Latest Post


माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांचे कथन आहे.

ते सर्व अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे ऐकणे व आज्ञापालनासाठी प्रतिज्ञा करीत असत तेव्हा ते म्हणत, ‘‘असेसुद्धा सांगा की जितके काही माझ्याकडून शक्य आहे.’’ (हदीस : मुस्लिम)

स्पष्टीकरण

हदीसकथन करणाऱ्यांचे वर्णन आहे की जेव्हा आम्ही यावर प्रतिज्ञा घेत असू की आम्ही आदेशपालन करू आणि त्यास स्वीकारू आणि त्यानुसार अनुसरण करू. तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) असे सांगत असत, ‘‘तुमच्या प्रतिज्ञेत या शब्दांची भर टाका की आम्ही आज्ञापालन आमच्या सामथ्र्यानिशी करू.’’ ही खरे तर पैगंबरांची करुणा होती. त्यांची अपेक्षा होती की एखादे कार्य त्या व्यक्तीच्या सामथ्र्यापलीकडचे असेल तर तो मनुष्य त्या कार्यासाठी अल्लाहकडे अपराधी ठरू नये.जो मैं ये साफ-साफ कह दूं 

जो है फर्क तुझ में मुझ में 

तेरा दर्द-दर्द-ए-तनहा,

मेरा ग़म गम-ए-ज़माना

अनेकांना हे सत्य माहित नसेल की  जगामध्ये इस्लाम स्विकारणारी पहिली व्यक्ती महिला होती. पहिली व्यक्ती जिची संपत्ती इस्लामच्या प्रसारासाठी उपयोगी ठरली ती महिला होती. एवढेच नव्हे तर इस्लामच्या नावावर लिंच झालेली पहिली शहीद व्यक्तीसुद्धा महिला होती. प्रेषित सल्ल. हे जेव्हा गारे हिरा मधून जिब्राईल अलै. यांची भेट घेऊन घाबरलेल्या अवस्थेत घरी आले तेव्हा त्यांना दिलासा देणारी पहिली व्यक्तीही  महिला होती. एवढेच नव्हे तर हजरत उमर बिन खत्ताब रजि. सारख्या रागीट, कनखर आणि कट्टर मूर्तीपूजकाला इस्लाममध्ये येण्याची दावत देणारी पहिली व्यक्तीसुद्धा महिलाच होती. सर्व प्रथम ईस्लाम स्विकारणाऱ्या व प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना दिलासा देणाऱ्या आणि आपली  संपत्ती इस्लामच्या प्रसारासाठी दान करणाऱ्या महिलेचे नाव हजरत खतिजतुल कुब्रा रजि. आहे. तर पहिल्या शहीद महिलेचे नाव हजरत सुमैय्या रजि. होत्या. हजरत उमर बिन खत्ताब रजि. यांना इस्लामची दावत देणाऱ्या महिलेचे नाव फातेमा बिन खत्ताब रजि. असे होते.

इस्लामच्या सुरूवातीच्या काळात महिलांनी इतरांपर्यंत सत्याचा संदेश पोहोचविण्यामध्ये जी चमकदार कामगिरी केली त्याचा विसर आजच्या मुस्लिम महिलांना कसा पडला याचेच आश्चर्य वाटते. आज महिला या फक्त गृहिणी म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यातच समाधान मानतात. वास्तविक पाहता शारीरिक रचना व त्या अनुकूल करावयाची  कामांची जबाबदारी वगळता इस्लाममध्ये स्त्री-पुरूषांदरम्यान कोणताच भेद नाही. बाकी जबाबदाऱ्या सारख्याच आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची जबाबदारी इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची आहे. ही जबाबदारी दोघांचीही आहे. पुरूषांना तर या जबाबदारीचा काही प्रमाणात तर अंदाज आहे मात्र महिलांमध्ये या जबाबदारी संबंधी मोठी गफलत दिसून येते. याच गफलतीतून बाहेर काढण्यासाठी आणि महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या आठवड्यात चर्चेसाठी हा विषय निवडला आहे.

इस्लाममध्ये स्त्री-पुरूषांचे अनेक कर्तव्य समान आहेत. उदा. शिक्षण घेणे दोघांचेही कर्तव्य आहे. या संदर्भात प्रेषित सल्ल. यांनी  फर्माविले आहे की, ’’शिक्षण घेणे हे प्रत्येक स्त्री पुरूषांना अनिवार्य आहे.’’ महिलांना गृहिणीची भूमिका बजावतांना मल्टी टास्कींग (एकाच वेळी अनेक कामं) करावी लागते. त्यांना जर का इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्यावर असलेल्या पैगंबरीय जबाबदारीची व्यवस्थित जाणीव करून दिली तर मला सूर्य तेजस्वी असण्यावर जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास महिला ह्या आपली ही जबाबदारी पुरूषांपेक्षा अधिक चांगल्यापणे पार पाडतील यावर आहे. कारण जमाअते इस्लामी  हिंद महाराष्ट्राच्या महिला विभागाने, जो की या जाणीवेने ओतप्रोत भरलेला आहे, नेहमी इस्लामचा संदेश इतर महिलांपर्यंत पोहोचविण्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे. अलिकडेच म्हणजे 22 ते 31 जानेवारी 2021 दरम्यान राबविण्यात आलेल्या ’अंधारातून प्रकाशाकडे’ या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रभर ज्या उत्साहाने त्यांनी काम केले ते पुरूषांपेक्षा कमी तर नव्हतेच उलट त्यांच्यापेक्षा काकणभर उजवेच होते. हा त्यांच्या मल्टि-टास्कींग अ‍ॅबिलिटीचा करिश्मा होता. सत्याचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे ही जबाबदारी स्त्रियांवर साक्षात परमेश्वराने टाकलेली आहे, याचे पुरावे खालीलप्रमाणे.

 पैगंबरीय जबाबदारी

कुरआनमध्ये म्हटलेले आहे की - 

1. ’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही लोक श्रद्धावंत देखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.’’  (सुरे आलेइमरान :110)

2. ’’सद्वर्तनाचे आवाहन करणारा व चांगुलपणाचा आदेश देणारा, तसेच दुराचाराचा प्रतिबंध करणारा एक गट तुमच्यात अवश्य असला पाहिजे, अशा लोकांना साफल्य लाभेल.’’  (सुरे आलेइमरान :104). 

वरील दोन्ही आयातींमध्ये असे कुठेच म्हटलेले नाही की, सदाचाराचा आदेश देण्याची जबाबदारी फक्त पुरूषांची आहे. याचाच अर्थ ही जबाबदारी महिलांची सुद्धा आहे. कारण जनसमुदाय आणि गट या दोन्ही शब्दात स्त्री आणि पुरूष दोहोंचाही समावेश होतो. 

3. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ’’ ऐ मुहम्मद सल्ल. ! ची लाडकी लेक फातेमा रजि. आणि मुहम्मदची लाडकी आत्या सफिया रजि. तुम्ही दोघी नरकापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करा. कारण माझ्याशी तुमचे असलेले नाते त्या ठिकाणी तुमच्या कामी येणार नाहीत.’’ (संदर्भ : औरत और इस्लामी इन््नलाब, लेखक सय्यद असद गिलानी, पान क्र. 13).

4. याशिवाय, प्रेषित सल्ल. यांनी आपल्या शेवटच्या हज यात्रेच्या अंतिम पाडावामध्ये अराफतच्या मैदानात एका टेकडीवर उभे राहून जवळ-जवळ सव्वा लाख मुस्लिमांसमोर बोलताना हा आदेश दिला होता की, ’’तुम्ही सर्व लोक जे या ठिकाणी उपस्थित आहात मी दिलेला इस्लामचा हा संदेश, जे या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांच्यापर्यंत

ठीक त्याच शब्दांत पोहोचवा ज्या शब्दात मी तुमच्यापर्यंत पोहोचविलेला आहे.’’

प्रेषितांच्या या आदेशाचा अर्थ असा आहे की, इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याचे कर्तव्य सर्वांचेच आहे. त्यात स्त्री-पुरूष असा भेद नाही. सर्वसाधारण मुस्लिम स्त्रियांमध्ये या कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याची मोठी जबाबदारी तहेरीके इस्लामी महाराष्ट्राच्या महिला विभागावर आहे. 

5. ’’म्हणून तुम्ही उपदेश करा, जर उपदेश लाभदायक असेल.’’ (सुरे अलआला:9).

माणसाची मनस्थिती सारखी बदलत असते, अशावेळेस कोणती घटिका असेल ज्यात तो उपदेश स्विकारेल हे सांगता येण्यासारखे नाही म्हणून सातत्याने सत्याचा संदेश देत राहणे हे स्त्री-पुरूष दोघांचेही आद्य कर्तव्य आहे, हे तहेरीके इस्लामीच्या भगिनींनी लक्षात ठेवायला हवे. मुळात हे काम कठीण आणि व्यापक आहे म्हणून हे एकट्याने करता येत नाही. त्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज  आहे आणि त्यासाठी जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र महिला विभाग हे अत्यंत उत्कृष्ट व्यासपीठ आहे.

महिलांना या कामात येणाऱ्या अडचणी

या कामाचे महत्त्व अधोरेखित झाल्यावर हे काम करण्यासाठी ज्या महिला आणि तरूणी पुढे येतील त्यांच्या मार्गात खालीलप्रमाणे अडचणी येण्याची शक्यता आहे. 

1. पुरूषी मानसिकता :- महिलांना या कामी सर्वात मोठी अडचण त्यांच्याच घरातील पुरूषांकडून निर्माण होण्याची शक्यता आहे. सामान्यतः मुस्लिम पुरूष हे महिलांसंबंधी मोठे पझेसिव्ह (वर्चस्ववादी) असतात. घरातील महिलांना या कामी बाहेर जाण्याची परवानगी देतांना त्यांच्या मनात अनेक शंका, कुशंका जन्म घेतात. म्हणून ते त्यांना बाहेर जाऊ देण्यासाठी उत्सुक नसतात. म्हणून महिलांना त्यांना या कामाचे महत्त्व पटवून देऊन हे काम करण्याची परवानगी मिळविताना त्यांचे कसब पणाला लावावे लागेल, ईश्वराकडे दुआ मागावी लागेल. मला विश्वास आहे की ज्या प्रमाणे महिला विभागाच्या महिला अतिशय सुरक्षित वातावरणात आपले कर्तव्य बजावत आहेत याचे उदाहरण महिलांनी आपल्या घरातील पुरूषांसमोर ठेवल्यास ईश्वराच्या कृपेने ते या कामासाठी त्यांना परवानगी देतील. 

2. महिलांची गफलत :- दूसरी सर्वात मोठी अडचण स्वतः महिलांची मानसिकता आहे. दावते इस्लामीचे काम हे महिलांचेही आहे याचा मागमूससुद्धा बहुतांश महिलांना नाही. त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याचे मोठे कठीण आव्हान तहेरीके इस्लामीच्या महिलांसमोर आहे. रात्रंदिवस  प्रयत्न करून त्यांना हे आव्हानात्मक काम पूर्ण करावे लागेल. त्यासाठी सुरूवात आपल्या घरातील महिलांपासून करावी लागेल. त्यानंतर शेजारी-पाजारी आणि इतर नातेवाईक महिलांसमोर अतिशय चांगल्या पद्धतीने आपले म्हणणे मांडावे लागेल. 

3. शेजाऱ्यांचे टोमणे :- भारतीय मुस्लिम समाज हा अनेक गटांमध्ये विभागला गेलेला असून, जमाअते इस्लामी हिंद सोडल्यास इतर कोणत्याही गटाकडे सत्याचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्याची सुसंघटित योजना तसेच यंत्रणा नाही. (अपवाद खेरीज करून) म्हणून महिला जेव्हा या कामासाठी बाहेर पडतील तेव्हा शेजारी-पाजारी महिला त्यांचा संदेश एक तर ऐकण्याच्या मनस्थितीत  नसतील दूसरे त्यांच्या उत्साहावर पाणी  टाकण्याचे काम मात्र व्यवस्थित करतील. या स्थितीला खंबीरपणे सामोरे जाऊन तहेरीकी (चळवळीतील)महिलांना आपले काम सुरूच

ठेवावे लागेल. त्यासाठी त्यांना प्रेषित सल्ल. व महिला साहबियात रजि. यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्यावी लागेल. त्यांना अगोदर प्रेषित सल्ल. आणि सहाबियात रजि. यांचे चरित्र आवर्जुन वाचावे लागेल.

या कार्यामुळे होणारे दिव्य फायदे हे कठीण काम केल्याने होणाऱ्या फायद्यांचे वर्गीकरण दोन गटात करता येईल. पहिल्या गटात आपल्या स्वतःच्या घरात आणि ज्या मुस्लिम महिलांनी हे काम करण्याची जबाबदारी स्वेच्छेने उचललेली आहे त्यांच्या घरात असलेल्या गैरइस्लामी परंपरा, वाडवडिलांपासून चालत आलेल्या  वाईट चालीरिती बंद पडतील. निकाह सोपा होईल कारण निकाहला्निलष्ट बनविण्यामध्ये पुरूषांपेक्षा जास्त महिलांची भूमिका असते हे सत्य नाकारता येण्यासारखे नाही. याशिवाय, घराचे वातावरण शुद्ध इस्लामी झाल्यामुळे घरातील मुली आणि मुलं हे पुढे चालून चांगले नागरिक बनतील. मुलं रेपिस्ट बनणार नाहीत आणि मुली आई-वडिलांच्या तोंडाला काळे फासले जाईल, अशी कृत्ये करणार नाहीत. आज मुस्लिम समाजामध्ये अशी कोणती वाईट गोष्ट नाही जी इतर समाजामध्ये आहे. अगदी व्याज खाण्यापासून ते पॉर्नमध्ये काम करण्यापर्यंत मुस्लिमांचा सहभाग  नाकारण्यासारखा नाही. सत्याचा संदेश दूसऱ्यांना देतांना त्याचा सर्वात मोठा फायदा हा होतो की, संदेश देणाऱ्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. अनेक मुस्लिम तरूण, तरूणी मोठ्या संख्येने लग्नापूर्वी प्रेमसंबंध ठवेून आहेत जे की, इस्लाममध्ये हराम आहेत, ते कमी होतील. घरेलू हिंसा कमी होईल, आंतरधर्मीय विवाह कमी होतील.  कारण या संबंधामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. सत्याचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास या समस्या आपोआप समाप्त होतील. या चळवळीचा सर्वात मोठा लाभ हा होईल की, इस्लाम हा केवळ ईबादतींपुरता मर्यादित धर्म आहे हा गैरसमज दूर होवून ती एक जीवन जगण्याची एकमेव यशस्वी पद्धत आहे हे महिलांच्या लक्षात येईल. आणि एकदा का मोठ्या प्रमाणात महिलांच्या लक्षात हे सत्य आले की, मुस्लिम समाजामध्ये एक रक्तविरहित अशी सामाजिक क्रांती निर्माण होईल की ज्यामुळे समाज सदाचारी होवून जाईल. त्यातून देशाला प्रामाणिक नागरिक मिळतील आणि कोणत्याही देशासाठी ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. ही उपलब्धी देशाला उपलब्ध करून देण्याचे महान कार्य करण्याची संधी मुस्लिम महिलांकडे चालून आलेली आहे. दूसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रयत्नामुळे ज्यांना इस्लामची समज मिळेल ते त्यांच्या पारलौकीक जीवनामध्ये एक मोठी उपलब्धी ठरेल. म्हणून ईश्वराकडे प्रार्थना करतो की, ’’ऐे अल्लाह! आमच्या भगिनींना सत्याचा संदेश इतर महिलांपर्यंत पोहोचविण्याची सद्बुद्धी व शक्ती दे.’’ आमीन. 

- एम.आय.शेखबंधुनो! तुम्ही स्वत:ला मुस्लिम म्हणून संबोधता आणि तुमचा विश्वास आहे की अल्लाहची मुस्लिमावर कृपा असते. परंतु जरा डोळे उघडून पाहा की काय खरोखर अल्लाहची कृपा तुमच्यावर अवतरित होत आहे? पारलौकिक जीवनात जे काही घडेल ते तुम्ही नंतर पहालच, परंतु या जगात तुमची जी स्थिती आहे त्यावर दृष्टी टाका. या हिंदुस्थानात (लक्षात असावे की ही प्रवचने त्या काळात लिहिली गेली होती जेव्हा हिंदुस्तानची फाळणी झाली नव्हती.) तुमची संख्या नऊ कोटी आहे. तुमची इतकी मोठी संख्या आहे की जर एका एका व्यक्तीने एक एक खडा टाकला तर पर्वत बनेल, परंतु जेथे इतके मुस्लिम आहेत तेथे अनेकेश्वरवादी राज्य करीत आहेत. तुमच्या माना त्यांच्या मुठीत आहेत की तुम्हाला त्यांनी हवे तिकडे वळवावे. तुमचे मस्तक जे अल्लाहशिवाय कोणासमोर नमत नसे ते आता मनुष्यासमोर नमत आहे. तुमची ती प्रतिष्ठा मातीत मिसळून टाकली जात आहे. तुमचा हात जो सदैव उंच राहत असे आता तो खाली असतो आणि तो अनेकेश्वरवाद्यांसमोर पसरला जातो. अज्ञान, गरीबी व कर्जबाजारीने तुम्हाला सर्वत्र अपमानित व लज्जित करून सोडले आहे. काय हीच अल्लाहची कृपा आहे? ही कृपा नव्हे तर हा उघड प्रकोप आहे. हे किती आश्चर्य आहे की मुस्लिमावर अल्लाहचा प्रकोप व्हावा! मुस्लिम आणि तो अपमानित व्हावा! मुस्लिम आणि तो गुलाम असावा! हे तर अशक्य कोटीचे आहे की एखादी वस्तु पांढरी शुभ्र आहे व काळीकुट्टही आहे. मुस्लिम अल्लाहला प्रिय असतो, मग अल्लाहचा प्रिय जगात तो कसा अपमानित व तुच्छ असू शकेल? काय तुमचा अल्लाह अत्याचारी आहे की तुम्ही तर त्याचा अधिकार ओळखावा, त्याच्या आज्ञेचे पालन करावे आणि त्याने अवज्ञा करणाऱ्यांना तुमच्यावर शासक बनवावे? आणि तुम्हाला मात्र आज्ञाधारकतेचा मोबदला म्हणून शिक्षा द्यावी? तुमचा विश्वास आहे की अल्लाह जुलूम करणारा नाही आणि तुमची खात्री आहे की अल्लाहच्या आज्ञापालनाचा मोबदला अपमान म्हणून मिळू शकत नाही. तर तुम्हाला हे स्वीकार करावे लागेल की मुस्लिम असण्याचा जो तुम्ही दावा करता त्यातच काहीतरी चूक आहे. सरकारी कागदपत्रात तर तुमच्या नावाची नोंद मुस्लिम म्हणून अवश्य केली जाते. परंतु अल्लाहच्या न्यायालयात इंग्रज सरकारच्या दफ्तराच्या सनदीवर निर्णय केला जात नाही. अल्लाह आपला वेगळाच दफ्तर ठेवतो. त्यात शोधा की तुमचे नाव आज्ञाधारकाच्या यादीत नोंदले आहे की अवज्ञाकारींच्या यादीत?

अल्लाहने तुमच्याकडे ग्रंथ पाठविला आहे जेणेकरून तुम्ही हा ग्रंथ वाचून आपल्या स्वामीस ओळखावे आणि त्याच्या आज्ञापालनाची पद्धत समजून घ्यावी. काय तुम्ही कधी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की या ग्रंथात काय लिहिले आहे? अल्लाहने आपल्या प्रेषितांना तुमच्याकडे पाठविले जेणेकरून त्यांनी तुम्हाला आज्ञाधारक (मुस्लिम) बनण्याची पद्धत शिकवावी. काय तुम्ही कधी हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला की त्याच्या प्रेषितांनी काय शिकविले आहे? अल्लाहने तुम्हाला या जगात व पारलौकिक जीवनात प्रतिष्ठा प्राप्त करण्याची एक आदर्श जीवनपद्धत दाखविली. काय तुम्ही त्यावर चालता? ज्यांच्यामुळे मनुष्य या जगात व पारलौकिक जीवनात लज्जित होतो. काय तुम्ही अशा कामापासून अलिप्त राहता? सांगा, तुमच्यापाशी याचे काय उत्तर आहे? जर तुम्ही हे मान्य करता की तुम्ही अल्लाहचा ग्रंथ आणि त्याचे प्रेषित (मुहम्मद स.) यांच्या जीवनापासून कोणतेही ज्ञान प्राप्त केले नाही आणि त्यांनी दाखविलेल्या पद्धतीचे अनुसरणसुद्धा केले नाही, तर तुम्ही आज्ञाधारक (मुस्लिम) तरी कुठे झाला की तुम्हाला याचा चांगला मोबदला मिळेल? ज्या प्रकारचे तुम्ही आज्ञाधारक (मुस्लिम) आहात त्याच प्रकारचा मोबदला तुम्हाला मिळत आहे आणि त्याच प्रकारचा मोबदला तुम्ही पारलौकिक जीवनात प्राप्त कराल.

यापूर्वी मी सांगितले आहे की मुस्लिम व अनेकश्वरवाद्यामध्ये केवळज्ञान व कर्माशिवाय अन्य कोणताही फरक नाही. एखाद्या माणसाचे ज्ञान व कर्म अनेकेश्वरवादीप्रमाणेच असेल आणि स्वत:ला तो मुस्लिम म्हणवितो तर तो साफ खोटे बोलत आहे. अनेकेश्वरवादी पवित्र कुरआनचे पठण करीत नाही आणि त्याला माहीत नसते की यात काय लिहिले आहे. हीच स्थिती जर मुस्लिमाचीसुद्धा असेल तर त्याला काय म्हणून मुस्लिम म्हणावे? अनेकेश्वरवादीला जाणीव नसते की प्रेषित (मुहम्मद स.) यांची काय शिकवण आहे आणि त्यांनी ईश्वरापर्यंत पोहचण्याचा कोणता सरळ मार्ग दाखविला आहे. मुस्लिमसुद्धा त्याच्याप्रमाणे अज्ञानी असेल तर तो कसा मुस्लिम असू शकतो? अनेकेश्वरवादी ईश्वराच्या मर्जीप्रमाणे चालण्याऐवजी स्वत:च्या मर्जीप्रमाणे चालतो. मुस्लिमसुद्धा त्याच्या व आपल्या मताप्रमाणेच चालणारा असेल, त्याच्याप्रमाणेच अल्लाहकडून बेपर्वा व आपल्या इच्छेचा गुलाम असेल तर त्याला स्वत:ला मुस्लिम (अल्लाहचा आज्ञाधारक) म्हणण्याचा काय अधिकार आहे? अनेकेश्वरवादी हलाल (धर्मसंमत) व हराम (धर्मनिषिद्ध) मध्ये फरक करीत नाही आणि ज्या कामात स्वत:ला फायदा व गोडी वाटेल त्याचा अवलंब करतो, मग अल्लाहच्या दृष्टीने ते हलाल असो की हराम. आणि असाच व्यवहार मुस्लिमाचासुद्धा असेल तर त्याच्यात व अनेकेश्वरवाद्यामध्ये फरक तो कोणता? याचा अर्थ असा की मुस्लिमसुद्धा इस्लामच्या ज्ञानापासून तितकाच कोरा असेल जितका की अनेकेश्वरवादी असतो, आणि मुस्लिमसुद्धा ते सर्वकाही करतो जे अनेकेश्वववादी करतो तर त्याला अनेकेश्वरवाद्याच्या तुलनेत श्रेष्ठत्व का प्राप्त व्हावे? अंतिमदिनी त्याचा निवाडा अनेकेश्वरवाद्याप्रमाणेच का केला जाऊ नये? ही गोष्ट अशी आहे की जिचा विचार शांत मनाने आम्ही सर्वांनी केला पाहिजे.


माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे.


पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘कोणीच सच्चा मुस्लिम असा नाही ज्याला मी या जगात व पारलौकिक जीवनात सर्वाधिक प्रिय नसेन. जर इच्छिता तर वाचा की पैगंबर ईमानधारकांसाठी त्यांच्या जिवांपेक्षासुद्धा अधिक निकट आहे.’’

....म्हणून ज्या ईमानधारकास मृत्यु येतो आणि तो संपत्ती मागे सोडतो तर त्याचे जिवंत नातेसंबंधी त्याचे वारसदार असतील आणि जो कोणी मागे कर्जाची रक्कम सोडून जाईल किंवा लहान मुलं मागे सोडले आणि ते माझ्याकडे आले तर मी त्यांच्यासाठी जबाबदार आहे.’’ (हदीस : बुखारी)

स्पष्टीकरण

म्हणजे त्याने त्याच्या मागे धनसंपत्ती सोडली असेल तर ती त्या मृताच्या वास्तविक वारसदारांना मिळेल. जर कोणी आपल्या मागे कर्ज आणि लहान मुलं सोडून जाईल तर अशा मृताचा स्वजन व आत्मिय स्वत: पैगंबर मुहम्मद (स.) हे आहेत. त्याचे कर्ज फेडणे व त्याच्या लहान मुलांचे पालनपोषण करणे हे पैगंबरांचे दायित्व आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी इस्लामी राज्याच्या अध्यक्षाच्या अधिकारात वरील विवेचन केले आहे. यावरून स्पष्ट कळून येते की शासनदायित्व अतिविस्तृत व महत्त्वपूर्ण असते. यावरून इस्लामी राज्याची मानसिकतासुद्धा कळून येते.


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget