Latest Post


लेखक - न्या. एस. ए. रहमान

भाषांतर - मुहम्मद शफी अन्सारी

इस्लामनुसार खरा शरियत ज्ञाता अल्लाहच आहे. त्याने वही (दिव्यप्रकटन) द्वारे धर्मप्रणाली म्हणजेच जीवनप्रणालीविषयी मार्गदर्शन केले आहे. अल्लाहच विधीविधाता आहे. या पुस्तिकेत कायद्याशी अभिप्रेत मदीना येथील ते सर्वकष व आवश्यक कायदे आहेत ज्यांचे पालन सुसंस्कृत समाजासाठी आवश्यक आहे.

या पुस्तिकेत कायद्याचा अर्थ, कुरआनी कायद्याचे वैशिष्ट्य, कायदेशीर स्वरुपाची हदीस वचनं, वचन-कराराचे पालन, शासकाचे गुणविशेष, व्याजाची मनाई, भेदभाव विरहीत व्यवस्था व कसोटीपूर्ण स्वातंत्र्य इ. विषय चर्चिले आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 245     -पृष्ठे - 24 मूल्य - 16      आवृत्ती - 1 (2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/s2knhedl313i6vcbacktz7o3myyo0u7y

हजरत    अबुबकर,    इस्लामचे   दुसरे खलीफा. यांच्या काळात अमरो  बिनुल  आस   हे पॅलेस्टाईनचे राज्यपाल होते. पॅलेस्टाईनच्या इतर शहरांवर विजय मिळविल्यानंतर बैतुलमुकद्दसकडे ते निघाले. तिथे ख्रिस्ती किल्लाबंद होऊन  त्यांच्याशी   लढत  देत राहिले. त्यांचा धीर खचल्यानंतर त्यांनी समेट घडवण्याचा प्रस्ताव सादर केला. अमरो बिनुल आस यांचे सहकारी अबु  उबैदा  यांना  पत्र पाठवून कळविले की बैतुलमुकद्दस जिंकण्यासाठी आपली प्रतिक्षा होत आहे. ह. उमर (र.) यांनी आपल्या इतर सहकऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय केला. ह. उस्मान यांनी म्हटले की ख्रिस्ती लोकांचे मनोबल   खचले  आहे.  जर  आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याशी करार केला नाही तर ते आणखीनच खचून जातील आणि  मुस्लिम लोक त्यांना मान देत नाहीत. त्यांना तुच्छ समजतात अशी त्यांची धारणा होऊन ते कोणत्याही अटी न घाल ता स्वतःच पराभूत होतील. ह. अली (र.) यांनी त्या उलट दुसरा विचार मांडला. उस्मान (र.) यांनी तो स्वीकारला. ह. उमर भले मोठे लष्कर आणि शस्त्रास्त्रे घेऊन बैतुलमुकद्दसच्या दिशेने निघतील असा कयास लोकांनी बांधला होता. भव्यदिव्य लष्कर तर सोडाच ते निघाले त्या वेळी त्यांचयाकडे तंबू उभारण्यासाठीही काही सामग्री नव्हती. एक घोडा होता पण ह. उमर यांच्या स्वारीची वार्ता सर्वत्र पोहोचली. जिथं जिथं ही बातमी पोहोचली तिथल्या लोकांचे धाबे दणाणले. शासकीय अधिकाऱ्यांना आधीच कळवले गेले होते. त्यांनी जाबिया या ठिकाणी येऊन त्याची भेट घेतली. यझीद बिन अबी सुफियान आणि खालिद बिन वलीद यांनी याच ठिकाणी त्यांचे स्वागत केले.

सीरिया या देशात रेशिम असल्याने त्यांच्या अधिकारीवर्गामध्ये  अरबांसारखे  साधेपण  गायब झाले होते. ह. उमर (र.) यांना भेटायला हे लोक आले तेव्हा त्यांनी रेशिमची वस्त्रे परिधान केलेली होती. आपल्या हावभावाने हे लोक बिगर अरबांसारखे दिसत होते. ह. उमर  यांना  ही    अवस्था  पाहून  राग  आल ा. ते घोड्यावरून खाली उतरले आणि जमिनीवरील खडे हातात   घेऊन   त्यांच्या   दिशेने  भिरकावल े. म्हणाले की एवढ्या लवकर तुम्हाला अरबांच्या साधेपणाच्या जीवनाचा विसर पडला?

जाबिया या ठिकाणी  बराच  काळ  ते थांबले होते. याच ठिकाणी बैतुलमकद्दसचा करार संमत झाला. त्या लिखित करारावर सर्वांच्या सह्या घेतल्या गेल्या. करार संमत झाल्यावर ह. उमर (र.) बैतुलमकद्दसकडे   निघाले.  त्यांच्या  घोड्याचे  नाल झिजले होते, म्हणून घोडा एकेका पावलावर थांबत होता. उमर (र.) घोड्यावरून खाली उतरले आणि  पायीच निघाले. बैतुलमकद्दसच्या जवळ अबु उबैदा आणि इतर अधिकारी त्यांच्या  स्वागतासाठी  पुढे आले. तिथल्या मुस्लिम लोकांना लाज वाटल्यासारखे झाले. एवढ्या बलाढ्या अधिराज्याचा अधिपती अशी वस्त्रे परिधान करतो हे त्यांना पसंत नव्हते. त्यांनी त्यांच्यासाठी तुर्की देशाचा एक घोडा आणि आलिशान वस्त्रे परिधान करण्यासाठी उपलब्ध करून दिली. ते घेण्यास नकार देत ह. उमर (र.) म्हणाले की आम्हाला मानसन्मान मिळाला तो इस्लाम धर्मामुळे मिळाला आहे आणि तोच सन्मान आम्हाला पुरेसा आहे.

(संदर्भ – अल-फारुक, अल्लामा शिबली नोमानी) 

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद


 


माननीय उमर (रजि.) यांचे कथन आहे.

अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही माझी प्रशंसा अति करू नका, ज्याप्रमाणे खिश्चन लोकांनी मरयमपुत्र ईसा (अ.) यांच्या प्रशंसेत अतिशयोक्ती केली. मी तर अल्लाहचा एक दास आहे. म्हणून तुम्ही मला अल्लाहचा दास आणि अल्लाहचा पैगंबर म्हणत चला.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण

‘‘पदप्रतिष्ठेतील अंतराला दृष्टीसमोर ठेवून असणे आवश्यक आहे. सामान्यत: लोक आपल्या थोरांची प्रशंसा करण्यात अतिशयोक्ती करतात. याच कारणाने ईसा मसीह (अ.) यांच्या अनुयायींनी ईसा मसीह (अ.) यांना ईशपुत्र घोषित करून टाकले, आणि भक्तीच्या (बंदगी) पंक्तीत प्रेषित्वाला सामील केले. यहुदी (ज्यू) लोकांनी आदरणीय उजैर (अ.) यांना ईश्वरपुत्र म्हटले. खरे तर ईश्वराच्या ईशत्वात कोणीही भागीदार बनू शकत नाही. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी लोकांनी त्यांची प्रशंसा करताना अतिशयोक्तीने काम घेण्यास रोखले.  साक्षवचन (कलमे शहादत) अर्थात ‘‘मी साक्ष देतो की अल्लाहशिवाय दुसरा कोणी पूज्य नाही. तो एकमेव आहे, त्याचा कोणी भागीदार नाही आणि मी साक्ष देतो की मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि त्याचे पैगंबर आहे.’’ या वाक्यातील शब्द ‘अब्दुहु व रसूलुहु’ (त्याचे दास व त्याचे पैगंबर) निरंतर स्मरण करून देतात की पैगंबर व रसूल अल्लाहचा एक दास असतो जरी ते श्रेष्ठत्व व पूर्णत्वप्राप्त व्यक्ती असतात. अशा प्रकारे इस्लामने अनेकेश्वरत्वाला समूळ नष्टकेले आहे.


लेखक - जैनुल आबेदिन मन्सुरी

भाषांतर - एम. हुसेन गुरूजी

या पुस्तिकेत पैगंबर येशु आणि त्यांची माता मेरी यांच्याशी संबंधित कुरआन आयतींचे भाषांतर दिले आहे. ह्याचा लाभ विशेषत: आमच्या ख्रिस्तासह बांधवांना होणार आहे जे पैगंबर येशु आणि मेरीविषयी कुरआनचे मत जाणून घेण्यास इच्छुक आहेत.

कुरआनात येशुविषयी एकूण तीस आयतींचा उल्लेख त्यांचा अलौकिक जन्म, दर्जा, विशेष धर्मकार्य व धर्मप्रसाराचे वर्णन आहे. येशुची जन्मदाती मेरी अन्य पैगंबरांच्या मातेहून सर्वथा भिन्न आहे, हे सत्य उलगडण्यात आले आहे. या पुस्तिकेमुळे अभ्यासकाची शोधवृत्ती अवश्य परिपूर्ण होईल, असा लेखकाचा दृढविश्वास आहे.  

आयएमपीटी अ.क्र. 244   -पृष्ठे - 53     मूल्य -28   आवृत्ती-1(2014)

डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/3123q18tzuaxctl1uaa3j47comw9nfg6मजबूत समाज हे मजबूत कुटुंबाच्या समुच्चयाचे नाव आहे. मजबूत कुटुंब मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत लोकांमुळे बनते आणि असे लोक ईशपारायणतेच्या माध्यमातून घडतात. जगात असे कुठेच आणि कधीच घडले नाही की मजबूत समाज हा व्यसनाने पोखरलेल्या दुराचारी लोकांमुळे अस्तित्वात आला. इस्लामचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या नेतृत्वाखाली सातव्या शतकात जरूर एक मजबूत समाज अस्तित्वात आला होता. पण त्यांच्यानंतर हळूहळू तो समाज लोप पावत गेला. परंतु, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ज्या प्रक्रियेद्वारे अरबांसारख्या रानटी समाजाचे रूपांतरण नैतिकदृष्ट्या मजबूत समाजात केले होत. ती प्रक्रिया शरीयतच्या रूपाने आज देखील अस्तित्वात आहे. स्वतः मुस्लिम समाज बऱ्यापैकी शरियतवर आचरण करत असल्यामुळे त्यांची कुटुंब व्यवस्था इतरांच्या तुलनेत मजबूत आहेत. म्हणूनच की काय मुस्लिम तरूण-तरूणी यांच्यामध्ये आत्महत्येसारख्या आत्मघाती कृत्यापासून ते व्यसनाधिनतेचे व अश्लिलतेचे प्रमाण अतिशय कमी आहे.

मात्र अलिकडे प्रगतीच्या नावाखाली जो काही भौतिकवाद समाजामध्ये बोकाळत चाललेला आहे त्यातून स्वार्थी समाज आकारात आलेला आहे. कुटुंबाचे अस्तित्व संकटात सापडलेले आहे. कुटुंबाला पर्याय म्हणून लीव इन रिलेशनशिपसारखी स्त्रियांवर अत्याचार करणारी अनैतिक पद्धत मोठ्या शहरात सुरू झालेली आहे. नव्हे रूढ झालेली आहे. पण ही पद्धत मजबूत कुटुंब तर सोडा लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यांच्या नात्याला सुरक्षासुद्धा पुरविण्यास सक्षम नाही. इस्लामच्या दृष्टीने कुटुंब म्हणजे जबाबदारी, नात्यांचे रक्षण होय. म्हणूनच शरियतने वैध लग्नाशिवाय इतर पद्धतीने अस्तित्वात येणाऱ्या कुटुंबांना निषिद्ध ठरविलेले आहे. प्रसिद्ध इस्लामी विचारवंत अस्लम गाझी यांच्या मते मानवसमाजाचे सर्वांग सुंदर चित्र कुटुंबाच्या परिघामध्ये दिसून येते. यात पती-पत्नीचे एकमेकावरचे प्रेम, आई-वडिलांची कृपा, धाकट्यांवर प्रेम, मोठ्यांचा सन्मान, कुटुंबातील विवश किंवा दिव्यांग लोकांची मदत, वृद्धांचा आधार, अडी-अडचणींमध्ये एकमेकांच्या कामाला येणे, सर्वांशी चांगले संबंध ठेवणे, आनंद आणि दुःखाच्या क्षणात एकत्र गोळा होणे. थोडक्यात असे कुटुंब म्हणजे छोटा समाजच असतो. हा छोटा समाज जेवढा मजबूत आणि सुंदर असतो तेवढाच मोठ्या समाजासाठी उपयोगी आणि मदतीचा असतो. मानवी गरजा ह्या झुंडीतून पूर्ण होत नाहीत. त्यांना पूर्ण करण्यासाठी पावलो-पावली नातेवाईकांची गरज पडते. आणि मजबूत कुटुंबातूनच मजबूत नाती निर्माण होतात. ज्याप्रमाणे वर्षभर अभ्यास केल्यानंतर वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थ्याच्या क्षमतेचा कस लागतो तसाच संकटाच्या समयी कुटुंबातील सदस्यांचा कस लागतो. कुटुंब मजबूत असेल तरच एकमेकाच्या सहकार्याने कुटुंबातील सदस्य त्या संकटावर मात करतात. नाती ही माणसाची मुलभूत गरज आणि अधिकार दोन्ही आहेत. ते आनंद आणि दुःख दोन्ही समयी उपयोगाला येतात. मात्र अलिकडे कुटुंब व्यवस्था खिळखिळी होत असतांना पाहतांना दुःख होते. 

ज्याप्रमाणे झाड आपल्या मुळांपासून तुटल्यावर वाळून जाते त्याचप्रमाणे कुटुंबाचे सदस्य कुठल्याही कारणांमुळे कुटुंबापासून लांब गेल्यामुळे वाया जाण्याची शक्यता वाढते. आज अनेक तरूण मुलं-मुली उच्च शिक्षणाच्या निमित्ताने आपले कुटुंब सोडून मोठ्या शहरात किंवा विदेशामध्ये राहतात. तेथे त्यांच्यावर कुटुंबाचे नियंत्रण नसते. त्यामुळे अशा मुलां-मुलींचे पाय घसरण्याची शक्यता जास्त असते. कुटुंब हे समाजाचे मूळ घटक आहे म्हणून होता होईल तितके हे मजबूत कसे राहील, यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. 

’’आणि त्याच्या संकेतचिन्हांपैकी ही आहे की त्याने तुमच्यासाठी तुमच्यामधून पत्नीं बनविल्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्यापाशी संतोष प्राप्त करावा. आणि तुमच्या दरम्यान प्रेम आणि करूणा उत्पन्न केली,निश्चितच यात बरीच संकेतचिन्हे आहेत, त्या लोकांसाठी जे मनन व चिंतन करतात.’’ (सुरे अर्रूम : आयत नं. 21)

कोणत्याही श्रद्धावान कुटुंबाची सुरूवात एका मुलाच्या लग्नाच्या प्रस्तावाला एका मुलीने होकार दिल्याने होते. या प्रक्रियेद्वारे दोन कुटुंब एकत्र येतात आणि तिसऱ्या एका नवीन कुटुंबाची पायाभरणी होते. इस्लाममध्ये लग्नाची आवश्यकता पतीने पत्नीपासून संतोष प्राप्त करावा, या प्राथमिक हेतूने केलेली आहे. ज्याचे संकेत वर नमूद आयातीमध्ये दिलेले आहेत. याशिवाय, मानव वंशाचा विस्तार कुटुंब व्यवस्थेतून अपेक्षित आहे. वर नमूद आयातीमध्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये आपसात प्रेम आणि करूणा ही ईश्वरीय देणगी आहे. या मजबूत पायावर एका नवीन कुटुंबाची सुरूवात होते आणि लवकरच त्या कुटुंबामध्ये मुलांच्या स्वरूपात नवीन सदस्यांचा प्रवेश होतो. सुरूवातीला दोघांवर आधारित असलेले कुटुंब पुढे विस्तारत जाते आणि स्वतंत्र कुटुंबाचे स्वरूप धारण करते. या कुटुंबातून चांगले चारित्र्यवान आणि सभ्य स्त्री-पुरूष निर्माण होणे आवश्यक असते, असे तेव्हाच शक्य असते जेव्हा कुटुंब नावाची ही प्राथमिक ईकाई ही मजबूत तर समाज मजबूत. 

जमाअते इस्लामी हिंद महिला विभागातर्फे येत्या 19 ते 28 फेब्रुवारी दरम्यान मजबूत कुटुंब मजबूत समाज या नावाने जी मोहिम सुरू झालेली आहे ती आजच्या काळाची गरज आहे. कारण कुटुंब व्यवस्थेचा ठिसूळ होत चाललेला पाया पुनःश्च मजबूत केल्याशिवाय आपला समाज मजबूत होणार नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश या मोहिमेतून जाणार आहे. या मोहिमेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!  


- मिनहाज शेख, 

पुणे (९८९०२४५५५०)हजरत मुहम्मद (स.) यांचे नाव जगातील पहिल्या शंभर प्रसिद्ध व्यक्तींच्या सूचित पहिल्या क्रमांकावर असल्याचे वाचले आणि झालेला आनंद अविस्मरणीय असा होता. हजरत मुहम्मद (स.) यांचा जन्म (मक्का) आणि मृत्यू (मदीना) या दोन्ही घटना रबिऊल अव्व्ल महिन्यातील होत. हजरत मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन आणि त्यांचे कार्य यांचे स्मरण रबिऊल अव्व्ल महिन्याच्या औचित्यातून करण्याचा या लेखाचा प्रयास आहे. माझ्या लेखासाठी प्रा. के. एस. रामाकृष्ण राव यांचे पुस्तक मुहम्मद (स.) आदर्श प्रेषित याचा आधार घेतला आहे.

ते लिहितात :- मुहम्मद (स.) प्रेषित, सेनापती, शासक, योद्धे, व्यापारी, उपदेशक, तत्त्वज्ञानी, राजनीतीज्ञ, वक्ते, समाजसुधारक, अनाथांचे पोषणकर्ते, गुलामांचे रक्षक, स्त्रीजातीचे उद्धारक, नायनिष्ठ आणि संत या सर्व भूमिकांमध्ये व मानवतेच्या सेवाकार्य क्षेत्रात त्यांची योग्यता महान विश्व्नायकाची आहे. जगभरात चारित्र्य नावाला उरले नव्हते, अनीती शिगेला पोहचलेली होती अशा वेळी गरज होती ती मानवतेच्या शिकवणीची. अल्लाहने या कामासाठी निवड केली मुहम्मद (स.) यांची, जे अशिक्षित होते मात्र प्रामाणिकपणा त्यांच्या नसानसांत भरलेला होता. या कामाची जबाबदारी म्हणून त्यांस लाभली, या लाभाबरोबरच ते अल्लाहचे पैगम्बरही बनले.

त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यानंतर विषयाची माहिती व प्रशिक्षण त्यांस देणे आवश्यक होते. अल्लाहने आवशयक ती माहिती व प्रशिक्षण दिले. त्यानंतर मुहम्मद पैगंबर (स.) यांनी त्यांचे कार्य हाती घेतले. ते कार्य होते एकेश्वरवाद पुनर्जीवित करणे, मानव समानतेचा अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहचविणे. अर्थात हे कार्य तेथील समूहास रुचेनासे होते तेव्हा त्यांनी मुहम्मद (स.) व त्यांचे सह्काऱ्यांचा अनन्वित छळ केला ज्यामुळे त्या सर्वांना मक्का सोडून मदीनेस जाणे भाग पडून ते मदीनेस गेले. एका बाजूने छळ चालू होता तर दुसऱ्या बाजूने पैगम्बर मुहम्मद (स .) यांनी अल्लाहची पाठराखण व सह्कार्यचे विश्वासच्या जोरावर कार्य चालू ठेवले परिणामी कारवाही वाढत गेली आणि स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण करता येईल  याची खात्री झाली .या खात्रीचे पुढे हाती घेतलेले मिशन यशस्वीपणे १० वर्षाच्या  कालावधीत पूर्ण झाले .आणि याची देही याची डोळे सर्व काही घडून आलेचे समाधान लाभून वयाच्या ६३ व्या वर्षी हजरत मुहम्मद पैगम्बर (स .)अल्लाहला प्रिय झाले .

प्रा .के एस रामकृष्ण राव आणि काही भारतीय बुद्धिमान विचारवंत  या पुसकात नमूद केले आहे ते पुढील प्रमाणे : जर्मनचे मोठे कवी 'गोयटे' म्हणतात : 'हा ग्रथं प्रत्येक युगात लोकांवर आपला अत्याधिक प्रभाव पाडत राहील'                                                            

जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात पुढील शंभर वर्षात इंग्लंडच नव्हे तर संपूर्ण युरोपवर धर्म इस्लाम असेल . प्रा. हर्गरोन्ज (Hurgronje) यांच्या शब्दांत, इस्लामच्या पैगंबरांद्वारे प्रस्थापित राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय एकता आणि विश्वबंधुत्वाच्या नियमांना अशा सार्वभौमिक आधारांवर स्थापन केले आहे, जे इतर राष्ट्रांना मार्गदर्शन करीत राहातील. प्रा. हर्गरोन्ज पुढे लिहितात, वस्तुस्थिती ही की, राष्ट्रसंघाच्या धारणेस वास्तविक रूप देण्याकरिता इस्लामची ही कामगिरी आहे. जगातले कोणतेही राष्ट्र याचे उदाहरण सादर करू शकत नाही. महात्मा गांधी म्हणतात, “इस्लाम ज्याने स्पेनला सभ्य बनविले, त्या इस्लामपासून ज्याने मोरोक्कोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहचविला आणि संपूर्ण विश्वाला बंधुभावाचे बायबल शिकविले. दक्षिण आफ्रिकेतील यूरोपियन इस्लामच्या विस्तारामुळे केवळ एवढ्यासाठी भयभीत आहेत की त्याच्या अनुयायींनी गौरवर्णीयांशी समानतेची मागणी करू नये? असे असेल तर त्यांचे भयभीत होणे योग्यच आहे. बंधुभाव पाप आहे, कृष्णवर्णीयांची गौरवर्णीयांशी समानता होण्याची त्यांना भीती वाटते. तर मग (इस्लामच्या प्रसाराने) त्यांच्या भयभीत होण्याचे कारणही लक्षात येऊ शकते. सरोजिनी नायडू म्हणतात ,"हा पहिला धर्म आहे ज्याने लोक्तांत्राची शिकवण दिली आणि त्याला एक व्यावहारिक रूप दिले . या करीता त्यांनी मस्जिद मधील सामूहिक नमाज हे उदाहरण घेतले आहे ते असे कि नमाज मध्ये श्रीमंत -गरीब , उच्च-निच्च ,राजा -रंक  आणि गोरा -काळा असा भेदभाव नाही . (pg 2)

इस्लाम बाबत थॉमस कार्लायलचे मत पुढे विचारत येईल ,ततपूर्वी  लेखक प्रा . के एस रामाकृष्ण राव यांनी केलेले  विवेचन पाहू .

मुहम्मद (स.) अनाथ आणि निरक्षर होते त्यांचा जन्म मक्का शहरात झाला होता त्या शहराततील लोक शीघ्रकोपी व सूडभावनचे होते .तर काही सुज्ञ होते मुहम्मद (स.) अशाच  सुज्ञ मंधील सर्वउत्तम होते ,त्यांच्यातील  प्रामाणिकपणा व न्यायी वृती  यामुळे तेथील आपसांतील भांडणात ते मध्यस्थी असत . मानव ,गुरेढोरे झाड -माड एकूणच सर्वप्रती ते दयावान होते . आणि तरीही त्यास अशा भयंकर छळाला सामोरे जावे लागले ,कि यातना असह्य होहून आपले घरदार सोडून शहर मदिना मध्ये जाऊन आश्रय घेतला त्यांच्यातिल सद्गुणा मुळे त्यांच्या सादचारामुळे त्यांनी हाती घेतलेली इस्लामी मानवतेचे मिशन मध्ये लोक सामील झाले होते . ते या छळाला  बळी पडले तरीही त्यांनी आपले या नेत्याची साथ प्रसंगी त्यांच्यातील काहींनी मरण पत्करून दिली . तर काहींनी स्वतःचे घरदार सोडून त्यांच्या बरोबर शहर मदिना जाऊन साथ दिली.

परिणामी या सोसलेल्या यातनांचे इनाम म्हणून मक्का शहर मुहम्मद (स.) त्यांच्या सहकार्यनच्या ताब्यात रक्ताचा एक थेंब सांडून न देता अल्लाहने दिले.

मुहम्मद (स.) नी ज्या यातना स्वतः सोसल्या त्या हि पेक्षा त्याना अधिक वेदना त्यांच्या सहकार्यस सोसाव्य लागल्या. आणि तसे त्याचं कृतितुन दिसूनही येत होते . परंतु त्यांनी हे सर्व जे काही सहन केले ते एका निश्चित ध्येयासाठी होते आणि ते ध्येय होते एकेश्वरवादचे सत्य ,मानवतेचे सत्य या सर्वाना अल्लाहने लोकांचे जीवन सुलभ शांती व समाधानाचे व्हावे म्हणून केलेले मार्गदर्शन अर्थात धर्म दिन इस्लाम लोकपर्यंत पोहचवावे ,अखेर ते पोहचले नंतर त्यानि केलेली कृती म्हणजे उच्चतम मानवतेत रोवलेला एक अवीसमरणीय ,अनमोल तुरा होता आणि तो होता ज्यानी छळून त्यांस व त्यांच्या सहकार्यास शहर मक्का सोडण्यास भाग पडले होते. त्या सर्वाना दिलेली क्षमा -माफी होय अदभूतच कारण माफी देताना मुहम्मद (स०)म्हणाले होते आज तुमच्यावर कोणताही अपराध नाही आणि तुम्ही सर्व स्वतंत्र आहात . page 3

मानवता टिकावी म्हणून हि इस्लामचे मार्गदर्शन आहे ते हे कि ,एकाधिकार ,व्याज ,बाजार पेठांवर कब्जा करणे साठेबाजी ,कृत्रिम टंचाई निर्माण करणे यांना अवैध ठरविण्यात आले शिवाय  व्यभिचार, जुगार ,दारू यानाही निषेध केले गेले . तर शिक्षण संस्था ,उपासना स्थळे ,रुग्णालये  आदि समजयोगी साधनांना प्राधान्य दिले गेले . अनाथालयाचा प्रारंभ मुहम्मद (स)याचे कडून झालेला होता आणि हे सर्व विचारांत घेऊन मुहम्मद (स .)  यांचे विषयी कार्लईल म्हणतात कि निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या या वाळवंटी पुत्राच्या ह्रदयात मानवता द्या आणि समता  स्वभाव निसर्गत: होता .याच कार्लईल व कवी गोयटे यांच्यातील या बाबतचा संवाद अब्दोधक  ठरेल .p4

पैगम्बर हजरत मुहम्मद (स०) यांचे  एकूणच जीवन चरित्राने बेहद खुश आणि प्रभावित झालेले थॉमस कार्लईल लिहितात"आणि मग इस्लामची देखील हि मागणी आहे ,आम्ही स्वतःला अल्लाह करिता समर्पित केले पाहिजे तो आमच्याशी जे काही करतो ,आम्हला जे काही पाठवितो ,मग तो मृत्यू का असेना किंवा त्याहून एखादी वाईट गोष्ट ,ती वास्तविक आमच्या भलाईची आणि आमच्याकरिता उत्तमच असेल. अशा प्रकारे आम्ही स्वतःला ईश्वराच्या प्रसन्ने करीता समर्पित करतो ". गोयटे विचारतात जर हा इस्लाम आहे तर आम्ही सर्व इस्लामी जीवन जगत नाही काय?"यावर कार्लईल लिहातांत "होय ,आमच्या पैकी ते सर्व जे नैतिक व सदाचारी जीवन जगतात ते सर्वच ज्ञान आणि प्रज्ञा आहे ,जी आकाशातून या भूतलावर अवतरीत केली आहे . पैगम्बर मुहम्मद (स०) याचे पवित्र जीवन त्यांचे पवित्र कुराण इस्लामचे मार्गदर्शन सर्वकाही झऱ्यातून वाहणाऱ्या निर्मल पाण्या सारखे असले तरी देखील तलवार ,स्त्रिया असे आक्षेप दूषित मनाचे काही लोक घेत आलेत आणि आजही ते आपली राजकीय पोळी भाजून घेत असतात . जित्याची खोड हि म्हण तिचे ठिकाणी योग्यच परंतु ज्यांना नीट माहिती नसते अशाना इस्लाम वरील आक्षेप कसे अज्ञानातून असतात हे वेळोवेळी समाजातून सांगण्यात येत असतेच तरी देखील सभ्य माणसाने अशा खोडसाळपणा पासून दूर राहावे तसे प्रयत्न नेहमीच गरजेचे ठरतात .

           प्रा .के एस रामकृष्ण राव स्त्रियांचा इस्लामने केलेले उद्धाराबाबत लिहितात - इस्लाम स्त्री उद्धारक या रूपाने आला आणि  त्याने स्त्रीला पतृक वारसात हिस्सेदार बनविले .त्याने शेकडो वर्षपूर्वी स्त्रियांना मिळकतीचा अधिकर दिला आणि त्याच्या बारा शतका नंतर इ. स. १८८१ मध्ये इंग्लंड जो लोकतंत्र प्रणालीचा प्रणेता समजला जातो त्याने इस्लामचा हा सिद्धांत अंगीकारून त्या करीता विवाहित स्त्रियांचा विधिनियम नावाचा कायदा पास केला (आपण २६-१-१९५० पर्यंत ब्रिटिश डोमिनियन मध्ये होतो हे आरोपकर्त्यानी ध्यानी घेतलेले बरे बरका .) प्रा के एस रामकृष्ण राव याच्या हिंदीतील पुस्तकाचे भाषांतरकार अनुवादक मन्सूर आगानी म्हंटले आहे कि मुहम्मद (स ०) याचे बाबत असे पुस्तक हिंदी ,इंग्रजी साहित्यात ते काय उर्दू मध्ये हि सुलभ नाही . अर्थात प्रा रामकृष्ण राव आपले विवेचन पृ . २१ वर लिहितात :जे लोक श्रध्दा बाळगतात आणि सत्कर्म करतात केवळ तेच लोक स्वर्गात जाऊ शकतील ",हे कुरआनने वारंवार सांगितले आहे .जे लोक श्रध्दा बाळगतील ,पण तयानुसार आचरण करीत नसतील तर त्याचें इस्लाम धर्मात काहीच स्थान नाही . वरील प्रमाणेचे इस्लामी मार्गदर्शन करण्यात ज्या यातना सोसव्या लागल्या होत्या त्यांचा अभ्यासकांवर परिणाम होणे स्वाभाविक होते कारण मानवास मानवंतावादी  बनवणेच हे त्याचं कार्य असे २३ वर्ष चालूच होते अखेर वयाचे ६३ व्या वर्षी इस्मलाचे पैगम्बर हजरत मुहम्मद (स ०) अल्लाहचे महबुबना अल्लाहने आपले समीप घेतले . प्रा रामाकृष्ण राव याचे या समयीचे बोल कोणच्या हि डोळयांत अश्रू आणणारे असेच आहेत ते लिहितात = ज्या कपडयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यात  अनेक ठिगळे लावलेली होती . ते घर ज्या पासून संपूर्ण जगात प्रकाश पसरला ते अंधारात होते . कारण दिवा लावण्या करीता तेल सुद्धा नव्हते ..

-बशीर मोडक,

रत्नागिरीहे लोक दुर्बलांचे, शोषितांचे, वंचितांचे भार उचलतात, पाहुणचार करतात, गरीबांच्या तक्रारींना वाईट मानत नाहीत, जे अपंग आहेत त्यांच्या गरजा भागवतात, अनाथांशी दयेने वागतात. आपत्ती कोसळल्यास संयम ढळू देत नाहीत. वचनपूर्ती करतात. आदरसन्मानाचे रक्षण करतात. ज्ञानी लोकांचा मान राखतात. त्यांना हवी असलेली मदत करतात. ज्या गोष्टींपासून ज्ञानी लोक सत्ताधाऱ्यांना रोखतात त्याचे आचरण करतात. त्यांच्याविषयी चांगले विचार बाळगतात. धार्मिक लोकांवर प्रेम करतात. दुर्बलांशी चांगला व्यवहार करतात. त्यांच्याशी न्याय्य वर्तन करतात. त्यांची स्थिती सुधारण्यासाठी पुढे येतात. सत्यासमोर नतमस्तक होतात. लोकांच्या तक्रारींचे निवारण करतात. धार्मिक प्रवृत्तीचे असतात. आराधना-उपासना करतात. म्हणजे त्यांचे एकूण राजकारण याच सद्गुणांवर आणि वैशिष्ट्यांवर आधारित असते. वरील सर्व सद्गुण चांगल्या राजकारण्याचे द्योतक आहेत. ते एखाद्या लहानशा भूभागाचे शासक असतो की एखाद्या अधिराज्याचे अधिपती असोत, हे राजकीय सद्गुण त्यांच्यामध्ये आवश्यक आहेत.

याउलट जेव्हा ईश्वर कुणा सत्ताधारी शासकाकडून त्याचे राज्य हिरावून घेतो तेव्हा तर अशा शासनकर्त्यामध्ये वाईट गुण निर्माण होतात. कारण त्यांच्यामध्ये राजकीय सद्गुण लयाला गेलेले असतात. त्यांच्या हातून त्यांचे राज्य काढून घेऊन ईश्वर दुसऱ्या एखाद्या जनसमूहातील शासकाच्या स्वाधीन करतो, त्यांना अशा शक्तींच्या लोकसमूहांच्या अधीन करतो, ज्यांच्यामध्ये वर उल्लेखित सद्गुण असतात. त्यांच्या कुकृत्यांमुळे त्यांची समृद्धी, त्यांचा मानसन्मान सर्वकाही त्यांना गमवावे लागते. पवित्र कुरआनात असे म्हटले आहे की, “जेव्हा आम्ही एखाद्या देशाला, राष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचे ठरवतो तेव्हा त्या राष्ट्रात धनसंपन्न लोकांची संख्या काढतो, मग असे लोक कुकर्म करू लागतात आणि त्यासाठी त्यांच्यावर प्रकोप कोसळवतो. त्यांना नेस्तनाबूद करून टाकतो.” एखाद्या समुदायाची सत्ता काढून टाकण्याचे मोठे संकेत असे की तो समुदाय आपल्या राज्यातील विद्वान, ज्ञानसंपन्न आणि लोकहितासाठी झटणारे, मानवतेच्या कल्याणासाठी वाहून घेतलेल्यांचा मानसन्मान करत नाही. एखाद्या समुदायात अशी वृत्ती दिसायला सुरुवात झाली तर त्या समुदायाचे त्या अनुषंगाने त्या राष्ट्राचे पतन जवळ आहे असे समजावे. ज्या समुदायाचे ईश्वर काही वाईट करण्याचे ठरवतो तेव्हा कोणतीही शक्ती त्या समुदायाला, राष्ट्राला वाचवू शकत नाही. पराभूत राष्ट्र लवकरच नामशेष लोते.

गुलाम राष्ट्र सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्वाखाली गेले असल्याने त्यांच्या अमलाखाली असते. त्यांच्याच मेहेरबानीने ते जगू लागते. त्यांचे मनोबल खचून जाते. त्यांची संततीदेखील कमकुवत होत जाते. त्यांचा जन्मदरही खाली होत जातो. ते आळशी बनतात. आळशी झाल्याने आणखीनच धीर खचतो. दुसऱ्या राष्ट्राच्या, लोकसमूहाच्या वर्चस्वाखाली जगत असताना त्यांच्या आपसातील वांशिक संबंध ढिले पडत जातात. त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी होत जाते. अशा लोकांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या भावना दिवसेंदिवस कमी कमी होत जातात. जगण्यात रस नसतो. ते स्वतःचेदेखील रक्षण करू शकत नाहीत. अशा मनोबलाबरोबरच त्यांची शारीरिक शक्तीदेखील कमकुवत होत जाते. कारण सत्ताधारी समूह त्यांच्या गत वैभवाला नष्ट करू पाहात आहे. कोणत्याही आक्रमण करणाऱ्या शक्तीसमोर ते आत्मसमर्पण करत राहतात.

पराभूत राष्ट्र-जनसमुदाय आपल्यावर ताबा मिळविलेल्याच्या आहारी जातात. फक्त शारीरिक गुलामीच नव्हे तर मानसिक गुलामीसुद्धा पत्करतात. त्याचा असा गैरसमज झालेला असतो की ज्यांनी त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे त्यांच्यामध्ये खरेच कमालीचे सामर्थ्य असेल. ही गोष्ट त्यांच्या मनामध्ये घर करून बसल्यानंतर तो विजयी राष्ट्राकडे आकर्षित होत जातो. त्याची प्रत्येक कृती आणि उक्ती त्यांना लोभनीय वाटू लागते. त्यांच्यासारखेच जगणे अंगीकारण्याच्या प्रयत्नात असतात. स्वतः आपल्यामध्ये त्याला अवगुण दिसू लागतात आणि स्वतःशीच ते घृणा करू लागतात.

(संदर्भ- इब्ने खल्दून, मुकद्दमा भाग-१)

संकलन – सय्यद इफ्तिखार अहमद


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget