ताच्या एका गुठळीपासून मानवाची निर्मिती केली. वाचा आणि तुमचा पालनकर्ता मोठा वैभवशाली आहे.’’ (कुरआन,  96:1-3)
कुरआनचे अवतरण प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर एकाच वेळी झालेले नाही. ते गरजेनुसार एकूण 22 वर्षे 5 महिने 40 दिवसांत पूर्ण झाले. कुरआनात 114 अध्याय (सूरह) मिळून 30 भाग (पारे) पाडण्यात आले आहेत. यात 540 रुकुअ (विसावे) आहेत. कुरआनचे पठण (ऐकताना किंवा करताना) यातील 14 ठिकाणी सजदा करणे म्हणजे ईेशरासमोर नतमस्तक होणे अनिवार्य आहे. संपूर्ण कुरआनात 77234 शब्द व 333760 अक्षरे आहेत. 6666 आयती आहेत. पवित्र कुरआनच्या बाबतीत स्वत: ईेशर (अल्लाह) सांगतो,’’आम्ही यास कद्रच्या  रात्री पाठविले आणि तुम्हाला काय माहीत कद्रची रात्र काय आहे? कद्रची रात्र हजार महिन्यांपेक्षा अधिक उत्तम आहे.’’ प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यानुसार ही रात्र रमजान महिन्याच्या  शेवटच्या दहा दिवसांपैकी एक रात्र आहे. जसे बारा महिन्यांत रमजान हा पवित्र महिना मानला जातो तसे रमजान महिन्यातील शेवटच्या दहा रात्रींमधून एक पवित्र रात्र आहे. कुरआन  ईेशराचा दोर आहे अर्थात जे याच्या नियमाला धरून जीवन व्यतीत करतील ते जग व परलोकात यशस्वी होतील. या संदर्भात तिबरानींची एक हदीस (प्रेषित वाणी) आहे की एकेदिवशी  प्रेषित मुहम्मद (स.) एका मस्जिदमध्ये गेले. त्यांनी पाहिले की काही सहाबी (प्रेषितांचे साथीदार) मस्जिदमध्ये एका कोपऱ्यात बसून एकमेकांना कुरआन समजावून सांगत होते. हे  पाहून प्रेषितांचा चेहरा आनंदी झाला. प्रेषित त्यांच्या जवळ गेले आणि विचारले की ’’तुम्ही म्हणता की अल्लाहशिवाय कोणी उपासनेस योग्य नाही, मी अल्लाहचा प्रेषित आहे आणि  कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे?’’ साहबांनी उत्तर दिले, ’’हे प्रेषित! होय, आम्ही ग्वाही देतो की अल्लाहशिवाय कोणी उपासनेस योग्य नाही आणि तुम्ही अल्लाहचे प्रेषित आहात व  कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे.’’ मग प्रेषित म्हणाले, ’’तुमच्यावर कृपा असो अल्लाहची. मी असा विेशास देतो की कुरआन अल्लाहचा दोर आहे. ज्याला धरून तुम्ही स्वर्गापर्यंत पोहचाल,  ज्याचे एक टोक धरतीवर तुमच्याजवळ आणि दुसरे टोक आकाशात अल्लाहजवळ आहे.’’

- नाजीम खान
9763869930

रोजा हे अनेक कारणामुळे इस्लामच्या खऱ्या स्वरुपाचे द्योतक आहे. कुरआनने धर्माची स्पष्ट केलेली कल्पना ही रोजा मध्ये सर्वांगांने स्पष्ट होते. कारण रोजा मनुष्याला फक्त सदाचरणींच बनवत नाही तर त्याच्या आत्म्याला आणि विचाराला एक दिशा देते. बहिरंग आणि अंतरंग दोन्ही ईशपरायण बनतात. याबद्दलचे स्पष्टीकरण खालील प्रेषितकथनाने अधिक स्पष्ट होते.
‘‘जी व्यक्ती आयुष्यभर रोजे ठेवते अशा व्यक्तीचे रोजे निरर्थक आहेत.’’ (बुखारी)
‘‘तुम्हाला दोन किवा त्यापेक्षा जास्त दिवसांचे सततचे रोजे ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.’’ (मुस्लिम)
एकदा प्रवासात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी लोकांची गर्दी एका व्यक्तीभोवती पाहिली. विचारपूस केल्यानंतर कळले की तो प्रवासी रोजादार आहे. प्रेषित म्हणाले, ‘‘प्रवासात रोजा ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना अपरिमित कष्ट झेलावे लागतात.’’ (बुखारी)
प्रेषित मुहम्मद (स.) यांचा सोबती (र.) जो मदिनाबाहेर राहत होता तो एकदा त्यांच्याजवळ आला आणि भेट झाल्यानंतर निघून गेला. एक वर्षानंतर तो पुन्हा आला या वेळी तो फार दुबळा झाला होता. तो ओळखूसुध्दा आला नाही. प्रेषितांनी त्याला विचारले, ‘‘काय झाले आहे, मागील वर्षी तू चांगला सदृढ होता.’’ त्याने उत्तर दिले, ‘‘मी वर्षभर दिवसातून एकदाच जेवण घेत असे (रोजा ठेवत असे).’’ हे ऐकल्यानंतर प्रेषित म्हणाले, ‘‘तू स्वतः ला का कष्ट दिले?’’ (अबू दाऊद)
आपण वरील प्रेषितकथनांचा विचार केला तर हे सिध्द होते की रोजामुळे ईशपरायणतेचा क्रांतीकारक अर्थ निघत आहे. ईशपरायणता रोजाचा मूळ हेतु आहे. रोजामध्ये ‘स्व’चा नाश होत नाही. तर ‘स्व’वर नियंत्रण राहते. दुसऱ्या शब्दांत ईशपरायणतेबरोबर त्याची मौलिकता आणि महत्त्वसुध्दा रोजादार जाणून घेतो. समजून उमजून घेतो. हे सर्व अनुभवातूनच! जेव्हा ‘रोजा’ हा शब्द कानी पडतो तर लगेचच ‘स्व’च्या मागणीला रोखून धरणे म्हणजे रोजा हे आपल्या लक्षात येते. ती ‘स्व’च्या मागणीचा अतिरेकसुध्दा होऊ देत नाही. कुरआन स्पष्टोक्ती आहे,
‘‘ज्याने आपल्या पालनकर्त्यासमोर उभे राहण्याचे भय बाळगले होते आणि मनाला वाईट इच्छेपासून दूर ठेवले होते, स्वर्ग त्याचे ठिकाण असेल.’’ (कुरआन ७९: ४१)
ईशपरायणता मनाला स्वैर सोडून कधीच प्राप्त होत नाही. रोजा दिव्य अवतरणानुसार त्या ‘स्व’वर नियंत्रण ठेवतो व त्याला सैरावैरा पळू देत नाही. याचा अर्थ ‘स्व’ला मारून टाकणे असा मुळीच नाही. दुसऱ्या धर्मात ‘स्व’ला अतिकष्ट देऊन आणि मनोकामनांचे दमन करून नष्ट करणे अतिउच्च दर्जाचे पुण्य समजले जाते. इस्लामला हा अतिरेक मुळीच मान्य नाही. इस्लामनुसार हे पुण्य नाही तर पाप आणि अत्याचार आहे. रोजा तुम्हाला या सत्यतेची आठवण नेहमी करून देतो. काही संबंधित प्रेषितकथने आपण येथे पाहू या.
1. ‘‘पहाटे सहेरी (जेवण) करा रोजा सुरू करण्यापूर्वी हे एक लाभकारक कृत्य आहे. - मुस्लिम
2. लोक रोजा सोडण्यासाठी वेळेत घाई करतील तेवढे त्यांना पुण्य लाभेल.’’ - मुस्लिम
3. ‘‘लोक जोपर्यंत रोजा सोडण्यात वेळेवर घाई करत राहतील तोपर्यंत हा धर्म वर्चस्व स्थापित करून राहील.’’ - अबू दाऊद
4. ‘‘अल्लाह स्पष्ट करतो की माझा प्रिय दास तो आहे जो वेळेत रोजा सोडण्यासाठी घाई करतो.’’ -तिरमिजी
अशा प्रकारे वरील प्रेषितकथनानुसार रोजाचे महत्त्व स्पष्ट होते. ईशपरायणता म्हणजे ‘स्व’चे दमन अथवा नाश नव्हे तर स्वयंनियंत्रण होय. हे स्वयंनियंत्रण दृष्टिकोनाची शिस्तबध्दता आणि आवडीनिवडीची शिस्तबध्दता दर्शविते. ‘स्व’ला दिव्यप्रकटन अथवा ईश्वरेच्छेला प्रत्यक्ष व्यवहारात कार्यान्वित करणे. असे करताना स्वतःच्या आवडीनिवडींना, इच्छांना कुठेही थारा न देणे ईशपरायणतेला अपेक्षित आहे. अल्लाहची प्रसन्नताप्राप्तीसाठी फक्त अल्लाहचे आदेश पाळणे पुरेशे नाहीत तर त्याबरोबर आपल्या मनातील इच्छांना आवर घालून स्वतःच्या इच्छेनुसार न वागणे आवश्यक आहे. अल्लाहची उपासना- इबादत करणे म्हणजे अल्लाहव्यतिरिक्त इतर तथाकथित ईश्वरांना नाकारणे आणि अल्लाहचे एकत्व, एकेश्वरत्व मान्य करणे या दोन्ही मौलिक गोष्टी आहेत. अल्लाहला आत्मसमर्पण करणे आणि ईशपरायण जीवन जगणे म्हणजे अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताची आज्ञाधारकता स्वीकारणे होय. ज्यांना न करण्याचा आदेश दिला आहे त्यांना नाकारणे आणि ज्यांच्यासाठी परवानगी दिली आहे त्या गोष्टी आचरणात आणणे हे माणसाला आत्मिक समाधान प्राप्त करुन देते. अल्लाह आणि त्याच्या प्रेषिताने घालून दिलेल्या मर्यादांचे पालन करणे आणि स्वतःची भर त्यात न घालता, मर्यादा भंग न करता जीवन कंठत राहणे ईशपरायणता आहे.
रोजाचा उद्देश ईशपरायणतेला वृध्दिगंत करणे आहे. एकीकडे रोजा ठेवण्याच्या व्यक्तीला पहाटे जेवण सेहरी करण्याची कडक ताकीद दिली आहे. सेहरी न करता रोजा ठेवणारा अल्लाहची कृपा प्राप्त करु शकत नाही, तसेच रोजा सोडण्याच्या वेळेसंबंधीसुध्दा कडक ताकीद आहे. रोजा सोडण्यात विलंब याला श्रध्देत कमतरता म्हटले गेले आहे. ही दोन्ही कृत्ये ईशपरायणता प्राप्त करण्याच्या मार्गातील अडथळे आहेत. ‘स्व’वर नियंत्रण अशा कृत्यामुळे होते. यामुळे रोजाचा हेतूसुध्दा साध्य होण्यास मदतच होते. ही दोन्ही प्रकारची ताकीद स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा मार्ग बंद करते. स्वतःच्या इच्छेनुसार आवडीनुसार तर रोजाचे योग्यरित्या पालन होऊच शकत नाही. रोजा ठेवण्यासाठी ठरवून दिलेली वेळ न पाळता आपल्या मनाप्रमाणे करणे हे स्वार्थी वृत्तीचे लक्षण आहे. हे तर खरे धर्मात स्वतःची ढवळाढवळ करण्यासारखे आहे. असे जर असेल तर रोजामुळे स्वयंनियत्रंण होते हे म्हणणेच चुकीचे ठरते. मर्यादांचे उल्लंघन करणे याचसाठी निषिध्द आहे. या सर्व बाबींचा आपण विचार केला तर कळून येते की रोजाला इस्लामचा आधारस्तंभ का म्हणून संबोधले आहे आणि इस्लामची इमारत या अधारस्तंभाअभावी का म्हणून अपूर्ण राहते हेसुध्दा आपणास कळून येते.

- मुहम्मद फारूक खान
    इस्लाम एक गंभीर विषय आहे मात्र तो मानवतेच्या दृष्टीने अत्यंत सरळ व सुलभ विचार आहे. या पुस्तिकेत इस्लामचे वास्तविक स्वरूप देशवासीयांसमोर माडण्याचा प्रयत्न केला आहे.
    भारतीय धर्म ग्रंथात पैगंबर मुहम्मद (स.) यांचा उल्लेख अल्लाहसंबंधी उपनिषदाचे भविष्य कथन, महात्मा बुद्धाचे भविष्य कथन, पैगंबर (स.) यांच्या पवित्र जीवनावर मुस्लिमेतर विद्वानांनी लिहिलेली पुस्तके आणि पवित्र कुरआन सेवेत भारतातील मुस्लिमेतर विद्वानांचा सहभाग इ. विषयावर विवेचन आले आहे.

आयएमपीटी अ.क्र. 111   -पृष्ठे - 20     मूल्य - 08           आवृत्ती - 2 (2011)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/2nctzdwtp5h7w30838duqkewkstf05jv

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget